Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

उत्तम भालेरावांची वडनेर भैरवला सरशी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चांदवड ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारानी प्रस्थापितांविरुद्ध कौल देत नव्या शिलेदारांवर विश्वास दाखवित विविध ठिकाणी परिवर्तन घडवून आणले आहे. ३८ ग्रामपंचायतींपैकी काही ग्रामपंचायतींवर जुन्यांनीच मोहर उमटवली असली तरी प्रस्थापितांच्या सत्तेला शह बसल्याचेच निकालात स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील वडनेरभैरव या मोठ्या ग्रामपंचायतीची सत्ता माजी आमदार उत्तमराव भालेराव यांच्या गटाने जिंकून आपला दबदबा सिद्ध केला आहे.

राजकीय पक्षांच्या महत्वापेक्षा स्थानिक गटांना प्राधान्य देत मतदारांनी स्थानिक प्रश्न सोडविन्यास सक्षम असलेल्या नेतृत्वाचा पर्याय निवडल्याचे स्पष्ट झाले आहे. चांदवड शहराला नगर पंचायतीचा दर्जा मिळाल्याने तिथे निवडणूक झाली नाही. ५३ पैकी १५ ठिकाणी बिनविरोध निवड झाली. ३८ पैकी बहुतेक ठिकाणी बदलाचे वारे वाहत असल्याने प्रस्थापितांना धक्का बसला आहे. भडाने आणि वड बारे येथे दोन उमेदवारांना समान मते मिळाली. चिठ्ठी टाकून निर्णय जाहीर करण्यात आला वड़नेरभैरव येथे १७ पैकी ११ जागा जिंकून भालेराव गटाने वर्चस्व सिद्ध केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


येवल्यात अंबादास बनकरांना दणका

$
0
0

५४ पैकी निम्म्या ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला तालुक्यातील प्रस्थापित नेतृत्वाला मतदारांनी सपशेल नाकारत नव्या चेहऱ्यांच्या हाती गावाची राजकारणाचे सूत्रे सोपविल्याचे चित्र दिसून आले आहे. ५४ ग्रामपंचायतींपैकी निम्म्या ठिकाणी सत्तांतर झाले असून, या गावांना नवे नेतृत्व भेटले आहे. अंगणगाव, विखरणी, अंदरसूल, पाटोदा, नगरसूल येथील निकालाने भल्याभल्यांचे अंदाज फोल ठरविले.

अवघ्या अर्ध्या तासातच पहिला निकाल हाती आला. तालुक्याच्या राजकारणातील मातब्बर समजले जाणारे मराठा विद्या प्रसारकचे येवला सदस्य अंबादास बनकर यांच्या पॅनलचा अंगणगावमध्ये धुव्वा उडवला गेला. येथे त्यांचा मुलगा संजय बनकर यांना सदस्यपद कायम राखता आले असले तरी प्रतिस्पर्धी विठ्ठलराव आठशेरे यांच्या पॅनलने सात जागांवर विजय मिळवत सत्ता हस्तगत केली. या निकालाची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू असून, अण्णा पर्व संपल्याचे जाहीररित्या बोलले जात आहे.

हाणामाऱ्यांमुळे जिल्हाभर चर्चेत आलेल्या नगरसूल या सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखालील सदगुरु पॅनलने ११ जागांवर विजय मिळवत सत्ता आपल्या ताब्यात ठेवली. तर राष्ट्रवादीचे नेते सुनील पैठणकर, सुभाष निकम यांच्या नगरसूल विकास आघाडीला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले. येथे सर्व नेते विरुध्द प्रमोद पाटील असा लक्षवेधी सामना रंगला होता. यात पाटील यांनी बाजी मारली. विशेष म्हणजे दोन वार्डात उभे असलेले सुनील पैठणकर तसेच सुभाष निकम यांच्या पत्नी पराभूत झाल्या आहेत.

याउलट पाटील यांचे पुत्र प्रसाद व भावजय मंदाकिनी हे दोघेही विजयी झाले. वादावादी झालेल्या राजापूर येथे पंचायत समिती सदस्य पोपट आव्हाड, प्रमोद बोडखे, संपतराव वाघ, कैलास मुंढे यांनी सत्ता खेचून आणत ७ जागांवर विजय मिळवला. तर सत्ताधारी परसराम दराडे, रामभाऊ केदार यांना ६ जागा मिळाल्या. आजच्या निकालात आव्हाड यांच्या पॅनलला पाचच, तर दराडेंना सहा जागांवर विजय मिळाला. मात्र, आव्हाड यांच्या दोन जागा अगोदरच बिनविरोध झाल्या असल्याने त्यांनी सत्ता खेचून आणली.

तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या अंदरसुल येथे भाऊबंदकीच्या लढाईत राष्ट्रवादीचे युवानेते मकरंद सोनवणे यांच्यासमोर माजी जि. प. अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, शिवाजी वडाळकर, किसनराव धनगे, हरिभाऊ जगताप आदी नेत्यांनी एकत्रित येऊन आव्हान उभे केले होते. परंतु, मकरंद सोनवणे सर्वांना भारी पडत सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यात यशस्वी झाले. त्यांच्या जनहित पॅनलला दहा, तर प्रतिस्पर्धी जनशक्ती पॅनलला सात जागा मिळाल्या. शिवसेनेचे तालुकाप्रमुख झुंजार देशमुख यांच्या पत्नीचा पराभव चर्चेचा ठरला आहे.

पाटोदा येथील निकालही राष्ट्रवादीच्या नेत्यांना झोंबणारा ठरला आहे. येथे जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती निवृत्ती पाटील बोरणारे यांचे मतदानाचे आदल्या दिवशी निधन झाले. मतदारांनी त्यांच्या रामेश्वर ग्रामविकास पॅनलला एकतर्फी बहुमत देत आदरांजली वाहिली. येथे पंचायत समिती सदस्य रतन बोरणारे, अशोक मेंगाणे, पुंडलिक पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली १३ जागा रामेश्वर पॅनलला भेटल्या आहेत, तर राष्ट्रवादीचे माजी जि. प. सदस्य बाळासाहेब पिंपरकर, साहेबराव आहेर, अण्णा दौंडे, यांच्या जनसेवा पॅनलला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे येथे पिंपरकर पती पत्नी दोन्हीही पराभूत झाले.

साताळी येथे अर्जुन कोकाटे यांना मतदारांनी साफ नाकारले. त्यांना त्यांच्याच भाचेजावयांनी असमान दाखवले. कोकाटे यांच्या पॅनलला अवघ्या २ जागा मिळाल्या, तर गोरख काळे, कैलास टिळे यांच्या पॅनलला ५ जागांवर विजय मिळाला.

विखरणी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मोहन शेलार यांनी ९ पैकी ८ जागांवर विजय मिळवत सत्ता कायम राखली. विरोधी गटाचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव शेलार यांचा मुलगा रवींद्र व स्नुषा सविता हे दोघेही पराभूत झाले आहेत. अंगुलगाव येथे जि.प सदस्य प्रविण गायकवाड यांच्या शेतकरी विकास पॅनलला ६ जागांवर विजय मिळाला, तर विरोधी जनसेवा पॅनलला तीन जागा मिळाल्या.

कोटमगाव (विठ्ठलाचे) येथे बाजार समिती संचालक शरद लहरे, नाना लहरे, बाबासो कोटमे यांच्या जगदंबा जनशक्ती विकास पॅनलने ६ जागावर विजय मिळवीत सत्ता हस्तगत केली. जनविकास पॅनलला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला. पारेगाव येथे सचिन आहेर, बाळकृष्ण पोटे यांच्या जनविकास पॅनलने नऊपैकी नऊ जागांवर विजय मिळवत सत्तांतर घडवले.

२५ वर्षांनंतर परिवर्तन

तालुक्यातील रहाडी ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन पॅनलने इतिहास घड़वत २५ वर्षे सत्ताधारी असलेल्या पॅनलचा धुव्वा उडवला आहे. नऊपैकी सात जागी परिवर्तन पनलचे उमेदवार निवडून आले आहेत. या पॅनलमधील सर्व सदस्य प्रथमच निवडून आले असून, सत्ताधारी पॅनलमधील दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला आहे. पराभूतांमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सखाहरी गायवकवाड यांचा समावेश आहे. परिवर्तन पॅनलचे नेतृत्व भागवत सोनवणे, बाबुभाई दिलावर शेख, हुसेन अब्बास शेख, बाबू अब्दुल शेख, जनार्दन गायकवाड, श्रावण मोरे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळवण तालुक्यात नवोदितांना संधी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या १२४ जागा व आठ ग्रापंचायतींच्या रिक्त आठ अशा एकूण १३२ जागांसाठी आज झालेल्या मतमोजणीत बहुसंख्य ठिकाणी परिवर्तन झाले आहे. यामुळे तालुक्यात प्रस्थापितांना धक्का बसला आहे.

मतदानाची वाढलेली टक्केवारी ही परिवर्तनाला संधी देत असल्याचा इतिहास आज खरा ठरला आहे. तब्बल ८१ टक्के मतदान झाल्यामुळे बहुसंख्य ठिकाणी परिवर्तन झाले. कनाशी, अभोणा, सप्तशृंगगड, नांदुरी, भुसनी या महत्त्वाच्या ग्रामपंचायातींमध्ये मोठे फेरबदल झाले. विशेषतः बहुतेक ठिकाणी मतदारांनी नवीन चेहऱ्यांना संधी देत युवकांना प्राधान्य दिले आहे. येथील सत्ताधा-यांना मतदार राजाने साफ नाकारले व नवोदितांना संधी दिली. विशेष म्हणजे या निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यात माकप कार्यकर्त्यांनी पॅनल उभे केल्याचा व निवडून आणण्याचा नवा अध्याय सुरू केला आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत सप्तश्रुंग गडाचे संदीप बेनके, कनाशीचे, विजय शिरसाठ, भुसणीचे विष्णू सोनवणे, अभोण्याचे सुनील खैरनार यांसारख्या प्रस्थापितांचा पराभव झाला आहे. यावेळी कळवण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर गावित यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कळवण तालुक्यात ८१ टक्के मतदान झाले होते. यामध्ये कनाशी ८१ टक्के, अभोणा ६५ टक्के, जामलेवणी ८५ टक्के , कळमथे पाळे ७९, काठरे दिगर ७७ , नरूळ ८५ , ओतूर ७३ , सप्तशृंगगड ८१ , कुंडाणे क ८४ , मोहनदरी ८०, नांदुरी ८७, ततानी ८७, लिंगामे ८८, पळसदर ६९, भुसनी ९२ , गोसराने ७२, मोहमुख ७८ , मुळाणे वणी ८८ , ओझर ८३, सावकी पाळे ८१, बिलवाडी ७९ टक्के १ याप्रमाणे २२ ग्रामपंचायतींसाठी ८१ टक्के मतदान झाले आहे. तर वडाळे वणी ७१, ककाणे ७३ , जयदर ७१, धार्डेदिगर ७६ , खडकवन ८१, पिंपळे बु ७९, खेडगाव ७४ या ८ ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एक जागेसाठी ७६ टक्के मतदान झाले होते. एका मागून एक २२ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीस फक्त २ तास अवधी लागला. सभागृहाबाहेर उमेदवार हितचिंतकांनी मोठी गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी, शिवसेनेने गड राखले

$
0
0

दिंडोरीतील चित्र; जोपूळ, चिंचखेडमध्ये शिवसेनेची सत्ता

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

दिंडोरी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत चार-पाच ग्रामपंचायती वगळता इतर बहुतांशी ग्रामपंचायतीत सत्ता कायम राखण्यात त्या-त्या गावातील सत्ताधाऱ्यांना यश मिळाले आहे. शिवसेना व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपापले वर्चस्व कायम राखले आहे.

दिंडोरी तालुक्यातील सर्वांत प्रतिष्ठेच्या व लक्षवेधी ठरलेल्या जोपूळ व चिंचखेड ग्रामपंचायतीत शिवसेनेने क्रांती घडवत अनुक्रमे माधव उगले व सुनील मातेरे यांच्या पॅनलने सत्ता काबीज केली आहे. तर पालखेड येथे उपसरपंच उत्तमराव जाधव, खडक सुकेणेत पांडुरंग गणोरे, वारे येथे माजी

आमदार धनराज महाले, बोपेगाव निवडणुकीत सरपंच वसंत कावळे यांच्या पॅनलने बाजी मारत भगवा फडकत ठेवला आहे. अवनखेड येथे भाजप नेते सरपंच नरेंद्र जाधव यांच्या पॅनलने बाजी मारली आहे. सोनजांब येथील चुरशीच्या लढतीत प्रभाकर जाधव यांच्या परिवर्तन पॅनलने निसटता विजय मिळवत सत्ता मिळवली आहे. लखमापूर ग्रामपंचायतीच्या बहुरंगी लढतीत सरपंच ज्योतीताई

देशमुख, माजी सरपंच सुभद्राताई देशमुख विजयी झाल्या असून, येथे सरपंच निवडीनंतर सत्ता कुणाची येणार हे स्पष्ट होणार आहे. पाडे येथील चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादीचे नरेंद्र पेलमहाले यांच्या पाडे ग्रामविकास पॅनलची सरशी झाली आहे. परमोरी ग्रामपंचायतीत सत्ताधारी सरपंच नामदेव काळोघे, ज्ञानेश्वर दिघे यांच्या पॅनलने विजय मिळवत सत्ता राखली आहे. वणी खुर्द येथे माजी प.स. सदस्य काका चौधरी यांच्या पॅनलने बाजी मारली. तळेगाव वणी येथे सत्तांतर झाले. आमदार नरहरी झिरवाळ पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर भगरे यांच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका या अगोदरच बिनविरोध झाली. तेथे राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.



गुलालाची उधळण

सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयात तहसीलदार मंदार कुलकर्णी, नायब तहसीलदार मोहन कनोजे यांच्या मार्गदर्शनाखाली दहा टेबलांवर मतमोजणीला सुरवात होवून चार फेऱ्यांमध्ये दुपारी दीड वाजता मतमोजणी संपली. यावेळी तहसील कार्यालयासमोर गावागावातून आलेल्या नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याने वाहतूक कोंडी झाली. पोलिसांना नागरिकांना आवरण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. मिनिटागणिक निकाल समजताच समर्थक गुलाल उधळत जल्लोष करीत होते. सर्वांत अगोदर वणी खुर्दचा, तर शेवटी लखमापूरचा निकाल लागला. लखमापूर येथील वार्ड पाचमध्ये दोन महिला उमेदवारांना समसमान मते पडल्याने चिठ्ठी काढून निकाल घोषित करण्यात आला. पोलिस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलावंत रसिक आणि संवेदनशिलता !

$
0
0

प्रत्येक कलाकृतीचा आत्मा जर कोणता असेल तर तो म्हणजे त्या त्या कलावंताची संवेदनशीलता. त्या संवेदनशीलतेतूनच कलेला जीवंतपणा येतो. एखाद्या मंदिरात गेल्यावर खूप प्रसन्न आणि शांत वाटतं आणि मूर्ती तर अगदीच प्रसन्न आहे असं अनेकदा बोललं जातं. यामधून ज्या कलावंताने ती मूर्ती घडविली आहे त्याची संवेदनशीलता किती उच्च दर्जाची आहे याचा प्रत्यय येतो. अशीच कलावंतांची संवेदनशीलता आपल्याला मैफलीतून, अभिनयातून, चित्रातून जाणवत राहते आणि कलेचा पुरेपूर आनंद मिळतो. ही संवेदनशीलता कलाकाराला नुसतीच कलेच्या शिक्षणातून मिळत नाही, तर कलेच्या साधनेतून आणि अनुभवातून मिळते. श्रोते आणि रसिक संवेदनशील असतील तर ती भावना या हृदयीची त्या हृदयी पोहोचलो.

बालगंधर्वांची गायकी याचे उत्तम उदाहरण आहे. प्रत्यक्ष रुख्मिणी, भामिनीच्या भूमिकेत शिरून अभिनय आणि गायन अत्युच्च पातळीवर नेणारे बालगंधर्व युगायुगातून एकदाच निर्माण होतात. सुप्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक आमीर खान याने टीव्हीवरील एका मुलाखतीत सांगितले होते की, कलावंत होणं ही सोपी गोष्ट नाहीये. त्यासाठी अतिशय उच्च दर्जाची प्रतिभा असली पाहिजे. भाषा आणि साहित्य हा यातला महत्त्वाचा दूवा आहे; पण भाषा नसतानाही अत्यंत उच्च दर्जाची कलाकृती केवळ संवेदनशील मनाच्या जोरावर आणि प्रतिभेवर होऊ शकते. हे चार्ली चप्लीनने संपूर्ण जगाला दाखवले आहे. सुंदर सुंदर छायाचित्रे ज्या कॅमेऱ्याने काढली जाताना त्यामागे सौंदर्यसृष्टी आणि संवेदनशील कलावंताचे मनच असते. ही संवेदनशून्यतेचीच उदाहरणे आहेत. लेखनासाठी चिंतनासाठी एकांत मिळावा म्हणून शहरापासून दूर अंतरावर गेलेल्या एका मोठ्या साहित्यीकाच्या घराजवळून प्रशासनाने रेल्वेलाईन टाकली आणि हे लक्षात आल्यावर माफी मागून ती रेल्वेलाईन पुन्हा काढून घेतली हे उदाहरण नुकतेच एका देशात घडले आहे. तर, कोट्यवधी रसिकांच्या ह्रदयावर राज्य करणाऱ्या स्वरसम्राज्ञी लतादिदिंच्या घराला अगदीच खेटून फ्लायओव्हर गेला तेव्हा तो कसा योग्य आहे, हे सांगण्यासाठी चढाओढ लागली होती.

कलेच्या संवर्धनासाठी प्रशासन कार्य करीतही असते. पण आपला वारसा हा आपला अभिमान असतो, तो ही जपला पाहिजे. कारण, ते भावी संस्कृतीचे प्रेरणास्थान असते. नाशिकच्या उत्तमोत्तम कलाकृती कुठे आणि कशा गायब झाल्या याच्या कथा आपण भावी पिढीला सांगायच्या का ? आणि दादासाहेब फाळके आणि कानेटकरांचे कतृत्व जिथे ही संवेदनशून्यतेचीच उदाहरणे आहेत. लेखनासाठी चिंतनासाठी एकांत मिळावा म्हणून शहरापासून दूर अंतरावर गेलेल्या एका मोठ्या साहित्यीकाच्या घराजवळून प्रशासनाने रेल्वेलाईन टाकली आणि हे लक्षात आल्यावर माफी मागून ती रेल्वेलाईन पुन्हा काढून घेतली हे उदाहरण नुकतेच एका देशात घडले आहे. तर, कोट्यवधी रसिकांच्या ह्रदयावर राज्य करणाऱ्या स्वरसम्राज्ञी लतादिदिंच्या घराला अगदीच खेटून फ्लायओव्हर गेला तेव्हा तो कसा योग्य आहे, हे सांगण्यासाठी चढाओढ लागली होती.

कलेच्या संवर्धनासाठी प्रशासन कार्य करीतही असते. पण आपला वारसा हा आपला अभिमान असतो, तो ही जपला पाहिजे. कारण, ते भावी संस्कृतीचे प्रेरणास्थान असते. नाशिकच्या उत्तमोत्तम कलाकृती कुठे आणि कशा गायब झाल्या याच्या कथा आपण भावी पिढीला सांगायच्या का ? आणि दादासाहेब फाळके आणि कानेटकरांचे कतृत्व जिथे बहरले त्या जागे ऐवजी फाळके स्मारक आणि कानेटकर उद्यान दाखवायचे का हा प्रश्न सगळ्या संवेदनाशील कलावंताना आणि रसिकांना पडायला हवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोड्स ऑपरेंडीचा विसर

$
0
0

गुन्हेगारी जगतात गुन्हेगार शोधण्यासाठी व् त्याने गुन्हा करताना वापरलेली पद्धत कोणती हे शोध घेणे म्हणजे मोड्स ऑपरेंडी. मात्र, या तंत्राचा जणू काही गुन्हेशाखा व् पोलिसानाच विसर पडला की काय असा सध्याच्या घडामोडिंमुळे सर्वोतोपरी निदर्शनास येत आहे. नाशिकसारख्या गजबजलेल्या शांत शहरात अनेक गुन्हेगार एकामागून एक गुन्हे सर्रास घडवून आणतात वा करून जातात; मात्र पोलिस यंत्रणेला याचा शोध घेणे फार किचकट होऊन बसले आहे. कारण याला जबाबदार कामाचे स्वरुप पद्धत आणि तत्परता हे होय. हजारोंच्या संख्येत असलेल्या पोलिस शिपायांपैकी शारीरिक दृष्ट्या उत्तम असे मोजकेच पोलिस आहेत. ही झाली नाण्याची एक बाजू. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी गुन्हा घडतो किवा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असतात. या लोकांच्या आजुबाजुचा परिसर व तेथे राहणारे काही रहिवासी हे देखील काही अंशी त्यांच्या कृतींमध्ये सामील असतात किंवा बाहेरून पाठिंबा देतात. एकीकडे पोलिसांना खबर देऊन गुन्ह्याची जागा दाखाविली जाते व दुसरीकडे हेच लोक पोलिस पथक कोणत्या दिशेने येत आहे. याची खबर गुन्हेगाराला भीतीपोटी किंवा अन्य कारणास्तव देत असतात. यामुळे गुन्हा करणारा साळसुदपणे व सावाधगिरीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होतो. जणू काही पोलिसांचीच मोड्स ओप्रेंडी त्यांना पाठ झाली आहे. यासाठी काही चांगला मार्ग सुचला तर नक्कीच गुन्हेगारी आटोक्यात येऊ शकेल. जास्त गुन्हेगारी भागात पुन्हा जोमाने कोम्बिंग व्हायला पाहिजे तसेच तडीपार गुन्हेगार देखील काही राजकीय हस्तक्षेप करणारी मंडळी व लाचखाऊपणामुळे बाहेर समाजात ताठ मानने फिरताना दिसतात. त्यांच्यावर पायबंद घालणारी व्यवस्था निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

- अनामिक पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकखातेदारांनाच भुर्दंड!

$
0
0

रवींद्र कुलकर्णी, वाचक वार्ताहर

पाच सहा महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. मी माझ्या मित्रासोबत द्वारकाजवळच्या एका बँकेत गेलो होतो. त्यावेळी बँकेत एक बोर्ड समोर दिसला त्यावर लिहिले होते. 'येथे जुन्या व फाटक्या नोटा बदलून मिळतील'. माझ्या पाकिटात बऱ्याच दिवसांपासून पाच आणि दरा रुपयांच्या नोटा होत्या. या सर्व नोटा मिळून पंच्चावन्न रुपये होते. बँकेतल्या कॅशिअरला माझ्याजवळ फाटक्या नोटा आहेत त्या बदलून मिळतील का? अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी सांगितले की, 'तुम्हाला पैसे रोख मिळणार नाही ते तुमच्या बँकेच्या खात्यात जमा होतील'. त्याच बँकेत माझे अकाऊंट असल्याने मी होकार दर्शवला आणि नोटा जमा केल्या. पण तरीही माझ्या मनात शंका आली की आपले शिवाजीनगरच्या शाखेत खाते आहे. त्याविषयी चौकशी केल्यानंतर कॅशिअरने काहीच हरकत नसल्याचे सांगितले.

दोन ते तीन दिवसानी शिवाजीनगर शाखेत जाऊन मी माझे पासबुक भरून घेतले. पण, खात्यात फक्त पाच रुपये जमा झालेले होते. मी पुन्हा द्वारका येथील शाखेत जाऊन तेथील शाखाधिकाऱ्यांना भेटलो. त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यावर त्यांनी मला सांगितले की तुमचे खाते दुसऱ्या शाखेत आहे व तुम्ही येथे पैसे भरले त्यामुळे तुम्हाला पन्नास रुपये फी आकारण्यात आली आहे. पैसे भरूनही माझ्या हातात पाच रुपये आले होते. हे कळाल्यानंतर विचित्रच वाटले. कॅशिअरला याबाबत विचारपूस केली असल्याची माहिती मी त्यांना दिली. त्यावर शाखाधिकाऱ्याने कॅशिअरला दोन शब्द सुनावले खरे. पण माझं नुकसान भरून निघणारं नव्हतं.

पैसे कमी असो वा जास्त नुकसान तर आहेत ना! पण बँकांमधील अशा नियमांमुळे खातेधारकांना नेहमीच दंड किंवा फी आकारणीला तोंड द्यावे लागते. वास्तविक पाहायला गेले तर बँकांनी असे नियम बदलायला हवे. अन्यथा ग्रहकांचे असे नुकसान होतच राहिल. अशा नियमांमध्ये बदलासाठी नक्कीच विचार व्हायला हवा.

न‌ाशिककरांनो लिहिते व्हा!

खरेदी किंवा एखादी सेवा घेत असताना फसवणुकीचे वा खटकणारे अनुभव आले असतील, तर ते 'मटा'ला कळवा. 'ग्राहक देवो भवः'च्या माध्यमातून इतरांना ते सावधानतेचा इशारा देणारे ठरतील आणि ते योग्य ती खबरदारी घेऊ शकतील.
आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स तिसरा मजला, अल्फा स्क्वेअर, काठियावाड शोरूमच्या समोर, ऑफ कॉलेजरोड, नाशिक
समन्वयक : अश्विनी पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीकरांना प्रतीक्षा सर्व्हिस रोडची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

पंचवटी परिसरातील मुंबई महामार्गावरील दोन्ही बाजुंनी स‌र्व्हिस रोड होणार तसेच शहर वाहतुकीची बससेवा याच सर्व्हिस रोडने होणार असे स्वप्न पंचवटीमधील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून दाखविले जात आहे. मात्र, कुंभमेळा चार महिन्यांवर येऊन ठेपला तरी सर्व्हिस रोड होण्याची कोणतिही चिन्हे दिसत नसल्याने परिसरातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

के. के. वाघ कॉलेजजवळ कार आणि दुचाकी वाहने उभी करण्यासाठीच स‌र्व्हिस रोड बनविला की काय, असा प्रश्न नागरिकांना रोज पडतोय. कारण या रस्त्यावर दिवसभर वाहने उभी केली जातात. त्यामुळे ये-जा करणाऱ्यांना जीव मुठीत धरूनच रस्ता ओलांडावा लागतो. कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गर्दी असते. यात रिक्षा व इतर वाहनांची भर पडल्याने नेहमी वाहतूक कोंडी होते. याच कॉलेजसमोर स्टेडियम जवळील स‌र्व्हिस रोडचे काम ठप्प पडले आहे. या मार्गावर पाणी कायम असल्याने डासांचे साम्राज्य वाढले आहे. अस्वच्छता वाढून परिसराला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. निदान या ठिकाणी तरी स‌र्व्हिस रोडचे काम पूर्ण केले तर आडगावपासून येणाऱ्या सर्व नागिरकांना हिरावाडीकडे सहज शक्य होऊ शकेल, असे मत नागरिकांनी मांडले आहे. रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने औरंगाबाद नाक्याला वळसा घालून जावे लागतो. अमृतधाम परिसरातील नागरिकांना स्टेडियम व तरण तलावाकडे जा‌ण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. स‌र्व्हिस रोडचे काम मार्गी लावावे, अशी मागणी परिसरातील रहिवाशी नागरिकांकडून केली जात आहे.

महामार्ग जवळ असल्याने सर्व्हिस रोड होणे गरजेचे आहे. सर्व्हिस रोड झाल्यास प्रत्येक वेळी रोड ओलांडावा लागणार नाही. मीनाताई ठाकरे स्टेडियम व तरण तलावाकडे जाणे सोयीचे होईल. महापालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालून काम करावे.
- नितीन पाटील

ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागते. सर्व्हिस रोडचे काम अपूर्ण असल्याने नाशिकच्या दिशेने येणाऱ्या जनतेला घाणीचे साम्राज्याचे दर्शन होते. डासांचेही प्रमाण वाढले आहे.
- दशरथ पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लामरोडचा प्रवास होणार सुखकर

$
0
0

रस्ता रुंदीकरण-डांबरीकरणाचा आज मुहूर्त

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

लामरोड रुंदीकरण व डांबरीकरणास अखेर शुक्रवारचा (दि. २४) मुहूर्त लाभला आहे. गेल्या काही वर्षापासून प्रलंबित असलेल्या व आता सिंहस्थ निधीतून पूर्ण होत असलेल्या लामरोड रुंदीकरण केले जाणार आहे या कामाचा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.

लामरोडच्या रुंदीकरणासाठी नियोजन मंडळाकडे निधी मागणी करण्यात आली होती. बोर्डातील नगरसेवकांनी व प्रशासनाने पाठपुरावा केल्यानंतर सिंहस्थ निधीतून ५ कोटी २३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. यामध्ये पथदीप स्थलांतर, दुभाजक, रुंदीकरण, डांबरीकरण या कामांचा समावेश आहे. पर्यावरणवाद्यांनी मात्र नाहक या कामात वृक्षतोडीचा मुद्दा काढून हे काम लांबणीवर पडले. कॅन्टोन्मेन्टच्या कायद्यानुसार या हद्दीतील वृक्षतोडीचा अधिकार बोर्डाच्या अध्यक्षांकडे असल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्पेंद्रसिंह व उपाध्यक्ष सचिन ठाकरे यांसह नगरसेवकांनी संबधितांना पटवून दिले. कामासाठी आलेला निधी परत जाऊ नये यासाठी मार्ग काढत अखेर काम पूर्णत्वास नेण्याचे ठरविले. तसेच विजेच्या खांबांचे स्थलांतरण करण्यात येणार आहे.

यावेळी पालकमंत्री महाजन यांच्याशी कॅन्टेन्मेन्ट बोर्डाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व नगरसेवक विविध समस्यांसह निधीची उपलब्धता याबाबत चर्चा करणार आहे. त्यानंतर दुपारी भगूर येथील सावरकर स्मारकास भेट व भगूर नगरपालिकेच्या प्रश्नांविषयी चर्चा करणार आहे. लामरोड मार्गाच्या कामास खासदार हेमंत गोडसे, हरिश्चंद्र चव्हाण, शिवसेना उपनेते बबनराव घोलप, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, सीमा हिरे, राहुल आहेर, योगेश घोलप, अपूर्व हिरे, माजी खासदार राजाभाऊ गोडसे, माजी आमदार वसंत गिते, बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर संजीव तिवारी, उपाध्यक्ष सचिन ठाकरे आदी उपस्थित राहणार आहे‌त.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

र्यंबकेश्वरमध्ये सकाळेंचे वर्चस्व

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि एक पोटनिवडणूक अशा चारही ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. शिवाजी नगर ग्रामपंचायतीच्या तीन जागांची निवडणुक झाली व बाकी सर्व जागा बिनविरोध झालेल्या होत्या. शिवाजीनगर ग्रामपंचायतीच्या तीन जागांचे निकालासाठी ग्रामस्थांनी हजेरी लावली विशेषतः या तीनही जागा काँग्रेस तालुका अध्यक्ष संपतराव सकाळे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आल्या आहेत.

ग्रामपंचायत निकाल : शिवाजी नगर ग्रामपंचायत कुंडलीक काशिराम बेंडकोळी, हिराबाई पांडुंग पोटींदे, पार्वती राजु बेंडकोळी हे उमेदवार विजयी झाले, तर राजू विश्वनाथ बेंडकोळी, हिराबाई बेंडकाळी, भाऊराज चहाळे, पर्वाताबाई बेंडकोळी हे बिनविरोध निवड झाले आहेत. ग्रामपंचायत पेगलवाडी : झोले रविंद्र बाळु, झोले शांताराम किसन, हिराबाई मधुकर बदादे, वाळू रामा बदादे सर्व बिनविरोध आहेत. ग्रामपंचायत डहाळेवाडी विजयनगर-प्रमोद वसंत ढोंगे, वसंत निवृत्ती भांडकोळी, प्रकाश सुरेश खाडे सर्व बिनविरोध झाले आहेत. ग्रामपंचायत वाघेरा पोटनिवडणुक- रखमाबाई मुरलीधर वाडगावकर, माधुरी सोमनाथ बदादे बिनविरोध झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बागलाणमध्ये प्रस्थापितांना हादरा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या ३० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रस्थापितांना हादरा देणाऱ्या व नवोदितांना संधी देणाऱ्या या निवडणुकीने राजकीय समीकरणे बदलली आहेत. अत्यंत संवेदनशील असलेल्या लखमापूर, ताहाराबाद, नामपूर, ठेगोंडा, ब्राम्हणगांव, कोटबेल येथे सत्तांतर झाले आहे.

नामपूर, उत्राणे व ताहराबाद येथील तिघाही महिला जागांवर तिघा महिलांना समसमान मते मिळाली. त्यानंतर अक्षदा खांडवी या विद्यार्थिनीने काढलेल्या चिठ्ठीत नामपूर येथून करूणा प्रसाद अलई, उत्राणे येथील रेखा प्रभाकर पगार, तर ताहाराबाद येथील मालती पिरामण सोनवणे या तिघा महिला विजयी घोषित करण्यात आल्या.

द-हाणे ग्रामपंचातीच्या इंदिरा नगर वॉर्ड क्र. ३ मधून परशराम पांडुरंग पाकळे व भारती परशराम पाकळे हे पती-पत्नी विजयी झाले आहेत. बागलाण तालुक्यातील तालुका पातळीवर राजकीय दबदबा असलेल्या लखमापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मविप्रचे विद्यमान उपसभापती नानाजी दळवी व सखाराम दळवी यांचा पॅनलचा धुव्वा उडवित मविप्रचे माजी उपसभापती डॉ. विलास बच्छाव व संजय देवरे यांनी लखमापूर ग्रामपंचायतीत सत्ता हस्तगत केली आहे. उत्राणे ग्रामपंचायतीत विद्यमान जि. प. सदस्य यतीन पगार यांनी १२ पैकी ८ जागांवर विजय मिळवून उत्राणे ग्रामपंचायतीची सत्ता हस्तगत केली आहे.

ताहाराबाद ग्रामपंचायतीत कठगडक सोसायटीचे वर्चस्व असलेले के. पी. जाधव यांच्या पॅनलला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विद्यमान सरपंच संदीप साळवे, सीताराम साळवे, सचिन कोठावदे यांच्या दत्तकृपा पॅनलने १७ पैकी ११ जागांवर घवघवीत यश संपादन केले आहे. सोमपूर येथे विद्यमान सरंपच गिरीश भामरे यांच्या गटाला पराभवाला सामोरे जावे लागले असून, आदर्श पॅनलने सत्ता हस्तगत केली आहे.

जुनी शेमळी येथे भरत बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा पॅनलने ९ पैकी ६ जागांवर विजय मिळवून सत्ता हस्तगत केली आहे. कंधाणे येथे जि. प. सदस्य अनिल पाटील यांच्या जगदंबा पॅनलने घवघवीत यश मिळवून कधांणे ग्रामपंचायतीवर वर्चस्व निर्माण केले आहे. नामपूर ग्रामपंचायतीत अशोक सावंत व भाजपाचे अण्णा सांवत यांच्या पॅनलने सत्ता हस्तगत केली आहे. सटाणा शहरातून विजयी उमदेवारांनी पटाक्यांची आतषबाजी, गुलालांची उधळण करीत व घोषणांचा जयघोष करित आपला विजयाचा जल्लोष साजरा केला आहे. मतमोजणी येथील तहसिल कार्यालयात सकाळी १० वाजता सुरू होवून सांयकाळी ४ वाजता पूर्ण झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांनी कामकाज बघितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावांचे नेतृत्व नवोदितांच्या हाती!

$
0
0

अनिल कदमांना ओझरमध्ये झटका

लासलगाव : निफाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये प्रस्तापितांना जोरदार हादरा बसल्याचेही या निकालाहून स्पष्ट झाले आहे. ओझरमध्ये युवा नेते यतीन कदम यांच्या बाजूने जनतेचा कौल आला आहे. येथे शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये व यतीन कदम यांच्या पॅनलमध्ये थेट लढत पहावयास मिळाली आहे. ओझरला यतीन कदम यांचे ११ सदस्य निवडून आले आहेत. तर आमदार कदम गटाचे ६ सदस्य निवडून आले आहेत.

लासलगावमध्ये या अगोदर पाटील गटाच्या हाती ग्रामपालिकेची सत्ता राहिली होती. या निवडणुकीत मात्र मतदारांनी होळकर गटाच्या ग्रामविकस पॅनलच्या हाती सत्ता देऊन बदल घडवून आणला आहे. लासलगावमध्ये एकूण १७ जागांसाठी ग्रामविकास व समर्थ पॅनलमध्ये थेट लढत दिसून आली. ग्रामविकासने १७ जागांपैकी १० जागांवर दणदणीत विजय मिळवीत समर्थ पॅनलचा पराभव केला. ग्रामविकासचे जयदत्त होळकर यांच्यासह कुसुम होळकर, श्वेता मालपाणी, रोहिणी मोरे, स्नेहल ब्रम्हेचा, सचिन होळकर, श्रीहरी खैरनार, राणी शाह, गुलशन मन्सुरी, संगीता शेजवळ आदि दहा सदस्य बहुमताने निवडून आल्याने आता जयदत्त होळकर यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकासला सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. तर समर्थचे नेते नानासाहेब पाटील, डी. के. जगताप, सीना होळकर, प्रतिभा पानगव्हाणे, योगेश पाटील, संतोष पलोड, योगिता झांबरे हे सात सदस्य समर्थकडून निवडून आले आहेत. बहुमत नसल्याने आता समर्थच्या सदस्यांना विरोधकांची भूमिका बजावावी लागणार आहे.

बनकर गटाने मिळविला विजय

चापडगावला माजी आमदार दिलीप बनकर गटाने बाजी मारली. ७ पैकी ६ सदस्य बनकर गटाचे आले आहेत. विंचूरमध्ये एकूण १७ पैकी एक जागा बिनविरोध झाली तर उर्वरित १६ जागांसाठी मतदान झाले होते. विंचूर व टाकळीमध्ये वार्डवाईज लढती झाल्या. देवगावसह अनेक गावांमध्येही काही ठिकाणी सत्ताधारी गटांनी सत्ता राखली तर काही ठिकाणी प्रस्तापितांना मतदारांनी पायउतार केले आहे.


जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी परिवर्तनाच्या बाजूने कौल दिला आहे. नवोदितांना संधी देतानाच काही ठिकाणी ज्येष्ठ, तरुण व महिला यांना समसमान प्रमाणात संधी मिळाल्याचे दिसून येत आहे. हाणामारीचे किरकोळ प्रकार वगळता निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्ह्यात बुधवारी ५०२ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ७५ ते ८० टक्के मतदान झाले होते.


गोदाकाठ मात्र कदमांनीच राखला

एकीकडे लासलगावमध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनमताचा कौल दिसून आला असतांनाच ओझरमध्ये युवा नेते यतीन कदम यांच्या बाजूने जनतेचा कौल आला आहे. येथे शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये व यतीन कदम यांच्या पॅनलमध्ये थेट लढत पहावयास मिळाली आहे. ओझरला यतीन कदम यांचे ११ सदस्य निवडून आले आहेत. तर आमदार कदम गटाचे ६ सदस्य निवडून आले आहेत. बहुमताच्या जोरावर आता यतीन कदम सत्ता स्थापन करणार असल्याचे निकालाहून स्पष्ट झाले आहे. गोदाकाठातील अनेक गावांमध्ये अनिल कदम गटाने सत्ता राखण्यात यश मिळविले आहे. आमदार कदम यांच्या हातातून ओझर गेले असले तरी गोदाकाठातील अनेक गावांमध्ये आमदार कदम गटाची सत्ता आली आहे. यामध्ये करंजगाव, भुसे, म्हाळसाकोरे यांसह काही गावांचा समावेश आहे. करंजगाव अनिल कदम गटाचे १३ पैकी ११ सदस्य निवडून आले. भूसेमध्ये आमदार कदम गटाने सत्ता राखत जुन्या जाणत्यांना मतदारांनी घराचा रस्ता दाखवून युवा पिढीच्या हातात सत्तेची सूत्रे दिली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेसाठी ५४ जणांचे अर्ज

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी गुरूवारी ५४ जणांनी आपले अर्ज सादर केले. त्यामुळे आतापर्यंत ९१ अर्ज दाखल झाले असून शुक्रवार (दि. २४) अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे. दरम्यान गुरुवारी अॅड. सुनील ढिकले, आमदार जे. पी. गावीत, प्रिया वडजे, परवेझ कोकणी यांनी अर्ज दाखल केले आहेत.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी चौथा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले. तब्बल ५४ उमेदवारांनी गुरुवारी अर्ज दाखल केले. आतापर्यंत देवीदास पिंगळे, अॅड. माणिकराव कोकाटे, शोभा बच्छाव, चंद्रकांत गोगड, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, दीपक गोगड, संदीप गुळवे, अद्वय हिरे, शिवाजी चुंबळे माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्यासह दत्ता गायकवाड, सुहास कांदे, कोंडाजी मामा आव्हाड, प्रकाश उबाडे, आमदार सिमा हिरे या प्रमुख उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. गुरुवारी अॅड. सुनील ढिकले, आमदार जे. पी. गावीत, प्रिया वडजे, परवेझ कोकणी, शेखर ढिकले, कैलास शिंदे, धनंजय पवार, योगेश हिरे, रतन निकम, शैलेश सूर्यवंशी, मनीषा पगार अशा तब्बल ५४ जणांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे दाखल अर्जाची संख्या ९१ इतकी झाली आहे. तर ३६० अर्जांची विक्री झाली आहे.

आज शेवटचा दिवस

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची शुक्रवार शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी अर्जांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ग्रामपचायंतीच्या निवडणुका संपल्याने आता जिल्हा बँकेच्या राजकारणाकडे इच्छुक वळणार आहे. त्यामुळे शुक्रवारी जिल्हा बँकेला यात्रेचे स्वरूप येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटक लुटीच्या घटनेचा गुंता कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मॉरेशियसमधून भारतात आलेल्या एका वृध्द दाम्पत्यांची मुंबई नाका परिसरात टॅक्सी चालकाने लूट केल्याच्या घटनेचा गुंता कायम आहे. पोलिसांनी माजगावला जाऊन चौकशी केली. मात्र, त्यात काहीही निष्पन्न झाले नाही. तक्रारदार महिलाही मुंबईला गेली असून या गुन्ह्याचा नेमका उलगडा कसा करायचा असा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाला आहे.

मॉरिशेसमध्ये राहणाऱ्या बेबी फैजा अब्दुला खान (७१) आणि त्यांच्या पतीला शनिवारी सांयकाळी मुंबई नाका येथे माजगाव येथील टॅक्सी चालकाने लुटल्याची तक्रार भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली. मॉरेशियसमध्ये जेलरच्या कामातून निवृत्त झालेले खान दाम्पत्य नेहमीच भारतातील विविध दर्ग्यांना भेट देण्यासाठी येतात. दोन वर्षापूर्वी भारतात आले असता ते मुंबईतील डोंगरी परिसरात राहिले. त्यावेळी माजगाव परिसरात राहणाऱ्या अख्तर चौगुले या टॅक्सीचालकाने त्यांना पुणे येथील काही दर्गांमध्ये नेले. परतीच्या प्रवासात चौगुलने शीतपेय दिल्यानंतर खान दांम्पत्य झोपी गेले. या दरम्यान, चौगुलने त्यांच्याकडील दोन हजार डॉलरसह एक मोबाईलची चोरी केली. चोरीच्या घटनेनंतर मॉरशिस गाठलेले पती-पत्नी १७ एप्रिल २०१५ रोजी पुन्हा मुंबईत परत आले. भेंडी बाजार येथे संशयित चौगुले त्यांना दिसून आला. चोरीच्या घटनेबाबत विचारणा केली असता पैसे देतो, असे सांगत चौगुले त्यांना त्याच्या घरी, माजगावला घेऊन गेला. तेथील पाहुणचार आटोपल्यानंतर चौगुलेने खान दाम्पत्यांला विविध दर्ग्यांना जाऊ असे सांगितले. संशयित आरोपी गेल्या शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मुंबई नाका येथील सैलानी बाबा दर्गेजवळ पोहचला. तिथे त्याने खान दाम्पत्यांस दमबाजी केली. तुम्हाला ड्रग्जच्या खोट्या केसमध्ये अडकवतो, असे सांगून त्याने दोघा वृध्दांकडून सोन्याचे दागिने, अमेरिकन डॉलर असा ७० हजार रुपयांचा मुद्देमाल काढून घेतला. यानंतर शहरातील एका नातेवाईकाच्या मदतीने खान दाम्पत्य भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गेले. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी माजगाव येथे पथक पाठवले. मात्र, महिलेने दिलेला पत्ता मिळून आला नाही. तसेच परदेशी महिलेच्या शहरातील नातेवाईकांनी टॅक्सी चालकाचा फोटो असल्याचे सांगितले. मात्र, तेही त्याचा फोटो पोलिस स्टेशनमध्ये घेऊन आले नाहीत. दरम्यान तक्रार देऊन संबंधित दांम्पत्य मुंबईला निघून गेल्याने संशयितांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्य परिषदेची नाशिकरोडला मुहूर्तमेढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

साहित्याचा प्रसार करणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) नाशिकरोड शाखेला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे साहित्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.

घुमानच्या साहित्य संमेलनावर आधारित अनुभव कथनाचा कार्यक्रम येत्या २९ एप्रिल रोजी सायंकाळी पाचला नाशिकरोड येथील ऋतुरंग भवनमध्ये होणार आहे. त्यावेळी या शाखेची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती शाखेची मुहूर्तमेढ रोवणारे साहित्यप्रेमी आणि वास्तुविशारद उन्मेष गायधनी यांनी दिली.

मसापच्या कार्यकारिणीची बैठक पुण्यात 26 एप्रिलला होणार आहे. त्यावेळी शाखेच्या परवानगीवर शिक्कामोर्तब होणार आहे. परिषदेने कुरिअरद्वारा पाठवलेले पत्र नाशिकरोड शाखेला गुरुवारी मिळाले. त्यासोबत घटनापत्राची प्रतही आहे. गायधनी यांच्या नावे आलेल्या या पत्रात (जावक क्रं. १७/१५-१६) शाखेची बैठक बोलावून कार्यकारी मंडळाची निवड करावी तसेच राष्ट्रीयकृत बँकेच खाते उघडण्याची प्रक्रिया करावी अशी सूचना आहे. पत्रावर कोषाध्यक्ष सुनील महाजन यांची सही आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मीरा बोरवणकरांना जेलकडूनच सरप्राईज!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोड कारागृहाला राज्याच्या अप्पर पोलिस महासंचालक (कारागृह) मीरा बोरवणकर यांनी गुरुवारी सरप्राईज व्हिजीट दिली. मात्र, नाशिकचे वरिष्ठ पोलिस अधिकारी, बॉम्बशोध आणि श्वानपथक आदींनी आठ तास कसून तपासणी करूनही आक्षेपार्ह आढळले नाही. 'खोदा पहाड निकला चूहाँ' असे देखील घडले नाही. त्यामुळे बोरवणकरांबरोबरच खमंग बातमीच्या आशेने दिवसभर ठिय्या दिलेल्या मीडियावरच आश्चर्यचकित होण्याची वेळ आली.

नागपूरच्या कारागृहातून पाच कैदी पळून गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेथे अचानक भेट दिली होती. राज्यातील कारागृहांची सुरक्षा आणि कारभाराचे आडिट करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे नाशिकरोडला चेकींग होणार हे गृहीतच होते. नाशिकरोड कारागृहात कैद्यांकडे मोबाईल, निरोधची पाकिटे, शस्त्रे सापडली होती. खून, गँगवार, कैदी पलायन यामुळे कारागृह चर्चेत असते. त्या पार्श्वभूमीवर भले मोठे घबाड सापडेल, एखादा तरी अधिकारी सस्पेन्ड होणार ही आशा फोल ठरली.

पोलिसांचा ताफा

मीरा बोरवणकर सकाळी साडेदहाला कारागृहात आल्या. त्यांच्यासमवेत पुण्याचे विशेष पथक, नाशिकचे सहाय्यक आयुक्त अतुल झेंडे, गुन्हा शाखेचे सहाय्यक आयुक्त गोरे, उपायुक्त संदीप दिवाण, नाशिकरोडचे पोलिस निरीक्षक नारायण न्याहाळदे, उपनगर, अंबड आदी ठिकाणचे पोलिस अधिकारी व कर्मचारी, बांबशोध पथक, श्वान पथक असा मोठा ताफा होता.

इंच-इंचची तपासणी

पथकाने कारागृहातील जमीन व फरशा उकरल्या. छतावर जाऊन पाहणी केली. पाण्याचा साठे तपासले. कारखाने व बराकींची बारकाईने तपासणी केली. कारागृहाची इंचन इंच तपासणी केली. सकाळी साडेदहा ते रात्री आठपर्यंत मॅरेथान तपासणी सुरु होती. रात्री सव्वा आठला मॅडम गेल्यानंतर अधिकाऱ्यांनी सुस्कारा सोडला. कारागृह अधीक्षक जयंत नाईक, वरिष्ठ तुरुंगाधिकारी सुनिल कुवर, तुरुंगाधिकारी संदानशिव यांच्या मार्गदर्शनाखाली अंतर्गत सुरक्षा अधिकारी चोख काम बजावत असल्यानेच या छाप्यात एकही वस्तू सापडली नसल्याचा दावा कारागृहाच्या सूत्रांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठक्कर बाजारमध्ये युवतीचा विनयभंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुणे येथे जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करणाऱ्या युवतीचा टवाळखोरांनी विनयभंग केल्याची घटना बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ठक्कर बाजार येथे घडली. यामुळे बस स्टॉपवरील रोडरोमियोंचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, रात्रीच्या वेळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जाते आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की पीडित तरूणी पुणे येथे जाण्यासाठी रात्री ठक्कर बाजार येथे पोहचली. बसची प्रतीक्षा करीत असताना तेथे आलेल्या दोन अज्ञात युवकांपैकी एकाने तरुणीच्या खांद्यावर हात ठेऊन अश्लील चाळे केले. तरूणीने प्रतिकार केला असता रोडरोमियोंनी पळ काढला. या प्रकरणी पीडित तरूणीने दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, यामुळे रात्रीच्या वेळी प्रवाशांना होणाऱ्या त्रासावर प्रकाश पडला आहे. ठक्कर बाजार येथे रात्रभर अवैध प्रवाशी वाहतूक सुरू असते. अनेक टवाळखोर रात्रीच्या वेळी या परिसरात जमून धिंगाणा घालतात. एकट्या महिलांना प्रवास करताना जीव मुठीत धरावा लागतो. महिला बस वाहकांना देखील रोडरोमियोंच्या त्रासाला सामोरे जावे लागते. सरकारवाडा पोलिसांनी या ठिकाणी पोलिस चौकी सुरू केली असली तरी कर्मचाऱ्यांचा सातत्याने अभाव असतो. सध्या, सुटीचा कालावधी असून प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी ठक्कर बाजारसह, महामार्ग, ना​शिकरोड व इतर महत्वाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवावा व प्रवाशांसाठी बस स्थानकावर पोलिस हेल्पलाईन सुविधा सुरू करण्याची मागणी केली जाते आहे.

डेबिट कार्ड हॅक

डेबिट कार्ड हॅक करून त्याआधारे एकाच्या खात्यातील ९९ हजार ८४३ हजार रूपये काढून घेण्यात आले. ही घटना २१ ​एप्रिलरोजी राजीव गांधी भवनसमोरील एका बँकेत घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये आयटी अॅक्टच्या कलम ४३ व ६६ सीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंधर्वनगरीत शनिवारपासून बालाजी मंदिर महोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंधर्वनगरी येथील बालाजी सोशल फाउंडेशनच्या वतीने प्रती बालाजी मंद‌िराच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत २५ एप्र‌‌िल रोजी मोफत आरोग्य तपासणी व सर्व रोग निदान शिबिर होणार असून, २६ एप्रिल रोजी ओपन रोलर रोड स्के‌टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २५ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत होणाऱ्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात अॅजियोग्राफी, अॅजियोप्लास्टी, बायपास, वॉल बदलणे, डिव्हाईस क्लोजर, दुर्बीणीद्वारे किडनीतील व मुत्रमार्गातील मुतखडे अशा व इतर आजारांचे मोफत तपासणी शिबिर होणार आहे. तसेच रविवारी २६ एप्रिल रोजी ओपन रोलर स्केटींग कॉम्पिटीशनचे आयोजन करण्यात आले आहे. ही कॉम्पिटीशन सकाळी ६ ते १० या वेळेत होणार आहे. तसेच सकाळी ११ ते २ या वेळेत डायव्हींग कॉम्पिटीशनचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे १ मे व २ मे रोजी धार्मिक कार्यक्रम होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन बालाजी सोशल फाऊंडेशनचे कैलास मुदलीयार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तवेरा नदीपात्रात कोसळून राजीवनगरमधील एकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक/ संगमनेर

भरधाव वेगात चालकाचा ताबा सुटून वाहन नदीपात्रात कोसळून झालेल्या अपघातात राजीवननगर परिसरातील एका व्यक्तिचा मृत्यु झाला. मुलाला मुलगी पाहण्यासाठी एकाच कुंटुबातील तिघेजण पुण्याला जात असताना चंदनापूरी घाटातील जावळेवस्तीनजीक सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

दिनकर मधुकर पाटील (५४) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तिचे नाव आहे. जखमींमध्ये गौरव दिनकर पाटील (२७), विलास मधुकर पाटील (५७) आणि वाहनचालक मनोज छगन आहेर यांचा समावेश आहे. इगतपुरी येथील महिंद्रा अॅण्ड महिंद्र कंपनीत सर्व्हिसला असलेल्या दिनकर पाटील यांचा मुलगा गौरव यास मुलगी पाहण्यासाठी हे चौघे (पुणे) येथे जाण्यास निघाले होते. आज, सकाळी चंदनापुरी येथील जावळेवस्तीनजीक वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याचे वाहन नदीकाठावरील कठडे तोडून खाली कोसळली. या ठिकाणी पुलाचे काम सुरू असल्याने पुलाखाली मोठ्या प्रमाणावर लोखंडी सळ्या ठेवलेल्या होत्या. त्या थेट गाडीत घुसल्या. या भीषण अपघातात दिनकर मधुकर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर आजूबाजूच्या व येथील कामगारांनी जखमींना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथून जखमींना खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. वाहनचालकाची पुरेशी झोप झालेली नसल्याने हा अपघात झाला असावा, अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. गावितांचा जबाब सुरू

$
0
0

पाचपुतेंना ३० एप्रिलपर्यंत मुदत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विकास विभागातील भ्रष्टाराचाराच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या निवृत्त न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड समितीने तक्रारदारांचे जबाब नोंदवण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यत ३० जणांचे जबाब समितीने नोंदविले आहेत. दरम्यान, गुलाबराव पवार यांच्या तक्रारीत थेट उल्लेख असलेले माजी आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते यांचेही जाबजबाब नोंदविण्यास सुरूवात झाली आहे. पाचपुतेंना ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

आदिवासी विभागात सन २००४ ते २००९-१० मधील कथित भ्रष्ट्राचार प्रकरणी शासनाने चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्ती एम. जी.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली आहे. या समितीकडे आतापर्यंत ३१ तक्रारी प्राप्त झाल्या असून, या तक्रारदारांची उलटतपासणी सुरू आहे. तक्रारदारांनी दाखल केलेल्या शपथपत्रावर साक्षिदारांचे जबाब नोंदविले जात आहे. याचिकाकर्ते आणि तक्रारदार गुलाब पवार यांनी आपल्या शपथपत्रात थेट माजी मंत्री डॉ. गावित आणि पाचपुते यांच्यासह माजी आमदार शरद गावित यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे या तिघांना साक्ष देण्यासाठी समितीने पंधरा दिवसांपूर्वीच समन्स काढले होते. १६ एप्रिलला डॉ. गावित आणि शरद गावितांतर्फे अॅड प्रवीण पाटील यांनी बाजू मांडत खुलासा केला. गुरूवारी पाच तक्रारदारांचे जबाब नोंदविण्यात आलेत. त्यात किशोर देविदास पाटील, देवमन चौरे, संतोष धनगर, नागराज पाटील, सयाजीराव मोरे यांनी जबाब दाखल केले. सोबतच डॉ.गावितांच्या वतीने अॅड प्रवीण पाटील यांनी झालेल्या आरोंपावर आपली बाजू मांडली. तर चौकशी आयोगातर्फे अॅड. एस. बी .टर्ले यांनी उलटतपासणी केली.आदिवासी विभागाच्या वतीने सरकारी वकील श्रीधर माने यांनी, तर आदिवासी महामंडळातर्फे एस. एस. कोतवाल यांनी बाजू मांडली. आतापर्यंत तब्बल ३० तक्रारदारांचे जबाब नोंदविण्यात आले असून, शुक्रवारी आणखी चार जणांचे जबाब नोंदविण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images