Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मंडल अधिकाऱ्याला धमकी

$
0
0


नाशिकरोडला वाळूमाफियांचा प्रताप; चालक-मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

वाळूची बेकायदा वाहतूक करणारा ट्रकचालक आणि मालकाने मंडल अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी देण्याची घटना नाशिकरोडला घडली. जिल्ह्यात बेकायदा वाळू वाहतूक करून सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात आहे. याबद्दल `मटा`ने वृत्तमालिका प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने वाळूमाफियांवर कारवाई सुरू केली आहे.

देवळालीगावातील मंडल अधिकारी प्रवीण गौंडाळे, देवळालीचे तलाठी अन्ना लक्ष्मण डावरे, विहीतगावचे रमेश उगले, संसरीचे पांडुरंग गोतीसे व सहकारी बुधवारी (ता. २५) देवळाली मंडलमध्ये बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करत होते. लहवित, बेलतगव्हाण शिवारातील सहा नंबर नाक्याजवळ सायंकाळी सातच्या सुमारास वाळूने भरलेला ट्रक (एमएच १५ सीके ५०६९) या पथकाला दिसला. पथकाने

तपासणी केली असता, त्यात प्रमाणापेक्षा जास्त वाळू भरलेली आढळली. चालक राधाकृष्ण आप्पासाहेब कोळपे (२०, रा. कोळपेवाडी, ता. कोपरगाव) व गाडी मालक रामा खंडू विंचू (रा. वडगाऴ, ता. सिन्नर) यांनी ही वाळू कोपरगावहून आणल्याचे व आपल्याकडे परवाना अथवा कागदपत्रे नसल्याचे सांगितले. गौंडाळे यांनी पंचनामा करुन ट्रक तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगितले. दुर्गा उद्यानाजवळ ट्रक आला असता चालक कोळपेने तो थांबवला. मालक विंचूने साथीदारांना फोन करुन बोलावून घेतले. या सर्वांनी गौंडाळे यांच्याशी वाद घालून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. नंतर हा ट्रक नाशिकरोड पोलिस ठाण्यात आणण्यात आला.

सरकारी कामात अडथळा, गौण खनिज चोरी, सरकारी कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार गौंडाळे यांनी कोळपे व विंचूविरुद्ध केली. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोवंश हत्याप्रकरणी गुन्हा दाखल

$
0
0



म. टा. मालेगाव, वृत्तसेवा

राज्यात नुकताच गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्याअंतर्गत मालेगावमधील आझादनगर पोलिस ठाण्यात राज्यातील पहिला गोवंश हत्येचा गुन्हा बुधवारी रात्री दाखल झाला आहे. पोलिसांनी छाप्यात ३५ हजार किंमतीचे दीडशे किलो मांस जप्त करण्यात आले. या गुन्ह्यातील तीन आरोपी फरारी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसा, आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मसुद खान यांच्या पथकाने बुधवारी रात्री बजरंगवाडी, तेहजिब हायस्कूल गेट समोर पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला. दरम्यान, आरोपी रशीद ऊर्फ पांड्या, हमीद ऊर्फ लेंडी व आसिफ तलाठी या तिघांविरोधात गोवंश हत्याबंदी (सुधारणा) कायदा , महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा (१९९५)पाच (अ )आणि नऊ (अ ) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते तिघेही फरारी आहेत. छाप्यादरम्यान पथकास एका पत्र्याच्या शेडमध्ये ३५ हजार किंमतीचे दीडशे किलो गोवंश मास, दोन कोयते, दोन चाकू, एक कुऱ्हाड जप्त करण्यात आले. महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायद्यातंर्गत दाखल होणारा राज्यातील हा पहिलाच गुन्हा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्लूने महिलेचा बळी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

स्वाइन फ्लूवर उपचार घेणाऱ्या २० वर्षीय विवाह‌तिेचा गुरूवारी बळी गेला. सुनिता योगेश कांबळे असे मृत्यूमुखी पडलेल्या विवाह‌तिेच नाव आहे. मनमाड येथील रहिवाशी असलेल्या कांबळे यांना बुधवारी दुपारी सिव्ह‌लि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना प्रकृती खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला. सिव्ह‌लि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी त्यांच्यावर मनमाडमधील स्थानिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. सिव्ह‌लिमध्ये सध्या ५ पेशंट दाखल असून, यातील एका पेशंटला स्वाईन फ्लूची लागण झाल्याचा अहवाल प्रशासनाला मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेत ट‌ीसीवर वस्तऱ्याने वार

$
0
0

देवळाली स्टेशनजवळील घटना; आरोपी फरारी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकरोड ते देवळाली कॅम्प मार्गावर तिकीटाची चौकशी केली म्हणून अज्ञात व्यक्त‌िंनी टीसीवर वस्तऱ्याने वार केल्याची घटना घडली. यामुळे गंभीर जखमी झालेल्या टीसीला तातडीने इगतपुरीतील हॉस्प‌टिलमध्ये दाखल करण्यात आले. ही घटना बुधवारी रात्री १२.२० च्या सुमारास घडली. या प्रकरणी नाशिकरोड रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्त‌िंविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिकीट निरीक्षक चुनीलाल रमेशचंद्र गुप्ता हे मध्य रेल्वेत भुसावळ येथे ड्युटीवर आहेत. ते नेहमीप्रमाणे तिकीट तपासणीसाठी भुसावळ येथून हावडा ते लोकमान्य टिळक टर्मिनस १८०३० शालीमार एक्सप्रेसच्या एस ४ या डब्यात बसले. नेहमीप्रमाणे त्यांची तिकीट तपासणी सुरु केली. त्यांची ड्युटी भुसावळ ते कल्याण या मार्गावर आहे. नाशिकरोडला गाडी आली तेव्हा ते एस ३ या डब्यात होते. नाशिकरोडहून रात्री १२.१० वाजता गाडी निघताच दरवाजात उभ्या असलेल्या दोन व्यक्तींना दार लावून घेण्याची विनंती केली व तिकीटाची मागणी केली. यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत 'काय करायचे ते करुन घ्या' अशी धमकी देत तिक‌ीट दाखवण्यास नकार दिला. यावर गुप्ता यांनी त्यांना जनरल बोगीत जायला सांगितले. यावर दोघांना राग आला. त्यातील एकाने त्याच्याजवळील वस्तऱ्याने गुप्ता यांच्या तोंडावर वार केले. यामुळे गोंधळ उडाला. तेवढ्यात गाडी देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशनवर आली व हल्ला करणारे दोघे पसार झाले. गुप्तांना तातडीने इगतपुरी व त्यानंतर नाशिकरोड येथील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले.

सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

एक महिन्यापूर्वी देवळाली कॅम्प येथे एका टीसीचा गाडीतून पडल्याने मृत्यू झाला होता. हा मृत्यू गाडीतून पडल्याने झाला नसून अज्ञात व्यक्त‌िंनी गाडीतून ढकलून दिले असावे, असा संशय रेल्वे कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला होता. रेल्वे कर्मचाऱ्यांना गुंडगिरीचा त्रास होत असल्याने रेल्वेत पोलिस बंदोबस्ताची मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणचा ‘दिव्याखाली अंधार’!

$
0
0



चिफ इंजिनीअरच्या दालनातच विजेची उधळपट्टी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यात वीजेची तीव्र टंचाई असताना महावितरणच्या नाशिकरोड येथील विद्युत भवन परिसरात असलेल्या चीफ इंजिनीअरच्या ऑफिसमध्ये कुणीही नसतांना कायमच वीजेचा अपव्यय सुरू असल्याचे दृष्य दिसते आहे. त्यामुळे 'वीज बचती म्हणजे वीज निर्मिती' असा मंत्र सामान्यांना सांगणाऱ्या महावितरणचा 'दिव्याखाली अंधारा'चे दर्शन घडत आहे.

विद्युत भवन परिसरात महावितरणचे अनेक विभाग आहेत. येथे नाशिक परिमंडळाचे चिफ इंजिनिअर सुहास रंगारी यांचे मुख्य कार्यालय आहे. एकीकडे राज्यातील ग्रामीण भागात १२-१२ तास वीज भारनियमन सुरू असतांना साहेबांच्या कॅबीनचा एसी मात्र कायम सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे समजते. रंगारी यांनी गुरुवारी सकाळी आपल्या शेजारी असलेल्या सभागृहात अधिकाऱ्यांची मिटींग बोलावली होती. या मिटींगला जाताना आपल्या कार्यालयातील वीजेची उपकरणे स्वतः बंद करणे अथवा आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला बंद करण्यास सांगणे गरजे होते. परंतु, तसे न करता साहेब मिटींगला निघून गेले. त्यामुळे या कार्यालयातील एसी सुमारे दोन ते तीन तास सुरुच होता. तसेच रंगारी यांचे सहाय्यक असलेल्या अधिकाऱ्यांच्या दालनातील पंखेही सुरू होते. मिटींग सुरू असताना जे अधिकारी सभागृहात होते त्यांच्या दालनातील सर्व पंखे सुरू होते. एकीकडे वीज बचतीचा टेंभा मिरवणारे अधिकारी मात्र वीज ही राष्ट्रीय संपत्ती न मानता आपल्या घरची मालमत्ता असल्यासारखा उपयोग करीत आहे. स्वतः मात्र दुसऱ्याला वीज बचतीचा संदेश देताना आपल्या कार्यालयात मनमानी कारभार करीत आहे.

राज्य सरकाराने आपल्या अख्त्यारीत असलेल्या विभागांना कार्यालयात वीज बचत करावी असे आदेश दिले आहेत. राज्य सरकारने दिलेले आदेश महावितरणला लागू नाहीत का? असा सवाल नागरीक विचारता आहेत. महावितरणचे तत्कालीन संचालक अजय मेहता यांनीही कर्मचाऱ्यांना अस्थापनेचा खर्च कमी करावा व कंपनी नफ्यात कशी येईल याकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले होते. परंतु, त्यांची बदली होताच नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांनी मात्र जुन्या अधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर बसवणे सुरू आहे. नाशिक येथे झालेल्या वीज आढावा बैठकीतही अधिकाऱ्यांच्या वर्तनावर ऊर्जा मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी आक्षेप घेतले होते. परंतु, त्यांची पाठ फिरताच पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थीती झाली आहे.
साहेब बदलले; 'परिस्थिती जैसे थे'च

या अगोदरही चिफ इंजिनीअर यांच्या कॅबीनमध्ये ते नसतानाही एसी सुरू असल्याचे आढळले आहे. रंगारी साहेब रुजू झाल्यानंतर ते बाहेरगावी गेले होते. त्यावेळी त्याच्य दालनातील एसी सुरूच होता. तेथील कर्मचाऱ्याला 'साहेब कुठे गेले?' असे विचारले असता 'साहेब बाहेरगावी' गेल्याचे उत्तर मिळाले. सामान्य ग्राहकांना डांगोरा पिटवून ऊर्जा बचतीचे धडे दिले जात असताना हे धडे अधिकाऱ्यांना दिले जात नाहीत का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतो आहे. सामान्य ग्राहकांच्या वीज वापराचे ऑडीट केले जाते; मात्र स्वतःच्या कार्यालयातील वीज वापराचे ऑडीट करणारी यंत्रणा झापा काढते काय, असा सवाल उपस्थित होत आहे.


अधिकाऱ्यांची ही मुजोरी चांगली नाही. वीज बचत हीच वीज निर्मिती असते हे त्यांना माहीत नाही असे वाटते. सामान्य ग्राहकांप्रमाणे प्रशासनाने त्यांच्यावर देखील कारवाई करावी. - श्रीधर व्यवहारे, ग्राहक प्रतिनिधी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाचनाचा ध्यास : इंदुमतीताई यंदे

$
0
0

>> अपर्णा क्षेमकल्याणी

वाचनाचा ध्यास घेतलेल्या माणसाचं आयुष्य किती आनंदी बनतं यांच उदाहरण म्हणजे ताई. ज्येष्ठ नागरिक स्वतःचं सुख कसं मिळवू शकतात हे समजतं. नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा शनिवारी (दि. २८) १७५ वा वार्षिकोत्सव होतोय. या उत्सवात श्रीमती इंदुमती यंदे यांचा 'अखंड वाचक' म्हणून सन्मान करण्यात येणार आहे...

काळ साधारणतः १९२५-२६ सालचा. महाराष्ट्रातील नागपूरच्या इतवारी किंवा ज्याला महाल भाग म्हणतात त्या भागातील इंदुमती सोनवणे ही ५-६ वर्षांची चिमुरडी पोर. हिला शिक्षणाची भारी हौस. डॉ. बा. शि. मुंजे यांची मुलगी आणि इंदुमती या दोघी मैत्रिणी नागपूरातील बर्डीच्या शाळेत जाऊ लागल्या. इंदुमतीला तिच्या शिक्षणाची जबर किंमत मोजावी लागे. ज्या काळी स्त्रियांनी क्वचित घराबाहेर पडण्याची पध्दत होती त्याकाळी इंदुमतीला शिक्षणानं झपाटलं होतं. आईच्या हयातीत मूळ नाशिककर असलेल्या सोनवणे कुटुंबातील ६ भावंडांपैकी तीन भावंडांची शिक्षणं यथोचित पार पडली. मात्र, आईच्या जाण्याने थोरल्या भावजयीच्या हाती सत्ता आली. अन् नागपूरात गेल्यापासून सोनवणे कुटुंब अधिकच कर्मठ बनत गेलं. मुलींना सांसारिक शिक्षणाव्यतिरिक्त कसलंही वारं लागू नये असा दबाव वाढला. शिक्षण घेते म्हणून मध्यरात्रीपर्यंत घराबाहेर उभे राहायची शिक्षा असो वा पुस्तकांची बंबात घालून केलेली राख असो इंदुमतीला शिक्षण दुरापास्तच होत गेलं. इंदुमतीचे शिक्षण थांबलं पण जिद्द नाही थांबली. तिच्या वडिलांनी त्यांच्या अखेरच्या काळात दिलेला अक्षर वाचत राहायचा मंत्र तिनं अक्षरशः प्राणपणाने जपला. तो वसा आज वयाच्या ९६ व्या वर्षी देखील इंदुमतीताई चालवत आहेत. या वयात ही त्या अखंड वाचक आहेत.

जुन्या काळची पहिली होऊन नाईलाजाने शिक्षण अर्धवट सोडावं लागल्याचा सल मनात घेऊनच इंदुमती बोहोल्यावर चढल्या. सोनवणेच्या यंदे झाल्या पुन्हा नाशिकला आल्या. याही काळात इंदुमती अक्षर अन् अक्षर जोडून वाचत राहिल्या. पुडीच्या कागदावरील अक्षर वाचण्यास त्या धडपडायच्या. यजमानांनी दररोजचं वर्तमानपत्र घ्यावं यासाठी मिन्नतवाऱ्या करायच्या. दरम्यान त्या ६ मुलांची माता बनल्या. यजमानांचा चांदीची नक्षीची भांडी बनवायचा कारखाना व्यवस्थित सुरू होता. मुलं शाळेला जात होती. स्वतःचं शिक्षणाचं स्वप्न मुलांकरवी त्या पुरं करून घेणार होत्या; पण इंदुमतींचे यजमान वारले आणि घराचे वासे फिरले. मुलांना जगवण्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी इंदुमतींनी हाडाची काडं केली. मुलांची शिक्षण केली. आज त्यांची मुलं सामाजिक, आर्थिक लौकिकदृष्टया समृद्ध आहेत. ती इंदुमतींनी केलेल्या संस्कारामुळेच.

मुलं कर्ती झाल्यावर त्यांनी ताईंचं सगळं काम थांबवलं. पण, कामात राम शोधणाऱ्या ताईंच्या जीवाला चैन पडेना. ताई पुन्हा वाचायला लागल्या. विषयांचं बंधन नव्हतं आणि वेळेचंही. ताईंचे धाकटे पुत्र नंदेश यांची स्वतःची ५ हजार पुस्तकांची लायब्ररी ताईंनी केव्हाच वाचून संपवली. त्यांनी आतापर्यंत जवळजवळ सगळीच चरित्र, पौराणिक कथा, समग्र सावरकर, समग्र अत्रे वाचून काढले आहेत. आजही ताईंमधील तीव्र इच्छाशक्ती, प्रचंड आत्मविश्वास, कमालीची सकारत्मकता समोरच्याला जगण्यासाठीचं बळ देत असते. याचं रहस्य ताई सांगतात 'वाचाल तर वाचाल'. वयोमानपरत्वे ताईंनी स्वतःच्या वाचनानंदासाठी आधुनिक टेक्नॉलॉजीचाही स्वीकार केलेला आहे. त्या भिंग घेऊन पुस्तकं वाचतात, नातवाने घेऊन दिलेल्या टॅबवर आणि प्रोजेक्टरवरही पुस्तकं वाचतात, पुस्तकाच्या ऑडिओ सीडी ऐकतात. आपल्या प्रचंड वाचन असलेल्या सुनेशी चर्चा करतात आणि वाचनानंदात गढून जातात. ताईंना जगण्याचं भान आहे वाचनानं त्यांना अधिक मिश्कील केलय; 'इन्कमटॅक्सची बखर' हे पुस्तक वाचून त्यांनी थोरल्या मुलाला त्याच्या इन्कमटॅक्स विषयी विचारणा केली. सावरकरांचं लेखन वाचून सावरकरांच्या भगूरस्थित घरी जाऊन आल्या. ही सव्यासाची बुद्धी वाचनानं मला दिली असं त्या म्हणतात. नाशिकच दैवत तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या पत्नी मनोरमाबाई या ताईंची चुलत बहिण. मनोरमाबाईंनी शिक्षणासाठी दिलेलं प्रोत्साहन आजही त्यांच्या स्मरणात आहे. वाचनाचा ध्यास घेतलेल्या माणसाचं आयुष्य किती आनंदी बनतं यांच उदाहरण म्हणजे ताई. ९६ व्या वर्षातला त्यांचा पुस्तकवाचनाचा नाद बघून थक्क व्हायला होतं. ज्येष्ठ नागरिक स्वतःचं सुख कसं मिळवू शकतात हे समजतं. शनिवारी नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा १७५ वा वार्षिकोत्सव होतोय, या उत्सवात इंदुमती यांचा 'अखंड वाचक' म्हणून सन्मान होत आहे. अखंड वाचनाच्या या चळवळीला मानाचा मुजरा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इतकं सगळं सवयीचं झालंय…!

$
0
0

>> प्राजक्त देशमुख
देशाच्या कुठल्याशा कोपऱ्यात काहीतरी अघटित घडतं आणि बातमी पसरते, चुकचुक पसरते, हळहळ पसरते. आजकाल पोळीभाजी सोबत ताटात लोणचं नसलं तरी चालतं पण, तोंडी लावायला टीव्ही पाहिजेच. यात नवे म्हणू नका, जुने म्हणू नका प्रत्येकाचीच तशी लाइफस्टाइल झाली आहे. होऊ देत पण, वाईट याचं वाटतं की त्या बातम्यांमध्ये कोणाचा खून पडो, इज्जतीचे धिंडवडे निघो की निरागस डोळ्यांचा टाहो असो पण, जेवताना कोणालाच ठसका लागत नाही. गिळल्या घशात कोरड पडून पाण्याचे दोन घोट कोणाला घ्यावेसे वाटतं नाही इतकं सगळं सवयीचं झालंय.

गंगापूर रोडच्या चौकात चारचौघं गाड्या स्टँडवर लाऊन गप्पा मारत असतात. गप्पांचा विषय असतो की शहरात जी फ्री वायफाय झोनची घोषणा झाली त्यात कोणते कोणते ठिकाणं प्रामुख्याने यावे. तितक्यात समोर गळक्या पाण्याच्या टँकरमुळे जे पाणी पसरलंय त्यावरून दोन बाईकस्वार घसरतात. घसरू देत पण, वाईट हे वाटतं की फुकट वायफायची घोषणा होणाऱ्या शहरात अजूनही पिण्यासाठी टँकर फिरताय हा प्रश्न कोणालाच पडत नाही. इतकं सगळं सवयीचं झालंय.

कॅनडा कॉर्नरजवळच्या कुठल्याशा कट्ट्यावर चर्चेचा विषय असतो दिल्लीत 'त्या' मुलीसोबत जे झालं ते वाईट झालं. चर्चा क्रांतिकारी होते आणि निष्कर्ष निघतो की 'अशा' लोकांना भर चौकात फाशी द्यायला पाहिजे. तितक्यात कोणाचा तरी 'व्हॉट्सएप' वाजतो. मेसेज वाचाणारा सवयीने मेसेजमध्ये आलेल्या बत्तीस सेकंदाच्या एका मादक व्हीडिओवर हसतो आणि म्हणतो ये देखो कमाल. 'भरचौकात फाशी द्यायला पहिजे' असं म्हणाऱ्यांचा एक 'बॉयज् ओन्ली व्हॉट्सएप ग्रुप' असतो. तिथे तो मादक व्हीडिओ पाठवला जातो. पुढे बत्तीस सेकंद सगळे मौनीबाबा त्या ग्रुपवरच गप्पा मारतात. मारू देत पण वाईट हे वाटतं की 'महिलांचा आदर सन्मान आणि इच्छा' यावर दोन तास धगधगणारी ज्वाळा बत्तीस सेकंदात विझून जाते. इतकं सगळं सवयीचं झालंय.

खूप दिवस सोशल साईटला एकत्र फोटो टाकता आला नाही म्हणून खूप दिवसांनी सगळे एकत्र जमतात. गळाभेट होते. जागा सेट होते. फक्त मेसेज विंडोमधून भेटणाऱ्यांच्या प्रत्यक्षात बदललेल्या लूकची चर्चा होते. सालाबादाप्रमाणे 'सेल्फी' होतो. सेल्फी काढायच्या नादात सेल्फमध्ये डोकावणं हळूहळू कमी होतं. होऊ द्या पण, वाईट हे वाटतं की या सेल्फी लाइफस्टाइलच्या रोजनिशीत पूर्वी काहीतरी घडायचं म्हणून सोशल नेटवर्किंगवर टाकलं जायचं. आता काहीतरी टाकायचंय म्हणून घडवलं जातं. इतकं सगळं सवयीचं झालंय.

आताशा अशीच चिड आली की काय होतं? चर्चा होते. खूप चिड आली की मेसेजेस धाडले जातात. त्याहून जास्त चिड आली की कोणीतरी सोशलसाईटला स्टेटस टाकतो. चिड वाढली की हॅशटॅग होतो आणि ट्रेण्ड होतो. अजून पराकोटीची चिड वाढली की सगळ्यांच्या हातात मेणबत्त्या येतात. पाऊस असो ऊन असो सगळे मेणबत्या घेऊन चालायला लागतात एखादया स्तंभाकडे. दहा लोकांना टॅग करून पोस्ट पडते FEELING ANGRY AT क्रांतिकारी चौक......इतकं सगळं सवयीचं झालंय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्य लेखापालचा निर्णय महासभेत

$
0
0

नाशिक : महापालिकेच्या मुख्य लेखापाल सुरेखा घोलप यांना पदोन्नती देण्याचा महासभेचा निर्णय डावलून परसेवेतील अधिकारी नियुक्तीचा वाद पुन्हा महासभेच्या कोर्टात आला आहे. या पदावर परसेवेतील राजेश लांडे यांना कायम ठेवावे की पदोन्नतीवरील सुरेखा घोलप यांना ते पद द्यावे याचा फेरप्रस्ताव महासभेवर पुन्हा ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. घोलप यांना महापालिका पदोन्नती समितीने २७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुख्य लेखापालपदी पदोन्नती दिली. महापालिकेने त्यांच्या पदोन्नतीला हिरवा कंदील दिला. मात्र, राज्य सरकारने १४ जानेवारी २०१३ ला लांडे यांची या पदावर नियुक्ती केली. सोबत त्यांचा तीन वर्षाचा कार्यकालही वाढविला. तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांनी त्यांना महासभेच्या निर्णयाविरोधात लांडे यांना रूजू करून घेतले. त्यामुळे घोलप यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने आयुक्तींची कृती नियमबाह्य ठरवत मुख्य लेखापाल पदावरती परसेवेतील लांडे यांना कायम ठेवावे की पदोन्नतीवरील घोलप यांना ते पद द्यावे याबाबतचा फेरप्रस्ताव महासभेवर पुन्हा ठेवण्याचे आदेश दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंचवटी एक्स्प्रेसमध्ये आदर्श कोचचा हॅपी बर्थ डे

$
0
0

नाशिकरोड : लिम्बा बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आदर्श कोच म्हणून नोंद झालेल्या पंचवटी एक्स्प्रेसमधील सी - ३ कोचचा आठवा वर्धापनदिन शुक्रवारी उत्साहात साजरा करण्यात आला. नवनिर्माण ग्रुपचे संचालक नेमीचंद पोतदार प्रमुख पाहुणे तर रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी अध्यक्षस्थानी होते. त्यांच्याहस्ते केक कापण्यात आला. यावेळी अतुल सोनजे, राहुल पाटील, सुधीर सपकाळे, अमोल घाडगे, देविदास दिवेकर, व्ही. जे. आर्य, कमलेश बाफना, अभिजित रानडे, विशाल तांबट, प्रमोद गंगावणे, अशोक रुपवते, इनाक गणविरे, जिमी जोशी आदींची प्रमुख उपस्थित होती.

रेल परिषदेच्या नियमानुसार या कोचमध्ये शांतता व स्वच्छतेला प्राधान्य दिले जाते. प्रवाशांचे मोबाईल बंद असतात, आपआपसांत चर्चाही केली जात नाही. कोचमध्ये वस्तू अथवा खाद्यपदार्थ विक्रीस मनाई आहे. इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते. िनशिकांत मुळे यांनी सूत्रसंचलन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायी सदस्यत्वाचा बिरारी यांचा राजीनामा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोन सदस्यांनी राजीनामे दिले. आता शिवसेनेनही आपल्या दोन सदस्यांचे राजीनामे घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शिवसेनेच्या वंदना बिरारी यांनी शुक्रवारी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा महापौर अशोक मुर्तडक यांच्याकडे सुपूर्द केला. मात्र, सचिन मराठे यांचे अद्यापही तळ्यात मळ्यात सुरू असून सोमवारपर्यंतची (दि. ३०) वेळ मागून घेतली आहे.

सभापतीची निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर मनसेच्या सविता काळे आणि अनिल मटाले यांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे शिवसेनेच्या सदस्यांवरही राजीनाम्यासाठी पक्षाने दबाव वाढवला. वंदना बिरारी यांनी शुक्रवारी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा महापौरांकडे सुपूर्द केला. पक्षाच्या आदेशाने राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. तर मराठे यांनी अद्यापही आपला राजीनामा सादर केलेला नाही. राजीनामा सोमवारपर्यंत देऊ, असे त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. राजीनामा देण्यासंदर्भात ते अजूनही संभ्रमावस्थेत आहेत. मात्र, दुसरीकडे पक्षाने राजीनामा देण्यासाठी त्यांच्यावर दबाव वाढविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका बरखास्त करा

$
0
0

पाणीटंचाईप्रश्नी माजी महापौर दशरथ पाटील यांची मागणी

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

नाशिक शहरातील विशेषत: सातपूर व नवीन नाशिक परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून कर भरणाऱ्या नागरिकांना सत्ताधारी आवश्यक दैनंदिन पाणीपुरवठा करू शकत नसल्याचे दुदैवी चित्र आहे. नागरिकांनाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यास सत्ताधारी अपयशी ठरल्याने महापालिका बरखास्त करावी, अशी मागणी माजी महापौर दशरथ पाटील यांनी केली आहे.

शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना दैनंदिन पाणीही मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून सत्ताधाऱ्यांच्या अपयशाचा पाढा वाचला. धरणांमध्ये मुबलक पाणीसाठी असूनही सध्या विविध भागात पाण्याची टंचाई आहे. सिडको, सातपूर इंदिरानगर, पाथर्डी या भागात पाण्यासाठी नागरिकांना भटकावे लागत आहे. पाणी पुरवठ्याची यंत्रणा नव्या पाईपलाईन टाकण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे.

पाणीपुरवठ्याचा सर्व भार हा जुन्याच यंत्रणावर आहे. नवीन यंत्रणा उभारण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे. नाशिककर नियमित कर भरूनही त्यांना पाणीपुरवठा करण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजाही पूर्ण करण्यास सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने महापालिकाच बरखास्त करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

आजही कमी दाबाने पाणीपुरवठा

महापालिकेने गुरुवारी कमी दाबाने पाणी, तर शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहील अशी सूचना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली होती. मात्र, शुक्रवारी पिण्याच्या पाणी मिळविण्यासाठी महिलांची धावपळ दिसून आली. नवीन नाशिकसह कामटवाडा, खुटवडनगर, डीजीपीनगर, कृष्णनगरसह सातपूर परिसरात पाण्याचा एकही थेंब मिळू शकला नाही. त्यामुळे सकाळी सकाळी महिलांची चिडचिड झाली. अनेकांनी कमी दाबाने पाण‌ी होत असलेल्या मोजक्या ठिकाणी पाणी मिळविण्यासाठी गर्दी केली. तसेच काही सोसायटींमध्ये रहिवाशांनी एकत्रितपणे पाण्याचे टँकर मागवून घेतले. दरम्यान, शनिवारी सातपूर तसेच सिडको परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची सूचना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गस्त होणार आरामदायी

$
0
0

शहर पोलिसांसाठी सुमो ऐवजी १० इर्टिगाची खरेदी

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

छतावरील अंबर दिवा पेटवून अवघ्या ताशी ४० किलोमीटर वेगाने रस्त्यावर फिरणारी​ पोलिसांची वाहने इतिहास जमा होत आहेत. जीप, सुमो असा सुरू झालेला पोलिसांचा प्रवास आता इर्टिगापर्यंत पोहचला आहे. पॉश मानल्या जाणाऱ्या आणि अधिकाऱ्यापुरत्या सिमीत असलेल्या अत्याधुनिक कार आता पोलिस स्टेशनपर्यंत पोहचल्या आहेत. शहर पोलिसांना नुकत्याच ११ नव्या इर्टिंगा कार मिळाल्या असून यांचा वापर गस्तीसाठी केला जाणार आहे.

शहर पोलिसांकडे आजमितीस सुमारे १२५ चारचाकी वाहने तर १२० च्या दरम्यान दुचाकी आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसहित ​पोलिस स्टेशन, गुन्हे शाखा, नियंत्रण कक्ष, शहर वाहतूक शाखा, विशेष शाखा, व्हीआयपी एस्कॉर्ट, क्युआरटी टीम, डॉग युनिट, कैदी पार्टी, एटीएस, एसआयडी अशा वेगवेगळ्या २७ विभागांसाठी वाहनांची आवश्यकता असते. सर्वाधिक वाहनांची गरज पोलिस स्टेशन पातळीवर भासते. शहरातील ११ पोलिस स्टेशनमध्ये १५ पेक्षा जास्त सुमो, सात ते आठ लाईट व्हेईकल आणि ५० पेक्षा जास्त दुचाकी वापरल्या जातात. पोलिस स्टेशनमधील वाहनांचा सर्वाधिक वापर गस्तीसाठी केला जातो. सध्या पोलिसांकडे बोलेरो, सुमो, स्कॉर्पियो, तवेरा, क्वॉलीस, जिप्सी आणि कार अशा विविध प्रकाराची वाहने आहेत. मात्र, ६ ते ८ लाख रुपये किंमतीपेक्षा जास्त रक्कमेच्या वाहनांची संख्या तुलनेत कमी आहे. पोलिसांचा सर्वाधिक भार सुमो गाड्यावर आहे. त्यापाठोपाठ बोलेरोचा नंबर लागतो. आता, या वाहनांची संख्या कमी करून तुलनेत जास्त जागा असलेल्या वाहनांना गृहविभागाकडून प्राधन्य दिले जाते आहे. नुकत्याच शहर पोलिसांसाठी ११ इर्टिगा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ही वाहने सध्या आरटीओकडे पासिंग झालेली नाहीत. ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नवीन वाहने कोणत्या विभागात किंवा कोणत्या पोलिस स्टेशनसाठी द्यायची याविषयी निर्णय घेतला जाणार आहे. शक्यतो, गस्तींसाठी नवीन वाहनांचा उपयोग फायदेशीर ठरू शकतो, त्यादृष्टीने नियोजन केले जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी​ दिली.

नवीन वाहने उपलब्ध झाली असून ही सामन्य प्रक्रिया आहे. ठराविक कालावधीनंतर गृहविभागामार्फत नवीन वाहने पुरवली जातात. वाहने उपलब्ध झाले की गरजेनुसार तसेच संख्येनुसार विविध विभागांना वाहने दिली जातात. नवीन वाहनांचा सिंहस्थ कुंभमेळ्या दरम्यान उपयोग होणार आहे.

- कुलंवतकुमार सरंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक कटारिया यांना शिक्षा

$
0
0

नाशिकरोड : धनादेश न वटल्याबद्दल देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेन्ट बोर्डाचे नगरसेवक भगवान टिकमदास कटारिया यांना न्यायालयाने सहा महिने कारावास आणि ७५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणी प्रताप रामचंद्र गायकवाड यांनी फिर्याद दाखल केली होती. गायकवाड यांच्याकडून कटारिया यांनी ५० हजार रुपये उसनवार घेतले होते. त्यापोटी कटारिया यांनी गायकवाड यांना धनादेश दिला होता. मात्र, तो वटला नाही. नाशिकरोड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती ए. एच. काशीकर यांच्या न्यायालयात गायकवाड यांनी फौजदारी खटला दाखल केला. अॅड. अशोक गायकवाड यांनी फिर्यादीतर्फे बाजू मांडली. त्यात दोषी आढळल्याने न्यायालयाने कटारिया यांना निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट कायद्याच्या कलम १३८ नुसार शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ZP अर्थसंकल्पात ८ कोटींची कपात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेचा २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठीच्या ३५ कोटी ४४ लाख १६ हजार ३१ रुपयांच्या अर्थसंकल्पाला अध्यक्षा विजयश्री चुंबळे यांनी व सभागृहाने विशेष सभेत एकमताने मंजुरी दिली. प्रामुख्याने दहा विविध विभागांवर करण्यात आलेल्या संकल्पित खर्चात नेहमीप्रमाणे बांधकाम विभागाने बाजी मारली आहे.

गतवर्षी परिषदेने ४६ कोटी २० लाख रूपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली होती. यंदा मात्र तोही आकडा जिल्हा परिषदेच्या आवाक्यात नव्हता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ओढाताण करून २५ कोटींच्या घरात ही रक्कम जाऊ पाहत होती. या उद्दिष्टात वाढ करीत ही रक्कम ३५ कोटींवर जाऊन पोहचली. विविध विभागातील योजनांवर खर्च करताना अनावश्यक ठिकाणी कपातीच्या सूचना सदस्यांनी मांडल्या. या कपातीतून बचत झालेल्या सुमारे ८ कोटी ५ लाख रूपयांच्या निधीचे सदस्यांमध्ये समान वाटप करण्याचा ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला. कपातीतून बचत झालेल्या या निधीचे जिल्हा परिषदेच्या ७३ सदस्यांमध्ये समान वाटप करण्यात यावे, या ठरावालाही सभागृहाने मंजुरी दिली. अडीच कोटींचा निधी केवळ जलयुक्त शिवार अभियानावरच खर्च करण्याच्या ठराव मांडण्यात आला.

झेडपीच्या अर्थसंकल्पात उपाध्यक्षांचे पारडे जड

यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण, महिला व बालकल्याण, ग्रामविकास, समाजल्याण, अपंग कल्याण, पाणीपुरवठा आदी विषयासंदर्भातील योजनांवरही तरतूद करण्यात आली. यावेळी जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, उपाध्यक्ष प्रकाश वडजे, विविध समित्यांचे सभापती, सदस्य आदी उपस्थित होते. नव्या आर्थिक वर्षाच्या संकल्पात विविध दहा विभागांच्या तुलनेत निधीच्या बाबतीत उपाध्यक्ष व अर्थ समितीचे सभापती अथा बांधकाम सभापती वडजे यांचेच पारडे जड ठरले. या विभागांच्या तुलनेत 'बांधकाम'साठी सर्वाधिक ७ कोटी २४ लाख ९१ हजार ९११ रुपयांची, त्या खालोखाल पाणीपुरवठा व स्वच्छता विभागावर तरतूद केली आहे. या विभागासाठी ६ कोटी ९५ लाख रुपयांची तर आरोग्य विभागाच्या वाट्याला तुलनेने सर्वात कमी ५१ लाख ८० हजार रुपयांची तरतूद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट

$
0
0

पाटबंधारे-महापालिकेचा वाद कारणीभूत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर आणि दारणा धरणातून शहरासाठी महापालिकेकडून उचलण्यात येणाऱ्या पाण्याची दहा कोटी रुपयांची थकबाकी महापालिकेने भरली नसल्याने पाटबंधारे विभागाने थकबाकीपोटी २० टक्के पाणीकपातीचा इशारा दिला आहे. पालिकेने तत्काळ थकबाकी न भरल्यास पाणीपुरवठा खंडीत करण्याचीही धमकीही देण्यात आली आहे. तर पाटबंधारे विभागाने चुकीच्या पद्धतीने पाणीपट्टी आकारल्याचे सांगत महापालिकेने वाढीव पाणीपट्टी भरण्यास नकार दिला आहे. या वादात नाशिककर भरडले जाण्याची शक्यता आहे. जलसंपदाने आयुक्तांना नोटीस बजावली असून, थकबाकी न भरल्यास पाणीपुरवठा कपात करण्याचा इशारा दिला आहे. पाणीपुरवठ्यावरून जनक्षोभ उदभवल्यास त्यास महापालिका कारणीभूत राहील असे सांगत, संभाव्य जबाबदारीही टाळली आहे.

जलसंपदाचा आगाऊपणा

वाढीव थकबाकीचा वाद सध्या पालकमंत्र्यांच्या कोर्टात आहे. पालकमंत्री महापालिका आणि जलसंपदाच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेवून थकबाकीचा निर्णय सोडविला जाणार आहे. मात्र, ही बैठक होण्यापूर्वीच जलसंपदाने महापालिकेला नोटीस देण्याचा आगाऊपणा केला आहे. त्यामुळे महापालिकेतील पदाधिकारी आणि अधिकारी संतापले आहेत.

थकबाकासाठी पालिकेला वारंवार नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांच्याकडून थकबाकी भरली जात नाही. त्यामुळे २० टक्के पाणीकपातीची शेवटची नोटीस आम्ही दिलेली आहे.

- सुनिल बाफना, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग

औद्योगिक वापरानुसार पाणीपट्टी लावली आहे. त्यामुळे वाढीव पाणीपट्टी आम्ही भरणार नाही.पालकमंत्र्यांसोबत याबाबत बैठक होणार आहे. त्यात तोडगा काढला जाईल.

- अशोक मुर्तडक, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नुकसानग्रस्तांसाठी ५५ कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नोव्हेंबर व डिसेंबर २०१४ या दोन महिन्यांमध्ये अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून जिल्हा प्रशासनाला ६५ कोटींपैकी ५५ कोटी १५ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील ६४ हजार ६३९ शेतकऱ्यांना या निधीला लाभ मिळणार आहे. निधी वाटपाची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे.

गत पंधरवड्यातील नुकसानाची पाहणी करण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि राज्य महसूल मंत्री संजय राठोड यांनी सिन्नर तालुक्यात भेट दिली होती. गतवर्षी झालेल्या नुकसानाची अद्याप भरपाई मिळाली नसल्याचे गाऱ्हाणे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे मांडले होते. जिल्हाधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह यांनी अद्याप ६५ कोटींची निधी मिळणे बाकी असल्याची कैफियत मांडली होती. यापैकी ५५ कोटी १५ लाखांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जितेन्द्र काकुस्ते यांनी दिली. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील अडीच कोटी रुपयांच्या निधीचीही जिल्हा प्रशासनाला प्रतीक्षा आहे. दोन हेक्टर क्षेत्रासाठीच ही मदत दिली जाणार आहे. त्यामुळे एका द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याला जास्तीत जास्त ५० हजार रुपये मदत मिळू शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीत ‘टूरिस्ट पोलिस’

$
0
0

अरविंद जाधव, ना​शिक

पंचवटीच्या धार्मिक महत्त्वामुळे याठिकाणी दररोज हजारो भाविक येत होतात. भाविकांच्या गर्दीत भुरटे चोर, भिकारी आणि गर्दुलेही असतात. अर्थात, याचा परिणाम येणाऱ्या पर्यटकांवर होतो. भाविकांची होणारी गैरसोय लक्षात घेत शहर पोलिसांनी 'टूरिस्ट पोलिस' या संकल्पनेला आकार दिला आहे. रामकुंड परिसरात विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिने हा पायलट प्रोजेक्टच मानला जात आहे.

शिर्डी-नाशिक-त्र्यंबकेश्वर आणि वणी अशा धार्मिक स्थळांमुळे भाविकांचा राबता दिवसेंदिवस वाढतो आहे. रामकुंड परिसर तर १२ महिने भाविकांच्या गर्दीने ओसांडून वाहतो. देश-परदेशातून याठिकाणी भाविक दाखल होतात. या गर्दीचा फायदा घेत भाविकांना लुटण्याच्या, त्यांना त्रास देण्याच्या घटनाही सर्रास घडतात. रामकुंड परिसरात दोन-अडीचशे भिकाऱ्यांचा नेहमी वेढा पडलेला असतो. भुरटे चोर भाविक, पर्यटकांचा ऐवज चोरून नेतात. परिणामी, मोठ्या भक्तीभावाने नाशिकमध्ये येणारे हजारो नागरिक शहराची वेगळीच कीर्ती घेऊन जातात. साहजिकच, नाशिकच्या प्रतिमेवरही त्याचा परिणाम होतो आहे. यापार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी 'टूरिस्ट पोलिस' या नव्या संकल्पनेला आकार देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यानुसार, शुक्रवारपासून पंचवटी पोलिस स्टेशनच्या दोघा कर्मचाऱ्यांची रामकुंड परिसरात नियुक्ती करण्यात आली आहे. येणाऱ्या भाविकांना मदत करण्याचे काम हे पोलिस करतील. भाविकांच्या अडचणी समजून घेण्यासह त्या दूर करण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर आहे.

याबाबत माहिती देताना पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी, सांगितले की पंचवटी परिसरात अनेक धार्मिक ठिकाणे आहेत. त्याचे कुतुहल देश-परदेशातील भाविकांना तसेच पर्यटकांना असते. अनोळखी ठिकाणी आलेल्या पर्यटकांना काही समस्या उद्भवल्यास त्यांना पोलिसांची मदत सहजतेने उपलब्ध व्हावी म्हणून 'टूरिस्ट पोलिस' संकल्पना राबवली जात आहे. नियुक्त केले गेलेले पोलिस केवळ पर्यटकांसाठी काम करतील. पोलिसांच्या उपस्थितीमुळे रामकुंड परिसरातील पर्यटकांना होणाऱ्या त्रासाच्या छोट्या-मोठ्या घटनांना आळा बसू शकेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पर्यटकांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने पंचवटी पोलिस स्टेशनचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पर्यटकांसाठी पोलिसांची उपस्थिती उपयोगी ठरली तर हा पायलट प्रोजेक्ट व्यापकपणे राबविला जाईल.

कुलवंतकुमार सरंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्य लेखापालचा निर्णय महासभेत

$
0
0

नाशिक : महापालिकेच्या मुख्य लेखापाल सुरेखा घोलप यांना पदोन्नती देण्याचा महासभेचा निर्णय डावलून परसेवेतील अधिकारी नियुक्तीचा वाद पुन्हा महासभेच्या कोर्टात आला आहे. या पदावर परसेवेतील राजेश लांडे यांना कायम ठेवावे की पदोन्नतीवरील सुरेखा घोलप यांना ते पद द्यावे याचा फेरप्रस्ताव महासभेवर पुन्हा ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. घोलप यांना महापालिका पदोन्नती समितीने २७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुख्य लेखापालपदी पदोन्नती दिली. महापालिकेने त्यांच्या पदोन्नतीला हिरवा कंदील दिला. मात्र, राज्य सरकारने १४ जानेवारी २०१३ ला लांडे यांची या पदावर नियुक्ती केली. सोबत त्यांचा तीन वर्षाचा कार्यकालही वाढविला. तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांनी त्यांना महासभेच्या निर्णयाविरोधात लांडे यांना रूजू करून घेतले. त्यामुळे घोलप यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने आयुक्तींची कृती नियमबाह्य ठरवत मुख्य लेखापाल पदावरती परसेवेतील लांडे यांना कायम ठेवावे की पदोन्नतीवरील घोलप यांना ते पद द्यावे याबाबतचा फेरप्रस्ताव महासभेवर पुन्हा ठेवण्याचे आदेश दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटी एक्स्प्रेसमध्ये आदर्श कोचचा हॅपी बर्थ डे

$
0
0

नाशिकरोड : लिम्बा बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आदर्श कोच म्हणून नोंद झालेल्या पंचवटी एक्स्प्रेसमधील सी - ३ कोचचा आठवा वर्धापनदिन शुक्रवारी उत्साहात साजरा करण्यात आला. नवनिर्माण ग्रुपचे संचालक नेमीचंद पोतदार प्रमुख पाहुणे तर रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी अध्यक्षस्थानी होते. त्यांच्याहस्ते केक कापण्यात आला. यावेळी अतुल सोनजे, राहुल पाटील, सुधीर सपकाळे, अमोल घाडगे, देविदास दिवेकर, व्ही. जे. आर्य, कमलेश बाफना, अभिजित रानडे, विशाल तांबट, प्रमोद गंगावणे, अशोक रुपवते, इनाक गणविरे, जिमी जोशी आदींची प्रमुख उपस्थित होती.

रेल परिषदेच्या नियमानुसार या कोचमध्ये शांतता व स्वच्छतेला प्राधान्य दिले जाते. प्रवाशांचे मोबाईल बंद असतात, आपआपसांत चर्चाही केली जात नाही. कोचमध्ये वस्तू अथवा खाद्यपदार्थ विक्रीस मनाई आहे. इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते. िनशिकांत मुळे यांनी सूत्रसंचलन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायी सदस्यत्वाचा बिरारी यांचा राजीनामा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोन सदस्यांनी राजीनामे दिले. आता शिवसेनेनही आपल्या दोन सदस्यांचे राजीनामे घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शिवसेनेच्या वंदना बिरारी यांनी शुक्रवारी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा महापौर अशोक मुर्तडक यांच्याकडे सुपूर्द केला. मात्र, सचिन मराठे यांचे अद्यापही तळ्यात मळ्यात सुरू असून सोमवारपर्यंतची (दि. ३०) वेळ मागून घेतली आहे.

सभापतीची निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर मनसेच्या सविता काळे आणि अनिल मटाले यांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे शिवसेनेच्या सदस्यांवरही राजीनाम्यासाठी पक्षाने दबाव वाढवला. वंदना बिरारी यांनी शुक्रवारी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा महापौरांकडे सुपूर्द केला. पक्षाच्या आदेशाने राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. तर मराठे यांनी अद्यापही आपला राजीनामा सादर केलेला नाही. राजीनामा सोमवारपर्यंत देऊ, असे त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. राजीनामा देण्यासंदर्भात ते अजूनही संभ्रमावस्थेत आहेत. मात्र, दुसरीकडे पक्षाने राजीनामा देण्यासाठी त्यांच्यावर दबाव वाढविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images