Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बीएड, एमएडसाठी २५ जुलै रोजी सीईटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील सर्व शासकीय, अशासकीय, अनुदानित व केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट अशासकीय विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित कॉलेजेसच्या बी. एड व एम. एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्या असून त्यासाठी ऑनलाइन अर्ज देखील मागविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना १७ जुलैपर्यंत अर्ज भरता येणार असून २५ जुलै रोजी केंद्रीभूत पद्धतीने या अभ्यासक्रमाची सीईटी घेण्यात येणार आहे.

बी.एड. अभ्यासक्रमास प्रवेशासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या (एमकेसीएल) http://bed.mhpravesh.in या वेबसाईटवर तर एम. एड. ला प्रवेशासाठी http://med.mhpravesh.in या वेबसाईटवर अर्ज भरायचा आहे. बी. एड. प्रवेशासाठी मान्यता पात्र विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची तीन वर्षीय पदवी आवश्यक असून एम. एडसाठी एनसीटीई मान्यताप्राप्त अध्यापक कॉलेजमधून बी. एड, बी. ए. एम. एड, बी. एस्सी. बी. एड, बी. एल. एड., डी. एल. एड. यापैकी एका अभ्यासक्रमाची पदवी असणे आवश्यक आहे. बी. एड. प्रवेश अर्जासाठी ओपन संवर्गाला रुपये ६५० व मागासवर्गीयांसाठी रुपये ३५० फी असणार आहे. तर खुल्या संवर्गासाठी रुपये ८०० तर मागासवर्गीयांसाठी रुपये ४०० व राज्याबाहेरील विद्यापीठातील सर्व संवर्गांसाठी रुपये ८०० फी आकारण्यात येणार असल्याचे राज्य उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांनी कळविले आहे.

सप्टेंबरपर्यंत प्रवेशप्रक्रिया

राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परीषदेने घेतलेल्या निर्णयानुसार बी. एड. व एम. एड. या दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी दोन वर्षाचा करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून योग्य न्याय मिळणे आवश्यक असल्याने केलेल्या बदलामुळे प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला आहे. एरवी मार्च-एप्रिलमध्ये पार पडणारी ही प्रवेशप्रक्रिया यावेळी सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.

विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघणे गरजेचे आहे. यातील अभ्यासक्रमात झालेला बदल ही महत्त्वपूर्ण बाब असून त्याआधारे तयार झालेला शिक्षक हा अधिक कौशल्याधिष्ठीत व गुणवत्तापूर्ण असणार आहे. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासही मदत होईल.

- प्राचार्य डॉ. सूर्यभान वाजे, मविप्र शिक्षणशास्त्र महाविद्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी हवी नाशिककरांची मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

शहरात होणारा सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी पंचवटीसह शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे. सर्वांनी पोलिसांना आपले कार्य समजून सहकार्य व मार्गदर्शन करावे, असे आवाहन पंचवटी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक शांताराम अवसरे यांनी केले.

पंचवटी पोलिस स्टेशनच्या वतीने श्री अमरापूर धाम येथे झालेल्या सहविचार सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी पोलिस उपयुक्त अविनाश बारगळ होते. यावेळी व्यासपीठावर महापलिकेच्या विरोधी पक्षनेत्या प्रा. कविता कर्डक, पोलिस निरीक्षक नरेंद्र पिंगळे, बाजीराव महाजन, प्रकाश डुकरे पाटील, मनात चरणदास महाराज आदी उपस्थित होते. बारगळ आणि कर्डक यांनी यावेळी मार्गदर्शन केले. उपस्थित पंचवटीकरांनी सहकार्याच्या भावनेसोबतच विविध सूचना केल्या. यावेळी पद्माकर पाटील, देवांग जानी, अनिल कोठुळे, निवृत्ती काकड आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

काही महत्त्वपूर्ण सूचना

स्वयंसेवक नेमावेत, त्यांना प्रशिक्षण तातडीने द्यावे

स्वयंसेवकांना गणवेश असावा

अन्नदान करण्यापूर्वी त्याची तपासणी करावी

पुरेशा रुग्णवाहिका असाव्यात

शाही मार्गावरील रहिवाशींना विश्वासात घ्यावे

शाही मार्गावरील रहिवाशींची स्वतंत्र सभा घ्यावी

हरवलेल्या व्यक्तीबाबत मदत केंद्रावर बहुभाषिक नेमावेत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शटरडाऊनमुळे गुन्हेगारीला टाळे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

ढासळती कायदा व सुवस्था सुधारण्यासाठी सातपूर पोलिसांकडून रात्री दहा वाजताच दुकांनाचे शेटर डाऊन करण्याचे आदेश देत आहेत. यामुळे गेल्या महिन्याभरात सातपूर पोलिसांना गुन्हेगारी रोखण्यात यश आले आहे. चौका-चौकात होत असलेल्या बैठकांमुळे गुन्हेगारीवर वचक बसविण्याचे काम सातपूर पोलिसांकडून केले जात आहे.

वाढत्या गुन्हेगारीमुळे सातपूर परिसर कायम चर्चेत रहात होता. गुन्हेगारीवर वचक ठेवता न आल्याचा ठपका ठेवत पोलिस आयुक्तांनी वरिष्ठ निरिक्षक व्ही. एन. मेढे यांची तत्काळ बदली केली होती. त्यांच्या जागी मनोज करंजे यांची नियुक्ती करण्यात आली. करंजे यांनी सातपूर पोलिस ठाण्याची सूत्रे स्वीकारल्यानंतर पेट्रोलिंग वाढवत गुन्हेगारांवर वचक बसविण्याचे काम केले. ठिकठिकाणी गटगटाने उभे राहणाऱ्या टवाळखोरांवर धडक कारवाई केली.

जनतेशी थेट संवाद

सातपूर भागातील बहुतांश भागात जाऊन चौका-चौकात ज्येष्ठ नागरीक, महिला व तरुणींशी थेट संवाद साधला आणि कुणाकुणाकडून त्रास होत असल्याची माहिती घेतली. पोलिस पेट्रोलिंग वाढवित गुन्हेगार आणि उपद्रवी व्यक्तींना तत्काळ ताब्यात घेत कारवाई सुरू केली. तसेच रात्री दहा वाजेलाच दुकानदार व व्यवसायिक यांना शेटरडाऊन करण्याचे आदेश दिले. व्यापाऱ्यांनी देखील पोलिसांच्या सूचनांचे पालन करत दहा वाजेलाच दुकाने बंद करीत आहेत. यामुळे महिन्याभरात पोलिसांना गुन्हेगारीवर वचक राखता आला आहे.

पोलिस चौकीचा मागणी

नाशिक : डीजीपीनगर क्रमांक एक आणि अशोका मार्ग अशा दोन ठिकाणी पोलिस चौकी सुरू करावी, अशी मागणी माजी उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे केली आहे.

परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. ते रोखावे यासाठी येथे पोलिस चौकीची आवश्यकता आहे. अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर डीजीपी नगर क्रमांक एकमध्ये पोलिस चौकी सुरू देखील करण्यात आली होती. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण सांगून ती पुन्हा बंद करण्यात आली. पोलिस चौकी सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे निवेदन पाटील यांना देण्यात आले आहे.

गुन्हेगारीवर आळा बसावा यासाठी रात्री दहा वाजताच व्यवसायिकांना दुकाने बंद करण्याच्या सूचना केल्या. त्या सूचनांचे पालन झाल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्याची काळजी पोलिसांनी घेतली. नागरिकांनी देखील अनिष्ठ गोष्टी पोलिसांना माहिती द्यावी.

- मनोज करंजे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक, सातपूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीवनमान उंचावण्यासाठी डिजिटलायझेशन आवश्यक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

दुकाने, संस्था, धार्मिक स्थळे अशा जीवनाशी संबंधित सर्व गोष्टींची डिजिटलायझेशन नोंद हवी. नाशिककरांचे जीवनमान उंचावण्यासाठी डिजिटलायझेशन आवश्यक आहे, असे प्रतिपादन अमेरिकेतील एमआयटी संस्थेतील संशोधन विभागाचे प्रमुख आणि बिटको कॉलेजचे माजी विद्यार्थी डॉ. रमेश रासकर यांनी केले.

बिटको कॉलेजात आधुनिक संकल्पना (इनोव्हेशन) या विषयावर कार्यशाळा झाली. त्यावेळी ते बोलत होते. प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, जॉन व्हर्नर, मॅगी चर्च, प्रकाश रासकर, प्रा. जयंत भाभे, प्रा. सुदेश घोडेराव आदी व्यासपीठावर होते. डॉ. रासकर म्हणाले, की कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची अचूक मोजदाद करण्यासाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. मोबाईल टावर्सचा उपयोग त्यासाठी करण्यात येईल. विकिपीडियाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक व नागरिक संपर्कात राहतील. भाविकांना नाशिकमधील महत्त्वाच्या व्यक्ती, संस्था, पोलिस स्टेशन आदींची माहिती डिजीटल नाशिक, मिट कुंभथॉन या नावाने उपलब्ध केली जाईल. डॉ. राम कुलकर्णी यांनी स्वागत केले. जॉन व्हर्नर यांनी उपक्रमात सहभागी होण्यासाठी निस्वार्थीपणे काम करण्याची शपथ दिली. मॅगी चर्च यांनी मनोगत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूषित पाण्यामुळे आजारांची भीती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

जुने नाशिक परिसरात काही दिवसांपासून दूषित व गढूळ पिण्याचे पाणी दिले जात आहे. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यात तर लाल रंगाच्या बारिक आळ्यादेखील आढळून आल्या आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

दूषित व गढूळ पिण्याच्या पाणी वापरामुळे अनेकांना पोटदुखीचे त्रास होत आहे. कावीळाची साथ पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दूषित व गढूळ पिण्याचे पाणीपुरवठा संदर्भात नागरिकांच्या तक्रारींकडे नगरसेवक व महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. महापालिकेच्या डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयात पोटदुखी व कावीळची लक्षणे घेऊन येणारी रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. खासगी डॉक्टरांकडेही अशीच लक्षणे असणारे अनेक रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. पाणी उकळून प्यावे सध्या हाच रामबाण उपाय दूषित पाणीपुरवठा संदर्भात नागरीकांना डॉक्टर आणि तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

जुने नाशिक परिसरातील अनेक जलवाहिन्या जुन्या झाल्या असून त्या गटारीच्या मार्गातून टाकण्यात आलेल्या आहेत. गळक्या, फुटलेल्या या जलवाहिन्यांमध्ये दूषित पाणी मिसळले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. यापूर्वी जुने नाशिक परिसरातील जनरल अरुणकुमार वैद्यनगरमध्ये दूषित पाण्यामुळे परिसरात जुलाब होऊन अतिसारासह अनेकांना कावीळाच्या साथीने रोगाने ग्रासले होते. यामुळे एका गर्भवतीचे बाळच पोटात दगावले. तसेच या गर्भवतीचा जीवही धोक्यात आला होता. महापालिका प्रशासनाचे जुने नाशिक परिसरात सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे विविध समस्या जैसे थे आहेत. त्या दूर कधी होणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

जुने नाशिक परिसरात अनेक दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे. अनेकांना पोटदुखीचे त्रास होत आहेत. महापालिका प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे.

- खान फैरोजा नाझनिन, रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधुग्रामसाठी देना बँकेचे एटीएम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साधुग्राममध्ये ऑटोमेटेड टेलर मशीन अर्थात एटीएम सेंटर उभारण्याकरीता देना बँकेने पुढाकार घेतला आहे. बँकेतर्फे पाच ठिकाणी तात्पुरते एटीएम मशिन बसवले जाणार असून, यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शाखा विस्तारीकरण आणि एटीएम सेंटरच्या पुरेशा संख्येमुळे बहुतांश राष्ट्रीय बँकांनी साधुग्रामसह भाविक मार्गावर एटीएम उभारण्याचा प्रस्ताव थंड बासनात गुंडाळला होता. याबाबत 'मटा'ने ३० जून रोजी सविस्तर वृत्त प्रसिध्द केल्यानंतर वरिष्ठ पातळीवर हालचाली झाल्या आहेत.

गत कुंभमेळ्यात एटीएम सेवा अत्यंत नवलाईचा विषय होता. एटीएम वापरणाऱ्यांची संख्या तुरळक असताना २००३ च्या कुंभमेळ्यात दोन ठिकाणी तात्पुरते एटीएम सेंटर उघडण्यात आले होते. आजही लक्ष्मीनारायण मंदिरालगत असलेल्या गाळ्यांमध्ये त्यापैकी एका सेंटरच्या खाणाखुणा दिसून येतात. कुंभमेळ्यासाठी किमान ३ लाख २० हजार साधु-महंत तर ८० लाख भाविक शहरात दाखल होण्याची अपेक्षा प्रशासनला आहे. त्यामुळे यंदा तात्पुरत्या एटीएम सेंटरच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता होती. मात्र, एसबीआयसह इतर राष्ट्रीयकृत बँकांनी मोठ्या प्रमाणात शाखा व एटीएम सेंटर असल्याचे कारण पुढे करीत तात्परते एटीएम सेंटर सुरू करण्याकडे पाठ फिरवली. बँकांची ही भुमिका भाविकांना अडचणीची ठरणारी होती. याबाबत ३० जून रोजी 'मटा'ने सविस्तर वृत्त प्रसिध्द केले. यानंतर, वरिष्ठ पातळीवर हालचाली झाल्या आहेत. आता देना बँकातर्फे साधुग्राम, पंचवटी येथे तात्पुरत्या स्वरूपात एटीएम सेंटर सुरू करण्यात येणार आहे. तपोवनातील रामसृष्टी प्रकल्पासमोर तसेच जेजुरकर मळ्याजवळील एका मोकळ्या जागेत दोन सेंटर राहतील. पंचवटीत सुध्दा ही सेवा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती देना बँकेच्या आडगाव ब्रँचचे मॅनेजर अशोक अहिरे यांनी दिली.

प्रादेश‌िक स्तरावरून मुख्य शाखेला हा प्रस्ताव पाठवण्यात आला. त्यानुसार पाच एटीएमसाठी मंजुरी मिळाली आहे. आडगाव शाखेतंर्गत दोन एटीएम असून, साधुमहंताचा तसेच भाविकांचा ओघ सुरू झाल्याबरोबर एटीएम कार्यन्वित होतील.

- अशोक अहिरे, ब्रँच मॅनेजर, देना बँक आडगाव शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ऑपरेशन मुस्कान’द्वारे लहानग्यांचा शोध

$
0
0

प्रवीण बिडवे, नाशिक

जिव्हाळ्याची व्यक्ती नजरेआड झाली की मन सैरभैर होते. ती व्यक्ती कुठे असेल, सुखरूप असेल ना, तिचे बरे वाईट तर झाले नसेल असे एक ना अनेक विचार डोक्यामध्ये थैमान घालू लागतात. काही बेपत्ता व्यक्तींचा शोध लागतो. परंतु, पोलिसांना कळविण्याचे कष्ट नातलगांकडून घेतले जात नाहीत. तर काहींचा शोधच लागत नाही. त्यांचे नेमके काय होते हे गूढ बनून राहिले आहे. अशा बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठी आता देशभरात 'आपॅरेशन मुस्कान' ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यात १ जुलैपासून पोलिसांनी ही मोहीम सुरू केली आहे.

देशभरात लहान मुले-मुली हरविण्याचे प्रमाण मोठे आहे. मात्र, ते सापडण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. सार्वजनिक ठिकाणांवर अनेक लहान मुलांचा भीक मागणे व तत्सम कारणांसाठी उपयोग करून घेतला जातो. काही मुले खरोखरच हरवितात तर काही जाणीवपूर्वक घर सोडतात. कारण काहीही असले तरी पालक आणि मुले यांच्यातील ताटातूट कायम राहाते. एखाद्या राज्यातील मुले दुसऱ्याच राज्यात बेवारस अवस्थेत फिरत राहतात. ही मुले कोण, ती कोठून आली, त्यांचे पालक कोण यांसारखे अनेक प्रश्न वर्षानुवर्ष अनुत्तरीत राहिले आहेत. म्हणूनच २०१० पासून बेपत्ता असलेल्या परंतु, अजूनही न मिळालेल्या लहान मुला-मुलींची यादी तयार करून त्यांचा शोध घेण्याचे आदेश केंद्राच्या गृह सचिवांनी दिले आहेत. पोलिस आयुक्त आणि अधीक्षकांनी तयार केली आहे. महिला सुरक्षा विशेष शाखेला ही यादी द्या असेही या आदेशात म्हटले आहे. प्रत्येक पोलिस स्टेशनला मिसिंग सेलचे अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असतात. ही मोहीम राबविताना त्यांच्या मदतीला स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी असणार आहेत. शहर आणि जिल्ह्यातील रेल्वे स्टेशन, बस स्थानके, धार्मिक ठिकाणे, बाजारपेठा, आश्रयगृहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ट्रॅफिक सिग्नल्स आणि रस्ते अशा ठिकाणी भेटी देऊन हरविलेल्या बालकांचा शोध घेण्याचे काम या पथकाकडून केले जाणार आहे.

बालकाचे नाव, लिंग, गाव, शिक्षण, आईवडिलांचे नाव, घर सोडण्याचे कारण, ज्याच्या ताब्यात ते बालक सापडले त्याचे नाव संकलित केले जाणार आहे. सार्वजनिक ‌ठिकाणी भटकणारी लहान मुलेच कोठून ना कोठून बेपत्ता झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे. म्हणूनच ही मुले शोधताना गणवेषाचा उपयोग न करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. कारण गणवेषधारी पोलिसाशी बोलताना ही मुले संकोचतील. ती कदाचित त्यांना दिशाभूल करणारी माहिती देतील. त्यातून वास्तव पुढे आणणे कठीण होईल. म्हणूनच सामान्य व्यक्तीसारखे जाऊन ही माहिती संकलित केली जाणार आहे. बालकांची चौकशी केली जात असताना त्यांना लक्षात येऊ न देता त्यांचे फोटो घेतले जाणार आहेत. तसेच गरज भासल्यास व्हिडिओ शुटींग देखील केले जाणार आहे. पोलिसांना अशी बेपत्ता मुले मुली आढळून आलीच तर www.trackthemissingchild.com या वेबसाइटवर ती माहिती लोड केली जाणार आहे. मुलांची ओळख पटली की त्यांना पालकांपर्यंत पोहोचविण्याचे काम अधिक सुलभ होणार आहे. महिनाभर राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेसाठी प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये विशेष पथकच नेमण्यात आले आहे. या पथकात सहभागी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. या मोहिमेद्वारे पालकांना त्यांची बेपत्ता मुले मिळावीत अन् त्यांच्या उदास आयुष्यात पुन्हा उत्साहाचे रंग भरावेत असाच आमचा प्रयत्न असल्याचे पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन आणि पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध पुस्तकविक्री रोखली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषी शिक्षण प्रसारक मंडळ शाळेत अभ्यासक्रमाची पुस्तके परवानगी नसताना शाळेकडून विक्री केली जात होती. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनने शाळेचा हा प्रयत्न हाणून पाडला. संघटनेने शिक्षण उपसंचालकांच्या मदतीने ही अवैध पुस्तकविक्री रोखली.

विद्यार्थ्यांनी शालेय पुस्तकांची खरेदी शाळेच्याच कार्यालयातून खरेदी करावी, अशी सक्ती केली जात होती. हा प्रकार संघटनेचे शहर उपाध्यक्ष शाम गोहाड, अक्षय एडके, प्रवीण पवार यांनी शिक्षण उपसंचालक आर. बी. पाटील यांच्या निदर्शनास आणून दिला. याची दखल घेत शिक्षण विभागाच्या वतीने शाळा प्रशासनाला हा प्रकार तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले. तसे न झाल्यास शाळेची मान्यता रद्द करण्याचेही बजावण्यात आले. यामुळे पालकांकडून 'मनविसे'चे आभार मानले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रशिक्षण विभागात ‘बाबू’ची घुसखोरी

$
0
0

विजय महाले, नाशिक

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयात स्वतंत्रपणे कारभार पाहणाऱ्या दोन संचालकांऐवजी या विभागाशी कोणताही संबंध नसलेल्या मंत्रालयातील तिसऱ्याच अधिकाऱ्याकडे नियमबाह्य पद्धतीने आस्थापनाविषयक सर्व अधिकार एकवटलेले आहेत. त्यामुळे विभागात विचित्र कोंडी निर्माण झाली आहे.

संचालनालयात एका संचालकाकडे व्यवसाय शिक्षण तर दुसऱ्या प्रभारी संचालकाकडे प्रशिक्षण (आयटीआय) विभागाचा भार आहे. मात्र, उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयातील सचिव रा. गो. जाधव यांच्याकडे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालकांचे (प्रशिक्षण) आस्थापनाविषयक अधिकार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आर. आर. आसावा यांच्याकडे यापूर्वी संचालक प्रशिक्षणपदाचा प्रभारी अधिकार होता. परंतु, तेव्हापासून जाधव यांच्याकडे संचालकांचे आस्थापनाविषयक अधिकार देण्यात आले होते. विशेष म्हणजे याबाबतचे आदेशही स्वत: जाधव यांच्याच सहीने जारी करण्यात आले होते. याबाबत संबंधित मंत्रालयाने मंजुरीच कशी दिली, असा प्रश्न अधिकारी व कर्मचाऱ्यांना पडला आहे.

संचालकपदावर अधिकारी बसविला पण त्यांना अधिकार नसल्याची स्थिती आहे. सहसंचालक, सहाय्यक संचालक, व्यवसाय शिक्षण अधिकारी, प्राचार्य, निदेशक या कर्मचाऱ्यांना जबाबदारी वाटून देणे, पदोन्नती, विभागीय चौकशी, बदली याबाबत सर्व अधिकार जाधव यांच्याकडेच असल्याने संचालनालयाऐवजी थेट मंत्रालयात जातात. तेथे आपापल्या 'क्षमता' आणि 'वजन' वापरून काम होत असल्याने प्रभारी संचालक साईडट्रॅक झाले आहेत. याचा थेट परिणाम प्रशिक्षणावर होतानाच संचालनायातील अनागोंदीही पुढे आली आहे.

सरकारचे आर्थिक नुकसान

संचालक प्रशिक्षण आणि संचालक व्यवसाय शिक्षण या दोन अधिकाऱ्यांना शासकीय वाहन तसेच चालक देण्यात आलेले आहेत. आता तिसराच (अर्धा) संचालक आल्याने त्यालाही या सुविधा द्याव्या लागत आहेत. यात सरकारच्या पर्यायाने जनतेच्या पैशाचा अपव्यय होत आहे. शिवाय मंत्रालयाच्या या 'अर्ध्या' संचालकाकडे कारवाईचे सर्वाधिक अधिकार एकवटलेले असल्याने खऱ्या संचालकांपेक्षा त्याची बडदास्त अधिक ठेवली जात असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला कंडक्टर्सकडून नको जादा सेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्यादरम्यान प्रवासी वाहतूक करण्यासाठी तब्बल साडेसात हजार चालक-वाहकांची मदत घेण्यात येणार आहे. या काळात वाहकांना कदाचित जादा वेळ काम करावे लागणार आहे. त्यामुळे महिला वाहकांना पाठवू नका, असे स्पष्ट निर्देश नाशिक विभागाने संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.

एसटी सिंहस्थ काळात ५० लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक करणार आहे. एक हजार बसेस प्रवाशांना नाशिकपर्यंत घेऊन येण्याचे आणि पुन्हा घेऊन जाण्याचे काम करणार आहेत. तीन हजार बसेस नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वरपर्यंत प्रवासी वाहतुकीचे काम करणार आहेत. सिंहस्थ काळात ५० लाखांहून अधिक प्रवाशांची ने आण करण्यासाठी महामंडळाच्या बसेस ७० हजार फेऱ्या मारणार आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये याची काळजी महामंडळाकडून घेतली जात असून, राज्यभरातून अतिरिक्त मुनष्यबळ मदतीसाठी बोलाविले आहे. तीन हजार ७५० चालक आणि तेवढ्याच वाहकांना न नाशिकमध्ये बोलाविले आहे. एक हजार १०५ कर्मचारी अधिकारी नाशिकमध्ये येणार आहेत. २६ ऑगस्टपासून बसेस दाखल होणार आहेत. धुळे, नगर, जळगावमधील १११९ बसेस पर्वणीनंतर परत पाठविल्या जातील. पुन्हा दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्वणीसाठी या बसेस बोलाविण्यात येणार आहेत. मात्र, नागपूर आणि अमरावती विभागातील बसेस सव्वा महिना सेवा देणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॅरिसमध्येही उमटणार नाशिकची मोहोर

$
0
0

फणिंद्र मंडलिक, नाशिक

रेस अॅक्रॉस अमेरिका (रॅम) ही स्पर्धा नाशिकच्या महाजन बंधूंनी जिंकल्यानंतर आता नाशिकची देविका पाटील (वय २२) ही सायकलिस्ट जगात अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस या स्पर्धेत सहभागी होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणारी ती महाराष्ट्रातील एकमेव सायकलिस्ट आहे.

स्पर्धेसाठी देविका अत्यंत कठोर मेहनत करीत असून, रोज शंभर ते दीडशे किलोमीटर सायकलिंगचा सराव करीत आहे. देविका लोणी येथील प्रवरानगर मेडिकल ट्रस्टमध्ये मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत आहे. स्पर्धेत पात्र होण्यासाठी तिने पुणे येथे झालेल्या बीआरएम स्पर्धेत सहभाग घेतला होता. २००, ३००, ४००, ६०० किलोमीटर गटात तिने २०१४ मध्ये विशेष प्रावीण्य मिळवल्यानंतर तिला पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. ही स्पर्धा सांघिक स्वरुपाची नसून, वैयक्तिक प्रकारातली आहे. स्पर्धा अत्यंत खडतर असून, ऊन, वारा, पाऊस यांचाही सामना करावा लागतो. पॅरीस ते ब्रेट व ब्रेट ते पॅरीस असे १२०० किलोमीटरचे अंतर ९० तासांत पूर्ण करायचे आहे. सायकल चालवतानाच स्पर्धेचे नियोजन स्वतः करायचे असून, स्वतःचे सामान स्वतः कॅरी करायचे आहे. सायकल नादुरुस्त झाल्यास त्याची दुरुस्तीही स्वतः करायची आहे. देविका १२ ऑगस्ट रोजी पॅरिस येथे रवाना होणार असून, १६ ते २० ऑगस्टदरम्यान स्पर्धा होणार आहे.

देविका पाचवीत असल्यापासून सायकलचा सराव करीत आहे. शनिवार व रविवार या दिवशी, नाशिक ते भंडारदरा, नाशिक ते धुळे, नाशिक ते मुंबई, नाशिक ते सापुतारा असा सराव ती करीत आहे. स्पर्धेसाठी तिला मुंबईतील मिथेन हे प्रशिक्षक असून, मेघना तिच्या न्यूट्रीशियन आहेत. त्यांच्या सल्ल्यानुसार रोज तिचा सराव सुरू आहे. देविकाने ट्रेकिंगचे देखील प्रशिक्षण घेतलेले आहे.

जास्तीत जास्त लोकांनी सायकलचा वापर करून पर्यावरणाचे रक्षण करावे. असा संदेश या मोहिमेतून मी देणार आहे. प्रत्येकाने आठवड्यातून एक दिवस सायकल चालवली तरच ही वसुंधरा टिकेल.

देविका पाटील, सायकलिस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजी बाजार आजपासून बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान गोदाघाटावरील भाजी बाजार हटवण्याबाबतची फेरविचार याचिका हायकोर्टाने फेटळल्यानंतर भाजी बाजाराचा गोंगाट काही काळापुरता शांत होणार आहे. नवीन इमारतीत भाजी बाजार स्थलांतरीत होण्याची चिन्हे नसल्याने कुंभमेळा पार पडेपर्यंत भाजी बाजार बंद राहण्याची शक्यता आहे.

मागील १२ वर्षांपासून भाजी बाजार स्थलांतरीत होण्याचा मुद्दा जिल्हा कोर्टात प्रलंबित पडला आहे. त्यातच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा बाजार हटवण्यात यावा, याविषयी महापालिकेने कोर्टात ग्राऱ्हाणे मांडले होते. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बाजार स्थलातंरीत करण्याबाबतचा निर्णय जिल्हा कोर्टाने दिला. यानंतर गंगामाई बाजार संघटनेने हायकोर्टात धाव घेतली. यावर आज हायकोर्टात सुनावणी होऊन हायकोर्टाने जिल्हा कोर्टाचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे, शुक्रवार रात्री बाजार हटवण्याचे काम सुरू झाले असल्याची माहिती भाजी बाजार संघटनेचे उपाध्यक्ष शांताराम क्षीरसागर यांनी सांगितले.

दरम्यान, भाजी बाजाराचे स्थलातंर रामवाडीतील नवीन मार्केटमध्ये सुध्दा होणार नसून, यामुळे भाजी बाजारचा गोगांट कुंभमेळा संपेपर्यंत शांत राहू शकतो. नवीन बाजारातील स्थलांतराबाबत काय निर्णय घ्यायचा, याबाबत संघटनेच्या बैठकीत चर्चा केली जाईल. सध्यातरी भाजी बाजार भरणार नसल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापती निवडीला स्थगिती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

महापालिकेच्या शिक्षण समितीमागील शुक्लकाष्ठ संपत नसल्याचे चित्र आहे. राज्य सरकारने शिक्षण समिती गठीत करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी निलंबित केला. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या सभापती व उपसभापती निवडीला स्थगिती आली आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियाच थांबली आहे. शिक्षण मंडळ २०१७ पर्यंत अस्तित्वात असल्याचा उल्लेख अध्यादेशात करण्यात आल्याने शिक्षण समिती संपुष्टात आली आहे.

महापालिकेचे शिक्षण समितीवरून सत्ताधारी मनसे विरूद्ध भाजप असे राजकारण सुरू झाले आहे. महासभेने २७ एप्रिल रोजी शिक्षण समितीसाठी १६ सदस्यांची नियुक्ती केली होती. मात्र, या निर्णयाला शिक्षण मंडळाच्या काही सदस्यांनी आक्षेप घेत शासनाकडे दाद मागितली होती. त्यामुळे राज्य सरकारने त्याला स्थगिती दिली होती. या निर्णयाविरोधात सदस्य संजय चव्हाण हे हायकोर्टात गेले होते. कोर्टाने राज्य सरकारला फटकारत ही स्थगिती उठवत निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी नगरविकास विभागाचे कार्यसन अधिकारी एस. डी. धोंडे यांनी आदेश काढत, महापौरांनी केलेला ४२४ क्रमांकाचा ठराव विंखडींत केला असल्याचे म्हटले आहे. महापौरांचा ठराव निलंबित झाल्याने निवडणूक प्रक्रियेवर टांगती तलवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधुग्रामचा बोजवारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मोठी जमीन उपलब्ध असताना प्रशासनाने निवासासाठी छोटे छोटे प्लॉटस् तयार केले आहेत. यामुळे साधू-महंताबरोबरच भाविकांची गैरसोय होणार आहे. प्रशासनाने साधुग्रामच्या नियोजनाचा पुरता बोजवारा उडवला असल्याचा आरोप आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांनी केला. आखाड्यांच्या अटी-शर्थीनुसार प्रशासनाने तातडीने फेरबदल न केल्यास साधुग्राम सोडण्याचा इशारा त्यांनी दिला.

आखाड्यांशी संलग्न खालशांची संख्या १२ वर्षांत वाढली. सव्वातीन लाखांपेक्षा अधिक साधू-महंत सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणार आहेत. यानुसार प्रशासनाने ३५० एकर जमिनीवर साधू-महंतांच्या निवासाची सोय उभारण्याचे काम सुरू केले आहे. या कामाची पाहणी शुक्रवारी आखाडा परिषदेचे अध्यक्ष ग्यानदास महाराज यांनी केली. त्यावेळी त्यांनी सर्व्हिसरोडसाठी जास्त तर निवासस्थानासाठी कमी जागा सोडल्याचा आक्षेप घेतला.

गेल्या कुंभमेळ्यात जागेची उपलब्धता नव्हती. त्यामुळे सर्वांनी समजून घेतले. यावेळेस मात्र जागेचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला. तरीही कमी जागा का दिली जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. चांगले काम झाले असल्याचा दावा करीत प्रशासन स्वतःची पाठ थोपटून घेत असून, प्रत्यक्षात सगळे नियोजनच चुकले असल्याचा दावा महंत ग्यानदास यांनी केला. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली नाही. साधू-महंतांना चर्चेसाठी बोलवले नाही. त्यामुळे ही वेळ आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्य रस्त्यांवर तसेच निवासासाठी दिलेल्या जागेवर आजही झाडे असून, राहण्याची कोणतीही व्यवस्था येथे होणार नाही. प्रशासनला यात फेरबदल करावे लागणार आहेत. आम्ही दिलेल्या अटी शर्थीनुसार काम झाले तरच आम्ही येथे राहू अन्यथा इतर ठिकाणी व्यवस्था करू, असा दमच ग्यानदास यांनी भरला. यावेळी कुंभमेळा व्यवस्थापक विश्वंभरदासजी महाराज, भक्तीचरणदास महाराज यांच्यासह प्रमुख साधू-महंत उपस्थित होते.

ताळमेळ नाही

कुंभमेळ्यासाठी जनतेचे कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. मात्र, प्रशासनात तसेच राज्यकर्त्यांमध्ये ताळमेळ नसल्याचा आरोप सुध्दा ग्यानदास महाराज यांनी केला. कामाबाबत पालकमंत्री एक बोलतात तर, मुख्यमंत्री प्रशासनाला शाबासकीची थाप देऊन निघून जातात, ही बाब अकालनीय असल्याचे त्यांनी म्हटले. साधुग्रामच्या परवडीला जिल्हाधिकारी आणि आयुक्त जबाबदार असल्याचे ग्यानदास महाराज यांनी स्पष्ट केले.

'त्या' साधुंना महत्त्व नको

कुंभमेळ्यादरम्यान अनेक ढोंगी पुढे येतील. तेव्हा प्रशासनाने गर्दी हा निकष बाजुला सारून साधू महंताकडे पहावे, असे आवाहन ग्यानदास महाराजांनी केले. आसारामसारखे पूर्वी मोठी गर्दी करायचे. आता किर्तीकुमार सारखे महाराज पुढे येत आहेत. पालकमंत्री, मुख्यमंत्र्यांनी अशा साधुसमोर जाताना, त्यांचे चरित्र तपासावे, असा सल्ला त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा ठरणार हायड्रोजन बॉम्ब

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारने अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार कांद्याचे निर्यातमूल्य कमी केल्याचा आरोप करतानाच, कांदा आंदोलन केंद्र सरकारसाठी हायड्रोजन बॉम्बपेक्षा स्फोटक ठरेल, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने परशुराम सायखेडकर सभागृहात शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलतांना शेट्टी यांनी केंद्र सरकारच्या कांद्यासंदर्भातील धोरणावर आगपाखड केली. शेतकऱ्यांचा रोष आणि आंदोलनाचा वणवा सरकारला परवडणारा नाही, असा दमही त्यांनी भरला आहे. सोबतच केंद्र आणि राज्य सरकारची सध्याची भूमिका पाहता, शेतकऱ्यांची प्रश्ने गनिमी काव्यानेच सुटतील, असे चित्र असल्याने संघटना त्यासाठी तयार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. एकीकडे सरकारविरोधात बोलत असतानाच, मंत्रिमंडळातील सहभाग हा आमचा अधिकार असल्याचा दावाही शेट्टी यांनी केला आहे. मात्र, मंत्रिमंडळातील सहभागासाठी आम्ही भिकेचा कटोरा घेवून फिरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळात सहभाग झालाच तर, आदर्श कारभार काय असतो ते आम्ही दाखवून देवू, असे सांगतानाच स्वाभिमानीला मंत्रिपद हवे, असेही त्यांनी सूचकपणे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोदाघाटाने घेतला मोकळा श्वास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

नाशिकच्या गोदावरी नदीच्या काठावरील प्रसिद्ध भाजी बाजार कोर्टाच्या आदेशानंतर अखेर उठविण्यात आला. भाजीबाजार उठणार की, नाही याबाबत हायकोर्ट सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर कोर्टाने भाजीबाजार हटविण्याचा निर्णय घेतल्याने शुक्रवारी व शनिवारी सकाळी भाजी विक्रेत्यांनी स्वत:हून बाजाराची जागा मोकळी केली.

सिंहस्थ काळात गोदाकाठावर भाविकांची उसळणारी गर्दीचे नियंत्रण करण्याच्या दृष्टीने गोदाघाट परिसरातील अतिक्रमणे व भाजी बाजार हटविण्याची मागणी प्रशासनाकडून होत होती. पेशवाईपासून गोदाघाटावर भाजी बाजार असून, येथे ६५० विक्रेत आहेत. या विक्रेत्यांना महापालिकेने गणेश वाडीतील स्वतंत्र्य इमारतही उपलब्ध करून दिली होती मात्र, तेथे विक्रेत्ये जाण्यास तयार नव्हते. अखेर विक्रेत्यांनी महापालिकेच्या भूम‌किेविरोधात हायकोर्टात धाव घेतली. मात्र कोर्टाने जागा मोकळी करण्यास सांगितले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतीक्षा प्रवेश यादीची

$
0
0

आयटीआयच‌ी ऑनलाइन रखडली; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हाल

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

गेल्या वर्षापासून आयटीआयचे प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. शनिवारी आयटीआयची प्रवेश यादी लागणार होती. मात्र ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया होऊनही आयटीआयमधील सावळा गोंधळ थांबलेला नाही. प्रवेश यादी लागणार म्हणून त्र्यंबकेश्वर रोड येथील आयटीआयमध्ये पहाटेपासून दाखल झालेले विद्यार्थ्यांची निराशा झाली. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हाल झाले.

आयटीआयमधी‌ल एकूण २७ ट्रेडसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुटसुटीत व्हावी, यासाठी शासनाने ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरूवात केली. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वारंवार शहरात यावे लागले. त्यातच प्रवेश अर्ज भरल्यानंतर प्रवेशाच्या यादीसाठी विद्यार्थ्यांना प्रतीक्षाच करावी लागत असल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्या २९ जूनला यादी लागणार असे आयटीआयकडून सांगण्यात आले होते. यात ४ जुलैला यादी ऑनलाइन जाहीर होईल, असे सांगण्यात आल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरात पहाटेच दाखल झाले. मात्र दिवसभर प्रतीक्षा केल्यानंतरही यादी न आल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला.

यादी नक्की केव्हा?

आयटीआयमधी‌ल एकूण २७ ट्रेडसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे. यादीची प्रतीक्षा संपत नसल्याने विद्यार्थ्यांना इतरत्र प्रवेशासाठी प्रयत्नही करता येत नसल्याने विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळले जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. यादीत प्रवेश मिळाला नसेल तर नव्याने इतरत्र प्रवेशासाठी पुन्हा भटकावे लागणार असल्याचा मनस्तापही पालकांनी व्यक्त केला.

एसएमएस सुविधा द्या

ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवित असताना प्रवेश यादी केव्हा जाहीर होणार याबाबत विद्यार्थ्यांना एसएमएस सुविधा मिळाल्यास ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागणार नाही. यादीबाबत होत असलेला गोंधळ होऊ नये यासाठी प्रशासन का प्रयत्न करत नाही, असा सवालही नागरिकांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमराठी शाळेत मराठी भाषेचे फाऊंडेशन !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील आठवी ते दहावीचे वर्ग सुरु असलेल्या ऊर्दू माध्यमाच्या किंवा अमराठी शाळांमध्ये मराठी भाषा फाउंडेशन वर्ग सुरू करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. यासाठी मानसेवी शिक्षकांची नियुक्ती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

अमराठी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये जिल्ह्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. या विद्यार्थ्यांचेही मराठी भाषेवरील प्रभुत्व वाढीला लागावे या उद्देशाने या फाऊंडेशन उपक्रमाची पायाभरणी केली जाते आहे. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये होणारा मराठी भाषेचा उपयोग पाहता अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी राज्यात मराठीवरील प्रभुत्वाच्या अभावी मागे राहत असल्याचे निरीक्षण शिक्षण विभागाने नोंदविले होते. मराठी विद्यार्थ्यांच्या तुलनेत अमराठी विद्यार्थी या स्पर्धेत हे विद्यार्थी कमी पडू नये, असाही यामागील उद्देश आहे.

मानसेवी शिक्षकांची नियुक्ती

या उपक्रमासाठी इयत्ता आठवी ते दहावी या वर्ग आणि तुकड्यांच्या संख्येनुसार मानसेवी शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ऊर्दू माध्यमिक किंवा मराठी माध्यमेतर शाळांच्या अमराठी विद्यार्थी संख्या, तुकड्यांची संख्या, सद्यस्थितीतील शाळेमध्ये असलेल्या मराठी भाषा शिक्षकांची संख्या या पध्दतीने वर्गीकरण करण्यात येणार आहे. या मानसेवी शिक्षकांची शैक्षणिक अर्हता पदवी व बी.एड किंवा एम.एड असावी. १ जुलै ते ३१ मार्च अशा नऊ महिन्यांच्या कालावधीसाठी ही नेमणूक करण्यात येणार आहे. या नेमणुकीस जिल्हाधिकारी शिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता असणार आहे. या शिक्षकांना दरमहा पाच हजार रुपये एवढे मानधन असेल. मानसेवी शिक्षकांचे प्रस्ताव शासकीय कन्या शाळा आवार, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक या पत्तयावर सादर करावे असे आवाहन शिक्षणाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘म्या बी...’तून श्रद्धा-अंधश्रद्धेचा मेळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देव दगडात न शोधता माणसात शोधावा. कोणत्याही मूर्तीची पूजा करण्यापेक्षा माणसाच्या आचार-विचारावर प्रेम करून स्वतःमध्ये देव शोधा, अशा सुंदर आशयाचे 'म्या बी शंकर हाय' हे नाटक महाकवी कालिदास कलामंदिरात विद्या प्रबोधिनी प्रशालेच्या वतीने सादर करण्यात आले. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ५४ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवात शनिवारी 'म्या बी शंकर हाय', पुण्यातील संस्कृत प्रगत अध्ययन केंद्राने 'को यं राहुल शर्मा' हे तर रत्नागिरीच्या राधाकृष्ण कला मंचने 'संगीत स्वयंवर' या नाटकाचे सादरीकरण केले.

म्या बी शंकर हाय या बालनाट्यात भिक मागणाऱ्या शंकऱ्या व बबी या भाऊ-बहिणीला समाज झिडकारतो. त्यामुळे ते दुसऱ्या गावाला मंदिराजवळ जाऊन भिक मागतात. या दरम्यान त्यांना भगवान शंकर प्रसन्न होतात. मात्र, हा व्यक्ती खोट बोलत आहे, असे समजून शंकऱ्या आणि बबी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. अन् मग स्वतः शंकऱ्याच भगवान शंकराचे रूप घेऊन मंदिरात विराजमान होतो. यातून पसरलेली अंधश्रद्धा, फुलांचा वधारलेला भाव, दर्शनासाठी लागलेली रांग याचे चित्र श्रद्धा-अंधश्रद्धेच्या माध्यमातून नाटकात रंगवण्यात आला. शंकऱ्या ओंकार पंडित व शंकर भगवानांची भूमिका सोहम महाजन यानी निभावली आहे. नाटकाचे लेखन सुजीत जोशी व दिग्दर्शन सागर रत्नपारखी याचे आहे.

कोयं राहुल शर्मा या नाटकात राहुल शर्मा नावाचे तीन पात्र दाखविण्यात आले. आंधळा, मुका व बहिरा अशा कमतरता त्यांच्यात असतात. या व्यंगांना दूर सारून ते ऑनलाइन पद्धतीने नेहा व साक्षी या मुलींशी चॅटिंग करून त्यांना भेटायला बोलावतात. या दोघींच्या संकल्पनेत हे मुलं बसत तर असतात मात्र भविष्याच्या दृष्टीने त्यांच्यातील या कमतरता अडसर निर्माण करतील, या विचाराने त्यांचा गोंधळ उडतो. लेखन व दिग्दर्शन अधिश गबाले यांचे होते. रत्नागिरीच्या राधाकृष्ण कला मंचने 'संगीत स्वयंवर' या संगीत व अभिनयाचा उत्तम मिलाफ सादर केला.

आज पारितोषिक वितरण

मराठी, हिंदी, संस्कृत या भाषांमधील नाटके या महोत्सवात सादर करण्यात आली. नाशिक, मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर अशा पाच विभागीय केंद्रांतून विजेत्या ठरलेल्या नाटकांची अंतिम फेरी पनवेल येथे एप्रिल महिन्यात झाली होती. त्यातील विजेत्या नाटकांचे पारितोषिक वितरण आज (५ जुलै) होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानसिक तणाव अन् उच्च रक्तदाब

$
0
0

>> डॉ. अनिरूद्ध धर्माधिकारी

आधुनिक जीवनशैलीमुळे ज्या विविध आजारांना आमंत्रण मिळत असते त्यापैकी एक आजार म्हणजे 'उच्च रक्तदाब' होय. आजार होऊ नये असे जर मनापासून वाटत असेल तर तो टाळलेला केव्हाही योग्यच नाही का? त्यासाठी मानसिक ताणतणाव टाळले पाहिजे. आजकाल तर अनाठायी स्पर्धेमुळे शाळेपासून ते कार्यालयीन जीवनापर्यंत प्रत्येकाच्याच आयुष्यात ताणतणावांचे साम्राज्य असते. एक ताण संपत नाही तोपर्यंत दुसरा ताण उंबरठ्यावर दत्त म्हणून हजर असतो. संपत्ती हवी, शिक्षण हवे आणि त्याचबरोबर आयुष्य दर्जेदार ही हवे. समाजात आपला मानमरतबही असावा. सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा हाताशी असाव्या, असे जर सामान्य माणसालाही वाटू लागले तर मानसिक ताण येणे अपरिहार्यच आहे. सकारात्मक ताण असेल तर अतिउत्तम कारण त्यामुळे माणूस अतिवेगाने ध्येयाप्रत पोहोचतो. पण, नकारात्मक ताण असेल तर विविध प्रकारच्या आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. आनंदी राहणे हे तर सर्वस्वी आपल्याच हातात असते. त्यासाठी जीवनाचा प्र्र्राधान्यक्रम मात्र प्रत्येकाला ठरविता आला पाहिजे. अर्थातच आपले 'निरोगी आरोग्य' हे त्या क्रमात प्रथम स्थानावर असले पाहिजे. कारण, आरोग्यसंपन्न शरीरच केवळ सर्व भौतिक सुविधांचा उपभोग घेऊ शकते. मानसिक तणाव टाळता आले तर सर्वात उत्तम. परमेश्वराने प्र्र्र्रत्येक मनुष्याला एक स्वतंत्र कलाकृती म्हणून घडविले आहे. प्र्र्र्रत्येकामध्ये कमी अधिक प्रमाणात मृदू भावनांचे रोपण केले आहे. म्हणून प्र्र्रत्येकाच्या जीवन जगण्याचा दृष्टिकोन निरनिराळा आहे. कारण, प्र्र्रत्येकाचे संस्कार तसेच जडणघडण निरनिराळी असते. अगदी साधेच आपल्या मोबाइलचे उदाहरण घेऊ या. येणारे सर्व कॉल्स जर आपण अॅटेंड करायचा प्र्र्र्रयत्न केला तर आयुष्यातील शांती नक्कीच हरवून जार्इल, त्यासाठी आपल्याला हवे तेच कॉल आपण अॅटेंड केले पाहिजे.

मानसिक तणावाची योग्य वेळी दखल घेणे, त्याचे निदान होणे आणि त्यावर प्रभावी उपचार होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्र्र्रत्येकाने केवळ स्वत:शी निकोप अशी स्पर्धा ठेवावी. शालेय जीवनातील पाल्यांकडून पालकांची अवास्तव अपेक्षा नको; कारण बालकाचे पौंगडावस्थेत मन लवकर भरकटू शकते. शाळेमध्ये समुपदेशक, समुपदेशन करीत असतात ही अत्यंत गरजेची बाब आहे. जपानसारख्या प्रगत देशात उत्तम मनुष्यबळ विकसित होण्यासाठी ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळा ठेवल्या जातात. त्यासाठी ग्र्र्रुप थेरेपिज तसेच ग्रुप गेम्सचे आयोजन करण्यात येते. योगाभ्यासातील योग म्हणजे परमतत्वाशी जोड होय. प्र्र्राणायामामुळे ह्रदयाच्या ठोक्यांची गती तसेच रक्तदाब नियंत्रित राहतो. सकाळच्या प्र्र्र्रसन्नतेवेळी निदान पंधरा मिनिट तरी ध्यानधारणेसाठी प्र्र्र्रत्येकाने काढले पाहिजे, ज्याला शास्त्रीय भाषेत 'बायोफिडबॅक' घेणे असे म्हणतात. पाश्चात्यांचे अंधानुकरण करण्याच्या नादात आपल्याला प्र्र्राचीन भारतीय योगशास्त्राचा विसर पडला आहे. सत्संगही आपल्याला 'मी' पणा विसरायला लावत असतो. शांतपणे अंतर्मूख होऊन स्वत:च्या मनात डोकावून पाहिल्यास ताणतणाव निश्चितच कमी होऊ शकतो.

प्रायोग शाळेतील उंदरांवर संशोधन केल्यानंतर असे सिद्ध झाले की, मवाळ उंदरांचा रक्तदाब आक्रमक उंदरांच्या रक्तदाबापेक्षा कमी असतो. इटलीच्या चर्चमधील नन्सचा रक्तदाबही सरासरी ३० मिलिमीटर मर्क्युरीने कमी असतो. कौटुंबिक कलह, कामाच्या ठिकाणचे वातावरण, विविध जबाबदाऱ्या तसेच निर्णय क्षमता या घटकांमुळे मानसिक तणाव निर्माण होत असतो. मानसिक तणावामुळे किती प्र्र्र्रमाणात रक्तदाब वाढले हे खालील गोष्टींवर अवलंबून असते.

१) उद्दीपकामुळे चेतनसंस्था किती उद्दिपित होते.

२) त्या व्यक्तीची मानसिक क्षमता किंवा सहनशक्ती

३) शरीराची ग्र्र्र्ररणक्षमता.

मानसिक तणावामुळे ह्रदयरोग वाढण्याचे कारण 'उच्च रक्तदाब' हे आहे. मानसिक तणावामुळे रक्तातील अॅड्रिनलीन, नॉर अॅड्रिनलीन व ग्लुकोकॉर्टीकॉर्इडस् या संप्र्रेरकाचे प्र्र्र्रमाण वाढते. अॅड्रिनलीनमुळे ह्रदयाच्या ठोक्यांची गती तीव्र होते. रक्तवाहिन्या आकूंचन पावतात आणि ह्रदयाची स्पंदन क्षमता वाढते. प्र्र्रतिकूल परिस्थितीत हल्ला करण्यासाठी किंवा पळ काढण्यासाठी हे बदल शरीरात आवश्यक असतात आणि शरीर त्याप्र्र्र्रमाणे तयारी करते. वारंवार असे झाल्यास रक्तवाहिन्यांच्या स्नायूंचे आकारमान वाढते. रक्तवाहिन्यांच्या आतील अस्तराला इजा होते आणि हळूहळू त्याचा व्यास कमी होतो. कमी व्यासाच्या वाहिनीतून प्र्र्र्रवाह होत असल्याने रक्तदाब आपोआप वाढतो. काही काही मंडळींचे तर घरी इलेक्ट्रॉनिक मशीनने रक्तदाब नॉर्मल येतो पण तोच रक्तदाब हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टरांनी मोजल्यास तो वाढलेला असतो. त्यावर उपाय म्हणजे ऑटोमॅटीक रेकॉर्डिंग करणारे छोटे उपकरण २४ तासांसाठी रुग्ण लावून घेतो जे दर अर्धा तासाने रक्तदाबाची नोंद स्मरणात ठेवते.

मानसिक तणाव जाणीवपूर्वकरित्या कमी केल्यास तसेच आपली सहनशक्ती, मानसिक क्षमता आणि शारीरिक क्षमता जाणीवपूर्वक वाढविल्यास रक्तदाब नक्कीच नियंत्रित होऊ शकतो. अकबर बादशहाच्या अंगठीवर एक वाक्य कोरले होते. - 'ये भी दिन जायेंगे...' एवढे जरी लक्षात ठेवले तरी माणूस तणावमुक्त होऊ शकतो. मनाच्या आत जेव्हा ही गाठ पक्की असते तेव्हा माणूस त्यात गुंतत नाही.

(लेखक प्रसिद्ध ह्रदयरोग तज्ज्ञ आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images