Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

८१ हजारांचे सोने लांबविले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पेठरोड येथील एसबीआय बँकेत गेलेल्या महिलेच्या पर्समधून ८१ हजार रुपये किमतीचे दागिने चोरट्याने लांबविले. ५ जून रोजी हा प्रकार घडला असून, पंचवटी पोलिसांनी १३ जून रोजी गुन्हा दाखल केला आहे. चोरट्याने ११७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लांबविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

तरुणाची फसवणूक

तुमचे एटीएम बंद झाले आहे, ते सुरू करून देतो त्यासाठी मला सहा आकडी युनिक कोड सांगा असे सांगत तरुणाचा विश्वास संपादीत करीत त्यास ९० हजारांचा गंडा घालण्यात आला. उपनगर पोलिसांनी याप्रकरणी फसवणूक तसेच आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला

आहे. संबंधित अज्ञात आरोपीने फिर्यादीस फोन केला. मी आयसीआयसीआय बँकेतून बोलतोय असे सांगून त्यांचा विश्वास

संपादन केला. तुमच्या मोबाइलवर मी एक संदेश पाठवितो. त्यातील सहा अंकी युनिक कोड सांगा असे त्यांना सांगितले. फिर्यादीच्या बॅँक

खात्यातून ९१ हजारांची रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतली.

तरुणीचा मृत्यू

राहत्या घरात १०० टक्के भाजलेल्या तरुणीचा मृत्यू झाला. देवळाली परिसरात १२ जून रोजी ही घटना घडली. हिना रज्जाक पठाण असे तिचे नाव आहे. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

पुण्याचे दोन युवक ठार

नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावर पळसेनजीक अपघातात पुण्याचे दोन युवक ठार झाले. अक्षय पवार (वय २६) आणि रोहन चारुदत्त ओतारी (वय २४, रा. नंदू घाटेंच्या आफिससमोर, कसबा पेठ, पुणे) हे दोघे नाशिकच्या पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत असलेल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी शनिवारी (ता.१३) रात्री मोटरसायकलवर (एमएच १४ सीटी ७०८४) येत होते. पळसेनजीक बंगाली बाबा दर्ग्याजवळ स्वागत बिअर शॉपसमोर त्यांच्या मोटरसायकलची नाशिकरोडहून सिन्नरकडे जाणाऱ्या ट्रकशी (एमएच १५ एजी ५६९) धडक झाली. त्यात अक्षय जागीच ठार झाला. रोहनचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून ट्रकचालकास ताब्यात घेतले. नंतर चौकशी करून सोडून दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्र्यंबकेश्वरला जागा मिळेना; साधू-महंतही वैतागले!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

जिल्हा प्रशासनाकडून साधू-संतांना मिळणाऱ्या वागणुकीने कुंभमेळा सोडून जावे, असे वाटत असल्याचे मत महामंडलेश्वर श्री स्वामी विश्वात्मानंद सरस्वतीजी महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे पत्रकार परिषद घेवून व्यक्त केले.

श्री स्वामी विश्वात्‍मानंद सरस्वती चॅरिटेबल ट्रस्ट यांनी गत सिंहस्थात येथे अन्नदान भंडारा आयोजित केला होता. त्यावेळी दररोज सरासरी दहा हजार भाविक त्याचा लाभ घेत होते. या सिंहस्थात वाहनतळ नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर असून, तेथून काही किलोमीटर अंतरावर भाविक चालत येतील. त्यांना अन्नदान करण्यासाठी किमान पाच एकर जागेची आवश्यकता आहे. तसेच या जागेत वीज, पाणी, रस्ता आणि ड्रेनेजलाइन असणे गरजेचे ठरणार आहे. शासनाकडे काही महिन्यांपासून वारंवार पाठपुरावा केला. मात्र त्यांनी त्यास दाद दिली नाही. आता पावसाळा सुरू झाला असताना शासन एक इंच देखील जागा मिळणार नाही, असे म्हणत आहे. तेव्हा जायचे कोणाकडे अशी कैफियत त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

उज्जैन सिंहस्थास अद्याप बराच अवधी आहे. तथापि, तेथील तयारी पाहता येथे काहीच काम झालेले नाही. महाराष्ट्र शासनाचा हा असा कारभार पाहता सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करायचा नाही असा उद्देश दिसून येतो. मेळाधिकारी साधू महात्म्यांचे म्हणणे गांभीर्याने घेत नाहीत ही अत्यंत चिंतेची बाब आहे, असे ते म्हणाले.

महामंडलेश्वर विश्वात्मानंद महाराज हे महानिवार्णी आखाड्याशी संबंधित आहेत. शासनाने याच आखाड्याची जागा साधुग्रामकरिता घेतली आहे. जागेबाबत शासनाने वेळीच दखल घेतली नाही तर आम्हास येथून परत फिरावे लागेल, असे स्वामी विश्वात्मानंद यांनी सांगितले. शासनाने साधू- महंतांकरिता सिंहस्थाचे नियाजन केले आहे. विविध सेवा उपलब्ध करीत असल्याचा दावा केला आहे. तथापि, अशा प्रकारे सिंहस्थ पर्वकालात अन्नदान करण्यासाठी पुढे सरसावलेल्या संस्था आणि साधू-महंतांना शासन सुविधा देणार नसेल तर कोट्यवधींचा खर्च कोणासाठी आणि कशासाठी असा सवाल येथील साधूंनी उपस्थित केला आहे. यामुळे साधू- महंत ‌प्रशासनाच्या नियोजनाला वैतागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थासाठी मोठा फौजफाटा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळा पर्वणीकाळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. राज्यभरातून २० हजार पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफा १५ ऑगस्टपर्यंत शहरात दाखल होणार आहे. ही माहिती राज्याचे गृहसचिव के. पी. बक्षी यांनी दिली.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या तयारीचा आढावा बक्षी यांनी घेतला. शहरातील गोदाघाट, रामकुंड, साधुग्राम, नदीवर बांधण्यात आलेले विविध घाट, तसेच त्र्यंबकेश्‍वर येथील कुशावर्त व साधुग्रामची त्यांनी पाहणी केली. प्रत्येक पर्वणीला शहरात ८० लाख ते एक कोटी भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. या भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य राहणार असल्याचे बक्षी यांनी स्पष्ट केले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यभरातील २० हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी १५ ऑगस्टपर्यंत शहरात दाखल होणार आहेत. त्यांच्या निवासाची तसेच भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे. त्यांना पुरविण्यात येणाऱ्या मुलभूत सुविधांचा बक्षी यांनी आढावा घेतला. या कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पोलिस आयुक्त, विशेष पोलिस महानिरीक्षकांनी काही सूचना तसेच प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविले असून, ते ही विचारात घेतले जाणार आहेत. सद्यस्थितीत प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये चांगला समन्वय दिसत असून, सिंहस्थ कामांबाबतही बक्षी यांनी समाधान व्यक्त केले.

एमपीएत निवास व्यवस्था

सिंहस्थासाठी येणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये बॅरेक्सची उभारणी केली जात आहे. महाराष्ट्र पोलिस अकादमीत सध्या दोन तलाव असून, त्या माध्यमातून पाणीपुरवठा होतो. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचारी तेथे वास्तव्यास येणार असल्याने त्यांच्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करा, अशी सूचना महापालिका आयुक्तांना करण्यात आली आहे.

सीसीटीव्हींची जोडणी

भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिने शहरासह त्र्यंबकेश्‍वरमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सीसीटीव्हींच्या कंट्रोलिंग युनिट पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात असणार आहे. हे सीसीटीव्ही कशाप्रकारे काम करतात याची पाहणी बक्षी यांनी केली. सीसीटीव्हींद्वारे होणाऱ्या चित्रणात सुस्पष्टता असल्याबाबत बक्षी यांनी समाधान व्यक्त केले. सीसीटीव्हीद्वारे दिसणाऱ्या दृश्यांच्या आधारेच पर्वणीकाळात कर्ण यंत्रणेमार्फत आवश्यक सूचना केल्या जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामोत्सव कमिटीची भाविकांसाठी वेबसाईट

$
0
0

नाशिक : कुंभमेळ्याकरिता येणाऱ्या भाविकांना मार्गदर्शन व्हावे, यासाठी सिंहस्थ ग्रामोत्सव कमिटीने वेबसाईट तयार केली आहे. www.kumbhinnasik.com या वेबसाईटचे लोकार्पण खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले. पंचवटीतील शिवछत्रपती भवनमध्ये हा कार्यक्रम झाला. या वेबसाईटमध्ये नाशिकविषयी तसेच येथील कुंभमेळा, साधु-महंत व समितीच्या कार्याविषयी माहिती दिली आहे. सरकारी कार्यांलयांचे संपर्क क्रमांकही त्यावर दर्शविण्यात आले आहेत. त्यामध्ये जिल्हाधिकारी प्रशासन, महापालिका, पोलिस, रेल्वे, हॉस्पिटल्स यांच्या संपर्क क्रमांकांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. वेबसाईटला भेट देणारे नागरिक त्यावर सूचना अथवा संदेश देखील देऊ शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुश्शऽऽ वाचलो!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोड रेल्वेस्थानकात नियमबाह्य पद्धतीने टाकलेल्या पाण्याच्या पाइपमुळे तिघांचे प्राण धोक्यात आले होते. नशिबानेच त्यांचे प्राण वाचले. मात्र, यातील लहानगा गंभीर जखमी झाला आहे. आजही त्याच पद्धतीने पाइप लावल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. रेल्वे प्रशासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मुलाच्या पालकांनी केली आहे.

रेल्वेस्थानकात चौथ्या प्लॅटफार्मचे काम सुरू आहे. त्यासाठी तिसऱ्या प्लॅटफार्मवरील नळाला पाइप लावून रुळाखालून तो चौथ्या प्लॅटफार्मवर नेण्यात आला होता. शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास मुंबईला जाण्यासाठी गोरेवाडीतील एकनाथ कदम हे पत्नी उषा, भाऊ सोमनाथ आणि दोन लहान मुलांसह फलाट क्रमांक तीनवर उभे होते. भुसावळहून आझमगड एक्स्प्रेस येत असताना इंजिनाच्या जाळीला पाइप अडकला. प्लॅटफार्मवर वृद्दाची काठी देण्यासाठी कदम यांचा सहा वर्षाचा मुलगा पुढे झाला. त्याचवेळी पाइप त्याच्या पायाला गुंडाळला जाऊन तो रूळ आणि प्लॅटफार्मच्या एक फुटाच्या जागेत पडला. त्याचे काका सोमनाथ यांनी धाव घेऊन त्याला प्लॅटफार्मच्या कडेला दाबून धरले. दोघांच्या काही इंचावरून गाडी धडधडत गेली. गाडीची पायरी लागून आदित्यच्या डोक्याला क्रॅक गेला. जबडाही तुटला. रेल्वेसुरक्षा दलाचे जवान कैलास बोडखेही मदतीला धावले. आदित्याला तातडीने जयराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कदम आणि बोडखे यांनाही दुखापत झाली आहे. गाडी गेल्यानंतर तिघेही अक्षरशः थरथर कापत होते.

ठेकेदार व प्रशासन दोषी

आदित्यचे वडील एकनाथ कदम म्हणाले की, लोहमार्ग पोलिसांनी रुग्णालयाला दिलेल्या रिपोर्टमध्ये स्थानकातील पाइपला गुंडाळल्या गेल्यामुळे आदित्य जखमी झाल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. ठेकेदाराने आजही त्याच पद्धतीने पाइप लावलेला होता. उपचाराचा खर्च लाखात जाणार आहे. रेल्वे प्रशासनाने नुकसानभरपाई द्यावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशभरात ६० ठिकाणी सिंहस्थाचे माहितीफलक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थाचे ब्रॅण्डिंग हा यंदाच्या नियोजनात कळीचा मुद्दा ठरला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सिंहस्थाच्या जाहिरातीसाठी पुढाकार घेतला आहे. देशात ६० ठिकाणी सिंहस्थाची माहिती देणारे फलक झळकावले जाणार आहेत.

तब्बल बारा वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याचे नाशिककरांनाच नव्हे तर देशभरातील नागरिकांना कुतूहल असले तरी हा कुंभमेळा नेमका केव्हा येणार, त्याचे नियोजन काय याची माहिती अनेक लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. पर्वणी काळात ८० लाख ते एक कोटी भाविक येण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने तयारी सुरू ठेवली असली तरी सिंहस्थाचे हवे तसे ब्रॅण्डिंग होत नसल्याची तक्रार साधू, महंतांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली होती. नाशिकपेक्षा उज्जैनला पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याचीच अधिक चर्चा होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सिंहस्थाच्या ब्रॅण्डिंगसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याची मोठी जबाबदारी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळावर सोप‌विण्यात आली आहे. जेवढे अधिक भाविक या सोहळ्यासाठी येतील तेवढी पर्यटनवाढीला अधिक चालना मिळणार आहे. म्हणूनच महामंडळानेही देशभरातील भाविकांना आकर्षित करण्यासाठी फलके प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

फलकावर सचित्र माहिती

उत्तर भारतातील रेल्वेस्थानके, बसस्थानके, विमानतळ यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी हे फलक प्रदर्शित करण्यात येणार आहे. ही साठ ठिकाणे जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केली असून, ती यादी महामंडळाकडे सोपवली आहे. या फलकांवर सिंहस्थ कुंभमेळ्याची सचित्र माहिती असणार आहे. अधिकाधिक भाविकांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणीच्या तारखा माहीत व्हाव्यात, त्यांनी हा सोहळा अनुभवावा यासाठी प्रशासनाने सोशल मीडियानंतर आता या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीएसएनएल टॉवर्सला आडकाठी

$
0
0

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी दाखल होणाऱ्या लाखो भविकांना एकमेकांच्या संपर्कासाठी तसेच जिल्हा प्रशासनाला नियोजनाच्या दृष्टिकोनातून दूरध्वनी संवादमाध्यम सर्वांत महत्त्वाचे ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर सुमारे ८० लाख भाविकांना डोळ्यासमोर ठेऊन बीएसएनएलतर्फे सेवा विस्ताराची कामे सुरू आहेत. सध्या १५ लाख लोकसंख्या गृहित धरून बीएसएनएलतर्फे ११८ टॉवर्सची कामे सुरू आहेत. सिंहस्थ काळात येणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता, त्यात आणखी १०१ नवीन टॉवर्स उभारण्याची आवश्यकता होती. त्यानुसार बीएसएनएलने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला. मात्र, यातील फक्त ८१ टॉवर्स उभारणीच्या कामास हिरवा कंदिला मिळाला. आतापर्यंत मंजुरी मिळालेल्या ८१ टॉवर्सपैकी ६० टॉवर्सचे काम सुरू असून, यातील १८ टॉवर्स प्रत्यक्षात कार्यन्वित करण्यात आले आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये टॉवर्ससाठी जागा मिळताना काही ठिकाणी अडचण निर्माण झाली. मात्र, तिथे पर्याय उपलब्ध झाला. त्यामुळे नियोजनात बदल करून टॉवर्स उभारण्यात आले. त्र्यंबकेश्वरमध्ये एकूण सहा टॉवर्स उभे करण्यात येणार आहे. नाशिक शहरात जागेचे चढे भाव असल्याने जागेची उपलब्धता कळीचा मुद्दा ठरत आहेत. त्यातच सरकारी यंत्रणांच्या ताब्यातील जागांचा देखील उपयोग बीएसएनएलला करून दिला नसल्याचा आरोप काही अधिकाऱ्यांनी केला.

जिल्हाधिकारी कार्यालयासह महापालिकेला टॉवर्ससाठी जागा देण्याची विनंती करण्यात आली होती. इमारतींच्या टेरेसवर १० फुटांचा टॉवर उभा राहिला असता तर अडचण झाली नसती. शिवाय, यापोटी महापालिकेसहीत जिल्हाधिकारी कार्यालयाला मासिक उत्पन्न सुरू झाले असते. मात्र, या दोन्ही कार्यालयांनी सहकार्य करण्यास नकार दिला. जिल्हा प्रशासनाच्या २ हजार ३७८ कोटी ७८ लाख रूपयांच्या आराखड्यात बीएसएनएलच्या कामांसाठी एका रुपयांची तरतूद केलेली नाही. एका टॉवरसाठी ४० ते ४५ लाख रुपये खर्च येत असून, योग्य क्षमतेचे टॉवर उभे राहिले नाही तर पर्वणी दरम्यान नेटवर्क जॅम होऊ शकते.

बीएसएनएलची अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. कुंभमेळ्याच्या निमित्ताने बीएसएनएलचा विस्तार होणार असून, जागेसहीत इतर समस्यांवर तोडगा काढण्यात आला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्या दरम्यान खासगी मोबाइल ऑपरेटरपेक्षा बीएसएनएलची सेवा मजबूत असेल.

सुरेश बाबू प्रजापती, महाप्रबंधक, बीएसएनएल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

धरणांचा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख असली तरी या धरणांमधील पाण्याची पातळी खालावल्याने जिल्हावास‌यिांपुढे पाण्याचे संकट उभे राहण्याची शक्यता बळावली आहे. जिल्ह्यातील बहुतांश धरणे तहानली असून, त्यामध्ये सध्या केवळ ११ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, धरणांना पावसाची आस लागली आहे. तर नाशिक शहर आणि परिसराला पाणी पूरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये ३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत ४३ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. तुलनेत यंदा चार टक्के पाणीसाठी कमी झाला आहे.

‍‌जिल्ह्यात मोठे आणि मध्यम आकाराचे मिळून तब्बल २३ धरणे आहेत. गोदावरीसह कादवा, उनंदा, पराशरी, दारणा, भावली, वालदेवी, आळंदी, म्हाळुंगी, मोसम या नद्यांवर ही धरणे आहेत. त्यापैकी गंगापूर, करंजवण, दारणा, कडवा, चणकापूर, गिरणा आणि मुकणे ही मोठी धरणे आहेत. १६ मध्यम आकाराच्या धरणांद्वारे त्या त्या भागातील शेतीला पाण्याचा लाभ होतो. राज्यात सर्वाधिक धरणे असलेला जिल्हा म्हणून नाशिकचा गौरव होत असला तरी त्यामधील उपयुक्त पाणीसाठा खालावल्याने जिल्हा वासियांच्या ‌चिंतेत भर पडली आहे. ६६ हजार ३५४ दशलक्ष घनफुट एवढी या सर्व धरणांची पाणी साठविण्याची क्षमता आहे. मोठ्या धरणांमध्ये ४८ हजार ४७२ दशलक्ष घनफूट तर मध्यम आकाराच्या धरणांत १७ हजार ८८२ दशलक्ष घनफूट पाणी साठविता येते. आजमितीस या सर्व धरणांमध्ये मिळून केवळ सात हजार १३५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे.

करंजवण धरणात १०, दारणा धरणात १७, चणकापूर धरणात १८ आणि गिरणा धरणात सर्वात कमी म्हणजे आठ टक्केच उपयुक्त पाणीसाठा आहे. पावसाची भुरभुर झाली असली तरी मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे. लांबणीवर पडणारा पाऊस धरण क्षेत्रांतील शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर टाकत आहे. धरणे भरली तरच पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटू शकणार आहे.

महत्त्वाची धरणे आणि पाणीसाठा

धरणाचे नाव

गंगापूर ................. ३९

काश्यपी ............... २५

पालखेड ................. ४

ओझरखेड ............... ४

वालदेवी ................. ४

हरणबारी ................ ९

पुनद .................... ३०

आळंदी ................... ९

भावली ................... ५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिककरांना पावसाची प्रतीक्षाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबईतील उपनगरांसह कोकणात मुसळधार पावसाने हजेरी लावली असली तरी नाशिककरांवर अजूनही पाऊस रूसल्याचेच प्रत्ययास येत आहे. शहरात पंचवटी आणि जिल्ह्यात त्र्यंकबकेश्वर वगळता रविवारही कोरडाच गेल्याने नाशिककरांची निराशा झाली आहे. शहरातील काही भागात पावसाने हजेरी लावली असली तरी ती एखाद्या तासासाठी असल्याने नाशिककरांची निराशाच झाली आहे. रविवारी सकाळी मेरी, म्हसरूळ, आडगाव, आडगाव नाका, औरंगाबाद नाका, नांदुरनाका आणि तपोवनातील काही भागात पावसाचा फक्त शिडकावाच झाला. गेल्या चार दिवसांपासून शहरावर ढग जमा झाल्याने पाऊस बरसणार असे वातावरण दररोज तयार होत असले तरी पाऊस हुलकावणी देत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-ओझर मार्गावर अपघात

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

नाशिक-ओझर महामार्गावर झालेल्या बस आणि कारच्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती एका खासगी वृत्तवाहिनीवरून देण्यात आली आहे. हा अपघात आज पहाटे तीनच्या सुमारास झाल्याचे समजते.

अपघातात कसा झाला याची अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र दोन्ही गाड्यांच्या भरधाव वेगात असवा असे सांगण्यात येत आहे. या अपघातातील मृतांमध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. हे तिघेही मालेगावचे रहिवासी असल्याची माहिती मिळते. तसेच या अपघातात १५ जण जखमी झाल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमुरडे वाजतगाजत वर्गात

$
0
0

स्वागतोत्सवाने रंगला शाळेचा पहिला दिवस

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दीर्घ सुटीनंतर सोमवारी शाळांचे प्रांगण मुलांच्या गर्दीने फुलले होते. अनेक चिमुकल्यांना शाळेचे प्रांगण नवे होते तर अनेकांनी मोठ्या सुटीनंतर मैदानांवर खेळणे पसंत केले. आनंदाने खेळण्याचा, गप्पांचा अन् प्रार्थनेचा सूर शाळेत उमटला तर सुटीच्या कोषातून बाहेर न आलेल्या मुलांना रडू कोसळले होते. चिमुकले पालकांना सोडायलाच तयार नसल्याने पालकांनीनही शाळेचा पहिल्या दिवसाचा अनुभव घेतला. शाळांनीही मुलांच्या स्वागतासाठी जय्यत तयार केली होती. फुलांनी व रांगोळ्यांनी शाळा सजली होती तर मुलांसाठी विशेष उपक्रमांसह खाऊची व्यवस्थाही करण्यात आली होती.

शाळेचा पहिला दिवस संस्थांसाठी इव्हेंट सारखा साजरा केला जात आहे. विद्यार्थ्यांना शाळांकडे आकृष्ट करण्यासाठी या दिवसाचे महत्त्व वाढीला लागले आहे. शालाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीनेही विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये वस्त्यांमध्ये जाऊन पालकांचे प्रबोधन, विद्यार्थ्यांशी संवाद आदी उपक्रम राबविण्यात येत आहे.

दरम्यान, सोमवारी यंदाच्या नव्या शैक्षणिक वर्षाचा पहिल्या दिवशी पालक अन् विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून आला. सकाळच्या सुमाराला शहरात पावसाच्या पडणाऱ्या हलक्याशा सरी अन् नवा गणवेश पावसापासून जपत शाळा गाठणारे विद्यार्थी, स्कूल बसेस अन् रिक्षांमधून रस्त्यावरच्या काकांना बाय बाय करीत शाळा गाठणारे चिमुरडे आज दोन महिन्यांनंतर नाशिककरांना पुन्हा भेटले.

पाच लाख विद्यार्थी शाळेत

शहरामध्ये सर्व व्यवस्थापनाच्या सुमारे ४७५ शाळा आहेत. यातून सुमारे २ लाख ११ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर जिल्ह्यात १५ तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या ३३४८ शाळा आहेत. या शाळांमधून सुमारे पावणेतीन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शहर व जिल्हा मिळून सर्व व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ५ लाखांच्या घरात असून, त्यांनी आज शाळेत हजेरी लावली.

३१ लाख पुस्तकांचे वितरण

सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सुमारे सव्वादोन लाख विद्यार्थ्यांना ३१ लाख पुस्तकांचे वाटप होणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी उपलब्ध पुस्तक संख्येनुसार काही ठिकाणी या उपक्रमाला सुरूवात झाली. उर्वरीत शाळांमध्ये पुढील टप्प्यात उपलब्ध होणाऱ्या पुस्तकांचे वितरणही लाभार्थी विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे. सुमारे १२ लाख विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिकांचेही वाटप करण्यात येणार आहे.

विविध उपक्रमांची रेलचेल

चित्रकला, कार्यानुभव, नृत्य, रांगोळी, मैदानी खेळ यासारख्या विविध उपक्रमातून मुलांचा उत्साह वाढवण्यात आला. मुलींच्या हातावर मेहंदीही काढण्यात आली. बालगीतांवर मुलांनी ठेका धरला तर पेढे व खाऊ देऊन मुलांचे स्वागत करण्यात आले. अनोख्या उपक्रमांची कल्पना महाराष्ट्र टाइम्सच्या हॅपी स्ट्रीटवरून सुचल्याचे शिक्षकांनी सांगितले.

चिमुकल्यांची आनंदी शाळा

शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या आठवणीत शाळेचा पहिला दिवस हा आनंद देणारा ठरावा. यासाठी अनेक शाळा विविध स्तरांवर प्रयत्न करत आहेत. मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळ संचालित शिशु विहारच्या मराठी व इंग्रजी माध्यम शाळेने मुलांचे स्वागत शाळेत गुढी उभारून करण्यात आले. यावेळी लेझीम व ढोलपथकांनी मुलांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.

पावणेतील लाख विद्यार्थ्यांना गणवेश

सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यात सुमारे २ लाख ७० हजार विद्यार्थ्यांना गणवेशांचे वाटप होणार आहे. यामध्ये १ लाख ९ हजार मुली, मागास वर्गातील सुमारे ६२ हजार विद्यार्थी, दारिद्र्य रेषेखालील सुमारे १८ हजार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होईल. राज्य सरकारच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत सुमारे ४० हजार विद्यार्थीनी, मागास वर्गातील सुमारे ३२ हजार विद्यार्थी व दारिद्र्य रेषेखालील ७ हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. सर्वशिक्षा अभियानांतर्गत गणवेश लाभार्थ्यांची संख्या १ लाख ९० हजारांच्या घरात आहे. तर, उर्वरीत सुमारे ८० हजार विदयार्थी हे राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेचा लाभ घेणार आहेत.

उत्साह अन् शाळा प्रवेशोत्सव

शाळा सुरू होण्याच्या काही दिवस अगोदरच विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची तयारी सुरू केली असल्याची माहिती पेठे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गीता कुलकर्णी यांनी दिली. शाळेच्या प्रांगणात सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित जमवून स्वागतगीताचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आली. त्याचबरोबर माध्यान्ह भोजनात शिरा या गोड पदार्थांचा समावेश करुन विद्यार्थ्यांचे तोंड गोड करण्यात आले. पेठे विद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबर आलेल्या पालकांचेही गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्याचबरोबर शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांनी विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षाबाबत मार्गदर्शन केले.

कुठे चेहरा खुलला.. कुठे हिरमुसला!

नव्या शैक्षणिक वर्षात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आपले मित्र दोन महिन्यांनी भेटल्याचा आनंद दिसत होता. उन्हाळ्याच्या सुटीत काय धमाल केली याची कुठे चर्चा होती तर आता कोणत्या विषयाला कोणत्या बाई-सर असतील, याचेही तर्क लावले जात होते. तर ज्या मुलांचा शाळेतच पहिला दिवस होता, अशा छोट्या गटातील मुलांचा चेहरा आई-बाबांचा हात सोडताना चांगलाच हिरमुसला होता. शाळेत जाण्याची अजिबात इच्छा नसलेल्या या मुलांचे शालेय शिक्षकांनी केलेल्या स्वागतामुळे ही मुलंदेखील शाळेत झटकन रमली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूर रोड रुंदीकरण प्रश्न सुटता सुटेना!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सिंहस्थ कुंभमळ्याच्या पार्श्वभूमिवर रस्ते रुंदीकरण आणि डांबरीकरणाची कामे सर्वत्र वेगाने सुरू आहेत. परंतु, गंगापूर रोडच्या रुंदीकरणात सोमेश्वर महादेव मंदिराच्या कमानाची अडथळा येत आहे. याप्रश्नी महापालिका प्रशासनाने मंदिर देवस्थाच्या विश्वस्तांना विश्वासात घेऊन ठोस पावले उचलण्याची गरज आहे, असे मत वाहनचालकांनी व्यक्त केले आहे.

कुंभमेळ्याच्या निमित्ताने बारा वर्षांनंतर गंगापूररोडच्या रुंदीकरणास सुरुवात झाली. मात्र यात वृक्षांची अडचण येत आहे. महापालिका ठेकेदाराने रस्ते रुंदीकरणाचे काम जोमाने हाती घेतले आहे. परंतु, काही ठिकाणी वृक्षांची अडचण तर काही ठिकाणी खाजगी विकसकांची शेत रुंदीकरणात अडथळा ठरत आहे. यामुळे रुंदीकरणाचे काम करणारे ठेकेदारही हतबल झाले आहेत. तरीही रस्ता रुंदीकरण होत असतांना सोमेश्वर महादेव मंदिराच्या कमानीचा अडथळा येत आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने रहदारीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या गंगापूररोडच्या रुंदीकरणात लक्ष घालण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याचे नाव घेणारे पुजारी गंगापूररोडच्याच रुंदीकरणात अडथळा निर्माण करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महापालिकेने यावर तत्काळ तोडगा शोधून काढण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

महापालिकेने होऊ घातलेल्या सिंहस्थात शहरातील सर्वच रस्त्यांची कामे जोमाने हाती घेतली आहेत. परंतु, गंगापूररोडची समस्या सुटण्याची चिन्हे दिसत नाही. सोमेश्वर महादेव मंदिराची कमान रस्त्यात अडथळा निर्माण करीत आहे. याप्रश्नी महापालिकेने लक्ष घालण्याची गरज आहे. - अशोक पवार, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी आज सेमिनार

$
0
0

'मटा' व पारख क्लासेस यांचा संयुक्त उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहावी, बारावीनंतर कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा, त्यातील संधी कोणत्या याबाबत विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचाही गोंधळ होतो. यात अनेक विद्यार्थ्यांची धाव ही कॉमर्स शाखेकडे असते. या शाखेत अडमिशन घेण्यार्या विद्यार्थ्यांना या शाखेची सखोल माहिती मिळावी, यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स' व 'आशा ग्रुप पारख क्लासेस' यांच्या वतीने मंगळवारी (‌दि. १६) सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

अकरावी कॉमर्स शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना व कॉमर्स शाखेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना या सेमिनारमधून प्रा. सीए लोकेश पारख मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थ्यांना कॉमर्स शाखेविषयी योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांना करिअरची वेगळी वाट सापडू शकते. ती वाट सापडण्यासाठी त्यांना दिशा देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कॉमर्स शाखेतील करिअरची सखोल माहिती, एकूण खर्च, वेळ, निकालाची टक्केवारी, अकरावी कॉमर्समधील विषयांची निवड व अभ्यासक्रमांची प्राथमिक माहिती अशी सर्व उपयुक्त माहिती समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना या सेमिनारमधून मिळणार आहे. तसेच बोर्ड व सीए परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे अनुभवही यावेळी ऐकता येणार आहेत. या सेमिनारमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला पारख क्लासतर्फे गिफ्ट दिले जाणार आहे.

सेमिनारची वेळ व ठिकाण

पारख क्लासेस, सोना हार्डवेअर समोर, पेठे हायस्कूलजवळ, रविवार कारंजा नाशिक

मंगळवार (दि. १६) वेळ : २ ते ४ पारख क्लासेस, शॉप नं. २३, २४ एस. के. ओपन मॉल, बीवायके कॉलेज समोर, कॉलेजरोड नाशिक मंगळवार (दि. १६) सायंकाळी ५ ते ७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फायरब्रिगेडने शमविली तहान

$
0
0

विहितगाववासीयांच्या आंदोलनानंतर महापालिका प्रशासनाला जाग

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे चार दिवसांपासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित असलेल्या विहितगाव येथील नागरिकांना अखेर अग्निशमन दलाच्या गाडीद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. नाशिक परिसरात सर्वत्र पावसाळी वातावरण असतांना पिण्याच्या पाण्यासाठी विहितगाव परिसरातील रहिवाशांना वणवण करावी लागली.

पाणी मिळत नसल्याने रविवारी विहितगावमधील महिला आणि पुरुष रस्त्यावर उतरले. त्यांनी रास्तारोको केल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. जलवाहिनी फुटल्यामुळे पाणीपुरवठा बंद असल्याची वस्तुस्थिती महापालिका प्रशासनाने व‌िहितगाववासीयांना ‌सांगितली. मात्र, वस्तुस्थिती मान्य करीत स्थानिकांनी किमान टँकरद्वारे तरी पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली. त्यासाठी त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले. याच तत्काळ दखल घेत महापालिका प्रशासनाने चक्क अग्निशमन दलाच्या गाडीतून स्थानिक रहिवाशांना पिण्याचे पाणी पुरविले. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपाचे का होईना पण स्थानिक महिलांनी समाधान व्यक्त केले. विहितगाव परिसरात सिंहस्थ कुंभमेळ्यांतर्गत नवीन पुलाचे काम चालू असतांना विहितगाव, सौभाग्यनगर, बागुलनगर, चंदनवाडी आदी भागात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे महिला रस्त्यावर उतरल्या होत्या.

आजपासून पाणीपुरवठा सुरळीत

प्रभाग सभापती केशव पोरजे, नगरसेविका सुनीता कोठुळे यांनी जलवाहिनी फुटलेल्या ठिकाणाची भेट दिली. जलवाहिनी दुरुस्त करावी व मगचं पुलाच्या कामाला सुरुवात करावी, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. त्यामुळे महापालिका प्रशासनाने त्वरित जलवाहिनी दुरुस्तीकरणाच्या कामाला सुरुवात केली. रविवारी सायंकाळी या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असून लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती प्रभाग सभापती पोरजे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानोपानी मिणमिणले असंख्य काजवे

$
0
0

भंडारदाऱ्याच्या कुशीतील अनोखा अनुभव

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुणाच्या लहानपणी काडीपेटीतील अनोखी ठेव बनणारे... कुणाच्या झाकल्या अन् अंधारल्या ओंजळीत प्रकाशाची शिंपण करणारे काजवे पुन्हा नजरेसमोर प्रकटले तर... अनोखा अनुभव ठरेल ना! या अशा असंख्य काजव्यांच्या दर्शनाचा अन् निसर्गाच्या जादूगिरीचा अनोखा अनुभव सध्या शेकडो नाशिककर भंडारदाऱ्याच्या कुशीत घेत आहेत. नाशिकमधील पर्यटक प्रेमींच्या प्रयत्नातून साकारलेल्या काजवा महोत्सवाने ही अनोखी संधी उपलब्ध करून दिल्याने सध्या नाशिककरांची

पावले भंडादाऱ्याच्या कुशीत वळत आहेत.

शहरी भागातून हद्दपार झालेल्या काजव्यांची वसतिस्थाने अद्यापही भंडारदाऱ्याच्या जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर आहेत. हंगामाच्या पहिल्या पावसात या परिसरातील बहुतांशी वृक्षांवर दाट अंधारातही विद्युत रोषणाई केल्याचा भास होतो. सुरुवातीच्या संततधार पावसात या काजव्यांच्या रोषणाईला येणारा बहरही निसर्ग चमत्कार आहे. हा चमत्कार अनुभवण्यासाठी सद्यस्थितीत शेकडो नाशिककर भंडारदाऱ्याच्या रस्त्याकडे वळले आहेत. काजवा महोत्सवाची संकल्पना रुजविण्यासाठी यापूर्वी राज्याच्या पर्यटन विभागानेही प्रयत्न केले होते. यानंतर पर्यटनप्रेमी अंबरीश मोरे यांनी या संकल्पनेत पुन्हा बळ भरले आहे.

निसर्गापासून तुटत जाणाऱ्या शहरी नागरिकांना अन् विशेषत्वाने विद्यार्थ्यांना चमचमत्या काजव्यांचे दर्शन घडविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या परिसरात आता हलक्याशा पावसाला सुरुवात झाल्याने काजवा महोत्सव चांगलाच बहरला आहे. ३१ जूनपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार असल्याची माहिती मोरे यांनी दिली. पर्यटन विभागाच्या वतीनेही या परिसरात जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

अनोखी संधी

काजव्यांच्या दर्शनासोबतच भंडारदारा धरणाच्या परिसरातील दुर्गम परिसर, आदिवासी लोकजीवन, आदिवासी बांधवांकडून होणारा पाहुणचार अन् शहरात हरविलेले निसर्ग सौंदर्य हलक्याशा पावसात अनुभवण्याची अनोखी संधी सध्या नाशिककरांनी हेरली आहे. मुंबई आणि ठाणेकरांपाठोपाठ नाशिककरांच्या उपस्थितीनेही काजवा महोत्सवाला यंदा अनोखा बहर आणल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात

$
0
0

दहावी फेरपरीक्षा जुलैमध्ये

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा येत्या जुलै महिन्यात घेण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज उपलब्ध झाले असून २३ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. २४ ते २७ जून यादरम्यान लेट फी भरून अर्ज भरता येणार आहे. www.mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना हे अर्ज भरता येणार आहेत.

२०१४-२०१५ या शैक्षणिक वर्षात दहावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ, यासाठी या वर्षापासून जुलैमध्ये परीक्षा घेण्यात येणार असून या विद्यार्थ्यांना ऑगस्ट महिन्यात लगेचच अकरावीसाठी प्रवेश मिळणार आहे. मंडळाच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना आपल्या शाळांमार्फतच हे अर्ज सादर करावयाचे आहेत.

या परीक्षांची फी बँक ऑफ इंडिया या बँकेत शाळेमार्फत चलनाच्या माध्यमातून भरावयाची असून ३० जूनपर्यंत हे अर्ज शाळांमध्ये जमा करायचे आहे. तसेच १ जुलैला हे अर्ज शाळांनी संबंधित विभागीय बोर्डाकडे सादर करणे गरजेचे असल्याची माहिती बोर्डचे विभागीय अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी दिली. ऑक्टोबरमध्ये या परीक्षा होणार नाही, याची नोंद विद्यार्थी व पालकांनी घ्यावी, असे आवाहन राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘धन्वंतरी’च्या विद्यार्थ्यांचा ठिय्या

$
0
0

मेडिकल कॉलेज व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराविरोधात नाराजी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विविध सुविधांसाठी रक्कम आकारल्यानंतरही विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात सुविधा देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप करीत कामटवाडे परिसरातील धन्वंतरी मेडिकल कॉलेजसमोर शेकडो विद्यार्थ्यांनी सोमवारी तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह (अभाविप) इतरही विद्यार्थी संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या. या प्रकरणी आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडेही आंदोलनकर्त्यांनी धाव घेतली आहे.

शहरातील कामटवाडे परिसरातील विद्यार्थ्यांकडून अनेक दिवसांपासून व्यवस्थापनाच्या विरोधात तक्रारी येत होत्या. येथील गैरसुविधांबाबत व्यवस्थापनाशी वारंवार संपर्क साधल्यानंतरही याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या अनुभवाने संतापाचा उद्रेक झाल्याचे आंदोलक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विविध उपक्रमांच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा पैसे लुटून विद्यार्थ्यांना सुविधाच दिल्या जात नसल्याचा विद्यार्थ्यांचा मुख्य मुद्दा आहे.

मेडिकल कॉलेजमध्ये बॅचलर ऑफ होमीओपॅथी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पहिल्या ते चौथ्या वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे 'अभाविप'चे म्हणणे आहे. कॉम्प्युटर अभ्यासक्रमासाठी ५ हजार रुपये घेतल्यानंतरही याबबत शिक्षण देण्यात आलेले नाही, मे महिन्यात विद्यार्थी सुटीवर असतानाही त्यांच्याकडून मेसची अडीच हजार रुपये फी घेण्यात आली, मुलींच्या होस्टेलसाठी सिक्युरिटी गार्ड नाही, मुलींना होस्टेल सुविधा घेणे बंधनकारक केले जाते, मुलींसाठी पुरेसे स्वच्छतागृह नाहीत, प्रॉस्पेक्टसच्या छापील किमतीपेक्षा प्रत्यक्षात जास्त पैशांची होणारी वसुली, प्रॉस्पेक्टची छापील किंमतही नियमबाह्य यांसह विविध समस्या मांडत विद्यार्थी व विद्यार्थिनींनीनी कॉलेजच्या गेटवर सुमारे पाच तास ठिय्या दिला. याप्रश्नी आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडेही पाठपुरावा केला जाणार आहे. या आंदोलनामध्ये 'अभाविप'चे अध्यक्ष प्रशांत टोपे, आकाश आंभोरे, अमोल अहिरे, रुपेश पाटील, श्रेयस पुंडे तसेच मनसेच्या वतीने गणेश मोरे, तुषार मटाले, ललित ओहोळ, प्रतिक राजपूत, तुषार वाडीले प्रवीण शिरसाठी आदींनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांचा प्रश्न न सुटल्यास आठ दिवसात पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा युवासेनेच्या वतीने दीपक दातीर यांनी कॉलेज व्यवस्थापनाला दिला.

विद्यार्थी समितीची स्थापना

दिवसभर सुरू असलेल्या आंदोलनाची फलनिष्पत्ती म्हणून सायंकाळी उशिरा या कॉलेजमधील विद्यार्थ्यांची एक प्रातिनिधीक समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती 'अभाविप'चे अध्यक्ष प्रशांत टोपे यांनी दिली. ही समिती यापुढे व्यवस्थापनाकडे विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तरीही कॉलेजने दाद न दिल्यास विद्यापीठाकडे हे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविणार

सातपूर : विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर धन्वंतरी कॉलेजच्या व्यवस्थापनाने समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. याप्रश्नी आंदोलनकर्त्यांनी व्यवस्थापनाशी भेट घेत संवाद साधला. संस्थेचे पदाधिकारी सरोज धुमणे पाटील आणि जयंत पाटील यांनी आंदोलनकर्त्यांचे म्हणणे समजावून घेतले. यावेळी चर्चेसाठी अभाविप, मनसे आणि युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

धन्वंतरी मेडिकल कॉलेजसंदर्भात आंदोलनकर्त्यांच्या तक्रारी विद्यापीठाकडे आल्या. यानुसार प्राचार्य व व्यवस्थापनास बोलावून सुधारणेसाठी सूचना देण्यात आल्या आहेत. गतवेळी अचानक केलेल्या पाहणीत या कॉलेजकडे ५६ टक्के स्टाफच आढळून आला होता. - प्रा. डॉ. अरुण जामकर, कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीर फिरला कुणाकडे?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

एका बैठकीच्या आयोजनासंदर्भांत चर्चा करण्यासाठी पुरोहीत महासंघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल सोमवारी सकाळी मंहत ग्यानदास यांच्याकडे पोहचले. चर्चा सुरू असतानाच महापालिका प्रशासनाने पुरोहीत संघाच्या कार्यालयासहीत वस्त्रांतर गृहाजवळील शेड साफ करून टाकण्यास सुरुवात केली. मंहत ग्यानदास यांनी केलेली मूळ मागणी प्रशासनाने कानामागे टाकीत पुरोहीत संघाला टारगेट केल्याने यामागे नेमकी काय हालचाली सुरू आहेत, याविषयी चर्चा रंगल्या आहेत.

कुंभमेळ्याच्या आयोजनात पुरोहीत संघ खारीचा वाटा उचलत असतो. यंदाही पुरोहीत संघाने 'स्वखर्चाने' दिल्ली व मुंबई वारी केली. शाहीस्नानाच्या तारखा व इतर माहिती देशभर पसरवली, असा दावा संघामार्फत केला जात आहे. सुरुवातीस आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यावर खूश होते. मात्र, नाशिकला त्यांच्या चकरा वाढल्या तसे काहीसे बिघडत गेले. मागील महिन्यात तर त्यांनी वस्त्रांतरगृह पाडण्याची जाहीर मागणी केली. पुरोहीत संघाचे काम व आखाड्यांचा थेट संबंध नसल्याचेही त्यांनी सांगून टाकले. वस्त्रांतरगृहाची इमारत महापालिकेनेच उभी केली असून, त्याचा भाविकांना कितपत फायदा होतो, हे पाहणे महापालिकेची जबाबदारी आहे आहे. यात पुरो​हीत संघ व आखाड्यांचा संबंध येत नाही. मात्र, प्रशासनाधिकारी डोळ्यावर पट्टी बांधल्यागत वागू लागले आहेत. वस्त्रांतरगृह पाडणे हा एकमेव पर्याय असेल तर रामकुंड परिसरातील सर्वच अतिक्रमणांवर महापालिकेने हातोडा चालवला पाहिजे. ज्या इमारती महापालिकेने पात्रानजीक बांधल्या, त्या सर्वच हटवल्या तर नवीन प्रश्नच उद्भवणार नाही. असो, महंत ग्यानदास यांची वस्त्रांतरगृहासहीत पुरोहीत संघावर पडलेल्या वक्रदृष्टीमागे कोणाचे नियोजन असावे, याचीही गरमागरम चर्चा सुरू आहे. अनेकदा उद्योजक धनंजय बेळे यांच्या नावाचाही उल्लेख यात होत असतो. लोकसभा निवडणुकीत ब्राह्मण समाजाचा माजीमंत्री छगन भुजबळ यांना पाठिंबा असल्याचे​ पत्र बेळे यांनी प्रसिध्द केले होते. यानंतर पुरोहीत संघाने बेळे यांच्यावर आगपाखड केली होती​. हा वाद बराच वाढला होता. आज उद्भवलेल्या परिस्थितीला या वादाची किनार असण्याची शक्यता नाकारात येत नाही. कारण, महंत ग्यानदास व बेळे यांचे संबंध सर्वश्रृत आहेत. महंतांनी वस्त्रातंर गृह पाडण्याची मागणी केलेली असताना प्रशासनाने त्याकडे डोळेझाक करीत पुरोहीत संघाच्या कार्यालयावर कारवाई केल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकची ‘रेंज’ त्र्यंबकपर्यंत

$
0
0

सिंहस्थ कुंभमेळ्यात समन्वयासाठी अधिकाऱ्यांना मिळणार विशेष फोन

अरविंद जाधव, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान शाहीस्नानासाठी तब्बल ७० ते ८० लाख भाविक येण्याची शक्यता असून, याचा ताण मोबाइल नेटवर्कवर पडणार आहे. यामुळे मोबाइल यंत्रणा कोसळली तर प्रशासनाच्या नियोजनाचे तीन तेरा वाजू शकतात. या पार्श्वभूमीवर भारत संचार निगम लिमिटेडतर्फे रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या मदतीने सुरू राहणारे विशेष फोन उपब्लध करून देण्यात येणार आहेत. यामुळे नाशिक व त्र्यंबकेश्वरमधील अधिकारी एकमेकांशी संवाद साधू शकतील.

सिंहस्थादरम्यान मोबाइल टॉवर कंपन्यांवर ग्राहकांचा अतिरिक्त भार पडणार आहे. बीएसएनएल वगळता इतर खासगी मोबाइल ऑपरेटर्संनी फक्त सिंहस्थ म्हणून सेवा विस्तार करण्यास अनुकूलता दर्शवलेली नाही. एका टॉवरसाठी ४० ते ४५ लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. जागेचाही प्रश्न आहे. बीएसएनएलने मात्र आहे त्यापेक्षा ५० टक्क्यांपेक्षा अधिक आपल्या क्षमतेमध्ये वाढ केली आहे. टॉवरची संख्या लक्षणीयरित्या वाढविण्यात आली असून, आपत्तकालीन परिस्थितीत अडचण नको म्हणून मुंबईच्या दिशेने कल्याण-वाडामार्गे पर्यायी केबल टाकण्यात आली आहे. यामुळे किमान पर्वणी दरम्यान त्र्यंबकेश्वरमध्ये नेटवर्कचा प्रश्न उद्भवणार नाही.

गर्दीचे नियोजन करण्यासाठी गुंतलेल्या प्रशासनातील सर्व विभागांना सातत्याने एकमेकांशी संवाद साधावा लागणार आहे. संवादात खंड पडू न देता हे काम होणे अपेक्षित आहे. साधारणतः प्रत्येक टॉवरची कॉल घेण्याची व पाठवण्याची क्षमता निर्धारीत असते. त्यात अचानक खूप वाढ झाल्यास सर्व यंत्रणाच बंद पडू शकते. या पार्श्वभूमीवर बीएसएनएलतर्फे सर्वच विभागातील अधिकाऱ्यांना विशेष मोबाइल पुरवण्यात येणार आहे. या मोबाइलची संख्या सुमारे एक हजाराच्या आसपास आहे. विशेष म्हणजे एखाद्या टॉवरची रेंज फारतर दोन किलोमीटरपर्यंत असू शकते. याउलट या फोनची रेंज किमान २५ किलोमीटरपर्यंत असते. म्हणजेच नाशिक तसेच त्र्यंबकेश्वरमधील अधिकारी बीएसएनएलच्या 'त्या' फोनच्या मदतीने संवाद साधू शकतील. यासाठी टॉवरकडून मिळणाऱ्या रेंजची आवश्यकता असणार नाही. सदर फोन उपलब्ध करून देण्याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बीएसएनएलची अनेक कामे पूर्णत्वास पोहचली आहे. सिंहस्थ काळात संवादात खंड पडणार नाही, या दृष्टीने सर्व नियोजन आखले असून, किमान एक हजार फोनचे वाटप केले जाणार आहे. नारायण पोटोळे, - जनसंपर्क अधिकारी, बीएसएनएल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांना अपेक्षित असलेली विमानसेवा विविध कारणांनी हूल देत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी नाशिक-पुणे ही सेवा सुरु होणार अपेक्षित असताना हवामानामुळे या सी-प्लेनमध्ये अचानक बिघाड झाल्याने सोमवारचे उड्डाण रद्द करण्यात आले. मात्र, येत्या काही दिवसातच ही सेवा सुरु होईल, असे मेहेर कंपनीने सांगितले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककरांना विमानसेवेची मोठी आस लागली आहे. ओझर विमानतळाच्या ठिकाणी अत्याधुनिक पॅसेंजर टर्मिनल साकार झाले. मात्र, त्यास दीड वर्षे उलटूनही तेथून सेवा सुरु झालेली नाही. मेरिटाईम एनर्जी हेलिएअर सर्व्हिसेस लिमिटेड (मेहेर) या सीप्लेन सेवा देणाऱ्या कंपनीने नाशिक ते पुणे ही विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १५ जूनपासून ही सेवा सुरु होणार होती. त्यासाठीचे बु‌किंगही करण्यात आले. मात्र, 'नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न' या म्हणीप्रमाणेच नाशिकची विमानसेवा विविध कारणांनी सुरु होण्यास विलंब होत आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या वादळी पावसामुळे सी-प्लेनच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात धुके जमले आहे. हे काढणे अत्यावश्यक आहे. सी-प्लेन हे मुंबईहून नाशिकला येऊ शकते. मात्र, नाशिकहून पुण्याला सेवा देणे घातक ठरु शकते. त्यामुळे पूर्वनियोजित सेवा रद्द करीत असल्याचे मेहेरने सांगितले आहे. विमानातील धुके दूर काढून येत्या एक ते दोन दिवसात ही सेवा सुरु केली जाईल, असेही मेहेरने स्पष्ट केले आहे. यामुळे मात्र, नाशिककरांनी मोठी निराशा झाली आहे.

नाशिकहून विमानसेवा सुरु होणार असल्याने मी सर्वप्रथम तिकीट बूक केले. सेवा जेव्हाही सुरु होईन त्यावेळी मी पुण्याला जाईन. मात्र, आगामी चार महिने पावसाचे असल्याने पुन्हा विमानात बिघाड व्हायला नको. तसेच विमान हवेत असताना वातावरणात बदल झाल्यास काय, याचा विचार कंपनीने करायला हवा. - अविनाश आव्हाड, उद्योजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images