Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पिस्तुल विक्रेत्यांना पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी​, ना​शिक

बंदुका व जिवंत काडतुसे विकण्याच्या तयारीत असलेल्या तिघा संशयितांना आज कोर्टाने १३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. संशयितांना शुक्रवारी सांयकाळच्या सुमारास सीबीएस परिसरातील एका बारसमोरून अटक करण्यात आली होती.

निखिल विलास गवळी (अशोकनगर, सातपूर), योगेश दादा गांगुर्डे (भद्रकाली) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार राकेश अंबादास सोनार (रा. जाधव संकुल, त्र्यंबक रोड, सातपूर) सध्या फरारी असून पोलिस त्याच्या मागावर आहेत. सीबीएस परिसरात काही गुन्हेगार बंदुका विकण्यासाठी येणार असल्याची माहिती भद्रकाली पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार सिनीअर पीआय मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची काही पथके तैनात करण्यात आली. गुलशनबार समोर काही संशयित उभे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसानी छापा मारून वरील दोघांना अटक केली. तर, राकेश सोनार पळून जाण्यात यशस्वी ठरला. संशयिताकडून २0 हजार २00 रुपये किंमतीची दोन गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे तसेच एक लाख रुपयाची इंडिका कार (एमएच 0४, सीई ४१९१) असा एकूण १ लाख ४0 हजार ४00 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेले संशयित अनुक्रमे २३ व २४ वर्षाचे असून गवळीवर खून, खूनाचा प्रयत्न, चोरी अशा गुन्ह्याची नोंद आहे. तर गांगुर्डेवर देखील खूनाचे दोन तसेच खंडणीचे गुन्हे विविध पोलिस स्टेशनमध्ये दाखल आहेत.

दरम्यान, या दोघा संशयितांना आज कोर्टासमोर हजर करण्यात आले. या प्रकरणात अधिक तपास करण्याची आवश्यकता असल्याने संशयितांना पोलिस कोठडी देण्यात आली‌.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अंदाजपत्रकातील आरोग्य

$
0
0

डॉ. शाम अष्टेकर

केंद्र सरकारच्या ताज्या अंदाजपत्रकात आरोग्यासंबंध‌चिी तरतूद काहीशी वाढलेली आहे. आरोग्यसेवांमधल्या तरतुदी अंदाजपत्रकात ठिकठिकाणी विखुरलेल्या असतात, त्यात आरोग्य व कुटुंबकल्याण (१८५०० कोटी) आयुष (३०० कोटी), एडस् नियंत्रण (५०० कोटी), याशिवाय आदिवासी उपयोजना, बालविकास योजना वगैरेंमधून थोडाथोडा भाग येतो. वस्तुत: २०१४-१५ पेक्षा २०१५-१६ वित्तीय वर्षातील सामाजिक खात्यांवरची तरतूद कमी केलेली दिसतेच, परंतु राज्यांना वाढीव निधी मिळणार असल्यामुळे त्याचा एकत्रित विचार केला तर वाढ दिसते (३५,००० पासून ४४,००० कोटी). अर्थमंत्र्यांच्या भाषणात प्रत्येक खेड्यासाठी (?) आरोग्यसेवा आणि पाच राज्यांमधे एम्स (दिल्लीप्रमाणे अखिल भारतीय विज्ञान संस्थान) याचा मुख्यत: उल्लेख होता आणि मेडिकल इन्शुरन्ससाठी भरघोस करसवलती दिसतात. याचा एकूण अर्थ लावण्याचा मी प्रयत्न केला आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल व आसाममध्ये एम्स सुरू करणे सर्वार्थाने योग्य आहे, पण बिहार आणि पंजाबला आधीच एम्स असतानाही आणखी एकेक दिली आहे. एका एम्सचा वार्षिक खर्च २०० कोटीच्या आसपास असतो, त्यामुळे इतर बऱ्याच तरतुदींना कात्री लावावी लागते. पण एम्स ही दृश्यमान संस्था असल्याने त्याचे राजकीय महत्त्वही आहे. पूर्वीच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन ऐवजी आता ग्रामीण व नागरी मिळून आरोग्यमिशन सुरू झालेले आहे. तथापि प्रत्येक खेड्यास आरोग्यसेवा याचा मला फारसा अर्थ कळला नाही, आरोग्यनीतीमध्ये किंवा आरोग्यहमी मसुद्यात त्याचा स्पष्ट उल्लेख नाही. प्रत्येक खेड्यात डॉक्टर जाणे शक्य नाही. त्यामुळे नवीन पॅरामेडिक्स शिकवून तयार करावे लागतील व तशी कायदेशीर तरतूद करावी लागेल, यापैकी काहीच घडलेले नाही. याऐवजी देशातल्या जवळजवळ दीड लाख ग्रामीण उपकेंद्रांना अधिक कार्यक्षम करून टप्प्या टप्प्याने त्यांचे दवाखान्यामध्ये रुपांतर करून स्थानिक पंचायतींना चालवायला दिली असती तर जास्त ठोस काम होऊ शकले असते.

मेडिकल इन्शुरन्ससाठी वाढीव करसवलत कौटुंबिक म्हणजे खाजगी विमाक्षेत्राला लाभदायक आहे, यामुळे विमा कंपन्यांना अधिक ग्राहक मिळतील व प्रिमियम पण वाढवता येईल. (वैद्यकीय विम्याचा ८०% व्यवसाय आज सार्वजनिक विमा कंपन्यांकडे आहे.) नागरिकांना, त्यातही ज्येष्ठांना स्वत:ची वैद्यकीय सुरक्षा (खर्चाची सुरक्षा) स्वत: घेता यावी म्हणून हे उपयोगी असले तरी एकूण खाजगी वैद्यकीय क्षेत्र व त्यातले दर आणखी वाढतील हे निश्‍चित. (सेवाकर वाढल्याने कॉर्पोरेट व मोठ्या खाजगी रुग्णालयांची बिलेही थोडीशी वाढतील.) आरोग्यनीती २०१५ मध्ये प्रगट केलेल्या संकल्पनेशी हे विसंगत आहे. याउलट सामूहिक व सामाजिक विमा योजनांमध्ये नागरिकांनी अधिक सामील होऊन एकूण आरोग्यसेवांमध्ये स्वस्ताई आणण्याचा राष्ट्रीय प्रयत्न करायला हवा. अपघाती मृत्यूसाठी २ लाख रु. विमा संरक्षण आर्थिक अडचण निवारू शकते; पण वैद्यकीय उपचारांचा खर्च त्यातून भागू शकत नाही (एकूण अपघातांपैकी साधारणपणे १०% मृत्यू होतात, इतरांना उपचारासाठी जबर वैद्यकीय खर्च करावा लागतो.)

तरतूद किती वाढली किंवा कमी झाली याहीपेक्षा नव्या संकल्पना व दिशा अंदाजपत्रकातून दिसायला हव्या. सामूहिक इन्शुरन्स योजनांना गती व अवकाश देणे, प्राथमिक आरोग्यसेवेचे स्ट्रटेजिक पुनरुज्जीवन, पॅरामेडिक्सचा अधिक वापर, धर्मादाय व रास्त दराने सेवा प्रदान करणाऱ्या रुग्णालयांना सहायता, वैद्यकीय शिक्षण-सुधारणा वगैरे चिन्हे यात हवी होती. देशातल्या आरोग्यसेवेला (सरकारी, खाजगी व धर्मादाय) काही दिशा व पर्याय देण्याचे काम अंदाजपत्रकाने करायला हवे ते फारसे दिसत नाही. या विसंगतींचे किंवा त्रुटींचे एक कारण म्हणजे खुद्द आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय त्या क्षेत्राच्या माहितगाराकडे नाही हे असू शकेल. आजकाल प्रत्येक क्षेत्र तांत्रिकदृष्ट्या व्यामिश्र होत चालले आहे आणि त्याचा अभ्यास असल्याखेरीज ऐनवेळी आणून बसवलेल्या माणसांना ते क्षेत्र समजून घेणे व त्यात अर्थपूर्ण योग्य बदल करणे वगैरे शक्य नसते, त्याला एखादा अपवाद असू शकतो, पण सध्यातरी अवस्था धूसर दिसते. आरोग्यमंत्रालयात काही चांगले अधिकारी असले तरी एकूण बाबूशाही, कॉर्पोरेट रुग्णालये, परदेशस्थ फंडिंग संस्था, आणि मेडिकल कौन्सिलमधले काही हितसंबंधी हे बिनमाहितगार मंत्र्याला गुंडाळू किंवा वळवू शकतात. म्हणूनच आरोग्यक्षेत्राला अच्छे दिन येण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल असे मला दिसते. आशेचा किरण हा की आरोग्यसेवा हा मुख्यत: राज्यांचाच विषय आहे आणि केंद्रावर पूर्णपणे अवलंबून न राहता प्रत्येक राज्य आपापल्या गरजा व आकांक्षानुसार सार्वजनिक आरोग्यसेवा, वैद्यकीय शिक्षण-संचालन आणि खाजगी व धर्मादाय वैद्यकीय सेवांचे काही प्रमाणात नियोजन करू शकते. त्यासाठी कल्पकता आणि नेतृत्व लागते. गेली २-३ दशके वरून आलेल्या केंद्रीय योजना कशाबशा राबवणे, त्यात जमेल तेवढा हात मारणे आणि आपली सोय बघून बाकी वाऱ्यावर सोडून देणे हीच प्रवृत्ती राज्यांमध्ये अगदी महाराष्ट्र धरून बळावली आहे, रालोआ सरकारने राज्यांना अधिक निधी, कार्यक्रम स्वातंत्र्य आणि उत्तरदायित्व देऊ केलेले आहे, हा बदल आत्मसात करून राज्य सरकारे अधिक काम करू शकतात.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला दिनानिमित्त ‌ वि‌विध कार्यक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी (८ मार्च) रोजी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहेत. यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य संस्था तसेच राजकीय पक्ष अशा विविध क्षेत्रातील संस्थाकडून विविध शिबिरे, चर्चासत्र, व्याख्याने, रॅली, आरोग्य शिबिरे, सत्कार सोहळे यांचा समावेश आहे.

आरोग्य शिबिर

महिलादिनानिमित्त सह्याद्री हॉस्पिटलच्या वतीने महिलांसाठी बोर्न बर्थडे-माय हेल्थ डे हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. ८ मार्च रोजी जन्मलेल्या कोणत्याही महिला ३ हजार रुपयांच्या कुपनचा लाभ घेऊ शकतात. ३१ मार्चपर्यंत हे कुपन वापरता येणार असून ८ मार्च रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत यासंधीचा लाभ घेता येईल अशी माहिती आयोजकांच्यावतीने कळवण्यात आली आहे.

संगीत खुर्ची स्पर्धा

आम्ही साऱ्याजणी या शहरातील महिला संघटनेच्यावतीने महिला दिनानिमित्त प्रश्नमंजूशा, संगीत खुर्ची आदि विविध स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. सरोज म्हसकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहे. रविवारी (८ मार्च) बीवायके

कॉलेजमधील कुलकर्णी हॉल येथे हा कार्यक्रम पार पडणार असल्याचे संघटनेच्या अध्यक्षा दिपाली कुलकर्णी यांनी कळवले आहे.

आरोग्य शिबिर

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आडगांव येथील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सोमवारी (९ मार्च) रोजी सकाळी १० ते १ या वेळेत मोफत तपासणी केली जाणार आहे. महामार्गावरील आडगांव फाटा येथून व बी. डी. भालेकर हायस्कूल ग्रांऊड येथून सोमवारी सकाळी ९.३० वाजता मोफत वाहनव्यवस्था करण्यात आली आहे. महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन सरचिटणीस निलिमा पवार, अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील, स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. किरण पाटोळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९८९०६९३६८८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

स्पर्धांचे आयोजन

प्रभाग क्रमांक ४० मध्ये विविध वयोगटातील महिलांसाठी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी इंदिरानगर परिसरातील रथचक्र चौकाजवळील अजय मित्र मंडळाच्या सभागृहात या स्पर्धा पार पडतील. पाककला स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या महिलांनी गोड किंवा तिखट पदार्थ घरीच तयार करून आणायचे आहे. दुपारी एक वाजता पाककला स्पर्धा पार पडेल. यानंतर सुंदर मेकअप व उखाण्यांची स्पर्धा, मेहंदी व रांगोळी स्पर्धा तसेच एक मिन‌टि स्पर्धा पार पडतील. स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन नगरसेविका दीपाली कुलकर्णी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुंड्यासाठी महिन्याकाठी दोन महिलांचा बळी

$
0
0

अरविंद जाधव​, ना​शिक

हुंड्यासाठी छळ करून विवाह‌तिेला आत्महत्येस प्रवृत्त करणे किंवा तिचा जीवच घेण्याचे प्रकार शहरी भागात वाढीस लागले आहेत. गत वर्षातच हुंड्यासाठी महिन्याकाठी दोन विवाह‌तिांना प्राणास मुकावे लागले आहे.

लग्नात मानपान दिला नाही, हुंडा कमी दिला, गाडी घेण्यासाठी माहेराहून पैसे आणाले नाहीत, चरित्राचा संशय अशा असंख्य कारणावरून विवाहीतेंचा मानसिक आणि शा‌रीरिक छळ होण्याच्या घटना दररोज घडतात. यातील काही घटना पोलिस स्टेशनपर्यंत पोहचतात तर काही 'सामंजशाने' मिटवल्या जातात. गतवर्षात महिलांचा छळ केल्याप्रकरणी शहर पोलिसांकडे २०२ गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे वर्षागणीक हा आकडा वाढतच चालला आहे. २०११ मध्ये कौटुंबिक हिंसाचार कायद्यातील कलम ४९८ नुसार ११३ गुन्हे दाखल झाले होते. २०१२ मध्ये हा आकडा १४३ इतका झाला तर २०१३ मध्ये विवाह‌तिांचा मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचे १७५ गुन्हे दाखल झाले होते. विवाह‌तिेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या २० घटना २०१४ मध्ये घडल्यात.

हुंड्यासाठी विवाह‌तिेचा खून केल्याप्रकरणी शहरातील पोलिस स्टेशनमध्ये चार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी २०११ मध्ये २६, २०१२ मध्ये १८ आणि २०१३ मध्ये १५ गुन्ह्यांची नोंद होती. उपलब्ध आकडेवारीवरून गेल्या वर्षात फक्त हुंड्यासाठी महिन्याकाठी दोन विवाह‌तिा मृत्युमूखी पडल्याचे दिसते. निर्भयाप्रकरणानंतर विनयभंगाच्या घटना रोखण्यासाठी कठोर कायदा अंमलात आणला गेला.

परिणामी गुन्हा दाखल होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली. गत वर्षी छेडछाड किंवा विनयभंगाच्या १०२ घटना घडल्या. तर २८ बलात्काराच्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला.

ही जागृती की अधोगती?

शहरी भागात शिक्षणाच्या प्रसारामुळे हुंडा पध्दतीसह इतर प्रथांना मुठमाती देण्याचे काम होणे अपेक्षित होते. मात्र, याउलट चित्र सध्या निर्माण होताना दिसते आहे. २०११ पासून २०१४ पर्यंत विवाहीतेच्या मानसिक आणि शारी‌रिक छळाच्या ६३३ घटना घडल्या आहेत. वर्षागणीक कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होते आहे.

चालू वर्षात देखील 'असुरक्षितता'

चालू वर्षातील पहिल्या दोन महिन्यात छळाच्या २५, विनयभंगाच्या १२, बलात्काराच्या सहा तर हुंड्यासाठी विवाह‌तिेला जीवे मारण्याचा प्रयत्न केले म्हणून चार गुन्हे दाखल झाले आहेत. वाढत्या लोकसंख्येबरोबर या गुन्ह्यांची संख्या वाढण्याची शक्यता अधिक असते. एकत्र कुंटुब पध्दतीचा झालेला ऱ्हास, शिक्षणाचा अहंकार किंवा अभाव, सामाजिक मुल्यांचे झालेले अधः‍पतन अशा विविध कारणांमुळे या गुन्ह्यांना काबूत ठेवणे पोलिसांना सोपे नसल्याचे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

कौटुंबिक छळाच्या घटना वाढल्या की गुन्ह्यांची संख्या वाढू शकते. पीडीत महिलेची इच्छा असल्यास तत्काळ गुन्हा दाखल केला जातो. हुंडा पध्दत आणि त्याअनुषंगाने उद्भवणारे गुन्हे रोखण्यासाठी समाजाच्या मानसिकतेत बदल होणे अपेक्षित आहे. - कुलवंत कुमार सरंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाईक रॅलीचा आज थरार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जागतिक महिला दिनानामित्त नारीशक्तीला सलाम करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे रविवारी सकाळी बाईक रॅली होत आहे. या रॅलीच्या नावनोंदणीला नाशिककर महिलांनी तुफान प्रतिसाद दिला असून, सकाळी ९ वाजता बीवायके कॉलेजच्या मैदानापासून रॅलीला मोठ्या उत्साहात प्रारंभ होणार आहे.

संघर्ष, परिश्रम आणि यश या त्रिसूत्रीच्या आधारे दैनंदिन जगण्यातील आव्हानांचा सामना करणाऱ्या महिलांचा आवाज आता बुलंद होऊ लागला आहे. महिलांच्या या सबलीकरणाचा उत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सतर्फे यंदाही जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बाइक रॅलीचे आयोजन केले आहे. काळाप्रमाणे बदलणारी महिला आणि तीची खास मैत्रिण म्हणजे तीची बाइक. मग तिच्यासह मिरविण्याची संधी कोण सोडणार? त्यामुळेच 'मटा'च्या आवाहनाला प्रतिसाद देत शेकडो महिलांनी या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी केली आहे.

या बाबी महत्त्वाच्या

>रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन आवश्यक.

>पोषाखाचे कोणतेही बंधन नाही, पण शक्यतो सुटसुटीत पोषाख परिधान करा.

>रॅलीदरम्यान तुमचे लायसन्स तुमच्याबरोबरच असू द्या

>हेल्मेट असेल तर ते निश्चित परिधान करा.

>ही रॅली असणार आहे रेस नाही. त्यामुळे सांगितलेल्या स्पीड लिमिटमध्येच गाडी चालवा.

>रॅलीचा मार्ग ज्या पध्दतीने दिला आहे, त्यानुसारच गाडी चालवा.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला दिनानिमित्त ‌ वि‌विध कार्यक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी (८ मार्च) रोजी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहेत. यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य संस्था तसेच राजकीय पक्ष अशा विविध क्षेत्रातील संस्थाकडून विविध शिबिरे, चर्चासत्र, व्याख्याने, रॅली, आरोग्य शिबिरे, सत्कार सोहळे यांचा समावेश आहे.

आरोग्य शिबिर

महिलादिनानिमित्त सह्याद्री हॉस्पिटलच्या वतीने महिलांसाठी बोर्न बर्थडे-माय हेल्थ डे हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. ८ मार्च रोजी जन्मलेल्या कोणत्याही महिला ३ हजार रुपयांच्या कुपनचा लाभ घेऊ शकतात. ३१ मार्चपर्यंत हे कुपन वापरता येणार असून ८ मार्च रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत यासंधीचा लाभ घेता येईल अशी माहिती आयोजकांच्यावतीने कळवण्यात आली आहे.

संगीत खुर्ची स्पर्धा

आम्ही साऱ्याजणी या शहरातील महिला संघटनेच्यावतीने महिला दिनानिमित्त प्रश्नमंजूशा, संगीत खुर्ची आदि विविध स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. सरोज म्हसकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहे. रविवारी (८ मार्च) बीवायके

कॉलेजमधील कुलकर्णी हॉल येथे हा कार्यक्रम पार पडणार असल्याचे संघटनेच्या अध्यक्षा दिपाली कुलकर्णी यांनी कळवले आहे.

आरोग्य शिबिर

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आडगांव येथील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सोमवारी (९ मार्च) रोजी सकाळी १० ते १ या वेळेत मोफत तपासणी केली जाणार आहे. महामार्गावरील आडगांव फाटा येथून व बी. डी. भालेकर हायस्कूल ग्रांऊड येथून सोमवारी सकाळी ९.३० वाजता मोफत वाहनव्यवस्था करण्यात आली आहे. महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन सरचिटणीस निलिमा पवार, अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील, स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. किरण पाटोळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९८९०६९३६८८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

स्पर्धांचे आयोजन

प्रभाग क्रमांक ४० मध्ये विविध वयोगटातील महिलांसाठी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी इंदिरानगर परिसरातील रथचक्र चौकाजवळील अजय मित्र मंडळाच्या सभागृहात या स्पर्धा पार पडतील. पाककला स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या महिलांनी गोड किंवा तिखट पदार्थ घरीच तयार करून आणायचे आहे. दुपारी एक वाजता पाककला स्पर्धा पार पडेल. यानंतर सुंदर मेकअप व उखाण्यांची स्पर्धा, मेहंदी व रांगोळी स्पर्धा तसेच एक मिन‌टि स्पर्धा पार पडतील. स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन नगरसेविका दीपाली कुलकर्णी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुंड्यासाठी महिन्याकाठी दोन महिलांचा बळी

$
0
0

अरविंद जाधव​, ना​शिक

हुंड्यासाठी छळ करून विवाह‌तिेला आत्महत्येस प्रवृत्त करणे किंवा तिचा जीवच घेण्याचे प्रकार शहरी भागात वाढीस लागले आहेत. गत वर्षातच हुंड्यासाठी महिन्याकाठी दोन विवाह‌तिांना प्राणास मुकावे लागले आहे.

लग्नात मानपान दिला नाही, हुंडा कमी दिला, गाडी घेण्यासाठी माहेराहून पैसे आणाले नाहीत, चरित्राचा संशय अशा असंख्य कारणावरून विवाहीतेंचा मानसिक आणि शा‌रीरिक छळ होण्याच्या घटना दररोज घडतात. यातील काही घटना पोलिस स्टेशनपर्यंत पोहचतात तर काही 'सामंजशाने' मिटवल्या जातात. गतवर्षात महिलांचा छळ केल्याप्रकरणी शहर पोलिसांकडे २०२ गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे वर्षागणीक हा आकडा वाढतच चालला आहे. २०११ मध्ये कौटुंबिक हिंसाचार कायद्यातील कलम ४९८ नुसार ११३ गुन्हे दाखल झाले होते. २०१२ मध्ये हा आकडा १४३ इतका झाला तर २०१३ मध्ये विवाह‌तिांचा मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचे १७५ गुन्हे दाखल झाले होते. विवाह‌तिेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या २० घटना २०१४ मध्ये घडल्यात.

हुंड्यासाठी विवाह‌तिेचा खून केल्याप्रकरणी शहरातील पोलिस स्टेशनमध्ये चार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी २०११ मध्ये २६, २०१२ मध्ये १८ आणि २०१३ मध्ये १५ गुन्ह्यांची नोंद होती. उपलब्ध आकडेवारीवरून गेल्या वर्षात फक्त हुंड्यासाठी महिन्याकाठी दोन विवाह‌तिा मृत्युमूखी पडल्याचे दिसते. निर्भयाप्रकरणानंतर विनयभंगाच्या घटना रोखण्यासाठी कठोर कायदा अंमलात आणला गेला.

परिणामी गुन्हा दाखल होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली. गत वर्षी छेडछाड किंवा विनयभंगाच्या १०२ घटना घडल्या. तर २८ बलात्काराच्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला.

ही जागृती की अधोगती?

शहरी भागात शिक्षणाच्या प्रसारामुळे हुंडा पध्दतीसह इतर प्रथांना मुठमाती देण्याचे काम होणे अपेक्षित होते. मात्र, याउलट चित्र सध्या निर्माण होताना दिसते आहे. २०११ पासून २०१४ पर्यंत विवाहीतेच्या मानसिक आणि शारी‌रिक छळाच्या ६३३ घटना घडल्या आहेत. वर्षागणीक कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होते आहे.

चालू वर्षात देखील 'असुरक्षितता'

चालू वर्षातील पहिल्या दोन महिन्यात छळाच्या २५, विनयभंगाच्या १२, बलात्काराच्या सहा तर हुंड्यासाठी विवाह‌तिेला जीवे मारण्याचा प्रयत्न केले म्हणून चार गुन्हे दाखल झाले आहेत. वाढत्या लोकसंख्येबरोबर या गुन्ह्यांची संख्या वाढण्याची शक्यता अधिक असते. एकत्र कुंटुब पध्दतीचा झालेला ऱ्हास, शिक्षणाचा अहंकार किंवा अभाव, सामाजिक मुल्यांचे झालेले अधः‍पतन अशा विविध कारणांमुळे या गुन्ह्यांना काबूत ठेवणे पोलिसांना सोपे नसल्याचे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

कौटुंबिक छळाच्या घटना वाढल्या की गुन्ह्यांची संख्या वाढू शकते. पीडीत महिलेची इच्छा असल्यास तत्काळ गुन्हा दाखल केला जातो. हुंडा पध्दत आणि त्याअनुषंगाने उद्भवणारे गुन्हे रोखण्यासाठी समाजाच्या मानसिकतेत बदल होणे अपेक्षित आहे. - कुलवंत कुमार सरंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांनी’ रोवली मुहूर्तमेढ!

$
0
0

डॉ. सरल धारणकर

आधुनिक कालखंडात व्यवसायाच्या शिक्षणाचे ज्ञान स्वतंत्रपणे दिले जाण्याची सोय नव्हती. मात्र, परंपरागत शिक्षण घरच्या घरी स्त्रियांना आपोआप मिळत असे. हळूहळू शिक्षणाचा प्रसार होऊ लागला तसतसे स्त्रियांच्या कार्याचे क्षेत्र विस्तारले. अशा वातावरणात उद्योग-व्यवसायात महिलांचे कार्यक्षेत्र सुरू झाले. हळूहळू त्यात वाढ होत गेली. या आर्थिक क्षेत्रातील नाशिकमधील महिलांचा सहभाग फारसा नव्हता. परंतु, त्यांच्या कार्यामुळे पुढील काळातील उद्योगधंद्यांना चालना मिळत गेली.

सरस्वती फाळके यांचे नाव प्रथम समोर येते. एकोणिसावेशतक संपत आलेल्या काळात स्त्रियांना वैचारिक स्वातंत्र्य फारसे नव्हते. वयाच्या नवव्या वर्षी सरस्वतीबाईंचा विवाह दादासाहेब फाळके यांच्याबरोबर झाला. दादासाहेब चित्रपट बनविण्याच्या उद्योगात रममाण झालेले होते. हा जगावेगळा ध्यास सरस्वतीबाईंच्या लक्षात आला. दादासाहेबांनी इंग्लंडला जाऊन चित्रपट निर्मितीचे नवे तंत्रज्ञान घेतले होते. यासाठी त्यांना खूप खर्च झाला होता आणि हा खर्च वाढतही होता. पतीनिष्ठेमुळे सरस्वतीबाईंनी आपले दागिने पतीच्या स्वाधीन केले. या दागिन्यांच्या चांगल्या कामासाठी उपयोग होत आहे यावर त्यांचा भरवसा होता. अशा प्रकारे पतीबरोबर चित्रनिर्मिती व्यवसायात त्यांचा सहभाग सुरु झाला. ज्या काळात चित्रपट स्त्रियांनी पाहणे चांगले नव्हे, असे समजले जात होते त्याच काळात सरस्वतीबाईंचा व्यवसायात सहभाग सुरू झाला व तो यशस्वीही ठरला.

आणखी एक विशेष उदाहरण म्हणजे नाशिकमधील सायंटिफिक लॅबोरेटरीच्या संचालिका शांताबाई फाळके. पतीसमवेत शास्त्रीय उपकरणे, तक्ते, रसायने व अन्य प्रकारचे साहित्य पुरविण्याच्या व्यवसायात त्यांनी स्वतःला वाहून घेतले. त्यांची यूएसएडब्ल्यु ही एजन्सी होती. रोज काम करताना पोटॅशियम सायनाईट सारखे रसायन, अॅसिटस्, फॉस्फरस सोडियमसारखे ज्वालाग्रही पदार्थ त्यांना हाताळावे लागत असे. या क्षेत्रातील कोणतेही ट्रेनिंग घेतलेले नसताना शांताबाईंनी या व्यवसायात सहभाग नोंदविला आणि त्यासाठी लागणारी कार्यक्षमता त्या काळात त्यांनी मिळवली.

परिस्थिती माणसाला बरेच काही शिकवून जाते व शिकायला भाग पाडते. तसेच काहीसे येसुबाई जोशी यांच्या बाबतीत झाले. त्या नाशिकच्या चितपावन संघाच्या गल्लीत मोठ्या वाड्यात राहत असत. घरातील कडक शिस्तीचे वातावरण. सत्याग्रहात पतीला अटक झाल्यानंतर आपल्या पाच मुलांना घेऊन न डगमगता त्यांनी घर सांभाळले. १९५७ च्या संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये सहभागी झाल्याने त्याची झळ सर्वांनाच पोहचली होती. आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी येसूबाई जोशींनी छोटे-छोटे व्यवसाय करून घर सावरले. कलेपेक्षा अर्थसाधनेमध्ये त्यांनी लक्ष दिले.

याप्रमाणेच नाशिकच्या रागिणी वैद्य धडाडीच्या महिला होत्या. नाशिकच्या महिला वर्गाला त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने शिवणकाम, भरतकाम शिकवण्याचे वर्ग चालू केला. नाशिकमध्ये समाधान हॉटेलच्यावर त्यांच्या क्लासचा फलक लावलेला होता. नंतर चांदवडकर लेन येथे मुलींसाठी व स्त्रियांसाठी शिवणकाम व भरतकामाचा वर्ग चालू केला. यामध्ये कला शिकण्याबरोबर स्वावलंबी होऊन अर्थार्जनाकडे वळावे हाही हेतू त्यांचा यामागे होता. पारंपरिक कला, चालीरिती, सणवार, कुळधर्म, कुळाचार यात गुंतलेल्या महिलांना शिवणकाम, भरतकामाचा वर्ग सुरु केल्याने त्यांच्या कार्याला वेगळी दिशा मिळण्यास सुरुवात झाली. नाशिकमध्ये १९३० ते १९८० या काळात हा क्लास प्रसिद्ध होता. आजच्या काळात असे क्लास सुरू करणे म्हणजे विशेष नवीन वाटणार नाही. परंतु, त्या काळात घरातच वावरणा-या महिलांना अशाप्रकारे अर्थाजनाच्या दृष्टीने पाऊल टाकणे विशेष होते.

गृहिणी म्हणून घरची सर्व जबाबदारी सांभाळत घरच्या व्यवसायाला मदत करणे हा व्यवसायाचा भाग ठरला. नाशिकमधील प्रसिद्ध भगवंतराव हॉटेलच्या प्रारंभीच्या काळात अष्टपुत्रे कुटुंबातील महिलांनी घराच्या उंबरठ्याच्या आत राहून व्यवसायाचे मोठे व्यवस्थापन सांभाळले. उत्पादनासाठी हातभार लावला. या पार्श्वभूमीवर हॉटेलचा व्यवसाय वाढला. हे एक प्रारंभीच्या अर्थकारणातील उदाहरण ठरते. अष्टपुत्रेंच्या सरस्वतीबाईंनी आपल्याबरोबर आपल्या सुनांनाही हाताशी धरून कार्य नेटाने केले. व्यवसाय वाढीस लावला. हॉटेलसाठी लागणारे पदार्थ अनरसे, ताक, श्रीखंड इत्यादी घरी बनवले जात. नंतर ते विक्रीला जाई या पदार्थाना मागणीही मोठी होती. घरच्या महिलांनी घराच्या उंबरठ्याच्या आत राहून चालविलेले व यशस्वी केलेले असे हे हॉटेल म्हणजे या व्यवसायातील यश फलदायी ठरले असे दिसून येते. स्वातंत्र्यपूर्व काळात मुलींच्या शिक्षणाची सुरुवात झाली परंतु महाविद्यालयात शिक्षण घेणा-यांची संख्या फारशी नव्हती. नंतर त्यात वाढ होत गेली. तसे स्त्रिया नोकरीसाठी घराबाहेर पडल्या आणि त्यांचा अर्थकारणाकडे सहभाग सुरू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आधी स्वतःला गृहीत धरणं सोडा!

$
0
0

करिअर आणि घर या दोन्ही माझ्याच जबाबदाऱ्या असं गृहीत धरून महिला सुपरवूमन होऊ पाहत आहेत. हे गृहीत धरणंच त्यांना स्वत:च्या अस्तित्वापासून दूर घेऊन जात आहे. त्यामुळे आजही बहुतांश महिला मानसिक आणि आर्थिक संतुलन साधण्यापासूनही दूर राहिल्या आहेत. हे चित्र बदलण्यासाठी आधी स्वत:ला गृहीत धरणं सोडा असा मौलिक सल्ला 'मटा' राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या निमित्ताने जमलेल्या विविध क्षेत्रातील महिलांनी दिला. मधू चौगावकर, मुक्ता चैतन्य, दीपिका तांबे, दीप्ती राऊत, अॅड. वर्षा देशमुख व वासंती ठाकूर या चर्चेत सहभागी झाल्या.

फोकसड् व्हा...!

महिलांची करिअर आणि घर या दोन्हींमध्ये समतोल साधताना होणारी तारेवरची कसरत म्हणजे आपण फोकसड् नसल्याचा परिणाम आहे. समाजव्यवस्था निश्चितच यासाठी जबाबदार आहे पण त्याआधी तुम्ही स्वत: जबाबदार आहात. नवऱ्याला चांगला पैसा मिळत असेल तर अनेक मुली सरळ नोकरी सोडून घरी बसतात आणि काही कालावधीनंतर त्यांचं अस्तित्वच राहत नाही. कित्येक जणी मुलाबाळांच्या जबाबदाऱ्यांदरम्यान करिअरमधून ब्रेक घेतात आणि कायमच्या घरी बसतात. मी स्वत: मुलीसाठी दोन वर्षांचा ब्रेक घेतला पण तो स्वत:च्या आनंदासाठी. या दरम्यानही मी मला काय करायचंय हे ठरवून घेतलं होतं. त्यानुसार दोन वर्षांनंतर पुन्हा कामाला सुरुवात केली. तुम्हाला घर आणि करिअर या दोन्ही गोष्टी हव्या असतील तर त्यामध्ये बॅलन्स साधण्यासाठी तुम्ही तुमचे प्रेफरन्सेस ठरवायलाच हवेत. पण याचा अर्थ असा नाही की घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या तुमच्याच आहेत. हा बॅलन्स तुमच्या मानसिकतेमध्ये हवा. आपल्याला हवं तस जगण्यासाठी आपणच पूरक परिस्थिती निर्माण करायला हवी. तुम्ही ठरवलं तरच तुम्ही तुम्हाला हवं तसं लाईफ बॅलन्स करु शकता, अन्यथा समाज व्यवस्था तुम्हाला टिकू देणार नाही. - मुक्ता चैतन्य, लेखिका

मानसिकदृष्ट्या स्वावलंबी व्हा

पूर्वीच्या काळी स्त्रीला नोकरी करणं किंवा आपल्या आवडीनुसार काम करणं यासाठी जितकी बंधनं होती ती परिस्थिती आता राहिलेली नाही. सध्याच्या परिस्थितीत स्त्रीला करिअरसाठी आणि त्यानंतर येणाऱ्या अडचणी पूर्णपणे बदलल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलायला हवा. घरामधून आपल्या करिअरला पोषक वातावरण मिळेलच याची प्रत्येकीला खात्री नसते पण तसं वातावरण निर्माण करणं आपल्या हातात आहे, हे प्रत्येकीने लक्षात घ्यायला हवे. जनरेशन गॅप, सामाजिक मानसिकता या सगळ्यांचा त्रास होणार असला तरीही स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा असायलाच हवी. पूर्वीच्या महिलांची मानसिकता आता बदलली आहे, करिअरसाठी घरामधून मिळणारं स्वातंत्र्य हवं त्या प्रमाणात आहे. मात्र तरीही मानसिकता आणि जबाबदाऱ्या या दोन्ही गोष्टींचा समाजाने प्रामुख्याने विचार करायला हवा. समाज, कुटूंब या सगळ्या गोष्टी दूर लोटून मानसिकदृष्ट्या स्वावलंबी व्हायला हवं. खंबीरपणा सर्व अडथळे तोडण्याच्या कामी येऊ शकतो. - वासंती ठाकूर, व्यावसायिक

इच्छा तिथे मार्ग

घरच्यांचा प्रचंड विरोध असतानाही आज मी माझा स्वत:चा टी बार सुरू करण्याचं स्वप्न पूर्ण केलं. पण हे शक्य झालं ते केवळ माझ्या इच्छाशक्तीमुळे. आज महिला प्रत्येक क्षेत्रात दिसत असल्या तरी तिथवर पोहोचण्यासाठी त्यांना लाख अडथळे पार करावे लागतात. अडथळ्यांना घाबरुन राहायचं असेल तर स्वप्न पाहण्याची गरजच नाही, कारण ती पूर्णच होणार नाहीत. स्त्री पुरुष मानसिकतेमध्ये असलेला फरक आजही आपल्याला पाहायला मिळतोच आहे. यावर एकच उपाय आहे तो म्हणजे परिस्थितीशी नेटानं लढा देणं. तुम्ही झगडणं बंद केलंत तर दुसऱ्यांचं काहीच बिघडणार नाही पण तुमचं मात्र निश्चितच नुकसान होईल. आजूबाजूच्या वातावरणानुसार स्वत:ला तयार करायला हवं व मार्ग काढायला हवा. मागच्या पिढीने ते केलं म्हणून आपल्याला हे दिवस पाहायला मिळत आहेत. आपण याच्या पुढचा टप्पा गाठायला हवा. जबाबदारी घेण्याची धमक आपल्यात आहेच पण म्हणून त्याचा गैरवापर होता कामा नये, मग तो कुटुंबाकडून असेल किंवा समाजाकडून. - दीपिका तांबे, व्यावसायिका

जबाबदाऱ्या शेअर करायला शिका

मुलांची जबाबदारी घेण्याची वेळ येते तेव्हा बाईलाच नोकरी सोडावी लागते. तिथे पुरुष हात झटकून मोकळे होतात. हे चित्र बदलायला हवं. यासाठी तुम्हीच तयार व्हा, स्वत:ला प्रीझर्व्ह करा नाहीतर हा समाज तुम्हाला खाऊन टाकेल. यासाठी तुम्ही काही मर्यादा ठरवून घेतल्या पाहिजेत ज्या ओलांडण्याचा अधिकार कोणालाच असणार नाही. आजची समाज व्यवस्था कितीही बदलली असल्याचं वरवर दिसत असलं तरी ते सगळं झूठ आहे. करिअर करण्याचं स्वातंत्र्य तर तुम्हाला दिलं आहे पण त्यासाठी अाडकाठी ठरणाऱ्या जबाबदाऱ्यांमधून मात्र अद्याप तुम्हाला मुक्त केलेलंच नाही. यावर प्रत्येक महिलेने विचार करायला हवा आणि या जबाबदाऱ्या स्पष्टपणे शेअर करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. - मधू चौगावकर, जेंडर रिसर्चर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजाने उभी करावी सपोर्ट सिस्टीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'करिअर आणि घर या दोन्ही पातळ्यांवर लढताना अनेक महिला करिअरपासून कायमच्या दुरावतात. हे टाळण्यासाठी त्यांच्या जबाबदाऱ्या सुसह्य करण्याची सपोर्ट सिस्टीम समाजानेच उभी करायला हवी', असा सूर 'महाराष्ट्र टाइम्स'मार्फत महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये उमटला. मुक्ता चैतन्य, दीप्ती राऊत, अॅड. वर्षा देशमुख, मधू चौगावकर, वासंती ठाकूर आणि दीपिका तांबे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

आज बहुतांश महिलांना घरच्या जबाबदाऱ्यांसाठी काही वर्षे करिअरपासून दूर राहावं लागतं. याच कालावधीत मेन स्ट्रीमपासून अनेकजणी बाजूला फेकल्या जातात आणि त्यांचं करिअरचं संपतं. हे टाळण्यासाठी समाजानेच वर्किंग वुमन्ससाठी सपोर्ट सिस्टीम विकसित करायला हवी असे मत या महिलांनी व्यक्त केले. कामाच्या ठिकाणीच या महिलांच्या लहान मुलांसाठी पाळणा घराची सुविधा निर्माण झाल्यास महिलांचे अर्ध्याहून अधिक प्रश्न सुटतील, असा मुद्दा यावेळी समोर आला.

आज महिलांना करिअरसाठी कोणी आडवत नाही पण करिअर करतानाही त्यांना घरच्या जबाबदऱ्यांसाठी गृहीत धरलं जात असल्याचं मत दीप्ती राऊत यांनी व्यक्त केलं. मुक्ता चैतन्य यांनी महिला स्वत:च्या आयुष्याबाबत फोकसड् नसल्याचा मुद्दा उपस्थित केला तर दीपिका तांबे यांनी महिला आणि पुरुषांच्या मानसिकतेतील फरकांचा उल्लेख यावेळी केला. मधू चौगावकर यांनी काळानुसार बदललेल्या महिलांच्या समस्यांचा गोषवारा घेतला. अॅड. वर्षा देशमुख यांनी करिअरसाठी आवश्यक असणाऱ्या घरच्यांच्या पाठिंब्याबद्दल वक्तव्य केले तर वासंती ठाकूर यांनी मानसिक स्वावलंबनाचा मुद्दा उपस्थित केला.

केवळ करिअरला प्राधान्य न देता करिअरबरोबरच कुटुंब व्यवस्थेलाही सांभाळण्यासाठी आज अनेक महिला धडपडत आहेत. समाजव्यवस्था त्यांच्या मार्गात अडथळा बनत असेल तर ती बदलण्याचे काम महिलांनीच करायला हवे असे, मत सर्वच सहभागी महिलांनी या राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या समारोपात व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटांवर उभारणार आयसीयू वॉर्ड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना‌शिक

सिंहस्थाच्या गर्दीत एखाद्या व्यक्तीला तातडीने उपचारांची गरज भासलीच तर त्याला गर्दीतून वाट काढत हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाणे मोठे दिव्य ठरणार आहे. म्हणूनच शहरात उभारण्यात येणाऱ्या सात घाटांवर तात्पुरत्या स्वरुपातील तंबूतच अतिदक्षता विभाग उभारण्यावर जिल्हा प्रशासन भर देणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक झाली. आरोग्य सुविधांचे नियोजन करताना जिल्ह्यातील आरोग्य संस्था, रुग्णालये, सेवाभावी संस्था, वैद्यकीय महाविद्यालयांसोबत समन्वय स्थापित करणे हा या बैठकीचा उद्देश होता. बैठकीला आमदार डॉ. राहुल आहेर, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, आरोग्य उपसंचालक डॉ. बी. डी. पवार, उपजिल्हाधिकारी महेश पाटील, इंडियन मेडीकल असोसिएशनचे डॉ. मनोज चोप्रा आदी उपस्थित होते.

आरोग्य सुविधांबाबत सहकार्य करण्यासाठी विविध संस्था आणि रुग्णालये पुढे येत असल्याने कुंभमेळ्यात भाविकांच्या आरोग्याची योग्य काळजी घेतली जाईल, असा विश्वास डवले यांनी व्यक्त केला.

‍शासकीय यंत्रणेमध्ये समन्वय साधण्यासाठी समिती गठीत करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. सर्व संस्था आणि रुग्णालयांशी समन्वय राखण्यासाठी डॉ. रवींद्र चौधरी यांची नेमणूक करण्यात आली आहे. कुंभमेळा कालावधीत २४ तास वैद्यकीय सुविधा देण्यासाठी आवश्यक यंत्रणा राबविण्यासाठी तीन नियंत्रण पथके तयार करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. गेडाम यांनी दिली. आरोग्य सुविधांचे नियेाजन करताना प्रत्येक मार्गावर रुग्णवाहिकांची सुविधा, संदर्भित करावयाच्या रुग्णालयांचा कृती आराखडा, तात्काळ वैद्यकीय सुविधा पुरविण्याबाबतचे नियेाजन आदी विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.

मोबाईल अॅप विकसित करणार

शहरातील आणि जिल्ह्यातील आरोग्य सेवांची माहिती लोकांना सहजगत्या उपलब्ध व्हावी यासाठी स्वतंत्र मोबाईल अॅप विकसित करण्यात येणार आहे. आरोग्य सुविधांच्या मोबाईल अॅप्ससाठी रुग्णालयांनी संपर्क क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती समन्वयक अधिकाऱ्यांकडे द्यावी, असे आवाहन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५ कॉपीबहाद्दरांना पकडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहावीच्या परीक्षेत शनिवारी इंग्रजीच्या पेपरला कॉपी करताना नाशिक आणि जळगाव येथे एकूण २५ विद्यार्थ्यांना पकडण्यात आले आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील १८ तर जळगाव जिल्ह्यातील ७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या भरारी पथकांनी ही कारवाई केली आहे. कॉपी करणाऱ्या २५ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे मंडळाने सांगितले आहे. दरम्यान, धुळे आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यात मात्र कॉपी करताना एकही विद्यार्थी भरारी पथकांना आढळून आलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाईक रॅलीचा आज थरार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जागतिक महिला दिनानामित्त नारीशक्तीला सलाम करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे रविवारी सकाळी बाईक रॅली होत आहे. या रॅलीच्या नावनोंदणीला नाशिककर महिलांनी तुफान प्रतिसाद दिला असून, सकाळी ९ वाजता बीवायके कॉलेजच्या मैदानापासून रॅलीला मोठ्या उत्साहात प्रारंभ होणार आहे.

संघर्ष, परिश्रम आणि यश या त्रिसूत्रीच्या आधारे दैनंदिन जगण्यातील आव्हानांचा सामना करणाऱ्या महिलांचा आवाज आता बुलंद होऊ लागला आहे. महिलांच्या या सबलीकरणाचा उत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सतर्फे यंदाही जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बाइक रॅलीचे आयोजन केले आहे. काळाप्रमाणे बदलणारी महिला आणि तीची खास मैत्रिण म्हणजे तीची बाइक. मग तिच्यासह मिरविण्याची संधी कोण सोडणार? त्यामुळेच 'मटा'च्या आवाहनाला प्रतिसाद देत शेकडो महिलांनी या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी केली आहे.

या बाबी महत्त्वाच्या

>रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन आवश्यक.

>पोषाखाचे कोणतेही बंधन नाही, पण शक्यतो सुटसुटीत पोषाख परिधान करा.

>रॅलीदरम्यान तुमचे लायसन्स तुमच्याबरोबरच असू द्या

>हेल्मेट असेल तर ते निश्चित परिधान करा.

>ही रॅली असणार आहे रेस नाही. त्यामुळे सांगितलेल्या स्पीड लिमिटमध्येच गाडी चालवा.

>रॅलीचा मार्ग ज्या पध्दतीने दिला आहे, त्यानुसारच गाडी चालवा.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नदी, तलावांच्या शहरात पाणीटंचाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

गोदावरीच्या उगमस्थानी दिवसाआड पाणी अशी परिस्थिती त्र्यंबक नगरीत उद्भवली आहे. अंबोली धरणात पाणीसाठा कमी होत असल्याचा आणि पाऊस उशिरा आल्यास सिंहस्थ कालावधीत पाणी पुरले पाहिजे, असा दावा नगरपालिका प्रशासन करीत आहे. कोट्यवधी रुपये खर्च होऊन आणि नागरिकांच्या माथी नव्या नळयोजनेचा खर्च माथी मारल्यानंतर देखील गत वर्षांप्रमाणे पुन्हा दिवसाआड पाण्यावर अवलंबून रहावे लागणार आहे.

त्र्यंबक नगरीस अंबोली धरणातून पाणीपुरवठा होत आहे. तसेच २५ कोटी रुपये खर्चाची गोतमी बेझे योजना एप्रिल अखेरपर्यंत कार्यान्वित होण्याचा दावा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासह संबंधित यंत्रणांनी केला आहे. अंबोली धरणात मुबलक पाणीसाठा आहे. नव्याने कार्यान्वित होणाऱ्या गौतमी बेझे योजनेची तरतूद केवळ मुबलक पाणीसाठा उपलब्ध व्हावा म्हणूनच करण्यात आली आहे. सध्यस्थितीला अहिल्या धरणाजवळ असलेल्या पाणीपुरवठ्याच्या विसोबा तलावात मोटारपंप टाकून रस्ते बांधकाम करणारे ठेकेदार खुलेअाम पाणी घेतात. साधारणत: आठ वर्षांपूर्वी वीज नसते म्हणून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला. त्यानंतर काही वर्षांनी २२ लाख रुपयांची एक्स्प्रेस वीजलाइन टाकण्यात आली. तरी देखील उपयोग झाला नाही म्हणून पावसाळ्यात शहरातील अहिल्या धरणाचे पाणी वापरण्यासाठी सुमारे ७५ लाख रुपयांचा जलशुध्दीकरण केंद्राच प्रस्ताव आखला. सुमारे एक कोटी रुपये खर्च केले. इतके सारे झाले त्यानंतर कुंभमेळा आला म्हणून गौतमी बेझे प्रकल्प योजना आणली. त्याचे श्रेय सर्वांनीच घेतले. मात्र, यावर्षी देखील दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निणर्य घेण्यात आला आहे.

भुर्दंड तरीही भटकंती

प्रत्येक नव्या नळजोडणी धारकास दोन हजार ते अगदी पाच ते दहा हजारांपर्यंत खर्च झाला आहे. यामध्ये सुमारे तीन हजार जोडणीधारकांचा सरासरी खर्च एक ते दीड कोटी झाला आहे. रस्ता फोडण्यापासून ते नळ जोडणीपर्यंत इंचावर पैसे मोजूनही पाण्याची आबळ कायम आहे. त्र्यंबक येथे थेट नदीपात्रात सांडपाणी सोडले जाते. ते अगदी चार पाच किमी अंतरावर असलेल्या धरणात पोहचते. तेथेच पीकअप पाईंट घेऊत ते पाणी पिण्यासाठी नागरिकांना देण्यात येणार आहे. अर्थात यामध्ये शुध्दीकरण प्रकल्प आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकांची कुंभकर्णी झोप

$
0
0

हल्ली वर्तमानपत्रे उघडले की कॉलेजच्या गॅद‌रिंगमध्ये युवकाचा खून, युवाप्रेमींनी घेतला गळफास , रॅगिंगमुळे शालेय मुलाची आत्महत्या, नेटवरून विवाह जमवलेल्या कॉलेज युवतीची फसवणूक, शिक्षकांना मारहाण अशा बातम्या येऊ लागल्या आहेत. पूर्वीपेक्षा हे प्रमाण खूप वाढले आहे, ही चिंतेची बाब आहे.

शिक्षक, संस्थाचालक हे शिस्त व जबाबदारीची जाणीव करून देतात. काही प्रमाणात पोलिस व प्रशासनही जबाबदारी स्वीकारतात. मात्र, आता वेळ पालकांनी निक्षून सांगण्याची आली आहे. शामने छोटा गुन्हा केल्यावर त्याच्या आईने त्याला चोप देऊन चांगल्या मार्गावर कसे आणले हे शामच्या आई चित्रपटात फार छान पद्धतीने दाखवले आहे. पालकांची जबाबदारी केवळ प्रवेश घेऊन देणे, फी भरणे, मोबाइल, गाड्या देण्यापुरतीच राहिलेली नाही. मुलगा-मुलगी घराबाहेर कधी बाहेर जातात, कधी येतात, काय करतात, त्यांचे फ्रेंड सर्कल कोणते आहे, त्यात काय डिस्कशन चालते याचाही कानोसा वेळोवेळी घेणे गरजेचे आहे. पाश्चिमात्य संस्कृती फोफावण्याचे काम जाहिरीतींच्या माध्यमातून जोरात सुरू आहे. दुसरीकडे, भारतीय संस्कृतीच्या आदर्शाचे धडे अमेरिका, पाश्चिमात्य देशात गिरवले जात आहेत. अमेरिकी शाळेत योगा तसेच बाराखडी सक्तीची करण्यात आली आहे. तेथे व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनाचे धडे शिकवत आहेत. अमेरिका, जर्मनीत संस्कृत संशोधन केंद्र आहेत. पिझ्झा, बर्गलर यापासून दूर राहण्याचा सल्ला तेथील आहार तज्ञ देत आहेत. आपल्याकडे वाचन संस्कृतीचा ऱ्हास होत आहे, व्यायामशाळा ओस पडत आहेत. शिक्षकांएेवजी गाईड, शार्पवर विश्वास वाढला आहे. अशा परिस्थितीत पालकांनी जबाबदारी स्वीकारण्याची गरज वाढली आहे. १९९० च्या दशकात नाशिक हे थंड हवेबरोबरच माणुसकीचे केंद्र म्हणून ओळखले जात होते. २०११ च्या जणगणनेनुसार नाशिकची लोकसंख्या सोळा लाखांवर गेली आहे. ग्रामीण पालक पाल्याला आकलन क्षमता, व्हीजन वाढविण्यासाठी शहरात पाठवत आहेत. शहरी भागात काट बेसीसवर किंवा होस्टेलमध्ये ही मुले राहतात. त्यामुळे त्यांच्यावरही शहरी संस्कार होत आहेत. शहरालगतच्या भागांमध्ये जमिनींना सोन्याचे भाव आल्याने सायकलीएेवजी मुलांना बाईक घेऊन दिल्या जात आहेत. पाल्याचे मोबाइल, पाकेटमनीचे हट्ट पुरवले जात आहेत. बाय टू गेट वनच्या जमान्यात आपणही भरकटत चाललो आहोत. १९९० च्या दशकातील चित्र आठवले तर ग्रामीण पालक आपल्या कोपरीत न्याहारी बांधून येत असे. आता तो चारचाकीने येऊन कामाचा आव आणून सकाळीच मिसळ, चायनीजकडे आकर्षला जात आहे. सायंकाळी घरी तो कोणत्या अवस्थेत जातो ते सांगायला नको. शहरी भागात मरावे परी प्लॅटरुपी उरावे असे चित्र आहे. मुलाबाळांसाठी इस्टेट करता करताच पालकांचे आयुष्य संपून जाते. गृहिणी घरकाम संपल्यावर टीव्ही मालिकांमध्ये गुंग होतात. मुलांवर संस्कार करायला, तो काय करतो याकडे बघायला त्यांच्याकडे फुरसतच उरत नाही. जाईंट फॅमिलीची जागा त्रिकोणी कुटुंबाने घेतल्याने छोटे नवाब बिघडत आहेत. विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी शिक्षकांनी छडी उचलली तर लगेच राजकीय संघटना आंदोलने करतात. मग मुलांवर संस्कार करायचे कोणी, त्यांना चांगल्या मार्गाला लावायचे कोणी हा प्रश्न उभा राहतो. शाळा- महाविद्यालयीन वय हे मुलांना घडवायचे असते, कोणीतरी त्यासाठी वाईटपणा घेणे गरजेचे असते, हेच सर्वजण विसरतात आणि मग ड्रग्ज, खून, गुन्हेगारीच्या विळख्यात पाल्य अडकून करिअर बरबाद झाल्यावर पालक छाती पिटून दुसऱ्यांना दोष देत बसतात. आपल्या चुका लक्षातच घेत नाहीत. पैसा झाला मोठा, माणूस झाला छोटा याप्रमाणे महाविद्यालयात कॅन्टीन फुल्ल तर तास गुल. सायंकाळी ट्यूशनच्या नावाने चौक, कार्नर, कॅफेत मुलांचा राबता वाढला आहे. मोबाइलवर सेल्फी काढून, फेसबुकवर स्वतःची छबी टाकून आणि व्टिटवर प्रेमाचे व्टिट करून घेण्यातच विद्यार्थी धन्य मानत आहेत. टेक्नोसॅव्ही नसलेले पालकही हे कौतुकाने बघत असतात. मात्र, मुलांच्या बिघडण्याची ही सुरुवात आहे हे त्यांना कळत नाही. कळले तरी त्यांना समजले तरी अति लाडामुळे त्यांना अडविण्याची हिम्मतच राहिलेली नाही. या सर्वांचे परिणाम मुलांचे शिक्षण, त्याचे कुटुंब याबरोबरच समाज आणि देशावरही होत आहेत. एकदा अकबर दरबारातील मंत्र्यांना मांजर हाती देऊन महिनाभर पोसण्याची जबाबदारी सोपवतो. बिरबल सोडून मंत्रीगण बादशाहाच्या आदेशाप्रमाणे मांजराला लाडाने खाऊ पिऊ घालून गुबगुबीत करतात. बिरबल मात्र मांजराला कोनड्यातच राहू देतो. महिन्यानंतर पुन्हा दरबार भरतो. बादशाह अकबर काही उंदीर दरबारात सोडतो. मंत्र्यांनी लाड केलेली मांजरे लठ्ठपणामुळे पळू शकत नाहीत. बिरबलचे भुकेलेले मांजर टपा टपा एक एक उंदीर फस्त करतो. या कथेचा बोध हाच की, प्रतिकूल परिस्थिती, सुसुंगती, संस्काराने मुले घडत असतात. वाचन, चिंतन, मनन, थोरांचे विचार एकल्याने प्रगल्भ होतात. ही प्रक्रियाच खंडित झाली आहे. सध्या भारतात जगातील सर्वात जास्त तरूण आहेत. देशाला सुपर पाॅवर करण्याची स्वप्ने युवकांच्या बळावर पाहिली जात आहेत. २०२० मध्ये भारतातील तरुणांचे सरासरी वय २८ ते ३० दरम्यान असेल. जागतिक लोकसंख्येच्या ७० टक्के युवक भारतात असतील. अर्थमंत्री अरुण जेटलींनी बजेटमध्ये पालकांना जागे होण्याची संधी दिली आहे. पूर्वी उत्पन्नावर इन्कम टॅक्स होता आता खर्चावर सेवाकर दीडटक्क्यांनी वाढविला आहे. यामुळे पाल्याच्या चंगळवादाचा फटका बसून पालक शहाणे होतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. परदेशात मुले-मुली सोळा वर्षाची झाली की, पालकांपासून विभक्त होतात, स्वबळावर शिक्षण घेऊन करिअरचे स्वप्न साकारतात. आपल्याकडे पाल्याचे लग्न लाऊन त्याचा संसार उभा करून देण्यापर्यंतची जबाबदारी पालकच वाहत असतात. मुलांचे करिअर घडविण्याची जबाबदारी मुलांची नसून ती आपलीच आहे असा पालकांचा आजही गैरसमज आहे. तो लवकर दूर होईल, तो सुदिन म्हटला पाहिजे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्मरणाला जरासे गालबोट…!

$
0
0

कुसुमाग्रज यांच्या स्मरणानिमित्ताने गेल्या दहा दिवसांपासून कुसुमाग्रज स्मारकात विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे. जनस्थान पुरस्कार सोहळ्यापासून सुरू झालेला हा सोहळा अनेक कारणांनी गाजत आहे. कधी 'प्रथमपुरूषी' बोल्डपणे सादर झाल्याने, तर कधी 'रिमझिम-रिमझिम' साठी रसिकांना जागा न मिळाल्याने. कविता, मुलाखत, वाचक मेळावा, नाटक, गायन असा एकूणच सर्व घटकांना स्थान असलेला हा उपक्रम गर्दीने भाव खाऊन गेला खरा परंतु, सर्व घोडे अडले ते नियोजनाजवळ. कुसुमाग्रज स्मारक भव्य-दिव्य असे आहेच त्यात शंका नाही. परंतु, त्याच्या स्वत:च्या काही व्यवस्था आहेत. जसे व्याख्यान व गायनासाठी प्रसिध्द असलेला प्रथमदर्शनी हॉल. हा हॉल गेल्या काही दिवसांपासून नाटकांसाठी वापरण्याचा अट्टहास सुरू आहे. स्मारकामध्ये नाटकासाठी हॉल उपलब्ध असावा ही चांगली बाब आहे. परंतु, एखाद्या ठिकाणी ती बळजबरीने तयार करण्यात यावी हे चुकीचे आहे. मध्यंतरी स्मारकाच्या दर्शनी भागात रंगमंच तयार करीत एक नाटक झाले होते. चांगला प्रयोग होता तो. परंतु, त्यानंतर 'रिमझिम-रिमझिम' या नाटकासाठी हॉलचा उपयोग करण्यात आला. त्यावेळी नाटक निमंत्रितांसाठी होते म्हणून निभावले गेले. परंतु, आता कुसुमाग्रज स्मरण कार्यक्रमामध्ये पुन्हा टीम 'बी' कडून हे नाटक सादर केले गेले. रंगमंच, त्यामागील व्यवस्था यासाठी इतकी जागा वापरण्यात आली की प्रेक्षकांना बसण्यासाठी अत्यंत कमी जागा उरली. नाटकाला गर्दी प्रचंड झाली होती कारण नाटक खरोखरच सुंदर आहे. मात्र, गर्दीचे नियोजन होऊ न शकल्याने त्याचा हवा तो इम्पॅक्ट येऊ शकला नाही. शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम अगर कवितावाचन व वाचक मेळावा हे कार्यक्रम काहीतरी देणारे झाले. स्मारकाने नेटाने हा उपक्रम सुरू ठेवला आहे त्याबद्दल त्यांचे कौतुकच.

अजब 'नाना'फेक

संस्कृतमध्ये एक प्रसिध्द वचन आहे, 'अप्रियस्यच पथ्यस्य वक्ता श्रोताच दुर्लभः।' अप्रिय परंतु हितकारक वचन सांगणारा वक्ता व ते ऐकणारा श्रोता तसा दुर्लभच असतो. नाशिकविषयी बोलायचे तर येथे दोघेही औषधालादेखील सापडणार नाहीत. कारण, येथे येऊन काहीही बोलणाऱ्यांची व त्यांचे ते काहीही ऐकून घेणाऱ्यांची येथे कमी नाही. पेपरमध्ये छापून आले म्हणजे ते खरेच असे समजणाऱ्यांचा पूर्वी एक काळ होता तसेच आता, व्यासपीठावर येऊन बोलला म्हणजे ते खरेच हे माननणाऱ्यांचाही एक काळ सुरू आहे. त्यातही नाशकात जो पाहुणा येतो तो अप्रुपाचे असे काही वातावरण सोबत घेऊन येतो की त्याला येथे आल्यावर काय बोलू व काय नको असे होऊन जाते. मग, तो सुरुवात करतो ती तात्यासाहेबांपासून. अगदी कुणीही यावे व तात्यासाहेबांवर बोलावे इतके ते स्वस्त वाटतात बाहेरच्या लोकांना. बरे यांचा बोलण्याचा बाजही असा असतो की अशक्यातला वाटावा. माईकचा ताबा मिळाला की झाले सुरू...'असेच एकदा तात्यासाहेबांना भेटलो, (वर्ष सांगण्याचे ते बहुदा टाळतात, त्यातून सत्यता बाहेर येण्याची शक्यता बळावते.) ते मला म्हणाले, 'बाळा! पुस्तक लिहून टाक'(जणु शेणाची पाटी उचलून टाकायची आहे, इतक्या सहजतेने) टाकले लिहून. अगदी त्यांचा तो डोक्याला झालेला हाताचा स्पर्श अद्यापही मला आठवतो. (झाले नॉस्टॅल्जिक ते स्वत:ही अन् नाशिककरही) हातांचा स्पर्श वगैरे म्हणून एखादा दीर्घ सुस्काऱ्याचा 'श्रीरामऽऽऽऽ' मध्ये टाकला की नाशिककर बेहोष. मग हा जे सांगतोय ते सर्व खरे मानून किती मोठ्या माणसाला भेटलो आपण आज! हे आठवडाभर सांगायला श्रोते मोकळे. असो. इतका काथ्याकूट करण्याचे कारण म्हणजे प्रत्येक गोष्टीला 'नाना' म्हणणारा एकजण परवा परवाच आमच्याकडे येऊन 'हा हा' म्हणता नाशिककरांना शेंडी लावून गेला. (अर्थात ते ही नाशिककरांना कळाले नाहीच परंतु समवयस्क असलेल्या एका बुजुर्ग श्रेष्ठींनी यावर प्रकाश टाकल्यानंतर अचानक सर्वांना खडबडून जाग आली.) मुळात आपल्या साहित्यिक दैवताविषयी बाहेरचा येऊन काय बोलतोय हे जीवाचे कान करून त्याला जागीच थांबवायला हवे. परंतु, ती सजगता येण्यासाठी आणखी काही वर्षे जाऊ द्यावी लागणार आहेत. पाश्चात्य देश याबाबतीत प्रचंड जागरूक असतात. (अमेरिकेतील एक घटना ऐकण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय शोधनिबंधाचे वाचन सुरू होते. तेथे अधिकाराने व वयाने ज्येष्ठ असलेल्या एका वक्त्याला भाषणाच्या सुरुवातीलाच त्याचे मुद्दे पटत नसल्यामुळे एका २४ वर्षीय तरुणाने, 'महाशय, आपण आमचा वेळ घेत आहात' असे सुनावत खाली बसवले होते. विशेष म्हणजे तो वृध्दही काहीही न बोलता खाली बसला होता. आपल्याकडे ही सजगता कधी भिननार, देव जाणे?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकला वाढीव निधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी नाशिक/त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ विकासकामांसाठी १६ कोटी ८८ लक्ष रुपयांचा वाढीव निधी मंजूर करण्यात नगरपालिकेस यश मिळाले आहे. यामुळे एकूण ५१ कोटी ५८ लाखांची विकासकामे या सिंहस्थात होत आहेत.

नगराध्यक्षा अलका शिरसाठ यांनी याबाबत माहिती दिली असून, ३४ कोटी ६९ लाख रुपयांची सिंहस्थ आराखाड्यातील कामे प्रगतीपथावर आहेत, तर नव्याने मंजूर कामांच्या निविदा प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. एप्रिल २०१५ अखेर कामे पूर्ण होतील असा विश्वास शिरसाठ यांनी व्यक्त केला आहे. नगरपालिकेने १५० कोटींचा सिंहस्थ आराखडा सादर केला. मात्र, सरकारने केवळ ३४.६९ कोटींच्या कामांना मंजुरी दिली. आराखडा सादर करताना सर्व बाबतीत पूर्तता होती. तथापि, नंतर कामांना कात्री लागली आणि अंतर्गत रस्ते तसेच राहणार असे दिसून आले. नव्याने हाती घेतलेल्या पाणीपुरवठा योजनेसाठी तसेच वीजवितरण कामांसाठी शहरातील जवळपास सर्वच रस्ते खोदल्याने प्रत्येक रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याची गरज निर्माण झाली. याचा पाठपुरावा केला आणि सर्व अंतर्गत रस्ते नव्याने करण्यात येणार आहेत. याबाबत बांधकाम सभापती तृप्ती धारणे यांनी सर्वप्रथम ही बाब सभागृहाच्या लक्षात आणून दिली होती. पालकमंत्री तसेच मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा देखील करण्यात आला.

श्री संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेत महापूजेसाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांना निमंत्रित केले. सर्व परिस्थती निर्दश्नास आणल्यानंतर या वाढीव निधीच्या मजुंरी प्रक्रियेस खऱ्या अर्थाने वेग आला होता. नगरापालिका कार्यालयात नगराध्यक्षा अलका शिरसाठ यांनी ही माहिती दिली तेव्हा उपनगराध्यक्ष रवींद्र सोनवणे, शकुंतला वाटाणे, सिंधू मधे, ललित लोहगावकर, रवींद्र गमे, अंजनाबाई कडलग, विजया लढ्ढा, तृप्ती धारणे आदी नगरसेवक उपस्थित होते. या कामांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष पुरूषोत्तम कडलग, भाजपाचे नेते पंकज धारणे, दीपक लढ्ढा, माजी नगराध्यक्ष राजेंद्र शिरसाठ, सिंहस्थ समितीचे अध्यक्ष सुरेश गंगापुत्र, कार्याध्यक्ष पुरूषोत्तम लोहगावकर, तसेच कैलास वाटाणे, दत्ताजी मधे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

नगराध्यक्षा अलका शिरसाठ यांनी सर्वांच्या सहकार्याने वाढीव निधी मिळविणे शक्य झाले असल्याचे नमूद केले. सर्व कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण होण्यासाठी नागरिकांसह सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही केले. दरम्यान गायधनी गल्ली, इंद्राळेश्वर परिसर, गौतम तलाव तसेच जोगळेकर वाडा, रतनगल्ली, शंकराचार्य मठ परिसर, भुवनेश्वरी रस्ता, सुशृत हाॅस्पिटल रस्ता, पाचआळीस जोडणारे रस्ते, मनेरोडला जोडणारे रस्ते, कडलग गल्ली, तेली गल्ली तसेच कुशावर्तास जोडणारे रस्ते आदींसह शहरतील सर्वच लहानमोठे रस्ते मुळ आराखड्यात धरलेले नव्हते. ते नव्याने मंजूर केले. तसेच, त्यांच्यालगत गटारींची कामे मंजूर झाली आहेत. अशी एकूण ३७ कामे असून या रस्त्यांची एकूण लांबी ४४९१ मीटर आहे. जवळपास तितक्याच लांबीच्या गटारींचे काम होत आहे ही बाब सर्वप्रथम प्रशासनाच्या निदर्शनास आणण्याचे काम पंकज धारणे यांनी केले. मंजुरीसाठी पाठपुरावा देखील केला.
सिंहस्थात होणारी कामे

l कायमस्वरूपी २५ शेड उभारणी १९२.५० लाख

l आश्रमामध्ये कायमस्वरूपी ५ शौचालये ७० लाख

l आराखड्याचे ध्वजस्तंभ काँक्रिटीकरण १० ठिकाणी २ कोटी ३४ लाख

l शहरातील उर्वरित अंतर्गत ३७ रस्ते ४ कोटी ६५ लाख

l जुना आखाडा पाणीपुरवठा योजना पिंपळद ४४ लाख

l आश्रमासाठी २० पाण्याच्या टाक्या १३ लाख

l गटारी आणि सिवेज ट्रिटमेंट प्लान्ट १ कोटी ७० लाख

l शाहीमार्ग व प्रशासकीय मार्ग काँक्रिटीकरण, शेड बांधकाम २ कोटी

l शौचालय बांधकाम २ कोटी

l पथदीप व्यवस्था ७१ लाख.

l नदी व सांडपाणी वेगळे करणे ३० लाख





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिप हिप हुर्रे...! महिलांचा जल्लोष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंगावर ल्यालेली भरजरी नऊवार साडी...कुणाच्या मस्तकावर फेटा तर कुणाच्या मस्तकावर पुणेरी पगडी अन् दिमतीला असणारी रॉयल एनफील्ड अशा रूबाबदार पोशाखात सुमारे अड‌ीचशे महिलांनी वूमन्स डे निमित्त 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित बाईक रॅलीत सहभाग घेत 'हिप हिप हुर्रे...!' अशी घोषणाबाजी करीत जल्लोष केला.

रविवारी सकाळी वूमेन्स डे निमित्त आयोजित बाईक रॅलीला गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बीवायके कॉलेजच्या मैदानावरून सुरूवात झाली. यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे यांनी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

'टाइम्स ग्रुप'च्या नाशिक रिस्पॉन्स हेड मंजिरी शेख, 'महाराष्ट्र टाइम्स'चे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे, आरएमडी हेड संतोष लोकरे, इव्हेंटचे स्पॉन्सर मोहरीर ऑटोचे संचालक ओम मोहरीर यांच्या प्रमुख उपस्थितीत बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. पारंपरिक वेशभूषेतील महिलांच्या सहभागाने या उपक्रमात रंगत आणली.

बीवायके कॉलेजपासून सुरू झालेली ही रॅली कॉलेजरोड मार्गे भोसला सर्कल, महात्मानगर मार्गे एबीबी सर्कल, त्र्यंबकरोड सिटी सेंटर मॉल, मायको सर्कल, तरण तलाव, कॅनडा कॉर्नरमार्गे काढण्यात आली. बीवायके कॉलेज येथे रॅलीचा पुन्हा समारोप करण्यात आला.

झुम्बा डान्स अन् प्रश्नावली

या रॅलीच्या समारोपाच्या वेळी महिलांसाठी प्रश्नमंजूषा घेण्यात आली. यावेळी 'महाराष्ट्र टाइम्स' संदर्भातील विविध प्रश्न त्यांना विचारण्यात आले. योग्य उत्तरे देणाऱ्या सहभागी महिलांना गौरविण्यात आले. यावेळी 'डीजे'च्या तालावर महिलांसाठी झुंबा डान्सचेही आयोजन करण्यात आले. यातही उत्स्फूर्तपणे सहभागी होत नाशिककर महिलांची आघाडी पुन्हा एकवार सिध्द केली आहे.

सामाजिक संदेशाची पेरणी

घरापासून तर सामाजिक विश्वापर्यंत विविध आघाड्यांवर लढणाऱ्या महिलांनी 'मटा'च्या बाईक रॅलीत सहभागी होत सामाजिक संदेशाचीही पेरणी केली. या उपक्रमाच्या आयोजनामागे महिला दिनाचे औचित्य होते. या निमित्ताने लेक वाचवा, समानता आणि महिलांची सुरक्षितता आदी मुद्दे मांडण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हम किसी से कम नहीं

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना‌शिक

नऊवारी साडी अन् डोक्यावर फेटा घालून बाइकस्वारी करायला निघालेल्या महिलांनी रविवारी कॉलेजरोड दुमदुमला होता. निमित्त होते जागतिक महिलादिनाचे. बीवायके कॉलेज, कॉलेजरोड, महात्मानगर, एबीबी सर्कल, आयटीआय सर्कल, सिटी सेंटर मॉल, मायको सर्कल, तरण तलाव, राजीव गांधी भवन, कॅनडा कॉर्नर ते बीवायके कॉलेज हा संपूर्ण मार्ग

या रॅलीने महिला रॅली व घोषणांनी दुमदुमला होता.

'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित 'विमेन्स बाइक रॅली'मध्ये सर्वच वयोगटातील महिला मोठ्या उत्साहात सहभागी झाल्या होत्या.

मराठी बाणा

साडी नेसून बाइक चालवता येत नाही असा समज बाइकर्णींच्या उत्साहाने चुकीचा ठरवला. नऊवार साडी, कोल्हापुरी चप्पल आणि शान वाढवणारा फेटा घालून स्पोर्ट्स बाइक चालवणाऱ्या तरुणींना पाहून सर्वच लोक अवाक् झाले. मराठी बाणा आणि त्याला साहसाची मिळालेली जोड इतरांना प्रोत्साहन देणारी ठरली. एकीकडे नऊवार साडी तर एकीकडे जीन्स आणि शर्टस अशा वेस्टर्न लूकमधील तरुणीही यावेळी सहभागी झाल्या होत्या.

बचके रहना रे

बाइक रॅलीमध्ये सहभागी तरुणींनी आपला वेगळा ठसा उठवला. रॅलीमध्ये पुढे जात असतानाच 'बचके रहना रे' अशा घोषणा देत होत्या. या माध्यमातून महिलांच्या प्रगतीच्या वाटेत अडथळा निर्माण करणाऱ्या समाजव्यवस्थेला एक प्रकारे आव्हान देत होत्या. तरुणींच्या या उत्साहाने बाइक रॅलीत अनोखा रंग भरला.

बाइकर्णींची धूम

मुली आणि मोपेड बाइक असं समीकरण मोडीत काढणाऱ्या बाइकर्णींचा सहभाग उल्लेखनीय होता. स्पोर्टस् बाइक असो वा मॉडिफॉइड बाइक प्रत्येक बाइक चालवण्याचा अनुभव असलेल्या महिला आणि तरुणींना सहभाग रॅलीमध्ये होता. या बाइकर्णींना रॅलीत केलेली धूम बघ्यांना आश्चर्यचकित करणारी होती. प्रोत्साहन देणारे लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते.

सामाजिक संदेश

बाइक रॅलीमधून केवळ नारीशक्तीचा नारा न देता त्यातून सामाजिक संदेश मिळावा यासाठी अनेकींनी प्रयत्न केले. 'सेव्ह गर्ल चाइल्ड' असा संदेश देताना पर्यावरणाचे संरक्षण किती गरजेचे आहे हे देखील महिलांनी यावेळी दाखवून दिले. मराठी आणि इंग्रजी भाषेतील पोस्टर आपल्या बाइकसोबत जोडून संदेश दिला. यामुळे रॅलीच्या माध्यमातून जगजागृतीही महिलांनी केली.

उत्तर द्या बक्षिस मिळवा

बाइक रॅली पूर्ण झाल्यानंतर बीवायके कॉलेजच्या ग्राउंडवर जमलेल्या महिलांसाठी एक अनोखी स्पर्धा देखील यावेळी घेण्यात आली. यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे बरोबर उत्तर देणाऱ्याला 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे बक्षिसही देण्यात आले. या

उत्साहाला नाही तोटा

अठरा वर्षांपासून ते साठी उलटलेल्या महिलांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता.वेगवेगळ्या वेशभूषा करून तर कुणी आपल्या मैत्रिणी, आई, बहिणी, मुलगी यांना सोबत घेऊन बाइक रॅलीचा आनंद घेत होत्या. महिलांच्या या उत्साहाने खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होत असल्याचे चित्र दिसत होते.

विटेंज बाइक ते स्कूटी

या बाइक रॅलीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे विंटेज बाइक ते स्कूटी या प्रत्येक प्रकारची बाइक पहायला मिळाली. राजदूत, रॉयल एनफिल्ड, करिझ्मा, यामाहा, पल्सर, स्पेंडर, यामाहा आर एक्स १००, अॅक्टिव्हा अशा विविध प्रकारच्या बाइक्स यावेळी दिसत होत्या. प्रत्येक प्रकारची बाइक चालवू शकणाऱ्या महिलांची संख्या यामध्ये मोठ्या प्रमाणात होती.

'महाराष्ट्र टाइम्स' च्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेला उपक्रम प्रेरणादायी आहे. महिलांमधील आत्मविश्वास जागविण्यासाठी, त्यांच्या स्वातंत्र्याला वाव देण्यासाठी यासारखे उपक्रम जास्त फायदेशीर ठरतात. - सीमा हिरे, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरती निषादची विक्रमाला गवसणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिलांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी. स्त्री एक अबला नसून सबला आहे हा विचार जनमानसात रुजावा स्त्रियांच्या प्रश्नांबद्दल समाजात जागृती निर्माण व्हावी यासाठी नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलची विद्यार्थीनी आरती हरिश्चंद्र निषाद हिने महिलादिनाचे औचित्य साधून अनंत कान्हेरे मैदानाला १०० फेऱ्या पूर्ण केल्या.

आरती हिने या उपक्रमासाठी तिचे गुरू रंजय त्रिवेदी यांच्याकडून प्रेरणा घेतली असून त्यांनीही १०० तास चालण्याचा विक्रम केला होता. आरतीने ८ मार्च रोजी सकाळी साडे सहा वाजता या उपक्रमाला सरुवात केली असून हा उपक्रम रात्री साडेबारापर्यंत सुरू रहाणार आहे. या दरम्यान तिने लिक्वीड फूड सेवन केले असून तिला प्रोत्साहन देण्यासाठी शहरातील विविध संघटना व संस्थांचे पदाधिकारी मैदानावर तळ ठोकून आहेत. आरतीचे वडील कुशन कारागीर असून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी आरतीला या उपक्रमासाठी मदत केली आहे.

या उपक्रमासाठी परफेक्ट अॅकेडमीचे कमलाकर शिंदे, रंजय त्रिवेदी यांचे मार्गदर्शन व सहाय्य लाभले आहे तर बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष अरुण जाधव व त्यांचे सहकारी आरतीला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानावर उपस्थित होते. तिया या उपक्रमाबद्दल एकलव्य सेवा मंडळ, मानव उत्थान मंचच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images