Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

गिरीराजांच्या पुतळ्याचे दहन

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या केंद्रीय लघु उद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंह यांचा पुतळा जाळून नाशिक शहर काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. यावेळी काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी सिंह यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

सिंह यांनी बुधवारी सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्याचे पडसाद देशभरात सर्वत्र उमटले असून नाशिक शहर आणि ग्रामीण काँग्रेसच्या वतीने त्यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. सिंह यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. सोबतच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, शहराध्यक्ष शरद आहेर, महापालिका गटनेते उत्तमराव कांबळे, काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील, महिला शहर काँग्रेस अध्यक्ष वत्सला खैरे, वंदना मनचंदा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना-मनसेत चुरस

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

नाशिक महापालिकेच्या सहा विभागांच्या प्रभाग सभापतींची निवडणूक येत्या ८ व ९ एप्रिलला होत आहेत. यात नवीन नाशिकमधील सिडकोतील सभापतीसाठी मनसे व शिवसेनेत चुरस असल्याचे चित्र आहे. मनसे अन्य पक्षांना बरोबर घेत शिवसेनेला बाहेर ठेवणार असल्याची तयारी सुरू असल्याची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, मनसे व शिवसेनेच पक्षीय बलाबल समसमान असले तरी इतर पक्ष कुणाला साथ देतात यावर सिडकोतील नवीन सभापती ठरणार आहे.

नाशिक महापालिकेत पहिल्यांदाच अनेक घडामोडी पक्षांमध्ये बघायला मिळाल्या आहेत. यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि विशेष म्हणजे माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांनाच आपल्या भाषणातून टार्गेट केले होते. परंतु, काळाच्या बदलत्या रणनीतीमध्ये मफलरने गळा आवळण्याची भाषा करणारे ठाकरेंनी राजकीय गरज म्हणून 'राष्ट्रवादी'ची मदत घेतली.

यामुळे अनेक राजकीय बदल महापालिकेला पहायला मिळाले. आता पुन्हा सहा विभागातील प्रभाग सभापतींची निवडणूक ८ व ९ एप्रिलला होत आहे. यात नवीन नाशिक सिडकोत मनसे शिवसेनेला बाहेर ठेवत इतर पक्षांना साथ देणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्या निवडणुकीत मनसे शिवसेने एकमेकांना साथ देत सभापती पद मिळविले होते. परंतु, सद्या स्थितीत बदलेले राजकीय समिकरणे बघता मनसे इतर पक्षांमधील नगरसेवकांना सभापतीची माळ बहाल करणार असल्याची चर्चा सिडको विभागात रगंली आहे.

यात पहिल्यांदा सिडको प्रभागाचे सभापतीपद शिवसेनेला गेले होते. नंतर मनसे व पुन्हा शिवसेनेने सभापतीपद भूषविले. आता मनसे इतर पक्षातील म्हणजेच राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यापैकी एकाला सभापती पद देणार असल्याचे राजकीय जाणकारांनी सांगितले. मात्र, मनसे, राष्ट्रवादी यांना रोखण्यासाठी शिवसेना काय रणनीती आखते याकडेही सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस आयुक्तांची तडकाफडकी बदली

0
0

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

कुंभमेळ्याच्या तोंडावरच पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांची गृहविभागाने गुरूवारी तडकाफडकी बदली केली. सरंगल यांच्या जागी राज्य मानवी अधिकार आयोगाच्या तपास शाखेचे पोलिस महानिरीक्षक एस. जगन्नाथ पदभार स्वीकारणार आहेत. सरंगल यांच्याकडे सध्या तरी कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही.

काही महिन्यांपासून जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि शहर पोलिसांचे कुंभमेळ्याच्या नियोजनावरूनच बिनसत गेले. शहर पोलिस योग्य सहकार्य करीत नसल्याच्या तक्रारी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या होत्या. प्रशासनाला सहकार्य करणारा पोलिस आयुक्त देण्याची जिल्हा प्रशासनाची मागणी मुख्यमंत्री यांनी उचलून धरत सरंगल यांची अचानक बदली केली. गृहविभागाने गुरूवारी सकाळी सरंगल यांच्या बदलीचा फॅक्स पाठवला.

१९९१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या जगन्नाथ यांनी गडचिरोली, नाशिक, उस्मानाबाद आदी ठिकाणी काम पाहिले आहे. २००१ ते २००८ या कालावधीत जगन्नाथ यांनी सीबीआय (सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशन) मध्ये पोलिस अधीक्षक तसेच सह पोलिस महानिरीक्षक म्हणून बँकींग सिक्युरीटज अॅण्ड फ्रॉडस सेल (बीएसएफएस) म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या जगन्नाथ यांनी पार पाडल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज यांनी शिवसेनेला डिवचले

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मनसेच्या सत्ताकाळात नाशिकचा विकास झाला नसल्याची टीका करणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांसह माध्यंमानाही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी खडे बोल सुनावले आहेत. आधी औरंगाबाद पाहून या मग, नाशिकच्या विकासाची तुलना करा असा सल्ला त्यांनी राजकीय पक्षांसह प्रसार माध्यमांना दिला. औरंगाबादमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. ठाकरेंनी प्रहार करून शिवसेनेला डिवचल्याचे बोलले जात आहे.

राज ठाकरे यांनी गुरुवारी नाशिकचा दौरा केला. यावेळी पत्रकारांशी गप्पा मारतांना ठाकरेंनी मनसेने विकास केला नसल्याचा मुद्दा खोडून काढला आहे. शहरात विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून विरोधकांच्या माध्यमांच्या नजरेतून ती सुटत असल्याचा टोला लगावला आहे. अजून थोडे दिवस थांबा असा सल्ला देत, औरंगाबादची एकदा जावून पाहणी करून या, मग नाशिकच्या विकासाबद्दल बोला असे खडे बोलही त्यांनी विरोधकांना सुनावले आहेत. माध्यमे मनाचे श्लोक लिहून आपल्यावर टीका करता अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सध्या औरंगाबाद महापालिकेची निवडणूक सुरू असून तीथे पंधरा वर्षापासून शिवसेना सत्तेत आहे. त्यामुळे ठाकरेंनी औरंगाबादच्या विकासावरच बोट ठेवत शिवसेनेला निवडणूक काळातच डिवचले आहे. त्यामुळे शिवसेना आणि मनसेत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

नगरसेवकांनी फिरविली पाठ

राज ठाकरे यांनी गुरुवारी शहरातील विकासकामांचा दौरा केला. मात्र, या दौऱ्यात पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आणि महापालिकेतील महत्त्वपूर्ण नेत्यांनीच हजेरी लावली. निम्म्यापेक्षा जास्त नगरसेवक या दौऱ्यापासून लांब होते. विशेषत: माजी आमदार वसंत गीते यांच्याशी संबंधित नगरसेवक या दौऱ्यात दिसलेच नाहीत. याबद्दल मनसेच्याच पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा होती.

राज यांच्या शैलीचा अमितकडून अभ्यास

राजकारणाचा अभ्यास करणाऱ्या राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांनी गुरुवारच्या दौऱ्यात पूर्णपणे सहभागी होवून ठाकरेंची स्टाईल जाणून घेतली. ठाकरेंच्या शैलीसह अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांशी ठाकरे कसा संवाद करतात याचा अमित बारकाईने त्याचा अभ्यास करत होते. ठाकरेंचा संपूर्ण दौरा त्यांनी जवळून पाहत त्यांची शैली आत्मसात करण्याचा प्रयत्न यावेळी अमितने केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटनाला जा, घराप्रमाणे राहा!

0
0

>> फणिंद्र मंडलिक

आपण एखाद्या निर्सगरम्य ठिकाणी भटकायला जातो आणि क्षणात मनात विचार येऊन जातो, या ठिकाणी राहता आले असते तर किती बरे झाले असते! मात्र, हा विचार आता प्रत्यक्षात येऊ शकणार आहे. इंग्लंडमध्ये स्थायिक असलेल्या नाशिकच्या हेरंब सहस्त्रबुध्दे या तरुणाने जगात प्रचलित असलेली कॅराव्हॅन टूरिझम ही संकल्पना भारतात प्रथम आणण्याचा मान मिळवला आहे.

हेरंबने टूरिझमसाठी लागणाऱ्या कॅराव्हॅन्स नाशिकमध्ये आणल्या आहेत. या व्हॅन्स इंग्लंडहून बोटीने आणण्यात आल्या. येत्या दोन दिवसांत त्या पर्यटकांनाही उपलब्ध करून देण्याचा हेरंबचा मानस आहे. हा प्रकार पाश्चिमात्य देशात नियमित वापरला जात असून, विकेंडसाठी लोक त्याचा वापर करीत असतात. आपल्याकडे मात्र ही संकल्पना पहिल्यांदाच आली असल्याचा दावा हेरंबने केला आहे. चार चाकी गाडीला या व्हॅन्स जोडता येणार असून, हव्या त्या ठिकाणी घेऊन जाता येणार आहे. या व्हॅन्समध्ये घराप्रमाणे सोयी-सुविधा आहेत. यात मोठ्या माणसांसाठी तसेच लहानग्यांसाठी बेड्स आहेत. त्याचप्रमाणे किचन, फ्रीज, ओव्हन, एसीही आहे. केमिकल टॉयलेटचीही त्यात व्यवस्था आहे. त्यामुळे कुठेही फिरायला गेलो तेथे मुक्कामाचा सोय अगदी घरच्याप्रमाणे होऊ शकते.

ज्या ठिकाणी पक्के बांधकाम करण्याला परवानगी नाही, अशा ठिकाणीही या व्हॅन्स वापरण्यास योग्य आहेत. भारत सरकारच्या कॅराव्हॅन कॅम्पिंग योजनेंतर्गत पहिल्यांदा सुरू झालेल्या या व्हॅन्स असतील. या कॅराव्हॅनमध्ये एक कुटूंब सहज राहू शकते. हेरंब म्हणाला, की गेल्या वर्षी लंडनमध्ये प्रवासी भारतीय दिनाला केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज तेथे आल्या होत्या. मेक इन इंडियाच्या अंतर्गत भारतात पर्यटन हा व्यवसाय किती चांगल्या प्रकारे होऊ शकतो हे त्यांनी पटवून दिले. माझी तेथे टॅन्जंट कन्सेप्ट्स नावाची कंपनी आहे. त्याद्वारे ही कन्सेप्ट मी भारतात रुजवू शकतो असे मला वाटले आणि त्या मी भारतात आणल्या. भारतात चांगल्या प्रकारचे रस्ते होत आहेत, फिरण्याची ठिकाणं आहेत. त्यामुळे लोकांना ही संकल्पना निश्चित आवडेल असे वाटते.

भारतात मला पर्यटनासाठी वेगळे काही तरी करण्याची इच्छा होती. या कॅराव्हॅन्समुळे ती प्रत्यक्षात येईल अशी आशा आहे. ही संकल्पना आपल्याकडे चांगली रूजू शकतो - हेरंब सहस्त्रबुध्दे

पर्यटनाला मिळणार चालना

अनेक वेळा शुटींगसाठी फिल्मस्टार येतात त्यांना आपल्या गाडीतच मेक अप अथवा विश्रांती घ्यावी लागते. त्यांच्याकडे असलेल्या व्हॅनिटीसाठी गाडी लागते. मात्र, या व्हॅनला मशिन नाही. त्यामुळे गाडी अडकून रहाणार नाही. त्याचप्रमाणे अनेक आंतरराष्ट्रीय पर्यटक भारतात भेट देण्यासाठी येतात त्यांचा फाईव्हस्टार निवासावर जास्त खर्च होतो. या व्हॅन्स उपलब्ध झाल्यानंतर परदेशी पर्यटकांची देखील मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना-मनसेत चुरस

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

नाशिक महापालिकेच्या सहा विभागांच्या प्रभाग सभापतींची निवडणूक येत्या ८ व ९ एप्रिलला होत आहेत. यात नवीन नाशिकमधील सिडकोतील सभापतीसाठी मनसे व शिवसेनेत चुरस असल्याचे चित्र आहे. मनसे अन्य पक्षांना बरोबर घेत शिवसेनेला बाहेर ठेवणार असल्याची तयारी सुरू असल्याची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, मनसे व शिवसेनेच पक्षीय बलाबल समसमान असले तरी इतर पक्ष कुणाला साथ देतात यावर सिडकोतील नवीन सभापती ठरणार आहे.

नाशिक महापालिकेत पहिल्यांदाच अनेक घडामोडी पक्षांमध्ये बघायला मिळाल्या आहेत. यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि विशेष म्हणजे माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांनाच आपल्या भाषणातून टार्गेट केले होते. परंतु, काळाच्या बदलत्या रणनीतीमध्ये मफलरने गळा आवळण्याची भाषा करणारे ठाकरेंनी राजकीय गरज म्हणून 'राष्ट्रवादी'ची मदत घेतली.

यामुळे अनेक राजकीय बदल महापालिकेला पहायला मिळाले. आता पुन्हा सहा विभागातील प्रभाग सभापतींची निवडणूक ८ व ९ एप्रिलला होत आहे. यात नवीन नाशिक सिडकोत मनसे शिवसेनेला बाहेर ठेवत इतर पक्षांना साथ देणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्या निवडणुकीत मनसे शिवसेने एकमेकांना साथ देत सभापती पद मिळविले होते. परंतु, सद्या स्थितीत बदलेले राजकीय समिकरणे बघता मनसे इतर पक्षांमधील नगरसेवकांना सभापतीची माळ बहाल करणार असल्याची चर्चा सिडको विभागात रगंली आहे.

यात पहिल्यांदा सिडको प्रभागाचे सभापतीपद शिवसेनेला गेले होते. नंतर मनसे व पुन्हा शिवसेनेने सभापतीपद भूषविले. आता मनसे इतर पक्षातील म्हणजेच राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यापैकी एकाला सभापती पद देणार असल्याचे राजकीय जाणकारांनी सांगितले. मात्र, मनसे, राष्ट्रवादी यांना रोखण्यासाठी शिवसेना काय रणनीती आखते याकडेही सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस आयुक्तांची तडकाफडकी बदली

0
0

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

कुंभमेळ्याच्या तोंडावरच पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांची गृहविभागाने गुरूवारी तडकाफडकी बदली केली. सरंगल यांच्या जागी राज्य मानवी अधिकार आयोगाच्या तपास शाखेचे पोलिस महानिरीक्षक एस. जगन्नाथ पदभार स्वीकारणार आहेत. सरंगल यांच्याकडे सध्या तरी कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही.

काही महिन्यांपासून जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि शहर पोलिसांचे कुंभमेळ्याच्या नियोजनावरूनच बिनसत गेले. शहर पोलिस योग्य सहकार्य करीत नसल्याच्या तक्रारी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या होत्या. प्रशासनाला सहकार्य करणारा पोलिस आयुक्त देण्याची जिल्हा प्रशासनाची मागणी मुख्यमंत्री यांनी उचलून धरत सरंगल यांची अचानक बदली केली. गृहविभागाने गुरूवारी सकाळी सरंगल यांच्या बदलीचा फॅक्स पाठवला.

१९९१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या जगन्नाथ यांनी गडचिरोली, नाशिक, उस्मानाबाद आदी ठिकाणी काम पाहिले आहे. २००१ ते २००८ या कालावधीत जगन्नाथ यांनी सीबीआय (सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशन) मध्ये पोलिस अधीक्षक तसेच सह पोलिस महानिरीक्षक म्हणून बँकींग सिक्युरीटज अॅण्ड फ्रॉडस सेल (बीएसएफएस) म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या जगन्नाथ यांनी पार पाडल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज यांनी शिवसेनेला डिवचले

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मनसेच्या सत्ताकाळात नाशिकचा विकास झाला नसल्याची टीका करणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांसह माध्यंमानाही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी खडे बोल सुनावले आहेत. 'शहरात विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत, पण विरोधक व माध्यमांच्या नजरेतून ती सुटत असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याचवेळी, 'आधी औरंगाबाद पाहून या, मग नाशिकच्या विकासाबद्दल बोला,' असा टोला लगावत त्यांनी शिवसेनेलाही डिवचलं आहे.

राज ठाकरे यांनी गुरुवारी नाशिकचा दौरा केला. यावेळी पत्रकारांशी गप्पा मारतांना ठाकरेंनी मनसेने विकास केला नसल्याचा मुद्दा खोडून काढला आहे. शहरात विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून विरोधकांच्या माध्यमांच्या नजरेतून ती सुटत असल्याचा टोला लगावला आहे. अजून थोडे दिवस थांबा असा सल्ला देत, औरंगाबादची एकदा जावून पाहणी करून या, मग नाशिकच्या विकासाबद्दल बोला असे खडे बोलही त्यांनी विरोधकांना सुनावले आहेत. माध्यमे मनाचे श्लोक लिहून आपल्यावर टीका करता अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सध्या औरंगाबाद महापालिकेची निवडणूक सुरू असून तीथे पंधरा वर्षापासून शिवसेना सत्तेत आहे. त्यामुळे ठाकरेंनी औरंगाबादच्या विकासावरच बोट ठेवत शिवसेनेला निवडणूक काळातच डिवचले आहे. त्यामुळे शिवसेना आणि मनसेत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

नगरसेवकांनी फिरविली पाठ

राज ठाकरे यांनी गुरुवारी शहरातील विकासकामांचा दौरा केला. मात्र, या दौऱ्यात पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आणि महापालिकेतील महत्त्वपूर्ण नेत्यांनीच हजेरी लावली. निम्म्यापेक्षा जास्त नगरसेवक या दौऱ्यापासून लांब होते. विशेषत: माजी आमदार वसंत गीते यांच्याशी संबंधित नगरसेवक या दौऱ्यात दिसलेच नाहीत. याबद्दल मनसेच्याच पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा होती.

राज यांच्या शैलीचा अमितकडून अभ्यास

राजकारणाचा अभ्यास करणाऱ्या राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांनी गुरुवारच्या दौऱ्यात पूर्णपणे सहभागी होवून ठाकरेंची स्टाईल जाणून घेतली. ठाकरेंच्या शैलीसह अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांशी ठाकरे कसा संवाद करतात याचा अमित बारकाईने त्याचा अभ्यास करत होते. ठाकरेंचा संपूर्ण दौरा त्यांनी जवळून पाहत त्यांची शैली आत्मसात करण्याचा प्रयत्न यावेळी अमितने केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटनाला जा, घराप्रमाणे राहा!

0
0

>> फणिंद्र मंडलिक

आपण एखाद्या निर्सगरम्य ठिकाणी भटकायला जातो आणि क्षणात मनात विचार येऊन जातो, या ठिकाणी राहता आले असते तर किती बरे झाले असते! मात्र, हा विचार आता प्रत्यक्षात येऊ शकणार आहे. इंग्लंडमध्ये स्थायिक असलेल्या नाशिकच्या हेरंब सहस्त्रबुध्दे या तरुणाने जगात प्रचलित असलेली कॅराव्हॅन टूरिझम ही संकल्पना भारतात प्रथम आणण्याचा मान मिळवला आहे.

हेरंबने टूरिझमसाठी लागणाऱ्या कॅराव्हॅन्स नाशिकमध्ये आणल्या आहेत. या व्हॅन्स इंग्लंडहून बोटीने आणण्यात आल्या. येत्या दोन दिवसांत त्या पर्यटकांनाही उपलब्ध करून देण्याचा हेरंबचा मानस आहे. हा प्रकार पाश्चिमात्य देशात नियमित वापरला जात असून, विकेंडसाठी लोक त्याचा वापर करीत असतात. आपल्याकडे मात्र ही संकल्पना पहिल्यांदाच आली असल्याचा दावा हेरंबने केला आहे. चार चाकी गाडीला या व्हॅन्स जोडता येणार असून, हव्या त्या ठिकाणी घेऊन जाता येणार आहे. या व्हॅन्समध्ये घराप्रमाणे सोयी-सुविधा आहेत. यात मोठ्या माणसांसाठी तसेच लहानग्यांसाठी बेड्स आहेत. त्याचप्रमाणे किचन, फ्रीज, ओव्हन, एसीही आहे. केमिकल टॉयलेटचीही त्यात व्यवस्था आहे. त्यामुळे कुठेही फिरायला गेलो तेथे मुक्कामाचा सोय अगदी घरच्याप्रमाणे होऊ शकते.

ज्या ठिकाणी पक्के बांधकाम करण्याला परवानगी नाही, अशा ठिकाणीही या व्हॅन्स वापरण्यास योग्य आहेत. भारत सरकारच्या कॅराव्हॅन कॅम्पिंग योजनेंतर्गत पहिल्यांदा सुरू झालेल्या या व्हॅन्स असतील. या कॅराव्हॅनमध्ये एक कुटूंब सहज राहू शकते. हेरंब म्हणाला, की गेल्या वर्षी लंडनमध्ये प्रवासी भारतीय दिनाला केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज तेथे आल्या होत्या. मेक इन इंडियाच्या अंतर्गत भारतात पर्यटन हा व्यवसाय किती चांगल्या प्रकारे होऊ शकतो हे त्यांनी पटवून दिले. माझी तेथे टॅन्जंट कन्सेप्ट्स नावाची कंपनी आहे. त्याद्वारे ही कन्सेप्ट मी भारतात रुजवू शकतो असे मला वाटले आणि त्या मी भारतात आणल्या. भारतात चांगल्या प्रकारचे रस्ते होत आहेत, फिरण्याची ठिकाणं आहेत. त्यामुळे लोकांना ही संकल्पना निश्चित आवडेल असे वाटते.

भारतात मला पर्यटनासाठी वेगळे काही तरी करण्याची इच्छा होती. या कॅराव्हॅन्समुळे ती प्रत्यक्षात येईल अशी आशा आहे. ही संकल्पना आपल्याकडे चांगली रूजू शकतो - हेरंब सहस्त्रबुध्दे

पर्यटनाला मिळणार चालना

अनेक वेळा शुटींगसाठी फिल्मस्टार येतात त्यांना आपल्या गाडीतच मेक अप अथवा विश्रांती घ्यावी लागते. त्यांच्याकडे असलेल्या व्हॅनिटीसाठी गाडी लागते. मात्र, या व्हॅनला मशिन नाही. त्यामुळे गाडी अडकून रहाणार नाही. त्याचप्रमाणे अनेक आंतरराष्ट्रीय पर्यटक भारतात भेट देण्यासाठी येतात त्यांचा फाईव्हस्टार निवासावर जास्त खर्च होतो. या व्हॅन्स उपलब्ध झाल्यानंतर परदेशी पर्यटकांची देखील मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेगवेगळी उन्हं

0
0

>> प्राजक्त देशमुख

उन्हाळा लागला की दुपारच्या ठराविक वेळी शहरात कर्फ्यू लागल्यागत शांतता होते. ऋतू बदलाची पहिली माणसाळलेली खुण लोकांच्या डोक्यावर दिसते. तापमान शुन्याकडे धाव घ्यायला लागला की डोक्यावर कानटोपी येते. ढग काळवंडून ओसंडायला लागले की डोक्यावर छत्री येते. तापमानला चाळीशीचे वेध लागले की डोक्यावर उन्हाची टोपी येते. म्हणजे बदल कोणताही असतो पहिली चाहुल दिसू लागते ती गर्दीच्या डोक्यावर. मग आधीच मुखवटे चढवलेल्या चेहऱ्यांवर काळे गॉगल येतात. त्यात ज्यांना चष्मा असेल त्यांचे दु:ख अवर्णनीय असतं. या लोकांचं दु:ख पावसाळ्यात तर महाअवर्णनीय असतं. जमिनीतून उगवावे तसे नारळपाणीवाले, उसाच्या रसवाले, लिंबू सरबतवाले, टरबूजवाले, आईस गोळेवाले इत्यादीवाले रस्त्याच्या कडेकडेला उगवतात. कुठलतरी सावलीचा आडोसा धरून बसलेले हे लोकं म्हणजे टळटळीत उन्हाळ्यात रस्त्याच्याकडेला असलेले अमृताचे घडेच आहे. अमृताचे घडे एवढ्यासाठी कारण दैवदुर्विलासाने जर तुम्हाला या अघोरी उन्हात बाहेर पडावं लागलंच तर तुम्हाला पाठीवरती हात ठेवून लढ म्हणणारे ही एकमेव जमात आपल्याला रस्त्यावर दिसेल. ठरल्याप्रमाणे उन्हं पसरावी आणि ठरल्याप्रमाणे सावल्या पांगाव्या इतकं ठरल्याप्रमाणे सगळ्याची लाईफस्टाईल बुद्धीबळाच्या पटाप्रमाणे मांडलेली असते.

पण उन्हं वाढली की सावल्या पांगतातच असं नाही. जेव्हा सूर्य डोक्याच्या अगदीवर नव्वद अंशात असतो असा 'झिरो शेडो दिवस' पण कधीतरी येतो. अशा वेळेस जाणीव होते की जगाचा भार माथ्यावर आला की कधीकधी सोबतीला सावलीसुद्धा नसते. बऱ्यादचा असंही होतं की बाहेरच्या शहरातून एखादा पाहुणा शनिवार-रविवार बघून त्रंबकराजाच्या निमित्ताने किंवा साईनाथांवरच्या श्रध्देने नाशकात सबुरीने तंबू ठोकतो. कारण एकच की त्यामानाने नाशिकची उन्हं ही कमी तापदायक. पण जाळायचं म्हटलं की थोडं जाळू जास्त, जाळू असं काही होतं नाही. उगा आपल्या मनाची समजूत दुसरं काय? खरी धमाल स्टाईल असते ती तरुणांची. त्यांच्या टोप्यांच्या तऱ्हा, गॉगल्सच्या तऱ्हा, स्कार्फच्या तऱ्हा सगळंच तऱ्हेवाईक. अशा उन्हात दिंडी आणि पालख्यांचे भोई दिसतात तसे नोकरी शोधणारे सुटबूटधारी पण दिसतात. दोघांचा शोध शाश्वत. मग या चालणाऱ्यांना नेमका कोणता विचार अखंड चालवत ठेवतो? असा विचार मी नेहमी करतो. मग या निष्कर्षावर येतो की सकाळी मागे असणारी सावली दुपार कलंडता कलंडता आपल्या समोर पसरते. अशावेळी चालताना एक सुख असं ही असेल की आज नाही कोणाला पण सूर्याला तर मागे टाकलं आपण.

गावाकडे छतावर धारं असायची. म्हणजे बंद छताऐवजी जाळी असायची. उन्हाळी सुटीत दुपारी पडल्या पडल्या त्या घरात ढगांमुळे ऊन सावलीचे गालिचांची नक्षी तयार व्हायची. तशी नक्षीदार उन्हं आता दुर्मिळच.

भर उन्हात सगळीकडे रुक्षपणा, डोळे किलकिले करायला लावणारा भक्क उजेड असतो तेव्हा एखाद्या नाक्यावरचा गुलमोहराचा लाल केशरी रंग डोळ्यात भरून राहतो. असं वाटत राहतं की जागोजागी पसरलेली ही आग या गुलमोहरानेच पसरवली आहे. एखादं झाड पेटवून द्यावं तसा हा गुलमोहर पेटून पिवळसर केशरीलाल रंगी ज्वालांसारखा लपलपतांना दिसतो. पण कधी याच दाहात त्या झाडाखाली सावलीला गारवा अनुभवत उभं राहिल्यावर आपल्याला कळतं की कदाचित असं ही असू शकेल की जसं महादेवाने विष प्राशन करून सृष्टीचा दाह कमी केला होता, जसा येशूने जगाचे घाव आपल्या अंगावर सोसले आणि क्रुसाच्या आधीन झाला अगदी तसंच ही आजुबाजुला जी आग पसरलीय ती गुलमोहराने अंगावर झेलून घेतली आहे. अाता जो दाह आहे तो त्यामानाने जरा कमीच आहे याला कारण आहे तो हा गुलमोहरच. गैरसमज गैरसमज म्हणतात तो हाच का?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘होल्ड’ची पनिशमेंट

0
0

>> अरविंद जाधव

शहराचा विकास झपाट्याने होतो आहे. एकीकडे चकाचक जीवनशैली मूळ धरत असताना दुसरीकडे गुन्हेगारीही झपाट्याने पसरत आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सक्षम पोलिसाची फौज तयार असणे आवश्यक असून उपनगरांमधील पोलिस स्टेशन, चौक्यानांही पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होणे काळाची गरज बनली आहे. कुंभमेळा तोंडावर आला असून याच परिस्थितीचा वेध घेणारे 'मटा'चे खास सुरक्षा विषयक साप्ताहिक सदर...

'नाशिक शहरात कायमस्वरूपी तत्त्वावर सीसीटीव्ही बसवायचे होते. मात्र, काय झाले माहित नाही' असे उथळ स्पष्टीकरण देत, या प्रकरणाची चौकशी करण्याचे​ आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी​ नुकतेच दिलेत. यानंतर, पुढील दोन दिवसात पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांची तडकाफडकी बदली झाली. या दोन घटनांमध्ये साधर्म्य नसले तरी ते दाखवण्याचा प्रयत्न होतो आहे. कायमस्वरूपी सीसीटीव्ही बसवण्यासाठी राज्य सरकारकडे वेळ आणि पैसा दोन्हीही होते. मात्र, मंत्र्यांनी वाफा घालवण्यापलिकडे काहीच केले नाही. याचीच खरेतर चौकशी होणे आता क्रमप्राप्त ठरते.

शहर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कायमस्वरूपी सीसीटीव्ही कार्यरत होणे अत्यावश्यक होते. कुंभमेळ्याच्या हजारो कोटी रुपयांच्या खर्चात कायमस्वरूपी सीसीटीव्ही बसवण्याचे काम सहज शक्य झाले असते. चेन स्नॅचिंग, घरफोडी, हाणामारी, चौकाचौकात होणाऱ्या विनयभंगाच्या प्रकारावर यामुळे २४ तास लक्ष ठेवता येऊ शकले असते. मात्र, राजकीय उदासिनतेमुळे सर्वांवर पाणी फेरले गेले. त्यातच सीसीटीव्हीबाबत राज्य सरकारने सुरुवातीपासून सावळा गोंधळ घातला. कधी कायम तर कधी तात्पुरत्या स्वरूपात सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय मंत्रालयातील बाबू घेत राहिले. सुरुवातीच्या प्रस्तावातील १ हजार ७०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या शेवटी साडे तीनशेपर्यंत आणली गेली. मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, पालकमंत्री गिरीश महाजन अशा पहिल्या फळीतील मंत्र्यांनी कायमस्वरूपी सीसीटीव्ही बसवण्याचा आग्रह धरला. खुद्द मुख्यमंत्रीच तयार असल्याने सर्व सोपास्कार पार पडतील, अशी अपेक्षा व्यक्त झाली. मात्र, वेळ सरत गेली तसे मुख्यमंत्रीच तोंडघशी पडल्याचे स्पष्ट झाले. प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपाचे सीसीटीव्ही बसवण्याचा घाट घातला आणि तो स्थानिक पोलिसांच्या गळी उतरवला देखील. विधान परिषदेमध्ये स्थानिक आमदारांनी या विषयी प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री बोलते झाले. कायमस्वरूपी ऐवजी तात्पुरत्या स्वरूपात सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय कसा झाला, असा प्रश्न पडलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी लागलीच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. युतीचे सरकार सत्तेत आल्यापासून अनेकदा कुंभमेळ्यासंदर्भांत बैठका झाल्यात. या बैठकीची माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचली. मग, 'ध' चा 'मा' कसा झाला हे समजण्यासाठी चौकशीची आवश्यकता तरी काय? खरेतर, शहरात कायमस्वरूपी सीसीटीव्ही बसावेत, अशी राज्य सरकारचीच इच्छा नव्हती. अन्यथा, एखाद-दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या नकारामुळे सरकार आपल्या निर्णयापासून मागे ढळलेच नसते. स्थानिक आमदार, महापौर, नगरसेवक यांनाही याचे महत्त्व वाटले नाही. नांदेड पोलिसांनी अगदी थोड्या पैशांमध्ये ​१०० सीसीटीव्ही बसवून कार्यरत केले. त्यात तेथील लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची ठरली. आपले शहर याबाबत दुर्दैवी ठरले. विशेष म्हणजे याची खंतही कुणाला वाटेनाशी झाली आहे. तात्पुरते सीसीटीव्ही बसवणे, त्यादृष्टीने यंत्रणा उभारणे, डाटा संकलित ठेवणे आदी कामांसाठी राज्य सरकार सुमारे ११ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करणार आहे. शहरात १५७ ठिकाणी ३४७ सीसीटीव्ही बसवले जाणार असून सिंहस्थ कुंभमेळा पार पडला की हे सीसीटीव्ही काढून घेतले जातील. अवघ्या काही महिन्यांसाठी पैशांची ही उधळपट्टी? तेच, कायमस्वरूपी सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय झाला असता तर खर्च थोडा वाढला असता, पण शहराची सुरक्षाही मजबूत झाली असती. सिंहस्थाच्या सर्व कामांबाबत 'झाकली मूठ..' अशी रणनीती वरपासून खालपर्यंतचे अधिकारी राबवत आहेत. यात पारदर्शकता नसल्याने असे प्रकार घडताना दिसतात. त्यातच मुख्यमंत्र्यांनी 'आवडते' या श्रेणीत येणाऱ्या अधिकाऱ्यांना कुंभमेळ्यासाठी नियुक्त करण्याचा सपाटा लावला आहे. यातून काय निष्पण होईल, ते ऑगस्ट २०१५ नंतर समोर येईल. महापालिका आयुक्त, नूतन जिल्हाधिकारी यांची नियुक्ती झाल्यानंतर सर्व अलबेल वाटत होते. मात्र, शाहीमार्गावरून पोलिस आणि जिल्हा प्रशासन यांच्यात बिनसले. त्यातच महापालिकेच्या कृपार्शिवादाने पसरलेला अतिक्रमणाचा पसारा काढण्यासाठी पोलिस उपलब्ध करून देण्याच्या मुद्यावरून महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि पोलिस आयुक्त सरंगल यांचे वाजले. या वादाचे पडसाद मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचले. पोलिस महासंचालकांच्या चर्चेनंतर लागलीच सरकारने सरंगल यांची बदली केली. त्यांच्या जागी नियुक्त झालेल्या एस. जगन्नाथ यांना कुंभमेळ्यासाठी तयार व्हावे लागेल. दुसरीकडे गुन्हेगारांना रोखण्याचे आवाहन देखील पेलावे लागेल. यात ते किती यशस्वी होतात, यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.

सलग तिसरी पनिशमेंट

एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला बदली करताना लागलीच दुसरी पोस्टींग न देता होल्डवर ठेवले तर ही एक प्रकारे प​निशमेंटच मानली जाते. सध्या, सरंगल देखील होल्डवर आहेत. त्यामुळे त्यांची बदली सरकारने दिलेली पनिशमेंटच ठरते. मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांना केलेल्या विरोधाचा परिपाक बदलीच्या स्वरूपातून पुढे आला आहे. यापूर्वी व्ही. डी. मिश्रा, विनोद लोखंडे आणि आता सरंगल यांना होल्डवर ठेवण्यात आले. पोलिस आयुक्तालयाच्या इतिहासातील ही सलग तिसरी घटना असून त्याचा परिणाम सहाजिकच नवीन येणाऱ्या अ​धिकाऱ्यांवर होऊ शकतो.

नाशिककरांनो... लिहिते व्हा...

यंग सीनियर्स असोत, की कॉलेज स्टुडंट्स; नोकरदार असोत, की गृहिणी; सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्यापैकी प्रत्येकालाच सुरक्षाविषयक चिंता भेडसावते. अशा वेळी घराजवळील पोलिस स्टेशन, चौकीतील पोलिस मदतीला धावून येतात का? आपल्या त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत? तुमच्या अशा प्रश्नांची उत्तरे आम्ही देऊ 'पोलिस राउंड'मधून. त्यासाठी तुमच्या भागातील सुरक्षाविषयक घडामोडी, पोलिसांसंदर्भातील तक्रारी, अपेक्षांसाठी आवर्जून संपर्क साधावा.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर बिल्डींग,‌ तिसरा मजला, डिसुझा कॉलनी कॉलेज रोड, ना‌शिक

समन्वय : अरविंद जाधव

ई-मेल : mataanashik@gmail.com

(पाकीट आणि ई-मेलवर पोलिस राउंड उल्लेख करावा)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेच्या खांबांचा रस्त्यात अडथळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

देवळालीच्या लामरोड भागात असणाऱ्या विठ्ठलवाडी परिसरात रस्त्याच्या मधोमध असलेल्या वीज महावितरण कंपनीच्या खांबांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या खांबांमुळे अपघातांचा धोका वाढला असून या खांबांचे योग्य जागी स्थलांतर करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

विठ्ठलवाडी परिसरातील अंतर्गत रस्त्यावरच गेल्या अनेक वर्षांपासून विजेचे खांब आहेत. आजूबाजूला असणाऱ्या घरांमधील खिडक्यांमधून हात जरी बाहेर काढला तर खांबाला सहज स्पर्श होऊ शकतो. पावसाळ्यात तर विजेचा धक्का बसण्याची परिसरातील नागरिकांना धास्ती सतावते. वीज महावितरण कंपनीकडे यासंदर्भात अनेक वेळा तक्रारी करण्यात आली. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई होऊ शकली नसल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार आहे.

पाण्याची बेभरवशाची वेळ

याच भागात कॅन्टोन्मेन्ट प्रशासनाच्या वतीने पिण्याचे पाणी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास सोडण्यात येते. त्या वेळी सर्वच नागरिक झोपलेले असतात. परंतु, महिलांची मात्र झोपमोड होते. या प्रश्नी अनेक वेळा नगरसेवकांच्या नजरेत ही बाब आणून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, परिस्थिती 'जैसे थे'च आहे. कॅन्टोन्मेन्ट प्रशासन पाण्याच्या वेळेच्या मुद्यायाबाबत काहीही निर्णय घेत नाही, असा आरोप विठ्ठलवाडी परिसरातील संतप्त महिलांनी केला आहे.

सांडपाण्याचा प्रश्न गंभीर

विठ्ठलवाडी परिसरात असणाऱ्या एका गल्लीला भूमिगत गटार तर दुसऱ्या गल्लीला गटार नाही अशी अवस्था आहे. महिलांनी धुण्या-भांड्याचे सांडपाणी कोठे टाकावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच भागात असलेले २-३ पथदीप वगळता पथदीप नाही. रात्रीच्या वेळी अंधार पसरल्यावर अपुऱ्या प्रकाशामुळे अडचण निर्माण होते आहे. वीज महावितरण कंपनी व कॅन्टोन्मेन्ट प्रशासनाने या समस्यांबाबत त्वरित लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

रात्रीच्या वेळी परिसरात अंधार असल्यामुळे काहीही दिसत नाही. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक मार्गात अडखळून पडतात. त्यामुळे या भागात पथदीपांची संख्या वाढविण्याची गरज आहे. - मनोज आडके

नळाला पाणी येण्याची निश्चित योग्य अशी वेळ नाही. पहाटे ३ वाजता पिण्याच्या पाणी येते. ते किमान पहाटे ५ वाजता आले तर स्थानिक रहिवाशांच्या सोयीचे होऊ शकेल.- संगीता जाधव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवार निवडीसाठी दमछाक

0
0

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव

लासलगाव ग्रामपालिकेची निवडणूक जाहीर होताच ग्रामपालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी प्रमुख राजकीय नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. जातीय समीकरणांची जुळवाजुळव करीत सक्षम उमेदवार शोधताना दोन्हीही पॅनलच्या नेतृत्वाची दमछाक होत आहे.

अचानक निवडणूक कार्यक्रम लागल्याने निवडणूकपूर्व नियोजन व पॅनल निर्मिती करण्यासाठी कमी कालावधी उरला आहे. उमेदवार निवडताना कसब पणाला लावावे लागत आहे. लासलगाव ग्रामपालिकेच्या सत्तेची सूत्रे नेहमीच होळकर किंवा पाटील गटाच्या हाती राहिली आहेत. सध्या लासलगाव ग्रामपालिकेवर सरपंच नानासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलची सत्ता आहे. तर, या अगोदरच्या पंचवार्षिक निवडणुकीत लासलगाव ग्रामपालिकेवर जयदत्त होळकर यांची एकहाती सत्ता राहिली होती. लासलगावचे राजकारण नेहमीच होळकर किंवा पाटील गटाभोवतीच फिरते राहिले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही पाटील विरुद्ध होळकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्येच सरळ लढत पहावयास मिळणार आहे. एकूण सहा प्रभागातील १७ जागांसाठी निवडणूक होत असून, पन्नास टक्के उमेदवारीचा वाटा महिलांसाठी राखीव असल्याने दोन्ही गटांना महिला उमेदवार शोधतांना अडचणी येत आहेत. एकीकडे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कमी अवधी शिल्लक असल्याने आपल्या वार्डात कोणाला उमेदवारी मिळते याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्याने येथील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. येत्या १० एप्रिल रोजी माघारीची मुदत संपत असून, त्यानंतरच इथले राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. कोणकोण उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आपले नशीब अजमावितात याकडे आता लासलगावकरांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोवंश हत्या बंदीवर पोलिसांकडून जनजागृती

0
0

कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरात गोवंश पालन करणाऱ्या व्यक्तिंनी आपल्या जनावरांचे फोटो पोलिस ठाण्यात जमा करून त्यांची माहिती द्यावी. अफवांवर विश्वास ठेवू नये. गोवंश हत्या बंदी कायद्याची अंमलबजावणी करताना कोणताही दुजाभाव होणार नाही तसेच, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अप्पर पोलिस अधीक्षक सुनील कडासाने यांनी केले.

गोवंश हत्या बंदी कायद्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी व कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून मालेगाव पोलिस दलातर्फे अप्पर पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपजिल्हाधिकारी मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी महेश सवाई, पोलिस निरीक्षक मालकर, शहरातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी, मनपा उपायुक्त फातले, महापौर हाजी मोहम्मद इब्राहीम तसेच शहरातील मुस्लिम नगरसेवक आदी उपस्थित होते. गोवंश हत्या बंदी कायद्याबद्दल बरेच समज गैरसमज पसरवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर या कायद्याबद्दल सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती या बैठकीत देण्यात आली. तसेच शहरात बहुसंख्य मुस्लिम बांधव राहत असल्याने मौलनांनी त्यांना कायद्याबाबत योग्य माहिती द्यावी, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

बैठकीतील सूचना

- कायद्याचे सर्वांनी पालन करावे - कोणीही कायदा हातात घेऊ नये. - कायद्याचे उल्लंघन झाल्यास कारवाई. - कायद्याबद्दल सर्वांना माहिती द्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाकीत पडून बालकाचा मृत्यू

0
0

नाशिकरोड : मावशीच्या घरी गेलेल्या बालकाचा पाण्याच्या टाकीत पडल्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी घडली. नाशिकरोड पोलिस ठाण्यात त्याची नोंद करण्यात आली आहे. संस्कार अरुण कडाळे (वय ३, मूळ रा. संसरी) हा गुरुवारी (दि. २) रात्री काळवी (ता. नाशिक) येथे मावशीच्या घरी आला होता. सकाळी दहाच्या सुमारास खेळत असताना लहानगा संस्कार पाण्याच्या टाकीत पडला. थोड्यावेळाने हा प्रकार लक्षात आला. नाका तोंडात पाणी गेल्याने त्याची शुद्ध हरपली. खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. संस्कारच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निमा इंडेस्कसाठी ८० टक्के स्टॉल बुक

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

नाशिक इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे (निमा) भरविण्यात येत असलेल्या निमा इंडेक्सची तयारी अंतिम टप्यात आली आहे. यात ८० टक्के स्टॉल बुकिंग झाल्याची माहिती निमा इंडेक्सचे चेअरमन एच. बी. थोन्टेश यांनी दिली आहे. दर दोन वर्षांनी येणाऱ्या निमा इंडेक्समध्ये एकूण २६० स्टॉल असतील.

उद्योजकांच्या उत्पादनांचा कुंभमेळा म्हणून निमा इंडेक्स ओळखले जाते. यात दर दोन वर्षांनी निमा या औद्योगिक संघटनेकडून निमा इंडेक्सचे आयोजन करण्यात येते. निमा इंडेक्सच्या माध्यमातून जिल्हा, विभाग, राज्य, देश व विदेशातील कंपन्यांचा देखील सहभाग इंडेक्समध्ये असतो. यावर्षी २४ ते २७ एप्रिल चार दिवस निमा इंडेक्स त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील एबीबी सर्कलला लागून असलेल्या ठक्कर मैदानावर होणार असल्याचे इंडेक्स चेअरमन थोन्टेश यांनी सांगितले.

निमाने पहिल्यांदाच इंडेक्समध्ये वातानुकुलीत २० स्टालची उभारणी करणार असल्याचे 'निमा'चे सरचिटणीस मंगेश पाटणकर यांनी सांगितले. निमा इंडेक्समध्ये सहभागी होणारे उद्योजक व कंपन्यांनी उर्वरीत शिल्लक असलेल्या स्टॉलचे लवकर बुकिंग करण्याचे आवाहनही पाटणकर यांनी केले आहे. याप्रसंगी निमा इंडेक्सचे सदस्य व उद्योजक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायी सदस्य निवडीसाठी सोमवारी महासभा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या स्थायी समितीच्या रिक्त चारपैकी दोन जागांवर नवीन सदस्यांच्या निवडीसाठी येत्या सोमवारी (दि. ६) महासभा बोलविण्यात आली आहे. मनसेच्या दोन सदस्यांच्या रिक्त जागेवर ही निवड केली जाणार आहे. दरम्यान याच सभेत अनिल मटाले यांची मनसेच्या गटनेतेपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.

स्थायी समितीच्या सभापती निवडीची प्रक्रिया संपल्यानंतर मनसेच्या सविता काळे आणि अनिल मटाले यांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे या दोन सदस्यांच्या रिक्त जागेवर नवीन सदस्यांची निवड करण्यासाठी ६ एप्रिल रोजी महासभा होणार आहे. या दोन रिक्त जागांवर महिलांचीच निवड केली जाणार आहे. त्यात सुरेखा भोसले यांचा समावेश आहे. यासोबतच मनसेन महापालिकेतील आपल्या पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याचे गटनेते अशोक सातभाई यांच्या जागेवर अनिल मटाले यांनी संधी दिली जाणार आहे. त्यामुळेच मटाले यांचा स्थायी समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाने घेतला होता. त्यामुळे मटाले यांच्या नावाचीही घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. तर सभागृनेतेपदी नगरसेवक सलिम शेख यांना दिले जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसे ठरविणार ‘पश्चिम’चा सभापती

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

नाशिक पश्चिम विभागात सात प्रभागात १४ नगरसेवक आहेत. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्मार सेनेचे सर्वाधिक ५ नगरसेवक आहेत. त्यामुळे मनसेच्या कौलावरच पश्चिम विभागाच्या प्रभागाचा सभापती ठरणार आहे. भाजपाची साथ सोडून इतर पक्षांची मनसेकडे झुकल्याचे चित्र असल्याने काँग्रेसच्या पारड्यात पश्चिमचे सभापतीपद पडणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

सहा प्रभाग सभापतींची निवडणूक येत्या ८ व ९ एप्रिलला होत आहे. यात महापालिकेत मनसेची सत्ता असली तरी प्रभाग सभापतीच्या निवडणुकीत अनेक घडामोडी पश्चिम विभागात पहायला मिळणार आहेत. तसेच सद्या स्थितित पश्चिम प्रभागात आमदार म्हणून भाजपचे तीन नगरसेवक निवडून आले आहेत.

यात विद्यामान सभापती डॉ. राहुल आहेर यांचा देखील समावेश आहे. यामुळे भाजपाचे कुणीच सदस्य सभापतीच्या रेसमध्ये असण्याची शक्यता दिसत नाही. परंतु, मनसेने गेल्या वर्षी भाजपाची साथ घेतल्याने सलग दोन वर्षे सभापतीपद भाजपकडे गेले होते. यंदाची प्रभाग सभापती ठरविणे मनसेच्याच हातात आहे. यात मनसे स्वतः सभापती आपल्याकडे ठेवते की काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला सभापती होण्याचा मान देते याबाबत उभय पक्षांचे पदाधिकारीच ठरविणार आहेत. सर्वात शांत प्रभाग म्हणून नाशिक पश्चिम प्रभागाची ओळख आहे. यासाठी सभापतीपदासाठी जास्त काही इच्छुक पश्चिम प्रभागात नाहीत. सभापतीपदाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत मनसे किंवा काँग्रेसचा सभापती होणार हे निश्चित मानावे लागेल.

मनसेचे पारडे जड

महापालिकेच्या नाशिक पश्चिम प्रभागात १४ पैकी मनसेचेच ५ सदस्य आहेत. यात भाजप व काँग्रेस यांचे प्रत्येकी ३ सदस्य असून शिवसेनेकडे २ तर राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ एकच सदस्य आहे. यामुळे मनसेच्याच खांद्यावर नवीन सभापती निवडण्याची जबाबदारी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलबीटी वाढीसाठी व्यापाऱ्यांची शोधमोहीम

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेने स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसुलीत गेल्या वर्षी विक्रमी अशी ६८० कोटी रुपयांची वसुली केली असली, तरी अद्यापही व्यापारी मोठ्या संख्येन एलबीटीपासून दूर आहेत. अशा व्यापाऱ्यांचा शोध घेण्यासह अर्धवट पत्ते असलेल्या चार हजार ८०० व्यापाऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी विक्रीकर विभागाशी संपर्क साधला आहे. या व्यापाऱ्यांकडून तब्बल दोन वर्षाची एलबीटी वसूल केली जाणार आहे.

महापालिकेन विक्रीकर विभागाकडे नोंद असलेल्या ३१ हजार व्हॅट भरणाऱ्या व्यापाऱ्यांची नोंदणी एलबीटीत करून घेतली आहे. मे २०१३ मध्ये एलबीटी लागू झाल्यानंतर १६ हजार ४०० व्यापाऱ्यांची नोंदणी झाली होती. ती संख्या आता वाढली आहे. सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात यातील तब्बल ४८०० व्यापाऱ्यांनी एलबीटीचे रिटर्न भरले नाहीत. त्यामुळे महापालिकेन या व्यापाऱ्यांचा शोध केल्यावर अर्धवट पत्ते आणि माहितीमुळे या त्यांचा शोधच लागला नाही.

त्यामुळे महापालिकेन या व्यापाऱ्यांच्या अर्धवट पत्त्यांसाठी पुन्हा विक्रीकर विभागाकडे धाव घेतली असून त्यांच्या पत्त्यासह मोबाईल नंबर किंवा नवीन बदलेला ठावठिकाणा द्यावा अशी मागणी केली आहे. सोबतच मुंबई दुकाने आणि आस्थापना अंतर्गत रजिस्टर केलेल्या शहरातील शॉप अॅक्टचीही माहिती मागविण्यात आली आहे. त्यानंतर नवीन एलबीटीधारकांची नोंदणी केली जाणार आहे. नवीन एलबीटीधारकांची नोंदणी झाल्यास एलबीटी वसूलीत वाढ होवून आपोआप तिजोरीचा भार हलका होणार आहे. गेल्या आर्थिक वर्षात महापालिकेने आपल्या उद्दिष्टापेक्षा अधिक अशी तब्बल ६८० कोटींची वसूली केली आहे. त्यामुळे चालू वर्षात ती आठशे कोटीपर्यंत नेण्याचा विभागाचा मानस आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उड्डाणपूलप्रश्नी दिल्ली दरबारीही आंदोलनाची उपेक्षा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

सर आम्हाला तुमचा अभिमान आहे, सर तब्यतेची काळजी घ्या, नाशिककरांना न्याय नक्कीच मिळेल, सर मी आमदारांना फोन केला होता, ते नितीन गडकरींशी बोलणार आहेत.... फक्त शुभेच्या मिळत आहे, यश नाही. दिल्लीत कोणी आपल्या आंदोलनाची दखल घेतच नाही, अशी खंत आडगाव शिवारातील शिक्षक सचिन आहेर यांनी महाराष्ट्र टाइम्सशी दिल्लीहून बोलताना व्यक्त केली.

के. के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेजपासून जत्रा हॉटेलपर्यंत उड्डाणपूल व्हावा या मागणीसाठी आहेर दिल्लीत जंतरमंतरवर उपोषणाला बसले आहेत. व्हॉटसअपवर त्यांना नाशिककरांचे प्रचंड पाठबळ लाभत आहे. मात्र, दिल्लीत कोणीच दखल घेत नसल्याचा अनुभव त्यांच्या वाट्याला आला आहे.

के. के. वाघ, अमृतधाम, बळी महाराज मंदिर आणि जत्रा हॉटेल दरम्यान गेल्या २० वर्षात तब्बल २२०० अपघात झाले. त्यामध्ये आतापर्यंत सुमारे १४३१ बळी गेल्याची माहिती आहेर यांनी माहितीच्या अधिकारात पाच पोलिस ठाण्यांकडून मिळवली. या भागात उड्डाणपूल बांधल्यास अपघात कमी होऊन निष्पापांचे बळी जाण्याचे प्रमाण कमी होईल, असे त्यांना मनस्वी वाटते. त्यामुळेच त्यांनी जनजागृती केली, सभा घेतल्या, पत्रके वाटली. हा प्रश्न ‌दिल्ली दरबारी मांडावा यासाठी त्यांनी निश्चिय केला. यात दिल्लीला जाण्यासाठी लोकांनी त्यांना वर्गणी दिली. नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर भावपूर्ण निरोप देत जिंकूनच या, अशा शुभेच्छा दिल्या.

दिल्लीतील मीडियाचे दुर्लक्ष

दिल्लीत गेल्यावर त्यांनी मीडियाचे दरवाजे ठोठावले. दिल्लीपासून ८० किलोमीटर दूर असलेल्या नॅशनल हायवेच्या कार्यालयात गेले. तेथे दोन तास थांबूनही उपयोग झाला नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना कागदपत्रे दिली. त्या आधी पंतप्रधानांना पत्र दिले. हायकोर्टात याचिका दाखल केली. मात्र, निकाल हताश करणारा आहे. दिल्लीत आल्यावर त्यांनी महात्मा गांधीजींची समाधीस्थळ असलेल्या राजघाटाचे दर्शन घेऊन मंगळवारी (दि. ३०) बेमुदत उपोषण सुरू केले. आता आहेर यांची तब्येत खालावली आहे. सोबत असलेले वडिल शिवाजी आहेर, सतीश गुंजाळ, राहुल रोकडे त्यांची काळजी घेत आहेत.

लोकांचे बळी घेणाऱ्या मुंबई-आग्रा हायवेवर उड्डाणपूल व्हावा एवढीच माझी मागणी आहे. आणखी दोन-चार दिवस वाट बघेन. कोणीच दखल घेतली नाही तर सरळ नाशिकला येऊन रास्तारोको आंदोलन करेन. - सचिन आहेर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live

Latest Images