Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

ग्लोबल शाळांचं गाव

$
0
0
जागतिकीकरणाच्या प्रक्रीयेमुळे शहर जगात जाऊ पाहतंय आणि जगं शहरात येऊ पाहतंय. या स्थित्यंतराला सांधणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे शिक्षण. आव्हान व्यापक होतं तेव्हा ते पेलणा-या खांद्यांमध्येही तितक्याच ताकदीच्या क्षमता निर्माण कराव्या लागतात. ही प्रक्रिया नाशिकच्या शिक्षण क्षेत्रात सुरू झाली आहे.

मालेगाव तहसील कार्यालयात मतदार मदत कक्ष

$
0
0
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शंभर टक्के छायाचित्र मतदार ओळखपत्र तयार करण्यासाठी मालेगाव तहसील कार्यालयात मतदार मदत कक्ष कार्यान्वीत करण्यात आला आहे.

मार्केटिंगचा पाया वेदांमध्येच!

$
0
0
नवनवे गॅझेट्स, टेक्नॉलॉजी व मार्केटिंग अशा गोष्टींनी व्यापलेल्या जगात वेदांचा अभ्यास करण्यास सांगितले तर अनेक जण नाक मुरडतील. मात्र नाशिकमधल्या सौरभ हरदास या विद्यार्थ्याने वेदांचा अभ्यास तर केलाच, शिवाय सध्या कॉस्मेटिकपासून कन्स्ट्रक्शनच्या मार्केटिंगमध्ये वापरल्या जाणा-या तंत्रांचा वेदांशी कसा संबंध आहे हेही दाखवून दिले.

हजार वाहनांवर कारवाई

$
0
0
नाशिक जिल्ह्यातून अवैधरित्या गौणखनिजांची वाहतूक करणा-या सुमारे १०४२ वाहनांवर महसूल विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईपोटी विभागाने तब्बल लीड कोटी रुपयांचा दंडही वसूल केला असून ४७ वाहनांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कामगारांवर दबाव आणू नका

$
0
0
इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील एन्ट्रोमॉड पॉलिकोटर्स कंपनीत कामगारांवर दबाव आणू नये, असे निर्देश सहाय्यक कामगार आयुक्तांनी कंपनी प्रशासला दिल्याची माहिती सीटू नेते डॉ. डी. एल. कराड यांनी दिली आहे.

'आरटीओ'ने ओलांडले महसूल टार्गेट

$
0
0
जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेसारख्या यंत्रणांपुढे निधी खर्चाचे आव्हान उभे असताना, प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) मात्र महसुलाचे उद्दीष्ट पार करत विभागातून १०५ टक्के अर्थात ३२१ कोटींचा महसूल संकलीत केला. विभागात आर्थिक आकडेवारीत नाशिक, तर टक्केवारीत मालेगावने आघाडी घेतली.

मंदीने रोखली वाहनविक्रीची घोडदौड

$
0
0
बाजारातील आर्थिक अस्थिरता, इंधनाच्या दरांत झालेली प्रचंड वाढ अशा विविध कारणांमुळे २०१२-१३ या आर्थिक वर्षात वाहनबाजारावर मोठा परिणाम झाल्याचे आरटीओ कार्यालयाकडील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

'मुक्त' च्या आरोग्याला डॉ. जामकरांचे 'बूस्ट'

$
0
0
कुलगुरू डॉ. आर. कृष्णकुमार यांच्या दिर्घकालीन रजेमुळे विद्यापीठाविषयी अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या. याला थेट विद्यापीठाच्या कुलपतींनीच पूर्णविराम दिला असून महिनाभराच्या रजेवर गेलेल्या कुलगुरू डॉ. कृष्णकुमार यांच्या पदाचा कार्यभार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरूण जामकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

जिल्ह्यातील करमणूक साडेसतरा कोटींची

$
0
0
करमणुकीची साधने दिवसेंदिवस वाढत असल्याने नाशिक जिल्ह्यातून करमणूक कर विभागाला तब्बल साडेसतरा कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, प्रदर्शने, केबल, डीटीएच आदिंद्‍वारे हा कर विभागाला मिळाला आहे.

सिंहस्थासाठी पालिकेला ३०० कोटी

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या ३५० कोटींपैकी ३०० कोटी रुपये महापालिकेला देण्यात येणार आहेत. सिंहस्थासाठी लवकरच विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी सांगितले आहे.

लाच प्रकरणी लिपीकास अटक

$
0
0
महापालिकेच्या पूर्व विभागातील कनिष्ठ लिपीकाने नळ कनेक्शन देण्यासाठी पाचशे रूपयांची मागणी केली होती. हे पैसे स्वीकारताना कनिष्ठ लिपीकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

गाडीच्या धडकेत बालकाचा मृत्यू

$
0
0
स्कॉर्पियोने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत सहा वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नाशिक-पुणे रोडवर घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी दोन तास रास्ता रोको केले.

नाशिकच्या भावी वाटचालीचा रोडमॅप

$
0
0
नव्या युगातलं नवं महानगर म्हणून आपलं नाशिक झपाट्याने आगेकूच करतंय. शिक्षण, उद्योग, व्यवसाय, संस्कृती अशा विविध क्षेत्रात नाशिक चकाकू लागलं आहे. या चकाकीला कोंदण आहे ते मुंबई आणि पुण्याच्या निकटच्या सहवासाचं. मात्र, विकासाच्या झंझावातात या दोन्ही मोठ्या शहरांची विस्कटलेली घडी सावरण्यात बरीच शक्ती खर्ची पडते आहे.

उद्योगांना वीज सवलतीची मुदतवाढ

$
0
0
रात्री दहा ते सकाळी सहा या काळात औद्यागिक वीजग्राहकांना प्रती युनिट अडीच रुपयांची सवलत पुन्हा सहा महिन्यांसाठी देण्यात आली आहे. या सवलतीची मुदत ३१ मार्चला संपली होती. सहा महिन्यांसाठी मुदतवाढ मिळाल्याने उद्योजकांनी दिलासा व्यक्त केला आहे.

राज निघाले उत्तर महाराष्ट्रात

$
0
0
फेब्रुवारीपासून राज्याच्या दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज, मंगळवारपासून उत्तर महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. राज यांच्या राज्यव्यापी दौऱ्याचा शेवटचा टप्पा असलेल्या या दौऱ्याची सुरुवात नाशिकपासून होणार असून रविवारी जळगाव येथील सभेने या दौऱ्याची सांगता होणार आहे.

केवळ १५९ शाळांना मान्यता

$
0
0
बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार देणाऱ्या अधिनियमानुसार जिल्ह्यातील केवळ १५९ शाळांना प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत मान्यता देण्यात आली आहे. या कायद्यानुसार सुविधा देण्यासाठी शाळांना ३१ मार्च २०१३ पर्यंत मुदत देण्यात आली होती.

एमपीएससीचे उमेदवार हवालदील

$
0
0
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून रविवारी होणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा राज्यभरातील विद्यार्थ्यांचा डाटाच करप्ट झाला आहे. नाशिकमध्ये राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मंगळवारी संध्याकाळी आयोगाच्या वेबसाइटवर ही सूचना अपडेट करण्यात आली.

दमणगंगा, नारपारचे पाणी गुजरातला देऊ नका

$
0
0
दमणगंगा व नारपार या नद्यांचे पाणी गुजरातला देऊ नये, यासाठी राज्य सरकारने केंद्राच्या राष्ट्रीय जलविकास अभिकरणाकडे प्रयत्न करावेत. तसेच पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी तापी आणि गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी मांजरपाडा-१, मांजरपाडा-२ आणि वांजुळपाणी या प्रकल्पांसह २१ प्रवाही वळण योजनांसाठी पुरेसा निधी द्यावा, अशी मागणी आमदार जयंत जाधव यांनी विधान परिषदेत केली.

‘ज्युनिअर ड्राफ्ट्समन’ला ५० हजार घेताना अटक

$
0
0
धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातील मौजे ब्राह्मणे येथील भूखंड ‘एन-ए’साठी (अकृषक) आवश्यक अंतिम आराखडा मंजूर करण्यापोटी लाचेची मागणी करणाऱ्या धुळ्याच्या नगर रचना कार्यालयातील ज्युनिअर ड्राफ्ट्समन प्रवीण श्रीराम खंडेराव यांना ‘अँटी करप्शन ब्युरो’च्या पथकाने मंगळवारी ५० हजारांची लाच घेताना अटक केली.

अव्वल कारकुनाच्या निलंबनाचे आदेश

$
0
0
छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांच्या नावे बनावट रेशनकार्ड दिल्याप्रकरणी तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकून ज्योती शिंदे यांच्या निलंबनाची कारवाई जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. याप्रकरणी तहसीलदार सुचेता भामरे यांना हलगर्जी केल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images