Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

जेलमध्ये कैद्याकडे पुन्हा सापडला मोबाइल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

कैद्यांच्या भाडणातून नाशिकरोड कारागृहात सलग दुसऱ्या आठवड्यात मोबाइल सापडला. गेल्या सोमवारी पाच-सहा कैद्यांनी मोबाइलवर संभाषण करण्यावरून दीपक अंबादास पोकळे या कैद्यावर कांदा कापण्याच्या पत्र्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते.

होमगार्ड अभिषेक चव्हाण यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्यादीचा दिली आहे. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास सर्कल सहाच्या बॅरेक चारमधील न्यायालयीन बंदी माजीद हुसेन वाजीद हुसेन, निलेश चिवसे, समीर निजाम सैय्यद आणि सागर शिंदे यांच्यात वाद सुरू होते. तुरुंगाधिकारी बी. एस. चंदनशिव, सर्कल अमलदार भालचंद्र शिरसाठ आणि होमगार्ड चव्हाण तेथे गेले असता मोबाइलवरून हा वाद सुरू असल्याचे निष्पन्न झाले. कर्मचाऱ्यांनी झडती घेतली असता या बॅरेकीच्या शौचालयाशेजारील चौथ्या बिछान्याखाली काळा मोबाइल व चार्जर सापडले. सीमकार्ड गायब होते. हा बिछाना अशोक शेलार या कैद्याचा होता. त्याला सकाळी मालेगाव कोर्टात सुनावणीसाठी नेले होते. त्यामुळे मोबाइल कोणाचा हे स्पष्ट झाले नाही.

आठवड्यातील दुसरी घटना

कारागृहात मोबाइल वापरण्यास कैद्यांनी बंदी आहे. तरीही कैद्यांकडे मोबाइल सापडत असल्याने प्रशासन झोपले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या आठवड्यात दीपक अंबादास पोकळे या कैद्याला विशाल भालेराव, अजय बोरिला, अजय इंगळे, अविनाश एमके, निखील मराठे व किरण निकम यांनी हल्ला करुन त्याला गंभीर जखमी केले होते. तेव्हाही मोबाइलवरूनच वाद झाला होता. मोबाइलवरून दुसऱ्या टोळीविरोधात सुपाऱ्याही दिल्या जात आहेत. सरकारी वकील अजय मिसर यांना कारागृहातून मोबाइलवरून धमक्या आल्याचे उघड झाले होते. कारागृहाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी काही महिन्यांपूर्वी येथे छापा घातला असता मोबाइल सापडले नव्हते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अमृत का अवसर आया है...!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रभु राम की जनस्थानमें, कुंभ का मेला आया है l

साधू संतो के दर्शनका, अमृत अवसर आया है l

गोदाजल में अमृत है, इस नगरी में स्वागत है l

अब धरती का सबसे पावन उत्सव आया है l

असे सुरेल कुंभगान सिंहस्थ कुंभमेळा काळात देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचे स्वागत करणार आहे. वैविधतेने नटलेल्या भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा अधोरेख‌ित करणारे अन् खास कुंभमेळ्यासाठी रचलेले 'कुंभगान' यंदाच्या सिंहस्थ कुंभात अमृत सिंचन ठरेल. सिंहस्थ या महासोहळ्याचे महत्त्व समजावे, यासाठी राष्ट्रभाषेत चित्र‌ित केलेले हे चार मिन‌िटांचे कुंभगान यंदा लक्षवेधी ठरणार आहे. कुंभगानातील जिंगल्समध्ये या सोहळ्याच्या धार्मिक महत्त्वासह सामाजिक आणि पर्यावरणा सारख्या दृष्ट‌िकोनासही अधोरेख‌ित करण्यात आले आहे.

नाशिक सिंहस्थाचे आगळे वेगळे महत्त्व आहे. या सिंहस्थ कुंभमेळ्यानिम‌ित्त लाखो साधुमंहतासह, भाविक या काळात नाशिकमध्ये येण्यास सुरूवात झाली आहे. साधुमहंतासह भाविकांना नाशिकची एक आगळीवेगळी ओळख करून देण्याचा व त्यांचे स्वागत मनोभावे करण्याचा विडा शहरातील जैन सोशल ग्रुप प्लॅट‌िनमने उचलला आहे. भाविकांच्या स्वागतासाठी कुंभगानची रचना करण्यात आले असून, त्याला चित्रबद्धही केले जात आहे. शहरातील प्रवेशद्वारांसह सिंहस्थातील एलईडीवर भाविकांना ते पाहता येईल. हे कुंभगान चार मिन‌िटांचे असून, स्वागत गिताची रचना मिना निकम यांनी केली आहे. तर प्रशांत महाबळ यांनी त्याला संगीतबद्ध केले आहे. जैन सोशल ग्रुपने या स्वागत गितात कुंभमेळा मंत्री ते सर्वसामान्य नाशिककरांना सहभागी केले आहे. महापौर , उपमहापौरांसह, धार्मिक, शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक, सांस्कृत‌िक क्षेत्रातील मान्यवरांच्या माध्यमातून या चित्रफितीद्वारे हरित कुंभ आणि त्याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच, गोदावरी स्वच्छताबाबतही गीतातून जनजागृती करण्यात आली आहे. सध्या शहरात या गीताचे चित्रीकरण सुरू असून, लवकरच ते शहरातील प्रवेशद्वारावर दाखविले जाणार आहे.

जेएसजी प्लॅट‌िनमचा अभिनव उपक्रम

सिंहस्थात येणाऱ्या साधुमंहताचे आणि भाविकांचे स्वागत गिताद्वारे व्हावे, शहर व सिंहस्थाची महतीही सांगित‌ली व दाखविली जावी, अशी संकल्पना पारस जैन यांनी मांडली होती. त्याला जेएसजी प्लॅट‌िनम ग्रुपचे अध्यक्ष कल्पना पाटनीस व सचिव किरण खाबिया यांनी आकार देत कामाला सुरूवात केली. या गितासाठी लागणार आर्थिक भार हा ग्रुपनेच उचलला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑगस्टमध्ये फडकणार आखाड्यांचे ध्वज

$
0
0

अनिल पवार, नाशिक

नाशिकमध्ये ध्वजारोहणावरून पुरोहित संघ व आखाड्यांमध्ये फारसे एक्य नसले तरी त्र्यंबकेश्वरमध्ये मात्र सर्व काही आलबेल आहे. यामुळे पुरोहित संघाच्या ध्वजारोहणानंतर ऑगस्टमध्ये त्र्यंबकेश्वरच्या दहाही आखाड्यांचे ध्वजारोहण व पेशवाई शोभायात्रा निघणार आहे. ध्वजारोहण व पेशवाईच्या तारखाही आखाड्यांनी जाहीर केल्या आहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्यात ध्वजारोहणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ध्वजारोहणापासून खऱ्या अर्थाने सिंहस्थ कुभमेळ्याला सुरुवात होते. पुरोहित संघातर्फे नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे ध्वजारोहण केले जाते. या सोहळ्यानंतर सर्व आखाड्यांचे ध्वजारोहण होत असते. सुमारे दोन महिने हे ध्वज फडकत असतात. त्र्यंबकेश्वरमधील दहा आखाड्यांच्या ध्वजारोहण व पेशवाई शोभायात्रा वेगवेगळ्या दिवशी होत असते. त्र्यंबकेश्वर येथील दहा आखाड्यांच्या ध्वजारोहणासाठी सर्व तयारी झाली आहे. प्रत्येक आखाड्यात ध्वजासाठी खास जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

पुरोहित संघाचे १४ जुलै रोजी ध्वजारोहण होणार आहे. त्यांनतर आखाड्यांच्या ध्वजारोहण व पेशवाई शोभायात्रेसाठी त्या त्या आखाड्यांचे साधू-महंत, महामंडलेश्वर, सचिव आदी सर्व उपस्थित राहतात. त्र्यंबकेश्वरमध्ये सर्वप्रथम श्री तपोनिधी आनंद आखाड्याचे ध्वजारोहण होणार आहे. दि. १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण होणार आहे तर १८ ऑगस्ट रोजी पेशवाई शोभायात्रा निघणार आहे. तसेच श्री तपोनिधी निरंजनी आखाड्याचेही ध्वजारोहण हे दि. १५ ऑगस्ट रोजी होणार असून, पेशवाई शोभायात्रा दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. १६ ऑगस्ट रोजी होणार आहे.

श्री शंभु पंचदशनाम जुना आखाडा, श्री पंचअग्नी आखाडा व श्री शंभु पंचदशनाम आवाहन आखाडा या तीन आखाड्यांचे ध्वजारोहण एकाच दिवशी म्हणजे दि. १९ ऑगस्ट रोजी होणार आहे. मात्र, त्यांची पेशवाई शोभायात्रा वेगवेगळी निघणार आहे. जुना आखाडा व आवाहन आखाडा यांची पेशवाई शोभायात्रा गुरुवार दि. २७ ऑगस्ट रोजी निघणार आहे, तर पंचअग्नी आखाड्याची पेशवाई शोभायात्रा दि. २३ ऑगस्ट रोजी निघणार आहे.

श्री पंचायती आखाडा महानिर्वाणी आखाड्याचे ध्वजारोहण दि. २१ ऑगस्ट रोजी होणार असून पेशवाई शोभायात्रा दि. २६ ऑगस्ट रोजी निघणार आहे. यानंतर श्री पंचायती अटल आखाड्यांचे ध्वजारोहण होणार आहे. दि. २३ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण तर दि. २७ ऑगस्ट रोजी पेशवाई शोभायात्रा निघणार आहे. यानंतर उदासीन आखाड्यांचा क्रमांक लागतो. श्री पंचायती नया उदासीन आखाड्याचे ध्वजारोहण दि. २४ ऑगस्ट रोजी होणार असून, दि. २५ ऑगस्ट रोजी पेशवाईचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर श्री पंचायती नया उदासीन आखाड्याचे ध्वजारोहण दि. २६ ऑगस्ट रोजी तर पेशवाई दि. २७ ऑगस्ट रोजी होणार आहे. सर्वात शेवटी श्री पंचायती आखाडा निर्मल या आखाड्याचे ध्वजारोहण दि. २८ ऑगस्ट रोजी तर पेशवाई शोभायात्रा दि. २६ ऑगस्ट रोजी निघणार आहे.

धर्मध्वजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. धर्मध्वजा दोनच महिने असते. पूर्वी धर्मध्वजाचे नियम खूपच कडक होते. यवनांच्या काळात धर्मध्वजाच्या रक्षणासाठी कडक पहारा असायचा. रक्षणासाठी थांबावे लागत होते. त्यात आता शिथिलता आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकल वारकरी सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सायकलिस्ट असोसिएशनतर्फे १७ ते १९ जुलै या कालावधीत पंढरपूर सायकल वारी आयोजित करण्यात आली आहे. मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही आतापर्यंत ११० नागरिकांनी सहभाग नोदवला असून, त्यात आणखी वाढ होणार असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.

पंढरपूर सायकल वारीला मागील वर्षीही नाशिककरांनी उत्तम प्रतिसाद दिला. मागील वेळी या वारीत ७४ लोक सहभागी झाले होते. या वर्षी रजिस्ट्रेशनसाठी १० दिवस बाकी असल्याने हा आकडी दोनशेपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागील वर्षी प्रमाणे या वर्षीही लहान मुले व महिला यांचा सहभाग मोठा असणार आहे. ही रॅली गोल्फ क्लब येथून सुरू होणार असून, पहिला मुक्काम अहमदनगर येथे असणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा महिला व मुलांची संख्या जास्त आहे. १२ ते १६ वयोगटातील मुले जास्तीत जास्त सहभागी होत आहे. त्याच्यासाठी नाशिक सायकलिस्ट असोसिएशन कोणत्याही प्रकारचे शुल्क आकरणार नसल्याचे सांगितले आहे. या वारीत नाशिकप्रमाणेच औरंगाबाद पुणे, अहमदनगर, संगमनेर येथील सायकलपटू देखील सहभागी होणार आहे. वारीचा पहिला मुक्काम अहमदनगर येथील हुंडेकरी मंडल कार्यालयात, दुसरा मुक्काम टेंभूर्णी येथे होणार आहे. वारीत सहभागी नागरिकांची जेवणाची व नाष्ट्याची व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात आली आहे. मागील वर्षी प्रमाणे या वर्षी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष विशाल उगले व पोलिस उपायुक्त हरिष बैजल यांनी केले आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सायकल वारीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी लहान मुलांची संख्या जास्त आहे. नोंदणीचा आकडा १५० ते २०० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. या वारीला नाशिककरांनाकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्याने आमचा उत्साह वाढला आहे.

विशाल उगले, अध्यक्ष, नाशिक सायकलिस्ट असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मजूर फेडरेशनतर्फे वसतिगृहाचा अट्टहास’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मजूर संस्थांना कामे मिळणे बंद झाले असताना मजूर सहकारी संघातर्फे संचित निधीतून सदस्यांच्या मुलांना वसतिगृह बांधण्याचा प्रस्ताव असून, त्यासाठी जागा खरेदी केली जाणार आहे. मजुरांवर उपासमारीची वेळ आली असताना व मागणी केली नसतानाही आर्थिक लाभाच्या हव्यासातूनच फेडरेशनचे पदाधिकारी वसतिगृहाचा अट्टाहास करीत असल्याचा आरोप माता धनदायी मजूर सहकारी संस्थेच्या चेअरमन अनिता भामरे यांनी केला आहे.

भामरे यांनी जिल्हा उपनिबंधकांना निवेदन दिले आहे. मजूर सहकारी संघाने गेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ३ सप्टेंबर २०१४ रोजी घाईगर्दीने गोंधळाची स्थिती निर्माण करून जागा खरेदी करण्याचा प्रस्ताव पास करून घेतला. वास्तविक त्यास अनेक सभासदांचा विरोध होता. फेडरेशनच्या संचालक मंडळाची मुदत १७ ऑक्टोबरला संपत आहे. निवडणूक तीन महिन्यांवर आली असताना घाईगर्दीत जागा खरेदी करण्याचे का घाटत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासाठी ई टेंडर आवश्यक असताना फेडरेशनने कुठल्याच वर्तमानपत्रात जाहिरात दिलेली नाही. याचे कारण काय, असा सवालही करतानाच खरेदीचा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्याचा पाणीप्रश्न तूर्त सुटणार

$
0
0

म.टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहरातील पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता पुनद धरणातून सुमारे २०० दशलक्ष घनफूट पाणी गिरणा नदीपात्रात सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपेंद्रसिह कुशवाह यांनी दिले आहेत. ही माहिती नगराध्यक्षा सुलोचना चव्हाण यांनी दिली.

सटाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या केळझरसह चणकापूर धरणातील जलसाठा संपुष्टात आल्याने गिरणा नदीपात्रातून होणारा पाणीपुरवठा बंद झाला होता. तसेच, शहरातील उद्भव विहिरी आटल्याने शहरात तीव्र स्वरूपाची पाणीटचांई जाणूव लागली होती. या पार्श्वभूमीवर सटाणा शहरात गत आठवड्यापासून दोन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा तब्बल चार ते पाच दिवसाआड करण्यात येत असल्याने शहरात कमालीची नाराजीची भावना तयार झाली होती.

या पार्श्वभूमीवर दि. १ जुलै रोजी नगराध्यक्षा सुलोचना चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून पुनद धरणातून सटाणा शहरासाठी विशेष एक आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. यानंतर प्रत्यक्ष भेट घेऊन शहरातील वस्तुस्थितीदर्शक परिस्थिती मांडल्यानंतर जिल्हाधिकारी कुशवाह यांनी पुनदमूधन सुमारे २०० दलशक्ष घनफूट इतके पाणी सटाणा शहरासाठी सोडण्याचे मान्य केले आहे. यामुळे सटाणा शहरातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करणे शक्य होणार असल्याचेही याावेळी चव्हाण यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाड्याच पडल्या आजारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

नाशिक शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या घंटागाड्या आजारी पडल्या आहेत. धक्का स्टार्ट असलेल्या आणि आरटीओच्या पासिंगविना या घंटागाड्याकडून कचरा गोळा केला जात आहे. या प्रश्नाकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

महापालिका हद्दीतील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडीची योजना तत्कालीन महापौर प्रकाश मते यांनी आणली होती. घरोघरी कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीमुळे रस्त्यावर पडणाऱ्या कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणावर सुटली. परंतु, गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या घंडागाड्याच आजारी पडल्या आहेत. यामध्ये बहुतांश घंटागाड्या 'दे धक्का' झाल्या असून कचरा गोळा करतांनाच बंद पडतात. त्यातच घंडागाड्यांचे टायर पूर्णत: खराब झाले आहेत. तर काही घंटागाड्यांची मोडतोड झाली आहे. त्यामुळे कचरा वाहून नेतांना पाठिमागील भागास तात्पुरते कापड लावले जात आहे. यातून रस्त्यावर कचरा पडणार तर नाही ना? अशी धास्ती कर्मचाऱ्यांना कायम असते. घंटागाडीच्या मागील शटरच्या जागी लावलेल्या कापडातून कचरा खाली पडून रस्त्यावर सांडतो. यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या अन्य वाहनचालकांची बोलणी कर्मचाऱ्यांना ऐकावी लागतात.

घंटागाडी ठेकेदाराने घंटागाड्यांचे पासिंग केले नसल्याने विनापासिंगच्याच गाड्या कचरा गोळा करत आहेत. आरटीओने घंडागाड्यांना नोटीस दिल्या असतांनाही या गाड्या पासिंग करण्यात आलेल्या नाहीत. सतत बंद होत असलेल्या घंटागाड्यांमुळे काम करणारे चालक व कर्मचारी देखील हैराण झाले आहेत. यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने आजारी पडलेल्या घंटागाड्या दुरुस्त करण्याची मागणी केली जात आहे.

कचरा संकलनात अडचण

घंटागाड्यांच्या नादुरुस्तीमुळे शहरातील अनेक भागात नियमितपणे कचरा संकलन होत नाही. यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. ऐरवी दोन दिवसाआड येणाऱ्या घंटागाड्यांची फेरी काही भागामध्ये आता आठवड्यातून एकदा किंवा दोन वेळा होते. ऐन पावसाळ्यात नागरिकांना घरात कचरा साचून ठेवावा लागत आहे. त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्यातक्षम उद्योगासाठी पूरक धोरणांची आखणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सरकारने निर्यात धोरण ठरवतांना निर्यातक्षम उद्योगांच्या हिताचा विचार केला जात आहे. त्याअनुषंगाने सरकार उद्योगांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल, असे प्रतिपादन जिल्हा उद्योग केंद्रांचे सहसंचालक प्रवीण देशमुख यांनी सांगितले. निमा, आयमा, जिल्हा उद्योग केंद्र व भारतीय विदेश व्यापार संस्थेच्या विद्यमाने निमा हाऊसमध्ये झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते.

राज्यातील उद्योजकांनी निर्यात धोरण विकसित करण्याबाबत 'निमा'मध्ये चर्चासत्र झाले. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश निर्यात धोरण विकसित करणे हा होता. यासाठी भारतीय विदेश व्यापार संस्था नवी दिल्लीचे प्राध्यापक डॉ. देबाशिष चक्रवर्ती चर्चासत्राला उपस्थित होते. डॉ. चक्रवर्ती यांनी उपस्थित उद्योजकांना निर्यात धोरण विकसित करण्यातबाबत मार्गदर्शन केले. चर्चासत्रात अनेक उद्योजकांनी आपल्या समस्या डॉ. चक्रवर्ती यांच्याकडे मांडल्या. त्यांनीही सविस्तर उत्तरे दिली. 'निमा'चे अध्यक्ष रवी वर्मा यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी आयमाचे अध्यक्ष विवेक पाटील, निमा निर्यात समिती अध्यक्ष हर्षद ब्राह्मणकर, निरज बदलानी, साहेबराव पाटील यासंह उद्योजक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एकलहरे प्रकल्पाला हिरवा कंदील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

एकलहरेतील औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रस्तावित मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्पाबाबत महानिर्मिती व लष्करादरम्यानच्या वादावर तोडगा निघाला आहे. केंद्राने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकाव्दारे दिली आहे. प्रकल्प झाल्यानंतर विजेचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

गोडसे यांनी नवी दिल्लीत केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेऊन प्रकल्पप्रश्नी चर्चा केली. या प्रकल्पाच्या टॉवरची (चिमणी) उंची जास्त असल्याने लष्कराने अद्याप ना हरकत दाखला (एनओसी) दिलेला नाही. त्यामुळे हा प्रकल्प रखडला आहे.

गोडसे यांनी लष्कराच्या परवानगीबाबत पर्रिकर यांच्याशी बुधवारी चर्चा केली. पर्रिकर यांनी अस्तित्वात असणाऱ्या अधिनियमानुसार संरक्षण विभागाने निर्णय घेण्याची सूचना केली. गोडसे म्हणाले की, प्रस्तावित नवीन नियमानुसार दीडशे मीटरच्यापेक्षा जास्त उंची असलेल्या टावरला परवानगी देता येणार नाही हे खरे असले तरी अद्याप तरी असा नियमच अस्तित्वात नाही. त्यामुळे सध्याच्या नियमानुसार ना हरकत दाखला मिळायला हवा. लष्कराने तो द्यावा. त्यावर पर्रिकर यांनी दाखल्यासाठी व प्रकल्पासाठी सर्वोतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.

विमानतळप्रश्नी चर्चा

ओझर विमानतळावर एचएएल वाचआर चार्जेस (विमान उतरताना लक्ष ठेवण्याचे शुल्क) आकारणार आहे. छोट्या विमानांसाठी काही दिवस तरी हे चार्जेस आकारु नयेत अशी मागणी शगोडसे यांनी श्री. पर्रिकर यांच्याकडे केली. त्यावर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन पर्रिकर यांनी दिले.

लष्कराने विद्यमान धोरणानुसार एकलहरेतील प्रस्तावित वीजप्रकल्पासाठी ना हरकत दाखला द्यावा. केंद्राने दाखल्याच्या नवीन नियमांचे संकेत दिले आहेत. नियम अस्तित्वात आले नसतानाही लष्कराकडून अडवणूक केली जात असल्याने प्रकल्प रखडला आहे. पर्रिकर यांनी ना हरकत दाखल्याबाबत परवानगीचे आश्वासन दिल्याने आपण समाधानी आहोत.

- हेमंत गोडसे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूर रोड परिसरात महिलेचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बँकेत घुसून तेथील महिला कर्मचाऱ्याची खून केल्याची घटना गंगापूर रोडवरील महिला सहकारी बँकेत बुधवारी सकाळी घडली. महिलेच्या एका नातलगास संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले असून, प्रॉपर्टीच्या वादातून हा प्रकार घडला असावा असा संशय व्यक्त केला आहे. गंगापूर पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

वर्षा अरुण देशमुख (वय ४८, रा. फ्लॅट क्र. २, दत्तात्रय अपार्टमेंट, काठे गल्ली) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. गंगापूर रोड परिसरातील महिला सहकारी बँकेत त्या शिपाई म्हणून नोकरीस होत्या. बुधवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास त्या बँकेत एकट्याच होत्या. आवरसावर करीत असताना तोंडाला रुमाल बांधून अज्ञात इसम बँकेत आला. त्याने वर्षां यांचे तोंड दाबून त्यांना मारहाण केली. त्यांच्यावर धारदार हत्याराने वार केले. त्यानंतर तो इसम पळून गेला. जखमी अवस्थेतच वर्षा बँकेतून बाहेर आल्या. काही नागरिकांनी त्यांना तत्काळ जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर कॉलेजरोडवरील खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली. वर्षा यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. परंतु दुपारी दीडच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमी वर्षा यांचा जबाब पोलिसांनी नोंदविला. प्रॉपर्टीच्या कारणावरून सुरेश साहेबराव देशमुख यांच्याशी त्यांचा वाद होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. तसेच लवकरच त्याचा निकाल लागणार होता, अशी माहिती जबाबातून पुढे आली. दिंडोरी येथून देशमुख याला ताब्यात घेण्यात आले. वर्षा यांच्या पतीचे निधन झाले आहे.

जखमी वर्षा यांचा जबाब आम्ही नोंदविला आहे. त्यातून काही माहिती पुढे आली. त्यानुसार आम्ही त्यांच्या एका नातलगास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

- अविनाश बारगळ, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारने मागितली आठ दिवसांची मुदत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

महापालिकेच्या शिक्षण समितीचा ठराव निलंब‌ित करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आपले म्हणणे मांडण्यासाठी राज्य सरकारने आठ दिवसांची मुदत मागितली आहे. न्या. ओक यांनीही सरकारला गुरूवारपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याची परवानगी देत, शुक्रवारी अंतिम सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारीच आता शिक्षण समिती संदर्भातील अंतिम फैसला होण्याची शक्यता आहे.

शिक्षण समिती तयार करण्याच्या महापौरांचा ठराव निंलबित करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर बुधवारी सुनावणी झाली. त्यात न्या. अभय ओक यांनी राज्य सरकारला स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले. मात्र, सरकारच्या वकिलांना आपल्या निर्णयावर स्पष्टीकरण मागण्यासाठी आठ दिवसांची मुदत न्यायालयाकडे मागितली. न्यायालयाने त्यांना आठ दिवसांची मुदत देत, पुढील गुरूवारपर्यंत आपले म्हणणे न्यायलयासमोर सादर करण्याचे आदेश दिले. गुरूवारी स्पष्टीकरण सादर केल्यानंतर शुक्रवारी या याचिकेवर अंतिम सुनावणी करण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले. महापालिका शिक्षण समितीच्या प्रस्ताव निलंबित करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला सोमवारी चव्हाण यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्या. अभय ओक यांच्या पिठासमोर ही याचिका सुनावणी सुरू आहे.त्यामुळे आता शुक्रवारी होणाऱ्या अंतिम सुनावणीकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसाला उडविले

$
0
0

नाशिक : नाकाबंदीवेळी अडविणाऱ्या पोलिसाला न जुमानता त्याच्या अंगावर गाडी घालण्यात आल्याचा प्रकार भद्रकाली पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडला. त्या पोलिसासह मोटरसायकलवरील तिघेजण या घटनेत जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी पोलिसांनी भाभानगर परिसरात तिघेजण नवशक्ती चौकातून मोटरसायकलवरून येताना दिसले. हवालदार बिन्नर यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मोटरसायकलस्वारांनी त्यांना उडविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सारडा सर्कलचा कोंडला श्वास

$
0
0

प्रवीण बिडवे, नाशिक

जीव मुठीत धरून ये-जा करणारे शालेय विद्यार्थी, रस्त्यावरच ठाण मांडून बसणारी जनावरे, द्वारका, शालिमार, गडकरी चौक अन् भद्रकाली अशा चारही बाजूने गर्दी करणाऱ्या वाहनांमुळे सारडा सर्कलचा श्वास कोंडला आहे. वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती आणि बेशिस्त वाहनचालक यामुळे येथून ये-जा करणारे विद्यार्थी आणि अन्य नागरिकांनाही जीव मूठीत धरून प्रवास करावा लागतो आहे.

सारडा सर्कलसारख्या शहरातील मुख्य चौकात अपघाती मृत्यूच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. किरकोळ अपघात ही तर नित्याची बाब बनली आहे. मात्र, तरीही येथील वाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडून लक्ष घातले गेलेले नाही. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील बहुतांश रस्त्यांचे रुंदीकरण, डांबरीकरण, डागडूजी व तत्सम कामे झाली. परंतु, शालिमार ते द्वारका या रस्त्याची मात्र उपेक्षाच करण्यात आल्याचे पहावयास मिळत आहे. म्हणूनच या परिसरात राहणारे आणि या परिसरातून सातत्याने ये-जा करणारे नागरिक याबाबत नाराजी व्यक्त करतात. एसटी महामंडळाच्या ८० टक्क्याहूंन अधिक बसेस सारडा सर्कलमार्गेच शहरातून बाहेर पडतात. पुणे, अहमदनगर, धुळे, या सर्वच मार्गांवरील, नाशिकरोडहून शहरात ये-जा करणाऱ्या नागरिकांकडूनही याच मार्गाचा अवलंब केला जात असल्याने चौकात नेहमीच वर्दळ असते.

भद्रकालीतील रहिवाशांच्या मुलांना सारडा सर्कल येथील उर्दू शाळेत जाण्यासाठी याच मार्गाचा अवलंब करावा लागतो. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी विद्यार्थ्यांची या चौकात मोठी गर्दी असते. चौकातील रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातात शालेय विद्यार्थ्यांनी जीव गमावल्याच्याही घटना घडल्या आहेत. या चौकातून ओव्हर ब्रीज करावा अशी मागणी त्यावेळी रहिवाशांनी केली होती. मात्र ही मागणी अद्याप पूर्ण होऊ शकली नाही. त्यावेळी रहिवाशांची समजूत काढत या चौकामध्ये वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली. परंतु आता अनेकदा वाहतूक पोलिसही तेथे गैरहजर असतात. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी येथे वाहतुकीचा बोजवारा उडतो. आधीच या मार्गावर असलेली वाहनांची वर्दळ त्यातच भद्रकालीतील लोखंड बाजारातील मालाची याच चौकातून होणारी ने-आण यामुळे वाहतुकीच्या समस्येमध्ये अधिकच भर पडते. भद्रकालीतील अनेक व्यापाऱ्यांच्या मालाची ने-आण करणारी वाहने याच चौकातून ये-जा करतात.

प्रश्न बनला जटील

मुंबई महामार्गाला जोडणारा जवळचा मार्ग म्हणूनही भद्रकाली, शालिमार, सीबीएस, त्र्यंबक नाका, रविवार कारंजा परिसरातील नागरिकही सारडा सर्कल, व्होक हार्ट हॉस्पिटल मार्गे ये-जा करू लागले आहेत. या चौकात अनेक वर्षांपासून पेव्हर ब्लॉक बसविले आहेत. हे ब्लॉक देखील वाहनांच्या वर्दळीमुळे खचले आहेत. अशा एक ना अनेक कारणांमुळे सारडा सर्कल येथील वाहतुकीचा प्रश्न जटील होत असून, त्यावर उपाय शोधण्याचे आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे.

येथील अतिक्रमणे काही प्रमाणात हटविण्यात आली असली तरी अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नाला प्रशासनाने अजूनही हात घातलेला नाही. या चौकाने मोकळा श्वास घ्यावा यासाठी प्रशासनाने आश्वासक पाऊले उचलायला हवीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीवायके कॉलेज पार्किंगच्या विळख्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बीवायके कॉलेजच्या बाहेर पार्किंगची समस्या जाणवत आहे. बीवायकेच्या कॅम्पस मध्ये बऱ्याचदा कॉलेजियन्स पार्किंग करायची सोडून आपल्या बाइक्स आणि कार कॉलेजबाहेर रस्त्यावर थेट उभ्या करतात. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या उग्र रुप धारण करीत आहे.

बीवायके कॉलेजमध्ये शिकणारे तरुण आणि तरुणी कॉलेज पार्किंगऐवजी रस्त्यावरच गाड्या उभ्या करतात. बीवायके कॉलेजच्या येवलेकर मळ्याकडील गेटचा रस्ता, मुख्य चौकाजवळ तसेच कॉलेजच्या मुख्य गेटसमोरील दुकांनांजवळ सर्रासपणे गाड्या उभ्या केल्या जातात. याशिवाय कॉलेजच्या बाजुलाच असलेल्या एका मॉलमध्ये अनेक शोरुम आणि दुकाने आहेत. या शोरूम्समध्ये खरेदीसाठी येणारी मंडळी देखील आपली वाहने रस्त्यावर उभी करतात. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

वाहतुकीसाठी जागा कमी

बीवायके कॉलेज परिसरात येणारी वाहने रस्त्यावर उभी केली जातात. अशी वाहने उभी करणाऱ्यांमध्ये नव्याने प्रवेश घेण्यासाठी आलेले विद्यार्थी व त्यांचे पालक यांची संख्या अधिक आहे. मात्र, याचा सर्वाधिक त्रास अन्य वाहनचालकांना होतो. गाड्या चालविण्यासाठी अतिशय कमी मार्ग मोकळा राहतो. यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या वाहनांमधून इतर वाहनचालकांना वाट काढावी लागते.

वाहनचालकांचा बेशिस्तपणा

बीवायके कॉलेजसमोर दोन कॅफे आहेत. तेथे कायम तरुणाईची गर्दी असते. कॅफेसमोर गाड्या उभ्या करून त्यावर तरुण मंडळी ठाण मांडून बसलेली दिसतात. तसेच एनबीटी लॉ कॉलेजलग असलेल्या बँकेमध्ये बँकिंग व्यवहार आणि एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीही वाहने अस्ताव्यस्त उभी करून निडून जातात. त्यामुळे आधीच अरुंद असलेला रस्ता अधिकच छोटा होतो. काही तरुण तरुणी आपल्या बाइक्स आणि कार वेगाने पळवितात. यातून अपघाताचा धोका वाढला आहे.

पोलिसांचा धाक गेला कुठे?

पर्किंगच्या समस्येवर उपाय काढण्यासाठी कॉलेजरोडवर ट्रॅफिक पोलिसांकडून अनेकदा कारवाई केली जाते. मात्र, त्याचा फारसा परिणाम जाणवत नाही. वाहनचालकांनीच आपल्या गाड्या योग्य प्रकारे पार्किंगमध्येच उभ्या करण्याची गरज आहे. तसेच शोरूम मालकांनी गाड्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपप्रवृत्तींमुळे प्रवेशप्रक्रियेत बाधा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वरवंडी शिवारातील महावीर एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेमध्ये सुरू असणाऱ्या प्रवेशप्रक्रियेत बाधा आणून ती बंद पाडण्याचा प्रयत्न परिसरातील अपप्रवृत्तींकडून केला जात आहे, असा आरोप संस्थेचे अध्यक्ष हरीश संघवी यांनी केला. या प्रकरणी दिंडोरी पोलिसांमध्ये गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संस्थाध्यक्षांची खाजगी जागा आणि संस्थेची जागा यातून जाणाऱ्या वहिवाटीचा उपयोग संस्थेचे विद्यार्थी करतात. ही वहिवाट सर्वांसाठी खुली नसून केवळ विद्यार्थ्यांसाठी ती खुली केल्याची माहिती संघवी यांनी दिली. तर याच परिसरातील एका बांधकाम व्यावसायिकाकडून संस्थेच्या जागेमध्ये धुडगूस घालण्यात आला. या प्रकारात त्या व्यावसायिकाकडून जेसीबीच्या सहाय्याने संस्थेच्या जमिनीत खोदकाम करण्यात आले. तसेच संस्थेत तंत्रशिक्षण संचलनालयाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत प्रवेशाचे कामकाज सुरू होते. या अतिक्रमित खोदकामामुळे संस्थेतील इंटरनेट, टेलिफोन कनेक्शन तोडले गेल्याने प्रवेशप्रक्रियेत बाधा पोहचल्याचे संघवी यांनी दिंडोरी पोलिसात केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. यावर पोलिसांकडून तात्पुरती कारवाई करण्यात आली असली तरीही या प्रवृत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुख्याध्यापकास लाच घेताना पकडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सरकारी माध्यमिक आश्रमशाळेतील स्वयंपाकी आणि शिपाई यांच्या पदोन्नतीच्या वेतनातील फरकाची रक्कम मिळवून देण्यासाठी तीन हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारणाऱ्या मुख्याध्यापकाला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. सिन्नर तालुक्यातील धोंडबारे येथील आश्रमशाळेत बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. दादाजी दत्तू झिंजाडे असे त्याचे नाव आहे. मार्च २०११ ते मे २०१५ या कालावधीतील वेतनातील फरकाची रक्कम मिळवून देण्यासाठी ही लाच स्वीकारण्यात आली.

खराब भाजीपाला रस्त्यावर

ना‌शिक : अमृतधाम येथे भरणा-या बाजारात भाजी विक्रेते विक्रीनंतर खराब भाजीपाला तेथेच फेकत असल्याने कचरा साचत आहे. यामुळे दुर्गंधीही पसरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्वजस्तंभाचा संपला शोध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याचे प्रतीक असलेल्या ध्वजस्तंभ उभारण्याची जबाबदारी महापालिकेवर सोपवण्यात आली असून, पालिकेने ध्वजस्तंभासाठी आ‍वश्यक ध्वजकाठी मिळवल्या आहेत. नांदूरमध्यमेश्वर येथे मनपा प्रशासनाला ५४ फुटांचे निलगिरीचे वृक्ष सापडले असून, त्यांचा तीन आखाड्यांसह पुरोहित संघाला पुरवठा केला जाणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यांची सुरुवात ही ध्वजारोहण सोहळयाने होते. सिंहस्थ राशीत गुरूचे आगमन होते, तेव्हा ब्रह्मांडातील सर्व इष्टदेवता या आनंदाने गोदावरीतल्या रामतीर्थावर येतात. त्यांचे आनंदाने व मंगलमय वातावरण स्वागत करण्यासाठी ध्वजस्तंभ फडकवला जातो. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सुरुवातीचे प्रतीक म्हणून या ध्वजस्तंभाकडे पाहिले जाते. रामकुंडावर पुरोहित संघाचे ध्वजारोहण होते, तर निर्मोही, दिंगबर आणि निर्वानी अशा तीन आखाड्यांचे स्वतंत्र ध्वजारोहण केले जाते. पुरोहित संघाला ५१ फूट तर, उर्वरीत तीन आखाड्यांना ५४ फुटांची ध्वजकाठी उपलब्ध करून द्यावी लागते. जिल्हा प्रशासनाने महापालिकेवर या ध्वजकाठ्यांची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या लांब ध्वजकाठ्यांचा शोध महापालिका प्रशासनाकडून सुरू होता.प्रशासनाचा लांब ध्वजकाठींचा शोध संपला असून, नांदूरमध्यमेश्वर या अभयारण्यात निलगिरीचे ५४ फुटांचे वृक्ष आढळून आले आहेत. या वृक्षांची तोड करून ते ध्वजस्तंभासाठी पुरविले जाणार आहेत. या वृक्षांच्या तोडणीसाठी कोणतीही परवानगी लागत नसल्याने प्रशासनाने हा सोपा उपाय निवडला आहे. पुरोहित संघाला ५१ फुटांचा ध्वजस्तंभ १४ जुलैपूर्वी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तीनही आखाड्यांना १९ ऑगस्टपूर्वी या ध्वजस्तंभ उपलब्ध करून दिला जाणार आहे.

उंचीमुळे कमी संकटे

ध्वजस्तंभ उंचीवर असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या काठीवरील ध्वज जेवढा उंच आणि लांब असेल तेवढी संकटे कमी येतात, असा पुराणात उल्लेख आहे. ध्वज जेवढा लांब फडकतो आणि त्याच्या जेवढ्या वायुलहरी दूर जातात, तेवढ्या परिक्षेत्रात असुरी शक्ती प्रवेश करीत नाहीत असे म्हटले जाते. त्यामुळे तो जास्तीत जास्त उंच फडकवला जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज ठाकरे उद्यापासून नाशकात

$
0
0

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दहा तारखेपासून नाशिकच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत सिंहस्थासह विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. दोन दिवस ते नाशिकमध्ये मुक्काम ठोकणार असून, आपल्या मुक्कामात पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या देणार आहेत. महापालिका निवडणुका जवळ येऊ लागल्याने मनसेतर्फे विकासकामांची लगीनघाई सुरू झाली आहे.

राज ठाकरे शुक्रवारी सायंकाळी नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. त्यानंतर शनिवारी सकाळी गटनेता अनिल मटाले यांच्या प्रभागातील शाळांच्या बांधकामाचे भूमिपूजन, सभागृह नेते सलिम शेख यांच्या प्रभागातील रस्त्याचे उद्घाटन, तसेच कामगारांसाठी सुरू केलेल्या पुरीभाजी केंद्राचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे. नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या प्रभागातील तीनेश झोपडपट्टी धारकांना घरकुलांचे वाटप केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाड चौफुलीवर अपघातात चार ठार

$
0
0

मालेगाव : मालेगाव शहरातील मनमाड चौफुली भागातील अमरफुरसेन परिसरानजीक सकाळी ट्रक व कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात जागीच चार जणांचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. मनमाडकडून मालेगावच्या दिशेने येणार ट्रक आणि मालेगावहून मनमाडच्या दिशेने जाणारा कंटेनर यांच्यात सामोरासमोर टक्कर झाली. या अपघातात दोन्ही वाहन चालकांसह अन्य दोन जणांचा मृत्यू झाला असून, अपघातातील एका जखमी व्यक्तीवर उपचार सुरु आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरीही अकरावीच्या जागा रिक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अकरावी प्रवेशासाठी यंदा मेरीट लिस्टने उच्चांक गाठल्यानंतर प्रवेशासाठीची चुरस चांगलीच वाढली होती. मात्र, अंतिम टप्प्यात सुमारे दोन हजारावर जागा रिक्त राहिल्या आहेत. यंदा शिक्षण विभागाने अकरावीसाठी होणारी चढाओढ लक्षात घेता एकूण प्रवेश क्षमतेत दोन हजाराने वाढ केली होती.

शहरातील सुमारे ५३ ज्युनिअर कॉलेजेसमधील प्रवेशांसाठी यंदा २० हजार ८६० जागा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या जागांवर अद्यापपर्यंत साडेअठरा हजारांपेक्षाही जास्त प्रवेश निश्चित झाले आहेत. सुमारे दोन हजार जागा अद्यापही रिक्त असून अंतिम टप्प्यात प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत सायन्स शाखेसाठी सुमारे साडेसहा हजार, आर्टससाठी सुमारे सव्वा चार हजार तर कॉमर्स शाखेसाठी सुमारे साडे सात हजार प्रवेश निश्चित झाले आहेत.

शहरातील सर्वच सायन्स कॉलेजेसमधील जागा भरल्या गेल्या आहेत. पाठोपाठ आर्टसमधील जागाही भरल्या जात आहेत. तीनही शाखांच्या तुलनेत कॉमर्स शाखेमध्ये झालेले प्रवेश कमी दिसत आहेत.

प्रवेश सेंट्रलाइज हवेत

काही वर्षांमध्ये अकरावी प्रवेशासाठी नाशिकमध्ये चुरस वाढीला लागली आहे. यामुळे कॉलेजेसचा प्राधान्यक्रमही मेरीटच्या विद्यार्थ्यांकडून ठरविला जातो आहे. राज्यात मुंबई व पुण्यासारख्या शहरांमध्ये अकरावीची पूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पध्दतीने राबविण्यात येते.

मात्र, नाशिकमध्ये ही प्रक्रिया कॉलेजेसवर अवलंबून आहे. नाशिकमधील काही कॉलेजेस ऑनलाइन प्रवेशानंतरही एकूणच प्रक्रिया सेंट्रलाइज नाही. परिणामी प्रवेशाचा असमतोल असल्याचे शहरातील मुख्य चित्रण दिसून येत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्षापासून शहरात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय पध्दतीने राबविण्यात यावी. यामुळे विद्यार्थ्यांना न्याय मिळू शकेल, अशी मागणीही विद्यार्थी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.

आर्टसलाही प्राधान्यक्रमाचा पर्याय

अकरावीच्या प्रवेशासाठी प्रवेशाच्या सुरुवातीच्या टप्प्यात चांगलीच चूरस दिसून आली. यंदा सायन्स शाखेसाठीच्या मेरीटने कळस गाठला. शहरातील सायन्स शाखेसाठी प्राधान्याच्या कॉलेजमध्ये पहिल्या तीनही मेरीट लिस्ट सुमारे ९३ टक्क्यांच्या खाली उतरल्या नाहीत. तर पाठोपाठ कॉमर्ससाठीही ८२ टक्क्यांपर्यंत कळस गाठला गेला. आर्टससाठी प्रवेश खुले असले तरीही विद्यार्थ्यांनी या ही कॉलेजेसमध्ये प्राधान्यक्रम लावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images