Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

जीवन विकासासाठी शिक्षणशास्त्र महत्त्वाचे

0
0

सध्या राज्यात बी.एड, एम.एड. प्रवेशाची धावपळ दिसून येत आहे. या अभ्यासक्रमाचा लाभ विद्यार्थ्यांनी स्वतःबरोबरच समाजाच्या जीवनविकासासाठी करावा, असे मत मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या अॅड विठ्ठलराव हांडे शिक्षणशास्त्र कॉलेजचे प्राचार्य डॉ. सूर्यभान वाजे यांनी व्यक्त केले. या अभ्यासक्रमाचे महत्त्व, संधी जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी साधलेला संवाद...

कॉलेजमध्ये कोणकोणते अभ्यासक्रम आहेत ?

डी.एड, बी.एड, एम.एड हे अभ्यासक्रम शिकवले जातात. एम.फील. व पी.एचडी. सेंटर म्हणूनही २००५ सालापासून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना येथेच डॉक्टरेट मिळवण्याची सुविधाही मिळालेली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे बी.एड, एम.ए.एज्युकेशन व डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट हे अभ्यासक्रमही या केंद्रावर होतात. आपली शिक्षणपद्धती ही नोकरीभिमुख झाली आहे. मात्र ती व्यवसायाभिमुख असणे गरजेचे आहे. ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांकडे कौशल्य असेल तर ते करत असलेल्या कोणत्याही कामात त्यांना यश मिळू शकतं. त्यामुळे आम्ही प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकास कसा होईल, याकडे लक्ष देऊन त्यांची या अभ्यासक्रमांशी सांगड घालतो.

कोणकोणते उपक्रम येथे राबवले जातात?

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम कॉलेजमध्ये राबवले जातात. शैक्षणिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाशी निगडीत पाठाचा समावेश होतो. तंत्रज्ञान, पर्यावरण, नीतिमूल्ये, अभिरुप, सांघिक यांवर आधारित पाठ विद्यार्थी घेत असतात. याचबरोबर सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमही राबवले जातात. अंधश्रद्धा निर्मुलन, बेटी बचाओ, हुंडा बळी यासारखे जनजागृतीपर उपक्रमही वेळोवेळी होतात. या उपक्रमांचा लाभ विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनविकासासाठी व्हावा, अशी आमची भूमिका असते.

कॉलेजचे वेगळेपण काय आहे?

शिक्षणशास्त्राचे महाराष्ट्रातील हे सर्वात मोठं अनुदानित कॉलेज आहे. कॉलेजमधील वीसपैकी सोळा प्राध्यापक हे पी.एचडी. केलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे ज्ञान ते देऊ शकतात. शिक्षणशास्त्र कॉलेजेससाठी ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. कॉलेजमधील प्रत्येक वर्गात एक स्मार्ट बोर्ड व प्रोजेक्टर लावण्यात आलेला आहे. तंत्रज्ञानाचे महत्त्व शिक्षणाच्या दृष्टीने खूप वाढले आहे. हे ज्ञान शिक्षकाला असणे आजच्या काळात गरजेचे आहे. तसेच भाषा प्रयोगशाळा ही संकल्पना आम्ही येथे राबवत आहोत. विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषा समृद्ध होण्यासाठी ही प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे. त्यात अद्यावत सॉफ्टवेअर्सही अपडेट केले आहेत. तंत्रज्ञानाधिष्ठीत अभ्यासक्रमावर आम्ही भर देत आहोत.

अॅडमिशनसाठी विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल?

या अभ्यासक्रमाकडे वळताना विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे. हे शिक्षण घेऊन केवळ नोकरी करण्याचे ध्येय ठेवण्यापेक्षा यातून करीअरच्या विविध वाटांचा शोध घेणे आवश्यक आहे. आज अनेक ठिकाणी खाजगी क्लासेस सुरू आहेत. तेथे शिकवण्यास असलेले शिक्षक हे केवळ तो अभ्यास येतो म्हणून शिकवतात. पण ही पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना अध्यापनकौशल्याचे योग्य ज्ञान असतं.

या ज्ञानाच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकतात. निर्माण होणाऱ्या पिढीवर उत्तम संस्कार करण्याचे महत्त्वपूर्ण काम ते करत असतात. त्यामुळे या अभ्यासक्रमाकडे वळल्यास विद्यार्थ्यांना आपल्या कुटूंबाला शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच समाजाला सक्षम करण्याचे काम त्यांच्याकडून होऊ शकतं.

(शब्दांकन- अश्विनी कावळे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकची पूजा एनएसडीमध्ये

0
0

अमोघ पोंक्षे, कॉलेज क्लब रिपोर्टर

राज्य नाट्यस्पर्धेत विजयी ठरलेल्या 'न हि वैरेन वैरानि' या नाटकात अभिनय करणाऱ्या पूजा वेदविख्यातची नवी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) मध्ये निवड झाली आहे. एनएसडीतील तीन वर्षांच्या डिप्लोमा कोर्ससाठी दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर केवळ २६ विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यात पूजाचा समावेश आहे.

नाशिक मधील गो. ह. देशपांडे वक्तृत्व स्पर्धेपासून सुरुवात करणाऱ्या पूजाने विविध नाट्य स्पर्धा गाजवलेल्या आहेत. दीपक मंडळ, लोकहितवादी मंडळ व जिनियस संस्था यांच्या माध्यमातून पूजाने नाट्य अभिनयाची चुणूक दाखविली आहे. 'न हि वैरेन वैरानि' या राज्यस्तरीय नाट्य पारितोषिक विजेत्या नाटकातील अभिनयासाठी पूजाला पारितोषिक मिळालेले आहे. बीवायके कॉलेजमध्ये बीकॉमचे शिक्षण पूर्ण करून ती एनएसडीत दाखल होणार आहे. नाट्य दिग्दर्शक मुकुंद कुलकर्णी यांच्याकडून पूजाला अभिनयाचे धडे मिळाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् भरुन आला ऊर

0
0

गतवेळी अवघ्या गुणाने हुकली होती उमेश खांडबहालेची संधी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'युपीएससीच्या अभ्यासासाठी उमेश तीन वर्षांपासून दिल्लीत ठाण मांडून बसलायं. गतवेळी अवघ्या एका गुणानं त्याची संधी हुकली होती. तेव्हापासून उमेश जिद्दीचा पेटला होता. आमचं उभं आयुष्य शेतीत गेलं... त्याने आज मिळविलेले यश आमच्या स्वप्नापेक्षा मोठं आहे. आमच्या कष्टाचं चीज झालं...' असे उद्गार आहेत महिरावणी येथील शेतकरी गणपत खांडबहाले यांचे. त्यांचा मोठा मुलगा उमेश याने युपीएससी परीक्षेच्या अंतिम टप्प्यात म्हणजे मुलाखतीत यश मिळविले.

नाशिकजवळील महिरावणी परिसरात खांडबहाले यांची शेती आणि किराणा दुकान आहे. उमेश यांच्या परिवारात आई-वडील, दोन मुली, दोन मुले असा परिवार आहे. नाशिकमध्ये शिक्षण घेतलेला उमेश गणपत खांडबहाले हा तीन वर्षांपासून दिल्लीमध्ये युपीएससी परीक्षेची तयारी करतो आहे. नाशिकमधून पायाभूत शिक्षण पूर्ण केल्यानंतर अचूक मार्गदर्शनासाठी उमेशने दिल्ली गाठली. तेथे त्याने परीक्षेची तयारी सुरू केली.

तिसऱ्या प्रयत्नात त्याने हे यश मिळविले आहे. गेल्यावेळी मुलाखतीत अवघा एक गुण कमी पडला अन् त्याचे हाती आलेले यश हुकले होते. यानंतर पुन्हा पहिल्यापासून सुरूवात करीत त्याने हे यश मिळविल्याची माहिती उमेशचे वडील गणपत यांनी दिली. उमेशच्या यशामुळे अनेक तरूणांना प्रेरणा मिळणार आहे, असेही ते म्हणाले.

आई-बाबांनाच यशाचे श्रेय

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नाशिक शाखेमध्ये कार्यरत प्रोबेशनरी ऑफिसर कल्याणी राजन मालपुरे यांनीही ७४२ वी रँकिंग मिळवित युपीएससीत नाशिकचे नाव उंचावले. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी हे यश मिळविले आहे. स्पर्धा परीक्षेच्या स्वप्नासाठी आई-बाबांच्या पाठबळावर कल्याणी हिने दिल्ली गाठली. वर्षभर तेथे अभ्यास केल्यानंतर तिला स्टेट बँकेच्या स्पर्धा परीक्षेत यश मिळून नाशिकच्या शाखेत तिची काही महिन्यांपूर्वी नियुक्ती झाली. या यशानंतर मिळेल ती जबाबदारी स्वीकारून भविष्यात फॉरेन सर्व्हिस जॉईन करण्याचा कल्याणी हिचा मानस आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू वाहतूकदारांचा संप; सिंहस्थ कामे ठप्प

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महसूल विभागाकडून अन्यायकारकरित्या दंड वसूल केल्याच्या निषेधार्थ वाळूसह अन्य गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांनी शनिवारपासून बेमुदत बंदचे हत्यार उपसले आहे. साधुग्राम, वाहनतळे येथे मुरूम आणि अन्य सामग्री पोहोचविणारे वाहतूकदारही संपामध्ये सहभागी झाल्याने सिंहस्थाशी संबंधित सर्व कामे ठप्प झाल्याचा दावा वाहतूकदार संघटनांनी केला आहे.

महसूल विभागाकडून वाळू वाहतूकदारांना दमबाजी सुरू आहे. पंचनाम्याशिवायच दंड वसुली केली जात आहे. केवळ नाशिकमध्येच असे प्रकार घडत असल्याचा दावा करीत श्रमिक बि‌ल्डिंग मटेरियल ट्रक चालक-मालक संघटनेसह नाशिक जिल्हा बि‌ल्डिंग मटेरियल सप्लायर्स असोसिएशनने गौण खनिजांची वाहतूक थांबवली आहे. प्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत बेमुदत संप सुरू राहणार आहे. जिल्ह्यात दररोज सुमारे एक हजार गाड्यांद्वारे वाळूची, आठशे गाड्यांद्वारे विटांची वाहतूक होते. याखेरीज खडी, मुरूम आणि डबरच्याही सुमारे एक हजार गाड्या वाहतूक करतात. ही सर्व वाहतूक शनिवारी ठप्प झाली. पाच हजार वाहने रस्त्यावर उतरलीच नाहीत, असा संघटनांचा दावा आहे.

सिंहस्थाशी संबंधित १५० वाहने थांबून

सिंहस्थाची कामे मार्गी लावण्यासाठी प्रशासनाची लगीनघाई सुरू आहे. साधुग्राम, वाहनतळांवर मुरूमासह अन्य सामग्री पोहोचविण्यासाठी ट्रक, ट्रॅक्टर्सची मदत घेतली जात आहे. मात्र, अशा सुमारे दीडशे वाहनांनी वाहतूक बंद ठेवली. त्यामुळे नाशिक, त्र्यंबकेश्वरमधील सिंहस्थाची कामे ठप्प झाली.

स्वत:च सोडली वाहनांची हवा

प्रशासनाचा निषेध करण्यासाठी वाहतूक बंद ठेवणाऱ्या वाहतूकदारांनी स्वत:च वाहनांची हवा सोडली.

वाहने वाहतुकीसाठी उपयोगात आणायचीच नाही अशी खूणगाठ मनाशी पक्की असल्यानेच हवा सोडण्यात आल्याचा वाहतूकदारांकडून सांगितले जात होते.

वाळू वाहतूकदारांचे आक्षेप

- मनमानी पध्दतीने दंडवसुली. - स्वत:च बाजारभाव ठरवून पाच पट दंड आकारणी अन्यायकारक. - वाळूमाफिया संबोधल्याने सामाजिक प्रतिष्ठा धोक्यात. - पोलिसात केल्या जातात खोट्या तक्रारी. - मुल्यांकन किमंत वसूल करणे अन्यायकारक. - जेवढी वाळू चोरीची तेवढ्याच ब्रासवर दंड आकारणे आवश्यक. असताना सर्रास कारवाई.

प्रशासनाने वाळू वाहतूकदारांच्या मागण्या समजून घेऊन त्यावर सकारात्मक तोडगा काढावा. बोली पध्दतीने वाळूचे लिलाव सुरू करावेत. गौण खनिज वाहतूकदारांवर अन्याय होणार नाही, अशी नियमावली महसूल विभागाने तयार करायला हवी. - शिवाजी चुंभळे, अध्यक्ष नाशिक जिल्हा बि‌ल्डिंग मटेरियल सप्लायर्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण समितीसाठी चव्हाण मागणार दाद

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका शिक्षण समिती गठीत करण्याचा महापौरांचा ठराव निलंबित करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात संजय चव्हाण यांनी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा बेकायदा असून, त्या विरोधात पुन्हा न्यायालयीन लढाई लढणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. त्यामुळे समितीचा वाद पुन्हा न्यायालयात जाणार असल्याने समिती पुन्हा न्यायालयीन फेऱ्यात अडकण्याची चिन्हे आहेत.

महापालिकेच्‍या शिक्षण समितीवरून सत्ताधारी मनसे विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरू झाला आहे. शनिवारी होणारी सभापती व उपसभापतीची निवडणूक प्रक्रियाच रद्द झाल्याने समितीच्या सदस्यांनी सरकार विरोधात आगपाखड केली आहे. महासभेने २७ एप्रिल रोजी शिक्षण समितीसाठी १६ सदस्यांची नियुक्ती केली होती. मात्र, या निर्णयाला शिक्षण मंडळाच्या काही सदस्यांनी आक्षेप घेत शासनाकडे दाद मागीतली होती. त्यामुळे राज्य सरकारने त्याला स्थगिती दिली होती.

या निर्णयाविरोधात सदस्य संजय चव्हाण हे हायकोर्टात गेले होते. कोर्टाने राज्य सरकारला फटकारत ही स्थगिती उठवत निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी नगरविकास विभागाचे कार्यसन अधिकारी एस. डी. धोंडे यांनी आदेश काढत महापौरांनी केलेला ४२४ क्रमांकाचा ठराव विखंडित केला. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया रद्द झाली. सरकारच्या या निर्णयाविरोधात संजय चव्हाण यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी या संदर्भातील याचिका दाखल केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वामी सागरानंद सरस्वतींकडे नेतृत्व

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकचा सिंहस्थ स्वामी सागरानंद सरस्वती यांच्या अध्यक्षेखाली आणि मार्गदर्शनाने करावयाचा आहे. स्वामी सागरानंद सरस्वती हे अनुभवी असून, सर्व साधुंना वंदनीय आहेत, असे भावपूर्ण उद्गार जुना आखाड्याचे राष्ट्रीय संर्वधक तथा महामंत्री श्रीमहंत हरीगिरी महाराज यांनी काढले.

त्र्यंबकेश्वर नगर परिषदेत ध्वजपर्वाच्या नियोजनासाठी साधू-महंत आणि नगरपालिका यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. या बैठकीत श्रीमहंत हरीगिरी महाराज बोलत होते. या बैठकीस नाशिकचे यापूर्वीचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीणकुमार साळुंखे यांची खास उपस्थिती लाभली. त्र्यंबकेश्वर मंदिर तसेच शाहीमार्ग आणि आखाड्यांची पाहणी करण्यासाठी ते आले होते. व्यासपीठावर आखाडा परिषद अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती, प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे, श्रीमहंत हरीगिरी महाराज, जुना आखाड्याचे उपाध्यक्ष श्रीमहंत प्रेमगिरी महाराज, डॉ. बिंदुजी महाराज, नगराध्यक्षा अनघा फडके, मुख्याधिकारी निवृत्ती नागरे उपस्थित होते. सभेस उपनगराध्यक्ष संतोष कदम, नगरसेवक धनंजय तुंगार, योगेश तुंगार, स्वामी शंकरानंद महाराज, धनराजगिरी महाराज, शिवपुरी महाराज, दुर्गानंद महाराज आदींसह आणखी काही साधू-महंत उप‌स्थित होते. स्वामी सागरानंद महाराज यांनी प्रारंभीच ध्वजारोहण हा पुरोहित संघ आणि नगरपालिका यांचा विषय आहे, तेव्हा या ध्वजारोहणास अतिथी कोण आहेत याची माहिती देण्यास सांगितले. त्यानंतर चर्चा करण्यात येईल, असे स्पष्ट केले. पुरोहित संघाचे अध्यक्ष यांनी मिरवणूक आणि चित्ररथ या संदर्भात माहिती दिली. श्रीमहंत हरीगिरी महाराज यांनी या चित्ररथांमध्ये आखाड्यांच्या इष्टदेवता जसे श्रीचंद्र भगवान, तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रातील संतांचा समावेश असावा अशी अपेक्षा व्यक्त केली. निलपर्वत जुना आखाड्याचे श्रीमहंत प्रेमगिरी महाराज यांनी धर्मध्वजा पुरोहितांनी व साधुसंतांनी उभारायची असते. याबद्दल ऐतिहासिक माहिती दिली.

मंत्र्यांचीही लाभणार उपस्थिती

गुरू सिंह राशीत १४ जुलै २०१५ रोजी सकाळी ६.३० वाजता प्रवेश करीत आहे. त्यानुसार सकाळी ५ ते ७.३० पर्यंत कार्यक्रम होणार आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, उमा भारती, प्रकाश जावडेकर आदी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिले आहे. तथापि, त्यांचे अजून निश्चित नाही अशी माहिती या प्रसंगी नगरसेवकांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच दिवसांच्या वाहतूक बंदला ‌विरोध

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ पर्वणीकाळात नाशिकमध्ये पाच दिवस वाहतूक बंद ठेवण्याचे पोलिसांच्या विचाराधीन असले तरी वाहतूकदार संघटनांनी त्यास विरोध दर्शवला आहे. पाच दिवस वाहने उभी रा‌हिल्यास आम्हाला मोठा आर्थिक फटका बसेल, अशी कैफियत वाहतूकदारांनी शनिवारी मांडली. जीवनावश्यक वस्तू शहरात आणता याव्यात यासाठी वाहतुकीवरील निर्बंध शिथिल असावेत, अशी सूचनाही वाहतूकदारांनी केली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी वाहतूकदार संघटनांची बैठक बोलावली होती. बैठकीला पोलिस उपायुक्त एन. अंबिका, पंकज डहाणे, महामार्ग सुरक्षा विभागाचे पोलिस अधीक्षक समाधान पवार, वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त प्रशांत वाघुडे यांसह नाशिक गुड ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष पी. एम सैनी, सुरेश शर्मा, इंदरपाल चढ्ढा, डी. पी. पाटील, नाशिक जिल्हा टॅक्सी युनियन आणि नाशिक मुंबई टॅक्सी युनियनशी संबंधित शशिकांत जोशी, देवीकिसन पारीक तसेच वाहतुकीशी संबंधित ५८ जण या बैठकीला उपस्थित होते. सिंहस्थ काळात नाशिकमध्ये बंद ठेवण्यात येणाऱ्या मार्गांची माहिती पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली. शहरातील नो एन्ट्री झोन्स, नो व्हेईकल झोन, आऊटर पार्किंग, इनर पार्किंग याबाबतही वाहतूकदारांना माहिती देण्यात आली. पंचवटी प‌रिसरात एकही वाहन रस्त्यावर असणार नाही असे यावेळी सांगण्यात आले. पर्वणीपूर्वी आणि नंतरचे दोन दिवस तसेच पर्वणीचा दिवस असे पाच दिवस वाहतूक बंद ठेवण्यास सहकार्य, करावे असे आवाहन पोलिसांकडून वाहतूकदारांना करण्यात आले. मात्र, तीन दिवसच वाहतूक बंद ठेवा, अशी सूचना वाहतूकदारांनी केली आहे. भाजीपाला, दूध, औषधे यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू राहील, अशी व्यवस्था असू द्या, अशी सूचना यावेळी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांच्या नावाने जमवली कोट्यवधींची माया

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्थायी समितीच्या सभेत वैद्यकीय विभागात मेडिकल स्टोअर विभागाचे प्रमुख असलेल्या के. बी. निकम यांनी महापौरांसह सदस्यांच्या नावाने फार्मासिस्टकडून कोट्यवधीची वसुली केल्याचा आरोप राहुल दिवे यांनी केला आहे. अठरा वर्षांपासून संबंधित कर्मचारी एकाच टेबलावर काम करीत असल्याचा गौप्यस्फोटही करीत कोट्यवधीची माया जमविल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या सुरस कहाण्या सांगितल्यानंतर सभापतींनी संबंधित कर्मचाऱ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

स्थायी समितीच्या बैठकीत वैद्यकीय विभागासाठी एक कोटी रुपयांच्या औषध खरेदीचा विषयाला मंजुरी देण्यात आली. मात्र, यावेळी दिवे यांनी या विभागात कायम औषधांची खरेदी करणाऱ्या के. बी. निकम यांच्या भ्रष्टाचाऱ्याचा पर्दाफाश केला. निकम हे गेल्या अठरा वर्षांपासून एकाच टेबलावर काम करीत आहेत. त्यांनी कोट्यवधीची संपत्ती जमा केल्याचा आरोप केला.

वर्षभरापूर्वी स्थायी समितीने त्यांची बदली करण्याचे आदेश दिले. मात्र, तरीही निकम त्याच पदावर कायम असल्याचा आरोप करीत महापौर, आयुक्त, स्थायी समिती सभापतींसह नगरसेवकांच्या नावाने फार्मासिस्टकडून ५५ ते ६० लाख रुपये उकळल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित फार्मासिस्ट हे पुराव्यासह आयुक्तांना माहिती देण्यास तयार असल्याने त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली. निकम याच्या सुरस कहाण्या आणि संपत्तीची यादी पाहून सदस्यही अवाक झाले. त्यामुळे सभापतींनी संबंधित कर्मचाऱ्याची लाचलुचपत विभागाकडे तक्रार करून चौकशी करावी अन् चौकशीची माहिती स्थायीला सादर करावी, असे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वॉटर ग्रेस कंपनीवर फुली

0
0

स्वच्छतेच्या ठेक्याप्रकरणी स्थायी समितीने प्रशासनावर फोडले खापर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

साधुग्रामच्या स्वच्छतेचा साडेपाच कोटीचा ठेका पुन्हा वॉटर ग्रेस प्रोडक्टस् या कंपनीला देण्याचा प्रशासनाचा डाव स्थायी समितीने हाणून पाडला आहे. स्थायीत वादळी चर्चेंनतर सदस्यांचा विरोध पाहता सभापती शिवाजी चुंभळे यांनी संशयास्पद पद्धतीने हा प्रस्ताव आल्याचे नमूद केले. संबंधित कंपनी थकबाकीदार असल्याने ठेका वॉटर ग्रेस कंपनीला देऊ नये. तसेच, वॉटर ग्रेस कंपनीच्या दरकरारावर निविदा प्रक्रियेत दुसऱ्या क्रमांकाच्या क्रिस्टल इंटिग्रेटेड कंपनीला ठेका देण्यात यावा, असे आदेश सभापतींनी दिले आहेत.

सिंहस्थ काळात साधुग्रामच्या स्वच्छतेसाठी १३२० सफाई कर्मचारी घेण्याचा वादग्रस्त प्रस्ताव शनिवारच्या स्थायी समिती बैठकीत पुन्हा सादर करण्यात आला. वॉटर ग्रेस कंपनी थकबाकीदार आणि काळ्या यादीतील असतानाही साधुग्रामचा ठेका देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. प्रशासनाने संबंधित कंपनी डिफॉल्टर असतानाही स्थायी समितीवर प्रस्ताव ठेवून सदस्यांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सदस्यांनी केला होता. सभापतींसह काही सदस्यांनी याबाबत प्रशासनाकडे खुलासा मागीतला होता.

संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकले होते, तरी त्याची माहिती का लपवली असा सवाल सदस्यांनी केला. संबंधित कंपनीकडून थकबाकी वसूल का केली नाही, अशा प्रश्नांची सदस्यांनी सरबत्तीच केली. प्रशासनाने सुधारीत डॉकेट ठेवावे, अशी मागणी राहुल दिवे यांनी केली. संबंधित कंपनीकडून ही रक्कम वसूल करावी, अशी मागणी यशवंत निकुळे यांनी केली आहे. आम्हाला जळगावसारके जेलमध्ये जायचे नाही. आम्हाला फाशीवर चढवता का, असा सवाल सदस्यांनी केला. मनसेसह सर्वच सदस्यांनी वॉटर ग्रेसच्या विरोधात भूमिका घेतल्याने अखेरीस सभापतींनी प्रशासनाने समाधानकारक खुलासा केला नसल्याचे सांगून ही प्रक्रियाच संशयास्पद असल्याने संबंधित कंपनीस ठेका देण्यास नकार दिला. तसेच, निविदा प्रक्रियेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या क्रिस्टल इंटिग्रेटेड कंपनीस पहिल्या दरकरारानुसार देण्यात यावा, असे सभापतींनी आदेशित केले. त्यामुळे या ठेक्याच्या वादावर पडदा पडला आहे.

प्रशासन आरोपीच्या पिंजऱ्यात

स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अधिकारी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. संबंधित कंपनीकडून थकबाकी वसूल न करता घंटागाडीचा ठेका कसा दिला, असा सवाल उपस्थित केला. सदस्यांनीही प्रशासन आमच्यावर दबाव टाकून आम्हाला जेलमध्ये अडकावण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. त्यामुळे सभापतींनीच थेट प्रशासनाच्या कारभारावरच संशय व्यक्त केल्याने आयुक्तांच्या अडचणी वाढल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘यूपीएससी’त नाशिकच्या चौघांचे यश

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यूपीएससी परीक्षेत नाशिकच्या चौघांनी यश मिळविले आहे. उमेश गणपत खांडबहाले, कल्याणी राजन मालपुरे, धीरज रविंद्र सोनजे आणि स्वप्नील कोठावदे अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी एप्रिल महिन्यात झालेल्या मुलाखतीच्या अंतिम टप्प्यात यश मिळविले.

उमेश खांडबहालेला ७०४ वे तर कल्याणी मालपुरे हिला ७४२ वी रँकींग मिळाली. स्वप्नील कोठावदे याला ७५५, तर रविंद्र सोनजे याला १००१ वी रँकिंग मिळाली. डिसेंबर २०१४ मध्ये यूपीएससीची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेच्या चाळणीतून मुलाखतीच्या अंतिम टप्प्यापर्यंत देशभरातून सुमारे १,२३६ विद्यार्थी पोहचले. यामध्ये नाशिकच्या चार उमेदवारांचा समावेश होता. विद्यार्थ्यांच्या यशाच्या वृत्तामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्याथ्यांमध्येही हुरूप दिसून आला.

नाशिकचा टक्का वाढतोय

मागील पाच वर्षांपासून स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढतो आहे. एमपीएससी, यूपीएससी या परीक्षांसह विविध स्पर्धा परीक्षांसाठी अनुकूल वातावरण शहरात निर्माण झाले आहे. शहरात एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत यूपीएससीसाठी विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प असली तरीही अलीकडील कालावधीत या परीक्षांविषयीची सलगता वाढत असल्याचे निरीक्षण स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक प्रा. डॉ. जी. आर. पाटील यांनी मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधुग्राम सफाई ठेका क्रिस्टल इंटिग्रेटेडला

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

साधुग्रामच्या स्वच्छतेचा साडेपाच कोटीचा ठेका पुन्हा वॉटर ग्रेस प्रोडक्टस् या कंपनीला देण्याचा प्रशासनाचा डाव स्थायी समितीने हाणून पाडला आहे. स्थायीत वादळी चर्चेंनतर सदस्यांचा विरोध पाहता सभापती शिवाजी चुंभळे यांनी संशयास्पद पद्धतीने हा प्रस्ताव आल्याचे नमूद केले. संबंधित कंपनी थकबाकीदार असल्याने ठेका वॉटर ग्रेस कंपनीला देऊ नये. तसेच, वॉटर ग्रेस कंपनीच्या दरकरारावर निविदा प्रक्रियेत दुसऱ्या क्रमांकाच्या क्रिस्टल इंटिग्रेटेड कंपनीला ठेका देण्यात यावा, असे आदेश सभापतींनी दिले आहेत. स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अधिकारी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. संबंधित कंपनीकडून थकबाकी वसूल न करता घंटागाडीचा ठेका कसा दिला, असा सवाल उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण क्षेत्राला ‘शाळाबाह्य धडा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुणाची आर्थिक परिस्थिती बेताची, कुणाला शिक्षकांची भीती, तर कुणाला घराच्या देखभालीची चिंता...शाळा का सुटते याची असंख्य कारणे शनिवारी शाळाबाह्य सर्वेक्षणाच्या निमित्ताने समोर आली. यातील बहुसंख्य कारणे ही आर्थिक दुर्बलता, शिक्षक-अभ्यासाची वाटणारी भीतीसंबंधित असल्याचा 'शाळाबाह्य धडा' शिक्षणक्षेत्राला व सरकारला शिकता आला. या मोहिमेत असंख्य शाळाबाह्य मुले सापडली असून, याची नोंद अनेक शाळांनी घेतली आहे.

राज्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारच्या शिक्षण विभागातर्फे शाळाबाह्य सर्वेक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार शनिवारी सकाळी सातपासून संध्याकाळी सातपर्यंत हे सर्वेक्षण पार पडले. यात मोठ्या संख्येने शिक्षक आणि मुख्याध्यापक वर्ग सामील झाले होते. कुष्ठरोग्यांची वस्ती, वेश्यावस्ती, कामटवाडा झोपडपट्टी, बसस्टॅण्ड, रेल्वे स्टेशन, गंजमाळ येथील पंचशील झोपडपट्टी, भोईगल्ली, भाजीबाजार, आझादनगर भंगारमार्केट, नदी किनारा परिसर, रामकुंड, मुंबई नाका, देवळाली कॅम्पजवळील सुंदरनगर, विटभट्टी वस्त्या अशा काही संवेदनशील ठिकाणांमधील सर्वेक्षणाचे मोठे आव्हान होते. अशी ३२ ठिकाणे वेगळी करुन तेथे सर्वेक्षणासाठी विशेष पथके नेमण्यात आली होती.

कर्मचाऱ्यांचा गोंधळ!

काही ठिकाणी शाळाबाह्य मुलांना शोधण्यात कर्मचारी यशस्वी झाले, तर काही ठिकाणी नेमकी माहिती मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाल्याचे दिसून आले. संपूर्ण जिल्हाभरात ६ ते १४ या वयोगटातील मुलांचे डोअर-टू-डोअर सर्वेक्षण करण्यात आले. जिल्ह्यात दहा हजारापेक्षा जास्त, तर शहरात तीन हजार ५५२ कर्मचारी सर्वेक्षणात सहभागी झाले. काही ठिकाणी माहिती देण्यास मोठी टाळाटाळ झाल्याने कर्मचाऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागले. कुठे घरांना कुलूप लागलेले, तर कुठे शाळेत जातो असे सांगण्यात आल्याने कर्मचाऱ्यांची पंचाईत झाली. एका कर्मचाऱ्याला शंभर घरांचे सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. बारा तासांत त्यांना हा आकडा गाठायचा होता. सरकारकडून नाश्ता, जेवणाची कोणतीही व्यवस्था केली नसल्याच्या तक्रारी कर्मचाऱ्यांनी केल्या.

नगरसेवक, खासदारांची दांडी

या सर्वेक्षणासाठी राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयात राज्यातील नगरसेवक, आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींनी सामील होण्याच्या सूचना होत्या. मात्र अनेक ठिकाणी झालेल्या सर्वेक्षणात काही अपवाद वगळता नगरसेवक, आमदार, खासदार किंवा लोकप्रतिनिधींनी या सर्वेक्षणाकडे पाठच फिरवली याबद्दल शिक्षण वर्तुळात नाराजी व्यक्त होत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वायफाय सिटीकडे वाटचाल

0
0

बीएसएनएलची राज्यातील पहिली सेवा

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी/नाशिक

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर विविध पातळ्यांवर विकासाकडे झेपावत असतानाच आता बीएसएनएलने राज्यातील पहिली वायफाय सेवा नाशिकमध्ये सुरू केली आहे. नाशिक आणि त्र्यंबकमधील एकूण ८ ठिकाणी १५ ते ३० मिनिटे ग्राहकांना वायफाय सेवा मोफत उपलब्ध होणार आहे.

सिंहस्थात प्रत्येक नागरिकाला आणि भाविकांना सर्वाशी चटकन संवाद साधता यावा, यासाठी बीएसएनएलने वायफाय सुविधेची शनिवारी घोषणा केली आहे. राज्यात नाशिक शहरामध्ये अशी सुविधा सुरू झाल्याचे बीएसएनएलचे (सीएफए) संचालक एन. के. गुप्ता यांनी सांगितले. नाशिक व त्रंबकेश्वर येथे होऊ घातलेल्या सिंहस्थात प्रचंड जनसमुहासाठी ही योजना सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी बीएसएनएलचे महाप्रबंधक सुरेशबाबू प्रजापती यांनी माहिती देतांना सांगितले की नाशकात पंचवटी टेलिफोन एक्सचेंज, रामकुंड, साधुग्राम, लक्ष्मी नारायण मंदिर परिसरात ही योजना चालू करण्यात आली आहे तर, त्र्यंबकेश्वर येथे टेलिफोन केंद्र, कुशावर्त, अमृतकुंभ आणि स्वामी समर्थ केंद्र याठिकाणी ही व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे.

पहिल्या २० मिनिटांसाठी दररोज मोफत असेल तर नंतर ३० रुपयांच्या रिचार्जद्वारे ३० मिनिटे वायफाय वापरता येईल. तसेच, ५० रुपयांत ६० मिनिटे, ९० रुपयांत १२० मिनिटे, तर १५० रुपयांत एक दिवस वैधता असेही त्यांनी सांगितले. देशात येत्या दोन वर्षांत ४० हजार ठिकाणी अशा प्रकारे वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नाशिकनंतर येत्या ९ जुलैला पुरी येथे ही सुविधा कार्यन्वित होणार असून, पुढच्या सहा महिन्यांत २५०० ठिकाणे वायफायने कनेक्ट होतील, असे गुप्ता यांनी सांगितले.

आगामी सिंहस्थासाठी शहरात दर्जेदार सुविधा देण्यासाठी बीएसएनएल प्रयत्नशील आहे. त्यासाठी नाशिक व त्र्यंबकमध्ये मोबाईल टॉवर्सची संख्या वाढविण्यात आली आहे. या आठही ठिकाणी जवळपास ३०० मीटर परिसरात २ ते २०

एमबीपीएस या स्पीडने वायफाय सुविधा उपलब्ध होईल, असे गुप्ता यांनी सांगितले. यामुळे भाविक, पर्यटक आणि नाशिककरांना मोठा फायदा होईल, असा विश्वास प्रजापती यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकस्य अधिकम् फलम् !

0
0

दर तीन वर्षांनी येणारा अधिकमास यंदा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आला आहे. अधिक महिना म्हणजे व्रतवैकल्यांचा काळ. देवाला नैवेद्य अन् जावयांना वाण देऊन त्यांना सन्मानित करणे हे या काळातील महत्कर्तव्य. गोदेमध्ये डुबकी मारून पुण्यसंचय केला जातो, ते वेगळेच. अधिकमासात सोने, चांदी, तांबी पितळाची भांड्यांनाच नव्हे तर कपड्यांना देखील मागणी वाढलेली ‌दिसते. यंदाच्या अधिकमासात अनारशांचा दरवळ लागला, बाजारपेठांमध्ये चैतन्य संचारले. शहरात आणि जिल्ह्यात कोट्यवधी रूपयांची उलाढाल झाली. अधिक फलदायी असलेल्या अधिकमासाचा हा आढावा...

पुण्यफलप्रद अधिकमास

अधिकमास म्हणजे जास्तीचा महिना. दर तीन वर्षांनी येणाऱ्या या महिन्यास 'अधिकमास 'धोंडामास' असे म्हणतात. शक संवत्सरात ३५५ दिवस, तर इंग्रजी वर्षात ३६५ दिवस असतात. त्यासाठी शास्त्रकारांनी अधिकमास ठरविला आहे. दर तीन वर्षांनी (३२ महिने १६ दिवसांनी ) या अधिकमासाचे आगमन होते. सूर्य प्रत्येक महिन्यास एक राशीचे संक्रमण करतो. अधिक महिन्यात सूर्याचे संक्रमण नसते; म्हणून अधिकमासास 'मलमास' असेही संबोधतात. या महिन्यात लग्नादी मंगलकार्य निषिद्ध असतात. अधिकमासाचा स्वामी मुरलीधर श्रीकृष्ण आहे.अधिकमासात तीर्थस्थान, दानधर्म, उपवास, व्रते इत्यादी पुण्यकर्मे करतात. अधिकमासाचे आराध्य दैवत श्रीकृष्ण असल्याने त्याची मन:पूर्वक भक्ती करतात. पुराणात अधिकमासाच्या कथा पुष्कळ आहेत. 'क्षयमास व अधिकमास' अधिकमासात कोणत्याही राशीत सूर्याचे संक्रमण नसते. तसाही चमत्कार एखाद्दा महिनात घडून येतो. तेव्हा सूर्य दोन राशींचे संक्रमण करतो. त्या विशिष्ट महिन्यास 'क्षयमास 'असे म्हणतात. अशा वर्षात क्षयमास पाळण्याची पध्दत नसते. ते वर्ष १२ - १ = ११ महिन्यांचे होईल! या वर्षात दोन अधिक महिने येतात, म्हणजे ते वर्ष एकूण ११ + २ = १३ महिन्याचे होते. या दोन अधिक महिन्यांपैकी क्षयमासापूरवी अधिक महिना मंगलकार्य व पुण्यमास उपयुक्त नसतो. क्षयमासाच्या या गणितात अनेक गमती-जमती आढळतात. १८२२ मध्ये क्षयमासाचे आगमन झाले होते. १९६३ मध्ये कार्तिकमासाचा क्षय झाला. या दोन कालावधीत १४१ वर्षांचे अंतर आहे. १९८२-८३ मध्येही म्हणजेच १९ वर्षांनी पौष महिन्याचा क्षय झाला, म्हणजेच पंचांगात पौष महिनाच नव्हता म्हणजे मार्गशीर्ष नंतर एकदम माघ महिना आला होता. पौषातील संक्रांतीचा नित्याचा सण १४ जानेवारी लाच आला होता. म्हणजेच मार्गशीर्ष कृष्ण अमावास्या हा पुण्यकाळ होता. क्षयमास सर्वसाधारणपणे कार्तिक, मार्गशीर्ष, पौष यापैकी एकच क्षयमास म्हणून संबोधला जातो. क्षयमास व त्यापूर्वी येणारा अधिकमास सर्व शुभ कार्यास वर्ज्य मानले जातात; तर क्षयमासानंतर येणारा अधिकमास पुण्यकार्यास उत्तम मानतात.

पुरोहितांना डिमांड; दक्षिणाही महागली

हिंदू धर्मात अधिकमासाला मोठे महत्त्व असल्याने विविध प्रकारची व्रत वैकल्ये केली जात असून, यासाठी होणाऱ्या वेगवेगळ्या विधींसाठी पुरोहीत मिळत नसल्याने मोठी अडचणींचा सामना भाविकांना करावा लागत आहे. दरतीन वर्षांनी अधिकमास येतो याला पुरुषोत्तम मास असे देखील म्हणतात. कुमारीकांनी करायची व्रते देखील याच महिन्यात केली जातात. सूर्याच्या बारा राशींतून होणाऱ्या संक्रमणामुळे एक 'संवत्सर' होत असते. यावर्षी 'अधिक आषाढ मास' आहे. या पूर्ण महिन्यात सूर्याचे राशांतर होत नसल्याने यास 'अधिक महिना' असे म्हणतात. यालाच पुरुषोत्तममास, मलमास, धोंड्याचा महिना, क्षयमास अशीही इतर नावे आहेत. धार्मिक व्रते, दान, धर्म, पुण्यप्राप्तीच्या दृष्टीने हा अधिकमास सर्वात महत्त्वाचा ठरतो. कारण, या महिन्यातील साधनेचे फल अक्षय मिळते व या महिन्याला साक्षात गोपालकृष्णाचे वरदान आहे. विशेष असे की, या मासातील दान, धर्म, त्याग, व्रते यांना 'अधिकस्य अधिकं फलम्' हा नियम लागू आहे. म्हणून सर्वांनीच या महिन्याचा लाभ करून घेत भगवान श्री गोपालकृष्णाची संपूर्ण कृपा या एकाच महिन्यात प्राप्त करून घ्यावी, असे म्हणतात ही व्रते पुरोहीतांच्या माध्यमातूनच होणे गरजेचे असते. परंतू यजमान अनेक व पुरोहीत कमी असे व्यस्त प्रमाण असल्याने पुरोहीतांची ड‌मिांड वाढली आहे. येणाऱ्या सणांच्या बुकिंगसाठीही नागरिकांनी आतापासून पुरोहीताच्या बुकिंगला सुरुवात केली आहे. प्रत्येक व्यवसायांचा ठराविक एक सिझन असतो, त्याप्रमाणे पुरोह‌तिांच्या व्यवसायाचा ही अधिकमास हा प्रमुख सिझन आहे. या व्यवसायात पुरोह‌तिांची संख्या कमी होत असल्याने त्यांचा तुटवडा भासू लागला आहे. या व्यवसायात शाश्वत उत्पन्न नसल्याने या व्यवसायात नवी पिढी येण्यास अनुत्सूक आहे. इतर व्यवसायात उत्पन्न जास्त असल्याने तरुण पिढी नोकरी व्यवसायाकडे वळत आहे. पूर्वी यजमान गुरुजींना दक्षिणा विचारत नसत व गुरुजीही दक्षिणा सांगत नसत; पण वाढत्या महागाईमुळे आज गुरुजींना दक्षिणा सांगणे भाग पडते आहे. काही काळापूर्वी सत्यनारायणाची दक्षिणा शंभर रुपये असायची; परंतु महागाईमुळे तीच दक्षिणा तिनशे रुपयावर गेली आहे. इतर व्यवसायाप्रमाणे या व्यवसायातही आउटसोर्सिंग सुरु झाले आहे. प्रत्येक यजमानाला नेहमीचेच गुरुजी हवे असतात एकाच गुरुजींना सगळ्या ठ‌किाणी जाणे शक्य हेत नाही; म्हणून प्रत्येक गुरुजींनी आपल्या शिष्यांकरवी कामे करुन घेणे सुरु केले आहे व त्या शिष्यांना उत्पन्नातला काही भाग दिला जात आहे. काही कंपन्यानी तर गुरुजींचे अॅन्युअल कॉन्ट्र्रॅक्ट केले आहे. या व्यवसायात आता काही इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या संस्थाही आल्या असल्याने या व्यवसायाला एक वेगळेच परिमाण लाभले आहे.

पुण्यफल देणारे कोकिळा व्रत

अधिकमासामध्ये कोकिळा व्रताचे आचरण केले जाते. आषाढ शुध्द द्वादशीला वामनाची पूजा केल्याने नरमेधाचे फळ मिळते. पूर्वाषाढा नक्षत्र असलेल्या पौर्णिमेला अन्नपानाचे दान केल्याने अक्षय्य अन्नपान मिळते अशीही आख्यायिका आहे. पौर्णिमेला शंकराचा शयनोत्सव पार पाडावा लागतो. या कर्माला जी पौर्णिमा येते ती प्रदोषकाळात असल्यास त्याच पौर्णिमेला कोकिळाव्रत केले जाते. 'स्नानं करिष्ये नियता ब्रह्मचर्य स्थिता सती, भोक्ष्यामि नक्त भुशय्यां करिष्ये प्राणिनां दयाम' असा संकल्प करून मी एक महिन्यापर्यंत हे व्रत करणार आहे असे सांगावे. कोकिळारूपी शिवादेवीची पूजा करावी व केवळ रात्री जेवण करावे. ज्यावर्षी अधिक आषाढ असेल त्यावर्षी हे व्रत करावे. हे व्रत शुध्द आषाढात करण्यास शास्त्राधार नाही. आषाढ किंवा श्रावण या महिन्यातल्या पौर्णिमा, चतुर्दशी किंवा अष्टमी या तिथीला शिवाचे पवित्रारोपण करावे आषाढी पौर्णिमेला चार महिने एकाच जागी राहण्याचा संकल्प करावा आणि व्यासांची पूजा करावी असे शास्त्रात सांगतिले आहे. सुर्योदयापासून तीन मुहूर्तपर्यंत असलेली पौर्णिमा या कामासाठी उत्कृष्ट असते. या व्रतासाठी चार अथवा दोन महिने एकाच जागी रहावे असेही सांगण्यात आले आहे.

कीर्तनकारांची चणचण

अधिकमासानिमित्त सर्वत्र हरिपाठ, भागवत सप्ताह आदी कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याने कीर्तनकारांची चणचण भासू लागली आहे. त्यातच कीर्तनाचा ट्रेंड बदलल्याने सध्याच्या पिढीतील कीर्तनकारांना चांगली मागणी मिळू लागली आहे. संत नामदेवांपासूनची परंपरा असलेले कीर्तन शहरी आणि ग्रामीण या दोन्ही ठिकाणी लोकप्रिय आहे. शास्त्र, पुराण, इतिहासातील घटना कथेतून सांगितले जाणारे कीर्तन काळानुरूप बदलू लागले आहे. धार्मिकतेची चौकट मोडून समाजप्रबोधनाचा वसा पुढे नेण्याचे काम कीर्तनकार करत आहेत. त्यामुळे समकालीन जाणिवांचे प्रतिबिंबही त्यात उमटू लागले आहे. ग्रामीण भागातच नव्हे; तर शहरातही कीर्तनाचे असंख्य कार्यक्रम होत असल्याने कीर्तनकारांची उणीव भासत आहे. त्याच आषाढी वारी आल्याने कीर्तनकार पंढरपूरकडे प्रस्थान करीत आहेत, त्यामुळेही कीर्तनकारांचा भाव वधारला आहे.

'अधिक'च गजबजला गोदाघाट

पुण्यसंचयाचा विशेष कालावधी म्हणून मानल्या जाणाऱ्या अधिक मासामध्ये गोदाघाटही भाविकांच्या गर्दीने गजबजला आहे. कुंभमेळा तोंडावर आलेला असतानाच अधिकासही प्रारंभ झाल्याने हा दुग्धशर्करा योग साधण्यासाठी भाविकांची गोदाकाठी गर्दी वाढते आहे. परिणामी पूजासाहित्याच्या विक्रीचा आलेखही उंचावला आहे. अधिक मासामध्ये गोदास्नानालाही विशेष महत्व आहे. अधिकातील गोदास्नानाचे मुहूर्त साधण्यासाठी शहराबाहेरूनही भाविक नाशिकमध्ये येत आहेत. गोदास्नानाच्या सोबतीलाच ब्राह्मणपूजन, दान आणि दीपदानाचीही प्रथा पाळली जाते. यासाठीही भाविकांची उपस्थिती वाढत असल्याने गोदाकाठचा माहोल बहरला आहे. संध्याकाळच्या वेळी गोदेच्या संथ पाण्यावर तूपाचे दीपही भाविक सोडत असल्याने गोदेलाही अधिकाची झळाळी आली आहे. दानाच्या वस्तूंचीही मोठ्या प्रमाणावर येथे विक्री होत आहे. धातूच्या वस्तूंसह धान्य, वस्त्र, पूजेच्या वस्तूंचीही रेलचेल मोठ्या प्रमाणावर आहे.

चांद‌ीला झळाली अधिक

एरवी सोन्याला मागणी असली तरी अधिक मासामध्ये चांदीचे महत्त्व सोन्याहूनही अधिक आहे. त्यामुळेच गेल्या पंधरा दिवसांपासून चांदीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. शहरातील सराफ व्यावसायिकांकडे दररोज प्रत्येकी सहा ते दहा किलो चांदीची विक्री होत आहे. त्यामुळे दररोज लाखोंच्या घरात ही चांदीची उलाढाल सुरू आहे. अधिक महिना आणि चांदीचे अटोक्यात असलेले दर असे दुहेरी लाभ सध्या ग्राहकांना होत आहेत. सध्या चांदीचा भाव ३६ हजार ते ३७ हजारांच्या दरम्यान आहे. तसेच अधिक महिन्यानिमित्त ‌चांदीच्या वस्तूंची मोठी व्हरायटीही उपलब्ध झाली आहे. त्यामुळे चांदीच्या खरेदीला बाजारपेठेत उधाण आले आहे. नाशिकची चांदी शुध्द असल्याचा बोलबाला असल्याने शहराबरोबरच आसपासच्या गावांमधूनही लोक चांदी खरेदीसाठी नाशिकला प्राधान्य देत आहेत. यामध्ये चांदीचे दिवे, ताट, वाट्या, ताम्हण, पूजेचा सेट, तांब्या-भांडे, जोडवी, पैंजण, समई यांची खरेदी अधिक प्रमाणावर होत आहे. याचबरोबर ताटी-वाटी, तांब्या-भांडं, चमचे असा चांदीचा खास जावई सेटही उपलब्ध झाला आहे. याचबरोबर चांदीचे ट्रे, फुलदाणी, अत्तरदाणी, सुपारीचे भांडे, चांदीचे गाय-वासरु, अनेक सराफी पेढ्यांमध्ये चांदी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक महिना सुरू होण्यापूर्वीही चांदीच्या खरेदीचे प्रमाण सराफ व्यावसा‌यिकाकडे एक ते तीन किलोंदरम्यान असे. परंतु अधिक महिन्यातील चांदीचे महत्त्व लक्षात घेता यामध्ये मोठी वाढ झालेली दिसत आहे. केवळ पारंपरिक वस्तूच नव्हे; तर चांदीच्या नाविन्यपूर्ण वस्तू खरेदी करण्यालाही प्राधान्य मिळत आहे.

फुलवाती ते बत्ताशांची मोठी उलाढाल

अधिकमासात अनेक महत्त्वाच्या वस्तूंसोबतच काही किरकोळ वस्तूंला देखील फार महत्त्व आले आहे. एकाद्या शुभ कार्यात बऱ्याचदा लहानसहान वस्तु चांगलीच धावपळ उडवतात. पौराणिक महत्त्व असणाऱ्या अधिक मासात सोन्याचांदीच्या मोठ्या वस्तूंसोबतच बत्तासे, अनारसे, तांब्याचे निरंजन, तांब्याचे पत्री लहान दिवे, द्रोण तसेच वाती यांवस्तूं मोलाच्या तसेच अधिकमासात महत्वाच्या आहेत. अधिकमासात देवांना वाण लावण्याची पौराणिक धार्मिक प्रथा आहे. यासाठी वाण लावताना या वस्तूंची गरज भासते. बत्तासे आणि अणारसे यांच्या सोबत तांब्याचा पत्री दिवा किंवा शक्य असल्यास तांब्याचे निरंजन वाणमध्ये दिले जाते. देवीदेवतांच्या मंदिरात जाऊन भगिनी बत्तासे, अनारसे हे एका द्रोणमध्ये ठेवत यात एक तांब्याच्या दिवा लाऊन आरती करत हे वाण लावतात. अशावेळी बात्तासांच्या भावात चांगलीच वाढ झालेली दिसून येते. जसा बत्तासा असेल तशी त्याची किंमत लावली जात आहे. साधारण ७० रुपये तर ११० रुपयांपर्यंत या बात्तासांची किंमत बाजारात आहे. बात्तासंसोबातच अनारशांनाही तितकेच महत्त्व असल्याने त्याचीही किंमत वधारली आहे. अनारसे साधारण १५० ते १८० रुपये प्रतिकिलो असे उपलब्ध आहेत. वाण लावण्यासाठी लागणारा पत्राच्या तंबी दिवा १० रुपये डझन ते २५ रुपये डझनापर्यंत उपलब्ध आहेत. त्यामध्ये अनेक प्रकार तसेच क्वालिटी दिसून येत आहे. तांब्याचे निरंजन घ्यायचे झाल्यास ११० रुपयाचे सर्वात लहान निरंजन तर ते घेतले तसे २५०-३०० रुपयापर्यंत निरंजन मिळत आहे. सोबतच फुलवातीची किंमत २० रुपये तर सध्या वातींची किंमत ३० रुपयांपासून पुढेच असल्याचे दिसून येते. अधिक मासात लहानसहान गोष्टींना देखील मानाप्रमाणे भाव असल्याने बाजारपेठा चांगल्याच वधारलेल्या दिसून येत आहेत.

कपडे खरेदीत 'अच्छे दिन'

अधिकमासात मुलगी आणि जावयाला वाण देण्याची आपल्याकडील पद्धत. गेल्या काही वर्षात या वाण देण्यामध्ये काही बदल झाले असले तरीही पारंपरीक गोष्टी जपल्या जात असल्याचे दिसून येते. सोने, चांदी असो वा एखादी वस्तू देण्याबरोबर कपडेही आवर्जून दिले जातात. त्यामुळे कपडे आणि साड्यांचे मार्केट सध्या तेजीत आहे. वर्षभरात होत असलेली उलाढाल या अधिकमासाच्या काळात होत असल्याचे दिसते. त्यामुळे कपड्यांच्या मार्केटमध्ये चांगले वातावरण आहे. काळ बदलला तशी लोकांशी राहणीमानाची पद्धतही बदलली आहे. मात्र आपली संस्कृती जपण्यासाठी आजही काही पद्धतींना पाळल्या जातात. त्यामध्येच जावई आणि मुलीला अधिकामासाचा वाण देण्याबरोबर कपडे दिले जातात. त्याचबरोबर घरातील व्यक्तींनाही आवर्जून कपडे केले जातात. या सगळ्या खरेदीच्या माहोलामुळे कापड बाजारात मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते. आहे. साड्या, लहान मुलांचे कपडे, शर्टिंग, सुटींग सोबतच रेडीमेड कपड्यांनाही मागणी वाढली आहे. काळ बदलल्याने आता लोकांचा खरेदीची क्षमता वाढली आहे. त्यामुळेच ट्रेंडमध्ये असलेल्या गोष्टींकडे सर्वांचा कल दिसून येतो. हल्ली शॉपिंग मॉलमधून खरेदी केली जात असली तरी अशावेळी जुन्या आणि विश्वासू दुकांनामधून आपल्या घरातील व्यक्तींसाठी खरेदी केली जात आहे. एरवी मुलीला माहेरी आल्यावर तिच्या मनाप्रमाणे वस्तू घेतली जात असते तरीही अधिकमासानिमित्त साड्यांनाच अधिक प्रमाणात पसंती आहे. त्याचबरोबर पुरुषांच्या खरेदीतही पारंपरीकता दिसून येते.

तांबे, स्ट‌ीलच्या वस्तूंना मागणी

अधिक महिन्यात जावयाला आणि भाच्याला वाण देण्याची परंपरा पूर्वीपासून आहे. वाणाच्या पंगतीत तांब्याला विशेष महत्त्व आहे. या वस्तूंना ग्राहकांची मिळणारी पसंती लक्षात घेता विक्रेत्यांनी तांब्याची निरांजन, घंगाळे, पंचपात्र, दिवा, ताम्हण, पळी, कलश अशा अनेक वस्तू बाजारात बाजारात उपलब्ध करुन दिल्या आहेत. साधारणपणे १५ रुपयांपासून ३५० रुपयांपर्यंत या वस्तू बाजारात मिळत असून तांबे व स्टीलमध्ये सुमारे दीड कोटींची उलाढाल झाली आहेे. जावयावर कितीही प्रेम असले तरी या खरेदीला महागाईमुळे हात आवरता घ्यावा लागतो. तांब्याच्या वस्तूंचे दर हे आवाक्यातही असल्याने त्याच्या खरेदीला मोठी पसंती मिळते. इतरवेळीही तांब्याच्या वस्तूंच्या खरेदीकडे ग्राहकांचा ओढा असतो. मात्र अधिक महिन्यात याचे प्रमाण दुप्पट होत असल्याचे विक्रेते सांगतात. तांब्याच्या वस्तूंप्रमाणेच स्टीलच्या वस्तूंनाही मागणी वाढली आहे. तसेच स्टीलचे ताट, वाटी, चमचे, ग्लास यांचा एकत्रित सेट घेण्यासही पसंती दिली जात आहे.

सराफ बाजार फुलला; कोट्यवधींची उलाढाल

अधिकमासानिमित्त सराफ बाजाराला झळाळी आली असून, सोने खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या गर्दीमुळे सराफ व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जावयांना देण्यासाठी विविध प्रकारच्या वस्तु बाजारात दाखल झाल्या आहेत. सोन्याच्या भावातील स्थिरतेमुळे खरेदीदारांमध्ये सोने खरेदीचा उत्साह गेल्या काही दिवसांपासून कायम आहे. जावयांना देण्यासाठी व गुंतवणूक म्हणूनही सोन्याची खरेदी होत आहे. अधिक मासाला सुरुवात झाल्यानंतर बाजारात कोट्यावधी रुपयाची उलाढाल होत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. अधिकमासानिमित्त सोने खरेदीला असलेले महत्त्व लक्षात घेऊन सराफ बाजारातील व्यावसायिक सज्ज झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बाजारात विक्रमी उलाढाल होत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. यंदा गत वर्षीच्या तुलनेत अधिक सोने विक्रीची अपेक्षा व्यावसायिकांनी धरली होती. त्याप्रमाणे बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. नाशिकच्या सराफ बाजाराबरोबरच नाशिकरोड, सातपूर, सिडको, पंचवटी भागातील सराफ दुकानातही ग्राहकांनी गर्दी होत आहे. गुरु पुष्यमृताच्या मुहूर्ताप्रमाणेच अधिक मासात थोडे तर सोने खरेदी करावे म्हणजे ते अधिक काळ टिकते व त्याचा संचय दिवसेंदिवस अधिक होत जातो, अशी अख्ययिका आहे. त्यामुळे वाणासाठी व संचयासाठी देखील सुवर्ण खरेदी होत आहे. जावयांसाठी बाजारात विविध प्रकारच्या अंगठ्या उपलब्ध असून, यात डायमंडच्या अंगठ्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. १० हजारांपासून ते लाखो रुपये किंमतीच्या डायमंडच्या अंगठ्यांची विक्री होत आहे. त्या खालोखाल एम्बॉसच्या अंगठी आणि कास्टिंगच्या अंगठ्या देखील आपली मागणी टिकवून आहेत. तसेत चेन, गोफ, ब्रेसलेट यांची देखील मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. ब्रेसलेटमध्ये ५ ग्रॅम वजनापासून ते हव्या तेवढ्या वजनापर्यंत ब्रेसलेटला मागणी आहे. तसेच कोकीळ व्रत असल्याने जावयांना देण्यासाठी चांदीच्या कोकीळा देखील मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. सोन्याचे भाव दहा ग्रॅमसाठी २६ हजार ५०० रुपये इतका होता. अधिकमासाचा मुहूर्त साधत अनेकांनी शुध्द सोन्याची खरेदी केली. त्यात पाटल्या, बांगड्या, नेकलेस, मंगळसुत्र, शुध्द सोन्याच्या अंगठ्या इत्यादींचा समावेश होता. अधिकमासानिमित्त सराफींनी ग्राहकांंच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे.

अनासशांना आली गोडी

अधिकमास महिन्याकाठी १६ ते १७ हजार किलो अनारशाचे पीठ विकले जाते. एकशे दहा ते एकशे वीस रूपये किलो याप्रमाणे सुमारे २० लाख रुपयांची उलाढाल अनारसे पीठ विक्रीतून होत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे. वाण देण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाल्याने वाणासाठी घेतल्या जाणाऱ्या गुळाची मागणी कमी झाली आहे. मात्र मांडे, पुरणपोळी आणि अनारसे अशा सर्वच गोड पदार्थांमध्ये गुळाचा वापर होत असल्याने अधिक मासात गुळाची मागणी दुपटीने वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तयार अनारसे घेण्यास देखील अधिक पसंती दिली जात आहे. १५० ते २०० रुपये किलो दराने हे अनारसे मिळतात. शहरातील काही नावाजलेल्या मिठाई विक्रेत्यांकडे तर अधिक मासात शेकडो किलो अनारशांची विक्री होते. गावठी तुपातील अनारशांचा भाव अधिक असला तरी त्यासही मोठी मागणी आहे. अनारसे ६० रुपये किलो दराने मिळत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिपॉझिट करा; थेट बँकेत जमा

0
0

लायब्ररी, प्रयोगशाळा डिपॉझिट आणि त्यासाठी करण्यात येणारा आडमुठेपणा यावर 'मटा' लेखमालेद्वारे प्रकाश टाकण्यात आला. विद्यार्थ्यांच्या हक्काच्या डिपॉझिटसाठी अनेक पळवाटा असणाऱ्या या मुद्यांवर चांगलीच चर्चा रंगली. या संदर्भातील अनेक मुद्दे विद्यार्थ्यांनी मांडले. नोटीस लावणे, लेक्चर्समध्ये माहिती देणे, कॉलेज प्रतिनिधी तसेच वर्गप्रतिनिधी यांनी वारंवार याचा पाठपुरावा करणे, परीक्षाकाळात सर्वच विद्यार्थी उपलब्ध असल्याने त्यावेळेस डिपॉझिटची माहिती देणे आदी मुद्दे चर्चेत मांडण्यात आले. नाशिकची वाटचाल स्मार्टसिटीकडे होत असल्याने नाशिकच्या कॉलेजेसनी लायब्ररी आणि प्रयोगशाळाचे डिपॉझिट थेट विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा करावे, असा सूर राऊंड टेबलमध्ये व्यक्त करण्यात आला.

बँकेत डिपॉ‌झिट जमा करण्याचा उत्तम पर्याय

सर्वच कॉलेजेसमधून डिपॉझिट घेतले जाते. अर्थात काही कॉलेजेस याला अपवादही आहेत. डिपॉझिट घेणे काही गैर नसले तरी ते परत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यास यावे हे मात्र तेवढेच महत्त्वाचे आहे. कोणतेच कॉलेज विद्यार्थ्याला डिपॉझिट देण्यापासून नकार देत नाही. डिपॉझिट घेतले जाते ते विद्यार्थ्यांना जास्त कागदोपत्रांची मागणी करीत देण्यापेक्षा त्याचा रेकॉर्ड चेक करून देण्यात यावे. डिपॉझिट घेण्यामागे अनेक ध्येय असतात. अगोदर डिपॉझिटची पद्धत नव्हतीच, पण कालांतराने पुस्तकांची मागणी वाढत गेली. अनेक जुनी तसेच दुर्मीळ पुस्तके ग्रंथालयामध्ये असणे म्हणजे प्रतिष्ठा; असे समीकरण अजूनही कायम आहे. यामुळे अनकेदा विद्यार्थी जुनी पुस्तके वाचण्याची मागणी करतात. त्यासाठी फंड किंवा त्यांची रक्कम उपलब्धतेसाठी फी आणि डिपॉझिट घेतले जाते. सध्या अनेकदा विद्यार्थी टेक्स्ट बुक देखील खरेदी करीत नसल्याने त्याची पूर्तता करणे ग्रंथालय विभागाची जबाबदारी बनते. त्यासाठी या डिपॉझिट रक्कम घेतली जाते. एखादे पुस्तक विद्यार्थ्याने ग्रंथालायामधून नेल्यानंतर ते व्यवस्थित परत न केल्यास त्याकडून दंड घेण्यासाठी डिपॉझिट घेतले जाते. म्हणजे तस्सम रक्कम त्याच्या डिपॉझिटमधून वळती करण्यात येते. पुस्तकांची निगा, नवी पुस्तके, पुस्तकांसाठीची अद्ययावत सामग्री या सर्वांसाठी डिपॉझिट रक्कमेचा फायदा होतो. तसेच प्रयोगशाळा डिपॉझिट बाबतही सारखीच भूमिका असते. संबंधित विद्यार्थ्याकडून प्रयोग करतेवेळी जर एखाद्या वस्तूचे नुकसान झाल्यास त्याच्या दंडाच्या रुपात दीडपट रक्कम डिपॉझिट मधूनच वळती केली जाते. डिपॉझिटच्या रक्कमेसंदर्भातील प्रोसेस फक्त किचकट आहे. प्रत्येक कॉलेजच्या अकाउंट विभागात ही रक्कम सांभाळून ठेवली जाते. कॉलेजेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना याबाबत सूचना, मेसेज किंवा सर्वानुमते बँकेत डिपॉझिट जमा करण्याची पद्धत योग्य ठरू शकेल.

- प्राचार्य. डॉ. दिलीप धोंडगे

रिफंड पध्दतच चुकीची

बऱ्याच वेळा कॉलेजियन्सला लायब्ररीमध्ये डिपॉझिट असते हेच माहिती नसते. कुठेतरी विद्यार्थी म्हणून आमचीही जबाबदारी आहे. त्या डिपॉझिटबाबत चौकशी करीत राहणे. त्याबाबतची माहिती लहान अक्षरांमध्ये डिपॉझिट रिफंड आहे, असे नमूद असल्याने विद्यार्थ्यांना ते कळत नाही. डिपॉझिट परत देतांना खूपच चौकशी करण्यापेक्षा लास्ट इयरची फी पावती बघत त्यावरून क्लिअर्न्स देण्यात यावा. रिफंडसाठीची मुदतच मुळात चुकीची आहे. मार्चमध्ये रिझल्ट लागलेला नसतो आणि ग्रज्युएशननंतर विद्यार्थ्यांनी कॉलेज बदलल्यास ते नोव्हेंबरमध्ये डिपॉझिट रिफंड घेण्यासाठी येऊ शकत नाहीत. तसेच, सत्यताप्रत वैगरे करण्यात त्यांच्याकडे फारसा वेळदेखील तेव्हा उपलब्ध नसतो. विद्यार्थ्यांना डिपॉझिट रिफंडबद्दल माहिती करून देणे कॉलेज प्रशासनाला शक्य नसल्यास वर्ग प्रतिनिधी किंवा कॉलेज प्रतिनिधी यांनी मिळून सेमिनार्स घ्यावे. यात हे मुद्दे घेत कॉलेजियन्सला डिपॉझिटबाबत माहिती द्यावी. तसेच, या डिपॉझिटमधून कित्येक पैसा कॉलेज प्रशासानाकडे उपलब्ध असतो. त्याच्यातून विद्यार्थ्यांच्या मागणीच्या पुस्तकांचे ग्रंथालयामध्ये समाविष्ट करणे बरेच सोपे आहे. परंतु, याचा कोणताच विद्यार्थी कायम पाठपुरवठा करीत नसल्याने आयते कॉलेजचे फावून जाते. विद्यार्थी लायब्ररीचा वापर फारच कमी करीत असल्याने याचा फायदा कॉलेज घेते. विद्यार्थ्यांनी एकत्र येत यावर जर कायम विचारपूस केली तर पुस्तके मागवत तसेच डिपॉझिटची प्रक्रिया सोपी करायची मागणी केल्यास हे शक्य आहे. कॉलेजियन्सने कॉलेजला धारेवर धरल्यास सर्व मागण्या मान्य करणे सहज शक्य आहे. तसेच लास्ट इयरनंतर टीसी (ट्रान्स्फर सर्टीफिकेट) देतेवेळीच डिपॉझिटची रक्कम परत केल्यास ही प्रोसेस सोपी होत विद्यार्थ्यांचा पैसा त्यांच्यात हाती पडेल.

- प्रेरणा जैन, विद्यार्थिनी, बीएस्सी

विद्यार्थ्यांचीही जबाबदारी

डिपॉझिट रक्कम परत मिळते याची माहिती घेत ती रक्कम कॉलेजकडून घेणे ही विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे. आपली जबाबदारी न सांभाळल्यास त्याचा गैरफायदा होणारच. हाच प्रकार कॉलेज प्रशासनाचा चालू आहे. आर्टस् कॉमर्स, सायन्सपेक्षाही इंजिनीअरिंगच्या डिपॉझिटची रक्कम भली मोठी आहे. सगळीकडे संगणीकरण वाढले आहे. आताचे विद्यार्थी तसेच शिक्षणसंस्थाही प्रगत झाल्या आहेत. या प्रगतशिलतेचा वापर करीत डिपॉझिट रिफंडबद्दल माहिती पुरवणे कॉलेज प्रशासनास सहज शक्य आहे. कॉलेज प्रशासन ओळखपत्र फॉर्ममध्ये मेल, मोबाइल नंबर्स घेत असते. यावर एक मेल व मेसेज केल्यास विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल. सोबतच प्रवेश अर्जात पालकांचाही नंबर घेतला जातो. त्यांना पालक मिटिंगसंदर्भात मेसेज केले जातात. त्याच सिस्टीममध्ये हा डिपॉझिट रिफंडचा मेसेज करण्यास काय हरकत आहे. जशी सढळ हाताने डिपॉझिटची रक्कम स्वीकारली जाते तशीच ती सढळ हाताने देण्यात यावी. सत्याताप्रत, मार्च आणि नोव्हेंबरमध्येच रिफंड या सर्व रिफंड न देण्यामागच्या पळवाटा आहेत. अनेकदा डिपॉझिट रक्कम विद्यार्थ्याने घेतल्यास त्याचा गैरवापर होतो असा कॉलेज दावा करते. यावर एक उपाय होऊ शकेल. सर्वच विद्यार्थ्याचे बँकेचे अकाउंट क्रमांक घेत त्याच्या कोर्सनंतर याचे डिपॉझिट रक्कम त्या खात्यामध्ये वळती केली जावी. सध्या विद्यार्थ्यानाही बँकेत कॉलेजचे डॉक्युमेंट्स मागितले जातात. म्हणजे त्यांच्याकडे विद्यार्थ्याचा कॉलेजचा डाटा असतोच मग यांना हा डाटा रिकव्हर करायला काय फारसा वेळ लागणार आहे? जर यांची भूमिका ही डिपॉझिट रक्कम स्वखजिन्यात कायम राखण्याची असेल तर यांस सगळीच मुद्दे ही वेळखाऊ आणि तथ्य नसणारी वाटतील. कॉलेजने विद्यार्थ्यांना डिपॉझिट रक्कमची पूर्तता कसलीही अडवणूक न करता दिल्यास आपण एक चांगल्या कॉलेजमध्ये पदवीधर झालो असे समाधान राहील. बँकेत डिपॉझिट रक्कम जमा केल्यास कॉलेजला कसलीही डेडलाइन नसेल. पदवीधर झाल्यावर कधीही ही रक्कम कॉलेजने परत जमा करावी.

- संजय गुरव, पालक

रिफंडबद्दल माहिती देण्यास टाळाटाळ

कॉलेजमध्ये इतर कार्यक्रम, उपक्रम यांच्या बऱ्याच नोटीस लावल्या जातात. पण, डिपॉझिट संदर्भात एकही नोटीस नसल्याने आम्हाला डिपॉझिट रिफंड प्रक्रियेबद्दल काहीही माहिती मिळत नाही. संबंधित लायब्ररीमधूनही याची पुरेपूर माहिती दिली जात नसल्याने संभ्रम निर्माण होतो. डिपॉझिटची रक्कम घेतली जातेच सोबतच वेगळी फी देखील असते. तरी, अजूनही लायब्ररीमध्ये अद्ययावत पुस्तके उपलब्ध नाहीत. नवीन अभ्यासक्रमाची एकही पुस्तक लायब्ररीमध्ये उपलब्ध नसते. परीक्षा काळात पुस्तके घेण्यावरही बंदी आहे. एकावेळी एकच पुस्तक नेऊ शकतात, असे अनेक नियम लायब्ररीचे आहेत. याचा विद्यार्थ्यांना काहीच फायदा नसतो. डिपॉझिट मात्र दरवर्षी घेतात मग सुविधांच्या नावाने यांचा शंखोबा का? विद्यार्थी अनेकदा याची निवेदने देतात पण, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत शांत केले जाते. बक्कळ डिपॉझिट दरवर्षी घेत हे यांचे खजिने भरविण्यासाठी आमची अडवणूक करत असतातच त्याचा साधा मोबदला तर पुस्तकांची अद्ययावत राखत द्यावा. कॉलेज सिस्टीमपर्यंत कॉलेजियन्स पोहचू शकत नाहीत परंतु नोटीस, मेसेज, मेल यांच्या सोबतीने कॉलेज प्रशासनाला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे सहज शक्य आहे. कॉलेजमधील अनुपस्थिती, कार्यक्रम यांचे मेसेज कॉलेजकडून वारंवार दिले जात असतात मग, डिपॉझिट घेऊन जा हा मेसेज आम्हाला कॉलेज देण्यात दिरंगाई करतेय की, त्यांना द्यायचेच नाही, असे अनेकदा वाटते. सोबतच खरी पावती, ओळखपत्र यांची दोरी ते ओढत आमची ओढाताण करतात. डिपॉझिट रिफंड करण्यास त्यांना अवघड वाटत असल्यास आमच्या बँकेत हे पैसे जमा केले जावेत. प्रवेश अर्ज किंवा ओळखपत्र अर्जामध्ये बँकेचे अकाउंट नंबर घेत त्यांनी ही सुविधा करावी. बँकेत पैसे शक्य होतील तेव्हा जमा झाले तरी काही फरक नाही पण आम्हाला आमचे हक्काचे पैसे मिळाल्याचे समाधान राहील. तसेच, कॉलेज पैसे बुडवत नाही अशी खात्री पटण्यास मदत होईल. हायेटेक एज्युकेशनचा वापर करत शिक्षण दिले जात आहे. याचाच वापर हा डिपॉझिट रिफंडसाठी करीत ऑनलाइन प्रक्रियेद्वारे डिपॉझिट रक्कम बँक खात्यात जमा करावी. शाखेनिहाय यादी लावण्यात यावी. म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांचे ‌डिपॉझिट मिळविणे सोपे होईल. तसेच कॉलेज सोडताना त्या विद्यार्थ्यांचे प्रयोगशाळा किंवा लायब्ररीचे किती डिपॉझिट आहे हे तपासून ट्रान्सफर सर्टीफिकेटसोबतच धनादेश दिला तर चांगलेच होईल.

- पूजा गवळे, विद्यार्थिनी, एसवाय आर्टस्

माहितीसाठी सोशल मीडियाचा वापर करावा

लायब्ररी डिपॉझिट असते हे मुळात 'मटा' सिरीजच्या माध्यमातून समजले. डिपॉझिटची कसलीही माहिती आम्हाला दिली जात नाही. लायब्ररी डिपॉझिटबद्दलची माहिती तसेच रिफंड प्रोसेस या संदर्भात माहिती देण्याच्या अनेक पद्धती वापरता येऊ शकतात. या सर्वांसाठी कॉलेज प्रशासनाला वेळ आणि मनुष्यबळ खर्च करायचे नसेल तर त्यांनी सोप्यात सोपे म्हणजे जेव्हा वार्षिक परीक्षा असतात त्याचा पेपर्सच्या दिवशी म्हणजे पेपर दिल्यावर प्रश्नपत्रिका देईपर्यंत ही माहिती सर्वाना सांगणे सहज सोपे आहे. तसेच पेपर्स चालू असल्याने सर्वच विद्यार्थी कॉलेजमध्ये उपस्थित असतात. तसचे सर्वच सोशल मीडियाचा वापर करीत असल्याने कॉलेजच्या लायब्ररीमध्ये न जाणारा देखील याचा वापर करताना दिसतो. कॉलेजने फेसबुकवर एक ऑफिशियल पेज तयार करीत सर्व नोटीस, डिपॉझिट रिफंडची माहिती, प्रक्रिया मुदत या संदर्भात कळविल्यास सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल.

- रोहित भंडारी, विद्यार्थी, एफवाय कॉमर्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहा लाख मतदान कार्डांना ‘आधार’

0
0

अजय पाटील, जळगाव

निवडणूक आयोगाच्या निर्देशांनंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मतदान ओळखपत्र व आधार कार्ड माहितीची सांगड घालण्यासाठी आधार लिंक प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.

४ जुलै पर्यंतच्या अहवालात जळगाव जिल्ह्यात ५ लाख ७४ हजार ७०८ नागरिकांनी आपले मतदान ओळखपत्र आधार्ड कार्डशी जोडले केले आहे. या बाबतीत सध्या जळगाव जिल्हा राज्यात कोल्हापूर, नांदेड व औरंगाबाद नंतर चौथ्या स्थानावर आहे, तर विभागात पहिल्या स्थानावर आहे. जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान ओळखपत्र आधारला कनेक्ट करण्याची प्रक्रिया सुरू असून, प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत जाऊन बीएलओ आधार कार्ड लिंक्ड करून घेत आहेत. जिल्ह्यातील चोपडा मतदार संघात सर्वाधिक ६५ हजारांहून अधिक नागरिकांचे ओळखपत्र आधारशी जोडण्यात आले आहे, तर सर्वात कमी ४८ हजार ७३ नागरिकांचे जळगाव शहर या मतदारसंघात आधार कनेक्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यात दोन महिन्यांपासून मतदान ओळखपत्रांचे आधारशी लिंक्ड करण्याचे काम सुरू आहे. परंतु बीएलओंची अनुपस्थिती, अपुरा प्रतिसाद यामुळे आधार लिंकिंगचे काम मागे पडत असल्याचे चित्र आहे. यासाठी प्रशासनाकडून नागरिकांमध्ये जनजागृती देखील चांगल्या पध्दतीने करण्यात आली आहे.

जिल्हा अव्वल

जळगाव जिल्ह्यात ४ जुलैपर्यंत पाच लाख ७४ हजार नागरिकांनी आपले मतदान कार्ड आधारशी कनेक्ट केले आहे. राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात ९ लाख ८९ हजार ५९३ नागरिकांनी आधारशी मतदान कार्ड कनेक्ट केले. नाशिक विभागात जळगाव जिल्हा प्रथम असून, दुसऱ्या स्थानावर अहमदनगर (५ लाख ३६ हजार ३६१ ), तिसऱ्या क्रमाकांवर नंदुरबार (१ लाख ८४ हजार २६६), चौथ्या क्रमांकावर धुळे (१ लाख ५७ हजार ७९१) तर नाशिक जिल्ह्यात केवळ २ लाख ७९ हजार ९६६ नागरिकांनी आपले मतदान कार्ड आधारशी कनेक्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

0
0

म. टा. वृत्तसेवा, जळगाव

जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, पारोळा आणि धरणगाव बाजार समितीसाठीचा निवडणूक कार्यक्रम शनिवारी जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांनी जाहीर केला आहे. या चारही बाजार समित्यांमध्ये प्रत्येकी १८ जागांसाठी सहा सप्टेंबर रोजी मतदान, तर सात नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

जिल्ह्यातील बारापैकी जामनेर, जळगाव, यावल व अमळनेर या चार बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम यापूर्वीच जाहीर झाला आहे. शनिवारी जाहीर झालेल्या चार बाजार समित्यांपैकी धरणगाव, पाचोरा बाजार समितीवर शिवसेनेची सत्ता असून, चाळीसगाव व पारोळा बाजार समितीत राष्ट्रवादीची सत्ता आहे. या चारही बाजार समित्यांमध्ये सत्ता मिळविण्यासाठी मुख्य लढत ‌राष्ट्रवादी, भाजप व शिवसेनेतच रंगणार आहे. चाळीसगाव व पारोळ्यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, तर धरणगाव व पाचोऱ्यात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत रंगण्याची शक्यता आहे. धरणगाव समितीत काही प्रमाणात भाजपकडून आपली शक्ती आजमावण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

गेल्या पंचवार्षिकमध्ये सोसायटी, ग्रामपंचायत, हमाल-मापाडी व व्यापारी मतदारसंघांसोबतच पणनप्रकिया मतदारसंघसुद्धा होता. मात्र, यावेळेस ९७ व्या घटना दुरस्तीनुसार पणनप्रक्रिया मतदारसंघासाठी स्वतंत्र मतदान होणार आहे. याबाबत कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांनी दिली आहे. चोपडा, भुसावळ, रावेर व बोदवड बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रमदेखील लवकरच जाहीर केला जाणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

निवडणूक कार्यक्रम

अर्ज भरण्याची मुदत : ४ ते २३ जुलै

अर्जांची छाननी : २७ जुलै

अंतिम यादी : २८ जुलै

अर्जांवर अपील करण्याची मुदत : ३ ऑगस्ट

अप‌िलावर निर्णय : १० ऑगस्ट

माघार : १२ व १३ ऑगस्ट

चिन्हवाटप : १४ ऑगस्ट

मतदान : ६ सप्टेंबर

मतमोजणी : ७ सप्टेंबर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकमासाचा योग ठरतोय लक्ष्मीयोग

0
0

केशव ढोन्नर, त्र्यंबकेश्वर

रविवारची सुटी आणि धोंड्याचा महिना असा दुहेरी योग साधण्यासाठी त्र्यंबक येथे गर्दी उसळली आहे. मध्यंतरी सिंहस्थ कामांनी त्र्यंबक शहराची नाकाबंदी करण्यात आली होती. त्यातच अतिक्रमण काढण्यात आल्याने व्यवसायिकांना चांगलाच फटका बसला होता. मात्र, आता अधिकमासाचा योग व्यवसायिकांसाठी लक्ष्मीयोग ठरला आहे. तब्बल सहा महिन्यानंतर त्र्यंबकेश्वरच्या बाजारपेठेची उलाढाल गतिमान झाली आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी लागलेली भाविकांची रांग थेट ग्रामीण रुग्णालयापर्यंत पोहचली होती. दर्शनासाठी दोन तासांपेक्षा अधिक वेळ दर्शनरांगेत थांबावे लागले होते. पाऊस नसल्याने भाविक रांगेत शांतपणे उभे होते. तथापि, पाऊस झाल्यास भाविकांची सत्वपरीक्षाच ठरणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात विश्वस्तांनी पेड दर्शन सुरू केले. त्यास देखील चांगला प्रतिसाद लाभला असून, देवस्थानच्या खजिन्यात भर पडत आहे. अर्थात यामधून भाविकांना काही सुविधा मिळालेल्या नाहीत याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. स्वच्छतागृहापासून पिण्याचे पाणी, निवारा आदी सर्व बाबतीत दुर्लक्ष झाल्याने येथे देव खरोखरच भक्तांची सत्वपरीक्षा पाहतो, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

सध्या मोबाइल हा प्रत्येकाकडे असतो. तशात महिला पर्स बाळगतात. काही भाविकांकडे बॅग असते, हे साहित्य बाहेर जमा करावे लागते. भाविकांना मोबाइल ठेवण्यासाठी पाच दहा रुपये भुर्दंड बसतो. तशात रांगेत दोन तास थांबावे लागल्यास संपर्कक्षेत्राच्या बाहेर जावे लागते. काही वेळेस चुकाचुक होते, अशा एक ना अनेक अडचणींना येथे सामोरे जावे लागत आहे. मंदिर प्रशासनाने मोबाइल लॉकर स्वतः उपलबध्द करणे आवश्यक असताना याबाबत कायम मागणी होऊनही कानाडोळा करण्यात येत आहे. फूल, नारळ, प्रसाद बंदी मात्र अग्रक्रमाने राबचली जात आहे.

अधिकमास असल्याने गर्दी वाढली आहे. या वाढत्या गर्दीचा फायदा व्यवसायिकांना झाला आहे. मागील काही दिवस मंदीचे होते. अर्थात सिंहस्थ कालावधीत सुरक्षेच्या कारणास्तव व्यवसायिकांना पुन्हा बेरोजगारी पदरी येणार आहे.

- निखील सोनवणे, व्यवसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वसाका’ ची सूत्रे प्रशासक मंडळाकडे

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

कसमादे कार्यक्षेत्र असलेल्या विठेवाडी (ता. देवळा) येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यावर अखेर प्रशासक मंडळाची वर्णी लागली आहे. गेल्या १८ महिन्यापासून बंद असलेल्या कारखान्याची चाके भविष्यात पुन्हा रूळावर येतील, असा विश्वास ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. या प्रशासक मंडळावर जिल्हा उपनिबंधक जी. जी. मावळे व शिखर बँकेचे व्ही. के. पकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अहमदनगर येथील प्रादेशिक सहसंचालक मिलिंद भालेराव यांनी विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यावर द्विस्तरीय प्रशासक मंडळाची नियुक्ती करून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या वसाकाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. तत्कालीन चेअरमन डॉ. जे. डी. पवार यांच्या गुरुदत्त पॅनलची एकहाती सत्ता असताना वसाका कामगारांनी आपल्या थकीत १९ महिन्यांच्या पगारांची मागणी केली होती.

यांनतर दि. २ फेब्रुवारी २०१२ रोजी वसाकाचे चेअरमन डॉ. जे. डी. पवार यांनी आपल्या समर्थक संचालकासह राजीनामे सादर केले होते. तेव्हापासून कारखाना बंद स्थितीत आहे. यानंतर वसाका चालविण्यास देण्यासाठी विद्यमान संचालक डॉ. दौलतराव आहेर यांच्यासह माजी चेअरमन शांताराम तात्या आहेर यांनी कमालीचे प्रयत्न केले. खासगी कंपनीमार्फत वसाका चालविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

मात्र, अनेक तांत्रिक अडचणींमुळे अपयश आले. या दरम्यान संचालक शांताराम आहेर यांनी आपल्या समर्थक संचालकासह राजीनामा दिल्याने संचालक मंडळ अल्पमतात आल्याने वसाकावर प्रशासकांची नियुक्ती होण्याचा मार्ग सुकर झाला होता. वसाका कामगारांचे कारखान्याकडे सुमारे ३० कोटी रुपये घेणे असून, राज्य शिखर बँकेसह अन्य बँका व व्यापाऱ्यांचे सुमारे २३० कोटी रूपयांची घेणी आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासक म्हणून जिल्हा उपनिबंधक जी. जी. मावळे व शिखर बँकेचे व्ही. के. पकाळ यांची नियुक्ती झाल्याने ते पुढील कामकाजाची दिशा कशी ठरवितात, यावर पुढील घडामोडी निश्चित होणार आहेत. यामुळे कधी चाके फिरतात याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात पाच दिवसाआड पाणीपुरवठा

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

वरूणराजाची अवकृपा, तसेच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चणकापूर व केळझर धरणात पाण्याचा ठणठणाट या पार्श्वभूमीवर सटाणा शहरात गत आठवड्यापासून तीव्र पाणीटंचाई सुरू झाली आहे. दोन दिवसाआड होणारा नळपाणीपुरवठा तब्बल चार ते पाच दिवसाआड झाल्याने शहरात कमालीची पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

उन्हाळ्यापेक्षा ही भयावह स्थिती जुलै महिन्यात निर्माण झाल्याने पालिका प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. पुनद धरणातून तातडीने आवर्तन मिळावे, यासाठी नगराध्यक्षा सुलोचना चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. मार्च, एप्रिल व मे महिन्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागला नाही त्यापेक्षाही भयंकर परिस्थिती जुलै महिन्यात सटाणा शहरात उद्भवली आहे. शहरात पिण्याच्या पाण्यासह वापराच्या पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. शहरात पाण्याचे टँकर धावू लागले असून खासगी टँकर, पाणी वाटप करणाऱ्या पाणीदार व्यक्तींना आपसूकच महत्त्व प्राप्त झाले आहे.

सटाणा शहराला चणकापूर व केळझर धरणातून पिण्याच्या पाण्याचे वितरण होते. मात्र जून महिना पुरता कोरडा गेल्याने या दोघा धरणातील पाण्याची पातळी जैसे थे आहे. परिणामी ठेंगोडा येथील नदीपात्र कोरडेठाक झाले आहे. शहरातील उद्भव विहिरींचा जलस्त्रोत बंद झालेला आहे. यामुळे शहरात पाण्याची चणचण भासू लागली आहे. पालिकेने दोन दिवसाआड होणारा पिण्याच्या पाण्याचा नळपुरवठा चार ते पाच दिवसांवर नेल्याने जनतेची अधिकच कोंडी निर्माण झाली आहे.

शहरात चार जलकुंभ असले तरीही उद्भव विहिरीं देखील आटल्याने पाण्याचे स्त्रोत संपले आहेत. जोरदार पाऊस झाल्याशिवाय शहरवासीयांनीच तहान भागणार नाही. हे निश्चित आहे. मात्र, तुर्तास पुनद धरणातील जलसाठा जेमतेम असला तरीही सटाणा शहरासाठी एक आवर्तन उपलब्ध होऊ शकत असल्याने आवर्तन देवून शहरवासीयांना तृप्त करण्याची मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images