Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सिंहस्थाची कामे वेळेत पूर्ण करा

$
0
0



नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. सोबतच रामकुंडाचा परिसर स्वच्छ व सुशोभित करण्यासाठी एजन्सीला काम देण्यात येणार असल्याचे सांगून नाशिकची गुन्हेगारी लागलीच कमी होणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. मे पर्यंत कामे झाली नाही तर जास्तीत जास्त जूनपर्यंत ती पूर्ण केली जातील, असे त्यांनी सांगीतले. सोबतच मुख्य शाहिस्नानाचे स्थान असलेल्या रामकुंडाची स्वच्छतेची स्वतंत्र निविदा काढण्यात येणार असून एका एजन्सीलाच स्वच्छतेचे काम देण्यात येणार आहे. त्यामुळे हा परिसर सिंहस्थापूर्वीच स्वच्छ होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासोबत नाशिकच्या गुन्हेगारी संदर्भात त्यांनी आयुक्तांची पाठराखण केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिंहस्थासाठी ३१० कोटींचा निधी

$
0
0



नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यांतर्गत सुरू असलेल्या कामांसाठी भासणारी निधीची चणचण दूर होणार आहे. निधी अभावी कामे खोळंबून राहू नयेत, यासाठी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने ३०१ कोटी ३० लाख एक हजार रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे कामांना गती मिळणे शक्य आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये विविध विकासकामे सुरू आहेत. पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी पाटबंधारे, सार्वजनिक बांधकामासह विविध विभागांना निधीची चणचण भासत होती. नगरविकास विभागाने निधी उपलब्ध करून दिल्याने ही कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘क्राऊड’ मॅनेजमेंट अधांतरीच

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेल्वे स्थानकावरील 'क्राऊड मॅनेजमेंट' प्रशासनासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. रेल्वेची प्रवासी वाहतूकीची क्षमता, उपलब्ध प्लॅटफॉर्मस आणि त्यावर होणारी भाविकांच्या गर्दीचे गणित जुळविण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सादर केलेल्या आढाव्यातून सिंहस्थाच्या केंद्रीय समितीचे समाधान होऊ शकलेले नाही. म्हणून लवकरच नाशिकरोड रेल्वे स्टेशनची पाहणी आणि क्राऊड मॅनेजमेंटसंबंधी स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेली कामे मुदतीत पूर्ण होतील याची दक्षता घेण्यासाठी केंद्रीय समिती स्थापन करण्यात आली आहे. सावर्जनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद कुलकर्णी हे या समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासह नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, पोलिस गृहनिर्माण विभागाचे व्यवस्थापकीय संचालक अरुप पटनाईक, राजमाता जिजाऊ महिला व बालकल्याण संस्थेच्या महासंचालक वंदना कृष्ण यासह विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी ‌दीपेन्द्रसिंह कुशवाह, विशेष पोलिस महानिरीक्षक जयजीत सिंह, पोलिस आयुक्त जगन्नाथन आदी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सकाळी साडेअकराला ही बैठक झाली. त्यास जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, आरोग्य विभाग, पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग यांसारख्या सर्वच प्रमुख विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पर्वणी काळात देशभरातून ८० लाख ते १ कोटी भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होतील, असा जिल्हा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यापैकी ३० टक्के लोक रेल्वेद्वारे येतील, अशी शक्यता गृहीत धरली तरी किमान २५ ते ३० लाख लोक याकाळात रेल्वेने शहरात दाखल होतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. मात्र, एका दिवसात जास्तीत ७५ हजार भाविकांना घेऊन येण्याची क्षमता असल्याचे रेल्वेसूत्रांचे म्हणणे आहे. प्लॅटफॉर्मवर किती प्रवाशी थांबू शकतात, त्यांना स्थानकातून बाहेर पडण्यास किती वेळ लागेल, दिवसभरात किती लोक रेल्वेने नाशिकमध्ये येतील, किती लोक शहरातून बाहेर पडतील, कोठून किती गाड्या नाशिकमध्ये येणार, स्थानकात जास्तीत जास्त किती लोक थांबू शकतात यांसारख्या बाबींची मा‌हिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कामांच्या पूर्णतेसाठी तारीख पे तारीख

सिंहस्थात सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, महापालिका, महावितरण यांसह विविध विभागांकडून कामे सुरू असली तरी बहुतांश कामे पूर्ण होण्याची मुदत संपून गेली आहे. काही कामांना ३० मार्च पर्यंतची मुदत देण्यात आली होती. ती वाढवून १५ ते २० एप्रिल करण्यात आली. त्यानंतर ती पुन्हा वाढवून ३० एप्रिल करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात होते. मात्र, आता अशी सर्व कामे प्रूर्ण करण्यासाठी कुलकर्णी यांनी समितीला २५ ते ३१ मे पर्यंतची मुदत दिली आहे. ही कामे मुदतीत करवून घेण्याची जबाबदारी समितीवर आहे. कामे पूर्ण होण्यास दिरंगाई होत असली तरी त्याबाबत कानउघाडणी करण्याऐवजी अधिकाऱ्यांची पाठराखण करण्याचे धोरण समितीकडून अवलंबले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सारोळेकरांची प्रशासनाकडून दखल

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अवकाळीची मदतीकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्यासह मंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याचा सारोळे खुर्दच्या ग्रामस्थांच्या इशाऱ्याची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. निफाडच्या प्रांतांसह तहसीलदारांनी तात्काळ सारोळेग्रस्तांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली असून, शासनाच्या अध्यादेशाप्रमाणे तत्काळ मदतीचे आश्वासन दिले आहे. 'मटा'ने ग्रामस्थांच्या व्यथेला वाचा फोडली होती.

गारपीटग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी महिनाभरापूर्वी नाशिक दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी फसवणूक केल्याचा आरोप निफाड तालुक्यातील सारोळे खुर्दच्या ग्रामस्थांनी केला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मदत मिळेल, असे आश्वासन देवून गेलेल्या सिंह यांची पाठ फिरून महिना लोटला तरी मदतीचा छदामही मिळाला नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी सिंह यांच्यासह महसूलमंत्री एकनाथ खडसे, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. या संदर्भातील वृत्त मटाने प्रकाशित करताच जिल्हा प्रशासन खळबळून जागे झाले होते. निफाडचे तहसीलदार संदीप आहेर यांनी सारोळे करांशी संपर्क साधून त्यांनी कोणतेही पाऊल उचलू नये, अशी विंनती केली आहे. तर प्रांत शशिकांत मंगरूळे यांनी संरपच कैलास भोसले यांच्याशी संपर्क करून तेरा एप्रिलच्या आदेशाप्रमाणे तत्काळ मदत करण्यात येईल, असे आश्वासन दिले. एक आठवडा ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला मुदत देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मोबाइल लर्निंग व्हॅन’ची चौकशी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात मोबाइल लर्निंग व्हॅन धूळखात असल्याची बाब 'मटा'ने चव्हाट्यावर आणल्यानंतर विद्यापीठ प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, या संबंधीचा विस्तृत अहवाल कुलगुरुंनी मागवला आहे.

शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहचविण्याचाच एक भाग म्हणून आदिवासी भागात कम्प्युटर साक्षरतेसाठी मुक्त विद्यापीठाने मोबाइल लर्निंग व्हॅनची संकल्पना मांडली. विशेष म्हणजे, कॉमनवेल्थ यूथ प्रोग्राम आशिया केंद्र आणि पवार ट्रस्ट यांनी त्यास तातडीने मदतीचा हात दिला. प्रत्येकी एक व्हॅन विद्यापीठाच्या हवाली केली. मोबाइल व्हॅनमध्ये काही कॉम्प्युटर्स ठेवून ती व्हॅन आदिवासी भागामध्ये नेली जायची. व्हॅनमध्ये प्रत्यक्ष येऊन विद्यार्थ्यांना कम्प्युटरची माहिती दिली जायची. या उपक्रमाद्वारे आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत थेट कॉम्प्युटर पोहचतानाच कम्प्युटर शिकण्याची आवडही त्यांच्यामध्ये निर्माण होत असल्याचे दिसून आले.

मात्र, विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा फटका या अभिनव संकल्पनेला बसल्यामुळेच विद्यापीठाकडे असलेल्या दोन्ही व्हॅन्स सध्या चक्क 'मुक्त'पणे विद्यापीठाच्याच आवारात धूळखात असल्याचे चित्र आहे. हा प्रकार 'मटा'ने उघडकीस आणला. या प्रकरणाची गंभीर दखल कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी घेतली आहे. या व्हॅन धूळखात का आहेत, असा सवाल उपस्थित करीत कुलगुरुंनी या साऱ्याच प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश केले आहेत. तसेच, या व्हॅन्स सुरू करण्याबाबत नियोजन करण्याचेही निर्देश कुलगुरुंनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मित्रांची ‘मजा’ कंपन्यांना ‘सजा’

$
0
0



ऑर्डर न देताच घरपोहच येतात वस्तू

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्मार्टफोन, इंटरनेट आणि विविध वस्तूंची ऑनलाइन विक्री करणाऱ्या कंपनीच्या अॅप्लिकेशनच्या मदतीने ओळखीच्या किंवा मित्रांच्या घराच्या पत्त्याचा वापर करून परस्पर ऑर्डर देण्याच्या गंमती-जमती सध्या शहरात घडत आहेत. यामुळे ऑनलाइन कंपनीची दमछाक होत आहे, तर ऑर्डर न देताच वस्तू घेण्याची वेळ आल्याने अनेकांची भंबेरी उडते.

ऑनलाइन वस्तूंची खरेदी-विक्री होण्याचे प्रमाण शहरात वाढले आहे. स्मार्टफोन व इंटरनेटची उपलब्ध सहजतेने होत असून, त्याचा फायदा ऑनलाइन व्यवहारांना होत आहे. काही म​हिन्यापासून जुन्या वस्तूंची खरेदी विक्रीनेही जोर पकडला आहे. या व्यवहारासाठी सुरुवातीस मोबाइलनंबर देण्याची आवश्यकता होती. तसेच, तो नंबर सर्वांना उपलब्ध होत होता. याचा फायदा घेत काही जण दुसऱ्याच्या कारचा फोटो अपलोड करून तिसऱ्याचा नंबर देऊन मोकळे होत होते. अर्थात ज्याचा मोबाइल नंबर डिस्प्ले होत होता, त्याच्या त्रासाला परिसीमा नव्हती. नंतर यात सुधारणा करण्यात आली. सध्या ग्राहकांना चॅटचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. आता, टाईमपास शोधणाऱ्यांनी वस्तूंची ऑनलाइन विक्री करणाऱ्या बेवसाईडकडे लक्ष वळवले आहे. स्मार्टफोन, इंटरनेट व संबंधित कंपनीच्या अॅप्लिकेशनद्वारे एकमेकांना फसवण्याचा उद्योग केला जात आहे. काही दिवसांपूर्वी हिरावाडी भागात राहणाऱ्या सागर हिंगमिरे यांच्या घरावर आलेल्या सेल्समनने ऑर्डर हातात देऊन एक हजार रुपयांची मागणी केली. संबंधित वस्तूंची सागर किंवा त्याच्या कुंटुंबीयांपैकी एकानेही ऑर्डर दिलेली नव्हती. परिणामी, तोही बुचकळ्यात पडला. वस्तूच्या पॅकिंगवर लावलेल्या बिलात त्याच्या मित्राचा इमेल आयडी होता. सदर मेल आयडीवरून आपली फसगत करण्यासाठी कोणीतरी परस्पर ऑर्डर दिल्याचे सागरच्या लक्षात आल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.

गंमत ठरतेय डोकेदुखी

ऑनलाइन वस्तू खरेदी करताना मोबाइल नंबर, इमेल आयडी व डिटेल पत्त्याची आवश्यकता असते. गंमत म्हणून केल्या जाणाऱ्या या प्रकारामुळे ऑनलाइन वस्तू पुरवणारे डिलेव्हरी बॉईज मात्र वैतागले आहेत. दिवसभरात एका ठिकाणी जरी असा प्रकार घडल्यास आर्थिक फटका बसत असल्याचे डिलेव्हरी बॉईज म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक्झिबिशन सेंटरला अखेर मुहूर्त

$
0
0


मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच होणार भूमिपूजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उद्योगासह कुठल्याही क्षेत्रातील प्रदर्शने आयोजित करण्यासाठी नाशिकमध्ये पर्मनंट एक्झिबिशन सेंटर साकारण्याच्या प्रक्रियेला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. लवकरच या सेंटरसाठीच्या सुमारे ८२ एकर जागेवर सेंटरचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येईल, अशीही घोषणा देसाई यांनी केली.

'निमा इंडेक्स २०१५' च्या प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी देसाई बोलत होते. देशाच्या औद्योगिक नकाशावर वेगाने विस्तारणाऱ्या नाशिकमध्ये सातत्याने प्रदर्शने आयोजित करण्यात येतात. मात्र, यासाठी स्थिर जागा नसल्याने आयोजकांच्या क्षमतेनुसार या जागांमध्ये वेळोवेळी बदल केला जातो. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांची आणि आयोजकांची गैरसोय टाळण्यासाठी कायमस्वरूपी एक्झिबिशन सेंटरची मागणी औद्योगिक क्षेत्रातील संघटनांच्या वतीने वारंवार करण्यात आली. २००९ च्या औद्योगिक धोरणामध्येही या मुद्द्याचा समावेश करण्यात आला होता. मात्र, तेव्हापासून केवळ कागदावरच राहिलेली ही घोषणा आता प्रत्यक्षात उतरण्याची आशा निर्माण झाली आहे.

उद्योगास चालना देणाऱ्या प्रदर्शनांच्या सोबतीलाच या दृष्टीने मंथन घडविणारी व्याख्याने, चर्चासत्रे आदी उपक्रमांसाठी या सेंटरचा उपयोग होणार आहे. जिंदाल सॉ लि. कंपनीचे नाशिकचे अध्यक्ष दिनेशचंद्र सिन्हा, एचएएलच्या नाशिक शाखेचे व्यवस्थापक आर. नारायणन निमाचे अध्यक्ष रवी वर्मा, उपाध्यक्ष संजीव नारंग, सरचिटणीस मंगेश पाटणकर, प्रदर्शन समितीचे अध्यक्ष एच. बी. थाँटेश, विवेक पाटील उपस्थित होते.

जिल्ह्यात ४८० नवक्षेत्र

दिंडोरीसह येवला, मालेगाव आणि सिन्नर या परिसरात उद्योगांसाठी ४८० नवक्षेत्र उपलब्ध होणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. परिणामी, नाशिक जिल्ह्यातही उद्योगांना चालना मिळण्याचा आशावाद देसाई यांनी व्यक्त केला.

`त्या` भूखंडांचे होणार फेरवाटप

केवळ कागदावरती उद्योगाचे प्रस्ताव दाखवून बड्या उद्योजकांनी मोठ्या प्रमाणावर भूखंड लाटले आहेत. नाशिकमध्ये अशा १०७ भूखंडांचा समावेश होता. उद्योजकांच्या नाकर्तेपणामुळे सरकारने ते आता ताब्यात घेतले असून, केवळ जागेअभावी उद्योजकतेपासून दूर राहणाऱ्या नवउद्योजकांना हे भूखंड देणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. नव्याने या भूखंडांचे फेरवाटप करतानाही मर्यादीत कालावधीत येथून उत्पादन होणे अपेक्षित असण्यच्या लेखी अटीवरच हे फेरवाटप होईल, अन्यथा हे भूखंड सरकार पुन्हा ताब्यात घेईल असेही देसाई म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारागृहातील कैद्याचा खूनच

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात ९ जुलै २०१४ रोजी पाण्याच्या टाकीत आत्महत्या केलेल्या कैद्याचा खून झाल्याचा गुन्हा शुक्रवारी रात्री नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात झाला.

राज्याच्या कारागृह अप्पर पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी, बॉम्बशोध आणि श्वान पथकाने गुरुवारी या कारागृहाची कसून तपासणी केली होती. ९ जुलै २०१४ ला सकाळी नागो ऊर्फ नाना नामदेव पाटील (४७, साईराज अपार्टमेंट, सूरत) या कैद्याचा मृतदेह मंडल क्रमांक ७, यार्ड क्रमांक ५ नजीकच्या बॅरक क्रमांक १ मागील शौचालयाच्या छतावरील पाचशे लीटरच्या टाकीत आढळला होता. तेव्हा अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. हा कैदी सुरक्षारक्षकांची नजर चुकून वर गेलाच कसा, त्याने आत्महत्या का केली हा प्रश्न कायम होता. त्याच्या पोस्ट मार्टम रिपोर्टचा अहवाल तहसीलदारांकडे गेल्यानंतर त्यांना काही गोष्ट खटकल्यामुळे त्यांनी खुनाचा गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोळा कोटींचे सोने लुटले

$
0
0



वाडीवऱ्हे परिसरात हायवेवर सिनेस्टाइल प्रकार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक/घोटी

मुंबईतील एका खासगी कंपनीचे शिरपूर येथील गोल्ड रिफायनरीमध्ये जाणारे ५८ किलो सोने दरोडेखोरांच्या टोळीने शुक्रवारी पहाटे लुटले. मुंबई-आग्रा हायवेवरील वाडीवऱ्हे परिसरात हा प्रकार घडला. बाजारभावानुसार या सोन्याची किंमत १६ कोटी २८ लाख रुपये आहे. चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी सात पथके रवाना केली आहेत.

नाशिकपासून १६ किलोमीटरवरील वाडीवऱ्हे परिसरात पहाटे साडेतीनच्या सुमारास घटना घडली. अंधेरी येथून झी गोल्ड कंपनीची सिकेल लॉजिस्टीक ही व्हॅन ६० किलो सोन्याचे बिस्कीटे घेऊन धुळे जिल्ह्यातील शिरपूर गोल्ड रिफायनरीमध्ये चालली होती. प्रत्येक बिस्कीटचे वजन एक किलो होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास वाडीवऱ्हे शिवारात एक सफेद कार व्हॅन आडवी झाली. कारमधून पाच जण खाली उतरले. आम्ही पोलिस असून, या वाहनातून चोरीच्या मालाची तस्करी होत असल्याचे सांगून त्यांनी गाडीतील कर्मचाऱ्यांना धमकावले. त्यानंतर वाहनातील वाहनचालक, दोघे सुरक्षा कर्मचारी आणि डिलेव्हरी सहाय्यक समीर पिंजारे गोंधळात पडले. मालाची शहानिशा करण्यासाठी लॉजिस्टीक व्हॅन पोलिस स्टेशनला नेण्याचा फतवा चोरट्यांनी सोडला. त्यानंतर त्यांनी गाडीतील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. बंदुकीचा धाक दाखवून कर्मचाऱ्यांना टेपच्या सहाय्याने व्हॅनमध्येच बांधून टाकण्यात आले. कर्मचाऱ्यांकडील चार मोबाईलपैकी दोन मोबाईल तसेच ५८ किलो सोने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. अवघ्या १० ते १५ मिनिटांत हा प्रकार घडला.

सीसीटीव्ही बंद, बंदुकाही पेटीत!

लॉजिस्टीक व्हॅनमधील सीसीटीव्ही यंत्रणा बंद पडलेली होती. गाडीतील जीपीएस यंत्रणा कार्यान्वित असली तरी त्यातून फारसे काही हाती लागणार नसल्याचे समजते. वाहनात दोन सुरक्षारक्षक होते. त्यांच्याकडे दोन बंदुकाही होत्या. मात्र, त्यांनी त्या पेटीत बंद करून ठेवल्या होत्या. पेटीचे लॉक उघडून बंदुका बाहेर काढून फायर करेपर्यंत किमान १० मिनिटांचा कालावधी लागणार होता. सुरक्षायंत्रणा सोबत असताना केवळ हलगर्जीपणामुळे चौघा कर्मचाऱ्यांना चोरीची घटना रोखता आली नाही.

१ ऑक्टोबर २०१३ रोजी पाच जणांच्या टोळीने नाशिकरोड परिसरातील मण्णपुरम फायनान्स लिमिटेड कंपनीत दरोडा टाकून १५ किलो सोने लुटून नेले होते. महत्त्वाचे म्हणजे पाचपैकी तीन आरोपी पोलिसांच्या वेशात आले होते. या गुन्ह्यात पकडलेल्या संशयितांपैकी एकाची जामिनावर सुटका झाली असून, वाडीवऱ्हे लूटप्रकरणी पोलिस त्याचीही चौकशी करणार असल्याचे समजते.

रेल्वे स्टेशनवर अॅलर्ट देण्यात आला असून, शेजारच्या जिल्ह्यातील पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. घटनेचे सर्वच कांगोरे तपासण्यात येत असून, संशयिताचा माग काढण्यात लवकरच पोलिसांना यश मिळेल. - संजय मोहिते, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच संचालक बिनविरोध

$
0
0



जिल्हा बँकेवर गावित, गुळवे, सावंत, हलकंदर, दराडे यांची निवड निश्चित

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी शेवटच्या दिवशी तब्बल १५९ जणांनी अर्ज दाखल केले असून, आतापर्यंत २५० अर्ज दाखल झाले आहेत. सोसायटी गटातून संदीप गुळवे, आमदार जीवा पांडू गावित, सचिन सावंत, नामदेव हलकंदर आणि किशोर दराडे या पाच जणांची बिनविरोध निवड झाली आहे. या पाचही जागांसाठी एकच अर्ज आल्याने त्यांची निवडीची औपचारिकता घोषणा होणे बाकी आहे. त्यामुळे आता केवळ १६ संचालकांसाठीच निवड प्रक्रिया होणार आहे.

येत्या २७ तारखेला अर्जाची छाननी केली जाणार आहे. दरम्यान, शुक्रवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने बँकेला यात्रेचे स्वरूप आले होते. अर्जदारांची संख्या जास्त असल्याने जिल्हा बँकेत गदारोळ होऊन कामकाज सायंकाळपर्यंत चालवावे लागले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी उमेदरावांची झुंबड उडाली होती. शेवटच्या दिवशी तब्बल १५९ अर्ज दाखल झाले. यापूर्वी ९१ अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे तब्बल अडीचशे अर्ज दाखल झाले आहेत. शेवटच्या दिवशी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, माजी आमदार वसंत गिते, आमदार अनिल कदम, वैशाली कदम, मंदाकिनी कदम, डॉ. शोभा बच्छाव, आमदार अपूर्व हिरे अशा दिग्गज उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आतापर्यंत देवीदास पिंगळे, अॅड. माणिकराव कोकाटे, शोभा बच्छाव, चंद्रकांत गोगड, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, दीपक गोगड, संदीप गुळवे, अद्वय हिरे, शिवाजी चुंबळे माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्यासह दत्ता गायकवाड, सुहास कांदे, कोंडाजी मामा आव्हाड, प्रकाश उबाडे, आमदार सीमा हिरे या प्रमुख उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. गुरुवारी अॅड. सुनील ढिकले, आमदार जे. पी. गावित, प्रिया वडजे, परवेझ कोकणी, शेखर ढिकले, कैलास शिंदे, धनंजय पवार, योगेश हिरे, रतन निकम, शैलेश सूर्यवंशी, मनीषा पगार अशा मातब्बर उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

१६ जागांसाठी निवडणूक

जिल्हा बँकेच्या २१ संचालकांपैकी सोसायटी गटातील पाच संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यात इगतपुरी गटातून संदीप गुळवे, सुरगाणा गटातून आमदार जे. पी. गावित, बागलाण गटातून सचिन सांवत, पेठ गटातून नामदेव हलकंदर, येवला गटातून किशोर दराडे यांचा समावेश आहे. या पाचही गटासाठी एकच अर्ज आले आहेत. त्यामुळे त्यांच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी आहे. निवडणूक प्रक्रिया आता केवळ १६ जागांसाठीच होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हाडाच्या चढ्यादरांची चौकशी

$
0
0




म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबईत म्हाडाच्या घरांना चांगला प्रतिसाद मिळत असला तरी इतर शहरांत या घरांच्या किंमती बाजारभावापेक्षा जास्त असल्यानेच प्रतिसाद मिळत नाही. यात भ्रष्टाचार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे म्हाडाच्या चढ्यादरांची चौकशी करण्याची घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी केली आहे. या सोबतच म्हाडाच्या घरांची चौकट आता बदलण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या बैठकीनंतर वायकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की २०२२ पर्यंत सर्वांना स्वस्तात घरे देण्याची योजना आहे. त्यासाठी जास्तीत जास्त जमिनींचे संपादन करण्यात येणार आहे. पारंपारिक रित्या उभे राहणारे म्हाडाच्या बिल्डींग्सचे स्ट्रक्चर बदलून ग्राहकांच्या अपेक्षेनुरूप आराखडा तयार करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिळकतींच्या सर्व्हेक्षणाला मुहूर्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मालमत्ता करासह पाणीपट्टीच्या दरवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीपाठोपाठ महासभेने फेटाळल्यानंतर प्रशासनाला आता यंत्रणेतील त्रुटी शोधण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. महापौरांना प्रस्ताव फेटाळताना मालमत्ता करांचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे प्रशासनाने आता मिळकतींच्या सर्व्हेक्षणाची तयारी सुरू केली आहे. सिंहस्थापूर्वीच मिळकतींच्या सर्व्हेक्षणासंदर्भातील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून, निविदाही उघडण्यात येणार आहे. सर्व्हेक्षणासाठी सहा विभागात चार एजन्सी नियुक्ती केल्या जाणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या मालमत्तांच्या सर्व्हेक्षणाचे घोडे पुढे दुमटणार आहे.

महापालिका हद्दीतल्या मिळकतींचा सर्व्हेक्षणासाठी पालिकेन २००७ मध्ये हैद्राबाद स्थित स्पेक सिस्टीम्स लिमिटेड ही कंपनी नियुक्त केली होती. यासाठी कंपनीला चार कोटी रुपये देण्यात येणार होते. मात्र, संबंधित कंपनीने त्रुटीचा फायदा घेत अर्धवट काम सोडून पोबारा केला. वारंवार स्मरणपत्रे देऊनही कंपनीने सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण केले नाही. त्यामुळे स्थायी समितीने या कंपनीला सन २०१३ मध्ये ब्लॅकलिस्ट केले होते. त्या संदर्भातील नोटीसही पालिकेने बजावली होती. मात्र तरीही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यामुळे महापालिकेचे सर्व्हेक्षणाचे काम पुढे सरकलेच नाही. सद्यस्थितीत पालिकेच्या हद्दीत केवळ साडेतीन लाख मालमत्ता आहेत. मात्र, गेल्या सात आठ वर्षात त्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या वाढीव मालमत्तांकडून कर वसुली करून महसूल वाढविण्याची मागणी प्रशासनानकडून होत आहे. मात्र, तरीही आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी नुकताच स्थायी समिती आणि महासभेवर या मिळवतींवरील मालमत्ता कर वाढविण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, महासभेने हा प्रस्ताव फेटाळत नवीन मालमत्तांचा सर्व्हेक्षण करून महसूल वाढविण्याचे आदेश दिले होते. यंत्रणेतील त्रुटी शोधून कर वाढविण्याच्या सूचनाही केल्या होत्या.

प्रशासनाने महापौरांनी दिलेल्या आदेशानुसार मिळकतींचे सर्व्हेक्षण करून उत्पन्न वाढविण्याच्या प्रयत्नांना सुरुवात केली आहे. त्यासाठी शहरातील सहाही विभागासाठी चार एजन्सींना काम देण्यात येणार असून, हा मिळकतींचा सर्व्हे हा हायटेक असणार आहे. सॅटेलाईट पद्धतीने हा सर्व्हे केला जाणार असून, त्याचे थेट नियंत्रण हे महापालिकेत असणार आहे. त्यामुळे मिळकतींचा अप टू डेट सर्व्हेक्षण होणार आहे. सिंहस्थामुळे सर्व्हेक्षणाचे काम होणार नसले तरी, या सर्व्हेक्षणासाठीची निविदा प्रक्रिया सिंहस्थापूर्वीच पूर्ण केली जाणार आहे. तिसऱ्या पर्वणीनंतर सर्हेक्षणाला सुरुवात केली जाणार असून, तीन महिन्यात सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण केले जाणार आहे. या सर्व्हेक्षणात शहरातील मालमत्तांची संख्या दुप्पट होणार असून, महसूलही दुपटीने वाढणार आहे.

हायटेक सर्व्हेक्षण होणार

महापालिकेकडून होणारे मिळकतींचे सर्व्हेक्षण हे हायटेक असणार आहे. मोबाइल टॅबद्वारे हा सर्व्हे होणार असून, इमारतींच्या आतील स्केअरफुटाचीही नव्याने नोंदणी केली जाणार आहे. त्यामुळे बिल्डरांने वाढीव पद्धतीने वाढवलेली इमारतीच्या आतील जागांचीही मोजदाद होणार असून, त्यामुळे मालमत्ता कर वाढणार आहे. या सर्व्हेक्षणावर महापालिकेचे थेट नियंत्रण राहणार आहे. महापालिकेच्या नियंत्रण कक्षात सॅटेलाईटद्वारे इमारतीच्या सदनिकांसह क्षेत्रफळाचीही नोंद होणार आहे. त्यामुळे यात गडबडी होण्याची शक्यता कमी असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी सरपंचाविरुध्द आत्महत्येप्रकरणी गुन्हा

$
0
0

येवला : ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधी पॅनलच्या उमेदवारांचा प्रचार केल्याने तसेच सत्ताधारी जनसेवा पॅनलच्या नेत्याने सातत्याने धमकाविण्याचे सत्र सुरू ठेवल्याने शनिवारी सकाळी निमगाव मढ येथील एका युवकाने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात माजी सरपंचाविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका पोलिस ठाण्यात अशोक बयाजी लभडे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार मुलगा दत्तात्रेय हा ग्रामपंचायत निवडणुकीत साईपरिवर्तन पॅनलच्या उमेदवारांचा प्रचार करीत होता. तू विरोधी पॅनलच्या उमेदवारांचा प्रचार करू नको, नाही तर तुला निट जगू देणार नाही असा दम जनसेवा पॅनलचे नेते माजी सरपंच नवनाथ बबन लभडे यांनी माझ्या मुलाला दिला. वाद झाल्यानंतर लभडे यांनी मुलगा दत्तात्रेय याच्यासह इतर सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उच्चभ्रू वस्तीलाही समस्यांचे ग्रहण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

जुने नाशिकमधील साठ फुटी रोडच्या अगदी दर्शनी भागात असलेल्या सहकार नगर या उच्चभ्रू लोकांच्या आणि पॉश समजल्या जाणाऱ्या भागाला शेजारील भीमवाडीतील समस्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे.

सहकार नगरमध्ये तशा फार पूर्वीपासूनच विविध मूलभूत सुविधा मिळालेल्या आहेत. मात्र, हल्ली कमी दाबाने पाणीपुरवठा, अनियमित घंटागाडी व तुंबलेली चेंबर फुटून गटारीचे घाणपाणी रस्त्यावर वाहण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. याभागामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी एक चांगले उद्यानही आहेत. सुदैवाने या उद्यानाची अवस्था चांगली असून, परिसरातील लोक उद्यानात फेरफटका मारताना दिसतात.

सहकार नगरच्या अगदी शेजारी भीमवाडी ही झोपडपट्टी वसलेली आहे. गंजमाळ बस स्थानकाच्या मैदानातच कोपऱ्यात महापालिकेचे सार्वजनिक शौचालय आहे. मात्र, या शौचालयाची दुरावस्था झाल्याने झोपडपट्टीवासीय शौचालयाच्या बाहेर मैदानातच प्रात:विधीसाठी बसतात. त्यामुळे परिसरात असह्य दुर्गंधी पसरते. या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक हैराण आहेत. या समस्येमुळे परिसरातील घरांच्या किमती घसरल्याचा आरोप केला जात आहे. प्रभागाचे विद्यामान नगरसेवक येथे नियमित संपर्क साधून समस्या जाणून घेत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नगरसेवकांच्या अवाक्यातील समस्या सुटतात. मात्र, महापालिका प्रशासनकडून अपेक्षित समस्या सुटत नसल्याचाही नागरिकांचा आरोप आहे.

सहकार नगरमध्ये हल्ली नळांना कमी दाबाने पाणी येत आहे. घंटागाडी येतच नसल्याने कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गटारी वारंवार तुंबतात. गटारीचे चेंबर फुटून अस्वच्छ पाणी रस्त्यावर येते.

- विनायक कोठावदे, रहिवाशी

सहकार नगरात कचरा विल्हेवाटीचा प्रश्न सतावतो. अनेक पथदीप बंद असल्याने आंधाराचे साम्राज्य आहे. गंजमाळ पोलिस चौकी कायम बंद असते त्यामुळे गुंड लोकांचे नेहमी फावते.

- श्रीकृष्ण ओतुरकर, रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्न लपवून केली तरुणीची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पहिल्या लग्नाबाबत माहिती दडवून तरुणीशी विवाह करणाऱ्या पतीसह त्याला या कामात मदत करणाऱ्या आणखी सात जणांविरोधात इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित ३० वर्षीय तरुणी इंदिरानगरमध्ये राहते. तिचे २०१२ मध्ये याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणाशी प्रेमप्रकरण सुरू होते. या दोघांनी गंधर्व विवाह देखील केला. या विवाहानंतर आपला पती विवाहीत असून, त्याला मुलगा असल्याची माहिती पीडित तरुणीला समजली. याच काळात संशयित आरोपी म्हणजे तिच्या पतीने त्यांच्या शरीरसंबंधाची फिल्म बनवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. काढलेली फिल्म सार्वजनिक करण्याची धमकी देत तिच्याकडून चेकद्वारे २० लाख रुपये, सोन्याचे दागिने काढून घेतले. हा वाद सुरू असतानाच पतीसह त्याची पत्नी, मुलगा, सासू सासरे व अन्य दोघांनी मिळून पीडित मुलीच्या घरी जाऊन मारहाण केली. या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलिसांनी कौंटुबिक हिंसाचार कायद्यातील कलम अ, विनयभंग, जिवे मारण्याची धमकी देणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

एकाची आत्महत्या

पांडवनगरी येथील शिव कॉलनी येथे राहणाऱ्या बाळू बेलप्पा तळभंडारे (वय ४९) यांनी रूमच्या गॅलरीतून उडी मारली. यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने ते मृत्युमुखी पडले. ही घटना शुक्रवारी सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी व्यंकटेशन विश्वनाथन याने दिलेल्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली आहे. तळभंडोर मूळचे नवी मुंबई परिसरातील एैरोली येथील रहिवाशी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोने लूट : महत्त्वाचे धागेदोरे हाती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक/घोटी

मुंबई-आग्रा महामार्गावर वाडिवऱ्हे गावाजवळ ५८ किलो सोने लुटणाऱ्या टोळीचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. लवकरच सर्व आरोपींना जेरबंद करू, असा दावा पोलिसांकडून केला जात आहे. संशयितांच्या शोधासाठी एक पथक केरळमधील कोची येथे, दुसरे पथक अलाहाबाद येथे तर पाच पथके मुंबईत चौकशीचे काम करीत आहेत.

मुंबईतील अंधेरी येथून झी गोल्ड कंपनीचे ६० किलो सोने शुक्रवारी पहाटे ​धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील गोल्ड रिफायनरीमध्ये जात असताना चोरट्यांनी ते लुटून नेले. याप्रकरणी पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करून तपासासाठी सात पथके तयार केली. घटनेच्या दिवशीच ग्रामीण पोलिसांचे एक पथक वाहनातील चौघा कर्मचाऱ्यांपैकी दोघांना घेऊन मुंबईला गेले होते. प्राथमिक चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले असून, लवकरच आरोपींना अटक करू, असा दावा जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी केला आहे.

लुटीच्या घटनेनंतर आरोपी हायवेनेच आग्रा शहराच्या दिशेने गेले. फिर्यादीने वर्णन केलेली लोगन कार पिंपळगाव टोलनाक्यावरील सीसीटीव्हीवर टिपली गेली आहे. वाहनावर एका दुचाकीचा नंबर चिटकवण्यात आला होता. कार ज्या दिशेने गेली, त्या दिशेच्या सर्व टोलनाक्यांना सूचना देण्यात आली असून, तेथील व्हिडीओ फुटेज मागवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, पोलिसांनी या घटनेच्या तपासासाठी सात पथके तैनात केली आहेत. लुटलेल्या सोन्याचे बाजारमुल्य १६ कोटी २८ लाख रूपये असून, जिल्ह्यातील या प्रकरणाचा यशस्वी तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेपत्ता महिलेचा नदीत मृतदेह

$
0
0

नाशिकरोडः येथील दारणा नदीत शनिवारी एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबल उडाली. नाशिकरोड पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रमिला मधुकर कासार (३७, शेवगेदारणा) ही महिला शेतात काम करत असताना तीन एप्रिलला बेपत्ता झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एजंटांकडून प्रवाशांची लूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सध्या सुट्यांचा कालावधी असल्याने तिकीट न मिळालेल्या प्रवाशांना हेरून त्यांच्याकडून तिकीटासाठी अव्वाच्या सव्वा पैसे घेतले जात आहे. नाशिकरोड व सिटी रेल्वे रिझर्व्हेशन ऑफिस या दोन्ही ठिकाणी एजंटांनी हैदास घातला असून, प्रवाशांची लूट केली जात आहे.

नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरील रिझर्व्हेशन काऊंटरवर एजंटांची घुसखोरी सुरू असून, लवकर नंबर लावूनही तिकीट मिळत नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे. बुकींग ऑफिसमध्ये खुलेआमपणे तिकीटविक्रीत गैरव्यवहार होत असून, प्रवाशांना कर्मचाऱ्यांकडून हीन दर्जाची वागणूक मिळत असल्याचेही प्रवाशांचे म्हणणे आहे.

नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर रिझर्व्हेशनसाठी रांगेत उभे राहिल्यानंतरही तिकीट मिळत नाही. तत्काळ तिकीटासाठी नंबर लावल्यानंतर पहिल्या दोन प्रवाशानंतर तिकीट बंद झाल्याची घोषणा केली जाते. परंतु, एजंटमार्फत रिझर्व्हेशन काढल्यास नंबर न लावताही घरपोच तिकीट मिळत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. येथील कर्मचारी रिझर्व्हेशनसाठी आलेल्या प्रवाशांना नीट उत्तरे देत नाहीत. योग्य माहिती भरल्यानंतरही तिकीटावर चुका केल्या जात आहे. याची माहिती दिल्यानंतर या कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. फॉर्म भरण्यास चूक झाल्यास प्रवाशाला नव्याने फॉर्म भरून पुन्हा रांगेत नंबर लावण्यास सांगितले जाते. रिझर्व्हेशन ऑफिसमध्ये एजंट लोकांचीच गर्दी तिसते. त्यांना जादा पैसे दिल्यास ते पाहिजे तेवढी तिकीटे काढून देतात.

जादा रकमेची वसुली

गेल्या शनिवारी अमावस्या असल्याने अनेक प्रवासी भुसावळ पॅसेंजरने तीर्थक्षेत्र नस्तानपूर येथे गेले. नस्तानपूरचे नाशिकरोड येथून तिकीट ३०-३५ रुपये आहे. मात्र, तिकीट विक्री करणाऱ्या व्यक्तींनी सुटे पैसे देण्यासाठी नसल्याचे कारण देत सरसकट ५० रुपयांची तिकीटे दिली. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाला सुमारे २० रुपयाचा जादा भुर्दंड बसला.

अधिकाऱ्यांचे लागेबांधे

अनेकवेळा रांगेत उभे राहून तिकीट मिळत नाही. मात्र, एजंटाकडून तिकीट काढल्यास कन्फर्म तिकीट मिळते. अधिकाऱ्यांनाही रक्कमेतील हिस्सा द्यावा लागतो तरच तिकीट मिळते असे एजंटांचे म्हणणे आहे. रिझर्व्हेशन ऑफिसमध्ये घुसखोरी करणाऱ्या एजंटांवर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे.

कर्मचाऱ्यांचा उर्मटपणा

प्रवाशांनी गाडी संबंधी माहिती विचारल्यास तिकीट खिडकीवरील कर्मचारी खेकसतात. 'गाड्यांची माहिती सांगता येणार नाही तिकीट काढायचे असेल तर काढा अन्यथा निघून जा' अशा शब्दात सुनावले जाते. काही कर्मचारी ऑफिसमध्ये पान गुटखा खातांना दिसतात. त्यामुळे ते काय बोलतात हे प्रवाशांना समजत नाही. रेल्वे स्टेशनच्या आवारात गुटखा खाण्यास सिगारेट पिण्यास बंदी असताना कर्मचाऱ्यांना तो नियम लागू नाही का? असा सवाल प्रवाशी विचारत आहेत.

हिशेबात नेहमीच घोळ

तिकीट काढल्यानंतर हिशेबात नेहमी घोळ होतो. अनेक प्रवाशांना पैसे परत मिळतांना कमी मिळत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. पैसे कमी का दिले अशी विचारणा केल्यास 'सुटे दोन रुपये आणून द्या; त्यानंतर दहा रुपये घेऊन जा' अशा प्रकारे प्रवाशांची अडवणूक केली जाते. त्यामुळे अनेक प्रवासी पाच ते दहा रुपये सोडून देतात. रेल्वे रिझर्व्हेशन काऊंटर संबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले असता 'बघतो, कारवाई करतो' अशी थातूरमातूर उत्तरे दिली जातात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांची मोर्चेबांधणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका शिक्षण मंडळाच्या शिक्षण समितीच्या १६ सदस्यांची निवड सोमवारी होत असून, या समितीत संधी मिळावी यासाठी सर्वपक्षीय सदस्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मनसेसह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना-भाजपही या समितीसाठी प्रयत्नशील आहे. दुसरीकडे शिक्षण मंडळाच्या माजी सदस्यांनी ही निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा दावा करीत जुनेच शिक्षण मंडळ कायम असल्याचे म्हटले आहे. पूर्वीच्या मंडळाची मुदत संपल्यानंतरच नव्याने समिती गठीत करण्याचे आदेश

न्यायालयाने दिल्याचा दावा करण्यात आला आहे.

पालिकेच्या शिक्षण मंडळावरील १६ सदस्यांच्या नियुक्ती करण्यासाठी सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता महासभा बोलविण्यात आली आहे. यात मनसे-५, राष्ट्रवादी, शिवसेनेचे प्रत्येकी ३, काँग्रेस-भाजपचे प्रत्येकी २ आणि अपक्षांचा एक सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. शिक्षण मंडळाची वार्षिक उलाढाल ही ७५ ते १०० कोटींपर्यत असते. सोबतच शाळांवर वचक राहत असल्याने या समितीवर जाण्यासाठी नगरसेवकांमध्ये स्पर्धा लागली आहे. थेट पक्षातील नेत्यांनाच गळ घालून वर्णी लावून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे नेतृत्वापुढे संकट उभे राहिले आहे. मनसेने मात्र आतापर्यंत पदापासून वंचित राहिलेल्यानां सधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

मनसेपाठोपाठ इतर पक्षांमध्येही हाच ट्रेन्ड असला तरी, शिवसेना आणि काँग्रेसमध्ये समितीवर जाण्यासाठी घमासान आहे. समितीच्या सदस्यांची निवड झाल्यानंतर हा ठराव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर सभापती आणि उपसभापतींची निवड होणार आहे. सभापतीपदावर मनसेसह काँग्रेस आणि शिवसेनेने दावा ठोकायला सुरुवात केली आहे. काँग्रेसला प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत कोणतेही पद मिळाले नाही. त्यामुळे शिक्षण समितीचे सभापती पद मिळावे, अशी काँग्रेसच्या नेत्यांची मागणी आहे. त्यामुळे महाआघाडीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

शिक्षण मंडळच कायम असल्याचा दावा

शिक्षण समितीची निवड प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा दावा मंडळावरील माजी सदस्यांनी केला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या आदेशानुसार सध्या शिक्षण मंडळच अस्तित्वात आहे. त्यामुळे समितीची निवड केली जाऊ शकत नाही. शिक्षण विभागाने एक एप्रिल रोजी दिलेल्या पत्रात जुनीच मंडळे अस्तित्वात असल्याचे म्हटले आहे. जोपर्यंत पूर्वी गठीत झालेल्या शिक्षण मंडळ सदस्यांची मुदत संपत नाही तोपर्यंत नव्याने निवडणूक घेता येणार नसल्याचा निष्कर्ष उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. राज्याच्या विधी व न्याय विभागानेही जुनीच मंडळे अस्तिवात असून, त्याप्रमाणेच कारभार सुरू ठेवण्याचा सल्ला महापालिकांना दिला आहे. त्यामुळे ही निवड स्थगित करून जुन्याच सदस्यांकडे कारभार सोपविण्यात यावा, अशी मागणी माजी सदस्य बाळासाहेब कोकणे यांनी केली आहे. त्यामुळे ही निवड वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचे १५० भाविक अडकले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधील १५० हून अधिक पर्यटक नेपाळमध्ये अडकले असून, त्यामध्ये सिमेन्स कंपनीतील १५ कामगार कुटुंबीयांचाही समावेश आहे. नाशिकहून गेलेले सर्व भाविक सुरक्षित असल्याचा दावा ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून करण्यात आला आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांबद्दल अधिक माहिती असल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन आपत्कालीन व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी केले आहे.

पशुपतीनाथ, काठमांडू यांसारख्या धार्मिक पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी नाशिककर आवर्जून नेपाळला जात असतात. उन्हाळी सुटीचा कालावधी असल्याने अशा भाविकांची संख्या मोठी असते. पाच दिवसांपूर्वीच चौधरी यात्रा कंपनीची एक बस पर्यटकांना घेऊन नेपाळला गेली होती. या बसमध्ये ५० भाविक असून, ते पशुपतीनाथ येथे सुखरूप असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

उर्वरित दोन बस भारत-नेपाळ सीमेवर पोहोचल्या होत्या. त्या तेथेच अडकून पडल्या आहेत. या तीनही बसेसमधील पर्यटक सुखरूप असून, त्यांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था केल्याने निकटवर्तीयांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन ट्रॅव्हल कंपन्यांकडून करण्यात आले आहे.

ते कामगार सुखरुप

सिमेन्स कंपनीतील एका अधिकाऱ्याच्या कन्येच्या विवाह सोहळ्यासाठी काही कामगार बिहारला गेले होते. तेथून १५ कामगार कुटुंबीयांसह विमानाने नेपाळला गेले आहेत. भुकंपामुळे ते तेथे अडकले असले तरी सुखरूप आहेत. प्रवीण कुलकर्णी या पर्यटकाने नाशिकमधील कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना आपण सुरक्षित असल्याची माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images