Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

देवळालीत रहिवाशांचे हाल

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

देवळालीच्या संजय गांधी नगर हा भाग गेल्या अनेक वर्षांपासून नागरी सुविधांपासून वंचित आहे. येथे कॅन्टोन्मेन्ट बोर्ड प्रशासनाच्या वतीने कोणतीही नागरी सुविधा पुरविण्यात आल्या नसल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार आहे. सुविधांच्या पूर्ततेसाठी खासदार हेमंत गोडसे यांना निवेदन देऊन आपल्या व्यथा मांडण्याचा स्थानिकांनी काही संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न केले. मात्र, अद्याप कोणतिही कार्यवाही होऊ शकलेली नाही.

संजय गांधी नगर येथे सर्वसाधारण १००० लोकवस्ती असून त्यांचा मतदानयादीमध्ये समावेश आहे. गेल्या काही वर्षांपासून तेथील नागरिकांचा वापर केवळ मतदानापुरताच केला जात आहे; मात्र त्यांना कोणत्याही प्राथमिक सुविधा देण्यात आल्या नाही. येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सहा चाळ येथील पिण्याच्या पाण्याच्या नळावरून पाणी भरावे लागते. पथदीप नसल्यामुळे रात्री घराकडे परततांना अंधारात चाचपडत पावले टाकावी लागतात. घरघरांमध्ये अजुनही वीज पोहचू शकलेली नाही. त्यामुळे रात्री या भागातील बहुतांश विद्यार्थी रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास करावा लागत आहे.

परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे. महिलांसाठी अद्याप शौचालयाची उभारणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे बहुतांश महिलांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे. येथे ठेवण्यात आलेल्या कचराकुंड्यामधून कचरा देखील नियमितपणे उचलला जात नाही. गटारींची बांधणीच करण्यात आलेली नाही. त्यामुळे परिसरातील इतस्तत: सांडपाणी वाहून जाते. रहिवाशांना असह्य दुर्गंधी सहन करावी लागत असून परिसराचे आरोग्यच धोक्यात सापडले आहे. गटारांची नियमित स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे देवळाली कॅम्प परिसरातील संजय गांधी नगर हा नक्की शहराचाच भाग आहे की नाही? असा प्रश्न बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींना पडतो.

नागरी सुविधांची मागणी करीत स्थानिकांनी कॅन्टोन्मेन्ट बोर्ड प्रशासनाकडे अनेकवेळा निवेदने दिली, आंदोलने केली, मोर्चे काढले. परंतु, प्रशासनाकडून नेहमीच उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, असा स्थानिकांचा आरोप आहे. काही अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी हा भाग लष्कराच्या जागेवर असून तो अनधिकृतरित्या वसलेला आहे. त्यामुळे तेथे नागरी सुविधा देता येणार नाही, असे स्पष्टीकरण देण्यात आले. याबाबत स्थानिकांनी संजयगांधी नगर अनधिकृत असल्याचे खंडन केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण तेथील रहिवाशी असून कॅन्टोन्मेन्ट बोर्डसह विधानसभा, लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या यादीमध्ये रहिवाशांची नावे कशी काय समाविष्ट कशी करण्यात आली? आणि नावे समाविष्ट असतील तर आम्हाला नागरी सुविधा पुरविण्याबाबत का चालढकल केली जाते, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. कॅन्टोन्मेन्ट प्रशासनाने नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे.

महिलांना उघड्यावर शौचास जावे लागते आहे. प्रशासनाने किमान फिरत्या शौचालयाची तरी व्यवस्था करून द्यावी. - मीराबाई घारू

चारणवाडीच्या पर्यायी जागेला विरोध आहे. प्रशासनाने आम्हाला येथेच नागरी सुविधा द्याव्यात अशी विनंती आहे. - राजेश पवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


CBS घेणार मोकळा श्वास?

$
0
0


वाढती लोकसंख्या आणि वाढत्या वाहनसंख्येमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेपुढील आव्हाने बदलली आहेत. एकीकडे रस्त्यांवर उतरणाऱ्या वाहनांची संख्या वाढत असताना दुसरीकडे रस्त्यांची रुंदी मात्र फारशी वाढू शकलेली नाही. परिणामी सततची वाहतूक कोंडी हा नाशिककरांना हैरान करणारा विषय ठरू लागला आहे. सीबीएस बस स्थानक, जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालयासारखी महत्त्वाची ठिकाणे असलेल्या सीबीएस या शहराचा मध्यवर्ती भागात वाहतुकीची समस्या जटील होण्याची चिन्हे अधिकच गडदपणे दिसू लागली आहेत. त्यावर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर हा प्रश्न अधिक जटील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोर्टात येणारे वकील आणि पक्षकारांची संख्या पहाता तेथे वाहनांसाठी पुरेशी जागा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. येथील वाहनतळाच्या विषयावर वारंवार खल होऊनही पक्षकारांनी वाहने उ‌भी करायची कोठे याचे समाधानकारक उत्तर अद्याप मिळू शकलेले नाही. त्याचा परिणाम बेशिस्त पार्कींग आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या समस्येच्या रुपात दिसू लागला आहे. वकील बांधवांना पास वितरित करण्यात आल्याने त्यांची वाहने बिनदिक्कत आत प्रवेश करतात. परंतु, पक्षकारांच्या वाहनांना आत प्रवेश मिळत नाही. ही वाहने कोठे ना कोठे जागा अडवितात आणि त्यातून निर्माण होतो वाहतुकीचा प्रश्न. जिल्हाधिकारी कार्यालयातही दिवसभर जिल्हाभरातील लोकांचा या ना त्या कारणाने राबता असतो. पाच दहा मिनिटांच्या कामांसाठी वाहन ‌जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घेऊन जाण्यास कंटाळा केला जातो. पार्कींगसाठीचे पैसे वाचविण्याच्या प्रयत्नातही नको तेथे वाहने उभी करून वाहतुक व्यवस्थेपुढील समस्या जटील करून ठेवल्या जात आहेत. जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वाराबाहेरच शहर बस थांबा आहे. सकाळी आणि सायंकाळी तेथे विद्यार्थी, नोकरदारांची मोठी गर्दी असते. बसेस आणि अन्य वाहनांच्या वर्दळीमुळे हा रस्ता अधिकच अरुंद वाटू लागतो. बेशिस्त रिक्षाचालक, अस्ताव्यस्त उभी केली जाणारी वाहने यांमुळे येथे प्रवाशांना जीव मुठीत धरूनच थांबावे लागते.

काही महिन्यांपूर्वी न्यायालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर वाहने उभी केली जात होती. पार्कींगचे पैसेही आकारले जात होते. मात्र, यामुळे येथील वाहतूक व्यवस्थेचा अक्षरश: बोजवारा उडाला. हे पार्कींग नागरिकांसाठी त्रासदायक ठरू लागल्याने ते हटविण्याचा स्वागतार्ह निर्णय प्रशासनाने घेतला. सध्या या संपूर्ण रस्त्यावर एका बाजूला दोरी बांधून तेथे वाहने तसेच खाद्य पदार्थ विक्रेत्यांना थांबण्यास बंदी करण्यात आली आहे. मात्र, बेशिस्त नागरिक आता जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणि त्याही पुढे अशोकस्तंभापर्यंत रस्त्यावरच वाहने उभी करू लागली आहेत. सीबीएस ते अशोकस्तंभ हा मुख्य रस्ताच अघोषित वाहनतळ बनला आहे. विशेष म्हणजे दोरीपासून आतील भागात वाहने उभी करू नये हा उद्देश असला तरी आता दोरीआणि बॅरिकेटींगला खेटून रस्त्यावरच वाहने उभी केली जाऊ लागली आहे. परिणामी वाहतुकीसाठी अरुंद ठरणारा हा रस्ता अधिकच अरुंद ठरतो आहे. विशेषत: येथे कार आणि तत्सम वाहनेच उभी केली जात असून वाहतुक पोलिस त्याकडे दुर्लक्ष करतात. या मार्गावरील नो पार्कींगचे फलक शोभेच्या वस्तू ठरत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासारख्या ठिकाणी सतत वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पोलिसांचा राबता असूनही तेथे वाहतुकीचे नियम डावलले जात आहेत. त्यास वेळीच पायबंद केला न गेल्यास भविष्यात येथील वाहतुकीची समस्या अधिकच जटील होत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रीडाक्षेत्राला सुगीचे दिवस?

$
0
0


मंदार देशमुख

भोवताली ढोल-ताशांच्या नौबती वाजायला लागल्या आहेत. सनईचे मंजुळ स्वर मधुनच कानावर पडत आहे. सांडणीस्वार लगबगीने आवतन घेऊन मोह‌िमेवर निघाले आहेत. चौका-चौकात, नाका-नाक्यावर, गावात-शहरामध्ये, शाळा-कॉलेजात सगळीकडे कुजबुज सुरू झाली आहे. सरदार-मनसबदार आपल्या खात्रीच्या माणसांकडून आवतण वेळेत पोहोचले की नाही याची खातरजमा करून घेत आहेत. कारण सवाल आहे लाखमोलाचा, वासंत‌िक क्रीडा प्रशिक्षण शिब‌िराचा.

आवतन देण्यापूर्वी आपल्यातला व इतरांच्यातला फरक अधोरेखीत केला जात आहे. सांडणीस्वारानां योग्य ते प्रशिक्षण दिले जाते. कोठे जायचे/कधी जायचे/ काय आणि कसे बोलायचे. आधुन‌िक व्यवहारी जगात आपणच सर्वोत्तम कसे आहोत व सर्वोत्तम कसे घडवू शकतो हे पटवून देण्याचा. कारण प्रश्न आहे व्यावसाय‌िक हिशोबाचा व त्याच बरोबर प्रश्न आहे काही नीतीमूल्य अजुनही जपणाऱ्या व आपल्या आदर्शवादाने व्यवहारावर मात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काहीशा एकांड्या शिलेदाराचा.

जादुगार आपल्या पोतडीतून एका पाठोपाठ एक वस्तू काढतो व समोरच्याना संमोहीत करून टाकतो. त्याच पद्धतीचे वेगवेगळे उोले-झरलज्ञचा नजराणा पेश केला जातो. काहीजण पारंपरीक खेळाचे, काही जण पारंपरीक खेळासमवेत स्पर्धात्मक खेळांची तर काही याला जोड देतात साहसी खेळाची. काही प्रशिक्षण शिब‌िराचा कालावधी अगदी आठ दिवसापासुन एक महिन्यापुरता. काही शिब‌िरे काही ठराव‌िक खेळासाठी तर काही क्रीडा कुंभमेळ्यासारखी. ज्यात सारे काही मिळते. अगदी संभाषण चार्तुयाच्या वर्गापासुन ते संस्कारापर्यंत सारे काही एकाच झेंड्याखाली व एकाच ठिकाणी. याला जोड दिली जाते ती फिटनेस तंत्राची, मंत्राची व आहार तज्ज्ञाची. दिवसभरात आपण नक्की किती कॅलरी अन्न कशा पद्धतीने खायचे याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले जाते. याच्यातच अंतर्भाव असतो तो आठवडा सहलीचा, हे सारे काही घडत असते क्रीडा वासंत‌िक प्रशिक्षण शिब‌िरात. सध्याच्या धावपळीच्या युगात यशस्वी होण्यासाठी हे सारे करणे आवश्यक असते, हे पालकांच्या मनावर बिंबवले जाते. पण स्वत: बरोबरच आपल्या पाल्यांना जे वेळ देऊ शकत नाही अथवा कामातून मला वेळच मिळत नाही अशी मानस‌िकता करून बसले आहेत, असे पालक या क्रीडाप्रशिक्षण शिब‌िराच्या महाजाळात अडकतात किंवा स्वत:हून त्यात अडकून घेतात. कोणाचीही ही मानसिकता नसते जे उमगले ते समजावुन घेण्याची. आठ दिवसापासुन मह‌िना भरात खेळाची आवड निर्माण करणे, त्यांना वर्षभर क्रीडांगणावर सरावासाठी सकाळ-सायंकाळ आणणे, त्यातुन खंडीभर खेळातून एक खेळ निवडणे व त्यातला प्रवास खेळाडू म्हणुन सुरू करणे, किती अवघड असते याची जाणीव सुजान पालकांना नसते. पण वासंत‌िक प्रशिक्षण शिब‌िरे आयोज‌ित करणाऱ्या आयोजकांना मात्र नक्की असते. एका महिन्याच्या कालावध‌ीत असल्या प्रशिक्षण शिब‌िरातून फार काही साध्य होत नाही. तसेच झाले असते तर राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नकाशावर नाशिकचे नाव क्रीडाक्षेत्रावर कोरले गेले असते. पण समाजाची मानसिकता नसते ते समजावून घेण्याची. कारण एका रात्रीत कधीच जगज्जेते अथवा चांगले खेळाडू घडू शकत नाहीत. तो असते सतत अविरतपणे चालू असणारा क्रीडा यज्ञ. ज्यात समिधेच्या रूपात आपल्याला आहुती द्यायची असते अहमपणाची, वेळेची व आवड निवडीची. तेव्हाच वास्तववादी क्रीडासंस्कृती निर्माण होते.

अर्थात सारेच वासंत‌िक क्रीडा प्रशिक्षण शिब‌िराच्या आयोजनाचा हेतू व्यावसाय‌िक आहे असा नाही. अर्थात व्यवसाय‌िक असणे वाईट नाही. पण ते तितक्याच स्पष्टपणे आयोजकानी पालकांना सांगणे आवश्यक असते व पालकांनी अशा प्रशिक्षण शिब‌िरात खेळाची तोंड ओळख होण्याच्या पलीकडे काही घडणार नाही हे वास्तव स्विकारण्याची. अन्यथा १ ली ते १० वी पर्यंत शालेय शिक्षणाची चढत्या श्रेणीने मांडणी करावी लागली नसती. प्रत्येक गोष्टीची वेळ असते आणि ती येण्यासाठी वेळ देण्याची सुद्धा गरज असते.

हे सारे घडत असतांना काही ध्येयवेडे कार्यकर्ते हा यज्ञ अविरतपणे चालू ठेवण्यासाठी पदरमोड करून क्रीडासंस्कृती जपण्याचा प्रामाण‌िक प्रयत्न करीत आहेत. त्यात यशवंत व्यायाम शाळेच्या माध्यमातून व्हॉलिबॉलचे जागले आनंद खरे, मल्लखांबाला लोकाश्रय मिळावा यासाठी प्रयत्नशिल असणारा यशवंत जाधव व त्याच प्रांगणात कबड्डीची ज्योत अव्ह्यातपणे चालू ठेवणारा प्रशांत भाबड, छत्रपती शिवाजी मैदानात फुटबॉल जपणारे बी. डी. रॉय, ज्युदोच्या माध्यमातून काम करणारा तुषार माळोदे, खो-खो ला आपले दुसरे घर माननारा व दुसऱ्या कोणत्याही खेळापासून दूर राहणारा उमेश आटवणे. तलवारबाजीला सकाळ-सायंकाळ वेळ देणारा राजू शिंदे, टेबलटेनिसच्या प्रसार व प्रचारासाठी कार्यरत असणारा शेखर भंडारी व शशांक वझे, बॅडमिंटनचा झेंडा अटकेपार रोवणारा मकरंद देव व अनंत जोशी, कुस्ती जपणारा हिरामण वाघ व गोरखनाथ बलकवडे ही व अन्य हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या व्यक्तींमुळे क्रीडाक्षेत्राच्या उपेक्षीत माळरानावर कधी तरी क्रीडा संस्कृती रूजेल व फुलेल असा विश्वास वाटतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटील, शेळके, पोरजे सभापतीपदी

$
0
0


टिम मटा

महापालिकेच्या सहा विभागांपैकी सातपूर, सिडको व नाशिकरोड विभागाच्या प्रभाग सभापतींची बुधवारी निवड करण्यात आली. सिडको विभागाच्या सभापतीपदी मनसेच्या कांचन पाटील, सातपूर विभागाच्या सभापतीपदी उषा शेळके तर ना‌शिकरोडच्या सभापतीपदी शिवसेनेच्या केशव पोरजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नाशिकरोडला पोरजे

महापालिकेच्या नाशिकरोड प्रभाग सभापतीपदी शिवसेनेचे केशव पोरजे यांची बुधवारी अपेक्षेनुसार बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आणि ढोलताशाच्या गजरात भगवा फडकवत जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी रावसाहेब भागडे आणि प्रभारी विभागीय अधिकारी कुसुम ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी चारला निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. शिवसेनेचे केशव पोरजे, वैशाली भागवत (शिवसेना) आणि रिपब्लिकन पक्षाचे सुनील वाघ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. माघारीच्या मुदतीत शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुधाकर बडगुजर आदींनी चर्चा करून सेनेच्या नगरसेवकांनी पोरजे यांना मतदान करावे, असा व्हीप बजावला. रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रकाश लोंढे, सुनील वाघ, ललिता भालेराव यांनीही स्वतंत्र चर्चा केली. अखेर भागवत आणि वाघ यांनी माघार घेतल्याने पोरजेंच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. बैठकीला मावळत्या सभापती कोमल मेहरोलिया, अशोक सातभाई, नगरसेवक सूर्यकांत लवटे, शिवाजी सहाणे, शैलेश ढगे, संभाजी मोरुस्कर, संपत शेलार, रंजना बोराडे, शोभना शिंदे, नयना घोलप, मंगला आढाव, हरिष भडांगे, कन्हैय्या साळवे आदी नगरसेवक उपस्थित होते.

सिडकोत कांचन पाटील

सिडको प्रभाग सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या शोभा निकम यांनी माघार घेतल्याने मनसेच्या कांचन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेत हातमिळवणी केल्याने सिडको सभापतीपदी मनसेच्या उमेदवाराचीच वर्णी लागणार हे निश्चित होते. मनसेकडून कांचन पाटील यांनी तर, जनराज्य पक्षातून शिवसेनेत आलेल्या शोभा निकम यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केला होता. निवडणूक प्रक्रियेदरम्यान शोभा निकम यांनी माघार घेतल्याने कांचन पाटील यांचा मार्ग मोकळा झाला. निवडणूक निर्णय अधिकारी रावसाहेब बागडे यांनी कांचन पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, स शिवाजी चुंभळे, सभागृह नेते सलिम शेख उपस्थित होते.

सातपूरला उषा शेळके

महापालिकेच्या सातपूर विभागातील सभापती निवडीची बिनविरोध परंपरा कायम राखली आहे. यात बुधवारी झालेल्या सभापती निवडणुकीत मनसेच्या उषा शेळके यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी रावसाहेब बागडे यांनी जाहीर केले. सातपूर विभागीय कार्यालयाच्या सभागृहात सभापतीपदासाठी मनसेच्या नगरसेविका उषा शेळके, भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील, राष्ट्रवादीच्या उषा आहिरे व माकपातून शिवसेनेत गेलेल्या नंदिनी जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सकाळी साडेदहा वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी बागडे यांनी सभापतीपदाच्या निवडीत चार अर्ज असल्याने माघारीसाठी पंधरा मिनिटांचा अवधी दिला. यानंतर सर्वच पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी समझोता घडवून आणला. यात भाजपाचे पाटील, राष्ट्रवादीच्या आहिरे व माकपाच्या जाधव यांनी सभापतीपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी बागडे यांनी सभापतीपदासाठी नगरसेविका शेळके यांचा राहिल्याने त्यांना सातपूरचे नूतन सभापती म्हणून जाहीर केले. याप्रसंगी नगरसचिव दि. ना. जुन्नरे, विभागीय अधिकारी महेंद्रकुमार पगारे, विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, गटनेते अनिल मटाले, सभागृहनेते सलिम शेख, शशिकांत जाधव, विलास शिंदे, नगरसेवक प्रकाश लोंढे, विक्रांत मते, सचिन भोर उपस्थित होते.

प्रभाग १९ मध्ये दोन्ही सदस्यांना पद

महापालिकेच्या दोन दिवसांपूर्वीच झालेल्या महासभेत सभागृहनेते म्हणून सलिम शेख यांची निवड करण्यात आली. त्यातच सातपूरच्या सभापतीपदाच्या झालेल्या निवडणुकीत उषा शेळके यांनाच बिनविरोध सभापतीपद मिळाले. यामुळे प्रभाग १९ मधील दोनही नगरसेवकांना मानाची पदे मिळाली आहेत.

विजय निश्चित तरीही व्हीप

नाशिकरोडला शिवसेनेचे आठ, राष्ट्रवादीचे चार, मनसेचे तीन, भाजप, काँग्रेस व रिपब्लिकनचे प्रत्येकी दोन, बंडखोर दोन आणि अपक्ष एक असे एकूण चोवीस संख्याबळ आहे. पोरजे यांना मनसे व काँग्रेसचे मिळून चार बंडखोर, रिपब्लिकनच्या दोन आणि भाजपच्या एक असा पंधरा जणांचा पाठिंबा होता. तरीही दगाबाजी नको म्हणून सेनेने व्हीप बजावला. मनसेचे गटेनेते अशोक सातभाई वगळता या पक्षाचे रमेश धोंगडे, संगीता गायकवाड तसेच भाजपच्या सविता दलवानी अनुपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डासांचा धोका

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात पूर्ण क्षमेतेन धूर फवारणी होत नसल्याने डासांचा उच्छाद वाढला असून, नागरिक डांसामुळे त्रस्त झाले आहेत. शहरातील डासांची घनता सरासरी चारवर पोहचली असून नाशिकरोड, सातपूर पंचवटी भागात डासांची घनता चारपेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे पाच या धोकादायक पातळीपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. दरम्यान, शहरातील डासांची घनता मोजण्यासाठी महापालिकेकडे दोनच कर्मचारी असल्याचे उघड झाले आहे.

धूर फवारणीचा ठेका वादात अडकल्याने शहरात सध्या धूर फवारणीचे काम विस्कळीतपणे सुरू आहे. त्यामुळे शहरात डासांनी उच्छाद मांडला आहे. पाचपर्यंत हा आकडा पोहचल्यास धोकेदायक मानला जातो. त्यामुळे नाशिकरोड, सातपूर आणि पंचवटीची घनता सध्या धोक्याच्या पातळीजवळ पोहचली आहे. शहरात एडीस आणि क्युलेक्स जातीचे डास असून, त्यात क्युलेक्स जातीचे डास मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याचे तपासणीत समोर आले आहे. या डासांमुळे रोगराई होत नसली जरी उपद्रव मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे नागरिक हैराण झाले असून, धूर फवारणी करण्याची मागणी केली जात आहे. तसेच घाण कचरा वेळेत उचलण्याची मागणी करण्यात आली आहे.

दोनच कर्मचारी

नाशिक शहराची लोकसंख्या १७ लाखांच्या वर पोहचली असून, शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र शहरातील डासांची घनता मोजण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे दोनच कर्मचारी असल्याचे उघड झाले आहे. शहराचा मोठा विस्तार झाला असताना केवळ दोनच कर्मचारी सहाही विभागाची घनता दररोज कशी मोजू शकतात, असा सवाल केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'जलयुक्त शिवार'ला देव पावला

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानासाठी मुंबई येथील श्री सिध्दीविनायक गणपती मंदिर न्यासने एक कोटी रुपयांची आर्थिक मदत जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केली आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मिळालेला हा निधी म्हणजे सिध्दीविनायकाने अभियानासाठी दिलेला आशीर्वाद असल्याची भावना प्रशासनातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.

राज्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी तसेच, दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. त्या अंतर्गत दरवर्षी राज्यात पाच हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचा राज्य सरकारचा निर्धार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. अभियानाच्या यशस्वीतेसाठी स्वयंसेवी संस्था, उद्योजक, देवस्थान ट्रस्ट आणि तत्सम संस्थांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत सिध्दीविनायक न्यासने राज्यातील ३४ जिल्ह्यांना प्रत्येक एक कोटी रुपये याप्रमाणे ३४ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी दिलेला यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारने मान्य केला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यासाठी एक कोटी रुपयांच्या निधीचा धनादेश अप्‍पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष नरेंद्र राणे, विश्वस्त हरिश सनस यांनी दिली. यावेळी रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर, जिल्हा कृषी अधीक्षक टी. एन. जगताप उपस्थित होते.

संस्था आणि उद्योजकांच्या सकारात्मक प्रतिसादाने हे अभियान यशस्वी होईल, असा विश्वास अप्‍पर जिल्हाधिकारी पालवे यांनी व्यक्त केला. न्यासाने दिलेल्या निधीतून अभियानाच्या अंमलबजावणीसाठी निवडलेल्या गावांमध्ये कामे केली जातील. संस्थाही त्या गावांना भेट देऊन तेथील कामांच्या प्रगतीची पाहणी करू शकेल.

जिल्ह्यात जलयुक्त शिवारांतर्गत होत असलेल्या कामांसाठी ३६८ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. एप्रिल ते जून या कालावधीत ५८ कोटी रुपये, तर जून ते मार्च या कालावधीत १०२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यामध्ये सिमेंट बंधारे, शेततळे, वनीकरण व पाणलोट संबंधिची कामे केली जाणार आहेत. पाच वर्षात २५ हजार गावे टंचाईमुक्त करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॅसेंजर टर्मिनलचे हस्तांतरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ओझर येथून विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ने दिली आहे. विमानतळाच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या आणि सेवेसाठी सज्ज असलेल्या अत्याधुनिक पॅसेंजर टर्मिनलचे हस्तांतरण एचएएलकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.

ओझर येथील विमानतळाच्या ठिकाणीच एचएएलच्या जागेत अत्याधुनिक पॅसेंजर टर्मिनल साकारण्यात आले आहे. गेल्या वर्षभरापासून हे टर्मिनल विनावापरच पडून आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ८४ कोटी रुपये खर्चून हे टर्मिनल बांधले. त्याची देखभाल एचएएलकडे राहिल, असे निश्चित करण्यात आले. मात्र, भाड्यापोटी एक लाख रुपये दरमहा देण्याची अट एचएएलने नाकारली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एचएएलकडे या टर्मिनलचे हस्तांतर होऊ शकले नाही. अखेर एक रुपये प्रति महिना आणि दीर्घ मुदतीसाठी हे टर्मिनल भाड्याने देण्याचे सरकारने घोषित केले. त्यानंतर सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एचएएलकडे टर्मिनलचे हस्तांतरण करण्यात आले. याप्रसंगी एचएएलचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर एस रंगनाथन, बांधकाम विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर एस. एस. साळुंखे, एस. बी. जमदाडे, राकेश सोनवणे, श्याम मिसाळ आदी उपस्थित होते. टर्मिनल आता आमच्या ताब्यात आले असून ओझर येथून प्रवासी विमानसेवा लवकरात लवकर सुरू व्हावी, यासाठी आम्ही सर्वंकष प्रयत्न करणार असल्याचे एचएएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

देखभालीसाठी नवीन टेंडर?

टर्मिनलची देखभाल करण्यासाठी एचएएलने गेल्या वर्षी टेंडर काढले होते. त्यास मोठ्या व बहुराष्ट्रीय कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. मात्र, टर्मिनलचे हस्तांतर न झाल्याने ते टेंडर बारगळले. आता एचएएलकडे टर्मिनलचा ताबा आल्याने नव्याने टेंडर काढण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोकड हिसकावली

$
0
0


नाशिक : थत्तेनगर येथील एचडीएफसी बँकेतून पैसे काढून निघालेल्या व्यापाऱ्याजवळील साडेचार लाखांची रोकड हिसकावून चोरट्यांनी पोबारा केला. बुधवारी दुपारी एक ते दीडच्या सुमारास हा प्रकार घडला. या बँकेच्या परिसरात गत वर्षभरात अशा प्रकारची ही तिसरी घटना घडली असून अद्याप यापैकी एकाही गुन्ह्याची उकल होऊ शकलेली नाही. त्यामुळे गंगापूर पोलिसांच्या एकूणच कार्यपध्दती आणि कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

प्रमोद माधव देवगिरी (रा. पंडित कॉलनी) हे बुधवारी दुपारी एकच्या सुमारास गंगापूर रोडवरील थत्तेनगरच्या एचडीएफसी बँकेत आले होते. त्यांनी बँकेतून ४ लाख ५० हजार रुपये काढले. पैसे पिशवीत ठेवून ते बँकेतून बाहेर पडले. त्याचवेळी दोघे मोटरसायकलवरून त्यांच्याजवळ आले. त्यांनी देवगिरी यांच्या हातातील पैशांची पिशवी हिसकावली. देवगिरी यांनी विरोधाचा प्रयत्न केला. मात्र त्यांना धक्काबुक्की करीत चोरट्यांनी पळ काढला. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त रविंद्र वाडेकर, गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंकर काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर देवगिरी यांनी फिर्याद दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अॅड. उत्तमराव ढिकले अनंतात विलिन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी पंचवटी

अॅड. उत्तमराव ढिकले यांच्या पार्थिवावर बुधवारी शोकाकूल वातावरणात पंचवटी अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नाशिकसह राज्यातील विविध राजकीय, सामाजिक, सहकार, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सकाळी अॅड. ढिकलेंच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पंचवटीतील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा वैकुंठ रथातून काढण्यात आली. रथयात्रेत हजारो शोकाकूल सहभागी झाले होते. ढिकले साहेब अमर रहे असे फलक जागोजागी लावण्यात आले होते. तत्पूर्वी मंगळवारी रात्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे ही उपस्थित होते. पार्थिवाला अग्निडाग दिल्यानंतर महापौर अशोक मुर्तडक, माजी आमदार बबन घोलप, वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी ढिकले यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगून आदरांजली अर्पण केली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, देविदास पिंगळे, माधवराव पाटील, आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, आमदार योगेश घोलप, माजी आमदार नितीन भोसले, वसंत गिते, माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, उपमहापौर गुरुमीत बग्गा, माजी आमदार दिलीप बनकर, जि. प. अध्यक्षा विजयश्री चुंभळे आदींसह हजारो नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेंट फ्रान्सिसमध्ये फी वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोल्फ क्लब मैदानाशेजारील सेंट फ्रान्सिस शाळेत पाच टक्के फी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात पालक शिक्षक संघाची बुधवारी दुपारी शाळेत बैठक झाली. या निर्णयास काही पालकांनी विरोध केला आहे तर, काही पालकांनी समर्थन केले आहे.

सेंट फ्रान्सिस शाळेतील फी वाढीसंदर्भात यापूर्वी मोठे आंदोलन झाले होते. तेव्हापासून तेथील फी वाढीचा प्रश्न अतिशय वादग्रस्त ठरला आहे. या प्रकरणामुळेच शाळेमध्ये पालक शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली. त्यानुसार बुधवारी (दि.८) दुपारी शाळेमध्ये संघाची बैठक घेण्यात आली. मुख्याध्यापक कुसुम शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पालक आणि शिक्षक सदस्य उपस्थित होते. २०१४-१५ आणि २०१५-१६ या दोन्ही वर्षांसाठी प्रत्येकी पाच टक्के फी वाढ करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती शेट्टी यांनी बैठकीनंतर दिली आहे. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता आणि त्याच्या वाढीसंदर्भात वैविध्यपूर्ण चर्चा करण्यात आली. येत्या काळात शाळेत नवनवीन उपक्रम राबविण्याचेही यावेळी निश्चित केल्याचे शेट्टी यांनी सांगितले. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीबाबत संघाचे पालक सदस्य गोरख बाविस्कर यांनी समाधान व्यक्त केले आहे. तर, शाळेने कुठल्याही प्रकारचे ऑडिट सादर केलेले नसताना फी वाढीचा घेतलेला निर्णय हा अमान्य असल्याचे संघाचे पालक सदस्य हरीष वाघ यांनी सांगितले. त्यामुळे शाळेतील फी वाढीचा प्रश्न कायम राहतो की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दशपुतेकडे कोट्यवधींचे घबाड

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक बांधकाम विभागात नेमणूक असलेला परंतु, पंतप्रधान ग्रामसडक योजनेत प्रतिनियुक्तीवर असलेल्या संजय दशपुते याला एक लाख रुपयांची लाच घेताना अटक केल्यानंतर त्याच्या घराची झडती घेण्यात आली. सकाळी सातपर्यंत सुरू असलेल्या या झडतीमध्ये मोठे घबाड हाती लागल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. दशपुते याला न्यायालयाने १० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

रस्ते बांधण्याचे गर्व्हन्मेंट कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या एका ठेकेदाराने दशपुतेच्या विरोधात तक्रार केली होती. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चार गावांमधील रस्त्याचे मातीकाम आणि डांबरीकरणाचे काम या ठेकेदाराकडे होते. तसेच या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे पाच वर्षांसाठीचे कामही त्यांच्याकडेच आहे. सरकारी नियमानुसार गॅरंटी म्हणून त्यांनी ३३ लाख रुपये अनामत रक्कम बँक ऑफ बडोदामध्ये भरली होती. मुदतीत काम पूर्ण केल्याने ती रक्कम परत मिळावी तसेच रिलीज ऑर्डर काढून डांबरीकरण केलेल्या रस्त्याच्या देखभालीचे शेवटच्या वर्षाचे बील मिळावे यासाठी ठेकेदार कार्यकारी अभियंता संजय दगडू दशपुते यांच्याकडे पाठपुरावा करीत होता. मात्र हे काम करून देण्याच्या मोबदल्यात दशपुते याने दीड लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती एक लाख रुपये देण्याचे ठरले. मंगळवारी सायंकाळी कॉलेजरोड येथील अंबर अपार्टमेंट राहत्या घरी दशपुतेने लाच स्वीकारली. त्याच्यावर सरकारवाडा पोलिसांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधकच्या नंदुरबार येथील पथकाने कारवाईत सहभाग घेतला.

दशपुते याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या घराची झडती कामकाज सुरू करण्यात आले. हे काम सकाळी सातपर्यंत सुरू होते. त्यामध्ये पाच लाख २२ हजार ३६५ रुपयांची रोकड, ६० हजार रुपये किमतीची चांदीची भांडी, आनंदवली विसेमळा, चांदशी, हिरावाडी येथे भूखंडांची कागदपत्रे आढळून आली. याखेरीज घर झडतीमध्ये आढळलेल्या बँकांच्या पासबुकमधील नोंदी तपासल्या असता त्यामध्ये २४ लाख ३ हजार ६८० रुपये खात्यावर असल्याचे आढळून आले आहे. त्याच्याकडे एक इनोव्हा, एक झेन आणि एक अॅक्टिवा अशी वाहने असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

२३ तोळे दागिने

दशपुते याच्या बँक लॉकर्सची बुधवारी दुपारी झडती घेण्यात आली. त्यामध्ये सहा लाख ४५ हजार ६५१ रुपये किमतीचे २३ तोळे सोन्याचे दागिने आढळून आले आहे. ५१ हजार ६०० रुपयांची रोकड, तसेच ३१ हजार १२२ रुपये किमतीची चांदीची भांडी आढळून आली आहेत.

दशपुते याला ताब्यात घेतल्यानंतर रात्री त्याच्या घराची झडती घेण्यात आली. दुपारी आमच्या पथकाने त्याच्या बँक खात्यांची तपासणी केली. दशपुते याच्याकडे मोठ्या प्रमाणावर मालमत्ता आढळून आली आहे. कोणी लाच मागत असल्यास माहिती देण्यासाठी नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. - प्रवीण पवार, अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फीची आडकाठी

$
0
0


भावेश ब्राह्मणकर, नाशिक

शिक्षण हक्क कायद्यानुसार अल्पसंख्याक शाळा वगळता उर्वरित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील पाल्यांसाठी देण्यात येतात. यंदा ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबविण्यात आली आहे. आता शाळेत प्रवेश घेण्याची वेळ येऊन ठेपलेली असताना अनेक समस्या पालक आणि शाळांसमोर येवून ठेपल्या आहेत. या सर्वांवर प्रकाश टाकणारी मालिका आजपासून...

शिक्षण हक्क कायद्यानुसार पाल्याला मोफत प्रवेश दिला जाईल. पण, सरकारने गेल्या तीन वर्षात मोफत प्रवेशाचा निधी दिला नाही. त्यामुळे आताच्या प्रवेशाची फी द्या. सरकारने आम्हास ती दिली की तुम्हाला परत देतो, अशी भूमिका काही शाळांना घेतल्याने पालक मोठ्या विवंचनेत सापडले आहेत.

देशात शिक्षण हक्क कायदा करण्यात आला असून, त्यास यंदा पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या कायद्यानुसार अल्पसंख्याक शाळा वगळता उर्वरित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील पाल्यांना मोफत देण्याची तरतूद आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरातील शाळांमध्ये ही प्रक्रिया पारंपरिक पद्धतीने राबविण्यात आली. मात्र, यंदा ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार नाशिकसह राज्यातील ८ शहरांमध्ये १८ फेब्रुवारी ते २० मार्च दरम्यान ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. शहरातील १०१ शाळांमधील २००० जागांसाठी एकूण १५१० अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील १२९० अर्ज वैध ठरले आहेत. त्यानंतर या अर्जांचा ड्रॉ काढण्यात आला. ज्या अर्जांची निवड झाली आहे. त्या पालकांना संबंधित शाळेत प्रवेश घेण्यासंबंधिचे एसएमएस पालकांच्या मोबाइलवर पाठविण्यात आले आहेत. तर, प्रवेश होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावांची यादी महापालिका शिक्षण मंडळाने शाळांकडे सुपूर्द केली आहे.

पाल्याचा प्रवेश घेण्यासाठी शाळेत जाणाऱ्या पालकांना मात्र विचित्र परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. शाळेत मोफत प्रवेश घेण्यासाठी गेल्यानंतर पालकांशी वेगवेगळ्या बाबीत चर्चा केली जात आहे. 'आम्ही प्रवेश देण्यास तयार आहोत. मात्र, गेल्या तीन वर्षातील मोफत प्रवेशाचे पैसे आम्हाला आजवर मिळाले नाहीत. लाखो रुपयांची बाकी राहिल्याने आमची शाळा अडचणीत येण्याची शक्यता आहे. सरकार कधी पैसे देईल, हे निश्चित नाही. त्यामुळे तुमच्या पाल्याला आम्ही मोफत प्रवेश देतो पण, तुम्ही या वर्षीची शैक्षणिक फी द्या. सरकारने आम्हाला पैसे दिले की. तुम्ही भरलेली फी परत केली जाईल', अशी अट शाळांकडून टाकली जात आहे. या साऱ्या परिस्थितीत पालक मोठ्या संभ्रमावस्थेत सापडले आहेत. दरम्यान, खासगी आणि विनाअनुदानित असलेल्या शाळा संस्थाचालकांची नुकतीच नाशकात बैठक झाली. जोवर सरकार तीन वर्षाचे पैसे देत नाही तोवर प्रवेश न देण्याचे निश्चित करण्यात आले. आणि आता प्रवेश देण्यावेळी पालकांची अडवणूक केली जात असल्याने पालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. एकीकडे बालकांना शिक्षणाचा हक्क प्रदान करण्यात आला आहे, तर दुसरीकडे शाळांकडून प्रवेशासाठी अडथळ्यांचे बांध घालण्याचे प्रकार घडत आहेत. या साऱ्या प्रकारात मात्र आरटीईच्या प्रवेशांवरच गंडांतर येणार की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थासाठी १५ हजार पोलिस

$
0
0


नाशिकः नाशिकमध्ये जुलैमध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी राज्यातील १५ हजार पोल‌सिांची कुमक बंदोबस्तासाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी हेमंत टकले यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. नाशिक पोल‌सि आयुक्तालयातील अधिकाऱ्यांच्या २७३ मंजूर पदांपैकी २४८ पदे भरण्यात आली आहेत. पोल‌सि कर्मचाऱ्यांच्या ३ हजार ०३६ पैकी मंजूर पदापैकी २ हजार ९४१ पदे भरण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले. सीसीटीव्ही टेंडर काढलेले आहे. यातील अनियमीततेबाबत सध्या चौकशी चालू आहे. त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होईल, असे सांगून सीसीटीव्हीचे काम कुंभमेळ्याव्यापूर्वी होईल, याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. कुंभमेळाव्याच्या नियोजनासाठी राज्यातील सर्व पोल‌सि फोर्स नाशिकमध्ये आणला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपात महिला जागर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळाल्यानंतर महिलांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. गुणवत्तेच्या बळावर त्या आता पुरूषांना मागे टाकत महत्त्वाची आणि निर्णयक्षम पदे मिळवण्यात अग्रणी ठरत असल्याचा प्रत्यय महापालिकेच्या स्थायी समितीपाठोपाठ महिलांनी आता प्रभाग समित्यांमध्येही आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. बुधवारी झालेल्या तीन प्रभाग समित्यांपैकी दोन प्रभाग समित्यांमध्ये महिलांना सभापती होण्याची संधी मिळाली असून, गुरूवारीही तीन मह‌लिांना सभापतीपदाची संधी मिळणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले असले तरी, प्रमुख आणि महत्त्वाच्या पदांवर पुरूषांचीच मक्तेदारी राह‌लिी आहे. आतापर्यंत महिलांना निर्णय घेण्यापासून डावलले जात होते. मात्र या आरक्षणाचा फायदा घेत, महिला आपली गुणवत्ता सिद्ध करत महत्त्वाची आणि निर्णायकपदे पटकावत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. स्थायी समितीपाठोपाठ प्रभाग समित्यांमध्येही महिलांनीही आपला दबदबा निर्माण केल्याने महापालिकेच्या आर्थिक चाव्या त्यांच्या हातात येण्याची शक्यता आहे. स्थायी समितीत सध्या १४ सदस्यांपैकी १० सदस्य महिला असून, स्थायीत महिलांचे बहुमत आहे. त्यामुळे महापालिकेच्या आर्थिक नाड्या महिलांच्याच हाती असतील.

महापालिकेत सहापैकी पाच प्रभाग समित्यांच्या सभापतीपदाची संधी महिलांना मिळणार आहे. बुधवारी झालेल्या प्रभाग समित्यात तीन सभापतीपदापैकी दोन सभापतीपदे महिलांनी पटकावली आहेत. सातपूरच्या सभापतीपदी मनसेच्या उषा शेळके, नवीन नाशिकच्या सभापतीपदी मनसेच्या कांचन पाटील या बिनविरोध निवड‍ून आल्या. तर गुरूवारी होणाऱ्या नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि पंचवटीतही मह‌लिांनाच संधी मिळण्याची शक्यता आहे. पूर्वमध्ये अपक्ष सदस्या शबाना पठाण यांना सभापतीपद दिले जाणार आहे, तर पश्चिममध्ये काँग्रेसच्या योगिता आहेर आणि पंचवटीत राष्ट्रवादीच्या सुनिता शिंदे यांना सभापती पदाची संधी मिळणार आहे.

महिलांमध्ये एकमेकांबद्दल नेहमीच असूया असते. मात्र प्रभाग समित्यांच्या या निवडणुकीत महिलांनी आपल्या एकमेकींबद्दलची असूया बाजूला ठेवत, निवडणुका बिनविरोध करण्यास संमती दर्शवली आहे. पक्षाने नाव निश्चित केल्यानंतर दुसऱ्या महिला सदस्याने समंजसपणा दाखवून आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे या निवडणुका बिनविरोध होण्यास मदत झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँक निवडणूक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या दोन याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून, गुरूवारी किंवा शुक्रवारी अंतिम प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीची धामधूम सुरू होणार असून, आठ दिवसात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.

नाशिक विभागातील अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे जिल्ह्यातील चार बँकांची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली. मात्र, नाशिक जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया ही न्यायालय‌ीन चक्रात अडकली होती. जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी ही २५ मार्च रोजी प्रसिद्ध होणार होती. मात्र मतदार यादी आणि पाच हजार रुपये सभासदधारक मतदार करण्याच्या मुद्द्यावर काही सभासदांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यामुळे उच्च न्यायालयाने अंतिम मतदार यादीच्या प्रसिद्धीवर बंदी आणली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेला मतदार यादी प्रसिद्ध करता येत नसल्याने निवडणूक प्रक्रिया थांबली होती. मात्र बुधवारी उच्च न्यायालयाने दोन्ही याचिका फेटाळून लावल्या. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून, अंतिम प्रारूप मतदार यादी बुधवारी किंवा शुक्रवारी प्रसिद्ध होईल व आठ दिवसात निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापणार आहे.

राजकीय गणिते बदलणार

माजी आमदार व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अॅड. उत्तमराव ढिकले यांच्या निधनामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय गणिते बदलणार आहेत. जिल्हा बँकेवर अॅड. ढिकले गटाचे वर्चस्व राहिले आहे. त्यांनी बँकेच्या निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उभे करण्याची तयारीही पूर्ण केली होती. मात्र त्यांच्या निधनाने निवडणुकीतील चित्र बदलले असून, पॅनलमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रामपंचायत इलेक्शनचा चढला फिव्हर!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यामधील ३८ ग्रामपंचायतीच्या १३८ वार्डातील ३८० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी एक हजार १४१ उमेदवारांनी अर्ज दाखल झाले. छाननीनंतर यापैकी ३७ अर्ज अवैध, तर एक हजार १०३ अर्ज वैध ठरविण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांनी दिली.

तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींच्या ४९ वार्डातील ६३ जागांच्या पोटनिवडणुकीसाठी फक्त ५४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लखमापूर ग्रामपंचायतीत १७ जागांच्या निवडणुकीसाठी तालुक्यातून सर्वाधिक १२९, उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर ठेंगोडा (५५), लखमापूर (१२९), ताहाराबाद (८९), मळगांव भामेर (८), वाडीपिसोळ(१३), नवी शेमळी (१३), ब्राम्हणगांव (७३), नामपूर(८२), बोढरी(२६), रामतीर (२१), खमताणे (२५), जुनीशेमळी(३०), श्रीपूरवडे(२३), तरसाळी(२५), निताणे(२७), नळकस(८), कोटबेल(२५), धांद्री(५०), कोळपाडा(२६), अंबासन(३७), इजमाने(८) द्याने (२२), कौतिकपाडे (९), पपळदर (१४), कंधाणे (२५), मोराणे सांडस (९), उत्राणे (४३), देवळाणे(२९), विचुरे (१०), कुपखेडा (१६), लाडुद (७), दeहाणे(३१), सारदे (१९), सोमपूर(३५), बिजोटे(११), इजमाने (८), रातीर(७), करजांड(४३) या ग्रामंपचातीसाठी अर्ज दाखल झाले आहेत. दि. १० रोजी माघारीचा दिवस असल्याने बहुतांशी ग्रामपंचायती बिनविरोधासाठी प्रयत्नशील आहेत. तर मोठ्या ग्रामपंचातींच्या निवडीसाठी किती माघारी होतात याकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॅसेंजर गाडीत लुटारुंचा हैदोस

$
0
0

अनेकांना मारहाण; मनमाड-नगरसूल दरम्यानचा प्रकार

म. टा. वृत्तसेवा, येवला

मनमाड-नगरसूल पॅसेंजर रेल्वे गाडीतील प्रवाशांना गुरुवारी मध्यरात्री तिघा लुटारूंनी मारहाण करतानाच चाकूचा धाक दाखवून लुटले. प्रवाशांकडील रोख रक्कम, मोबाइल व इतर साहित्य लुटण्यात आले. पैसे न देणा-या अनेक प्रवाशांवर चाकूचे वारही करण्यात आले. मनमाड ते नगरसूल रेल्वे मार्गावर अनकाई रेल्वे स्टेशनपासून नगरसूलदरम्यान गुरुवारी मध्यरात्री २.१० ते २.२० वाजेच्यादरम्यान हा प्रकार घडला. जखमी प्रवाशांना नगसूल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

निजामाबाद ते मनमाड येणारी पॅसेंजर रेल्वे मनमाड जंक्शनवर खाली होते. पुढे ही गाडी रात्री १२.४० वाजता सुटण्याची निर्धारित वेळ असली तरी ही गाडी नेहमी रात्री २ ला मनमाडवरून सुटते. ती रात्री २.२० वाजता येवला तालुक्यातील नगरसूल रेल्वे स्थानकावर येते. पहाटे ५.२० वाजता नांदेड कडे जाते. गुरुवारी मध्यरात्री दो वाजता मनमाड रेल्वे स्थानकावरून नगरसूलकडे निघालेली ही रेल्वे गाडी (७५५९०) अनकाई रेल्वे स्थानकात काही वेळ थांबताच अज्ञात लुटारूंनी गाडीत शिरकाव केला. काही वेळातच लुटारूंनी गाडीच्या डब्यात आपला प्रताप दाखविण्यास सुरुवात केली. या तिघा लुटारूंनी आपल्याकडील धारधार चाकूंचा प्रवाशांना धाक दाखवत कधी हाताने, कधी लाथांनी मारहाण केली. काही प्रवाशांना चाकूचा वार करीत लुटले. लुटारूंनी प्रवाशांकडील रोकड, तर काहींचे मोबाईल हॅण्डसेट हिसकावून घेतले. नगरसूल रेल्वे स्थानकावर गाडीचा वेग कमी होताच तिघे लुटारू गाडीतून उड्या टाकत पसार झाल्याची माहिती जखमी प्रवाशांनी दिली. तिघे लुटारू २० ते २२ या वयोगटातील होते. ते हिंदी भाषेतूनच धमकावित असल्याचे रेल्वे प्रवाशांनी पोलिसांना सांगितले.

जखमी झालेले सय्यद हारूण नवाब (२१), मोहम्मद सरवर खान (३५), जियाउद्दीन फारुकी (२४) तिघेही औरंगाबाद यांच्यासह लक्ष्मी नारायण दशरथ (३५) रा. चंद्रमपेठ, जिल्हा-करीमनगर, तेलंगणा यांना रेल्वे गाडी नगरसूलमध्ये आल्यानंतर नगरसूल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गुरुवारी रात्री त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यांनतर वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र पाटील यांनी त्यांच्यावर उपचार केले. लुटारूंनी केलेल्या मारहाणीत तसेच चाकुच्या हल्ल्यात काही प्रवाशांना डोक्याला, हाताला, खांद्याला तसेच गुडघ्याला गंभीर जखमा झाल्या

पथके रवाना

गुरुवारी सकाळी 'जीआरपी' चे मनमाड पोलिस निरीक्षक के. एस. जांभळे यांच्यासह त्यांच्या पथकाने नगरसूल ग्रामीण रूग्णालयात घटनेतील जखमी रेल्वे प्रवाशांची भेट घेत प्रकार जाणून घेतला. याअगोदरच्या रेल्वेतील चोरी प्रकरणातील लुटारूंची छायाचित्रेही प्रवाशांना दाखवून शहानिशा करण्यात आली. 'जीआरपी' पोलिसांनी घटनेतील आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना केल्याचे पोलिस निरीक्षक जांभळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज तारांची समस्या; राष्ट्रवादीची गांधीगिरी!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहरातील मध्यवर्ती कार्यालय शहरापासून चार ते पाच किमी अंतरावर असलेल्या मोरेनगर येथे स्थलांतर केल्याच्या निषेधार्थ तसेच नववसाहत परिसरातील विद्युत तारा लोंबकल्या असल्याच्या निषेधार्थ सटाणा शहर राष्ट्रवादीच्या वतीने गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.

सटाणा शहरातील नववसाहतीमधील शिवशक्ती नगर, ठगुमाई नगर, डी. बी. नगर, टेलिफोन कॉलनी, आर. के. नगर, सिमानगर, काळू नानाजी नगर, माधवनगर, सदानगर, क्रांतीनगर परिसरात बहुतांश ठिकाणी दोन पोलांमधील अंतर जास्त असल्याने दोघांमधील विद्युत तारा जमिनी पासून काही अंतरावर लोंबकळत आहेत. परिमाणी काही पोलांवर विद्युत तारांचा मोठ्या प्रमाणात ताण येत असल्याने ग्राहकांना पुरेसा विद्युत पुरवठा होत नाही. यामुळे संतप्त राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यांनी दोघा प्रकरणाबाबत वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांच्या दालनात चर्चासाठी गेले असता अभियंता उपलब्ध नसल्याने खुर्चीची

चर्चा करीत गांधीगिरी आंदोलन केले. याबाबत आठ दिवसांत वरील प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन विद्युत विभागाच्या वतीने अतिरिक्त कार्यकारी अभियंता लक्ष्मण पिरवानी, उपमुख्य कार्यकरी अभियंता प्रदिप मोरे, ओ. बी. महाजन यांनी दिले. आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी नगराध्यक्ष पांडूरंग सोनवणे, फारूक सैय्यद, जिल्हाउपाध्यक्ष ज. ल. पाटील, नगरसेवक भारत खैरणार, सुनील अहिरे, फझल शेख, प्रमोद सोनवणे, सलिम पठाण, फईम शेख, रविंद्र ओतारी, संदीप भामरे डॉ. मन्सरी आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच स्थलातंरित झालेले कार्यालय सटाणा येथे सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटविहीर शाळेत वाचनालयाची सुविधा

$
0
0

कळवण ः कळवण तालुक्यातील जिल्हा परिषद पाटविहीर शाळेत नूतन वाचनालय सुरू करण्यात आल्याची माहिती प्राचार्य जिभाऊ निकम यांनी दिली. वाचनालयाचे उदघाटन प्रा. निंबा कोठावदे यांनी केले. यावेळी कै. बळवंत कोठावदे यांचे स्मृतीप्रित्यर्थ प्रा. निंबा कोठावदे यांनी पाटविहीर शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध लेखकांची अकरा हजार रुपयांची पुस्तके शाळेला भेट दिली.

प्रा. निंबा कोठावदे म्हणाले, की आजपर्यंत देशात उच्च पदावर असलेल्या असंख्य व्यक्ती या वाचन आणि लेखनाच्या जीवावर मोठ्या झाल्या आहेत. असंख्य लेखक आपल्या लेखणीने साहित्यात भर टाकून विद्यार्थी वर्गाला ज्ञान वाटत आहेत. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांनीही वाचनाचा पुरेपूर आनंद घ्यावा व जास्तीत जास्त पुस्तक वाचावीत. यावेळी कमको बँकेला निवडून आलेल्या सुनील महाजन व प्रा. निंबा कोठावदे यांचा शाळेच्या शिक्षण कमेटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास गटशिक्षण अधिकारी बी. टी. चव्हाण, केंद्रप्रमुख के. बी. पगार, उपसरपंच आर. एस. भोये, प्राचार्य जिभाऊ निकम, व्यवस्थापन समिती अध्यक्ष उत्तम जगताप, शाळेतील पदवीधर शिक्षक निलेश भामरे, कुंदन दाणी, शिक्षिका साळूबाई बागुल, मीनाक्षी आहेर, वंदना सपकाळे, संगीता अहिरे, सरला अहिरराव, शाळा समितीचे अध्यक्ष उत्तम जगताप, सदस्य ललित भोये, शिवाजी चौरे, आदींसह विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयंती उत्सवामध्ये समन्वय ठेवावा

$
0
0

पोलिस उपायुक्त विजय पाटील यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव शांततेत साजरा करण्यासाठी महापालिका, महावितरण व संबंधित यंत्रणांनी योग्य समन्वय राखावा. कार्यकर्त्यांनीही भान ठेऊन दिमाखात उत्सव साजरा करण्यासाठी सहकार्य करावे, असे प्रतिपादन पोलिस उपायुक्त विजय पाटील यांनी केले.

नाशिकरोड येथे शांतता समितीच्या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. सहाय्यक आयुक्त अतुल झेंडे, नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नारायण न्याहाळदे, उपनगरचे अशोक भगत, उत्सव समितीचे अध्यक्ष विलासराज गायकवाड, विजया जाधव, नगरसेवक सूर्यकांत लवटे, ललिता भालेराव, रंजना बोराडे, सुनील वाघ, हरिष भडांगे, शशी उन्हवणे, सुनील कांबळे, आकाश भालेराव, नाझाबाई सोनवणे, युनूस सैय्यद, शकुंतला त्रिवेदी, देवीदास डोखे, पांडुरंग गुरव, भरत कदम, नितीन चिडे, शेखर भालेराव, साहेबराव खर्जुल, प्रमिला चव्हाण, सुनंदा मोरे आदी सदस्य उपस्थित होते.

पाटील म्हणाले, की मद्यपींनी उत्सवाला गालबोट लावण्याचे प्रयत्न केल्यास महिलांनीच त्यांचा समाचार घ्यावा. पोलिसांचे पाठबळ महिलांना राहिल. सहाय्यक आयुक्त झेंडे म्हणाले, की वर्गणीची सक्ती करू नये. मद्यप्राशन केलेल्यांना मिरवणुकीत सहभागी होऊ देऊ नये. डॉ. आंबेडकरांनी तयार केलेल्या राज्यघटनेतील कायद्याचे आणि न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे. वाद होणार असेल तर चित्ररथ काढू नये, त्याऐवजी कार्यक्रम साजरा करावा, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

जयंतीच्या दिवशी उड्डाणपुलावर पोलिस नेमावेत, महावितरणने वीजपुरवठा अखंडीत ठेवावा, पथदीप सुरू करावेत, जयंती काळात मद्यविक्री बंद ठेवावी, गुंडगिरीला आळा घालावा, देवी चौकाएवजी शिवाजी पुतळामार्गे मिरवणूक न्यावी, चित्ररथांना बॅटरी बॅकअप ठेवावा, वादाचे प्रसंग टाळावेत आदी सूचना सदस्यांनी केल्या. महापालिका व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images