Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

संजयची रवानगी नाशिक जेलमध्ये?

$
0
0
कोर्टाने संजय दत्तची शिक्षा कायम ठेवल्याने त्याला आता कोणत्या जेलमध्ये पाठविले जाईल, या चर्चेला उधाण आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव संजूबाबाची रवानगी नाशिक कारागृहात केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत वरिष्ठ स्तरावर विचार विनिमय सुरू असल्याचे समजते.

डॉ. पवारांचा वसा पुढे नेण्याची गरज

$
0
0
डॉ. वसंत पवारांचा वसा पुढे नेण्याची गरज असून तसे झाल्यास त्यांच्या नावाचा झेंडा रोवण्यासाठी कार्यकर्त्यांना मदतच होणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी केले.

पावसाची अचूक नोंद कळणार

$
0
0
टंचाई आराखडा अधिकाधिक वास्तव पातळीवर आखण्यास मदत व्हावी म्हणून त्या-त्या भागातील पावसाची स्थिती जाणून घेण्यासाठी जिल्ह्यातील महसुली मंडळांमध्ये पर्जन्यमापक यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

उत्तर महाराष्ट्राची गॅस सुरक्षा वाऱ्यावर

$
0
0
उत्तर महाराष्ट्रातील कोट्यवधी गॅस ग्राहकांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे स्पष्ट होत आहे. विभागातील पाच जिल्ह्यांसाठी तिन्ही गॅस कंपन्यांचा केवळ एकच सेल्स ऑफिसर असल्याने ग्राहकांच्या तक्रारीचीही दखल घेतली जात नाहीत.

नाशिकरोड विभागात पाण्याची उधळपट्टी

$
0
0
राज्यभरात पाण्याचे दुर्भिक्ष असताना नाशिकरोडच्या अनेक भागात पाण्याचा अपव्यय सुरु आहे. याबाबत नाशिक महापालिकेचे विभागीय कार्यालय अनभिज्ञ असून राजरोस चाललेल्या या उधळपट्टीकडे अर्थपुर्ण डोळेझाक करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

लोंबकळत्या तारांमुळे जीव टांगणीला

$
0
0
वृंदावननगर परिसरातील लोंबकळत्या तारांचा मुद्दा आता ऐरणीवर आला असून चिमुरड्यांच्या भितीने पालकांचा जीव कायम टांगणीला लागलेला असतो. हाताला लागतील इतक्या उंचीवर या विद्युत तारा असल्याने लहानांसह मोठ्यांना दिवसरात्र भीती असते.

'ईएसडीएस' सोल्युशन्सला सीएमएमआय मानांकन

$
0
0
सॉफ्टवेअर सोल्युशन्स, क्लाऊड कम्प्युटिंग, सर्व्हर होस्टिंग या सेवा पुरविताना गुणवत्तेला प्राधान्य दिल्याबद्दल सातपूर एमआयडीसीतील ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रा. लिमिटेडला 'कॅपॅबिलिटी मॅच्युरिटी मॉडेल इंटिग्रेशन (सीएमएमआय) लेव्हल थ्री' हे जागतिक दर्जाचे मानांकन प्राप्त झाले आहे.

सिन्नर- शिर्डी रस्त्यावर मनसेचे आंदोलन

$
0
0
येथील वावी वेस भागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या फलकाचे नुकसान केल्याच्या निषेधार्थ मनसेच्या कार्यकर्त्यांनी सिन्नर-शिर्डी रस्त्यावर रास्ता रोको केला. फलक फाडणाऱ्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.

विदेशी शिक्षणाच्या संधींवर 'फॅक्ट'तर्फे रविवारी सेमिनार

$
0
0
नाशिकमधील फॅक्ट अॅकॅडमीतर्फे रविवारी (ता. ७) 'अमेरिका आणि कॅनडामधील शिक्षणाच्या संधी' या विषयावर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. शरणपूर रोड येथील विराज कलादालनात सकाळी ११ ते दुपारी २ आणि नाशिक पुणे रोडवरील हॉटेल ग्रेप सिटी येथे दुपारी ४ ते ६ दरम्यान हे सेमिनार होणार आहे.

उद्योगांच्या समस्या सोडविणार

$
0
0
उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांच्या उद्योगांचे विविध प्रश्न सोडविण्यासंदर्भात विभागीय उद्योग समन्वय समितीची बैठक या महिना अखेरीस घेण्यात येणार असल्याचे विभागीय महसूल आयुक्त रविंद्र जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

नाशिकच्या बुरूजावर वारकरी भवनाचा झेंडा

$
0
0
नाशिक शहराला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे, प्रभु रामांचे क्षेत्र तसेच वारकरी संप्रदायाचा ज्यांनी पाया रचला त्या माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांचे गुरू तथा ज्येष्ठ बंधु संत निवृत्तीनाथ यांची ही दीक्षाभूमी आहे.

बेंडखळेंनी अज्ञात भुयारे उजेडात आणली

$
0
0
बाळ बेंडखळे यांनी महाराष्ट्रातील तब्बल ८0 भुयारे पालथी घातली असून जेथे सूर्यप्रकाशही पोहोचू शकत नाही, अशा अज्ञात भुयारांना उजेडात आणण्याचे काम बेंडखळे यांनी केले असल्याचे मत प्रा. सुनील हिंगणे यांनी व्यक्त केले.

'आरटीओ'ने वसुल केला ५ कोटींचा पर्यावरण कर

$
0
0
वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारने आठ आणि पंधरा वर्षांपेक्षा जुन्या वाहनांवर पर्यावरण कर लावला आहे. नाशिक विभागाने तीन वर्षांत २६ हजार ६३३ वाहनांकडून ३१ मार्च २०१३ अखेरपर्यंत ५ कोटी १५ लाख १५ हजार रूपयांचा कर संकलित केला आहे.

संत संमेलन १२ एप्रिलला

$
0
0
श्री दत्त मंदिर मोह व सिन्नर तालुक्यातील सर्व भक्तांच्या उदंड प्रतिसादामुळे दत्त मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले असून या मंदिराचा भव्य उद्‍घाटन सोहळा, मूर्ती स्थापना, कलशारोहण समारंभ शुक्रवार, १२ एप्रिल रोजी होत आहे.

'डीएड'बाबत २० एप्रिलला बैठक

$
0
0
राज्यभरातील डीएड कॉलेजांच्या तपासणी अहवालाबाबत राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (एमएससीईआरटी) २० एप्रिलला बैठक होणार आहे. गेल्या आठवड्यात कॉलेजांकडून मागविलेल्या माहितीबाबत ही बैठक होणार असून त्यानंतर सरकारला अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे.

वाइन उद्योग राय'झिंग'!

$
0
0
देशाची वाइन कॅपिटल असलेल्या नाशिकमधील वाइन उद्योगाला लवकरच विकासाची झिंग चढणार आहे. केवळ नाशिकच नव्हे तर देशातील वाइन उद्योगाला नवा आयाम देण्यासाठी नाशिकपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या विंचूर वाइन पार्कमध्ये सुमारे १०० कोटी रुपये गुंतवणुकीतून अत्याधुनिक दर्जाचे देशातील पहिले वाइन क्लस्टर साकारले जाणार आहे.

सेट टॉप बॉक्सची मुदत वाढविण्याची मागणी

$
0
0
सेट टॉप बॉक्स लवकरात लवकर घेण्याची धास्ती दाखवून काही केबलचालक व कंपन्या ग्राहकांना लुबाडत आहेत. यामुळे, ग्राहक संरक्षणासाठी सेट टॉप बॉक्स बसविण्याची मुदत ३१ डिसेंबर २०१३ पर्यंत वाढवून द्यावी, अशी मागणी नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीने केली आहे.

गायत्री महायज्ञात रमले भाविक

$
0
0
नाशिकच्या अखिल विश्व गायत्री परिवारातर्फे सिडकोतील पवननगर मैदानावर श्रीमद् प्रज्ञापुराण आणि युग साहित्य - माहात्म्य कथा व २४ कुंड गायत्री महायज्ञ होत असून रोज हजारो भाविक यात रममाण होत आहेत.

जिल्हा बॅंकेच्या निलंबित कर्मचाऱ्यांवर आरोपनिश्चिती

$
0
0
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने निलंबित केलेल्या पाचही कर्मचाऱ्यांवर आरोपनिश्चिती करण्यात आली असून याप्रकरणी चौकशी सुरु झाली आहे. यासंबंधीचा अहवाल १५ दिवसात बँकेच्या अध्यक्षांना सादर केला जाणार आहे.

सुनील बागुल राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष

$
0
0
शिवसेनेतून राष्ट्रवादीत दाखल झालेले सुनील बागुल यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्या उपस्थितीत बागुल यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images