Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मॉर्निग वॉकवेळी वृद्धेला लुटले

$
0
0
मॉर्निग वॉकसाठी निघालेल्या वृद्धेला फसवून तोतया पोलिसांनी दहा तोळे सोन्याचे दागिने चोरी केले. ही घटना रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भोसला मिलिटरी स्कूलजवळ घडली.

इंदिरानगरला सराफी दुकान फोडले

$
0
0
मुंबई-आग्रा हायवेपासून जवळच असलेल्या तसेच इंदिरानगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या किशोरनगर येथील सराफी दुकान फोडून चोरट्यांनी ७ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरी केले. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

बेलगंगा कारखान्यासाठी पदयात्रा

$
0
0
चाळीसगाव येथील बंद पडलेला बेलगंगा सहकारी साखर कारखाना दीर्घ मुदतीने भाडेतत्त्वावर देण्यात यावा, या मागणीसाठी चाळीसगाव परिसरात शेतकरी, ऊस उत्पादकांनी पदयात्रा सुरू केली. या पदयात्रेस जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

शहरातील शाळांना लाभणार 'आधार'

$
0
0
मशिनींचा आणि मनुष्यबळाच्या तुटवड्यानंतरही सरकारी इमारती, शाळा, कॉलेजांमध्ये आधार केंद्र सुरू करण्याची सूचना सरकारने केल्याने प्रशासनासमोर संकट उभे ठाकले आहे.

केबल चालकांची स्वीच्ड ऑफ 'गेम'

$
0
0
'एसटीबी' (सेट टॉप बॉक्स) बसविण्यासाठी आठ दिवस बाकी असतानाही सातपूरसह शहरातील अनेक भागांत 'एमएसओ'ने (मल्टी सर्व्हिस ऑपरेटर्स) परस्पर केबलचे पारंपरिक प्रक्षेपण (अॅनॉलॉग सिग्नल्स) बंद केले आहेत.

त्र्यंबकला येणार भक्तमेळ्याचे स्वरूप

$
0
0
त्र्यंबकेश्वरातील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात ११ ते १३ एप्रिलदरम्यान विविध कार्यक्रम होणार असल्याने परिसरात भक्तमेळ्याचे स्वरूप येईल. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांनी आवश्यक सुविधांसाठी सज्ज राहण्याची सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी केली.

खुंटलेल्या नियोजनाला जोड विचारांच्या दुष्काळाची

$
0
0
पायाभूत सुविधाच नव्हे, तर प्रत्येक बाबतीत यंत्रणांच्या ठायी नियोजनाचा दुष्काळ दिसून येतो. गेल्या काही वर्षांपासून ज्या वाहतूक प्रश्नावर सर्वाधिक भर दिला जातोय, ते क्षेत्रही यापासून दूर राहिलेले नाही.

गु-हाळ, छळछावणी अन् पीयूसी

$
0
0
निकाल देताना सुप्रीम कोर्ट ठराविक परिस्थिती समोर ठेऊन निर्णय देते. त्यानंतर सुप्रीम कोर्टाचा 'तो' निर्णय देशभरात लागू होतो. कोर्टाचा आदेशाच्या भितीने सरकारी विभाग कारवाईचा बडगा उगारतो.

नाट्य परिषदेवर नाशिकचे वर्चस्व

$
0
0
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंधरा सदस्यांच्या कार्यकारिणीत नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील चौघांना स्थान मिळाल्याने या कार्यकारिणीत नाशिक विभागाचे वर्चस्व निर्माण झाले आहे.

बॉर्ज टाऊनमध्ये वनौषधी वाटिका

$
0
0
वनविकास महामंडळ आणि नव्याने स्थापन झालेला 'टुरिझम फॅन क्लब' यांच्या संयुक्त विद्यमाने बॉईज टाऊन पब्लिक स्कूलमध्ये वनौषधी वाटिका साकारली जाणार आहे. जागतिक वनदिनानिमित्त २५ वनौषधींची स्कूलमध्ये लागवडही करण्यात आली आहे.

स्थायी समितीसाठी धुळवड

$
0
0
स्थायी समितीच्या रिक्त ८ जागांसाठी २८ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीबाबत सोमवारी सायंकाळी महापौरांनी सर्व पक्षांच्या गटनेत्यांबरोबर बैठक घेतली. या बैठकीत कोणत्याही पक्षाने आपल्या उमेदवाराचे नाव घोषित केले नाही.

होळीपूर्वीच पेटले राजकीय वातावरण

$
0
0
आज (मंगळवार) साजऱ्या केल्या जाणा-या होळी या सणाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेकडून शहरभर होळी करण्यात येणार आहे. मात्र राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेससह भाजप व शिवसेनेकडून हा दिवस राजकारणाचा नाही, असे सांगत पक्षातर्फे होळी करणार नसल्याचे सांगितले.

दारणेतून आज पाणी सोडणार

$
0
0
मराठवाड्यातील वैजापूर, गंगापूर भागासाठी दारणा धरणातून मंगळवारी सकाळच्या सुमारास पाणी सोडण्यात येणार आहे. नदीपात्रालगत वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला असल्याची खात्री केल्यानंतरच पाणी सोडले जाणार आहे.

टक्केवारीच्या खेळात ‘अळीमिळी गुपचिळी’

$
0
0
गणवेश खरेदीच्या प्रकरणात सरळसरळ भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते. मात्र त्याविषयी लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाने अळीमिळी गुपचिळीची भूमिका स्वीकारली आहे.

परदेशी मायेने भरले पंखात बळ!

$
0
0
निरागसता ‘त्यांच्या’ चेहऱ्यावर ठासून भरलेली... बालसुलभ म्हणतात ना, तशा ‘त्यांच्या’ सर्वच हालचाली... पण जन्मानंतर काहीच दिवसांनी त्यांच्यापुढे ‘अनाथ’ हे लेबल लागलं.

सुशील आय इन्स्टिट्यूट नाशिककरांच्या सेवेत

$
0
0
नेत्रविकारांवर सर्व प्रकारचे अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध असलेले सुशील आय इन्स्टिट्यूट नाशिककरांच्या सेवेत दाखल झाले आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या इन्स्टिट्यूटचे उद्घाटन झाले.

‘सातपूर प्रभागा’त पाणी पेटले

$
0
0
सातपूर परिसरातील विविध नगरांमध्ये कमी किंवा अधिक दाबाने पाणी येत आहे. तसेच अनेक नगरांना तीन ते चार दिवस पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याचे नागरिकांचे हाल होत आहेत.

‘त्या’ प्रकारापासून शिक्षण विभाग अनभिज्ञ

$
0
0
शाळेतील विद्यार्थिनींशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकावर झालेल्या पोलिस कारवाईबाबत शिक्षण विभाग अद्याप अनभिज्ञच आहे. शिक्षण विभागाच्या सूचनेकडे संस्थेचे लक्ष लागले असताना या घटनेबद्दल माहिती नसल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एन. बी. औताडे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

पुस्तकांविना रखडणार व्हेकेशन बॅच?

$
0
0
सायन्स आणि गणित विषय वगळून दहावीच्या सर्व विषयांच्या अभ्यासक्रमात यंदापासून बदल करण्यात आला आहे. परंतु या बदललेल्या अभ्यासक्रमाची पुस्तकेच उपलब्ध नसल्याने विविध शाळांमध्ये एप्रिलपासून सुरू केल्या जाणाऱ्या व्हेकेशन बॅच रखडणार की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

रेल्वेमार्ग निधीसाठी मध्य प्रदेश तयार

$
0
0
मनमाड - धुळे - नरडाणा-इंदूर या रेल्वे मार्गासाठी मध्य प्रदेश सरकार २५ टक्के निधी देण्यास तयार असल्याची माहिती भाजपचे दिंडोरी मतदारसंघाचे खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी पत्रकरांशी बोलताना दिली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images