Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पाणीकपातीचे संकट टळले

$
0
0

जलसंपदा मंत्र्यांनी 'पाटबंधारे'च्या अधिकाऱ्यांना फटकारले

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दहा कोटीच्या थकीत पाणीपट्टीवरून महापालिका आणि पाटबंधारे विभागातील वादात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेतला असून पाणीकपात होणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. दोन्ही विभागांशी चर्चा करून हा वाद सोडविला जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. सोबतच महापालिकेला नोटीस पाठविणाऱ्या व हा वाद उकरून काढणाऱ्या पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना महाजन यांनी फटकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे थकबाकीवरून नाशिककरांचे पाणीकपातीचे संकट तूर्तास तरी टळल्याचे चित्र आहे.

नाशिकच्या गंगापूर धरणात असलेल्या महापालिकेच्या पाणीसाठ्याच्या आरक्षणापोटी महापालिकेचे ९ कोटी ८५ कोटी रुपये थकीत होते. ही रक्कम तात्काळ न भरल्यास शहरात २० टक्के पाणी कपात करण्याचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला होता. यानंतर महापालिकेने आपली भूमिका स्पष्ट करत, पाटबंधारे विभागाने चुकीचे बिलं लावण्याचा आरोप केला होता. तसंच सुधारित आरक्षण आणि थकबाकीबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा करू असं सांगितलं होते. यांसदर्भात नाशिक दौऱ्यावर आलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना महापालिकेन पुन्हा साकडे घातले आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी हा वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महापालिका आणि पाटबंधारे विभाग यांच्यातील वाद मिटवण्यासाठी आपण पुढाकार घेणार असून, दोन्ही विभागांशी चर्चा करून हा विषय कायमचा मिटवणार असल्याचं महाजन यांनी स्पष्ट केलं.

थकबाकीवरून गोंधळ उडाला असतान देखील पाटबंधारे विभागाने महापालिकेला नोटीस पाठवल्याने पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना चांगलच फैलावर घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. पाणी पुरवठ्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर महापालिकेला नोटीस पाठवणे योग्य नसल्याचे मत महाजन यांनी व्यक्त केले आहे. गंगापूर धरणात यंदा पाण्याचा साठा ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरेल एवढा आहे. त्यामुळे नाशिककरांना दिलासा मिळाला होता. मात्र, पाटबंधारे विभाग आणि महापालिका यांचं थकबाकीवरून सूर असलेलं भांडण नाशिककराभर उन्हात ताहानलेलं ठेवतं का ही भिती नाशिककरांन होती. मात्र, पालकमंत्र्यांच्या मध्यस्तीनं नाशिककरांवरचं पाणीकपातीचं संकट दूर होइल असं निदान आजतरी चित्र आहे.

कायदा सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा

नाशिक शहरातील गुन्ह्याचे प्रमाण कागदावर कमी दिसत असली तरी, शहरातील कायदा सुव्यवस्था गंभीर असल्याचे स्पष्टीकरण महाजन यांनी पत्रकारांशी बोलतांना दिले आहे. यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून योग्य तो तोडगा काढला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. नाशिकच्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर विधानसभेत चर्चा झाली आहे. पोलिसांच्याही खूप तक्रारी आहेत. गृहमंत्रालय मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मार्गी काढला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घर, पाणीपट्टी वसुलीत वाढ

$
0
0

उद्दिष्ट दूरच, एप्रिलमध्येही वसुली मोहीम तीव्र करणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सन २०१३-१४ या आर्थिक वर्षापेक्षा गेल्या वर्षात महापालिकेच्या मालमत्ता करासह पाणापट्टी वसुलीत वाढ झाली आहे. मात्र, उद्दिष्ट पूर्ण करण्यात यंत्रणेला अपयश आले आहे. मालमत्ताकराचे उद्दिष्ट हे ११५ कोटींचे ठेवण्यात आले होते. त्यापैकी ३१ मार्चपर्यंत ७५ कोटी १९ लाखांची वसुली झाली असून, ती गेल्या वर्षापेक्षा पाच टक्क्यांनी अधिक आहे. पाणीपट्टी कराचे उद्दिष्ट हे ६० कोटींचे ठेवण्यात आले होते. त्यापैकी केवळ ४२ कोटींची वसुली झाली असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत सात टक्क्यांनी अधिक आहे.

मालमत्ता करासह पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेन मार्च महिन्‍यात उघडलेल्या वसुली मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने विविध करांच्या वसुलीवर जोर दिला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. मार्चमध्ये मालमत्ता कर वसुलीसाठी ७५ हजार मिळकतधारकांना नोटिसा बजावल्या होत्या. तर, काही मालमत्ता जप्तही केल्या होत्या. पाणीपट्टी वसुलीसाठीही ११ हजार जणांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत मार्च महिन्यात वसुलीचा जोर वाढला आहे. सन २०१३-१४ मध्ये मालमत्ता कर ७१ कोटी वसूल झाला होता. सन २०१४-१५ मध्ये यात पाच कोटींची वाढ होऊन ७५ कोटी १९ लाखांची वसुली झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ ५.२० टक्के एवढी आहे. सन २०१३-१४ मध्ये पाणीपट्टीतून पालिकेला ३८ कोटी ८५ लाख रुपये मिळाले होते. तर, सन २०१४-१५ मध्ये ही रक्कम ४१ कोटी ६८ लाखांपर्यत गेली आहे. मात्र दिलेल्या उद्दिष्टापेक्षा ही रक्कम १८ कोटींनी कमी आहे. मालमत्ताकराचे उद्दिष्ट हे ११५ कोटींचे दिले आहे. मात्र, वसुली ३० कोटींनी कमी आहे.

घरपट्टी वाढीसाठी प्रयत्न गरजेचे

नाशिक शहराच्या वाढत्या विस्तारात विकासकामांसाठी निधी उपलब्ध होत नसल्याची ओरड नगरसेवक करीत असतात. परंतु, महापालिकेच्या उत्पन्नवाढीत घरपट्टीचे उद्दिष्ट वाढविणार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सातपूर व अंबड एमआयडीसी व रहिवाशी भागातील पोटभाडेकरूंची योग्य माहिती महापालिकेने घेतल्यास निश्चितच उत्पन्नात भर पडणार आहे. नागरी सुविधा देताना नगरसेवक व प्रभागातील रहिवाशी यांच्या नेहमीच खटक्या उडत असतात. निधी उपलब्ध होत नसल्याने नगरसेवकही नाराजी व्यक्त करताना दिसतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकची विकासगाथा अॅपवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या साडेतीन वर्षांपासून नवनिर्माणाची वाट पाहणाऱ्या नाशिककरांना मनसेची विकासगाथा आता थेट अॅपवर पहायला मिळणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरूवारी मनसेच्या अॅपचे लॉन्चिंग केले जाणार आहे. मनसेने मागील साडेतीन वर्षांत केलेल्या विकासाची जंत्री आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकांपर्यंत मांडली जाणार आहे. मनसेचा हा अॅप फेसबुकलाही जोडला जाणार असून, नागरिकांना त्यावर कमेंट करता येणार आहे.

नाशिकच्या नवनिर्माणाची स्वप्ने बाळगून असलेल्या राज ठाकरे यांच्या हाती साडेतीन वर्षांपूर्वी नाशिककरांनी सत्ता सोपवली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कारभाराला कंटाळलेल्या नाशिककरांनी मनसेच्या पारड्यात भरभरून मतदान केले. सत्तेवर येताच ठाकरेंनीही नाशिकचा विकास करणे ही आपली पॅशन असल्याचे सांगून आश्वासनांची पोतडी खोलली. सहा महिने थांबा, वर्षभर थांबा, दोन वर्षे थांबा अशा घोषणा करून ठाकरेंची पॅशन आता साडेतीन वर्षांवर पोहचली आहे. गोदापार्कचे काम वगळता या साडेतीन वर्षांत मात्र नाशिकच्या विकासाचा पाळणा हललाच नाही. विकास करतो, मात्र तो लोकांना दिसत नाही असे सांगून ठाकरेंनी आपल्या अपयशाचे खापर माध्यमांवर फोडले आहे. मनसेच्या सत्ताकाळात कोट्यवधींची कामे सुरू असून, नगरसेवकांची कामे आदर्श असल्याचा दुजोरा त्यांनी दिला आहे.

नगरसेवकांनी आपल्या प्रभागात केलेली कामे लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी ठाकरेंनी आता तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. मनसेच्या वतीने स्वतःचा अॅप सुरू केला जाणार आहे. या अॅपच्या माध्यमातून मनसेची सुरू असलेली विकासकामे, केलेली कामे आणि विकासाचा आराखडा सादर केला जाणार आहे. फाळकेस्मारक, रिंगरोड, गोदापार्क, सिंहस्थासाठी पालिकेची सुरू असलेली कामे यात समाविष्ट केली जाणार आहेत. या अॅपवर नागरिकांकडून सूचनाही मागविल्या जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांशी कनेक्ट वाढणार असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला आहे. गेले साडेतीन वर्षे मनसेचा वेळ हा आपली सत्ता टिकवण्यातच गेला आहे. गोदापार्क वगळता कोणताही मोठा प्रोजेक्ट साडेतीन वर्षांत सुरू होवू शकला नाही. या काळात मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यातही सत्ताधाऱ्यांना यश आले नाही. त्यामुळे हा अॅप राज ठाकरेंना किती तारणार याबद्दल पदाधिकाऱ्यांमध्येच संभ्रम आहे.

मुंबईच्या तंत्रज्ञांची मदत

अॅपच्या डिझाईनसाठी मुंबईहून केतन जोशी आणि सौरभ कंरदीकर बुधवारी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. मनविसेच्या मदतीने हा अॅप तयार करण्यात आला असून, गुरूवारी दुपारी राज ठाकरेंच्या हस्ते त्याचे लॉन्चिंग केले जाणार आहे. हा अॅप फेसबुकलाही अटॅच केला जाणार आहे. नागरिकांनाही त्यावर आपली मते व्यक्त करता येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६६ हेक्टरवरील पिकांवर अवकळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात मार्च अखेरीस पडलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. २७ ते २९ मार्चदरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने १३ गावे बाधित झाली असून तेथील ६६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान केले आहे.

मार्च महिन्यात दोन वेळा अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. १० ते १४ मार्च या कालावधीत पडलेला पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होत नाहीत तोच पुन्हा एकदा जिल्ह्यातील काही भागांमध्ये अवकाळीने पिकांचे मोठे नुकसान केले आहे. सातत्याने आव्हान देणाऱ्या या नैसर्गिक संकटामुळे जिल्ह्यातील शेती आणि शेतकरी दोघेही अडचणीत आले आहेत. शेती व्यवसाय नकोच अशी हतबलता त्यांच्याकडून व्यक्त होत आहे. २७ ते २९ मार्चदरम्यान झालेल्या पावसाने त्र्यंबक, इगतपुरी, कळवण तालुक्यांना झोडपून काढले. तेथील एकूण १३ गावांना या पावसामुळे अधिक फटका बसला आहे. त्यामध्ये १८७ शेतकऱ्यांच्या शेतांमधील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये इगतपुरीतील १०५ त्र्यंबकेश्वरमधील ५५ आणि कळवणमधील २७ शेतकऱ्यांना या नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.

पावसाचा कहर थांबत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत. अवकाळीचा समावेश नैसर्गिक आपत्तीमध्ये करावा यासाठी समिती गठित करण्याचे आश्वासन केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिले आहे. तसे झाले तर शेतकऱ्यांना तातडीक मदतीद्वारे दिलासा मिळू शकेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

मदतीसाठी प्रतीक्षाच

यंदाच्या वर्षी म्हणजे २०१५ मध्ये जानेवारी ते मार्च या कालावधीत पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळू शकलेली नाही. त्यात पुन्हा अवकाळीचा मारा सुरूच असून लवकरात लवकर भरपाई मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट चेकद्वारे फसवणुकीचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

बनावट चेक तयार करून त्याआधारे रयत सेवक संघ बँकेची लूट करू पाहणाऱ्या चौघा जणांविरोधात आडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात बँक व्यवस्थापक, कॅशिअर, लिपीक आणि अन्य एकाचा समावेश आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयितांनी धूम ठोकल्याची माहिती आडगाव पोलिसांनी दिली आहे.

राज्यात सर्वदूर जाळे असलेल्या रयत शिक्षण ​संस्थेची रयत सेवक संघ ही बँक असून, तिची शहरात शाखा आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या बँकेच्या ठेवी व इतर व्यवहार आयडीबीआय बँकेत होतात. याआधारे संशयित बँक व्यवस्थापक नंदकुमार लोभे तसेच सुनील दत्तात्रय पवार आणि पुंजाराम कोतवाल या कर्मचाऱ्यांनी एक प्लॅन तयार केला. त्यांनी प्रशांत बक्षी या व्यक्तिच्या नावे ५ कोटी रुपयांचे दोन बनावट चेक तयार करून औरंगाबाद नाक्यावरील आयडीबीआय बँकेला सादर केले.

रयत सेवक बँकेची मुख्य शाखा सातारा येथे असून हा चेक क्लेअरिंगसाठी तिथे गेला. एवढी मोठी रक्कम देण्याचा प्रश्नच नसल्याचा मुद्दा तेथील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चौकशी सुरू केली. यात वरील तिघे व अन्य एका व्यक्तिचा सहभाग असल्याचे निष्पण झाल्यानंतर मुख्य शाखेतील कर्मचाऱ्यांनी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार दाखल केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूरला गँगवॉर, तरुणाची हत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सातपूरला दि. १ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता अपहरण झालेल्या तरुणाचा खून झाल्याची घटना २ एप्रिल गुरुवारी दुपारी बारा वाजता उघडकीस आली. गँगवारमधून हा खून झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अशोकनगर भागातील शिंदेमळा गणराज अर्पांटमेंटमध्ये राहणाऱ्या अमोल सुधीर मोहिते (वय २८) याचे बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास ओमिनी व्हॅनमधून आलेल्या तिघांनी अपहरण केल्याची तक्रार अमोलचा भाऊ वैभव मोहिते याने सातपूर पोलिसांत दिली होती. यानंतर पोलिसांनी रात्रीच तपासाला सुरुवात केली होती. रात्रभर अमोलचा तपास करून देखील तो मिळून आला नाही. दरम्यान, गुरुवारी दुपारच्या सुमारास शांताराम चव्हाण यांना एका तरुणाचा मृतदेह वासाळी शिवारात आढळून आला. यानंतर चव्हाण यांनी तत्काळ सातपूर पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहचताच संबंधित मृतदेह हा अमोल याचाच असल्याचे पोलिसांना कळले. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

अमोलचा भाऊ वैभव याने दिलेल्या फिर्यादीत संशयित रोशन काकड, दीपक भालेराव व बाळू नागरे यांची नावे आहेत. दरम्यान, पोलिसांनी तीनही गुन्हेगारांचा शोध सुरू केला आहे. त्यातच अमोलचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला असता त्याच्या सहकार्यांनी गुन्हेगारांना अटक केल्यानंतरच शवविच्छेदन करण्याची मागणी केली. पोलिसांनी शांतता ठेवण्याचे आवाहन केल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. सातपूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिस संशयित आरोपींचा शोध घेत आहेत.

सराईत गुन्हेगार

अमोल मोहिते हा देखील २०१० च्या अजय मांगटे खून प्रकरणातील आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच, अमोलचे अपहरण करून खून करणारे संशयित दीपक भालेराव हा देखील २०११ च्या सोनाली हॉटेल बाहेरील राहुल शेजवळच्या खूनप्रकरणातील संशयित आहे. तर, रोशन काकड व बाळू नागरे यांचा देखील अनेक गुन्ह्यांमध्ये हात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण शुल्कासाठी सुनावणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील आरोग्य विज्ञान आणि उच्च व तंत्र शिक्षण अभ्यासक्रमासाठीचे शैक्षणिक शुल्क निश्चित करण्यासाठी येत्या ७ एप्रिलला मुंबईत सुनावणी होणार आहे. त्यास उपस्थित राहून सूचना करण्यात याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील आरोग्य विज्ञान आणि उच्च आणि तंत्र शिक्षण अभ्यासक्रमाच्या सर्व संस्थांचे २०१५-१६ या वर्षातील शैक्षणिक शुल्क लवकरच निश्चित करण्यात येणार आहे. हे शुल्क निश्चित करण्यासाठी येत्या ७ एप्रिलला (मंगळवारी) मुंबईत जाहीर सुनावणी होणार आहे. वैद्यकीय आणि उच्च व तंत्र शिक्षण या दोन्ही अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क २०१५ या शैक्षणिक वर्षापासूनच लागू होणार आहे. येत्या ७ एप्रिल रोजी सकाळी ११.३० ते १२.३० या वेळेत वैद्यकीय शिक्षण, तर दुपारी १ ते २.३० या वेळेत उच्च व तंत्र शिक्षण शुल्क समितीची बैठक होणार आहे. वांद्रे (पूर्व) येथील चेतना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्‍ड रिसर्चच्या सेमिनार हॉलमध्ये होणाऱ्या या सुनावणीस विद्यार्थी, पालक तसेच कॉलेजचे प्रतिनिधी यांना उपस्थित राहता येणार आहे.

या सर्वांची यांची मते या बैठकीत जाणून घेतली जाणार आहेत. या सुनावणीबाबत कॉलेजच्या विद्यार्थी आणि पालकांना सूचना दिल्यास त्याचा निश्चितच विचार केला जाणार आहे. शैक्षणिक वर्ष २०१५-१६ चे सूत्र तसेच नियमावली ही समितीच्या www.sssamiti.org या वेबसाईटवर उपलब्ध आहे. ती पाहून आवश्यक त्या सूचना व हरकती द्याव्यात, असे आवाहन समितीच्या कक्ष अधिकारी के. व्ही. साने यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांनी शोधले तणनाशक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतातील पिकांच्या दोन रोपांमधील नको असलेले गवत काढणारे यंत्र मेट बीकेसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. या यंत्राचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून, या यंत्राला राष्ट्रीय स्तरावरचे पारितोषिक मिळाले आहे.

शेतातील गवत ही शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या असते. पिकाला मिळणारे पोषणद्रव्य हे गवत शोषून घेत असल्याने त्याचा परिणाम पिकांच्या वाढीवर होतो. दोन पिकांमधील नको असलेले सरीतील गवत काढण्यासाठी मजुरांशिवाय पर्याय नसतो. त्यासाठी वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतो. या शेतकऱ्यांच्या समस्येचा विचार मेट कॉलेजच्या विद्यार्थिनी प्रणाली मोगल व अर्चना मालुंजकर यांनी केला. त्यानुसार त्यांनी न्यूमॅटिक कंट्रोल गवत काढण्याच्या तंत्राची कल्पना सुचली.

हा प्रोजेक्ट 'मेकप्रो-२0१५'मध्ये सादर करण्यात आला होता. या स्पर्धेत त्यांना तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. मेकॅनिकल विभागाचे प्रा. एस. व्ही. शेवाळे यांचे मार्गदर्शन या प्रोजेक्टला लाभले असून, हा प्रोजेक्ट 'रुरल इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजी क्लब- आयआयटी चेन्नई'च्या अंतर्गत तयार करण्यात आला आहे. शेतकरीवर्गाला या किफायतशीर मशिनचा पुरेपूर उपयोग होऊन या मशिनची किंमत वसूल होण्यास फार कालावधी लागणार नसल्याचा विद्यार्थ्यांचा दावा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कला आणि समाज...

$
0
0

>> मकरंद हिंगणे

टीव्हीवरील एका संगीत स्पर्धेच्या वेळी सुप्रसिध्द गायिका आशा भोसले यांनी एका गायिकेला सांगितले की, 'अगं तू आधी सरळ उभी तर राहा म्हणजे तुझे स्वर स्थिर लागतील...' एक गाणं म्हणायचं म्हणजे माईक हातात घेऊन संपूर्ण स्टेजभर फिरत असतात गाणारे, अभिजात संगीताचा तर आवाकाच मोठा. म्हणून बसून गाणं म्हणण्याची पध्दत रूढ झाली असावी कारण आपल्या संगीतात स्थिर स्वराला महत्त्व आहे आणि संपूर्ण जगात खाली बसून गाणं म्हणण्याची पध्दत भारतातच आहे;

इतर भारतीय नसलेल्या संगीत प्रकारात फक्त वाद्यवृंदातील वाद्यच बसलेले आढळतात तेही खुर्ची किंवा स्टुलवर. अर्थात दोन्ही प्रकारच्या म्हणजे भारतीय आणि पाश्चात्य संगीताच्या सादरीकरणाच्या पध्दती वेगवेगळ्या असल्याने हा फरक आहे. सांगायचा मुद्दा एवढाच की हे सरळ उभं राहणं सगळ्याच कलांच्या बाबतीत अत्यंत आवश्यक आहे. आपल्याकडे रसिकांच्या अभिरुचीच्या नावानं नेहमीच गळा काढला जातो. पण आपले कलाकार तरी आपापल्या कलेत असे सरळ उभे आहेत का? हा एक कलावंतांच्या दृष्टीनेही आत्मचिंतनाचाच विषय आहे.

आपल्याच कलेबद्दल माहिती नसणारे कलाकार आपल्याकडे आहेत. गायन, वादन, नृत्य, नाट्य, चित्रकला, शिल्पकला या कला अशा आहेत. की त्या सरळ त्या त्या देशाच्या संस्कृतीशी आजही कुठे उत्खनन केले गेले तर तिथे सापडणाऱ्या कलाकृती, चित्रकला, गुहेतील चित्रे, शिल्पे, वाद्य, घरांचे रचनाशास्त्र यावरून तेथील समाजजीवनाची ओळख पटते. म्हणजेच कोणत्याही काळातील समाजजीवनात कलेचे महत्त्व आबाधित आहे. किंवा त्या त्या काळातील असलेल्या कलेच्या माहितीवरून समाजाच्या प्रगतीचा स्तर ओळखू येतो. आज समाजजीवन प्रगतीच्या उच्च स्तरावर असतानाही आजच्या काळाचा समावेश कलेच्या सुवर्णकाळामध्ये होत नाही हा केवढा मोठा विरोधाभास आहे. दूरचित्रवाणीने तर कलेवर अतिक्रमणच केले आहे. एवढी वर्ष रसिक म्हणून कलेचा आस्वाद घेणारे लोक रंगमंचावर आले आहेत. 'हे तर आम्हाला येतंच' असं म्हणत, त्यांच्यातील कलावंत जागृत होतो आहे ही चांगलीच गोष्ट आहे पण अभ्यासाचे काय? समाजातून कलात्मक दृष्टी जवळजवळ हद्दपार झालीये. आज आपल्याला हुसेन, रझा, बेंद्रे, अमृता शेरगील कळत नाहीत. गुरूदत्त, मीनाकुमारी माहीत नाहीत, कुमार गंधर्व अमिर खाँ, बेगम अख्तर, मदन मोहन, समजत नाहीत. गुलझार, कुसुमाग्रज, बोरकर वाचायला वेळ नाही, रचना समजत नाही, रंगसंगती कळत नाही, जुन्या कलात्मक वास्तूंची मोडतोड करुन रंग द्यायला हात शिवशिवताहेत, कसा बदलणार समाज? यासाठी सर्व प्रथम कलावंतांनीच अभ्यासाची सवय लावून घेतली पाहीजे. 'अमूक एका कलेतलं आपल्याला काही कळत नाही बुवा' हे चुकीचं वाक्य बदललं पाहिजे. सगळ्या कलांचा आंतरिक संबंध हा वेगळा विषय आहे पण कोणतीही कला परिपूर्णतेच्या मार्गावर जाणार असेल तर त्यासाठी कलात्मकदृष्टी ज्येष्ठ अनुभवी अभ्यासू कलावंतांचे सानिध्य अभ्यासाची जोड, कलेसाठी झिजणं अपरिहार्य आहे. तरच गीतरामायणासारखी अभिजात कलाकृती निर्माण होते. कलेमध्ये सरळ उभ राहणं हे असं असतं. (लेखक के. के. वाघ कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टसचे प्राचार्य आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भक्तीरसाने भारला चैत्रोत्सव

$
0
0

राकेश हिरे, कळवण

महाराष्ट्रातल्या देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ म्हणून गणल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील आदिमाया सप्तशृंगी देवीचा चैत्र नवरात्रोत्सव सध्या सुरू आहे. रामनवमीपासून सुरू होऊन पौर्णिमेला सांगता होणाऱ्या या चैत्रोत्सवाला देवी भक्तांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेकडो वर्षांपासून परंपरेने चालत आलेला हा चैत्रोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी भाविकांची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. या उत्सवाच्या काळात उत्तर महाराष्ट्रातील व विशेषतः खान्देशातील लाखो भाविक नाचत, गात पायी चालत येउन भक्ती भावाने देवीचरणी नतमस्तक होतात. चैत्र पौर्णिमेला गडावरच्या उंच शिखरावर कीर्तीध्वज फडकल्यानंतर चैत्रोत्सवाची सांगता होते.

देवीची महती

अनादी काळापासून मनुष्य शक्तीची उपासना करीत असून, मानवी जीवनात शक्ती उपासनेला विशेष महत्त्व आहे. जगदंबेची ५१ पिठे भूतलावर असून, उपासकांना त्यापासून लाभ होतो अशी प्रत्येकाची श्रद्धा आहे. या शक्तीपिठांपैकी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिन्ही स्थानांचे त्रिगुणात्मक साक्षात ब्रम्ह स्वरुपीणी धर्मपीठ ओंकार स्वरुप अधिष्ठीत असल्याचे मानले जाते आणि तेच शक्तीपीठ म्हणजे गडावरील सप्तश्रृंगी देवी होय. दुष्ट शक्तींच्या नाशानंतर विसावा घेण्यासाठी सप्तशृंगी देवीने या गडावर वास्तव्य केले. सप्तश्रृंगी देवीचे पुराण काळापासुन असलेले महात्म्य लक्षात घेता या देवीची स्वयंभू अशी मूर्ती मंदिराच्या भव्य गाभाऱ्यात असून, नवनाथ संप्रदायातून नाथापासूनचा कालावाधी स्पष्टपणे सांगितला जातो. साबरी कवित्व अर्थात मंत्र शक्ती ही देवी सप्तश्रृंगीच्या आशीर्वादाने नाथांना प्राप्त झाली. नंतरच्या काळात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, पेशवे सरकार, दाभाडे, विंचुरकर, होळकर इत्यादी देवी भक्तांचा या पीठाशी अगदी जवळचा संबंध होता, असे संदर्भ मिळतात.

अर्धपीठाचे महात्म्य

महिषासुरमर्दिनी म्हणूनही सप्तशृंगी देवीला ओळखले जाते. फार पूर्वी दक्षाने बृहस्पतीराव या नावाचा मोठा यज्ञ केला. या यज्ञात शंकराला न बोलवता सर्व देवांना बोलवले. मात्र, शिवपत्नी सती या यज्ञाला आमंत्रण नसतांना गेली. यज्ञात शिवाला हबीरभाग दिला गेला नाही म्हणून सतीने रागाने यज्ञात उडी घेतली. शंकराला हे समजल्यानंतर त्याने यज्ञात विध्वंस केला. सतीचे कलेवर हातावर घेऊन शंकर त्रैलोक्यात हिंडू लागल्यामुळे ही स्थिती पाहून विष्णुने सुदर्शन चक्र सोडले व सतीच्या शरीराचे ५१ तुकडे ठिकठिकाणी पडले. हिच ५१ शक्तीपीठे म्हणुन गणली जाऊ लागली. महाराष्ट्रात शक्तीची साडेतीन पीठे आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची महासरस्वती, माहूरची महाकाली आणि वणीची सप्तश्रृंगी देवी आहे. परंतु, आदीशक्तीचे मूळ स्थान सप्तश्रृंग गड हेच असून, ओंकारातील मकार पूर्ण रुप होऊन सप्तशृंग गडावर स्थिरावला म्हणुन हेच मूळ रुप आणि हिच आदिमाया असल्याचे भक्त मानतात. अठरा हातांची ही महिषासुर मर्दिनी श्री महालक्ष्मी देवी, श्री महाकाली व श्री महासरस्वती होय. या त्रियुगणात्म्क स्वरुपात आद्यस्वयंभू शक्तीपीठ म्हणुन श्री सप्तशृंग देवीचा उल्लेख पौराणिक ग्रंथातून आढळतो.

चैत्रोत्सव

चैत्र महिन्यात रामनवमीपासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत हा नवरात्रोत्सव सुरू असतो. आदिमाया सप्तशृंगी देवीची दररोज पंचामृत पूजा केली जाते. गडावर येणारे भाविक नवस फेडत असतात. रामनवमीपासून सुरू होणारा हा उत्सव वाढत जावून पौर्णिमेपर्यंत भक्तांच्या गर्दीने उच्चांक गाठलेला असतो.

दानशूर करतात भक्तांची सेवा

यात्रा काळात भाविकांची प्रचंड गर्दी असते. गेल्या काही वर्षांत कळवण, सटाणा, मालेगाव या रस्त्यावर पायी चालणाऱ्या भाविकांसाठी विविध दानशूर व्यक्ती, सामाजिक मंडळे यांच्याकडून भक्तांसाठी पाणपोई, उसाचा रस, महाप्रसाद, भोजन दिले जावून भाविकांचे आदरातिथ्य राखले जाते.

डीजेचा तालावर जगदंबेचा उदो उदो

अनेक भाविक ग्रुपने गडाकडे मार्गस्थ होत असतात आणि सोबत असतात ते आदिमायेचा जयजयकार करणारे डीजे. या डीजेच्या तालावर सप्तशृंगी देवीची गाणी लावून भगवतीचा जयजयकार करत देवी भक्त पुढे सरकत असतात.

कीर्तीध्वजाची परंपरा

सुमारे ५०० वर्षापासून सुरू असलेल्या कीर्ती ध्वज मिरवणुकीची परंपरा आजही सप्तशृंग गडावर अखंडपणे सुरू आहे. सप्तश्रृंग

गडावर कीर्ती ध्वजाची भव्य

मिरवणूक काढण्यात येऊन पौर्णिमेच्या दिवशी रात्री ठीक १२ वाजता कळवण तालुक्यातील दरेगावचे पारंपरिक देवीभक्त एकनाथ गवळी पाटील सप्तशृंग गडावर ध्वज लावतात. ध्वज लावण्याचा हा मान गवळी परिवाराकडेच पूर्वीपासून आहे.

खान्देशातील भाविकांची पायी यात्रा

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी देवीच्या चैत्र महिन्यातील यात्रेसाठी खान्देशातील धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांमधील लाखो भाविक पायी चालत गडावर येतात. चार ते पाच दिवसांचा प्रवास करीत हे भाविक पौर्णिमेच्या दिवसापर्यंत गडावर येवून भगवतीचरणी नतमस्तक होतात. देवीचे दर्शन घेतल्यानंतर पायी चालत येऊन आलेला थकवा दूर होऊन दर्शनाने भक्तांच्या चेहऱ्यावर कृतार्थ झाल्याचा भाव दिसतो.

सप्तशृंग गडाच्या विकासाची गरज

दरवर्षी लाखो भाविक गडावर दर्शनासाठी येत असतात. सप्तशृंगी देवीच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे क्षेत्र असल्याने या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या व सप्तशृंग गड परिसराला लाभलेले नैसर्गिक सौंदर्य लक्षात घेऊन उत्तम दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून गडाचा विकास होणे गरजेचे आहे. शासनाने गडाला जास्तीचा निधी देण्याची अपेक्षा येथे येणारे भाविक नेहमी व्यक्त करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकला सापडली तोफ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पूर्व दरवाजास दर्शनबारीकरिता जमीन सपाटीकरण काम सुरू झाले आहे. येथे पूर्वी भराव टाकलेला हाता तो काढत असताना लोखंडी तोफ सापडली आहे. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जेसीबीने माती उकरत असताना ही तोफ आढळली. मंदिर व्यवस्थापन कर्मचाऱ्यांनी ती कोठी संसान इमारतीत ठेवली असून, पुरातत्व खात्याच्या निर्दशनास आणून दिली आहे. सुमारे ३०० वर्षांपूर्वीची ही तोफ असल्याचे बोलले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३०० कुटुंबांना मिळणार लाभ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस प्रा. लि. च्या वतीने वॉटर शेड ऑर्गनायजेशन ट्रस्ट (WOTR ) आणि संजीवनी इ‌‌न्स्टिट्यूट फॉर इम्पॉवरमेंट अॅण्ड डेव्हलपमेंट (SIED) व स्थानिक लोकसहभागातून सिन्नर तालुक्यातील खापराळे, चंद्रपूर आणि जामगाव या तीन गावात नैसर्गिक संसाधनांचे पुनर्निर्माण घडवून आणण्याकरिता वॉटर शेड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट राबविण्याचे ठरविले आहे. दोन वर्षे चालणाऱ्या या प्रकल्पातून २९७ हून अधिक कुटुंबांना त्याचा लाभ होणार आहे.

जागतिक जल दिनाच्या निमित्ताने या प्रोजेक्टचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे, तहसीलदार मनोज खैरनार, कोका कोलाचे मॅनेजर केदार सप्रे, कल्याण रंजन, प्रताप शिवलकर पारदा सारथी, तसेच डब्लूओटीआरचे क्रिस्पेनो लोबा, संदीप जाधव, एसआयडीइचे जे. आर. पवार तसेच जामगावच्या सरपंच मनीषा आव्हाड, चंद्रपूरचे सरपंच नामदेव सदगीर आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी या प्रोजेक्टबद्दल ग्रामस्थांना माहिती दिली.

कोका कोलाचे कल्याण रंजन म्हणाले की, आम्ही हाती घेतलेला हा दुसरा प्रोजेक्ट आहे. जलसंधारण आणि चिरस्थायी शेतीतून उपजीविका मिळवून देण्याकरिता कोका कोला पुढे असून, सामाजिक व आर्थिक सुधारणांमध्ये पाण्याचा वाटा खूप मोठा आहे. हेच जाणून सिन्नर तालुक्यातील या तीन गावांचा सिंचन विकास व त्यातून या परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचा आमचा प्रयत्न आहे. डब्लूओटीआरचे क्रिस्पिनो लोबो म्हणाले की, पाण्याचे अधिकाधिक संधारण, जमिनीचा दर्जा उंचावणे,

शेतीचे उत्पन्न वाढविणे आणि हवामानामुळे होणारे नुकसान टाळण्याक‌रिता पीकविषयक सल्ला असे नवनवे मार्ग सुचवणार आहोत. पिण्याकरिता आणि शेतीकरिता पाण्याची अधिक उपलब्धता, शेतीच्या उत्पन्नात वाढ, पिकाचा आणि पोषणाचा आणि तात्पर्याने आयुष्याचा दर्जा उंचावणे हे या प्रकल्पाचे फलित असेल, असे त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंगच्या परीक्षा जाहीर

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर, नाशिक

इंजिनीअरिंग शाखेच्या परीक्षांचे वेळापत्रक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जाहीर केले आहे. त्यानुसार सध्या विद्यार्थ्यांना प्रीपरेशन लिव्हस् (सराव सुट्टी) सुरू असून, पुढील महिन्यात लेखी परीक्षा होणार आहेत.

पुणे विद्यापीठाने www.unipune.ac.in या वेबसाइटवर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. येत्या ८ एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे. त्यानंतर साधारण ५ मे ते २७ मे दरम्यान विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा असेल. २००८ पॅटर्नच्या फस्ट इयरच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा ही लेखी परीक्षेनंतर होईल. त्या संदर्भातील माहिती मुलांना लवकरच दिली जाईल. विद्यापीठाच्या परीक्षा दरवर्षी काही ना काही गोंधळामुळे चर्चेत असतात. प्रश्नपत्रिका उशिरा मिळाल्या, पेपर उशिरा सुरू होण्याच्या तक्रारी किंवा परीक्षेनंतर विलंबाने निकाल लागण्याच्या व त्या निकालांमधील त्रुटींसंदर्भातील तक्रारी अशा विविध बाबींचा त्यात समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मलजल शुध्दीकरणची रॉयल्टी मनपालाच मिळावी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

इंडिया बुल्स या कंपनीला देण्यात येणाऱ्या मलजल शुध्दीकरणाच्या पाण्याबद्दल जलसंपदा विभागास प्राप्त होणारी रॉयल्टी नाशिक महापालिकेकडे वर्ग करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. नागपूर महापालिकेप्रमाणेच नाशिक महापालिकेलाही मलजलचे पैसे मिळावेत, असे साकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांना घातले आहे.

आमदार फरांदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले असून, त्यात नाशिक महापालिकेचे प्रक्रियायुक्त सांडपाणी इंडिया बुल्स या कंपनीच्या थरमल पॉवर स्टेशनसाठी आरक्षित केले आहे. या पाण्याच्या बदल्यात इंडिया बुल्स जलसंपदाला त्याची रॉयल्टी भरते. मात्र, नागपूर महापालिकेत महाजेनको प्रक्रियायुक्त पाण्याची रॉयल्टी महापालिकेला अदा करते. त्यामुळे नागपूरप्रमाणेच इंडिया बुल्सने जलसंपदाला रॉयल्टी न देता थेट महापालिकेला द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पर्यावरण विभागानेही अशाच प्रकारचा आदेश काढला आहे. त्यात प्रक्रियायुक्त पाणी शेती, उद्योग यांनी वापरल्यास पाण्याचा मोबदला महापालिकेला द्यावा, असे नमूद केले आहे. मात्र, नाशिक महापालिकेबाबत उलटा नियम लावण्यात आला असून इं‌डिया बुल्सची रॉयल्टी जलसंपदाला मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून रॉयल्टीची रक्कम जलसंपदाऐवजी महापालिकेकडे वर्ग करावी, अशी मागणी फरांदे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघवी, बागरेचा सोबत रायसोनींचे व्यावसायिक साटेलोटे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थेचे सर्वेसर्वा प्रमोद उर्फ अंकल रायसोनी यांच्याशी उद्योगाच्या माध्यमातून प्रशांत संघवी व पवनकुमार बागरेचा यांचे संबंध प्रस्थापित झाल्याचे आणि या संबंधामुळेच रायसोनी, बागरेचा, प्रदीप कर्नावट आणि संदेश चोपडा यांनी बी. एच. आर. पतसंस्थेतून कोट्यवधींचे बेकायदेशीर कर्ज उचल करून ठेवींच्या पैशांवर आपले स्वहित साधले असे दिसून आले आहे.

रायसोनी पतसंस्थेच्या शिवकॉलनी शाखेत ठेवींची रक्कम देण्यास टाळाटाळ झाली म्हणून चावदस शिवराम चौधरी यांच्या फिर्यादीवरून दाखल झालेल्या गुन्हन्याचे दोषारोप पत्र रामानंद नगर पोलिसांनी बुधवारी न्यायालयात दाखल केले असता यातील तपासात अंकल रायसोनी यांचे प्रशांत संघवी व पावन बागरेचा यांचे व्यावसायिक साटेलोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोषारोप पत्राच्या यादीप्रमाणे १२ क्रमांकाच्या पानावर पवनकुमार बागरेचा यांचा पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. या जबाबात बागरेचा याने बळीराम पेठेतील आर. बी. डायमंड या फर्ममध्ये अंकल रायसोनी यांचा पूर्ण पैसा असून ४०/५० टक्के याप्रमाणात भागीदारी असल्याचे कबूल केले आहे. २००६ मध्ये सुरू झालेल्या या दालनाचे सर्व व्यावसायिक व भागीदारीचे कागदपत्र अंकल रायसोनी यांच्याकडे असल्याचे आणि या दालनाची जागा पार्टनर म्हणून दोघांच्या मालकीचे असल्याचे नमूद करून रायसोनी-बागरेचा या नावाचे फर्मचे जळगाव येथील फेडरल बँकेत चालू खाते असल्याची कबुली दिली आहे. आर. बी. डायमंडसाठी लागणारा पैसा मला अंकल रायसोनी यांनी वेळोवेळी उपलब्ध करून दिल्याचे यात नमूद आहे. बागरेचा यांनी रायसोनी संस्थेतून कर्ज घेवून परतफेड केल्याचे म्हटले आहे.

याच दोषारोप पत्रात १५ क्रमांकाच्या पानावर प्रशांत संघवी याचा जबाब असून, संघवी याने सुद्धा २००५ पासून पुण्यातील पिंप्री चिंचवड प्राधिकरणात काम सुरू असलेल्या 'पी थ्री'नावाच्या बांधकाम कंपनीत अंकल रायसोनी यांच्यासोबत प्रशांत संघवी, संदेश चोपडा, प्रदीप कर्नावट अशी सर्व मंडळी समप्रमाणात म्हणजे २५ टक्क्यांप्रमाणे भागीदार असल्याचे कबूल करून या व्यवसायासाठी १० कोटी रुपये पतसंस्थेतून कॅश क्रेडीट कर्ज उचल केल्याचे म्हटले आहे. संघवी यांनी वडिलोपार्जित शेती आणि पाचोरा तालुक्यातील जिनिंग व प्रेसिंगचा उद्योग असल्याचे स्पष्ट केले आहे पण प्रमोद रायसोनी व संघवी यांच्यात मामा-भाच्याचे सर्वश्रुत नाते असल्याचे जबाब देतांना मुद्दाम लपवले आहे. रामानंद नगर पोलिसांनी सादर केलेल्या दोषारोप पत्रात बागरेचा व संघवी यांच्या जबाबावरून प्रमोद रायसोनी यांनी आर. बी. डायमंड व पी. थ्री. या पुण्यातील उच्च तारांकित व्यवसायात पार्टनर म्हणून गुंतवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. रायसोनी यांनी अशा व्यवसायांसाठी एकूण किती भांडवल ओतले आणि ते कुठून आणले? हा महत्वपूर्ण उलगडा इतर ठिकाणच्या गुन्ह्यात पोलिसांच्या तपासात होऊ शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हा नियोजनाची खर्चात आघाडी

$
0
0

तब्बल ९९ टक्के निधी खर्च; अवघा ३ लाख रुपये परत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारच्या विविध योजनांवर खर्च करण्यासाठी २०१४-१५ या आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या एकूण निधीपैकी तब्बल ९९.९९ टक्के निधी खर्च झाल्याचा दावा जिल्हा नियोजन विभागाने केला आहे. २७५ कोटींपैकी अवघा २ लाख ८९ हजारांचा निधी खर्च होऊ न शकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी निधीची आवश्यकता असते. म्हणूनच प्रत्येक आर्थिक वर्षात सरकारकडून जिल्हा प्रशासनाला निधी दिला जातो. मार्च अखेरपर्यंत हा निधी खर्च करणे अपेक्षित असते. त्यानंतर पुढील आर्थिक वर्षासाठीच्या निधीची तजवीज केली जाते. वितरित केलेला निधी मुदतीमध्ये खर्च न झाल्यास तो सरकारला परत जातो. कोणत्याही प्रशासनासाठी ही नामुष्कीची गोष्ट असते. विशेष म्हणजे निधी माघारी जाणे प्रशासनाच्या दृष्टीने शोभनीय बाब नसते. त्याचा परिणाम पुढील आर्थिक वर्षामध्ये पदरात पाडून घ्यावयाच्या निधीवरही होण्याची शक्यता असते. म्हणूनच प्राप्त निधीचा पुरेपूर विनीयोग करण्याकडे सर्व विभागांचा कल असतो.

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये प्रशासनाला २७५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी २७४ कोटी ९७ लाख २१ हजारांचा निधी खर्च करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गाभा क्षेत्रांतर्गत कृषी व संलग्न सेवा, ग्राम विकास, सामाजिक व सामूहिक सेवांसाठी १६३ कोटी २५ लाख २२ हजारांचा निधी आला होता. त्यापैकी १६३ कोटी २२ लाख ९७ हजारांचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्यातही ग्राम विकासासाठी देण्यात आलेला सर्वच्या सर्व म्हणजेच २९ कोटी ९२ लाख ३७ हजारांचा निधी खर्च करण्यात आला आहे.

बिगर गाभा क्षेत्रांतर्गत पाटबंधारे व पूरनियंत्रण, ऊर्जा, उद्योग व खाण, परिवहन, सामान्य आर्थिक सेवा, सामान्य सेवा अशा सहा विभागांसाठी ९९ कोटी १४ लाख १३ हजारांचा निधी प्राप्त झाला होता. हा सर्वच्या सर्व निधी खर्च करण्यात आला आहे. मूल्यमापन, सनियंत्रण आणि नाविन्यपूर्ण योजनांसाठी मंजूर १२ कोटी ६० लाख ६५ हजार रुपये निधीपैकी १२ कोटी ६० लाख ६४ हजारांचा निधी खर्च झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३० गावे अजुनही तहानलेली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मार्च म‌हिन्यापासून जिल्हावासियांना उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जिल्ह्यातील ३० दुष्काळी गावे आणि ८१ वाड्या तहानलेल्या असून त्यांची तहान शमविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे.

यंदा नाशिककरांना असह्य उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार अशी चिन्हे मार्च महिन्याच्या अखेरपासूनच दिसू लागली आहेत. मे महिन्यास अद्याप अवकाश असला तरी तेव्हा जाणवणारे असह्य उन्हाचे चटके नागरिकांना आता सकाळी आठपासूनच सहन करावे लागत आहेत. त्यामुळे सबंध उन्हाळा यंदा कसा जाणार याचीच चिंता नागरिकांच्या बोलण्यातून डोकावू लागली आहे. शहरात अशी परिस्थिती असताना ग्रामीण भागात तर यापेक्षाही चिंताजनक परिस्थिती आहे.जिल्ह्यीतील बहुतांश ग्रामीण भागआतापासून उन्हाच्या झळांमुळे पोळून निघू लागला आहे. अंगाची काहिली करणाऱ्या उन्हामुळे जिल्ह्यातील काही गावांमधील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. त्यामुळे या गावांमध्ये आतापासूनच पाण्याचे र्दु‌भिक्ष्य जाणवत असून ग्रामस्थांना विशेषत: महिलांना आतापासूनच पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. अर्थात जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या नसली तरी येवला, सिन्नर, नांदगाव, चांदवड आणि बागलाण तालुक्यातील ३० गावे आणि ८१ वाड्या तहानलेल्या असून तेथे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक गावे येवला तालुक्यामध्ये तर सर्वाधिक वाड्या सिन्नर तालुक्यामध्ये आहेत. तेथील ग्रामस्थांची मागणी विचारात घेऊन प्रशासनाने २० टँकरच्या माध्यमातून तेथे पाणी पुरविण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक ११ टँकर सिन्नर तालुक्यात तर चार टँकर येवला तालुक्यात फिरविण्यात येत आहेत. दिवसभरात ८३ टँकरच्या फेऱ्यांद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जातो आहे. त्यामध्ये सर्वाधिक १५ फेऱ्या नांदगाव तालुक्यामध्ये सुरू आहेत.

तीन विहिरी अधिग्रहीत

पाणी टंचाई असलेल्या सर्वच गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो असेही नाही. काही गावांमध्ये तेथील रहिवाशांच्या मालकीच्या विहिरी असतात. ग्रामस्थांना पुरेल एवढे पाणी या विहिरींमध्ये असेल तर त्या प्रशासनाकडून अधिग्रहीत केल्या जातात. या विहिरींवर ग्रामस्थांना पाणी भरू देण्यासाठी संबंधित मालकाला प्रशासनाकडून ठराविक मोबदला दिला जातो. जिल्ह्यात अशा पाच विहिरी प्रशासनाने अधिग्रहीत केल्या आहेत. बागलाणमध्ये दोन तर सिन्नर आणि नांदगावमध्ये प्रत्येकी एक विहीर अशा प्रकारे एकूण तीन विहिरी अधिग्रहीत करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्ह्यांचे प्रमाण घटविण्यात यश आले

$
0
0

सिंहस्थ कुंभमेळ्यातील गर्दीचे योग्य प्रकारे नियोजन करून तो निर्विघ्न पार पाडणे पोलिस दलाची सर्वांत महत्त्वाची जबाबदारी आहे. कुंभमेळ्याच्या आयोजनास आता अवघा चार महिन्याचा ​कालावधी शिल्लक आहे. शहर पोलिस दल याच कामात गुंतलेले असताना राज्य सरकारने पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांची तडकाफडकी बदली केली. याविषयी त्यांच्याशी 'मटा'ने साधलेला संवाद.

बदलीची नेमकी कारणे काय आहेत?

या शहरात माझा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. तीन वर्षे आणि दोन महिने पूर्ण झाल्यामुळे बदली झाली. ही एक प्रशासकीय बाब आहे. मी माझे काम चोख केले. तसेच त्याबाबत पूर्ण समाधानी​ आहे.

कुंभमेळ्याची तयारी कुठपर्यंत आली आहे?

सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामास लवकरच सुरुवात होईल. कायदा व सुव्यवस्था नियंत्रित ठेवणे तसेच गर्दी नियोजनाच्या दृष्टीकोनातून पोलिसांची १०० टक्के तयारी पूर्ण झाली आहे. गुरुवारी सकाळी देखील कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत अधिकाऱ्यांसोबत माझी बैठक झाली. कुंभमेळ्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्याचे काम सुरू आहे. प्रशिक्षणाचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे.

सीसीटीव्हीच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत?

सीसीटीव्ही कोणत्या स्वरूपाचे असावेत, हे ठरवण्याचा अधिकार स्थानिक पोलिसांना नव्हता. सुरुवातीस सीसीटीव्ही कायमस्वरूपी बसवण्याच्या दृष्टीने सूचना करण्यात आल्या. म्हणून तसा प्रस्ताव तयार झाला. नतंर, मंत्रालयातून नवीन आदेश आले. त्या आदेशानुसारच आम्ही तात्पुरत्या स्वरूपात सीसीटीव्ही बसवण्याच्या कामाचा प्रस्ताव पाठवला. तो मंजूर झाला असून लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल. या निर्णयामागे स्थानिक पोलिसांची भूमिका स्पष्ट होती आणि आहे.

शहरातील गुन्हेगारीबाबत काय वाटते?

वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे गुन्हेगारी घटना घडतच राहणार. १०० टक्के गुन्हेगारीमुक्त शहर ही संकल्पना अस्तित्वात येण्याची शक्यता फारच कमी आहे. नाशिक शहराची लोकसंख्या अद्यापपर्यंत आटोक्यात असून गुन्ह्यांची संख्याही कमी झाली आहे. मिशन ऑल आऊट, कोंम्बिग, नाकाबंदी, फिक्स पॉइंट अशा स्वरूपाच्या योजना राबवताना पोलिस आणि सर्वसामन्यांचा संपर्क वाढवण्याचा हेतू होतात. तो सफल झाला. अधिकारी आ​णि कर्मचाऱ्यांनी चांगली साथ दिली. वेळ पडेल तेव्हा कामे करण्यास सर्वजण पुढे आल्याने गुन्ह्यांची संख्या कमी झाली.

तुमच्या कार्यकाळात सर्वांत जास्त कर्मचारी निलंबीत झाले?

असे काही नाही. चार्टशिट वेळेत दाखल न करणे, जप्त केलेल्या साहित्याचा गैरवापर करणे, कामात ढिलाई दाखवणे अशी कृत्ये कर्मचाऱ्यांकडून होतात, तेव्हा निलंबनाची कारवाई करावीच लागते. ही कारवाई निश्चित‌च आकसातून झालेली नसते. ती प्रशासकीय बाब आहे. चांगले काम करताना इतरांचे हितसंबंध दुखावले जाऊ शकतात. असो, पण मागील तीन वर्षात केलेल्या चांगल्या कामगिरीमुळेच मी अभिमानाने या शहराची रजा घेतो आहे.

(शब्दांकन- अरविंद जाधव)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागरुक राहून करा ऑनलाइन खरेदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड वाढला असला तरी यामधून होणारा मनःस्तापही त्यापेक्षा अधिक प्रमाणात आहे. काही ठराविक वेबसाइट सोडल्या तर अनेकदा ग्राहकांना मनःस्ताप सहन करावा लागतो. काही कंपन्यांच्या भोंगळ कारभारामुळे ऑनलाइन शॉपिंगची विश्वासार्हता कमी होत जाते ग्राहक यापासून चार हात दूर राहण्याचा प्रयत्न करतात. पण जागृत राहून आणि काही ठराविक गोष्टी लक्षात ठेवून ऑनलाइन शॉपिंग सोपी आणि सहज होण्याबरोबरच निश्चिंतदेखील होऊ शकते.

सध्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटमध्ये ढीगभर कंपन्या आहेत. पण यापैकी काही ठराविक कंपन्या सोडल्या तर उरलेल्या कंपन्यांची हवी तितकी माहिती आपल्याला नसते. त्यामुळेच ऑनलाइन शॉपिंगमध्ये होणारे फसवणूकीचे प्रकार, किंवा आपली गैरसोय होण्याचे प्रकार वाढीस लागतात. हा त्रास टाळायचा असेल तर आपल्यालाच जागरुकता बाळगण्याची गरज आहे.

हल्ली रोज सकाळ झाली की हातात मोबाइल किंवा लॅपटॉप समोर घेऊन 'डील ऑफ डे' किंवा 'ऑफर ऑफ डे'चा शोध सुरू होतो. यामध्ये त्या एका दिवसापुरती ती वस्तू साधारणपणे पन्नास ते सत्तर टक्के डिस्काऊंटने विकली जाणार असते. अशावेळी खरेदी करताना कुठलाही विचार न करता ती वस्तू ऑर्डर केली जाते; मात्र यावरही विचार करणे खूप गरजेचे आहे. ऑनलाइन शॉपिंग करताना आपण योग्य तेवढी काळजी घेत असलो तरीही नवीन वेबसाइटवर व्यवहार करताना काळजी घेणं अधिक गरजेचं आहे. ऑनलाइन खरेदी करताना काळजी घेताना या गोष्टींचा विचार नक्की करा.

- आपण जी वस्तू घेत आहोत ती आपल्यासाठी किती गरजेची आहे याला प्राधान्य द्या.

- ऑफ किंवा डिस्काऊंटमध्ये जी वस्तू मिळते आहे ती खरंच आपल्या किती गरजेची आणि उपयोगाची आहे याचा विचार करा.

- फक्त स्वस्तात वस्तू मिळते आहे म्हणून खरेदी करू नका.

- आपण जी वस्तू घेतो आहे तिची किंमत आणि दर्जा रास्त आहे की नाही याचा विचार करा.

- बऱ्याचदा वस्तूच्या किंमतीवरून तिचे डिलिव्हरी चार्जेस ठरवले जातात. अशा वेळी आपण जी वस्तू घेत आहोत त्यासाठी असणाऱ्या डिलिव्हरी चार्ज बघून घ्या.

- आपण जी वस्तू खरेदी केली आहे ती परत करण्याची मूदत, त्यासाठी असणारी प्रक्रिया याची पूर्ण माहिती करून घ्या.

- कॉम्बो ऑफरमधील चार्जेस आणि त्यातील वस्तू आपल्यासाठी उपयोगी आहेत की नाही याचा विचार करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थासाठी सजणार प्रवेशद्वारे

$
0
0

महापालिका घेणार वास्तुविशारदांची मदत; रिंगरोड काठापर्यंत पूर्ण करण्याची सूचना

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात येणाऱ्या सर्व रस्त्यांच्या प्रवेशद्वारावरांचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शहरातील वास्तुविशारदांमध्ये झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील फूटपाथावर अपंगाना चढउतार करता यावा यासाठी फूटपाथना स्लोप देण्याच्या आणि रिंगरोड दोन्ही काठांपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना राज यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान, शहरातीत डेब्रिज उचलण्याच्या आणि खतप्रकल्प कार्यान्वित करण्याच्या निविदा पुढील आठवड्यात निघणार असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली.

राज यांनी गुरुवारी महापौर अशोक मुर्तडक आणि आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, मनसे शहराध्यक्ष राहुल ढिकले यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत शहरतील विकासकामांची पाहणी केली. गोदापार्क, रिंगरोड, चिल्ड्रन पार्कला भेट देवून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी अधिकाऱ्यांना प्रस्तावित कामांमध्ये आवश्यक बदल करण्याच्या सूचना यावेळी केल्या. तर सकाळी ठाकरेंनी यांनी आयुक्तांसमवेत शहरातील वास्तुविशारदांसोबत बैठक घेवून सिंहस्थाच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये लाखो भाविक येणार असल्याने, नाशिकची वेगळी ओळख निर्माण होण्यासाठी रस्त्यांच्या प्रवेशद्वारांचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. प्रवेशद्वारांचे सौंदर्यीकरणाचे डिजाईन वास्तुविशारद तयार करणार असून महापालिका त्याचे इम्पिमेन्ट करणार आहे. त्यासाठी खर्चही महापालिका उचलणार आहे. या सौंदर्यीकरणामुळे नाशिकची ओळख निर्माण होईल असा दावा ठाकरेंनी केला आहे. यासोबतच शहरातील सर्व आयलॅन्डचा आकार एकसारखा असावा यासाठी आपला प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. रिंगरोडच्या कामांत महत्त्वपूर्ण सूचना केल्या असून रिंगरोड आता पूर्ण काठापर्यंत करण्यात येणार आहे. रिंगरोडच्या आजूबाजूंची माती रस्त्यावर येवून खड्डे तयार होतात. त्यामुळे रिंगरोड काठापर्यंत पूर्ण केल्यास रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत असा दावा त्यांनी केला आहे.

अपंगासाठी फूटपाथवर स्लोप

शहरात महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या फुटपाथवर अंपगाना चढता येत नाही. त्यांनाही या फुटपाथचा वापर करता यावा यासाठी फुटपाथला स्लोप देण्याच्या सूचना ठाकरे यांनी केल्या आहेत. फुटपाथची रचना अंपगाना मदत व्हावी, अशी असावी असे सांगत सर्व फुटपाथवर अंपगासाठी स्लोप करण्याच्या सूचना त्यांनी आयुक्तांना केल्या आहेत. यामुळे अंपगानाही या फुटपाथवर चढउतार करता येणार आहे.

नेहरू उद्यानाला अद्याप मंजुरी नाही

पांडवलेण्यांजवळील नेहरू गार्डन बोटॅनिकल गार्डन म्हणून विकसित करण्याचा महापालिकेन निर्णय घेतला असला तरी त्याला वनविभागाची मंजुरी मिळाली नसल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे. या गार्डनचे डिजाईनचे काम सुरू असून लवकरच त्याला मंजुरी मिळेल. डिझाईन केल्यानंतर ते वनविभागाकडे सुपूर्द करू असे त्यांनी यावेळी सांगितले.

डेब्रिज व खतप्रकल्पासाठी लवकरच निविदा

शहरातील डेब्रिज उचलण्याचा ठेका देण्याचा निर्णय दोन वर्षापूर्वीच घेतला आहे. मात्र, संजय खंदारे यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र, आता डॉ. गेडाम यांनी या कामाचे कंत्राट काढण्याचा निर्णय घेतला असून पुढील आठवड्यात त्याची निविदा निघेल असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले. सोबतच खत प्रकल्पातून वीज निर्मिती करण्याची निविदाही पुढील आठवड्यात काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

पुलाखालील सौंदर्यीकरणाला महिंद्राचा प्रतिसाद नाही

नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डानपूलाखालील रिक्त जागेचे सौदर्यीकरण महापालिका महिंद्राच्या वतीने करणार होती. मात्र, या सौंदर्यीकरणाला आंनद महिंद्रा यांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे सौंदर्यीकरणाचे काम रखडल्याची माहीती ठाकरे यांनी दिली आहे.

सिंहस्थाचा बोजा नाशिककरांवर का?

सिंहस्थ कुंभमळ्याची जबाबदारी ही राज्य आणि केंद्र सरकारचीच असल्याचा दावा करत, नाशिककरांवर कुंभमेळ्याचा बोजा का असा सवाल त्यांनी केला आहे. केंद्राने अद्यापही मदत केली नसल्याचे सांगत, नाशिकरांच्या करातून ही कामे नकोत असे त्यांनी यावेळी सांगितले.

डॉ. गेडाम गुडमॅन; खंदारे बॅडमॅन

राज ठाकरे यांनी गुरुवारी महापालिकेचे विद्यमान आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची तोंडभरून स्तुती केली. डॉ. गेडाम चांगला माणूस असून शहरात असलेली सर्व टीमही चांगली असल्याचे प्रशस्तीपत्र त्यांनी दिली. मात्र, तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांच्यावर जोरदार टीका केली. खंदारेना काहीही सांगितले तरी ते मोबाईलच खेळत होते असा टोला त्यांनी हाणला. डेब्रेजचे टेंडर काढण्यासाठी आपण त्यांना अनेकवेळा सांगितले; मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images