Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

धनदाई लॉन्ससमोरील रस्त्याची डागडुजी

$
0
0
जुना गंगापूर नाक्याहून पेठ रोडकडे जाणाऱ्या धनदाई लॉन्ससमोरील रस्त्याची महापालिकेने ‘मटा’तील वृत्ताची दखल घेत डागडुजी केली आहे. या रस्त्यावर एक किलोमिटरच्या अंतरात तब्बल सोळा ठिकाणी चर खोदण्यात आले होते. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत होती.

अथेलेटिक्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहिर

$
0
0
नाशिक जिल्हा अमेच्युर अथेलेटिक्स असोसिएशनच्या २0१३ ते २0१६ या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. असोसिएशनच्या स्थायी अध्यक्षपदी जिल्हाधिकारी असून नूतन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी मेजर डि. के. झरेकर यांच्या नियुक्ती करण्यात आली आहे.

करन्सी प्रेस कर्मचाऱ्याचा भाजून मृत्यू

$
0
0
करन्सी नोट प्रेसमधील रात्रपाळीतील कामगारांना चहा करण्यासाठी पेटविलेल्या गॅसचा भडका होऊन जबर भाजलेले कॅन्टीन कर्मचारी संपतराव खंडेराव जाधव ( ६०, रा. शिंदे गाव) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पाण्याअभावी २६ मेंढ्या दगावल्या

$
0
0
कसमादे परिसरातील दुष्काळ दिवसागणिक भयावह बनत चालला असून चारा- पाण्याअभावी मुक्या जनावरांची मोठ्या प्रमाणात दैना होत आहे. मालेगाव तालुक्यातील मेंढपाळाच्या २६ मेंढ्या पाण्याअभावी तडफडून मेल्याच्या घटनेने हे भयावह वास्तव सामोरे आले आहे.

टिप्पर गँगविरुद्ध हजार पानी चार्जशीट

$
0
0
शहरात विविध गुन्हे करत दहशत माजविणाऱ्या सिडकोतील टिप्पर गँगच्या १२ जणांविरुद्ध पोलिसांनी मंगळवारी मोक्कांतर्गत तब्बल एक हजार १०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. या टोळीविरुद्ध खून, दरोडा, चोरी, जाळपोळ, हाणामारीच्या प्रयत्नासारखे १५ हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत.

कारचोरीप्रकरणी चौघांना अटक

$
0
0
शहरातील वाहनचोरीच्या घटनांमधील सातत्य कायम असून, अशाच घटनांत दोन मोटरसायकली व एका रिक्षाचोरीची पोलिसांत नोंद झाली. कारचोरीप्रकरणी पंचवटी पोलिसांनी चौघांना अटक केली. या चौघांनी ३१ मार्चला रात्री दहा वाजेच्या सुमारास कार चोरून नेल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली होती.

कुंभमेळा निधीसाठी CMना साकडे

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निधी मिळावा म्हणून नाशिकमधील काँग्रेस व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. केंद्रासह राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात कुंभमेळ्यासाठी कुठलीही विशेष तरतूद न केल्याने या दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निधीसाठी थेट मुख्यंमंत्र्यांना साकडे घातले आहे.

राज ठाकरे आज महापालिकेत

$
0
0
पक्षबांधणीसाठी राज्याच्या दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे मंगळवारी संध्याकाळी नाशिकमध्ये दाखल झाले. आपल्या राज्यव्यापी दौऱ्यातील शेवटचा टप्पा असलेल्या उत्तर महाराष्ट्राचा दौरा ते नाशिकपासून सुरू करणार आहेत. नाशिक भेटीत ते पक्ष पदाधिकाऱ्यांसह मनसेच्या महापालिकेतील कारभाराचा आढावा घेणार आहेत.

आ मनीष जैन होणार काँग्रेसचे सहयोगी सदस्य

$
0
0
विधान परिषदेचे अपक्ष सदस्य आमदार मनीष जैन यांना काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व दिले जाणार आहे. २० एप्रिल रोजी जळगावात होणाऱ्या कापूस उत्पादक परिषदेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याबाबतची घोषणा करतील.

'इएसडीएस' सोल्युशन्सला सीएमएमआय मानांकन

$
0
0
सॉफ्टवेअर सोल्युशन्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग, सर्व्हर होस्टिंग या सेवा पुरविताना गुणवत्तेला प्राधान्य दिल्याबद्दल सातपूर एमआयडीसीतील इएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रा. लिमिटेडला 'कॅपॅबिलिटी मॅच्युरिटी मॉडेल इंटिग्रेशन (सीएमएमआय) लेव्हल थ्री' हे जागतिक दर्जाचे मानांकन प्राप्त झाले आहे.

२५ हजार घरांमध्ये वाहिन्यांचे प्रक्षेपण बंद

$
0
0
शहर परिसरातील सुमारे २५ हजाराहून अधिक घरांमध्ये सेट टॉप बॉक्स न बसविण्यात आल्याने तेथे केवळ मुंग्यांचेच दर्शन केबलग्राहकांना होत आहे. शहरातील केबल ग्राहकांची संख्या दोन लाखाच्या आसपास असून त्यापैकी १ लाख ६२ हजार ग्राहकांनी सेट टॉप बॉक्स बसविले आहेत.

नकट्या बंधा-याची साठवणक्षमता वाढणार

$
0
0
दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी कळवणकर सज्ज होत आहेत. पाण्याबाबत संजीवनी ठरणाऱ्या नकट्या बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम कळवण ग्रामपालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. त्यामुळे बंधाऱ्याची साठवणक्षमता वाढून कळवणकरांना पाणी मिळेल, अशी आशा आहे.

२.२५ लाख मतदारांचे हवेत फोटो

$
0
0
नाशिक शहरातील तीन विधानसभा मतदारसंघातील सुमारे २ लाख ३६ हजार ६५ मतदारांचे फोटो गोळा करण्याचे काम निवडणूक विभागाने सुरु केले आहे. त्यासाठी मतदार मदत केंद्र स्थापण्यात आले असून मतदारांचे फोटो घेण्याचे तसेच काढण्याचे काम या केंद्राच्यावतीने होत आहे.

तो मी नव्हेच...

$
0
0
गैरसमज हा शब्द म्हणजे भांडणाचं कारण असा आपला समज असतो. परंतु कधी कधी एखादा गैरसमज विनोदी प्रसंगालाही कारणीभूत ठरतो. असाच एक किस्सा काही दिवसांपूर्वी घडला. इंदिरानगर भागातील एक महाशय आपल्या घरात एका पाहुण्याची वाट पहात थांबले होते.

कायमस्वरुपी कृत्रिम तलावाबाबत विचारणा

$
0
0
निर्माल्य आणि पुजाविधी साहित्यासाठी गोदाघाटाच्या ठिकाणी कायमस्वरुपी कृत्रिम तलाव उभारण्याबाबत हायकोर्टाने महापालिकेकडे विचारणा केली आहे. यासंदर्भात पुरोहित संघाशी चर्चा करुन निर्णय घेण्याची भूमिका महापालिकेने कोर्टापुढे मांडली आहे.

अस्वस्थतेच्या डोहातला हुंकार 'गोदो वन्स अगेन'

$
0
0
मानवी भावभावनांचा हुंदका जेव्हा दाटून येतो, त्याला कोठेतरी वाट मोकळी करून द्यायची असते तेव्हा 'गोदो वन्स अगेन' सारखे नाटक रंगमंचावर येते. भगवान हिरे लिखित व प्रशांत हिरे दिग्दर्शित या नाटकाचा प्रयोग नुकताच 'मटा'तर्फे झाला.

इंदिरानगर परिसरात तुंबली गटारे

$
0
0
इंदिरानगर परिसरातील गुरुगोविंद शाळेसमोरील एलआयसी कॉलनी शिवकॉलनी, सिमेन्स कॉलनी यासमोरील गटार वर्षभरात कधीही स्वच्छ न झाल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.

नाशिककरांच्या मनात 'राय‌झिंग'

$
0
0
महानगराच्या दिशेने सुरू झालेली नाशिकची वाटचाल हा निश्चितच नाशिककरांच्या दृ‌ष्टीने अभिमानाचा विषय आहे. उत्तम भौगोलिक प‌रिस्थिती आणि प्रचंड क्षमता लाभलेल्या नाशिकच्या प्रगतीला 'महाराष्ट्र टाइम्स'ने 'नाशिक रायझिंग'चे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

जैन सोशल ग्रुपतर्फे २१ पाण्याच्या टाक्या

$
0
0
दुष्काळग्रस्तांसाठी जैन सोशल ग्रुपतर्फे त्र्यंबकेश्वर व परिसरात २१ पाण्याच्या टाक्या देण्यात आल्या आहेत. तहसीलदार बाळासाहेब शेवाळे यांच्याकडे त्या सुपूर्द करण्यात आल्या.

सायकल भाड्याने देण्याचा व्यवसाय अखेर पडद्याआड

$
0
0
शहरात ज्याच्या घरी सायकल असे ते घर म्हणजे श्रीमंताचे घर समजले जात असे. सायकल नसणारी व्यक्ती सायकल भाड्याने घेऊन आपली गरज भागवत असे. सायकल दुरुस्तीची व भाड्याने देण्याची अनेक ठिकाणे होती; परंतु काळ ओघात भाड्याने देणारी सायकलची दुकानेही दिसेनाशी झाली आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images