Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘TC’कमतरता : फुकट्यांची चांदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर टीसींची संख्या अपुरी असल्याने याचा फायदा विनातिकीट प्रवास करणारे प्रवाशी व अनधिकृत व्यावसायिक घेत आहेत. दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थासाठी रेल्वेत या फुकट्या प्रवाशांना आळा घालण्याची गरज आहे. ज्यादा टीसींची नेमणूक केल्यास उत्पन्नातूनही वाढ होऊ शकते.

नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर पूर्वी एक प्रवेशद्वार होते. मात्र, सिंहस्थामुळे स्टेशनला तीन नवीन प्रवेशदार करण्यात आली आहेत. या तीनही ठिकाणी टीसींची आवशक्यता आहे. दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थासाठी जादा टीसींची नेमणूक न केल्याने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चांदी होणार आहे. आरक्षणगृहाच्या पाठीमागील बाजूस नव्याने बांधण्यात आलेल्या मार्गावर टीसी नसल्याने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चांदी झाली असून, एका महिन्यात रेल्वेला तब्बल तीन ते पाच लाखांचे नुकसान सहन करावे लागत आहे. हा आकडा सिंहस्थात दुप्‍पटीने वाढणार आहे.

नाशिकरोड स्थानक हे भुसावळ डिव्हीजनमध्ये सर्वाधिक उत्पन्न देणारे स्टेशन म्हणून गणले जाते. या स्टेशनवर इतर स्टेशनच्या तुलनेत प्रवासी वाहतूकही मोठ्या प्रमाणावर होते. या स्टेशनवरून उत्तर भारतात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने टीसींची संख्या पुरेशी असणे गरजेची आहे. रेल्वेगाडी आल्यानंतर प्रवाशांची तपासणी करण्यासाठी टीसी उपलब्ध नसल्याने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. अनेक प्रवासी रोज रेल्वेने प्रवास करीत असतात. त्यापैकी बहुतांश प्रवाशांना या स्टेशनवर टीसी नसल्याचे माहीत झाले आहे. त्यामुळे काही प्रवासी मुद्दाम तिकीट काढण्याचे टाळतात. तसेच, आरक्षण गृहाच्यामागे नव्याने बांधण्यात आलेल्या मार्गावर तिकीट तपासणी होत नसल्याने हे प्रवासी या मार्गाचा अवलंब करीत आहेत. भुसावळ डिव्हीजनमध्ये काही दिवसांपूर्वी ६५ टीसींची नेमणूक करण्यात आली; परंतु त्यातील एकाही टीसीची नेमणूक नाशिकरोड रेल्वेस्टेशनवर झालेली नाही.

तेराच टीसी

प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत टीसींची संख्या निम्म्याने कमी आहे. या स्टेशनवर एकूण २५ टीसींची आवश्यकता आहे; परंतु प्रत्यक्षात १३ टीसी काम करीत आहेत. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून नियोजन होण्याची गरज आहे. आगामी काळात नाशिक येथे सिंहस्थात लाखो भाविक शहरात दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर टीसींची संख्या दुप्पट करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

दंडाची रक्कम दुप्पट होण्यास मदत

१३ टीसींचा संख्या असताना महिन्याला अंदाजे एक हजार प्रवाशांवर कारवाई करून दोन ते तीन लाख रुपये उत्पन्न दंडाच्या माध्यमातून मिळते. परंतु, हिच टीसींची संख्या पूर्ण झाल्यास महिन्याला दोन हजार प्रवाशांवर कारवाई करून पाच लाख रुपये मिळवता येऊ शकेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिंहस्थ कामात कसूर नको

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

सिंहस्थ नियोजनांतर्गत आखाड्यांच्या सोयीसुविधांची कामे करीत असताना ठेकेदारांनी साधू-संतांसाठी होत असलेल्या कामात हायगय करू नये, तसेच या कामांबाबत ठेकेदारांना नाहक त्रास दिला जाणार नाही याची हमी दिली आहे.

नव्याने वाढीव कामांबाबत ठेकेदार पुढे येत नसल्याचे निर्दशनास आल्याने साधू-महंत आखाडा परिषदेने याची दखल घेतली आहे. महंत शंकरानंद सरस्वती महाराज यांनी बांधकाम ठेकेदारांना कोणत्याही प्रकारे अडवणूक होत असल्यास आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. दर्जेदार काम करण्यासाठी निविदेत नमूद केल्याप्रमाणे त्याच मानांकाचे साहित्य वापरले पाहिजे, गुणवत्तेबाबत तडजोड करू नये, असे जाहीर केले आहे.

योग्य गुणवत्तेचे दर्जेदार काम केल्यास येथे साधू आखाडे तसेच प्रशासन वा अन्य कोणत्याही यंत्रणेकडून त्रास होणार नाही याची हमी दिली आहे. आखड्यांच्या कामांच्या प्रगतीबाबत महंत शंकरानंद सरस्वती यांनी समाधान व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वी आखाडा परिषदेच्या साधू-महंतांनी कामांची पाहणी केली होती. काही सूचनाही केल्या होत्या. त्याप्रमाणे कामे होत आहेत. विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, मेळाधिकारी महेश पाटील, प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे, मुख्याधिकारी निवृत्ती नागरे सातत्याने कामाचा आढावा घेत आहेत. अनेकदा दिवसातून दोन वेळेस कामांची पाहणी होत आहे. गत सिंहस्थाच्या तुलनेत यावेळेस उपयुक्त आणि समाधानकारक सुविधांची कामे दिलेली आहेत. अर्थात कामांच्या निविदा प्रकियेसह उशीर झाल्याने काहीसा विलंब जाणवत आहे. मात्र, कामे दर्जदार होतील याचा विश्वास वाटतो असे महंत शंकरानंद सरस्वती यांनी स्पष्ट केले आहे. अर्थात याबाबत ठेकेदारांची नाहक अडवणूक होत असल्यास त्यांनी आखाडा परिषद व जिल्हा प्रशासन यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाविकांची होणार दमछाक

$
0
0


अरविंद जाधव, नाशिक

सिंहस्थ पर्वणीनिमित्त शहरात दाखल होणाऱ्या भाविकांना सरासरी चार आणि जाताना तितकेच अंतर पायपीट करावी लागणार आहे. त्यातच शाही मिरवणूक संपल्यानंतर भाविकांना थेट रामकुंडापर्यंत येण्यास मुभा मिळणार असल्याने पायपीटीचे अंतर १० ते १२ किमीपर्यंत वाढू शकते.

सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान रामकुंडात केलेल्या स्नानाला महत्त्व असल्याने भाविकांच ओढा याच ठिकाणी असतो. २००३ पर्यंत शहरात दाखल होणारे भाविक थेट रामकुंडापर्यंत पोहचत होते. अरूंद भागात एकच गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीची शक्यता अधिक होती. २००३ च्या कुंभमेळ्यात झालेही तसेच. यानंतर प्रशासनाने गर्दीचे विकेंद्रीकरण करण्याचे नियोजन आखले. त्यानुसार, रामकुंडा व्यतिरिक्त कन्नमवार पुलाजवळ, नांदूर घाट तसेच दसक येथे नवीन घाट तयार करण्यात आले. नाशिक-पुणे हायवेने शहरात दाखल झालेल्या किंवा रेल्वेने आलेल्या भाविकांना रामकुंडाऐवजी दसक घाटावर घेऊन जाण्याचे नियोजन प्रशासनाने आखले आहे. किमान शाही मिरवणूक संपेपर्यंत ना​शिकरोडप्रमाणे इतर भागातील भाविक रामकुंडावर पोहचणार नाहीत, याची काळजी घेतली जात आहे. अंतर्गत वाहनतळ म्हणजे एसटी बसेस ज्या ठिकाणी भाविकांना सोडतील तेथून त्यांच्याजवळील घाटाचे अंतर सरासरी चार किलोमीटर आहे. दोन्ही बाजूने ८ किलोमीटरची पायपीट भाविकांना करावी लागणार आहे.

पर्यायी मार्गही उपलब्ध

सर्व मार्गांवर भाविकांची गर्दी वाढली किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास पर्यायी मार्ग तयार करण्यात आले आहे. शाही मिरवणुकीदरम्यान गर्दी नियोजनाचे काम महत्त्वाचे असल्याने परतीच्या प्रवासात तीन पर्यायी मार्ग तयार असणार आहेत. यात काट्या मारूती चौकात रस्ता बंद करून भाविकांना लक्ष्मण झुला पुल, नाग चौक, काळाराम मंदिर, सरदार चौक मार्ग, म्हसोबा पंटागण येथे स्नानासाठी वळविण्यात येईल. गणेशवाडीकडून नागचौकाकडे येणा-या पुलावरून भाविकांना नागचौक काळाराम मंदिर, सरदार चौक, म्हसोबा पंटागणाकडे वळविण्यात येईल. तर गणेशवाडी आर्युवेदीक कॉलेज समोरील पुलावरून भाविकांना काळाराम मंदिर, दक्षिण दरवाजा सरदार चौक, म्हसोबा पंटागण स्नानासाठी पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

भाविकांची मोठी संख्या घेऊन नियोजन करण्याचे काम सुरू आहे. शाही मिरवणुकीदरम्यान भाविकांना जवळील घाटावर नेण्यात येईल. शाही मिरवणूक आटोपल्यानंतर भाविकांना रामकुंडापर्यंत येता येईल. भाविकांना जवळील घाटावर पोहचण्यासाठी सरासरी चार किलोमीटर अंतर कापावे लागेल. तेच शाही मिरवणुकीनंतर सातपूर, ना​शिकरोड आदी भागातून रामकुंडाकडे येणाऱ्या भाविकांसाठी हे अंतर जास्त होईल. - पंकज डहाणे, पोलिस उपायुक्त

सिन्नर फाटा-मार्केटयार्ड पार्किंग येथून दसक घाट- ३.५ किमी

मुंबईनाका येथील अंतर्गत पार्किंग येथून कन्नमवार घाट- ३ किमी

मांडसांगवी येथून नांदूर घाट-४.५ किमी

सातपूर-रोकडोबा मंदिर घाट-४ किमी

गंगापूर बाह्य पार्किंगवरून बसने भाविक शरदचंद्र मार्केट यार्ड येथे येतील. तेथून पायी रामकुंड परिसरात दाखल होतील- ४ किमी

दिंडोरीरोड येथून केके वाघ कॉलेज परिसरातील पार्किंगवर आलेले भाविक कन्नमवार पुलाजवळील घाटावर येतील- ३.५ किमी

शाही मिरवणूक- ३ किमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘खडसेंचे मुलीसाठी ‘सर्वपक्षीय’ षडयंत्र’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

स्वत:च्या मुलीला जिल्हा बँकेत आणण्यासाठी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी सर्वपक्षीय पॅनल तयार करून जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार ईश्वरलाल जैन यांनी रविवार पत्रकार परिषदेत केला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. सतिश पाटील यांनीही या आरोपास दुजोरा दिला.

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीसाठी सुरुवातीपासून खडसे यांनी सर्वपक्षीय पॅनल तयार करून निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका मांडली होती. त्यानंतर समन्वयासाठी अनेक बैठक घेण्यात आल्या, त्यानुसार अनेक उमेदवारांनी माघारही घेतली. मात्र, सर्वपक्षीय पॅनलच्या जागावाटपात समाधान न झाल्याने राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी बैठक झाली. या बैठकीत सर्वपक्षीय पॅनल तयार करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनतंर पत्रकारांशी बोलताना ईश्वरलाल जैन यांनी सर्वपक्षीय पॅनलकडून फसवणूक केली जात असल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार काँग्रेस व राष्ट्रवादीचे स्वतंत्र पॅनल स्थापन करून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी आ. सतिश पाटील, अरुण गुजराथी, अॅड. वसंत मोरे आदी उपस्थित होते.

आरोप पोरकटपणाचा

ईश्वर जैन यांनी केलेले सर्व आरोप हे पोरकटपणाचे असल्याचे सांगतानाच शरद पवार यांनीही सुप्रिया सुळेंना पुढे आणले आहे, अशा शब्दांत खडसे यांनी आरोपांना उत्तर दिले आहे. रोहिनी खडसे माझी मुलगी आहे, म्हणून नव्हे तर ती कायकर्ता म्हणुनच तिला तिकीट देण्यात आल्याचेही खडसे यांनी सांगितले. जिल्हा बँक निवडणुकीसाठी लाडवंजारी सभागृहात घेण्यात एकनाथ खडसेंच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलचा उमेदवारांचा मेळावा रविवारी घेण्यात आला. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना खडसे बोलत होते. रोहिणी खडसेही उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उर्स, छठ्ठी शरीफ उत्साहात

$
0
0


जुने नाशिक : अजमेर शरीफ येथील सुफी संत सुलतानुल हिंद हजरत ख्वाजा मोईनोद्दीन चिश्ती यांच्या ८०३ वा उर्स व छठ्ठी शरीफ शहरात उत्साहात साजरा झाला. विविध धार्मिक कार्यक्रमांनी हजरत ख्वाजा गरीब नवाज यांचे स्मरण करुन त्यांच्या प्रति आदरांजली अर्पण करण्यात आली.

मशिदींमध्ये मुस्लिम धर्मगुरुंचे ख्वाजा गरीब नवाज यांच्या सत्याच्या मार्गावरील शिकवणी व जिवनावर आधारित धार्मिक प्रवचन झाले. छठ्ठी शरीफचे औचित्य साधुन शहरातील सामाजिक व धार्मिक संस्थांच्या वतीने गोड खीरचे सर्व धर्मियांत वाटपाचे कार्यक्रम झाले. काही संस्थांनी हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या अजमेर शरीफ येथील दरगाहची आकर्षक सजावट असलेली भव्य प्रतिकृती साकारून नागरिकांच्या दर्शनासाठी खुले केले होते. या प्रतिकृती बघण्यास नागरिकांची गर्दी झाली. अजमेरची दरगाह ही देशातील हिंदू-मुस्लिमांच्या एकतेचे प्रतिक मानली जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयसोलेटेड वार्ड सुसज्ज ठेवा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ काळात स्वाइन फ्लूसारखे गंभीर साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे. अशा आजारांचा मुकाबला करण्यासाठी पुरेसे आयसोलेटेड वार्ड सुसज्ज ठेवा, असे आदेश सामान्य प्रशासनचे अपर मुख्य सचिव पी. एस. मिना यांनी प्रशासानाला दिले आहेत.

कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मिना रविवारी नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी नदी घाटांवर सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. प्रशासनाकडून सुरू असलेल्या तयारीची माहिती जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतली. सिंहस्थ काळात केवळ नैसर्गिक किंवा चेंगराचेंगरीसारखी मानवनिर्मित आपत्ती उदभवेल असे नाही. हा कालावधी पावसाळ्याचा असणार असल्याने स्वाइन फ्लू किंवा तत्सम संसर्गजन्य आजार फैलावण्याची शक्यता खूपच अधिक आहे. म्हणूनच अशा आजारांना वेळीच प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश मिना यांनी दिले.

रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या प्रतिक्षेत शेकडो लोक थांबत असतात. अशा लोकांची संख्या सिंहस्थ काळात कैकपटींनी वाढेल. त्यांना किमान स्थानकाच्या परिसरात उभे राहाता येईल अशी व्यवस्था करा असे आदेशही मिना यांनी दिले आहेत. शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक घेतल्यानंतर मिना यांनी कन्नमवार पूल आणि लाखलगाव रस्त्याच्या कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना नोटिसा

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सटाणा

गेल्या वर्षी गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली होती. मात्र, अनेक शेतकऱ्यांनी बोगस पंचनामे करून नुकसानभरपाईची रक्कम हडप करून आपले उखळ पांढरे केल्याने संबंधित शेतकऱ्यांनी सदरची रक्कम परत करावी, या आशयाच्या नोटिसा शासनाने बजावल्याने संबंधित शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, या नोटिसीला केराची टोपली दाखवून शासनाने जबरदस्ती केल्यास आत्महत्या करण्याचे उलट टपाली कळविल्याने शासन व शेतकऱ्यामध्ये जुंपली आहे.

गत वर्षी जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या तीन महिन्याच्या कालावधीत बागलाण तालुक्यात सर्वत्र गारपीट व अवकाळी पाऊस झाला होता. परिणामी शासनाने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून संबंधितांना काही कोटी रुपयांची नुकसानभरपाई दिली होती. त्यात फळपिकांना हेक्टरी २५ हजार रुपये तर जिरायती पिकांना हेक्टरी १० हजार रुपये नुकसानभरपाई जाहीर केली होती.

तालुक्यातील पंचनामे करीत असताना संबंधित तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनी बोगस पंचनामे करून अनेक शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम विनाकारण मिळवून दिल्याचा आरोप शेतकरी राहुल सोनवणे व खमताणे येथील प्रदीप इंगळे यांनी केला होता. संबंधित शेतकरी या चौकशीसाठी २६ जून २०१४ रोजी उपोषणाला देखील बसले होते. त्यावेळी तलाठी व कृषी सहाय्यक यांना निलंबित देखील करण्यात आले होते. तसेच, बोगस पंचनामे करून अनुदान लाटलेल्या प्रकरणाची चौकशी करण्याकामी नेमलेल्या समितीला या प्रकरणात तथ्य आढळून आल्याने या समितीने खमताणे व मुंजवाड परिसरातील काही शेतकऱ्यांवर ठपका देखील ठेवला होता.

या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार तहसीलदार पोतदार यांनी संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा पाठविल्या असून, बोगस पंचनामे दाखवून घेतलेल्या अनुदान परत करण्याचे आदेश काढल्याने संबंधित शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील रंग उडाले आहेत. यामुळे या गंभीर प्रकरणात दोषी असलेल्या शेतकऱ्यांना तहसीलदार पोतदार यांनी ज्या शेतकऱ्यांनी बोगस पंचनामे दाखवून शासनाचे अनुदान लाटले अशा शेतकऱ्यांकडून त्या अनुदानाची वसुली करण्यासाठी महसूल विभागाने नोटिसा बजावल्याने खळबळ उडाली आहे. सबंधित शेतकऱ्यांनी हात वर करून नोटिसा मागे घ्या अन्यथा आत्मदहनाची परवानगी द्या, असा उलट दम शासनाला दिल्याने शासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.

शेतकरी हैराण

गत दोन दिवसापासून शहरातील वातावरणात पुन्हा एकदा बदल झाला असून, दिवसभर कडकडीत उन्हासोबत प्रचंड उकाडा व पावसाच्या वातावरणामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये अनुत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. पावसाच्या वातावरणामुळे कांदा उत्पादकांना या वातावरणामुळे मोठी पंचाईत निर्माण झाली आहे. वातावरणाच्या या बदलामुळे शेतकरी पुन्हा एकदा धास्तावला आहे. सकाळी उन्हांचे चटके बसू लागले असताना दुपारी ढगाळ वातावरणामुळे असह्य उकाडा जाणवू लागतो. केव्हा आकाशातून जलधारा बरसतील या धाकाने शेतकरी धास्तावला आहे. यामुळे बाजारात पावसापासून बचाव करणाऱ्या प्लास्टिक कागदाला मागणी वाढली आहे.

तीव्र चाराटंचाई

येवला तालुक्यातही पाण्याची टंचाई जाणवू लागली असून जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न उपस्थित झाला आहे. तांदुळवाडी परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानाचा पारा चढल्याने पशुपालकांना पाणी व चाऱ्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. येवला तालुक्यातील उत्तर भाग जानेवारीपासूनच कोरडा झाला आहे. पाणी आणायच कोठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही शेतकऱ्यांनी जनावरे नातेवाईक, मित्रमंडळींकडे सांभाळण्यास दिली आहेत. तसेच काही जनावरे विकण्याशिवाय पर्याय नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

चाराटंचाईमुळे पशुधन अर्धपोटी

उन्हाळा लागला की पाणी व चाराटंचाई डोके वर काढू लागते. यंदा पाऊस जेमतेमच झाल्याने पाण्याअभावी चाऱ्याची टंचाई जाणवू लागली आहे. यामुळे अवकाळीमुळे संकटात सापडलेल्या शेतकरी व पशुपालकांवर चारा विकत घेण्याची वेळ आली आहे. काही पशुपालकांवर चाऱ्याअभावी शेळ्या, गायी, म्हशी ही जनावरे विकण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात सध्या सर्वत्र पाणीटंचाई जाणवत आहे. जिल्ह्यातील ४१ गावे १०७ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. कळवण तालुक्यात अद्याप कोणत्याही गावात टँकरने पाणीपुरवठा होत नसला तरी येत्या काही दिवसात टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी काही गावांकडून होऊ शकते. सध्या पाण्यापेक्षाही चाराटंचाईचा प्रश्न आ वासून उभा आहे. पिण्यासाठी पाणी मिळत आहे पण, चारा पैसे देऊनही मिळेना, अशी स्थिती निर्माण झाली आहे. रब्बी हंगामातील पिके निघाल्यानंतर मेंढपाळ, शेळ्यापालकांना शेत चरण्यासाठी दिली जातात. यंदा मात्र, अधूनमधून अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने चारा खराब झाला आहे. यामुळे कळवण तालुक्यात चाराटंचाई जाणवू लागली आहे. पशुधनाला चाऱ्याअभावी अर्धपोटी रहावे लागत आहे. परिसरातून सर्व मेंढपाळ हे यंदा लवकर परिसर सोडून दुसरीकडे मार्गस्थ झाले आहेत. दरवर्षी मेंढपाळ बांधवाना कांदा पात, खराब कांदा मेंढ्यांना चारा म्हणून ३० मे पर्यंत मिळत असे. यंदा परिसरात लवकर चाराटंचाई भासू लागल्याने परिसरात दाखल झालेले सर्वच मेंढपाळ हे पश्चिमेकडे स्थलांतरित होत आहेत. शेळीपालनाचा व्यवसाय करणाऱ्या आदिवासी बांधवाना चाऱ्याअभावी शेळ्या विकण्याची वेळ आली आहे. पैसे देऊनही चारा मिळत नाही अशी अवस्था झाली आहे. चाऱ्यासाठी रानोमाळ हिंडूनही पोटाला चारा मिळत नसल्याने काही पशुपालकांना जनावरे विकण्याची वेळ आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊसतोडणीमुळे नुकसान

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

कादवा सहकारी साखर कारखान्याने कार्यक्षेत्रातील चिंचखेड शिवारातील ऊसतोड वेळेत न केल्याने ऊसाला चवरे व तुरे ‌निघाले आहेत. तसेच उंदीर लागल्यामुळे ऊस पोकळ पडून वजनात मोठी घट झाल्याची तक्रार करीत कादवा कारखान्याने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्याने केली आहे.

कादवा कारखान्याच्या ऊसतोड नियोजनाअभावी चिंचखेड येथील संजय पंढरीनाथ पाटील यांचे नुकसान झाले आहे. यामुळे त्यांनी कादवा कारखान्याकडे नुकसानभारपाईची मागणी केली आहे. संजय पाटील यांचा नुकसानभरपाईचा अर्ज संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवून त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी स्पष्ट केले आहे. संजय पाटील यांनी खोडवा ऊसाची पाच एकरमध्ये लागवड केली होती. त्याची डिसेंबर २०१४ मध्ये कादवा कारखान्याकडे नोंद केली होती. त्यानुसार जानेवारी जानेवारी २०१५ मध्ये ऊसतोड होणे अपेक्षित होते.

मात्र, कादवा कारखान्याने लवकर ऊसतोड केली नाही. उशीर झाल्याने ऊसाला चवरे, तुरे निघाले. उंदीर लागल्याने पर्यायाने ऊस पोकळ पडून वजनात मोठी घट झाली. त्यातच ऊसतोडणी कामगारांमागे सुपरवायझर व स्लिपबॉय नसल्याने तोड चांगली झालेली नाही. आपला ऊस सोळा महिन्यांचा झाला. त्याची त्वरित तोड करावी म्हणून वेळोवळी शेतकी अधिकारी, शेतकी विभाग यांना सूचना दिल्या. मात्र, वेळेत तोड झाली नाही. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे, असे संजय पाटील यांनी म्हटले आहे.

चिंचखेड येथील ऊस उत्पादक संजय पाटील यांनी २६५ जातीच्या ऊसाची लागवड केली आहे. या जातीचा ऊस चौदा महिन्यांनी तोडला जातो. एक महिना उशीर झाला असला तरी संजय पाटील यांचा नुकसानभरपाईचा अर्ज संचालक मंडळापुढे सादर केला जाईल. - पी. के. आंधळे, शेतकी अधिकारी, कादवा साखर कारखाना

ऊसगाळप २ लाख ७६ हजार टन

साखर उत्पादन ३ लाख १५ हजार टन

कार्यक्षेत्राबाहेरील ऊस ५० हजार टन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिग्गज रिंगणात

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निफाड तालुका सोसायटी गट अर्थात अ गटातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आमदार अनिल कदम, भास्करराव बनकर, राजेंद्र डोखळे, जयदत्त होळकर आदी मान्यवरांसह तब्बल दहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. माजी आमदार दिलीप बनकर यांनीही सोसायटी गटातून अर्ज दाखल केला आहे. यामुळे निफाड सोसायटी गटात पेच व चुरस निर्माण होणार आहे.

जिल्हा बँकेवर आतापर्यंत जिल्ह्यातून पाच सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याबाबत फक्त औपचारिकता बाकी आहे. पिंपळगाव बसवंत येथे मात्र कमालीची चुरस आणि उत्सुकता वाढली आहे. आजी-माजी आमदारांसह बबनराव सानप, संपतराव डुबेरे, संपतराव कुयटे, शांताराम गोसावी, विलास वावधाने यांनीही सोसायटी गटातून अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, गेल्या आठवड्यात तालुक्यातील काही प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती. दिलीन बनकर यांच्याविरोधात एकच उमेदवार देण्याबाबत खल झाल्याचे समजते. आमदार अनिल कदम व राजेंद्र डोखळे यांनी जरी अ गटातून अर्ज दाखल केले असले तरी महिला गटातून त्यांच्या पत्नी वैशाली कदम यांचा अर्ज दाखल असल्याने मागील संचालक मंडळात त्या संचालिका असल्याने यावेळी सुध्दा त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर आमदार अनिल कदम हे माघारी घेण्याची शक्यता आहे. तसेच राजेंद्र डोखळे यांचाही जिल्हा बँकेतील अ गटातून थांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिलीप बनकर यांच्या विरोधात सर्व संमतीने भास्करराव बनकर यांचे नाव पुढे येऊ शकते.

दिलीप बनकर हे सलग दहा वर्षे जिल्हा बँकेवर संचालक होते. विशेष म्हणजे पहिल्याच टर्ममध्ये त्यांना थेट अध्यक्षपदाची संधी मिळाली होती. यापूर्वी त्यांनी दोन्ही वेळेस प्रक्रिया गटातून निवडणूक लढवली होती. यंदा मात्र ते सोसायटी अर्थात अ गटातून प्रथमच निवडणूक लढवत आहेत. प्रतिष्ठेचा निफाड अ गटातून निवडणूक लढविण्याची संधी एक नव्हे तर दोन बनकरांना मिळत असून गत पन्नास वर्षापासून मोगल-बोरस्ते यांचा हक्काचा व मक्तेदारीचा अ यावेळी नव्या समीकरणांना सामोरे जाण्याची शक्यता आहे.

या निवडणुकीत भास्करराव बनकर उमेदवार ठरल्यास आमदार अनिल कदम, माणिकराव बोरस्ते, राजेंद्र डोखळे आदींवर भास्करराव बनकर यांची भिस्त असेल. निफाड तालुका अ गट अर्थात सोसायटी गटात १३४ उमेदवार असून त्यापैकी दोन सोसायट्यांचे ठराव जिल्हा बँकेला मुदतीत प्राप्त झालेले नाही. त्यामुळे १३२ उमेदवार या गटात मतदान करतील. निफाड तालुक्यातील १३२ सोसायटींमधील संचालक मंडळातून जिल्हा बँकेच्या या गटातील मतदार म्हणून ठरावाद्वारे एका संचालकाची निवड केली जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोडेखोरांचा धुमाकूळ

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला तालुक्यातील अंगुलगाव येथे प्राणघातक शस्रास्रांचा धाक दाखवून दरोडेखोंरानी पाच घरांवर दरोडा टाकीत ११ तोळे सोने अन् ३० हजारांची लूट केली. सुमारे १५ ते २० दरोडेखोरांनी शेतकऱ्यांना मारहाण केली. प्रवीण झाल्टे हा तरूण यात जखमी झाला. श्वानपथकाव्दारे दरोडेखोरांचा माग काढण्यात आला. मात्र, काही सुगावा लागला नाही. पोलिसांनी चौकशीसाठी शेजारील जिल्ह्यात पथके रवाना केली आहेत.

अंगुलगाव - तळवाडे रस्त्यावर वस्तीवर राहणाऱ्या कचरू नामदेव जगझाप यांच्या घरावर मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दरोडेखोरांनी प्रथम दरोडा घातला. दरोडेखोरांनी दगड, कुऱ्हाडीच्या साह्याने दरवाजा तोडून घरात प्रवेश मिळवला. घरात प्रवेश करीत त्यांनी मोबाइल हिसकावून शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. पूर्ण कुटुंबाला एका खोलीत कोंडून शस्रांचा धाक दाखवून आरडाओरडा न करण्याची ताकीद दिली. कपाटे तोडून घर लुटले. दुसऱ्या घरांवर दरोडा टाकण्यासाठी पोलिस व इतरांना माहिती मिळू नये म्हणून काही दरोडेखोर तेथेच थांबून राहिले होते.

जगझाप यांच्यानंतर दयानंद सुकदेव झाल्टे यांच्या वस्तीवर दरोडेखोरांनी आपला मोर्चा वळवला. तेथेही मारहाण करीत दहशत निर्माण केली गेली. त्यानंतर राजेंद्र सुकदेव झाल्टे, चांगदेव जगझाप, करुणा राजेंद्र झाल्टे यांच्या घरांकडे दरोडेखोरांनी मोर्चा वळवला. तेथेही दरवाजे तोडून त्यांनी घरात प्रवेश मिळवला. दरोडेखोरांनी संपर्कसाधने आधीच हस्तगत केल्याने संपर्क साधण्यासाठी उशीर झाला. मराठी व हिंदी भाषेत हे दरोडेखोर बोलत होते. दरोडेखोरांच्या मारहाणीत प्रवीण झाल्टे जखमी झाला आहे. चांगदेव जगझाप यांचा दरवाजा दरोडेखोर तोडीत असताना जगझाप त्यांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या प्रवीण झाल्टे यास आसपास लपून बसलेल्या चोरांनी दगडफेक करून जखमी केले. तेथून प्रवीण झाल्टे पळाले असता त्याच्या मागे दरोडेखोर लागले होते.

रात्री १२.३० ते २.३० असा सुमारे दोन तास दरोडेखोरांचा धुमाकूळ चालू होता. तालुका पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक पी. बी. पाटील यांनी पोलिस पथकासह अंगुलगावकडे धाव घेतली. हा प्रकार गावामध्ये समजताच ग्रामस्थ जमा होऊ लागल्यावर व पोलिसांचा सुगावा लागताच दरोडेखोर पसार झाले. घटनास्थळी भल्या पहाटेच राजापूर गटाचे जि. प. सदस्य प्रवीण गायकवाड, मनमाड उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक नरेश मेघराजानी यांनी भेट दिली. तालुक्याच्या सिमेलगतच्या कोपरगाव, वैजापूर तालुक्यांमध्ये पोलिसांची तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. श्वानपथकही बोलावण्यात आले पण, त्याचा काही उपयोग झाला नाही. येवला तालुक्यात गेल्या काही ‌िदवसात भुरट्या चो-यांचेही प्रमाण वाढले आहे. घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरटे डाव साधत आहेत. तसेच पशुधन चोरीचेही प्रमाण वाढले आहे. यामुळे पोलिस गस्त वाढविण्याची मागणी केली जात आहे. तसेच चो-यांना आळा घालण्याचे पोलिसांपुढे आव्हान उभे ठाकले आहे.

दरोडेखोरांना कुकरी, कोयते, कुऱ्हाडी, चाकू, दगडांचा वापर करीत दरोडेखोरांनी दहशत निर्माण केली होती. तसेच लूट करताना मोबाइल जप्त करण्याबरोबरच लूट केलेल्या ठिकाणी काही जणांना थांबवून पुढील ठिकाणी दरोडा घालण्यात आला. यामुळे मदत मिळू शकली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारचा पालिकेला दणका

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या उपमुख्यलेखापाल एस. व्ही. घोलप यांना पदोन्नतीने मुख्यलेखापालपद देण्याचा महासभेचा २०१३ चा ठराव राज्य सरकारने विखंडीत केला आहे. त्यामुळे घोलप यांच्यासंदर्भात गेल्या आठवड्यात झालेला दुसरा ठरावावरही अंमलबजावणी होण्याची शक्यता धुसर बनली आहे.

हा ठरावही विखंडीत होण्याच्या हालचाली सुरू झाल्याने घोलप यांना तूर्तास तरी मुख्यलेखापाल पदापासून दूर रहावे लागणार आहे. तर राजेश लांडे या पदावर कायम राहण्याची शक्यता आहे.

उपमुख्यलेखापाल एस. व्ही. घोलप यांना पदोन्नती दिल्यानंतर त्यांना मुख्यलेखापाल पद देण्यात यावे असा ठराव २०१३ मध्ये झाला होता. हा ठराव प्रशासनाने विखंडीत करण्यासाठी शासनाकडे पाठविला होता. त्यातच घोलप यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे न्यायालयाने नुकताच घोलप यांच्यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार महासभेला दिला होता. त्यामुळे महापालिकेच्या मुख्य लेखापालपदाच्या वादावर गेल्याच आठवड्यात महासभेने पडदा टाकत, मुख्य लेखापाल राजेश लांडे यांना मूळ सेवेत परत पाठविण्याचा दुसऱ्यांदा निर्णय घेत एस. व्ही. घोलप यांच्याकडे धुरा पदोन्नतीने देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन मुख्यलेखापालपदाचा वाद निकाली निघाला होता. सोबतच महापालिकेत यापुढे महत्वाच्या रिक्त पदांवर सक्षम असलेल्या भूमिपुत्रांनाच पदोन्नती देण्याचे आदेश महापौरांनी दिले असून, प्रतिनियुक्ती अधिकाऱ्यांना जवळपास दार बंद केले आहे.

महासभेच्या निर्णयामुळे घोलप यांना मुख्यलेखापाल पद दृष्ट्रीपथास पडले होते. मात्र, हा ठराव पारीत होताच, शासनाने २०१३ मध्ये महासभेन घोलप यांच्यासदर्भात केलेला ठराव विखंडीत केला आहे. दोन दिवसांपूर्वीच महापालिकेच्या प्रशासनाला हा विखंडीत झालेला ठराव प्राप्त झाला आहे. त्यामुळे दुसरा ठरावही अधांतरी लटकणार आहे. दुसरा ठराव अद्याप प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. मुख्यलेखापालपदी राजेश लांडेच कायम राहण्याची शक्यता आहे. घोलप यांचे मुख्यलेखापालपदी जाण्याचे स्वप्न भंगणार असल्याची शक्यता आहे .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शुभमंगल’साठी पोलिस ‘सावधान’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे यंदा लग्न तिथीत घट झाली आहे. दाट लग्नतिथींमुळे बहुतांश मंगलकार्यालयांचे बुकिंग पूर्ण झाले असून, वधूपक्षांना रिकाम्या कार्यालयांसाठी वणवण करावी लागत आहे. या धावपळीत पोलिसांचीही भर पडली असून, लग्नसराईत होणाऱ्या चे स्नॅचिंगच्या घटना रोखण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

शहरातील आडगाव, नाशिकरोड, उपनगर, सरकारवाडा आणि अंबड भागात मंगलकार्यालयांची संख्या मोठी आहे. फक्त सरकारवाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत १४ मंगलकार्यालये येतात. लग्नसराईचा मौसम चोरट्यांची चांदी करणारा ठरू शकतो. लग्न समारंभासाठी महिला दागिने परिधान करतात. अशा वेळी चोरटे महिलांच्या गळ्यातील दागिने सहजेतेने तोडून नेतात. गेल्याच आठवड्यात मंगलकार्यालायाकडे पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरट्यांनी तोडून नेली. ही घटना उपनगर परिसरात घडली. २०११ मध्ये तर चोरट्यांनी एकाच दिवशी चोपडा लॉन्स ते शरणपूर पोलिस चौकी दरम्यान चार चेन स्नॅचिंग करून लाखो रुपयांचे दागिने लुटून नेले होते. यानतंरही लग्नाच्या मौसमात स्नॅचर सक्रिय झाले होते. मध्यतंरीच्या काळात पोलिसांनी मंगल कार्यालयात जाऊन जनजागृती करण्याचे काम सुरू केले. बँग लिफ्टिंग, चेन स्नॅचिंग अशा घटनांना यामुळे आळा बसला. पोलिसांनी प्रत्येक पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मंगल कार्यालयांची यादी व लग्न तिथी यांची माहिती संकलित केली. तसेच, लग्नतिथीनुसार परिसरात बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे. यंदाही चोरट्यांना अशी कोणतीही संधी मिळू नये यासाठी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या मार्गदर्शनाखाली योजना आखली जात आहे. पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या मंगलकार्यालयांच्या यादीनुसारही मंगलकार्यालये किती दिवसांसाठी आणि वेळेसाठी बुक करण्यात आली आहे, याचा आढावा घेण्यात आला असून, तसे नियोजन करून मंगल कार्यालयांच्या जवळ पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. आडगाव परिसरातील बहुतेक मंगल कार्यालये नाशिक-औरंगाबाद हायवेवर असून, लग्नसराईत येथे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून नवरदेवांच्या मिरवणुकींवर यापूर्वीच पोलिसांनी बंधने आणली आहेत. याबरोबर, मंगल कार्यालयासाठी देण्यात येणार पोलिस बंदोबस्त चेन स्नॅचिंग रोखण्यासाठी आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता व्यवस्थपाकांनी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लग्नसराईत चेन स्नॅचिंग तसेच बॅग लिफ्टिंगच्या घटना रोखण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येईल. याबरोबर मंगलकार्यालयात जनजागृती करण्यात येईल. बँग लिफ्टिंग व स्नॅचर्सच्या घटना यामुळे टाळता येतील. - अतुल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेपाळमध्ये नाशिककर सुखरुप

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेले नाशिकचे पर्यटक सुखरूप असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. नेपाळमधून हे पर्यटक सुखरूप बाहेर पडले असून, त्यांनी परतीचा प्रवासही सुरू केला आहे. दरम्यान, काही पर्यटकांना नेपाळच्या सीमारेषेवरूनच मागे फिरावे लागल्याने पशूपतीनाथ आणि काठमांडूच्या दर्शनापासून वंचित रहावे लागले आहे.

शनिवारी पहाटे झालेल्या भूकंपामुळे नेपाळमधील जनजवीन विस्कळीत झाले आहे. नाशिकमधील दीडशेडून अधिकजण पर्यटनासाठी नेपाळमध्ये गेले होते. त्यापैकी अनेकजण नेपाळमध्ये अडकून पडले. पर्यटकांपैकी अनेकजणांशी संपर्क होत असल्याने नातलगांचाही जीव टांगणीला लागला होता. मात्र, नाशिकचे पर्यटक सुखरूप असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

विमानाने गेलेल्या सिमेन्स कंपनीच्या काही कामगारांशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाला आहे. हे कामगार व त्यांचे कुटुंबीय असे २५ जण विमानाने गोरखपूर येथे परतले. तेथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी या पर्यटकांची एका आश्रमात राहण्याची व्यवस्था केली. तेथून हे पर्यटक कोलकात्त्याकडे निघाले असून, ते रेल्वे किंवा मिळेल त्या साधनाने नाशिकला परतणार आहेत. कळवण तालुक्यातील अभोणा येथील रुपेश बाळासाहेब वराडे, अकिल जमशद पठाण यांसह अठरा पर्यटकांशी संपर्क साधण्यात प्रशासनाला यश आले असून, हे पर्यटकही सुखरूप आहेत. नाशि‌कमधील एकही पर्यटक या भूकंपामुळे मृत्युमुखी पडल्याची किंवा बेपत्ता असल्याची माहिती अद्यापपर्यंत प्राप्त झाली नसल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांनी दिली आहे.

दोन्ही वाहन सुरक्षित

चौधरी यात्रा कंपनीची दोन वाहने नेपाळमधील काठमांडू आणि पशूपतीनाथ येथे न जाताच शनिवारी सायंकाळी नेपाळ-भारताच्या सीमेवरूनच माघारी फिरल्या आहेत. स्थळदर्शन रद्द करण्यात आले असले तरी सहलीत अंर्तभाव असलेली परतीच्या मार्गावरील जगन्नाथपुरी, दार्जिलिंगसारख्या ठिकाणांना भेट देऊन हे पर्यटक नाशिकमध्ये परतणार असल्याची माहिती चौधरी यात्रा कंपनीचे संचालक ब्रीजमोहन चौधरी यांनी दिली. नेपाळमध्ये अडकलेले वाहनही पर्यटकांसह भारतात परतले असून, पुढील प्रवासाला लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाकळीत तोडफोडीमुळे तणाव

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

खून झालेल्या तरुणाच्या नातेवाईक व मित्रांनी शनिवारी (दि. २५) रात्री दोनच्या सुमारास टाकळीत काही तरुणांवर हल्ला करून गाडीची मोडतोड केल्याने तणाव पसरला आहे.

किरकोळ वादातून सुजित लोटचा ११ एप्रिलला खून झाला होता. त्याप्रकरणी चरण उजागरे या मुख्य संशयिताला अटक झाली आहे. शनिवारी रात्री उजागरे गटातील सतीश कृष्णा नायर मित्रांसमेवत घराजवळ उभा असताना सात-आठ मोटरसायकलवर डबलशीट आलेल्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. सतीश व त्याचे मित्र पळून गेले. मात्र, सतीशच्या पल्सर मोटरसायकलची (एम एच १५ डीएफ ३१४२) पेट्रोल टाकी, हेडलाईट, शॉकाप्सर हल्लेखोरांनी तोडून टाकले. सतीशने प्रवीण लोट व त्याच्या साथीदारांविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिस उपायुक्त विजय पाटील व उपनगरच्या उपनिरीक्षक मीना पखाल यांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

आत्महत्या नव्हे खून

येथील दारणा नदीत प्रमिला मधुकर कासार (वय ३७, शेवगेदारणा) या महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर नाशिकरोड पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, या महिलेचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. ही महिला शेतात काम करीत असताना चार एप्रिलला बेपत्ता झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढल्या वाहनचो-या

$
0
0


खान नजमुल इस्लाम, जुने नाशिक

जुने नाशिक परिसर हा विविध जातीधर्मांच्या लोकांच्या मिश्रवस्ती असलेला शहराचा अतिसंवेदनशील भाग आहे. सुमारे साडेचार लाख लोकसंख्येच्या व त्यांच्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी अवघे १३२ पोलिस तैनात असतात. म्हणजे सुमारे साडेतीन हजार लोकांमागे एक पोलिस असे सूत्र आहे. सध्या या भागात दुचाकी वाहनचोरांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षभरात २२ मोटरसायकली चोरीला गेल्या. यावर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यातच २८ मोटरसायकली चोरीला गेल्या आहेत.

भद्रकाली पोलिसांनी इतर गंभीर गुन्ह्यांवर काही प्रमाणात अंकुश मिळविला असला तरी महिला व तरुणींच्या विनयभंगाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. गेल्या वर्षात (२०१४) सहा विनयभंगाच्या घटना घडल्या होत्या. या वर्षाच्या प्रारंभीच चार घटनांची नोंद झाली आहे. दुसरीकडे दंगे, हाणामाऱ्यांवर काही प्रमाणात नियंत्रण असले तरी चालू वर्षातील पहिल्या तीन महिन्यातच गेल्या

वर्षाच्या १३ घटनांच्या तुलनेत आठ दुखापतीच्या घटनांची पोलिस दप्तरी नोंद झाली आहे. जबरी चोऱ्याही डोके वर काढत असून, याचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्या वर्षात निरंक असलेले नकली नोटांचे यावर्षी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. खुनाचीही तीच परिस्थिती असून, एक खुनाचा गुन्हा दाखल आहे. मोटर अपघातात मृत्यू पावणाऱ्यांची संख्या गेल्या वर्षी पाच होती. यावर्षी पहिल्या तीन महिन्यातच चारचा टप्पा ओलांडला आहे.

भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे साडेचार लाख लोकसंख्येच्या सुरक्षेसाठी अवघे १३२ पोलिस तैनात असतात. मंजूर संख्येपेक्षा अधिक मिळण्याऐवजी जे मंजूर संख्याबळ आहे ते ही मिळत नाही. यामुळे कामाचे ताण पोलिसांवर येत असल्याने याचा परिणाम तपास कार्य व बंदोबस्तावर दिसून येतो. भद्रकाली पोलिस ठाण्याचे विभाजन करून मुंबईनाका हे नवीन पोलिस ठाणे अस्तिवात येण्याच्या हालचाली गतिमान होऊन पुन्हा ते थंड बस्त्यात गेले आहे. अतिसंवेदनशील भागाच्या सुरक्षेचा प्रश्न कायम असताना सिंहस्थ कुंभमेळा अतिरिक्त जबाबदारी कशी पेलवेल या प्रश्नाचे उत्तर तूर्त तरी अनुउत्तरीतच आहे.

भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी वाहन चोरीच्या घटना वाढत आहेत. वाहनचोरांना जेरबंद करण्यासाठी सापळे रचून चोरांना अटकाव केला जात आहेत. इतर गंभीर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी वेळोवेळी नाकाबंदी, पायी गस्त, प्रतिबंधक कारवाई, रात्री दहाच्या नंतर चौकातील बसण्यावर प्रतिबंध, दिवसा व रात्री बिट मार्शलची विभागनिहाय गस्त, शांतता, मोहल्ला समिती सदस्यांच्या माध्यामातून जातीय सलोखा व कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यावर भर दिला जात आहे. - मधुकर कड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भद्रकाली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिककरांचे ‘पाणी’दार यश

$
0
0


महेश पठाडे

हिमाचल प्रदेश व पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत पुणे विद्यापीठाने रोइंग आणि कयाकिंग या दोन्ही क्रीडाप्रकारांत सुवर्ण पदक मिळवले. नाशिकच्या दृष्टीने ही ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे. कारण या 'पाणी'दार यशाचे शिलेदार नाशिकच्या ग्रामीण भागातील आहेत.

पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी पुणे विद्यापीठाच्या संघात वर्णी लागणे हीच नाशिकच्या दृष्टीने गौरवास्पद कामगिरी मानली जात होती. खो-खो, कबड्डी, कुस्ती हे नाशिकचे हुकमी खेळ मानले जात असले तरी यात पश्चिम महाराष्ट्राचेच वर्चस्व राहिले आहे. मात्र, आता ही परिस्थिती बदलत आहे. काही खेळांमध्ये नाशिकने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यात वॉटर स्पोर्टचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. रोइंग आणि कयाकिंगमध्ये सुवर्ण पदक मिळवणारे नाशिकचे खेळाडू पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करीत होते. अमृतसरमधील गुरू नानक विद्यापीठाच्या यजमानपदाखाली २३ ते २६ मार्च रोजी झालेल्या रोइंग स्पर्धेत 'कॉक्सलेस ४' प्रकारात पुणे विद्यापीठाने सुवर्ण पदक जिंकले. पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणारी ही टीम नाशिकच्या पंचवटी कॉलेजची होती. यात संतोष कडाळे, प्रसाद जाधव, राजेंद्र सोनार, अनिकेत हळदे यांचा समावेश आहे. रोइंगमध्येच सिंगल स्कलमध्ये संतोष कडाळे याने रौप्य पदक जिंकले. विशेष म्हणजे, पुणे विद्यापीठाचा मुले व मुलींचा संघ द्वितीय स्थानावर राहिला असला, तरी एकत्रित गुणांच्या जोरावर सर्वसाधारण विजेतेपदाचा मान पुणे विद्यापीठालाच मिळाला.

नाशिकमधील बोट क्लबमागे चिकाटी, संघर्ष आहे. गोदेच्या काठावर वसलेल्या केटीएचएम कॉलेजमध्ये (कै.) डॉ. वसंतराव पवार यांच्या दूरदृष्टीमुळे वॉटर स्पोर्ट बहरला. खरं तर नाशिकच्या वॉटर स्पोर्टची मुहूर्तमेढच डॉ. पवार यांनी रोवली. या बोट क्लबची कमान जितेंद्र कर्डिले यांनी सांभाळली. त्यानंतर घारपुरे घाटावर बोट क्लब सुरू झाला. नाशिकमधील काही तरुण पुण्यात शिक्षण घेत असताना त्यांनी सुरू केलेला नाशकातला हा दुसरा बोट क्लब. या धडपडणाऱ्या तरुणाईतले एक नाव म्हणजे माजी उपमहापौर अजय बोरस्ते. त्यांच्या प्रयत्नामुळेही नाशिकमधल्या वॉटर स्पोर्टला चालना मिळाली. मात्र, सातत्य राहिले नाही, हेही तितकेच खरे. सावरकरनगरातील वॉटर्सएज क्लबचा बोट क्लब म्हणजे गोदेचा पाईकच. ज्या वेळी १९ सप्टेंबर २००८ रोजी पुराचा फटका बसला, त्या वेळी क्लबच्या सर्व बोटी वाहून गेल्या. एकही बोट शिल्लक राहिली नाही. रोइंग संघटनेचे सचिव अंबादास तांबे गाळात रुतलेल्या बोटी पाहिल्यानंतर खिन्न झाले. मात्र, माजी उपमहापौर प्रकाश मते, तसेच विक्रांत मते यांच्या आधाराने या बोट क्लबने पुन्हा उभारी घेतली. गोदेला जेव्हा जेव्हा पूर येतो त्या वेळी जीवरक्षक म्हणूनही हा बोट क्लब मदतीसाठी सदैव सज्ज असतो. त्यानंतर चौथा बोट क्लब पिंपळगाव बसवंत येथील के. के. वाघ कॉलेजने चिंचखेड येथे सुरू केला. मविप्र संस्थेचे क्रीडाधिकारी हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने सुरू झालेल्या या बोट क्लबला माजी आमदार दिलीप बनकर यांची मदत मोलाची ठरली. कादवेच्या बॅकवॉटरवर सुरू झालेल्या या बोट क्लबला कष्टकऱ्यांनी राज्य, राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदके मिळवून दिली.

रोइंगमध्ये नाशिकचा दबदबा

नाशिकमध्ये रोइंगची सुरुवात १९९५-९६ पासून झाली. तत्पूर्वी केटीएचएम कॉलेजचा एकमेव बोट क्लब होता. रोइंगमध्ये १९९५मध्ये केटीएचएमच्या १४ खेळाडूंनी पुणे विद्यापीठाच्या संघात प्रथमच स्थान मिळविले. त्या वेळी ही कामगिरी नाशिकच्या इतिहासातली सर्वोच्च मानली जात होती. यात ८ मुले आणि ६ मुलींचा समावेश होता. रोइंगमध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळणारा पहिला खेळाडू अंबादास तांबे होता. मात्र, रोइंगमध्ये खऱ्या अर्थाने पदकांचा सिलसिला सुरू झाला, तो २००७पासूनच. राष्ट्रीय स्पर्धेत नाशिकने दरवर्षी पदक घेतले असून, सध्या १००पेक्षा अधिक राष्ट्रीय खेळाडू नाशिकमध्ये आहेत, अशी माहिती जिल्हा रोइंग संघटनेचे सचिव तांबे यांनी दिली. गेल्या वर्षी नाशिकच्या वैशाली तांबे हिने शिवछत्रपती पुरस्कार स्वीकारला. रोइंगमधील नाशिकची ही सर्वोत्तम कामगिरी मानली जाते. याच वर्षी मार्चमध्ये नाशिकने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय रोइंग चॅम्पियनशिप स्पर्धेत नाशिकने १३ सुवर्ण, ९ रौप्य, तर सात ब्राँझ पदके मिळवली होती. दरवर्षी विविध वयोगटांतील १० ते १५ मुले राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत असून, महाराष्ट्राच्या रोइंगमध्ये नाशिकचा दबदबा वाढत आहे.

आशियाई स्पर्धेचे लक्ष्य

कनोइंग कयाकिंगमध्येही नाशिकचे वर्चस्व वादातीत आहे. पुणे विद्यापीठाची कनोइंग-कयाकिंगची पहिली महाविद्यालयीन स्पर्धा २०११मध्ये कोकणगावच्या कादवा नदीत झाली. विशेष म्हणजे जेथे महाविद्यालयीन स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली त्याच कादवा नदीच्या बॅक वॉटरवर सराव करणाऱ्या पिंपळगाव कॉलेजने पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करताना अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत दोन ब्राँझ पदक मिळवले. यात सी १ प्रकारात सागर गाढवे, तर सी ४ प्रकारात सागर गाढवेसह गोकुळ निकम, सागर नागरे, किरण उघडे यांचा समावेश होता. केटीएचएम कॉलेजच्या लखन रहाडे याने नाशिकच्या इतिहासात ऐतिहासिक कामगिरी करताना पुणे विद्यापीठाला कयाकिंगमध्ये एक सुवर्ण पदकासह दोन ब्राँझ पदके मिळवून दिली. ही सुवर्णकामगिरी हिमाचल प्रदेशात नोंदवली आणि नाशिकच्या गोदाकाठाला आनंदाचे भरते आले. कारण रोइंग आणि कयाकिंगमध्ये दुहेरी सुवर्ण पदकाची कामगिरी नाशिककरांनी प्रथमच नोंदवली होती. जिल्हा कनोइंग कयाकिंग संघटनेचे सचिव जितेंद्र कर्डिले व मराठा विद्याप्रसारक संस्थेचे क्रीडाप्रमुख व प्रशिक्षक हेमंत पाटील यांनी आशियाई स्पर्धेत खेळाडूंकडून पदक मिळविण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्या दृष्टीने सुरू असलेली तयारी नक्कीच प्रेरणादायी असल्याचे स्पष्ट होत आहे.

महाराष्ट्रात वर्चस्व वाढणार

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंनी वॉटर स्पोर्ट्‍सला खऱ्या अर्थाने चालना दिली आहे. केटीएचएम कॉलेजचा बोट क्लब जिल्ह्यातील सर्वांत पहिला. त्यानंतर घारपुरे घाटावर बोट क्लब सुरू झाला. नाशिक शहरात दोन बोट क्लब असूनही शहरातली मुले या खेळाकडे फारसे वळत नसल्याची खंत प्रशिक्षक जितेंद्र कर्डिले यांनी व्यक्त केली. सध्या ९० टक्के मुले ग्रामीण भागातीलच आहेत. त्यामुळेच आम्ही विल्होळीत, तसेच सायखेडा कॉलेजचा बोट क्लब सुरू करणार आहोत. सध्या जिल्ह्यात चार बोट क्लब असून, लवकरच ही संख्या सहापर्यंत जाणार आहे. मद्रास स्पोर्ट क्लब तमिळनाडूचे प्रतिनिधीत्व करतो, तर कृष्णा हा एकमेव बोट क्लब कर्नाटकचे प्रतिनिधीत्व करताना दिसतो. त्या तुलनेने नाशिकमध्ये चारही बोट क्लबच्या खेळाडूंमध्ये प्रचंड चुरस आहे, जी महाराष्ट्राचे सातत्याने प्रतिनिधीत्व करीत राहील, अशी आशा आहे. गंगापूर धरणावर ४५ कोटींचे बजेट असलेल्या बोट क्लबचे मोठ्या थाटात उद्‍घाटन झाले. सलमान खान, सुनील शेट्टीसारख्या कलाकारांना त्या वेळी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, या बोट क्लबचे काम अनेक महिन्यांपासून थांबलेले आहे. हा बोट क्लब सुरू झाल्यास भारतातले आगळेवेगळे नौकानयन नाशिककरांना पाहायला मिळेल.

कनोइंग कयाकिंगचा इतिहास

कनो आणि कयाक हे दोन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये विभागले आहेत. कयाक म्हणजे एस्किमोमध्ये मानवी बोट म्हटले जाते. हा खेळ मूळचा सैबेरिया आणि ग्रीनलँडमधून उदयास आला. एस्किमो लोक शिकार आणि मासेमारीसाठी त्याचा उपयोग करीत. कनो बोटीचा उपयोग वाहतूक आणि युद्धासाठी केला जात. क्रीडा प्रकारात कनोइंग कयाकिंगचा समावेश १९व्या शतकात करण्यात आला. १८६६मध्ये क्रीडा विकासाच्या दृष्टीने लंडनमध्ये रॉल कनो क्लब, तर १८७१ मध्ये न्यूयॉर्क कनो क्लबची स्थापना झाली. १९२४ मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कनोइंग खेळाची प्रात्यक्षिके झाली. त्यानंतर १९३६मध्ये बर्लिनमध्ये या खेळाला ऑलिम्पिकची मान्यता मिळाली. पुणे विद्यापीठाची पहिली महाविद्यालयीन कनोइंग कयाकिंग स्पर्धा २०११मध्ये कोकणगावातील कादवा नदीवर झाली. त्याचे यजमानपद होते पिंपळगाव बसवंतच्या के. के. वाघ कॉलेजकडे.

रोइंगचा इतिहास

इंग्लंडमध्ये १७व्या शतकात रोइंगचा उदय झाला. रोइंगचा प्रसार प्रामुख्याने फ्रान्स, रशिया, जर्मनी, अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर झाला. लंडनमध्ये जमिनीवरील वाहतुकीपेक्षा थेम्स नदीत नावेद्वारे जलवाहतूक अधिक सोयीची समजली जात होती. इंग्लंडमधील इटन कॉलेजमध्ये १७१५मध्ये रोइंगची पहिली व्यावसायिक स्पर्धा झाली. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचा पहिला अंतिम सामना १८२९मध्ये ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठादरम्यान झाला. हा सामना पाहण्यासाठी २० हजार प्रेक्षक होते. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रोइंग असोसिएशन (फिसा)ची स्थापना १८९२मध्ये झाली. नाशिकमधील रोइंगच्या १४ खेळाडूंनी १९९५मध्ये पुणे विद्यापीठाच्या संघात प्रथमच स्थान मिळवले होते.

सायखेड्यात गोदावरीत, तर विल्होळीमध्ये वालदेवी धरणावर बोट क्लब सुरू करणार आहे. कारण ग्रामीण भागातील मुले या खेळात चांगली प्रगती करीत आहेत. त्यामुळे आशियाई स्पर्धेचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून आम्ही खेळाडूंची तयारी करून घेत आहे. अखिल भारतीय विद्यापीठ स्तरावर मिळविलेल्या यशाने आमचा आत्मविश्वास वाढला आहे. - जितेंद्र कर्डिले, सचिव, जिल्हा कनोइंग कयाकिंग संघटना

नाशिकच्या खेळाडूंचा सहभाग असलेल्या पुणे विद्यापीठाच्या संघाला रोइंगमध्ये प्रथमच सुवर्ण पदक मिळाले आहे. १९९५पासून रोइंगला सुरुवात झाल्यापासून सुवर्ण पदक नव्हते. हे मोठे यश असून, आमच्याच मार्गदर्शनाखाली या खेळाडूंनी चांगला सराव केला होता. लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरीही करून दाखवू. - अंबादास तांबे, राष्ट्रीय पंच, सचिव, जिल्हा रोइंग असोसिएशन

आशियाई स्पर्धेचे लक्ष्य बाळगूनच पिंपळगाव बसवंतच्या खेळाडूंचा सराव घेतला जात आहे. पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करताना खेळाडूंनी मिळविलेले यश ग्रामीण भागासाठी प्रेरणादायी आणि गौरवास्पद आहे. नाशिक जिल्ह्याची वॉटर स्पोर्टवरील पकड आता घट्ट होत असल्याची ही आशादायी बाब आहे. - हेमंत पाटील, प्रशिक्षक, क्रीडाधिकारी, मविप्र, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ते’ तहसीलदार मुंबईत

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सुरगाण्यातील कोट्यवधी रूपयांच्या रेशन धान्य घोटाळ्याप्रकरणी निलंबन अटळ असल्याची तहसीलदारांना खात्री पटली आहे. त्यांनी विविध खात्यांच्या मंत्र्यांसह राज्यपालांकडे गाऱ्हाणे मांडण्याचा निर्णय घेतला असून, सोमवारी सकाळीच ते मुंबईला पोहोचणार आहेत. निलंबनाची कारवाई करण्यापूर्वी चौकशी व्हायलाच हवी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येणार आहे.

सुरगाण्यात पाच कोटींच्या रेशन धान्याचा घोटाळा विधीमंडळाच्या अधिवेशनात चर्चेत आल्याने अन्न आणि पुरवठा मंत्री गिरिष बापट यांनी सात तहसीलदारांसह १६ जणांच्या निलंबनाची घोषणा केली. सोमवारी (दि. १३ एप्रिल) या विभागाचे सचिव दीपक कपूर यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर जवंजाळ, प्रभारी सहायक पुरवठा अधिकारी रवींद्र सायंकर यांसह अव्वल कारकून आर. एम. त्रिभूवन, अश्विनी खर्ड आणि लिपीक यांच्यासह लिपीक लता चामनार यांना निलंबित केले. त्यामुळे तहसीलदारांचीही झोप उडाली आहे. त्यातच अन्न व पुरवठा विभागाचा अहवाल महसूलमंत्री खडसे यांनी ग्राह्य मानल्याची कुणकुण तहसीलदारांना लागल्याने ते अधिकच धास्तावले आहेत. निलंबनाचे आदेश हातात पडण्यापूर्वीच मंत्र्यांकडे आणि राज्यपालांकडे आपली बाजू आग्रहपूर्वक मांडण्याचा निर्णय या तहसीलदारांनी घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक मनसेत मोठे बदल?

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मनसेतील फाटाफुटीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खास शिलेदारांमार्फत पुन्हा नाशिकमध्ये पक्षाची पाळेमुळे रुजवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून पक्षाचे सचिव प्रमोद पाटील आणि संपर्कमंत्री अविनाश अंभ्यकर नाशिकमध्ये तळ ठोकला आहे. त्यांनी सुरू केलेल्या जोडतोड मोहीमेमुळेच नगरसेवकांची फाटाफूट थांबल्याची चर्चा पक्षात सुरू असून, त्यावर राज ठाकरेंचे आता थेट नियंत्रण राहणार आहे. महिनाभरात पक्षसंघटनेतही मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मनसेची सत्ता असली तरी, शहरात मनसेच्याच नगरसेवकांची कामे होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नगरसेवकांमध्ये अस्वस्थता असून, अनेक जण इतर पक्षाच्या संपर्कात आहे. माजी आमदार वसंत गितेंनी राज ठाकरेंना धक्के देण्यास सुरूवात केल्याने ठाकरेंनीही आता आस्ते कदम घेत, पक्षाच्या उभारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नगरसेवकांचा मोठा गट फुटण्याच्या चर्चेने अस्वस्थ झालेल्या ठाकरेंनी पुन्हा नगरसेवकांची जमवाजमव सुरू केली आहे. त्यासाठी पक्षाचे सचिव प्रमोद पाटील यांच्यावर खास जबाबदारी सोपवली आहे. पाटील यांनी प्रशासकीय पातळीसह प्रभागांमधील कामांचा आढावा सुरू केला असून, नगरसेवकांच्या कामांचा आढावा घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक मनसेत मोठी फूट पडणार?

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या निवडणुका दीड वर्षावर येऊन ठेपल्याची जाणिव होताच, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निवणुकांना सामोरे जाण्याची व्यूहरचना आखायला सुरूवात केली आहे. पक्षिय संघटन मजबूत करण्यासोबतच नागरिकांना दृष्टीस पडण्याजोगी आणि लोकोपयोगी कामे हाती घेण्याच्या सूचना ठाकरेंनी आज नगरसेवकांना दिल्या. फक्त प्रभागाचा विचार न करता नाशिकच्या विकासावर भर देण्याचे आदेश त्यांनी नगरसेवकांना दिले. दरम्यान, ठाकरेंच्या बैठकीला ३० नगरसेवकांनी हजेरी लावल्याने पक्षात मोठी फूट पडणार असल्याच्या चर्चेला तुर्तास पूर्णविराम मिळाला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी शासकीय विश्रामगृहावर नगरसेवकांची व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मनसेचे सरचिटणीस बाळा नांदगावकर, संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर यांच्यासोबत त्यांनी नगरसेवकांना अपेक्षित असलेली कामे आणि अड‌ीअडचणी जाणून घेतल्या. मात्र, नगरसेवकांना ठाकरेंनी झटका दिला. केवळ प्रभागाचा विचार करू नका, शहरात लोकोपयोगी कामे कशी होतील याला प्राधान्य द्या, केलेली कामे लोकांपर्यंत कशी जातील यासाठी प्रयत्न करा अशा सूचना त्यांनी नगरसेवकांना केल्या.

माजी महापौरांसह नगरसेवक दूरच

मनसेत मोठी फाटाफूट होणार याची चर्चा सुरू असल्याने ठाकरेंनी आज थेट सर्व नगरसेवकांची बैठक घेतली. यात जवळपास ३० नगरसेवकांनी हजेरी लावली. तर दोन ते तीन नगरसेवकांनी बाहेरगावी असल्याचे कारण सांगीतले. मात्र प्रभाग समिती निवणुकीत बंडखोरी करणारे माजी महापौर अॅड. यतीन वाघ यांच्यासह माधुरी जाधव, सुनिता मोटकरी यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. पक्षाच्या बैठकीला हजेरी लावतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी या बैठकीपासून लांब राहणेच पसंद केले. अॅड. यतीन वाघ यांच्यासह तीन नगरसेवकांबाबतचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यांसदर्भात अंत‌मि निर्णय राज ठाकरेच घेतील अशी माहिती अविनाश अभ्यंकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

अन् ठाकरेंचा पाय घसरला !

शिवसेनेत असल्यापासून नाशिकवर घट्ट पकड असलेल्या राज ठाकरेंची नाशिकवरील पकड हळूहळू ढिली होत असल्याची जाणिव त्यांना आपल्या चालण्यातूनच आली. बैठकीनंतर जॉगिंग ट्रॅकवरून विश्रामगृहाकडे येताना ठाकरेंचा पाय अचानक घसरला. मात्र त्यातून ते लगेच सावरले. आपला पाय घसरल्याचे चित्रीकरण झाल्याचे लक्षात येताच ठाकरेंनी दूरचित्रवाहिणीच्या कॅमेरामन्सना बोलावून घसरल्याचे फुटेज दाखवण्याचे फर्मान सोडले. हे फुटेज डिलीट करण्याची विनंती त्यांनी केली. एकूणच आपला टीआरपी घसरल्याची जाणीव ठाकरेंना झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थात रेल्वेला अधिक थांबे?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ काळात नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना घडू नये यासाठी जवळपासच्या स्टेशनांवरही गाड्या थांबविण्याचे तसेच तेथूनही गाड्या सोडण्याचे प्रशासनाच्या विचाराधीन आहे. ओढा ते इगतपुरीपर्यंतच्या स्थानकांची त्यासाठी मदत घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

गेल्या नाशिक कुंभमेळ्यात येथील सरदार चौकात चेंगराचेंगरीची घटना घडून कुंभमेळयाला गालबोट लागले होते. यंदा अशी दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन काळजी घेत आहे. सिंहस्थ काळात नाशिकरोड रेल्वेस्थानकावर भाविकांची प्रचंड गर्दी होईल. ते लक्षात घेऊनच वेगळा विचार केला जात आहे. एकूण ५९ गाड्या नाशिकरोड स्टेशनात थांबतात. याखेरीज सिंहस्थ काळात या दोन्ही दिशेला जाण्यासाठी प्रत्येकी अकरा जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. इटारशी, पाटणा, खांडव्यासह उत्तर भारतातूनच अधिक भाविक येणार आहेत. या भाविकांना सरसकट नाशिकरोड स्टेशनात न उतरविता त्यांना वेगवेगळ्या स्टेशनांवर उतरविण्याचे नियोजन करण्याचे प्रशासनाच्या विचाराधीन आहे.

सिंहस्थकाळात येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेस्थानक अपुरे ठरणार आहे. गाडीची प्रतीक्षा करीत प्रवासी स्थानकात थांबत असतात. परंतु, प्रवाशांची होणारी गर्दी पाहता किती लोक थांबू शकतात हा प्रश्नच आहे. त्यामुळे पर्यायी जागेत शेड उभारल्यास तेथे प्रवाशांची व्यवस्था होऊ शकते. रेल्वेकडे महापालिकेची आठ ते दहा एकर जागा आहे. तेथे शेड उभारले तर हजारो भाविक तेथे थांबू शकतील, अशी सूचनाही पुढे आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images