Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

उघडे DP, मृत्यूचा धोका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

जुने नाशिक परिसरात उच्च विद्युत दाब असलेल्या उघड्यावरील अनेक डीपी मृत्यूचा सापळा ठरत आहेत. या धोकादायक डीपींना स्पर्श होऊन अनेकांचा बळी गेल्यानंतर महावितरण कंपनी प्रशासन जागे झालेले नाही. या डीपींना संरक्षक जाळ्या कधी बसविल्या जाणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

खडकाळी परिसरातील गैबनशहा नगर येथे नागरी वस्तीत उच्च विद्युत दाबाची डीपी आहे. मात्र, झाकण नसलेली ही उघडी डीपी जमिनीपासून अगदी तीन फुटावर आहे. तिला कोणाचाही सहज स्पर्श होऊ शकतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. गंजमाळ बसस्थानक येथेही उघड्यावरील डीपीला जवळच लहान मुले खेळतात. यामुळे वीज महावितरण कंपनीने संरक्षक जाळी बसविण्याची मागणी वारंवार त्रस्त नागरिकांनी वेळोवेळी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जुने नाशिक परिसरातील वडाळानाका येथे तर अनेक वर्षांपासून उच्च दाबाच्या डिपी आहेत. या डीपींना संरक्षक जाळ्या बसविण्यात टाळाटाळ होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

नागजी परिसर व वडाळारोडवरही उघड्यावर अनेक डीपी नागरिकांच्या जिवितास धोकादायक ठरत आहे. शालिमारपासून जवळच असलेल्या नेहरू उद्यानालगत शाळा आहे. या शाळेजवळच उघडी डीपी आहे. याशिवाय जुने नाशिक परिसरातील अनेक भागात कोणतेही सरंक्षक जाळ्या व झाकण नसलेल्या उघड्यावरील डीपी आहेत.

कधी जागणार महावितरण प्रशासन?

डीपीला चिकटून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यावर महावितरण कंपनीचे अभियंते, अधिकारी घटनास्थळी अवतरतात. लवकरच संरक्षक जाळी लावू, असे ठरलेले आश्वासने देऊन गायबच होतात. काही महिन्यांपूर्वीच बडी दरगाह शरीफ येथे आठ वर्षीय मुलाचा उघड्यावर असलेल्या डीपीला स्पर्श झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही महावितरण कंपनीला जाग आलेली नाही. अजून किती लोकांचा जीव गेल्यानंतर प्रशासन संरक्षक जाळ्या बसविणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

BSNL संपावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारत दूरसंचार निगम लिमिटेडच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या १९ संघटनांनी एकत्र येऊन विविध मागण्यांसंदर्भात दोन दिवसीय संपाला मंगळवारी प्रारंभ केला. या संपामुळे ऐन अक्षय तृतीयेच्या दिवशी ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

ग्रामीण भागातील सेवांचा तोटा भरून काढणे, बीएसएनएलच्या सेवा सुधारण्यासाठी विकास करण्यासाठी नवीन यंत्रसामग्री खरेदी करणे, स्पेक्ट्रम वापराचे सर्वाधिकार मिळणे, नवीन अधिकारी कर्मचाऱ्यांची भरती करणे आदी मागण्यांसाठी बीएसएनएलच्या विविध कर्मचारी संघटनांनी दोन दिवसीय संपाची हाक दिली. त्यानुसार मंगळवारी त्यास प्रारंभ झाला. त्यामुळे बीएसएनएलच्या सर्व कार्यालयांमध्ये शूकशूकाट होता. संपात नाशिकचे पदाधिकारी जी. एन. वाघ, एम. बी. सांगळे, एस. ए. भदाणे, ए. आर. आखाडे, बी. डी. गायकर आदींसह सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले. या देशव्यापी संपामु‍ळे मात्र ग्राहकांचे हाल झाले. केंद्र सरकार नेहमीच बीएसएनएलच्या विरोधात निर्णय घेत असल्यामुळे कंपनी तोट्यात चालल्याचा आरोप संघटनांनी यावेळी केला.

इतर सेवांपुढे बीएसएनएलला दुय्यम महत्व मिळत असल्यामुळे कंपनीचे ग्राहक झपाट्याने घटत आहेत. कंपनीकडून चालविली जाणारी इंटरनेट सुविधाही रडत खडत सुरू असल्यामुळे त्रस्त ग्राहक वारंवार कार्यालयात फोन करून तक्रारी करत असतात. मंगळवारपासून कार्यालयात कर्मचारीच नसल्यामुळे या तक्रारींची दखल घ्यायला कोणीच नव्हते. त्यामुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. तर, मोबाइल रिचार्ज करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना रिकाम्या हाती परतावे लागले. बुधवारीही हा संप सुरु राहणार असल्याचे संघटनांनी सांगितले आहे. त्यामुळे बुधवारीही ग्राहकांची गैरसोय होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामीण भागात ‘बहुरूपी’ रंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एकीकडे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांप्रमाणेच ग्रामपंचायत निवडणुकाही हायटेक होत असून, व्हॉट्स अॅप आणि फेसबुकवरही प्रचाराची रणधुमाळी पहावयास मिळाली. मात्र, याच ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रचारात बहुरुप्यांनीही रंग भरले असून, त्यांनी मतदारांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा खाली बसला आहे. सोशल मीडिया खेडोपाड्यांतील वाड्या वस्त्यांवर पोहोचल्याने उमेदवारांनी त्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच ग्रामपंचायत निवडणुकीतही यंदा व्हॉटस् अॅप आणि फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. उमेदवारांचे पॅनल, त्यांची नावे, छायाचित्र तसेच त्यांची मा‌हिती देखील छोट्या चित्रफितींच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचविण्यात आली. एकीकडे अशा आधुनिक मार्गाने प्रचार केला जात असताना काही उमेदवारांनी प्रचाराचा पारंपरिक मार्ग अवलंबण्यास पसंती दिली. हावभाव, नकला आणि बढायांद्वारे मतदारांचे मनोरंजन करणाऱ्या बहुरुप्यांची प्रचारात मदत घेण्यात आली. उमेदवाराची थोरवी गाण्याचे काम या बहुरूप्यांनी केले. गावातील गल्ली बोळांमध्ये फिरून त्यांनी उमेदवारांचा प्रचार केला. प्रतिस्पर्धी उमेदवाराची आपल्या वाकचातुर्याद्वारे फिरकी घेतानाच मतदानाचा हक्क अवश्य बजावा, अशा आग्रहाद्वारे त्यांनी मतदानाबाबत जनजागृतीचेही काम केले. या निवडणुकीवरही सोशल मीडियाचा प्रभाव असला तरी बहुरूप्यांनी आपले वेगळे अस्तित्व जपल्याने प्रचाराची रंगत अधिक वाढल्याची चर्चा ग्रामीण भागात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५०२ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्रामपंचायतींसाठी भवितव्य आजमावणाऱ्या जिल्ह्यातील हजारो उमेदवारांचे भवितव्य आज मतदान पेट्यांमध्ये बंद होणार आहे. गेल्या महिनाभरात उठलेला प्रचाराचा धुराळा खाली बसला असून, आज (बुधवारी) जिल्ह्यातील ५०२ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे.

जिल्ह्यात यंदा ४८७ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक तर १५ ग्रामपंचायतींसाठी पोट निवडणूक होत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून, कुठल्याही मतदान केंद्रावर अनूचित प्रकार घडू नये यासाठी ग्रामीण पोलिसांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. जिल्ह्यात तब्बल १६५६ केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविली जाणार असून त्यासाठी १८२९ बॅलेट युनिट तसेच कंट्रोल युनिट मतदान केंद्रांवर पोहोचविण्यात आले आहे. ही सर्व निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलिसांव्यतिरिक्त जिल्हा प्रशासनाने साडेआठ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. १८२९ बॅलेट आणि कंट्रोल युनिटचा वापर निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी केला जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर पाच कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

तहसीलदार आणि संबंधित पोलिस स्टेशनच्या निरीक्षकांनी दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील १०४ ग्रामपंचायती संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तेथे अनूचित प्रकार घडण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांकडून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त पुरविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे.

नोटाचाही पर्याय उपलब्ध

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही मतदार नोटा या पर्यायाचा अवलंब करू शकणार आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ न देता मतदारांनी निर्भय वातावरणात मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यात १० तालुके असे आहेत जेथे बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका घेण्यात येत आहेत. उमेदवार आणि ग्रामस्थांनी खिलाडूवृत्तीने या निवडणुकीकडे पहावे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न देता लोकशाहीचा सन्मान राखावा. - संजय मोहिते, पोलिस अधीक्षक

कडेकोट पोलिस बंदोबस्त

जिल्ह्यातील या निवडणुकांदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तो हाताळता यावा यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तब्बल अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तावर असणार आहे. त्यामध्ये पोलिस अधीक्षकांसह दोन अप्‍पर अधीक्षक, आठ उपअधीक्षक, ४३ पोलिस निरीक्षक, १३५ सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक, २२६५ पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे. याखेरीज एक एसआरएफची तुकडी, १४५० होमगार्डस, ३०० पोलिस कर्मचारी, दोन उपअधीक्षक, दोन पोलिस निरीक्षक असा अतिरिक्त फौजफाटा बंदोबस्तासाठी मागविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

MIDC ची झोळी रितीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या तिजोरीत सुमारे ऐंशी टक्के कररूपी रक्कम अर्पण करूनही मुलभूत सुविधांसाठी उद्योग वर्तुळाला पालिकेच्या तोंडाकडे बघावे लागते आहे. परिणामी आश्वासनांचा उंबरठा ओलांडू न शकणाऱ्या नाकर्त्या प्रशासनाच्या नावाने उद्योग वर्तुळाने मंगळवारी बोटे मोडली. या परिसरातील दीर्घ काळापासून प्रलंबित फायर स्टेशन आणि कंपाऊंड शिवाय असलेले मोकळ्या भूखंडांचा प्रश्न पुन्हा प्रकाशझोतात आला आहे.

महापालिकेस मिळणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी सुमारेऐंशी टक्के कर हा इंडस्ट्रितून दिला जात असल्याचा औद्योगिक संघटनांचा दावा आहे. यानंतर वीज, पाणी, रस्ते, स्पीड ब्रेकर्स, मोकळ्या भूखंडांवरील अतिक्रमणे, फायर स्टेशन्स यासारख्या मुलभूत सुविधांपासून या औद्योगिक वसाहती वंचित आहेत. 'महा' पालिकेच्या दरबारी 'किरकोळ' मागण्यांसाठी वारंवार खेट्या घालणाऱ्या उद्योजकांच्या वाट्याला आतापर्यंत उपेक्षाच आली आहे.

'झूम' मध्येही गाजले होते मोकळे भूखंड

उद्योगांचे प्रश्न सोडविण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या 'झूम' (महा उद्योग मित्र) च्या बैठकीला तब्बल सात महिन्यांनंतर नुकताच मुहूर्त लागला होता. अर्धवट उरकण्यात आलेल्या या बैठकीत एमआयडीसी अंबड परिसरात फायर स्टेशन सुरू होईपर्यंत फायर ब्रिगेडच्या दोन गाड्या पुरविण्याचे आश्वासन खुद्द जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिले होते. पण, हे आश्वासनही 'बोलाचाच भात' ठरले अन् मंगळवारी घटनास्थळी फायर ब्रिगेडची गाडी अर्ध्या तासाने पोहचली. या परिसरासाठी अग्निशमन केंद्राच्या कामाचा प्रस्ताव मंजूर आहे. मात्र, निविदेला अद्याप मंजुरी नाही. मोकळ्या भूखंडांवरील अतिक्रमण आणि येथे होणारा कचऱ्याच्या प्रादुर्भावाचा मुद्दाही उद्योजकांनी झूमच्या बैठकीत उचलून धरला होता. यावरही त्यांना तेथे वृक्षारोपणाचे आश्वासन देण्यात आले. लवकरच कंपाऊंड उभारण्याचेही आश्वासन देण्यात आले होते. मात्र, बैठकीच्या सोपस्कारांनंतर या आश्वासनांकडे प्रशासनाने सर्रास पाठ फिरविल्याने आयमा व निमा या संघटनांच्या वतीने अध्यक्ष विवेक पाटील व रवी वर्मा यांसह उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासन या समस्यांकडे लक्ष पुरवित नसल्याने या घटनांना निमित्त होत असल्याचा आरोपही या संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे.

.. अन् बचावले ट्रान्सफॉर्मर

मंगळवारी एमआयडीसीच्या सेक्टर डी मध्ये घडलेली घटना ही भरदुपारच्या सुमाराला घडली. त्यामुळे आगीचे स्वरूप त्वरित समजून आग विझविणे शक्य झाले. मोकळ्या भूखंडावरील कचऱ्याला आग लागल्याने हानी झाली नसली तरीही नजीकचे इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफॉर्मर थोडक्यात बचावले. अन्यथा दुर्घटनेत भर पडली असती. सुदैवाने ही आग मोकळ्या भूखंडाच्या परिसरात होती. नजीकच एखादी इंडस्ट्री असती तर या आगीने महाकाय रूप धारण केले असते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

डोळ्यांवर झापड

औद्योगिकदृष्ट्या मुंबई-पुणे अन् नाशिकच्या सुवर्ण त्रिकोणाच्या गप्पा ठोकणारे महापालिका अन् एमआयडीसी प्रशासन मात्र उद्योजकांच्या प्राथमिक गरजाही पुरवू शकत नाही, हे चित्र या घटनांमुळे उघड होते आहे. औद्योगिक वसाहतींच्या मागण्या पुरविताना स्वत: दायित्व न स्वीकारता केवळ एकमेकांकडे बोट दाखविण्यात प्रशासकीय विभाग धन्यता मानत असल्याचे उद्योजकांचे अनुभव आहेत. कागदी घोडे नाचवित आश्वासनांचे उंबरठेही न ओलांडणाऱ्या प्रशासनाने या समस्यांप्रती डोळ्यांवर कातडे ओढले आहे, अशा संतप्त प्रतिक्रियाही या औद्योगिक वसाहतींमधून व्यक्त होत आहेत. महापालिका किंवा एमआयडीसी विभागाच्या अधिकाऱ्यांना या वसाहतींची माहितीच नसल्याच्या मुद्द्यावरही उद्योग वर्तुळाने बोट ठेवले. डोळ्यांवर कातडे ओढून बसलेले प्रशासन कारवाईसाठी मोठ्या दुर्घटनांची वाट बघते आहे काय? असा सवालही उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयडीसीत आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उद्योजकांच्या वारंवारच्या मागणीनंतरही रखडलेले फायर स्टेशन्स अन् एमआयडीसीतील मोकळ्या भूखंडांवरील 'मुक्त' वावर, याच्या परिणामी भडकलेल्या आगीने मंगळवारी धोक्याची घंटा वाजवली. एक्स्लो प्लॉईंटनजीकच्या मोकळ्या भूखंडावर घडलेल्या या घटनेने मोठी हानी झाली नसली तरीही या परिसरातील मोकळे भूखंड अन् प्रलंबित फायर स्टेशन्सचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यंत्रसामुग्री अन् कारखान्यांच्या पूजनात मग्न असलेल्या उद्योगवर्तुळाचे लक्ष डी सेक्टरमध्ये लागलेल्या आगीकडे वेधले गेले. एक्स्लो प्लॉईंटनजीक मोकळा भूखंड आहे. या भूखंडाचा उपयोग परिसरातून कचरा टाकण्यासाठी होतो. मंगळवारच्या सुमाराला या भूखंडावर फायबरचे टाकाऊ तुकड्यांचे ढीग टाकून देण्यात आले होते. ज्वलनशील असलेल्या या तुकड्यांनी अचानक पेट घेतला अन् आगीच्या ज्वाला भडकल्या. सुमारे अर्ध्या तासाने फायरब्रिगेडची गाडी पोहचली. आग दीड तासाने आटोक्यात आली. या भूखंडावर वृक्षारोपण केलेली झाडे जळून खाक झाली. धुराचे लोळ दिसताच आयमाचे अध्यक्ष विवेक पाटील, राजेंद्र आहेर यांनी फायर ब्रिगेडला संपर्क केल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जातीयता देशासाठी घातक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आज विविध समाजातील जातींचे समूह वाढत असून, ते आणखी कट्टरवादी होऊन राजकीय पोळी भाजून घेत आहेत. त्यामुळे जातीयता आणखी घट्ट होऊ पहात आहेत. देशहितासाठी ही बाब धोकादायक असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.

गंगापूररोड येथील रावसाहेब थोरात सभागृहात वीरशैव ककय्या डोहार समाजाच्या वतीने सस्नेह मेळावा, गुणवंताचा सत्कार व वधू-वर मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिंदे म्हणाले की, चर्मकार-डोहार समाजाच्या पाचवीला दरिद्रता पूजलेली आहे. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले 'शिका, संघटित व्हा व संघर्ष करा' हा एकच मार्ग आहे. रडत बसू नका तर त्यावर मार्ग काढा, मनात जिद्द ठेवा. डोहार समाजाने कधीही कुणाकडे मदतीसाठी हात पसरले नाही. हा समाज घाणीत काम करून हातात रापी घेऊन कष्टाने जनावरांची कातडी कमवण्याचे काम केले. परंतु, आज हे पारंपारिक काम बंद करून तरुणांनी शिक्षणाचा मार्ग धरला पाहिजे. तरच समाज खऱ्या अर्थाने पुढे जाईल. समाजाने जुन्या चालीरिती बंद करायला हव्या. कर्ज काढून लग्न करण्याची प्रथा बंद करायला पाहिजे. समाजात सामुदायिक विवाह होणे गरजेचे झाले आहे, असे त्यांनी सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप उपस्थित होते. यावेळी परशुराम इंगोले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात डोहार समाजाच्या सिडीचे प्रकाशन करण्यात आले. संतोष बोराडे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. यावेळी ज्या दाम्पत्यांच्या विवाहाला ५० वर्षे पूर्ण झाली त्यांचा सत्कार केला.

रोटी-बेटी व्यवहार व्हावा

माजी मंत्री व चर्मकार महासंघाचे अध्यक्ष घोलप म्हणाले की, चर्मकार समाजातील चांभार व डोहार हे समाज नाण्याच्या दोन बाजू आहे. पूर्वी समाजात चर्मकारांना हिन दर्जाची वागणूक मिळत होती. त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असून चांभार, डोहार यांनी रोटी-बेटी व्यवहार सुरू करायला पाहिजेत. आज राष्ट्रीय पातळीवर चर्मकार समाजाने एकत्र येवून आपली ताकद दाखवायला पाहिजे. विधानसभेत १५ आमदार चर्मकार समाजातले आहे. मात्र, काही जण अजूनही वेगळ्या चुली मांडून आपला डाव साधत आहेत. मंडळांनी वधू-वर मेळाव्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त विवाह घडवून आणले पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोरीत 'महसूल' आघाडीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक विभागात लाचखोरीत महसूल विभाग आघाडीवर असून, सर्वाधिक सापळे जळगाव जिल्ह्यात रचण्यात आले आहेत. जानेवारीपासून एप्रिल महिन्यापर्यंत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तब्बल ५० केसेस दाखल केल्या आहेत. यात एका अपसंपदेच्या गुन्ह्याचाही समावेश आहे. २०१४ च्या तुलनेत केसेसच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाली आहे.

दाखल झालेल्या गुन्ह्यात नाशिक विभागातील पाच क्लास वन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याबरोबर, वर्ग दोनमधील सहा, वर्गतीन मधील ४३ तर वर्ग चारमधील दोन कर्मचाऱ्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली. विभागातील जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १६ गुन्हे दाखल झाले आहेत. यापाठोपाठ नाशिक (१३), अहमदनगर (८), धुळे (७) आणि नंदुरबारचा (५) नंबर लागतो. जळगाव जिल्ह्यात अपसंपदेचा एक गुन्हा देखील दाखल आहे. जनजागृती हे मुख्य कारण आहे. नागरिकांच्या तक्रारी वाढल्या की सापळ्यांची संख्याही त्या प्रमाणात वाढते, असा दावा एसीबीच्या अधिकाऱ्यांनी केला.

याबाबत अधिक माहिती देताना विभागाचे पोलिस अधिक्षक प्रवीण पवार यांनी सांगितले की, एसीबीकडून सोशल मीडिया, मोबाइल अॅप्लिकेशनचा वापर होत आहे. हेल्पलाइन नंबरमुळे नागरिकांना तक्रार करणे सोपे झाले असून, जनजागृतीमुळे तक्रारींचे प्रमाण वाढत आहे. लाचखोरीच्या गुन्ह्यात सर्वाधिक महसूल विभागाचे कर्मचारी अडकले असून, त्याखालोखाल पोलिस आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा क्रमांक लागतो.

दरम्यान, सध्या एसीबीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या उघड व गुप्त चौकशा सुरू आहेत. एसीबीचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी लाचखोरांविरोधात आघाडी उघडली असून, ते वैयक्तिक स्वरूपात सर्व माहिती व्हॉटस अपच्या माध्यमातून घेत असतात.

विभाग सापळ्यांची संख्या

महसूल ९

पोलिस ७

जिल्हा परिषद ५

पंचायत समिती ४

एमएसईडीसीएल ३

भूमी सर्व्हेक्षण ३

महापालिका २

आदिवासी विकास २

कारागृह २

आरोग्य २

सार्वजनिक बांधकाम खाते १

कामगार कार्यालय १

न्याय विभाग १

कृषी विभाग १

रजिस्ट्रार कार्यालय १

जीवन प्रा​धिकरण १

शिक्षण १

एमआयडीसी १

इतर ३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाईट वॉचमनच्या कुंचल्यात रंगांचे आविष्कार!

$
0
0

विजय महाले, न‌ाशिक

गुरूविना विद्या अवगत करणारे रामायणातील एकलव्य सुपरिचित आहे. असाच एक एकलव्य शहरातील एका नाईट कॉलेजमध्ये वॉचमन म्हणून काम करतोय. मात्र, त्याच्या हातात धनुष्यबाण नव्हे तर रंग उधळणारा कुंचला आहे. रंगांच्या या दुनियेत रमणाऱ्या या कलावेड्या अवधेससिंह या युवकाने रंगाच्या आविष्कारातून आपल्या जीवनात प्रचंड इच्छाशक्ती अन् आशेची पेरणी केली आहे; मात्र त्याला आधार हवाय समाजाच्या साथीचा अन् लढ म्हणण्याचा.

अवधेससिंह चौहान असे या कलासक्त चित्रकाराचे नाव आहे. तो मूळचा बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील. मात्र, भाकरीच्या शोधात २००२ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी तो नाशिकमध्ये आला आणि नाशिकच्या मातीत रमला. शिक्षण दहावीपर्यंत झालेले, अन्य कोणतेही व्यावसायिक शिक्षण झाले नसल्यामुळे मिळेल ते काम करून पोटाची खळगी भरण्यास त्याने सुरुवात केली. मात्र, नाशिक परिसरातील डोंगर, गोदावरी नदीचा खळाळणारा घाट, अध्यात्माची उंची दाखविणारे मंदिरांचे कळस यामुळे अवधेससिंहमधील सुप्त चित्रकलेने उडी मारली अन् असंख्य व्यक्तीरेखा त्याच्या बोटांतून कागदावर अवतरल्या. 'रुद्रावतारातील महादेव', 'भक्ष्यावर झेप घेण्यासाठी सरसावलेला वाघोबा', 'पावसात छत्री घेऊन जाणारी तरुणी', 'प्रेमरंगात आकंठ बुडालेले राधाकृष्ण', 'सुतार कामात गुंतलेले आजोबा' अशी असंख्य चित्रे त्याने साकरली. विशेष म्हणजे त्याने कधीही चित्रकलेचे ना धडे गिरविलेले नाहीत.

अवधेससिंह सध्या द‌ि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या रत्नप्रभा प्रभाकर वैशंपायन नाईट कॉलेजमध्ये वॉचमन म्हणून काम करतोय अन् तेथीलच एका जिन्याखाली असलेल्या दहा बाय चारच्या खोलीत राहतो. चित्रकलेशिवाय जगणे अशक्य असल्याने अवधेससिंहने घर सोडले. चित्रकार सावंत बंधूंकडून त्याला मार्गदर्शन मिळत असून, संस्थेचे कार्यकारी उपाध्यक्ष प्रकाश वैशंपायन यांचेही सहकार्य मिळत असल्याचे अवधेससिंह नमूद करतो.

अवधेससिंहमध्ये प्रचंड कलादृष्टीकोन आहे. तो अधिकाधिक वाढला जावा यासाठी त्याला योग्य मार्गदर्शन मिळण्याची गरज आहे. - प्रा. अनिल साळवे, प्राध्यापक, वैशंपायन नाईट कॉलेज

चित्रकलेशिवाय जगण्याचा मी विचारच करू शकत नाही. मी सभोवतालच्या सर्व परिस्थितीतून चित्रकला शिकण्याचा तिचे विविध पैलू आत्मसात करण्याचा प्रयत्न करतोय. - अवधेससिंह चौहान, चित्रकार

अवधेससिंहची चित्रकला शाळा-कॉलेजमध्ये सर्वांनाच परिचित आहे. शाळेतील मुले त्याला आपली चित्रे काढण्यासाठी आग्रह करतात. तो देखील कोणतेही आढेवेढे न घेता या चिमुकल्यांची चित्रे काढून देतो. त्यामुळे तो शाळेमध्ये 'पेंटिंगवाले अंकल' म्हणूनही प्रसिद्ध आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यातून अवधेससिंहला प्रेरणा मिळाली आहे. त्याने वारली पेंटिंगमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा चितारला आहे. महाराजांच्या आतापर्यंत ऐकलेल्या शौर्यकथांमधून ही प्रेरणा मिळाल्याचे तो सांगतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आखाड्यांच्या साधूंना ओळखपत्र

$
0
0

प्रवीण बिडवे, नाशिक

भोंदूंकडून श्रध्दाळू भाविकांची फसवणूक होते; मात्र बदनाम होतात खरे साधू. सिंहस्थात आखाड्यांशी संबंध‌ीत किमान पाच लाख साधू नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये येणार असले तरी श्रध्दांळूना फसविणाऱ्या संधीसाधूंचाही मोठा मेळा भरण्याची भीती आहे. भाविकांना खऱ्या साधूची ओळख पटावी यासाठी त्यांना विशि‌ष्ट ओळखपत्र देण्याचा निर्णय अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या नवनियुक्त अध्यक्षांनी घेतला आहे. त्यामुळे संत रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणे 'तोचि साधू ओळखावा' हे वचन या साधूंबाबत सार्थ ठरू शकणार आहे.

रंजल्या गांजलेल्यांना आपुले म्हणून वागविणारा खरा साधू असतो असे रामदास स्वामींनी म्हटले आहे. तर 'ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू' या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी भोंदुगिरी करणाऱ्या संधीसाधूंवर आसूड ओढला आहे. भोंदू बाबांकडून श्रध्दाळूंच्या फसवणूकीच्या घटना घडत असतात. सिंहस्थ कुंभमेळ्यात त्या मोठ्या प्रमाणावर घडण्याची शक्यता आहे. अशा घटनांना रोखणे हे आव्हान असणार आहे. नकली साधूंचा बुरखा फाटावा आणि खऱ्या साधूंचा लौकीकही जपला जावा यासाठी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे नवनियुक्त अध्यक्ष महंत नरेंद्रगिरीजी यांनी आखाड्यांशी संबंधीत साधूंची ओळखपत्रे तयार करण्याचे आवाहन १३ आखाड्यांच्या महंतांना केले आहे. नाशिक भेटीवर आल्यानंतर त्यांनी प्रमुख आखाड्यांच्या महंतांशी संवाद साधून सूचना मांडल्या.

ओळखपत्राविषयीच्या सूचनेचे आखाड्यांनी स्वागत केले आहे. देशभरातील आठ लाख साधूंना ही ओळखपत्र मिळू शकतील. कुंभमेळ्यापूर्वीचे त्याचे वितरण व्हायला हवे. - श्री महंत नरेंद्रगिरीजी, अध्यक्ष अ. भारतीय आखाडा परिषद

साधूंच्या ओळखपत्रावर साधूचे नाव आणि छायाचित्र, आखाड्याचे नाव आणि पत्ता तसेच संपर्क क्रमांक दिला जाणार आहे. हे ओळखपत्र क्रेडीट कार्डच्या आकाराचे आणि प्लास्ट‌कि कार्डसारखे असणार आहे. त्यामुळे ते हाताळणेही सोईचे ठरू शकेल. या कार्डवर संबंधीत आखाडयाच्या प्रमुख महंतांची किंवा आखाड्याच्या सचिवांची स्वाक्षरी असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांची पायी गस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चेन स्नॅचिंग, तोतया पोलिस आणि बॅग लिफ्टिंगचे गुन्हे रोखण्यासाठी यापुढे नाकाबंदीऐवजी पायी पॅट्रोलिंग सुरू करण्याचे निर्देश पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी दिले आहेत. या नियोजनाची जबाबदारी थेट पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांवर सोपवण्यात आली असून, पोलिसांच्या 'पायी पॅट्रोलिंग' करण्याचा फायदा होण्याची शक्यता अधिक आहे.

शहरात रस्त्यावर होणारे म्हणजे चेन स्नॅचिंग, तोतया पोलिस आणि बॅग लिफ्टिंगचे गुन्हे काही प्रमाणात वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी 'पायी पॅट्रोलिंग' ही नवीन संकल्पना समोर आणली. याबाबत माहिती देताना झोन एकचे पोलिस उपायुक्त अविनाश बारगळ यांनी सांगितले की, पायी पॅट्रोलिंगसाठी प्रत्येक पोलिस स्टेशनसाठी तीन पथके तयार करण्यात आली आहे. पोलिस स्टेशनच्या कर्मचारी संख्येनुसार प्रत्येक पथकात दोन अधिकारी आणि चार ते सहा कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक या पथकाला मार्गदर्शन करणार असून, दिलेल्या मार्गावर एका पथकाला तीन तास पॅट्रोलिंग करावी लागणार आहे. गस्ती दरम्यान कर्मचारी विविध रहिवाशी इमारती, व्यवसायिक अस्थापने, उद्याने, जॉगिंग ट्रॅक आदी ठिकाणी भेटी देतील. या भेटी दरम्यान, पोलिस जनजागृतीचे काम करतील. पोलिसांच्या उपस्थितीमुळे सराईत गुन्हेगारांसोबत टवाळखोरांवर वचक निर्माण होईल, अशी माहिती बारगळ यांनी दिली. एक पथक तीन तास काम करेल. त्यानंतर एका तासाच्या विश्रांतीनंतर दुसरे पथक वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या आदेशानुसार दुसऱ्या मार्गावर पोहचेल. झोन एकमध्ये गंगापूररोड, सरकारवाडा, भद्रकाली, पंचवटी, आडगाव अशी पाच पोलिस स्टेशन येतात. तर, झोन दोनमध्ये अंबड, सातपूर, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड आणि देवळाली अशा सहा पोलिस स्टेशनचा समावेश आहे. ही नवीन संकल्पना झोन दोनमधील इंदिरानगर, उपनगर, तसेच नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये सर्वांत जास्त उपयोगी ठरू शकते. सध्या या तीन पोलिस स्टेशनच्या हद्दीत चेन स्नॅचर्सचा वावर वाढला आहे. पायी गस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना वॉकीटॉकी पुरवण्यात आले असून, यामुळे गुन्हेगाराच्या हालचाली टिपता येतील, असे झोन दोनचे पोलिस उपायुक्त विजय पाटील यांनी स्पष्ट केले.

अक्षय तृतीयेसाठी बंदोबस्त

अक्षय तृतीयेनिमित्त दागिन्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. त्यातच लग्नसराई सुरू झाली असून, गुन्हेगारांना रोखण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात ठेवला. प्रमुख रस्त्यासह कमी वर्दळीच्या ठिकाणीही पोलिस हजर होते. यात पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांसह नवीन भरती झालेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

यापूर्वी सकाळी ९ ते रात्री ९ अशी नाकाबंदी करण्यात येत होती. यासाठी काही महत्वाची ठिकाणे नि​श्चित करण्यात आली होती. मात्र, कोणत्या रस्त्यावर नाकाबंदी आहे, याचा अभ्यास गुन्हेगार करीत असे. त्यामुळे नाकाबंदी दरम्यान गुन्हेगार मोकाट आणि सर्वसामन्यांना त्रास, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. गुन्हेगारांची बदलेली मोडस ऑपरेंडी लक्षात घेत यापुढे कायमस्वरूपी नाकाबंदी काढून घेण्यात आली आहे. आता, दिवसातील कोणत्याही वेळेत आणि कोणत्याही ठिकाणी नाकाबंदी लावण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

$
0
0

टीम मटा

नाशिक जिल्ह्यात आज होणा-या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक कर्मचा-यांबरोबरच पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. कळवण तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होणार असून, २७१ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण ५९ मतदान केंद्र असून २९५ अधिकारी व कर्मचारी आदी यंत्रणा सज्ज झाली आहे. ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पुरे यांनी दिली.

तालुक्यातील नरूळ, ओतूर, भुसणी, मुळाणे वणी, ततानी, लिंगामे, वडाळे, जामले वणी, अभोणा कळमथे, सप्तशृंग गड, मोहनदरी, नांदुरी, पळसदर, मोहमुख, ओझर, सावकी पाळे, बिलवाडी, कुंडाणे, कठारे दिगर, कनाशी, गोसरानणे या ग्रामपंचायतीसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात होणार असून ५:३० वाजे पर्यंत सुरू राहणार आहे. एका मतदान केंद्रावर तीन मतदान अधिकारी, एक शिपाई, एक पोलिस असे एकूण पाच कर्मचारी राहणार आहेत. फिरते पथक, मतदान मशीनमध्ये काही तांत्रिक अडचण आली तर त्यासाठी ७ कर्मचारी राहणार आहेत. तसेच ओतूर, सप्तशृंग गड या संवेदनशील मतदान केंद्रावर विशेष पोलिस बंदोबस्त देण्यात येणार आहे. दोन पोलिस निरिक्षक, सहा सहाय्यक पोलिस निरिक्षक, शंभर पोलिस कर्मचारी तसेच ५३ होमगार्ड असा बंदोबस्त राहणार आहे.

मनमाडमध्ये ५२ ग्रा. प.

मनमाड : नांदगाव तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत असून, निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती तहसीलदार सुदाम महाजन यांनी दिली. एकूण ५९ पैकी ७ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली असून, ५२ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. १७९ मतदान केंद्रे असून, एक हजार दहा कर्मचारी आणि ३०० पोलिस निवडणूक कामांसाठी कार्यरत आहेत. तहसीलदार सुदाम महाजन यांच्या नियोजनाखाली ६१ निवडणूक निर्णय अधिकारी आणि १० झोनल अधिकारी निवडणूक कामकाजासाठी नेमण्यात आले आहेत. २५ मतदान केंद्रे संवेदनशील असल्याचे तहसीलदार महाजन यांनी सांगितले.

चांदवड सज्ज

चांदवड तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींपैकी १५ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली असून, बुधवारी ३८ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती तहसीलदार मनोज देशमुख यांनी दिली. ३८ ग्रामपंचायतींसाठी १२१ मतदान केंद्रावर मतदान होणार असून, सहाशे कर्मचारी तैनात करणयात आले आहेत. याशिवाय नायब तहसीलदार नितीन गर्जे यांच्यासह ३८ निवडणूक निर्णय अधिकारी, आठ झोनल अधिकारी कार्यरत आहेत, असे तहसीलदार महाजन यांनी सांगितले.

मालेगावात ८४ ग्रा. पं.

मालेगाव तालुक्यातील ९९ पैकी १५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असल्या तरी ८४ ग्रामपंचायत आणि एका पोटनिवडणूकसाठी आज मतदान होणार आहे. महिन्यापासून गावाकडील राजकारण चांगलेच तापले होते. मतदान यंत्रणादेखील मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी सज्ज झाली आहे . ८४ ग्रामपंचातींसाठी सुमारे एक हजार आठशे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. विविध गावांच्या मतदान केंद्रांवर साहित्य नेण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी झाली होती. अक्षय तृतीयेसारखा सण असूनही सुट्टी मिळाली नसल्याने अनेक कर्मचारी नाराजी व्यक्त करीत होते. मात्र दुपारपर्यंत सर्वच मतदान केंद्राचे साहित्य वाटप करण्यात आले. तसेच या कर्मचाऱ्यांना सोडण्यासाठी २६ बसेस व ३० जीप गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २३ तारखेला येथील शिवाजी जिमखाना येथे सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी होणार असल्याची माहिती तहसीलदार दीपक पाटील यांनी दिली.

सटाण्यात तयारी पूर्ण

बागलाण तालुक्यातील सुमारे ३० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका आज बुधवार (दि. २२) होत असून सहा ठिकाणी पोटनिवडणुका होत आहेत. या निवडणुकांसाठी सुमारे ५०० कर्मचारी तैनात करण्यात आले असून, पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा बागलाणचे तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांनी दिली. तालुक्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या लखमापूर, नामपूर, खमताणे, ब्राह्मणगाव, मोराणे सांडस, नवी शेमळी, जुनी शेमळी, ठेगोंडा, कऱ्हे आदी ठिकाणी चुरशीच्या लढाई होत आहेत. तालुक्यातील राजकारणात अत्यंत संवेदनशील असलेल्या या ठिकाणी ग्रामपंचायती निवडणुकांमुळे वातावरण ढवळून निघाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक चक्र अन् चार कुंभपर्व

$
0
0

कुठल्याही प्रभावी संवाद यंत्रणेशिवाय करोडोंचा जनसमुदाय कसा एकत्रित होऊ शकतो ? त्यासाठी किती खर्च येऊ शकतो? अशा आशयाचा सवाल एका इंग्रज अधिकाऱ्याने पं. मदनमोहन मालवीयांना विचारला होता. पंचांग नावाच्या पुस्तकातील केवळ एका मुहूर्ताच्या नोंदीवरून कुंभमेळ्यात ही जनशक्ती एकवटली जात असल्याचा संदर्भ त्यांना दिला त्यावेळी अधिकारी अवाक् झाले होते.. असा एक किस्सा आहे ! या कुंभचक्राचे चार पर्व आहेत. चार कुंभाच्या आयोजनानंतर एक चक्र पूर्ण होत असल्याची भाविकांमध्ये श्रध्दा आहे. याच विषयावर एक नजर :

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या जीवनध्येयांचा विचार भारतीय तत्वज्ञानाने मानवी जीवनाला दिला. याच उद्दिष्टांपैकी धर्माच्या माध्यमातून जाणारा आणि मोक्ष तथा पूर्णत्वाच्या प्रक्रियेकडे नेणारा महासोहळा म्हणून कुंभमेळ्याच्या स्थान भारतात प्राचीन काळापासून आजवर अबाधित आहे. या कुंभाची पताका पिढ्यान् पिढ्या, युगानुयुगे खांद्यावर फडकविणाऱ्या साधू समुदायाच्या रचनेला आखाड्यांनी आश्रय दिला. या आखाड्यांचा कुंभमेळ्यातील सहभाग हा अविभाज्य घटक आहे. किंबहुना आखाड्यांच्या सहभागाशिवाय या महासोहळ्याला अर्थ नाही. दहा शैव पंथीय तर तीन वैष्णव पंथीय आखाड्यांच्या माध्यमातून लाखो साधूंचा समुदाय या सोहळ्यात यंदाही सहभागी होणार आहे. यातील शैव आखाड्यांना पूज्य शंकराचार्यांपासून सुमारे २२०० वर्षांची परंपरा असल्याचे मानले जाते. तर वैष्णव पंथीय आखाड्यांची सुमारे ६०० वर्षांची परंपरा मानली जाते.

कुंभपर्वाला हरिव्दारपासून सुरुवात होत असल्याचा उल्लेख नारद पुराण, शिवपुराण अन् ब्रह्मपुराणासारख्या संदर्भांमध्ये आहे. तर हरिव्दार पाठोपाठ प्रयाग, नाशिक-त्र्यंबकेश्वर, उज्जैन या प्रमाणे हे चक्र पूर्ण होत असल्याचे मानले जाते. या प्रत्येक क्षेत्री दर बारा वर्षांच्या कालखंडाने कुंभमेळा आयोजित केला जातो. हरिव्दार व प्रयाग येथे दर सहा वर्षांनी 'अर्ध कुंभ' साजरा होतो.

दक्षिणकाशी नाशिक

बारा ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्वर हे एक स्थान. सह्याद्री पर्वतरांगांमधील ब्रह्मगिरी टेकड्यांच्या पायथ्याशी नाशिक शहरापासून हाकेच्या अंतरावर वसलेले हे क्षेत्र. ब्रह्मगिरीच्या टेकड्यांवर गोदावरीचा उगम आहे. यामुळे शैव पंथियांच्या दृष्टीने कुंभासाठी त्र्यंबकेश्वरला तर प्रभू रामचंद्र तथा भगवान विष्णूंच्या अवतरांच्या निवासामुळे पावन झालेल्या नाशिक नगरीला वैष्णव पंथियांच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. गुरूचा सिंह राशीतील प्रवेश अन् सूर्य व चंद्राचा कर्क राशीतील प्रवेशाच्या तिथीस नाशिक व त्र्यंबकेश्वरी होणाऱ्या महाकुंभास महत्त्व आहे.

अवंतिका तथा उज्जैन

मध्य प्रदेशातील क्षिप्रा नदीच्या तीरावर वसलेल्या अवंतिकापुरी तथा आजच्या उज्जैनलाही कुंभाच्या दृष्टीने महत्व आहे. महाकालेश्वर ज्योतिर्लिंगामुळे हे स्थानही अत्यंत पवित्र मानले जाते. गुरू सूर्य राशीमध्ये व चंद्र आणि सूर्य मेष राशीत असतांना उज्जैन येथे कुंभमेळा आयोजित केला जातो.

प्रयागचा कुंभमेळा

गुरू ग्रह ज्यावेळी वृषभ राशीत व सूर्य आणि चंद्राचा मकर राशीत प्रवेश होतो त्यावेळी प्रयाग क्षेत्री कुंभाचे आयोजन केले जाते. या क्षेत्री गंगा, यमुना व अदृश्य सरस्वतीच्या संगमावर कुंभमेळा पार पडतो. साधू अन् भाविकांची संख्या लक्षात घेता प्रयागमध्ये सर्वात मोठा कुंभमेळा आयोजित केला जातो.

हरिव्दार

हिंदू धर्मियांच्या दृष्टीने पवित्र असणारे हरिव्दार हे आणखी एक स्थान. या ही क्षेत्री कुंभाचे बारा वर्षांनी आयोजन होते. आता सन् २०२२ मध्ये होणारा कुंभ हा हरिव्दारला होणार आहे. हिमालयाच्या रांगांमध्ये शिवालीक टेकड्यांच्या पायथ्याशी उत्तराखंड राज्यात हे क्षेत्र आहे. 'मोक्षव्दार' म्हणूनही हे क्षेत्र भाविकांमध्ये सुपरिचित आहे. गुरूचा कुंभराशीतील प्रवेश, सूर्य व चंद्राचा अनुक्रमे मेष व धनू राशितील प्रवेश झाल्यानंतर हरिव्दार येथे कुंभमेळा आयोजित होतो.दीर्घकालाने हाती येणारी पर्वणी साधण्यासाठी कुंभाच्या कालावधीत करोडो पावलांचे ध्येयही केवळ एकच असते. ते म्हणजे पर्वणीचे स्नान.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हंडाभर पाण्यासाठी पायपीट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्याच्या पश्चिमभागातील आदिवासी भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी सुमारे दोन ते तीन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. एप्रिल महिन्यातच अशी स्थिती असून मे महिन्यात मोठ्या प्रमाणात या परिसरात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याने तातडीने टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. सध्या तालुक्यात चार पिण्याचे पाण्याचे टँकर सुरू असून, तिसऱ्या टप्प्यात सहा टँकर सुरू करण्यात येणार आहेत. एकूण दहा टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.

बागलाण तालुक्यातील १७९ गावांपैकी सर्वत्र पिण्याच्या पाण्याची स्थिती जेमतेम असली तरीही आदिवासी भागातील पश्चिम पट्ट्यासह मोसम खोरे, काटवन परिसरात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई जाणवू लागली आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील रातीर, रामतीर, खिरमाणी, भाक्षी, कऱ्हे, मुळाणे, या गांवाना चार टँकर सुरू आहेत. गत दोन महिन्याच्या काळात अवकाळी पावसाच्या हजेरीने थोड्याशा प्रमाणात पाणीटंचाईवर मात करणे शक्य झाले असले तरीही आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून या म्हणीनुसार आदिवासी भागात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई जाणवू लागली आहे.

तालुक्यातील भवाडे येथे काही वर्षांपूर्वी भारत निर्माण योजनेतंर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी आठ लाख रुपये निधी मंजूर झाला होता. त्यापैकी काही टक्केच रक्कम विकासावर खर्च झाली असून, विहिरीचे काम अपूर्ण ठेवल्याने कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. साल्हेर, मुल्हेर, गोळवाड, वाघंबा, पिसोळ, भाटांबे परिसरात महिलांना मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर या दोघा धरणातील जलसाठा संपुष्टात आला असून, या दोन्ही धरणातील दोन आवर्तने शेती व पिण्यासाठी देण्यात आले आहेत. गत पंधरवाड्यातच चणकापूरचे एक आर्वतन दिल्याने सटाणा शहरात एक दिवसाआड पिण्याच्या पाणी मिळू लागले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा नदीपात्रात देखील थोडेच पाणी शिल्लक असल्याने सटाणा शहरात येत्या आठवड्याभरात दोन ते तीन दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हरणबारी धरणामुळे मोसम खोऱ्यातील जनतेला पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत नसली तरीही नामपूरसह काटवन परिसरात अनेक गावांना तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तळवाडे, देवळाणे, सुराणे, अजमीर सौंदणे या ठिकाणी तर नेहमीचीच पाणीटंचाई पाचवीला पुजलेली असल्याने मोठ्या प्रमाणात टँकरची ओरड होऊ लागली आहे. एका टँकरद्वारे या ठिकाणी पाणीपुरवठा होत आहे.

एप्रिल महिन्याअखेर अथवा मे महिन्याच्या प्रारंभीच सुमारे सहा टँकर वाढविण्यात येणार असून, यावेळी तालुक्यातील तीव्र पाणीटंचाई असलेल्या गावांतून मागणी झाल्यास टँकर तातडीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दरम्यान, पाणीटंचाई कृती आराखडा योजनेनुसार तालुक्यातील विंधन विहीर, विहीर अधिग्रहण आदी बाबींना प्राधान्य देण्यात येणार असून, चार अधिक सहा अशी दहा ठिकाणी पिण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. - अश्विनीकुमार पोतदार, तहसीलदार

Latest Images