Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

म्हाडाच्या घरांना अतिक्रमणांचा विळखा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

म्हाडाने सातपूर कॉलनीत उभारलेल्या घरांना काही ठिकाणी असलेल्या चौकात जाण्यासाठी रस्ताच राहिलेला नाही. आठ हजार स्कीमच्या रहिवाशांच्या अतिक्रमणाने चौकात कोपऱ्यात राहणारे रहिवाशी त्रस्त झाली आहेत. यातच बहुतांश घरमालकांनी घर भाड्याने देऊन दुसरीकडे भाडे तत्वाने रहावे लागत आहे. यासाठी महापालिकेने याकडे लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

सातपूर भागात एमआयडीसीची स्थापना झाल्यानंतर म्हाडाने कामगारांसाठी स्वतःत घरे असावित म्हणून म्हाडाची स्कीम सातपूर भागात राबविली. यात सर्वसामान्य कामगारांना परवडणार अशा दरात कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यात आली. यात सातपूर हौसिंग कॉलनीत सर्वात मोठी स्कीम म्हाडाने कामगारांसाठी निर्माण केली. यात आठ हजार घरांची स्कीम देखील अगदी कमी पगार असणाऱ्या कामगारांसाठी बांधण्यात आली. परंतु, गेल्या काही वर्षांपासून आठ हजार स्कीममध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी त्यांना हवी तशी अतिक्रमणे करीत घरांची बांधकामे केली. यामुळे मोठ्या प्रमाणात अतिक्रमाणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यात बहुतांश रहिवाशांनी घरांचे बांधकाम करतांना चौकात कोपऱ्यात राहणाऱ्या रहिवाशांना रस्ताच सोडला नसल्याने त्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत चौकात राहणाऱ्या रहिवाशांनी स्थानिक नगरसेवक व महापालिकेकडे तक्रारी करून देखील न्याय मिळत नसल्याचे सांगतात. विशेष म्हणजे एकेकाळी गुण्यागोविंदाने राहणारे रहिवाशीच चौकातील रहिवाशांचे घरच अतिक्रमणात गायब करत असल्याने रोजच छोटीमोठी भांडणे होतांना दिसत आहेत.

कुणाकुणावर करावी कारवाई?

अनधिकृत बांधकामाबाबत अनेक तक्रारी देखील महापालिकेकडे आल्याने नेमकी कारवाई करावी तरी कोणावर असा प्रश्न निर्माण होत असल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगतात. त्यातच दोन किंवा चार रहिवाशांनी अतिक्रमण केले असल्यास कारवाई करता आली असती. परंतु, शेकडो घरांचे अतिक्रमण असल्याने कारवाई करावी कशी? असा प्रश्न महापालिका अधिकाऱ्यांना पडला आहे. परंतु, आठ हजार स्किममधील चौकात राहणाऱ्या रहिवाशांचे मात्र अतिक्रमाणात मोठे हाल होत असल्याने त्यांना घरसोडून दुसरीकडे भाडे तत्वाने राहण्याची वेळ आली आहे.

सातपूरमध्ये कामाच्या शोधासाठी आलेल्या कामगारांसाठी म्हाडाने घरे उभारली. परंतु, दिवसेंदिवस रहिवाशांनी घरांच्या मागे पुढे अतिक्रमणे करीत बांधकामे केली. यामुळे चौकातील रहिवाशांना तर रस्त्याच सोडलेला नाही. महापालिकेने या प्रश्नाकडे लक्ष घालण्याची गरज आहे.

- दिनेश आवारे

आठ हजार स्किममध्ये चौकातील घरात आम्ही राहत होते. परंतु, गेल्या वर्षी शेजारी राहणाऱ्या दोघा रहिवाशांनी बेसुमार अतिक्रमण केल्यामुळे आमचे घर दिसेनासे झाले आहे. त्यामुळे स्वतःचे घर सोडून भाडेतत्वाने दुसरीकडे राहण्याची वेळ आली आहे.

- स्वप्निल वडनेरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आदिवासींमधील कुपोषण कमी करणे शक्य

$
0
0

डॉ. अशिष सातव यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

महात्मा गांधीजी यांनी देशाची प्रगतीसाठी खेड्याकडे जाण्याच्या दिलेल्या मंत्राने प्रेरीत होऊन मी खेड्याकडे वाटचाल केली आणि मेळघाटातील आदीवासींच्या मुलांमधील कुपोषण कमी करण्यासाठी काम केले. सरकार व राजकारणी यांच्याकडून कुपोषणाविषयी दिशाभूल करणारी माहिती खोटी असल्याचे स्पष्ट केले. आदिवासींमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे शक्य आहे, हे मी माझ्या अनुभवातून सिध्द करून दाखविलेल, असे प्रतिपादन डॉ. अशिष सातव यांनी केले.

हुतात्मा स्मारक येथे ज्ञान विज्ञान समितीतर्फे 'कुपोषण कसे नाहीसे करायचे?' या विषयावर डॉ. सातव यांचे व्याख्यान झाले. डॉ. सातव म्हणाले, की आजच्या तरुण पिढीने म्हात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरीत होऊन देश घडविण्यासाठी शहरी भागापेक्षा खेड्याकडे वळायला हवे. डाक्टर झाल्यानंतर मी खेड्यातूनच रुग्णसेवा सुरू केली. मेळघाटातील आदिवासी व त्यांची मुले कुपोषणाने बळी जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर 'महान' नावाची संस्था स्थापन करून कुपोषणकडे लक्ष केंद्रीत केले. यावेळी सरकार व राजकारणी मेळघाटात कुपोषणच नसल्याचे सांगत होते मात्र विविध प्रयोगाद्वारे मी व माझी पत्नी व सहकारी डॉक्टर्स यांच्या मदतीने कुपोषणावर मात केली. कुपोषणाचचे निर्मूलन करण्यासाठी विविध अडचणी व सरकारी धोरणांचा मुकाबला करावा लागला, असेही अनुभव त्यांनी मांडले. कार्यक्रमात कुपोषण व त्यावरील निर्मूलनाच्या उपायांविषयी माहिती दिली. यावेेळी स्वातंत्र्य सैनिक वसंत हुदलीकर, जयप्रकाश म्हात्रे, डॉ. अजिता शिंदे, सुशिला म्हात्रे, वासंती सोर, संजय दोबारे, लक्ष्मण जाधव, प्राचार्य विजय भट, शाहीर तुळसीदास, राहुल गवारे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाळीसगाव बसस्थानकाला खड्ड्यांचा विळखा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,चाळीसगाव

चार जि‌ल्ह्यांच्या सिमेवर असलेल्या चाळीसगाव आगाराचे उत्पन्न महिन्याकाठी लाखो रुपयांमध्ये येते. मात्र हे बसस्थानक अनेक समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांची कसरत पार करून बसस्थानकात पोहचलेल्या प्रवाशांना स्थानकातील खड्ड्यांनाही सामोरे जावे लागत आहे.

बस स्थानकाच्या अवारात मोठमोठ्ठे खड्डे पडल्याने प्रवशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून नुकत्याच झालेल्या पावसामुळे यात आणखीनच भर पडली आहे. काही दिवसांपुर्वी झालेल्या पावसामुळे सर्वत्र चिखल आणि घाण साचली होती. तसेच खड्ड्यांमुळे उडणाऱ्या धुळीने प्रवाशांना नाकाला रुमाल बांधून या घाणीतूनच मार्ग काढावा लागत आहे. बस स्थानकात असलेल्या खड्ड्यांमुळे अनेकदा वयोवृध्द प्रवाशी घसरून पडण्याचे प्रकार घडले आहेत. तर आजही लहान-मोठ्या अपघातांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे बसस्थानकातील परिसराचे डांबरीकरण त्वरीत करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे

बसस्थानकाच्या झालेल्या दुरावस्थेची लोकप्रतिनिधींनी योग्य ती दखल घेऊन प्रवाशांच्या सोईसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. निवडूण येण्याअगोदर त्यांनी बसस्थानकातील खड्ड्यांंमध्ये मुरूम टाकून आंदोलन केले होते. आता निवडून आल्यानंत त्या आंदोलनाची आठवण ठेऊन बस स्थानकाच्या पसिरातील डांबरीकरणासाठी निधी उपलब्द करून दयावा, अशी मागणी होत आहे.

शौचालयाची दुरवस्था

चाळीसगाव तालुका हा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. मोठा ग्रामीण परिसर या तालुक्याला जोडला आहे. रोज ये-जा करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. परंतु सुविधांच्या बाबतील चाळीसगाव आगार पिछाडीला आहे. स्वच्छता गृह व शौचालयाची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून अनेक प्रवासी परिसरात उघड्यावरच लघवी करीत असल्याचा चित्र पहावयास मिळते. नवीन अद्यावत असे स्वच्छतागृह उभारावे, अशी मागणी देखील प्रवाशांकडून होत आहे.

विविध संघटनांचे निवेदन

बस स्थानक परिसरात डांबरीकरण, महिलांच्या शौचालयांचे नवीन व अधिक युनिट बांधण्यात यावे, यासाठी विविध संघटनाव्दारे आगार व्यवस्थापक अरुण सिया यांना निवेदन देण्यात आले आहे. तरी देखील प्रशासनाला विषयाचे गांभीर्य कळत नसून डांबरीकरणासाठी कुठलेच प्रयत्न होत नसल्याची ओरड संघटनाकडून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनोग्राफी केंद्र धूळखात पडून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण उपजिल्हा रुग्णालयात गेल्या दोन वर्षांपासून सोनोग्राफी केंद्र बंद आहे. लाखो रुपये खर्च करून खरेदी करण्यात आलेले सोनोग्राफी मशीन धूळखात पडले आहे. सर्व आधुनिक साधनसामुग्री धूळखात पडून असतांना जिल्हा प्रशासनाला सोनोग्राफी तज्ञ का मिळत नाही, असा सवाल महिला रुग्ण उपस्थित करीत आहेत.

महिला रुग्णांची होणारी हेळसांड टाळण्यासाठी शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते पुढे सरसावले आहेत. रुग्णालयातील सोनोग्राफी केंद्र तातडीने सुरू करावे यासाठी शिवसेनच्या वतीने नायब तहसीलदार डी. आर. ठाकूर यांना निवेदन देण्यात आले. कळवणसारख्या आदिवासी भागात चांगले निष्णात वैद्यकीय अधिकारी नसल्याने आदिवासी महिलांना उपजिल्हा रूग्णालयाशिवाय पर्याय नसतो. पैशाची असलेली चणचण, पाचवीला पुजलेले अठरा विश्वे दारिद्र यामुळे या भागातील महिला सरकारी दवाखान्यातच येतात.

मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांपासून बंद असलेले सोनोग्राफी केंद्र पाहता येथे येणाऱ्या गर्भवती महिलांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यांना खाजगी दवाखान्यात सोनोग्राफी करावी लागत आहे. त्यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. लवकरात लवकर सोनोग्राफी केंद्र सुरू करावे व डॉक्टर उपलब्ध करून घ्यावा, अन्यथा शिवसेनेच्यावतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावगाड्याचा रंगू लागला प्रचार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

गावची ग्रामपंचायत अन् तिची पंचवार्षिक निवडणूक म्हणजे धमाल व बेरकी राजकारणासह तिरक्या चालीची कमाल.... गावचं मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या या गावोगावच्या गावगाड्याच्या रथांची रणधुमाळी सध्या सुरू झालेली आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासुन ते माघारीनंतर आता निवडणूक रिंगणात राहिलेल्या पॅनल व त्यांच्या उमेदवारांची प्रचाराची रणधुमाळी सध्या चांगलीच जोमात आली आहे. गावगाड्यातील या बहुरंगी-बहुढंगी राजकारणाचे पैलू येवला तालुक्यातही दिसत आहेत. २२ तारखेला होणाऱ्या तालुक्यातील या ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

येवला तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होतांना उमेदवारी अर्ज दाखल, छाननी व माघार या प्रक्रियेनंतर ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. आता उर्वरित ५४ ग्रामपंचायतींच्या एकूण ४१२ जागांसाठी ९८१ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे ठाकतांना गावोगावीचे राजकारण चांगलेच रंगात येवू लागले आहे. येवला तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ११ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध निवड झाली आहे, तर अनेक ग्रामपंचायतींच्या काही जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर पाच ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीपैकी दोन ठिकाणी बिनविरोध निवड झाली तर तीन ग्रामपंचायतीच्या तीन जागेसाठी अर्जच प्राप्त झालेले नाही, त्यामुळे त्या जागा रिक्तच ठरल्या आहे. आता ५४ ग्रामपंचायतीच्या ४१२ जागांसाठी ९८१ उमेदवार रिंगणात आहेत.

या ग्रामपंचायती बिनविरोध...

येवला तालुक्यातील सोमठाणदेश, कानडी, कुसमाडी, कोळम बुद्रुक, बोकटे, आडगाव रेपाळ, जळगाव नेऊर, देशमाने बुद्रुक, कातरणी, पुरणगाव, मुरमी आदी ११ ग्रामपंचायतीची पूर्णपणे बिनविरोध निवड झाली आहे. धामोडे येथे एका जागेसाठी निवडणूक होणार असून, बाकीच्या जागांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक होणार्‍या गावांमध्ये माघारी व चिन्ह वाटपानंतर कालपासूनच प्रचाराची धामधुम सुरू झाली असून, प्रत्यक्ष भेटीगाठीवर सर्वांनीच भर दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात बाबासाहेबांचा होता मुक्काम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे शहराचे स्वातंत्र्य काळात फार मोठे योगदान राहिले आहे. स्वातंत्र लढ्यातील काही देशभक्तांना जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. तर साने गुरूजी, विनोबा भावे यांच्यासह इतरांना देखील इंग्रजांनी धुळे कारागृहाच्या बराकीत डांबून ठेवले होते. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही धुळे शहरात कोर्टाच्या कामकाजासाइी सन १९३७ मध्ये शहरातील प्रेमसिंह तवंग नावाच्या वकिलांकडे खटला चालविण्यासाठी बोलविण्यात आले होते. त्यावेळी बाबासाहेबांनी दि. २९, ३० व ३१ जुलै १९३७ ला तीन

दिवस शहरातील मुबई आग्रा महामार्गालगत असलेल्या लळींग किल्ल्यावरील लांडोर बंगला येथे मुक्काम करीत शहराची माहिती घेतल्याची माहिती प्रा. डॉ. विलास चव्हाण यांनी दिली.

शहरातील अॅड. प्रेमसिंग तवंग यांच्या खटल्याच्या कामकाजाला मदत करण्यासाठी डॉ. आंबेडकर हे धुळे शहरात आले असता त्यांनी शहरातील विजयांनद चित्रमंदिरामध्ये जाहिर सभा घेऊन दलित जनतेला मार्गदर्शन देखील केले होते. असंख्य कार्यकर्त्यांसह लळींग किल्ल्यावर विश्वासू व लाडके सेवक पुनाजी लळींगकर यांना भेटायला गेले. त्यांच्या घरी भोजन करून डोंगरावरील लांडोर बंगल्यावर कार्यकर्त्यांशी भेटीगाठी करण्यात आल्या होत्या.

या तीन दिवसाच्या मुक्कामावेळी बाबासाहेबांनी कार्यकर्त्यांना, समाजाला आणि महिलांना उपदेश व मार्गदर्शन केले होते. त्याचप्रमाणे शहरातील गरूड वाचनालय आणि राजवाडे संशोधन मंडळाला भेट देऊन अभिप्राय दिल्याची नोंद आजही संग्रही आहे. त्याचप्रमाणे देवपूरातील काकासाहेब बर्वे यांच्या राजेंद्र छात्रालयाला देखील भेट दिली होती.

भीम गीतांचा कार्यक्रम

३१ जुलै १९३७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे धुळे शहरात तीन दिवशीय मुक्कामाला आले असता तेव्हापासून ते आजपर्यंत प्रत्येक वर्षाच्या ३१ जुलै रोजी लळींग किल्ल्यावरील लांडोर बंगला येथे भीम गीतांचा कार्यक्रम व दलित बांधवाचा मेळावा भरतो. त्यावेळी धुळे, नंदुरबार, जळगाव जिह्यातील दलित समाज बांधव मोठ्या संख्येने दाखल होतात. आजही बाबासाहेबांच्या आठवणी अविस्मरणीय आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारा तासांच्या अभ्यासाने बाबासाहेबांना अभिवादन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीत १८ ते २० तास अभ्यास करीत शिक्षणाचा आपला ध्यास पूर्ण केला आणि देशाची राज्यघटना लिहिण्याचा बहुमान संपादन केला. त्यांच्या या शिक्षणप्रेमाची अभिनव पद्धतीने दखल घेत मनमाड येथे सलग बारा तास अभ्यास करून डॉ. आंबेडकर यांच्यासह शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतीबा फुले आणि जाणता राजा छत्रपती शिवराय यांना वैचारिकरित्या आगळे वेगळे अभिवादन करण्यात आले.

मनमाडच्या झेवियर्स विद्यालयात सकाळी आठ ते रात्री आठ असे सलग बारा तास अभ्यास करून अभ्यासकानी सर्वांचे लक्ष तर वेधलेच, पण शिक्षणाचे महत्त्वही सर्वांना पटवून दिले. केंद्रीय रेल्वे इंजिनीअरिंग कारखान्यातील एससी, एसटी एम्प्लाइज असोसिएशन व बहुजन युवक संघ यांच्या वतीने झेवियर्स विद्यालयाच्या सौजन्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

अतिशय निष्ठेने आणि आवडीने विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी सलग १२ तास अभ्यास करीत बाबासाहेबांच्या शिक्षण प्रेमाला सलाम केला. त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला तसेच महात्मा फुले छत्रपती शिवराय यांनाही अभिवादन करीत आम्ही चालवू हा पुढे वारसा, अशा भावना व्यक्त केल्या. या आगळ्या उपक्रमाचा शुभारंभ मुख्याध्यापक फादर सैबी कोरिया यांच्या हस्ते झाले. हजारो मैलांचा प्रवास करण्यासाठी पहिले पाऊल खुप प्रेरणादायी असते, या शब्दांत त्यांनी अभ्यासकांच्या मनात उत्साह पेरला. या उपक्रमात सतीश केदारे, सागर साळवे, सचिन इंगळे, सुनील पवार आदिंनी भाग घेतला. डॉ. आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर हा सलग अभ्यासाचा कल्पक उपक्रम सर्वांची दाद घेऊन गेला.

बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतिकूलता असूनही शिक्षणाची कास सोडली नाही. शिक्षण प्रणेते महात्मा फुले यांचे विचार आणि छत्रपती शिवरायांचा आदर्श यातून त्यांनी आपल्या ध्येयधोरणांना दिशा दिली, म्हणून या महापुरुषांना अभिवादन करण्याचा हा वेगळा

प्रयत्न आम्ही केला. या उपक्रमास मिळालेला प्रतिसाद उत्साह वाढविणारा ठरला.

- सतीश केदारे, मनमाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळीमुळे मुरंबीतील शेतकऱ्यांची दैना!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गत दोन दिवसांपासून नाशिक शहर व जिल्हा परिसरात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने इगतपुरी तालुक्यातील मुरंबी आणि सांजेगाव परिसरातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

या परिसरात लागवड करण्यात आलेला भोपळा, काकडी, कारले, टोमॅटो, मिरची, गहू आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी शेतकरी वर्गासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. दोन दिवसांपासून या परिसरास सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले. मोठाल्या गारांमुळेही शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. लागवड करण्यात आलेल्या पिकांवर शेतकरी वर्गाचे दीर्घकालीन नियोजन अवलंबून आहे. नुकसानग्रस्त परिसराचे पंचनामे सुरू आहेत. सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुरेशी मदत उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उटीच्या वारीसाठी त्र्यंबकनगरी दुमदुमली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

शितला चंदनाचा लेप संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधीस लावून आज, बुधवारी उटीची वारी होणार आहे. त्र्यंबकेश्वर येथे पंरपरेने संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीस चैत्रात वरूथनी एकादशीस चंदनाचा लेप लावण्यात येतो. यास उटी लावणे असे संबोधले जाते.

चैत्र सरतो आणि वैशाख सुरू होतो या सीमारेषेवर उष्मा वाढलेला असतो. भगवान शंकराचे अवतार मानले जात असलेल्या संत निवृत्तीनाथांच्या संजिवन समाधीस या उष्म्याची दाहकता सुसह्य व्हावी म्हणून चंदनाचा लेप लावण्याचा प्रघात आहे. यासाठी या महिन्याच्या पंचमीपासून चंदनाचे खोड उगाळले जाते. महिला तसेच पुरूष भाविकही येथे ओव्या अभंग म्हणत चंदन उगळून पिंपभर चंदनाचा लेप म्हणजेच उटी तयार करतात. ही उटी दुपारी दोन वाजता समाधी मंदिर संस्थानचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, सचिव सुरेश गोसावीस, डॉ. राधाकृष्ण महाराज लहवीतकर, सौ खुळे ताई, निवृत्तीनाथ महाराज भजनी मंडळ जयंत गोसावी आदिंसह सर्व विश्वस्त आणि पुजारी सेवक, भाविक, वारकरी यांच्या उपस्थितीत उटी लावली जाणार आहे. त्यानंतर विधीवत पूजा करून रात्री ११ वाजता ही उटी उतरवण्यात येईल. भाविकांना प्रसाद म्हणून उटी वाटप करण्यात आले. यासाठी स्वतंत्र रांग लावली जाते.

दशमीपासून दाखल झालेले भाविक रात्री रांगेत उटी घेतात. या सोहळ्यासाठी शहरात वारकरी-भाविकांचा ओघ वाढला आहे. वारीच्या पूर्वसंध्येला संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर परिसर भजन कीर्तन, हरीनामाने दुमदुमत आहे. परिरात पेंडॉल टाकुन वारकरी टाळ-मृदुंगाच्या ठेक्यावर भजनात दंग झालेले दिसून येत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समित्यांच्या निवडणुका मे अखेरीस?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जळगाव

सहकार संस्थांच्या निवडणुकांनंतर जळगाव जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी २० ते २५ मेदरम्यान होण्याची शक्यता आहे. निबंधक कार्यालयाने मतदार याद्या तयार करण्याचे कामही सुरू केले असून, आठवडाभरात निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

जिल्ह्यात १२ बाजार समित्या आहेत. या समित्यांचा कार्यकाळ मेमध्ये संपणार असल्यामुळे सहकार संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर निवडणुका जाहीर केल्या जाण्याची दाट शक्यता आहे. जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांकडून हमाल मापाडी, पणन महासंघ व अडत व्यापाऱ्यांच्या मतदार याद्या निबंधक कार्यालयात जमा झाल्या आहेत, तसेच गटविकास अधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायत सदस्य व विकास सोसायटी सदस्यांच्या नावांच्या याद्या मागविण्यात आल्या आहेत. मात्र, या याद्या जमा करण्याचे काम सुरू असून, याद्यांची छाननी करून २५ एप्रिलपर्यंत त्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यानंतरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. साधारणत‌: २० ते २५ मे दरम्यान निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण मंडळाचा वाद संपता संपेना!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका शिक्षण मंडळाच्या वादग्रस्त प्रशासन अधिकारी किरण कुंवर यांच्या बदली नंतर वसुधा कुरणावळ यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यावर नगरसेवकांनी आक्षेप घेतला आहे. कुरणावळ या कुंवर यांच्यापेक्षाही वादग्रस्त असून त्यांच्याकडे प्रभार देवू नये अशी मागणी मनसेचे नगरसवेक संदीप लेनकर यांनी केली आहे. विशेष म्हणजे कुरणावळ यांचे अनेक प्रताप महासभेसमोर आले असतांनाही आयुक्तांनी त्यांच्याकडे सोपवलेल्या पदभारावर आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. कुरवणावळ यांच्याऐवजी चांगल्या अधिकाऱ्याकडे शिक्षण मंडळाचा कारभार द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

किरण कुंवर यांच्या जागेवर बदली होवून आलेले राजीव म्हसकर रूजू न झाल्याने आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सहाय्यक आयुक्त वसुधा कुरणावळ यांच्याकडे शिक्षण मंडळाचा तात्पुरता पदभार सोपवला आहे. कुरणावळ यांनीही या आधी प्रशासन अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यांच्या काळात अनेक वादग्रस्त निर्णय घेण्यात आले आहेत. आर. टी. ई. २००९ चे उल्लघंन, विविध स्पर्धा घोटाळे, एकतर्फी शिक्षक भरती घोटाळा, आदेश खाडाखोड घोटाळा, स्कॉलरशिप पुस्तक खरेदी प्रकरण, अशी विविध प्रकरणांमध्ये कुरणावळ यांची भूमिका संशयास्पद राहिली आहे. माकपच्या तानाजी जायभावे यांनी महासभेत लक्षवेधी मांडून कुरणावळ यांचे घोटाळे बाहेर काढले होते. त्यामुळे अशा वादग्रस्त अधिकाऱ्यांकडे पुन्हा पदभार देणे योग्य नसल्याचा दावा संदीप लेनकर यांनी केला आहे.

महासभेत लक्षवेधी मांडणार

शिक्षण मंडळाचा कारभार स्वच्छ व पारदर्शी अधिकाऱ्यांकडे देण्यात यावा; अन्यथा पुढील महासभेत लक्षवेधी मांडू असा इशारा नगरसेवक संदीप लेनकर यंनी दिला आहे. शिक्षण उपसंचालकांकडे चांगल्या अधिकाऱ्याची मागणी करण्यात यावी किंवा राजीव म्हसकर यांच्याकडे तत्काळ पदभार देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोटी रस्त्यावरही वाळूच्या वळूंवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इगतपुरी येथील निवासी नायब तहसीलदारांच्या पथकाने सिन्नर घोटी मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या चार वाहनांवर कारवाई केली. या पथकाला गुंगारा देऊन एक वाळू वाहतुकदार वाहनासह पसार झाला. उर्वरित चार वाहनांकडून सुमारे तीन लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मंगळवारी पहाटे चार ते सहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

'मटा'ने प्रसिध्द केलेल्या 'वाळूचे वळू' या वृत्त मालिकेची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: बागलाण, चांदवड येथे अवैध वाहतूक करणाऱ्या सहा वाहनांवर कारवाई केली. प्रांत, तहसिलदारांच्या कार्यक्षेत्रात जाऊन ही कारवाई करीत जिल्हाधिकाऱ्यांनी एकप्रकारे त्यांना चपराक लगावली. जिल्हाधिकारीच रस्त्यावर उतरल्याने महसूल विभागातील त्यांची सेनाही रस्त्यावर उतरली. नाशिकचे तहसीलदार गणेश राठोड यांनी नाशिक औरंगाबाद रस्त्यावर अशी सहा वाहने पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली होती. रविवार आणि सोमवारी जिल्हाभरात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत २३ वाहनांवर कारवाई करून लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मंगळवारी पहाटे इगतपुरी तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदारांनी टाकेद ते सिन्नर रस्त्यावर कारवाई करून बेकायदा वाळू वाहतूक करणारे एमएच १७ ए ३७१०, एमएच १५ इजी ६०८८, एमएच ०४ बी ९७११ या क्रमांकांचे ट्रक ताब्यात घेतले. तर एका ट्रकवरील क्रमांकात खाडाखोड करण्यात आल्याचे आढळून आले. निवासी नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर, सर्कल सुभाष गीते, तलाठी सागर पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

‍आम्ही पाच वाहने अडविली. त्यातून क्षमतेपेक्षा अधिक वाळू वाहतूक होत असल्याचे आढळून आले. ही वाहने तहसील कार्यालयात घेऊन जात असताना एक चालक गुंगारा देऊन वाहनासह पसार झाला. चार वाहनांकडून सुमारे तीन लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

- संघमित्रा बाविस्कर, निवासी नायब तहसीलदार इगतपुरी

महिला अधिकाऱ्याकडून प्रथम कारवाई

जिल्हा प्रशासनाने वाळू माफियांवर कारवाईचा बडगा उगारल्यापासून एखाद्या महिला अधिकाऱ्याने रस्त्यावर उतरून अशा प्रकारची बेधडक कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. कारवाईवेळी पथकाकडून गोपनियता पाळण्यात आली. तलाठी पाटील यांच्यावर पाथर्डी फाटा येथे झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असल्याने वाहने ताब्यात घेताच सर्वप्रथम वाहनचालकांचे मोबाईल काढून घेण्यात आले. त्यांनतर ही वाहने तहसील कार्यालयात नेण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२८०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात गेल्या चार दिवसांमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे २८०७ हेक्टरवरील पिकांची मोठी हानी झाली आहे. त्याचा फटका जिल्ह्यातील अडीच हजारांहून अधिक शेतकऱ्यांना बसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, मंगळवारी सलग पाचव्या दिवशीही जिल्ह्यासह शहरातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

अवकाळी पावसाने कहर सुरूच ठेवला असून त्याने शेतकऱ्यांचे जगणे नकोसे करून ठेवले आहे. जिल्ह्यात ९ एप्रिलपासून सलग पाचव्या दिवशीही अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. गारपीटीने पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी केली असून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ११ आणि १३ एप्रिल रोजी बेमोसमी पावसाने अक्षरश: जिल्हावासियांना झोपडून काढले आहे.

या दोन दिवसांत अनुक्रमे ११२३ आणि १००६ शेतकऱ्यांच्या पिकांची मोठी हानी केली आहे. या पाच दिवसांत २ हजार ८०७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून २ हजार ५१४ शेतकऱ्यांची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. नांदगाव, कळवण, मालेगाव, निफाड आणि बागलाण या तालूक्यांमध्ये पावसाने दाणादाण उडवून दिली. त्यामध्ये २२३ घरांचे नुकसान झाले असून एकजण वीज पडून ठार झाला. ६ मोठी तर १० लहान जनावरे आणि १५३ कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. याखेरीज एक पोल्ट्री फार्म आणि एका कांदा चाळीचे त्यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी दिवसभर जिल्ह्यातील काही भागात तसेच शहरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘क्रेडाई’तर्फे ७०० अधिकाऱ्यांना निवास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी नाशिक शहरात उपस्थित राहणाऱ्या सुमारे सातशे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था 'क्रेडाई' या संस्थेच्या वतीने करण्याचे आश्वासन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. 'क्रेडाई'च्या वतीने नवे पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेच्या वतीने जगन्नाथन यांना आश्वस्त करण्यात आले.

कुंभमेळ्याच्या दृष्टीने प्रशासनाच्या विविध विभागांची जय्यत तयारी सुरू आहे. या नियोजनासाठी शहरात मोठ्या संख्येने प्रशासकीय अधिकारीही उपस्थित राहणार आहे. या अधिकारी वर्गाच्या निवासासाठी 'क्रेडाई'ने सहकार्य करावे, अशी अपेक्षा नवनियुक्त पोलिस आयुक्तांनी केली होती. यावर अधिकारी वर्गाच्या निवासासह सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन संस्थेच्या वतीने देण्यात आले.

या बैठकीत कुंभमेळ्याच्या अनुषंगाने 'शहर विकास व कुंभमेळा २०१५' या विषयावर प्रामुख्याने चर्चा झाली. अधिकारी वर्गाच्या बरोबरच देशविदेशातून नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांच्या सहकार्यासाठीही 'क्रेडाई'च्या वतीने नियोजन करण्यात येत आहे. शहराचा डिजीटल नकाशाही 'क्रेडाई'च्या वतीने बनविण्यात आला. हा नकाशा पोलिस आयुक्त कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला. आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या वतीने वेळोवेळी चर्चासत्र आयोजित करण्यात येणार असून या माध्यमातून विविध आव्हानांवर तोडगा शोधला जाईल, अशी भूमिकाही पदाधिकाऱ्यांनी मांडली.

पोलिस आयुक्त जगन्नाथन यांचे स्वागत 'क्रेडाई'चे अध्यक्ष जयेश ठक्कर यांनी केले. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष किरण चव्हाण, नेमिचंद पोद्दार, सुरेश पाटील, सदाशिव शुक्ल, उपाध्यक्ष अभय तातेड, राजेंद्र ठक्कर, सचिव नरेश कारडा, खजिनदार सुनील कोतवाल, कमिटी सदस्य सुनील गवांदे आदी उपस्थित होते. मानद सचिव नरेश कारडा यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक समस्यांवर राज्यघटना रामबाण उपाय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय राज्यघटना सर्व सामाजिक समस्यांवरील रामबाण उपाय आहे. राज्यघटनेची व्यवस्थित अंमलबजावणी झाल्यास अनेक सामाजिक समस्या दूर होतील, असे प्रतिप्रादन राज्य सरकारच्या अनूसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक समितीचे सदस्य कायदेतज्ज्ञ अॅड. बी. के. मोरे यांनी केले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक समता सप्ताहाचा मंगळवारी समारोप झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर होते. यावेळी इंग्रजी भाषेचे अभ्यासक प्रा. एकनाथ सोनवणे, प्रादेशिक उपायुक्त काशिनाथ गवळे व सहाय्यक आयुक्त वंदना कोचुरे आदी उपस्थित होते.

बर्वे म्हणाले, की डॉ. आंबेडकरांनी बौध्द धर्माची दीक्षा केवळ देशात समानता, एकात्मता निर्माण व्हावी यासाठीच घेतली. सध्या देशात अनुसूचित जाती-जमातींच्या व्यक्तींवर अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विधवा सुनेचा पंचवटीत छळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

पतीच्या निधनानंतर सासू आणि सासऱ्यांनी शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी सासऱ्या विरोधात सुनेचा विनयभंग केल्याचा गुन्हा देखील दाखल केला आहे.

पीडीत महिलेच्या पतीचे ​१ ऑगस्ट २०१३ रोजी निधन झाले. पतीच्या निधनानंतर ती महिला सासरी राहते. पतीच्या निधनानंतर सासू, सासरे छळ करीत असल्याचे पीडीत महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. १२ मार्च रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास संशयित सासऱ्याने बाथरूमला जायचे आहे असे सांगून दरवाजा उघडून देण्यास सांगितले. पीडीत महिला दरवाजा उघडून देत असताना सासऱ्याने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तसेच या प्रकरणातील सासूही मानसिक व शारीरिक छळ करीत असल्याचे पीडीत महिलेची तक्रार आहे. त्यानुसार पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा प्रशासनाचे हरितकुंभसाठी पाऊल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळा पर्यावरणपूरक व्हावा यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. 'हरितकुंभ'बाबत जनजागृती करण्यासाठी राज्यस्तरीय ऑडिओ व व्हिडिओ जिंगल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला राज्यभरातून प्रतिसाद मिळेल, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे.

कुंभमेळा पर्यावरणपूरक व्हावा यासाठी प्रशासन विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे हा वैश्विक उत्सव असल्याने त्यात अधिकाधिक घटकांना सामावून घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. म्हणूनच जिंगल्स स्पर्धेच्या माध्यमातूनही हरितकुंभच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जिंगल्स ३० ते ६० सेकंदांची असणे आवश्यक आहे. प्लास्टिकमुक्ती, नदी प्रदूषण रोखण्यात नागरिकांचा सहभाग, पर्यावरण रक्षण या संकल्पनेवर आधारित जिंगल्स स्पर्धकांकडून मागविण्यात आल्या आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याला अनुरूप चित्रीकरण व संकल्पना असणे अपेक्षित आहे. जिंगल्स निर्माता सादर करणार असलेली कलाकृती ही त्याची मूळ कलाकृती असावी. तसे प्रतिज्ञापत्रही स्पर्धकाला सादर करावे लागणार आहे. स्पर्धकांच्या संकल्पनांचा उपयोग प्रशासनाकडून जनजागृतीसाठी केला जाणार आहे. पुरस्कारप्राप्त जिंगल्सचे प्रसारण विविध दृकश्राव्य माध्यमाद्वारे करण्याचे अधिकारही जिल्हा प्रशासन राखून ठेवणार आहे.

उ‌त्कृष्ट जिंगल्सला पुरस्कार

व्हिडिओ जिंगल्स स्पर्धेसाठी प्रथम पुरस्कार रुपये २५ हजार, द्वितीय रुपये २० हजार, तृतीय रुपये १५ हजार आणि उत्तेजनार्थ रुपये ५ हजाराची दोन पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. ऑडिओ जिंगल्स स्पर्धेसाठी प्रथम पुरस्कार रुपये २० हजार, द्वितीय रुपये १५ हजार तृतीय रुपये १० हजार आणि उत्तेजनार्थ रुपये ५ हजार अशी पारितोषिके दिली जाणार आहेत. इच्छुकांनी जिंगल्स प्रवेशिका सीडी/डीव्हीडी फॉर्मेटमध्ये जिल्हा माहिती अधिकारी, सारडा संकुल, तिसरा मजला, महात्मा गांधी रोड, नाशिक (दूरध्वनी क्रमांक - ०२५३/२५७८६८६) येथे ३० एप्रिलपर्यंत सादर कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दुर्बल घटकांसाठी सहकारी बँका वरदान’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजातील दुर्बल घटक, मध्यवर्गीय घटकांची आर्थिक उपलब्धतेची गरज भागविण्यासाठी नागरी सहकारी बँकांची कामगिरी महत्त्वाची असते. अशा बँकांनी पारदर्शी प्रशासन आणि जनहिताच्या माध्यमातून लोकजीवनाला आधार दिला आहे, असे निरीक्षण माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी मांडले.

विश्वास को ऑपरेटीव्ह बँकेला पवार यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पवार म्हणाले, की विश्वास बँकेने तळागाळातील घटकांचा विश्वास जपला आहे. सद्यस्थितीत बँकींग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धा सुरू आहे. काळानुसार बदल स्वीकारणाऱ्या आणि काळाच्या बरोबरीने चालणाऱ्या बँकाच नवी आव्हाने पेलू शकतील. अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी प्रशिक्षण, कार्यशाळांचे आयोजन हे बँकेच्या प्रगतीसाठी महत्वाचे आहे. सहकाराच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबित्वाची प्रयोगशील जाणीव सामान्य माणसांपर्यंत नेण्याचे महत्वाचे कार्य सहकारी बँकांनी केले आहे, या कार्यात विश्वास बँकेचा सहभागही उल्लेखनीय असल्याचा गौरवही पवार यांनी केला.

बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी स्वागत व प्रास्तविक केले. बँकेच्या दोन दशकांच्या कालावधीतील एकूणच वाटचालीची, आगामी उद्दिष्टांची माहिती पवार यांनी घेतली. यावेळी रेडिओ विश्वास कम्युनिटी रेडिओ, विश्वास ज्ञान प्रबोधिनी रिसर्च इसिन्स्टट्यूट, यशवंतराव चव्हाण ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय आदी उपक्रमांची माहिती यावेळी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून पवार यांना देण्यात आली. देशातील नागरी सहकारी बँकांची आर्थिक स्थिती, सहकारी बँकांसाठी असलेले कायदे, ग्रामीण बँकांची परिस्थिती आदी विषयांवर यावेळी पवार यांनी संवाद साधला.

यावेळी विनायकदादा पाटील, आमदार हेमंत टकले, बँकेचे उपाध्यक्ष विलास हावरे, मानद कार्यकारी संचालक अजित मोडक, जनसंपर्क संचालक मंगेश पंचाक्षरी, संचालक डॉ. सुभाष पवार, डॉ. चंद्रकांत संकलेचा, शशिकांत पारख, घन:श्याम येवला आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूररोडचा ‘लढा’ सोशल मीडियावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विकासकामांना अडथळा ठरणारी गंगापूर रोडवरील झाडे हटवावीत यासाठी गंगापूर रोड विकास कृती समितीने चळवळ हाती घेतली आहे. या चळवळीला व्यापक रूप देण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेण्यात येत असून फेसबुक पेजही सुरू करण्यात आले आहे.

गंगापूर रोडवर मधोमध असणारी झाडे धोकादायक ठरत असून त्यामूळे अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचा कृती समितीचा दावा आहे. सिंहस्थाच्या निमित्ताने गंगापूर रोडच्या विकासासाठी ४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. मात्र, वृक्षप्रेमींकडून टाकण्यात आलेल्या याचिकेमुळे न्यायालयाने नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील झाडे तोडण्यास मनाई केली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने रस्ता रुंदीकरण आणि तत्सम विकासकामे मार्गी लावण्यावर मर्यादा आल्या आहेत. रस्त्यालगत तसेच मधोमध असलेल्या झाडांमुळे येथे दुभाजकही बसू शकलेले नाहीत.

एकाच रस्त्यावरून गंगापूर आणि नाशिक अशा दोन्ही बाजूची वाहतूक होत असल्याने अपघातांनाही निमंत्रण मिळते आहे. विकासाची मागणी असलेल्या समविचारी नागरिकांनी एकत्रित येऊन गंगापूर रोड विकास कृती समिती स्थापन केली आहे. त्या माध्यमातून रविवारी मानवी साखळी आणि स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या चळवळीला व्यापक रूप देण्यासाठी दोन दिवसापूर्वी 'जीआरव्हीकेएस नाशिक' या नावाने फेसबुक पेज सुरू करण्यात आले आहे.

त्यावर गंगापूर रोडच्या विकासात अडथळा ठरणाऱ्या झाडांची छायाचित्रेही टाकण्यात आली आहेत. नागरिकांचा पाठींबा वाढावा आणि ही चळवळ पुढे घेऊन जाता यावी या उद्देशाने सोशल मीडियाची मदत घेण्यात येत असल्याचे समितीकडून सांगितले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियमित करदात्यांना अपघात विमा

$
0
0

नाशिक : नाशिक महापालिका हद्दीत नियमित घरपट्टी आणि पाणीपट्टी व स्लमचार्जेस भरणा करणाऱ्या करदात्यांना अपघात विमा देण्याचा निर्णय महापालिकेन घेतला आहे. गेल्या वर्षी या अपघात योजनेचा केवळ नऊच करदात्यांनी लाभ घेतला आहे.

नियमित करदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेन अपघात विमा योजना सुरू केली आहे. त्यात मार्च अखेरपर्यंत नियमित कराचा भरणा केल्यास करदात्यास ५० हजार रुपयांपर्यंतचा अपघात विमा संरक्षण दिला जातो. मात्र, सन २०१३-१४ या वर्षात नऊ अर्जदारांनीच या योजनेचा लाभ घेतला आहे. नागरिकांनी वेळेवर कर भरल्यास नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल. या अपघात विम्याचे जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images