Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

...तर डिपॉजिट जप्त होईल

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी रस्ते महत्त्वाचे असून पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून दर्जेदार रस्ते निर्माण करा. त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष पुरवा, असे आदेश केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी शुक्रवारी दिले. देखभाल दुरुस्तीची कामे गांभीर्याने न घेणाऱ्या ठेकेदारांचे डिपॉझिट जप्त केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या सहा जिल्ह्यातील कामांची आढावा बैठक भगत यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथील शासकीय विश्रामगृहावर शुक्रवारी झाली. बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजयश्री चुंभळे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, हेमंत गोडसे, ए. टी. पाटील, रक्षा खडसे, ग्रामविकास विभागाचे सहसचिव दिपक मोरे, मुख्य अभियंता पी. बी. रणभोर आदी उपस्थित होते.

योजनेचा दुसरा टप्पा २०१३ मध्ये सुरू झाल्याचे सांगून भगत म्हणाले, की राज्यात या योजनेमधून आतापर्यंत २२ हजारपेक्षा अधिक किलोमीटर लांबीचे रस्ते तयार झाले आहेत. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत दोन हजार ६१८ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी मंजूर निधीचा हप्ता राज्याला देण्यासाठी केंद्र सरकार पातळीवर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. योजनेतून तयार केले जाणारे रस्ते चांगल्या स्थितीत रहाण्यासाठी यंत्रणांनी कामावर विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीच्या सुरुवातीला नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार, ठाणे जिल्ह्यातील योजनेच्या कामांची माहिती देण्यात आली. बैठकीस ग्रामविकास विभागाचे राज्य गुणवत्ता समन्वयक व्ही. एन. अष्टपुत्रे, वित्तीय सल्लागार सुनील मोने, कक्ष अधिकारी सुषमा कांबळी, कार्यकारी अभियंता संतोष शेलार, आदींनी ही माहिती दिली.

रस्त्यांची देखभाल नाही

चर्चेत सहभाग लोकप्रतिनिधींनी ही योजना राबविताना आणि यशस्वी करताना येणाऱ्या अडचणी मांडल्या. ग्रामसडक योजनेतून तयार केल्या जाणाऱ्या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती केली जात नाही, अशी तक्रार लोकप्रतिनिधींनी भगत यांच्याकडे केली.

स्थानिक राजकारणाचा आम्हालाच त्रास

अनेकदा रस्त्यांच्या कामांपेक्षा श्रेय घेण्यासाठी त्यांच्या उदघाटनाचे राजकारण केले जाते. त्यातून स्थानिक पातळीवर भांडणे होतात. त्याचा त्रास आम्हाला सहन करावा लागतो अशी तक्रार ठेकेदारांनी केली. रस्त्यांच्या देखभाल दुरूस्तीवर प्रतिकिलोमीटरसाठी २० हजार रुपये खर्च करता येतो. हा खर्च केला जात नसेल तर संबंधित ठेकेदारांकडील डिपॉजिट जप्त केले जाईल, असा इशारा भगत यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अवजड वाहनांना शहरात बंदी आणा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवसा शहरात येणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीसारखी समस्या तर उद्भवते तसेच अपघातात अनेकांना प्राणही गमवावे लागत आहे. अपघातात एकाच आठवड्यात चार जणांचा बळी गेला आहे. यामुळे दिवसा अवजड वाहनांना शहराबाहेर रोखण्यात यावे, अशी मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्याकडे केली आहे.

शुक्रवारी रात्री राणेनगर परिसरात उड्डाणपुलावर अपघात झाल्याने घोटी येथील मिलिंद देवराम वालतुले हे जागीच ठार झाले, तर इतर तिघे जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. एका विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी वालतुले यांच्यासह अशोक काळे, जनसेवा पतसंस्थेचे व्हाइस चेअरमन विठ्ठल काळे हे कारने जात असताना हा अपघात झाला. याच आठवड्यात सोमवारी रात्री पाथर्डी फाटा परिसरात उड्डाणपुलावर ट्रक-कुल कॅब कार अपघात होऊन त्यात पत्रकार प्रियांका डहाळे यांच्यासह तिघे ठार झाले होते. अपघाताच्या या मालिकांमुळे नागरिक धास्तावले आहे. यापार्श्वभूमीवर आमदार फरांदे यांनी शहरात दाखल होणाऱ्या अवजड वाहनांना दिवसभर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समितीकडून शेतकऱ्याची फसवणूक

0
0

नाशिक : कळवण कृषि उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप शेतकरी बचाव कृति समितीचे अध्यक्ष विश्वास मोरे यांनी पत्रकारपरिषदेत केला आहे. अभोणा येथील कांदा आडत व्यापारी कलिम शेख याने कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत कोट्यवधी रुपयांचा कांदा खरेदी केला. परंतु, वारंवार मागणी करूनही शेतक-यांचे पैसे दिले नाहीत. शेकडो शेतकऱ्यांना दिलेले लाखो रुपयांचे धनादेशही बँकेत न वटता परत आले असून, कळवण कृषि उत्पन्न बाजार समितीनेही अंग काढून घेतल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे मोरे यांनी सांगितले. मार्केट कमिटीने शेतकऱ्यांकडून योग्य ती सौदा पट्टी, कांदा पट्टी, हिशोब पावती, वचन चिठ्ठी, वजन चिठ्ठी कपात करुन सुध्दा शेतकरऱ्यांनी दिलेल मालाचे पैसे अदा केले नाहीत. या प्रकरणी वारंवार मागणी करुनही कमिटी प्रशासन त्याकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यावेळी शेतकऱ्यांसह गंगाराम पाटील व कृति समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्ड्यांसाठी २४ कोटींचा निधी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेचे तब्बल २४ कोटी रुपये खर्ची होणार आहेत. त्यासाठीची कार्यवाही महापालिकेने सुरू केली आहे. मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा खड्ड्यांची संख्या कमी झाली की काय, अशी शंका उपस्थित होत आहे.

सिंहस्थासाठी महापालिकेमार्फत शहरातील विविध रस्त्यांचे डांबरीकरण व रुंदीकरणाची सुमारे ४६२ कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. सद्यस्थितीत बाह्य रस्ते चकाचक दिसू लागले असले तरी शहरातील अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. आता पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सहाही विभागातील रस्त्यांची दुरुस्ती व खड्डे बुजविण्यासाठी २४ कोटी रुपयांचे प्राकलन तयार केले आहे. त्यासाठी निविदा दर मागविले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत खड्डे बुजविण्यासाठीची रक्कम १५ कोटी रुपयांनी घटली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात रस्त्यांची दुरुस्ती, डांबरीकरण व रुंदीकरण होत असतानाच महापालिकेने सहाही विभागातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती व खड्डे बुजविण्यासाठी २४ कोटी १९ लाख रुपयांचे प्राकलन तयार केले आहे. शहरातील नाशिक पूर्व व सातपूर विभागात रस्त्यांची स्थिती गंभीर मानली जात आहे. रस्त्यांवरचे डांबर उखडलेले, खड्डे पडलेले असल्याने नागरिकांच्या तक्रारी कायम आहेत. दोन वर्षांपूर्वी शहरात रस्त्यांची अवस्था अतिशय खराब होती. शिवसेनेने खड्ड्यांचा प्रश्न उपस्थित करीत लांब उडी मारण्याची स्पर्धाही ठिकठिकाणी घेतली. गेल्या वर्षी महापालिकेने खड्डे बुजविण्यासाठी ३९ कोटी ३१ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार केला होता. यंदा मात्र त्यात १५ कोटींनी घट झाली आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांनी मुंबईतील खड्ड्यांबाबत शिवसेनेवर तोंडसुख घेतले होते. मात्र, नाशिक महापालिकेत सत्ता आल्यानंतर राज यांनी मात्र खड्ड्यांची जबाबदारी ही पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांची असल्याचे सांगितले. आता महापालिकेत सत्तारूढ होऊन राज यांच्या मनसे पक्षाला तीन वर्षे लोटली आहेत. खड्ड्यांची कामे महापालिकेच्या खर्चातून करायची की संबंधित कंत्राटदारांकडून करून घ्यायची, याबाबत राज ठाकरे यांची भूमिका नेमकी काय असेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

असे असतील दर

महापालिकेने आता नाशिक पूर्व विभागासाठी पाच कोटी ३२ लाख, पश्‍चिम विभागासाठी तीन कोटी ४० लाख, पंचवटी विभागासाठी तीन कोटी ६५ लाख, नाशिकरोड विभागासाठी तीन कोटी ७७ लाख, सिडको विभागासाठी तीन कोटी ९६ लाख, तर सातपूर विभागासाठी चार कोटी सहा लाख रुपयांचे प्राकलन तयार करीत त्याकरिता निविदा दर मागविले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् ऑपरेशन गरुड झाले फत्ते

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

सकाळची वेळ. लान्सर हेलिकाप्टरने शत्रुची टेहाळणी करून शत्रुची महत्त्वाची ठिकाणे हुडकून काढली. नंतर दहा हजार फूट उंचीवरून पॅराशूटच्या सहाय्याने भारतीय जवान रणभूमीवर अचूकपणे उतरवले. शत्रुवर चित्यासारखी झेप घेत चिता आणि चेतक हेलिकॉप्टरांनी बॉम्बचा वर्षाव केला. पाठोपाठ अत्याधुनिक शस्त्रांनी युक्त अशा ध्रुव हेलिकॉप्टरांनी भेदक मारा करून शत्रुची दाणादाण उडवली. शत्रुचा संपूर्ण निपातः करून जवानांनी तिरंगा फडकला आणि भारत माता की जयच्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. ऑपरेशन गरुड मोहीम फत्ते झाली.

निमित्त होते गांधीनगर येथील लष्करी हवाई प्रशिक्षण केंद्राच्या २३ व्या तुकडीच्या पदवीदान समारंभाचे. मात्र, चित्तथरारक प्रात्यक्षिकांमुळे त्याला रणभूमीचा रिअल फिल आणि थ्रिल आला. या मोहिमेला ऑपरेशन गरुड असे नाव देण्यात आले. यानंतर पदवीदान सोहळा पार पडला. लेफ्टनंट जनरल पी. आर. कुमार प्रमुख पाहुणे होते. १ सप्टेंबर २००३ रोजी स्थापन झालेल्या या केंद्रातून खास लष्करासाठी लढाऊ हेलिकॉप्टरचे पायलट घडविले जातात. येथे दहा अभ्यासक्रम आहेत. यंदा ४३ विद्यार्थी होते. तेरा महिन्यांच्या कालावधीत त्यांनी अलाहाबाद, झांसी येथे प्राथमिक तर गांधीनगर येथे खडतर प्रशिक्षण घेतले.

चिता, चेतक, ध्रुव या हेलिकॉप्टरनी प्रथम मानवंदना दिली. त्यानंतर झालेल्या ऑपरेशन गरुड मोहिमेने डोळ्यांचे पारणे फेडले. प्रथम युद्धभूमीवर टेहळणी करण्यात आली. हेलिकॉप्टरमधून आघाडीवर जवान उतरविण्यात आले. त्यांना रसद पोहचविण्यात आली. हेलिकॉप्टरमधून उतरवलेल्या उखळी तोफांच्या सहाय्याने राजपूताना रायफल्सच्या जवानांनी हल्लाबोल केला. जखमी जवानांना तळावर आणताना लक्ष्यभेद करुन ऑपरेशन गरुड मोहीम यशस्वी केली.

ट्रॉफी गोज टू...

प्रशिक्षण कालावधीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खालील विद्यार्थ्यांना ट्राफी देऊन गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट विद्यार्थी- चिता ट्रॉफी- कॅप्टन निखिलेश साहू, एअर ओपी ट्रॉफी- कॅ. निखिलेश साहू, फ्लेडग्लिंग ट्रॉफी- कॅ. प्रणव वर्मा, पी. के. गौर ट्रॉफी- कॅ. वरुण पाराशर, एस. के. शर्मा ट्रॉफी- कॅ. प्रखर अरोरा.

देशाचा गौरव वाढवा

आपल्या बीज भाषणात लेफ्टनंट जनरल पी. आर. कुमार म्हणाले की, तुमचे प्रशिक्षण पूर्ण झाले असले तरी खरी जबाबदारी आता सुरू होणार आहे. ती गांभीर्याने पार पाडा. स्वयंशिस्त, समर्पण वृत्तीने सेवा करुन देशाचा गौरव वाढवा. देशाला तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. प्रत्येक गोष्टीत शंभर टक्के योगदान द्या. जम्मू-काश्मीर असो की, ईशान्येकडील राज्ये असो, अथवा सीमावर्ती भाग असो, आपले कर्तव्य चोखपण पार पाडा. अष्टपैलू व्हा. आपण सर्व गुणसंपन्न झालो असे कदापी समजू नका. तुम्हाला सुधारणेसाठी भरपूर वाव आहे. तुमच्या कुटुंबियांचे आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलबीटी थकबाकीदारांना ‘अभय’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्थानिक संस्था कर भरण्यास पात्र असतानाही तो भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी राज्य सरकारने अभय योजना जाहीर केली आहे. महसुलासाठी झगडणाऱ्या महापालिका प्रशासनाला यामुळे कितपत दिलासा मिळेल, हे लवकरच स्पष्ट होईल.

स्थानिक संस्था कर (एलबीटी) सुरू झाल्यापासूनच त्याच्या भवितव्याबद्दल साशंकता व्यक्त केली जात होती. व्यापारी व सरकार आमने सामने उभे ठाकल्याने अनेकदा कायद्यात बदल करण्यात आला. एलबीटी नकोच या मागणीवर व्यापारी ठाम राहिले. नूतन सरकारने याच आश्वासनावर व्यापक पाठिंबा मिळवला. त्यामुळे सरकार स्थापन झाल्यापासूनच एलबीटी रद्द करण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू होत्या. १ ऑगस्टपासून नवी कररचना अस्तित्वात येणार असताना, एलबीटीची थकबाकी वसुलीकरिता अभय योजना राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. राज्यातील २५ महापालिकांमध्ये आघाडी सरकारच्या काळात एलबीटी कर सुरू करण्यात आला होता. जकात रद्द करण्याची मागणी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी ही कररचना सुरू झाल्यावर त्यालाही विरोध सुरू केला. व्यापाऱ्यांनी कर भरण्यासाठी नोंदणीच केली नाही तर नोंदणी केलेल्या व्यापाऱ्यांनी विवरणपत्रेच भरली नाहीत. या करावरून गोंधळ असतानाच १ ऑगस्टपासून एलबीटी रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली होती. कर सुरू असताना एलबीटी भरण्याचे व्यापाऱ्यांनी टाळले होते. तर काही व्यापाऱ्यांनी नोंदणीही केली नव्हती. ही पार्श्वभूमी असताना १ जून ते ३१ जुलै या काळात एलबीटी कराची थकबाकी भरण्याकरिता अभय योजना राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. या योजनेत व्यापाऱ्यांना व्याज वा दंड भरावा लागणार नाही. एलबीटी रद्द होणार हे सरकारनेच जाहीर केले असल्याने अभय योजना सरकारने आणली असली तरी त्याला कितपत प्रतिसाद मिळेल याबाबत साशंकताच आहे. कारण हा कर रद्द होणार असल्याने थकबाकी का भरावी, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. पण हा कर रद्द झाल्यावरही आधीची थकबाकी व्यापाऱ्यांच्या नावे कायम राहील याकडे अधिकारी लक्ष वेधत आहे. हजारो व्यापाऱ्यांकडे थकबाकी असून, एलबीटीमुळे महापालिकेच्या उत्पन्नाला महिन्याकाठी पाच ते सात कोटी रूपयांचा फटका बसला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वा लाखाची रोकड लंपास

0
0

नाशिकः दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले १ लाख ३० हजार रुपये चोरट्यांनी हातोहात लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सरस्वतीनगर परिसरातील महामार्गाजवळ घडली.याच ठिकाणी राहणाऱ्या फिर्यादीने एका बँकेच्या एटीएममधून एक लाख ३० हजार रुपयांची रोकड काढली. यात पाच हजार रुपये कमी ​असल्याने त्यांनी दुसरे एटीएम शोधले. काढलेले पैसे फिर्यादीने आपल्याकडील प्लेझर वाहनाच्या डीक्कीमध्ये ठेवले होते. दुसऱ्या एटीएममधून पाच हजार रुपये काढेपर्यंत चोरट्याने डीक्की खोलून आतील पैशांवर हात साफ केला. पाळत ठेऊन चोरट्यांनी आपला कार्यभाग साधला. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनैतिक संबंधातून पत्नीचा गळा दाबून खून

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या बायकोचा गळा दाबून खून केल्याची घटना दिंडोरी येथे घडली असून, दिंडोरी पोलिसांनी पतीस अटक केली आहे. युवराज गोवर्धन चव्हाण (वय ३०) रा. विठ्ठलनगर हा पालखेड चौफुलीजवळ चहाची टपरी चालवतो. एका फ्लॅटमध्ये पत्नी हीना (वय २५) व दोन मुलांसह राहत होता. त्याच्या पत्नीचे शुक्रवारी संशयास्पद निधन झाले. तिचा गळा दाबून खून झाल्याचा संशय व्यक्त करून आई सरमाबाई रमेश कोळेकर हिने दिंडोरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. युवराज गोवर्धन चव्हाण याचा एका मुलीशी अनैतिक संबंध होते. यामुळे तो हीनाचा शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बुधवारी (दि. १३ मे) हीनास युवराजच्या घरी आणून सोडत त्याची समजूत काढली होती. शुक्रवारी (दि. १५ मे) दुपारी फोन आला की हीना बिल्डिंगवरून पडली. तुम्ही या आम्ही येथे आलो असता पहिले तर तिच्या कमरेवर व मानेवर मारहाणीच्या खुणा तसेच कशाने तरी गळा आवळून खून केल्याचे आढळून आले, असे फिर्यादीम म्हटले आहे.

विवाहितेच्या खूनप्रकरणी अटक

मनमाड : प्रेमसंबंध ठेवायला नकार देणाऱ्या विवाहीत महिलेला मारहाण करून विहिरीत ढकलून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी नांदगाव तालुक्यातील समाधान सांगळे याच्याविरोधात नांदगाव पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा शुक्रवारी उशिरा दाखल करून अटक केली. जळगाव बुद्रुक येथे समाधान सांगळे याने प्रियंका आव्हाड या विवाहितेला मारहाण करून प्रेमसंबंध ठेवण्याचा आग्रह केला. मात्र त्यास नकार दिल्याने प्रियंकास विहिरीत ढकलून दिले. त्यात तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी समाधान सांगळे यास अटक केली आहे.

अपघातात एक ठार

नाशिकरोड : शिंदे गावाजवळ ट्रकने धडक दिल्याने एक महिला ठार झाली. नाशिकरोड पोलिस ठाण्यात किसन मुरलीधर सांगळे (वडाळागाव) यांनी फिर्याद दिली आहे. दुचाकीवरून (एमएच १५ एच १६६५) पत्नी ताईबाई सांगळे (वय ५५) व माया सुदाम सांगळे (वय ११) यांच्यासह नाशिकरोडला येत होते. शिंदे गावाजवळ ट्रकने (एम.डब्लू.एन. २७४३) दुचाकीला मागून धडकली. ताईबाई सांगळे या गंभीर जखमी झाल्या. खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान ताईबाई यांचा मृत्यू झाला. ट्रकचालक रामदास गुंड (जालना) याला नाशिकरोड पोलिसांनी अटक केली आहे.

९१ हजाराची घरफोडी

जेलरोड येथे शौचालयाचे गज कापून ९१ हजाराची घरफोडी झाली. नाशिकरोड पोलिस ठाण्यात राजेंद्र शेजवळ (राजगृह बंगला, सदगुरू नगर, जेलरोड) यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (ता.१५) दुपारी ते विवाह समारंभाला गेले होते. सायंकाळी परतल्यावर चोरी झाल्याचे उघड झाले. घराच्या स्वच्छतागृहाचे गज तोडून चोरांनी दागिने व रोकड असा ९१ हजाराचा एवज लंपस केला. उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

जेलरोडच्या नारायणबापू चौक परिसरातील सोळा वर्षाच्या अल्पयवीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी उपनगर पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना आज ताब्यात घेतले. मुलीने दिलेल्या फिर्यादीचा आशय असा ही मुलगी सायखेडारोड-जेलरोडवरील अभिनव शाळेसमोरून पंधरा मे रोजी सकाळी साडेदहाला दूध आणण्यासाठी जात होती. दोन मुलांनी अडवून तिला पल्सरवर फिरायला येणार का, अशी विचारण केली. तिने नकार देताच दोघांनी शिवीगाळ, मारहाण करून तिचा विनयभंग केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अतिक्रमण मोहिमेविरोधात त्र्यंबकला बंद

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेने बेजार झालेल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरत गाव बंद ठेवून निषेध व्यक्त केला. तसेच वीन बसस्थानक परिसरात रास्तारोको करण्यात आला. त्र्यंबक येथे या आठवड्याच्या प्रारंभापासून शहरातील अतिक्रमणे काढण्यात येत आहेत. यामध्ये काही नागरिकांची आम्हाला पूर्वसूचना मिळालेली नसल्याची तक्रार आहे तर, काहींचे आपले अतिक्रमणच नाही असे गाऱ्हाणे आहे.

नगरसेवक धनंजय तुंगार, योगेश तुंगार तसेच राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नागरिकांसह शहरात फेरी काढून गावबंदची हाक दिली होती. नागरिकही व्यवसाय बंद ठेवून यात सहभागी झाले. नवीन बसस्थानक परिसरात रास्तारोको करण्यात आला. मात्र, त्यानंतर नगरपरिषद कार्यालयात प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे, मुख्याधिकारी निवृत्ती नागरे यांच्यासमवेत जवळपास सर्वच नगरसेवकांनी चर्चा केली. त्याचप्रमाणे जिल्हा बँकेचे संचालक परवेज कोकणी, रमजान कोकणी यांनी देखील याबाबत नाग‌रिकांना विश्वासात घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी केली. त्यानंतर सर्व सतरा नगरसेवक एकत्र येऊन प्रशासन अधिकाऱ्यांसह शहरातील अतिक्रमणांचे मार्किंग करतील, असा निर्णय झाला. नागरिक स्वतः अतिक्रमण काढतील, त्यांचे नुकसान करू नका असे स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, नारायण नागबली होतो तेथील शेड काढण्यात आले आहे. तसेच, प्रमुख मार्गावरील ओट्यावर असलेली दुकाने हटविण्यात आली. या कारवाईदरम्यान तहसीलदार नरेशकुमार बहीरम, नायब तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी आदींसह महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी आपण तीन महिन्यांपूर्वीच शहरात फिरून अडथळा ठरतील, अशा अतिक्रमित मालमत्ताधारकांना सूचना दिलेल्या आहेत. तसेच, नगरभूमापन यांच्या सहाय्याने मोजमापे घेऊन मार्किंग देखील केले आहे. कोणाचेही नुकसान होणार नाही याकरिता स्वतः उभे राहून विनंती कार्यवाही सुरू आहे, असे स्पष्ट केले. महंत डॉ. बिंदूजी महाराज यांनी देखील साधूंनी अतिक्रमण काढा, असे सांगितलेले नाही. साधूंची याबाबत काही मागणी नाही, असे स्पष्ट केले.

शहरतील त्र्यंबकेश्वर मंदिर कोटालगत असलेल्या व्यवसायिकांची दुकाने मागे हटविण्यात आली आहेत. मंदिर ते कुशावर्त त्याचप्रमाणे पाटील गल्ली चौक, कुशावर्त चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नारायण नागबली विधी होता तो संगमघाट परिसर, शंकराचार्य मठ परिसर असा शहराचा बहुतांश भाग मोकळा करण्यात आला आहे.

व्यावसायिकांचा बंद

शहरात व्यवसायिकांनी बंद पाळला. बहुतांश दुकाने तोडण्यात आली त्यामुळे भाविकांचे खाण्यापिण्याचे हाल झाले. काही दिवसांपासून सिंहस्थ कामांची तोडफोड आणि आता या अतिक्रमण कारवाई त्यामुळे शहराला भकास स्वरूप आले आहे. अद्याप काही रस्त्यांचे तसेच काही वादग्रस्त ठिकाणचे अतिक्रमण काढावयाचे आहे.

सिंहस्थ कामांची पाहणी

सिंहस्थ कामांची अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली. विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पोलिस अधीक्षक संजय मोहिते आदी अधिकाऱ्यांनी कामांची पाहणी केली. नवीन बसस्थानकालगत होत असलेल्या गोदावरी घाटाच्या कामाबाबत विशेष लक्ष देण्यात येत असून, तेथे आणखी एक पूल बांधण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कामाच्या प्रगतीबाबत मात्र ठेकेदारांना फटकारण्यात आले. अहिल्या घाटाबाबत मात्र अत्यंत नाराजी व्यक्त झाली आहे. मेनरोड आणि कुशावर्त तीर्थ परिसरातील कामांची माहिती घेण्यात आली. या कामांबाबत महत्त्वपूर्ण सूचना करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अस्वच्छ गोदावरीमुळे नाराजी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

गोदावरी नदीची काल विविध धार्मिक संस्थांच्या वतीने साफसफाई करण्यात आली. गोदावरी नदीवरील सर्वच कुंडामध्ये निघालेला घाण कचरा पाहून श्रीराम शक्तीपिठाचे धर्माचार्य बाल ब्रह्मचारी श्री सोमेश्वर चैतन्य महाराज तसेच भाविकांनी संताप व्यक्त केला.

सफाईची सुरुवात महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमीत बग्गा, श्रीराम शक्तीपिठाचे धर्माचार्य बाल ब्रह्मचारी श्री सोमेश्वर चैतन्य महाराज , श्रीनाथ महाराज, भाजपचे कैलास अहिरे व भाविक भक्तांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी सर्व नाशिककर तसेच ब्रह्मचारी आश्रमाचे सदस्यांनी लक्ष्मणकुंड, रामकुंड यांच्यासह सर्व कुंडांची साफसफाई केली. सर्वच कुंडातून निघालेला घाण कचरा पाहून महाराजांनी व भाविकांनी संताप व्यक्त केला.

गोदावरी नदीची नेहमी साफसफाई झाली पाहिजे, असा कायदा करा, स्वतंत्र नियोजन करावे, पवित्र गोदावरी नदीला आणि संतांना न्याय द्यावा, महापालिकेकडून हे काम होणार नसेल तर साधू संताना महापालिकेने साफसफाईचा आदेश दिल्यास आम्ही नक्की काम करू. पाणी दूषित झाल्याने माशांसारखे प्राणी मरत आहेत. प्रशासनाने काळजीपूर्वक लक्ष द्यावे, अशीही मागणी केली. नाशिक शहरातून बंद गटारीतून येणारे घाण पाणीही ताबडतोब बंद करावे, असेही त्यांनी नमूद केले.

गोदावरी नदीत स्नानासाठी व दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येत असतात. गोदावरी नदीचे पावित्र्य सर्वांनी राखले पाहिजे. नेहमी साफसफाई केली पहिजे.

- धर्माचार्य सोमेश्वर महाराज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाळ्यांचा वाद हायकोर्टात!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंबड औद्योगिक गाळे प्रकल्पांसंदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या धोरणांविरोधात महाउद्योग मित्रचे अध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याबाबत मुंबई हायकोर्टाच्या सुटीच्या बेंचसमोर सुनावणीही झाली. महाउद्योग मित्रच्या वतीने बाजू मांडण्यात आली. कोर्टाची सुटी संपताच म्हणजे ११ जून रोजी महामंडळाला बाजू मांडण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

गाळे प्रकल्पांसाठी खासगी विकासकाला भूखंड देणे, विकासकांना अनुकूल असे दर ठेवून महामंडळाने गाळे विक्रीला काढणे, महामंडळाचे अध्यक्ष तथा उद्योगमंत्र्यांची दिशाभूल करणे, उद्योजकांच्या सहकारी संस्थांना भूखंडांचे वाटप करण्यासंदर्भातील अध्यादेश आदी मुद्द्यांना कोर्टात आवाहन देण्यात आले आहे.

अंबड औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट नं. १ च्या सुमारे १४ हजार ८५० चौरस मीटरच्या भूखंडावर गाळे प्रकल्प प्रस्तावित आहे. याबाबत महाउद्योग मित्र या उद्योजकांच्या सहकारी संस्थेने चार वर्षांपासून मागणी केली होती. या मागणीनुसार या जागेवर गाळे उभारून संबंधित उद्योजकांना देण्याचे आश्वासनही महामंडळाच्या वतीने देण्यात आले होते. जानेवारी २०१४ मध्ये या गाळ्यांच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. २१ एप्रिल २०१५ रोजी महामंडळाने गाळे वाटपाची निविदा काढून बुकिंगसाठी अर्जही मागविल्यानंतर सदर गाळ्यांचे दर हे खासगी विकासकाच्या दरापेक्षा दुपटीने जास्त असल्याची बाब उद्योजकांच्या लक्षात आली होती. या गाळ्यांमध्ये तळमजल्यासह पहिल्या व दुसऱ्या अशा एकूण तीनही मजल्यांसाठी ५,२५० रूपये प्रतिचौरस फूट असा दर ठेवला आहे. कुठल्याही लघु किंवा सूक्ष्म उद्योजकाला हा दर परवडणारा नाही. महामंडळाने निविदेच्या माध्यमातून जाहीर केलेला दर निश्चित करताना चुकीची प्रक्रिया राबविण्यात आल्याचा व त्यामागे खाजगी विकासकाला फायदा करून देण्याचा हेतू असल्याचा आक्षेप महाउद्योग मित्रने घेतला होता.

प्रकल्पाची खाजगी विकसकाला विक्री करून महामंडळ हवा तसा फायदा घेण्याच्या तयारीत आहे. यानंतर नव्याने पुन्हा सहकारी संस्था उभारण्याचा देखावा करण्यात येईल, अशी भीती याचिकेमध्ये व्यक्त करण्यात आली आहे.

उद्योगांना गाळे द्या!

महामंडळाने जास्ती दराने गाळ्यांची विक्री केल्यास केवळ गुंतवणूकदारच हे गाळे घेऊ शकतील. परिणामी छोटे भाडेकरू व उद्योजक यापासून वंचित राहतील. म्हणून सूक्ष्म भाडेकरू उद्योजकांच्या सहकारी संस्थेस भूखंड दिल्यास 'ना नफा ना तोटा' या तत्वावर उद्योगास परवडेल, अशा दरात गाळे मिळू शकतात, असा युक्तीवादही यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका कर्जबाजारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक असंतुलनामुळे अखेर महापालिकेला बँक ऑफ महाराष्ट्राकडून कर्ज घ्यावे लागले आहे. कर्जाचा ५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता महापालिकेने उचलला आहे. परिणामी, महापालिकेच्या कर्जबाजारीपणावर शिक्कामोर्तब झाले आहे.

एलबीटीमुळे बिघडलेली आर्थिक घडी सावरत असलेल्या महापालिकेसमोर सिंहस्थ कुंभमेळ्याचे आव्हान आहे. १ हजार ५२ कोटी रूपयांच्या महापालिकेच्या आराखड्यापैकी अवघे २२३ कोटी रुपये देऊन सरकारने हात झटकले. सिंहस्थ पार करण्याची जबाबदारी महापालिकेवर पडली. मागील आर्थिक वर्षापासून महसुलात लक्षणीय घट होत असल्याने अखेर चारशे कोटी रुपयांचे कर्ज उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. तीन टप्प्यांत या कर्जाची उभारणी करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ११० कोटी रुपये सिंहस्थ कामांसाठी, तर ९० कोटी रुपये जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत शहरी गरिबांसाठी घरकुल योजनेच्या प्रलंबित कामांसाठी उभारण्यास राज्य सरकारने तत्त्वत: मंजुरी दिली होती.

केंद्राकडूनही वेळेत मदत मिळण्याची शक्यता दिसत नसल्याने अखेर दुसऱ्या टप्प्यातील आणखी १५० कोटींच्या कर्ज उभारणीचा प्रस्ताव महापालिकेने सरकारच्या मान्यतेसाठी पाठविला होता. त्यास मंजुरी मिळाली आहे. या दोन्ही टप्प्यांतील एकूण ३५० कोटींच्या कर्जापैकी सिंहस्थ कामांसाठी २६० कोटी रुपये राष्ट्रीयकृत बँकेकडून, तर घरकुल योजनेसाठी ९० कोटी रुपये 'हुडको' या वित्तीय संस्थेकडून कर्ज उभारणीची प्रक्रिया महापालिकेने राबविली. यात बँक ऑफ महाराष्ट्राने कमीत कमी म्हणजे १० ते १०.५० टक्के व्याजदराने महापालिकेस १५ वर्षे दीर्घ मुदतीचे कर्ज देण्याची तयारी दर्शवली. त्यात महापालिकेने वाटाघाटी केल्याने अखेर १०.१५ टक्के दराने कर्ज घेण्याचे निश्चित झाले. त्यामुळे या बॅँकेकडून २६० कोटींचे कर्ज उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपहृत नंदिनीचा लागेना सुगावा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सातपूर-अंबड लिंकरोडवरील घराच्या अंगणातून अपहरण करण्यात आलेल्या नंदिनींचा ३६ तासानंतरही कोणताही सुगावा लागला नाही. शुक्रवारी सकाळी आठ वाजता एका सफेद रंगाच्या वाहनातून चार वर्षीय नंदिनीचे अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी सहा पथके तैनात केली असून, शहरासह इतर ठिकाणी तिचा शोध घेतला जातो आहे.

अंबड-लिंकरोडवरील इस्सार पेट्रोलपंपाजवळील बापुशेट नागरगोजे यांच्या घरात महेंद्र शर्मा यांचे कुटुंब राहते. मागील १८ वर्षांपासून शहरात वास्तव्यास असलेले शर्मा कारपेंटर म्हणून व्यवसाय करतात. त्यांच्याकडे अनेक परप्रांतीय मजूर कामाला आहेत. शुक्रवारी सकाळी नंदिनी तिची मोठी बहीण अंजली व भाऊ कृष्णा यांच्यासमवेत खेळत होती. यावेळी तिथे सफेद कारमधून आलेल्या एका जणाने वडिलांना घरातून बोलावून आण, असे अंजलीला सांगितले. ती घरात जात असतानाच अपहरणकर्त्याने नंदिनीचे तोंड दाबून तिला वाहनात घालून धूम ठोकली. नंदिनीचे वडील महेंद्र शर्मा यांनी काही नागरिकांच्या मदतीने तत्काळ शोध घेतला. मात्र, सफेद रंगाची ती कार मिळून आली नाही. याप्रकरणी माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी तपास सुरू केला. ठि​कठिकाणी नाकेबंदी करण्यात आली. ग्रामीण पोलिसांनाही माहिती देण्यात आली. मात्र, अपहरणकर्ता पळून जाण्यात यशस्वी ठरला. अद्यापपर्यंत नंदिनीचा कोणताही ठावठिकाणा पोलिसांना मिळाला नाही. याबाबत माहिती देताना सातपूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलासकुमार मेढे यांनी सांगितले की, या घटनेची साक्षीदार असलेली अंजली अवघ्या सहा ते सात वर्षांची आहे. तिने दिलेली माहिती आमच्याकडे असून, तिला आतापर्यंत कार कशी होती, हे सांगता आलेले नाही. तरीही सर्व दृष्टिकोनातून आमचा तपास सुरू आहे. शर्मा कुटुंब बिहार राज्यातील आहे. व्यवसायानिमित्त ते १८ वर्षांपासून शहरातच राहतात. त्यामुळे त्यांचे कोणाशी वैर आहे काय? याचा शोध घेतला जातो आहे. नातेवाईकांकडे चौकशी सुरू असून, काम सोडून गेलेल्या नोकरांचाही तपास केला जातो आहे. सर्व बाजुंनी चौकशी चालु आहे. मात्र, आतापर्यंत नंदिनीचा ठावठिकाणा लागलेला नाही. अपहरणकर्त्यांनी शर्मा यांच्याशी संपर्क साधलेला नाही. आम्ही या तपासासाठी सहा पथके तैनात केली आहेत. प्रत्येक पथकात क्राईम ब्रँचसह पोलिस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शहर, जिल्हा यासह परराज्यात चौकशी सुरू असल्याचे मेढे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात रोज धावतात १२ टँकर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नियोजनाचा अभाव आणि पाणी पुरवठा विभागाच्या जुनाट साधन सामुग्रीचा फटका शहरवासियांना सहन करावा लागतो आहे. 'मुबलक पाणी' अशी ओळख असलेल्या शहरात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आजमितीस १२ टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो आहे.

उन्हाळा सुरू झाल्यापासून शहरात पाणी कपात नसल्याचे प्रशासन ठामपणे सांगते आहे. एकीकडे पाणी पुरवठा सुरळीत असल्याचे सांगणारे प्रशासन दुसरीकडे १२ टँकरद्वारे जुने नाशिक, सिडको, टाकळी, उपनगर तसेच सातपूर भागात पाणी पुरवठा करीत आहे. यात सहा टँकर महापालिकेचे तर सहा टँकर खासगी आहे. गंगापूर धरणात जुलै महिन्याअखेर पुरेल इतका पाणी साठा आहे. अनियमीतपणा आणि कमी दाब यामुळे महिलांची पाण्यासाठी वणवण होते आहे.

सातपूर, पाथर्डी फाटा, इंदिरानगर, वडाळा गाव, पंचवटीतील म्हसरूळ, आडगाव, नाशिकरोड परिसर, जेलरोड यासह इतर भागात अनियमीत पाणी पुरवठा तोही कमी दाबाने होतो आहे. जुने नाशिक परिसरात तर पाइपलाईन खराब झाल्यामुळे दुषीत पाणी पुरवठा होतो आहे. यामागे प्रशासनाची निष्क्रियता कारणीभूत असल्याची टीका होते आहे. याउलट, उन्हाळ्यात पाण्याचा वापर वाढल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला जातो आहे. गंगापूर धरणात सध्या ३९ टक्के पाणी साठा असून ते जुलैपर्यंत पुरेल.

गंगापूर धरणात पाणी साठा

२ हजार ७६० दशलक्ष घनफूट

घरगुती नळ कनेक्शन संख्या १ लाख ४५ हजार

व्यावसायिक नळ कनेक्शन संख्या - ६ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थ कामांच्या दर्जावर साशंकता

0
0

नाशिक : सिंहस्थ कामांना दिरंगाई झाल्यामुळे प्रशासनावर टीका होत असताना आता त्या कामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह हे सिंहस्थ कामांच्या दर्जावर साशंक असल्याचे जाणवू लागले आहे. पालकमंत्री ‌गिरीष महाजन यांनीही तपोवनातील कामांव नाराजी व्यक्त केली आहे. कामे उरकण्याच्या नादात कामाचा दर्जा घसरण्याची दाट शक्यता आहे. मेरीमार्फतही कामाचा दर्जा तपासण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. यामुळे सिंहस्थ कामांच्या दर्जाबाबत साशंकता व्यक्त होऊ लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्‍थ कुंभमेळ्यामुळे नाशिक-सिंहस्थ रस्त्याचे रूंदीकरण करण्यात आले आहे. रस्त्याच्या दुभाजकामध्ये माती टाकून झाडे लावण्यास सुरुवात झाली आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंला झाडे लावण्यात आली आहेत. यामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्‍त्याचे सौंदर्य वाढण्यास मदत होणार आहे. महिरावणी गावापासून पुढे रस्त्यावरील दुभाजकामध्ये रविवारी माती टाकण्यात येत होती. तर, त्र्यंबकेश्वर येथे दुभाजकामध्ये झाडे लावण्यात आली आहेत. तसेच झाडांना पाणी देण्यासाठी गोल रिंगण करण्यासाठी दिवसभर मजूर राबत होते. झाडांना संरक्षक जाळ्याही बसविण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण हटवले; ढिगारे साचले

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगरीच्या प्रमुख मार्गावरील अतिक्रमण काढण्याची मोहीम रविवारीही दिवसभर सुरू होती. अतिक्रमण काढल्यानंतर आता जागोजागी झालेले दगड, विटा, मातीचे ढिगारे उचलण्याचे आवाहन आता नगरपालिका प्रशासनापुढे उभे ठाकले आहे.

दिवस उजाडताच शहरात प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे हजर होत असून, नगरपालिका मुख्याधिकारी निवृत्ती नागरेंसह सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होऊन अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात होत आहे. नागरिक देखील आता सहकार्य करीत असून, सूचना मिळताच आपापल्यापरिने दुकानांचे शटर मागे घेणे, ओटे आणि पायऱ्या तोडणे ही कामे स्वयंस्फूर्तीने करीत आहेत. नगरपालिका प्रशासनाचा आरोग्य विभाग ढिगारे हलविण्याच्या कामाला जुंपला असून, या कामास दिवस अपुरा पडत आहे. अतिक्रमित मालमत्ताधारकांकडून जेसीबी आणि तत्सम यंत्रणेचा खर्च वसुली करण्यात येईल, असे संकेत प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, रविवारी तेली समाज धर्मशाळा तसेच सोनार धर्मशाळा यांचे पूर्वापार असलेले ओटे अतिक्रमणात नव्हते तरी देखील शाहीमार्गास अडथळा नको म्हणून त्यांनी स्वतः काढून घेतले. याकामी नगरेसवक संतोष कदम यांनी पुढाकार घेतला.

मुख्याधिकारी निवृत्ती नागरे यांनी नगरसेविका लढ्ढा यांचे अतिक्रमण नाही, असे स्पष्ट केले. विकास आराखड्यातील रस्ता हा नंतर झालेला असून, अगोदरपासून त्यांची इमारत तेथे आहे. तसेच, त्यांचे कच्चे बांधकामातील कंपाऊंड वॉल त्यांनी शाहीमार्गाला अडथळा नको म्हणून स्वतः काढून घेतले. त्याचप्रमाणे माधुरी जोशी आणि आणखी काही नगरसेवकांची नावे अतिक्रमणात देण्यात आले, मात्र त्यास आधार नाही. जुन्या जवळपास शंभर वर्षांपूर्वीचे ओटे रस्त्यावर अतिक्रमित दाखविण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे. अतिक्रमण निर्मूलनाची ही मोहीम आणखी काही दिवस सुरू राहणार आहे. शासकीय भूखंड मोकळे करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी दिली. मुख्याधिकारी निवृत्ती नागरे यांनी त्यास दुजोरा दिला आहे.

बेरोजगारी वाढली

शहरात झालेल्या धडक अतिक्रमण निर्मूलनाच्या कारवाईने हॉटेल आदी व्यावसायिक कारागीर बेरोजगार झाले आहेत. वेल्डिंग, बांधकाम, सुतारकाम कारागीर मिळेनासे झाले आहेत. प्रमुख रस्त्यावरील जवळपास सर्वच घरांच्या पायऱ्या तुटल्याने आणि शटर काढल्याने अतिशय दीनवानी अवस्था झाली आहे. शहरात अल्पोहाराची जवळपास सर्वच छोटी हॉटेल, टपरी, हातगाडे बंद झाले असून, नाश्ता दुरापास्त झाला आहे. ऊसाच्या रसाची गुऱ्हाळे बंद झाली आहेत. चहापानाचे हातगाडे देखील दिसेनासे झाले आहेत. व्यापारी संकुलातील हॉटेल देखील छपरी टपरी काढण्यात आल्याने किंवा काढावी लागेल या भितीने बंदच आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदीप सोनवणे यांना ‘ग्रिन सिग्नल’

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी कोण विराजमान होणार ही उत्सुकता शनिवारी संपली. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अन् येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतर्फे पालिकेतील विद्यमान गटनेते प्रदीप सोनवणे यांच्या नावाला हिरवा कंदील दाखविला आहे. सोनवणे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने नगराध्यक्षपदासाठी त्यांची निवड निश्चित झाली आहे. दि. २२ मे रोजी येवला पालिकेच्या होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत त्यांच्या निवडीची औपचारिकता पूर्ण होणार आहे.

इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित असलेल्या नगराध्यक्षपदासाठी प्रदीप सोनवणे यांच्यासह जयश्री लोणारी, सरला निकम, नीता परदेशी, मुश्ताक शेख यांची नावे चर्चेत होती. आमदार छगन भुजबळ यांनी येवल्यातील संपर्क कार्यालयात बंद खोलीत नगरसेवकांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. पुढे त्यांनी नगराध्यक्षपदासाठी प्रदीप सोनवणे यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर सोनवणे यांनी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अॅड. माणिकराव शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व अपक्ष नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

प्रदीप सोनवणे यांनी दाखल केलेल्या अर्जावर सुचक म्हणून ज्येष्ठ नगरसेविका उषा शिंदे, अनुमोदक म्हणून नगरसेवक मुश्ताक शेख तर दुसऱ्या अर्जावर सुचक म्हणून नगरसेविका राजश्री पहिलवान तर अनुमोदक म्हणून नगरसेविका भारती येवले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

निकम समर्थक संतप्त

गटनेते प्रदीप सोनवणे यांच्या नावाची घोषणा करताच नगराध्यक्षपदासाठी इच्छुक इतर राष्ट्रवादी नगरसेवकांचे चेहरे पडल्याचे चित्र दिसले. विशेषतः नगरसेविका सरला दत्तात्रय निकम यांचा मोठा हिरमोड झाल्याचे दिसले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सावरकर पुतळ्याला संरक्षक जाळी बसवावी’

0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्ताने भगूरमधील शिवाजी चौकात असलेला सावरकर यांच्या पुतळ्याच्या लागत असलेल्या संरक्षक जाळी तुटली असून ती बदलण्यात यावी, सावरकरांच्या पुतळ्याची डागडुजी व आठवड्यातून किमान दोन वेळा तरी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी प्रबोधन संघटना व हिंदू जनजागरण समितीने केली आहे.

भगूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी संगीता नांदुरीकर यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. या पुतळ्याजवळ जाळी नसल्यामुळे कचरा उडून येतो. अस्वच्छता वाढत असल्याने सावरकर प्रेमींची निराशा होते. या निवेदनावर हिंदू जनजागरण समितीचे अध्यक्ष मनोज कुंवर तसेच प्रबोधन संघटनेचे शाम ढगे, डॉ. मृत्युंजय कापसे, प्रताप गायकवाड, राजू मुंदडा, प्रशांत लोया आदींच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडित वीजपुरवठ्याचा विद्यार्थ्यांना फटका

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

म्हसरूळच्या एका इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये खंडित वीजपुरवठ्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. कॉम्प्युटर शाखेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा 'मायक्रो प्रोसेसिंग आर्कीटेक्चर' या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती तब्बल तासभर उशिरा पडली. या प्रकाराचा पाठपुरावा शिक्षणमंत्र्यांपर्यंत करू, अशी भूमीका विद्यार्थी प्रतिनिधींनी घेतली आहे.

कॉलेजमध्ये शुक्रवारी सकाळी १० वाजता इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार होती. मात्र, परीक्षेची नियोजित वेळ पुढे सरकू लागल्यानंतर विद्यार्थ्यांमधील अस्वस्थता वाढत गेली. विद्यार्थ्यांनी कॉलेजकडे चौकशी केली असता विद्यापीठाकडे बोट दाखवत सर्व्हर डाऊन असल्याचे तांत्रिक कारण देण्यात आले. मात्र, नंतर कॉलेजातील वीजपुरवठाच खंडित झाल्याचा प्रकार उघडकीला आला. या गैरनियोजनामुळे विद्यार्थ्यांच्या मनावरील तणाव वाढल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी विद्यार्थी संघटनांच्या माध्यमातून काम करणारे कार्यकर्ते भूषण काळे यांनी याबाबत शिक्षणमंत्र्यांकडे पाठपुरावा करू, अशी भूमिका मांडली. अखेरीला विद्यार्थ्यांना दहा वाजता सुरू होणारा पेपर ११ वाजता हाती पडला.

इंजिनीअरिंगसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये असा प्रकार घडत असेल तर इतर अभ्यासक्रमांची काय स्थिती असेल, असाही सवाल संतप्त विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी विद्यापीठाने गांभीर्याने लक्ष पुरवावे आणि तशा सूचनाही विद्यापीठाने कॉलेजांना द्याव्यात, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे. अगोदरच निकालांमधील दिरंगाई, निकालातील चुका, रखडणारी प्रवेश प्रक्रिया आणि कॉलेजांमधून प्रवेशांच्या वेळी होणारी विद्यार्थी व पालकांची आर्थिक, मानसिक पिळवणूक या प्रकरणीही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गांभीर्याने लक्ष घालावे. दोषी कॉलेजांवर कारवाई करावी, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे. शिक्षणमंत्र्यांच्याही कानावर हे प्रश्न विद्यार्थी संघटनांच्या माध्यमातून घालण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images