Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बर्गरमध्ये रबराचे तुकडे

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, सातपूर

कॉलेजरोडवरील सिनेमॅक्स थिएटरमध्ये चित्रपट बघण्यासाठी गेलेल्या दोघा मित्रांनी तेथील हॉटेलमधून घेतलेल्या बर्गरमध्ये रबराचा तुकडा आढळून आला आहे. याप्रकरणी संबंधितांनी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) कार्यालयाकडे तक्रार केली आहे. दरम्यान, या प्रकरणी तपास सुरू असल्याचे 'एफडीए'ने स्पष्ट केले आहे.

नीलेश कासार आणि पवन चितमलकर हे दोघे सिनेमॅक्स येथे चित्रपट बघण्यासाठी शनिवारी गेले होते. इंटरव्हल झाल्यानंतर त्यांनी तेथील हॉटेलमधून बर्गर खरेदी केले. चित्रपट बघतांना त्यांना या बर्गरमध्ये तीन सेंटीमीटरचा रबराचा तुकडा लागला. याबाबत त्यांनी संबंधित हॉटल चालकांकडे तक्रार केली. तसेच सिनेमॅक्स व्यवस्थापनाकडे इमेलद्वारे घडलेल्या प्रकाराची माहिती कळविली. याबाबत सिनेमॅक्सच्या स्थानिक व्यवस्थापनाने बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. तसेच बर्गरमधील टिक्कीत रबर असून ते आम्ही अन्य कंपनीकडून घेत असल्याचेही स्पष्टीकरण दिल्याचे चितमलकर यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत ‌मेलवरून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने कासार आणि चितमलकर यांनी 'एफडीए'कडे लेखी तक्रार केली. तसेच बर्गरचे फोटो आणि अन्य माहिती दिली. याविषयी 'एफडीए'कडे विचारणा केली असता त्यांनी अशी तक्रार मिळाल्याचे सांगत या‌प्रकरणी कारवाई केली जात असल्याचे स्पष्टीकरण दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिंहस्थासाठी मनपाचे अॅप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळा अधिकाधिक हायटेक करण्याच्या प्रयत्नात आता नाशिक महापालिकेनेही उडी घेतली आहे. सिंहस्थासाठी महापालिकेचे स्वतंत्र मोबाइल अॅप विकस‌ित करण्याचा निर्णय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी घेतला आहे. सिंहस्थात येणाऱ्या भाविकांना हा अॅप गाईडचे काम करणार असून रस्ते, ठिकाण व परिसराची माहिती देण्यात महत्त्वाची भूम‌किा पार पाडणार आहे. यासाठी कुंभथॉनची मदत घेतली जाणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यात दोन कोटी भाविक नाशिकला भेट देण्याची शक्यता आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसह स्थानिक यंत्रणांवर आहे. भाविकांच्या नियोजनांसाठी व त्यांना नियंत्र‌ति करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रशासन व स्वयंसेवी संस्था प्रयत्नशील आहेत. यादृष्टीने महापालिका आयुक्तांनी लाखो भाविकांना उपयुक्त ठरेल, असे स्वंतत्र मोबाइल अॅप तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बोलणी सुरू असून, यासाठी कुंभथॉनची मदत घेतली जात आहे.

अॅपमध्ये रस्ते, महत्त्वाची ठिकाणे, कुंभमेळ्याशी निगडीत सर्व माह‌तिी, आपण कुठे उभे आहोत आणि कुठे जायला हवे, याची माहितीही दिली जाणार आहे. सुरू आणि बंद असलेल्या रस्त्यांबाबतही माहिती भाविकांना मिळाल्यास गोंधळ कमी होईल. - डॉ. प्रवीण गेडाम, आयुक्त, महापालिका नाशिक

लुटमारीपासून भाविकांचे संरक्षण

कुंभमेळ्यात परराज्यातून येणाऱ्या भाविकांची असमाज‌कि तत्त्वांकडून लूटमार करण्याचे प्रयत्न होतात. विशेषत: माह‌तिी आणि पत्ता विचारणाऱ्या लोकांना गंडविले जाते. त्यामुळे भाविकांनी आपल्या मोबाइल वर हा अॅप डाऊनलोड केल्यास त्यांना, कोणालाही पत्ता व माह‌तिी विचारण्याची गरज उरणार नाही, त्यामुळे आपोआपच लुटमारीच्या घटनांवरही पायबंद बसणार आहे.

...........

नाशिकमध्ये पूर्वी असलेले दहा ते बारा नैसर्गिक प्रवाहाचे कुंड पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी मुंबई हायकोर्टात राष्ट्रवादीचे नेते देवांग जानी यांनी एक जनहित याचिका केली आहे. गेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळी भाविकांची गर्दी होणार असल्याचे लक्षात घेऊन या कुंडांमध्ये कोणी पडून काही अनुचित घटना होऊ नये यासाठी ते बुजवण्यात आले होते. तसेच अशा ठिकाणी भिंतीही उभारण्यात आल्या होत्या. परंतु, त्यामुळे नैसर्गिक प्रवाह बंद झाले आणि पाणीही दूषित झाले, असा दावा करत हे कुंड पूर्ववत करण्याचे निर्देश प्रशासनाला द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. त्यावर येत्या काही दिवसांत सुनावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बर्गरमध्ये रबराचे तुकडे

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, सातपूर

कॉलेजरोडवरील सिनेमॅक्स थिएटरमध्ये चित्रपट बघण्यासाठी गेलेल्या दोघा मित्रांनी तेथील हॉटेलमधून घेतलेल्या बर्गरमध्ये रबराचा तुकडा आढळून आला आहे. याप्रकरणी संबंधितांनी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) कार्यालयाकडे तक्रार केली आहे. दरम्यान, या प्रकरणी तपास सुरू असल्याचे 'एफडीए'ने स्पष्ट केले आहे.

नीलेश कासार आणि पवन चितमलकर हे दोघे सिनेमॅक्स येथे चित्रपट बघण्यासाठी शनिवारी गेले होते. इंटरव्हल झाल्यानंतर त्यांनी तेथील हॉटेलमधून बर्गर खरेदी केले. चित्रपट बघतांना त्यांना या बर्गरमध्ये तीन सेंटीमीटरचा रबराचा तुकडा लागला. याबाबत त्यांनी संबंधित हॉटल चालकांकडे तक्रार केली. तसेच सिनेमॅक्स व्यवस्थापनाकडे इमेलद्वारे घडलेल्या प्रकाराची माहिती कळविली. याबाबत सिनेमॅक्सच्या स्थानिक व्यवस्थापनाने बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. तसेच बर्गरमधील टिक्कीत रबर असून ते आम्ही अन्य कंपनीकडून घेत असल्याचेही स्पष्टीकरण दिल्याचे चितमलकर यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत ‌मेलवरून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने कासार आणि चितमलकर यांनी 'एफडीए'कडे लेखी तक्रार केली. तसेच बर्गरचे फोटो आणि अन्य माहिती दिली. याविषयी 'एफडीए'कडे विचारणा केली असता त्यांनी अशी तक्रार मिळाल्याचे सांगत या‌प्रकरणी कारवाई केली जात असल्याचे स्पष्टीकरण दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थासाठी मनपाचे अॅप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळा अधिकाधिक हायटेक करण्याच्या प्रयत्नात आता नाशिक महापालिकेनेही उडी घेतली आहे. सिंहस्थासाठी महापालिकेचे स्वतंत्र मोबाइल अॅप विकस‌ित करण्याचा निर्णय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी घेतला आहे. सिंहस्थात येणाऱ्या भाविकांना हा अॅप गाईडचे काम करणार असून रस्ते, ठिकाण व परिसराची माहिती देण्यात महत्त्वाची भूम‌किा पार पाडणार आहे. यासाठी कुंभथॉनची मदत घेतली जाणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यात दोन कोटी भाविक नाशिकला भेट देण्याची शक्यता आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसह स्थानिक यंत्रणांवर आहे. भाविकांच्या नियोजनांसाठी व त्यांना नियंत्र‌ति करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रशासन व स्वयंसेवी संस्था प्रयत्नशील आहेत. यादृष्टीने महापालिका आयुक्तांनी लाखो भाविकांना उपयुक्त ठरेल, असे स्वंतत्र मोबाइल अॅप तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बोलणी सुरू असून, यासाठी कुंभथॉनची मदत घेतली जात आहे.

अॅपमध्ये रस्ते, महत्त्वाची ठिकाणे, कुंभमेळ्याशी निगडीत सर्व माह‌तिी, आपण कुठे उभे आहोत आणि कुठे जायला हवे, याची माहितीही दिली जाणार आहे. सुरू आणि बंद असलेल्या रस्त्यांबाबतही माहिती भाविकांना मिळाल्यास गोंधळ कमी होईल. - डॉ. प्रवीण गेडाम, आयुक्त, महापालिका नाशिक

लुटमारीपासून भाविकांचे संरक्षण

कुंभमेळ्यात परराज्यातून येणाऱ्या भाविकांची असमाज‌कि तत्त्वांकडून लूटमार करण्याचे प्रयत्न होतात. विशेषत: माह‌तिी आणि पत्ता विचारणाऱ्या लोकांना गंडविले जाते. त्यामुळे भाविकांनी आपल्या मोबाइल वर हा अॅप डाऊनलोड केल्यास त्यांना, कोणालाही पत्ता व माह‌तिी विचारण्याची गरज उरणार नाही, त्यामुळे आपोआपच लुटमारीच्या घटनांवरही पायबंद बसणार आहे.

...........

नाशिकमध्ये पूर्वी असलेले दहा ते बारा नैसर्गिक प्रवाहाचे कुंड पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी मुंबई हायकोर्टात राष्ट्रवादीचे नेते देवांग जानी यांनी एक जनहित याचिका केली आहे. गेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळी भाविकांची गर्दी होणार असल्याचे लक्षात घेऊन या कुंडांमध्ये कोणी पडून काही अनुचित घटना होऊ नये यासाठी ते बुजवण्यात आले होते. तसेच अशा ठिकाणी भिंतीही उभारण्यात आल्या होत्या. परंतु, त्यामुळे नैसर्गिक प्रवाह बंद झाले आणि पाणीही दूषित झाले, असा दावा करत हे कुंड पूर्ववत करण्याचे निर्देश प्रशासनाला द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. त्यावर येत्या काही दिवसांत सुनावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अर्पण थॅलेसेमिया’चा राष्ट्रीय परिषदेत गौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उत्तर महाराष्ट्रातील १८१ थॅलेसेमिपिडीत पेशंट्सना अतिसुरक्षित नॅट टेस्टेड रक्ताचा मोफत पुरवठा अर्पण थॅलेसेमिया सोसायटीतर्फे करण्यात येतो. तसेच त्यांच्यावर विनामूल्य उपचार देखील केला जातो. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मुंबई येथील नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय परिषदेत सोसायटीचा गौरव करण्यात आला.

मुंबई येथील हिमॅटोलॉजी या संस्थेच्यावतीने देशभरातील रक्तविकार तज्ज्ञांची राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. परिषदेत देशभरातील १५०हून अधिक प्रतिनिधींनी सहभागी होत उपक्रमांचे सादरीकरण केले. परिषदेच्या नामवंताच्या उपस्थितीत प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी नाशिकच्या अर्पण थॅलेसेमिया सोसायटीच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून आयएमए शाखेच्या सहकार्याने चालविल्या जाणाऱ्या थॅलेसेमिया केअर सेंटरची माहिती अर्पण रक्तपेढीचे डॉ. शशिकांत पाटील यांनी सादर केली. यावेळी सोसायटीच्या वतीने राबविली जाणारी उपचार पध्दती ही भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्कृष्ट उपचार पध्दती असल्याचे गौरवोद्गगार प्रख्यात रक्तविकार तज्ज्ञ डॉ. एम. बी. अग्रवाल यांनी काढले. तसेच अत्याधुनिक तंत्राव्दारे नॅट टेस्टेड रक्तच अतिसुरक्षित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी परीक्षक म्हणून वाडिया हॉस्पिटलचे डॉ. मुकेश देसाई, केईएम हॉस्पिटलचे डॉ. फराह जीजीना यांनी काम पाहिले. यावेळी अर्पण रक्तपिढीचे चेअरमन डॉ. नंदकिशोर तातेड, हिंदुजा हॉस्पिटलचे डॉ. आनंद देशपांडे, डॉ. राजेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

असे चालते सोसायटीचे काम

अर्पण थॅलेसेमिया सोसायटीमार्फत सहकार्याने सविता देसाई हॉस्पिटलमध्ये तीन वर्षापूर्वी थॅलेसेमिया केअर सेंटर सुरू केले. या सेंटरमध्ये आजमितीला १८१ थॅलेसेमिया पीडीत पेशंट्सवर मोफत उपचारांबरोबरच अतिसुरक्षित नॅट टेस्टेड रक्ताचाही मोफत पुरवठा केला जातो. तीन वर्षात ८ हजोपेक्षा जास्त रक्तपिशव्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे रक्तसंक्रमणाच्या या प्रक्रियेत एकही पेशंट एचआयव्ही बाधित नाही. अत्यंत सेवाभावी पध्दतीने चालविल्या जाणारा हा उपक्रम आता एक रोल मॉडेल म्हणून पुढे आला आहे.

सोसायटीचा बहुमान

अर्पण थॅलेसेमिया सोसायटीमार्फत सेवाभावी वृत्तीने थॅलेसेमिया पीडितांवर मोफत उपचार केले जात आहेत. सोसायटीच्या याच कामाची पावती राष्ट्रीय परिषदेत मिळाली. हा आम्ही मोठा बहुमान समजतो. पेशंटची संख्या दिवसागणिक वाढतेच आहे आणि त्यासाठी दात्यांचेही सहकार्य लाभते आहे.

- डॉ. नंदकिशोर तातेड, चेअरमन, अर्पण रक्तपेढी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूररोडवरून व्यक्ती बेपत्ता

$
0
0

नाशिक : गंगापूर रोड येथील रहिवाशी राजू दत्तात्रय कदम (५०) हे नमित अपार्टमेंट येथून १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता बेपत्ता झाले आहेत. कदम यांची उंची ५ फुट आहे. सावळा रंग, बारीक मिशी, मध्यम बांधा, अंगात चौकटी लाल रंगाचा शर्ट व पॅन्ट परिधान केलेल्या कदम यांच्या बाबत काही माहिती समजल्यास गंगापूर रोड पोलिस स्टेशनमध्ये संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्थाचालक एकवटणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक भगवान सूर्यवंशी यांच्या कारभाराविरोधात आता शहरातील सर्व शिक्षण संस्थाचालक एकवटणार आहेत. त्यासंदर्भात येत्या शनिवारी पेठे हायस्कूलमध्ये महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

उपसंचालक सूर्यवंशी हे अपमानास्पद भाषा वापरण्यासह ७५ ते १०० वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षण संस्थांबाबतही बदनामीकारक बोलत असल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात मराठा विद्या प्रसारक संस्थेने थेट शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह शिक्षक आमदारांकडेही तक्रार केली आहे. त्यामुळे सूर्यवंशी यांचा कारभार चर्चेचा विषय बनला आहे. दि न्यू एज्युकेशन सोसायटीनेही सूर्यवंशी यांच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या साऱ्या प्रकाराची दखल घेत नाशिक शहर शिक्षण संस्थाचालकांच्या संघाने येत्या शनिवारी पेठे हायस्कूलमध्ये विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. मविप्र, दि एज्युकेशन सोसायटी, नाशिक एज्युकेशन सोसायटी यांच्यासह एकूण २३ संस्था या संघाच्या सभासद आहेत. या संस्थांचे पदाधिकारी या बैठकीला येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर यांनी दिली आहे. दरम्यान, सूर्यवंशी यांचे निलंबन करण्याचा ठरावही या बैठकीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

कुठल्याही अधिकाऱ्याने शिक्षण संस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, वशिल्याद्वारे व्यक्तीची नेमणूक करण्याचे निर्देश दिले, तर तातडीने अँटी करप्शन ब्युरोशी संपर्क साधावा. त्याची तत्काळ दखल घेण्याची ग्वाही ब्युरोने दिली आहे.

- मनोज पिंगळे, सचिव, नाशिक शहर शिक्षण संस्थाचालक संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अशोकनगरमध्ये सिलिंडरला आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

अशोकनगर भागातील जाधव संकुलमध्ये असलेल्या होळकर चौकातील वसंत वन-विहार अपार्टमेंटमधील काशिनाथ भामरे यांच्या घरगुती सिलिंडरला पहाटे सहाच्या सुमारास आग लागली. यावेळी अग्निशमन दलास तात्काळ कळविण्यात आले. मात्र, शेजारील तरुणाने प्रसंगावधान राखत सिल‌िंडरचा रेग्युलेटर वेळीत बंद केल्याने संभाव्य धोका टळला.

सिलिंडरला आग लागल्यानंतर दोनपैकी वापरात येणाऱ्या एका सिलिंडरचा रेग्युलेटरला जळून खाक झाला. परंतु, याप्रसंगी शेजारीच राहणाऱ्या युवकाने रेग्युलेटरचे कनेक्शन बंद केले. तसेच अग्निशमन दलाचे जवान देखील घटनास्थळी दाखल होत पाण्याचे फवारे मारून त्यांनी सिलिंडर थंड केले. यानंतर गॅस कंपनीचे कर्मचाऱ्यांनी सिलिंडरची पहाणी करत याची खात्री करूनच भामरे यांना सिलिंडर परत करण्यात आले. लागलेल्या आगीत मात्र वापरात असलेल्या सिलिंडरचे रेग्युलेटर पूर्णपणे जळून खाक झाले. वापरात असलेल्या सिलिंडरच्या रेग्लुलेटरमध्ये लिकेज असल्याने आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केला. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे ए. यू. जाधव, एस. आर. जाधव, जी. एम. अवसरकर, व्ही. एम. स्वामी आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिकेचा बड्यांना दणका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने मंगळवारी शहरात पुन्हा धडक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. एबीबी सर्कल ते महात्मानगर आणि भोसला कॉलेज ते कॅनडा कॉर्नपर्यंतची ४७ अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. तर व्यावसायिकांनी रस्त्यावर लावलेली ९३ फलके काढण्यात आली. कॉलेजवरील बिग बाजारच्या बाहेर पॅसेजमध्ये उभारलेले रेस्टॉरन्ट पाडण्यात आले. तसेच महात्मा नगरमधील झायकॉन हॉस्पिटलचे अतिक्रमण पाडण्यात आले.

पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याने अनेक दिवसापासून थंडावलेली अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला मंगळवारी पुन्हा चालना मिळाली. महापालिकेला ४० पोलिसांचा बंदोबस्त मिळाला. यानंतर महापालिकेच्या चार विभागाच्या पथकांनी मंगळवारी सर्कल ते महात्मानगर, भोसला कॉलेज ते कॅनडा कॉर्नर आणि शांती हॉटेलपर्यंची अनधिकृतपणे व्यावयायिकांनी केलेली अतिक्रमणे पाडून टाकलीत. यात शेड, ओटे आणि फलक यांचा समावेश आहे. जवळपास ४७ ओटे आणि शेड हटविण्यात आलेत. तर ९३ फलक जप्त करण्यात आले. यात व्यावसायिक अतिक्रमणांचा जास्त समावेश आहे. महापालिकेच्या ६० कर्मचारी, दोन जेसीबी आणि चार ट्रक असा फौजफाटा या मोहिमेसाठी वापरण्यात आला.

बिग बाजार मॉलचे अतिक्रमण काढले

महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कॉलेजरोडवरील बिग बाझार मॉलतर्फे करण्यात आलेले अतिक्रमणही काढले. मॉल्सतर्फे ओटा बांधून त्यावर शेड टाकून रेस्टॉरन्ट सुरू करण्यात आले होते. महापालिकेच्या पथकाने हे रेस्टॉरन्टसह शेड हटविला. बिग बाजारप्रमाणेच महात्मानगरमधील झायकॉन हॉस्पिटलचेही अतिक्रमण काढण्यात आले.

वादानंतर पोलिस बंदोबस्त

अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला बंदोबस्त मिळत नसल्याने कारवाई बंद असल्याची माहिती मनपा आयुक्तांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर दिले होते. त्यावरून आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्यातच वाद झाला होता. पालकमंत्र्यांनी पोलिस आयुक्तांना पोलिस बंदोबस्त पुरवण्याचे आदेश दिले. पोलिस आयुक्तांनी बंदोबस्त उपलब्ध करून दिल्यानंतर ही कारवाई पुन्हा सुरू करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्किल इंडिया’ची मोहीम भरकटली!

$
0
0

भावेश ब्राह्मणकर, नाशिक

देशभरात स्किल इंडिया ही महत्त्वाकांक्षी मोहीम राबविली जात आहे. मात्र, तिची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होताना दिसत नाही. त्यामुळेच ही मोहीम भरकटली असल्याची खंत युनेस्को एथिक्स एज्युकेशन स्किल इंडियाचे डॉ. ई. मोहनदास यांनी 'मटा'कडे बोलून दाखविली. सर्वप्रथम विद्यार्थ्यांऐवजी शिक्षकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण द्यायला हवे, असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले.

आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कार्यक्रमासाठी आले असताना, त्यांनी स्किल इंडिया मोहिमेच्या अंमलबजावणीतील त्रुटीही स्पष्ट केल्या. केंद्रात सरकार आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्किल इंडिया मोहिमेची घोषणा केली. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्देश दिल्यानंतर देशातील सर्वच विद्यापीठांमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्याद्वारेच ठराविक तासांचे प्रशिक्षण किंवा लेक्चर आयोजित करण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, ही मोहीम भरकटली असल्याचे स्पष्ट मत डॉ. मोहनदास यांनी व्यक्त केले. खरे तर ही मोहीम अतिशय महत्त्वाची आहे. आज शिक्षण आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रात मोठी दरी निर्माण झाली आहे. त्यामुळेच बेरोजगारांची संख्या एकीकडे वाढताना दिसत आहे तर उत्तम आणि योग्य मनुष्यबळ मिळत नसल्याची चिंता उद्योगातून व्यक्त होत आहे. या दोन्ही क्षेत्रांना जोडण्यासाठीच ही मोहीम आहे. मात्र, या मोहिमेच्या अंमलबजावणीत अनेक त्रुटी राहिल्याचे डॉ. मोहनदास यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, स्कील इंडिया या मोहिमेचे रुपांतर स्कम इंडियात होत असल्याचा खुलासा नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या चिफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरनेच केला आहे. आता डॉ. मोहनदास यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने ही मोहीम वादात सापडण्याची चिन्हे आहेत.

हे करायला हवे

सध्या ठराविक तासांचे लेक्चर किंवा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले जात आहेत. यातून त्यांचा कौशल्य विकास होणार नाही. तर, सर्वप्रथम शिक्षकांना प्रशिक्षित करायला हवे. या प्रशिक्षित शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवायला हवेत. ज्यात समूह चर्चा, परिसंवाद, चर्चासत्र यांचा समावेश असायला हवा. विद्यार्थ्यांना विविध प्रश्न आणि समस्या देवून त्या सोडविण्याची त्यांची कौशल्ये जाणायला हवेत. ही निरंतर प्रक्रिया असल्याने एका दिवसातून किंवा एक प्रमाणपत्र देवून विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास साधला जाणार नसल्याचे डॉ. मोहनदास यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्यात ५ एप्रिलपर्यंत लिलाव बंद

$
0
0

येवला : शुक्रवारची अमावस्या, शनिवारचा गुढीपाडवा, रविवारची साप्ताहिक सुट्टी अन् मंगळवारपासून पुढील महिन्यातील ५ तारखेपर्यंत मार्च एंडचा हिशेब पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांचा बंद यामुळे सोमवारी येवला कृषी उत्पन्न बाजार समिती व अंदरसूल उपबाजार आवार लाल, उन्हाळ कांदा, मका आदींच्या आवकेने गजबजून गेले होते.

येवला मुख्य आवारात लाल व गावरान अर्थातच उन्हाळ कांद्याची तब्बल ९०० च्या वर ट्रॅक्टरमधून जवळपास २६ हजार क्विंटल कांदा आवक झाली. तर, अंदरसूल उपबाजार आवारात ७०० च्या आसपास पीकअपमधून सुमारे १० हजारच्या वर लाल व उन्हाळ कांदा विक्रीसाठी आला होता. आवक वाढल्यामळे जवळपास दोनशे ट्रॅक्टर शिल्लक राहिले. येवला मुख्य आवारात लाल कांद्याला किमान ३०० ते कमाल ९५१ व सरासरी ८०० रुपये, उन्हाळ अर्थातच गावरान कांदा किमान ५०० ते कमाल ९९८ व सरासरी ८१० रुपये भाव मिळाला. अंदरसूल उपबाजारात लाल कांदा किमान ३०० ते कमाल १०३५ व सरासरी ८७० रुपये व उन्हाळ कांद्याला किमान ४०० ते कमाल १०३० व सरासरी ८५० रुपये भाव मिळाला. गेल्‍या आठवड्यात येवल्यात लाल कांद्याला किमान ५०० ते कमाल ११६१ व सरासरी ९५०, तर उन्हाळ कांद्याला किमान ५०० ते कमाल ११२४ व सरासरी ९७५ रुपये बाजारभाव मिळाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा दरात ५५० रुपयांची घसरण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, लासगलाव

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत चालू सप्ताहात लाल कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. या महिन्यात १ हजार ५८७ रुपयांपर्यंत गेलेले लाल कांद्याचे भाव पाचशे रुपयांनी घसरले आहेत. १४५० रुपयांपर्यंत असणारे सरासरी बाजारभावही सुमारे साडेपाचशे रुपयांनी घसरून ९०० रुपये प्रती क्विंटलपर्यंत खाली आले आहेत.

अवकाळी पावसाने व गारपिटीने कांद्याची प्रतवारी खराब होण्याच्या शक्यतेने शेतकरी कांदा विक्रीसाठी गर्दी करताना दिसत आहे. परिणामी जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची बंपर आवक होत असून, बाजारभावात घसरण सुरू झाली आहे. या भाव घसरणीमुळे कांदा उत्पादकांना आर्थिक चिंता सतावू लागली आहे. जानेवारी महिन्यात लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याची सुमारे ४ लाख ५१ हजार ३०२ क्विंटलची आवक झाली होती. जानेवारीत १६७४ रुपयांच्या उच्चांकी व सरासरी १३०१ रुपये प्रती क्विंटल दराने कांदा विक्री झाला होता. फेब्रुवारीमध्ये ४ लाख ५० हजार ५१३ क्विंटल आवक होऊन मोसमातील सर्वाधिक १७५१ रुपयांचा भाव लाल कांद्याला मिळाला होता. फेब्रुवारीत सरासरी भाव १४०६ रुपये राहिले होते. तर चालू मार्च महिन्यात लासलगाव बाजार समितीत आतापर्यंत ३ लाख क्विंटल लाल कांद्याची आवक झाली असून सरासरी बाजार भावात सुमारे पाचशे रुपयांची घसरण झाली आहे. चालू महिन्यात लाल कांद्याला १५८७ रुपयांचा उच्चांकी व १२६४ रुपयांचा सरासरी भाव मिळाला होता. त्यातुलनेत चालू सप्ताहात कांद्याच्या दरात जोरदार घसरण झाली आहे.

सलग नऊ दिवस सुट्ट्या

मार्च एंड व सलग सुट्ट्यांमुळे बाजार समिती २८ मार्च ते ५ एप्रिल असे सलग ९ दिवस बंद राहणार आहे. या बंदच्या परिस्थितीतच पुन्हा एकदा अवकाळी पाऊस व गारपिटीचा धोका असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यामुळे कांदा उत्पादकांपुढे दुहेरी आव्हान उभे राहिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूचा उपसा महसूलला फटका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

तालुक्यातील वरखेडा व करभेळ गावाशेजारी आणि वेरूळाची झरी या ठिकाणी तांबडी नदीतून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा करण्यात येत आहे. महसूल आणि पोलिस खात्याच्या डोळेझाकमुळे वाळू माफियांचे चांगलेच फावले आहे.

येथील तांबडी नदीचा पाच वर्षापूवी वाळू लिलाव करण्यात आला होता. परंतु, पाच वर्षात लिलाव न झाल्यामुळे लाखो शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला. मात्र, लिलाव न होताही वाळू माफिया लखपती होत आहेत. त्याकडे पोलिस व महसूल विभाग सोयीस्कररित्या दुर्लक्ष झाले आहे. तांबडी नदीपात्रातून दिवसा आणि रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात चोरटी वाहतुकीने वाळू उपसा होत आहे. वाळू उपसा होत असल्याने नदीपात्रालगतच्या विहिरींच्या पाण्याची पातळी खालावत चालल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. मात्र वाळू सम्राटाचे चांगलेच फावले आहे. ते सर्रास वाळू उपसा करून मालामाल होत आहेत. यामुळे वाळूचा धंदा तेजीत आला आहे. नदीपात्रात वाळू उपसामुळे ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. वाळू उपसा झाल्यामुळे परिसरातील गावातील विहिरी तळ गाठत आहेत. त्यामुळे अवैध वाळू उपसा बंद करण्याचे यंत्रणेसमोर आव्हान उभे ठाकले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एफडीए’कडून बर्गरचे सॅम्पल जमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

कॉलेजरोडवरील सिनेमॅक्स सिनेमागृहात चित्रपट बघण्यासाठी गेले असतांना तेथील हॉटेलमधून खरेदी केलेल्या बर्गरमध्ये रबराचा तुकडा निघाल्याची तक्रार मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने मंगळवारी अन्य बर्गरचे सॅम्पल जमा केले. बर्गरमध्ये रबराचा तुकडा निघाल्याचे वृत्त 'मटा'ने प्रसिद्ध केले होते.

सिनेमॅक्समध्ये चित्रपटाच्या इंटरव्हलच्यावेळी तेथील हॉटेलमधून नीलेश कासार आणि पवन चितमलकर यांनी बर्गर खरेदी केले होते. दरम्यान याच बर्गरमध्ये तीन इंजांचे रबराचे तुकडे निघाल्याने त्यांनी संबंधित हॉटेलचालक व सिनेमॅक्स व्यवस्थापक यांच्याकडे तक्रार केली. तसेच 'एफडीए'कडेही जाऊन लेखी तक्रार करण्यात आली होती. याबाबत 'मटा'ने बर्गरमध्ये रबराचा तुकडा सापडल्याचे वृत्त मंगळवारी प्रसिद्ध केले. 'एफडीए'च्या अधिकाऱ्यांनी सिनेमॅक्सच्या हॉटेलमधील बर्गरचे सॅम्पल ताब्यात घेतले. याबाबत हॉटेलमध्ये तपासणी करून वरिष्ठांकडे अहवाल देणार असल्याचे 'एफडीए' सूत्रांनी सांगितले. परंतु, नामांकित असलेल्या सिनेमागृहात बर्गरमधून अशा प्रकारे रबराचे तुकडे निघाल्याने अनेकांनी आर्श्चय व्यक्त केले आहे. जप्त केलेल्या सॅम्पलवरून पुढील तपास 'एफड‌ीए'च्या अधिकाऱ्यांना करता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थानंतर शहरातील मिळकतींचा पुन्हा सर्व्हे

$
0
0

नाशिक : महापालिकेची परवानगी न घेताच शहरात तब्बल ८,६९८ इमारती उभ्या असून, वापरात असलेल्या या इमारतींकडून करवसुली होत नसल्याचे उघड झाले आहे. या प्रश्नावर आमदार देवयांनी फरांदे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यावर नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी या प्रकरणात भ्रष्टाचार असल्यास दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले आहे. सोबतच सिंहस्थानंतर महापालिकेला सर्व्हेक्षण करण्याचे आदेश देण्यात येतील, अशी माहिती सभागृहात देण्यात आली.

शहरात बांधकाम विभागाकडून पूर्णत्वाचे दाखले न घेताच इमारतीचा वापर सुरू असल्याबद्दलचा तारांकित प्रश्न आमदार फरांदे यांनी विधानसभेत विचारला. महापालिका उपायुक्तांसह मिळकत विभागातील अधिका-यांनी यात भ्रष्टाराचार केल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावर आज सभागृहात नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी उत्तर दिले असून, महापालिका हद्दीत ८,६९८ इमारतींना पूर्णत्वाचे दाखले दिले नसल्याचा खुलासा केला. यात काही अधिका-यांनी भ्रष्टाचार केल्याचे आढळल्यास तपासणी करण्याचे आश्वासनही पाटील यांनी दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनसेच्या टेकूने राष्ट्रवादीला संजीवनी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्थायी सभापतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मागील तीन वर्षांपासून एकमेकांना लपून छपून मदत करणारी मनसे-राष्ट्रवादी-काँग्रेस अशी महाआघाडी प्रथमच एकत्रित पालिकेत सत्तेत आल्याने सत्तेचे त्रांगडे पूर्ण झाले आहे. शिवाय, मनसेच्या टेकूने दहा वर्षानंतर प्रथमच राष्ट्रवादीला शहरात संजीवनी मिळाली आहे. तर आपणही इतर पक्षांपेक्षा वेगळे नसल्याचे मनसेने यानिमित्ताने दाखवून दिले आहे.

तीन वर्षांपूर्वी झालेल्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. मनसे मोठा पक्ष असल्याने राज ठाकरे यांनी सत्ता मिळविण्यासाठी राष्ट्रवादीशी असलेले संबंध वापरत भाजपच्या मदतीने सत्ता मिळवली. दुसऱ्या टर्ममध्ये भाजपला धोबीपछाड करून राष्ट्रवादी आणि काँग्रेसची थेट मदत घेवून सत्ता मिळवली. मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि अपक्षांची महाआघाडी स्थापन झाली असली तरी सत्तेत मात्र मनसे आणि अपक्ष वगळता राष्ट्रवादी आणि काँग्रेसला वाटा मिळाला नव्हता. मात्र, मंगळवारी राष्ट्रवादीने मनसेच्या मदतीने थेट स्थायीचे सभापतीपद मिळ‍वून सत्तेत वाटा मिळवला आहे. सत्ताधारी मनसेने उमेदवार न दिल्याने राष्ट्रवादीचा विजय सोपा झाला होता. चुंभळे यांच्या निवडीने महापौर मनसेचा, उपमहापौर शहर विकास आघाडीचा तर स्थायी समितीचे सभापतीपद राष्ट्रवादीकडे गेल्याने काँग्रेस वगळता महाआघाडीतल्या सर्वांना सत्तेत वाटा मिळाला आहे. त्यामुळे कधीकाळी एकमेकांचे शत्रू असलेले पक्ष सत्तेसाठी एकत्र आले आहेत.

महापालिका निवडणुकीत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची नक्कल करून दाखवली होती. आता त्याच ठाकरेंच्या पक्षांने नाशिकमध्ये राष्ट्रवादीला संजीवनी दिली आहे. मनपा निवडणुकीत केवळ २० जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीने मनसेशी तडजोड करून स्थायी सभापतीचे महत्त्वपूर्ण पद मिळवले आहे. सोबतच मनसेला राष्ट्रवादीशिवाय पर्याय नसल्याचे सांगत, मनसेच्या बळावर महापालिकेत हा पक्ष सत्तेत सहभागी झाला आहे. एकमेकांविरूद्ध आरोपांची राळ उठवण्यासह समोरासमोर भिडणारे मनसे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महापौरांच्या रामायण बंगल्यावर मंगळवारी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून गुलालाची उधळून करीत होते. विजयाच्या नशेत कधीकाळी एकमेकांचे दुश्मन असल्याचे भानही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नव्हते. तडजोडीच्या या राजकारणाचा राष्ट्रवादीला फायदा होणार असून, मनसेला मात्र हा सौदा घाट्यात नेवून ठेवणारा आहे.

काँग्रेसची पुन्हा फरफट

राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसची पुन्हा फरफट झाली आहे. निवडणुकीच्या शेवटपर्यंत काँग्रेसच्या दोन सदस्यांसह पदाधिकाऱ्यांमध्ये फूट होती. अखेरच्या क्षणी राहुल दिवे यांनी परिस्थितीचे भान ठेवून राष्ट्रवादीला पाठिंबा दिला असला तरी सत्तेत सन्मानाची वागणूक मिळाली नसल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.

तिजोरीची चावी भुजबळांकडे

महापालिकेतील सत्तेचा रिमोट कंट्रोल आता कृष्णकुंजपाठोपाठ भुजबळ फार्महाऊसवर गेला आहे. महापौर मनसेचा असला तरी मनपाची तिजोरी ही राष्ट्रवादीच्या हातात आहे. त्यामुळे मनसेला योजना राबविण्यासाठी राष्ट्रवादीकडेच हात पसरावे लागणार आहेत. त्यासाठी भुजबळ फार्महाऊसच्या मंजुरीची गरज भासणार आहे.

झेडपी अन् महापालिकेच्याही चाव्या!

शिवाजी चुंभळे यांनी पश्चिम मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे आमदारकी लढवली होती. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आमदारकी मिळाली नसली तरी महापालिकेतील महत्त्वपूर्ण स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या राजकीय पदाला गवसणी घातली आहे. चुंभळे यांच्या स्नुषा विजयश्री चुंभळे यांनी पालिकेतच चुंभळे यांचे औक्षण केले. विजयश्री जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. ग्रामीण भागाच्या विकासाचा गाडा हाकण्याची जबाबदारीही या रुपाने चुंभळे कुटुंबीयांकडेच आहे. आता महापालिका तिजोरीच्या चाव्याही त्यांच्या हाती गेल्या आहेत. त्यामुळे एकाच वेळी ग्रामीण भागासह शहरी भागाचे नेतृत्व करण्याची संधी चुंभळे कुटुंबीयांना मिळाली आहे. दरम्यान, मराठा समाजाचे विरोधक हा कथित शिक्का पुसण्यासाठीच भुजबळांनी मराठा समाजाकडे महत्त्वाची पदे देण्याचा सिलसिला सुरू केल्याचे मानले जात आहे.

महापालिकेतील सर्व नगरसेवकांना सोबत घेवून शहर विकासाला प्राधान्य देणार आहे. सिंहस्थाच्या नियोजनासह साधूसंताना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सर्वच जण एका विचाराचे असून, नाशिकच्या विकासाची जबाबदारी आमच्यावर आहे. सर्वांनाबरोबर घेवून पुढील काळात काम करणार आहे.

- शिवाजी चुंभळे, नवनिर्वाचित सभापती, स्थायी समिती

राजकारणात काहीही घडू शकते. इथे कोणी-कोणाचा कायमचा मित्र वा शत्रू नसतो. मनसे, राष्ट्रवादी आणि अपक्ष शहराच्या विकासाठी एकत्र आले आहेत. यावर आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही.

- अशोक मुर्तडक, महापौर, नाशिक

मनसेला कधीकाळी जातीयवादी पक्ष म्हणणारे काँग्रेस, राष्ट्रवादी आता सत्तेत सहभागी झाल्याने त्यांचे खरे रुप उघड झाले आहे. दलितांच्या जीवावर राजकारण करणाऱ्या या दोन्ही पक्षांनी आरपीआयला मदत करायला हवी होती. सत्तेसाठी या पक्षांनी आपल्या विचारांना तिलांजली दिली आहे. नाशिकची जनता त्यांना माफ करणार नाही.

- अजय बोरस्ते,

महानगरप्रमुख शिवसेना, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरवलेल्या चावीच्या मदतीने घरफोडी

$
0
0

म टा. प्रतिनिधी, ना​शिक

हरवलेल्या चावीच्या मदतीने चोरट्यांनी बंद घराचे लॉक उघडून आतील १२ तोळे वजनाचे दागिने व रोख ५१ हजार रुपये असा मुद्देमाल लंपास केला. इंदिरानगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत २२ मार्च रोजी हा प्रकार घडला.

फिर्यादीच्या दरवाजच्या लॉकची चावी काही दिवसांपूर्वी हरवली होती. २२ मार्च रोजी फिर्यादी पावणेपाच ते रात्री सव्वानऊ वाजेच्या दरम्यान बाहेर गेले असता चोरट्यांनी त्याच चावीच्या मदतीने दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. तसेच, घरातील १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख ५१ हजार रुपये असा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. घरफोडीचे प्रकार वाढतच असून शहर पोलिसांपुढे चोरट्यांना पकडण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

फ्लेक्सप्रकरणी गुन्हा

रामनवमीनिमित्त फ्लेक्सबोर्ड लावून कायद्याचे उल्लंघन केले म्हणून पोलिसांनी फ्लेक्स लावणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राजीवनगर चौफुली येथे श्रीराम मंदिर सेवा समितीद्वारे आयोजित श्रीराम नवमीबाबत हा फ्लेक्स लावण्यात आला होता. फ्लेक्स लावणाऱ्यांनी महापालिका अथवा पोलिस विभागाची परवानगी घेतली नसल्याने संशयितांविरोधात महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्यातील कलम तीननुसार इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेचा मृत्यू

स्वाइन फ्लूसदृश आजारावर उपचार घेणाऱ्या निर्मला मुन्ना चव्हाण (वय ३८) यांचा सोमवारी दुपारी मृत्यू झाला. पखालरोडवरील तन्विक रेसिडेन्सी येथे राहणाऱ्या चव्हाण यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रीरामपूरमधील संशयित तोतया पोलिस ताब्यात

$
0
0

नाशिक : उपनगर आणि सरकारवाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत हैदोस घालून फरार झालेल्या तोतया पोलिसांपैकी काही संशयितांना शहर पोलिसांनी श्रीरामपूरमधून ताब्यात घेतले आहे. मात्र, फिर्यादीने त्यांना ओळखले नाही. उपनगर येथे झालेल्या घटनेतील संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. पण, ते फुटेज खूपच अस्पष्ट असल्याने आरोपींची ओळख पटवणे पोलिसांना ​जिकरीचे झाले आहे.

तोतया पोलिसांनी सोमवारी रमेश दत्तात्रय देशपांडे (७३, हरिनिवास, ओ विंग, आनंदनगर) यांना लुटले. तसेच सरकारवाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका दाम्पत्याकडील सोन्याचे दागिने लंपास केले. या प्रकरणी उपनगरसह सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या. यानंतर पोलिसांनी जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे छापा मारून संशयितांना ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोरांवरील कारवाईचे अस्त्र म्यान

$
0
0

अरविंद जाधव, ना​शिक

लाचखोरी करताना अॅन्टी करप्शन ब्युरोच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून देखील नाशिक विभागातील १२ कर्मचाऱ्यांना संबंधित विभागाने 'अभय' दिल्याचे समोर आले आहे. यात नाशिक जिल्ह्यातील दोन, जळगाव जिल्ह्यातील पाच, धुळे जिल्ह्यातील चार आणि अहमदनगरमधील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. लाचखोरीच्या गुन्ह्यात अटक करून कर्मचाऱ्यांना निलंबित केले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

याबाबत माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, आम्ही या सर्व प्रकरणाचा अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करीत आहोत. त्यामुळे मागील तीन महिन्यात १५ संशयितांना कामातून निलंबित करण्यात आले. मात्र, अजूनही १२ संशयित संबंधित विभागात काम करीत आहेत. सरकारी पातळीवरील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी एसीबीमार्फत अनेक उपाययोजना राबवल्या जातात. जनजागृती हा त्यातला महत्वाचा भाग आहे. लाचखोरीचा आरोप असलेल्या एखाद्या कर्मचाऱ्यावर त्याच्या विभागामार्फत कोणतीच कारवाई झाली नाही​ तर इतर कर्मचाऱ्यांमध्ये वेगळा संदेश जातो, असेही एसीबीच्या या अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील दोघा कर्मचाऱ्यांवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. यातील एक प्रकरण गत वर्षातील ऑक्टोबर महिन्यातील आहे. गटविकास अधिकारी राजाराम मोहिते यांना चार हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने अटक केली होती. दिंडोरी तालुक्यातील करंजवण येथील पंचशीलनगरमधील ड्रेनेजलाइन टाकण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्याचे हे प्रकरण होते. यानंतर, येवल्या तालुक्यातील उपप्रादेशिक अधिकारी रामसिंग सुलाने यांना १५ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने अटक केली होती. या दोन्ही अधिकाऱ्यांना अद्याप निलंबित केले गेले नसल्याची एसीबीकडे नोंद आहे.

१३४ लाचखोरांना अजूनही अभय

राज्यभरात लाचखोरीत अटक करूनही निलंबित न केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या सध्या १३४ पर्यंत पोहचली आहे. यातील २५ कर्मचारी महसूल विभागाशी संबंधित आहेत. तर, २१ शिक्षण, १९ जिल्हा परिषद व पंचायत समिती अशा विविध विभागात कार्यरत आहेत. विशेष म्हणजे लाचखोरीच्या आरोपानंतरही निलंबनापासून दूर पळणाऱ्या १३४ कर्मचाऱ्यांपैकी २३ कर्मचारी क्लास वन वर्गातील आहेत. २१ कर्मचारी वर्ग दोनमधील, ६४ कर्मचारी वर्ग तीनमधील तर चतुर्थ श्रेणीतील २२ कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासन झाले जागे; कारवाईसाठी सरसावले

$
0
0

म. टा. प्र‌तिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्सने वृत्त मालिकेच्या माध्यमातून वाळू तस्करीमागील गौडबंगाल चव्हाट्यावर आणताच जिल्हा प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. नांदगाव तहसीलदारांनी धोटाणेजवळ वाळू माफियांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर सोमवारी रात्री नाशिकचे तहसीलदारही रस्त्यावर उतरले. बेकायदा वाहतूक करणाऱ्या दोन वाळूच्या आणि सहा मुरुमाच्या गाड्या पकडण्यात आल्या. जिल्ह्यात केवळ वाळूची नव्हे तर मुरुमाचीही तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार या कारवाईतून उघडकीस आला आहे.

'वाळू'चे वळू या वृत्त मालिकेद्वारे महाराष्ट्र टाइम्सने वाळू व्यवसायातील अनागोंदीवर प्रकाश टाकला आहे. सरकारी बाबूंच्या पायचेप्या धोरणामुळे राज्य सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. एकीकडे सरकारी बाबू वाळू माफियांशी अर्थपूर्ण संबंधांच्या माध्यमातून मलईवर ताव मारीत आहेत. तर, दुसरीकडे वाळू माफियाही गब्बर झाले आहेत. हा सर्व प्रकार चव्हाट्यावर आल्यामुळे जिल्हा प्रशासनातील सरकारी बाबूंचे धाबे दणाणले आहे. त्यामुळेच त्यांनी रस्त्यावर उतरून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. नांदगावचे तहसीलदार सुदाम महाजन यांनी अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडल्यानंतर त्यापाठोपाठ नाशिकचे तहसीलदार गणेश राठोड यांनी मुंबई-नाशिक महामार्गावर विल्होळी येथे पथकासह जाऊन कारवाई केली. त्यामध्ये वाळूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या एमएच १५ डीके ००६२ आणि एमएच १८ एए ७३४४ या दोन गाडया पकडण्यात आल्या. त्यांच्याकडून अनुक्रमे दीड लाख आणि ९० हजार रुपये असा दोन लाख चाळीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांच्या पथकाला अवैधरित्या मुरुमाची देखील चोरी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे साधूग्रामसाठी हा मुरूम वाहून नेला जात असल्याची माहिती संबंधितांकडून राठोड यांना देण्यात आली. मात्र त्याबाबतची सत्यासत्यता पडताळल्यानंतर या मुरुमाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले. एमएच १५ बीके ६९७६, एमएच १५ बीके २८५१, एमएच १५ सीके ९५४१ यांसह आणखी तीन वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. त्यांमध्ये ३० ब्रास एवढा मुरूम आढळून आला आहे. विल्होळी जवळील सारूळ गावातून हा मुरूम आणला जात होता. विल्होळी, सारूळ आणि सातपूर परिसरात ही वाहने पकडण्यात आली. याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौन खनिजांची अवैध वाहतूक करणाऱ्या ३५ वाहनांकडून ६५ लाखांचा दंड वसूल केल्याची माहिती राठोड यांनी दिली.

गाढवांना तर सोडा

कोपरगावमध्ये वाळू ठिय्यांपासून ठराविक अंतरापर्यंत वाळू वाहण्यासाठी गाढवांची मदत घेतली जाते. नंतर ही वाळू गाडीमध्ये भरून नाशिकमध्ये आणली जाते. काही वर्षांपूर्वी एका तहसीलदाराने प्रती गाढव दरमहा पाचशे रुपये हप्ताही सुरू केला होता. नगर जिल्ह्यातील एका मंत्री महोदयांच्या मुलाच्या कानावर हा विषय गेला. तेव्हा गाढवांना तर सोडा, असे म्हणत त्याने संबंधीत तहसिलदाराची कान उघाडणी केली होती, असे सांगितले जाते.

सफेद हत्ती आला रे

प्रत्येकवेळी पैसे उकळून गाड्या सोडल्या जातातच असे नाही. काहीवेळा महसूल, आरटीओ तसेच पोलिसांकडून कारवाईचा बडगाही उगारला जातो. वाळूमाफिया आणि वाहतूकदारांचे प्रतिनिधी रस्त्यावर ठिकठिकाणी थांबलेले असतात. सरकारी अधिकाऱ्यांचे पथक येताना दिसले की ते मोबाईलद्वारे संवाद साधून पुढच्या सहकाऱ्याला सावध करतात. गाडीचा क्रमांक व तत्सम माहिती कळविताना 'सफेद हत्ती आला रे' यासारखे सांकेतिक शब्द वापरले जातात.

नियमांचे सर्रास उल्लंघन

वाळूच्या तस्करीत होणाऱ्या सर्व आर्थिक व्यवहारामध्ये प्रादेशिक परिवहन विभागाचे त्या-त्या भागातील प्रतिनिधीही हात धुऊन घेतात. वाळू वाहतुकीदरम्यान नियमांचे सर्रास उल्लंघन होते. त्यांच्यावर अनेकदा रितसर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी वसुलीचा मार्ग अवलंबला जातो. नियमांवर बोट ठेऊन गाडी पोलिस स्टेशनला जमा करा अशी भीती घातली जाते. तसेच कारवाई टाळण्यासाठी बक्कळ मागणी केली जाते. दरमहा हप्त्या 'रतीब' सुरू असल्याने प्रादेशिक परिवहन विभागाकडूनही अवैध वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष केले जात आहे. सप्टेंबरपर्यंत लिलाव चालू असल्याने काही वाळूची रॉयल्टी भरून वाहतूक केली जाते. तर चोरीच्या वाळूची वाहतूक करण्यासाठी ठेकेदार आणि वाहतूकदार तहसीलदार तसेच प्रांताधिकाऱ्यांशी अर्थपूर्ण संबंध जुळवून घेतात. सप्टेंबरनंतर लिलाव बंद होतात. त्यामुळे त्यानंतर होणारी वाळूची वाहतूक बेकायदा ठरते. या काळात सरकारी बाबूंचे दर दुपटीने वाढतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images