Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

'त्या' शिक्षकावर कारवाई नाहीच

$
0
0
विद्यार्थीनींशी गैरवर्तन करणा-या शिक्षकावर शिक्षण संस्थेने कारवाई करायची की शिक्षण विभागाने हेच स्पष्ट न झाल्याने संबंधित शिक्षकावर अद्यापही कारवाईच झालेली नाही. दोन्ही विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याने त्या शिक्षकावर कारवाई होणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

'कपालेश्वर' विश्वस्तांवरचे आरोप बिनबुडाचे

$
0
0
कपालेश्वर संस्थानाच्या विश्वस्तांवर झालेले आरोप बिनबुडाचे असून धर्मदाय आयुक्तांचा विश्वास सार्थ ठरवित कपालेश्वर संस्थानाचा विकास झाला आहे. उत्पन्नात नव्वद पटीने वाढ झाली आहे.

जि.प.समोर आव्हान अखर्चित निधीचे

$
0
0
नाशिक - आव्हान खर्चाचे (फोटो प्रातिनिधीक) ---------------------------------जिप...

सेटची उत्तरतालिका नसल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ

$
0
0
सेटची परीक्षा होऊन तब्बल महिना उलटून गेल्यानंतर अद्याप वेबसाइटवर उत्तरतालिका (आन्सर की) न आल्याने सेट दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. यंदा प्रथमच विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका घरी नेण्यास परवानगी देण्यात आली, मात्र सेट विभागातर्फे अधिकृत उत्तरतालिका न आल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत.

आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत

$
0
0
विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या 'राज्यातील कायदा व सुव्यवस्था' विषयावरील चर्चेत सहभागी होत आमदार जयंत जाधव यांनी गुळवंच (सिन्नर), जळगाव (बु) (नांदगाव) व भगूर येथील प्रियंका लकारिया प्रकरणात आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे.

गणवेश वाटपासाठी महापालिकेची लगबग

$
0
0
महापालिकेतील गणवेश घोटाळ्याला 'महाराष्ट्र टाइम्स'ने वाचा फोडल्याने सत्ताधारी आणि प्रशासन चांगलेच हादरले आहे. तब्बल वर्षभर कालहरण केल्यानंतर आणि शाळांना सुटी लागण्यास अवघ्या दहा-बारा दिवसांचा अवधी उरला असताना मंगळवारपासून मुख्याध्यापकांकडे गणवेशाचे गठ्ठे नेऊन टाकण्यात येत आहेत.

मनमाड रेल्वे स्थानकातील ओव्हरब्रिज लवकरच

$
0
0
मनमाड रेल्वे स्थानकातील अर्धवट असलेल्या ओव्हरब्रिजचे काम एप्रिलपासून सुरू करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे एडीआरएम प्रदीप बारापत्रा यांनी दिली.

स्थायीवर कोणाची वर्णी

$
0
0
गेल्या महिन्यात रिक्त झालेल्या स्थायी समितीतील जागेवर कुणाची वर्णी लागते याचा फैसला आज (गुरुवार) होणाऱ्या महासभेत लागणार आहे. १६ सदस्य असलेल्या स्थायी समितीतील ११ सदस्यांची घोषणा आज अपेक्षित आहे.

जळगाव महापालिकेचा ७४२ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

$
0
0
जळगाव महापालिकेचा २०१३-१४चा ७४१ कोटी ९१ लाख २० हजारांचा अर्थसंकल्प महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंगळवारी मंजूर झाला. महापालिका प्रशासनाने ७२७ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला होता.

'नाशिक केंब्रिज' घेणार इंप्रुव्हमेंट परीक्षा

$
0
0
इंदिरानगर परिसरातील सीबीएसई बोर्डाशी संलग्न असलेल्या नाशिक केंब्रिज स्कूलने अकरावीत काही विषयांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची इंप्रुव्हमेंट परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांनी बुधवारी निकालाबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

पेट्रोल पंपप्रकरणी बोरसे ताब्यात

$
0
0
सिडकोच्या कामटवाडे भागातील साई पेट्रोलपंपावर हल्ला केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी मुख्य संशयित प्रणव बोरसे याला बुधवारी दुपारी ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री प्रणवसह तिघांनी खंडणीच्या मागणीसाठी पेट्रोल पंपावर हल्ला केला होता.

'आयसीटी' पाच हजार शाळांमध्ये

$
0
0
माध्यामिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना कम्प्युटरचे ज्ञान देण्याच्या उद्देशाने राज्यभरातील ५ हजार शाळांमध्ये 'आयसीटी' योजनेचा तिसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. २००७पासून सुरू झालेल्या या योजनेचा हा टप्पा राबविण्यास नुकतीच राज्य सरकारमार्फत मान्यता देण्यात आली.

बाजार समितीला ४४ कोटींची सूट

$
0
0
दोन वर्षांपूर्वी ७२ कोटींच्या थकबाकीपोटी बाजार समिती सील करण्याची कारवाई करणा-या राज्य सहकारी बँकेने कृपादृष्टी ठेवत १२१ कोटी २९ लाख रुपये कर्जापैकी तब्बल ४४ कोटी ३० लाख रुपयांची सूट दिली आहे. कुठल्याही चौकशीविना कर्ज देणा-या या बँकेने पुन्हा एकदा पुनर्कृपा केल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे.

खतप्रकल्पात कामगाराचा मृत्यू

$
0
0
घंटागाडीवर काम करणाऱ्या कामगाराचा बुधवारी खतप्रकल्पावर मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी कामगाराचा मृतदेह थेट महापालिकेत आणला. यावेळी भरपाईसह इतर मागण्यांसाठी ठिय्या आंदोलनही करण्यात आले.

API वर धुळ्यात तलवारीने हल्ला

$
0
0
होळीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पकडलेल्या तरुणाला सोडण्यास नकार देणा‍रे असिस्टंट पोल‌िस इन्स्पेक्टर धनंजय पाटील यांच्यावर मंगळवारी रात्री तलवारीने हल्ला करण्यात आला.

जिंदाल कंपनीला आग

$
0
0
नाशिकमध्ये घोटीजवळ असलेल्या जिंदाल समुहाच्या कंपनीला लागलेली आग सहा तासांच्या प्रयत्नांनंतर आटोक्यात आली आहे.

परीक्षांचा श्रीगणेशा

$
0
0
एम. फुक्टोच्या परीक्षा विषयक असहकार आंदोलनामुळे बहुचर्चित विषय ठरलेल्या पुणे विद्यापीठाच्या परीक्षांना गुरूवारी सुरूवात झाली. ठरलेल्या वेळेतच या परीक्षा सुरू करण्याचे आव्हान पेलत विद्यापीठाने या परीक्षांना सुरूवात तर केली खरी. मात्र, नियमांचे उल्लंघन करीत नियोजन केलेल्या या परीक्षाच अशास्त्रीय असल्याची भूमिका पुक्टोने मांडली आहे.

पंतोजींच्या शाळांचा एन्टर ई लर्निंगच्या दिशेने

$
0
0
पासोड्यांपासून झालेली शहरातील शाळांची सुरूवात आजमितीला ई लर्निंगपर्यंत येऊन पोहोचली असून हा बदल विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून अत्यंत सकारात्मक आहे. ईलर्निंगमुळे शिक्षण तर हायटेक होणारच परंतु संगणक स्पर्धेशी लढताना विद्यार्थी सक्षमदेखील होणार आहे.

अन्यायाश्रमच

$
0
0
छळछावणी काय असते याचा प्रत्यय नुकताच पेठरोडवरील जय आनंद निराश्रित (अनाथ) बालगृहात घडलेल्या प्रकारावरुन आला. या बालगृहातील ६ ते १४ वयोगटातील मुलींचे तेथील पाच कर्मचाऱ्यांकडून लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार प्राप्त झाली आणि विधानसभा अधिवेशन काळात गडबड नको म्हणून सरकारी पातळीवर कारवाईची लगबग सुरु झाली.

विद्यार्थीनींसाठी क्रीडांगणे होणार राखीव

$
0
0
आठवड्यातील एक दिवस कॉलेजमधील क्रीडांगण विद्यार्थीनींसाठी राखीव ठेवण्याची सूचना राज्यभरातील कॉलेजेसना देण्यात आली आहे. अन्य क्षेत्राप्रमाणेच खेळातही महिलांना पुरुषांच्या बरोबरीने संधी मिळावी यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images