Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

विस्मृतीतल्या प्राचीन गणेशमूर्ती

$
0
0

भाविकांना मिळणार ६०च्या दशकातील गणेशाची रूपे

प्रशांत भरवीरकर, नाशिक

गणेशोत्सव ही महाराष्ट्राची परंपरा असल्याने बाराही महिने मूर्ती बनविण्याचे काम सुरूच असते. त्यातही भाविकांना हवीहवीशी वाटेल अशी मूर्ती तयार करून देण्याकडे अनेक मूर्तीकारांचा कल असतो; मात्र गणेशाची विस्मृतीत गेलेली रूपे आज अचानक आपल्यासमोर आली तर...? ही किमया साधणार आहे गेल्या कित्येक वर्षांपासून शाडू गणेश मूर्ती साकारण्यातून पर्यावरणाला हात देणारे मूर्तीकार शांताराम मोरे. भाविकांच्या विस्मृतीत गेलेली गणेशाची अनंत रूपे साकारण्याचा यंदा त्यांचा मानस असून, त्याकामाची सुरूवात देखील त्यांनी केली आहे.

भाविकांना गणेशमूर्तींमध्ये १९६० पासूनच्या दशकातील तसेच त्यानंतरच्या काळातील १९७०, १९८० च्या दशकातील विस्मृतीत गेलेल्या अनेक मूर्ती रूपांचा आनंद लुटता येणार आहे. विशेष म्हणजे या मूर्ती पर्यावरणपूरक असल्याने त्यांचे मोल अजूनच वाढत आहे.

सिडकोतील मोरे गणपतीवाले यांची परदेशात मूर्ती पाठवण्याची परंपरा कायम आहेच परंतु यंदा त्यांनी शाडूमातीतल्या अनेक दुर्मिळ मूर्ती भाविकांना मिळवून देण्याचा विडा उचलला आहे. जलप्रदूषण टाळण्यासाठी गणेश मूर्तीकारांनी प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती बनवू नयेत, असे निर्देश मध्यंतरी औरंगाबाद खंडपीठाने दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणे अवघड असल्याचा सूर मूर्तीकारांमधून उमटत होता परंतु गेल्या चार पिढ्यांपासून सिडकोच्या गणेश चौकातील मोरे कुटुंबियांनी मात्र पर्यावरणपूरक शाडू मातीपासून मूर्ती घडविण्याचे काम निष्ठेने सुरू ठेवले आहे. नाशिकमध्ये शाडू मातीच्या गणेश मूर्ती तयार करण्यासाठी शांताराम मोरे व त्यांच्या कुटुंबीयांनी खास www.mangalmurtiarts.com ही वेबसाईटही विकसित केली. त्यांची मुले मयूर आणि हर्षद ही परंपरा पुढे चालवत आहेत.

अष्टविनायकाबरोबरच ालबागचा राजा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई तसेच नाशिकमधील नवश्या गणपती, रविवार कारंजावरील चांदीचा गणपती, सिध्दी विनायक, महंत गणेश, मोदकेश्वर व आदी रुपात मूर्तीकाम करत मोरे कुटुंबीयांनी पिढ्यांन पिढ्यापासून आपला स्व:तचा ग्राहक वर्ग तयार केला आहे. शांताराम यांच्या आजोबाच्या काळातील रामचंद्र गणपती, पेण पद्मासन, पेशवाई या लोकप्रिय ठरलेल्या गणपतीं मूर्तींना आजही तितकीच मागणी आहे. परंतु या पुढे जात आता मोरे कुटुंबियांनी भाविकांसाठी दुर्मीळ मूर्ती बनविण्याची तयारी सुरू केली आहे.

गणेशाचे कोणतेही रूपे मनात भरणारेच असते; परंतु त्याची काही रूपे भाविकांच्या मनात खोलवर रूतून बसलेली आहेत. लेखणी घेऊन आकडेमोड करणारा गणेश आता मूर्तीरूपात सहसा पहायला मिळत नाही किंवा रिध्दी सिध्दी बाजूला असलेला गणेशही आता दुर्मीळ झाला आहे. याच मूर्ती पुन्हा एकदा जिवंत करण्याचे मनोरथ असून त्याकामी सुरूवातही केली आहे. - शांताराम मोरे, शाडू गणेश मूर्तीकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रवादी उतरली रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर राज्य सरकार सूडबुध्दीने गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप करीत नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी दुपारी रास्ता रोको केला. त्यामुळे वाहनधारकांना तासभर वाहतुककोंडीचा सामना करावा लागला.

एकीकडे भुजबळ आणि त्यांच्या नातलगांच्या मालमत्तांची लाचलूचतपत प्रतिबंधक विभागाने झडती सुरू केली असताना दुसरीकडे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या कारवाई विरोधात आक्रमक झाले आहेत. मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडून रास्ता रोको केला. राज्यसरकार आणि केंद्रसरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता वाढू लागली आहे. भुजबळांवर ज्या आरोपांवरून गुन्हे दाखल होत आहेत ते निर्णय तत्कालीन मुख्यमंत्र्यांसह मंत्रीमंडळ आणि उपसमित्यांनी घेतले आहेत. त्यात एकटया भुजबळांचा संबंध नाही. गुन्हे दाखल करण्यापूर्वी या प्रकरणांची शहानिशा होणे आवश्यक होते. परंतु तसे न करता केवळ भुजबळांनाच टार्गेट केले जात असल्याचा आरोप या आंदोलनावेळी करण्यात आला. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांना निवेदन देण्यात आले.

सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून पुतळा दहनाचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. आंदोलकांनी काळ्या फिती तसेच निषेधाची पत्रके हाती घेतली होती. आंदोलनात जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, दिलीप बनकर, परवेज कोकणी, श्रीराम शेटे, माणिकराव शिंदे, अर्जुन टिळे, संजय खैरनार, छबु नागरे, अंबादास खैरे, विरोधीपक्षनेत्या कविता कर्डक, सुनिता निमसे, शोभा मगर, कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटील यांच्या बंगल्याची झडती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबई विद्यापिठाचा सरकारी भूखंड एका बिल्डरच्या घशात घातल्याप्रकरणी आरोपी असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हरिष पाटील यांच्या नाशिक येथील बंगल्याची एसीबीने सोमवारी झडती घेतली. मात्र या कारवाईत मालमत्तेसंबंधीची कोणती माहिती हाती लागली याचा तपशील उघड करण्यास विश्वसनीय सूत्रांनी असमर्थता दर्शविली आहे.

मुंबईतील सांताक्रुझ कलिना परिसरातली मुंबई विद्यापिठाचा भूखंड परस्पर एका नामांकीत खासगी कंपनीला भाड्याने दिल्याप्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यासह बांधकाम विभागाच्या पाच अधिकाऱ्यांविरोधात एसीबीने फिर्याद दिली होती. आरोपींमध्ये नाशिकमध्ये राहाणाऱ्या तत्कालीन कार्यकारी अभियंता पाटील याचाही समावेश होता. गंगापूर रोडवरील सावरकरनगर परिसरात पाटील याचा आठ खोल्यांचा बंगला आहे. या बंगल्याची झडती घेण्यासाठी गेलेल्या एसीबीच्या पथकाला दोन दिवसापूर्वी हात हलवत परतावे लागले. पाटील व त्याचे कुटुंबीय बंगल्यात नसल्याने व ते केव्हा परततील याची शाश्वती नसल्याने एसीबीने न्यायालयाकडे झडतीसाठी बंगल्याचे कुलूप तोडण्याची परवानगी मागितली. परवानगी मिळण्यापूर्वी पुन्हा सोमवारी सकाळी पथकाला पाटील याच्या बंगल्यावर पाठविण्यात आले. त्यावेळी त्याची पत्नी आणि मुलगी घरीच होते. त्यानंतर पाटील याच्या बंगल्याची झडती घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळांच्या साम्राज्याला हादरे

$
0
0

एसीबीच्या छाप्यात कोट्यवधींची मालमत्ता हाती; रात्री उशीरापर्यंत बंगले व कार्यालयांची झाडाझडती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आमदार छगन भुजबळ यांच्या नाशिकधील साम्राज्याला मंगळवारी मोठे हादरे बसले. महाराष्ट्र सदन घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी एसीबीच्या पथकांनी भुजबळांच्या मुंबई आणि नाशिक येथील कार्यालये व बंगल्यांवर छापे टाकले. धाडीत कोट्यवधीची माया हाती आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

भुजबळ फार्ममधील चंद्राई बंगला, भुजबळ पॅलेस, राम बंगला, येवल्यातील बंगला आणि कार्यालय, मनमाडमधील बंगला आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले असून, रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरू होती. या धाडीत मोठे घबाड हाती लागल्याची चर्चा आहे. दरम्यान, या कारवाईने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कारवाईला विरोध केला आहे. तर विरोधकांनी मात्र कारवाईचे स्वागत केले आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यालयात सकाळी दहाच्या सुमारास निषेध मोर्चाचे आयोजन सुरू असतानाच, नेहमी वर्दळ असलेला भुजबळ फॉर्म हाऊसच्या परिसरात अचानक सरकारी गाड्यांचा ताफा शिरला. पोलीस आणि एसीबीच्या तीन पथकांनी भुजबळ फॉर्ममध्ये अचानक प्रवेश करत, संपूर्ण फार्म हाऊसचा ताबा घेतला. त्यानंतर झाडाझडतीला सुरूवात केली. त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना कारवाईचा अंदाज आला. एसीबीच्या तीन पथकांनी भुजबळ फार्ममधील चंद्राई बंगला, भुजबळ पॅलेस, राम बंगला, आणि संपर्क कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी सुरू केली. त्यामुळे या कारवाईने सुरक्षा रक्षक आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या आई हिराबाई ही भांबावल्या. धुळे, नगर आणि नाशिकच्या तीन पथकांनी बंगल्याची झाडाझडती सुरू केली. सोबतच त‌िन्ही बंगल्यातील मिळतील तेवढी कागदपत्रे गोळा करत, तपासायला सुरूवात केली. शहरात त्यांच्या घरांवर पडलेल्या छाप्यांची माहिती वाऱ्यासारखी पसरल्यानंतर राष्ट्रवादीच्या समर्थकांसह माध्यमांच्या प्रतिनिधींनी फार्म हाऊसकडे धाव घेतली. त्यामुळे दुपारच्या सुमारास परिसराला बंगल्यासमोर गर्दी जमली होती. नाशिकमधील फार्महाऊसची तपासणी रात्री उशीरापर्यंत सुरू होती. कारवाईचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले आहे. एसीबीच्या कारवाईत भुजबळांच्या घरात स्थावर मालमत्तेची कागदपत्रे हाती लागल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. प्लॉट, शेती, दुकाने यांच्यासह परराज्यातील संपत्तीची कागदपत्रे त्यांच्या घरात सापडल्याची चर्चा आहे. त्यांच्या स्थावर मालमत्तेचीच मोजदाद उशीरापर्यंत सुरू होती.

धाडीचा दिखावा

मंगळवारी भुजबळांच्या बंगले आणि कार्यालयावर एसीबीने छापे टाकले असले तरी, या धाडींना उशीर झाल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत होते. गुन्हा दाखल होताच अधिकाऱ्यांसोबत कारवाई केली असती, तर एसीबीच्या हाती बरेच काही हाती लागले असते, अशीही चर्चा होती. अधिकाऱ्यांवर छापे पडताच या बंगल्यातील अनेक सामान वाहून नेल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. त्यामुळे या कारवाईत फारसे काही हाती लागण्याची शक्यता कमीच असल्याचे सांगून हा दिखावा असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

'वीट' ढासळली

भुजबळ फॉर्महाऊसवर धाड सुरू असतानाच फार्म हाऊसच्या गेटवरील विटांची पडझड झाली. भुजबळांचे फार्महाऊस हे त्यांच्या नाशिकमधील साम्राज्याची निशानी म्हणून ओळखले जाते. मात्र एसीबीची गाडी गेटमध्ये घुसल्यानंतर पोल‌िसांनी माध्यमांच्या चित्रीकरणापासून वाचण्यासाठी जोरात गेट लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गेटवरील दोन विटा खाली पडल्या. त्यानंतर पुन्हा गाडी बाहेर गेल्यानंतर गेट लावताना पुन्हा विटा कोसळल्या. यामुळे भुजबळांच्या साम्राज्याच्या विटा कोसळायला सुरूवात झाल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.

छाप्यांना सुरूवात

सकाळी साडेनऊ वाजता नाशिक एसीबीचे पोल‌िस अधीक्षक डॉ. दिगबंर प्रधान यांच्या नेतृत्वाखाली पाच पथके तयार करण्यात आली. त्यातील तीन पथके दहा वाजता भुजबळ फार्महाऊसकडे रवाना करण्यात आली, तर दोन पथके येवला आणि मनमाडकडे कूच झाली. भुजबळ फार्महाऊसवर सव्वा दहा वाजता कारवाईला सुरूवात झाली तर येवल्यात १२ आणि मनमाडमध्ये साडेबारा वाजता कारवाईला सुरूवात झाली.

येवल्यातही छापा

येवला : मतदार संघाचे आमदार असलेल्या छगन भुजबळ यांच्या येवल्यातील संपर्क कार्यालय व बंगल्यावरही एसीबीच्या पथकाने मंगळवारी छापे टाकले.

दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक एसीबीच्या पथकाने संपर्क कार्यालयावर धाड टाकत कारवाईला सुरुवात केली. संपर्क कार्यालयाच्या बाहेर छगन भुजबळ यांचे येथील स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे व बी. आर. लोंढे यांना कारवाईची कल्पना देत पथकाने या दोघांनाही आत नेले. पथकात एका अधिकाऱ्यासह सात कर्मचाऱ्यांचा समावेश होता. तर पथकाने शहर व तालुका पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्यासह ९ पोलिस कर्मचाऱ्यांची मदत घेतली होती. संपर्क कार्यालयाबाहेरील प्रवेशद्वारावर बंदोबस्तासाठी यातील काही पोलिस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले होते. पथकाने कार्यालयाची झाडाझडती घेतली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

दरम्यान, एसीबीच्या पथकाने मनमाड-येवला मार्गावरील रामकुंज या भुजबळ यांच्या निवासस्थानीही कारवाई केली. धाडीत नेमके काय आढळले याचा तपशील मिळू शकला नाही. तर भुजबळ यांनी कोणतेही बेकायदा काम केले नसल्याचे शहराध्यक्ष राजाभाऊ पगारे यांनी सांगितले.

नेते पदाधिकारी गायब

भुजबळ फार्महाऊस वर एसीबीचे छापे पडताच काही समर्थकांनी भुजबळ फार्महाऊसकडे धाव घेतली. मात्र सुरू असलेली कारवाई पाहुण्यांसारखी पाहून घेत, तेथून काढता पाय घेतला. कारवाई सुरू असताना जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध आंदोलन सुरू असले तरी, कारवाईची माहिती समजताच अनेकांनी नाशिकमधून बाहेर जाणे पसंत केले. तर काही समर्थकांनी फोन बंद करून लांब राहणे बंद केले. भुजबळांच्या आजूबाजूला फिरणाऱ्या समर्थकांनी ऐनवेळी पाठ दाखवल्याची चर्चा सुरू होती.



मुंबई विभाग

> सुखदा को.ऑ.हौ.सो,वरळी - छगन भुजबळ २०००चौ. फुटांचे घर, टोयोटा कॅमरी कार

> म‌िलेश‌िया अपार्टमेंट, माझगाव - छगन भुजबळ ६०० चौ. फुटांची तीन घरे

> माणेक महल, ५ वा मजला - पंकज भुजबळ १२०० चौ. फूटांचे घर

> माणेक महल, ७ वा मजला - म‌ीना छ. भुजबळ १२०० फुटांचे घर भाड्याने दिलेले

> सागर मंदिर को.ऑ.हौ.सोसायटी, शिवाजी पार्क - ह‌‌िराबाई मगन भुजबळ ६०० चौ. फुटांचे घर

> साईकुंज बिल्डिंग, दादर (पू.) - विशाखा भुजबळ-(१५०० चौ. फूटांचे घर), शेफाली भुजबळ(१२०० चौ. फू.), हिराबाई भुजबळ (१५०० चौ.फू.), म‌ीना भुजबळ (१२०० चौ.फू.), ग्रोथ इन्फ्रा, दुकान(१५०० चौ.फू.)

> सॉल‌िटेअर ब‌िल्ड‌िंग, एस.व्ही. रोड, सांताक्रूझ - समीर भुजबळ (संपूर्ण पाचवा माळा, २५०० चौ.फू.घर) पंकज भुजबळ (सातवा माळा, २५०० चौ.फू.) म‌ीना भुजबळ (आठवा मजला २५०० चौ.फू.)

ठाणे विभाग

> पी एच ७, मारुती एनक्लेव्ह को. ऑ. सो.- पंकज भुजबळ १३५० चौ.फू. घर, तसेच ए विंगमध्ये भुजबळ ग्रुप कंपनीचे एक घर

> मारुती पॅराडाईज को. ऑ. हौ. सो. बी विंग. सीबीडी बेलापूर - दुर्गा भुजबळ १३०५ चौ.फू.घर

> मारुती पॅराडाईज को. ऑ. हौ. सी विंग. सीबीडी बेलापूर - भुजबळ ग्रुप एकूण नऊ गाळे, त्यातील दोन भाड्याने तर सात बंद

> एव्हरेस्ट को.ऑ.हौ. सोसायटी, सीबीडी बेलापूर - पंकज भुजबळ - १३०० चौ.फू.घर

> लाजवंती बंगला, सीबीडी बेलापूर - म‌ीना भुजबळ १३०० चौ.फू. घर

पुणे विभाग

> लोणावळा, मु.पो. आवतन - पंकज भुजबळ, समीर भुजबळ २.८२ हेक्टर जागेत सहा बेडरुमचा अलिशान बंगला, परदेशी फर्न‌िचर, प्राचीन मूर्ती, स्व‌िम‌िंग पूल, हेल‌िपॅड, शेत तळे, तीन नोकरांची घरे, सुरक्षारक्षकांसाठी पाच खोल्या, अंदाजे पाच कोटी क‌िमतीची फळझाडांची लागवड.

> ग्राफीकॉन आर्केड, संगमवाडी फ्लॅट नं. २०८, त‌िसरा माळा, प्लॉट नं. १५३ - समीर भुजबळ - घर



नाश‌िक विभाग

> चंद्राई बंगला, भुजबळ फार्म- म‌ीना भुजबळ - ४००० चौ.फू. बंगला

> भुजबळ पॅलेस - भुजबळ पंकज भुजबळ - ४६५०० चौ. फू. बंगला. किंमत अंदाजे १०० कोटी. २५ खोल्या, स्व‌िम‌िंग पूल व ज‌िम

> येवला - पंकज भुजबळ ५००० चौ.फू. ११ खोल्या

> मनमाड येथे बंगला, ऑफ‌िस - ३००० चौ.फू., पाच खोल्या

> राम बंगला - समीर भुजबळ - १५०० चौ.फू.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्याजाचे पैसे खात्यावर ऑनलाइन द्या

$
0
0

ज्येष्ठांची मागणी; चेक वटविण्यासाठी करावी लागते धावपळ

फणिंद्र मंडलिक, नाशिक

जेष्ठ नागरिकांना पोस्टातून मिळणाऱ्या व्याजाचे चेक वट‌व‌िण्यासाठी तीन दिवसाचा कालावधी लागतो. व्याजाचे पैसे पोस्टाने ऑनलाइन पद्धतीने थेट बँक खात्यात जमा करावे अशी मागणी ज्येष्ठांनी अनेकदा पोस्टाकडे केली आहे. मात्र, पोस्टाचा व्यवहार सुटसुटीत व्हावा यासाठी प्रयत्नच होत नसल्याचे दिसते. यामुळे चेक वट‌विण्यासाठी ज्येष्ठांना पोस्ट आणि बँकेचे उंबरे झिजवावे लागत आहेत.

पोस्टाची सेवा लोकाभिमुख करण्यासाठी सरकार विविध प्रकारचे प्रयत्न करीत असल्याची जाहिरात करीत असते; मात्र प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. योजना चांगल्या असूनही कागदपत्रे आणि पैसे मिळण्यास होत असलेला विलंब त्यामुळे नागरिक अन्य मार्गाचा विचार करत आहे. ज्येष्ठांना व्याजाच्या पैशांचा दर महिन्याला चेक देण्यात येतो हा चेक स्टेट बॅँक ऑफ इंडीयाच्या ट्रेझरी शाखेचा देण्यात येतो. त्यामुळे इतर शाखेत तो टाकता येत नाही. ज्येष्ठ नागरिक चेक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या शाखेत जमा करतात. चेक घेण्यासाठी एक दिवस व तो वटवण्यासाठी दुसरा दिवस असे दोन दिवस एकाच कामासाठी खर्च करावे लागतात. जेष्ठांच्या कोणत्याही खात्यावर मिळणाऱ्या व्याजाचे पैसे हे त्यांच्या थेट खात्यात जमा करावी अशी जेष्ठांची मागणी आहे. मात्र गेल्या अनेक दिवसापासून या मागणीला वाटाण्याच्या अक्षदा दाखवल्या आहेत. अनेकदा ट्रेझरीतून पैसे घेऊन जाताना जेष्ठांना फसवल्याचे प्रकार घडले आहे. शुक्रवारी पोस्टातून चेक मिळाल्यानंतर शनिवार व रविवार थांबावे लागते तो सोमवारी ट्रेझरीत जमा करावा लागतो.

व्याजाचे पैसे थेट बँकेत जमा करावेत यासाठी नाशिक जनरल पोस्ट ऑफिसमध्ये अनेकदा अर्ज केले; मात्र त्याबाबत दखल घेतलेली नाही. - त्र्यंबक पाटील, ग्राहक

सॉफ्टवेअरच्या चुकीमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. लवकरच त्यात बदल करण्यात येत असून, ज्या ग्राहकांना व्याजाचे पैसे थेट आपल्या खात्यात जमा करायचे आहेत अशा ग्राहकांनी संपर्क साधावा. - एस. आर. फडके, मुख्य पोस्ट मास्तर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोलमडले आयडियाचे नेटवर्क

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर शहर व परिसरात मोबाईलचे आयडिया नेटवर्क फेल झाल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. मंगळवार संध्याकाळपासून सदर कंपनीचे नेटवर्क नसल्याने संपर्क साधने अशक्य झाले आहे. कंपनी दाद देत नसल्याने तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न ग्राहकापुढे निर्माण झाला आहे.

मंगळवार संध्याकाळपासून आयडिया मोबाईलचे नेटवर्क गायब होत असल्याने संभाषणात अडचणी येत होत्या. संभाषण पूर्ण न होणे, मधेच आवाज गायब होऊन संपर्क तुटणे अशा तक्रारी अनेक ग्राहकांनी केल्या. त्यानंतर रात्रीपासून नेटवर्क गायब झाल्याने ग्राहकांचा एकमेकांशी संपर्कच होत नव्हता. बुधवारी रात्रीपर्यंत हीच परिस्थिती कायम असल्याने ग्राहकांचा संताप झाला होता.

बीएसएनएल व इतर मोबाईल सेवांपेक्षा आयडियाचे नेटवर्क चांगले असल्याने ग्राहकांनी आयडियाचे कनेक्शन घेतले, तर अनेकांनी पोर्टेबिलिटी करून आयडियाचे कनेक्शन घेतले. मात्र, वाढत्या ग्राहकांना सेवा देण्यास आयडिया कंपनी असमर्थ ठरली. गेल्या चोवीस तासांत एकमेकांशी संपर्क साधने अशक्य झाल्याने त्याचा व्यापारावर मोठा परिणाम झाला. नेटवर्कमध्ये अडचणी असल्याने ग्राहकांनी मोबाईल स्टोअर्स व रिचार्ज करणाऱ्या दुकानदारांकडे धाव घेतली. याबाबत कंपनीकडे संपर्क साधला याप्रकरणी समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिल्या उड्डाणाला आठवडाभर प्रतीक्षा

$
0
0

२२ जूनला होणार घोषणा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक ते पुणे ही विमानसेवा सुरु होण्यासाठी नाशिककरांना आणखी एक आठवड्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. या आठवड्याच्या अखेरीस सीप्लेन सज्ज होणार असून उड्डाणाची तारीख येत्या सोमवारी (२२ जून) मेहेर कंपनीकडून जाहीर केली जाणार आहे.

नाशिककरांना विमानसेवेची मोठी उत्कंठा आहे. मात्र, विविध कारणांमुळे या सेवेचा मुहूर्त लांबणीवर पडत आहे. मेहेर कंपनीने नाशिक ते पुणे ही सेवा सुरु करण्याचे घोष‌ित केले. त्यानुसार १५ जूनपासून ही सेवा सुरु होणार होती. मात्र, मुंबईत झालेल्या वादळी पावसामुळे सीप्लेनच्या आत मोठ्या प्रमाणात आर्द्रता जमा झाली आहे. त्यामुळे १५ जूनपासून ही सेवा सुरु न करता ती लांबणीवर टाकण्याचा निर्णय कंपनीने जाहीर केला. सध्या या विमानातील आर्द्रता काढण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी आवश्यक काही पार्टस परदेशातून मागविण्यात आल्याचे मेहेरचे संस्थापक आणि संचालक सिद्धार्थ वर्मा यांनी सांगितले आहे. या आठवड्याच्या अखेरीस ९ आसनी सीप्लेन सज्ज होणार आहे. मात्र, सेवा कधीपासून सुरु करायची याची घोषणा येत्या २२ जूनला करण्याचे मेहेरने निश्चित केले आहे. त्यानुसार येत्या २४ किंवा २५ जूनपासून ही सेवा सुरु होण्याची शक्यता आहे.

सुरक्षेला प्राधान्य

सुरक्षेला आम्ही प्राधान्य देतो. विमानात आर्द्रता असली तरी सेवा देता आली असती. पण, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आम्ही सेवा न सुरु करता विमानातील आर्द्रता काढत आहोत, असे वर्मा यांनी सांगितले. सध्या पावसाळा असला तरी सेवा सुरु केल्यानंतर पुन्हा अशा प्रकारचा प्रश्न उदभवणार नाही याची काळजी घेत आहोत, असेही वर्मा यांनी स्पष्ट केले.

प्रवाशांना पैसे परत

१५ जूनपासून सेवा सुरु होणार असल्याने मेहेर कंपनीने ११ जूनपासूनच बु‌किंग सुरु केले होते. त्यानुसार जवळपास २५ जूनपर्यंतच्या तिकीटाचे बु‌किंग प्रवाशांनी केल्याचे तानचे अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी सांगितले. जवळपास ५० प्रवाशांना पुणे विमान सेवेसाठी तिकीट बुक केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या सर्व प्रवाशांना पैसे परत देण्याची नामुष्की मेहेर कंपनीवर ओढावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा प्रशासन ‘गॅसवर’

$
0
0

सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत पेट्रोलियम मंत्रालयाकडे करावा लागणार पाठपुरावा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थात आखाड्यांसाठी गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावे लागणार असले तरी त्यासाठीचे ‌निकष न ठरल्याने हा विषय मार्गी लावण्यात अडचणी येत आहेत. आखाड्यांना सवलतीच्या दरात सिलेंडर हवे असले तरी त्यासाठी अनुदानाची रक्कम ग्राहकाच्या खात्यावर जमा करणे अनिवार्य असल्याने प्रशासनच पेचात पडले आहे. हा विषय केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवरील असल्याने तेथेच पाठपुरावा करण्याचे निश्चित झाले आहेत.

सिंहस्थ काळात नाशिकमध्ये सुमारे पाच लाख साधुमहंत येतील असा अंदाज आखाडा परिषदेचे महंत ग्यानदास यांनी व्यक्त केला आहे. या आखाड्यांमधून तयार होणाऱ्या महाप्रसादासाठी त्यांना अन्न धान्याबरोबरच केरोसिन, गॅस सिलेंडरची आवश्यकता भासणार आहे. त्यांना गहू, तांदूळ, साखर यांसारखा शिधा आणि केरोसिन आणि गॅस सिलेंडरसारख्या इंधनाचा पुरवठा करण्याची जबाबदारी पुरवठा विभागावर सोपविण्यात आली आहे.

सिंहस्थात आखाड्यांसाठी २१०० मेट्रीक टन गहू आणि १४०० मेट्रीक टन तांदूळ पुरविण्यास सरकारने मान्यता दिली आहे. परंतू या काळात मिष्टान्नासाठी साखरेचीही गरज भासणार असून, तिचा नेमका ‌किती पुरवठा केला जाणार हे अद्याप येथील पूरवठा विभागालाच स्पष्ट होऊ शकलेले नाही. अशीच परिस्थिती केरोसिनबाबतही आहे. आखाड्यांच्या स्वयंपाकगृहात केरोसिनची देखील गरज भासणार असून, राज्य सरकार किती केरोसिन उपलब्ध करून देणार हे देखील स्पष्ट झालेले नाही.

सर्वात मोठा पेच गॅस सिलेंडरसाठी किती पैस आकारावेत या प्रश्नामुळे उभा राहिला आहे. सवलतीच्या दरात सिलेंडर मिळावेत अशी आखाड्यांची मागणी आहे. परंतू सिलेंडरसाठी विशिष्ट रक्कम आकारल्यानंतर सरकारकडून अनुदान रुपाने परत मिळणारी रक्कम कोणाच्या बँक खात्यात जमा करावी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्थानिक पातळीवर हा प्रश्न सुटण्यासारखा नसल्याने राज्यसरकारला केंद्रात पेट्रोलियम मंत्रालयाशी बोलून हा प्रश्न मार्गी लावावा लागणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भुजबळांच्या राजीनाम्यासाठी सेना आक्रमक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध गैरव्यवहारांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी शिवसेनेने केली आहे. नैतिक जबाबदारी स्वीकारून भुजबळांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा प्रांतांना निवेदनाद्वारे दिला आहे.

आमदार छगन भुजबळ हे मागील बारा वर्षांपासून येवला विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. येवल्याची मान सध्या भुजबळांच्या कारनाम्यांमुळे शरमेने खाली गेल्याचे शिवसेनेने

निवेदनात म्हटले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून संपूर्ण राज्यात मंगळवारी भुजबळांच्या मालमत्तेची चौकशी केली गेली. हजारो कोटी रूपयांची मालमत्ता असल्याचे पुढे आले. घोटाळा आणि भुजबळ हे समीकरण राज्यात चर्चेला आले असून, यामुळे येवल्याची बदनामी होत असल्याचेही शिवसेनेने निवेदनात म्हटले आहे. नैतिक जबाबदारी स्वीकारून भुजबळांनी आमदारकीचा तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रांत वासंती माळी यांच्याकडे करण्यात आली आहे. पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार, जिल्हा उपप्रमुख वाल्मिक गोरे, तालुकाप्रमुख झुंजार देशमुख, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, माजी तालुकाप्रमुख भास्कर कोंढरे, तालुका उपप्रमुख चंद्रकांत शिंदे, शहर संघटक राहुल लोणारी, पंचायत समिती सदस्य दिलीप मेंगळ, रवी काळे, विठ्ठल पिंपळे, सर्जेराव सावंत, कैलास घोरपडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबक पालिकेत पुन्हा मनसे

$
0
0

नगराध्यक्षपदी अनघा फडके, उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे कदम विजयी

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव करीत मनसेचा विजय झाला आहे. मनसेच्या अनघा नारायण फडके, तर उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे संतोष कदम विजयी झाले. भाजपच्या तृप्ती धारणे यांना एका मताने पराभव स्वीकारावा लागला आहे. मनसेने त्र्यंबक शहरावर आपले वर्चस्व पुनश्च प्रस्थापित केले आहे.

१७ नगसेवकांच्या सभागृहात मनसेचे ६, शिवसेना १ आणि अपक्ष दोन असा ९ सदस्यांचा सत्तारूढ गट तयार झाला आहे. तर विरोधी गटात राष्ट्रवादी ४ भाजपा १ काँग्रेस ३ असे आठ नगरसेवक उरले आहेत. सहा महिन्यांपूर्वी मनसेची सत्ता राष्ट्रवादीने हिरावली होती. त्यावेळेस तयार झालेल्या गटास भाजपाच्या तृप्ती धारणे या तेव्हाच्या सत्तेत असलेल्या मसने गटाकडून विरोधकांना जावून मिळाल्या होत्या. याचा वचपा काढण्यासाठी विरोधात असलेल्या मनसेने व त्यांच्या सहकारी इतर नगरसेवकांनी अनघा फडके यांना उमेदवारी दिली व त्यांचा अर्ज दाखल करतांनाच चमत्कार घडवून सत्तारूढ गट फोडण्याचा मनसुबा जाहीर केला होता. दरम्यान अर्ज स्विकृतीच्या अखेरच्या दिवशी भाजपा गटातील राष्ट्रवादीच्या अंजना कडलग यांना नगराध्यक्षपद देण्याचे व सर्व ६ मनसे नगरेसवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अर्थात तसे घडले नाही. अखेरच्या क्षणाला भाजपच्या गटातील विजया लढ्ढा यांना उमेदवारी देवून नगराध्यक्षपद देण्याचे व भाजपचा पराभव करण्याचे ठरले. परंतु, लढ्ढा अर्ज दाखल करण्यासाठी वेळेत पोहचल्या नाहीत. त्याच वेळेस सत्तारूढ गटास सुरूंग लागल्याची चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, भाजपाच्या तृप्ती धारणे आणि त्यांचे समर्थक नगरसेवक असा ८ नगरसेवकांचा गट अज्ञातस्थळी सहलीसाठी गेलेला होता. परंतु, त्याच गटातील लढ्ढा त्यांच्यासोबत गेलेल्या नव्हत्या. दोन दिवसांपासून लढ्ढा यांच्यावर मनसेच्या बाजूने मतदान करण्यासाठी दबाव होता अशी चर्चा शहरात सुरू हाती.

ओढाताण व हाणामारी

दुपारी १२च्या सुमारास भाजपच्या तृप्ती धारणे आणि त्यांचे समर्थक असा आठ नगरसेवकांचा गट येथे दाखल झाला. त्यानंतर काही वेळातच मनसेच्या अनघा फडके आणि त्यांचे समर्थक असा ९ नगरसेवकांचा गट येथे दाखल झाला. नगरपालिका कार्यालयात प्रवेश करताना त्यांच्यासोबत असलेल्या विजया लढ्ढा यांना बळजबरीने समोरच्या गटात सामील केले आहे त्यांना आमच्या ताब्यात द्या, असे भाजपाच्या गटाच्या बाजूस असलेल्या काँग्रेस नगरसेविका सिंधु मधे यांनी तेथे उपस्थितांना जाब विचारत अडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तेथे असलेले नगरसेवक व समर्थक कार्यकर्ते यांच्यात एकच धुमश्चक्री सुरू झाली. जिल्हा पोलीस उपअधीक्षक व इतर पोलिस अधिका-यांसमोरच हा प्रकार सुरू झाला. पोलिसांना हे सर्व आवरणे कठीण झाले होते. पोलिसांनी दोन्ही गटाच्या सदस्यांना सभागृहात जाण्यास भाग पाडले. तेथेही हमरीतुमरी होत असल्याने पोलिस सभागृहात गेले. प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी हात उंचावून मतदान घेतले. अनघा फडके यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यानंतर उपनगराध्यक्षांची निवड पार पडली. सत्तारूढ झालेल्या गटाचे शिवसेना नगरसेवक संतोष कदम विजयी झाले. विरोधी गटाचे ललित लोहगावकर यांचा पराभव झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण समितीसाठी स्मरणपत्र

$
0
0

निवडणूक घेण्याची महापालिकेची विनंती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका शिक्षण समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकी सदंर्भात महापालिकेन विभागीय आयुक्तांना स्मरणपत्र पाठविले आहे. उच्च न्यायालयाने शिक्षण समितीवरील स्थगिती उठविल्यानंतर महापालिकेने निवडणूक घेण्यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडे पत्र पाठवून तात्काळ प्रक्रिया राबविण्याची विनंती केली आहे. दरम्यान, सभापतीपदासाठी अपक्ष गटनेते संजय चव्हाण यांनी जोरदार फिल्डींग लावली असून शिवसेना भाजपही रणनीती तयार करत आहेत.

शिक्षण समितीच्या सभापतीपदाच्या निवडणूक प्रक्रियेवरील स्थगिती उच्च न्यायालयाने उठविली आहे. त्यासंदर्भातील आदेश महापालिकेला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे महापालिकेन पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबविण्याची विनंती विभागीय आयुक्तांकडे केली आहे. निवडणूक घेण्यांसदर्भातील प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे अगोदरच पाठविण्यात आला आहे. मात्र, तक्रारी आणि स्थगितीमुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली नव्हती. आता तात्काळ निवडणूक प्रकिया राबवावी अशी विनंती महापालिकेने विभागीय आयुक्तांना केली आहे. त्यामुळे निवडणूक लवकरच लागण्याची शक्यता असून सभापतीपदासाठी हालचाली सुरू झाल्या आहे. सत्ताधारी गटाच्या वतीने अपक्ष गटनेते संजय चव्हाण यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना भाजपानेही निवडणुकीसाठी व्यूहरचना आखायला सुरुवात केली असून पश्चिम प्रभाग समितीप्रमाणेच चमत्काराची तयारी सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रॉम्प्टन ग्रीव्हजचा तिढा सुटेना!

$
0
0

औद्योगिक न्यायालयात आज पुन्हा सुनावणी

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

एकाच विचारधारेच्या दोन युनियनमध्ये वर्चस्वाच्या वादातून सुरू असलेल्या क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीचा तिढा सुटणार कधी? असा प्रश्न आंदोलनात सहभागी झालेल्या कामगारांना पडला आहे. औद्योगिक न्यायालयात या मुद्यावरून तारीख पे तारीख सुरू आहे. आता पुढील सुनावणीसाठी गुरुवारची (दि. १८) तारीख देण्यात आली आहे.

आयटक व सिटू या दोन युनियनच्या कामगारांच्या वादात क्रॉम्प्टन कंपनीतील कामगारांचे आंदोलन ४० दिवसांपासून सुरू आहे. यात कंपनी व्यवस्थापन व सिटू युनियनच्या संग्लन असलेल्या कामगारांची औद्योगिक न्यायालयात सुनावणी सुरु आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीत देखील १८ जूनची तारीख देण्यात आली आहे. यामुळे आंदोलन करणाऱ्या कामगारांच्या मागणी मान्य होणार का? की कंपनी व्यवस्थापनाची बाजू वरचढ ठरणार याकडे नाशिकमधील औद्योगिक जगताचे लक्ष लागून आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या कामगारांना लवकरच तिढा सुटण्याची आस लागलेली आहे. यात नाशिक एमआयडीसी क्षेत्रात नावाजलेल्या क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीच्या प्रवेशद्वारावर महिन्याभरापासून कामगार आंदोनल करीत असल्याने आर्श्चय व्यक्त केले जात आहे. यासाठी कंपनी व्यवस्थापन व दोन्ही कामगार युनियन यांनी समझोता करीत कामगारांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी कामगार वर्गातून केली जात आहे.

कंत्राटी कामगार का?

दरम्यान, औद्योगिक न्यायालयात वादावर सुनावणी सुरू असतांना क्रॉम्प्टनमधील कामगार संघटनांपैकी सिटूने गुरुवारी युक्तीवाद केला. सिटूच्या वकिलांनी कामगार आपल्या हक्कासाठी आंदोलन करीत असतांना कंपनी व्यवस्थापन कंत्राटी कामगारांना का आणत आहे? त्यांच्या माध्यमातून कंपनीत कामे का केली जात आहेत? असा प्रश्न उपस्थित केला.

'गेगा इन्फोटेक'चे कामगार आक्रमक

सातपूर एमआयडीसीतील गेगा इन्फोटेक कंपनी व्यवस्थापनाकडून अडीच महिन्यापासून वेतन मिळत नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. कंपनीतील उर्वरित ५० कामगारांनी आपल्याला कामावर परत घेण्यासाठी मागणी कामगार उपायुक्तांकडे केली आहे.

त्र्यंबक रोडवरील आयटीआय सिग्नलवरील उद्योग भवनात कामगार उपायुक्त कार्यालयाच्या खालील मजल्यावर गेगा इन्फोटेक प्रा. लिमिटेड कंपनी आहे. कंपनीतील कामगारांना सरकारी नियमानुसार सुविधा दिल्या जात नसल्याने तक्रारी कामगारांनी यापूर्वी कामगार उपायुक्त आर. एस. जाधव यांच्याकडे अनेकदा केल्या. कंपनी व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य होत नसल्याचे सांगत कामगारांनी सिटू युनियनचे सभासत्व स्वीकारले. मात्र, यानंतर व्यवस्थापनाकडून अधिक छळ सुरू झाल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. अंतर्गत संघर्ष शिगेला पोचल्यामुळे दीड वर्षांपासून कंपनी बंद होती. दरम्यान, अडीच महिन्यापूर्वी कंपनी व्यवस्थापनाने सिटू कामगार युनियनशी चर्चा केल्यानंतर कंपनी पुन्हा सुरू केली होती. यात १० कामगारांना पहिल्या टप्प्यात आणि उर्वरित ५० कामगारांना पुढील टप्प्यात घेण्याचे ठरले. मात्र, जुनेच मुद्दे पुढे करीत कंपनी व्यवस्थापन त्रास देत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. वेतन वेळेवर मिळत नसल्याचाही मुद्दा कामगारांनी पुढे केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळांची उंचावली श्रेणी

$
0
0

साडेचार हजार शाळा 'अ' व 'ब' श्रेणीत; त्रिसूत्रीद्वारे गुणवत्ता वाढ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या अभियानाच्या फलनिष्पत्तीत सुमारे साडेचार हजार शाळांनी 'अ' आणि 'ब' श्रेणीत नव्याने प्रवेश केला आहे. अस्तित्वासाठी झगडण्याची वेळ बहुतांश शाळांवर येऊन ठेपत असताना विभागात अभियानाने दिसून आलेल्या बदलाने आशावादी संदेश दिला आहे.

सुमारे चार वर्षांपासून इयत्ता आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण न करता उत्तीर्ण करण्याच्या धोरणानेही चुकीचा संदेश जनमाणसात गेला होता. परिणामी होणारी गुणवत्तेची घसरण रोखण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता विकास कृती कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. विभागातील ११ हजार ३५४ शाळांसाठी 'शैक्षणिक गुणवत्ता विकासाचा विद्यार्थी', 'शिक्षक व शाळा श्रेणीसुधार प्रभावी पर्यवेक्षण', 'शिष्यवृत्ती परीक्षा' असा त्रिसूत्री कार्यक्रम निश्चित करून राबविण्यात आला. या अभियानाच्या अंतिम मूल्यमापन चाचणीत फलनिष्पत्ती समोर आली आहे. विद्यार्थ्यांचे वर्ग शिक्षकांमार्फत 'अ', 'ब', 'क' आणि 'ड' असे चार श्रेणीत वर्गीकरण करण्यात आले होते.

विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व अहमदनगर या पाच जिल्ह्यांतील इयत्ता दुसरीच्या गणित विषयात 'अ' श्रेणीतील विद्यार्थ्यांची वाटचाल २६.३६ वरून ३७.८ टक्क्यांवर गेली. 'ब' श्रेणीतील विद्यार्थ्यांची वाटचाल १८.७२ वरून २४.२८ टक्क्यांवर गेली. तर 'क' श्रेणीतील विद्यार्थ्यांची प्रगती २३.६४ वरून २२.१४ टक्के इतकी घसरली. 'ड' श्रेणीतील विद्यार्थ्यांची टक्केवारी ३१.२९ वरून १६.५० टक्के इतकी घटली. 'क' आणि 'ड' श्रेणीतील विद्यार्थ्यांचा दर्जा वाढण्यासोबतच 'अ' व 'ब' श्रेणीतील विद्यार्थ्यांच्या टक्केवारीमध्ये ४२.८ वरून ६१.३६ इतकी वाढ झाली. तर 'क' आणि 'ड' श्रेणीतील विद्यार्थी टक्केवारीमध्ये ५४.९३ वरून ३८.६४ इतकी घट झाली. अशाच प्रकारे चौथी ते आठवी या इयत्तेतील विद्यार्थ्यांची श्रेणी व गुणवत्ता यामध्ये कमीअधिक प्रमाणात वाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या उपक्रमात ११ हजार ३५४ शाळांपैकी किमान ६० टक्के म्हणजे ७ हजार १३ शाळा 'अ' आणि 'ब' श्रेणीत आणण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. 'क', 'ड' आणि 'इ' श्रेणीत ८ हजार ७१६ शाळा होत्या. यात घट होऊन वर्षभरात ही संख्या ४ हजारांवर आली आहे. 'अ' आणि 'ब' श्रेणीतील शाळांच्या संख्येत २ हजार ६६० वरून ७ हजार १५९ पर्यंत आलेख वाढला आहे.

प्राथमिक स्तरावरील शिक्षणात विद्यार्थ्याचा सर्वंकष विकास होणे अपेक्षित आहे. प्रत्येक जिल्ह्यात कृती तपासणी पथके गठीत करून शिक्षण हक्क अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासाठी शाळांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. - एकनाथ डवले, विभागीय आयुक्त, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॉलिटेक्निकचे प्रवेश सुरू

$
0
0

नाशिक विभागामध्ये २८ हजार जागा उपलब्ध; अर्ज करण्यास २९ जूनपर्यंत मुदत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अकरावीच्या प्रवेश अर्ज प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी शहरातील हजारो विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्यानंतर पाठोपाठ पॉलिटेक्निकच्या प्रवेशाचा जोर दिसून येत आहे. या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून २९ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील. पॉलिटेक्निक प्रवेशांची पहिली मेरीट लिस्ट १ जुलै रोजी जाहीर होणार आहे. या प्रवेशासाठी नाशिक विभागातून सुमारे २८ हजार जागा उपलब्ध आहेत.

यंदा वाढलेल्या गुणवत्तेच्या परिणामी अकरावीच्या वर्गातील प्रवेशांसाठीची स्पर्धाही वाढणार आहे. शिवाय बारावीनंतर इंजिनीअरिंगच्या प्रवेशासाठीची परीक्षा आणि अनिश्चितता या प्रक्रियेला छेद देऊन पॉलिटेक्निकच्या माध्यमातून इंजीनिअरिंगचा रस्ता गाठण्याचाही पर्याय विद्यार्थी स्वीकारत आहेत. यामुळे पॉलिटेक्निकच्या प्रवेशांसाठीही यंदा तीव्र स्पर्धा असणार असल्याचे चित्र आहे.

या प्रवेशांसाठी जिल्हाभरात एकूण ३५ एआरसी सेंटर (अॅप्लिकेशन ‌रिसीव्हींग सेंटर) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यातील १४ सेंटर्स नाशिकमध्ये असून जिल्हाभरात २१ सेंटर्स उपलब्ध आहेत. 'डीटीई'च्या (डायरेक्टोरेट टेक्निकल एज्युकेशन) वेबसाइटवर या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील वेळापत्रक व सूचना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या वेबसाइटवर प्रवेशाचीही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. विभागात डिप्लोमा इंजीनिअरिंगच्या सुमारे २५ हजार जागा, फार्मसी डिप्लोमाच्या ३ हजार २०० जागा तर हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा या अभ्यासक्रमाच्या सुमारे ३५० जागा उपलब्ध आहेत.

पॉलिटेक्निक प्रवेशासाठी महत्त्वाच्या तारखा > एआरसी सेंटर संख्या : १४ (शहर), २१ (जिल्हा) अर्ज करण्याची मुदत : १६ जून (सुरुवात) ते २९ जून (अंतिम दिनांक) > मेरीट लिस्ट प्रसिध्दी : १ जुलै > कागद पडताळणी : २ जुलै > कागदपत्र पूर्तता मुदत : ४ जुलै > अंतिम मेरीट लिस्ट : ६ जुलै > प्रवेश निश्चिती : ७ ते १० जुलै

एआरसी सेंटर (जिल्हा)

> नेमिनाथ जैन पॉलिटेक्निक, चांदवड

> जुम्मा मशिद चॅरिटेबल ट्रस्ट पॉलिटेक्निक, वडाळारोड

> व्ही. एन. नाईक पॉलिटेक्निक, कॅनडा कॉर्नर

> भाऊसाहेब हिरे स्मरणिका समिती ट्रस्ट, मालेगाव

> श्री महावीर एज्युकेशन टेक्नॉलॉजी, वरवंडी, दिंडोरी

> जगदंबा एज्युकेशन सोसायटी, बाभुळगाव, येवला

> ब्रह्मा व्हॅली पॉलीटेक्निक, अंजनेरी

> के. के. वाघ पॉलिटेक्निक, चांदोरी, निफाड

> गुरूकुल एज्युकेशन सोसायटी, नांदगाव

> लोकनेते गोपाळराव गुळवे पॉलिटेक्निक, विल्होळी

> त्र्यंबकराव शेजवळ इन्स्टिट्यूट, मनमाड, नांदगाव

प्रमुख एआरसी सेंटर्स यादी : (शहर)

> शासकीय तंत्रनिकेतन, सामनगाव > के. के.वाघ पॉलिटेक्नीक, पंचवटी > के. के. वाघ महिला पॉलिटेक्निक > गुरू गोविदंसिंह फाऊंडेशन, इंदिरानगर > संदीप फाऊंडेशन, महिरावणी > मेट इन्स्टिट्यूट, भुजबळ नॉलेज सिटी ,आडगाव > राजश्री शाहू महाराज पॉलिटेक्निक, उदोजी मराठा बोर्डिंग, गंगापूर रोड > मातोश्री एज्युकशन पॉलिटेक्निक, एकलहरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दडवला बक्षिसाचा प्रायोजक !

$
0
0

बागेश्री वाद्यवृंदांकडून सणसणीत आरोप

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ज्यांच्या कल्पनेने व आर्थिक सहकार्याने पार्श्वसंगीताचा प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार सुरू करण्यात आला त्या बागेश्री वाद्यवृंदाला या श्रृंखलेतून बाजूला करीत निनावी पुरस्कार देण्याचा हास्यास्पद प्रकार नाट्य परिषदेने केला आहे. या प्रकरणी 'बागेश्री'च्या संचालकांनी नाराजीचे अस्त्र परजले असून, बक्षिसाची रक्कम आपण प्रायोजित करूनही आपल्यावर हा अन्याय का असा सवाल बागेश्रीकडून करण्यात आला आहे.

शहराच्या सांस्कृतिक कला क्षेत्रात नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच बालकलाकारांसाठी तसेच नृत्य नाट्य क्षेत्रातील उत्साही आणि सतत प्रयत्नशील असलेल्या युवकांना बागेश्री वाद्यवृंदातर्फे नेहमीच प्रोत्साहन मिळावे या हेतूने रोख स्वरूपात बक्षिसे, प्रशस्तीपत्रके दिली जातात. त्याचाच एक भाग म्हणून नाट्य परिषदेतर्फे होणाऱ्या राज्यस्तरीय कै. अनंत कुबल एकांकिका स्पर्धेत यापूर्वी नसलेल्या पार्श्वसंगीताचा पुरस्कार देण्याबाबत बागेश्रीने सुचविले. केवळ त्यावर न थांबता या पुरस्कारासाठी ११११ इतकी रक्कम प्रायोजित केली. नाट्यपरिषदेनेही त्यास होकार देऊन त्याप्रमाणे पुरस्कार सुरू करण्याबाबत चर्चा करून तसे पुरस्कार सुरूही केले.

नाट्यपरिषदेला एकांकिका स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत प्रथम क्रमांकासंबंधी सविस्तर पत्र व धनादेश बागेश्रीने नाट्यपरिषदेला सुपूर्द केला. हा धनादेश बँक ऑफ बडोदामध्ये वटवण्यातदेखील आला. यंदाच्या वर्षीच्या एकांकिका स्पर्धेमध्ये पार्श्वसंगीताचे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देण्यातही आले मात्र हे पुरस्कार देताना त्याच्या प्रायोजकाचा साधा उल्लेखही नाट्य परिषदेने केला नाही. याचवेळी इतर पुरस्कारांसाठी असलेल्या प्रायोजकांचा उल्लेख तर केलाच त्यासह त्यांच्या प्रतिनिधीला व्यासपीठावर बोलावून त्यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. असा दुजाभाव का झाला असा सवाल बागेश्री वाद्यवृंदाने केला आहे.

नाट्यपरिषदेचे विविध उपक्रम अतिशय चांगले आहेत यात शंका नाही. जो तो व्यक्ती नाट्यपरिषदेच्या उपक्रमांना निरनिराळ्या स्वरूपात मदत करीत असतो, परंतु त्याचे नाव नाट्य परिषद त्या उपक्रमाला देते किंवा श्रेय तरी देते मग आमच्याच बाबतीत लपवणूक का झाली अशी विचारणा बागेश्रीतर्फे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रायोजक असतानाही या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमासाठी साधे निमंत्रणही पाठविण्यात आले नाही तसेच हे पुरस्कार कुणाला देण्यात आले याबाबत कळविण्याचे साधे सौजन्यही दाखवले नाही. नाट्यपरिषदेच्या या एकुणच व्यवस्थापनाबद्दल बागेश्री वाद्यवृंदांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

गेल्या दोन वर्षांपासून परिषदेच्या कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्य असूनही व प्रत्येक कामात त्यांना मोलाचे सहकार्य करूनही परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून अशी वागणूक मिळत असल्याचे वाईट वाटते. प्रायोजक म्हणून माझ्या नावाचा आग्रह नाही परंतु बागेश्रीच्या नावाचा उल्लेख बक्षिस वितरणाच्या यादीत व्हायला हवा होता. - चारूदत्त दीक्षित, संचालक, बागेश्री वाद्यवृंद

बागेश्रीने स्पॉन्सरशीप दिलेली आहे, हे पुरस्कारानंतरच्या मिटिंगला कळाले. त्यांनी याबाबत कोणताही पाठपुरावा ठेवलेला नाही. त्यांचा चेकही कमी पैशांचा होता. परंतु आता सप्टेंबरमध्ये जी बालनाटय स्पर्धा होणार आहे त्यात त्यांना स्पॉन्सर करणार आहोत. त्यांनी पाठपुरावा ठेवणे गरजेचे होते. - सुनील ढगे, कार्यवाह, नाट्य परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मृग’ कोरडेच; शेतकरी धास्तावला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खरीप पिकांसाठी फायदेशीर मानले जाणारे मृग नक्षत्र कोरडेच जाऊ लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरीप पिकांच्या पेरणीसाठी मशागतीला सुरूवात झाली असली तरी पावसाने दडी मारल्यामूळे शेतकऱ्यांचे डाळे आकाशाकडे लागले आहेत.

रब्बी हंगामात आलेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमूळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. हाती आलेली पिके डोळ्यादेखत आडवी झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी पुरता झोपला. रब्बी हंगाम हातचा गेला असला तरी शेतकऱ्याचे डोळे खरीप हंगामाकडे लागले आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील सिन्नर, येवला, चांदवड, इगतपूरी, त्र्यंबकेश्वर तालूक्यांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला. त्याने खरीप पूर्व मशागतीला सुरूवात केली. शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला असता पावसाने पुन्हा दडी मारली आहे. जून महिना सुरू होऊन पंधरवडा तर मृग नक्षत्र सुरू होऊन आठवडा उलटला असून, अजूनही अपेक्षेप्रमाणे पाऊस पडत नसल्याने खरीपाच्या पेरण्या लांबणीवर पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ८ जूनपासून सुरू झालेले मृग नक्षत्र २२ जूनपर्यंत राहणार आहे. त्यानंतर आद्रा नक्षत्राला सुरूवात होणार आहे. खरीपाच्या पिकांसाठी फायदेशीर समजले जाणारे मृग नक्षत्र कारडेच जाऊ लागल्याने शेतकऱ्यांची धाकधुक वाढली आहे. कोकण परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी जिल्ह्यात १ ते १७ जून या कालावधीत ७३१ मिलीमीटर म्हणजेच ४.६ टक्के एवढाच पाऊस झाला आहे.

शुक्रवारपासून पाऊस?

राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात शुक्रवारपासून पावसाला सुरूवात होईल तसेच कोकण आणि गोव्यात शनिवारपासून पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी सध्या राज्यातील बहुतांश भाग व्यापल्याने पावसाच्या हलक्या सरींवर नागरिकांना समाधान मानावे लागते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकत्व ‘एल अॅन्ड टी’कडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बुधवारी गंगापूर रोडवरील इतिहास संग्रहालयाची पाहणी केली असून, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सहकार्यातून या इतिहास संग्रहालयाचा विकास केला जाणार आहे.

सोबतच फाळके स्मारकासंदर्भात एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, फाळके स्मारकाचे पालकत्व 'एल अँड टी'ने घेण्याची तयारी दर्शवली आहे. तर शहरातील सर्व आयलँड एक सारखेच असावेत अशा सूचना त्यांनी महापौरांसह अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

राज ठाकरे आणि बाबासाहेब पुरंदरे यांचे पुत्र प्रसाद पुंरदरे यांनी बुधवारी गंगापूर रोडवरील इतिहास संग्रहालयाची पाहणी केली. या संग्रहालयाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे पुरंदरे यांनी या संग्रहालयाचे पुर्नज्जीवन करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. त्यामुळे पुरंदरेंचे पुत्र प्रसाद यांनी ठाकरेंसोबत या संग्रहालयाची पाहणी केली. या संग्रहालयाचे संपूर्ण सादरीकरण आता बाबासाहेब पुरंदरे यांच्यासमोर केले जाणार असून, त्यानंतर संग्रहालयाचे रुप पालटणार आहे.

एल अँड टी कंपनीनेही सीएसआर फंडातून नाशिकमध्ये काम करण्याची तयारी दर्शवली असून, फाळके स्मारकाचे पालकत्व घेण्याची तयारी दर्शवली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी राज ठाकरेंसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी फाळके स्मारक, इतिहास संग्रहालय आणि गोदापार्कची पाहणी केली. संबंध‌ित अधिकारी आता कंपनीच्या अधिकाऱ्यांसमोर आपले प्रेझेंटेशन सादर करणार आहे. एल अॅन्ड टीने विशेषता फाळके स्मारकाच्या विकासात रस दाखवला आहे. त्यामुळे स्मारके रुप पालटण्याची शक्यता आहे.

गंगापूर धरणालगत असलेल्या आर्किटेक्चर धनजंय शिंदे यांच्या कार्यालयाला भेट देऊन तिथल्या विविध आकर्षक डिझाइनची पाहणी केली. सोबतच शहरात नव्याने निर्मित होत असलेल्या आयलँड संदर्भात त्यांनी आर्किटेक्चर्सची चर्चा केली. शहरातील ऑयलँड कमी खर्चात चांगले व आकर्षक करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्यात.

सर्व आयलँडचा आकार सारखाच असावा असे त्यांनी महापौरांसह अधिकाऱ्यांना सुचवले. शिंदे यांच्याकडे असलेल्या आकर्षक डिझाईन्स शहरातील गार्डन्समध्ये वापरण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्यात. ठाकरेंसोबत महापौर अशोक मुर्तडक, उमहापौर गुरूमीत बग्गा, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, शहराध्यक्ष अॅड. राहुल ढिकले, शशिकांत जाधव, सलिम शेख उपस्थित होते.

एंट्री पॉईंटस एकसारखेच असावेत

राज ठाकरेंनी आर्किटेक्टर्सची चर्चा करताना शहरातील सर्व एंट्री पॉईंटस एक सारखेच असावेत असे आदेश दिलेत. सोबतच एकाच रस्त्यावरून वेगवेगळे होणारे रस्त्यांच्या कॉर्नरही एकसारखा डिझाईनबद्दल करण्याच्या सुचना ठाकरेंनी यावेळी दिल्यात. सोबतच मुंबई नाक्यावरील आयलँडची उंची कमी करून ते अधिक आकर्षक कसे करता येतील ते पहा असे आदेश त्यांनी दिले. तर सर्व गार्डन्समध्ये चाफ्याची रोपे जास्तीत जास्त लावा अशा सूचना त्यांनी यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासींना इंग्रजी शाळांची नकारघंटा!

$
0
0

विनोद पाटील, नाशिक

पूर्वापारपासून दुर्लक्षित राहिलेल्या आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नांना राज्यातील नामांकित इंग्रजी शिक्षण संस्थांनी सुरूंग लावला आहे. यंदा २५ हजार आदिवासी मुलांना इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश देण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्प या संस्थांच्या प्रतिसादाअभावी बारगळणार आहे. २५ हजार मुलांसाठी ५०० शिक्षण संस्थाची गरज असतांना अवघ्या २१५ शाळांनी त्यास प्रतिसाद दिला आहे.

महत्त्वाचे म्हणजे यात नामांकित संस्थाचा समावेश नाही. शैक्षणिक शुल्काचे कारण त्यांनी पुढे केले असले तरी आदिवासी मुलांना प्रवेश दिल्यास शाळांच्या प्रवेशांवर परिणाम होत असल्यानेच या संस्थांनी हात आखडता घेतला आहे. त्यामुळे इंग्रजी शाळांसाठी आदिवासी मुले अद्यापही बहिष्कृतच असल्याचे चित्र आहे.

आश्रमशाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुमार असल्याने आदिवासी मुले मुख्य प्रवाहापासून दूर राहतात. त्यामुळे आदिवासी विकास विभागाने या मुलांना इंग्रजीचे शिक्षण देण्याचे धोरण अवलंबले आहे. आघाडी सरकारच्या काळात दरवर्षी ५ हजार मुलांना प्रवेश दिला जात होता. भाजप सरकारने यात बदल करून जास्तीत जास्त मुलांना इंग्रजी शिक्षण देण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्पच हाती घेतला. त्याअंतर्गत चालू वर्षी २५ हजार विद्यार्थ्यांना पहिली ते पाचवीच्या इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. या संस्थाना विद्यार्थ्यामागे ५० हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. एका शिक्षण संस्थेत ५० आदिवासी मुलांना प्रवेश दिला जातो. या प्रकल्पांतर्गत आदिवासी विभागाने २९ प्रकल्प कार्यालयांमार्फत इंग्रजी शाळांचे प्रस्ताव मागवले होते.

विदर्भातील संस्था आघाडीवर

नाशिकपाठोपाठ ठाणे, नागपूर आणि अमरावती या तीन पट्टयात आदिवासींचे प्रमाण जास्त आहे. मात्र, नाशिक वगळता या तीनही विभागातील इंग्रजी शाळांनी या प्रकल्पाबाबत स्वारस्य दाखवलेले नाही. नागपूर आणि ठाणे विभागातून अल्प प्रतिसाद मिळाल्याने विभागापुढे मोठे संकट उभे राहिले आहे. सर्वाधिक मुलांची संख्या याच विभागातून राहणार असल्याने इथल्या मुलांना आता कुठे प्रवेश द्यावा असा प्रश्न पडला आहे.

मुदतीत केवळ २१५ शाळांनीच प्रस्ताव सादर केले आहेत. केवळ सात ते आठ हजार मुलेच शिक्षण घेवू शकतात. आणखी प्रस्तांवाची आम्हाला प्रतीक्षा आहे. - अरुण जाधव, उपायुक्त, आदिवासी शिक्षण विभाग

५० हजार रुपये शुल्क आम्हाला परवडत नाही. एकीकडे महागाई वाढत असताना शैक्षणिक खर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शाळांचे ग्रेडेशन करून फी ठरविण्याची आवश्यकता आहे. राजाराम पानगव्हाणे - अध्यक्ष, शिक्षण संस्था फेडरेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळ फार्मवर सापडले २३ हजार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील मालमत्तांवरील एसीबीचे धाडसत्र सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले. बुधवारी एसीबीच्या दोन पथकांनी भुजबळ यांच्या नाशिकमधील संपर्क कार्यालयासह त्यांच्या मालकीच्या काही कंपन्यांची तपासणी केली. तर बुधवारच्या छाप्यांमध्ये भुजबळांच्या बंगल्यातून केवळ २३ हजार ५०० रुपये आढळून आले आहेत. भुजबळांच्या नाशिक जिल्ह्यातील पाच मालमत्तांची किंमत एसीबीने १६० कोटी २० लाखांच्या आसपास काढली आहे. त्यामुळे भुजबळ सलग दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये चर्चेचा विषय राहिले.

महाराष्ट्र सदनमधील घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी छगन भुजबळांच्या मालमत्तेवर लाच लाचलुचपत प्रतिंबधक विभागाने छापेसत्र सुरू केले आहे. भुजबळ फार्ममधील चंद्राई बंगला, भुजबळ पॅलेस, राम बंगला, येवल्यातील बंगला आणि कार्यालय, मनमाडमधील बंगला आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले असून, बुधवारी महत्त्वपूर्ण कागदपत्रे हस्तगत केली आहेत. या कारवाईने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी भुजबळ फार्मवरील त्यांच्या संपर्क कार्यालयावर एसीबीच्या दोन पथकानी पुन्हा धाडी टाकल्या. त्यांचे संपर्क कार्यालय आणि गणेश बंगल्याची तपासणी दिवसभर करण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरा भुजबळ यांच्या आणखी दोन मालमत्तांवर छाप्यांची परवानगी मिळाल्यानंतर बुधवारी संपर्क कार्यालय आणि गणेश बंगल्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीत पथकाच्या हाती काहीच सापडले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोबतच भुजबळांच्या आर्मस्ट्राँग कंपन्यांची कागदपत्रेही एसीबीने तपासल्याची चर्चा आहे.

भुजबळांच्या चंद्राई बंगल्यातून २३ हजार ५०० रूपयांची रोकड पथकाला सापडली आहे. संपूर्ण तपासणी प्रक्रियेत केवळ २३ हजार ५०० रुपये सापडल्याने एसीबी पथकांच्या अधिकाऱ्यांनाही हसू आवरेनासे झाले होते. मंगळवारच्या पाच छाप्यांमध्ये मिळालेली कागदपत्रे आणि स्थावर मालमत्तेची किंमत एसीबी काढली असून, भुजबळ फार्मसह बंगले आणि कार्यालयांची एकूण किंमत १६० कोटी रुपये काढली आहे. छगन भुजबळ तसेच पंकज व समीर भुजबळ या तिघांनीही निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या मालमत्तेची किंमत ४० कोटी दाखवली आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी भुजबळांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून, नाशिकचीच मालमत्ता १६० कोटींच्यावर गेल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार राहणार आहे.

कट्टर समर्थक रडारवर

एसीबीने आता भुजबळांच्या काही कट्टर समर्थकांनाही रडारवर घेण्याची तयारी सुरू केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. भुजबळांभोवती गोतावळा असलेल्या काही पदाधिकारी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगांराच्या संपत्तीवर एसीबीने डोळा फिरवला आहे. त्यांच्या कोट्यवधींच्या मालमत्ताही तपासाच्या रडारवर आल्या आहेत. कमी कालावधीत धनाढ्य झालेल्या त्यांच्या कट्टर समर्थकांची माहिती एसीबीने गोळा करण्यास सुरुवात केली आहे. या समर्थकांवरही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने नाशिकमध्ये नव्या चेहरा शोधण्याची तयारी केली आहे. त्यामुळे भुजबळांची राजकीय कारकीर्दही आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी शाळांना यंदाही रेड सिग्नल!

$
0
0

जिल्ह्यात दीडशे शाळा परवानगीच्या प्रतीक्षेत

जितेंद्र तरटे, नाशिक

इंग्रजी अन् उर्दू माध्यमाच्या स्वयं अर्थसहाय्यीत शाळांना परवाने हवे तसे वाटणाऱ्या शासनाने राज्यातील मराठी शाळांना यंदाही डावलले आहे. परिणामी शिक्षण मंत्र्यांकडे स्वयं अर्थसहाय्यीत मराठी शाळांचे हजारो प्रस्ताव अद्याप अंतिम निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातून सुमारे दीडशे मराठी माध्यमाच्या स्वयं अर्थसहाय्यीत शाळांच्या प्रस्तावांचा समावेश आहे.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शासनाने स्वयं अर्थसहाय्यीत शाळांचे प्रस्ताव मागविण्यासाठी ऑनलाइन नोटिफिकेशन काढले. मात्र, त्यात केवळ इंग्रजी आणि उर्दू माध्यमाचीच लिंक अॅक्टीव्ह ठेवण्यात आली. तिसरी मराठी माध्यमाची लिंक डिअॅक्टीव्ह करण्यात आली आहे. विनाअनुदानाच्या पडद्याआडून पाऊल रोवणाऱ्या अन् नंतर अनुदानासाठी ठाण मांडणाऱ्या शाळांच्या हद्दपारीसाठीच

शासनाचे हे धोरण मराठी माध्यमाची गळचेपी करीत असल्याचा आरोपही आता होऊ लागला आहे. शिक्षणाची गळती रोखणाऱ्या मराठी शाळांना डावलले जाऊ नये, अशी शैक्षणिक संस्थांची अपेक्षा आहे.

अनुदानाचा धसका

सुरूवातीला विना अनुदानित म्हणून पाऊल रोवणाऱ्या अन् नंतर सरकारसाठी अनुदानाची डोकेदुखी ठरणाऱ्या शाळांना परवानगीविनाच रोखण्याचे धोरण राबविले जात असल्याचा शिक्षण संस्थांचा आरोप आहे. मात्र, शासनाच्या या धोरणामुळे ग्रामीण भागात इंग्रजी आणि मराठी या दोन्ही माध्यमाच्या शाळांमध्ये असमतोल निर्माण झाला असून, त्याचा शैक्षणिक दर्जावरही परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

'त्या' शाळा ठरविल्या बोगस

गेल्या वर्षीही सेल्फ फायनान्सच्या तत्वावर जिल्हाभरात मराठी माध्यमाच्या काही शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. यातील बहुतांशी शाळा या जिल्ह्यातील बड्या शिक्षण संस्थांच्या असल्याने येथे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधाही जास्त आहेत. या शाळांनी मोठ्या संख्येने विद्यार्थीही आकृष्ट केले. यानंतर यंदा दोन महिन्यांपूर्वी शासनाने अध्यादेश काढून या शाळांना बोगस ठरविले आहे. या शाळा त्वरित बंद करण्यात याव्यात अन्यथा त्या चालविणाऱ्यांकडून लाख रूपयांचा दंड आकारण्याचे आदेशही सरकारने दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images