Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

गिसाका कामगारांचे ९ पासून आंदोलन

$
0
0
गिरणा सहकारी साखर कारखाना कामगारांच्या थकीत रक्कम मिळवण्यासाठी व्यवस्थापनाशी वेळोवेळी चर्चा करूनही कामगारांची देय रक्कम देण्यासाठी वेळ काढूपणामुळे कामगारांनी ९ जानेवारीपासून कारखान्यावर गेट बंद आंदोलनाचा इशार दिला असल्याची माहिती कामगार युनियनचे नेते सुरेश पवार यांनी दिली.

लासलगावमध्ये चोरटे पुन्हा सक्रिय

$
0
0
लासलगाव शहरातील मध्यवर्ती भागात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. एका रात्रीत चोरीच्या तीन घटना शहरामध्ये घडल्याने व्यापारीवर्ग तसेच नागरिकही भितीच्या सावटाखाली वावरत आहेत. पोलिसांनी तातडीने उपाययोजना करून अशा घटनांना आळा घालावा, अशी मागणी केली जात आहे.

एसटी हद्दीचा वाद प्रवाशांना भोवला

$
0
0
एसटी महामंडळाचा सुरक्षा साप्ताह सुरू असतानाच लासलगाव बस आगाराच्या पुणे-लासलगाव या खटारा झालेल्या बसमधील प्रवाशांना बस बंद पडल्याने व आगार हद्दीच्या वादामुळे तीन तास ताटकळत थांबावे लागल्याचा दिव्य अनुभव आला आहे.

वेणुनाद तयारी अंत‌िम टप्प्यात

$
0
0
आर्ट ऑफ लि‌व्हींग सोसायटीतर्फे श्री श्री रविशंकर व प्रख्यात बासरीवादक हरिप्रसाद चौरसीया यांच्या उपस्थितीत १२ जानेवारी रोजी होणाऱ्या वेणुनाद कार्यक्रमाची तयारी अंत‌िम टप्प्यात आली आहे. चार हजार बासरी वादकांसाठी ३ हजार स्केअर फुटाचा रंगमंच तयार करण्यात येत आहे.

शाहीमार्ग भुजबळांमुळे रेंगाळला

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्राम आणि शाहीमार्गचा प्रश्न रेंगाळण्याला राजकीय आणि प्रशासकीय उदासीनता कारणीभूत असल्याचा आरोप पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

संशोधनावर अधिक भर द्यावा

$
0
0
विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षण कार्यासोबतच संशोधनात्मक कार्यावर अधिक लक्ष केंद्रित करून संशोधन अधिक भक्कम करावे असे प्रतिपादन कुलगुरू प्रा. डॉ. अरुण जामकर यांनी केले.

‘त्या’ संशयिताची आत्महत्या

$
0
0
सातपूरच्या शिवाजीनगर परिसरातील कामगार महिलेचा भरदिवसा खून करून पसार झालेल्या संशयिताने गळफास घेतला. गुरूवारी दुपारी तीनच्या सुमारास निफाड तालुक्यातील पालखेड येथे राहत्या घरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांशी एकमत

$
0
0
‘धनगर समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. मात्र आदिवासी समाजाच्या ७ टक्के आरक्षणाला धक्का न लावता ते दिले जावे अशी माझी आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. आमच्या भूमिकेत विरोधाभास असल्याच्या विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यात तथ्य नाही.’ असा दावा आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी गुरूवारी नाशिकमध्ये केला.

शाहीमार्गाचा तिढा सुटला

$
0
0
आगामी सिंहस्थासाठी प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने सुचविलेल्या शाही मिरवणुकीच्या नव्या मार्गाला महंतांनी अनुमती दर्शविल्याने परंपरागत शाहीमार्गाचा प्रश्नही निकाली निघाला आहे. गत सिंहस्थात चेंगराचेंगरीची घटना घडून २९ भाविकांना जीव गमवावा लागला होता.

सरसंघचालकांनी घेतले दर्शन

$
0
0
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन देवाला अभिषेक केला. मोहन भागवत हे त्र्यंबकजवळील तळवाडे येथील योगविद्या धाम येथे दोन दिवसांपासून मुक्कामी आलेले आहेत. ते चिंतन शिबिरास आले असल्याचे सांगण्यात येते.

संरक्षणमंत्री पर्रीकर आज नाशकात

$
0
0
केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि हवाई दलप्रमुख अरूप राह शुक्रवारी नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत पहिल्या सुखोई ३० एमकेआय-एसी या लढाऊ विमानाचे हस्तांतरण केले जाणार आहे.

आदिवासींच्या प्रश्नांवर मंथन!

$
0
0
आदिवासी भागामधील बालमाता व कुपोषणाच्या निर्मूलनाबाबत भाजप सरकारही गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. आदिवासींचे प्रश्न त्यांच्यापर्यंत जावून सोडविणे अपेक्षित असताना, विभागाने या प्रश्नांवर काथ्याकूट करण्यासाठी लोणावळ्यासारख्या थंड हवेच्या ठिकाणाची निवड केली.

साधुग्राम भाडेतत्वावरच!

$
0
0
सिंहस्थात साधुग्रामसाठी आवश्यक असणारी जमीन शेतकऱ्यांकडून एक वर्षासाठी भाडेतत्वावर घेण्याचे निश्चित झाले आहे. सिंहस्थ कुंभेमळा पार पडल्यानंतर दोन वर्षांत तिचे कायमस्वरूपी अधिग्रहण केले जाणार असून, शेतकऱ्यांनी त्यास संमती दिल्याची माहिती सिंहस्थ मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री गिरीश महाजन यांनी गुरूवारी दिली.

सिटी सर्व्हे नंबरवरून गोंधळ

$
0
0
सिटी सर्व्हेनंबर २५९ मध्ये अनेक वर्षांपासून नागरिक राहतात. महापालिकेने या झोपडपट्टीला अधिकृत म्हणून घोषित केले आहे. मात्र, ही माहिती हायकोर्टापुढे आणण्यात आली नाही. परिणामी कोर्टाने म्हसोबावाडी झोपडपट्टीला अतिक्रमण ठरवून हटण्यासाठी एका महिन्याची मुदत दिली आहे.

अतिक्रमणधारकांनी घेतला धसका

$
0
0
महापालिकेने गंगापूररोडवर अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू केल्यानंतर त्याचे परिणाम शहरातील अन्य अतिक्रमणधारकांवर पडतांना दिसून येत आहे. विविध भागात अतिक्रमण मोहिमेबाबत चर्चा होत असून नागरिकांनी स्वतः अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. कॉलेजरोड देखील यास अपवाद नसून बिग बाजार चौकात सध्या हेच चित्र पाहण्यास मिळते आहे.

मांजा विक्रेत्यांवर संक्रांत

$
0
0
मकरसंक्रातीनिमित्त उडविण्यात येणाऱ्या पतंगांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येणार नायलॉन मांज्याची सातपूर महापालिकेकडून जप्ती मोहीम राबविण्यात आली. यात महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ५० पेक्षा अधिक नायलॉन मांज्याचे रीळ जप्त केले आहेत.

मुरुमाची ओव्हरलोड वाहतूक

$
0
0
नाशिकमधील वाढत्या बांधकाम व्यवसायात मुरुमाची मागणी वेगाने वाढू लागली आहे. त्यामुळे शहरात मुरुमाच्या ओव्हरलोड गाड्यांची सर्रासपणे वाहतूक होतांना दिसत आहे. मात्र, प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे.

१३५ भूखंड एमआयडीसीकडे

$
0
0
एमआयडीसीकडून घेतलेले मात्र वापराविना वर्षांनुवर्ष पडून असलेले भूखंड एमआयडीसी पुन्हा आपल्या ताब्यात घेणार असल्याचे प्रादेशिक अधिकारी रामदास खेडकर यांनी सांगितले. यात अहमदनगर व नाशिक जिल्हातील एकूण १३५ भूखंड ताब्यात घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

येवल्यात मांजा तपासणी

$
0
0
संक्रातीत पतंगासाठी नायलॉन मांजा वापरू नये, यासाठी येवला शहर पोलिस व नगरपालिका प्रशासनाने पतंग साहित्य विक्रेत्यांची बैठक येवला शहर पोलिस ठाण्यात बैठक घेऊन नायलॉन मांजा विक्री करू नये, असे आदेश दिले.

शिक्षकासाठी ग्रामस्थ एकवटले

$
0
0
येवला तालुक्यातील एरंडगाव बुद्रुक येथील उर्दू शाळेवरील एक प्राथमिक शिक्षक तात्पुरत्या स्वरुपात केवळ १५ दिवसांसाठी तालुक्यातील दुसऱ्या एका उर्दू शाळेसाठी देण्यात आला. मात्र महिना उलटला तरी ते शिक्षक परत न मिळाल्याने एरंडगाव येथील ग्रामस्थ अन् पालक चांगलेच संतप्त झाले आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images