Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बसस्टॉपचे आरोग्य सांभाळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

बस स्टॉपच्या नूतनीकरणासह नव्या बस देण्याचे धोरण अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पा दरम्यान जाहीर केले. या घोषणेचे प्रवाशी वर्गाने स्वागत केले असले तरी अस्वच्छता, बस स्थानकाची दुरवस्था यावर महामंडळाने तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जाते आहे.

यावेळेस पहिल्यांदाच एसटी महामंडळाला राज्याच्या अर्थसंकल्पात वेगळे स्थान मिळाले. राज्यातील प्रमुख शहरामधील बस स्थानकाची स्थिती चांगली करून नवीन बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला. या निर्णयाचे स्वागत प्रवाशांनी केले. सध्या कुंभमेळ्यानिमित्त सर्वच बस स्थानकावर कामे सुरू आहेत. नवीन बस स्थानकाची निर्मिती होणार आहे. मात्र, आहे त्या बस स्थानकातील अस्वच्छता, स्वच्छतागृहांची दूरावस्था, बसेसच्या वेळा या मूलभूत प्रश्नांकडे सरकारने गंभीरतेने पाहण्याची मागणी प्रवाशांनी केली. शहरात तुलनेत चांगले चित्र आहे. ग्रामीण भागातील बस स्थानक तर असून अडचण नसून खोळंबा या प्रकरात मोडतात. सायंकाळी सात वाजेनंतर बस स्थानकात प्रवाशी जात नाही, अशा तक्रारी यानिमित्ताने प्रवाशांनी मांडल्यात.

बसस्थानकांचे कॉर्पोरेट लूक सगळ्यांना आवडेल. मात्र, सार्वजनिक ठिकाण म्हणून चांगल्या वास्तू खराब केल्या जातात. याकडे सरकारने लक्ष पुरवणे आवश्यक आहे. तसेच बसस्थानकांना चांगले स्वरूप देताना यात प्रवाशी हा केंद्रबिंदू मानला पाहिजे.- वनिता शिंदे, प्रवासी

ग्रामीण भागातील बसस्थानकांकडे सरकारने लक्ष पुरवले पाहिजे. शहरा शेजारील खेड्यापर्यंत सीटी बसेस पोहचत नाही. त्यांची संख्या वाढली पाहिजे.- पद्माकर सुरळकर, प्रवासी

बसस्थानकावरील गर्दी सर्वांत महत्त्वाची डोकेदुखी ठरते. कॉलेजच्या वेळेत तर गर्दीचा उच्चांक असतो. सुस्थितीतील बसेसची संख्या वाढवावी. स्वच्छतेचा भागही महत्त्वाचा आहे.- अमोल शिंदे, प्रवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हेमंत करकरेंच्या खुनामागे ब्राह्मणवादी

0
0

बी. जी. कोळसे पाटील यांचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबई येथे '२६-११' रोजी झालेला दहशतवादी हल्ल्यात करकरेंचा मृत्यू अतिरेक्यांमुळे नव्हे तर ब्राह्मणवाद्यांमुळे झाला आहे. या विषयाला गोविंदराव पानसरेंनी हात घातला त्यामुळेच त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी केला.

रावसाहेब थोरात सभागृहात डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृती प्रित्यर्थ छात्रभारतीतर्फे आयोजित केलेल्या विवेक व्याख्यानमालेत १५ वे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. 'शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्राची विघटनाकडे वाटचाल' हा शुक्रवारी झालेल्या व्याख्यानाचा विषय होता. यावेळी जिल्ह्याभरातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाटील म्हणाले, की मुंबईतील हल्ल्याची व मालेगावच्या बॉबस्फोटाची माहिती सरकारला आधीपासूनच होती. त्याकडे हेतूपुरस्सर सरकारने लक्ष दिले नाही. मुठभर हिदुत्ववाद्यांनी नेहमीच हिंसाचाराला खतपाणी घातले आहे. 'आरएसएस'सारखी संघटना छुप्या पध्दतीने देशात अराजकता माजवत असून या संघटनेची स्थापना ब्रिटीशांना मदत करण्यासाठी झाली होती. त्यांना स्वातंत्र्य नको होते. मालेगाव बॉबस्फोटातही सापडलेल्या तीन लॅपटॉपची चौकशी व्हायला हवी व त्यात असलेली माहिती जनतेसमोर यायला हवी, असे पाटील यांनी सांगितले.

यावेळी छात्रभारतीचे राज्य अध्यक्ष जयभिम शिंदे, राकेश पवार, सचिन मालेगावकर, राजू देसले, मिलींद वाघ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छात्रभारतीच्या गीतांनी झाली.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजमेरी मशिदचा आज इफ्तेताह

0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

नाईकवाडीपुरातील अजमेरी मशिदीचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या मशिदीचे सोमवारी (दि. २३) इफ्तेताह होत असून या निमित्त प्रमुख मुस्लिम धर्मगुरूंच्या उपस्थितीत धार्मिक सुन्नी इज्तेमा व मेहफिलचे आयोजन करण्यात आले आहे.

सुन्नी दावत-इस्लामीचे प्रमुख अमिर कारी व हाफीज हजरत अल्लामा मुहम्मद शाकीरअली नूरी, हजरत मौलाना मुहम्मद सय्यद अमिनुल कादरी, कारी रियाजोद्दीन अशरफी बरकाती या प्रमुख मुस्लिम धर्मगुरुंचे धार्मिक प्रवचन होतील. तसेच सायंकाळी मगरीबचे नमाज पठणानंतर रात्री दहा वाजेपर्यंत अजमेरी चौक, नाईकवाडीपुरा, जुने नाशिक येथे विविध धार्मिक कार्यक्रम होतील. सुन्नी मुस्लिम बांधवांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य वक्फ बोर्ड पोरके

0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

राज्य वक्फ बोर्डाचे सीईओ बदली प्रकरण गाजत असतानाच तब्बल सात वर्षांपासून वक्फ बोर्डाला अध्यक्षपद रिक्त आहे. वक्फ बोर्डाला अध्यक्ष मिळावे यासाठी राज्य सरकारकडून शासन नियुक्त सदस्यांची नियुक्ती लवकरात व्हावी यासाठी सरकारविरूध्द उच्च न्यायालयात दाखल झालेली अवमान याचिकेवर सुनावणीसाठी आता पुढील सुनावणी २ मे रोजी होणार आहे. तारीख पे तारीख या फेऱ्यात अडकलेल्या सुनावणीमुळे वक्फ बोर्डाला अध्यक्षही लवकर मिळण्याची चिन्हे धूसर होत आहेत.

भूमाफियांसह वक्फ बोर्डातील काही विश्वस्तांच्या जाचाला वैतागून सीईओ सय्यद एजाज हुसेन यांनी विनंती बदलीसाठी अर्ज केला आहे. या अर्जावर राज्य सरकारकडून अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही. मात्र, हुसेन बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्व प्रकरणात वक्फ बोर्डाचे सर्व कामे थंडावली आहेत. याचाच फायदा घेत भूमाफिया वक्फ बोर्डाच्या कोट्यावधी रुपयांचे बाजारमूल्य असलेल्या जमिनी हडप करण्यात सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. अनेक जमिनींवर अतिक्रमणे करून ती बळकावली जात असल्याची तक्रार वक्फ बोर्डाच्या सदस्यांकडूनच केली जात आहे. मात्र, त्यांच्या तक्रारींची दखल घेणार तरी कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी वक्फ बोर्डाकडे ना अध्यक्ष ना सीईओ.

वक्फ बोर्डाचे विद्यमान सीईओ हुसेन हे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असून डेप्युटेशनवर त्यांची सीईओ या पदावर वक्फ बोर्डात बदली करण्यात आली. मात्र, आपल्या प्रामाणिक व पारदर्शक कार्यशैलीमुळे त्यांनी वक्फच्या जमिनी बळकावणाऱ्या भूमाफियांविरूद्ध खुली मोहीम उघडली. काही वक्फ बोर्ड सदस्यांसह भूमाफियांकडून त्यांचा छळ सुरू झाल्याने या छळाला कंटाळून सीईओ यांनी सरकारकडे वक्फ बोडाऱ्तून आपली बदली व्हावी असा अर्ज दिला.

न्यायालयीनच्या नियमाप्रमाणे एकदा बदलीसाठी दिलेले अर्जावर निर्णय होत नाही तोपर्यंत कार्यरत असलेल्या ठिकाणी कोणतेच निर्णय, सुनावणी व निकाल देता येत नाही. त्यामुळे सीईओ हुसेन यांनी या प्रचलित नियमांना धरून वक्फ बोर्डात विविध प्रकरणे संदर्भात सुरू असलेल्या सुनावणी तहकूब करून दिल्या आहेत.



अनेक कामे थंड बस्त्यात

सुनावणी पूर्ण झालेल्या अनेक प्रकरणाचे निकालही स्थिगत केल्याने वक्फ बोर्डाचे सुनावणी व निकालाचे सर्व कामे थंड बसत्यात पडली आहेत. राज्य सरकाने सीईओंच्या बदली अर्जावर कोणतेच निर्णय न घेतल्याने व त्यांना वक्फ बोर्डातून पदमुक्तही करण्यात येत नसल्याने वक्फ बोर्ड 'न घरका न घाटका' असा अवस्थेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चक्रव्यूहात अडकले प्राचार्य

0
0

>>प्राचार्य डॉ. हरिष आडके

शैक्षणिक वर्ष २०१४-१५ पूर्ण होत आहे. या वर्षाचे सिंहवलोकन केले असता शासन, विद्यापीठ, नॅक, व्यवस्थापन, प्राध्यापक, पालक, शिक्षक, विविध एजंसी व इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान यांच्या चक्रव्यूहात प्राचार्य अडकल्याची जाणीव प्रकर्षाने होताना दिसते.

शासनामार्फत अनुसुचित जाती जमाती भटक्या जाती आणि इतर मागासवर्गांच्या विद्यार्थांना १९०० कोटीची शिष्यवृत्ती दिली जाते. त्यामुळे अर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोयीचे होते. त्याच प्रमाणे विना अनुदान तत्त्वावरील महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक यांचे वेतनही त्यातून मिळणाऱ्या शिक्षण शुल्कातून भागविले जाते; परंतु चालु वर्षापासून शासनाने ही प्रक्रीया एका एजंसीद्वारे ३५८ तालुक्यांमध्ये ऑनलाइन राबविण्यास सुरुवात केली. ग्रामीण भागात ऑनलाइनच्या सुविधा फारशा उपलब्ध नसल्याने तसेच अवकाळी पाऊस, गारपीट यासारखी नैसर्गीक आपत्ती आल्याने बरेच विद्यार्थी शिष्यवृत्तीचे फॉर्म भरु शकले नाहीत. त्यातच शिष्यवृत्तीतील घोटाळ्यामुळे बऱ्याच महाविद्यालयांना शिष्यवृत्तीतून मिळणारे शिक्षण शुल्क मिळाले नाही. त्यामुळे महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाच्या सल्ल्याप्रमाणे करावा लागणारा शैक्षणिक विकास विनाअनुदानीत तत्त्वावरील कर्मचाऱ्यांचे वेतन, विद्यार्थ्यांची गैरसोय याबाबत प्राचार्यांवर त्यांची मोठी आणि शसनाची चुक नसतानाही केवळ एजंन्सीच्या अनियोजनाच्या कारभारामुळे रोष पत्करण्याची वेळ आली. तसेच एकाच महाविद्यालयात अनुदानीत आणि विनाअनुदानीत अभ्यासक्रम शिकवले जात असल्याने अनुदानीत शिक्षक, विना अनुदानीत शिक्षक, फिक्स पे शिक्षक, पार्ट टाइम शिक्षक अशा धोरणांमुळे पूर्वीसारखे चारवर्ण एकाच कॉमनरुममध्ये पहावयास मिळतात. त्यांचा अप्रत्यक्ष परिणाम प्राचार्यांच्या कार्यपध्दतीवर होतो. त्यामुळे शासनाने अनुसूचित जमातीप्रमाणे इतर प्रवर्गाच्या शिष्यवृत्तीपोटी ८० टक्के रक्कम महाविद्यालयात अघाऊ द्यावी.

सध्या वेतनेतर अनुदान मिळत असल्यामुळे या शिक्षण शुल्कावरच महाविद्यालयांना अवलंबून रहावे लागत आहे. नुकत्याच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार ४ फेब्रुवारी २००० नंतर सेवेत रुजू झालेल्या प्राध्यापकाला नेट सेट ऐवजी पीएचडीची सवलत देण्याचा अधिकार विद्यापीठ अनुदान आयोगाला नाही तर आयोगाने वर्षातून दोन नेट सेटच्या परीक्षा घेण्याची जबाबदारी एजंसी म्हणून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शक विद्यापीठ म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला दिली आहे. परंतु १ डिसेंबर २०१३ पासून अशी परीक्षा न झाल्याने हजारो युवकांना नैराशेचा सामना करावा लागत आहे. तर २१ सप्टेंबर १९९१ नंतर सेवेत आलेल्या प्राध्यापकांना नेटसेट याबाबतचा निकाल २५ मार्च २०१५ ला लागत असल्यामुळे गोंधळात आणखी भर पडत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या धर्तीवर नेटसेट परिक्षेचे वेळापत्रक एक वर्ष अगोदर जाहीर करावे, शिवाय परिक्षा शुल्क कमी करुन एकाच दिवसात तीन पेपर घेण्याऐवजी दोन दिवसात परीक्षा घ्यावी म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षा घेणे सोयीचे होईल. मागील सरकारने युवकांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण व्हावी, या हेतूने जागर जाणीवांचा उपक्रम सुरू केला होता. त्यानुसार ग्रामीण व शहरी भागातील महाविद्यालये, विद्यापीठे यांना १ लाख व ५० हजार असे पुरस्कार देणे सुरू केले होते. या वर्षी हा उपक्रम राबविला गेला नाही. तर पु:र्नपडताळणी, संच मान्यता तसेच त्यांना प्रती विद्यार्थी रुपये चार हजार देऊन हा अभ्यासक्रम पूर्ण करावा, अशा निर्णयामुळे गोंधळात भर पडते आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती बरी नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे पालकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे परीक्षा फी माफ करून मागील वर्षाप्रमाणे विद्यापीठाने ती परत करावी यासाठी विविध संघटना जोर धरू लागल्या आहेत. क्लस्टर योजनेला उशिरा अनुदान मंजूर झाल्यामुळे तसेच मार्च अखेरच्या आत हिशोब सादर करावे लागतात. यामुळे या योजनेपासून अनेक विद्यार्थ्यांना दूर राहावे लागत आहे. तर प्राध्यापकांच्या करीअर अॅडव्हान्समेंट स्कीम अंतर्गत वेतन निश्चितीला विलंब झाल्यामुळे प्राध्यापक वारंवार विचारणा करीत असतात. त्याचबरोबर नवीन इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाची ग्रामीण भागात अंमलबजावणी करण्यात वीज संकटामुळे येणारी अडचण याचा प्रभाव अध्यापन, परीक्षापध्दती, नॅक समितीच्या अपेक्षा पूर्ण करण्यावर पडत आहे.

अशाप्रकारे शिक्षण शुल्क न मिळाल्यामुळे व्यवस्थापन प्राचार्यांवर नाखुश, प्राध्यापक नाराज, विद्यार्थ्यांची वरील समस्यांमुळे होणारी हेळसांड, शासन, विद्यापीठांचे आदेश पाळण्याची जबाबदारी व नॅकचे मूल्यमापन अशा परिस्थितीत प्राचार्यांना discuss, sebate, dicision यावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यांची अवस्था महाभारतातील चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूसारखी झाली आहे. ज्याप्रमाणे सर्कशीचा तंबू पाया न खोदलेल्या खांबावर उभा असतो. त्याप्रमाणे प्राचार्य सर्वांना बरोबर घेऊन कधी खुशीने तर कधी नाराजीने महाविद्यालयाचा गाडा पुढे रेटत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदा प्रदषूणप्रश्नी लोकसभेत आवाज

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीसह जिल्ह्यातील अन्य धार्मिक स्थळांची साफसफाई करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी लोकसभेत केली.

गोडसे यांनी गोदावरी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. दक्षिणेतील गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि भारतातील दुसरी सर्वात मोठी नदी असलेल्या गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वेर येथे होतो. ही नदी सुमारे १,४६५ किलोमीटरचा प्रवास करून आंध्र प्रदेशातील बंगालच्या खाडीत जाऊन मिळते. नाशिकपासून पुढे गोदावरीत औद्योगिक कचरा, सांडपाणी, विषारी रसायने मिसळत असल्याने प्रदूषण वाढत असल्याचा मुद्दा खासदार गोडसे यांनी मांडला. नाशिकमध्येही नदी प्रदूषित झाल्याने अस्थी विसर्जनास येणाऱ्यांना त्रास होतो. येत्या जुलैपासून सिंहस्थ कुंभमेळा सुरू होत आहे. त्याला एक कोटी भाविक हजेरी लावणार आहेत. पर्वणी काळात स्नानासाठी आलेले भाविक गोदावरीचे तीर्थ प्राशन करतात. हे पाणी आरोग्यास अत्यंक घातक आहे. त्यामुळे गोदावरी नदीसह सर्व धार्मिक स्थळांची साफसफाई करण्याचे निर्देश पर्यावरण व जलसंधारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी संबंधित यंत्रणेला द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात चेन स्नॅचिंग सुरूच

0
0

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

शहरातील भद्रकाली आणि उपनगर परिसतील दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी ओरबडून नेण्याच्या घटना घडल्या. यामध्ये चोरट्यांनी एकूण तीन तोळ्यापेक्षा अधिक सोने लंपास केले.

चेन स्नॅचिंगची पहिली घटना भाभानगर परिसरातील नवशक्तीनगर येथील गणपती मंदिराजवळ घडली. शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याचे मंगळसूत्र पल्सरवर आलेल्या चोरट्यांनी तोडून पोबारा केला. यानंतर, नाशिकरोड परिसरातील जगताप मळारोडवरील स्वामी समर्थ मंदिराजवळून पायी जाणाऱ्या आणखी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र याच वेळेदरम्यान चोरट्यांनी तोडले. चेन स्नॅचिंगच्या घटना शहरात अधुनमधून होत असून पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

शाळेत कम्प्युटरची चोरी

सातपूर येथील प्रगती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील कम्प्युटर चोरट्यांनी चोरी केले. चोरीची घटना १८ मार्च रोजी रात्रीच्या वेळी झाली. चोरट्यांनी शाळेचे ऑफीस फोडून आतील कम्प्युटर, स्कॅनर व पेनड्राईव्ह पळवला. १९ मार्च रोजी सकाळी चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर शाळा प्रशासनाने सर्व ऑडीट करून सातपूर पोलिसांकडे तक्रार दिली.

गांजा जप्त

मध्यवर्ती कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तात्पुरत्या स्वरूपात बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेल्या होमगार्डकडे २४ पिशव्यात ठेवलेला गांजा पकडण्यात आला. शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास संशयित आरोपीची ड्युटी सुरू झाली. जेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची तपासणी केली जाते. तशी या तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती केलेल्या होमगार्डचीही तपासणी करण्यात आली. तेव्हा गुडघ्याजवळ लावलेल्या निकॅपमध्ये २४ प्लास्टीक पिशव्यांमध्ये ठेवलेला गांजा आढळून आला. यानंतर अंगझडती घेणाऱ्या कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठांशी चर्चा करून नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी एनडीपीएस अॅक्टमधील कलम २७ नुसार संबंधितावर गुन्हा दाखल केला आहे.

तरुणाची आत्महत्या

घारपुरे घाट परिसरातील गोदावरी नगर येथे राहणाऱ्या जितेंद्र राजघर कोबटी (वय ३२) या तरुणाने ऐन गुडीपाडव्याच्या दिवशी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. संध्याकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास ही घटना समोर आल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली. घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक परदेशी करीत आहेत.

मजूर ठार

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून शालिग्राम उर्फ अम्रपाल दगडू सुरखुंडे हा मजूर जागीच ठार झाला. इंदिरनगर परिसरातील पद्मा अपार्टमेंटमध्ये राहणारे सुरखुंडे शनिवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास साईचरण या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर काम करीत होते. जखमी सुरखुंडेना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली असून पुढील तपास हवालदार कोटमे करीत आहेत.

दुचाकी जाळली

भद्रकाली पोलिस स्टेशन हद्दीतील ठाकरे गल्ली येथील पिंपळचौक परिसरात पार्क केलेली दुचाकी (एमएच १५, एटी ९७१०) समाजकंटकांनी जाळली. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली. इमरान खान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. जाळपोळीच्या घटनेमागे वैयक्तिक भांडण आहे की अन्य कारण याचा पोलिस तपास करीत आहेत.

युवतीवर बलात्कार

प्रेमसंबंधात लग्नाचे अमिष दाखवून युवतीवर बलात्कार करणाऱ्या युवकाविरोधात गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गंगापूररोडवरील डिसुझा कॉलनी येथे २००९ ते २०१४ या कालावधीत ही घटना घडली. संशयित आरोपी फिर्यादी तरुणीच्या घरी येत असे. याच दरम्यान संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी अनैतिक संबंध ठेवले होते.

मोटरसायकलस्वार ठार

भरधाव कारने मागून धडक दिल्याने मोटरसायकल चालक ठार झाला तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला. जत्रा हॉटेल ते नांदुर नाका मार्गावर महालक्ष्मी हॉटेलजवळ शनिवारी रात्री हा अपघात झाला. शांताराम शंकर उजे (४५) असे मृत्यू झालेल्या मोटरसायकल चालकाचे नाव आहे. लक्ष्मण काशिनाथ पसाळे हे गंभीर जखमी झाले आहेत. ते दोघे मोटरसायकलवरून नांदुर नाक्याकडे चालले होते. त्यावेळी मागून भरधाव आलेल्या

स्कोडा कारने मोटरसायकलला धडक दिली. गंभीर जखमी झाल्याने उजे यांचा मृत्यू झाला. तर पसाळे जखमी झाले.

झाडे तोडल्याने गुन्हा

समर्थनगर परिसरातील त्रिमूर्ती कॉलनीतील नारळ्याच्या झाडांच्या बुंध्याचा आकार कमी करणाऱ्या चंद्रकांत सोनी यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षा विद्यार्थ्यांची; धावपळ पालकांची

0
0

लाखभर विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेला हजेरी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळांच्या शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेसाठी रविवारी विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी धावपळ दिसून आली. खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर सोडण्यासाठी पालक आणि अन्य नातेवाईक दिसून आले. मात्र, मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परिक्षेसाठी पोहचविण्याची जबाबदारी शिक्षकांवरच होती. पूर्व माध्यमिक परीक्षेसाठी ३९४ केंद्रावर ७२ हजार ३३८ तर माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ४३ हजार ९३० असे एकूण एक लाख १६ हजार २६८ विद्यार्थी हजर होते.

पूर्व माध्यमिक (इयत्ता चौथी) परीक्षेसाठी तीन पेपर घेण्यात आले. सकाळी ११ ते १२ या कालावधीत भाषा व इंग्रजी विषयाची शंभर मार्काची परीक्षा पार पडली. त्यानंतर गणित व परिसर अभ्यास भाग १ या विषयाची परिक्षा दुपारी १ ते २ या कालावधीत तर बुध्दीमत्ता चाचणी व परिसर अभ्यास भाग २ या विषयाची परीक्षा दुपारी ३ ते ४ या कालावधीत घेण्यात आली.

माध्यमिक (सातवीसाठी) परीक्षेसाठी तीन पेपर घेण्यात आले. सकाळी ११ ते १२ या कालावधीत भाषा व इंग्रजी या विषयाची १०० मार्काची परीक्षा पार पडली. त्यानंतर गणित व सामाजिक शास्त्रे या विषयाची परीक्षा दुपारी १ ते २ या कालावधीत तर बुध्दीमत्ता चाचणी व सामान्य विज्ञान या विषयाची परिक्षा दुपारी ३ ते ४ या कालावधीत घेण्यात आली.

परीक्षा संचलनासाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेसाठी प्रत्येक परीक्षा केंद्रास संचालक याप्रमाणे ३९४ केंद्र संचालक तसेच ३०० पेक्षा जास्त विद्यार्थी प्रविष्ठ झालेल्या परीक्षा केंद्रास ३४ उपकेंद्र संचालक व ३ हजार ५६६ पर्यवेक्षक आणि ९९९ शिपयांची नेमणूक करण्यात आली होती. तसेच माधिमिक शाळा शिष्यवृत्ती परिक्षेसाठी २४२ केंद्रसंचालक २५ उपकेंद्रसंचालक २ हजार ६९ पर्यवेक्षक व ५९० शिपायांची नेमणूक करण्यात आली.

अकराशे विद्यार्थ्यांची दांडी

जिल्हास्तरावरून १५ तालुके व दोन महापालिका यांच्यासाठी जिल्हा मुख्यालयाचे अधिकारी निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. तसेच भरारी पथकांतर्गत शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी व तालुकास्तरावरून परीक्षा केंद्रांना आकस्मित भेटी देऊन कामकाजाची पहाणी करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पूर्व माध्यमिक परीक्षेसाठी ७ हजार ६०८ तर माध्यमिकसाठी ३ हजार ५७२ विद्यार्थी गैरहजर होते.

मुख्याध्यापक 'आऊट ऑफ कव्हरेज'

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सकाळी दहा वाजेपासूनच शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी पालकांची शाळेबाहेर गर्दी होती. यात खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी आई, वडीलांसह नातेवाइकांची गर्दी झाली होती. परंतु, मनपा शाळेतील शिष्यवृत्तीला बसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ने-आण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर देण्यात आली होती. इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेत दर एक तासाला तीन पेपर होते. यात सकाळी अकरा ते बारा, एक ते दोन व तीन ते चार अशा तीन सत्रात परीक्षा झाली. मनपा शाळेतील काही शिक्षकांना रविवार सुट्टी असल्याने मुख्याध्यापकांचे मोबाईल आऊट ऑफ कव्हरेज लागत होते. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मुलांना सोडविण्यासाठी काही मनपा शाळेतील मुख्याध्यापकांना धावपळ करावी लागली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धर्म कालबाह्य झालाय

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

धर्म व धर्माचे नियम त्या काळात सुसंगत होते; मात्र आता धर्म कालबाह्य झाला आहे. आता सर्व धर्मांची चिकित्सा व विश्लेषण करण्याची वेळ जवळ आली आहे, असे प्रतिपादन पटकथाकार व स्तंभलेखक संजय पवार यांनी केले. शहीद भगतसिंग विचार मंचातर्फे रविवारी शहीद भगतसिंग स्मृतिदिन व नास्तिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पंचवटी येथील पंडित पलुस्कर सभागृहात हा कार्यक्रम झाला.

पवार म्हणाले, की विवेकवादी विचार करून सार काढले तर कोठेतरी निष्कर्ष काढता येणार असून धर्मांधतेमुळे होणारी वैचारिक हानी थांबविता येणार आहे. शास्त्रीय संविधान व कायदे नागरिकांसाठी असून त्यांचा आधार घेत नव्याने विचार करण्याची आता आवश्यकता आहे.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात उद्योजक लोकेश शेवडे आणि पत्रकार अश्विनी सातव-डोके यांची मुलाखत झाली. नास्तिक आहात म्हणजे काय याचा सांगोपांग विचार करून त्याच्या प्रवासाबाबत, अडचणींबाबत, आव्हानांबाबत जाणून घेण्याविषयी चर्चा झाली. मुलाखत दीप्ती राऊत यांनी घेतली.

गेल्या वर्षापासून मुंबई तसेच पुणे येथे नास्तिक परिषद घेण्यात येते. नाशिकला ही परिषद घेण्याचे पहिलेच वर्ष होते. नास्तिक असणाऱ्यांची वैचारिक देवाणघेवाण व्हावी या हेतूने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद तसेच अहमदनगर येथे एकाच दिवशी ही परिषद घेण्यात आली. कार्यक्रम यशस्वितेसाठी भगतसिंग विचार मंचच्या अमित जोजारे, प्रियदर्शन भारतीय व दीपक बेंडे यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेत्रसुखद रामचरित्रानुभव

0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

नाशिकमधील मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळ व संत सेवा संघ यांच्या वतीने राम नवमीचे औचित्य साधत रामायण या राम चरित्रावर आधारित नृत्य कार्याक्रमाचे भोंसला मिलिटरी स्कूलच्या श्री रामभूमीत भव्य आयोजन करण्यात आले होते.

कार्याक्रमची सुरवात तालरुद्र या ढोल पथकाच्या वादनाने झाली. यानंतर राम हे मुलगा, पती, भाऊ, मित्र म्हणून किती आदर्शवत जगले व आजच्या कलियुगात अशा आदर्शाने चालण्याची आवश्यकता माणसाला कशी आहे हा संदेश प्रत्येक नृत्यातून आणि त्यासोबत संत सेवा संघ यांच्यातर्फे झालेल्या खुमासदार सूत्रसंचालनाच्या खास शैलीतून देण्यात आला. श्री राम यांच्यासोबतच लक्ष्मण, सीता, हनुमान अशा अनेक पात्रांचा परिचय या नृत्याविष्कारातून सहभागी मुला-मुलींनी मांडला.

आकर्षक रंगमंच, दिव्यांनी उजळून निघालेला माहोल आणि त्यासोबत नेत्रसुखद नृत्याविष्कार यामुळे उपस्थित प्रेक्षकांचे डोळ्यांचे पारणे फिटले. यावेळी पोलिस उपायुक्त संदीप दिवाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नरला साकारणार कृषी महाविद्यालय

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिन्नर तालुक्यातील सावतामाळी नगर येथे शासकीय कृषी महाविद्यालय व प्रक्रिया प्रशिक्षण केंद्राच्या स्थापनेला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. शंभर एकरमध्ये साकारणाऱ्या या महाविद्यालयाचा चार तालुक्यांना फायदा होणार आहे. तसेच जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राला त्याचा फायदा होणार आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत गोडसे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन नाशिक परिसरात सरकारी कृषी महाविद्यालय व्हावे, अशी मागणी केली होती. या महाविद्यालयामुळे सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अदिवासी शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. मात्र जागा व पाण्याअभावी हा प्रश्न रेंगाळला होता. गोडसे यांनी पांढुर्लीच्या सावतामाळी नगरातील गायरानाच्या तीनशे एकरापैकी काही क्षेत्र कृषी महाविद्यालय व प्रक्रिया प्रशिक्षण केंद्रासाठी उपयोगी पडू शकते, असे सांगितले होते. येथे पाणी मुबलक असल्याने व नाशिक शहरापासून अवघ्या १५ किलोमीटरवर व चार तालुक्यांचा केंद्रबिंदू असल्याने हे महाविद्यालय या ठिकाणी व्हावे, अशी मागणी खासदार गोडसे यांच्याकडून करण्यात आली होती.

युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथ खडसे यांची भेट घेऊन हा मार्गी लावावा अशी मागणीही करण्यात आली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी या महाविद्यालयास तत्वता मंजुरी दिली आहे.

शेतकऱ्यांना फायदा

विद्यार्थ्यांना शेतीविषयी ज्ञान मिळत नसल्याने तरूणवर्ग शेतीपासून दूर चालला होता. कृषी महाविद्यालयाची स्थापना झाल्यानंतर कृषी क्षेत्राला नक्की फायदा होणार आहे. यामुळे परिसरात तांत्रिक शेतीची प्रगती

होऊन शेती व्यवसायाची भरभराट होईल, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. कृषी परिषदेने खर्चासह आपला प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे.

शासकीय कृषी महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी ६५६९.७० लाख खर्चास आणि ज्यामध्ये इमारतीच्या बांधकामसाठी कमाल २५०० लाख रुपयास कृषी परिषदेने तत्वतः मान्यता देऊन प्रस्ताव पाठवून शासनाकडे शिफारस केली आहे. या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना शेतीविषयी योग्य मार्गदर्शन मिळण्यास मदत होईल. तसेच जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राला त्याचा नक्कीच फायदा होईल.

- हेमंत गोडसे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववाचकांचं नुकसान होतंय…!

0
0



वाचनाची सुरुवात ज्या ठिकाणाहून होते, त्या वाचनालयांना सुरक्षितता आहे का असा प्रश्न आज विचारण्याची वेळ आली आहे. वाचनालयातून ढिगभर पुस्तकं घरी नेली जातात, त्यातील किती पुस्तकं पुन्हा कपाटात आणून ठेवली जातात? मासिकांमधून कितीतरी महत्त्वपूर्ण माहिती कापून घेतली जाते.

पुस्तकांच्या पहिल्या पानावर, शेवटच्या पानावर कितीजणांनी रेघोट्या मारून हे पुस्तक छान आहे, बोअर आहे, वाचावं, वाचू नये अशा कमेन्ट केलेल्या असतात. पुस्तकं खराब होतात ही एक बाब आहेच पण, अशा कमेन्टमुळे वाचकाचं त्या पुस्तकाबाबत, त्या लेखकाबाबत मत दूषित होतं याचाही विसर लिहिणाऱ्याला पडतो. पुस्तकं परत घेताना किती ग्रंथपाल ते चाळून घेतात. प्रथमदर्शनी तर असं लक्षात येतं की, कित्येक वाचनालयांमध्ये वाचकाला कपाटापर्यंत सोडलं जातं, त्याला पुस्तक निवडण्याची मुभा दिली जाते. पुस्तक पुन्हा ठेवण्याचा सोयिस्करपणा सांगितला जातो. त्यामुळे काही अंशी ग्रंथपालांचं तर बऱ्याच अंशी वाचकांचं फावतं. सोयिस्करपणामुळे नववाचकांचं मात्र मोठं नुकसान होतं.

'कोणतं पुस्तक वाचावं तेच कळत नाहीय? कधीपासून वाचायला सुरुवात केली? शिवाजी सावंतांचं मृत्युंजय वाचलंय का? ऐतिहासिक आधी वाचावं का सामाजिक? मला तर वाटतं आत्मचरित्रापासून सुरुवात करावी, इतर नको. पु.ल. वाचावेत आधी, कुसुमाग्रजांच्या कविता वाच ना नाहीतर, व. पु. काळे बेस्टच' वगैरे संवाद नववाचकांमध्ये नेहमीच झडतात. त्यानंतरची पायरी म्हणजे वाचनालय गाठणं व तेथून चांगली पुस्तक मिळवत त्यांचं रसग्रहण करणं. वाचनालयाच्या दाराशी येऊन ठेपलेले अनेकजण शक्यतो शिवाजी सावंतांची 'मृत्युंजय' ही कादंबरी मागण्यापासून सुरुवात करतात. पण वाचनालयात गेल्यावर, चौकशी केल्यावर या नववाचकाला कळतं की मृत्युंजय गेल्या वर्षभरापासून कुणाकडे तरी गेलंय. त्याने ते परत करण्याचं दाक्षिण्य दाखवलेलं नाही व त्यामुळे वाट पहाण्याशिवाय पर्याय नाही. मग नववाचक 'छावा'कडे वळतो, ते ही नसतं. मग तो 'स्वामी' मागतो, ते ही बाहेर गेलेलं असतं; शेवटी 'युगंधर' तरी द्या म्हणत तो ग्रंथपालाच्या मागं लागतो. झेप, वपुर्झा, अपूर्वाई, असा मी असामी, व्यक्ती आणि वल्ली, क्लिओपात्रा, कोंडुरा, उचल्या, कोसला, रात्र काळी घागर काळी, डाळं, चाळेगत, एसईझेड, गारंबीचा बापू अशी किती आणि कोणत्याही नावाजलेल्या पुस्तकांची नावं घेतली तरी ते बाहेर गेलेलं आहे इतकंच उत्तर कोणत्याही वाचनालयातून ऐकायला मिळतं; अशावेळी वाचकांना काय करावं? खरं तर यावर वाचनालयाच्या व्यवस्थापनाने काय मार्ग काढावा, असा प्रश्न विचारणं संयुक्तिक आहे. इतकी महागडी पुस्तकं जे घेऊन जातात व वेळेच्या आत परत करीत नाहीत, त्यांना केवळ महिन्याला दहा रुपये दंड करीत बसायचं की त्यांच्याकडून त्वरित पुस्तक परत मिळवता येईल असं काही करायचं? कोणतंही वाचनालय एका मृत्युंजयच्या दहा प्रती विकत घेऊ शकत नाही, यात दुमत नाही. परंतु, आहे त्या प्रती जपण्यासाठी काय करता येईल याचा विचार मात्र करणं गरजेचं झालं आहे. त्याला कारणही तसंच आहे, आताचे वाचक 'सुजाण' झाले आहेत. आठशे रुपयांचं पुस्तक बाहेरून विकत घेण्यापेक्षा, कमीत कमी डिपॉझिट भरून एखाद्या वाचनालयातूनच ते 'ढापता' करता येईल का, असा नजदिकी फायद्याच्या विचार अधिकत होताना दिसतोय. त्यामुळे होतं काय, एखादा नववाचक एखादं चांगलं पुस्तक वाचण्याची इच्छा मनात ठेवून असतो, त्याला ते वेळेवर मिळालं नाही तर हिरमोड होऊन हा वाचक पुन्हा प्रयत्न करण्याच्या भानगडीत पडत नाही. त्याची वाचनाची इच्छाच संपून जाते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मात्र 'आजकालची तरूण पिढी काही वाचत नाही यासाठी काय उपाययोजना कराव्यात' यासारख्या विषयावर परिसंवाद रंगत जातो.

वाचनालयांनी आपापली पुस्तकं जपण्याचा विचार करणं जसं महत्त्वाचं तसंच या नववाचकांसाठी काही योजना करता येतील का याबाबत विचार करण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, त्यांना मृत्युंजय आवडतं ना, त्याबाबत कोठे आलेली लेखमाला, कात्रणं गोळा करून एक वहीत चिकटून ठेवावी. मृत्युंजय देता आलं नाही किमान ही वही त्याला द्यावी...तो नक्कीच वाचनापासून माघारी फिरणार नाही; उलट त्याला अधिक रस वाटून तो वाचनाशी निगडित राहील.

- अशांत किरकिरकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केक फेस्टिव्हलची विकेंड धूम

0
0

दोन दिवसीय फेस्टिव्हलचा शानदार समारोप

अमोघ पोंक्षे, कॉलेज क्लब रिपोर्टर

गुढीपाडवा व विकेंडची धूम या वातावरणाला या आठवड्यात जोड मिळाली ती डब्ल्यू. एस. बेकर्स प्रस्तुत इंटरनॅशनल केक फेस्टिव्हलची. चोपडा लॉन्स, गंगापूर रोड येथे या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आले होतं.

नाशिकची ओळख झालेल्या अनेक गोष्टी केकच्या रुपात नाशिककरांना पहायला मिळाल्या. नाशिकचा उड्डाणपूल, द्राक्ष, कांदा, पांडवलेणीचा परिसर, नाशिकमधली जगप्रसिद्ध वाईन यांना केकच्या रुपात बघणं म्हणजे नाशिककरांसाठी एक पर्वणीच ठरली. रविवारी या दोन दिवसीय फेस्टिव्हलचा समारोप झाला. या फेस्टिव्हलमध्ये आकर्षण ठरले ते म्हणजे सात जागतिक आश्चर्यांची हुबेहूब केकरुपी प्रतिकृती. ताजमहल, चायना वॉल तसेच, वेडिंग केक्सची व्हरायटीही बघायला मिळाली.

एकूण २५० हून अधिक केक्स या प्रदर्शनात मांडण्यात आले होते. या केक्सचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे केक संपूर्ण शाकाहारी असून, लवकरच पुण्यातील ही बेकरी नाशिकमध्येही आपल्या शाखा उघडणार असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले.

दोनशे किलोचा उड्डाणपूल

या महोत्सवात दोनशे ‌किलोचो सहा फूट लांबीचा नाशिकचा उड्डाणपुलाची प्रतिकृती सादर करण्यात आली. उड्डाणपूल व त्याखालील महामार्ग व समांतर रस्‍तेही दाखविण्यात आले आहेत. यावेळी आयोजकांनी बघणाऱ्यांना वाढदिवस असल्यास गिफ्ट देण्याचीही घोषणा केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घुमानवारीत ९०० नाशिककर

0
0

एकाच वेशभूषेत होणार दर्शन;

२० ढोलपथकांचीही हजेरी

म. टा. प्र‌ति‌निधी, नाशिक

आषाढी कार्तिकीला मनोभावे पंढरीची वारी करणारे संत नामदेवांचे भक्त आता त्याच उत्साहाने साहित्य संमेलनाच्या निमित्ताने घुमान (पंजाब) वारीही करणार आहेत. यात ९०० हून अधिक नाशिककर समावेश असेल. साहित्य संमेलनाला जाणाऱ्या नामदेव भक्तांची व साहित्यप्रेमींची नाशिकरोड येथून खास सजविलेल्या रेल्वेने सोय केली आहे याच रेल्वेने नाशिकचे २० ढोल असलेले ढोल पथक पंजाब येथे रवाना होणार आहे ते आपली कला पंजाब येथे उपस्थितांचे स्वागत करून दाखविणार आहे.

अखिल भारतीय ८८ व्या मराठी साहित्य संमेलनास उत्तर महाराष्ट्रासह नाशिकचे अभूतपूर्व विशेष दर्शन होणार आहे. कारण नाशिक येथून जाणारे साहित्यिक, साहित्य रसिक, वारकरी हे एकाच पोशाखात सहभागी होणार आहेत. तब्बल ९०० नाशिककर घुमानमध्ये आलेल्यांचे लक्ष वेधून घेणार आहे. या साहित्य संमेलनाला जाणाऱ्या साहित्य रसिकांचा प्रतिसाद मिळत असल्याने लोकआग्रहास्तव २३ मार्च ही अंतिम नोंदणीची मुदत करण्यात आली आहे, अशी माहिती अखिल भारतीय बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष अरुण नेवासकर यांनी दिली.

गंथदिंडीला घुमणार नाशिक ढोल

विशेष म्हणजे संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी होणाऱ्या ग्रंथ दिंडीत नाशिक ढोल पथक घुमणार आहे. नशिक येथून जाणारा प्रत्येक व्यक्ती दिंडीत एकाच पोशाखात असेल. यामुळे नाशिककर साहित्य संमेलनात लक्ष वेधून घेतील. नाशिकरोड येथून बुधवार, १ एप्रिल रोजी विशेष रेल्वे घुमान कडे रवाना होणार आहे. त्यानंतर भुसावळ नागपूरमार्गे भोपाळ, दिल्ली, जालंदर मार्गे अमृतसरला जाणार आहे.

प्रवाशांना जेवण व नाश्ताही दिला जाणार आहे. डॉक्टर वृंदासह अत्यावशक सेवा पुरविली जाणार आहे. या प्रवासात बड्या साहित्यिकांच्या व्याखानाचे आयोजन केले आहे. ग्रंथ दिंडीचे विशेष आकर्षण म्हणजे दिंडीत संत नामदेवांची वेशभूषा करून नाशिकचे काही युवक सहभागी होणार आहे. एका अर्थाने पंजाबी व मराठीचा मिलापच येथे दिसणार आहे.



प्रत्येक रेल्वे बोगीला संतांची नावे

नशिक ही अनेक संतांची कर्मभूमी असल्याने त्या संताची नावे प्रत्येक बोगीला दिली जाणार आहे. रेल्वे इंजिनच्या दर्शनी भागात संत नामदेवांचे मोठे कट आऊट लावण्यात येणार आहे. संमेलनाला जाणाऱ्यांसाठी २५ मार्च रोजी एका विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. नाव नोंदणीसाठी ०२५३-२३१७२१६ येथे संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकात युनेस्कोचे केंद्र

0
0

कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये वैद्यकीय शिक्षणाबाबतचे युनेस्को बायोइथिक्स अध्यासनाचे राष्ट्रीय मध्यवर्ती केंद्र होणार आहे, अशी माहिती कुलगुरू प्रा. डॉ. अरुण जामकर यांनी दिली. या केंद्राच्या माध्यमातून बावी डॉक्टरांना नैतिकतेचे धडे दिले जाणार आहेत.

जगभरात वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. विकसित व विकसनशील देशांमध्ये आरोग्य, वैद्यकीय गरजा, वैद्यकीय आचारसंहिता यांचा समावेश असलेल्या नैतिक शिक्षणाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर आधुनिक अभ्यासक्रम तयार करणे आवश्यक आहे. आधुनिक ज्ञान व नीती शिक्षण जगभरातील वैद्यकीय विद्यापीठ, अध्यापक, विद्यार्थी यांना व्यावसायिक शिक्षण देण्याच्या उद्देशाने इस्त्राइलच्या हैपफा विद्यापीठात २००१ मध्ये युनेस्कोने एशिया-पॅसिफीक बायोइथिक्स नेटवर्क या आंतरराष्ट्रीय संस्थेची व बायोइथिक्स अध्यासनाची स्थापना केल्याची माहिती डॉ. जामकर यांनी सांगितले आहे.

आजच्या समाजात डॉक्टर व रुग्ण यांचे संबंध बऱ्याचवेळी ताणतणावाचे बघायला मिळतात. त्यासाठीच नीती शिक्षण अत्यावश्यक आहे. रुग्णांना आपुलकी, विश्वसनीयता आणि दर्जेदार उपचार यांची अपेक्षा असते. तसेच डॉक्टर व रुग्ण यांचे संबंध सलोख्याचे राहणे गरजेचे आहे. त्यासाठी संभाषण कौशल्य महत्त्वाचा भाग आहे.

डॉक्टरांना त्यांचे कर्तव्य पार पाडण्यासाठी आरोग्य संबंधित कायदे, नियमावली व इतर कायदेशीर बाबींची माहिती असल्यास ते त्यांना येणाऱ्या अडचणींना समर्थपणे व कायदेशीरपणे तोंड देऊ शकतील. त्यासाठी सामाजिक आणि वैज्ञानिक प्रक्रिया यांचा परिणाम म्हणून वैद्यकीय आचारसंहिता ही उदयोन्मुख गरज डॉ. जामकर यांनी व्यक्त केली आहे.



याचे मिळणार प्रशिक्षण

बायोइथिक्स अध्यासन ही संस्था वैद्यकीय आचारसंहितेचे आधुनिक अभ्यासक्रम, शैक्षणिक साधने व साहित्य तयार करते. शिक्षक, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे, वैद्यकीय अध्यापकांनी सुचविलेल्या संकल्पनात्मक बदलावर अभ्यास करणे, नैतिक मूल्ये देण्याचे काम ही संस्था करते. या संस्थेच्या सहयोगाने जगभरात अनेक ठिकाणी आरोग्य, कायदा व नैतिकतेचे शिक्षण दिले जाते. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना आचारसंहिता, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, सार्वजनिक प्रशासन याबाबतचे प्रशिक्षण सुध्दा दिले जाते. म्हणूनच आरोग्य विद्यापीठात युनेस्को बायोइथिक्स अध्यासनाचे राष्ट्रीय मध्यवर्ती केंद्र स्थापन करण्यात येत असल्याचे कुलसचिव डॉ. काशिनाथ गर्कळ यांनी सांगितले आहे. या केंद्राचे चिफ पॅट्रॉन हे कुलगुरु डॉ. जामकर तर प्रति कुलगुरु डॉ. शेखर राजदेरकर हे या केंद्राचे चिफ नोडल ऑफिसर राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाळू माफियांचा हैदोस

0
0

चोरट्या वाळू विक्रीतून कोट्यवधींच्या महसुलावर पाणी

प्रवीण बिडवे, नाशिक

वाळू लिलावाकडे ठेकेदारांनी पाठ फिरविल्याने कोट्यवधींचा महसूल बुडत असल्याचे रडगाणे जिल्हा प्रशासनाकडून गायले जात असताना जिल्ह्यातून दररोज हजारो ब्रास चोरीच्या वाळूची वाहतूक सुरूच आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'ने केलेल्या पाहणीत वाळू माफियांचे कारनामे आणि पोलिस, महसूल तसेच प्रादेशिक परिवहन विभागाकडून त्यांना मिळणाऱ्या पाठबळाचा पर्दाफाश झाला. सरकारी बाबू स्वत:च्याच तुंबड्या भरण्यात मश्गूल असल्याने सरकारला कोट्यवधींच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. पारदर्शी कारभाराची हमी देणारे जिल्हाधिकारी घरभेदींच्या मुसक्या आवळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वाळू माफियांनी अलीकडेच दोन तहसीलदारांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या. त्यातील सत्यासत्यता तपासण्याची कार्यवाही पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर सुरू आहे. अशा घटनांमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईच्या वेळी महसूल अधिकाऱ्यांना पोलिस संरक्षण पुरविण्याची ग्वाही दिली आहे. मात्र, चोरी रोखण्यासाठी तहसीलदारांपासून प्रांतापर्यंत, पोलिस हवालदारापासून निरीक्षक, आरटीओ अधिकाऱ्यांपर्यंत कोणीच फारशे उत्सुक नसल्याने जिल्ह्यात सर्रास चोरीच्या वाळूची वाहतूक सुरूच असल्याचे 'महाराष्ट्र टाइम्स'ने केलेल्या पाहणीत उघडकीस आले आहे.

जिल्ह्यातील अनेक मार्गांवर सर्रास बेकायदा वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती 'महाराष्ट्र टाइम्स'ला मिळाली. या प्रकाराची शहानिशा करण्यासाठी आम्ही सिन्नरचा मार्ग निवडला. सायंकाळी सातच्या सुमारास 'मटा'चे प्रतिनिधी आणि छायाचित्रकार सिन्नरला पोहोचले. नाशिक-पुणे महामार्ग आणि नाशिक-शिर्डी महामार्गालगतच्या पीरबाबा चौकात ते थांबले. यावेळी बऱ्यापैकी वाहनांची वर्दळ होती. वाळूची वाहतूक करणाऱ्या हायवा गाड्या १५ ते २० मिनिटांचे अंतर ठेऊन वावी वेस मार्गे नाशिक महामार्गावरून जात होत्या. सुमारे पाऊण तासात चार हायवा गाड्या या चौकातून नाशिककडे गेल्या. विशेष म्हणजे त्यापैकी दोन वाहनांवर क्रमांकच नव्हता. काही वाहनांवर क्रमांक होते. मात्र, ते न‌टिसे दिसणार नाहीत याची काळजी वाळू माफियांकडून घेतली गेली होती.

प्रतिनिधींनी त्यानंतर वावी वेसकडे मोर्चा वळविला. कोपरगाव तालुक्यातून येणारी ही वाळू शिर्डी महामार्गाने आणली जाते. वावी वेस चौकात ट्रकचा वेग कमी केला जातो. या चौकात रस्त्यालगतच वाळू माफियांचे साथीदार कार घेऊन उभे असतात. हे कार्यकर्ते वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील व्यक्त‌लिा खाणाखुणांद्वारेच इशारा करतात. चिंचोली फाट्यावरही असे तरूण थांबविण्यात आले होते. सायंकाळी सात ते रात्री साडेनऊ या वेळेत सुमारे नऊ वाळू गाड्या वावी वेस चौकातून गेल्या. त्यामध्ये क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक वाळू भरलेली होती.

रॉयल्टीच्या माध्यमातून मिळणारा सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून माफिया, वाहतूकदार आणि त्यांच्या ताटाखालचे मांजर बनलेले प्रशासनातील लोकांचे उखळ कसे पांढरे होते, हे पहायला मिळाले. (क्रमश:)



प्रशासन, पोलिस, आरटीओ गायब

विशेष म्हणजे वाळूची वाहतूक करताना त्यावर प्लास्टिक पेपर किंवा ताडपत्रीचे आच्छादन असावे, असा नियम असला तरी तो नियम धाब्यावर बसविला होता. काही गाड्या नाशिकला तर काही घोटी रस्त्याने मुंबईकडे जात असल्याचे पाहणीत पुढे आले. सकाळी सहापर्यंत शंभराहून अधिक गाड्या १५ ते २० लाखांच्या चोरीच्या वाळूची वाहतूक करतात. एका रात्रीत केवळ एका मार्गाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. धुळे, औरंगाबाद महामार्ग, पेठ रस्त्यानेही चोरट्या वाळूची वाहतूक होत असल्याचे समजते. हे सुरू असताना या रस्त्यावर पोलिस, प्रशासनातील अधिकारी अथवा आरटीओचे कर्मचारी कुठेही का दिसत नाहीत, असा प्रश्न पडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बर्गरमध्ये रबराचे तुकडे

0
0


म. टा. प्रतिनिधी, सातपूर

कॉलेजरोडवरील सिनेमॅक्स थिएटरमध्ये चित्रपट बघण्यासाठी गेलेल्या दोघा मित्रांनी तेथील हॉटेलमधून घेतलेल्या बर्गरमध्ये रबराचा तुकडा आढळून आला आहे. याप्रकरणी संबंधितांनी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) कार्यालयाकडे तक्रार केली आहे. दरम्यान, या प्रकरणी तपास सुरू असल्याचे 'एफडीए'ने स्पष्ट केले आहे.

नीलेश कासार आणि पवन चितमलकर हे दोघे सिनेमॅक्स येथे चित्रपट बघण्यासाठी शनिवारी गेले होते. इंटरव्हल झाल्यानंतर त्यांनी तेथील हॉटेलमधून बर्गर खरेदी केले. चित्रपट बघतांना त्यांना या बर्गरमध्ये तीन सेंटीमीटरचा रबराचा तुकडा लागला. याबाबत त्यांनी संबंधित हॉटल चालकांकडे तक्रार केली. तसेच सिनेमॅक्स व्यवस्थापनाकडे इमेलद्वारे घडलेल्या प्रकाराची माहिती कळविली. याबाबत सिनेमॅक्सच्या स्थानिक व्यवस्थापनाने बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. तसेच बर्गरमधील टिक्कीत रबर असून ते आम्ही अन्य कंपनीकडून घेत असल्याचेही स्पष्टीकरण दिल्याचे चितमलकर यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत ‌मेलवरून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने कासार आणि चितमलकर यांनी 'एफडीए'कडे लेखी तक्रार केली. तसेच बर्गरचे फोटो आणि अन्य माहिती दिली. याविषयी 'एफडीए'कडे विचारणा केली असता त्यांनी अशी तक्रार मिळाल्याचे सांगत या‌प्रकरणी कारवाई केली जात असल्याचे स्पष्टीकरण दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकात युनेस्कोचे केंद्र

0
0

कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये वैद्यकीय शिक्षणाबाबतचे युनेस्को बायोइथिक्स अध्यासनाचे राष्ट्रीय मध्यवर्ती केंद्र होणार आहे, अशी माहिती कुलगुरू प्रा. डॉ. अरुण जामकर यांनी दिली. या केंद्राच्या माध्यमातून बावी डॉक्टरांना नैतिकतेचे धडे दिले जाणार आहेत.

जगभरात वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. विकसित व विकसनशील देशांमध्ये आरोग्य, वैद्यकीय गरजा, वैद्यकीय आचारसंहिता यांचा समावेश असलेल्या नैतिक शिक्षणाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर आधुनिक अभ्यासक्रम तयार करणे आवश्यक आहे. आधुनिक ज्ञान व नीती शिक्षण जगभरातील वैद्यकीय विद्यापीठ, अध्यापक, विद्यार्थी यांना व्यावसायिक शिक्षण देण्याच्या उद्देशाने इस्त्राइलच्या हैपफा विद्यापीठात २००१ मध्ये युनेस्कोने एशिया-पॅसिफीक बायोइथिक्स नेटवर्क या आंतरराष्ट्रीय संस्थेची व बायोइथिक्स अध्यासनाची स्थापना केल्याची माहिती डॉ. जामकर यांनी सांगितले आहे.

आजच्या समाजात डॉक्टर व रुग्ण यांचे संबंध बऱ्याचवेळी ताणतणावाचे बघायला मिळतात. त्यासाठीच नीती शिक्षण अत्यावश्यक आहे. रुग्णांना आपुलकी, विश्वसनीयता आणि दर्जेदार उपचार यांची अपेक्षा असते. तसेच डॉक्टर व रुग्ण यांचे संबंध सलोख्याचे राहणे गरजेचे आहे. त्यासाठी संभाषण कौशल्य महत्त्वाचा भाग आहे.

डॉक्टरांना त्यांचे कर्तव्य पार पाडण्यासाठी आरोग्य संबंधित कायदे, नियमावली व इतर कायदेशीर बाबींची माहिती असल्यास ते त्यांना येणाऱ्या अडचणींना समर्थपणे व कायदेशीरपणे तोंड देऊ शकतील. त्यासाठी सामाजिक आणि वैज्ञानिक प्रक्रिया यांचा परिणाम म्हणून वैद्यकीय आचारसंहिता ही उदयोन्मुख गरज डॉ. जामकर यांनी व्यक्त केली आहे.



याचे मिळणार प्रशिक्षण

बायोइथिक्स अध्यासन ही संस्था वैद्यकीय आचारसंहितेचे आधुनिक अभ्यासक्रम, शैक्षणिक साधने व साहित्य तयार करते. शिक्षक, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे, वैद्यकीय अध्यापकांनी सुचविलेल्या संकल्पनात्मक बदलावर अभ्यास करणे, नैतिक मूल्ये देण्याचे काम ही संस्था करते. या संस्थेच्या सहयोगाने जगभरात अनेक ठिकाणी आरोग्य, कायदा व नैतिकतेचे शिक्षण दिले जाते. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना आचारसंहिता, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, सार्वजनिक प्रशासन याबाबतचे प्रशिक्षण सुध्दा दिले जाते. म्हणूनच आरोग्य विद्यापीठात युनेस्को बायोइथिक्स अध्यासनाचे राष्ट्रीय मध्यवर्ती केंद्र स्थापन करण्यात येत असल्याचे कुलसचिव डॉ. काशिनाथ गर्कळ यांनी सांगितले आहे. या केंद्राचे चिफ पॅट्रॉन हे कुलगुरु डॉ. जामकर तर प्रति कुलगुरु डॉ. शेखर राजदेरकर हे या केंद्राचे चिफ नोडल ऑफिसर राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू माफियांचा हैदोस

0
0

चोरट्या वाळू विक्रीतून कोट्यवधींच्या महसुलावर पाणी

प्रवीण बिडवे, नाशिक

वाळू लिलावाकडे ठेकेदारांनी पाठ फिरविल्याने कोट्यवधींचा महसूल बुडत असल्याचे रडगाणे जिल्हा प्रशासनाकडून गायले जात असताना जिल्ह्यातून दररोज हजारो ब्रास चोरीच्या वाळूची वाहतूक सुरूच आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'ने केलेल्या पाहणीत वाळू माफियांचे कारनामे आणि पोलिस, महसूल तसेच प्रादेशिक परिवहन विभागाकडून त्यांना मिळणाऱ्या पाठबळाचा पर्दाफाश झाला. सरकारी बाबू स्वत:च्याच तुंबड्या भरण्यात मश्गूल असल्याने सरकारला कोट्यवधींच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. पारदर्शी कारभाराची हमी देणारे जिल्हाधिकारी घरभेदींच्या मुसक्या आवळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वाळू माफियांनी अलीकडेच दोन तहसीलदारांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या. त्यातील सत्यासत्यता तपासण्याची कार्यवाही पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर सुरू आहे. अशा घटनांमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईच्या वेळी महसूल अधिकाऱ्यांना पोलिस संरक्षण पुरविण्याची ग्वाही दिली आहे. मात्र, चोरी रोखण्यासाठी तहसीलदारांपासून प्रांतापर्यंत, पोलिस हवालदारापासून निरीक्षक, आरटीओ अधिकाऱ्यांपर्यंत कोणीच फारशे उत्सुक नसल्याने जिल्ह्यात सर्रास चोरीच्या वाळूची वाहतूक सुरूच असल्याचे 'महाराष्ट्र टाइम्स'ने केलेल्या पाहणीत उघडकीस आले आहे.

जिल्ह्यातील अनेक मार्गांवर सर्रास बेकायदा वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती 'महाराष्ट्र टाइम्स'ला मिळाली. या प्रकाराची शहानिशा करण्यासाठी आम्ही सिन्नरचा मार्ग निवडला. सायंकाळी सातच्या सुमारास 'मटा'चे प्रतिनिधी आणि छायाचित्रकार सिन्नरला पोहोचले. नाशिक-पुणे महामार्ग आणि नाशिक-शिर्डी महामार्गालगतच्या पीरबाबा चौकात ते थांबले. यावेळी बऱ्यापैकी वाहनांची वर्दळ होती. वाळूची वाहतूक करणाऱ्या हायवा गाड्या १५ ते २० मिनिटांचे अंतर ठेऊन वावी वेस मार्गे नाशिक महामार्गावरून जात होत्या. सुमारे पाऊण तासात चार हायवा गाड्या या चौकातून नाशिककडे गेल्या. विशेष म्हणजे त्यापैकी दोन वाहनांवर क्रमांकच नव्हता. काही वाहनांवर क्रमांक होते. मात्र, ते न‌टिसे दिसणार नाहीत याची काळजी वाळू माफियांकडून घेतली गेली होती.

प्रतिनिधींनी त्यानंतर वावी वेसकडे मोर्चा वळविला. कोपरगाव तालुक्यातून येणारी ही वाळू शिर्डी महामार्गाने आणली जाते. वावी वेस चौकात ट्रकचा वेग कमी केला जातो. या चौकात रस्त्यालगतच वाळू माफियांचे साथीदार कार घेऊन उभे असतात. हे कार्यकर्ते वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील व्यक्त‌लिा खाणाखुणांद्वारेच इशारा करतात. चिंचोली फाट्यावरही असे तरूण थांबविण्यात आले होते. सायंकाळी सात ते रात्री साडेनऊ या वेळेत सुमारे नऊ वाळू गाड्या वावी वेस चौकातून गेल्या. त्यामध्ये क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक वाळू भरलेली होती.

रॉयल्टीच्या माध्यमातून मिळणारा सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून माफिया, वाहतूकदार आणि त्यांच्या ताटाखालचे मांजर बनलेले प्रशासनातील लोकांचे उखळ कसे पांढरे होते, हे पहायला मिळाले. (क्रमश:)



प्रशासन, पोलिस, आरटीओ गायब

विशेष म्हणजे वाळूची वाहतूक करताना त्यावर प्लास्टिक पेपर किंवा ताडपत्रीचे आच्छादन असावे, असा नियम असला तरी तो नियम धाब्यावर बसविला होता. काही गाड्या नाशिकला तर काही घोटी रस्त्याने मुंबईकडे जात असल्याचे पाहणीत पुढे आले. सकाळी सहापर्यंत शंभराहून अधिक गाड्या १५ ते २० लाखांच्या चोरीच्या वाळूची वाहतूक करतात. एका रात्रीत केवळ एका मार्गाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. धुळे, औरंगाबाद महामार्ग, पेठ रस्त्यानेही चोरट्या वाळूची वाहतूक होत असल्याचे समजते. हे सुरू असताना या रस्त्यावर पोलिस, प्रशासनातील अधिकारी अथवा आरटीओचे कर्मचारी कुठेही का दिसत नाहीत, असा प्रश्न पडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिके वाचवण्यासाठी नेट

0
0


म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

गारपिटीपासून द्राक्षबागा व इतर पिके वाचविणारी नेट बाजारात उपलब्ध आहेत. सामान्य शेतकऱ्याला या नेटची खरेदी करून द्राक्षबागा व इतर पिके वाचविता यावी म्हणून नेटसाठी अनुदान उपलब्ध करून द्यावे तसेच, नेट खरेदीवर आकारण्यात येणारा वॅट व इतर कर आकारणी रद्द करावी, अशी मागणी पिंपळगाव बसवंत येथील द्राक्ष उत्पादक विश्वासराव माधवराव मोरे यांनी केली आहे.

सरकारने तातडीने नेट खरेदीवर अनुदान जाहीर केल्यास तसेच, सर्वच द्राक्ष उत्पादकांना नेट खरेदी करता येईल. गारपिटीपासून द्राक्षबागांचे नुकसान टाळता येईल, असे मोरे यांनी म्हटले आहे. गत तीन चार वर्षापासून सातत्याने अवकाळी पाऊस व गारपिटीने द्राक्ष व इतरही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या गारपिटीच्या पार्श्वभूमीवर विश्वास मोरे यांनी आपल्या द्राक्षबागेवर सदर नेट बसवली असून, शेंगदाणा आकाराच्या व त्यापेक्षा मोठ्या गारांपासून द्राक्षबागा व इतर पिकांचा बचाव होत असल्याचा दावा विश्वास मोरे यांनी व्यक्त केला आहे.

या नेटसाठी एकरी एक लाख रुपये खर्च असून शासनाने व्हॅट व इतर कर रद्द करून काही प्रमाणात शेतकऱ्यांना अनुदान दिल्यास एकरी केवळ पन्नास हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. सामान्य शेतकरी सुध्दा नेट खरेदी करून आपली द्राक्षबाग व इतरही पिके वाचवू शकतील. म्‍हणूनच सरकारने नेटवरील सर्व कर रद्द करावेत आणि नेटसाठी अनुदान जाहीर करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images