Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बसस्थानक परिसरातील अतिक्रमणेही हटविणार

$
0
0
परिसरातील अतिक्रमणांवर बुधवार (ता. २१) पासून हातोडा पडणार असून, महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जय्यत तयारी केली आहे. नाशिकरोड बसस्थानक परिसरातील गाळेही हटविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ग्रामीण पोलिस उपविभाग कार्यालयाचे स्थलांतर?

$
0
0
ग्रामीण पोलिसांचे उपविभाग कार्यालय गडकरी चौकातील परिमंडळ एकच्या जागेत स्थलांतरीत करावे, असा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाला प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

झेडपीच्या विकासकामांचा विभागीय आयुक्त घेणार आढावा

$
0
0
नाशिकचे विभागीय आयुक्त एकनाथ डवले येत्या मंगळवारी (ता.२०) जिल्हा परिषदेतील कामकाजासह विकासयोजनांचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे विभागप्रमुखांनी आयुक्तांपुढे माहिती सादर करण्यासाठी कागदपत्रांची जमवाजमव सुरू केली आहे.

झेडपीत लघुपाटबंधारेच्या निधीवरून रंगले राजकारण

$
0
0
जिल्हा परिषदेत शाळा दुरुस्ती निधी पळविण्याचे राजकारण थांबत नाही तोच आता लघुपाटबंधारे विभागाला मिळालेल्या १४ कोटींच्या निधीवरून राजकारण सुरू झाले आहे. लघुपाटबंधारेच्या या निधीतून तब्बल १९३ बंधाऱ्याचे काम हाती घेतले जाणार आहे.

जुन्या नाशकात अतिक्रमण मोहिमेचा धसका

$
0
0
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचा जुने नाशिक परिसरातील अतिक्रमणधारकांनी धसका घेतला आहे. पहा आणि प्रतीक्षा करा (वेट अॅन्ड वाच) यानुसार अतिक्रमण निर्मूलन पथक आपल्याकडे धडकते याची रोज खात्री करून घेतली जात आहे.

मुंबई अर्ध मॅरेथॉनमध्ये कविताला सुवर्णपदक

$
0
0
महाराष्ट्राराची अग्रणी धावपटू व नाशिकची सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊत हिने मुंबई येथे झालेल्या अर्ध मॅरेथॉनमध्ये सुवर्णपदक मिळवले. तिने २१ किलोमीटर अंतर अंतर विक्रमी वेळेत पूर्ण करून पुन्हा एकदा नाशिकचे नाव उज्वल केले.

नाशिककर यंदा फेस्टिव्हल्सला मुकणार

$
0
0
दरवर्षी नाशिककरांना सांस्कृतिक तसेच विविध प्रकारच्या मनोरंजनाचा आनंद देणाऱ्या नाशिक आणि वाइन फेस्टिव्हलला यंदा मुकावे लागणार आहे. जिल्ह्यात झालेल्या गारपिटीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही फेस्टिव्हल आयोजित न करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.

रहिवाशी भागात थांबणाऱ्या कंटेनर चालकांना नोटिसा

$
0
0
रहिवाशी भागाला लागून उभ्या राहत असलेल्या कंटेनरमुळे नागरिक हैराण झाले होते. याबाबत `मटा`ने कंटेनरमुळे रहिवाशी भागात अडथळा असे वृत्त प्रसिद्ध केले होते. `मटा`च्या वृत्ताची दखल घेत महापालिकेच्या आरोग्य विभागाने कंटेनर चालकांना नोटिसा देत समन्स देण्यात आले.

मागासवर्गीय शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदतवाढ

$
0
0
मागासवर्गीय शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत होती. मात्र, विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी आणि होणारी मागणी लक्षात घेता येत्या ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिकरोड ते जत्रा हॉटेल वाहतूक मार्गात बदल

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नांदुर-मानुर येथे संत जनार्दन पुलाजवळ पूल बांधण्याचे काम सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे जत्रा हॉटेल ते नाशिकरोड मार्गावरील वाहतूक २ फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

तरुणाचा खून : चौघे ताब्यात

$
0
0
माझ्याकडे पाहून का थुंकलास अशी विचारणा करणाऱ्या तरुणाचा धारदार हत्यारांनी वार करून खून करण्यात आला. शनिवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास इंदिरानगरातील रंगरेज मळा परिसरात हा प्रकार घडला. पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

आदिवासी विभागातील ‘त्या’ फाईल्स गायब?

$
0
0
आदिवासी विकास विभागातील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या न्या. एम. बी. गायकवाड चौकशी आयोगाने दाखल झालेल्या ३२ तक्रारींची उलटतपासणी सुरू केली आहे. यात तक्रारकर्त्यांचे जबाब नोंदवण्यासह २९ प्रकल्प कार्यालयांना संबंधीत कालावधीतील भ्रष्टाचाराच्या फाईल्स सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

कातरवाडी होणार जलसमृद्ध

$
0
0
केंद्र सरकारने ‘हमारा जल, हमारा जीवन’ अभियान राबविण्याचा आदेश दिल्यानंतर प्रशासनाने चांदवड तालुक्यातील कातरवाडी या गावाची त्यासाठी निवड केली आहे. त्यामुळे या गावात पाण्याच्या सर्व गरजा भागविण्यासाठीचे उपाय करण्यात येणार आहेत.

गुंडगिरी इथली संपत नाही...

$
0
0
सातपूर भागातील अशोकनगर येथील राधाकृष्णनगरात केवळ गाडीचा धक्का लागल्यावरून चाकूने दोन भावांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यामुळे अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर पोलिसांचा धाकच उरला नाही काय, असा सवाल सर्वसामान्य नागरीक उपस्थित करीत आहेत.

प्लास्टिक ध्वज वापराल,तर कारवाई

$
0
0
आगामी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने प्लास्टिक ध्वजाच्या बंदीची अंमलबजावणी कडक करण्यासाठी शिक्षण संस्थांवरही निशाणा साधला आहे.

दोन अपघातात चार ठार

$
0
0
शहरात रविवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये चार जण ठार झाले तर तीन जण जखमी झाले. याप्रकरणी आडगाव आणि सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आडगाव स्मशान भूमीजवळ भरधाव ट्रक एका नादुरूस्त ट्रकवर आदळल्याने तीन जण ठार आणि तीन जण जखमी झाले.

अतिक्रमणांवर पुन्हा हातोडा

$
0
0
नाशिक महापालिका हद्दीतील व्यावसायिक आणि सोसायटीतल्या अतिक्रमणधारकांना स्वतःहून अतिक्रमण काढण्यासाठी आयुक्तांनी दिलेली आठ दिवसांची मुदत रविवारी संपली आहे.

मक्याचे झाले लाखाचे १२ हजार

$
0
0
जिल्ह्यात २०१३ मध्ये शेतकऱ्यांकडून शासनाने आधारभूत किमंतीत मका खरेदी केली. यात १३१० रुपये क्विंटल दर ठरविण्यात आला. मात्र यापेक्षा कमी दराने मका विकावा लागत आहे.

बांधकामात अडकले येवल्याचे उपजिल्हा रुग्णालय

$
0
0
येवला तालुका ग्रामीण रुग्णालयाची इमारत देखणेपणाने सर्वांनाच आकर्षित करीत असली तरी सुविधा नसलेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयांचा रस्ता धरावा लागत आहे. सहा महिन्यांपूर्वी या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला आहे.

घरकुल लाभार्थी निधीपासून वंचित

$
0
0
त्र्यंबकेश्वर पंचायत समितीत घरकुलाच्या लाभार्थ्यांना वारंवार चकरा मारण्याची वेळ आली आहे. याबाबत गणेशगाव वाघेरे येथील १५६ लाभार्थ्यांनी त्र्यंबकेश्वर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांची भेट घेवून घरकुलाचा हफ्ता देण्याची मागणी केली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images