Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाशिक उपकेंद्रासाठी एक कोटी ८६ लाख

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रामध्ये डिसेंबर २०१३ पूर्वी विद्यार्थी सहाय्यता केंद्र तसेच विभागीय संशोधन केंद्र उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २५ मार्चला झालेल्या अधिसभा बैठकीमध्ये विद्यापीठाने २०१३-१४ च्या बजेटमध्ये यासाठी १ कोटी ८६ लाख रुपयांची तरतूद केली आहे.

सातपूरमधील अतिक्रमणे जमीनदोस्त

$
0
0
रस्त्यावर बांधलेली दोन अतिक्रमणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मंगळवारी जमीनदोस्त केली. अनेकदा नोटिसा देऊनही अतिक्रमणधारकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दुगड हॉस्पिटलमुळे नाशिकच्या वैभवात भर

$
0
0
‘दातांचे सौंदर्य ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असून, दातांच्या समस्यांकडे सर्वांनीच लक्ष दिले पाहिजे. डॉ. दुगड यांच्या डेन्टल हॉस्पिटलमुळे नाशिककरांना एक चांगला पर्याय निर्माण झाला असून, या हॉस्पिटलमुळे नाशिकच्या वैद्यकीय वैभवातही भर पडली आहे,’ असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम, पर्यटन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

दोषी अधिकारी, लोकप्रतिनिधींवर कडक कारवाई व्हावी

$
0
0
गणवेश खरेदी करण्याचे टेंडर देऊन सतत गैरहजर राहणा-या ५ हजार ५४ विद्यार्थ्यांच्या नावे सुमारे २८ लाख रूपयांचा अपहार महापालिकेत करण्यात आला. याबाबत ‘मटा’ने ‘लक्तरे गणवेशाची’ या सीरिजमधून सर्व गैरकारभारावर प्रकाश टाकला.

‘काय करू, अधिकारी फोनच उचलत नाहीत’

$
0
0
दुष्काळाची भीषणता पाहून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मदतीसाठी आर्जव करीत असताना एकीकडे जिल्हा प्रशासन निधी स्वीकारण्याबाबत कार्यतत्परतेचा दुष्काळ दाखवित आहे तर, दुसरीकडे काय करू, अधिकारीच माझे फोन उचलत नाही, अशी हतबलता खुद्द जिल्हाधिकारी विलास पाटील व्यक्त करीत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री मदत निधीच्या बाबतीत जिल्हा प्रशासनाचे गांभीर्य आपसूकच स्पष्ट झाले आहे.

‘त्या’ नराधमांना पोलिस कोठडी

$
0
0
पेठरोडवरील तवली फाटा येथील जय आनंद निराश्रित (अनाथ) बालगृहात राहणाऱ्या अनाथ मुलींचा विनयभंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पंचवटी पोलिसांनी अटक केली. संशयितांना मंगळवारी कोर्टात हजर केले असता, त्यांना चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.

‘रोजगार हमी योजने’त घोटाळा

$
0
0
दुष्काळीस्थितीत रोजगार हमीच्या कामांना चालना देण्याचे सरकारी पातळीवर प्रयत्न असताना कळवण तालुक्यातील बाळापूर येथे याच योजनेत घोटाळा झाल्याची बाब उघडकीस आली आहे.

उपकेंद्राला छगन भुजबळांचा अडसर

$
0
0
पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र नाशिकमध्ये व्हावे म्हणून प्रयत्नांना सुरुवात केलेली असतानाही नगरने मास्टर प्लॅनपर्यंत मजल मारली आहे, नाशिक मात्र भूखंडही मिळवू शकलेले नाही. अर्थात जागा मिळण्यात होणाऱ्या विलंबास पालकमंत्री छगन भुजबळ यांची नाराजी हे कारण असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू आहे.

आम्हाला मुलगीच हवी!

$
0
0
मुलगी झाली म्हणून कपाळावर आठ्या चढविणारे... तिला हिणकस वागणूक देणारे पालक भरपूर दिसतात. पण मुलांऐवजी मुलींना दत्तक घेऊन त्यांना आपलसे करणाऱ्या पालकांच्याही संख्येत आता कमालीची वाढ होते आहे.

एलबीटी लागू

$
0
0
स्थानिक संस्था कर (एलबीटी) आठ आठवड्यात लागू करा असा निर्देश मुंबई हायकोर्टाने मंगळवारी दिला. याबाबत विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर आणि मनसे नगरसेवक गुलजार कोकणी यांनी याचिका दाखल केली होती.

सिंहस्थासाठी ५५० कोटींचा निधी

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने ५५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केल्याची माहिती जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिली आहे. यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ६ एप्रिलला बैठक होणार आहे.

धुळ्यात पोलिसावर तलवारीने हल्ला

$
0
0
जुन्या धुळ्यात सहाय्यक पोलिस निरिक्षक धनंजय पाटील यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

महापालिकेचे 'जावई' हटणार का?

$
0
0
नाशिकरोड परिसरातल्या फुटपाथची दुरावस्था झाली असून व्यावसायिकांनी फुटपाथवर ठाण मांडल्याने नागरिकांना चालणे मुष्कील झाले आहे. महापालिकेकडून नेहमीच अतिक्रमण निर्मुलनाचा फार्स केला जातो. यंदाही परिसरात राबविण्यात आलेली अतिक्रमण मोहिम फोल ठरली आहे.

महापौर गेले कुठे ?

$
0
0
'टाऊन प्लॅनिंग' या विषयाशी निगडीत चर्चासत्राचे आयोजन नुकतेच कालिदास सभागृहात करण्यात आले होते. शहराच्या विकासाचा विषय आला म्हणजे महापौरांना आमंत्रण आणि त्यांची उपस्थिती आलीच. महापौर कार्यक्रमाला आले...

विडी उत्पादनावरचा व्हॅट रद्द करण्याची मागणी

$
0
0
महाराष्ट्र सरकारने विडी उत्पादनावर १२.५ टक्के व्हॅट लावल्याने विडी उद्योग बंद पडण्याची शक्यता आहे. हा व्हॅट रद्द करावा, या मागणीसाठी विडी कामगारांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आपला निषेध नोंदवला.

रेल्वे दरवाढीची खिशाला झळ

$
0
0
रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल यांनी २०१३-१४ चा रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना तत्काळ, आरक्षण व सुपरफास्ट गाड्यांच्या दरात केलेल्या दरवाढीच्या घोषणेची अंमलबजावणी ३१ मार्चच्या मध्यरात्रीपासून होणार आहे.

मनमाडमध्ये २६ कुपनलिका मंजूर

$
0
0
भाजपचे खा. हरिश्चंद्र चव्हाण यांच्या निधीतून मनमाड शहरात २६ कुपनलिका मंजूर करण्यात आल्या असून त्याच्या जागाही निश्चित झाल्या आहेत. मनमाड शहरात भीषण दुष्काळ असल्याने तीव्र पाणीटंचाई आहे.

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा

$
0
0
विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी अंबड पोलिसांनी पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सिडकोच्या रायगड चौकात राहणाऱ्या पती आणि सासरच्या मंडळींनी चारित्र्याचा संशय घेत शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार विवाहितेच्या आईने केली आहे.

नागरिकांच्या समस्या तहकुबीच्या गर्तेत

$
0
0
नाशिकरोडचे प्रभाग सभापती पवन पवार न्यायालयीन कोठडीत असल्याने नाशिकरोडच्या प्रभागाचे काम ठप्प झाले आहे. पवार नसल्याने मार्च महिन्यात होणारी प्रभाग सभा पुन्हा एकदा तहकुब करावी लागली आहे.

नाकाबंदीत तीन गुन्हेगारांना अटक

$
0
0
चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणा-या तीन गुन्हेगारांना लासलगाव पोलिसांनी मंगळवारी अटक केली. नाकाबंदी व वाहन तपासणीदरम्यान त्यांना पकडण्यात आले. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास लासलगाव-विंचूर रस्त्यावर अॅक्सिस बँकेजवळ नाकाबंदीदरम्यान विंचूरच्या दिशेने लासलगाव शहरात येणा-या इंडिका कारची तपासणी करण्यात आली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images