Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

उद्धव ठाकरे आज मालेगावात

$
0
0
शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची आज, शनिवारी मालेगावमध्ये जाहीर सभा होणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत नियोजित प्रचारसभा रद्द झाल्यानंतर प्रदीर्घ काळाने होणाऱ्या या सभेकडे मालेगावकरांचे लक्ष लागले आहे.

मद्यपी पतीकडून पत्नीची हत्या

$
0
0
माहेरी का गेली, अशी कुरापत काढून मद्यपी नवऱ्याने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना गुरुवारी नाशिकरोड परिसरातील शिंदे वस्ती येथे घडली. हत्येनंतर भांबावलेल्या संशयित आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

‘त्या’ विद्यार्थिनी धास्तावलेल्याच

$
0
0
शाळेतील विद्यार्थिनींशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकावर कारवाई करण्याचे सोडून फक्त बदली करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याविरोधात फिर्याद दिलेल्या मुलींमध्ये भीतीचे वातावरण आहे.

धरणातील गाळ लोकसहभागातून काढणार

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील धरणांची पाणी साठवणूक क्षमता मोठ्या प्रमाणात आहे. परंतु त्यात असलेल्या गाळामुळे सध्या पाणी साठवणूक कमी झाली आहे.

बनावट नोटांप्रकरणी गुन्हा

$
0
0
बँकांच्या माध्यमातून बनावट नोटा चलनात आणण्याचे उद्योग अद्याप कायम असल्याची बाब शुक्रवारी पुन्हा पुढे आली. विशेष म्हणजे स्टेट बँकेच्या सातपूर शाखेचीच अशा दोन घटनांत फसवणूक झाली आहे.

बेकायदा प्रक्षेपण प्रकरणी गुन्हा

$
0
0
अधिकार नसतानाही कलर्स व आयबीएन लोकमत या ‘पे चॅनल्स’चे प्रक्षेपण केल्याप्रकरणी पोलिसांनी गंगापूर रोडवरील एम. एस. एंटरप्रायजेस व शर्मा केबल यांच्याविरुद्ध कॉपी राईट कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

महिलेच्या धाडसाने लूटारुंना अटक

$
0
0
धार्मिक कार्याच्या नावाने घरात शिरकाव करत लूटण्याचा प्रयत्न करणा-यांना एका महिलेने दाखवलेल्या प्रसंगावधानतेमुळे पोलिस स्टेशनची हवा खावी लागली. सिडकोच्या रायगड चौकात शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

क्रेडाई अध्यक्षपदी राजेगावकर

$
0
0
बांधकाम व्यावसायिकांची राष्ट्रीय संघटना असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई)च्या महाराष्ट्र अध्यक्षपदी नाशिकचे अनंत राजेगावकर यांची निवड करण्यात आली आहे.

ट्रेकिंगवेळी तरुणाचा मृत्यू

$
0
0
साल्हेर किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेल्या नाशिकच्या तरुणाचा किल्ल्यावरुन उतरताना झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. नाशिकच्या कामटवाडे परिसरातील शिवतीर्थ कॉलनीत राहणारे सागर संजय चंद्रात्रे (वय ३६) हे ट्रेकिंगसाठी ३१ मार्चला सटाणा तालुक्यातील साल्हेर किल्ल्यावर गेले होते.

जळगावचा पारा ४२.४ अंशावर

$
0
0
मार्च अखेरीपासून वाढत असलेले जळगाव शहराचे तापमान शनिवारी आणखी एक पायरी वर चढले. सकाळी ११ वाजल्यानंतर शहरात तब्बल ४२.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

सिंहस्थाची कामे सुरू करा

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक विविध कामांचे सोपस्कार येत्या १५ दिवसात संपवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा, असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सर्व सरकारी विभागाच्या प्रमुखांना दिले.

राज ठाकरेंचे ‘टार्गेट खडसे’

$
0
0
उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा एकनाथ खडसेंशी माझं कुठलंही वैयक्तिक वैर नाही. परंतु, जनहिताच्या मुद्द्यावर ते चुकत असतील तर त्यावर मी बोलणारच, असं स्पष्ट करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा ‘सेटलमेंट’चा आरोप केला आहे.

चिरडलेले हक्क; खुडलेल्या संवेदना

$
0
0
पोटच्या मुलाचे लाड पुरवायचे... त्याच्या सुखासाठी रात्रीचा दिवस करायचा अन् दुसरीकडे घरकामासाठी परप्रांतातून मुलं आयात करायची. त्यांच्या बालसुलभ वर्तनाचा विचार न करता त्यांच्याकडून मोठ्यांसारखी अपेक्षा करायची. वेळप्रसंगी मारझोडही करायची... असं टोकाचं चित्र सर्रास बघायला मिळतंय.

रावळगाव कारखान्यातील कामगारांची उपासमार

$
0
0
थकीत वेतनाच्या मागणीसाठी रावळगाव साखर कारखान्याच्या कामगारांनी चालविलेले आंदोलन २८ व्या दिवशीही सुरूच राहिल्यामुळे सुमारे साडेतीनशे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

कळवणच्या ‘जलस्वराज्य’ला घरघर

$
0
0
कळवण तालुक्यातील पिळकोस गावातील जलस्वराज्य प्रकल्पाला घरघर लागली आहे. गिरणा नदीच्या काठाला लागून असलेल्या पंचायतीच्या विहिरीत क्षारयुक्त पाणी येत असून सुमारे ५० हजार लिटर साठवणूक क्षमतेच्या पाण्याच्या टाकीलाही गळती लागली आहे.

खडसे, अजित पवारांशी वैयक्तिक वैर नाही

$
0
0
‘उपमुख्यमंत्री अजित पवार वा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्याशी आपले वैयक्तिक वैर नाही. मात्र जनहिताच्या मुद्द्यावर काही चुकत असेल तर मी बोलणारच,’ असे स्पष्टीकरण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना दिले.

पतसंस्थेविरोधात फसवणुकीचा गुन्हा

$
0
0
पतसंस्थेकडून कर्ज घेण्यासाठी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे कर्ज दिल्याचे भासवून प्रॉपर्टी हडप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुलेमान नागरी पतसंस्थेविरोधात नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनसेच्या महिला आघाडीनेही कंबर कसली

$
0
0
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून मनसेच्या महिला आघाडीतर्फे संघटनात्मक बळकटीवर भर देण्यात येत आहे. मनसे महिला आघाडी प्रमुख शालिनी ठाकरे यांनी नाशिकमधील महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत तसे आदेश दिले आहेत.

सातपूरमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट

$
0
0
सातपूर भागातील ‘स्टेट बँक ऑफ ​इंडिया’त सापडलेल्या बनावट नोटांबाबत गुन्हा दाखल होऊन २४ तास उलटत नाही तोच पुन्हा याच भागातील ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या शाखेत समाजकंटकांनी ५ हजार २०० रुपयांच्या ११ बनावट नोटा भरल्याचे उघडकीस आले आहे.

मांजरपाडा प्रकल्पासाठी ७० कोटी

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील विविध धरणांच्या कामांसाठी राज्य सरकारने ११० कोटींचा निधी दिला असून यात बहुचर्चित मांजरपाडा प्रकल्पासाठी ७० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images