Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कदम-बनकर पुन्हा आमनेसामने?

$
0
0

पिंपळगाव बाजार समिती निवडणूक रंगणार

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक २६ जुलै रोजी होत असून, उमेदवारी अर्ज छाननीनंतर साधारण १९९ उमेदवार वेगवेगळ्या गटातून निवडणुकीसाठी सज्ज दिसत आहेत. आमदार अनिल कदम, बाजार समितीचे विद्यमान सभापती दिलीप बनकर यांच्यासह माणिकराव बोरस्ते यांच्या गटामुळे निवडणूक चांगलीच रंगणार आहे.

सोसायटी मतदारसंघात ११ जागा असून, यातील महिला गटातील दोन जागेसाठी आठ उमेदवारी अर्ज आहेत. इतर मागास प्रवर्गातील एका जागेसाठी १५ उमेदवारी अर्ज आहेत. भटक्या विमुक्त जाती-जमाती गटातील एका जागेसाठी १६ उमेदवारी अर्ज आहेत. तर, सोसायटी गटातील सर्वसाधारण सात जागांसाठी तब्बल ८५ उमेदवारी अर्ज आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघात चार जागा असून, यातील अनु. जाती-जमातीच्या एका जागेसाठी १२ अर्ज आहेत. सर्वसाधारण गटातील दोन जागांसाठी तब्बल ४३ आहेत. व्यापारी गटातील दोन जागांसाठी दहा तर हमाल-मापारी गटातील एका जागेसाठी चार अर्ज आहेत. इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असली तरी माघारीनंतर चित्र स्पष्ट होईल. माघारीसाठी पॅनलप्रमुखांना कसरत करावी लागणार आहे.

बाजार समितीची निवडणूक आमदार अनिल कदम आणि माजी आमदार दिलीप बनकर यांच्या पॅनलमध्ये होण्याचे संकेत मिळत आहेत. निसाकाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नेते माणिकराव बोरस्ते यांनी स्वतःसह अनेक समर्थकांचे उमेदवारी अर्ज दाखल केल्याने बोरस्ते गटाची भूमिका काय? ते कोणत्या गटाला पाठिंबा देतात व त्यांच्‍यासह त्यांच्या किती समर्थकांची कोणत्या पॅनलमध्ये वर्णी लागते यावर निवडणुकीचे ग‌णित ठरणार आहे. यामुळे बोरस्ते गटासोबत जुळवून घेण्यासाठी कदम व बनकर गटाचे प्रयत्न सुरू आहेत. या दोन्ही नेत्यांची पॅनल निर्मिती करताना दमछाक होणार आहे.

प्रतिष्ठा पणाला

तब्बल हजार कोटी रुपये उलाढाल असलेल्या व कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असलेल्या पिंपळगाव बाजार समितीची सत्ता मिळविण्यासाठी आमदार अनिल कदम व विद्यमान आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आमदार कदम स्वतः निवडणूक लढणार असल्याने या निवडणुकीला चांगलाच रंग येणार आहे. दोन्ही गटाकडे तुल्यबळ उमेदवार असल्याने मतदारांची चांदी होणार आहे. विकासाच्या मुद्याबरोबरच बाजार समितीत असलेले अनेक प्रश्न, कर्मचाऱ्यांचे प्रश्न, आडतदार, व्यापारी यांच्या समस्या आदी मुद्यांभोवती निवडणुकीचा प्रचार रंगणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


३२ गावांना टँकरने पाणीपुरवठा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

राज्य शासनाने राज्यातील टंचाई परिस्थिती लक्षात घेता टंचाईच्या उपाययोजनांना ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्याने चार दिवसाच्या खंडानंतर येवला तालुक्यातील ३२ गावे व १४ वाड्यांना १३ टॅँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाला आहे.

शासनाच्या आजपर्यंतच्या प्रचलित धोरणानुसार पावसाळा सुरू होताना ३० जून अखेर हा पाणीपुरवठा बंद झाला होता. टॅँकरद्वारे पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्याने टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने जलसाठा निर्माण होण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता गृहीत धरून राज्य शासनाने राज्यातील टंचाई उपाययोजनांना येत्या ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

पावसाळा सुरू होऊन दुसरा महिना सुरू झाला पण, येवला तालुक्यात जेमतेम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. तालुक्यातील नदी, नाले अन बंधारे कोरडेच आहेत. विहिरींच्या पाण्याचे स्रोत देखील सुरू होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. त्यामुळे पावसाळा सुरू असला तरी टॅँकरच्या पाण्याचाच तहान भागवण्यासाठी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना आधार मिळतोय.

या गावांना टँकर सुरू

येवला तालुक्यातील बाळापूर, खैरगव्हाण, कुसमाडी, तांदूळवाडी, कासारखेडे, आहेरवाडी, पांजरवाडी, मुरमी, चांदगाव, खरवंडी, देवदरी, लहीत, जायदरे, गोरखनगर, ममदापूर, कोळगाव, धनकवाडी, गुजरखेडे, हडपसावरगाव, पिंपळखुटे तिसरे, महालगाव, वसंतनगर, निळखेडे, अनकाई, पन्हाळसाठे, वाईबोथी, खिर्डीसाठे, गोपाळवाडी, खामगाव, देवठाण, भुलेगाव, नगरसूल, रेंडाळे, तळवाडे, पिंपळखुटे बुद्रुक, खैरगव्हाण, सायगाव, ममदापूर या गावांसह नगरसूल (घनामाळी मळा) व वडाचा मळा (पाटील वस्ती) आदी १४ वाड्यांना पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती तहसीलदार शरद मंडलिक यांनी दिली. पाच शासकीय व आठ खासगी टॅँकरद्वारे येवला तालुक्यात पाणीपुरवठा केला जात आहे. लवकर पाऊस न झाल्यास टँकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिक्षक द्या हो शिक्षक’ची हाक

$
0
0

येवला तालुक्यात ७८ पदे रिक्त; विद्यार्थ्यांचे होतेय नुकसान

म. टा. वृत्तसेवा, येवला

शिक्षक, मुख्याध्यापक आदी रिक्त पदांमुळे येवला तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा मुद्दा याही वर्षी पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ज्ञानदात्या शिक्षकांच्या कमतरतेमुळे ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे चित्र समोर आले आहे.

येवला तालुक्यातील अनेक ठिकाणच्या शाळांमध्ये मंजूर पदांपेक्षा बरीच पदे रिक्त असल्याने 'शिक्षक द्या हो शिक्षक' अशी साद ठिकठिकाणच्या ग्रामस्थ, पालक यांच्याकडून घालताना गावे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. येवला तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये मुख्याध्यापक, पदवीधर प्राथमिक शिक्षक, उपशिक्षक, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांची एकूण तब्बल ७८ पदे रिक्त असल्याने त्याकडे गांभीर्याने बघण्याची वेळ आली आहे.

सध्याच्या बदलत्या स्पर्धेच्या काळात अनेक ठिकाणी खासगी शाळा, इंग्लिश मीडियम अन् महाविद्यालये निर्माण झाली असली तरी आजही ग्रामीण भागातील गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील मुलांसाठी परवडणारे हक्काचे शिक्षण म्हणजे जिल्हा परिषदेची शाळा. ग्रामीण भागातील शिक्षणाची पहिली पायरी असलेल्या या जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांच्या गावोगावच्या इमारतींचा चेहरामोहरा गेल्या काही वर्षात बदलला खरा मात्र, या शाळांमधील शिक्षकांच्या कमतरतेचा प्रश्न दरवर्षीच डोके वर काढत आहे. येवला तालुका देखील त्याला अपवाद नाही. यंदाही गावोगावच्या बऱ्याच शाळांमध्ये मंजूर पदांपेक्षा शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. दरवर्षीच शिक्षक द्या शिक्षक अशा मागण्या होत जिल्हा परिषदेच्या गावातील शाळांना टाळे ठोकण्याचा प्रकार तालुक्यात घडला. यंदाही शिक्षकांच्या मागणीसाठी गावोगावची निवेदने येवला पंचायत समितीत धडकत असल्याने शिक्षक कमतरतेचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच पुढे येताना दिसत आहे.

येवला तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण २३७ शाळा आहेत. अनेक ठिकाणी विविध पदे रिक्त आहेत. तालुक्यात पदवीधर प्राथमिक शिक्षकांची एकूण १२७ पदे मंजूर असताना त्यातील १६ पदे रिक्त आहेत. उपशिक्षकांची एकूण ७२० पदे असून त्यातील मराठी माध्यमाची ३१ तर उर्दू शाळांमधील ५ पदे अशी ३६ पदे रिक्त आहेत. हेही नसे थोडके की काय म्हणून मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख यांचीही अनेक पदे रिक्त असल्याने शाळेत कार्यरत असलेल्या अनेक गुरुजींनाच हेडमास्तरकीचा भार उचलावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. येवला तालुक्यात मुख्याध्यापकांची एकूण ५१ पदे मंजूर असताना त्यातील तब्बल १८ पदे रिक्त आहेत. केंद्र प्रमुखांची १८ पदे असताना केवळ ११ पदे सध्या भरली गेलेली आहेत. तालुक्यातील बोकटे, चिचोंडी, गवंडगाव, नागडे, नगरसूल, सावरगाव, येवला मराठी ही केंद्र प्रमुखांची सात पदे सध्या रिक्त आहेत. येवला पंचायत समितीत शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची ६ पदे मंजूर असून, त्यात येवला उर्दू या बीटाचे एक पद रिक्त आहे.

हेडमास्तर विना चाले यांचा गाडा

येवला तालुक्यातील अंदरसूल मुले, बोकटे, महालखेडा पाटोदे, आडगाव रेपाळ, सोमठाण देश, आडसुरेगाव, गवंडगाव, भुलेगाव, खामगाव, देवठाण, नगरसूल, पांजरवाडी, सायगाव, सावरगाव, साबरवाडी, ठाणगाव, बिजलाईनगर व येवला उर्दू शाळा मुली क्रमांक-२ या तब्बल १८ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापकांची पदे रिक्त असल्याने 'हेडमास्तर विना चाले यांचा गाडा' असे म्हणण्याची वेळ आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणीला गाडीतून उतरविले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करताना येणारे विचित्र अनुभव नवीन नाहीत. खासगी ट्रॅव्हल्सच्या अशाच मुजोरीचा सामना नाशिकमधील एका तरुणीला नुकताच करावा लागला. नाशिक-पुणे प्रवासादरम्यान चालकाने या तरुणीला बसमधून खाली उतरवून दिले.

पुण्यात शिकणाऱ्या मनीषा सोनवणे (नाव बदललेले आहे) या तरुणीला या प्रसंगाचा सामना करावा लागला. रविवारी एशियाड व परिवर्तन बसेसला गर्दी असल्याने या विद्यार्थिनीने ठक्कर बाजाराबाहेर उभ्या राहणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसने जाण्याचा निर्णय घेतला. सायंकाळी साडेसहापर्यंत बस पुण्यात पोहोचेल अशी माहिती ड्रायव्हरने दिल्याने या विद्यार्थिनी बसमध्ये बसली. मात्र, ठरलेल्या वेळेपेक्षा पाऊण तास उशिराने बस निघाली. नाशिकरोडला बस अर्धा तास थांबली. पुढे एका ढाब्यावर ड्रायव्हरने जवळपास ५० मिनिटे बस थांबवली.

बसमधील सर्व प्रवासी यामुळे वैतागले. मात्र, कुणीही बोलत नव्हते. मंचरहून पुढे निघाल्यावर ड्रायव्हर गाडी अधिकच धिम्या गतीने चालवू लागल्याने या विद्यार्थिनीने घडणाऱ्या प्रकाराबाबत चौकशी केली. मात्र, ड्रायव्हरने तिच्या प्रश्नाचे उत्तर देण्याएवजी रस्त्यात गाडी थांबवून तिला खाली उतरण्याचा सल्ला दिला. हा सगळा प्रकार बसमधील इतर प्रवासीही पाहात होते. परंतु, यापैकी कुणीही ड्रायव्हरला विरोध केला नाही. ड्रायव्हरने भर रस्त्यात गाडी थांबवून उतरवून दिले. प्रवासाचे पूर्ण पैसे देऊनही या विद्यार्थिनीला या मुजोरीला सामोरे जावे लागले आहे. बस निघून गेल्यानंतर पुण्यात राहणाऱ्या आपल्या मामाला फोन करून प्राजक्ताने बोलावून घेतले; मात्र या सर्व प्रकारामुळे तिला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रॉम्प्टनची आता रोज सुनावणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

अंबड एमआयडीसीमधील नावाजलेल्या क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीतील कामबंद आंदोलनाची सुनावणी रोजच होणार आहे. त्यामुळे या प्रकरणात लवकर सोक्षमोक्ष लागण्याची कंपनीतील कामगारांसह एमआयडीसीला आस लागलेली आहे. परंतु, बंद असलेल्या क्रॉम्प्टनमुळे कोट्यवधींचा फटका बसला आहे. यात एकाच विचार सरणीच्या दोन कामगार युनियनमुळे कामगारांना न्याय मिळणार का, असा प्रश्न कामगार वर्गातून उपस्थित होत आहे.

सिटू प्रणित युनियनशी वेतनावावाढीची बोलणी करावी या मागणीसाठी क्रॉम्प्टन कंपनीतील कामगारांनी ११ मेपासून कामबंद आंदोलन पुकारले होते. यानंतर कंपनी व्यवस्थापन व आयटक, सिटू युनियन यांचे औद्योगिक न्यायालयात सुनावणी सुरू आहे. परंतु, यात एकाच विचार धारणेच्या दोन कामगार युनियनमुळे कामगारांना न्याय मिळणार का, असा प्रश्न कामगार वर्गातून उपस्थित होत आहे. त्यातच औद्योगिक न्यायालयात कंपनी व्यवस्थापन व सिटू युनियन यांच्यातील प्रकरणाची रोजच सुनावणी होत आहे. परंतु, क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीत दोन महिने कामबंद आंदोलनाला होत असतांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. यासाठी कामगार उपायुक्तांनीच मध्यस्ती करत कामंबद आंदोलन मागे घेण्याची मागणी कामगार वर्गातून होत आहे.

दरम्यान, क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीच्या बाबतीत कामगार मंत्री देशुमख यांच्याकडे कंपनी व्यवस्थापन व कामगारांची बैठक झाली होती. परंतु, कंपनी व्यवस्थापनाने कामगार मंत्र्यांकडे मान्य केलेले काही मुद्दे कामगार उपायुक्तांकडे नाकारले होते. यामुळे कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांनी कंपनीच्या प्रवेशद्वारावर सभा घेत कामबंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जाहीर केले होते.

अफवांचे पिक

सिटूप्रणित आणि आयटकप्रणित कामगार संघटनांमधील वादामुळे क्रॉम्प्टन व्यवस्थापनाने कंपनीतील मशिनरी विकण्यासाठी काढल्याचा मेसेज शहरात सोमवारी सर्वत्र फिरत होता. यामुळे क्रॉम्प्टन तसेच या कंपनीचे वेंडर हादरले. याबाबत कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापन यांच्याकडे अनेकांनी विचारणा केली. मात्र, अशी कोण‌तीही गंभीर परिस्थिती उद्भवली नसल्याचे कामगार संघटनांनी स्पष्ट केले. तसेच या मुद्यावर व्यवस्थापनाकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

सुगुणा कामगारांना २२०० रुपयांची वेतनवाढ

सातपूर : नाशिक जिल्हातील चांदवड तालुक्यातील खडकजाम येथील सुगुणा कंपनीतील कामगारांना २२००० रुपयांची वेतनवाढ मिळाली आहे. तसेच कंपनीत काम करणाऱ्या १४३ कामगारांना कायमस्वरूपी करण्याचे पत्र देखील देण्यात आले आहे. यामुळे कंपनीतील कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सुगुणा फुडस प्रा. लिमिटेड कंपनीत कामगारांनी गेल्या वर्षी भाजप कामगार मोर्चा संलग्न महाराष्ट्र कामगार संघाचे सदस्यत्व स्वीकारले होते. कंपनी व्यवस्थापन व कामगार युनियन यांच्यात वेतनवाढीची बोलणी सुरू होती. दरम्यान सोमवारी कामगार उपायुक्त आर. एस. जाधव यांच्या दालनात वेतनवाढीच्या करारावर सह्या झाल्या. यात वर्षांला २२ हजार ८०० रुपयांची म्हणजेच प्रतिमहा सरासरी २२०० रुपयांची वेतनवाढ मिळणार आहे. कामगार उपायुक्त कार्यालयात झालेल्या वेतनवाढ कराराप्रसंगी कंपनी व्यवस्थापनाचे डॉ. दत्तात्रय कदम, बी. शिवकुमार, राकेश शिंदे व महाराष्ट्र कामगार संघाचे सरचिटणीस विक्रम नागरे, कंपनीचे युनियन सदस्य सुयोग ठोके, चेतन देशमुख, शरद पवार, यशवंत मोकळ, पंकज कोळंबी यासंह कामगार उपस्थित होते.

१४३ कामगार कायम

वेतनवाढीच्या करारात १४३ कामगारांना सेवेत कायम करण्याच आले असल्याची माहिती सरचिटणीस नागरे यांनी दिली. तसेच जानेवारी २०१७ मध्ये उर्वरित दहा कामगारांना कायम केले जाणार आहे. वेतनवाढ करारासाठी आमदार बाळासाहेब सानप व माजी आमदार वसंत गिते यांच्या मध्यस्तीने करण्यात आला असल्याचेही नागरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकची सुवर्ण जोडी

$
0
0

>> अविनाश खैरनार

चीनमधील वूहान येथे नुकत्याच झालेल्या जागतिक शालेय मैदानी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या होरायझन अकॅडमीत शिकणाऱ्या दुर्गा देवरे हिने पंधराशे मीटरचे अंतर ४.३३.६६ या विक्रमी वेळेत पूर्ण करून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदार्पणातच पहिले सुवर्णपदक मिळवून भविष्यातील तिच्याकडून अपेक्षा वाढविल्या आहेत.

ज्याप्रमाणे डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, वकिलाचा मुलगा वकील, पुढाऱ्याचा मुलगा पुढारी त्याप्रमाणे दुर्गा देखील प्रमोद देवरे या राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडूची कन्या. दुर्गाचे आजोबा कै. वसंतराव देवरे हे देखील व्हॉलीबॉल खेळाडू. त्यामुळे साहजिकच दुर्गाला लहानपणापासून खेळाची आवड निर्माण होणे स्वाभाविकच आहे. पण आपले आजोबा व वडील यांच्याप्रमाणे व्हॉलीबॉल मैदानाकडे न जाता भाऊ प्रणव याच्याबरोबर वयाच्या सहाव्या वर्षापासून भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर साई प्रशिक्षक विजयेंद्र सिंग यांच्याकडे धावण्याच्या सरावास जाऊ लागली. सिंग सरांच्या मार्गदर्शनामुळे दुर्गाने अल्पावधीतच आंतर शालेय, राज्य संघटनेच्या विविध वयोगटाच्या स्पर्धेत चांगली कामगिरी करून कविता राऊत, मोनिका आथरे, अंजना ठमके, संजीवनी जाधव यांच्यानंतर आपणच मैदान गाजविणार असल्याची चुणूक दाखविली होती. अपेक्षेप्रमाणे गेल्या दोन वर्षापासून दुर्गाने राष्ट्रीय स्पर्धा गाजविण्यास सुरुवात करून गोवा येथील राष्ट्रीय युवा मैदानी स्पर्धेत पंधराशे मीटर अंतराची स्पर्धा ४.३५.६ अशा वेळेत जिंकून आपल्या नावावर नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. वूहान येथील स्पर्धेत तिने आपलाच विक्रम मोडीत काढून आणखी एक पाउल पुढे टाकले आहे.

वूहान येथील स्पर्धेत दुर्गा प्रमाणेच सुवर्ण कामगिरी करणारा किसन तडवी हा दोन महिन्यांपूर्वीच आशियाई युवा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून प्रकाशात आला. या दोन महिन्याच्या कालावधीत आपले दुसरे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक मिळवून त्याने पुन्हा एकदा दाखवून दिले की, जो कठोर परिश्रम घेतो त्याला निश्चित यश हे मिळतेच, त्यासाठी वाटेत कितीही अडथळे आले तरी त्यावर मेहनत घेवून मात करता येते. नंदुरबार जिह्यातील अक्कलकुवा तालुक्यात बडी या रानमाळावरील

आदिवासी पाड्याचा रहिवासी असलेला किसान तडवी. घरात अठराविश्व दारिद्र्य अन् आठ भावंडाचा परिवार असलेल्या किसनचा सातपुड्याचे रानवन तुडवीत सुरू झालेला सुवर्ण यशापर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर राहिला आहे. प्रशिक्षक विजयेंद्र सिंग यांच्यामुळे त्याला एका वेगळ्या क्षेत्राची ओळख झाली आणि आज तो इथपर्यंत येवून पोहचला आहे. परिस्थितीचे रडगाणे न गाता चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी असेल तर यश मिळविणे सहज शक्य होते हे यापूर्वी सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊत, अंजना ठमके, यांच्यानंतर किसनने दाखवून दिले आहे.

इटावा येथे २०१३ मध्ये शालेय राष्ट्रीय स्पर्धेत किसनने १६ वर्षाखालील गटात तीन हजार मीटरचे अंतर आठ मिनिटे ३१ सेकंदात पूर्ण करून नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करीत नाशिकच्या दत्ता बोरसे, सुरेश वाघ यांचा वारसा पुढे चालू ठेवण्यास आपण येत आहोत याची जणू झलकच दाखविली. त्यानंतर दोहा येथे झालेल्या आशियाई युवा स्पर्धेत आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत आठ मिनिटे २६ सेकंद अशी वेळ देवून पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले होते. आताचे हे त्याचे दुसरे आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक. २०२० मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत नाशिककर धावपटू निश्चितच तिरंगा फडकवतील अशी आशा बाळगण्यास हरकत नाही. मात्र, त्यासाठी नाशिककरांनी या खेळाडुंच्या सत्कारासाठी वेळ न दडविता खेळाडूंना शुभेच्छा द्याव्यात त्याचप्रमाणे या खेळाडूंच्या प्रशिक्षकांनी सरावाकडे लक्ष द्यावे हे आवर्जून सांगावेसे वाटते.

(लेखक क्रीडा संघटक आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एनएसडीत प्रवेश अविस्मरणीयच

$
0
0

दिल्लीतील एनएसडी अर्थात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेमार्फत निवडण्यात आलेल्या २६ जणांमध्ये नाशिकच्या पूजा वेदविख्यातचाही समावेश आहे. यानिमित्ताने `मटा`ने पूजाशी संवाद साधत तिचा प्रवास जाणून घेतला.

नाट्यक्षेत्रातील तुझा प्रवास नेमका कुठून सुरू झाला?

नाट्यअभिनयाचे धडे वगैरे लहानपणी मी कधीच घेतले नाहीत, ना कोणत्या बालनाट्यात काम केले पण शाळेत असताना विविध वक्तृत्व स्पर्धेत मी भाग घेऊ लागले आणि स्टेजवर येऊन काही सादर करण्यासाठी मला हिंमत मिळू लागली. यातूनच बी कॉम फर्स्ट इयरला असताना मला नाट्यक्षेत्र खुणावू लागलं आणि मी विविध एकांकिका स्पर्धांमध्ये मग भाग घेऊ लागले. आज इथे बोलताना मला मी केलेलं 'अजब अथेल्लो' हे पहिलं नाटक आठवतयं. माझी आई आणि मावशी दोघी ही नाटकात पूर्वी काम करीत असल्याने अभिनयाचं बाळकडू मला त्यांच्याकडूनच मिळालं.

सिरीयल, चित्रपट यांच्या तुलनेत नाट्यक्षेत्रच तुला सरस का वाटलं?

माझ्यातील अभिनयाची चुणूक पाहून मला मोठ्या अभिनेत्यांच्या एका चित्रपटासाठी साईड रोल म्हणून ऑफरही आली होती. मात्र, मी ती ऑफर नाट्यप्रेमापायी नाकारली होती. मुळात नाटकात एकसलग खंड न पडू देता मिळालेली भूमिका जगण्यात जी मजा आहे ती मजा सीरियल आणि चित्रपटात टेक देत सिन करण्यात नाही असे मला वाटते. अंगावर येणारे ते लाईट, तालमीत होणारी धमाल ही फक्त नाटकाच्या प्रोसेसमध्येच अनुभवायला मिळते. चित्रपट, सीरियल कधीच करणार नाही असं नाही पण सुरुवातीला तरी नाट्यशिक्षणातून स्वतःला पैलू पाडत काम करण्याची इच्छा आहे.

अभिनय क्षेत्रातील कामादरम्यान शिक्षण कोणते वळणं घेत होते?

जगासाठी मी बी. कॉम आहे. पण त्याचा अभ्यास मी कधीच मनापासून केला नाही, जेवढा मी नाटकातल्या एखाद्या भूमिकेचा करते. एनएसडीत प्रवेश मिळावा म्हणून मध्यंतरी मी कसोशीने प्रयत्न केले. त्यादरम्यान मी मुक्त विद्यापीठातून योग शिक्षक डिप्लोमा कोर्स ही पूर्ण केला. गाण्याच्या माझ्या तीन परीक्षा झाल्या आहेत.

एनएसडीमध्ये प्रवेशाची प्रक्रिया कशी पार पडली?

एप्रिलमध्ये मी फॉर्म भरला आणि त्यासोबत माझा पोर्टफोलिओ जोडून पाठवला. अभिनयात रस असूनही मी फॉर्म भरताना दिग्दर्शनाला प्रथम पसंती दिली. केशभूषेपासून वेशभूषेपर्यंत आणि अभिनयापासून छोट्या छोट्या बारकाव्यांचा अभ्यास दिग्दर्शकाला करायला मिळतो आणि जो मला ही करायचा होता म्हणून मी दिग्दर्शनाला प्रथम पसंती दिली. विविध परीक्षांच्या माध्यमातून मला तावून सुलाखून घेतले गेले. १ जून ला झालेल्या प्रात्यक्षिक, लेखी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला, ज्यात माझी पुढील ट्रेनिंग राऊंडलाठी निवड झाल्याचे कळले. यानंतर मी ट्रेनिंगचा राऊंड पूर्ण केला.

तुझे या क्षेत्रातील अनुभव संचित कसे वाढत गेले?

कॉलेजमधून मी विविध एकांकीका करीत होते. गाण्याच्या परीक्षाही दिल्या होत्या. काही दिवस आरजे म्हणून मी कम्युनिटी रेडियो स्टेशनमध्येही काम केले. पण नाट्यक्षेत्रात काम करताना खरं टर्निंग पॉईंट देणारे नाटक ठरले ते म्हणजे कूस बदलताना. टीवायच्या परीक्षेनंतर मेन लीडची रिप्लेसमेंट म्हणून मला घेण्यात आले आणि अवघ्या तीन दिवसात नाटक बसवून मी लगेचच येऊ घातलेल्या नाट्य प्रयोगात दोन भूमिका केल्या. कूस बदलताना या नाटकाचं हिंदी भाषेत भाषांतर झालं आणि त्यात ही मी काम केलं.

नाट्यक्षेत्रात येताना कुटुंबिय किंवा कुणाकडून विरोध झाला का?

अभिनयाचं बाळकडू मला घरुन आई आणि मावशी आजीकडूनच मिळाले होतं. त्यामुळे घरून विरोध व्हायचं कारण नाही पण आईला चिंता वाटते. या क्षेत्रात व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप जास्त आहे आणि याचचं राहून राहून वाईट वाटतं. पण दुसरीकडे आपल्यावर झालेले संस्कार आपल्याला कधी ही चुकीच्या मार्गाने जाऊ देणार नाहीत याची खात्री वाटते.

आत्तापर्यंत मिळालेल्या यशाबद्दल काय सांगशील

मला राज्य नाट्यस्पर्धेत एकूण तीन बक्षिसं मिळाली आहेत. नुकतेच भगवान हिरे लिखित आणि मुकुंद कुलकर्णी दिग्दर्शित "न हि वैरेन वैरानि " या नाटकासाठी आमच्या टीमला सर्वोत्तम नाटक म्हणून पुरस्कार जाहीर झाला. ही अभिमानाने सांगण्याजोगी बाब आहे.

(शब्दांकन-अमोघ पोंक्षे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालगाडी पुन्हा घसरली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इगतपुरी

इगतपुरीत मुंबईहून दौलताबादकडे जाणाऱ्या मालगाडीचे तीन डब्बे रुळावरून घसरून मोठा अपघात झाला. सुदैवाने यात कोणतही जीवित हानी झाली नाही. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या साडेसात तास अथक परिश्रमानंतर रेल्वेमार्ग सुरळीत झाला.

सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या मालगाडीचे तीन डब्बे शहरातील लोकोशेड जवळील राममंदिरसमोर अचानक रेल्वे रूळावरून घसरून मोठी दुर्घटना घडली. यातील मालगाडीचे तीन डब्बे चाकासह जमिनीत घुसले. या ठिकाणी राममंदिरपासून पलीकडच्या बाजूला जाण्याचा पादचारी मार्ग आहे. पलीकडच्या बाजूला रेल्वे वसाहत, आठचाळ, फुलेनगर, सहा बंगला अशा वसाहती आहेत. या वसाहतीमधील नागरिक व विद्यार्थी या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत असतात. सुदैवाने घटना सकाळी पावणेसात वाजता घडली. दरम्यान, शाळा सकाळी साडेसात वाजता भरत असल्याने यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी गर्दी होत असल्याने मोठी जीवितहानी होण्याची दुर्घटना टळल्याचे येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले. या अपघातस्थळी नागरिकांनी व विद्यार्थ्यानी एकच गर्दी केल्याने काही काळ गोंधळ उडाला होता. मात्र, रेल्वेसुरक्षा बलाचे अधिकारी सतीश विधाते व लोहमार्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांनी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेऊन गर्दी हटवली.

सात तास अथक परिश्रम

स्टेशन प्रबंधक व्ही. आर. जाधव, उपप्रबंधक निकम, अभियंता बी. के. केदारे यांच्या देखरेखीखाली सकाळी सात वाजेपासून २५० कर्मचारी व ३५ अधिकाऱ्यांसह मालगाडीचे डब्बे उचलण्याचे काम युध्द पातळीवर सुरू होते. सात तास अथक परिश्रमानंतर अपघात नियंत्रक गाडीच्या सहाय्याने दुपारी अडीच वाजता रेल्वेमार्ग सुरळीत झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुभाजकाचा पडला विसर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

कोट्यवधी रुपये खर्च करून नाशिक-त्र्यंबक रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले असले तरी महापालिकेच्या हद्दीत या रस्त्यावर काही ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेला दुभाजकाचा विसर पडल्याची बाब समोर आली आहे. सिंहस्थ काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना पिंपळगाव बहुला येथील जकात नाका ते समृद्धनगर यादरम्यानच्या रस्त्यावर दुभाजक टाकण्यात आलेले नाहीत. या परिसरात रस्त्यावर नागमोडी वळणे असल्याने तेथे वारंवार छोटे-मोठे अपघात घडत आहेत.

पिंपळगाव बहुला येथील जकात नाक्यापासूनच महापालिकेची हद्द होते. नेमके तेथूनच समृद्धनगर चौफुलीपर्यंत दुभाजक बनविण्यात आलेले नाहीत. या एक किलोमीटरच्या रस्त्यावर तीन मोठी नागमोडी वळणे आहेत. महापालिकेने रस्त्याचे रुंदीकरण केले असले तरी तो खाली-वर बनविण्यात आला आहे. त्यामुळे वेगात असलेल्या वाहनांचे नियंत्रण सुटून अपघात घडत असतात. जावध संकुल जवळही रस्त्याच्या दोन्ही लेन एक ते दीड फुटाने खालीवर आहेत. रस्त्यावर डांबर टाकताना ते व्यवस्थित न टाकले गेल्याने रस्ता ओबड-धोबड बनला आहे. संपूर्ण त्र्यंबकरोडवर दुभाजक बनविण्यात आले आहेत. मात्र, हाच एक किलोमीटरचा पट्टा का सोडण्यात आला, याचे महापालिकेने उत्तर द्यावे, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत. समृद्धनगरच्या चौफुलीजवळ रस्त्याच्या मधोमध असलेले एक झाड येथे रात्री व दिवसाही अपघातांना निमंत्रण देत आहे.

गेल्या महिनाभरात पिंपळगाव बहुला येथील पुलावर अनेक अपघात घडले असल्याचे स्थानिकांनी सांगितले. गेल्या आठवड्यात एक ट्रकचा अपघात होऊन हा ट्रक तब्बल पाच दिवस तेथे तशाच स्थितीत होता. हॉटेल अमृतगार्डन समोरील रस्त्यावरही दुभाजक नसल्याने तेथे सिंहस्थ काळात समोरासमोर अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महापालिकेच्या यंत्रणेने हेतूपुरस्सरपणे दुभाजक टाकली नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशी व वाहनचालकांनी केला आहे.

या रस्त्यावर सायंकाळी प्रचंड वर्दळ असते. त्र्यंबकेश्वर परिसरातील शाळा-कॉलेजसची सुटी झाल्यानंतर तर वाहनांच्या रांगा लागतात. रस्त्यावर अनेक ठिकाणी घातकी वळणे आहेत. त्यामुळे इतक्या दिवसात तेथे दुभाजक टाकणे आवश्यक होते. - दीपक भावले

स्थानिक रहिवासी

सिंहस्थ काळात दिवसभरात हजारो वाहने या रस्त्यावरून धावणार आहेत. मात्र, ज्या ठिकाणी सर्वाधिक धोका त्याच ठिकाणी दुभाजक टाकायला महापालिकेची यंत्रणा विसरली आहे असे वाटते. या रस्त्याची दुरुस्ती करून दुभाजकाचे काम युद्धपातळीवर हाती घ्यायला हवे.

- संतोष पांडे, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तासभर उशिराने विमान उडाले आकाशी...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मेहेर कंपनीच्या शुभारंभीच्या नाशिक-पुणे सेवेला मेहेर आणि एचएएल या दोघांच्या ढिसाळ कारभारामुळे एक तास उशीर झाला. शिवाय, पहिल्याच सेवेसाठीही संपूर्ण बुकींग होऊ शकले नाही तर संध्याकाळची सेवाही रद्द करण्यात आली.

सोमवारी सकाळी ९.४५ वाजता सी प्लेनचे टेक ऑफ होणार होते. मात्र, प्रत्यक्षात हे टेक ऑफ सकाळी १०.४५ वाजता झाले. खासदार हेमंत गोडसे आणि एचएएचले सीईओ दलजित सिंग यांचे टर्मिनलच्या ठिकाणी ९.३० च्या सुमारास आगमन झाले. त्यानंतर छोटेखानी शुभारंभ कार्यक्रम ओझर येथील पॅसेंजर टर्मिनलच्या ठिकाणी घेण्यात आला. मान्यवरांचे उशिरा झालेले आगमन आणि चेक इनची प्रक्रिया करताना तब्बल एक तास उशीर झाला. टर्मिनलमधून प्रवासी बाहेर पडल्यानंतर त्यांना रनवेवरील विमानापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी ही मेहेर कंपनीची आहे. मात्र, त्याचे भान कंपनीला न राहिल्याने प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी धावपळ करण्यात आली आणि ऐनवेळी वाहनव्यवस्था करण्यात आली. अखेर १०.४५ वाजता टेक ऑफ झाल्यानंतर ११.३० च्या सुमारास हे सीप्लेन पुण्याच्या लोहगाव विमानतळावर उतरले. तेथून पुन्हा ते १२.०० वाजेच्या सुमारास निघाले आणि १२.५० वाजता ओझर विमानतळाच्या ठिकाणी उतरले. मेहेर कंपनीच्या नाशिक-पुणे या सेवेच्या बुकींगला धीमा प्रतिसाद असल्याचे मिळत असल्याचे दिसून येत आहे.

फुकटात प्रवास

पहिल्या विमानसेवेत रुचा जायखेडकर, खासदार गोडसे, त्यांचे मित्र शेहनाज पटेल, आमदार सीमा हिरे, त्यांची कन्या रुचा हिरे हे अवघे पाच प्रवासी होते. मात्र, या पहिल्या सेवेचे केवळ एकच तिकीट बुक झाल्याचे सांगण्यात आले. म्हणजेच, नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी विनातिकीट प्रवास केल्याची चर्चा शहरात होती.

नाशिक ते पुणे प्रवास हा अतिशय खडतर आहे. सहा ते सात तासांचा वेळ लागतो. पण, आता विमानाने अवघे ५० मिनिटे लागणार असल्याने मला आनंद झाला आहे. माझ्या आजी-आजोबांना भेटण्यासाठी मी जात आहे. - रुचा जायखेडकर, पहिली विमान प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू दरवाढीला टक्केवारीच जबाबदार

$
0
0

शिवाजी चुंभळे यांचा आरोप

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वाळू आणि गौणखनिजाच्या वाढलेल्या दराला प्रशासनातील अधिकारीच जबाबदार असून, शासकीय दरानुसार लिलाव प्रक्रिया राबविली जात नसल्याचा आरोप नाशिक जिल्हा बि‌ल्डिंग मटेरियल सप्लायर्स असोशिएशनचे अध्यक्ष व स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे यांनी केला आहे. गौण खनिजांच्या हेराफेरीत ८० टक्के वाटा हा शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा राहत असल्यानेच सर्वसामान्यांना महागड्या दरात वाळूची विक्री होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शासकीय दरानुसार लिलाव केल्यास वाळूचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील, असा दावा त्यांनी केला आहे.

शिवाजी चुंभळे यांनी सोमवारी पत्रकारपरिषद घेवून प्रशासनाच्या नियमबाह्य कामांचा पाढा वाचला. वाळूचा प्रति ब्रास दर चारशे रुपये असतांना, प्रशासनाकडून तीन हजाराची बोली लावली जाते. विशिष्ट अंतरावरची वाळू काढली गेल्यानंतर ठेकेदारावर प्रतिबंध लावले जातात. ठेकेदाराची वसुली झाली नसल्याचे अधिकारी आणि कर्मचारीच पार्टनर होवून वाळूची विक्री करतात असा आरोप करीत, ८० टक्के वाटा हा प्रशासकीय यंत्रणेचा असतो. त्यामुळे आपोआप बाजारात वाळूचे दर अव्वाच्या सव्वा वाढून बांधकामाचे दर वाढतात. तर त्याचा परिणाम सर्वसामान्य घर खरेदी करणा-यावर होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

प्रशासन ठेकेदारांना बदनाम करून स्वतःचे उखळ पांढरे करून घेते. त्यामुळे ठेकेदारांना वाळू माफिया म्हणून बदनाम केले जात असले तरी खरे वाळू माफिया हे प्रशासनच असल्याचा आरोप त्यांनी केली आहे. सरकारी दरानुसार वाळूची विक्री केली तर,वाळूचे दर नियंत्रणात येवून बांधकामाचे दर कमी होतील. ठेकेदारांना लिलाव देण्यापेक्षा प्रशासनाने स्वतःच वाळू काढावी आणि ठेकेदारांना विकावी असा प्रस्ताव असोशिएशने दिला होता. मात्र, प्रशासनाने तो मान्य केला नाही. ठेकेदारांना पुढे करून आपली प्रतिमा स्वच्छ ठेवण्यात अधिकारी धन्यता मानतात, असे सांगत गावाचा तलाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी या सर्व भ्रष्ट यंत्रणेत सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ब्लॅकमेलिंगसाठी धाडींचा बनाव

वाळू वाहतूकदार व ठेकेदारांवर अंकुश लावण्यासाठी प्रशासनाकडून धाडींचा बनाव केला जातो. ठेकेदारांना शरण येण्यासाठी दंडात्मक कारवाई केली जाते. अव्वाच्या सव्वा दंड त्यांना लावला जातो. स्टॅम्पपेपरवर ठेकेदारांकडून लिहून घेतले जाते. या स्टॅम्पचा वापर ठेकेदार वाहतूकदारांना ब्लॅकमेल करण्यासाठी केला जात असल्याचा आरोपही चुंभळे यांनी केला आहे. या स्टॅम्पवरच अधिकारी व कर्मचारी भ्रष्टाचार करवून घेत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्दी नियंत्रणाबाबत पोलिसांनाच धास्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महत्प्रयासानंतर नवीन शाहीमार्गाचे घोडे गंगेत न्हाले असले तरी अजूनही पोलिसांना गर्दीच्या नियंत्रणाबाबत धास्ती वाटत असल्याची कबुली दस्तुरखुद्द पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनीच सोमवारी दिली. शाहीमार्ग रूंद असला तरीही रामकुंडाजवळील परिसर खूपच अरुंद असल्याने गर्दीचे नियंत्रण कसे करावे, असा प्रश्न आमच्यासमोर असल्याची धास्ती त्यांनी व्यक्त केली.

गत कुंभमेळ्यात सरदार चौकामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे यंदा शाही मिरवणुकीचा मार्ग बदलण्यात आला. पारंप‌रिक मार्ग बदलण्यास सुरूवातीला साधुमहंतांकडून प्रचंड विरोध करण्यात आला. मात्र, भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्प्रयासांनतर नवीन शाही मार्गाला मान्यता मिळाली. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांनी नियोजनाची माहिती दिली. पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी शाहीमार्गावरील सीसीटीव्ही यंत्रणा, मिरवणुकीत असणारा पोलिस बंदोबस्त, साधुग्राममध्ये दहा पोलिस चौक्यांची उभारणी, टेहळणी मनोरे आदींबाबत माहिती दिली. शाहीमार्ग रुंद असला तरी रामकुंडाजवळचा परिसर अरुंद असल्याने तेथे होणाऱ्या गर्दीचे नियोजन कसे करावे, अशी चिंता त्यांनी या बैठकीमध्ये जाहीरपणे व्यक्त केली. भाविकांना या मिरवणुकीपासून बऱ्याच अंतरावर ठेवले जाणार आहे. मात्र पर्वणीच्या दिवशी मिरवणुकीत साधुंचीच गर्दी अधिक राहणार असल्याने अरुंद रस्त्यावर गर्दीचे नियोजन कसे करावे, असा प्रश्न आमच्यापुढे असल्याचे जगन्नाथन यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधुंना मिळणारा गहू निकृष्ट

$
0
0

महंत ग्यानदास महाराजांची नाराजी; पीठ गिरण्या बसविण्याची सूचना

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साधू-महंतांसाठी उच्च प्रतिचा गहू मागविल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. मात्र, साधूंना पुरविण्यात येणार असलेला गहू निकृष्ट दर्जाचा असल्याबद्दल महंत ग्यानदास महाराज यांनी सोमवारी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. साधू महंत नाशिकमध्ये दाखल होत असून, अजूनही केरोसिन आणि एलपीजी गॅस उपलब्ध न झाल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

साधुग्राममधील जागा वाटपासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजनभवनमध्ये बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला महंत ग्यानदास यांच्यासह तीन मुख्य आखाडे आणि त्यांच्या १८ उपआखाड्यांचे प्रमुख महंत उपस्थित होते. साधू-महंतांसाठी ३५०० मेट्रीक धान्य मंजूर करण्यात आले आहे. त्यामध्ये २१०० मेट्रीक टन गहू आणि १४०० मेट्रीक टन तांदळाचा समावेश आहे.

याखेरीज ३५०० क्विंटल साखर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांनी बैठकीत दिली. नाशिकमध्ये चार तर त्र्यंबकेश्वरमध्ये दोन रेशन वितरण केंद्रांची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येक साधूसाठी प्रतिमाह पाच किलो धान्य उपलब्ध करून देण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. नऊ रुपये ६० पैसे किलोने तांदूळ, तर सात रुपये २० पैसे किलो दराने गहू उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

गहू निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप करीत ग्यानदास महाराज यांनी नाराजी व्यक्त केली. साधुग्राममध्ये गिरण्यांची सुविधा नसल्याने गहू चावून खायचा का, अशी विचारणा त्यांनी केली. साधुंना चांगला गहू, तो दळण्यासाठी गिरणीची व्यवस्था उपलब्ध करून द्या किंवा तयार पीठ पुरवा अशी सूचना महंत ग्यानदास महाराज यांनी केली.

दोन दिवसात केरोसिनबाबत निर्णय...

साधू-महंतांचे आगमन होण्यास सुरूवात झाली आहे. मात्र अजूनही केरोसिन आणि एलपीजी गॅस उपलब्ध न झाल्याबद्दल महंत ग्यानदास यांनी नाराजी व्यक्त केली. गहू, तांदूळ, आणि आता साखरही उपलब्ध झाली आहे. केरोसिन आणि एलपीजी गॅसचा पुरवठा व्हावा यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत. दोन दिवसांत तेही उपलब्ध होईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी कुशवाह यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधुंची सुरक्षितता धोक्यात

$
0
0

रेकी झाल्याचा रामकिशोरदास महाराज यांचा दावा

म.टा. प्रतिनिधी, नाशिक

काही अज्ञात व्यक्ती दोन दिवसांपूर्वी आमच्या आखाड्यात येऊन पहाणी करून गेल्या आहेत. येथे किती व्यक्ती राहातात, त्या कोण आहेत, कोठे जातात अशी माहिती त्यांनी आखाड्यातील सेवकांकडून घेतली. आखाड्यांची रेकी केली जात असून, साधुंची सुरक्षितता धोक्यात आल्याचा दावा दिगंबर आखाड्याचे महंत रामकिशोरदास महाराज यांनी सोमवारी केला. आखाड्यांना पोलिस बंदोबस्त पुरवावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

अवघ्या दीड महिन्यांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकनगरीत लवकरच देशभरातील साधू दाखल होणार आहेत. साधुग्राममधील जागेचे वाटप होणार असल्याने बहुतांश आखाड्यांचे महंत रविवारी नाशिकमध्ये दाखल झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या बैठकीला मोठ्या संख्येने साधू उपस्थित होते. आपण त्र्यंबकेश्वर येथे कामानिमित्त गेलो असताना काही अज्ञात व्यक्ती तपोवनातील आमच्या आखाड्यात येऊन गेल्या. सेवकांना विश्वासात न घेताच त्यांनी आखाड्याच्या इमारतीची पाहणी केली. येथे किती व्यक्ती राहातात, त्या कोण आहेत, काय करतात अशी माहिती त्यांनी सेवकांना विचारल्याचे महंत रामकिशोरदास महाराज यांनी सांगितले. या अज्ञात व्यक्ती कोण होत्या, त्या कशासाठी आल्या होत्या, त्यांनी आखाड्यात येऊन पाहणी करण्याचे कारण काय याचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी महंत रामकिशोरदास यांनी केली. आखाड्यांची तसेच साधुंची सुरक्षितता धोक्यात असल्याचे संकेत अशा पाहणीतून मिळत आहेत. त्यामुळे पोलिसांनी आखाड्यांजवळ आतापासूनच पोलिस बंदोबस्त पुरवावा अशी मागणी महंत रामकिशोरदास यांनी केली आहे.

तपोवनातील आमच्या आखाड्यात अज्ञात व्यक्ती पाहणीसाठी आल्या होत्या. ते पोलिस असावेत असे उपस्थित साधू आणि सेवकांना वाटले. त्या व्यक्ती गणवेशात नव्हत्या. ते पोलिस असतील तर पाहणी करताना त्यांनी ओळखपत्र दाखवायला हवे होते. मात्र, तसेही झाले नाही. म्हणूनच सुरक्षितता धोक्यात आल्याचे आमचे म्हणणे असून सुरक्षेची मागणी आहे.

- महंत रामकिशोरदास महाराज, दिगंबर आखाडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॉलिटेक्निकचा आज पहिला राऊंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांची पहिली यादी सोमवारी जाहीर झाली असून मंगळवारी (दि. ७) पहिला कॅप राऊंड सुरू होणार आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने मुदतवाढ दिली होती.

साधारणपणे पहिल्या कॅप राऊंडमध्ये ८० टक्के जागा भरल्या जाण्याची शक्यता तंत्रशिक्षण संचालनालयाकडून वर्तवण्यात आली आहे. काही विद्यार्थी दोन ते तीन अभ्यासक्रमांसाठीही फॉर्म भरून ठेवत असल्याने निश्चित झालेल्या किती जागांचे प्रवेश होतील याबद्दलही साशंकता व्यक्त केली जात आहे. मागील वर्षीही याचप्रकारे जागा रिक्त राहण्याची अडचण निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांचा कल या अभ्यासक्रमाकडे कमी होतो आहे का? असे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पॉलिटेक्निकसाठी २५ हजार जागा असून अद्यापपर्यंत या प्रवेश प्रक्रियेसाठी १९ हजार ७२४ प्रवेश अर्ज निश्चित झाले आहेत. त्यामुळे पाच हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तविली जात आहेत.

अॅडमिशनचे वेळापत्रक

७ ते १० जुलै - कॅप राऊंड

१३ जुलै - पहिली यादी जाहीर

२० जुलै - दुसऱ्या कॅप राऊंडसाठी कॉलेजेसमधील रिक्त जागा, पात्र विद्यार्थ्यांची नावे

२७ जुलै - दुसरी यादी

४ ऑगस्ट - काऊन्सिलिंग राऊंडसाठी कॉलेजेसमधील रिक्त जागा, पात्र विद्यार्थ्यांची नावे

१० ऑगस्ट - काऊन्सिलिंग राऊंड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चला.. शाळेला जाऊ!

$
0
0

शाळाबाह्य सर्वेक्षणात अधिकारी मंडळींचे पालकांना आर्जव

टीम मटा, नाशिक

शहरातील वसाहती अन् गल्लीबोळा तर ग्रामीण भागात वाड्या वस्त्या, भटक्यांचे पाल व झोपड्या, मदरशे अशा अनेक ठिकाणे दारासमोर तक्ता व पेन घेऊन पाहुणे आले. मात्र, हे पाहुणे होते शिक्षक, अधिकारी. निमित्त होते राज्य शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार करण्यात आलेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाचे. आपल्या पाल्यांना शाळेत पाठवा, अशी आग्रहाची विनंती पालकांना करण्यात आली, विद्यार्थ्यांना तसे तत्काळ प्रवेशही देण्यात आले.

७८० जणांची फौज

नाशिकरोड : नाशिकरोडला शाळाबाह्य विद्यार्थांची सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. रेल्वेस्टेशन, आठवडे बाजार, झोपडपट्टी, फर्नांडिसवाडी, पवारवाडी, जयभवानीरोड, देवळालीगाव आदी ही मोहीम राबविण्यात आली. नाशिकरोड केंद्रप्रमुख राजश्री गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली ३३० तर जेलरोड येथे लता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ४५० असे एकूण ७८० सर्वेक्षण अधिकारी होते. महापालिकेचे शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी उमेश डोंगरे यांच्या नियंत्रणाखाली मोहीम राबविण्यात आली. जेलरोड येथील केंद्र क्रमांक दहामधील १४ शाळांच्या शिक्षकांनी उपनगर व कॅनलरोडवरील झोपडपट्टी, जेलरोड भागात सर्वेक्षण केले. नगरसेविका शोभना शिंदे, केंद्रप्रमुख लता सोनवणे यांच्यासह महापालिका शाळा, वनिता विकास शाळा, अभिनव शाळा, पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल, सेंट फिलोमिना व अन्य शाळांचे शिक्षक उपक्रमात सहभागी झाले.

दिंडोरीत ९८ विद्यार्थी

दिंडोरी : शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण मोहिमेत दिंडोरी तालुक्यामध्ये ९८ मुले आढळून आली. यात ४१ मुले आणि ५७ मुली यांचा समावेश आहे. यात सर्वाधिक विद्यार्थी दिंडोरी केंद्रात ९ मुले तर १६ मुली आहे. तालुक्यातील निगडोळ, तळेगाव दिंडोरी, जोपूळ, मालेदुमाला, चौसाळे, पिंपळपाडा या केंद्रात एकही विद्यार्थी नाही.

१०३ मुलांना प्रवेश

येवला : शाळाबाह्य मुले शोधार्थ मोहिमेत तालुक्यात २४४ ‌मुले आढळून आली. यापैकी १०३ मुलांना तात्काळ नजीकच्या शाळांमध्ये दाखल करण्याची प्रक्रिया तत्काळ राबविण्यात आली. तालुक्यातील अनेक ठिकाणी शाळाबाह्य मुलांचा शोध घेत त्यांना शिक्षणाच्या महत्त्वपूर्ण प्रवाहात आणण्यासाठी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत फेऱ्या देखील काढण्यात आल्या. तालुक्यात तहसीलदार शरद मंडलिक, सहअध्यक्ष तथा पंचायत समिती गटविकास अधिकारी सुनील आहिरे, सदस्य सचिव तथा गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर यांच्या देखरेखीखाली सर्वेक्षण झाले. या मोहिमेत एकूण २४४ शाळाबाह्य मुले आढळली. त्यातील १०३ मुलांना ते राहत असलेल्या परिसरातील शाळेत दाखल केले गेले. उर्वरित मुले ही मदरशांमधील असल्याचे सांगत त्यांना लवकरच शाळेत दाखल केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लासलगावात ७४ बालके

लासलगाव : शाळाबाह्य बालकांच्या सर्वेक्षणात लासलगाव बीटात २३ गावांतील १४ हजार ३९८ कुटुंबामधून ३६ मुले व ३८ मुली असे एकूण ७४ बालके असल्याची माहिती शिक्षण विस्तार अधिकारी व्ही. एन. गायकवाड यांनी दिली. लासलगाव बिटात चार केंद्र आहेत. लासलगाव केंद्रातील ६ गावांतील ६ हजार ११५ पैकी लासलगाव, टाकळी विंचूर, पिंपळगाव नजीक या तीन गावात ५ हजार १९४ कुटुंब असून त्यात २६ शाळाबाह्य बालके आढळली तर विठ्ठलवाडी, सुभाषनगर, कोटमगाव या तीन गावात ९२१ कुटुंब असून तेथे शाळाबाह्य बालके आढळली नाहीत. पाचोरे बुद्रुक आणि शिवडी केंद्रात प्रत्येकी शाळाबाह्य ११ बालके, विंचूर केंद्रात शाळाबाह्य २६ बालके आढळून आली.

बागलाणमध्ये ३५६ विद्यार्थी

सटाणा : बागलाण पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे तालुक्यातील १७१ गावांमधून सुमारे ३५६ शाळाबाह्य मुले आढळून आले असल्याची माहिती बागलाण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी दिली. शाळाबाह्य मुलांचे कधीच शाळेत न गेलेली व मध्येच शाळा सोडलेली अशी दोन प्रकारे वर्गीकरण करण्यात आले असून ६७ मुले व ४३ मुली अशा ११० मुलांनी शाळेत कधीच पाऊल ठेवलेले नाही. तर ११७ मुले व १२९ मुली अशा २४६ विद्यार्थ्यांनी मधेच शाळा सोडली आहे. बागलाण तालुक्यात ताहाराबाद केंद्रात सर्वाधिक ४४ मुले शाळाबाह्य आढळली. चिराई केंद्रात चार मुले शाळाबाह्य आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शाळाबाह्य’त सिडको अव्वल

$
0
0

शहरात एकूण ११०० मुले; मुलांची जबाबदारी मुख्याध्यापकांवर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्व्हेक्षण मोहिमेत ११०० शाळाबाह्य विद्यार्थी आढळून आले आहेत. शहरात आढळेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांमध्ये सिडकोत सर्वाधिक ४०७ विद्यार्थी आहेत. दरम्यान या शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्याची मोहीम सुरू झाली आहे. या मुलांना शाळेत टिकवून ठेवण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर टाकण्यात आली आहे.

राज्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारच्या शिक्षण विभागातर्फे ४ जुलै रोजी शाळाबाह्य सर्वेक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील कुष्ठरोग्यांची वस्ती, वेश्यावस्ती, कामटवाडा झोपडपट्टी, बसस्टॅण्ड, रेल्वे स्टेशन, गंजमाळ येथील पंचशील झोपडपट्टी, भोईगल्ली, भाजीबाजार, आझादनगर भंगारमार्केट, नदी किनारा परिसर, रामकुंड, मुंबई नाका, देवळाली कॅम्पजवळील सुंदरनगर, विटभट्टी वस्त्या अशा काही संवेदनशील ठिकाणांमधील सर्वेक्षण करण्यात आले. शहराताली सहा विभागांमध्ये करण्यात आलेल्या या सर्व्हेक्षणात ११०० शाळाबाह्य मुले आढळून आली आहेत. यात सिडकोत सर्वाधिक ४०७ शाळाबाह्य मुले आढळून आली. सिडको पाठोपाठ पंचवटी विभागात २२१ मुले शाळाबाह्य आढळून आलेले आहेत. तसेच उड्डाणपुलांखाली २५, नाशिकरोड रेल्वे स्टेशन ४५ आणि गंगाघाट परिसरात ७ शाळाबाह्य मुले आढळून आली.

जवळच्या शाळेत प्रवेश

शाळाबाह्य मुलांना नजिकच्या महापालिका शाळेत दाखल करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. या मुलांना जवळच्या शाळेत दाखल केल्यांनतर त्यांना शाळेत टिकवून ठेवण्याची जबाबदारी ही संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर राहणार आहे. संबंधित मुख्याध्यापकाला पालकाशी संवाद ठेवून तो नियमित शाळेत कसा येईल, याची काळजी घ्यावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील पाच कॉलेजेस ‘एक्सलंट’!

$
0
0

अश्विनी कावळे, नाशिक

शहरातील शिक्षण देणाऱ्या संस्थांचा दर्जा काय आहे याची माहिती मिळणे विद्यार्थी व पालकांना शक्य झाले आहे. शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता दर्शविणारी माहिती महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन व ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांच्याकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील पाच संस्थांना एक्सलंट ग्रेड मिळाली आहे.

शैक्षणिक संस्थांच्या अभ्यासक्रमांच्या गुणवत्तेची माहिती या मंडळांनी 'एमएसबीटीई'च्या www.msbte.com या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली आहे. पॉलिटेक्निक कॉलेजेसच्या अभ्यासक्रमानुसार गुणवत्ता ठरवण्यात आली असून त्याचा रितसर तपशील या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. पॉलिटेक्निक, फार्मसी, इंजिनीअरिंग अशा टेक्निकल अभ्यासक्रमांची गुणवत्तेची माहिती थेट प्रवेश घेणाऱ्यांना मिळते आहे. कॉलेजची निवड करण्यासाठी याचा फायदा नक्कीच होणार आहे.

पॉलिटेक्निक आणि इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षांची अडमिशन प्रक्रिया सुरू असल्याने विद्यार्थ्यांना कॉलेजच्या तेथील संस्थांची माहिती मिळावी, यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेअंतर्गत विविध अभ्यासक्रम राबवणाऱ्या संस्थांमधील शैक्षणिक बाबींची तपासणी राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत दरवर्षी करण्यात येते.

एक्सलंट, व्हेरी गुड, गुड, सॅटिस्फॅक्टरी व पूअर अशा पाच ग्रेडमध्ये ही वर्गवारी करण्यात आली आहे. सध्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना त्या कॉलेजेसमध्ये शिकवल्या जाणाऱ्या गुणवत्ता समजण्यापासून अनेकदा अडथळे येतात. हे अडथळे या माहितीमुळे दूर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी व संस्थांमध्ये पारदर्शकता राहण्यासाठी ही पद्धती असण्याची गरज असल्याचे ओळखून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण समिती पुन्हा आव्हानाच्या फेऱ्यात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या शिक्षण समितीचा ठराव निलंब‌ित करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला शिक्षण समिती सदस्य संजय चव्हाण यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सोमवारी त्यांनी याचिका दाखल केली आहे. न्या. अभय ओक यांच्या पिठासमोर ही याचिका सुनावणीसाठी आली असून, मंगळवारी यावर सुनावणी होणार आहे. शिक्षण समितीच्या सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच, नगरविकास विभागाने अध्यादेश काढत महापौरांचा शिक्षण समिती तयार करण्याचा ठराव निलंबित केला. त्यामुळे निवडणूक प्रक्र‌िया स्थग‌ित झाल्याने चव्हाण यांनी याविरोधात याचिका दाखल केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता म्हणे रामकुंड फोडा...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऐन सिंहस्थाच्या तोंडावर रामकुंडातील काँक्रीट फोडून पाण्याचे झरे जिवंत करा, अशी अद्भूत मागणी करून महंत ग्यानदास महाराज यांनी प्रशासनाची डोकेदुखी वाढविली आहे. महंतांपुढे नतमस्तक होणारे अधिकारी आतापासूनच जेरीस आले असून, कुंभमेळ्यापूर्वीच आखाडा रंगत असल्याचे पहावयास मिळत आहे. वस्त्रांतरगृहाची इमारत पाडा, अशी अशक्यप्राय मागणी करीत महंत ग्यानदास महाराजांनी काही दिवसांपूर्वीच प्रशासनाला वेठीस धरले होते. अलीकडेच साधुग्राममधील कामांबाबत नाक मुरडत कुंभमेळा होऊ देणार नाही, असा थयथयाटही करून झाला आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रथमच दाखल होताना महंत ग्यानदास महाराज यांनी वाढलेल्या अतिक्रमणांबाबत तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली होती. अतिक्रमणे आणि अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली नाहीत तर सिंहस्थ कुंभमेळा होऊ देणार नाही, असा इशारा देऊन त्यांनी प्रशासनाची झोप उडविली होती. त्यानंतरही ग्यानदास महाराज यांची प्रत्येक आज्ञा शिरसावंद्य मानत सिंहस्थाची तयारी करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जातो आहे. शाही मिरवणुकीतील ध्वजांना वस्त्रांतरगृह इमारतीचा अडथळा होईल तसेच सूर्यकिरणेही रामकुंडात पडणार नाहीत या कारणास्तव वस्त्रांतरगृहाची इमारत पाडावी अशी मागणी ग्यानदास महाराज यांच्याकडून करण्यात आली होती. मात्र ही मागणी आपली नव्हे तर स्थानिक आमदारांची होती असे म्हणून त्यांनी घुमजाव केले. अशा एक ना अनेक मागण्या प्रशासनाकडून पूर्ण करवून घेणाऱ्या साधू महंतांनी आता काँक्रीटने बांधलेले रामकुंड फोडण्याची मागणी केली आहे.

रामकुंड स्विमींग टँक बनला असून, काँक्रीट फोडून आतील पाण्याचे झरे मोकळे करा अशी मागणी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत केल्याने अधिकारी आवाक झाले. हे काम प्रशासनासाठी अवघड नसून ते लवकरात लवकर मार्गी लावावे अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

साधू एक, मागण्या अनेक !

किमान तीन महिने साधू महंतांचा नाशिकमध्ये मुक्काम राहणार असल्याने त्यांचे बरेचसे सामान वाहनांद्वारे नाशिकमध्ये आणले जाणार आहे. अशा वाहनांकडून रोड टॅक्स आकारला जाऊ नये अशीही मागणी साधुमहंतांनी केली आहे. साधूंना २४ तास कोठेही फिरता यावे, पोलिसांनी हटकू नये असे पास दिले जावेत अशी मागणी देखील करण्यात आली आहे. आखाड्यांसमोर आरसीसी प्रवेशद्वार उभारा, नवीन मोबाइल स‌िम द्या, अशा अनेक मागण्या आजच्या बैठकीत करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images