Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

विभागीय रोजगार मेळावा शुक्रवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उपसंचालक रोजगार व स्वयंरोजगार विभाग नाशिक यांच्यावतीने शुक्रवारी (दि. १३) भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहाला हा मेळावा होणार असून त्यामध्ये ३० नामांकित औद्यागिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. मेळाव्यात अधिकाधिक बेरोजगारांनी सहभागी होऊन नोकरीच्या संधीचा लाभ घ्यावा,

असे आवाहन रोजगार व स्वयंरोजगार नाशिक विभागाचे उपसंचालक अनिल पवार यांनी केले आहे.

मेळाव्यात २९ उद्योजकांनी एकूण २ हजार ४५४ रिक्तपदांची मागणी नोंदविली असून त्यामध्ये एस. एस. सी. ते पदवीधर, अभियांत्रिकी क्षेत्रातील पदविकाधारक, पदवीधर, कृषी पदविकाधारकांसाठी विशेष संधी पलब्ध आहेत. १०० महिलांना प्रशिक्षणार्थी म्हणून संधी मिळणार आहे.

तसेच एल अॅण्ड टी कंपनीत पाचवी ते बारावी उत्तीर्ण पात्रता धारकांना तीन महिन्याचे विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना कंपनीच्या कामाच्या ठिकाणी लगेचच रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

त्यासाठी १८ ते ४० अशी वयोमर्यादा ठरविण्यात आली आहे. मेळाव्यात दे आसरा फाऊंडेशन या संस्थेकडून उद्योग, व्यवसायात स्वयंरोजगार करण्यास इच्छूक उमेदवारांना मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे. विभागीय रोजगार मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अधिसूचित रिक्त पदांच्या माहितीसाठी www.maharojgar.gov.in या वेबपोर्टलला नियमितपणे भेट द्यावी. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५०२९/२५००६५३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डाक सेवक युनियनचे बेमुदत कामबंद आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सर्व ग्रामीण डाक सेवकांना त्वरित खात्यात समाविष्ट करावे यांसह अनेक मागण्यांच्या पूर्ततेसाठी ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक युनियनने मंगळवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मागण्यांची पूर्तता न करणाऱ्या सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. मात्र, या कामबंद आंदोलनामुळे ग्रामीण भागातील टपाल वितरणावर विपरित परिणाम होणार आहे.

केंद्र सरकारने माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण डाकसेवक कर्मचाऱ्यांसाठी वेतन पूनर्निधारण समिती स्थापन करण्याची मागणी फेटाळली आहे. त्यामुळे युनियनच्या केंद्रीय शाखेने संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. डाक सेवक वेतन समिती स्थापन करण्याचे लेखी आश्वासन तत्कालीन सरकारने संघटनेला दिले होते. मात्र, सत्तेवर आलेल्या नवीन सरकारला मागण्या मान्य नाही.

केंद्राने सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वेतनात सुधारणा करण्यासाठी माजी न्यायमूर्ती प्रमुख असलेली समिती स्थापन करावी. प्रस्तावित खासगीकरण थांबवावे, ५० टक्के महागाई भत्ता वेतनात समाविष्ट करावा यांसह अनेक मागण्या आहेत. तसेच सरकारच्या चुकीच्या धोरणांना संघटनेचा कडाडून विरोध आहे. म्हणूनच हा विरोध दर्शविण्यासाठी संघटनेने बेमुदत बंदचे हत्यार उपसले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुदत संपलेली औषधे ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सातपूर एमआयडीसीतील स्नायडर कंपनीच्या समोरील उघड्यावर नाल्यावर मुदत संपलेली औषधे टाकल्याचे वृत्त 'मटा'ने प्रसिद्ध केल्यांनतर महापालिकेच्या सातपूर आरोग्य विभागाने ती औषधे ताब्यात घेतली आहे. तसेच संबधित औषध कंपनीची माहिती घेऊन आरोग्य विभागाकडून कारवाई होणार असल्याचे विभागीय स्वच्छता निरिक्षक संजय गांगुर्डे यांनी 'मटा'ला सांगितले.

सातपूर व अंबड एमआयडीसीत मोकळ्या भूखंडावर फेकल्या जाणाऱ्या डेब्रिजबाबत अनेकदा उद्योजक तक्रारी करत असतात. परंतु, यात भर म्हणून की काय स्नायडर कंपनीच्या समोरील उघड्या नाल्याच्या बाजूला औषध कंपनीची मुदत संपलेली पॅकिंग औषधे फेकण्यात आली. याबाबत मटाने वृत्त प्रसिद्ध केल्यांनतर महापालिकेच्या सातपूर आरोग्य विभागाने ती औषधे ताब्यात घेतली. तसेच त्या औषधाच्या कंपनीवर कारवाई करणार असल्याचे स्वच्छता निरिक्षक गांगुर्डे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेकहेव्हन’ राष्ट्रीय स्पर्धा उद्यापासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मेकॅनिकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा आविष्कार समजली जाणारी मेकहेव्हन ही राष्ट्रीय स्पर्धा के. के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये गुरुवारपासून (१२ मार्च) सुरू होत आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने देशभरातील विविध विद्यार्थ्यांचे नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर होणार आहेत. या स्पर्धेसाठी 'महाराष्ट्र टाइम्स' मीडीया पार्टनर आहे.

के. के. वाघ इंजिनीअरींग कॉलेजच्यावतीने गेल्या १५ वर्षांपासून मेकहेव्हन ही राष्ट्रीय स्पर्धा घेतली जाते. दरवर्षी मोठ्या प्रमाणात या स्पर्धेत देशाच्या विविध भागांतील विद्यार्थी सहभागी होतात. यंदा या स्पर्धेत मेकॅनिकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर होणार असल्याचे प्रा. एम. बी. मुरुगकर यांनी सांगितले. स्पर्धेत विजेत्या ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारची पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेची http://www.mecheaven15.com/ ही स्वतंत्र वेबसाइट शौनक चांदवडकर या विद्यार्थ्याने साकारली आहे.

हे असतील कार्यक्रम

मेकहेव्हनमध्ये रोबो रेस, रोबो सॉसर, कॉन्ट्रॅप्शन, टार्गेट्रिक्स, कॅड मास्टर, जी. के. क्वीझ, मेझ क्रेझ, लेथ वॉर, पोस्टर मेकिंग कॉम्पिटीशन, स्नॅपशॉप, बाईक मॅनिया, ट्रेझर हंट, पिक्सेलेज असे विविध प्रकारचे कार्यक्रम होणार असल्याची माहिती प्रा. एस. व्ही. कडभाने यांनी दिली आहे.

मेक इन इंडियावर भर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया ही संकल्पना जाहीर केली आहे. देशाला लागणाऱ्या विविध वस्तू, उपकरणे ही देशातच तयार व्हावीत, असे यात अपेक्षित आहे. या संकल्पनेला अधिक वाव या स्पर्धेत दिला जाणार आहे. देशांतर्गत उत्पादन होण्यासाठी जे प्रकल्प प्रभावी ठरू शकतात. त्या प्रकल्पांचे सादरीकरण या स्पर्धेत केले जाणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. के. एन. नांदूरकर यांनी दिली आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डिपेक्स’ला उदंड प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक इंजिनीअरींग क्लस्टरमध्ये सध्या सुरू असलेल्या डिपेक्स प्रदर्शनाला भेट देण्यासाठी मोठी रांग लागली असून, या प्रदर्शनाचा बुधवारी समारोप होणार आहे. डिपेक्समध्ये असलेल्या वैविध्यपूर्ण प्रकल्पांना पाहण्यांसाठी मोठी गर्दी होत आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन ट्रस्ट यांच्यावतीने डिपेक्स प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील वैशिष्ट्यपूर्ण असे २७५ प्रकल्प सादर झाले आहेत. हे प्रकल्प पाहण्यासाठी शहरातील इंजिनीअरींग आणि विविध क्षेत्रातील कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांची व उद्योजकांची मोठी गर्दी होत आहे. इंजिनीअरींग, विज्ञान, कृषी अशा विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी केलेले संशोधन आणि त्यांनी साकारलेल्या विविध विज्ञान विषयक आविष्कार डिपेक्समध्ये मांडण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच कौशल्यपूर्ण उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना देण्यासाठी डिपेक्स हे प्रदर्शन गेल्या २६ वर्षांपासून भरविले जाते. नाशकात १९९७ आणि १९९८ मध्ये हे प्रदर्शन झाले होते. त्यानंतर आता ते यंदा होत आहे.

वुमन सेफ्टी जॅकेट

मुंबईच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमधील कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या फरहीन कमल, रश्मी मोरे, मरलीन सीमोस व शगुफ्ता शेख यांनी 'वुमन सेफ्टी जॅकेट' तयार केले आहे. जॅकेट घातलेल्या महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न केल्यास मायक्रो कंट्रोलिंग युनिटद्वारे बझर वाजतो. जॅकेटला हात लागताच विजेचा तीव्र झटका बसतो. जॅकेटला मायक्रोकंट्रोलर युनिट जोडलेले आहे. त्यातून बारीक तारांचे जाळीवजा कुंपण आहे. जबरदस्तीने झटापट करण्याचा प्रयत्न करताच कंट्रोलरचे बटण पुश-अप करायचे आहे. त्यानंतर बझर वाजतो आणि सेफ्टी जॅकेटला असलेल्या तारांमधून वीजप्रवाह वाहतो. तारांना हात लागताच विजेचा तीव्र झटका बसतो. कंट्रोल युनिटला ब्ल्यू-टूथ कनेक्ट असून ते अँड्रॉइड अॅपशी कनेक्ट आहे. जॅकेट घातल्यावर ब्लूटूथ आपल्या मोबाईलशी पेअर ठेवायचे आहे. कोणी जॅकेट ओढल्यास स्वीच बटण पुश होते. सेफ्टी जॅकेटचा बझर वाजतो. ब्ल्यू-टूथद्वारे अॅपशी कनेक्टिंग होते. आप्तांच्या इमर्जन्सी क्रमांकावर अलर्ट जातो. जीपीएसद्वारे ठिकाण ट्रॅप होते. या जॅकेटसाठी ९ हजार रुपये खर्च आल्याचे या विद्यार्थिनींनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदापासून क्रीडा शिष्यवृत्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे क्रीडा क्षेत्रातही योगदान रहावे, त्यांच्यातील क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने क्रीडा शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाचा २०१५-१६ साठीचा अर्थसंकल्प आणि सोळावा वार्षिक अहवाल मंगळवारी मंजूर करण्यात आला.

विद्यापीठाचा गेल्या वर्षाचा अर्थसंकल्प १४२ कोटी रुपयांचा होता. या अर्थसंकल्पात यंदा लक्षणीय वाढ झाली असून, तो यंदा २२५ कोटींचा आहे. विद्यापीठाचे एकत्रित उत्पन्न २२५.१४ कोटी रुपये अपेक्षित आहे. तर, खर्च २२८.६६ कोटी तर वित्तीय तूट ३.५२ कोटी रुपये अपेक्षित आहे. अर्थसंकल्प बैठकीला कुलगुरु डॉ. अरुण जामकर, प्रतिकुलगुरु डॉ. शेखर राजदेरकर, कुलसचिव डॉ. काशिनाथ गर्कळ उपस्थित होते. डॉ. गजानन एकबोटे यांनी अर्थसंकल्प सादर केला. विद्यापीठाचा पंधरावा वार्षिक अहवाल सदस्य डॉ. विठ्ठल धडके यांनी सादर केला. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. काशिनाथ गर्कळ यांनी सभेचे संचलन केले.

हे नवीन कोर्सेस सुरू होणार

शिक्षकांना वैद्यकीय शिक्षणात तज्ज्ञ करण्यासाठी ३ ते ५ वर्षांचा मास्टर इन हेल्थ प्रोफेशन एज्युकेशन हा कोर्स सुरू करण्यासाठी (१० लाख), जनुकीय आजारांबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जेनेटिक कौन्सेलिंग हा १ वर्षांचा कोर्स सुरू करण्यासाठी (५ लाख), वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी अॅडव्हान्स डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंट हा एक वर्षाचा अभ्यासक्रम करण्यासाठी (५ लाख).

मेक इन इंडियासाठी

वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री भारतातच निर्माण व्हावी तसेच आधुनिक यंत्रसामग्रीचा शोध लावण्यासाठी (२५ लाख), वैद्यकीय उपचार व उपचारांसाठी आवश्यक असलेली उपकरणे व साधनांची निर्मिती करण्यासाठी (१० लाख) तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पातील विविध तरतुदी

क्रीडा शिष्यवृत्तीसाठी (२५ लाख), सर्वसमावेशक नवीन संशोधनासाठी (५० लाख), शिक्षकांसाठी कॉम्प्युटरद्वारे कार्यक्रम सुरु करण्यासाठी (५ लाख), गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींची जनुकीय माहिती गोळा करण्यासाठी डीएनए बँकिंग (१० लाख), रक्तपेशी कमी झाल्यामुळे अॅनेमिया होऊन शरीराची वाढ खुंटते. त्यावर संशोधन करण्यासाठी (५० लाख), कुपोषण असलेल्या भागात आयुर्वेद व अॅलोपॅथी उपचार पध्दतीची माहिती देण्यासाठीच्या त्रिवेणी कार्यक्रमासाठी (५ लाख), आयुष संशोन लॅब तयार करण्यासाठी (१५ लाख), स्वतंत्र मआविवि पंचकर्म केंद्राची स्थापना करण्यासाठी (२० लाख), युनेस्को जैव नीतिशास्त्र केंद्राची स्थापना करण्यासाठी (१० लाख), विद्यापीठ परिसरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी (५० लाख), ऐरोली येथे इनक्युबेशन सेंटर स्थापण्यासाठी (५ कोटी) दिले जाणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी (२ कोटी १५ लाख), विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याकरीता विद्यापीठाचे क्रिडा संकूल बांधण्यासाठी (२५ लाख), विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन देण्यासाठी (६ लाख), मानसिक समुपदेशनासाठी (६ लाख), रॅगिंगला प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी (३ लाख) कुंभमेळ्यात आपत्कालीन प्रशिक्षणासाठी (७० लाख), ग्रामीण भागातील लोकांमध्ये आरोग्य व स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी विद्यापीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या ग्राम दत्तक योजनेसाठी (२५ लाख), आंतर संस्थात्मक सर्वसमावेशक संशोधन केंद्रांतर्फे विविध संस्थांना एकत्रित करुन संशोधनाची माहिती समाजातील विविध घटकांना देण्यासाठी (५० लाख), विद्यापीठाला नॅकचा दर्जा मिळविण्यासाठी (२५ लाख), विद्यापीठ व संस्था दोघांच्या व्यवस्थापनाने प्र्रायोगिक तत्वावर होमिओपॅथी कॉलेज सुरु करण्यासाठी (२५ लाख), शिक्षक व विद्यार्थी यांना फेलोशीप देण्यासाठी (१ कोटी ५० लाख), शिक्षकांना संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी प्रवास खर्च व परदेश दौऱ्यासाठी (१० लाख) तरतूद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कालबाह्य हेलिकॉप्टर बदला

$
0
0


नाशिक : लष्करातील कालबाह्य चिता आणि चेतक या हेलिकॉप्टरच्या वापरावर बंदी घालावी आणि अत्याधुनिक हेलिकॉप्टरांचा समावेश करावा, या मागणीसाठी लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या संघटनेचे शिष्टमंडळ बुधवारी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना भेटणार असल्याची माहिती मीनल वाघ-भोसले यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रेटर नाशिक!

$
0
0

साधारण ४३ वर्षांपूर्वी नवी मुंबईची संकल्पना तयार करण्यात आली होती. कारण मुंबई शहरावर दिवसेंदिवस वाढत असलेला जनसंख्येचा भार कमी व्हावा व काही प्रमाणात लोकसंख्या ही नवी मुंबईकडे वळवली जावी. ही गोष्ट लक्षात घेता त्यावेळी तसे नियोजन करून नवी मुंबईची संकल्पना अस्तिवात आली होती व अपेक्षा होती की नवी मुंबईची लोकसंख्या एका ठराविक स्तरापर्यंत जाऊ शकेल. पण, आज आपण जर त्याकडे लक्ष दिले तर नवी मुंबईच्या लोकसंख्येमध्ये ही पूर्वी केलेल्या नियोजनापेक्षा दुप्पट, तिप्पट पटीने वाढ झालेली आहे. नवी मुंबईचे क्षेत्र गर्दीचे झालेले आहे. साधारण १७ ते १८ वर्षापूर्वी मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे व नाशिक-मुंबई एक्सप्रेस हायवे ही संकल्पना उदयास आली. त्यावेळी प्रथम मुंबई-नाशिक एक्सप्रेस हायवे विकसित व्हावा ही संकल्पना आखण्यात आली. परंतु, पुरेसे राजकीय पाठबळ नसल्याने व राजकीय विरोधामुळे मुंबई-पुणे ह्या एक्सप्रेस हायवेला प्रथम मान्यता देण्यात आली. त्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे हा प्रथम उदयास आला. यामुळे मुंबईची बहुतांश लोकसंख्या ही ह्या मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेमुळे पुणे शहराकडे जास्त वळली व आज पुणे हे मोठे शहर म्हणून विकसित झाले आहे.

आज पुणे देखील अतिशय गर्दीचे शहर झाले आहे. कारण मुंबई हे एक असे शहर आहे ज्यात दिवसेंदिवस विकास होत आहे. भविष्यातही मुंबईचा विकास हा होत राहणार आहे. ह्या विकासामुळे लोकसंख्या व प्रदूषणातही मोठी वाढ होणार आहे. पण याला सोयीस्कर करण्यासाठी वेगवेगळे पर्याय काढणे फार आवश्यक झाले आहे. नुकतेच राज्य सरकारने कळवा येथे एक नवीन बिझनेस पार्क उभारण्यात येणार आहे, अशी संकल्पना जाहीर केली आहे. जे हुबेहूब वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स बिझनेस पार्क सारखी असेल पण ह्यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून नाशिक एकमेव शहर ठरू शकते. नाशिकच्या विकासाला कुठल्याही सीमा नाहीत. नाशिक शहर चारही बाजूने मोठ्या प्रमाणात विकसित होऊ शकते. वीज व पाणी मुबलक प्रमाणात नाशिकला उपलब्ध आहे. नाशिक हे धरणाचे शहर म्हणून ओळखले जाते. फक्त नाशिक शहराच्या विकासात बाधा येत आहे. गेली २० ते ३० वर्षांपासून कोणतेही राजकीय पाठबळ व इच्छाशक्ती लाभलेली नाही व कोणी ती दाखवलेली देखिल नाही की नाशिक ही एक ग्रेटर सिटी म्हणून व मुंबईची एक सॅटेलाईट सिटी म्हणून विकसित होऊ शकते.

राजकीय पाठबळ अभावमुळे नाशिकच्या रेल्वे, हवाई व रस्ते या मार्गात काही चांगला विकास झालेला नाही. आपण जर लक्ष दिले तर नाशिक-मुंबई एक्सप्रेस हायवेच्या तुलनेत मुंबई-पुणे व मुंबई-अहमदाबाद एक्सप्रेस हायवे खुपच सुंदर व सोयीस्कर झालेला आहे. त्यामुळे नाशिक-मुंबई महामार्ग हा विकसित होणे फार आवश्यक आहे. मुंबई - पुणे महामार्ग लवकरच १६ पदरी होणार आहे, पण नाशिक - मुंबई अजूनही ४ पदरी आहे. नाशिक- औरंगाबाद महामार्ग देखील विकसित होणे आवश्यक आहे. कारण आताची रस्त्याची परिस्थिती खूप वाईट आहे. गाड्यांचे खूप प्रमाणात नुकसान होत असते. सतत काही ना काही अपघात, दुर्घटना ह्या रस्त्यावर होत असतात. कारण रस्त्याची अतिशय बिकट परिस्थिती व लाईट व्यवस्था आणि पथदर्शिका देखील नसल्याने चालकास गाडी चालविणे ह्या मार्गावर अतिशय जिकरीचे होत आहे.

नाशिक-पुणे मार्गावर संगमनेर-नारायणगाव मार्गे जाणे अत्यंत जिकरीचे होते. लोक पुण्यासाठी नाशिक- ठाणे -नवी मुंबई एक्सप्रेस हायवे या मार्गाने प्रवास करणे पसंत करत आहेत. ह्या ज्या मुलभूत सुविधा आहेत ज्या एखाद्या सॅटेलाईट सिटीसाठी आवश्यक आहेत त्या मिळवून देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती व पाठबळ असणे फार गरजेचे आहे. आपण सर्वांनी जर या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केले नाही तर मुंबई शहराचा भार हा वाढतच राहणार. त्यामुळे मुंबईची गर्दीची समस्या दिवसेंदिवस वाढतच राहणार, म्हणून मुंबईला नाशिक सारखी सॅटेलाईट सिटी जोडणे हा पर्यायी मार्ग आहे. यासाठी नाशिकच्या राजकीय पुढाऱ्यांनी व मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी पुढाकार घेऊन जाणीवपूर्वक ही योजना राबविणे अनिवार्य आहे. दिंडोरी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, येवला, सिन्नर यासारख्या शहरांना सामावून घेणाऱ्या ग्रेटर नाशिकसाठीच मेट्रोही प्रस्तावित आहे. नागपूर, पुणे आणि मुंबईची मेट्रो वेग घेत असताना ग्रेटर नाशिकची मेट्रोही कागदावरच राहिली आहे. याचा विचार व्हायला हवा.

(लेखक आयटी उद्योजक आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


८० लाखांच्या व्याजावरून स्थायी वेठीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तेराव्या वित्त आयोगांतर्गत उपलब्ध झालेल्या सुमारे २१ कोटी रुपयांवरील ८० लाखांच्या व्याजाची तीन सदस्यांनी परस्पर पळवापळवी केल्याचा आरोप करीत उर्वरित सदस्यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा डोक्यावर घेतली. अखेर सर्व सदस्यांच्या पदरी व्याजातून उपलब्ध होणाऱ्या निधीचे दान पदरात पडल्यानंतर सभेवरील विषयांना पूर्णविराम मिळाला.

व्याजापोटी उपलब्ध झालेल्या निधीची परस्पर पळवापळवी अन् निधी लाटण्याचा प्रयत्न होत असल्याच्या आरोपांवरून सुमारे तासभरासाठी स्थायी सभेचे कामकाज खोळंबले होते. दरम्यान बंद दरवाजाआडच्या चर्चेनंतर खोळंबलेली स्थायी सभेची गाडी अखेर रूळावर धावली अन् सभेवरील विषयांना मंजूरी मिळाली.

तेराव्या वित्त आयोगांतर्गत नाशिक जिल्हा परिषदेला सुमारे २१ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. या निधीवर ८० लाख ५० हजार रुपयांचे व्याज जिल्हा परिषदेला मिळाले होते. या व्याजाचा निधी मोजक्या तिघा सदस्यांच्या पदरी पडण्यावरून स्थायी सभेत प्रश्नचिन्ह उभे राहण्याची शक्यता काही दिवसांपासून होती. सभेत मंजुरीसाठी विषयांच्या मांडणी अगोदरच निधीच्या पळवापळवी, लाटालाटी आणि असमान वाटपाचा मुद्दा उपस्थित करीत यासाठी कारणीभूत असणाऱ्या प्रक्रिया आणि घटकांच्या तपशीलाची मागणी केली. हा तपशील पुरविण्यासाठी संबंधित विभागांनी असमर्थता दर्शविल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देवरे, बाळासाहेब गुंड आदींनी बहिष्कार टाकून सभात्याग केला. यानंतर नाराज सदस्यांची मनधरणी करताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील पदाधिकाऱ्यांची बंद दाराआड चर्चा झाली. दरम्यान या कालावधीत सुमारे तासापेक्षाही अधिक कालावधीसाठी स्थायी सभेचे कामकाज खोळंबले होते. ही चर्चा यशस्वी झाल्यानंतर पुन्हा सभागृहात परतलेल्या नाराज सदस्यांना व्याजाच्या निधीचे समान वाटप करण्याचा ठराव या सभेच्या सुरुवातीला करण्यात आला. या निधीचे समान वाटप होईपर्यंत सर्व वर्क आर्डर थांबविण्याचे आदेशही जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे यांनी दिले.

दरम्यान तेराव्या वित्त आयोगांतर्गत विकासकामांसाठी जिल्हा परिषदेला २ कोटी १० लाख, पंचायत समित्यांना सुमारे ४ कोटी आणि ग्रामपंचायतींसाठी १४ कोटी ७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती यावेळी सदस्यांना देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ट्रायकॉम’मधील आंदोलन अखेर मागे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

ट्रायकॉम कंपनीतील कामगारांचे बंद आंदोलन मंगळवारी अखेर मागे घेण्यात आले. कामगार उपायुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीत तीन महिन्याच्या आत वेतनवाढीची बोलणी करणे व उर्वरित कामगारांचा १० टक्के बोनस कंपनीने दोन टप्यात देण्याचे ठरविण्यात आले. यानंतर सिटू भवनात कामगारांच्या झालेल्या बैठकित सिटूचे उपाध्यक्ष सिताराम ठोंबरे यांनी कामगारांनी ११ मार्चला पहिल्या पाळीपासून कामाला जाण्यास सांगितले.

कामगार कायद्याच्या ‌विविध सुविधा वेळेवर मिळत नसल्याने सातपूर औद्योगिक वसाहतीतील असलेल्या ट्रायकॉम इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीतील कामगारांनी सहा मार्चपासून कामबंद आंदोलन सुरू केले होते. दरम्यान, मागण्या मान्य होत नसल्याने कामगार उपायुक्त कार्यालयात कंपनी व्यावस्थापन व कामगार युनियन यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी कंपनीचे संचालक उपस्थित नसल्याने १० मार्चला बैठक घेण्याचे ठरले होते. दरम्यान कामगार उपायुक्त आर. एस. जाधव यांच्या दालनात झालेल्या बैठकीत मध्यममार्ग काढण्यात आला. यात कामगारांचा उर्वरित १० टक्के बोनस ३१ मार्च व ३० मे असा दोन टप्प्यात देण्याचे कंपनी व्यवस्थापनाने मान्य केले. तर तीन महिन्याच्या आत कामगारांचा प्रलंबित असलेली वेतनवाढीची बोलणी करण्याचेही कामगार उपायुक्तांनी कंपनी व्यवस्थापनाला सांगितले. याप्रसंगी ट्रायकॉम कंपनीचे संचालक परेश पाठक, चेतन कोठारी, चिराग शर्मा, कामगार युनियनच्या सिटूचे उपाध्यक्ष सिताराम ठोंबरे, आर. एस. पांडे, कंपनीचे युनियन प्रतिनिधी कैलास सरज, पंकज बोरसे, राहुल पवार, रंजना चव्हाण यांसह कामगार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिऱ्हाड आंदोलक आक्रमक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नोकरीत कायम करण्याच्या मागण्यासाठी तब्बल १४ दिवसांपासून आदिवासी आयुक्तालयावर मुक्काम ठोकलेल्या बिऱ्हाड आंदोलक आता आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्र्यासह आदिवासी विकास मंत्री आणि आदिवासी लोकप्रतिनिधी अहिंसक मार्गाने आंदोलन करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने, गुरुवारपासून (दि. १२) आंदोलन आक्रमक करण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलकांनी आता अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला असून प्रसंगी आत्मदहन आंदोलन सुरू करण्याचा पर्यायही निवडला आहे. त्यामुळे पोलिसांसह आदिवासी विभागाला धडकी भरली आहे.

गेल्या दोन महिन्यापासून शहरात विविध कारणास्तव येणाऱ्या मंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आंदोलकांनी प्रश्‍न मांडला. मात्र, त्यांना आश्‍वासनाव्यतिरिक्त काही मिळाले नाही. आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांच्याही झालेल्या चर्चेतूनही काही हाती आलेले नाही. त्यामुळे हताश झालेल्या आंदोलकांना अधिवेशनात निर्णय होण्याची अपेक्षा आहे. त्यांच्या प्रश्नाला आदिवासी लोकप्रतिनिधी वाचा फोडतील अशी त्यांना आशा होती. मात्र, राज्यभरातील आश्रमशाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आता आक्रमक होत गुरुवारी कामबंद आंदोलन अथवा प्रसंगी सामूहिक आत्महन करण्याचा इशारा दिला आहे. सोबतच साखळी उपोषणाचे रुपांतर आमरण उपोषणात करण्याचा निर्णय घेतला असून गुरुवारपासून सर्व आंदोलक अन्नत्याग करणार आहेत.

आम्ही गेल्या चौदा दिवसापासून अहिंसक मार्गाने आदोलन करत आहोत. मात्र, आमच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे बुधवार अल्टीमेटम असून गुरूवारपासून आंदोलन तीव्र होणार आहे. - संदीप भाबड, आंदोलक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्लायअॅशऐवजी मातीच्या विटांचा वापर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डने (एमपीसीबी) मातीच्या विटांना बंदी घालून देखील शहरातील बांधकाम व्यावसायिक मातीच्या विटांचा सर्रास वापर करीत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवले जात असून, त्याबाबत बांधकाम व्यावसायिकांना कोणतेही सोयरेसुतक नाही.

मातीच्या विटांपेक्षा फ्लाय अॅशच्या विटांचे वजन कमी असून, नवीन बांधकाम अत्यंत कमी वेळेत होते. तसेच या विटांच्या चारही कोनांचे माप सारखेच असल्याने कामाला फिनीशिंग अत्यंत चांगली मिळते. या विटांच्या बांधकामाला जॉईंट्स कमी लागते आणि प्लास्टर कमी लागत असल्याने कमी क्रॅक येते. त्यामुळे भविष्यात लिकेजची समस्या निर्माण होत नाही. याहून अधिक फायदे फ्लायअॅशच्या विटांचे असल्याने शहरातील काही बांधकाम व्यावसायिक त्याकडे दुर्लक्ष करून मातीच्या विटांचा वापर करताना दिसत आहेत.

शहरातील विद्युत प्रकल्पापासून १०० किमीच्या परिघात फ्लायअॅशने तयार करण्यात आलेल्या विटांचा वापर करावा, असा आदेश एमपीसीबीने दिलेले आहे. त्यासंबंधीचे निर्देश शासकीय कार्यालयांना दिलेले आहेत. त्यात नाशिक महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, एमआयडीसी, तसेच एचएएल कंपनीसह अशा कार्यालयांचा समावेश आहे. तसेच सरकारी कार्यालयांमार्फत देण्यात आलेल्या कॉन्ट्रॅक्टस्ना पास करण्याआधी नियमांचे पालन केले आहे की नाही याचे निर्देश संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच प्रायव्हेट बांधकामांसाठी आदेशाचे पालन व्हावे म्हणून महानगरपालिकेला घराचे ले-आऊट पास करताना नियमांचे पालन करण्याचे निर्देश त्यांनी दिले असल्याचे एमपीसीबीच्या सूत्राने सांगितले.

मातीच्या विटांमधून होणारे हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी तसेच एकलहरा विद्युत प्रकल्पातील फ्लायअॅशचा योग्य वापर व्हावा म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरातील बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्या इमारतींच्या प्रोजेक्टस्मध्ये मातीऐवजी फ्लायअॅशच्या विटांचा वापर करण्यास सक्तीचे केले आहे. यासंबंधी न्यायालयाने देखील आदेश दिले आहेत. परंतु, शहरातील काही ठिकाणी होत असलेल्या इमारतीच्या बांधकामात मातीच्या विटा वापरतांना आढळून येत आहे.

शहरात बहुतांश मोठ्या प्रोजेक्टसमध्ये फ्लायअॅशच्या विटांचा वापर होत आहे. तसेच क्रेडाईचे २६० मेंबर्स आहेत. त्यांना संस्थेकडून सरकारच्या नियमांनुसार बांधकाम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार सदस्यांकडून देखील बांधकाम केले जात आहेत. परंतु, शहरात १००० हून अधिक बांधकाम व्यावसायिक क्रेडाईचे सदस्य नाहीत. त्यांच्यामार्फत असेल किंवा एखाद्या बंगल्याचे बांधकाम असेल तर त्यांच्या साईटवर मातीच्या विटांचा वापर असू शकतो. - जयेश ठक्कर, अध्यक्ष क्रेडाई, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीसाठी सात लाखांना चुना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी​, ना​शिक

अमेरिकेत नोकरी लावून देतो असे सांगून, दोघा भामट्यांनी उत्तमनगर परिसरातील कुटुंबास सात लाख रुपयांचा चुना लावला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे.

मूळ चेन्नइ येथील रहिवाशी असलेली फिर्यादी महिला सध्या अंबड परिसरातील उत्तमनगर येथे वास्तव्यास आहे. ही महिला एका शाळेत शिक्षका म्हणून काम करते. काही दिवसांपूर्वी फिर्यादीच्या बहिणीचा मुलगा मॉसेस नाडार नोकरीसाठी येथे राहण्यासाठी आला. इंटरनेटचा वापर करणाऱ्या मॉसेसला २४ डिसेंबर २०१४ च्या दरम्यान एक इमेल आला. संशयित आरोपी लॉयर पॅमेरा विल्यम्स आणि जोसेफ यांनी हा मेल पाठवला होता. अमेरिकेतील मॅकमुलेन बुथरोडवरील सी फूड कंपनीत नोकरी देतो, अशा आशयाचा हा इेमल होता. त्यास प्रतिसाद देणाऱ्या मॉसेसला नंतर लॉयर या महिलेने व जोसेफने वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून कॉल्स केले. नोकरीसाठी पासपोर्ट, व्हिसा, इमिग्रेशन सर्टिफिकेट प्रोसेसिंग फी इत्यादीची आवश्यकता असल्याचे सांगत पैशांची मागणी केली. वारंवार होणाऱ्या फोन कॉल्समुळे विश्वास बसलेल्या नाडार कुटुंबाने नाशिकमध्ये आरोपींच्या विविध नावावरील चार बँका खात्यांमध्ये १ लाख ४० हजार रुपये जमा केले. उर्वरित पैसे चेन्नईतून संशयित आरोपींच्या खात्यांवर जमा करण्यात आले. सात लाख रुपये जमा करणा-या मॉसेसला आरोपींनी बनावट नियुक्तीपत्र, ऑफर लेटर तसेच यूएस अॅम्बेसीच्या नावाने पैसे भरल्याची बनावट रिसीट पाठवली. या कागदपत्रांच्या आधारे नाडार कुंटुबाने अधिक चौकशी केली असता फसवणुकीचा सर्व प्रकार समोर आला. सात लाख रुपयांपैकी १ लाख ४० हजार रुपये नाशिक शहरातून जमा झालेले असल्याने मॉसेसच्या मावशीने अंबड पोलिस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दाखल केली.

दरम्यान, याबाबत माहिती देताना अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी हा प्रकार नायजेरीयन फ्रॉडचा असावा, अशी शक्यता व्यक्त केली. संशयित आरोपींनी वेगवेगळ्या फोन नंबरचा आधार घेतला. तसेच वेगवेगळ्या बँक खात्याचा वापर केला आहे. या प्रकरणात चौकशी सुरू असून, एक पथक आरोपींना शोधण्यासाठी रवाना होणार आहे.

यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या असून, यातील बहुतांश आरोपी परदेशातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. लॉटरी लागली, परदेशात नोकरी मिळणार, कमी पैशांत परदेशात व्यवसाय असा आशय असलेल्या इमेला प्रतिसाद देऊ नये. किमान, नागरिकांनी पैसे भरताना सर्वोत्परी चौकशी करावी. - दिनेश बर्डेकर, सिनीअर पीआय, अंबड पोलिस स्टेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३०० जीवरक्षकांचा पहारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळा काळात प्रशासनाला मदत करण्यासाठी अनेक संस्था स्वत:हून पुढे येऊ लागल्या आहेत. देशभरातील कुंभमेळ्यांमध्ये शंभर वर्षांहून अधिक काळ योगदान देणाऱ्या भारत सेवाश्रम संघाच्या ३०० जीवरक्षकांचे पथक गोदावरी नदीपात्राजवळ सज्ज ठेवण्याची तयारी संघाने दर्शविली आहे. बुडणाऱ्या व्यक्तीला काही क्षणात सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचे कौशल्य जीवरक्षकांना आत्मसात आहे.

कोलकाता येथे मुख्यालय असलेल्या भारत सेवाश्रम संघाचा पंचवटीतील तपोवनामध्ये आश्रम आहे. संघाने नाशिकमध्ये गेल्या तीन कुंभमेळ्यांमध्ये योगदान दिले आहे. याखेरीज अलाहाबाद, ह‌रिद्वारसारख्या देशभरातील धार्मिक स्थळांवर संघाद्वारे मदतकार्य सुरू असते. उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयातही संघाच्या जीवरक्षकांनी स्वत:च्या जीवाची बाजी लावून अनेक भाविकांचे प्राण वाचविले आहेत. संघाच्या महंतांनी मंगळवारी जिल्हाधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह यांची भेट घेतली. सिंहस्थ काळात शक्य ती मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. संघाच्या कोलकाता मुख्यालयात सक्रिय असलेल्या ३०० जीवरक्षकांना कुंभमेळा काळात नाशिकमध्ये बोलावण्यात येणार आहे. तब्बल एक ते दीड महिना हे जीवरक्षक नाशि‌कमध्येच वास्तव्य करणार आहेत. पहाटे पाच ते रात्री बारा या वेळेत हे जीवरक्षक नदीपात्राजवळ त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी सज्ज राहून बुडणाऱ्या भाविकांना वाचविण्याचे काम करणार आहेत. याखेरीज सिंहस्थ काळामध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे मोबाइल अम्ब्युलन्सच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा पुरविण्याची तयारी संघाने दर्शविली आहे. कुंभमेळा प्रमुख स्वामी भास्करानंद महाराज, स्वामी अर्पितानंदजी, स्वामी परिपूर्णजी, स्वामी सौरभानंदजी आदी यावेळी उपस्थित होते.

आमच्याकडे जीवरक्षकांचे पथक आहे. त्यापैकी ३०० जीवरक्षकांना आम्ही सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निमंत्रित केले आहे. केवळ पर्वणीच्या दिवशीच नव्हे तर २० ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत हे पथक नाशिकमध्ये मुक्कामी असेल. प्रत्येक जीवरक्षक पहाटे पाच ते रात्री उशिरापर्यंत सेवा देऊ शकेल. बुडणाऱ्या व्यक्तीला काही क्षणांत सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचे कौशल्य जीवरक्षकांकडे आहे. वैद्यकीय पथकही योगदान देणार आहे. - स्वामी विश्वात्मानंदजी, प्रधान सचिव भारतीय सेवाश्रम संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉन्टम फिजिक्समध्ये संशोधन

$
0
0

फणिंद्र मंडलिक

कोणत्याही वस्तुची निर्मिती ही अणु-रेणुंपासून झाली असून, त्यांच्या निर्मितीचा सखोल अभ्यास झाला तर तिचे मूल्य जाणून घेण्यास व तिची निर्मिती करणे सोपे होते. गणिताच्या माध्यमातून त्याचा शोध घेण्यासाठी नाशिकच्या अक्षय दळवी याची थेरॉटीकल फिजिक्स विषयातील कॉन्टम फिजिक्स टॉपिकमध्ये पीएचडी करण्यासाठी अमेरिकेतील बोस्टन विद्यापिठात निवड झाली आहे. अशा प्रकारच्या संशोधनासाठी पात्र ठरणार अमोल हा जगातील आठवा, भारतातील चौथा तर महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थी आहे.

कुठल्याही वस्तुची निर्मिती प्रक्रिया जाणून घेण्याची प्रत्येकाला ओढ असते. तशीच ओढ अक्षयला लहानपणापासूनच होती. पुढे जिज्ञासू वृत्ती वाढत गेली व त्याने या विषयातील अभ्यास करण्यास सुरुवात केली. वडिलांचा पेन्टींगचा व्यवसाय व आई एका खासगी कंपनीत नोकरी करत असल्याने त्याचे सर्व शिक्षण शिष्यवृत्तीच्या माध्यमातूनच पूर्ण झाले. बारावीत असतांना त्याने चंद्राची गती शोधण्याची अनोखी पध्दत शोधून काढली. इंजिनीअरींगच्या फर्स्ट इयरला असताना त्याने 'टाइम डायलेशन' या विषयात रिसर्च केले. तसेच 'हायझनबर्ग अनसर्टीनिटी प्रिन्सिपल' या विषयात रिसर्च करुन इंजिनिअरींगच्या तिसऱ्या वर्षाला असताना त्याने शोध निबंध सादर करून बुध्दिमत्ता सिध्द केली. 'वर्ल्ड अॅज ए होलोग्राम' या विषयात अक्षयने रिसर्च करुन विविध सेमिनारमध्ये सहभाग घेतला आहे. एमपीएससी व यूपीएससीच्या विद्यार्थ्यांनाही तो मार्गदर्शन करत असतो. त्याचे प्राथमिक शिक्षण सेंट झेव्हीयर येथे झाले असून, के. के. वाघ इंजिनिअरींग कॉलेजमझून त्याने मॅकेनिकल इंजिनीअरींगमध्ये पदवी घेतली आहे.

अक्षयने स्वकर्तृत्वावर यश मिळवले आहे. अशा संशोधनासाठी निवड होणारा तो महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थी असल्याचा आम्हाला अभिमान आहे. - सतीश दळवी, अक्षयचे वडील



निर्मितीची मेथड उलगडणार

बोस्टन युनिव्हर्सिटीत तो कॉन्टम फिजिक्सचा २ वर्षे अभ्यास करणार असून, तेथे मास्टर डिग्री मिळवणार आहे. त्यानंतर तेथे चार वर्ष पीएचडीचा अभ्यास करणार आहे. या विषयांतर्गत एखाद्या वस्तुच्या निर्मितीची प्रक्रिया मॅथेमॅटीकल मॉडेलिंगच्या माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. जे मानव निर्मित आहे, ते साध्य करणे असाध्य नाही. मात्र, ज्या गोष्टी निर्सगनिर्मित आहे तेदेखील निर्माण करणे या मेथडमधून साध्य होणार आहे. एका सिस्टीममध्ये हे साध्य झाले, तर इतर सिस्टीमसाठीही ते साध्य होऊ शकेल. यातून भविष्यात काय होणार याचा अंदाज तो मॅथेमॅटीकल मॉडेलिंगच्या माध्यमातून वर्तवू शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निम्मे नाशिककर थकबाकीदार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेने पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी थकबाकीदारांविरोधात मोहीम उघडली आहे. शहरातील एक लाख ७३ हजार नळ कनेक्शनधारकांपैकी ८२ हजार थकबाकीदार असल्याने वसुलीसाठी आता नळ कनेक्शन तोडणीला सुरुवात झाली आहे. २५ ते ५० हजारांपर्यंत थकबाकी असणा-या चार हजार ११८ थकबाकीदारांना ४८ तासांची नोटीस बजावण्यात आली आहे. मंगळवारी ११० नळ कनेक्शन तोडण्यात आले.

थकबाकीदारांना वांरवार नोटिसा देवूनही पाणीपट्टीची वसुली होत नसल्याचे चित्र आहे. मार्च एन्डमुळे ही वसुली वाढविण्यासाठी कर संकलन आणि मूल्यनिर्धारण विभागाने कंबर कसली आहे. थकबाकी वसुलीच्या नोटिसा देवूनही नळपट्टी भरत नसल्याने महापालिकेने नळ कनेक्शन तोडणी मोहीम सुरू केली आहे. आर्थिक वर्ष संपण्याची वेळ आली असतानाही शहरात तब्बल जवळपास निम्मे थकबाकीधारक आहेत. पहिल्या टप्प्यात बड्या थकबाकीदारांविरोधात कारवाई सुरू झाली आहे. सोबतच जास्त थकबाकी असलेल्यांचे नळकनेक्शन तोडायलाही सुरुवात केली आहे.



खासगी प्लंबर्सची मदत

नळ कनेक्शन तोडण्यासाठी तसेच मोठ्या प्रमाणावर व्यापक मोहीम वसुली करण्यासाठी महापालिकेकडे व्यापक यंत्रणा नाही. सद्यस्थितीत प्रत्येक विभागात एक असे सहाच प्लंबर्स आहेत. त्यामुळे ही मोहीम व्यापकपणे राबविण्यासाठी आता खाजगी प्लंबर्सची मदत केली जाणार आहे. प्रत्येक विभागात तीन खाजगी प्लंबर्स उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी पाणीपट्टी विभागाने आयुक्तांकडे केली आहे. खाजगी प्लंबर्स उपलब्ध झाल्यानंतर लगेचच व्यापक कारवाईला सुरूवात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूरला कंपनीची छाननी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सातपूर औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत प्राप्तीकर विभागाने कारवाई केल्याच्या वृत्ताने मंगळवारी औद्योगिक वर्तुळात खळबळ उडविली. मात्र, आर्थिक वर्षाखेर होताना इन्कम टॅक्स विभागाकडील नोंदींनुसार कंपनी आणि संबंधीत उद्योजकांकडील मालमत्तेच्या तपशीलासंदर्भात कागदपत्रांची केवळ छाननी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

सातपूर औद्योगिक वसाहतीकडे जाताना आयटीआय सिग्नल जवळील एका कंपनीत इन्कम टॅक्स विभागाने कारवाई केल्याचे वृत्त मंगळवारी सकाळच्या सुमाराला शहरात पसरले होते. मोबाइलच्या माध्यमातून दुपारपर्यंत हे वृत्त शहरभर पसरले. याबाबत अधिक तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता विविध कंपन्यांची नावे समोर आल्यामुळे संभ्रम वाढत होता. दरम्यान, हे धाडसत्र नसून केवळ कागदपत्रांची छाननी असल्याची माहिती मिळाली. सुरुवातीला अॅन्टी करप्शन विभागाची ही कारवाई आहे की इन्कम टॅक्स विभागाची, कारवाईसाठी पुण्यातील पथक आहे की नाशिकमधील याबाबतही विरोधाभासी माहिती मिळत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगात रंगण्यासाठी नाशिककर सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

धुळवड वा होळीला रंगांची फारशी उधळण न करणारे नाशिककर रंगपंचमीचा उत्सवासाठी मात्र सज्ज झाले आहेत. रंगोत्सवाची परंपरा असलेल्या नाशकातल्या रहाडीही त्यासाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पूर्वी असलेल्या १६ रहाडींचा आनंद नाशिककर घेऊ शकत नसले तरीही शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या प्रमुख चार रहाडींमध्ये ते बुधवारी तुडूंब बुडणार आहेत.

रंगपंचमीच्या आनंदाला चार चाँद लावणा-या पेशवेकालीन रहाडी हे नाशिकचे खास वैशिष्ट्य. पंचवटीतील सरदार चौक, जुन्या नाशकात मधली होळी, नाव दरवाजा याठिकाणी सध्या रहाडी आहेत. याशिवायही जुन्या नाशिकच्या तसेच बाहेरील भागात काही रहाडी आहेत. पेशवेकाळात नाशिकला एकुण सोळा रहाडी होत्या पैकी काही बुजविण्यात आल्या असून, तीन रहाडी मात्र आजही अस्तित्त्वात आहेत. त्यातील दहीपुलाखालील रहाड दरवर्षी न चुकता खोदण्यात येते.

ऐरवी बुजविण्यात येणाऱ्या या रहाडी रंगपंचम‌ीच्या पूर्वसंध्येला खोदण्यात येतात. खोदल्यावर त्याची विधीवत पूजा करून त्यात रंग बनवले जातात. रंगपंचमीच्या दिवशी या रहाडी रंगाने काठोकाठ भरल्या जातात. त्यात उड्या मारून किंवा कुणाला उचलून रहाडीत फेकून आनंद व्यक्त करण्याची परंपरा वर्षानुवर्षे पाळली जाते.

दीड पुरूष उंचीच्या या रहाडीत ज्याची इच्छा असेल त्यालाच टाकले जात असे. कालांतराने मात्र जो येईल त्याला रहाडीत बुडवले जाऊ लागले. त्यामुळे त्यावरून अनेकदा भांडणेही होत, भांडणाचे पर्यावसन हाणामारीत होऊ लागल्याने पोलिसदादा मध्ये पडू लागले. रहाडीत माणूस सुरक्षित असावा म्हणून काही सुरक्षारक्षकांचे दल उभारले जाऊ लागले. रहाडीत खेळण्याचा आनंद नक्की लुटायला हवा. परंतु, त्यातही गांभीर्य पाळले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टूरिझम कॉनक्लेव्ह आजपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जून महिन्यात होणाऱ्या कुंभमेळ्याच्या धर्तीवर नाशिक शहर आणि परिसरातील पर्यटन स्थळांचे ब्रॅण्डिंग होण्याच्या उद्देशाने शुक्रवारपासून (दि. १३) टूरिझम कॉनक्लेव्हला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन (तान) यांच्या वतीने आयोजित या तीन दिवसीय परिषदेत भारतभरातून सुमारे ४५० टूर ऑपरेटर्सने सहभाग घेतला आहे.

नाशिक शहर परिसरातील पर्यटन स्थळांची ओळख देशभरात टूर ऑपरेटर्सच्या माध्यमातून पोहचावी, या उद्देशाने ही कॉनक्लेव्ह आयोजित करण्यात आली आहे. हॉटेल एक्सप्रेस इन येथे हा उपक्रम होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता या उपक्रमाचे उद्घाटन होईल. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय पर्यटनमंत्री डॉ. महेंद्र शर्मा, पर्यटन राज्य मंत्री राम शिंदे, पालकमंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित राहणार आहेत.

शहरात पहिलीच राष्ट्रीय कॉनक्लेव्ह

नाशिक शहर परिसरातील पर्यटन क्षेत्राचे या पध्दतीने ब्रॅण्डिंग करण्यासाठी नाशिकमध्ये राष्ट्रीय स्तरावर ही पहिलीच कॉनक्लेव्ह आयोजित करण्यात आल्याची माहिती उपक्रमाचे समन्वयक आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा आणि 'तान'चे अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी दिली. यापूर्वी कॉनक्लेव्ह ही संकल्पना मराठवाडा आणि कोकणात राबविण्यात आली होती. या परिषदेसाठी दिल्लीसह चेन्नई, कलकत्ता यासारखी शहरे आणि ओडिशा, मध्य प्रदेश, राजस्थान आदी राज्यांमधून अपेक्षित नोंदणी झाल्याचेही आयोजकांनी सांगितले. प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

शॉर्ट फिल्मद्वारे ब्रॅण्डिंग

नाशिकच्या पर्यटन क्षेत्रावर प्रकाश टाकणारी शॉर्ट फिल्मही या सोहळ्यात प्रदर्शित करण्यात येणार आहे. नाशिक शहराच्या ब्रॅण्डिंगला पाठबळ देण्यासाठी नाशिक महापालिकेसह, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, क्रेडाई, निमा, आयमा, हॉटेल ऑनर्स असोसिएशन, ऑल इंडिया वाईन प्रोड्युसर्स असोसिएशन, पंचवटी हॉटेल, हॉटेल एक्सप्रेस इन, कारडा कन्स्ट्रक्शन आदी संघटना व उद्योगांनी या उपक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला आहे.

कुंभमेळ्याच्या धर्तीवर राष्ट्रीय स्तरावर टुरिझम कॉनक्लेव्हचा प्रयोग पहिल्यांदाच नाशिकमध्ये होत आहे. या उपक्रमाला भारतभरातून विविध राज्य आणि मोठ्या शहरातून अपेक्षित प्रतिसाद मिळाला आहे. नाशिकच्या ब्रॅण्डिंगमध्ये हा उपक्रम भर घालेल. - संतोष मंडलेचा, समन्वयक, टूरिझम कॉनक्लेव्ह

शहराच्या ब्रॅण्डिंगसाठी हा उपक्रम अत्यंत फायदेशीर ठरेल. मुख्यत: भारतभरातून येथे टूर ऑपरेटर्स उपस्थित राहणार असल्याने पर्यटन व्यवसायास चालना मिळेल. नाशिक शहर आणि परिसराचे नाव देश व विदेशात पोहचविण्यासाठी कॉनक्लेव्ह फायदेशीर ठरेल. - दत्ता भालेराव, अध्यक्ष, 'तान'





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगपंचमीला गालबोट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

गोरेवाडीतील सौरव नारायण बर्वे या १७ वर्षीय कालेज युवकाची जेलरोडच्या ज्ञानेश्वरनगरमध्ये रंगपंचमीच्या रात्री (ता.११) साडेनऊच्या सुमारास टोळक्याने कोयता आणि लोखंडी रॉडने हल्ला करून हत्या केली. त्याच्या भावासह तीन जण जखमी झाले आहेत.

सौरव हा संदीप फाऊंडेशनमध्ये सिव्हील इंजिनीअरींग डिप्लोमाच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होता. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असल्याचे समजते.सौरवच्या मारेक-यांना त्वरित अटक करावी या मागणीसाठी गोरेवाडीत कडकडीत बंद पाळण्यात आला. सौरवचा भाऊ कुमार नारायण बर्वे याने तक्रार दिली. सैलानीबाबा चौकातील ज्ञानेश्वरनगरच्या मंदिराजवळ सौरव हा अमन भालेराव आणि राजनारायण या मित्रांसमवेत उभा होता. तेथे प्रतिक बर्वे, पप्पू घाडगे, निलेश बोराडे, सचिन कळमकर, निरभवणे आदींनी येऊन वाद घातला. सौरवने भाऊ कुमारला फोन करुन बोलावून घेतले. मध्यस्थीसाठी कुमार घटनास्थळी गेला. मात्र, पप्पू घाडगे व प्रतिक बर्वे यांच्या हातात कोयते तर त्यांच्या मित्रांकडे लोखंडी रॉड होते. शिवीगाळ करत त्यांनी सौरवच्या डोक्यावर वार केले. मध्यस्थीस आलेल्या कुमारच्या दंडावरही वार केले. अमन व राजनारायणही जखमी झाले. नागरिकांनी सौरवला बिटको हास्पिटलमध्ये दाखल केले. प्रतिक बर्वे, पप्पू घाडगे, निलेश बोराडे, सचिन कळणकर व निरभवणे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

गोरेवाडीत कडकडीत बंद

सौरवच्या मागे आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. भाऊ कुमार हा नाशिकरोड प्रेसमध्ये ठेकेदारीवर तर वडील महापालिकेत कामाला आहेत. सौरवच्या हत्येच्या निषेधार्थ गोरेवाडीतील व्यावसायिकांनी कडक बंद पाळला. तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी येथे बंदोबस्तात वाढ केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images