Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

वीज वितरणच्या ग्राहकांची पायपीट

$
0
0

तक्रार नोंदवण्यासाठी चार किमीचा प्रवास

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे सटाणा शहर अभियंता कार्यालय व तक्रार निवारण कक्ष स्थलांतरीत करण्यात आले आले आहे. परिणामी शहरवासीयांना तक्रारी व कामासांठी तब्बल चार किमी अंतरावर पायपीट करावी लागत असल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. या संदर्भात दोन आंदोलने होऊन देखील कार्यालय शहरात आणण्यास असमर्थमता व्यक्त करण्यात येत आहे.

सटाणा शहरातील वीज वितरण कंपनीच्या विविध तक्रारी, समस्या तसेच शहर अभियंता कार्यालय येथील शेतकरी सहकारी संघाच्या आवारात गेल्या अनेक वर्षांपासून होते. मात्र संघाने हे कार्यालय खाली करण्याची विनंती केल्यानंतर सदरचे कार्यालय मोरेनगर ग्रामपंचायत शिवारातील मोरेनगर सबस्टेशन कार्यालयाच्या आवारात स्थलांतरीत करण्यात आले. सदरची जागा सटाणा शहरापासून चार कि.मी. अंतरावर असल्याने ग्राहकांना तक्रारी व समस्या दाखल करण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. यामुळे वेळ व पैसाही खर्च होत आहे. हे कार्यालय शहरात आणल्यास ग्राहकांना सुसह्य होणार आहे.

सदर कार्यालया तत्काळ सटाणा शहरात पूर्ववत सुरू करण्यात यावे, यासाठी दोन वेळा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला. मात्र वीज वितरण कपंनीच्या अधिकाऱ्यांना याचे गांर्भीय कळत नसल्याने शिवसेना आंदोलन करेल, असा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख शरद शेवाळे यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अन् उंदराचा जातो जीव!

$
0
0

>> अविनाश खैरनार

स्विमिंग हा राज्याला राष्ट्रीय व आंतर शालेय स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त पदके मिळवून देणारा खेळ म्हणून ओळखला जातो. कारण या वैयक्तिक खेळ प्रकारात राज्यात अनेक व्यावसायिक प्रशिक्षक आहेत. त्यांच्याकडे सराव करून खेळाडू आपली वैयक्तिक कामगिरी सुधारतात. त्यांच्याच जोरावर मग राज्याची कामगिरी दिसून येते. यात जिल्हा व राज्य संघटनाचा संबंध येतो तो फक्त जिल्हा व राज्य स्पर्धा आयोजित करून प्रथम येणाऱ्या खेळाडूंची निवड करून राज्य/ राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडू पाठविण्यापुरताच. खेळाडू घडविण्यामागे या संघटनाचा कोणताही सहभाग नाही तरी संघटना ताब्यात घेण्याच्या / ठेवण्याच्या अट्टाहासामुळे यावर्षी खेळाडूंना कोणत्या राज्य संघटनेच्या स्पर्धा खेळाव्यात हा प्रश्न पडणार आहे.

गेल्या वर्षी अखिल भारतीय जलतरण संघटनेने राज्याची अस्तित्वात असलेली समिती बरखास्त करून त्यांच्या जागी आंतरराष्ट्रीय खेळाडू व पंच अभय दाढे यांच्या अध्यक्षेखाली अस्थायी समिती नियुक्त केली होती. कारण राज्य संघटनेने १५ वर्षांपासून हिशोबपत्रके, धर्मादाय आयुक्त यांच्याकडे पदाधिकारी बदलाचे अहवाल सादर केले नाही. फेडरेशनने राज्याची विद्यमान समिती बरखास्त करताना विद्यमान समितीने २ नोव्हेंबर १४ रोजी केलेल्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड देखील बेकायदेशीर ठरविली. राज्य संघटनेने, फेडरेशनने केलेली कार्यवाही कशी बेकायदेशीर आहे हे पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण फेडरेशनला राज्याची या खेळात असलेली प्रगती पहावत नसल्याने त्यांना कोणत्याही परिस्थितीत राज्यात दुफळी माजवायची होती. फेडरेशनवर कित्येक वर्षांपासून गुजरातच्या नानावटी बंधूंची मक्तेदारी आहे. सर्व महत्त्वाच्या पदावर गुजरातच्या लोकांची नियुक्ती करून नानावटी बंधूंनी फेडरेशन आपल्या ताब्यात ठेवले आहे.

अस्थायी समिती अस्तित्वात असताना राज्य संघटनेच्या नवनिर्वाचित समितीने आपले कामकाज चालूच ठेवले. त्याला अस्थायी समितीकडून विरोध होत होताच. त्यातच गेल्या काही वर्षांपासून मोठ्या कष्टाने सुरू झालेल्या संक्रोक ते गेट वे ऑफ इंडिया ही सागरी जलतरण स्पर्धा या दोघांच्या भांडणातच रद्द करावी लागली. आता अस्थायी समितीने नवीन निवडणूक घेवून अभय दाढे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती जाहीर केली आहे. त्यामुळे राज्य जलतरणाच्या दोन संघटना अस्तित्वात आल्या आहेत. विद्यमान पदाधिकाऱ्यांची राज्य स्पर्धा ५, ६ व ७ जून रोजी नाशिक येथे तर नवीन पदाधिकाऱ्यांच्या ८, ९ व १० जून रोजी पुणे येथे राज्य स्पर्धा होत आहे. शिवाय नवीन पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय स्पर्धा देखील पुण्यात आयोजित केलेल्या आहेत. त्यामुळे राज्यातच होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत कोणत्या राज्य स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूस प्रवेश मिळतो यावर खेळाडूंचे भवितव्य अवलंबून आहे.

फेडरेशन दाद देत नाही म्हणून विद्यमान पदाधिकाऱ्यानी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेकडे दाद मागितली; पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यानी धर्मादाय आयुक्त व उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. तसेच गेल्या १५ वर्षाचे हिशोब पत्रके, पदाधिकारी बदल अहवाल देखील धर्मदाय आयुक्ताकडे सादर केला आहे. त्यामुळे ज्या कारणास्तव अस्थायी समिती बरखास्त केली त्याची पूर्तता विद्यमान समितीने केली आहे. आता सर्वांचे लक्ष उच्च न्यायालय व धर्मदाय आयुक्त काय निर्णय देतात याच्याकडे! पण फेडरेशन कोणत्या पदाधिकाऱ्याना मान्यता देते यावर बरेच काही अवलंबून आहे तोपर्यंत खेळाडूंचे भवितव्य अधांतरीच आहे.

नवीन पदाधिकारी निवडतांना अस्थायी समितीने कोणते निकष लावले तेच काळात नाही कारण त्यांच्या यादीमध्ये सचिव असलेले झुबीन अमेरिया व उपाध्यक्ष असलेले प्रभाकर घरत हे देखील यापूर्वी राज्य संघटनेवर सचिव म्हणून काम पाहत होते त्यांच्या काळातले हिशोब पत्रके विद्यमान समितीने धर्मदाय आयुक्ताकडे दाखल केले आहे. त्यामुळे अशावेळी राज्य शासनाने केलेली नियमावली किती फायदेशीर आहे हे जाणवते पण पदाधिकाऱ्याना त्याचे कोणतेही सोयरेसुतक नाही. या कोर्ट कचेरीच्या कचाट्यात खेळाडूंचे जे नुकसान होईल त्याला कोण जबाबदार? कारण दोघेही म्हणतील आमचीच बाजू योग्य आहे. त्यामुळे खेळाडूंची अवस्था मांजराचा होतो खेळ आणि उंदराचा जातो जीव अशीच झाली आहे.

(लेखक क्रीडा संघटक आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळाबाह्य मुलांचे ४ जुलैला सर्वेक्षण

$
0
0

शंभर टक्के मुलांच्या शालांत प्रवेशासाठी प्रयत्न

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बालकांच्या मोफत आणि सक्तीच्‍या शिक्षणाचा अधिकार २००९ अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदविले जाणे, नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदार ‌शिक्षण मिळणे अनिवार्य आहे. यासाठी यावर्षी ४ जुलै रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शिक्षण विभाग तसेच प्रशासनाच्या सर्व विभागांच्या वतीने शाळाबाह्य मुलांचे एकदिवसीय सार्वत्रिक सर्वेक्षण, मार्गदर्शन करण्यात येणार असून यामुळे शंभर टक्के मुलं शाळेच्या प्रवाहात येणार आहे.

महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत शाळाबाह्य मुलांबाबत सार्वत्रिक सर्वेक्षण करण्याचा अध्यादेश काढण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमात महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय व‌ विशेष सहाय्य, महिला व बालविकास, कामगार विभाग, आदिवासी विकास, अल्पसंख्याक विकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य या विभागांच्या सहकार्य आणि समन्वयातून शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाबाबतच्या कामाचे स्वरुप ठरविण्यासाठी पुण्यातील ‌शिक्षण आयुक्तांची जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्‍थेचे प्राचार्य यांच्यासमवेत नुकत्याच बैठकीचे आयोजन करण्यात आले. परंतु, काही कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली असून पुढच्‍या आठवड्यात बैठक होण्याची शक्यता असल्याचे शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांनी सांगितले. यासंबंधी रावसाहेब थोरात सभागृहात ८ जुलै रोजी कार्यशाळेचे आयोजनही करण्यात आले आहे. अशी असणार समिती

राज्यव्यापी सर्वेक्षण असल्याने तळागाळात पोहचण्यासाठी स्तरानुसार समित्या तयार करण्यात आलेल्या आहेत. यात महापालिका, जिल्हा, तालुका व गाव स्तरावर समिती तयार करण्यात येणार आहे. यात महापालिका स्‍तरावर अध्यक्षस्‍‌थानी आयुक्त तर सदस्य सचिव म्हणून शिक्षणाधीकारी असणार आहे.

असे असणार नियोजन

शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण हे सूक्ष्म स्वरुपाचे असणार आहे. या सर्वेक्षणात ४ जुलै रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत शाळाबाह्य बालकांच्या नोंदी घरोघरी, बसस्‍थानक, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक ठिकाण, बाजार, अस्‍थायी निवारा करणारी कुटुंबे, शेतमळ्यावरील आणि जंगलातील वास्‍तव्य असलेल्या पालकांची बालके, यासारख्या ‌ठिकाणी जाऊन कराव्यात असे शासनाच्या अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे. प्रत्येक सर्वे‌क्षित बालकांच्या बोटाला शाईद्वारे खूण केली जाणार आहे.

कार्यक्रम नियोजनाची रुपरेषा

जुलै महिन्याला अवकाश असला तरी सर्वेक्षणाच्या कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यासाठी बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. यात येत्या ३ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक होईल. त्यानंतर जिल्हास्तरासाठी ८ जूनला तर तालुकास्तरासाठी १५ जूनला बैठक होऊन त्यात पप्रत्रांचे वाटप होणार आहे. तसेच २० जूनला गावस्तरावर तर २५ जूनला गावपातळीवर सर्वेक्षणासाठी नियोजन करण्यात येणार आहे.

शाळेत कधीही न गेलेले व अर्धवट शाळा सोडलेले अशा दोन प्रकारच्या विद्यार्थ्यांना शोधून त्यांच्यावर शैक्षणिक संस्कार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यातील आव्हाने लक्षात घेता प्रशासनाच्या सर्व विभागांचे सहकार्य यात घेण्यात आले आहे. अनेक स्वयंसेवी संस्थांनीही यासाठी पुढाकार घेतला आहे.

- भगवान सूर्यवंशी, शिक्षण उपसंचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आडगाव परिसरात भूकंपाचे धक्के

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आडगाव तसेच हॉटेल जत्रा परिसरात रविवारी रात्री भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांची मोठी धावपळ झाली. भूकंपाचे धक्के जाणवण्यापूर्वी कसला तरी आवाजही झाल्याचा दावा नागरिकांनी केला. मात्र, हा भूकंपच असल्याचे मेरी केंद्रातील नोंदीनुसार स्पष्ट झाले. २.१ रिश्टर स्केलचा हा भूकंप असल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षानेही सांगितले आहे.

आडगावसह परिसरातील गावठाण आणि मळे परिसर, तसेच हॉटेल जत्रा मागील वसाहतीत रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास नागरिकांना काही सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे हलके झटके बसताच घरातील सर्व लोक बाहेर आले. संपूर्ण आडगाव परिसरातील रहिवासी रात्री उशिरापर्यंत जागेच होते. हॉटेल जत्रा मागील भागातही अशाच प्रकारचे धक्के नागरिकांना जाणवले. मेरी येथील भूकंपमापन केंद्र रात्री बंद होते. भूकंपाचे धक्के बसले का किंवा किती तीव्रतेचे होते याची माहिती रविवारी रात्री कुणालाही मिळू शकली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पथदीपांवर कंदिल लावायचे का?

$
0
0

स्थायी समिती बैठकीत सदस्य आक्रमक; प्राथमिक सुविधा पुरविण्याचे सभापतींचे निर्देश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील बंद पथदीप आणि पाणीटंचाईच्या विषयांवरून पुन्हा वादंग होवून सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शहरात दोन वर्षांपासून तब्बल साडेतीन हजार दिव्याविना पथदीप उभे असल्याचा धक्कादायक खुलासा अधिकाऱ्यांनी करताच, सदस्यांसह सभापतीही अवाक झाले. शहरातील पथदीप बंद पडल्यानंतरही त्यांची दुरुस्ती होत नसल्याबद्दल सदस्य आक्रमक झाले. तसेच, शहरात अवेळी आणि कमी स्वरूपात पाणी सोडण्यात येत असल्याचा आरोपही केला. आरोग्य, पाणी आणि पथदिव्यांसारख्या मूलभूत सुविधा प्राधान्याने सोडविण्याचे आदेश अध्यक्ष शिवाजी चुंभळे यांनी दिले आहेत.

सभापती शिवाजी चुंभळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली स्थायी समितीची सोमवारची सभाही वादळी ठरली. सदस्यांनी वीज, पाणी आणि आरोग्याच्या विषयांवर आक्रमक झाले. शहरात पथदीप उभे करण्यात आले. मात्र, त्यांच्यावर दिवे लावण्यात आले नाहीत. तर खराब पथदीपांची दुरुस्ती होत नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. यावर सदस्य आक्रमक झाल्यानंतर अधीक्षक अभियंता आर. के. पवार यांनी दोन वर्षांपूर्वी शहरात साडेतीन हजार पोल बसविण्यात आले आहे. मात्र, एलईडीच्या प्रस्तावामुळे त्यावर पुढे कारवाई झालेली नाही, तर आता एलईडीचा वाद अडकल्याने या दिव्यांसाठी निधीची उपलब्धता नाही. विद्युत विभागाकडे निधी नसल्याने सिंहस्थ निधीतून ७८ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यासाठी शिखर समितीची बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगताच सदस्य संतप्त झाले. स्थायीत निधी आम्ही देतो तुम्ही लाईट बसला असा दावा सदस्यांनी केली. त्यामुळे सभापतींनी तात्काळ प्राथमिक सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश त्यांनी दिलेत.

अधिकाऱ्यांना धरले धारेवर

शहरात सध्या सुरू असलेल्या कृत्रिम पाणीटंचाईच्या विषयावरूनही सदस्य आक्रमक झाले. राहुल दिवे, नीलिमा आमले, शैलेश ढगे यांनी आक्रमक होत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अनेक ठिकाणी जास्तीचे तर अनेक ठिकाणी कमी पाणी सोडले जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला. आरोग्याच्या प्रश्नावर शोभा फडोळ, शैलेश ढगे, भालेराव यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. बिटको रुग्णालयात प्रसुतीसाठी डॉक्टरच उपलब्ध होत नसल्याचा आरोप केला. तसेच रुग्णांसाठी अॅम्ब्युलन्सही उपलब्ध होत नसल्याचा दावा सदस्यांनी केला. बाहेरून औषध खरेदी केली जात असल्याचे सदस्यांनी सांगितले. त्यावर अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांनी तपासणी करून कारवाई करू, असे आश्वासन दिले. त्यावर सभापतींनी प्राथमिक गरजा सदस्यांना पुरविण्याचे आदेश दिले.

सर्वानुमते नव्हे, बहुमताने लिहा

स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनेचे सदस्य शैलेश ढगे यांनी समितीच्या एकूण कामकाजावरच आक्षेप घेतला. स्थायी समितीत मंजूर होणाऱ्या ठरावांमध्ये सर्वानुमते मंजूर असे लिहिले जाते. त्याला आपला आक्षेप असून सर्वानुमते नव्हे तर बहुमताने लिहा अशी सूचना केली. न्यायालयासह काही वादग्रस्त विषयांवर आमचा विरोध असतांनाही सर्वानुमते लिहिले जाते. आम्हाला चुकीच्या कामांमध्ये अडकायचे नाही. सगळ्यांना आमचे समर्थन नसल्याचे सांगून नगरसेवक ढगे यांनी भर बैठकीत स्थायी समितीच्या कारभाराचेच सगळ्यांच्या देखत वाभाडे काढले.

जनतेसमोर जायचे कसे?

एलईडी नाहीत, पथदीपांसाठी निधी नाहीत, यामुळे सदस्य सभेत चांगलेच आक्रमक झाले होते. राहुल दिवे यांनी वर्षांपासून पथदीप खालीच आहेत. दिवे मिळत नसतील तर त्यांच्यावर दिव्याऐवजी कंदील लावायचेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केले. नागरिकांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायचे असे सांगत शैलेश ढगे निवडणुकीत आम्ही लोकांना काय उत्तर द्यायचे असा सवाल अधिकाऱ्यांना केले.

रक्त तपासणी मशीन बंद

आरोग्याच्या प्रश्नावर शोभा फडोळ यांनी अंबडमधील स्वामी समर्थ रुग्णालयात रक्त तपासणीचे मशीन सुरूच नसल्याचा आरोप केला. वर्षभरापासून मशीन खरेदी केले. मात्र, त्यासाठी लागणारे केमिकल्स खरेदी केले नसल्याने ते पेटीतच पडून असल्याने त्याची काय पूजा करायची का? असा सवाल त्यांनी केला. त्यावर अन्य सदस्यही आक्रमक झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेसतरा लाखांची लूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंडित कॉलनी परिसरात दोन बाईकवर आलेल्या चौघा जणांनी मिळून १७ लाख ७६ हजार रुपयांची रोकड लुटून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असला तरी घटनेच्या २४ तासानंतर आरोपींचा कोणताही मागमूस पोलिसांना लागलेला नाही.

खंडू शिरसाठ असे फिर्यादीचे नाव असून, ते मोरवाडीगाव येथील रहिवाशी आहेत. ते एका मद्य व्यवसायिकांकडे चालक म्हणून काम करतात. रविवारी रात्री वेगवेगळ्या मद्य दुकानांवरील कॅश एकत्रित करून मद्य व्यवसायिकाच्या घरी परतत होते. साधारणतः रात्री ११ वाजेच्या सुमारास शिरसाट पंडित कॉलनीतील ठक्कर नगर येथील मद्य व्यवसायिकाच्या चारचाकी वाहनाने पैसे घेऊन घरी पोहचले. मोठी रक्कम असल्याने सावधगिरी म्हणून इकडे-तिकडे पाहून शिरसाट वाहनातून खाली उतरले. त्याचवेळी दोन दुचाकीवर तिघे- चौघे जण तिथे पोहचले. त्यांनी लागलीच शिरसाठ यांना मारहाण करीत बॅग हिसकावून घेतली. तसेच घटनास्थळावरून पोबारा केला.

साधारणतः पाच मिनिटात हा सर्व प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात सहा आरोपींचा सहभाग असून, ते दोन दुचाकींवर आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. याबाबत अधिक माहिती देताना सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले की, तपासासाठी वेगवेगळे पथके तैनात करण्यात आली असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल. घटना घडली त्या ठिकाणापासून २०० मीटर अंतरावर एक सीसीटीव्ही आहे. मात्र, रात्रीचा अंधार व सीसीटीव्हीचे अस्पष्ट फुटेज त्यामुळे यातून काहीही निष्पण झालेले नाही. मागील काही महिन्यांपासून लुटीच्या घटना शहरात सातत्याने घडत आहेत. रविवारी रात्री गंगापूररोडवर एका महिलेच्या गळ्यातील ४४ हजार रुपयांची चेन हिसकावण्यात आली. याबरोबर, १७ मे रोजी देखील सातपूर एमआयडीसी परिसरात वृध्द महिलेच्या गळ्यातील ५२ हजार रुपयांची चेन ओरबडण्यात आली. या घटनेची नोंद रविवारी करण्यात आली. यापूर्वी धात्रक फाटा येथून महिलेच्या गळ्यातील ९० हजार रुपये किंमती​चे मंगळसूत्र चोरट्यांनी तोडून पोबारा केला. यातील एकाही आरोपीस अटक झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण समितीचा चेंडू सरकारच्या कोर्टात

$
0
0

निकालाकडे सर्वांचेच लागले लक्ष

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेच्या वादग्रस्त ठरलेल्या शिक्षण समिती सदस्य निवडीला आणि सभापती निवडी संदर्भातील सद्यस्थितीचा अहवाल महापालिका आयुक्तांकडून शासनाला सादर करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षण समितीचा चेंडू आता शासनाच्या कोर्टात असून, त्यावर सरकार काय निर्णय घेते यावर समितीचे भविष्य अवलंबून आहे.

शिक्षण समितीच्या निवड प्रक्रियेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्थगिती दिली होती. सोबतच आयुक्तांना समितीसंदर्भात सव‌िस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले होते. त्यावरून महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांनी समितीच्या निवड प्रक्रियेसंदर्भातल सविस्तर अहवाल शासनाकडे सादर केला आहे. राजपत्रात नोंद झालेली नसल्याने शिक्षण मंडळ बरखास्त झाले. त्यानंतर शिक्षण आयुक्तांच्या पत्रानुसार महापौरांनी समितीची निवड प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानंतर सोळा समिती सदस्यांची निवड, सभापती निवडीसाठी विभागीय आयुक्तांना सादर केलेल्या प्रस्तावाची माहिती देण्यात आली आहे. तसेच आपल्या स्तरावर योग्य ती कारवाई करावी, असे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे आता समितीचे भविष्य आता शासनाच्या हातात आहे. मुख्यमंत्री फडणवीस या समितीसंदर्भात काय निर्णय घेतात, याकडेच आता सर्वांच्या नजरा लागून आहेत. समितीच्या सदस्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. तर शिक्षण मंडळ सदस्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. शिक्षण मंडळ पुनरुज्जीवित झाले तर, विविध पक्षातील कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. त्यामुळे शासनाच्या निर्णयाकडे आता सर्वजन डोळे लावून बसले आहेत. यामुळे मुख्यमंत्री फडणवीस अहवालावर समितीच्या बाजूने की विरोधात निकाल देतात हे औत्सक्याचे ठरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सासे खूनप्रकरणातील संशयित फरार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

किरकोळ कारणावरून हत्या करण्यात आलेल्या शैलेश दत्तात्रय सासे (वय २६) या तरुणाच्या मारेकऱ्यांची ओळख पटली असून, पुढील काही तासातच आरोपीस अटक करण्यात येईल, असा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे. शैलेशची रविवारी रात्री साठे चौकातील किटकॅट चौकात दहा वाजेच्या सुमारास हत्या झाली होती.

भोई गल्लीत राहणाऱ्या आणि मासे विक्रीचा व्यवसाय असलेला शैलेश व साजन मोहन ठाकरे या दोघांनी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास काम आटोपल्यानंतर किटकॅट चौकातील सागर रसवंती आणि कोल्ड्रीक्स हे दुकान गाठले. दुचाकी पार्क करून पाण्याची बॉटल घेण्यासाठी ते आत गेले. घेतलेल्या बॉटल्स शैलेशने काऊंटरवर ठेवल्या. त्याच वेळी तिथे आलेल्या २२ ते २३ वयोगटातील आरोपीने सिगारेट पेटवून शैलेशच्या तोंडावर धूर सोडला. याबाबत शैलेशने जाब विचारला असता आरोपीने शिवीगाळ सुरू केली. सिगारेट पिणाऱ्या आरोपीसह त्याच्या दोन मित्रांनी बंदूक व चाकूसारखे हत्यार बाहेर काढले. या प्रकारामुळे साजन व शैलेशने दुचाकीकडे धाव घेतली. आरोपींनी शैलेशला गाठलेच. साजन तेथून निसाटला. शैलेशला फरफटत जवळील दुचाकी सर्व्हिस स्टेशनजवळ नेले. तेथे आरोपींनी शैलेशच्या पोटावर चाकूचे वार केले. यावेळी तिथे बघ्यांची गर्दी झाली होती. शैलेशला सोडून आरोपींनी दुचाकीवर बसून खडकाळी सिग्नलकडे धूम ठोकली. जखमी शैलेशला घेऊन साजनने रिक्षानेच सिव्हिल हॉस्पिटल गाठले. मात्र, अधिक रक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच शैलेशच्या नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तुफान तोडफोड केली. पोलिसांनी लाठीमार केला असता त्यांच्यावर देखील दगडफेक केली. यात, सहायक पोलिस आयुक्त रवींद्र वाडेकर यांच्या डोक्याला मार लागून ते जखमी झाले. त्यांच्यावर ​खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. खून प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्यांची नोंद केली आहे.

आरोपींचा वयोगट

शैलेशची हत्या करण्यात सहभागी असलेले सर्व आरोपी २२ ते २४ वयोगटातील आहे. पोलिसांना मिळालेल्या वर्णनानुसार त्याची ओळख पटवण्यात आली असून, त्यांच्या तपासासाठी पथके रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. .

पोलिसांचे अपयश

खुनाच्या घटनांमागे तत्कालीन कारणे असल्याचे सांगत अंग वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांचे अपयश या घटनेमुळे समोर आले आहे. खून करणाऱ्या आरोपींकडे चाकू बंदुक व सदृश्य हत्यार होते. टवाळखोर हत्यारे घेऊन फिरतात तसेच भरचौकात नागरिकांच्या साक्षीने तरुणाचा ​जीव घेऊन फरार होतात, हे पोलिसांच्या दृष्टीने आव्हान असल्याची भावना दिवसभर व्यक्त होत होती. गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा वचकच नाहीसा झाल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१८ महिन्यांनंतर ‘सेट’ला मुहूर्त

$
0
0

जितेंद्र तरटे, नाशिक

विद्यार्थ्यांची खऱ्या अर्थाने कसोटी पाहणाऱ्या विद्यापीठ अनुदान आयोगाला तब्बल अठरा महिन्यांनंतर सेट परीक्षेचा मुहूर्त सापडला आहे. सेट परीक्षेला सुरुवात झाल्यापासून परीक्षेच्या आयोजनातील हा पहिलाच प्रदीर्घ विलंब आहे. परीक्षेच्या या नियोजनातील गैरव्यवस्थापनाबद्दल परीक्षार्थींमधूनही तीव्र नाराजी आहे.

यापूर्वी सेट परीक्षा १ डिसेंबर २०१३ रोजी घेण्यात आली होती. यानंतर सहा महिन्याने या परीक्षेचे आयोजन अपेक्षित होते. दरम्यानच्या कालावधीत परीक्षेची अधिसूचनाही निघालेली नाही अन् त्याबाबतचे कारणही उमेदवारांना समजू शकलेले नाही. यामुळे परीक्षार्थी संभ्रमात होते. आता परीक्षेची अधिसूचना निघाल्याने परीक्षार्थींच्या मनावरील दडपडण थोडेसे कमी झाले आहे. युजीसीच्या वतीने पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून घेण्यात येणारी ३१ वी सेट परीक्षा आता ३० ऑगस्ट रोजी होईल. अर्ज भरण्याकरिता २७ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. बँकेमध्ये परीक्षा शुल्क भरण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत आहे. अधिक माहितीसाठी http://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना संपर्क साधता येईल.

'नेट'चा लांबला निकाल

गेल्या वर्षी सीबीएसईच्या वतीने राष्ट्रस्तरीय अधिव्याख्याता पदासाठी नेट परीक्षा घेण्यात आली होती. गतवर्षी डिसेंबरच्या अखेरीला पार पडलेल्या या परीक्षेचा निकाल तब्बल पाच महिने उलटूनही लागलेला नाही. परिणामी या परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांमधून नाराजी व्यक्त होत आहे. अगोदर युजीसीच्या नियंत्रणात असणारी नेट परीक्षा गतवेळपासून सीबीएसईकडे वर्ग करण्यात आली आहे. मात्र, सीबीएसईनेही या प्रतिष्ठेच्या अन् महत्वाच्या परीक्षा प्रक्रियेस प्राधान्य देण्याऐवजी दहावी अन् बारावीच्या निकालास प्राधान्य दिल्याचा परीणाम नेट च्या विलंबित निकालास कारणीभूत ठरत असल्याची शक्यता परीक्षार्थींमधून व्यक्त होत आहे. यामुळे परीक्षार्थी वैतागले आहेत.

'पेट' देऊ की 'नेट'?

पाच महिन्यांपूर्वी पार पडलेल्या परीक्षेचा निकाल न लावतान नव्या नेट परीक्षेचे नोटीफिकेशन काही दिवसांपूर्वी निघाले. या नियोजनानुसार आता पुढील नेट परीक्षा ही २८ जून रोजी पार पडणार आहे. तर याच दिवशी म्हणजे २८ जून रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने पीएच.डी. प्रवेशासाठी घेण्यात येणारी 'पेट' परीक्षा होणार आहे. नेटसाठी जिल्हाभरातून सुमारे ११० हजार परीक्षार्थी बसणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे पेटसाठी अर्ज केला आहे. या दोन्हीही परीक्षा एकाच दिवशी पार पडणार असल्याने विद्यार्थ्यांना दोनपैकी एका परीक्षेवर पाणी सोडावे लागणार आहे. विद्यापीठाने या नियोजनात बदल करावा, अशीही मागणी उमेदवारांमधून होत आहे.

महाराष्ट्राच्याच वाट्याला वेगळा न्याय!

देशातील इतर राज्यांमध्येही राज्यस्तरीय अधिव्याख्याता पदासाठी युजीसीच्या वतीने चाचणी घेण्यात येते. युजीसीच्या धोरणांप्रमाणे नियोजित कालावधीत ही परीक्षा त्या राज्यांमध्ये पार पडते. मात्र, महाराष्ट्रात या परीक्षेच्या आयोजनात वेळोवेळी विलंबच होताना दिसून येत आहे. यंदा झालेल्या परीक्षा आयोजनातील विलंबनाने तर कळसच गाठत नवा विक्रम प्रस्थापित केल्याने शिक्षण क्षेत्रातून सखेद आश्चर्यच व्यक्त केले जात आहे. इतर राज्यांमधील सेट परीक्षा विनविलंब व नियोजित धोरणांप्रमाणे सुरू असतानाच युजीसीच्या वतीने महाराष्ट्राच्याच वाट्याला वेगळा न्याय का, असाही सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

३१ वी सेट परीक्षा :

(स्टेट इलिजिबीलिटी टेस्ट)

- परीक्षा दिनांक : ३०ऑगस्ट

- अर्ज करण्यासाठी मुदत : १ ते २७ जून

- बँकेत शुल्क भरण्याची अंतिम तारीख : ३० जून

- अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : http://setexam.unipune.ac.in

- नेट परीक्षा (नॅशनल इलिजीबिलीटी टेस्ट)

- नेट परीक्षा : दिनांक २८ जून

- मुक्त विद्यापीठ पीएच.डी प्रवेश (पेट परीक्षा) : दि.२८ जून

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्यक्षपदाचा फैसला उद्या

$
0
0

एकमत नसल्याने उत्सुकता कायम

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी (दि. ३) निवडणूक होत असून दोन्ही गटांनी अध्यक्षपदावर दावा केला आहे. सद्यस्थितीत हिरे गटाचे पारडे जड दिसत असले तरी ऐनवेळी चमत्काराची शक्यता असल्याने दोन्ही गटाकडून अध्यक्षपदाचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

अध्यक्ष, उपाध्यक्षपद एक एक वर्षाचेच ठेवण्याचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांसह माजी मंत्री छगन भुजबळ यांनीही या निवडणुकीत उडी घेतल्याने चुरस वाढली असून अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार अपूर्व हिरे आणि माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यापैकी एकाही पॅनलला बहुमत मिळाले नाही. तर काही अपक्ष पाच सदस्यांनी दबावगट तयार केल्याने अध्यक्षपदाची निवड चुरशीची बनली आहे. सद्यस्थितीत हिरे गटाचे पारडे जड असून या गटाकडे १३ सदस्य असल्याचा दावा हिरेंकडून करण्यात येत आहे. या सर्वांचे सध्या भारत भ्रमण सुरू असून मंगळवारी सायंकाळपर्यंत ते नाशिकमध्ये दाखल होणार आहे. हिरे गटाकडून अध्यक्षपदासाठी अद्वय हिरे आणि उपाध्यक्षपदासाठी सुहास कांदे यांचे नाव रेटले जात आहे. मात्र, काही सदस्यांचा याला विरोध असला तरी तो ऐनवेळी मावळण्याची शक्यता आहे. हिरेंना जास्त विरोध झाला तर ऐनवेळी माजी आमदार शिरीष कोतवाल यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे. हिरे गटाने अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद एक एक वर्षासाठी वाटून घेण्याचा फॉर्म्युला तयार केला आहे. तर एका सदस्याला राज्य बँकेवर प्रतिनिधी पाठवून ऐनवेळी अकराचा कोटा पूर्ण करण्यासाठी हिरे गटाकडून रणनीती आखली जात आहे.

माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या गटात सहा सदस्य असले तरी ऐनवेळी चमत्कार करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. हिरे गटातील काही सदस्यांच्या ते संपर्कात असून अध्यक्षपदावर तडजोडीची तयारी त्यांनी ठेवली आहे. तर काही जुन्या मिंत्राच्या माध्यमातून फिल्डींग लावली जात आहे. यासाठी खासदारासह काही आमदारांनीही प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे अध्यक्ष नेमका कोण होणार हे सांगणे सध्या अवघड झाले आहे. तर शिवाजी चुंभळे आणि आमदार जे. पी. गावीत अद्याप तटस्थ असून त्यांच्याकडून ऐनवेळी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनाही आपआपल्या परिने फिल्डींग लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे चुरस वाढली आहे.

गुळवे, पवार यांचे तळ्यात मळ्यात

इगतपुरीचे संदीप गुळवे आणि कळ‍वणचे धनंजय पवार यांनी अध्यक्षपदासाठी फिल्डींग लावली होती. यासाठी त्यांनी प्रयत्न केले. हिरे गटाकडून प्रथम दोघांनाही अध्यक्षपदाचे आश्वासन दिले गेले. मात्र, आता उपाध्यक्षपदही मिळत नसल्याची शंका असल्याने दोघांचेही सध्या तळ्यात मळ्यात सुरू आहे. त्यामुळे हे दोघेही सदस्य ऐनवेळी काहीही निर्णय घेण्याची शक्यता आहे.

पेटी, खोका याचीच चर्चा

निवडणुकीत कोणालाही बहुमत नसल्याने बहुमतासाठी जोडतोडीचे प्रयत्न केले जात आहे. संचालकपदासाठी लाखोची उधळण करणाऱ्या काही सदस्यांनी भरपाई काढण्यासाठी दोन्ही गटाकडे चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे सध्या सहकाराशी संबंधित लोकांच्या तोंडी पेटी आणि खोकाचीच चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाही मार्गावर पोलिसांचे लक्ष

$
0
0

अरविंद जाधव, नाशिक

कुंभमेळ्यात सर्वांच्या आकर्षणचा केंद्रबिंदू असते ती शाही मिरवणूक. साधू महंतांच्या दृष्टीने शाही स्नानाला आगळेच महत्व असते. शाही मिरवणुकीत तब्बल ३ लाखापेक्षा जास्त साधू महंत सहभागी होणार आहेत. शाही मिरवणूक शांततेत होणे प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

प्रशासनाने नियोजनाच्या दृष्टीकोनातून सात प्रमुख विभाग (यात सर्व रस्त्यांचा समावेश), शहर वाहतूक विभाग, स्पेशल ब्रँच, क्राईम ब्रँच, पोलिस कंट्रोल रूम, बॉम्ब शोधक व नाशक स्कॉड, शीघ्र कृती दल (क्युआरटी) अशा पध्दतीने तब्बल १० हजारापेक्षा जास्त पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्ताचे नियोजन आखले आहे. यात पोलिस विभागाचे सर्वात जास्त लक्ष शाही मार्गावर असल्याचे दिसते. याठिकाणी तीन पोलिस उपायुक्त, पाच सहायक पोलिस आयुक्त, ३३ पोलिस निरीक्षक, २९९ एपीआय/पीएसआय, २३९ एएसआय, १ हजार ८६७ पोलिस कॉन्स्टेबल, ४५३ महिला महिला पोलिस कर्मचारी, १ हजार ७७ होमगार्डस आणि २५० महिला होमगार्डस तैनात असणार आहेत. बंदोबस्तातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या कमी-जास्त होऊ शकते. प्रशासनाने धुळे रोड, औरंगाबाद-पुणे रोड, मुंबईरोड, त्र्यंबकरोड, पेठ-गंगापूररोड, दिंडोरी रोड, शाही मार्ग असे विभागांचे वर्गीकरण केले आहे. या सर्व विभागासाठी शाही मार्ग वगळता प्रत्येकी एका पोलिस उपायुक्ताची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच साधारणतः तीन ते चार सहायक पोलिस आयुक्तांची नियुक्ती देखील केली जाणार आहे. तसेच २० ते ३० या संख्येनुसार पोलिस निरीक्षक, १५० ते २०० एपीआय, तसेच १ हजार ते १५०० पर्यंत पोलिस कर्मचारी तैनात केले जातील. पोलिसांच्या मदतीला होमगार्डस देखील असतील.

बीडीडीएस आणि क्युआरटी टीम्स

कुंभमेळ्या दरम्यान घातपाताच्या घटना रोखण्यासाठी तब्बल १३ बॉम्ब शोधक व नाशक पथके (बीडीडीएस) आणि ६ शीघ्र कृती दलाच्या (क्युआरटी) तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. बीडीडीएसच्या १३ पैकी सात पथके प्रत्येक विभागासाठी, तर उर्वरित रामकुंड, साधूग्राम आणि व्हीआयपी व इतर ठिकाणी तैनात ठेवण्यात येतील. क्युआरटीचे पथके रामकुंड, साधूग्राम, नाशिकरोड, दिंडोरीरोड, मुंबई व त्र्यंबकरोड, तसेच कंट्रोल रूममध्ये ठेवण्यात येतील. याबरोबर अतिरिक्त बंदोबस्त मागवण्यात येणार आहे. सध्या, बंदोबस्त निश्चित करण्याचे काम पोलिस महासंचालक कार्यालयाकडून सुरू असून कर्मचाऱ्यांच्या आकड्यात वाढ किंवा घट होऊ शकते, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

वाहतूक शाखेसाठी वेगळा बंदोबस्त

कुंभमेळ्या दरम्यान लाखो वाहने येणार असल्याने पोलिसांनी शहर वाहतूक शाखेसाठी सुमारे ३०० पेक्षा जास्त अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यात, एक पोलिस उपायुक्त, चार सहायक पोलिस आयुक्त, २० पोलिस निरीक्षक, २२ एपीआय किंवा पीएसआय, १५७ एएसआय आणि १७९ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. स्पेशल ब्रँच, क्राईम ब्रँच, पोलिस कंट्रोल रूमसाठी पोलिस कर्मचाऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन हजार द्या, दाखला घ्या!

$
0
0

विद्यार्थ्यांची पिळवणूक; एजंटांचा सुळसुळाट

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळा आणि तहसीलदार निलंबनास विरोध या प्रक्रियेत गुंतलेल्या जिल्हा प्रशासनातील गोंधळाचा फायदा घेत सेतू केंद्रांना एजंटांनी विळखा घातला आहे. त्यामुळे 'दोन हजार रुपये द्या, एका दिवसात दाखला मिळवा' अशी जाहिरातच एजंटांनी खुलेआम सुरु केली आहे. ऐन शैक्षणिक प्रवेशाच्या काळात जिल्हा प्रशासनाने सेतुच्या कारभाराकडे दुर्लक्ष केल्याने या साऱ्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांची प्रचंड आर्थिक पिळवणूक होत आहे.

इयत्ता बारावीचे निकाल लागल्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेश घेण्यासाठी विविध प्रकारच्या सरकारी शैक्षणिक दाखल्यांची जमवाजमव विद्यार्थ्यांनी सुरु केली आहे. त्यासाठीच नाशिक शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्तालय, नाशिक रोड, श्री छत्रपती शिवाजी स्टेडिअम, अश्विन नगर, सिडको, महापालिका विभागीय कार्यालय, सातपूर, आणि मेरी क्वार्टर, तारवाला नगर, दिंडोरी रोड, पंचवटी या पाच ठिकाणच्या सेतू केंद्रांवर विद्यार्थी व पालकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, सिंहस्थासह विविध कामांमध्ये गुंतलेल्या आणि तहसीलदारांच्या निलंबनामुळे कामाच्या ताणाखाली आलेल्या महसूल प्रशासनाकडून मात्र शैक्षणिक दाखल्यांच्या वितरणाकडे योग्य लक्ष दिले जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच एजांटांचा सेतू केंद्रांच्या ठिकाणी सुळसुळाट झाला आहे. 'दोन हजार रुपये द्या, एका दिवसात दाखला मिळवून देतो', असे आमीषच एजंटांकडून दाखविले जात आहे. या प्रलोभनाला विद्यार्थी आणि पालक सर्रास बळी पडत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड आर्थिक पिळवणूक होत आहे.

सिंहस्थाची कामे

दर १२ वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सिंहस्थाची कामे मार्चमध्ये पूर्ण होणे अपेक्षित होती. मात्र, ती अद्याप पूर्ण न झाल्याने त्याकडेच प्रशासनाचे लक्ष लागले आहे. परिणामी, सिंहस्थ कामांकडे महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अधिक कल आहे.

व्हीआयपींचे दौरे

सिंहस्थ तोंडावर आल्याने मंत्री आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी यांचे सिंहस्थ कामे पाहणीचे तसेच आढावा घेण्यासाठीचे दौरे वाढले आहेत. या दौऱ्यामध्ये या व्हीआयपींची व्यवस्था ठेवण्यासह सिंहस्थाची विविध प्रकारची जबाबदारी देण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ होत आहे.

नॉन क्रिमिलेअर काढण्यासाठी मी जिल्हाधिकारी कार्यालयात आलो. चौकशी केली असता ते १५ दिवासांनी मिळेल असे सांगण्यात आले. येथे मला एका व्यक्तीने एक दिवसात दाखला दिला. त्यासाठी मी त्याला २ हजार रुपये दिले. - मनोज पवार, विद्यार्थी

विद्यार्थी व पालकांनी एजंटांच्या कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये. थेट सेतूमध्येच अर्ज दाखल करावा. एंजंटसंबंधी आमच्याकडे तक्रार केल्यास आम्ही तातडीने त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करु.

- नीलेश जाधव, उपजिल्हाधिकारी (प्रशासन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

B. Ed.च्या जागा वाढवा

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर, नाशिक

शिक्षकांना शिक्षणशास्त्र पदविका अर्थात बी.एडची पदविका प्राप्त करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, उपलब्ध जागा पाहता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने आणखीन जागा वाढवाव्यात, अशी मागणी पदवीधर प्राथमिक शिक्षक संघटनेने केली आहे.

जिल्हा परिषदेने आरटीई २००९ अंतर्गत इयत्ता सहावी ते आठवी या वर्गांसाठी सुमारे एक हजार पस्तीस प्राथमिक शिक्षकांमधून पदवीधर शिक्षक म्हणून नेमणूक देण्यात आलेल्या शिक्षकांना मुदतीत शिक्षणशास्त्र पदविका अर्थात बी.एड ची पदविका प्राप्त करणे अनिवार्य असल्याने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात बी.एड अभ्यासक्रमाच्या जागा वाढवण्याची गरज आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता सहावी ते आठवी पर्यंतच्या वर्गांना अध्यापन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्याच पदवीधर शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. मात्र त्यासाठी त्यांना विहित मुदतीत शिक्षणशास्त्र पदविकेचा अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य असल्याने बी.एडची पदवी मिळवणे आवश्यक झाले आहे. यासाठी मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून बी.एड पूर्ण करण्याचा पर्याय उपलब्ध असला तरी जागांची संख्या मर्यादित असल्याने पदवीधर प्राथमिक शिक्षकांना बी.एड अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे.

या आधी मुक्त विद्यापीठाच्या बी.एड प्रवेशासाठी ५० : ३० : २० असे प्रमाण होते. त्यात प्राथमिक शिक्षकांसाठी ५० टक्के, माध्यमिक शिक्षकांसाठी ३० टक्के आणि इतर २० टक्के जागा प्रवेश दिला जात होता. मात्र यंदाच्या शैक्षणिक वर्षात सेवाज्येष्ठता, सध्या घेत असलेली वेतनश्रेणी, प्राप्त शैक्षणिक अहर्ता या बाबी विचारात घेऊन प्रवेश दिला जाणार आहे. मात्र असे असले तरीही जागांची संख्या खूपच मर्यादित असल्याने विहित मुदतीत बी.एड पदविका प्राप्त होणार का हा प्रश्न पदवीधर शिक्षकांना पडला आहे.

सद्यस्थितीत पदवीधर शिक्षकांची नेमणूक सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी झालेली असून, जिल्हा परिषदेच्या पदवीधर शिक्षकांना बी.एड अभ्यासक्रमात जागा वाढवून देण्याची मागणीही शिक्षकांकडून होत आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा संघटनेच्या नाशिक जिल्हा पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंशी चर्चा केली आहे.

जिल्हा परिषदेच्या पदवीधर प्राथमिक शिक्षकांना मुदतीत बी.एड पदविका प्राप्त करणे अनिवार्य असल्याने मुक्त विद्यापीठात जागा वाढवून देण्याची आणि पदवीधर प्राथमिक शिक्षकांना प्राधान्य देण्याची मागणी आम्ही केली असून यासंदर्भात कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंके यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. - महारु निकम, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक संघटना

स्वतंत्र बॅच

पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा स्तरावर स्वतंत्र बॅचेस तयार करून बी.एड प्रवेशासाठी अधिक जागा मिळाव्यात यासाठी दिल्ली येथील एनसीटीई ची परवानगी आवश्यक असल्याने त्यासाठी आता संघटना प्रयत्नशील राहणार असल्याचे जिल्हाध्यक्ष महारु निकम यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदिनी होणार प्रदूषणमुक्त

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, सातपूर

नाशिक शहरातील गोदावरीनंतर दुसरी महत्वाची मानली जात असलेल्या नंदिनी नदीच्या प्रदूषण मुक्ततेसाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे आशादायी चित्र निर्माण झाले आहे. बाराही महिने पाणी असलेल्या या नदीचा प्रदूषणामुळे श्वास कोंडला गेला होता.

प्रदूषणामुळे नंदिनी नदीला नासर्डी असेही म्हटले जाते. मात्र, या नदीच्या प्रदूषणमुक्ततेसाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. नंदिनी नदीची पहाणी कृती समितीने नुकतीच केली. यात येत्या शुक्रवारी (दि. ५) होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनी या नदीची ठिकठिकाणी स्वच्छता केली जाणार आहे. यासाठी खास स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार नियोजन करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमिवर शहरातील नदींची स्वच्छता करण्याची मोहीम महापालिका व महसूल विभागाने हाती घेतले आहे. यासाठी नाशिक शहरातून जाणारी नंदिनी नदीची पहाणी कृती समितीने केली. यात ठिकठिकाणी नंदिनी नदीत असलेल्या घाण कचरा व साजलेले सांडपाणी काढण्याच्या सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केल्या. तसेच समितीत असलेले राजेश पंडित, गोपाळ पाटील, अंजली पाटील यांनी देखील सूचना मांडल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हस्तांतरण प्रस्ताव पुन्हा महासभेवर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आठ ते दहा वर्षांपासून प्रलंबित असलेली सिडकोच्या सहाव्या गृहनिर्माण योजनेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा महासभेवर चर्चा होणार आहे. येत्या मंगळवारी (दि. ९) महासभेचे आयोजन करण्यात आले असून हस्तांतरणाच्या मुद्यावर पडदा पडणार तरी केव्हा असा प्रश्न या निमित्ताने सिडकोवासियांकडून उपस्थित केला जातो आहे.

सिडकोने साधारणत‍ः ८ वर्षांपूर्वी सहाव्या गृहनिर्माण योजनेत साडेचारशे सदनिका बांधल्या. या सदनिका सिडकोच्याच ताब्यात असल्यामुळे महापालिकेला सुविधा देताना अडचण निर्माण होते. त्यात यापूर्वी पाच गृहनिर्माण योजना महापालिकेकडे हस्तांतरित झालेल्या आहेत; पण ही योजना हस्तांतर करताना सुरवातीपासूनच अडचणी निर्माण झाल्या. येथील रहिवाशांना मूलभूत सुविधा देण्यासाठी महापालिकेला खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून योजना हस्तांतर करताना सिडको प्रशासनाने काही रक्कम महापालिकेला द्यावी, अशी मागणी होती. सुरवातीला ही मागणी मोठी होती; पण नंतर नऊ कोटी रुपये प्रशासनाने महापालिकेला द्यावेत, असे ठरले. मात्र, त्यावरही प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेवटी या योजनेच्या बदल्यात प्रशासनाने येथील चार भूखंड महापालिकेला द्यावेत, असे ठरले मात्र पुढे सिडको व महापालिका प्रशासनाचे बिनसतच गेले. अनेकदा हस्तांतराचा अंतिम निर्णय लांबल्यामुळे या महासभेच्या चर्चे दरम्यान काय होते, याकडे सहाव्या योजनेतील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. सिडकोची सहावी योजना हस्तातंरीत करण्याबाबत सिडकोच्या उपाध्यक्षांनी तत्वतः मंजुरी दिली आहे. मात्र, यासाठी महासभेचा ठराव आवश्यक आहे.

महासभेचा मंजूर ठराव व्यवस्थापकीय संचालक यांच्या मंजुरीने सिडकोच्या संचालक मंडळासमोर सादर करण्यात येईल. यानंतर, प्रशासन मंजुरीसह पुढील कार्यवाही पार पडेल. यापूर्वी २०१० मध्ये झालेल्या महासभेच्या ठरावात आणि सद्य स्थितीत सिडकोच्या प्रशासकीय धोरणात बदल झाल्याने येत्या महासभेत यावर धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वटपौर्णिमा साजरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

दिर्घायुषी म्हणून नावलौकिक असलेल्या वडाच्या झाडाकडे वटसावित्री पौर्णिमेच्या ‌निमित्ताने सौभाग्याचं अखंड दान मागितले. नाशिक व देवळाली परिसरातील विवा‌हितांनी सावित्रीप्रमाणेच आपल्याही पतीला चे आयुष्य वाढावे म्हणून वडाला सूत गुंडाळत पूजा अर्चना केली.

देवळाली कॅम्प परिसरात वडाची अनेक झाडे आहेत. त्यामुळे नाशिकरोड तसेच देवळाली कॅम्प परिसरातील अनेक महिलांनी या वडांभोवती गर्दी करीत या प‌वित्र मानल्या जाणाऱ्या झाडाची मनोभावे पूजा केली. देवळालीत प्राचीन काळापासून असणाऱ्या असंख्य वडाच्या झाडाला विवाहित महिलांनी आपल्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे अशी प्रार्थना केली. लामरोड, रेस्ट कॅम्प रोड, हिल रेंज परिसरात असणाऱ्या अनेक वडांच्या झाडासमोर महिलांनी गर्दी केल्याचे दिसून आले. सुहासिनी एकमेकांना हळद, कुंकू देत फळे देत एकमेकींची ओटी भरली. नववधूंनीही आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना केली. ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस 'वटपौर्णिमा' म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी अपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात.

पंचवटी परिसरात वटसावित्री पौर्णिमा पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. परिसरातील विडीकामगार वसाहत, दिगंबर सोसायटी, अमृतधाम, सरस्वतीनगर, औदुंबरनगर, गणेशनगर, हिरावाडी, मेरी कॉलनी, तारवलानगर, लामखेडे मळा, स्नेहनगर, म्हसरूळ, पोकर कॉलनी आदी सर्व भागातील सुवासिनींनी सकाळपासून वडाच्या पूजेसाठी गर्दी केली. सुंदर साड्या परिधान केलेल्या विवाहित महिला पुजेच्या ठिकाणी एकमेकींना वटसावित्री पौर्णिमेच्या शुभेच्छा देतांना दिसून आल्या. तसेच काही नवविवाहित तरुणींनी मोबाईल आणि व्हॉटअपवरूनही शुभेच्छांचे मेसेज केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोलनाक्यावर आनंदोत्सव!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

राज्य सरकारने काही टोल नाक्यांवर कार, पिकअप आदी छोटी चारचाकी वाहने तसेच एसटी बसला टोलमाफी देण्याच्या केलेल्या घोषणेनुसार सोमवार १ जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. मालेगांव- मनमाड- येवला-कोपरगाव राज्य मार्गावरील येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल शिवारातील टोलनाका तसेच गवंडगाव नजीकचा टोलनाका ठिकाणी त्याचा वाहनचालकांना दिलासा मिळाला. युती सरकारने दिलेला दिलासा बघता येवला तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या उत्साही पदाधिकाऱ्यांनी सकाळी पिंपळगाव जलाल शिवारातील टोल नाका गाठत मार्गावरून जाणाऱ्या-येणाऱ्या छोट्या वाहनचालकांसह एसटी बस चालकांचे स्वागत केले. त्यात कुणी गुलाबपुष्प दिले तर, कुणी मिठाई देत वाहनचालकांचे तोंड गोड केले. सुरुवातीला येवल्यातील भाजपा पदाधिकारी याबाबत अग्रेसर दिसत असतानाच त्यांच्या कार्यक्रमानंतर अवघ्या काही मिनिटांतच येवल्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी देखील या टोल नाक्यावर आपला मोर्चा वळवीत पक्षाचे झेंडे फडकावीत फटाके फोडले. जणू काही मनसेच्या आंदोलनामुळेच टोलमाफी मिळाली अशा अविर्भावात मनसे पदाधिकाऱ्यांचा जोश दिसत होता.

मनमाड-नगर राज्य मार्गावरील येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल शिवारातील टोल नाक्यावर सोमवारी कोपरगावचे बिपीन कोल्हे यांनी आपल्या समर्थकांसह मार्गावरून जाणाऱ्या-येणाऱ्या छोट्या वाहनचालकांसह एसटी बस चालकांचे स्वागत केले. यावेळी वाहनचालकांना मिठाई वाटप करण्यात आली. त्यात भाजपचे मनोज दिवटे यांच्या हस्ते मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला गेला. यावेळी भाजपा शहराध्यक्ष मनोज दिवटे, सरचिटणीस बापूसाहेब गाडेकर, युवा शहराध्यक्ष राम बडोदे, विशाल काथवटे, नगरसेवक बंडू क्षीरसागर, सुनील काबरा, राजेंद्र नागपूरे, पंकज पहिलवान, सुनील बाबर, कांचन पहिलवान, नाना मोरे, जेष्ठ नेते रमेशमामा भावसार, संजय बाबर आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी सामील झाले होते. त्यानंतर भाजपा तालुकाध्यक्ष गोरख साताळकर, जेष्ठ नेते श्रीकांत गायकवाड, पप्पु सस्कर, तालुका सरचिटणीस आनंद शिंदे, नगरसेवक बंडू पैलवान क्षिरसागर आदींनी टोलनाका गाठत वेगळ्या कार्यक्रमात वाहनचालकांचे गुलाबपुष्प देत स्वागत केले.

चढाओढ

भाजपाचे येवल्यातील पदाधिकारी टोल नाक्यावरून माघारी फिरतात न फिरतात तोच येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल शिवारातील टोल नाक्यावर येवल्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी टोल नाक्यावर आपला मोर्चा वळवीत पक्षाचे झेंडे फडकावले. कोपरगाव-मनमाड मार्गावरील येवला टोल नाका काही वाहनांसाठी बंद झाल्याने टोल धाड थांबली असे म्हणत येवल्यातील मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर जावून वाहन चालकांना पेढे वाटून जल्लोष केला. जणू काही मनसेच्या आंदोलनामुळेच टोलमाफी मिळाली अशा अविर्भावात मनसे पदाधिकाऱ्यांचा जोश यावेळी दिसत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदलणार टपऱ्यांचा ‘लूक’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रामकुंडासह शहरातील बहुतांश भागातील टपऱ्या सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर काढून टाकण्यात आल्या आहेत. यातील काही टपऱ्यांचे सिंहस्थानंतर पुनर्वसन केले जाईल. हे पुनर्वसन करताना टपरीधारकांना एकाच आकाराच्या व रंगाच्या टपऱ्या महापालिकेने पुरवाव्या आणि त्यादृष्टीने आतापासूनच नियोजन सुरू करण्याचे आदेश महापौर अशोक मुर्तडक यांनी दिले. रामकुंड परिसरातील अनेक टपऱ्या वेगवेगळ्या आकाराच्या असून त्यातून अस्ताव्यस्तपणा दिसून येतो. महापौरांनी उपायुक्त आर. एम. बहिरम यांच्याशी या प्रश्नावर चर्चा केली. रामकुंड परिसरातील टपऱ्या वेगवेगळ्या आकाराच्या आहेत. त्याऐवजी एकाच आकार व रंगाच्या तयार करण्याची सूचना महापौरांनी केली. महापालिकेने पुरवलेल्या टपऱ्यांच्या आकारात बदल करण्याचा प्रयत्न केला गेल्यास किंवा अटी शर्थीचे भंग करणाऱ्या व्यावसायिकाच्या टपऱ्या जमा करण्याच्या तरतुदीचा या प्रस्तावात समावेश करावा. तसेच उंच वाढणारे सरू, निलगिरी किंवा अशोक यासारखे झाडे व्यावसायिकांना देण्यात येतील. या झाडांना वाढविण्याची जबाबदारी विक्रेत्यांवर असेल. जवाहर योजनेतंर्गत महापालिकेनेच दिलेल्या जागेवरील मांडणीधारकांना (छोटी टपरी) हटवण्यात आले. रस्ता रुंदीकरणाच्यादृष्टीने गरजेचे असेल म्हणून कारवाई झाली. आता, महापालिकेने किलबिल स्कूलमार्गावरील रुंद रस्त्याच्याकडेला पुर्नवसन करून देण्याची मागणी १५ ते २० मांडणीधारकांनी महापौरांकडे केली आहे. आमदार ​​सीमा हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ​मांडणीधारकांच्या शिष्टमंडळाने महापौराची भेट घेतली.

'रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करा'

त्र्यंबकेश्वर येथील घाटाजवळील जमिनीचे सपाटीकरण करण्यात येऊन रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी मंगळवारी दिले. तसेच, सिमेंट रस्त्यांच्या साइडपट्टयांची कामे ५ जूनपर्यंत पूर्ण करावी, असेही त्यांनी बजावले. जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कामांची पाहणी केली. त्यांच्यासमवेत पोलिस उपअधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, उपजिल्हाधिकारी महेश पाटील, उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाघचौरे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता यू. एन. निर्मल, नगर परिषदेचे मुख्याधिकारी निवृत्ती नागरे आदी उपस्थित होते. कुशवाह यांनी भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घाटाजवळ रेलींग करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. ते म्हणाले, शहरातील मोकळ्या जागांची स्वच्छता करण्यात येऊन सुशोभिकरण करण्यात यावे. गोरक्षनाथ घाटाजवळील नदीपात्राची स्वच्छता करण्यात यावी. सार्वजानिक स्वच्छतागृहांना त्वरित रंगरंगोटी करण्यात यावी आणि आखाड्यात उभारण्यात आलेल्या शेडमध्ये विद्युत कनेक्शनचे काम तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

शाहीमार्गावर तीन 'थांबे'

भाविकांची अतिरिक्त गर्दी रोखण्याकरीता शाही मार्गावर तीन ठिकाणी 'होल्ड अॅण्ड रिलीज पॉईंट' तयार करण्यात येणार आहे. यामुळे घाटावरील गर्दी नियंत्रणात आणताना प्रशासनाला मदत होऊ शकते. सिंहस्थ कुंभमेळ्यात शाही मिरवणुकीसाठी तब्बल तीन लाख साधू महंत हजर राहणार असून भाविकांच्या संख्येची यात भर पडणार आहे. नवीन शाही मार्गानुसार शाही मिरवणूक लक्ष्मी नारायण मंदिर-तपोवन रस्त्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३, पंचमुखी हनुमान मंदिर, काट्या मारुती चौक, देवी चौक-गणेशवाडी रस्त्याने आयुर्वेद महाविद्यालय- गाडगे महाराज पुलालगतच्या रस्त्याने नदी पात्रापर्यंत, संत गाडगे महाराज पुलाखालून, सरदार चौक-कपालेश्वर मंदिर चौक-रामकुंड अशी प्रवास करेल. या पूर्वीच्या शाहीमार्गावरील सरदार चौक येथील उताराचा भाग नवीन शाही मार्गातून वगळण्यात आला आहे. गत कुंभमेळ्यावेळी सरदार चौकातच चेंगराचेंगरीची घटना घडून २९ भाविकांना जीव गमवावा लागला होता. तीव्र उतारामुळे ही घटना घडल्याचे आक्षेप तत्कालीन चौकशी समितीने नोंदवले होते. त्यानुसार या मार्गात बदल करण्यात आले. याशिवाय, काट्या मारुती चौक, गणेशवाडी देवी मंदिर, आयुर्वेदीक कॉलेज अशा तीन ठिकाणी होल्ड अॅण्ड रिलीज पॉईंट तयार करण्यात येणार आहे. एका तासात रामकुंडासह शहर परिसरातील इतर सर्व घाटांवरून किती भाविक स्नान आटोपून बाहेर पडतील, याचे अंदाजाचे गणित पोलिसांनी आखले आहे. आणि त्यादृष्टीने या होल्ड पॉईंटचा वापर केला जाणार आहे. लक्ष्मी नारायण मंदिर ते रामकुंड या तीन किलोमीटरच्या एखाद्या टप्प्यात किती गर्दी झाली हे पाहूनच भाविकांना सोडण्याचे नियोजन आखले जाईल. यामुळे गर्दीवर नियंत्रण राखणे शक्य होणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

गर्दीचे नियंत्रण

शाही मार्गावर पाच पोलिस चौकी, ११६ लाऊडस्पीकर, १ हजार ४४४ मीटर बॅरकेडींग, ११ वॉच टॉवर उभारून गर्दीचे नियोजन केले जाणार आहे. स्नान करून भाविक रामकुंड-कपालेश्वर मंदिर चौक-खांदवे सभागृह रस्त्याच्या मार्गाने मालवीय चौक-पुढे पाथरवट लेनने गजानन चौक, पुढे गुरुद्वारा रस्त्याने काट्या मारुती चौक-एसटी डेपो लगतच्या मुख्य रस्त्याने नवीन आडगाव नाका चौक, राष्ट्रीय महामार्गावरील औरंगाबाद नाका-औरंगाबाद रोडने जनार्दन स्वामी आश्रम चौक-पुढे तपोवन रस्त्याने लक्ष्मी नारायण मंदिरापर्यंत असा प्रवास करतील. रामकुंडाकडे येण्याचा आणि जाण्याचा मार्ग पूर्णतः वेगळा असल्याचा फायदा होणार असल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटकांना सिंहस्थाची पर्वणी

$
0
0

गायत्री काळकर, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणीचा लाभ घेण्यासाठी भारतभरातील पर्यटक सज्ज झाले आहेत. परंतु, यंदा मात्र हा कालावधी परदेशी पर्यटकांसाठीही अनोखी पर्वणीच ठरणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये सहभागी होण्याबरोरच वाइन टुरिझमची सफरही या कालावधीत अनेक परदेशी पर्यटकांना करता येणार आहे. यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून विविध देशातील पर्यटकांनी नाशिकमध्ये आपले बुकिंग केले आहे.

देशभरातील भाविकांची व पर्यटकांची कुंभमेळ्यादरम्यान होणारी नाशिकवारी नाशिककरांना काही नवीन नाही. परंतु, यंदाच्या कुंभमेळ्यात मात्र परदेशी पर्यटकांनीही नाशिक दौरा आयोजित केला आहे. ध्वजारोहणापासून शाही स्नानाच्या विविध तारखांना अनेक परदेशी पर्यटक ना‌शिकमध्ये दाखल होणार आहेत. १४ जुलै, १४ ऑगस्ट, २६ ऑगस्ट, २९ ऑगस्ट, १३ सप्टेंबर, १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर अशा महत्त्वाच्या तारखांना परदेशी पर्यटक नाशिकमध्ये असणार आहेत. जर्मनी, जपान, हाँगकाँग, अमेरिकन नागरिकांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. तसेच ११ ते २५ सप्टेंबरदरम्यान दोन अमेरिकन तरुणी खास कुंभमेळ्याच्या अभ्यासासाठी नाशिकमध्ये असणार आहेत.

कुंभमेळ्याबरोबरच या परदेशी पर्यटकांसाठी वाइन टूरचे आयोजनही करण्यात आले आहे. कुंभमेळ्याला भेट दिल्यानंतर नाशिक परिसरातील वायनरीजना हे पर्यटक भेट देणार आहेत. त्यामुळे नाशिकच्या आध्यात्मिक महतीबरोबर शहर विकासाचा आलेखही या परदेशी पर्यटकांना जाणून घेता येणार आहे. कुंभमेळा ही नाशिकची पारंपरिक आणि धार्मिक ओळख असली तरी परदेशी पर्यटकांना त्याकडे आक‌र्षित करण्याचे काम मात्र वाइन कॅपिटल या नाशिकच्या तयार होत असलेल्या नवीन ओळखीने साध्य केले आहे.

यापूर्वी बारा वर्षांपूर्वी म्हणजेच २००३-०४ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यादरम्यान नाशिक केवळ एक धार्मिक स्थळ म्हणूनच प्रामुख्याने ओळखले जात होते. त्यानंतर इथे झालेल्या औद्योगिक‌ विकासाने आणि वाइन इंडस्ट्रीच्या उदयाने नाशिकची वेगळी ओळख निर्माण झाली. इंटरनेट व सोशल मीडियाच्या विस्तारामुळे ही ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचण्यास वेळ लागला नाही. त्यामुळेच परदेशी पर्यटकांच्यादृष्टीने वाइन कॅपिटलमध्ये होत असलेल्या या आध्यात्मिक पर्वणीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. वाइन टुरिझमपेक्षाही कुंभमेळा काय असतो हे जाणून घेण्याची उत्सुकता विदेशी नागरिकांमध्ये अधिक असल्याची माहिती वाइन एस्कॉर्ट मनोज जगताप यांनी दिली. परदेशी पर्यटकांसाठी अध्यात्म आणि विकासाचा एक अनोखा संगम अनुभवण्याची ही एक पर्वणीच असणार आहे.

नाशिकला कुंभमेळ्यादरम्यान भेट देण्यासाठी इच्छुक असणाऱ्या ४४ परदेशी पर्यटकांचे दोन महिन्यांमध्ये बुकिंग झाले आहे. कुंभमेळ्यासोबतच नाशिकच्या वाइन टुरिझमच्यादृष्टीनेही ही भेट महत्त्वाची ठरणार आहे. - मनोज जगताप, वाइन टूर एस्कॉर्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उकाडा कायम

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मे महिन्यात पाऱ्याच्या उच्चांकानंतर शहरात आता दोन दिवसांपासून ऊन सावलीचा खेळ सुरू झाला आहे. तापमान घटण्याची आशा नागरिकांना असली तरी उकाड्याचे प्रमाण कायम आहे. सोमवारी हवामान खात्याने कमाल तापमान २४ अंश आणि किमान ३८ अंश नोंदविले.

सोमवारी अवकाश निरभ्र होते. पुढील आणखी दोन दिवस अवकाश निरभ्रच राहील. ६ जून रोजी अवकाशत ढग दाटून येण्यास सुरुवात होईल. तर ७ जून रोजी हलक्या सरींसह यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्या पावसची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आता जून महिन्यास सुरुवात झाल्याने पावसाच्या पहिल्या सरींचे वेध नागरिकांना लागले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा ७ जून रोजी पावसाने पहिली हजेरी लावणे अपेक्षित आहे. यंदाच्या उन्हाळ्यात एप्रिल महिन्यापासून तापमानाचा पारा चढता राहिला. यात दिवसेंदिवस भर पडून मे महिन्याच्या मध्यावर ४५ अंशांपर्यंत शहराच्या तापमानाने मजल गाठली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images