Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पुरस्कारांवर नाशिकची छाप

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या यावर्षीच्या पुरस्कारात नाशिककर रंगकर्मींनी बाजी मारली आहे. प्रायोगिक गटात नाटकासह लेखन, दिग्दर्शन, अभिनयासह तब्बल सात विविध पुरस्कार नाशिककरांच्या वाट्याला आले आहेत. या पुरस्कारांची घोषणा नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी केली.

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर व ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रभरातून एकूण ३८ रंगकर्मींचा नाट्यपरिषदेच्या पुरस्कारार्थींमध्ये समावेश आहे. त्यात नाशिकचे सहा रंगकर्मी असून, राज्य नाट्य स्पर्धेत बाजी मारलेले 'न ही वैरेन वैरीणी' या नाटकाला सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या नाटकाचे दिग्दर्शक मुकुंद कुलकर्णी व अभिनेते हेमंत देशपांडे यांनाही दिग्दर्शन व अभिनयासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. गेली काही वर्षे सातत्याने प्रायोगिक नाट्यलेखनात महाराष्ट्रभर आपली वेगळी छाप सोडणारे नाशिकचे नाट्यलेखक दत्ता पाटील यांना सर्वोत्कृष्ट प्रायोगिक लेखनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अनेक एकांकिकांसह बगळ्या बगळ्या कवडी दे, रिमझीम रिमझीम, कृष्णविवर ही त्यांची अलीकडची नाटकं रंगभूमीवर विशेष नावाजली गेली आहेत. याशिवाय लोककलेलाही गौरवताना हा पुरस्कारही नाशिकच्या पदरात टाकत लोककलावंत पुरस्कारासाठी शाहीर दत्ता शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.रंगभूषेची समृद्ध परंपरा चालवणाऱ्या नाशिकला या क्षेत्रासाठीही पुरस्कार मिळाला आहे. रंगभूषाकार रवींद्र जाधव यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पडद्याच्या मागे राबणाऱ्या कष्टाळू रंगकर्मींनाही नाट्यपरिषद गौरवत असते. या वर्षीचा गुणवंत रंगमंच कामगाराचा पुरस्कार नाशिकच्या महाकवी कालिदासमध्ये गेली अनेक वर्षे राबणारे रंगकर्मी वसंत दौंड यांना जाहीर झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्योजक नरमला, दंड भरला !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुलाच्या विवाह निमित्ताने आयोजित रिसेप्शन पार्टीसाठी राजरोसपणे विजेची चोरी करणाऱ्या शहरातील बड्या उद्योजकावर वीज कंपनीने अखेर कारवाईचा बडगा उचलला. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी `मटा`च्या वृत्ताची दखल घेत गुरुवारी सकाळी या उद्योजकाच्या घरावर धडक मारली. सुरुवातीला वीजचोरी केली नसल्याचा कांगावा करणाऱ्या उद्योजकाने नंतर मात्र निमूटपणे १६ हजार रुपयांचा दंड भरला. रंगीबेरंगी दगडगोट्यांचा व्यवसाय करणाऱ्या या उद्योजकाने डीपी तसेच स्ट्रीट पोलमधून

रिसेप्शनसाठी वीज चोरली होती. याबाबत मटाने वृत्त प्रकाशित केले. या उद्योजकाने 'मी असे केलेच नाही' असे सांगून अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांनी आपल्याकडे पुरावा असल्याचे सांगत वीजचोरीचे फोटोच त्याला दाखवले. दंड भरला नाहीतर गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा वीज कंपनीने घेतल्यानंतर मात्र त्याची बोबडी वळली. वापरलेल्या विजेचे पैसे व दंडाची रक्कम असे एकूण १६ हजार रुपये त्याने निमूटपणे काढून दिले.

रिसेप्शन पार्टी ज्या ठिकाणी होती, तेथे जवळच असलेल्या उद्योजकाच्या बंगल्यासमोरील डीपी उघडून त्यात वायर खुपसून वीजचोरी करण्यात आली होती. महोदयांच्या घराशेजारील विजेच्या खांबावरूनही वायर ओढण्यात आल्या. तीन-चार ठिकाणांहून अनधिकृतपणे वीज घेण्यात आल्याचे अनेक सजग नागरिकांनी `मटा`ला कळविले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तापमानात घट; मशागतीला वेग

$
0
0

बळीराजाच्या नजरा आकाशाकडे; खरिपाच्या तयारीने घेतला वेग

टीम मटा

नाशिक शहरासह जिल्ह्याचा सरासरी तापमानात घट झाली आहे. जिल्ह्यातील बळीराजाला मान्सूनचे वेध लागले असून, त्याने शेतीच्या मशागतीवर जोर दिला आहे. जिल्ह्याचा पारा सरासरी दोन ते तीन अंशाने कमी झाल्याने नागरिकांनाही उकाड्यापासून दिलासा मि‍ळाला आहे.

मान्सूनपूर्व पावसाच्या ढगांनी आकाशात गर्दी करायला सुरवात केल्याने यंदा सरासरीपेक्षा कमी खरीप हंगामात चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा बळीराजा बाळगून आहे. सायंकाळी आकाशात जमा होणारे ढग पाहून शेतकरीराजा काहीसा सुखावला आहे. मालेगाव शहर आणि तालुक्यात यावर्षी उन्हाळ्यात मे महिन्यात सूर्याने चांगलाच ताप घेतल्याने उच्चांकी तापमान ४४ अंश से. इतके नोंदवले गेले होते. मे महिन्याच्या अखेच्या आठवड्यात तर या उष्ण वातावरणाने सामान्य रुग्णालयात रुग्णाच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. मात्र आता मान्सूनच्या आगमनाचे अंदाज येत असून साधारणतः १५ जून च्या आसपास पावसाचे आगमन होईल असा अंदाज व्यक्त होत आहे . त्यामुळे वातावरणात देखील मान्सूनपूर्व पावसाचे संकेत मिळत आहे.

खरिपाची तयारी

जिल्ह्यातील शेतकरी वर्षभर दुष्काळ, गारपीट व अवकळीमुळे यंदा होरपळला गेला होता. मात्र, आता यंदाच्या खरीप हंगामात तरी चांगला पाऊस होईल या आशेवर खरिपाच्या तयारीला लागला आहे. पावसाळा तोंडावर आल्याने शेतकऱ्याला उसंत नाही. नांगरणी, वखरणी जमीन सपाटीकरणाची कामे शेतकरी करीत आहे. सकाळच्या प्रहरात अधिक काम होते. तर दुपारी विश्रांतीनंतर उशिराने बैल अवजरांना जुंपले जात आहेत. काही जणांना शेतजमिनींचे लेव्हलिंगही हाती घेतले आहे. पावसाची चाहूल लागल्याने या कामांचा वेग वाढविला जात आहे.

ज्यांच्याकडे बैल जोडी अवजारांची वानवा आहे, तेथे ट्रॅक्टर व इतर यांत्रिक अवजारांनी जमिनीची मशागत केली जात आहे. गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांच्या नियोजनाला फटका देणाऱ्या पर्जन्याला सामोर जाताना शेतकरी यावर्षी अधिक सावध झाला आहे. त्यामुळे पारंपरिक कापूस लागवडीच्या क्षेत्रात वाढ होण्याचे संकेत असून, मका लागवड घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात मान्सूनपूर्व सरी

$
0
0

नाशिक : जून महिन्याला प्रारंभ झाल्याने मान्सूनचे वेध लागले असतानाच जिल्ह्याच्या काही भागात मान्सून पूर्व सरींनी हजेरी लावली. मालेगाव, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. दुपारी कडक उन्हाचा तडाखा असतानाच सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास काळ्या ढगांनी आकाशात गर्दी केली. शहरासह जिल्ह्याच्या काही भागात ढगाळ वातावरण होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन शॉपिंग करा जपून

$
0
0

अजित कुर्लेकर, नाशिक

ऑनलाइन शॉपिंगमधला हा अनुभव मला खूप काही शिकवून गेला. या घटनेने मला जो धडा दिला त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. नुकताच हा किस्सा माझ्यासोबत घडला. ४ मार्च २०१५ ला आपल्या आजीचा वाढदिवसाला माझ्या मुलीने पुण्याहून आजीसाठी काही वस्तू मागवल्या. यामध्ये वाढदिवसाचा केक, फुलांचा बुके आणि चिनी मातीचा मग अशा काही वस्तू खरेदी केल्या.

तशी ही ऑनलाइन गिफ्ट कंपनी खूप नामांकित आहे असं नाही. मात्र या कलकत्तास्थित कंपनीतून आम्ही खरेदी केली होती. आम्ही दिलेल्या ऑर्डरपैकी त्यांनी फुलांचा बुके आणि केक या दोनच गोष्टी घरापर्यंत पोहोचवल्या आणि चिनी मातीचा मग ट्रान्सपोर्टमध्ये फुटल्याचे सांगितले.

यावर तक्रार केली असता त्यांनी आम्ही हा मग पुन्हा बदलून पाठवू असे कळवले. मात्र आता या घटनेला जवळपास तीन महिने होत आहेत. पण अजूनही रिफंड किंवा ती वस्तू हातात मिळाली नाही. याविषयी आम्ही असंख्य वेळा रिमाईंडर पाठवले. पण तरीही त्यावर काहीच अक्शन घेतली गेली नाही. त्यामुळे आम्ही या कंपनीबाबत माहिती काढण्याचा प्रयत्न केला. जास्त माहिती काढल्यावर लक्षात आले की अशीच फसवणूक असंख्य ग्राहकांची झालेली आहे. याविषयी अधिक माहिती कन्झुमर कोर्टाच्या ऑनलाइन चौकशीत मिळाली.

या कंपनीच्या वेबसाईटवर कॉर्पोरेट ऑफिसचा पत्ता नाही. जसे की इतर ऑनलाइन कंपन्या म्हणजे अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील वगैरेचे आहेत. आम्ही ज्या कंपनीतून खरेदी केली ती फ्रॉड असल्याचे नंतर आम्हाला समजले. आमचे झालेले नुकसान भरून निघण्याची शक्यता आता कमी आहे. मात्र त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पण ऑनलाइन खरेदी करताना ऑथराइज्ड कंपन्या तसेच त्या कंपनीविषयी पूर्ण माहिती मिळवूनच खरेदी करा अशी माहिती मी इतरांना देऊ इच्छितो. ऑनलाइन शॉपिंगने सर्वांनाच वेड लावले आहे ही वेगळी गोष्ट मात्र त्यातील विश्वासार्हता जपण्यासाठी ग्राहकांनीच जागरुक असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कुठलाही व्यवहार करताना चाचपणी करूनच तो करावा असेही सांगू इच्छितो. मला आलेला अनुभव कुणालाही येऊ नये हीच अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाडेकरू पोलिसांच्या रडारवर

$
0
0

माहिती दडवल्यास घरमालकाविरोधात गुन्हा
म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची माहिती पोलिस स्टेशनला कळवावी; अन्यथा थेट घरमालकाविरोधात गुन्हे दाखल करणार येईल, असा इशारा शहर पोलिसांनी दिला आहे. सिंहस्थ काळात दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा असे केले जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

शहरात २०१० मध्ये राहिलेला संशयित दहशतवादी शेख लालबाब फरीद उर्फ बिलाल हा सातपूर भागात भाडेकरू म्हणून राहिला होता. त्याने त्यावेळी महाराष्ट्र पोलिस अकादमी, पोलिस आयुक्तालय, देवळाली कॅम्प व इतर महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केली होती. अबू जुंदाल व लष्कर-ए-तय्यबाच्या मदतीने शहरात घातपात करण्याचा बिलालचा इरादा होता. त्यानंतर शहरात राहणाऱ्या भाडेकरूंबाबत प्रश्न उपस्थित होऊन त्यांची माहिती पोलिसांना कळवण्याचे आदेश तत्कालीन पोलिस आयुक्तांनी दिले होते. क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी गंगापूर भागात भाडेकरू म्हणून राहणाऱ्या संशयित गुन्हेगारांना अटक केली. हे संशयित स्वस्तात डॉलर देण्याचे अमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करत होते. याबरोबर, टकलेनगरमध्ये जून २०१३ मध्ये सामूहिक बलात्काराची घटना घडली. त्या घरमालकाने भाडेकरूची माहिती पोलिसांना दिली नव्हती. परिणामी पोलिसांनी लागलीच संबंधित घरमालकाविरोधात कारवाई केली. जून २०१२ ते जून २०१३ या वर्षभराच्या कालावधीत शहर पोलिसांनी भाडेकरूंची माहिती लपवून ठेवली म्हणून १६९ घरमालकांवर कलम १८८ नुसार कारवाई करण्यात आली होती. मध्यंतरीच्या काळात कारवाईचे प्रमाण काही कमी झाले होते. मात्र, सिंहस्थांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पुन्हा एकदा भाडेकरूंकडे आपला मोर्चा वळवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अरुणा नदी पुनर्जीवित करावी

$
0
0

ग्यानदास महाराज यांची अपेक्षा

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

रामकुंडावरील गोमुखात प्रकट होणारी मात्र आता लुप्त झालेली अरुणा नदी पुनर्जीवित व्हावी तसेच नदीतील सर्व बंद पडलेले कुंड पुन्हा खोदून काढावे, अशी अपेक्षा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महंत ग्यानदास महाराज यांनी व्यक्त केली. याप्रश्नी शासन दरबारी लढा देण्यासाठी ग्यानदास महाराज यांना साथ द्यावी, अशी मागणी भाविकांनी केली आहे.

कुंभमेळा आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांनी भाविकांशी चर्चा केली आहे. गोदावरी व अरुणा या दोन्ही नद्यांचा संगम पूर्ववत करण्याची गरज आहे यासाठी अरुणा नदी पुनर्जीवित करण्याची गरज आहे. गोदावरी नदीकाठावरील १६ प्राचीन कुंडही जीवित करायला हवीत. हिंदू संस्कृतीचे जतन करणे स्थानिक प्रशासन व नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यासाठी नागरिकांनी साथ देणे गरजेचे आहे, असे मत ग्यानदास यांनी व्यक्त केले. अरुणा नदी पुनर्जीवित करण्यासाठी महंत ग्यानदास महाराज हे शासन दरबारीकडे पाठपुरावा करणार आहेत. नाशिककरांसह भाविकांनी या कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी आणि उद्योजक धनंजय बेळे यांनी केले आहे. यावेळी राजू व्यास, योगेश रामय्या उपस्थित होते.

प्रशासनाचे सहकार्य हवे

कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी शहरातील नागरिकांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन ग्यानदास महाराज यांनी केले. त्यांनी साधुग्रमची पाहणी करीत कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

साधू-महंताचे मनोमिलन

साधूग्राम तसेच गोदावरी काठची पाहणी करतांना ग्यानदास महाराज यांनी दिगंबर आखाड्याचे महंत रामकिशोर शास्त्री व रामस्नेहीदास यांना सोबत घेतले. यामुळे अनेक दिवसानंतर सर्व साधू महंत एकत्र असल्याचे दिसून आले. साधू महंतामध्ये मनोमिलन झाल्याचे चर्चा उपस्थितांमध्ये रंगली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रविवारी ‘आई रिटायर होतेय’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्सच्या वर्धापनदिनानिमित्त वाचकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. याअंतर्गतच रविवारी (दि. ७) दुपारी दीड वाजता महाकवी कालिदास कलामंदिर येथे 'आई रिटायर होतेय' या नाटक सादर होणार आहे. 'मटा'च्या वाचकांसाठी ही खास ऑफर असून त्यासाठी मोफत पासेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

'आई रिटायर होतेय' हे नाटक मनोरंजन प्रकाशित असून एक अजरामर अभिजात नाट्यकृती आहे. कलाकार पुणे यांच्या माध्यमातून होत असलेल्या या नाटकाचे लेखन अशोक पाटोळे यांनी केले आहे. दिग्दर्शन रवी सांभारे यांचे आहे. यात उपेंद्र दाते, मंगेश दिवाणजी, रेणुका भिडे, मनोज डाळिंबकर, सुशील भोसले, रूपाली पाथरे, रुचा आणि वीणा फडके यांच्या भूमिका आहेत.

कल्चर कल्बच्या सदस्यांसाठी राखीव आसनव्यवस्था असून अद्यापही काही पासेस शिल्लक आहेत. अनेक वाचकांनी पास नेले असून ज्यांना पास हवे असतील त्यांनी मटा कार्यालयातून आज सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत पास घेऊन जावेत. ही सुविधा पास संपेपर्यंतच आहे. पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोट धरून हसविणारे ‘लगीनघाई’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा. हा टप्पा प्रत्येकाच्या आयुष्यात विशिष्ट वयातच येतो. असा हा महत्त्वपूर्ण टप्पा एकाच घरातल्या बाप व मुलाच्या आयुष्यात एकाच वेळी आला तर काय होईल? याचं उत्तर म्हणजे 'लगीनघाई'. सुयोग निर्मित, निर्माते गोपाल अलगेरी यांचं 'लगीनघाई' हे नवं कोरं विनोदी नाटक महाराष्ट्र टाइम्सच्या कल्चर क्लब सदस्यांसाठी नुकतेच दाखविण्यात आले. महाकवी कालिदास कलामंदिरात 'नाट्यसेवा'तर्फे या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.

'लगीनघाई' नाटकातील बाप एक विधूर. बायकोनंतर आपल्या मुलाला आईची आणि बापाची माया देऊन त्याचे संगोपन करतो. पण आता त्याच्या आयुष्यात दुसरी स्त्री आली आहे. दोघांनाही लग्न करायचं आहे, पण अडचण आहे ती मोठा झालेल्या मुलाला ही गोष्ट सांगायची कशी? मुलाचीही एक वेगळीच अडचण आहे. तो पण प्रेमात पडलाय, पण त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलीच्या. दोघंही बाप-बेट्यांना आपली प्रेमप्रकरणं एकमेकांना सांगायची आहेत. पण भिडस्त स्वभावाने थेट कोणीच बोलू शकत नाही.

या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांचे होते. अभिजीत पेंढारकर यांनी संगीत, शशांक तेरे, प्रकाश शीतल तळपदे यांनी नेपथ्य, प्रणोती जोशी यांची वेशभूषा तर यात मालतीची भूमिका आदिती देशपांडे, अनिकेतची भूमिका ओंकार राऊत, पूनमची भूमिका नियती घाटे तर राजीवची भूमिका अशोक सराफ यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आज शहरात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष खा. अशोक चव्हाण शनिवारी (दि. ६) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत कालिदास कलामंदिरात जिल्हा स्वातंत्र्य सैनिकाचा मेळावा होणार आहे. यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेही उपस्थित राहणार आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहे.

चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे त्यांचे जल्लोषात स्वागत केले जाणार आहे. सकाळी १०.३० वाजता त्यांचे ओझर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्याकडील कौटुंबिक कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी सव्वा वाजता ते स्वातंत्र्य सैनिकांच्या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘क्लिनटेक’द्वारे गोदा स्वच्छता

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर 'गोदावरी स्वच्छता' अभियानांतर्गत यंत्राद्वारे नदीतील झुडूपे आणि कचरा काढण्याच्या कामाचा महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते आणि विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सुरुवात करण्यात आली.

ऍक्वाटेक वीड हार्वेस्टर्स ट्रॅश स्कीमा नामक जलशुद्धीकरण यंत्रामार्फत पुढील चार महिने नदीपात्रात हे काम सुरू राहणार आहे. सीएसआर उपक्रमातून तीन कंपन्यांच्या मदतीने आणि आर्ट ऑफ लिव्हींगच्या सहकार्याने हे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस गोदामाई मोकळा श्वास घेण्याची शक्यता आहे.

आर्ट ऑफ लिव्हिंग, जिंदाल स्टील वर्क्स, डायनामिक प्रिस्ट्रेसिंग कंपनी यांच्या संयुक्त सहकार्याने ऍक्वाटेक वीड हार्वेस्टर्स ट्रॅश स्कीमा या जलशुद्धीकरण यंत्र नाशिक महापालिकेला नदीच्या स्वच्छतेसाठी उपलब्ध झाले आहे. आनंदवल्ली शिवारातील गोदापात्रात महापौरांनी पूजन करून यंत्राचा शुभारंभ केला. यावेळी उपमहापौर गुरुमितसिंग बग्गा, महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम आदी उपस्थित होते. गेल्या ५ वर्षांपासून क्लीन टेक इन्फ्रा या यंत्राचा भोपाल, अलाहाबाद आदी ठिकाणच्या सरोवरांमध्ये जलशुद्धीकरणासाठी वापर केला जात आहे. नदीपात्रात ५ फूट खोलवरील झुडुपे, घाण-कचरा काढण्याचे काम या यंत्राद्वारे केले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनोद्यानाचा मार्ग मोकळा

$
0
0

मंगळवारी महासभा, भुयारी गटार योजनेच्या निधीचाही प्रस्ताव

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेची प्रलंबित महासभा येत्या मंगळवारी (दि. ९) होत असून या महासभेत सिडकोच्या सहाव्या गृहनिर्माण योजनेचे हस्तातंरणासह पांडवलेण्याजवळील वनोद्यान विकसित करण्याचा सामंजस्य कराराचा विषय चर्चेला येणार आहे. या सभेत हा विषय मार्गी लागण्याची शक्यता आहे.

महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी महासभा होणार आहे. यात पांडवलेण्याजवळील २५ हेक्टर जागा महापालिकेच्या बॉटनिकल गार्डनसाठी वनविकास महामंडळाकडून महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यासंदर्भातील प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. वनविकास महामंडळाकडून ही जागा महापालिकेकडे हस्तांतरीत करण्याचा कराराला संमती दिली जाणार आहे. त्यामुळे हे गार्डन विकसित करण्याचा टाटा फाऊंडेशनचा मार्गही मोकळा होणार आहे. या गार्डनच्या माध्यमातून पर्यटनाचे एक मोठे केंद्र तयार होणार आहे.

महासभेत सिडकोच्या सहाव्या योजनेचा प्रस्तावही चर्चेला येणार आहे. सिडकोने सुमारे ८ वर्षांपूर्वी सहाव्या गृहनिर्माण योजनेत साडेचारशे सदनिका बांधल्या. या सदनिका सिडकोच्याच ताब्यात असल्यामुळे महापालिकेला सुविधा देताना अडचण निर्माण होते. त्यात यापूर्वी पाच गृहनिर्माण योजना महापालिकेकडे हस्तांतरित झालेल्या आहेत; पण ही योजना हस्तांतरीत करतांना सुरुवातीपासूनच अडचणी निर्माण झाल्या. येथील रहिवाशांना मूलभूत सुविधा देण्यासाठी महापालिकेला खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे अडीच वर्षांपासून योजना हस्तांतर करताना सिडको प्रशासनाने काही रक्कम महापालिकेला द्यावी, अशी मागणी होती. सुरवातीला ही मागणी मोठी होती; पण नंतर नऊ कोटी रुपये प्रशासनाने महापालिकेला द्यावेत, असे ठरले. मात्र, त्यावरही प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेवटी या योजनेच्या बदल्यात प्रशासनाने येथील चार भूखंड महापालिकेला द्यावेत, असे ठरले; मात्र पुढे सिडको व महापालिका प्रशासनाचे बिनसले. अनेकदा हस्तांतराचा अंतिम निर्णय लांबल्यामुळे या महासभेच्या चर्चेदरम्यान काय होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रस्तांवासोबतच महिला रुग्णालयासाठी जागा देण्याचा आणि सिंहस्थाच्या विकास कामांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तर भुयारी गटार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ६० कोटीच्या अतिरिक्त निधीचाही प्रस्ताव चर्चेसाठी येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा हजार वृक्षांचे रोपण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एकाच दिवशी, एकाच ठिकाणी दहा हजार लोकांच्या सहभागाने दहा हजार वृक्ष लावून वन तयार करण्याचा संकल्प शुक्रवारी नाशिककरांनी पूर्ण केला. वृक्षप्रेमी शेखर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमधील अबालवृध्दांनी या उपक्रमात सहभागी होऊन संपूर्ण नाशिक हिरवे करण्याचा संकल्प केला.

पर्यावरणदिनाच्या निमित्ताने शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून 'वन महोत्सवाला फाशीचा डोंगर येथे सुरुवात झाली. या उपक्रमासाठी महामंडळाकडून व खासगी व्यावसायिकांकडून वाहन व्यवस्था करण्यात आल्याने शहराच्या सर्व भागातून लोक येथे उपस्थित होते. या संकल्पाची पूर्तता करण्यासाठी वन विभागाच्या सहकार्याने सातपूर येथील फाशीचा डोंगर या ठिकाणी वनकक्ष क्र. २२२ ही जागा निवडण्यात आली होती. शहरातील बांधकाम व्यावसायिक, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती, वास्तुविशारद, उद्योजक सर्व क्षेत्रातील कामगार वर्ग, पत्रकार, सामजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी, ज्येष्ठ नागरिक, रिक्षाचालक, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, युवा संघटना यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुणाईने पुढाकार घेतला. शिवाय प्रसिद्धी समितीने फेसबुक, टि्वटर, व्हॉट्सअप या सारख्या सोशल मीडियाचा देखील वापर करून नागरिकांना उपक्रमाची माहिती दिली होती. त्या त्या विषयात पारंगत असलेल्या युवकांच्या समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यात अर्थ, जनसंपर्क, समन्वय, आपत्कालीन, साईट, प्रसिद्धी आदींचा समावेश होता. जनसंपर्क समितीने शाळा-महाविद्यालयांना सुटी असल्याने क्लासेस, वाचनालय, उद्याने, जॉगिंग ट्रक, अशा सार्वजनिक ठिकाणी भेटी देवून या उपक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवली होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी सामाजिक संस्थांच्या वतीने दहा हजार खड्डे खोदण्यात आले होते.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामांमध्ये अडथळा ठरणाऱ्या झाडांची एकीकडे कत्तल होत असताना दुसरीकडे मात्र विक्रमी वृक्षारोपणाचा अनोखा उपक्रम संपूर्ण राज्याला एक वेगळा विचार देणारा ठरणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे होते. सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या या उपक्रमाची सांगता सायंकाळी ५ वाजता झाली.

तरुणांचा प्रतिसाद

सर्व वयोगटातील नाशिककर यात सहभागी झाले होते. तरूण मंडळी या उपक्रमात सहभागी झालेली पहायला मिळाली. ही वाखाणण्याजोगी बाब म्हणायला हवी. तसेच, सेंट झेवियर्स व रेयान इंटरनॅशनल स्कूलसारख्या नाशिकमधील शाळांनी मुलांना येथे घेऊन येत मुलांकडून वृक्षारोपण करून घेतले.

वृक्षप्रेमी सेल्फीमय

वृक्षारोपणासाठी आलेल्या सर्वच स्तरातील लोकांमध्ये सेल्फीची क्रेझ दिसून आली. झाड लावल्यानंतर अनेकांनी मित्रांसोबतच नुकत्याच लावलेल्या झाडांबरोबरही सेल्फी काढले. या दरम्यान लोकांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत होता.

पोलिसही इको फ्रेंडली

एवढ्या मोठ्या उपक्रमादरम्यान कोणताही अनूचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी पोलिस सहज नजरेस पडत होते. यातील अनेकांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासोबतच झाड लावून पर्यावरणाप्रती ही आपली ड्युटी निभावली.

६५ जातीची झाडे

पळस, मोह, वड, पिंपळ, आंबा, पुत्रंजिव, बेहडा, सीताफळ, काटेसावर, चेरी, भोकर यासारख्या ६५ हून अधिक प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. यात मुख्यत्वे आयुर्वेदीक, वनौषधी झाडांचा प्रामुख्याने समावेश होता.

नगरसेवक उपस्थित

इतर वेळी महापालिकेच्या सभागृहातील हजेरीवरून टिकेला सामोरे जाणाऱ्या नगरसेवकांचे एक अनोखे रूप यादरम्यान पहायला मिळाले. महापालिकेतील बहुतांशी सर्वच नगरसेवकांनी या उपक्रमात सहभागी होत वृक्षारोपण केले. तसेच महपौरांनीसुध्दा या उपक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली होती.

मी कुटुंबासमवेत वृक्षारोपणासाठी येथे आले आहे. यापूर्वी ही अनेकवेळा मी पर्यावरणपूरक कामे केली आहेत. मात्र एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर मी पहिल्यांदाच काम करीत आहे आणि याचा एक वेगळाच आनंद आहे. - डॉ.नीलम परदेशी

आपलं पर्यावरण या संस्थेच्या वतीने आम्हाला खूप चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आली. खूप प्रसन्न वाटतयं. यापुढे ही अशाच प्रकारे मी झाडं लावणार आहे. आज खऱ्या अर्थाने जागतिक पर्यावरण दिन साजरा केल्यासारखे वाटत आहे. - जान्हवी कविश्वर

मी पहिल्यांदाच झाड लावलं. अनुभव खूपच अविस्मरणीय होता. दर आठवड्याला मी झाडाची निगा राखायला फाशीच्या डोंगरावर जायचे ठरवले आहे. दरवर्षी किमान १० झाडं लावायचा संकल्प मी केला आहे. - प्रसाद पाठक

यांचे लाभले सहकार्य

वृक्षारोपणाचा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. पण, हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी क्रेडाई, बिल्डर असोसिएशन, रमेश अय्यर, जयकुमार रिअल इस्टेट, रेडियो मिरची, इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग अॅन्ड रेफ्रीजेरेटिंग अॅन्ड एअर कंडीशनिंग इंजिनिअर्स, विष्णू पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच धनंजय शेंडबाळे यांनी ८ हजार झाडे उपलब्ध करून देत महत्वाची भूमिका बजावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरण प्रेमी, विविध मंडळे आणि शासकीय कार्यालयातील नागरिक आणि भाविकांनी शुक्रवारी सकाळपासून रामकुंडापासून अमरधामच्या पुलापर्यंत गोदावरी नदीपात्राची साफसफाई केली.

महापालिका व आरोग्य विभागाने झाडूसह सर्व साहित्य आणि मास्क भाविकांना पुरविले होते. नदीपात्रात उतरून काहींनी स्वच्छता केली तर काही भाविकांनी व काही नागरिकांनी आपल्या संस्थेचा आदेश व कर्तव्य म्हणून काम केले. नाशिक एज्युकेशन सोसायटी, उन्नती एज्युकेशन सोसायटी, आदर्श संस्था, व्ही. एन. नाईक आदी शिक्षणसंस्था, वेणुनाद, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक पंचायत समिती, सिन्नर व दिंडोरीसह अनेक पंचायत समित्यांमधील विविध विभागातील गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.

गोदामातेची कायम साफसफाई करण्याची प्रतिज्ञा नाएसोचे राजेंद्र निकम यांनी दिली. हेमंत धात्रक, तानाजी जायभावे, प्रभाकर धात्रक, साहेबराव कुटे, प्रकाश गामणे, रमेश अहिरे, राजेंद्र निकम, गटविकास अधिकारी रवींद्र परदेशी, बांधकाम विभागाचे आर. एस. सोमवंशी उपस्थित होते.

पर्यावरण रक्षणाचा संदेश

जुने नाशिक : हातात झाडू घेऊन शिक्षक व स्वयंसेवी संस्थांनी पर्यावरणाचा संदेश देत जुने नाशिक परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविली.जुने नाशिक परिसर चकाचक दिसत होता.

जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी जुने नाशिक परिसरातील साठफुटी रोडवरील दुभाजकात प्लास्टिक पिशव्यांचा व इतर साचलेला कचरामा करून स्वच्छता केली. इतर स्वयंसेवी, सामाजिक संस्थांनी आपापल्या परिसराची स्वच्छता केली. पर्यावरणाची शपथ घेत महापालिका, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, महसूल विभाग, समाज कल्याण विभाग, डे केअर शाळा, कल्याणी महिला मंडळ, गुरू गोविंद काॅलेज आदींनी दादासाहेब गायकवाड सभागृह ते पखालरोड, नाशिक-पुणे रोडवरील नंदीनी (नार्सडी) आंबेडकरवाडी पर्यंतचा परिसर व नदीपात्राची स्वच्छता केली.

प्रभाग २९ मधील अमरधाम रोड व टाळकुटेश्वर परिसरातील कचरा जेसीबीच्या सहाय्याने काढून स्वच्छ करण्यात आले. यावेळी नगरसेविका रंजना पवार, ज्ञानेश्वर पवार आदींसह सामाजिक कार्यकर्ते स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्मळ गोदेसाठी सरसावले हात

$
0
0

शहरभरात स्वच्छता मोहीम; हजारो ना‌शिककरांच्या प्रतिसादातून हटला ३७५ टन कचरा

टीम मटा

प्रदूषणामुळे नद्यांचा श्वास कोंडू लागला आहे. गोदावरीसह येथील उपनद्यांना प्रदूषणाच्या विषारी विळख्यातून बाहेर काढण्यासाठी स्वच्छतेची हाक देण्यात आली अन् बघता बघता गोदावरीचे पात्र स्वच्छ होत गेले. १९ हजारांहून अधिक नाशिककर या सत्कार्यात सक्रिय सहभागी झाले.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्रशासनाने सरकारी कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना अशा सर्वांनाच स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. गोदावरी, नासर्डी आणि वाघाडी नदीच्या १० किलोमीटर परिसरात शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विविध संस्थांचे प्रतिनिधींनी नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छता कार्य केले. एकूण २० जेसीबी, ८ डंपर, एक रोबोट, एक पोकलँड आणि सहा ट्रॅक्टरांची या अभियानासाठी मदत घेण्यात आली. गोदावरी पात्रामध्ये पाच जेसीबी, तीन डंपर आणि दहा घंटागाड्या ठेवण्यात आल्या होत्या. याठिकाणी सात हजार ६९८ स्वंयंसेवकांनी सहभाग घेऊन दुपारपर्यंत ३० गाड्या भरून कचरा एकत्रित केला. वाघाडी नदी परिसरात दोन हजार ६३४ स्वयंसेवकांनी १७ घंटागाड्या भरून कचरा हटविला. पाच जेसीबींची देखील स्वच्छतेसाठी मदत घेण्यात आली. नासर्डी परिसरात चार हजार ४९५ स्वयंसेवकांनी एक रोबोट, १० जेसीबी आणि पाच डंपरच्या सहाय्याने स्वच्छता मोहीम राबविली. ५० घंटागाड्या भरून कचरा एकत्रित करण्यात आला. इतर ठिकाणी साधारण साडेचार हजार स्वच्छतादूतांनी अभियानात सहभाग घेतला. १९ घंटागाड्या भरतील एवढा कचरा याठिकाणी एकत्रित करण्यात आला. मेळा अधिकारी रघुनाथ गावडे, उपजिल्हाधिकारी महेश पाटील, उदय किसवे, महापालिका उपायुक्त रोहिदास जोरकुळकर आदींनी अभियानाचे नियोजन केले. त्र्यंबकेश्वर परिसरातही सरकारी अधिकारी, आणि कर्मचारी, संदीप फाऊंडेशन, ब्रह्मा व्हॅली आदी संस्थांच्या कर्मचारी-विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

लोकप्रतिनिधी-प्रशासन

प्रशासनातर्फे दरवर्षी पर्यावरण दिन साजरा केला जातो. मात्र, यापासून नागरिकांना दूर ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होतो. यंदाचा पर्यावरण दिन त्यास अपवाद ठरला.

प्रशासनाने हरित कुंभ संकल्पनेतंर्गत स्वच्छता मोहीम हाती घेतली. यासाठी ७० पेक्षा जास्त ठिकाणे निवडण्यात आली. प्रत्येक ठिकाणासाठी लोकप्रतिनिधी किंवा जेष्ठ सरकारी अधिकाऱ्याकडे जबाबदारी देण्यात आली. मोहिमेला सकाळी ७ वाजता प्रारंभ झाला. गोदावरी, नासर्डी आणि वाघाडी नदीच्या १० किलोमीटर परिसरात अधिकारी, कर्मचारी आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छता केली. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी नासर्डी नदी परिसरात मोहिमेस सुरुवात केली. त्यांनी सपत्नीक स्वच्छता कार्यात सहभाग घेतला. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह आणि आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम हेदेखील सपत्नीक अभियानात सहभागी झाले. कुशवाह यांनी सोमेश्वर परिसरात स्वच्छतेच्या कामाला प्रारंभ केला. गेडाम यांनी दोंदे पूल परिसरात, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी वाघाडी नदी परिसर तसेच टाळकुटेश्वर मंदिर परिसर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी गाडगेमहाराज पुलाजवळील परिसरात स्वच्छतेचे कार्य केले.

खासदार हेमंत गोडसे यांनी कन्नमवार पुलाजवळील भागात सहभाग नोंदवला. आमदार सीमा हिरे यांनी सोमेश्वर परिसरात श्रमदान केले. महापौर अशोक मुर्तडक यांनी आयटीआय पूल तर उपमहापौर गुरुमीतसिंग बग्गा यांनी दोंदे पूल परिसरात सहभाग घेतला. भैय्यूजी महाराज आणि श्री ग्यानदास महाराज यांनी देखील गोदा स्वच्छतेसाठी काम केले. चिन्मय उद्गीरकर आणि धनश्री क्षीरसागर या कलाकारांनी सहभाग घेतल्याने सर्वांचा उत्साह वाढला. राजेश पंडित, निशिकांत पगारे आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद, महानगरपालिका, शासनाचे विविध विभाग आणि सेवाभावी संस्था अशा एकूण ११२ पथकांनी घेतलेला सहभाग हे वैशिष्ट्य ठरले.

ना‌शिककरांचा संकल्प

बघता बघता नाशिककर स्वच्छतेचा संकल्प करून रस्त्यावर उतरले. थोडेथिडके नाही तर ३८ हजार हात या मोहिमेसाठी सरसावले. १९ हजार २१२ आबालवृद्धांनी तब्बल ३७५ टन कचरा उचलला. सकाळी सातला सुरू झालेली ही मोहीम रात्रीपर्यंत सुरूच होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘लोकल मायग्रेशन’ला रेड सिग्नल!

$
0
0

विद्यार्थी संख्येत स्थिरता आणण्यासाठी शिक्षण विभागाचा निर्णय

अश्विनी कावळे, नाशिक

कॉलेजमधील वातावरण, शिकविण्याच्या पद्धती विद्यार्थ्यांना रुचल्या नाही तर एक शैक्षणिक वर्ष संपले की पुढच्या वर्षासाठी विद्यार्थी दुसऱ्या कॉलेजला प्रवेश घेण्यास म्हणजेच 'लोकल मायग्रेशन' करण्यास पसंती देत होते. मात्र, यामुळे कॉलेजेसला अडचणी निर्माण होत असल्याचे लक्षात आल्याने 'लोकल मायग्रेशन'वर महाराष्ट्र शिक्षण विभागाने बंदी घातली आहे.

अकरावी ते बारावी व ग्रॅज्युएशनचे पहिले ते शेवटचे वर्ष असे दोन विभाग यात केले गेलेले आहेत. दहावीत कमी मार्क्स मिळालेले विद्यार्थी अकरावीसाठी मिळेल त्या कॉलेजमध्ये अडमिशन घेण्यास पसंती देतात. अकरावीत चांगले मार्क्स मिळाले की पुढे बारावीसाठी दुसऱ्या कॉलेजकडे धाव घ्यायची याबाबत त्यांचे नियोजन सुरू झालेले असते. हेच ग्रॅज्युएशनला अॅडमिशन घेताना दिसून येते. बारावीला कमी मार्क्स मिळाल्यास मिळेल त्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घेऊन पुढच्या वर्षापासून हव्या त्या कॉलेजला अॅडमिशन घ्यायचे, हे ठरलेले असायचे. यामध्ये विद्यार्थ्यांची सोय होत असली तरी कॉलेज प्रशासनाला विद्यार्थी संख्या कमी होण्यामुळे घाम फुटत होता. नाशिक शहराचा विचार करता दरवर्षी ३० ते ३५ टक्के विद्यार्थी लोकल मायग्रेशन करीत होते. या प्रकारामुळे शहरातील सर्वच कॉलेजची विद्यार्थीसंख्या डळमळीत होत होती. याचा धक्का लहान कॉलेजेसला अधिक प्रमाणात बसत होता. यावर निर्बंध घालणे गरजेचे असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता संबंधित ज्ञानशाखांचा अभ्यासक्रम पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्याच कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागणार आहे.

विद्यार्थ्यांनी दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी टीसी (ट्रान्सफर सर्टिफिकेट) मागितले असता त्यांना या नियमाची जाणीव कॉलेज प्रशासन करून देत आहेत. तरी विद्यार्थ्यांनी वारंवार टीसीची मागणी केल्यास त्यावर 'लोकल मायग्रेशन इज नॉट अलाऊड' असे लिहून टीसी दिला जात आहे. केवळ एखादा विषय व अभ्यासक्रम कॉलेजमध्ये नसेल तरच त्यांना टीसी देऊन दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची मुभा यापुढे दिली जाणार आहे. या निर्णयामुळे येत्या काळात कॉलेज प्रशासनापुढे विद्यार्थी व पालकांच्या नाराजीला सामोरे जावे लागणार आहे.

लोकल मायग्रेशनचे प्रमाण मोठे असल्याने विद्यार्थीसंख्या निश्चित करण्यास कॉलेजेसला अडचणी येत होत्या. या अडचणी दूर होऊन विद्यार्थीसंख्येत स्थैर्य येणार असल्याचे कॉलेज प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. विद्यार्थी नापास होणे, लोकल मायग्रेशन यामुळे दरवर्षी कॉलेजच्या संख्येत चढ-उतार होत होता. या निर्णयामुळे विद्यार्थीसंख्येमध्ये स्थैर्य येण्यास मदत होईल.

पारंपरिक विद्याशाखांमध्ये ही समस्या मोठी असल्याचे अनेक वर्षांपासून दिसून येत होते. त्यावर ठोस निर्णय घेणे आवश्यकच होते. लोकल मायग्रेशनला बंदी आणल्यामुळे प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थी संख्येबाबत स्थिरता येईल, असा विश्वास वाटतो. - प्रा. डॉ. सुचिता कोचरगावकर, प्राचार्य, भोसला मिलिटरी कॉलेज

विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आपल्या स्वातंत्र्यावर गदा येत असून या निर्णयात बदल घडवावा व हव्या त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची मुभा द्यावी, अशी मागणी ते करत आहेत.

लॉ कॉलेजेस दूर

शहरात लॉ कॉलेजेस कमी असल्याने लोकल मायग्रेशनचा विचार विद्यार्थी करत नाहीत. कोणत्या कॉलेजमध्ये लॉचे शिक्षण घ्यायचे याचा परिपूर्ण विचार करुनच ते प्रवेश घेतात. त्यामुळे या अडचणीला लॉ कॉलेजेसला तरी सामोरे जावे लागत नाही, असे एनबीटी लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे विमानसेवेचे बुकिंग २ दिवसांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक ते पुणे या विमानसेवेला येत्या १५ जूनपासून प्रारंभ होणार असून त्याचे बुकिंग येत्या दोन दिवसात सुरू होणार आहे. या विमानसेवेसाठी ५९९९ रुपये भाडे राहणार आहे. १ जुलैपासून मात्र हजार रुपये अधिकचे मोजावे लागणार आहेत.

नाशिककरांना प्रदीर्घ प्रतीक्षा असलेली विमानसेवा ओझर विमानतळावरून सुरू होत आहे. मेरीटाईम हेलि हेअर सर्व्हिसेस लि. (मेहेर) या कंपनीने नाशिक ते पुणे ही सेवा सुरू करण्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भात नाशिकमधील विविध संस्था-संघटनांची बैठक त्यांनी तिडके कॉलनीतील हॉटेलमध्ये घेतली. याप्रसंगी मेहेरचे सहसंस्थापक सिद्धार्थ वर्मा, संचालक एस. के. मन, तानचे अध्यक्ष दत्ता भालेराव, महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, उद्योजक दिग्विजय कपाडिया व तानचे पदाधिकारी उपस्थित होते. नाशिक ते पुणे ही विमान सेवा सोमवार ते शुक्रवार यादरम्यान राहणार आहे. तानच्या सदस्यांकडे तसेच http://www.mehair.in/ या वेबसाईटवर ऑनलाईन बुकिंग करता येईल, असे वर्मा यांनी सांगितले. तर, प्रतिसाद वाढल्यास भाडे नक्कीच कमी होईल, असे भालेराव म्हणाले. दुसऱ्या टप्प्यात नाशिक ते मुंबई ही सेवा सुरू केली जाणार आहे. नाशिकचा विकास व्हावा, विमानसेवा त्वरित सुरू व्हावी असा गळा काढणाऱ्या नाशिकच्या विविध संस्था संघटनांच्या अध्यक्षांसह पदाधिकारी बैठकीला गैरहजर राहिले.

ओझरहून

सकाळी ९.४५, ११.५० दुपारी ४.३०, सायं ६.५०

पुण्याहून सकाळी १०.३५, ११.०० सायं. ५.२०, ६.००

नाशिक दर्शन २९९९ रुपये

शनिवार आणि रविवार हवाई नाशिक दर्शन (जॉय राईड) राहणार आहे. दहा मिनिटांच्या या उड्डाणासाठी २,९९९ रुपये आकारले जाणार आहे. मात्र, हे भाडे अधिक असल्याचे मंडलेचा यांनी सांगताच याबाबत विचार करण्याचे आश्वासन वर्मा यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराचा पारा अखेर उतरला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्याने शहर व जिल्ह्याच्या सरासरी तापमानात घट झाली आहे. पावसाचे वेध लागल्याने बळीराजाने खरिपाच्या तयारीवर जोर दिला असून, जमीन मशागतीच्या कामांनी वेग पकडला आहे. सुरुवातीला पाऊस चांगला झाला तर पेरण्यांची कामेही जोरात सुरू होण्याची शक्यता आहे.

शहर व जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने असह्य उकाड्यातून नागरिकांची सुटका झाली. मात्र, गुरूवारीही जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने पारा दोन ते तीन अंशाने उतरला आहे. गुरूवारी त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि देवळा तालुक्यात पाऊस बरसला. त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्वाधिक १० मिलीमीटर, तर इगतपुरीत तालुक्यात सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली. देवळा तालुक्यातही तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदेसाठी नाशिककर बनले भगीरथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दक्षिण गंगा असलेल्या गोदावरीच्या प्रदूषण मुक्तीसाठी तब्बल १९ हजारांहून अधिक नाशिककरांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपल्या हाती झाडू, फावडे घेत स्वच्छता केली. यानिमित्ताने गोदावरीसाठी नाशिककरांनी भगीरथी प्रयत्नांचा आरंभ केला असून, हरित नाशिकसाठी नाशिककरांनी शुक्रवारी तब्बाल दहा हजार रोपांची लागवडही केली आहे. यानिमित्ताने नाशिककरांनी प्रत्यक्ष कृतीद्वारे पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला आहे.

वाढत्या पर्यावरणीय समस्यांप्रती केवळ गळा काढण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्याचा संकल्प नाशिककरांनी केला. त्यानुसार शुक्रवारी, जागतिक पर्यावरणदिनानिमित्त सकाळी सहा वाजेपासूनच नाशिककर घराच्या बाहेर पडत होते. नाशिक महापालिका, जिल्हा प्रशासन, विविध सरकारी विभाग आणि स्वयंसेवी संस्था-संघटनांच्या माध्यमातून गोदावरी, नासर्डी, वाघाडी या नद्यांच्या स्वच्छतेसाठी

स्वतःला वाहून घेतले. आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापौरांपासून युवक आणि महिला या मोहिमेत मनापासून सहभागी झाले. यानिमित्ताने प्रदूषणाने काळवंडलेल्या नद्यांना मोकळा श्वास घेता येणार आहे. या मोहिमेत ९ हजार २१२ आबालवृद्धांनी गोळा केलेला तब्बल ३७५ टन कचरा महापालिकेच्या घंटागाड्यांमधून नेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरणासाठी 'सुला'ची मोहीम

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

व्यवसायाबरोबरच सामाज‌िक भान जपणाऱ्या सुला वाईन्सने पर्यावरण संवर्धनासाठीही पुढाकार घेतला आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गेल्यावर्षी लावलेली ९० टक्के झाडे जगविण्यात त्यांना यश आले आहे. तर यंदाही सुलाच्या कर्मचाऱ्यांनी विविध उपक्रमांतून पर्यावरण रक्षणासाठी जनजागृतीसाठी प्रयत्न केले जात आहेत.

पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सुला वाईन्सतर्फे सावरगाव येथे मुलांसाठी चित्रकला फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात होते. त्याच प्रमाणे हरितकुंभ उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या गोदापात्र, रामकुंड स्वच्छता मोह‌िमेत सुलाचे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सहाभाग घेऊन या उपक्रमालाही मोठ्या प्रमाणात हातभार लावला. सकाळी साडेसातवाजेपासून सुलाचे कर्मचारी यात सहभागी झाले असल्याची माहिती सुला विनियार्डचे उपाध्यक्ष डॉ. नीरज अग्रवाल यांनी दिली. गंगापूर व दिंडोरी येथे पाच कोटी लिटर क्षमतेची शेततळी, सोलर पॅनल, स्कायलाईट व आदिवासी मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून कंपनीतर्फे इको स्कूल सुरू करण्यात आले आहे.

कंपनीतर्फे सातत्याने सामाजिक कामे केली जातात. मुलांच्या शिक्षणासाठी, वृक्षसंवर्धनासाठी सातत्याने विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कंपनीतर्फे परिसरात सातत्याने स्वच्छता मोह‌िमेचे आयोजन केले जात आहे. - डॉ. नीरज अग्रवाल, उपाध्यक्ष, सुला वाइन्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images