Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

चांडक शाळेच्या विद्यार्थीनींचे यश

$
0
0
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या मातोश्री चंद्रभागाबाई व अयोध्याबाई चांडक कन्या विद्यालयातील विद्यार्थीनींनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवले. ‘सम्राज्ञी एज्युकेशन फाऊंडेशन’मार्फत ‘स्पर्धात्मक सामान्य क्षमता व संपादन’ परीक्षा घेण्यात आली होती.

‘प्रथम’च्या ‘असर’चा निष्कर्ष

$
0
0
‘प्रथम’ या शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या एनजीओच्या सर्व्हेक्षणानुसार नाशिक विभागामध्ये खासगी शाळांमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. हे प्रमाण ४५.९४ टक्के असल्याची माहिती संस्थेच्या असोसिएट मेधा कुळकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गुणवत्तापूर्ण उत्पादनासह मार्केटिंगही आवश्यक

$
0
0
‘एखादा उद्योग यशस्वी करण्यासाठी केवळ त्या उत्पादनाच्या गुणवत्तेकडे लक्ष देऊन चालणार नाही, तर त्याचे मार्केटिंगही योग्य प्रकारे होणे गरजेचे आहे,’ असा सल्ला महिला उद्योजकांनी दिला. ‘आयएमआरटी’मध्ये आयोजित ‘महिला उद्योजक’ विषयावरील चर्चासत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

‘मटा’तर्फे आज ‘जागर मनाचा’

$
0
0
परीक्षा संपल्यानंतर सुट्यांमध्ये शिबिर, भटकंती, मौजमजा, सिनेमा अशा एक ना अनेक योजना तरुणाई आखत आहे. तरीही करिअर आणि आयुष्याच्या भावी वाटचालीसाठी उपयोगी पडेल, असे 'व्हीजन' देणारी शंतनु गुणे यांची 'जागर मनाचा' ही कार्यशाळा 'महाराष्ट्र टाइम्स'ने आयोजित केली आहे.

व्हॅन-टेम्पो अपघातात पाच विद्यार्थी जखमी

$
0
0
मुंबईनाका ते द्वारका रस्त्यावर भाजीपाला घेऊन जाणाऱ्या टेम्पोने वडाळानाक्यावरील हॉटेल साई प्रीतमसमोर विद्यार्थ्यांना घेऊन जात असलेल्या व्हॅनला जबर धडक दिली. या अपघातात पाच विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मेघा लचके ठरल्या डायमण्ड ज्वेलरीच्या विजेत्या

$
0
0
अनपेक्षितपणे मिळालेले बक्षीस आणि चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद... ही अवस्था होती टाइम्स शॉपिंग फेस्टिवलमधील अंतिम विजेत्यांची. सलग तीन लकी ड्रॉमधून ग्राहकांवर बक्षिसांची बरसात केल्यानंतर ‘टाइम्स शॉपिंग फेस्टिवल’चा बंपर लकी ड्रॉ सोमवारी काढण्यात आला.

चैत्रोत्सव यात्रेची तयारी सुरू

$
0
0
साडेतीन शक्ती पीठापैकी अर्धे पीठ असलेल्या आदिशक्ती सप्तश्रुंग गड येथे चैत्रोत्सवानिमित्त १९ एप्रिलपासून यात्रा सुरू होत आहे. या यात्रेची तयारी सुरू झाली असून नियोजनासाठी सप्तश्रुंग गड येथे ट्रस्टच्या कार्यालयात प्रताधिकारी भीमराव शिंदे यांनी आढावा बैठक घेऊन त्वरित सर्व कामे मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.

जळगाव महापौरपदी किशोर पाटील बिनविरोध

$
0
0
जळगाव महापालिकेच्या महापौरपदी खान्देश विकास आघाडीचे नगरसेवक किशोर पाटील यांची आज झालेल्या विशेष सभेत बिनविरोध निवड करण्यात आली.

'राष्ट्रवादी'तर्फे गुटख्याची होळी

$
0
0
वाईट विचारांचा नाश करण्याच्या उद्देशाने केली जाणाऱ्या होळीचा आता राजकीय पक्षही लाभ उठवत आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीतर्फे मंगळवारी सकाळी शालिमार चौकात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह युवक, युवती, विद्यार्थी अशा सर्व आघाडीतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुटख्याची प्रतिकात्मक होळी करण्यात आली.

सुलभ शौचालयाची अंबड येथे मागणी

$
0
0
अनेक कंपन्यांचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या अंबड येथे सुलभ शौचालयाची व्यवस्था नसल्याने कामगार वर्गाचे प्रचंड हाल होत आहे. या कामगारांमध्ये अनेक महिला असून त्यांची सर्वाधिक कुचंबणा होत आहे.

‘जिंदाल’मधील आग सहा तासांनी आटोक्यात

$
0
0
जिंदाल पॉलिफिल्मस या इगतपुरी तालुक्यातील कंपनीत बुधवारी मध्यरात्री लागलेली आग सहा तासांनी आटोक्यात आली. या आगीविषयी कंपनीच्या सूत्रांकडून सारवासारव केली जात असली तरी अग्निशमन दलाने आगीच्या बातमीला दुजोरा दिला आहे. ही आग नेमकी कशाला लागली आणि त्यात किती नुकसान झाले याबाबतची माहिती मिळू शकली नाही.

घरचा आहेर

$
0
0
अनेकदा काही गोष्टी इतक्या अनपेक्षितपणे घडतात की आपल्याला त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हेदेखील कळत नाही. गंगापूर रोडवर असाच एक किस्सा झाला. परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये राहणारे महाशय नेहमीप्रमाणे रात्री घराकडे निघाले.

शिवजयंतीची जय्यत तयारी

$
0
0
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शनिवारी साजरी होत असून त्यानिमित्त परिसरातील विविध राजकीय पक्षांसह सार्वजनिक मंडळांच्या वतीने शिवजयंतीची जय्यत तयारी सुरू आहे. नाशिक, नाशिकरोड, सातपूर, सिडको परिसरात तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

स्थायीत दिसले उत्कंठेचे रंग

$
0
0
महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या ताब्यात ठेवणाऱ्या स्थायी समितीत वर्णी लागावी म्हणून इच्छुकांची होणारी घालमेल गुरुवारी सगळ्यांचेच लक्ष वेधणारी होती. यात काही जणांना अपेक्षितपणे तर काहींना अनपेक्षितपणे समितीत स्थान मिळाल्याने उत्सुकतेची अखेर जल्लोषाने झाली.

मार्केटयार्ड छे समस्यांचा बाजार

$
0
0
राज्याचा प्रमुख बाजारपेठेपैकी एक असलेल्या नाशिक मार्केट यार्डाला (कृषी उत्पन्न बाजार समिती) समस्यांनी ग्रासले आहे. बाजारातील मुलभूत गरजांकडे बाजार समितीचे पदाधिकारीही दुर्लक्ष करत असल्याचे येथील परिस्थितीहून लक्षात येते. त्यामुळे या परिसराला बजबजपुरीचे स्वरुप आले आहे.

सर्वसमावेशक शिक्षणव्यवस्थेची गरज

$
0
0
‘शिक्षणाच्या वाटेवर आताच्या काळात अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. तरीही, प्रत्येकाच्या आवाक्यात मनाजोगते शिक्षण नाही. यामुळे सर्वसमावेशक शिक्षणपध्दती ही काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी केले.

अंजना ठमकेला नॅनो कार प्रदान

$
0
0
राष्ट्रीय धावपटू अंजना ठमकेला नॅनो कार प्रदान करण्यात आली. जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या सोहळ्यात प्रख्यात धावपटू अंजना ठमकेला नॅनो कार दिली.

स्थायी सदस्यांची घोषणा

$
0
0
जवळपास महिनाभरापासून रिक्त असलेल्या महापालिकेतील स्थायी समितीच्या ११ सदस्यांची गुरुवारी निवड करण्यात आली. रिक्त ११ जागांसह १६ सदस्यांची घोषणा यावेळी करण्यात आल्याने सर्वांची नजर आता अध्यक्षपदाच्या निवडीकडे आहे.

चिऊताईला आसरा उड्डाणपुलाचा

$
0
0
पक्षीजगतात चिमण्यांचं एक वेगळं स्थान आहे. मानवी आयुष्यात तर चिमण्यांसाठी हळवा कोपरा कायम राखीव. बडबडगीतात चिमणी हमखास येतेच, शिवाय बाळाला ऐकवणाऱ्या पहिल्याच कथेत चिऊला पक्कं मेणाचं घर असतं. पण, काँक्रिटीकरणाच्या वाढत्या जंगलात चिऊताईचे घरच हरवत चालले आहे.

कर्मयोगातून आलेले कार्य प्रेरणादायी

$
0
0
‘व्यक्तीपेक्षाही तिच्या कार्याला विशेष महत्त्व असते. समाजात काही लोक प्रमाणाणिकपणे आपल्या कर्तव्यांला न्याय देतात. फळाची अपेक्षा न करता कर्मयोगातून आलेले हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरते,’ असे प्रतिपादन मॉडर्न कॉलेजचे माजी प्राचार्य मो. भा. लिमये यांनी केले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images