Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सफाई कर्मचाऱ्यांना कायम तत्त्वावरच घ्या!

$
0
0

म. टा. प्र‌तिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त सफाई कामगारांची भरती कायम तत्वावरच करा. कंत्राटी कामगारांना कायम करण्यास प्राधान्य देऊन जिल्ह्यात ही भरती प्रक्रिया राबवावी, अशी सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य विजयकुमार यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे. सफाई कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून हीन वागणूक दिली जात असल्याचे तसेच, त्यांना हक्कांपासून वंचित ठेवले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर विजयकुमार यांनी महापालिकेसह अनेक विभागांच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. सूचनांवर कार्यवाही करून अहवाल सादर न केल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला. तीन तास चाललेल्या या बैठकीत विजयकुमार यांनी सूचनांचा पाऊस पाडला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारतचा नारा दिला असून, सफाई कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा तसेच, कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी विजयकुमार शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, पोलिस उपायुक्त निसार तांबोळी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव

बनकर, उपजिल्हाधिकारी नीलेश जाधव, माजी नगरसेवक प्रताप मेहरोलिया यासह समाज कल्याण, आरोग्य, शिक्षण अशा विविध विभागांचे अधिकारी, सफाई कर्मचारी आणि त्यांच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यात सफाई कर्मचाऱ्यांबाबत असलेली वास्तव परिस्थिती प्रामाणिकपणे मांडा अशी सूचना प्रारंभीच करण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांना गमबुट, मास्क, हॅन्ड ग्लोव्हज् व तत्सम सुरक्षेची साधने पुरवली जात असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, गेल्या दहा वर्षांत अशी साधनेच मिळत नसल्याची तक्रार बैठकीतच सफाई कामगारांनी केल्यानंतर विजयकुमार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. चुकीची माहिती देऊन आयोगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा कठोर कारवाई करावी लागेल असा इशारा दिला. कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळले जात असल्याप्रकरणी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, तसेच त्यांना कारागृहात पाठविले जाईल असा इशारा देण्यात आला. २०१३ पासून सफाई कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेने आरोग्य तपासणी मोहीमच राबवली नसल्याची गंभीर दखल घेण्यात आली. प्रत्येक तीन महिन्यांनी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करा. त्याची सुरुवात रविवारी (दि. २९) पासून व्हायलाच हवी अशी सूचना करण्यात आली.

शहरात हवे ३,७५० सफाई कर्मचारी

एक लाख लोकसंख्येमागे २५० सफाई कर्मचारी असावेत असा निकष आहे. नाशिक शहरात २० लाख लोकसंख्येमागे केवळ १९९६ सफाई कर्मचारी आहेत. सिंहस्थात नाशिकमध्ये सुमारे १ कोटी लोक येणार

आहेत. त्यामुळे उपलब्ध मनुष्य बळावर साफसफाईचा मोठा ताण येणार असल्याचे काही कार्यकर्त्यांनी विजयकुमार यांच्या निदर्शनास आणून दिले. सरकारच्या निकषानुसार २० लाख लोकसंख्येसाठी किमान

३ हजार ७५० सफाई कर्मचारी हवे. या व्यतीरिक्त कुंभमेळ्यातही मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. सिंहस्थात नाशिक शहरात साडेचार हजार, तर त्र्यंबकेश्वरसाठी ५०० सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे लोक कायम तत्वावर घेण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली.

हे स्वास्थ्य रक्षक

देशाच्या सीमांवर पहारा देऊन सैनिक जसे देशबांधवांचे रक्षण करतो तसे देशभर स्वच्छता ठेऊन सफाई कर्मचारी देशवासीयांच्या आरोग्याचे रक्षण करतात. म्हणूनच त्यांना स्वास्थरक्षक असे संबोधले जावे असा प्रस्ताव आपण राष्ट्रपती तसेच पंतप्रधान, सर्व मुख्यमंत्री यांना देणार आहोत अशी माहिती विजयकुमार यांनी दिली.

विजयकुमार यांनी केलेल्या सूचना

> आरोग्य तपासणी शिबिरात कर्मचाऱ्यांना मोफत औषधे द्या. कोठे किती कॅम्प घेतले याचा अहवाल सादर करा.

> सफाई कर्मचारी जेथे काम करतात त्या परिसरात महिला आणि पुरूष कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम तयार करा. तेथे स्वच्छ पाणी, साबण असावा. चेंजिंग रूम बनविण्यापूर्वी त्याचे मॉडेल आयोगाकडे पाठवा.

> सफाई कर्मचाऱ्यांच्या कॉलनीमध्ये सामाजिक सभागृह, शाळा, व्यायामशाळा, शिलाई सेंटर सुरू करा.

> आंबेडकर निवास योजनेंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांना शहराच्या मध्यवस्तीत घरे द्या.

> दरवर्षी १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला निवडक सफाई कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करा.

> दरमहा किंवा दर तीन महिन्यांनी त्यांच्याशी वार्तालाप करा.

> सफाईची कामे खासगीकरणाच्या माध्यमातून न करता कायम तत्वावर देण्यास प्राधान्य द्या.

> सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या शिक्षणानुसार पदोन्नती द्या. तसेच, त्यांच्या वारसांना सेवेत घेताना शिक्षणानुसारच पद द्या.

> सफाई कर्मचाऱ्यांना कंत्राटी पध्दतीने न राबविता सेवेत कायम करा. सफाईच्या कामांचा ठेका देतानाही वाल्मिकी, मेहतर आणि तत्सम समाजाच्या लोकांनाच तो प्राधान्याने दिला गेला पाहिजे.

> सफाई कर्मचाऱ्यांना महापालिकेने व्यवसायासाठी बाजारपेठांच्या मध्यवर्ती भागात गाळे देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे.

> सफाई कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टाचा अवमान: मंगळवारी सुनावणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

शासकीय आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांबाबत ११ नोव्हेंबर २०११ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या आदिवासी विकास विभागातील सर्व जबाबदार अधिकाऱ्यांवर आता न्यायालयाच्या अवमानाची टांगती तलवार आहे. न्यायालयाच्या आदेशावर कारवाई न केल्याने कोर्टाच्या अवमानाची कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत मुंबई उच्च न्यायालयाने दिले असून, येत्या २४ मार्चला त्यावर सुनावणी होणार आहे.

आदिवासी विकास विभागाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांसंदर्भात काढलेल्या ११ नोव्हेंबर २०११ च्या शासननिर्णयाची अंमलबजावणी नियमाप्रमाणे झालेली नाही. शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांबाबत निर्गमित शासननिर्णयाच्या अंमलबजावणीचे उल्लंघन झाले आहे. विद्यार्थ्यांना दरमहा निर्वाह भत्ता देणे अपेक्षित असताना त्याप्रमाणे अंमलबजावणी होत नसल्याचे शासनानेच केलेल्या प्रतिज्ञापत्राने स्पष्ट होत आहे. याचिकेमध्ये उपस्थित करण्यात आलेले विषय अत्यंत महत्वाचे असून, २८ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांचा थकीत निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांना देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ४ फेब्रुवारीला दिले होते.

मात्र, त्याची अंमलबजावणी न करता आदिवासी विकास विभागाने ११ मार्च रोजी झालेल्या सुनावणीवेळी अंमलबजावणीसाठी चार आठवड्यांचा अवधी मागितला होता. त्यास न्या. अभय ओक व न्या. ए. के. मेनन यांच्या खंडपीठाने स्पष्ट नकार देऊन राज्यातील आदिवासी वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांचा थकीत निर्वाह भत्ता २० मार्चपर्यंत देण्याचे व त्याबाबतचे शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले. तसेच, २० मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना थकीत रक्कम न मिळाल्यास शासकीय आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांबाबत असलेल्या ११ नोव्हेंबर च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या आदिवासी विकास विभागातील सर्व जबाबदार अधिकाऱ्यांवर कंटेम्प ऑफ कोर्ट अ‍ॅक्ट, १९७१ नुसार कोर्टाच्या अवमानाची कारवाई करण्यात येईल, असे आदेश दिले. या सुनावणीत अर्जदारांसाठी अॅड. सुगंध देशमुख यांनी तर सरकारसाठी अॅड. एम. पी. ठाकूर यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रांतांच्या वाहनचालकाला मारहाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

देवळा तालुक्यातील लोहणेर येथे प्रांताधिकारी संजय बागडे यांच्या वाहनचालकाला वाळूमाफियांनी जबर मारहाण करीत जखमी केले. या हल्लातून प्रांताधिकारी संजय बागडे थोडक्यात बचावले. वाळू ट्रॅक्टरच्या चाकाची हवा सोडण्यासाठी गेलेले बागडे यांचे वाहनचालक बाळासाहेब निरधर यांना वाळू तस्करांनी मारहाण केली. या प्रकरणी चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोहणेर येथे गिरणा नदीपात्रातून मागील काही दिवसांपासून वाळू तस्करी होत आहे. वाळू माफियांचा हैदोस वाढल्याने गेल्याच आठवड्यात संजय बागडे यांनी वाळू तस्करांवर कमरेच्या खाली गोळ्या घालण्याचे आदेश जारी केलेले आहेत. गुरुवारी रात्री गिरणा पात्रातून वाळूची तस्करी होत असल्याची माहिती बागडे यांना मिळाल्यानंतर ते वाहनचालक निरधर व शिपाई भाऊलाल सोनवणे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांना पाहून वाळू उपसा करणारे कामगार व ट्रॅक्टर चालकांनी पळ काढला. या वेळी निरधर व सोनवणे हे ट्रॅक्टरच्या चाकातील हवा सोडण्यासाठी गेले असता, दादा बस्ते व इतर चार-पाच जणांनी त्यांना बेदम मारहाण करून घटनास्थळावरून पळ काढला. सोनवणे यांनाही मारहाण करण्यात आली. निरधने यांच्या फिर्यादीवरून दादा बस्ते यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'नायपर'साठी स्वाक्षरी मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नॅशनल फार्मा एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (नायपर) ही संस्था नाशिकलाच यावी या आग्रही मागणीसाठी जिल्ह्यातील फार्मसी कॉलेजने मोहिम सुरू केली आहे. त्याअंतर्गतच शुक्रवारी स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. त्यात जिल्ह्यातील एकूण ४ हजार विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला.

नायपरद्वारे नाशिकमध्ये उच्चशिक्षणाची सोय उपलब्ध होण्यासह उत्तर महाराष्ट्रासह राज्यभरातील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नायपर ही संस्था नाशिकमध्येच स्थापन व्हावी, अशी आग्रही मागणी फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १८ फार्मसी कॉलेजमधील पावणे चार हजार विद्यार्थ्यांनी व जवळपास २५० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वाक्षरी मोहिम राबविली.

आज पोस्टकार्ड मोहीम

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनेही नायपरच्या मोहिमेस सहभाग घेतला आहे. यासाठीच मराठी नववर्ष दिनी शनिवारी (दि. २१) गुढीपाडव्याच्या दिवशी पोस्टकार्ड मोहीम राबविली जाणार आहे. नायपर नाशिकलाच द्यावे, अशी आग्रही मागणी करणारे पोस्टकार्ड राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले जाणार आहेत. शनिवारी सकाळी पंचवटी कारंजा येथे ही मोहीम घेतली जाणार असल्याची माहिती शहराध्यक्ष चिन्मय गाढे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॉडीगार्ड पोलिसाची बंदूक चोरीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

जिल्हा परिषदेचे सीईओ सुखदेव बनकर यांचे अंगरक्षक म्हणून काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे सरकारी पिस्टल चोरट्यांनी चोरी केले. यामुळे बॉडीगार्ड म्हणून काम पाहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांकडील शस्त्रांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर पुढील कारवाई करण्याचे संकेत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

आडगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहणारे शिवाजी आव्हाड यांची पोलिस मुख्यालयात नियुक्ती आहे. सध्या त्यांना सीईओ बनकर यांचे बॉडीगार्ड म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडे एक पिस्टल देण्यात आले होते. १८ ते १९ मार्चच्या दरम्यान आव्हाड काही कामानिमित्त बाहेर गेले असता त्यांनी आपल्याकडील सरकारी पिस्टल घरातच ठेवले. नेमकी याचवेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा फोडून घरातील ७३ हजार ३४१ रुपये किंमतीचे ९ एमएम अॅटो पिस्टल तसेच जीवंत काडतुसे, एक एलईडी टीव्ही असा मुद्देमाल चोरी केला. १९ मार्चच्या सकाळी घरी पोहचलेल्या आव्हाड यांना चोरीची कल्पना येताच त्यांनी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. दरम्यान, अंगरक्षक म्हणून दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. दोघांना मिळून एकच शस्त्र दिले जाते. १२ तासांची ड्युटी संपलेल्या कर्मचाऱ्याने आपल्याकडील शस्त्र दुसऱ्याला सुपुर्द करणे आवश्यक असते. किंवा, दोघा कर्मचाऱ्यांकडे दोन वेगवेगळी शस्त्रे दिली जातात. त्यामुळे बॉडीगार्ड आपल्याकडील शस्त्र घरी घेऊन जाऊ शकतो. या प्रकरणात देखील असेच घडले. पिस्टल चोरीला जाण्याच्या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता, संबंधित कर्मचाऱ्याकडे चौकशी केली जाईल. या चौकशीत काय निष्पण होते, त्यानुसार कारवाईची पुढील दिशा ठरवली जाईल, अशी माहिती पोलिस उपायुक्त निसार तांबोळी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ते पेरताहेत आशावाद !

$
0
0

जितेंद्र तरटे, नाशिक

नकारात्मक अनुभव झेलत समाजात आशावाद पेरणाऱ्यांची संख्या तशी अत्यल्पच. पण, प्रतिकूल प्रवाहाचा हा मारा झेलत समाजाने पूर्णत: नाकारलेल्या वारांगणांच्या वस्तीत दहा तरुणांचे वीस हात गेल्या दशकभरापासून शहरात अहोरात्र राबताहेत. या दुर्लक्षित समुहाची उमेद जागविण्यात सुमारे ७५ टक्के यशस्वी झाल्याचा दावा प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या तरूण 'टिम' ने व्यक्त केला. प्रतिकूलतेवर विजय मिळवित समाजात सत्कर्माची बीजे रूजविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांशी 'मटा' ने साधलेल्या संवादातून उलगडत गेली त्यांच्या कामातील आव्हाने...

प्रसंग १ :

आपल्या माणसांसाठी अन् आपल्या समाजासाठी सर्वच जगतात. मग उपेक्षितांसाठी कुणी जगावे ? या प्रश्नाचा विचार करताना, 'आपण का नाही ?' असा प्रश्न मनात आला अन् सामाजिक कार्यक्षेत्रात

वारांगणांच्या समुहासाठी रचनात्मक काम करण्याच्या उद्देशाने माझी पावले तिकडे वळाली. सोशल वर्किंगच्या माध्यमातून पहिल्यांदाच फिल्डवर गेलो. रेड लाईट परिसरातल्या एका माडीवरच्या नजरांना आमच्या ट्रस्टचे कार्य अगोदर देखावा वाटले...एकीने तर चक्क घरातून गरम पाणी आणून माझ्या अंगावर फेकले.

प्रसंग २ :

पहिल्याच दिवशी अनुभवाला आलेला गरम पाण्याचा प्रसंग कसाबसा विसरलो. माझ्या सामाजिक कार्याचा परिघ समजावून घेण्यासाठी काही कार्यकर्त्यांसह माझी पावलं दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या वस्तीकडे वळली. तर, या दिवशी कळसच झाला. आमच्यावर अक्षरश: झाडूने हल्ला झाला.

प्रसंग ३ :

एका प्रसंगात होणाऱ्या पत्नीचा फोन आला. तुम्ही आता कुठे आहात? या प्रश्नावर माझं उत्तर सरळ होतं... 'रेड लाइट वस्तीतल्या एका लग्नसोहळ्यात..!' त्या उत्तरान तिचं समाधान झालं. या फोनचा तपशील मला लग्नानंतर दोन वर्षांनी उलगडला. 'तुमचा होणारा जावई अमुक ठिकाणी असल्याचा तपशील एका परिचिताने सद्भावनेने सासऱ्यांना कळविला होता.' त्या संदर्भातून पत्नीने तिच्या नातेवाईकांच्या मनातील शंका घालविण्यासाठी माझ्याशी तेव्हा संवाद साधला होता. हे प्रातिनिधीक प्रसंग आहेत शहरातील रेड लाइट परिसरातील महिलांसाठी सामाजिक कार्याची उभारणी करणाऱ्या तरुणांच्या आयुष्यातले. आपल्या ध्येयापासून चार पावले मागे हटण्याची मानसिकता बनविणारे असे प्रसंग त्या तरुणाईच्या रोजच्या जगण्यातील भाग बनले आहेत.

प्रवरा मेडिकल ट्रस्टने सन २००५ च्या ऑगस्ट महिन्यात येथे पाऊल ठेवले अन् अवघ्या दशकभरात सेवाभावी वृत्तीने काम करणारे हे तरूण कार्यकर्ते या समुहासाठी आधारवड बनले आहेत. या ट्रस्टच्या माध्यमातून या महिलांसाठी एचआयव्ही तपासण्या, आरोग्य जागर, सामाजिक उपक्रम, वैद्यकीय सेवा आदी उपक्रम राबविले जातात. या चौकटीच्या पलीकडे जाऊन या महिलांचे अन् त्यांच्या मुलांच्या पुनर्वसनासाठी विविध योजनांची माहिती पुरविण्यासोबतच, आधार कार्ड, बँक अकाऊंटसारख्या कागद पत्रांविषयी सजगता, गुन्हेगारी विरोधात या महिलांचे संघटन येथपासून दर स्वच्छता अभियानासारख्या उपक्रमात या महिलांचा सहभाग नोंदविण्याच्या दृष्टीनेही विविध उपक्रमांवर भर दिला जात आहे. आपल्या वाट्याला आलेला कटू अनुभव अन् नकोसं जगणं इतर मुली अन् महिलांच्या वाट्याला येऊ नये, यासाठी उभं रहाण्याचं बळ प्रवरा ट्रस्टच्या टिमकडून मिळत असल्याचं या व्यवसायातून सामाजिक कार्याकडे वळलेल्या आशाताई (नाव बदलले आहे) सांगतात.

समाजाचा दृष्टिकोन 'जैसे थे' च

या कार्यात योगदान देताना समाजाचा दृष्टिकोन मात्र 'जैसे थे' च असल्याचा अनुभव हे कार्यकर्ते सांगतात. कार्यकर्त्यांकडेही भोवतालचा समाज संशयित नजरेने पाहतो. अशावेळी आमचे मनोबळ आम्हालाच वाढवून कार्यात झोकून द्यावे लागते, असेही प्रोजेक्ट मॅनेजर कुलदीप पवार सांगतात. 'समाजाच्या दुर्लक्षित घटकापर्यंत पोहचणारा तू च सक्षम दुंवा असल्याने तुझी या कामासाठी निवड झाली आहे', या विचारसरणीच्या टॉनीकवर आमची टीम पुन्हा पुन्हा उभी राहते, असेही तंत्र पवार यांनी 'मटा' शी बोलताना मांडले.

या टीममध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कुलदीप पवार यांच्यासह सुरेखा खैरनार, समाधान पगारे, उज्वला गोऱ्हे, संदीप अहिरे, संतोष माळे, संदीप मोरे, नाझिया शेख, अमोल जाधव, वाल्मिक बोरसे असे दहा तरूण कार्यकर्ते कार्यरत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धीरजने घेतला गोदा स्वच्छतेचा वसा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोदावरी स्वच्छ व निर्मळ व्हावी, याकरिता व्यवसायाने दातांचा डॉक्टर असलेल्या धीरज बच्छाव याने गोदावरी स्वच्छतेचा वसा घेतला आहे.‍ सुरुवातील एकट्याने सुरू केलेला प्रवास आता अनेक सवंगड्यांबरोबरचा झाला आहे. त्यामुळे गोदावरी स्वच्छता हे आंदोलन न होता एक चळवळ उभी राहिली आहे.

धीरजने वैद्यकीय शिक्षण घेताना अनेक उपक्रम राबवले. शिक्षणाचे महत्त्व पटवून 'युवकांच्या मनामनातील गप्पागोष्टी' या कार्यक्रमाची सुरुवात केली. आरोग्याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण उपक्रम राबवून जनजागृती केली. रक्तदान, डेंटल चेकअप, एड्स जनजागृती सारखे अनेक उपक्रम राबविले. 'स्वच्छ आणि निरोगी नाशिक' या प्रभावशाली उपक्रमाचीही सुरुवात केली. हे कार्य सुरू असताना त्याला पाण्याच्या समस्येतून आरोग्याची समस्या निर्माण होत असल्याचे प्रामुख्याने जाणवले. नाशिककरांचा पाण्याचा मूळ स्त्रोत असणारी गोदावरी नदीच स्वच्छ करण्याचा निर्णय त्याने घेतला. अनेक दिवस एकट्यानेच त्याने नदी स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. एक दिवस एका गावातील पात्र स्वच्छ करताना अनेकांचे हात त्याला लागले आणि बघता बघता काही वेळातच पाण्याचा स्त्रोत स्वच्छ झाला. तेव्हापासून गोदावरी स्वच्छ करायचीच अशा निश्चय करून त्याने कामाला सुरुवात केली. या उपक्रमातून ५० ते ६० मित्रमंडळी एकत्र आले आणि त्यांनी 'सनविवि फाउंडेशन'ची २६ जानेवारी २०११ रोजी स्थपना केली.

कुंभमेळ्याचे केंद्रस्थान असणारी तसेच नाशिक जिल्हाची जीवनदायिनी गोदावरी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. कुंभमेळ्यावेळी आलेल्या पर्यटकांना तसेच भाविकांना गोदावरीचे हे विद्रूप दर्शन घडू नये, तसेच कुंभमेळयावेळी प्रदूषित पाण्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी गोदावरी नदीची स्वच्छता होणे गरजेचे आहे. सनविवि फाऊंडेशन'मार्फत गोदावरी महासंवर्धन अभियान राबविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विरोधी पक्षनेतेपदी कविता कर्डक

$
0
0

शिवसेना न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेचे विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आल्याने सत्ताधारी शिवसेना आणि मनसे पुन्हा आमने सामने आले आहेत. महापौरांनी महासभेत शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांच्याकडून विरोधी पक्षनेतेपद काढून घेत, ते 'राष्ट्रवादी'च्या कविता कर्डक यांच्याकडे सोपविले. त्यामुळे महापालिकेच्या राजकारणाने वेगळी कलाटणी घेतली असून न्यायालयात जाण्यासाठी शिवसेनेला महापौरांच्या पत्राची प्रतीक्षा आहे. महापौरांचे पत्र मिळताच शिवसेना न्यायालयात धाव घेणार असल्याने विरोधी पक्षनेतेपद न्यायालयाच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

महापालिकेत बुधवारच्या महासभेत मनसेन ऐनवेळी चाल खेळत शिवसेनेचे विरोधी पक्षनेतेपद काढून घेतले. कोणतीही चर्चा नसतांना अचानक स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर बदलेल्या या समीकरणांमुळे सगळ्यानाच आश्चर्याचा धक्का बसला. मनसेच्या महापौरांनी गत वेळी 'राष्ट्रवादी'ऐवजी शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद दिले होते. मात्र, बुधवारी अचानक प्रकरण न्याय प्रविष्ठ असतांना 'राष्ट्रवादी'च्या कर्डक यांना विरोधी पक्षनेतेपद बहाल करण्यात आले.

सभापती निवडीच्या पार्श्वभूमिवर सत्ताधारी मनसेने शिवसेनेला शह देत 'राष्ट्रवादी'ला चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे या घटनेमुळे विरोधी शिवसेना दुखावली गेली आहे. या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय शिवसेनेन घेतला आहे. प्रकरण न्याय प्रविष्ठ असतांनाच अशा प्रकारचा निर्णय घेणे चुकीचे असून महापौरांचे पत्र मिळताच, त्याला उच्च न्यायालात आव्हान देण्यात येणार आहे. यासाठी शिवसेनेने तयारीही केली असून वकिलांशी सल्ला मसलत केली जात आहे. आव्हानासाठी महापौरांच्या पत्राची प्रतीक्षा सेनेला आहे. मात्र, महापौर आता स्थायीच्या निवडणुकीत गुंतल्याने पत्राची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. शिवसेना-मनसे एकमेकांना भिडणार

मनसेने दोन वर्ष बाकी असतांनाच शिवसेनेकडील विरोधी पक्षनेतेपद काढून घेतल्याने सेना चवताळली आहे. त्यामुळे यापुढे महापालिकेत आता शिवसेना आणि मनसे यांच्यात थेट संघर्ष रंगणार आहे. मनसेने भाजपलाही दुखावले आहे. त्यामुळे मनसेच्या विरोधात शिवसेना आणि भाजप एकत्र येणार आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना युतीकडून कडवे आव्हान मिळण्याची शक्यता वर्त‌वली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाल कांद्याचा भाव घसरला

$
0
0

प्रतवारी खराब होण्याच्या भीतीने वाढली आवक; शेतकऱ्यांकडून लिलाव बंद

किशोर वडनेरे, लासलगाव

लासलगाव, पिंपळगाव, येवला, निफाडसह जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये गुरुवारी लाल कांद्याच्या दरात जोरदार घसरण झाली. या भाव घसरणीचे तीव्र पडसाद निफाड उपबाजार आवारावर पहावयास मिळाले आहेत. गेल्या सप्ताहात पंधराशे रुपयांच्या आसपास असणारे लाल कांद्याचे दर गुरुवारी दोनशे ते अडीचशे रुपयांनी घसरल्याने निफाड उपबाजार आवारावर संतप्त शेतकऱ्यांनी लिलावाचे कामकाज बंद पडले होते.

व्यापारी बाजारभाव कमी पुकारत असल्याचा आरोप करत लासलगाव बाजार समितीच्या निफाड उपबाजार आवारावर कांदा उत्पादकांनी लिलावाचे कामकाज सुमारे तासभर रोखून धरले. त्यामुळे येथे एकच गोंधळ निर्माण झाला होता. अखेर लासलगाव बाजार समितीचे संचालक शिवाजी ढेपले यांनी संतप्त शेतकऱ्यांची समजूत काढल्याने तासाभराने लिलावाचे कामकाज सुरळीत झाले. एकीकडे अवकाळी पाऊस व गारपिटीचा सामना करत असतांना जो काही लाल कांदा हाताशी आला आहे तोही आता कमी भावाने विकावा लागत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र वाढ होताना दिसत आहे. उन्हाळ कांद्याच्या तुलनेत लाल कांद्याची टिकवण क्षमता कमी असल्याने व त्यातच अवकाळी

पाऊस व गारपिटीने कांद्याची प्रतवारी खराब होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात कांदा विक्री करणे भाग पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये शेतकरी कांदा विक्रीसाठी गर्दी करतांना दिसत आहे. सध्या सर्वच प्रमुख बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या अावकेची विक्रमी नोंद होत आहे. परिणामी आवक वाढल्याने मागणी कमी व पुरवठा अधिक होत असल्याने बाजार भावात घसरण होत आहे. दरम्यान निफाड उपबाजार आवारावर लाल कांद्याचे किमान बाजारभाव ३०० कमाल १ हजार १४१ तर सरासरी भाव ८०० रुपये राहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळीराजाचा उद्रेक!

$
0
0

अर्थसंकल्पाची होळी; निफाडला मोर्चा, सटाण्यात आंदोलन

टीम मटा

एकीकडे अवकाळी पाऊस व गारपिटीची आपत्ती, तर दुसऱ्या बाजूला मदतीबाबत शासनाची उदासिनता यामुळे घायकुतीला आलेला बळीराजा आक्रमक होऊ लागला आहे. अर्थसंकल्पातही आपत्तीग्रस्तांसाठी तरतूद नसल्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होत असून, त्यातूनच अर्थसंकल्पाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. तर कुठे रास्ता रोको, मोर्चा, आंदोलनेही होऊ लागली आहेत.

अर्थसंकल्पाची प्रतिकात्मक होळी निफाड तालुक्यातील वनसगाव येथे संतप्त शेतकऱ्यांनी केली. सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप करतानाच आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने अर्थसंकल्पात कोणताही मदतनिधी व पॅकेजचा समावेश न केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. तर, आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांचे पीककर्ज व वीज बिल माफ करा या मागणीसह शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निफाड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयासमोर आंदोलकांनी काही काळ ठिय्या आंदोलन केले. कांदा, डाळींब, कापूस या पिकांना उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळावा, मध्यम मुदतीचे कर्ज माफ करावे अशा मागण्यांचे निवेदन निफाडचे तहसीलदार डॉ. संदीप आहेर यांना देण्यात आले. सरकाच्या शेतीविषयक धोरणावर टीका करण्यात आली.

सटाणा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. आंदोलनानंतर शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात मोर्चा नेऊन तहसीलदारांना निवेदन दिले.

जेटलींकडून मदतीची ग्वाही

नवी दिल्ली : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे देशभरातील रब्बी पिके आणि फळबागायतींच्या झालेल्या नुकसानीचा कृषी खात्याची स्वतंत्र पथके प्रत्येक राज्यात जाऊन अंदाज घेतील आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी केंद्राकडून प्रशासकीय तसेच अन्य उपाययोजना केल्या जातील, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी राज्यसभेत केली. आपत्तीग्रस्त राज्यांचा कृषीमंत्री राधामोहन सिंह आणि त्यांचे दोन सहकारी दौरा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

पवारांच्याही सूचना

नवी दिल्ली : अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात द्राक्षे, संत्री आणि आंब्याचे अतोनात नुकसान झाले असून अनेक वर्षांमध्ये कृषी क्षेत्रावर कधी एवढे गंभीर संकट ओढवले नव्हते, असे माजी कृषीमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. कर्जवसुलीला स्थगिती, कृषी कर्जांवर व्याजमाफी, कृषी विम्याची तातडीने भरपाई यासारख्या उपायांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी केली. अवकाळी पावसामुळे चाऱ्याची टंचाईही उद्‍भवणार असून ती दूर करण्यासाठी सरकारने पावले उचलावी, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफाई कर्मचाऱ्यांना कायम तत्त्वावरच घ्या!

$
0
0

म. टा. प्र‌तिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त सफाई कामगारांची भरती कायम तत्वावरच करा. कंत्राटी कामगारांना कायम करण्यास प्राधान्य देऊन जिल्ह्यात ही भरती प्रक्रिया राबवावी, अशी सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य विजयकुमार यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे. सफाई कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून हीन वागणूक दिली जात असल्याचे तसेच, त्यांना हक्कांपासून वंचित ठेवले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर विजयकुमार यांनी महापालिकेसह अनेक विभागांच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. सूचनांवर कार्यवाही करून अहवाल सादर न केल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला. तीन तास चाललेल्या या बैठकीत विजयकुमार यांनी सूचनांचा पाऊस पाडला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारतचा नारा दिला असून, सफाई कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा तसेच, कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी विजयकुमार शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, पोलिस उपायुक्त निसार तांबोळी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव

बनकर, उपजिल्हाधिकारी नीलेश जाधव, माजी नगरसेवक प्रताप मेहरोलिया यासह समाज कल्याण, आरोग्य, शिक्षण अशा विविध विभागांचे अधिकारी, सफाई कर्मचारी आणि त्यांच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यात सफाई कर्मचाऱ्यांबाबत असलेली वास्तव परिस्थिती प्रामाणिकपणे मांडा अशी सूचना प्रारंभीच करण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांना गमबुट, मास्क, हॅन्ड ग्लोव्हज् व तत्सम सुरक्षेची साधने पुरवली जात असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, गेल्या दहा वर्षांत अशी साधनेच मिळत नसल्याची तक्रार बैठकीतच सफाई कामगारांनी केल्यानंतर विजयकुमार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. चुकीची माहिती देऊन आयोगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा कठोर कारवाई करावी लागेल असा इशारा दिला. कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळले जात असल्याप्रकरणी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, तसेच त्यांना कारागृहात पाठविले जाईल असा इशारा देण्यात आला. २०१३ पासून सफाई कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेने आरोग्य तपासणी मोहीमच राबवली नसल्याची गंभीर दखल घेण्यात आली. प्रत्येक तीन महिन्यांनी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करा. त्याची सुरुवात रविवारी (दि. २९) पासून व्हायलाच हवी अशी सूचना करण्यात आली.

शहरात हवे ३,७५० सफाई कर्मचारी

एक लाख लोकसंख्येमागे २५० सफाई कर्मचारी असावेत असा निकष आहे. नाशिक शहरात २० लाख लोकसंख्येमागे केवळ १९९६ सफाई कर्मचारी आहेत. सिंहस्थात नाशिकमध्ये सुमारे १ कोटी लोक येणार

आहेत. त्यामुळे उपलब्ध मनुष्य बळावर साफसफाईचा मोठा ताण येणार असल्याचे काही कार्यकर्त्यांनी विजयकुमार यांच्या निदर्शनास आणून दिले. सरकारच्या निकषानुसार २० लाख लोकसंख्येसाठी किमान

३ हजार ७५० सफाई कर्मचारी हवे. या व्यतीरिक्त कुंभमेळ्यातही मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. सिंहस्थात नाशिक शहरात साडेचार हजार, तर त्र्यंबकेश्वरसाठी ५०० सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे लोक कायम तत्वावर घेण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली.

हे स्वास्थ्य रक्षक

देशाच्या सीमांवर पहारा देऊन सैनिक जसे देशबांधवांचे रक्षण करतो तसे देशभर स्वच्छता ठेऊन सफाई कर्मचारी देशवासीयांच्या आरोग्याचे रक्षण करतात. म्हणूनच त्यांना स्वास्थरक्षक असे संबोधले जावे असा प्रस्ताव आपण राष्ट्रपती तसेच पंतप्रधान, सर्व मुख्यमंत्री यांना देणार आहोत अशी माहिती विजयकुमार यांनी दिली.

विजयकुमार यांनी केलेल्या सूचना

> आरोग्य तपासणी शिबिरात कर्मचाऱ्यांना मोफत औषधे द्या. कोठे किती कॅम्प घेतले याचा अहवाल सादर करा.

> सफाई कर्मचारी जेथे काम करतात त्या परिसरात महिला आणि पुरूष कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम तयार करा. तेथे स्वच्छ पाणी, साबण असावा. चेंजिंग रूम बनविण्यापूर्वी त्याचे मॉडेल आयोगाकडे पाठवा.

> सफाई कर्मचाऱ्यांच्या कॉलनीमध्ये सामाजिक सभागृह, शाळा, व्यायामशाळा, शिलाई सेंटर सुरू करा.

> आंबेडकर निवास योजनेंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांना शहराच्या मध्यवस्तीत घरे द्या.

> दरवर्षी १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला निवडक सफाई कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करा.

> दरमहा किंवा दर तीन महिन्यांनी त्यांच्याशी वार्तालाप करा.

> सफाईची कामे खासगीकरणाच्या माध्यमातून न करता कायम तत्वावर देण्यास प्राधान्य द्या.

> सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या शिक्षणानुसार पदोन्नती द्या. तसेच, त्यांच्या वारसांना सेवेत घेताना शिक्षणानुसारच पद द्या.

> सफाई कर्मचाऱ्यांना कंत्राटी पध्दतीने न राबविता सेवेत कायम करा. सफाईच्या कामांचा ठेका देतानाही वाल्मिकी, मेहतर आणि तत्सम समाजाच्या लोकांनाच तो प्राधान्याने दिला गेला पाहिजे.

> सफाई कर्मचाऱ्यांना महापालिकेने व्यवसायासाठी बाजारपेठांच्या मध्यवर्ती भागात गाळे देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे.

> सफाई कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टाचा अवमान: मंगळवारी सुनावणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

शासकीय आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांबाबत ११ नोव्हेंबर २०११ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या आदिवासी विकास विभागातील सर्व जबाबदार अधिकाऱ्यांवर आता न्यायालयाच्या अवमानाची टांगती तलवार आहे. न्यायालयाच्या आदेशावर कारवाई न केल्याने कोर्टाच्या अवमानाची कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत मुंबई उच्च न्यायालयाने दिले असून, येत्या २४ मार्चला त्यावर सुनावणी होणार आहे.

आदिवासी विकास विभागाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांसंदर्भात काढलेल्या ११ नोव्हेंबर २०११ च्या शासननिर्णयाची अंमलबजावणी नियमाप्रमाणे झालेली नाही. शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांबाबत निर्गमित शासननिर्णयाच्या अंमलबजावणीचे उल्लंघन झाले आहे. विद्यार्थ्यांना दरमहा निर्वाह भत्ता देणे अपेक्षित असताना त्याप्रमाणे अंमलबजावणी होत नसल्याचे शासनानेच केलेल्या प्रतिज्ञापत्राने स्पष्ट होत आहे. याचिकेमध्ये उपस्थित करण्यात आलेले विषय अत्यंत महत्वाचे असून, २८ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांचा थकीत निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांना देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ४ फेब्रुवारीला दिले होते.

मात्र, त्याची अंमलबजावणी न करता आदिवासी विकास विभागाने ११ मार्च रोजी झालेल्या सुनावणीवेळी अंमलबजावणीसाठी चार आठवड्यांचा अवधी मागितला होता. त्यास न्या. अभय ओक व न्या. ए. के. मेनन यांच्या खंडपीठाने स्पष्ट नकार देऊन राज्यातील आदिवासी वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांचा थकीत निर्वाह भत्ता २० मार्चपर्यंत देण्याचे व त्याबाबतचे शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले. तसेच, २० मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना थकीत रक्कम न मिळाल्यास शासकीय आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांबाबत असलेल्या ११ नोव्हेंबर च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या आदिवासी विकास विभागातील सर्व जबाबदार अधिकाऱ्यांवर कंटेम्प ऑफ कोर्ट अ‍ॅक्ट, १९७१ नुसार कोर्टाच्या अवमानाची कारवाई करण्यात येईल, असे आदेश दिले. या सुनावणीत अर्जदारांसाठी अॅड. सुगंध देशमुख यांनी तर सरकारसाठी अॅड. एम. पी. ठाकूर यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रांतांच्या वाहनचालकाला मारहाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

देवळा तालुक्यातील लोहणेर येथे प्रांताधिकारी संजय बागडे यांच्या वाहनचालकाला वाळूमाफियांनी जबर मारहाण करीत जखमी केले. या हल्लातून प्रांताधिकारी संजय बागडे थोडक्यात बचावले. वाळू ट्रॅक्टरच्या चाकाची हवा सोडण्यासाठी गेलेले बागडे यांचे वाहनचालक बाळासाहेब निरधर यांना वाळू तस्करांनी मारहाण केली. या प्रकरणी चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोहणेर येथे गिरणा नदीपात्रातून मागील काही दिवसांपासून वाळू तस्करी होत आहे. वाळू माफियांचा हैदोस वाढल्याने गेल्याच आठवड्यात संजय बागडे यांनी वाळू तस्करांवर कमरेच्या खाली गोळ्या घालण्याचे आदेश जारी केलेले आहेत. गुरुवारी रात्री गिरणा पात्रातून वाळूची तस्करी होत असल्याची माहिती बागडे यांना मिळाल्यानंतर ते वाहनचालक निरधर व शिपाई भाऊलाल सोनवणे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांना पाहून वाळू उपसा करणारे कामगार व ट्रॅक्टर चालकांनी पळ काढला. या वेळी निरधर व सोनवणे हे ट्रॅक्टरच्या चाकातील हवा सोडण्यासाठी गेले असता, दादा बस्ते व इतर चार-पाच जणांनी त्यांना बेदम मारहाण करून घटनास्थळावरून पळ काढला. सोनवणे यांनाही मारहाण करण्यात आली. निरधने यांच्या फिर्यादीवरून दादा बस्ते यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'नायपर'साठी स्वाक्षरी मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नॅशनल फार्मा एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (नायपर) ही संस्था नाशिकलाच यावी या आग्रही मागणीसाठी जिल्ह्यातील फार्मसी कॉलेजने मोहिम सुरू केली आहे. त्याअंतर्गतच शुक्रवारी स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. त्यात जिल्ह्यातील एकूण ४ हजार विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला.

नायपरद्वारे नाशिकमध्ये उच्चशिक्षणाची सोय उपलब्ध होण्यासह उत्तर महाराष्ट्रासह राज्यभरातील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नायपर ही संस्था नाशिकमध्येच स्थापन व्हावी, अशी आग्रही मागणी फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १८ फार्मसी कॉलेजमधील पावणे चार हजार विद्यार्थ्यांनी व जवळपास २५० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वाक्षरी मोहिम राबविली.

आज पोस्टकार्ड मोहीम

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनेही नायपरच्या मोहिमेस सहभाग घेतला आहे. यासाठीच मराठी नववर्ष दिनी शनिवारी (दि. २१) गुढीपाडव्याच्या दिवशी पोस्टकार्ड मोहीम राबविली जाणार आहे. नायपर नाशिकलाच द्यावे, अशी आग्रही मागणी करणारे पोस्टकार्ड राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले जाणार आहेत. शनिवारी सकाळी पंचवटी कारंजा येथे ही मोहीम घेतली जाणार असल्याची माहिती शहराध्यक्ष चिन्मय गाढे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॉडीगार्ड पोलिसाची बंदूक चोरीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

जिल्हा परिषदेचे सीईओ सुखदेव बनकर यांचे अंगरक्षक म्हणून काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे सरकारी पिस्टल चोरट्यांनी चोरी केले. यामुळे बॉडीगार्ड म्हणून काम पाहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांकडील शस्त्रांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर पुढील कारवाई करण्याचे संकेत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

आडगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहणारे शिवाजी आव्हाड यांची पोलिस मुख्यालयात नियुक्ती आहे. सध्या त्यांना सीईओ बनकर यांचे बॉडीगार्ड म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडे एक पिस्टल देण्यात आले होते. १८ ते १९ मार्चच्या दरम्यान आव्हाड काही कामानिमित्त बाहेर गेले असता त्यांनी आपल्याकडील सरकारी पिस्टल घरातच ठेवले. नेमकी याचवेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा फोडून घरातील ७३ हजार ३४१ रुपये किंमतीचे ९ एमएम अॅटो पिस्टल तसेच जीवंत काडतुसे, एक एलईडी टीव्ही असा मुद्देमाल चोरी केला. १९ मार्चच्या सकाळी घरी पोहचलेल्या आव्हाड यांना चोरीची कल्पना येताच त्यांनी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. दरम्यान, अंगरक्षक म्हणून दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. दोघांना मिळून एकच शस्त्र दिले जाते. १२ तासांची ड्युटी संपलेल्या कर्मचाऱ्याने आपल्याकडील शस्त्र दुसऱ्याला सुपुर्द करणे आवश्यक असते. किंवा, दोघा कर्मचाऱ्यांकडे दोन वेगवेगळी शस्त्रे दिली जातात. त्यामुळे बॉडीगार्ड आपल्याकडील शस्त्र घरी घेऊन जाऊ शकतो. या प्रकरणात देखील असेच घडले. पिस्टल चोरीला जाण्याच्या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता, संबंधित कर्मचाऱ्याकडे चौकशी केली जाईल. या चौकशीत काय निष्पण होते, त्यानुसार कारवाईची पुढील दिशा ठरवली जाईल, अशी माहिती पोलिस उपायुक्त निसार तांबोळी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ते पेरताहेत आशावाद !

$
0
0

जितेंद्र तरटे, नाशिक

नकारात्मक अनुभव झेलत समाजात आशावाद पेरणाऱ्यांची संख्या तशी अत्यल्पच. पण, प्रतिकूल प्रवाहाचा हा मारा झेलत समाजाने पूर्णत: नाकारलेल्या वारांगणांच्या वस्तीत दहा तरुणांचे वीस हात गेल्या दशकभरापासून शहरात अहोरात्र राबताहेत. या दुर्लक्षित समुहाची उमेद जागविण्यात सुमारे ७५ टक्के यशस्वी झाल्याचा दावा प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या तरूण 'टिम' ने व्यक्त केला. प्रतिकूलतेवर विजय मिळवित समाजात सत्कर्माची बीजे रूजविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांशी 'मटा' ने साधलेल्या संवादातून उलगडत गेली त्यांच्या कामातील आव्हाने...

प्रसंग १ :

आपल्या माणसांसाठी अन् आपल्या समाजासाठी सर्वच जगतात. मग उपेक्षितांसाठी कुणी जगावे ? या प्रश्नाचा विचार करताना, 'आपण का नाही ?' असा प्रश्न मनात आला अन् सामाजिक कार्यक्षेत्रात

वारांगणांच्या समुहासाठी रचनात्मक काम करण्याच्या उद्देशाने माझी पावले तिकडे वळाली. सोशल वर्किंगच्या माध्यमातून पहिल्यांदाच फिल्डवर गेलो. रेड लाईट परिसरातल्या एका माडीवरच्या नजरांना आमच्या ट्रस्टचे कार्य अगोदर देखावा वाटले...एकीने तर चक्क घरातून गरम पाणी आणून माझ्या अंगावर फेकले.

प्रसंग २ :

पहिल्याच दिवशी अनुभवाला आलेला गरम पाण्याचा प्रसंग कसाबसा विसरलो. माझ्या सामाजिक कार्याचा परिघ समजावून घेण्यासाठी काही कार्यकर्त्यांसह माझी पावलं दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या वस्तीकडे वळली. तर, या दिवशी कळसच झाला. आमच्यावर अक्षरश: झाडूने हल्ला झाला.

प्रसंग ३ :

एका प्रसंगात होणाऱ्या पत्नीचा फोन आला. तुम्ही आता कुठे आहात? या प्रश्नावर माझं उत्तर सरळ होतं... 'रेड लाइट वस्तीतल्या एका लग्नसोहळ्यात..!' त्या उत्तरान तिचं समाधान झालं. या फोनचा तपशील मला लग्नानंतर दोन वर्षांनी उलगडला. 'तुमचा होणारा जावई अमुक ठिकाणी असल्याचा तपशील एका परिचिताने सद्भावनेने सासऱ्यांना कळविला होता.' त्या संदर्भातून पत्नीने तिच्या नातेवाईकांच्या मनातील शंका घालविण्यासाठी माझ्याशी तेव्हा संवाद साधला होता. हे प्रातिनिधीक प्रसंग आहेत शहरातील रेड लाइट परिसरातील महिलांसाठी सामाजिक कार्याची उभारणी करणाऱ्या तरुणांच्या आयुष्यातले. आपल्या ध्येयापासून चार पावले मागे हटण्याची मानसिकता बनविणारे असे प्रसंग त्या तरुणाईच्या रोजच्या जगण्यातील भाग बनले आहेत.

प्रवरा मेडिकल ट्रस्टने सन २००५ च्या ऑगस्ट महिन्यात येथे पाऊल ठेवले अन् अवघ्या दशकभरात सेवाभावी वृत्तीने काम करणारे हे तरूण कार्यकर्ते या समुहासाठी आधारवड बनले आहेत. या ट्रस्टच्या माध्यमातून या महिलांसाठी एचआयव्ही तपासण्या, आरोग्य जागर, सामाजिक उपक्रम, वैद्यकीय सेवा आदी उपक्रम राबविले जातात. या चौकटीच्या पलीकडे जाऊन या महिलांचे अन् त्यांच्या मुलांच्या पुनर्वसनासाठी विविध योजनांची माहिती पुरविण्यासोबतच, आधार कार्ड, बँक अकाऊंटसारख्या कागद पत्रांविषयी सजगता, गुन्हेगारी विरोधात या महिलांचे संघटन येथपासून दर स्वच्छता अभियानासारख्या उपक्रमात या महिलांचा सहभाग नोंदविण्याच्या दृष्टीनेही विविध उपक्रमांवर भर दिला जात आहे. आपल्या वाट्याला आलेला कटू अनुभव अन् नकोसं जगणं इतर मुली अन् महिलांच्या वाट्याला येऊ नये, यासाठी उभं रहाण्याचं बळ प्रवरा ट्रस्टच्या टिमकडून मिळत असल्याचं या व्यवसायातून सामाजिक कार्याकडे वळलेल्या आशाताई (नाव बदलले आहे) सांगतात.

समाजाचा दृष्टिकोन 'जैसे थे' च

या कार्यात योगदान देताना समाजाचा दृष्टिकोन मात्र 'जैसे थे' च असल्याचा अनुभव हे कार्यकर्ते सांगतात. कार्यकर्त्यांकडेही भोवतालचा समाज संशयित नजरेने पाहतो. अशावेळी आमचे मनोबळ आम्हालाच वाढवून कार्यात झोकून द्यावे लागते, असेही प्रोजेक्ट मॅनेजर कुलदीप पवार सांगतात. 'समाजाच्या दुर्लक्षित घटकापर्यंत पोहचणारा तू च सक्षम दुंवा असल्याने तुझी या कामासाठी निवड झाली आहे', या विचारसरणीच्या टॉनीकवर आमची टीम पुन्हा पुन्हा उभी राहते, असेही तंत्र पवार यांनी 'मटा' शी बोलताना मांडले.

या टीममध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कुलदीप पवार यांच्यासह सुरेखा खैरनार, समाधान पगारे, उज्वला गोऱ्हे, संदीप अहिरे, संतोष माळे, संदीप मोरे, नाझिया शेख, अमोल जाधव, वाल्मिक बोरसे असे दहा तरूण कार्यकर्ते कार्यरत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धीरजने घेतला गोदा स्वच्छतेचा वसा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोदावरी स्वच्छ व निर्मळ व्हावी, याकरिता व्यवसायाने दातांचा डॉक्टर असलेल्या धीरज बच्छाव याने गोदावरी स्वच्छतेचा वसा घेतला आहे.‍ सुरुवातील एकट्याने सुरू केलेला प्रवास आता अनेक सवंगड्यांबरोबरचा झाला आहे. त्यामुळे गोदावरी स्वच्छता हे आंदोलन न होता एक चळवळ उभी राहिली आहे.

धीरजने वैद्यकीय शिक्षण घेताना अनेक उपक्रम राबवले. शिक्षणाचे महत्त्व पटवून 'युवकांच्या मनामनातील गप्पागोष्टी' या कार्यक्रमाची सुरुवात केली. आरोग्याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण उपक्रम राबवून जनजागृती केली. रक्तदान, डेंटल चेकअप, एड्स जनजागृती सारखे अनेक उपक्रम राबविले. 'स्वच्छ आणि निरोगी नाशिक' या प्रभावशाली उपक्रमाचीही सुरुवात केली. हे कार्य सुरू असताना त्याला पाण्याच्या समस्येतून आरोग्याची समस्या निर्माण होत असल्याचे प्रामुख्याने जाणवले. नाशिककरांचा पाण्याचा मूळ स्त्रोत असणारी गोदावरी नदीच स्वच्छ करण्याचा निर्णय त्याने घेतला. अनेक दिवस एकट्यानेच त्याने नदी स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. एक दिवस एका गावातील पात्र स्वच्छ करताना अनेकांचे हात त्याला लागले आणि बघता बघता काही वेळातच पाण्याचा स्त्रोत स्वच्छ झाला. तेव्हापासून गोदावरी स्वच्छ करायचीच अशा निश्चय करून त्याने कामाला सुरुवात केली. या उपक्रमातून ५० ते ६० मित्रमंडळी एकत्र आले आणि त्यांनी 'सनविवि फाउंडेशन'ची २६ जानेवारी २०११ रोजी स्थपना केली.

कुंभमेळ्याचे केंद्रस्थान असणारी तसेच नाशिक जिल्हाची जीवनदायिनी गोदावरी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. कुंभमेळ्यावेळी आलेल्या पर्यटकांना तसेच भाविकांना गोदावरीचे हे विद्रूप दर्शन घडू नये, तसेच कुंभमेळयावेळी प्रदूषित पाण्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी गोदावरी नदीची स्वच्छता होणे गरजेचे आहे. सनविवि फाऊंडेशन'मार्फत गोदावरी महासंवर्धन अभियान राबविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्सवातून सामाजिक एकतेचे दर्शन

$
0
0

आमदार योगेश घोलप यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

देवळालीत भगवान झुलेलाल यांचा जन्मदिवस हा सिंधी नववर्ष दिवस 'चेट्रीचंड' तर गुढीपाडवा हा हिंदू नववर्ष दिवस एकाच दिवशी साजरा करताना विविध जाती धर्माचे लोक एकत्र येतात. यामुळे सामाजिक एकतेचे दर्शन घडते, असे प्रतिपादन आमदार योगेश घोलप यांनी केले.

सिंधू सेवा मंडळाच्या वतीने जुन्या बसस्थानक येथे चेट्रीचंड निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. सुरुवातीला उपाध्यक्ष सचिन ठाकरे, बळवंत गोडसे, शीतलदास बालानी, मोहन चावला, हसानंद नेहलानी, योगेश वाधवा, बाबुराव मोजाड, प्रभावती धिवरे, कावेरी कासार, आशा गोडसे, सुरेश कदम, सतीश मेवानी, झुलेलाल जयंती अध्यक्ष अमित अहुजा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन करण्यात आले. प्रास्तविकात भगवानदास कटारिया यांनी सिंधू सेवा मंडळाच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमांविषयी माहिती दिली. कार्यक्रमास राजनशेठ बच्चूमल, नगरसेविका सविता दलवाणी, कन्हय्या केवलरामानी, केशव केवलानी, तानाजी करंजकर आदी मान्यवर उपस्थित होते. सिंधू सेवा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शहरातून भव्य मोटरसायकल रेलीचे आयोजन केले होते. सुधाकर गोडसे यांनी सूत्रसंचालन केले. हरिष चावला यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुढीपाडवा चैतन्याचा, नव्या उमेदीचा...

$
0
0

वातावरणात पसरलेला गारवा, प्रसन्न सकाळ, घराघरांवरील आनंदाची गुढी, शहराच्या विविध भागांतून निघालेल्या स्वागतयात्रा आणि सायंकाळपर्यंत रसिकांना लाभलेली सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी, असा गुढीपाडव्याचा चैतन्यमयी दिवस नाशिककरांनी शनिवारी अनुभवला. शहरातील अनेकभागात मराठी नववर्ष स्वागतासाठी भल्या सकाळी स्वागतयात्रा निघाल्या होत्या. चित्ररथ, पारंपरिक वेशभूषेतील महिला, लेझीम पथकांची सलामी, मानवी मनोरे, प्रबोधनपर बॅनर्स अशा दिमाखात निघालेल्या स्वागतयात्रांमुळे नाशिककरांच्या पाडवा पहाटेची सुरुवातच चैतन्याने झाली.

पाडव्याच्या संध्येला गुंजले गीतरामायणाचे स्वर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाडव्याच्या संध्येला गीतरामायणातील नवरसांचा बहरदार आविष्कार सादर करीत बागेश्री कलावृंदांनी श्रोत्यांना आनंदाची अनुभूती दिली. सुर, ताल अन् लय यांचा अचूक मेळ साधत प्रासाद‌ीक शब्दरचनेने यावेळी रसिकांवर मोहीनी घातली.

पाडव्याच्या निमित्ताने डिसूझा कॉलनीतील प्रौढ नागरिक मित्रमंडळाच्या हॉलमध्ये या भक्तीसंगीताच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हेमंत कुलकर्णी यांनी गायलेल्या 'आरंभी वंदीन अयोध्येचा राजा' या गीताने सुरेल मैफलीचा प्रारंभ झाला. यापाठोपाठ 'कौशल्येचा राम बाई..', 'उमटली रामाची पावले', 'रघुपती राघव गजरी गजरी', यासारखी आठवणीतील भावमधून गाणी गायिका प्रज्ञा डंके यांनी सुरेल आवाजात सादर करीत रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळविली. 'दशरथा घे हे पायस दान', 'नकोस नौके परत फिरू' या हेमंत कुलकर्णी यांनी सादर केलेल्या गीतांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. चारुदत्त दीक्षित यांची निर्मिती व संकल्पना होती. गोकूळ सिन्नरकर यांनी निवेदन केले.

या गीतांना तबल्यावर अभिजीत वैद्य तर संवाद‌निीवर चारुदत्त दीक्षित यांनी साथ संगत केली. 'गा बाळांनो श्री रामायण..' या भैरवीने मैफलीची सांगता झाली. मंडळाचे अध्यक्ष अनंत साळी यांच्या हस्ते कलावंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रकांत जामदार, विजया पंडित, प्रा. अनंत देशपांडे, वैशाली भागवत आदी यावेळी उपस्थित होते.

नववर्षाचे जल्लोषात स्वागत

गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्षानिमित्त शहरातील विविध भागांमधून काढण्यात आलेल्या स्वागत यात्रांच्या उत्साहाने शहरात चैतन्याची लहर उमटविली. पाडव्याच्या मंगलप्रभाती विविध प्रभागातून निघालेल्या स्वागतयात्रांमध्ये सहभागी चित्ररथ, ढोल अन् लेझीम पथके, जागोजागी घातलेले सडे, काढलेल्या रांगोळ्या अन् उमेद वाढविणाऱ्या घोषणांमुळे वातावरण उल्हासमय बनले होते.

शहरात मध्यवर्ती भागात गंगापूर रोड आणि पंचवटीतील नेहरूनगर परिसरातून स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले. नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे नेहरू चौकात शुक्रवारी सकाळी गुढीचे पूजन करण्यात आले. यावेळी महंत सुधीरदास पुजारी, प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वासंतीदीदी, सद्गुरू वेणाभारती, विवेकानंद केंद्राचे विश्वास लपालकर यांसह विविध मान्यवरांच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले. यंदाची स्वागतयात्रा ही 'हरितकुंभ संकल्प यात्रा' असल्याचे समितीचे अध्यक्ष अॅड. निलेश कुलकर्णी यांनी सांगितले.

नेहरू चौकतून सुरू झालेल्या या स्वागत यात्रेचे वंदे मातरम चौक, मेहेर सिग्नल, अशोक स्तंभ, रविवार कारंजा मेनरोड या मुख्य मार्गावरून संचालन करण्यात आले. यावेळी 'तालरूद्र' ढोलपथकाचा निनाद, प्रभू रामचंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, हरितकुंभाची संकल्पना मांडणारा चित्ररथ आणि पारंपरिक वेशभूषेत यात्रेत सहभागी नागरिक अशा उत्साही वातावरणात यात्रेची सांगता करण्यात आली. यात्रेच्या मार्गावर जागोजागी गुढ्या आणि तोरणे उभारण्यात आली होती. यात्रेच्या स्वागतासाठी फुलांच्या वर्षावाने रस्तेही सजविण्यात आले होते. सुमारे चार तास सुरू असलेल्या या स्वागत यात्रेची सांगता खांदवे गणपती मंदिराच्या जवळ करण्यात आली.

यावेळी विजय साने, सारंग भार्गवे, वैदेही नाशिककर, जयंत गायधनी, प्रफुल्ल नाशिककर, मिलींद भगूरकर, प्रशांत गर्गे, रामभाऊ बोंदार्डे, पप्पू टिळे, गणेश मोरे, उल्हास कुलकर्णी आदींनी सहभाग घेतला.

इंदिरानगरमध्येही उत्साह

जीवन विकास न्यासाच्या वतीने इंदिरा नगरसह शहरातील विविध २५ ठिकाणाहून स्वागतयात्रा काढण्यात आली. या यात्रांचे नियोजन न्यासच्या नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने करण्यात आले. स्वागत यात्रेला सामाजिक स्वरूप देण्याचा पायंडा न्यासने काही वर्षांपासून प्रयत्न केला आहे. यंदाही इंदिरानगर राजीवनगर परिसरात नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. सेलिब्रेटींच्या सहभागाने या मोहिमेत उत्साह संचारला होता. दरम्यान, यंदा पहिल्यांदाच या उपक्रमात महिलांच्या बाईक रॅलीचा समावेश करण्यात आला. यावेळी सिडको, इंदिरानगर, राजीवनगर या परिसरातून आयोजित स्वागत यात्रेत नाग‌रिकांनी पारंपरिक वेशभूषेसह सहभाग घेतला. यात्रेच्या स्वागतासाठी जागोजागी रांगोळ्या काढून रस्ते सुशोभित करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदारयादीला मिळणार ‘आधार’

$
0
0

मतदारांना चुका दुरुस्त करण्याची मिळणार संधी

म. टा. प्र‌तिनिधी, नाशिक

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राष्ट्रीय मतदारयाद्या शुद्धीकरण आणि प्रमाणिकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. ३१ जुलैपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार असून, मतदारांनी आधार कार्डविषयी मा‌हिती द्यावी तसेच, दुबार नावे असलेल्या मतदारांनी आपली नावे स्वत:हून कमी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तसेच जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे. मतदारांना आधारकार्डची माहिती द्यावी लागणार आहे, यामुळे मतदारयादीतील चुका कमी होण्यास 'आधार' मिळणार आहे.

मतदार छायाचित्र ओळखपत्राच्या डेटाबेसशी प्रत्येक मतदाराचा आधारक्रमांक जोडण्याचे निवडणूक आयोगाने ठरविले आहे. दुबार नावे असलेल्या मतदारांनी आपली नावे स्वत:हून कमी करावीत यासाठी नमुना ७ मध्ये अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. मतदारांच्या तपशिलामध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना ८ अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र तपशील बदलताना त्यासोबत पुराव्याची कागदपत्रेही मतदारांना सादर करावी लागणार आहेत. अशा सर्व अर्जांवर मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी १५ दिवसांमध्ये निर्णय घ्यावा, असे आदेश देण्यात आले आहेत. आवश्यकता असल्यास मतदारांच्या छायाचित्रातही विहीत पद्धतीने सुधारणा करण्यात येणार आहे.

मतदारांना मतदानाचा दिवस, पुनरीक्षण कार्यक्रम, वगळणी किंवा दुरुस्ती संदर्भातील नोटीस आदींची माहिती सहजगत्या उपलब्ध करून देता यावी यासाठी मतदारांचे मोबाइल क्रमांक, ई-मेलची माहिती देखील मतदारांकडून संकलीत केली जात आहे. ही माहिती देखील डेटाबेसमध्ये भरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

आधार क्रमांक, मतदार छायाचित्र ओळखपत्राच्या डेटाबेसमध्ये भरण्यासाठी विविध कार्यपद्धतींचा उपयोग करता येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या http://eci.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टलवर आधारक्रमांक व इतर माहिती भरता येणार आहे. १६६/५१९६९ या क्रमांकावर ECILINK स्पेस एपिक क्रमांक स्पेस आधार क्रमांक याप्रमाणे एसएमएस करून किंवा ई-मेल, निवडणूक आयोग तयार करीत असलेले मोबाइल अॅप आणि १९५० या क्रमांकावर कॉल करून देखील डेटाबेस भरता येणार आहे. प्रपत्र 'अ' मध्ये माहिती भरून ती आधार क्रमांक आणि मतदार छायाचित्र ओळखपत्राच्या फोटो कॉपीसह सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील मतदार मदत केंद्रात जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनाही मतदारांच्या घरोघरी जाऊन आधारक्रमांक तत्सम कागदपत्रे गोळा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तहसील कार्यालय किंवा विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयातील मतदार मदत केंद्रातही मतदार नोंदणी अधिकारी ही कागदपत्रे स्वीकारली जाणार आहेत.

मतदारयादीत दुबार नावे हा गुन्हा

मतदारांनी खोट्या घोषणापत्राद्वारे मतदार यादीत एकापेक्षा अधिक ठिकाणी नावे ठेवणे हा लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० च्या कलम ३१ नुसार गुन्हा आहे. ज्या मतदारांची नावे एका मतदारसंघात किंवा एकापेक्षा जास्त मतदारसंघात आहेत, अशा मतदारांनी आपली दुबार नावे कमी करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर स्वेच्छेने फॉर्म क्रमांक ७ ऑनलाइन भरावा किंवा विधानसभा मतदारसंघाच्या संबंधित मतदार मदत केंद्रावर आवश्यक कागदपत्रांसह समक्ष द्यावा. एका विधानसभा मतदारसंघात दुबार नावे असलेल्या मतदारांची माहिती विधानसभा मतदारसंघ कार्यालय किंवा तहसील कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच विधानसभानिहाय मतदार याद्या http://nashik.nic.in या संकेतस्थळावर टाकण्यात येत आहेत. १२ एप्रिल रोजी सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत विधानसभा मतदारसंघाच्या पदनिर्देशित ठिकाणी व मतदार मदत केंद्रावर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यावेळी ओळखपत्रासाठी आवश्यक फॉर्म, फॉर्म क्र.६ आणि मतदार तपशील दुरुस्‍तीसाठी फॉर्म क्र. ८ तसेच नाव स्थलांतरीत करण्यासाठी फॉर्म क्र. ८ अ स्वीकारले जाणार आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार १२ एप्रिल, १७ मे, २१ जून आणि १२ जुलै २०१५ रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live

Latest Images