Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रोजगाराची रांग पाच हजारांची!

0
0
आर्थिक मंदीच्या सावटाखाली नोकरभरती टाळली जात असताना नाशिकमध्ये मनसेतर्फे आयोजित करण्यात आलेला रोजगार मेळावा उमेदवारांसाठी आशेचा किरण ठरतो आहे.

ठाणे-कसारा लोकल १५ फेब्रुवारीपासून

0
0
मुंबई-आग्रा हायवेच्या नाशिक-मुंबई रस्त्याचे चौपदरीकरण झाल्याने दोन्ही शहरांची रोड कनेक्टिव्हिटी वाढली असून नव्या ठाणे-कसारा लोकलमुळे आता रेल्वे कनेक्टिव्हिटीही वाढणार आहे.

रासबिहारी शाळेला फी कमी करण्याची सूचना

0
0
चौकशी समितीचा अहवाल आणि लेखाधिकाऱ्यांच्या तपासणीनुसार रासबिहारी शाळेला फी कमी करण्याबाबत सूचना दिली जाणार असल्याची माहिती नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक टी. एन. सुपे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

सिंहस्थासाठी ‘ऑपरेशन मॅनेजमेंट’

0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी पोलिस आणि सिम्बायोसिस इन्स्टिट्युटच्या ऑपरेशन मॅनेजमेंटचे (एसआयओएम) विद्यार्थी एकत्र येणार असून हे विद्यार्थी सिंहस्थ कुंभमेळ्यातील गर्दीचे नियोजन कसे असावे याचा अभ्यास करणार आहे.

... तर यशवंतराव मोठे साहित्यिक झाले असते

0
0
यशवंतराव चव्हाण हे नेतृत्त्वापेक्षा माणूस म्हणूनही खूप मोठे होते. राजकारणात राहूनही चारित्र्य अन् कर्तृत्व यांचा अनोखा मेळ त्यांनी साधला होता. यशवंतरावांना साहित्यातही रस होता.

शोभा साखरवाडे ‘सारडा समान संधी’च्या मानकरी

0
0
उल्लेखनीय सामाजिक कार्याकरिता दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील ‘सारडा समान संधी’ पुरस्कारासाठी यंदा शोभा साखरवडे यांची निवड करण्यात आली आहे. ४ फेब्रुवारीला मुंबईमधील चर्चगेट परिसरातील ‘मर्चंट चेंबर’च्या सभागृहात संध्याकाळी ६ वाजता हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

कांद्याची आवक घटली

0
0
गेल्या काही दिवसात आवक घटल्याने कांद्याचे भाव वाढले आहेत. गेल्या १५ ते २० दिवसांच्या आवकेशी तुलना करता लासलगाव बाजारसमितीत १० ते १५ हजार क्विंटल कांद्याची आवक घटली आहे.

वाइन फेस्टिवल फेब्रुवारीत

0
0
द्राक्षांचा हंगाम सध्या जोमात असताना आता या हंगामाला वाइन फेस्टिवलची जोड लाभणार आहे. इंडियन ग्रेप प्रोसेसिंग बोर्ड (आयजीबीपी) आणि ऑल इंडिया वाइन प्रोड्युसर्स असोसिएशन (एआयडब्ल्यूपीए) च्यावतीने या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. यात देशभरातील वायनरी सहभाग घेणार आहेत.

नाशिक क्राईम डायरी

0
0
रहदारीला अडथळा होईल अशा पध्दतीने उभी केलेली रिक्षा बाजूस घेण्यास सांगितल्याचा राग मनात धरून रिक्षा चालकाने वाहतूक पोलिसास धक्काबुक्की करीत शिवीगाळ केली. ही घटना सोमवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास सीबीएसजवळील हॉटेल सुरूची येथे घडली.

हुतात्म्यांच्या आठवणी धूसर!

0
0
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांच्या आठवणी जपण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सहा तालुक्यांत उभारण्यात आलेली हुतात्मा स्मारके अखेरच्या घटका मोजत आहेत. युवा पिढीला प्रेरणादायी ठरावीत या हेतूने लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या या स्मारकांची झालेली पडझड व त्या ठिकाणी असणारी अस्वच्छता चीड आणणारी आहे. स्मारकांच्या दुरवस्थेकडे प्रशासनानेही डोळेझाक केली आहे.

९ विद्यार्थ्यांना विषबाधा

0
0
महापालिकेच्या ६२ नंबर शाळेतील ९ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून त्यांना पालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

किस्सा ‘शूज’चा

0
0
बँकेच्या अधिकाऱ्यांचा कार्यक्रम म्हणजे विचारायलाच नको. सुटाबुटातले अधिकारी आणि आर्थिक व्यवहारांबाबतच्या चर्चा म्हणजे सामान्यांच्या डोक्यावरुन पाणीच म्हणा ना. अशा कार्यक्रमांमध्ये मुख्य भूमिका बजावणारे अधिकारी सामान्य माणसासारखे थोडेफार विसरभोळे असतील अशी शंकासुध्दा आपल्या मनात चुकूनही येत नाही.

यशवंतराव देशाला ललामभूत व्यक्तिमत्व

0
0
यशवंतराव चव्हाण म्हणजे अखिल देशाला ललामभूत ठरलेले व्यक्तिमत्त्व. त्यांनी सामान्य माणसाला जगण्यासाठी दिशा दिली. सर्वसामान्य माणसाला जवळ करून कलाकरांना व त्यांच्यातील कलेला राजाश्रय मिळवून दिला. समाजाचे भले व्हावे म्हणून त्यांनी आयुष्यभर काम केले, असे प्रतिपादन माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.

बनावट दाखल्यांच्या आधारे लायसन्स

0
0
शहरातील वेगवेगळ्या शाळांचे बनावट दाखले तयार करुन त्याआधारे ड्रायव्हिंग लायसन्स मिळविल्याचे प्रकरण पुढे आले असून, याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. आरटीओ कार्यालयात अशी १३ ते १४ प्रकरणे पुढे आली आली असून, त्यातून एजंट व ड्रायव्हिंग स्कूल्सची बनवेगिरीदेखील उघड झाली आहे.

नंदन भास्करे यांची फेरनियुक्ती

0
0
राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी नाशिकच्या नंदन भास्करे यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे.

दूध भेसळीबाबत व्हा जागरूक!

0
0
देशात सर्वाधिक दूध भेसळ महाराष्ट्रात होते, असा निष्कर्ष दस्तुरखुद्द फूड सेफ्टी अँण्ड स्टँडर्डस् अॅथॉरिटी ऑफ इंडियानेच काढल्याने आपण घेतो ते दूध शुद्ध आहे की भेसळयुक्त याकडे ग्राहकांनी गांभिर्याने पाहिले पाहिजे.

विषबाधेमुळे धडक मोहीम

0
0
महापालिका शाळेतील ९ विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनाच्या सेवनानंतर उलट्या आणि पोटदुखी झाल्याची घटना घडल्याने शिक्षण मंडळाला चांगलीच जाग आली. परिणामी आणखी काही उद्भविण्यापूर्वी शिक्षण मंडळामार्फत बुधवारपासून ‘धडक मोहिमे’च्या माध्यमातून महापालिकेच्या शाळांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

‘त्या’ विद्यार्थ्यांची तब्येत स्थिर

0
0
विषबाधेमुळे डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये मंगळवारी अॅडमिट केलेल्या नऊ विद्यार्थ्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. बी. पाटील यांनी दिली. या विद्यार्थ्यांवर उपचार करुन त्यांना बुधवारी सकाळी ११ वाजता सोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत

0
0
व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रोत्साहन देऊन शिक्षणाची उत्पादकता वाढवू पाहणाऱ्या सरकारनेच वर्षभरापासून बीबीएच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रोखून ठेवल्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणातून सरकारचे विरोधाभासी धोरण उघड झाले आहे.

जीवन उत्सवाचे सूतकताईने उद्घाटन

0
0
सर्वोदय परिवार, निर्मल ग्राम केंद्र व मराठी विज्ञान परिषद नाशिक यांच्यावतीने ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी या दरम्यान सार्वजनिक वाचनालयाच्या माधवराव लिमये सभागृहात आयोजित तीन दिवसीय जीवन उत्सव या कार्यक्रमाचे उद्घाटन पारंपरिक सूतकताई करून करण्यात आले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images