Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

उपविधी मंजुरीसाठी 'आदर्श' सभा

$
0
0
केंद्रीय सहकार कायद्यातील ९७व्या घटनादुरुस्तीनुसार स्वीकारावयाच्या आदर्श उपविधीसाठी आयोजित करण्यात आलेली जिल्हा बँकेची विशेष सर्वसाधारण सभा शनिवारी वादळी ठरली.

कोल्हे खूनप्रकरणी दोन ताब्यात

$
0
0
हॉटेलात पार्टी करून घरी परतणा-या सुनील हरिभाऊ कोल्हे (४५) यांचा रस्त्यात गाठून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून अन्य तीन आरोपी फरार आहेत.

पिपाडांना दोन दिवसांची कोठडी

$
0
0
पेठरोडवरील तवली फाटा येथील जय आनंद अनाथ बालकाश्रमामधील मुलींचे शोषण केल्याप्रकरणी मुख्य विश्वस्त लालचंद पिपाडा यांना कोर्टाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणात अटक झालेल्या संशयितांची संख्या आता पाच झाली आहे.

रंगांनीच फुलविले त्यांचे जीवन!

$
0
0
नेहमीच स्वत:ची ओळख लपविणारे... आपल्या अस्तित्वाची चाहूलही न लागू देण्याची काळजी घेणारे आणि समाजापासून तोंड लपवित फिरणारे एचआयव्ही बाधित... दुसरीकडे मात्र मनसोक्तपणे बागडणारे... समाजाची तमा न बाळगता समूहाने उत्सव साजरा करणारे एचआयव्ही बाधित!

पंचायत समित्यांचे रूप पालटणार

$
0
0
नाशिकसह जिल्ह्यातील चांदवड, पेठ, सुरगाणा व सटाणा पंचायत समितींना लवकरच नवीन प्रशासकीय इमारत मिळणार आहे. आमदार जयंत जाधव यांनी या पंचायत समितींच्या इमारती जुन्या असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.

५० दिवसांनंतर एकदा पाणीपुरठा

$
0
0
नळाला पाणी आले की घरातील ड्रम, हौद, बादल्या भरून झाल्यानंतर ग्लास, वाट्या, बाटल्यासह सर्व भांडी भरून घेणारे मनमाडकर बघितले की, पाण्याचे महत्त्व आपोआप कळते. या शहरात पाणीटंचाईची दाहकता इतकी आहे की, नळाला जेव्हा पाणी येते तेव्हा ते जास्तीत जास्त साठवून ठेवण्यासाठी काय काय केले जाते हे बघून कुणीही चकीत होईल!

'समृध्द अडगळ' हटणार कधी?

$
0
0
अडगळ कितीही समृध्द असली तरीही कधीतरी ती काढावीच लागते कारण त्याला पर्याय नसतो. ना‌शिक शहरातील पंचवटी परिसरात सध्या अशीच अडगळ साचली असून त्यामुळे रहिवाशांना जीवितहानीचा धोका आहे.

पुन्हा पंचवटी उशीरा...

$
0
0
लेटलतिफीचा शिक्का बसलेल्या पंचवटी एक्सप्रेसने पुन्हा डोकेवर काढले आहे. सोमवारी सकाळी सात वाजता निघणारी पंचवटी एक्सप्रेस नाशिकरोड स्टोशनवरून सोमवारी तब्बल २० मिनिटे उशीरा निघाल्याने तिला मुंबईला पोहचायला पावणेबारा वाजले.

दुष्काळाच्या छायेत रंगपंचमी

$
0
0
राज्यभरात धुळवडीच्या दिवशीच रंगांचे धूमशान घालण्याची परंपरा असताना नाशिकरोडमध्ये मात्र रंगपंचमी पारंपरिक पद्धतीने उत्साहाने साजरी झाली. या वर्षीच्या रंगपंचमीला दुष्काळाची झालर होती.

मंत्रभूमीची ओळख कायम

$
0
0
विकासाच्या वाटेवर वेगाने धाव घेणाऱ्या नाशिकने मंत्रभूमी ही आपली ओळख आजही तितकीच आत्मियतेने जपली आहे. त्यामुळेच इंजिनीअर्स, आर्किटेक्ट्स, डॉक्टर्स घडविणाऱ्या नाशिकने वेदाचे शास्त्रोक्त शिक्षण घेतलेले विद्यार्थी घडविण्याची जबाबदारीही गेल्या ३२ वर्षांपासून पेलली आहे.

रेंजवर लकलुकताहेत ऑटिझमचे 'तारे'!

$
0
0
'तारे जमीन पर' मधून मुलांमधील स्व-मग्नता (ऑटिझम) हा आजार पहिल्यांदाच प्रकाशात आला. त्यानिमित्ताने अत्यंत लाजणारी, डोळ्यात डोळे घालून न बोलणारी अथवा स्वत:तच मग्न होऊन खेळत रहाणारी मुले सर्वांच्या समोर आली.

टोलदर कपातीच्या 'ट्रॅकवर'

$
0
0
रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीच्या एकूण खर्चापेक्षा कित्येक पटीने टोल वसुली होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर आता 'व्हीव्हीआयपी' कोट्यातील सवलतीच्या बहाण्यानेही सर्वसामान्यांकडून टोलची लूट केली जात आहे.

पाण्यासाठी सरपंचांना कोंडले

$
0
0
टँकरचे पाणी पुरेसे मिळत नसल्याने संतप्त महिलांनी बागलाण तालुक्यातील पिंपळदर येथील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना घरात डांबून ठेवल्याची घटना रविवारी घडली. तालुका बीडीओंनी दोन दिवसांत दोनऐवजी चार टँकर देण्याचे आश्वासन दिल्यानंतर अखेर पदाधिकाऱ्यांची सुटका झाली.

वसुलीचा पत्ता

$
0
0
मार्च एण्ड असल्याने सगळीकडेच धावपळ सुरु होती. खासकरुन ज्या बँकांनी किंवा सहकारी संस्थांनी कर्ज दिले आहे त्यांना तर जाम टेन्शन आले होते. थकलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी भरारी पथके, वसुली पथके सक्रीय झाली होती.

रेल परिषदेतर्फे दुष्काळग्रस्तांना मदत

$
0
0
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी रेल परिषदेने खारीचा वाटा उचलण्याचा निर्णय घेत ५१ हजाराचा धनादेश मुख्यमंत्री निधीसाठी दिला आहे. दुष्काळग्रस्तांसाठी दोन लाख रूपयांची मदत दिली जाणार असल्याचेही यावेळी जाहिर करण्यात आले.

दुष्काळाच्या छायेत रंगपंचमी

$
0
0
राज्यभरात धुळवडीच्या दिवशीच रंगांचे धूमशान घालण्याची परंपरा असताना नाशिकरोडमध्ये मात्र रंगपंचमी पारंपरिक पद्धतीने उत्साहाने साजरी झाली. या वर्षीच्या रंगपंचमीला दुष्काळाची झालर होती. त्यामुळे काही ठिकाणी कोरडी तर काही ठिकाणी पाण्याचा वापर करीत एकमेकांना रंग लावण्यात आले.

'मेरी'च्या अहवालाअभावी प्रकल्पदुरुस्ती लांबली

$
0
0
कळवण तालुक्यातील ओतूर लघु पाटबंधारे प्रकल्पाची गळती थांबविण्यासाठी सरकारने सात कोटी १२ लाख रुपये मंजूर करूनही या दुरुस्तीच्या कामाची निविदा प्रक्रिया लांबली आहे.

एसटीला लागले चैत्रोत्सवाचे वेध

$
0
0
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्या पीठाचं महत्त्वं असलेल्या सप्तश्रुंग देवी गडावर भरणाऱ्या चैत्रोत्सवासाठी एसटीच्या नाशिक विभागीय कार्यालयाने १९ ते २५ एप्रिलदरम्यान ३३५ जादा बसेसचे नियोजन केले आहे.

शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा

$
0
0
देवळाली गावातील शिवसेना शाखेतर्फे शिवजयंतीच्या दिवशी रात्री दहा नंतरही मिरवणूक ठेवली व कर्णकर्कश आवाजात डिजे लावल्या म्हणून प्रकरणी सार्वजनिक शांततेचा भंग केला म्हणून पोलिसांनी मंडळाच्या पदाधिका-यांवर गुन्हा दाखल केला आहे.

कालिदासमध्ये हवे दत्ता भटांचे तैलचित्र

$
0
0
एकेकाळी मराठी व्यावसायिक रंगभूमी गाजविलेले नाशिकचे ज्येष्ठ नाट्य, चित्रपट कलावंत दत्ता भट यांचे तैलचित्र कालिदास कलामंदिरात लावावे अशी मागणी ज्येष्ठ रंगकर्मी करीत आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images