Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नियमानुसार वाहन नोंदणीसाठी पैसे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

ओरटीओकडून नियमानुसारच नोंदणीचे पैसे घेतले जातात. यात शोरुमचालक ग्राहकडून अतिरिक्त हस्तांतर चार्जेस घेणार असतील तर त्याचा आरटीओचा काही संबध नाही, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) जीवन बनसोड यांनी स्पष्ट केले. यासाठी ग्राहकांनीच वाहन खरेदी करतांना काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी मटाशी बोलतांना केले.

वाहन नोंदणीच्या नावाखाली ग्राहकांची लूट केली जात असल्याचे वृत्त 'मटा'ने नुकतेच प्रसिद्ध केले. यासंदर्भात बनसोड यांना विचारले असता त्यांनी या प्रकराबाबत असहमती दर्शविली. शहरातील शोरुम चालक दुचाकी किंवा चारचाकी वाहने खरेदी करतांना ग्राहकांकडून आरटीओच्या नावाखाली नोंदणी व हस्तांतर चार्जेस म्हणून हजारो रुपयांची लूट करत असतात. याबाबत 'मटा'ने वाहन नोंदणीच्या नावाखाली लूट अशा आशयाचे वृत्त प्रसारित करताच अनेक ग्राहकांनी आपल्या तक्रारी 'मटा'कडे मांडल्या. याबाबत 'आरटीओ' अधिकारी बनसोड यांना विचारला केली असता, त्यांनी वाहनाची नोंदणी करतांना 'आरटीओ'च्या नियमानुसार केली जात असल्याचे सांगितले. तसेच नोंदणी झालेल्या वाहनाची रितसर पावती संबंधित ग्राहकाला दिली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, शोरुमचालकांकडून कोटेशनमध्ये 'आरटीओ'त नोंदंणी व हस्तांतर चार्जेस व प्रत्यक्षात 'आरटीओ'ने दिलेली पावती यामध्ये हजारो रुपयाचा फरक असतो. यामुळे शोरुम चालक हस्तांरण जार्चेसच्या नावाखाली वाहने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लुटत असतील तर त्यात 'आरटीओ'चा काय संबध, असा प्रतिप्रश्न बनसोड यांनी केला. यासाठी ग्राहकाने वाहन खरेदी करतांना शोरुमचालकाने दिलेल्या कोटेशनबरोबर आहे, की चुकीचे याची माहिती घेऊनच वाहने खरेदी करण्याचे आवाहनही बनसोड यांनी केले.

'आरटीओ'च्या नियमानुसारच नोंदणीचे पैसे वाहने खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडून घेतले जातात. यामध्ये ग्राहकांनी वाहने खरेदी करतांना हस्तांतर चार्जेस म्हणजे नेमके, काय याची माहिती घेऊनच वाहने खरेदी केली पाहिजेत. जेणे करून ग्राहकांची फसवणूक होणार नाही.

- जीवन बनसोड,

प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक

चारचाकी वाहन शोरुम चालकांकडून घेतल्यावर आरटीओत नोंदणी व हस्तांतरण चार्जेसची पावती दाखविण्यात आली होती. परंतु, आरटीओ व शोरुमचालकाने दिलेल्या पावतीत हजारो रुपयांचा फरक आहे. यात शोरुम चालकच वाहन हस्तांतरणच्या नावाखाली ग्राहकांची लूट करतात. ते थांबविण्याची गरज आहे.

- अॅड. विनायक पगार,

वाहन खरेदी ग्राहक


‘एनडीसीसी’ बँक निवडणुकीत संभ्रम

$
0
0

म. टा. प्रत‌िन‌िधी, नाश‌िक

नाश‌िक ज‌िल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या न‌िवडणूक कार्यक्रमाची घोषणा करणाऱ्या नोट‌िसीमध्ये व‌िश‌िष्ट मतदानाचा हक्क देणाऱ्या अटी या द‌िशाभूल करीत असल्याची तक्रार ज‌िल्हा बँकेचे माजी संचालक राजेंद्र भोसले यांनी राज्य सहकारी न‌िवडणूक प्राध‌िकरणच्या आयुक्तांकडे केली आहे.

नुकत्याच प्रस‌िध्द केलेल्या नोट‌िसीमुळे काही सभासदांवर अन्याय होणार असून त्यांना मतदानाच्या हक्कापासून वंच‌ित ठेवले जात असल्याचा आरोपही भोसले यांनी केला आहे. ही नोट‌िस मागे घ्यावी, अन्यथा न्यायालयीन मार्ग अवलंब‌िला जाईल असाही इशारा त्यांनी द‌िला आहे.

नाश‌िक ज‌िल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अध‌िकाऱ्यांनी नोट‌िसीच्या माध्यमातून न‌िवडणूक कार्यक्रमाचे न‌ियोजन न‌ुकतेच जाह‌‌ीर केले. यामध्ये मतदारांसाठी देण्यात आलेल्या न‌िकषांमध्ये बँकेच्या खात्यातील व‌िश‌िष्ट ठेवी, खात्यावर होणारे ठराव‌िक कालावध‌ीतील व्यवहार क‌िंवा सभासदाकडे पाच हजार रूपये क‌िंमतीपर्यंत बँकेचे असणारे शेअर्स या न‌िकषांची पूर्तता करणाऱ्या सभासदांना क्र‌ियाशील सभासद ठरवून त्यांना मतदानाचा अध‌िकार देण्यात आल्याचा बोध या नोट‌िसमधून होतो.

या न‌िकषांवर हरकत घेताना माजी संचालक भोसले यांनी आयुक्तांना ल‌िहीलेल्या तक्रारीत १४ जानेवारी २०१५ रोजीच्या नव्या परिपत्रकाचा संदर्भ द‌िला आहे. राज्य सहकारी न‌िवडणूक प्राध‌िकरणचे सच‌िव डॉ. आनंद जोगदंड यांनी या पत्रकामध्ये क्र‌ियाशील सभासदत्व ही बाब या न‌िवडणुकीसाठी लागू नसल्याची बाब मांडली आहे. प्राथम‌िक मतदार यादी तयार करताना या न‌िकषाची नोंद घेण्याचे आवाहनही जोगदंड यांनी केले असल्याचे भोसले यांनी म्हटले आहे. श‌िवाय २०१८ मध्ये होणाऱ्या ज‌िल्हा बँकेच्या न‌िवडणूक‌ीत क्र‌ियाशील सभासदत्वाचा मुद्दा लागू होऊ शकतो. आताच्या न‌िवडणुकांना हा मुद्दा लागू करणे म्हणजे द‌िशाभूल ठरू शकते असाही दावा भोसले यांनी या तक्रारीत केला आहे.

हे संदर्भ लक्षात घेऊन जाहीर करण्यात आलेली नोट‌िस मागे घेण्यात यावी आण‌ि संस्थेची पायाभरणी करणाऱ्या सभासदांना मतदानाच्या हक्कापासून वंच‌ित ठेवले जाऊ नये अन्यथा बँकेच्या सभासदांच्या माध्यमातून कायदेशीर आण‌ि न्यायालयीन मार्ग अवलंब‌िला जाईल, असा इशाराही माजी संचालक राजेंद्र भोसले यांनी द‌िला आहे.

LICच्या नावाने फसवणुकीचा धंदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'तुमची एलआयसी पॉलिसी मॅच्युअर झाली असून बोनस द्यायचा आहे. मी दिल्ली ऑफिसमधून बोलतोय. तुमच्या पॉलिसीची माहिती सांगा....' किंवा 'काही कारणास्तव तुमची पॉल‌िसी रद्द होऊ शकते, तुम्ही पैसे भरा' असे कॉल सध्या नाशिककरांना येत आहेत. हे फसवे कॉल असून पैसे लुटले जाण्याची शक्यता असल्याने त्यास प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन 'एलआयसी'सह पोलिसांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये दिल्ली व परिसरातून फोनवर, मोबाइवर हे कॉल येत आहेत. ९१३६२४७०३६ किंवा ०१४०९३०३३६५८ या नंबरवरून कॉल्स आले आहेत. ग्राहकांना त्यांची एलआयसीची पॉलिसी मॅच्युअर झाल्याचे, अगर बोनस द्यायचा राहून गेल्याचे सांगितले जाते. त्याचा चेक पाठविण्यासाठी पत्ता व अन्य तपशील विचारला जातो. बहुतेकांची पॉलिसी असल्याने नागरिक त्यावर विश्वास ठेवतात. फोन करणारे तुमच्या स्थानिक एजंटाने याबद्दल सांगितले नाही का, अशी उलट विचारणा करून एजंटांना दोषही देतात.

एजंटांना तुमच्या फायद्याशी देणेघेणे नाही, आम्ही कंपनीच्या ऑफिसमधून बोलत असून तुमचे पैसे तुम्हाला मिळवून देत असल्याचे सांगत विश्वास संपादन करतात. त्यानंतर पुन्हा काही काळाने फोन करून चेक तयार असल्याचे सांगतात. मात्र, त्यासाठी एक अडचण असून तुमच्या खात्यात हप्त्याची रक्कम थकीत असल्याचे सांगतात. मिळणाऱ्या बोनसची रक्कम त्यापेक्षा किती तरी जास्त सांगितलेली असते. त्यामुळे तुलनेत कमी वाटणारी हप्त्याची रक्कम भरण्यास ग्राहक तयार होतात. मात्र, त्यांना हे पैसे एलआयसीच्या खात्यात नव्हे; तर त्यांनी दिलेल्या दुसऱ्याच नावाच्या व दुसऱ्याच बँकेत भरण्यास सांगण्यात येते.

आतापर्यंत अशा प्रकारे फसवणूक झालेले कोणी पुढे आलेले नाही. मात्र, अनेकांना असे फोन कॉल आल्याचे समोर येत आहे. अनेकांनी येथील एलआयसी ऑफिसकडेही यासंबंधी विचारणा केली आहे. हा हेराफेरीचा प्रकार असून याच्याशी एलआयसीचा कोणताही संबंध नाही, त्यामुळे यावर विश्वास ठेवू नये, असे एलआयसीतर्फे सांगण्यात आले.

दिल्ली व‌िजयामुळे ‘आप’चा जल्लोष

$
0
0

म. टा. प्रत‌िन‌िधी, नाश‌िक

वर्षभरापूर्वी सत्तात्याग करणाऱ्या आम आदम‌ी पक्षाच्या (आप) अरव‌िंद केजरीवालांनी पुन्हा जोरदार मुसंड‌ी मारत दिल्ली विधानसभेत ऐत‌िहास‌िक व‌िजय म‌िळव‌िला. या विजयानिमित्त 'आप'च्या नाश‌िकतील समर्थकांन‌ीही जोरदारपणे जल्लोष केला.

द‌िल्लीमध्ये एकूण ७० पैकी तब्बल ६७ जागांवर म‌िळव‌िलेल्या व‌िजयामुळे 'आप'च्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरही आशावादाचे रंग पसरले आहेत. मंगळवारी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर 'आप'ला म‌िळणाऱ्या यशाने कार्यकर्ते आनंदित झाले. सर्व जागांवरील प्राथमिक न‌िकाल हाती येताच 'आप'च्या कार्यकर्त्यांनी गाड्यांवर त‌िरंगा ध्वज फडकाव‌ित व‌िजयी म‌‌िरवणूक काढली. हुतात्मा स्मारक येथे स्वच्छता अभ‌ियान राबव‌िण्यात आले. व‌िजयाबद्दल नाश‌िकरोड परिसरात नागरिकांना आईस्क्रीमचे वाटप करण्यात आले. तर शहरातील इतर परिसरातही कार्यकर्त्यांनी म‌िठाईचे वाटप केले. सामान्यांचा सहभाग सत्याच्या पारड्यात न्याय देतो, हे या न‌िवडणुकीने स‌िध्द केल्याच्या प्रत‌िक्रीया यावेळी 'आप'च्या पदाध‌िकाऱ्यांनी व्यक्त केल्या.

जल्लोषामध्ये जगब‌िंरस‌िंह, ज‌ितेंद्र भावे, प्र‌ियदर्शन भारतीय, अॅड. प्रभाकर वायचळे, स्वप्निल घ‌िया, अक्षय अह‌िरे, अमोल गोरडे, राजीव आचार्य, रमाकांत भारतीय, ज्ञानेश्वरी भावे आदी कार्यकर्ते सहभागर झाले.

लोकशाहीचा व‌िजय

पैसा, साधने क‌िंवा सत्ता या सर्व बाबींपेक्षाही लोकशाही मोठी आहे, हेच द‌िल्लीच्या न‌िकालाने स‌िध्द केले आहे. सर्वार्थाने बलवान असलेल्या ‌व‌िरोधकांची स‌त्ताही सामान्य माणसाच्या ताकदीपुढे कमी पडली. अखेरीला लोकशाहीचाच व‌िजय झाला आहे.

- ज‌ितेंद्र भावे,

आम आदमी पार्टी

वृक्षतोडीस मनाई

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळासाठी आवश्यक तयारीअंतर्गत रस्ता रुंदीकरणाकरिता झाडे तोडण्यास मुंबई हायकोर्टाने नाशिक महापालिकेला तूर्तास मनाई केली. तसेच कोर्टाची मनाई असताना जवळपास शंभर झाडे तोडण्यात आली असतील तर ती कोणी तोडली, याविषयी महापालिका व सरकारने अहवाल द्यावा, असे निर्देश देऊन पुढील सुनावणी ५ मार्चला होणार आहे.

जुलैमधील कुंभमेळासाठी रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या कामाचे नाशिक महापालिकेचे नियोजन आहे. परंतु, त्याकरिता मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होणार असल्याने त्याविरोधातील नाशिक नागरिक कृती समितीची जनहित याचिका तर झाडे तोडण्यास परवानगी देण्याबाबत महापालिकेचा अर्ज न्या. अभय ओक व न्या. ए. के. मेनन यांच्या खंडपीठापुढे प्रलंबित आहे.

सुमारे दोन हजार ४०० झाडे तोडण्याचे पालिकेने प्रस्तावित केले होते. परंतु, कोर्टाच्या निर्देशांप्रमाणे सरकारने स्थापन केलेल्या तज्ज्ञांच्या समितीने सर्वेक्षण केल्यानंतर सुमारे सोळाशे झाडे तोडावी लागतील आणि त्याबदल्यात सुमारे १६ हजार पर्यायी झाडे लावावी लागतील, असा अहवाल दिला होता. तथापि, १६ हजार झाडांमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या झाडांचाही समावेश आहे का, याविषयीचे स्पष्टीकरण महापालिकेतर्फे समितीला परस्पर विचारण्यात आले. समितीनेही याबाबत सरकारी वकिलांना कोणतीच कल्पना न देता परस्पर हायकोर्टात प्रतिज्ञापत्र करून स्पष्टीकरण दिले. त्यातील झाडांचे आकडे आणि आधीच्या प्रतिज्ञापत्रातील आकडे यातही तफावत असल्याचे समोर आले. या साऱ्यामुळे खंडपीठ संतप्त झाले. 'समितीने सरकारी वकिलांना न विचारता परस्पर प्रतिज्ञापत्र कसे केले? यामुळे आता आम्हाला या अहवालांचीच तपासणी करावी, असे वाटत आहे', अशी नाराजी व्यक्त खंडपीठाने समितीकडे स्पष्टीकरण मागितले. तसेच याचिकाकर्त्यांना काही आक्षेप असल्यास तो सादर करण्याची मुभा दिली.

कर चुकविणाऱ्यांची होणार चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

कर चुकविण्यासाठी शहराबाहेरील‌ किंवा ग्रामीण भागातील पत्ते देणारे महापालिकेच्या रडारवर येणार आहेत. अशा प्रकारे करचुकवेगिरी करणा ऱ्यांची चौकशी करणार असल्याचे महापालिका उपायुक्त हरिभाऊ फडोळ यांनी 'मटा'शी बोलतांना स्पष्ट केले.

'गावाकडे धाव... पण कर चुकविण्यासाठी' या मथळ्याखाली 'मटा'ने नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले. यानंतर महापालिकेची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. यात शहरातील वाहने खरेदी करतांना कर चुकविणाऱ्यांची महापालीका चौकशी करणार असल्याचे कर उपायुक्त हरिभाऊ फडोळ यांनी 'मटा'शी बोलतांना सांगितले. यामुळे महागडी वाहने खरेदी करतांना ग्रामीण भागातील पत्ते देणाऱ्यांचे पितळच उघडे पडण्याची शक्यता आहे.

गेल्या काही वर्षांत शहर झपाट्याने वाढत आहे. यासाठी देश-विदेशातील सर्वच क्षेत्रातील नामांकित कंपन्यांचे जाळे जिल्हाभरात पसरले आहे. यामध्ये बांधकाम व्यावसायिकांबरोबरच महागड्या वाहनांचे देखील मोठ-मोठी शोरुम शहरात दाखल झाले आहेत. परंतु, महागडी वाहने खरेदी करतांना काही ग्राहकांकडून ग्रामीण भागातील बनावट पत्ते पुरावे म्हणून सादर करत महापालिकेचा कर चुकविला जात आहे. या विषयावर 'मटा'ने बातम्यांमधून प्रकाश टाकला. यानंतर महापालिकेची यंत्रणा खडबडून जागी झाली. खोटे पत्ते देणाऱ्यांची चौकशी करणार आहे. तसेच प्रसंगी कारवाई करणार असल्याचे महापालिकेचे कर उपायुक्त फडोळ यांनी सांगितले.

जिल्ह्यात गारपीट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गतवर्षाप्रमाणेचे यंदाही फेब्रुवारीत अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. मंगळवारी निफाड, सिन्नर, कळवण तालुक्यात गारपीट झाली तर, सटाणा, मालेगाव व जिल्ह्यातील इतर भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

दिवसभराच्या ढगाळ वातावरणानंतर संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात तर सिन्नर तालुक्यातील सांगवी, सोमठाणे, वडांगळी या भागात गारपीट झाली. तसेच कळवण तालुक्यातही मुसळधार पाऊस व गारपीट झाली. यामुळे कांदा, गहू, हरभरा या रब्बी पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसर, तामसवाडी, वडगाव, बखतरपूर, खेडले जुंगे, करंजे या भागात गारपीटने झोडपले. यामुळे द्राक्ष उत्पादकांचे धाबे दणाणले आहे. द्राक्ष हंगामाला नुकतीच सुरुवात झाल्याने द्राक्ष उत्पादकांची गारपीटमुळे चिंता वाढली आहे. हरभरा, गहू, लाल व उन्हाळ कांद्यालाही फटका बसण्याची शक्यता आहे.

सायंकाळच्या सुमारास येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचेही धाबे पुन्हा दणाणले. मुखेडच्या काही परिसरात गारांचा पाऊस झाल्याने बळीराजा पुन्हा च‌िंतेत सापडला आहे. तालुक्यातील मुखेड पट्ट्यासह काही परिसरात विजांच्या कडकडात पाऊस झाला. गारा पडू लागल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली. रस्त्यावर गारा दिसू लागल्याने तालुक्यात लावलेला उन्हाळी कांदा आण‌ि काही परिसरातील द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत.

ऑनलाइन सातबारा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा प्रशासनाने इ-गव्हर्नन्सच्या दिशेने पाऊल टाकण्यास सुरुवात केली असून, सातबारा उतारा थेट ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधील सातबार ऑनलाइन करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी निलेश जाधव यांनी दिली आहे.

एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे सातबारा ऑनलाइन केले जातील, अशी माहितीही त्यांनी दिली. राष्ट्रीय लॅण्ड रेकॉर्ड मॉड्युलेशन प्रोग्रामअंतर्गत सातबारा उतारा व त्यावरील अद्ययावत नोंदी ऑनलाइन करण्याचा उपक्रम जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे. खरेदी-विक्री करणाऱ्यांची नावेही उताऱ्यावर ऑनलाइन नोंदविली जाणार आहेत. देवळा, त्र्यंबकेश्वर, पेठ, बागलाण, चांदवड, येवला आणि इगतपुरी तालुक्यांचे सातबारा गेल्या महिन्यापर्यंत ऑनलाईन करण्यात आले होते. आता नांदगाव आणि सुरगाणा या दोन तालुक्यांची कामे प्रायोगिक स्तरावर पूर्ण झाली आहेत. उपनिबंधक कार्यालयालाही त्याची एक लिंक असेल. व्यवहार झाल्यानंतर लागलीच नोंद अद्ययावत करता येणार आहे. या दोन्ही पक्षकारांची नावे एनआयसीकडे असलेल्या सॉफ्टवेअरमध्ये अद्ययावत होतील. त्याची नोंद घेण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांकडे ऑनलाइन अहवाल जाईल. त्यांनी बायोमॅट्रिकमार्फत त्यावर कार्यवाही केल्यास लागलीच त्याची नोटीस तयार होईल आणि नोंद अद्ययावत होणार आहे.


एनर्जी प्रकल्पाला मंजुरी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्थायी समितीच्या सभेत विल्होळी येतील खत प्रकल्पावर वेस्ट टू एनर्जीच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. सभापती राहुल ढिकले यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यावेळी विविध विषयांना मंजुरी देतानाच सिंहस्थाच्या कामांचा आढावा घेण्यात आला.

स्थायी समितीच्या सभेत विविध विषय चर्चेसाठी मांडण्यात आले होते. गेल्या दोन वर्षापासून विल्होळी येथील वेस्ट टू एनर्जीचा हा प्रकल्प अनेक कारणांनी खोळंबला होता. त्यामुळे कचऱ्यापासूनची वीज निर्मितीला ब्रेक लागला होता. या मंजुरीमुळे वीज निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. जीआयझेड या कंपनीमार्फत प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असून, कचऱ्यातून बाहेर पडणाऱ्या कार्बन आणि मिथेन वायुचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. या कंपनीतर्फे प्रकल्पासाठी १०. ८० कोटीचे अनुदान देण्यात येणार असून, त्याद्वारे प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. प्रकल्पातून एकावेळी ३० टन कचऱ्याची विल्हेवाट लावता येणार आहे. या प्रकल्पातून ९९ हजार युनिट वीज निर्मिती होणार असून, ६ लाख रुपये त्यांची किंमत असणार आहे. याचा मोबदला म्हणून नाशिक महापालिकेने ४ लाख ९४ हजार रुपये दरमहा कंपनीला द्यावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे नवीन भूसंपादन कायद्यानुसार नाशिक महापालिकेचा भूसंपादन निधी सिंहस्थाच्या

भूसंपादनासाठी वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, यातून शाही मार्ग व गंगापूर मलनिस्सारण केंद्राचे भूसंपादन वगळण्यात आले. तसेच, गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला गणवेश खरेदीचा चेंडू पुन्हा महासभेकडे टोलवण्यात आला. दोन महिन्यांपूर्वी गणवेश खरेदीचा प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला होता. परंतु, तो चुकीने सादर केल्याची माहीती प्रशासनाने लोक प्रतिनिधींना दिली त्यावरून पुन्हा हा प्रस्ताव स्थायी समितीकडे बुधवारी सादर केला. स्थायी समितीने पुन्हा हा विषय महासभेकडे पाठवला आहे. यानंतर अनधिकृत होर्डींगच्या विषयावर चर्चा करण्यात आली. होर्डींगबाबत राज्य सरकारकडे नियमावली पाठवण्यात आली असून, तिला मंजुरी मिळत नसल्याने नाशिक महापालिकेचे उत्पन्न घटत आहे. त्याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली. विरोधी पक्ष नेते सुधाकर बडगुजर यांनी शिक्षण विभागाच्या किरण कुवर या मनमानी कारभार करत असल्याचा आरोप केला त्यांनी नियमबाह्य

कामकाज केले असून, त्यांच्या विरोध राज्याचे शिक्षण संचालक सर्जेराव जाधव यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच कुवर यांनी मनमानी करीत पंचवटीतील एका शिक्षेवर कारवाई केली असून, ती घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंना उत्तर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'दुसऱ्याच्या घरामध्ये पोर झाले म्हणून फार दिवस आनंद साजरा करता येत नाही. त्यामुळे दिल्लीत केजरीवालांचे सरकार आले म्हणून इतरांनी फार आनंदी होण्याचे कारण नाही. चांगल्या आणि वाईट वेळेस सोबत राहाणाराच खरा सहकारी असतो,' असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मोदी टीकेचा हिशेब चुकता केला.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा धुव्वा उडाला. केजरीवाल सरकारने विरोधी पक्षात बसायलाही जागा ठेवली नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सध्या टीकेची झोड उठवली जात आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले, 'अनेक राज्यांमध्ये आम्ही जिंकलो. दिल्लीत मात्र आम्हाला पराभवाला सामोरे जावे लागत आहे. त्याबाबत आम्ही आत्मपरीक्षण करू. दिल्लीच्या पराभवाचे मूल्यमापन करून पंतप्रधान मोदी यांना त्यासाठी जबाबदार ठरवणे योग्य नाही,' असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. 'एखादा पक्ष हरला म्हणून पक्षप्रमुखाला दोषी धरणे चुकीचे आहे. उद्या शिवसेना एखाद्या नगरपालिका निवडणुकीत पराभूत झाली म्हणून उद्धव ठाकरे हरले, असे म्हणता येणार नाही. संकटकाळी जे सोबत राहतात, तेच खरे सहकारी असतात,' असा टोलाही त्यांनी लगावला. प्रत्येक पराभवातून विजयाकडे जाण्याचा आमचा इतिहास आहे. ही परंपरा आम्ही यापुढेही कायम ठेवू, राज्यात जनतेने आम्हाला कौल दिला आहे. त्यामुळे जनतेला काय हवे ते समजून घेऊन त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

राज्यमंत्र्यांना हवीत अधिकची खाती

राज्यमंत्र्यांना खात्यांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, त्यांना अधिकची खाती हवी आहेत. शिवसेनेतील राज्यमंत्र्यांची त्या त्या विभागाच्या मंत्र्यांबाबत तक्रार आहे, तशाच तक्रारी शिवसेनेकडे महत्त्वाची खाती असलेल्या मंत्र्यांबाबत भाजपच्या राज्यमंत्र्यांच्याही आहेत. आपापसात चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यात येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

राजकीय अस्पृश्यता नाही

पंतप्रधान मोदींनी बारामती येथे येण्यात गैर नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. मोदी शरद पवार यांच्याकडे येणार नाहीत. ते कृषिविज्ञान केंद्राच्या उद् घाटनासाठी येणार आहेत. आमचे पवारांशी राजकीय मतभेद आहेत म्हणून त्यांच्या मतदार संघात जाऊ नये एवढी राजकीय अस्पृश्यता आपल्याकडे नाही. ती असूही नये, असे स्पष्ट मत फडणवीस यांनी व्यक्त केले.

साडेपाच हजार हेक्टरचे नुकसान

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्यावर्षीच्या गारप‌टिीतून शेतकरी अद्याप सावरला नसताना पुन्हा निसर्गाने उभ्या पिकांवर हल्ला चढविल्याने शेतकरी बेहाल झाला आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये पिकांची अतोनात हानी झाली आहे. निफाड, सिन्नर आणि कळवण तालुक्यांमध्ये अंदाजे ५ हजार ४५२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. तर इतर तालुक्यातील नुकसानीचे आकडेवारी येणे बाकी आहे.

जिल्हयातील काही भागांमध्ये मंगळवारी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. त्यामध्ये मालेगाव, सटाणा, येवला, दिंडोरीसह सात तालुक्यामधील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. गतवर्षी गारप‌टिीमुळे झालेल्या नुकसानीतून शेतकरी अजूनही सावरला नसताना पुन्हा गारपीट झाल्याने शेतकरी पुरते उध्वस्त झाले आहेत. द्राक्ष, डा‌ळिंब या फळ पिकांसह कांदा आणि गव्हाचे त्यामुळे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तलाठ्यांनी गाव पातळीवर झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांकडून माहिती घेऊन त्याची माहिती मंडळ अधिकाऱ्यांना कळविली आहे. मंडळ अधिकाऱ्यांनी तहसिलदारांना तीन तालुक्यांमधील नुकसानाचा प्राथमिक अंदाज दिला आहे. त्यानुसार निफाड तालुक्यातील १५ गावांमधील २६०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. १५२० हेक्टरवरील गहू आणि ५० हेक्टरवरील द्राक्ष पिकाची हानी झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. कळवण तालुक्यामध्ये २ हजार १५२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ६२ गावांमधील ४ हजार १९५ शेतकऱ्यांना या पावसामुळे फटका बसला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सिन्नर तालुक्यात सात गावांमधील ७०० हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामध्ये ३३४ हेक्टरवरील कांद्याचे तर २३६ हेक्टरवरील गव्हाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

सिंहस्थासाठी विशेष नियोजन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन करण्यासाठीच सूक्ष्म नियोजन प्रस्तावित आहे. त्यासाठीच आता समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सिंहस्थ कामांना अधिक चालना मिळण्याची शक्यता आहे.

जुलैत सुरू होणाऱ्या सिंहस्थासाठी आता गतिमान कामे होणे आवश्यक आहे. तसेच, या कामांमध्ये त्रुटी राहू नये म्हणून सूक्ष्म नियोजनही करण्यात येत आहे. आगामी कालावधी लक्षात घेता सूक्ष्म नियोजनासाठी आता अधिकाऱ्यांची नियुक्ती विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांनी केली आहे. सिंहस्थासाठी तात्पुरत्या स्वरुपात वाहनतळ, बसस्टँड यासारख्या विविध पायाभूत व्यवस्था निर्माण करायच्या आहेत. त्यासाठी नाशिक उपविभागीय अधिकारी रमेश मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करणार आहे. या समितीत महापालिकेचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर, बांधकाम विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर, एसटीचे विभाग नियंत्रक आणि वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक असणार आहेत. त्र्यंबकेश्वरसाठी उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम विभागाचे उत्तर विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर, एसटीचे विभाग नियंत्रक आणि वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक हे असणार आहेत.

भाविकांसाठी करावयाच्या वाहतूक व्यवस्थेसाठी पोलिस उपायुक्त समन्वय अधिकारी राहणार आहेत. त्यांच्याबरोबर मध्य रेल्वेचे नोडल अधिकारी, बांधकाम विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर, एसटीचे विभाग नियंत्रक हे असणार आहेत. तर, त्र्यंबकेश्वरसाठी नाशिक ग्रामीणचे पोलिस उपअधिक्षक समन्वय अधिकारी राहणार असून, त्यांच्यासह बांधकाम विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर, एसटीचे विभाग नियंत्रक बरोबर राहणार आहेत.

अंतर्गत वाहनतळांच्या निर्मितीसाठी नाशिक पोलिस उपायुक्तांबरोबर, महापालिकेचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर, पाटबंधारे विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर, लघुपाटबंधारे विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर यांची समिती असेल. त्र्यंबकेश्वरसाठी ग्रामीण पोलिस उपाधिक्षकांबरोबर त्र्यंबकेश्वर तहसीलदार, बांधकाम विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर, लघुपाटबंधारे विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांची समिती कार्यरत राहील.

वैद्यकीय व्यवस्थेसाठी आरोग्य उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली सिव्हिल सर्जन, जिल्हा आरोग्य अधिकारी, नाशिक व त्र्यंबक तहसीलदार, महापालिकेचे आरोग्य व वैद्यकीय अधिकारी, शहर व ग्रामीणचे पोलिस निरीक्षक कार्यरत राहणार आहेत. स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थेसाठी महापालिकेचे सुप्रिटेंडिंग इंजिनिअर यांच्याबरोबर बांधकाम विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर आणि त्र्यंबक पालिकेचे मुख्याधिकारी यांची समिती असेल. पाणीपुरवठा व्यवस्थेची जबाबदारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सुप्रिटेंडिंग इंजिनीअर यांच्याबरोबर जीवन प्राधिकरणचे त्र्यंबकेश्वर येथील सुप्रिटेंडिर इंजिनीअर, जिल्हा परिषदेचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर यांच्याकडे असेल.

साधुग्रामसाठी नाशकात मेळा अधिकारी, पोलिस उपायुक्त आणि महापालिकेचे सुप्रिटेंडिंग इंजिनीअर तर त्र्यंबकला मेळा अधिकारी, ग्रामीण पोलिस उपअधिक्षक आणि बांधकाम विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर हे काम पाहतील. विद्युत व्यवस्थेसाठी ग्रामीण महावितरणचे सुप्रिटेंडिंग इंजिनीअर यांच्याबरोबर नाशिक, कळवण व त्र्यंबकचे तहसीलदार, जलसंपदाचे सुप्रिटेंडिंग इंजिनीअर, महापालिकेचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर, बांधकाम विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर यांची समिती असेल. बॅरिकेडिंग, पोलिस निवास, सीसीटीव्ही आणि सिम्युलेशनसाठी पोलिस उपायुक्तांबरोबर सिंहस्थ उपजिल्हाधिकारी, बांधकाम विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर, महापालिकेचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर राहणार आहेत. त्र्यंबकसाठी ग्रामीण पोलिस उपअधीक्षकांबरोबर सिंहस्थ उपजिल्हाधिकारी, बांधकाम विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर, त्र्यंबक नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे व्यवस्था पाहणार आहेत.

यांच्यावर आहे जबाबदारी

होल्डिंग प्लेसेसची जबाबदारी सहाय्यक पोलिस आयुक्त, नाशिक तहसीलदार, महापालिकेचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर तर त्र्यंबकसाठी पोलिस उपअधीक्षक, त्र्यंबकेश्वर तहसीलदार आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्यावर असेल. ठिकठिकाणी दिशादर्शक लावण्यासाठी नाशिकमध्ये महापालिकेचे सहाय्यक इंजिनीअर, पोलिस उपायुक्त तर त्र्यंबकेश्वरसाठी अप्पर पोलिस अधीक्षक, मुख्याधिकारी, बाह्यवळण रस्त्यांसाठी महामार्गाचे पोलिस उपअधीक्षक, बांधकाम विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर, महामार्गाचे प्रकल्प संचालक आणि राष्ट्रीय महामार्गाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर हे काम पाहतील. अग्निशमन यंत्रमेचे काम महापालिकेचे मुख्य अघ्निशमन अधिकारी व त्र्यंबकचे मुख्याधिकारी यांच्याकडे राहील. आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे.

फुलांची निर्यात वाढली

$
0
0


ज‌ितेंद्र तरटे , नाश‌िक

वारंवारच्या अवकाळी पावसाने व‌िव‌िध कृषी उत्पादने धोक्यात आली असली तरी गुलशनाबादची गुलाब फुलशेती आशावाद पेरते आहे. 'व्हॅलेंटाईन डे'च्या पार्श्वभूमीवर देश-परदेशातून नाश‌िकच्या गुलाबाला मागणी वाढली आहे. एरव्ही ज‌िल्ह्यातील फुलशेतीतून तीन मह‌िन्यांकाठी होणारी सुमारे दोन ते अडीच कोटींची उलाढाल या कालावधीत सुमारे ६ कोटींचाही आकडा पार केला आहे.

नाश‌िक ज‌िल्ह्यातून या तीन मह‌िन्यांत देश-व‌िदेशात फुलांच्या सुमारे तीन लाख स्पेसीज न‌िर्यात झाल्या आहेत. यात प्रामुख्याने 'रेड रोज'चा भरणा आहे. महाराष्ट्राचे कॅल‌िफोर्न‌िया म्हणून दर्जेदार कृषी उत्पादनांनी नाश‌िकची ओळख जगात करून द‌िली आहे. आता नाशिकची फुलशेतीही स्वतंत्र अस्त‌ित्व न‌िर्माण करते आहे. 'व्हॅलेंटाईन डे'च्या पार्श्वभूमीवर तीन मह‌िन्यांमध्ये नाश‌िक आण‌ि तालुक्यातील गुलाबाच्या व‌िव‌िध प्रजातींना प्रामुख्याने गल्फ देशांसह युरोप आण‌ि आश‌ियाई देशांमधून जोरदार मागणी झाली अन् तिची पूर्तताही करण्यात आली आहे. अर्थात अवकाळी पावसाचा फटका फुलशेतीलाही बसला असल्याची माहिती फुल व्यापाऱ्यांनी द‌िली.

नाशिक तालुक्यातील जानोरी, मोहाडी, मखमलाबाद, कसबे सुकेणे, महिरावणी, गिरणारे आण‌ि दिंडोरी तालुक्यातील गावांमध्ये पॉल‌िहाऊस आण‌ि पारंपरिक पध्दतीने फुलांची शेती केली जाते. यामध्ये नारंगा, बोर्डा फ्रस्टेड, गोल्ड स्ट्राईक अशा गुलाबांच्या व‌िव‌िध प्रजातीही येथे घेण्यात येतात. लाल गुलाबास या कालावधीत बाजारपेठेतून कमालीची मागणी वाढल्याची माह‌ितीही मोहाडी येथील गुलाब उत्पादक सुन‌ील मौले यांनी द‌िली. दुबईसारख्या गल्फ देशांमध्ये नाश‌िकच्या गुलाबास चांगले भव‌ितव्य असल्याचे न‌िरीक्षणही त्यांनी नोंदविले.

न‌िळ्या गुलाबाची रूखरूख

'व्हॅलेंटाईन डे'च्या संदर्भाने लाल गुलाबाला व‌िशेष मागणी असली तरीही दुर्म‌िळ समजल्या जाणाऱ्या न‌िळ्या गुलाबालाही परदेशातून मागणी आहे. नाश‌िक परिसरातही काही ठ‌िकाणी न‌िळा गुलाब उपलब्ध होतो. यंदा मात्र सातत्याने बदलत्या हवामानामुळे व‌िदेशातून न‌िळ्या गुलाबाला मागणी असूनही पुरवठा करण्यात अडचणी आल्याने क्षमतेऐवढे निळे गुलाब उपलब्ध होऊ शकले नसल्याचे न‌िर्यातदार रोह‌ित कर्पे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. तर स‌िंगापूर, दुबई, मलेश‌िया आण‌ि नेदरलँड देशांसह चायना मार्केटही खुणावत असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिकमध्ये तात्पुरते CCTV

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात सीसीटीव्ही बसवण्याच्या कामाबाबत अखेर निविदा प्रसिध्द करण्यात आल्या. सीसीटीव्ही कायमस्वरूपी बसवण्याचा दावा करणारे सरकार यामुळे बॅकफुटवर गेल्याचे​ दिसते. प्रसिध्द झालेल्या निविदेनुसार शहरात ३४८ तर त्र्यंबकेश्वरमध्ये २०८ सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्या दरम्यान शहरात तसेच त्र्यंबकेश्वरला लाखो भाविक, साधू-महंत येणार आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्याचा प्रस्ताव समोर आला होता. निविदा प्रसिध्द होईपर्यंत या प्रस्तावात अनेक बदल झाले. कॅमेऱ्यांची संख्या, ठिकाणे सातत्याने बदलली. तसेच हे कॅमेरे कायमस्वरूपी बसवावे​ की तात्पुरते याविषयी बराच धुराळा उडाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृह राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्यासह इतर मंत्र्यांनी कायमस्वरूपी सीसीटीव्ही बसवण्याबाबत आग्रह धरला. मात्र, या आग्रहाचे रुपांतर आदेशात झालेच नाही. सीसीटीव्ही कायमस्वरूपी बसवल्यानंतर येणारे इंटरनेट बील, देखभाल दुरुस्ती यावर महिन्याकाठी कोट्यवधी रुपये खर्ची पडणार आहे. या खर्चाची तरतूद कोणत्याच विभागामार्फत केली गेली नाही. त्यामुळे प्रशासनाने भाडेतत्वावर सीसीटीव्ही बसवण्याच्या कामासाठी निविदा प्रसिध्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहरातील १५७ ठिकाणी ३४८ तर त्र्यंबकेश्वर २०८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. यात पॅनोरॅमिक, पीटीझेड, फिक्स, तसेच एएनपीआर अशा विविध प्रकाराच्या कॅमेऱ्यांचा समावेश आहे. कॅमेरे सुरू करण्याबरोबरच त्याचा डाटा काही कालावधीसाठी स्टोअर करण्याची जबाबदारी ठेकेदारावर आहे. ठेकेदाराची पोलिस आयुक्तांसोबत निविदेबाबत १८ फेब्रुवारी रोजी चर्चा होणार असून ३ मार्च रोजी निविदा उघडण्यात येणार आहे.

नाशिक शहरातील सीसीटीव्ही

एएनपीआर - १८

पीटीझेड - ७५

पॅनोरॅमिक - १०३

फिक्स - १५२

एकूण - ३४८

त्र्यंबकेश्वरमधील सीसीटीव्ही

एएनपी​आर - १८

पॅनोरॅमिक - २५

पीटीझेड - ४७

फिक्स - ११५

एकूण - २०५

‘हॅपी स्ट्रीट्स’साठी राहा तयार

$
0
0

नाशिक टाइम्स टीम

तुमचं टेन्शन खल्लास करत तुम्हाला रीलॅक्सेशन देण्यासाठी 'मटा'मार्फत नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. याच उपक्रमांचा भाग असलेला 'हॅपी स्ट्रीट्स' तुम्हाला देणार आहे धमाल करण्याची अनोखी संधी. कश्यप परुळेकर आणि मानसी मोघे या सेलिब्रेटींच्या खास उपस्थितीत 'हॅपी स्ट्रीट्स'चा शुभारंभ होणार आहे. तर मग तयार राहा या रविवारी म्हणजेच १५ फेब्रुवारीला फुल टू धमाल करण्यासाठी.

विशेष म्हणजे या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची नावनोंदणी करण्याची गरज नाही. तुम्हाला केवळ रविवारी सकाळी ७.३० ते ९.३० यावेळेत कॉलेजरोडवर उपस्थित राहायचं आहे. एकूणच काय टेन्शन, तणाव आणि धावपळ हे टाळून तुम्हाला रस्त्यावर एन्जॉय करण्याची संधी 'मटा' देणार आहे. या रस्त्यावर सुरू असणाऱ्या विविध अॅक्टिव्हीटीजमध्ये सहभागी होऊन तुम्ही आनंद लुटू शकता. यावेळेत मॉडेल कॉलनी सर्कल ते बिग बझार सर्कलदरम्यानचा रस्ता फक्त आणि फक्त तुमचा असणार आहे.

मॉडेल कॉलनी सर्कलजवळ झुंबा, सेलिब्रेटी इंटरअॅक्शन तसेच तेसच ड्रॅगन डान्स होणार आहे. डॉन बॉस्को सर्कलवर हास्यक्लब, एचपीटी कॉलेज गेट ते बीवायके कॉलेज गेट यादरम्यान शिल्पकला, परफॉर्मिंग आर्ट आणि पेंटिंग एग्झिबिशन असणार आहे. विजू सर्कलला ढोल पथक तर एसके रेनबो कलर लॅब ते पंचम हॉटेल या भागात बचपन गली असणार आहे. बिग बझार सर्कलला रांगोळी स्पर्धा, बासरी वादन तसेच गिटार वादन असणार आहे.

बचपन गलीत होणार धूम

बचपन गलीमध्ये लहान मुलांच्या चित्रांचे प्रदर्शन तसेच स्पर्धा होणार आहे. तुमच्या घरातल्या मुलांनी काढलेली चित्रे तुम्हाला इथे घेऊन यायची आहेत. चित्राखाली मुलाचे नाव, इयत्ता असणे गरजेचे आहे. उत्कृष्ट चित्रांना 'रुचीर आर्ट गॅलरी'मार्फत बक्षीस मिळणार आहे. तसेच या ठिकाणी लहान मुलांचे गेम्स व मॅस्कॉट्सही असणार आहेत. ज्या मुलांना स्केटिंगची आवड आहे त्यांनी स्केटिंग घेऊन यावे.


डॉ.सदानंद मोरेंचा सत्कार

$
0
0


म. टा. प्रत‌िन‌िधी, नाशिक

पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नूतन अध्यक्ष व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांचा नागरी सत्कार नाशिकच्या वारकरी सत्कार समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. उद्या (द‌ि.१४) रोजी गंगापूररोड येथील रावसाहेब थोरात सभागृहात दुपारी ५ वाजता हा सत्कार सोहळा होणार आहे.

यावेळी ह.भ.प. जनक महाराज सोळंकी आणि मविप्रच्या विद्यार्थ‌िनी स्वागतगीत व भक्तीगीत सादर करणार आहेत. थोरात सभागृहात होणाऱ्या या सत्कार सोहळ्यात शांतीब्रह्म ह.भ.प. मारुतीबुवा कुऱ्हेकर, आळंदी संस्थांनचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते, ह.भ.प.रामकृष्ण महाराज लहवितकर, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे आदी उपस्थ‌ित राहणार आहेत. नाश‌िककरांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

ATSद्वारे जनजागृती

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मध्य प्रदेशातील खंडवा जेलमधून फरार झालेल्या दहशतवाद्यांचे संभावित टार्गेट हे नाशिक असून, संभाव्य सिंहस्थ कुंभमेळ्यासह शहरातील धार्मिक स्थळांना त्यांच्यापासून धोका आहे. त्यामुळे एटीएससह स्थानिक पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. या दहशतवाद्यांची माहिती आणि त्यांची छायाचित्रे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी दहशतवाद विरोधी पथकाने महापालिकेकडे होर्डिंगसाठी मोक्याच्या जागांची मागणी केली आहे.

खंडवा जेलमधून नुकतेच सीमीचे काही संशयित फरार झाल्याने महाराष्ट्र दशहतवाद विरोधी पथकाची झोप उडाली आहे. गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार या संशयितांकडून नाशिकमधील महत्वाची धार्मिक स्थळे आणि सिंहस्थ कुंभमेळ्यात घातपाती कारवाया करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा दक्ष झाल्या आहेत. घातपाती कारवायांसाठी हे संशयित अगोदरच नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संशयितांची माहिती नाशिककरांना व्हावी यासाठी एटीएसने महापालिकेलाच जनजागृतीसाठी विनंती केली आहे. शहरातील मोक्याच्या जागांवरील पालिकेच्या होर्डिंगवर या संशयितांचे छायाचित्र, त्यांची संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेने हे होर्डिंग विनामोबदला एटीएसला द्यावेत, अशी विंनती केली आहे. त्यासाठी मनपा आयुक्तांना एटीएसचे प्रभारी पोलिस निरीक्षक के. डी. टेंभेकर यांनी पत्र लिहिले आहे. पालिकेकडून एटीएसच्या विनंतीला तत्काळ प्रतिसाद मिळाला असून, १४ फेब्रुवारीपासून दहशतवाद्यांची पोस्टर्स पालिकेच्या मोक्याच्या जागांवरील होर्डिंग्जवर झळकणार आहेत.

खबरदारीसाठी उचलली पावले

दोन वर्षापूर्वी लष्करचा संशयित दहशतवादी बिलाल शेखने नाशिकमध्ये वास्तव्य होते. सातपूरमध्ये एका घरात त्यांने कामगार म्हणून घर मिळवले होते. तशा प्रकारचा प्रसंग पुन्हा होवू नये, म्हणून एटीएसने ही खबदरदारी घेतली आहे

कुंभमेळा आणि रेल्वे

$
0
0

राहुल सोनवणे

सिंहस्थ कुंभमेळा हा दर १२ वर्षांनी भरतो. त्यात कोट्यवधी भाविक सहभागी होतात. या वैश्विक सोहळ्याच्या निमित्ताने रेल्वेने नाशिकचा सर्वंकष विचार करायला हवा. हॉलिडे स्पेशल गाड्या चालवून रेल्वे प्रशासनाने वेळ मारून नेण्यापेक्षा नाशिकरोडला नवे टर्मिनस आणि नव्या गाड्या उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

सहा महिन्यांवर येऊ घातलेला कुंभमेळा आणि त्याबाबत रेल्वे प्रशासनाने केलेली कामे यावर एक दृष्टीक्षेप टाकला तर, आजपावेतो नाशिकरोड रेल्वेस्थानकावर काहीही कामे झालेली दिसत नाहीत. बहुदा मागील कुंभमेळ्याप्रमाणेच या ही वेळेला केवळ हॉलिडे स्पेशल गाड्या चालवून रेल्वे प्रशासन वेळ मारून नेणार! असे दिसते. 'नवे टर्मिनस किंवा नाशिकरोड स्थानकावरून नव्या गाड्या', हे नाशिककरांकरिता दिवास्वप्नच ठरणार असे दिसते.

नाशिकहून इतर राज्यांशी कनेक्टिव्हीटीचा विचार करता, सद्य‌स्थितीला मध्य रेल्वेने नाशिकहून उत्तर प्रदेश, बिहार व पश्चिम बंगाल या राज्यांशी उत्तम प्रकारे जोडले गेलो आहोत. या राज्यांकडे जाणाऱ्या सर्वाधिक गाड्या नाशिकवरून धावतात. त्या व्यतिरिक्त इतर राज्यात जायचे असेल तर नाशिककरांना मनमाड, कल्याण किंवा मुंबईला जाऊन गाड्या पकडाव्या लागतात. यात पैशांबरोबरच वेळ आणि श्रम बरेच खर्ची पडतात. राजस्थानला जाण्यासाठी नाशिकहून एकही गाडी नाही. त्याकरिता एकतर वांद्रे टर्मिनस किंवा पश्चिम रेल्वे मार्गावरील वापी-बलसाड (नाशिकहून १५०/१६० किमी अंतरावर) स्टेशनवर जावे लागते. त्यातही वापी-बलसाडला रेल्वे नाही. त्यामुळे हा प्रवास बसने किंवा खासगी गाडीने करावा लागतो. त्याकरिता मुंबई (सीएसटी)हून नाशिक-भोपाळ-अजमेर मार्गे जयपूर-जोधपूर-बिकानेर गाडी मध्य रेल्वेने चालू केल्यास नाशिककरांबरोबरच उत्तर महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील बऱ्याच भागातील प्रवाशी राजस्थानशी जोडले जाऊ शकतात.

मुंबई-कल्याण-नाशिकरोड-भुसावळ-भोपाळ-उजैन-रतलाम-चित्तोडगड-अजमेर-जयपूर (एकूण किलो मीटर १६३४) सद्या या मार्गावर हैदराबाद-अजमेर गाडी आठवड्यातून एकदा मनमाड-भोपाळ मार्गे चालू आहे. तसेच मध्य रेल्वेने मागील वर्षी सोलापूर-जयपूर ही हॉलिडे स्पेशल एक्स्प्रेस याच मार्गावरून चालवून बघितली होती. नाशिकहून दुसरी सर्वात जास्त मागणी ही जम्मू व काश्मीर राज्याकरिता आहे. या राज्यात जाण्याकरिता आज उत्तर महाराष्ट्रातून फक्त एकच गाडी उपलब्ध आहे, ती म्हणजे पुणे-जम्मूतावी झेलम एक्स्प्रेस. वर्षभर ही गाडी तुडूंब भरलेली असते.

अमरनाथ, वैष्णवदेवी, काश्मीरला जाण्याकरिता नाशिक व उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांकरिता मध्य रेल्वेने मुंबई (सीएसटी)-जम्मूतावी-उधमपूर-वैष्णवदेवी-कटरा अशी सुपरफास्ट गाडी सुरू करावी. याचा लाभ नाशिक सोबतच उत्तर महाराष्ट्रापासून थेट भोपाळ पर्यंतच्या प्रवेशांना होईल.

उत्तरांचल मधील काठगोदाम या ठिकाणी जाण्याकरिता मध्यरेल्वेची थेट गाडीची आवश्यकता आहे, त्यामुळे नैनिताल, रानीखेत, अल्मोडा या महत्वाच्या पर्यटनकेंद्रांशी थेट जोडता येईल.

ईशान्य भारतात जाण्यासाठी आज मुंबई (एलटीटी) गुवाहाटी ही एकमेव गाडी उपलब्ध आहे. मुंबई-दिब्रुगड (गुवाहाटी मार्गे) यागाडीची आज खरोखरच गरज आहे. ईशान्य भारतातल्या सात राज्यातले बरेच नागरिक उत्तर महाराष्ट्रात पोटापाण्याच्या निमित्ताने वास्तव्यास आहेत. शिवाय नाशिककरांना अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेल्या या राज्यात सहजपणे जाता येत नाही.

राजधानी दिल्लीकरिता मागील वर्षापासून मुंबई (एलटीटी) हं. निझामुद्दीन ही वातानुकुलीत गाडी (राजधानी एक्स्प्रेसच्या धर्तीवर) आठवड्यातून एक दिवस चालविण्याऐवजी किमान ४ दिवस चालविण्यात यावी. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना या जलत गाडीने प्रवास करून वेळेची बचत करता येइल.

भुसावळ विभागात सर्वात जास्त उत्पन्न देणाऱ्या नाशिकरोड स्थानकावरून आज कित्येक गाड्यांना थांबाच नाही. त्यामुळे या सर्व गाड्यांना नाशिकचे महत्त्व लक्षात घेता नाशिकला थांबा दिल्यास प्रवाशांची सोय होऊ शकेल व या गाड्या पकडण्याकरिता मुंबई, भुसावळ किंवा मनमाडला जाण्याची परवड थांबेल.

त्या गाड्या खालील प्रमाणे:मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) पुरी २२८६५मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) छपरामुंबई - गोरखपूरमुंबई - भोपाळमुंबई - गुवाहाटी (कामाख्या) कर्मभूमी एक्स्प्रेस २२५११मुंबई - हावडा १२१०१मुंबई - आसनसोल १२३६२मुंबई - जयानगर जनसाधारण एक्स्प्रेस १५५४८मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) कर्मभूमी एक्स्प्रेस १२५४६

वर्षानुवर्षे नाशिककरांची रेल्वे अर्थसंकल्पात घोर निराशा होत आली आहे. रेल्वे अर्थसंकल्पात दरवेळी महाराष्ट्राच्या वाट्याला दरवेळेला ज्या गाड्या नाशिकहून सुटणाऱ्या असतात, त्यात उत्तर प्रदेश, बिहार व पश्चिम बंगालच्याच गाड्यांची भरणा असते. इतर राज्यांशी जोडण्याची बात नसल्याने नाशिककरांची सातत्याने निराशा होत आली आहे. राज्यातील इतर शहरांशी नाशिकला रेल्वेच्या माध्यमातून जोडणे गरजेचे झाले आहे.

मुंबई-नागपूर या राजधानी व उपराजधानीला जोडणाऱ्या मार्गावर नाशिकहून आजघडीला नाव घ्यावी अशी एकमात्र जलद गाडी म्हणजे गीतांजली एक्स्प्रेस. ही गाडी पुढे कोलकात्याला जाते. त्यामुळे नाशिककरांना त्यात जागा मिळणे दुरापास्त होऊन बसते. गीतांजली सोडल्यास सेवाग्राम व विदर्भ एक्स्प्रेस या गाड्या आहेत. परंतु, ही वारंवारीता खूपच कमी असल्याने या गाड्या वर्षभर कायम भरलेल्या असतात, त्यात सहजासहजी जागा मिळत नाही. नाही म्हणायला मुंबई-नागपूर दुरांतो आहे. परंतु, या गाडीला एक भुसावळ सोडला तर दुसरा थांबा नाही, त्याचाही कोणता लाभ नाही. या मार्गावर इतरही अनेक महत्वाची शहरे येतात. त्याकरिता मुंबईहून नाशिकमार्गे गीतांजलीच्या अगोदर किंवा नंतर जनशताब्दी किंवा एसी डबलडेकर सारखी गाडी असली तर मनमाड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा (अमरावती), वर्धा, नागपूर या शहरांना जोडणारी ही महत्वाची गाडी ठरू शकेल. उत्तर महाराष्ट्र व विदर्भ यांच्यात दुवा साधणाऱ्या रेल्वेची सद्या नितांत आवशक्यता आहे. परंतु, या मध्यम अंतराकरिता रेल्वेची उपलब्धता नसल्याने प्रवाशांना खासगी बसचा नाईलाजाने पर्याय स्वीकारावा लागतो.

मध्य रेल्वेकडे सद्या कोकण रेल्वे मार्गावर एक डबल डेकर एक्स्प्रेस पडून आहे. कमी प्रतिसाद असल्यामुळे या गाडीचा संपूर्ण रॅक मुंबईत सद्या उभा आहे. जर ही एसी डबलडेकर मुंबई-नागपूर रूटवर गीतांजलीच्या अगोदर चालवून बघितली तर त्यास उत्तम प्रतिसाद मिळू शकेल.

नागपूर - मडगाव (१३३० किलो मीटर)

नागपूरहून वर्धा-बडनेरा (अमरावती)-अकोला-भुसावळ-जळगाव-नाशिक-कल्याण-पनवेल-रत्नागिरी-मडगाव ही गाडी सुरू केल्यास विदर्भ-उत्तर महाराष्ट्र व कोकण, गोवा यांना जोडणारी ही महत्वाची उपलब्धी ठरू शकेल व त्यामुळे शेकडो प्रवाशांची कायमची सोय होईल.

नाशिक-पुणे-कोल्हापूर (६१५ किलो मीटर)

रात्रीच्या वेळेला नाशिकहून पनवेल-पुणे-कोल्हापूर अशी स्लिपरचे डबे असलेली गाडी गरजेची आहे. त्यामुळे पुणे-कोल्हापूर हा रात्रीचा प्रवास सोयीचा ठरून या गाडीला उत्तम प्रतिसाद मिळू शकेल.

(लेखक रेल्वे अभ्यासक आहेत)

बस पास असतानाही वाहकाने आकारले तिकीट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव

तिमाही प्रवासाच्या पासची वैध मुदत शिल्लक असतानाही लासलगाव येथील एका विद्यार्थिनीला उर्मटपणा दाखवीत वाहकाने तिकीट काढण्यास भाग पाडल्याचा प्रकार लासलगाव-नाशिक प्रवासादरम्यान उघडकीस आला आहे. त्या वाहकावर कारवाई करण्याचे आश्वासन लासलगाव बस आगाराच्या व्यवस्थापिका मनीषा सपकाळे यांनी दिले आहे.

लासलगाव येथील विद्यार्थिनी गीता संतोष पलोड ही लासलगाव- नाशिक बसने दररोज सकाळी महाविद्यालयीन शिक्षणाकरिता प्रवास करते. बुधवारी सकाळी लासलगाव- नाशिक बसने ती प्रवास करीत असताना बसवाहक डी. डी. चव्हाण यांनी तिच्याकडे तिकिटाची विचारणा केली. यावर तिने वैध मुदतीत असलेला पास दाखविला. मात्र तरीही तुला तिकीट काढावे लागेल, असे उर्मटपणे सांगत तिकीट घेतले नाही तर बसमधून रस्त्यावर खाली उतरून देईल, असा दम भरत बळजबरीने ६९ रुपयांचे तिकीट देऊन पैसे घेतले.

दरम्यान, गीता हीने घरी परतताच वडील संतोष पलोड यांना घडला प्रकार सांगितला. त्यानंतर गुरुवारी सकाळी अकरा वाजता पलोड यांनी बस वाहक डी. डी चव्हाण यांच्या विरोधात लासलगाव बस आगाराच्या व्यवस्थापिका मनीषा सपकाळे यांच्याकडे तक्रार केली. वाहक चव्हाण यांच्याविरुध्द कारवाई केली, जाईल असे आश्वासन दिले.

घोटीचा युवक अपघातात जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

घोटी-सिन्नर महामार्गावर धामनी शिवारात मंत्र्यांना घेण्यास जाणाऱ्या इनोव्हा कार (क्र. एमएच ०१ ए एन ८७३) व समोरून घोटीकडे येणारी मोटरसायकल (एमएच ०५ ए १९६८) यांची समोरासमोर धडक झाली. यात घोटी येथील मोटरसायकल चालक बबलू उर्फ उमर फारुख शेख (रा.घोटी क्रांतीनगर) हा गंभीर जखमी झाला. नाशिकच्या खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून, अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images