Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

भौगोलिक मानांकनात कांद्याला स्थान

$
0
0

किशोर वडनेरे, लासलगाव

दिल्ली येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील २२ कृषी उत्पादनांना भौगोलिक मानांकन जाहीर झाले असून, या यादीमध्ये लासलगावच्या कांद्यानेही दमदार एंट्री मिळविली आहे. आपल्या खास झणकेदार चवेसाठी प्रसिध्द असलेल्या लासलगावच्या कांद्याने या महत्त्वाच्या यादीमध्ये स्थान पटकाविल्यामुळे जगभरात आता लासलगावची ओळख ही दर्जेदार व निर्यातक्षम कांद्याचे माहेरघर अशी यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे.

या नव्या ओळखीमुळे येत्या काळात निर्यातदारांची पावलेही लासलगावच्या दिशेने पडू लागतील अशी आशा पल्लवित होऊ लागली आहे. याचा फायदा येथील कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी व एकूणच बाजारपेठेवर होईल, असा विश्वास लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील कृषी उत्पादने जागतिक स्थरावर पोहोचावीत, त्यांची निर्यात वाढावी याकरिता कृषी उत्पादनांना भौगोलिक मानांकन मिळविण्यासाठी सादरीकरण करण्यात आले होते. या मानांकनामध्ये महाराष्ट्रातील २२ कृषी उत्पादनांना स्थान मिळाल्यामुळे देशासह परदेशातही राज्यातील कृषी उत्पादनांना एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. येत्या काळात राज्यातील शेती व्यवसाय बहरण्याची संधी प्राप्त झाली आहे. लासलगावच्या मातीत व भौगोलिक परिस्थितीत उत्पादित झालेल्या कांद्याची चव, गंध, रंग हे इतर भागातून येणाऱ्या कांदा उत्पादनापेक्षा वेगळा असून, दर्ज्याच्या बाबतीत लासलगावचा कांदा इतर ठिकाणच्या कांद्यापेक्षा उच्चप्रतीचा असल्याचे यानिमित्ताने अधोरेखीत झाले आहे.

जीआयच्या यादीत लासलगावच्या कांद्याला मानांकन मिळाल्यामुळे कांद्याने लासलगावला सातासमुद्रापार स्वतंत्र अशी ओळख दिली आहे. या मानांकनामुळे कांद्याच्या निर्यातीला चालना मिळण्यासाठी मदत होणार असून, याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह, विक्रेते व प्रक्रिया उद्योगालाही होणार आहे.

- नानासाहेब पाटील, सभापती लासलगाव कृ.ऊ.बा., संचालक नाफेड.

लासलगावच्या कांद्याला भौगोलिक मानांकनाच्या यादीत स्थान मिळाल्यामुळे येथील कष्टकरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मेहनतीचे खऱ्या अर्थाने चीज झाले आहे. लासलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

- विष्णू जाधव, कांदा उत्पादक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजीबाजार ओट्यांना चढता दर

$
0
0

लिलावास प्रारंभ; महापालिकेला आर्थिक फायदा

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

महापालिकेच्या गोदाकाठावरील भाजीपाला मार्केटमधील ओट्यांच्या लिलावाला शुक्रवारी चांगला प्रतिसाद मिळाला. शासकीय दरापेक्षा चांगले दरात लिलाव सुरू झाले आहे. एकूण ४८६ ओट्यांच्या लिलाव प्रक्रियेपासून गंगाघाटावरील विक्रेत्यांनी मात्र लांब राहणेच पंसद केले. रात्री उशिरापर्यंत लिलाव प्रक्रिया सुरू होती.

गोदाघाटावरील भाजीबाजार हटविल्यानंतर महापालिकेने गणेशवाडीतील नवीन भाजीबाजाराची लिलाव प्रक्रिया सुरू केली. महापालिकेत तिसऱ्या मजल्यावर ४८६ ओट्यांच्या लिलावाला स्थानिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सायंकाळपर्यंत ४८ ओट्यांच्या लिलाव प्रक्रिया पार पडली. त्यास शासकीय दरापेक्षा जास्त दराची बोली स्थानिकांनी लावल्याने महापालिकेला त्याचा चांगला आर्थिक फायदा झाला आहे. महापालिकेच्या वतीने या ओट्यांचा दर हा १,३७५ रुपयांपर्यत लावला होता. मात्र, १,७२० रुपयांपर्यत अनेकांनी या ओट्यांसाठी बोली लावली. अनामत रक्कम म्हणून पाच हजार रुपये, दरमहा भाडे आणि तीन वर्षाच्या करारपट्टीवर हे ओटे देण्यात येत आहेत. अनेक महापालिकेतील राजकीय पदाधिकाऱ्यांनी ओटे घेण्याचा प्रयत्न केला असून कार्यकर्त्यांमार्फत त्यांनी शिरकाव केल्याची चर्चा होती.





जुने विक्रेते दूरच

पंचवटी : महापालिकेने आम्हाला प्राधान्य द्यावे, या मागणीवर अडून बसलेल्या गंगाघाटावरील भाजीबाजारातील काही विक्रेत्यांनी या प्रक्रियेपासून लांब राहण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी आपल्या परिचित व्यक्तींच्या नावावर ओटा घेऊन आपली व्यवस्था करून ठेवली आहे. महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम हे लिलावर ठाम राहिल्याने विक्रेते प्रत्यक्ष प्रक्रियेपासून दूर राहिले.





प्रभाग सभापतींना सभेत फुटले रडू

सातपूर : सातपूर विभागीय कार्यालयात शुक्रवारी झालेल्या प्रभाग बैठकीत सभापती उषा शेळके यांना रडू कोसळले. मनसेचीच सत्ता असतांना पक्षाच्याच सभापतींना प्रशासनाच्या कारभारामुळे रडण्याची वेळ आली. दरम्यान, महापालिका अधिकारी नागरी सुविधा देत नसल्याचा आरोप उपस्थित सर्वच सदस्यांनी केला.

सभापती उषा शेळके यांनी नागरी कामे होत नसल्याबद्दल त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे मनसेची सत्ता असलेल्या महापालिकेत मनसे नगरसेवकांचीच कामे होत नसल्याने नाराजीचा सुरु उमटू लागला आहे. कुंभमेळा तोंडावर आला असतांना प्रशासनाकडून कामांना दिरंगाई केली जात असल्याची तक्रार नगरसेवकांनी यावेळी केला. दरम्यान, प्रभाग बैठकीला नगरसेवकांनी उशिराने हजरी लावली. यात मनसेचे सभागृहनेते सलिम शेख, शशिकांत जाधव व सविता काळे यांना सभापतींनीच दूरध्वनी करून बैठकीला बोलावून घेतले. तसेच 'रिपाइं'चे नगरसेवक प्रकाश लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रांत मते बैठकीला उपस्थित होते. याप्रसंगी विभागीय अधिकारी महेंदकुमार पगारे, अशोक मेश्राम, संजय गांगुर्डे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलनानंतरही वाटण्याच्या अक्षता!

$
0
0

पंचवटीतील अधिकाऱ्यांकडून नगरसेवकांकडे दुर्लक्ष

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

पंचवटी विभागातील सर्व नगरसेवकांनी विभागीय कार्यालयात आठ दिवसांपूर्वी विभागातील सर्व पथदीप तातडीने सुरू करावे, यासाठी विद्युत विभागाच्या कार्यालयाच्या दरवाजास टाळे ठोकून ठिय्या आंदोलन केले होते. मात्र, प्रशासनाने अद्याप कार्यवाही न केल्यामुळे नगरसेवकांच्या मागणीला वाटण्याच्या अक्षता लावण्यात आल्याचे दिसून येत आहे.

पंचवटी परिसरातील सर्व पथदीप आठ दिवसात सुरू करण्याची एकमुखाने मागणी सर्व पक्षीय नगरसेवकांनी केली होती. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा पुन्हा इशारा दिला होता. त्यावेळी विद्युत विभागासह विभागाचे विभागीय अधिकारी यांनी सर्व नगरसेवकांना 'आंदोलन मागे घ्यावे; आम्ही तत्काळ सर्व पथदीप बसवून देतो', असे आश्वासन दिले. परंतु, 'येरे माझ्या मागल्या' या उक्तीप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली आहे. कोणत्याही भागातील सगळे पथदीप सुरू झालेले नाहीत. यावरून नगरसेवकांच्या मागणीला, अधिकारांना, आंदोलनाच्या इशाऱ्याला काहीही अर्थ उरला नाही का, असा प्रश्न पंचवटीतील नागरिकांना पडला आहे.

प्रभाग मोठा असल्याने पथदीपांच्या कामासाठी अतिरिक्त आठ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर सर्व नगरसेवक व विद्युत विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला जाईल.

- सुनिता शिंदे, सभापती, पंचवटी

प्रभागातील पथदीपांच्या कामासाठी आठ दिवसाची मुदत मागितली होती. त्या काळात सुमारे ९० टक्के कामे झाली आहेत. उर्वरित कामे लवकरच पूर्ण केली जाणार आहे.

- शरद दराडे, विद्युत अभियंता



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीमध्ये खरेदीसाठी गर्दी

$
0
0

ईदनिमित्त मुस्लिम तरुणींकडून 'कराची पॅटर्न'ला पहिली पसंती; डॉल फ्रॉकलाही मागणी प्रशांत धिवंदे

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

रमजान हा मुस्लिम समाजाचा महत्त्वाचा महिना. या महिन्यात उपवास केल्यास पुण्य प्राप्ती होते. आता आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या रमजान ईद‌साठी कपडे, शोभेच्या वस्तू आणि अन्य साहित्य खरेदीला देवळाली परिसरामध्ये वेग आला आहे. केवळ परिसरातूनच नव्हे तर नाशिकमधून अनेकांची पावले खरेदीसाठी देवळाली कॅम्पकडे वळू लागली आहे.

महिला आणि मुलींकडून कपड्यांमध्ये कराची पॅटर्न व प्लाझो याला यंदा सर्वाधिक मागणी आहे. कपडे खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या लेव्हीट मार्केटमध्ये गर्दी ओसंडून वहात आहे. लहान मुलांसाठी 'बादल वॉश जीन्स', 'प्रिंटेड कोड्रा जॅकेट', 'वेल्व्हेट जिन्स', 'रिव्हसेबल टी-शर्ट' व 'प्रिंटेड शर्ट' आदी पॅटर्न तर महिलांमध्ये 'कराची पेटर्न', 'शिफॉन कुर्ती', 'प्लाझो', 'फ्लॉवर टच', 'लाँग फ्रॉक', 'एँकर लेंथ', 'डिझायनर पीस' अश विविध व्हरायटी उपलब्ध आहेत. तर लहान मुलींमध्ये 'डॉल फ्रॉक'चे विशेष आकर्षण आहे. आपल्या मुलींसाठी मुस्लिम बांधव या ब्रॅन्डला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. रमजान महिन्यात हमखास वापरला जाणारा 'अरबी कुंदरा' बुरखा इ. कपड्यांची मुस्लिम महिलांकडून मोठ्या उत्साहात खरेदी केली जात आहे.

देवळाली कॅम्प येथील व्यापारी वर्ग सौदी अरेबिया, मुंबई, गुजरातमधील सुरत-अहमदाबाद, दिल्ली अशा भागातील माल विक्रीसाठी असतात. मुस्लिम धर्मियांचे नमाजसाठी लागणारे 'जानमाज'ची विशेष विक्री या मार्केटमध्ये होत असल्याची माहिती विक्रेते नवीन केवलानी यांनी दिली. वेस्टर्न आऊटफिटच्या दुकानामध्येही ग्राहकांची वाढती संख्या दिसत आहे.

सजावट साहित्याचीही खरेदी

रमजानच्या पवित्र महिन्यात प्रार्थनेसाठी लागणारे पवित्र ग्रंथ 'कुराण', 'रियाल', 'कुराण फतिया', 'यासीन शरीफ', 'मजीद' तसेच जप करण्यासाठी लागणारी 'कसबी' ही माळाही मुस्लिम भाविक खरेदी करीत असल्याचे विक्रेते अजगर अली काजी यांनी सांगितले. घरातील सोफा कव्हर, कर्टन कापड, ईद निमित्त 'सिल्की सोलापुरी चादर' इत्यादी साहित्याची खरेदी केली जात आहे.



मेकअप खरेदीला वेग

सध्या महिलांमध्ये मेकअप करतांना हर्बल प्रोडक्ट वापरण्याचा ट्रेंड आला आहे. त्यामुळे काजळ, आय शेडो, कॉम्पॅक्ट पावडर, लिपस्टिक, लीप पेन्सिल, मेकअप कीट, फेशियल कीट, लेडीज बेल्ट, मेहंदी आदींच्या खरेदीत वाढ झाल्याचे चित्र आहे. आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या रमजान ईदच्या सणासाठी येथे मोठी गर्दी होत असल्याने या परिसरात कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने व शहर वाहतूक पोलिसांनी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक विक्रेते सादिक कॉट्रॅक्टर यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीओई’धारकांनाही नोकरीच्या संधी

$
0
0

उच्च व त‌ंत्रशिक्षण विभागाकडून समकक्षतेस हिरवा कंदिल

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) 'सेंटर ऑफ एक्सलन्स' (सीओई) मधून पदविका मिळवून बाहेर पडलेल्या उमेदवारांना शासकीय व निमशासकीय क्षेत्रात नोकरीसाठी संधी उपलब्ध झाली आहे. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने 'सीईओ' अभ्यासक्रमाला व्यवसाय अभ्यासक्रमाशी समकक्ष ठरविण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव राज्य सरकारकडे औपचारिक मंजुरीसाठी पाठविला आहे.

कारखाने व औद्योगिक संघटनांच्या सहकार्याने केंद्र सरकारने सुरू केलेली 'सीओई' योजना आता क्राफ्ट्समन ट्रेनिंग योजनेत (सीटीएस) रुपांतरित करण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी घेतला होता. त्यावर शिक्कामोर्तब करणारा अध्यादेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अवर सचिव विवेक पाटील यांनी जारी केला आहे. 'सीओई'मुळे आयटीआय अभ्यासक्रमाच्या पूर्ततेनंतर नोकरीच्या संधी दुर्लक्षित राहत असल्याने या योजनेचे रुपांतर 'सीटीएस' योजनेत करण्यात आले आहे. त्यातील विषय मात्र 'सीओई'शी समकक्ष करण्यात आला आहेत. परिणामी, 'सीओई' अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

'आयटीआय'मधून दिले जाणारे प्रशिक्षण हे कारखान्यांमधील तंत्रज्ञानाच्या गरजेशी सुसंगत व कौशल्ययुक्त जागतिक दर्जाचे मनुष्यबळ निर्माण करण्याच्या उद्देशाने 'सीओई' योजनेंतर्गत अभ्यासाची रचना करण्यात आली होती. पायाभूत प्रशिक्षण विभागानुसार अभ्यासक्रम पार पाडले जात होते. एका वर्षात सहा प्रकारचे अभ्यासक्रम दोन महिन्याच्या कालावधीसह शिकवले जात होते. परंतु, विद्यार्थी एका ट्रेडमध्ये रुळत असतांना लगेचच त्याला नवीन अभ्यासक्रम वा पुढच्या ट्रेडला सामोरे जावे लागत असल्याने प्रशिक्षणातील गुणवत्ता ढासळली. २०१४ साली ही योजना बंद करण्यात आली. विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यातही अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे 'सीओई'ला मिळणारा प्रतिसाद वेगाने घटला. यावर उपाय काढण्यासाठी 'सीटीएस' योजनेत हा अभ्यासक्रम रुपांतरित करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलांच्या मानसिकतेवर टीव्हीचा परिणाम

$
0
0

पंकज चांडोले

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वयाच्या सहाव्या ते सातव्या वर्षात मेंदूचा विकास सर्वाधिक प्रमाणात होतो. या वयात जे संस्कार त्यांच्यावर केले जातात, ते पुढील आयुष्यभर त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर दिसून येतात. या महत्त्वपूर्ण वयात जर मुलं टीव्हीच्या अधीन झाले तर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात, असे प्रतिपादन इस्पॅलिअर शाळेचे संचालक सचिन जोशी यांनी केले.

'महाराष्ट्र टाइम्स'च्या वतीने आयोजित 'टीव्ही आणि मुलांची मानसिकता' या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. लहान मुलांचे वाढते टीव्हीप्रेम व त्यातून वेगवेगळी वळणे घेत असलेली त्यांची मानसिकता हा आज चिंतेचा विषय बनला आहे. टीव्हीवरील कार्यक्रम, त्यातील हिंसक दृश्ये याचा आघात मुलांच्या मानसिकतेवर होतो. त्याचा परिणाम मुलांच्या कृतीतूनही वारंवार दिसून येतो. यामागील कारणे पालकांनाही मिळत नाहीत. त्यांना याबाबत योग्य दिशा देता यावी, या उद्देशाने या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. बालपणावर आधारित कवितेच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. जोशी पुढे म्हणाले की, मुलांच्या भावनिक व मानसिक विकासावर टीव्हीवरील कार्यक्रम दुष्परिणाम करतात. या वयात मुले जे पाहतात, ऐकतात, अनुभवतात याचा कायमस्वरुपी परिणाम त्यांच्या भावी आयुष्यावर होतो. त्यांच्या कानावर पडणारे शब्द मेंदूत साठवले जातात. बालवयात आलेले अडथळे, अनुभव यातून बुद्धिचा विकास होतो. या अनुभवांमुळेच भविष्यात ते सक्षमरित्या कार्यरत राहू शकतात. त्यामुळेच टीव्हीवरील कार्यक्रम, आजची विघातक कार्टून्स यांपासून त्यांना दूर ठेवून त्यांच्या भविष्यात उपयोगी पडतील अशा गोष्टींचा अनुभव मिळेल, यासाठी पालकांनी प्रयत्नशील रहावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

टीव्ही बघण्यामुळे अति क्रियाशील, नैराश्य, एकलकोंडेपणा, वैयक्तिक स्वार्थाकडे झुकणे, हिंसक वृत्ती वाढणे, एकाग्रता नसणे यांसारख्या लक्षणांबरोबरच स्पर्श, आवाज, दृष्टी, वास, चव या संवेदनांवरही परिणाम होत जाणवत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच इस्पॅलिअर शाळेत साजरा केलेल्या 'नो टीव्ही विक' उपक्रमात विजेत्या ठरलेल्या कुटुंबांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला सर्वांगीचे संमित्र भांडगे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरकुलांचे आज वाटप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक ४० मधील शिवाजी नगरमध्ये उभारलेल्या घरकुल योजनेतील तीनशे घरकुलांचे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे. मात्र, घरकुल वाटपावर भाजप आणि काँग्रेस सदस्यांनी आक्षेप घेतला असून, यात बोगस लाभार्थी घुसवल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे हे घरकुल वाटप वादात सापडण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या शिवाजी नगरमधील ६२० घरकुलांपैकी ३०० घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत. या घरकुलांचे आज, शनिवारी सकाळी अकरा वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत वाटप केले जाणार आहे. झोपडपट्टी निर्मूलनासाठी स्थानिकांना घरकुले दिली जात आहेत. या समारंभाला महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमीत बग्गा, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना घरकुलांच्या चाव्या दिल्या जातील.

दरम्यान, या घरकुलांच्या लाभार्थी यादीवर काँग्रेसच्या राहुल दिवे आणि भाजपच्या प्रा. कुणाल वाघ यांनी आक्षेप घेतला आहे. लाभार्थी बोगस असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी करीत घरकुलांच्या दिरंगाईवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे घरकुलांचे वाटप वादात सापडण्याची शक्यता आहे.



पाच हजार घरकुलांचे दिव्य आव्हान

घरकुल योजनेतील लाभार्थींचे उद्दिष्ट ९ हजारांवरून ७४६० घरांपर्यत करण्यात आले असले तरी, मुदतीत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आहे. आतापर्यंत केवळ १९५५ लोकांनाच घरकुले वाटप करण्यात आले असून, ५४० घरकुले तयार आहेत. त्यामुळे केवळ २५९५ घरे तयार झाले आहेत. अजून पाच हजार घरे दीड वर्षात महापालिकेला पूर्ण करायचे आहेत. या योजनेला २०१६ पर्यंत मुदत आहे. त्यामुळे एवढी घरे दीड वर्षात पूर्ण होतील काय याबद्दल शंका आहे.





पाच हजार घरकुलांचे दिव्य आव्हान

घरकुल योजनेतील लाभार्थींचे उद्दिष्ट ९ हजारांवरून ७४६० घरांपर्यत करण्यात आले असले तरी, मुदतीत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आहे. आतापर्यंत केवळ १९५५ लोकांनाच घरकुले वाटप करण्यात आले असून, ५४० घरकुले तयार आहेत. त्यामुळे केवळ २५९५ घरे तयार झाले आहेत. अजून पाच हजार घरे दीड वर्षात महापालिकेला पूर्ण करायचे आहेत. या योजनेला २०१६ पर्यंत मुदत आहे. त्यामुळे एवढी घरे दीड वर्षात पूर्ण होतील काय याबद्दल शंका आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकला वेध स्मार्टसिटीचे

$
0
0

शंभर पैकी ८२.५० टक्के गुणांकन; प्रस्ताव लवकरच सादर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्टसिटी प्रकल्पात समावेशासाठी महापालिकेने शुक्रवारी ऑनलाइन मार्किंग राज्य सरकारकडे सादर केले. स्मार्ट सिटीसाठी ठरलेल्या शंभर गुणांपैकी नाशिक शहराने ८२.०५ टक्के गुण पूर्ण केले असून, राज्य सरकारकडून येत्या २२ जुलै रोजी हे गुणांकन केंद्र सरकारला सादर केले जाईल. स्मार्टसिटीसाठीच्या आवश्यक शंभर टक्के निकष पूर्ण करण्यासाठी नवे प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत. महापालिकेने शुक्रवारी या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे स्मार्टसिटी योजनेत नाशिकचा समावेश निश्चित मानला जात आहे.

पंतप्रधान नरेद्र मोदींनी नियोजनबद्ध व पर्यावरणपूरक शहरांच्या उभारणीसाठी देशात शंभर स्मार्टसिटी उभारण्याची घोषणा केली आहे. त्यात राज्यातील शहरांचा समावेश होण्यासाठी राज्य सरकारनेही कंबर कसली आहे. स्मार्टसिटीच्या पहिल्या टप्प्यात स्पर्धात्मक पद्धतीने दहा शहरांची निवड करून त्या शहरांची शिफारस केंद्र शासनाकडे केली जाणार आहे. राज्य शासनाने निवडलेल्या शहरांनी केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्मार्टसिटीसाठीचे आवश्यक गुणांकन करण्याचे आदेश महापालिकांना दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने निकषांची पडताळणी, गुणाकंन करीत, तसा प्रस्ताव शुक्रवारी राज्य सरकारला सादर केला. केंद्र सरकारने आखून दिलेल्या निकषानुसार महापालिकेने तब्बल ८२.५० गुणाकंन मिळविले आहे. ऑनलाइन पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. दोन दिवस अधिकाऱ्यांनी एकत्रित बसून केंद्राचे निकष पूर्ण केले. येत्या २२ जुलैला राज्य सरकारकडून केंद्राकडे हा प्रस्ताव पाठविला जाणार आहे. सोबतच उर्वरीत गुणांकन पूर्ण करण्यासाठी नवे प्रकल्पही महापालिका हाती घेणार आहे. त्यामुळे शंभर टक्के गुण मिळवण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. पालिकेच्या प्रस्तावात पाणीपुरवठा, शिक्षण, सार्वजनिक स्वच्छता व वाहतूक व्यवस्था, घरकुल योजना, माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे पुरविण्यात आलेली संपर्क सुविधा, महापालिकेच्या महत्त्वाच्या कागदपत्रांचे डिजिटायझेशन, ई-गव्हर्नन्स, सरकारी कामकाजात नागरिकांचा सहभाग, पर्यावरण, सुरक्षा, रस्ते आदी विषयांची माहिती देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘तुमच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला हॅटस् ऑफ’

$
0
0

मुलांना लाभला आजोबांचा आशीर्वाद

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'मुलांनो! आमची परिस्थिती फारशी श्रीमंतीची नाही, परंतु या सर्वांतून डोके वर काढून पाहताना आम्हाला मोकळा श्वास घेण्याची फार ऊर्मी दाटते. 'मटा' नेहमी वाचतो; त्यात हेल्पलाइनविषयी वाचले. इथे मोकळा श्वास घेता येईल असे वाटले. तुम्हा सर्वांच्या परिस्थितीची गाथा वाचली. तुमची शिकण्याची दुर्दम्य इच्छाशक्तीला 'हॅटस ऑफ'च.' या भावना आहेत १९६४ मधील आठवीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या! आज त्यांचे वय ६५ च्या वर आहे. परंतु, त्यांच्यासाठी आपण कुणाला तरी मदत करीत आहोत ही भावनाच खूप मोठी आहे.

'मटा हेल्पलाइन' उपक्रमासाठी आर्थिक मदतीचा ओघ सुरू आहेच, त्यातच पूर्वीच्या न्यू हायस्कूलचे (आताचे बिटको हायस्कूल) ८ वी ते ११ पर्यंतचे माजी विद्यार्थी एकत्र जमून त्यांनी 'मटा' हेल्पलाइनसाठी मदत दिली. त्या ‌आजोबांचे हे सुंदर शब्दचित्र आहे. त्यात चारूदत्त कुलकर्णी, पद्माकर भसे, जयप्रकाश जातेगावकर, गोपाळ मोरे, जयकृष्ण पुराणिक, प्रकाश पडोळ, सुरेश बागूल यांचा समावेश होता.

मनाने नेहमीच प्रफुल्लीत असलेल्या या सर्वच आजोबांना असलेली वाचनाची आवड. यामुळे त्यांना 'मटा' हेल्पलाइनची माहिती देता आली. त्यातून त्यांना या नऊही जणांच्या कथा अधिकच भावल्या. कारण, त्यांनाही या मुलांएवढेच नातवंडेक आहेत. त्यांच्यासोबतीने या आजोबांचा काळ अत्यंत मजेत जातो. असे असताना आपल्या नातवांच्या वयाची मुले शिक्षणासाठी असा संघर्ष करताय हे ठळकपणे लक्षात आले. त्यामुळे एकत्र येत त्यांनी या मुलांसाठी आर्थिक मदत तर दिलीच परंतु, या शब्द ओल्या भावनाही पाठवल्या आहेत. ते म्हणतात, 'मटा हेल्पलाइन म्हणजे पवित्र गोदामातेचा प्रवाह आहे.' या प्रवाहात आपलाही एक थेंब असावा या भावनेतून प्रत्येकाने मदत केली आहे. यातील काही आजोबांची पेन्शन आजारातच खर्च होत असून, अनेक आजारांना व उपचारांना सामोरे जाताना ते त्रासलेय परंतु, मदतीच्या या हाकेला ओ देऊन ते एकप्रकारे स्वत:चेच समाधान करीत आहेत.

'मटा' हेल्पलाइन या उपक्रमांतर्गत दानशूर नाशिककरांना हाक देण्यात आली. अत्यंत दानशूर हात लाभल्याने या दानपात्राला एव्हाना चांगले वजन आले आहे. आलेले धनादेश स्वीकारत या मुलांच्या शैक्षणिक प्रवासाचा मार्ग 'मटा'बऱ्याच अंशी सुकर करण्याचा प्रयत्न करीत आहे. आर्थिक परिस्थितीने गांजलेल्या परंतु, सरस्वतीचा वरदहस्त डोक्यावर असलेल्या कविता रंजवे, अक्षता पवार, सोनल लोखंडे, शुभम गांगुर्डे, मंदार रोकडे, हर्षदा भामरे, मंगेश चौधरी, सौरभ वाघ, अनुराज ढोबळे या नऊ जणांपर्यंत हे दान पोहोचविण्यासाठी एक कार्यक्रम घेतला जाणार आहे. त्यातून हे धनादेश त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येतील.



साईछत्र पान स्टॉल, हॉटेल शिल्पा डायनिंग हॉल शेजारी,

n साईछत्र पान स्टॉल, हॉटेल शिल्पा डायनिंग हॉल शेजारी,

वकीलवाडी कॉर्नर, एम. जी.रोड

n माधवजिका बढिया चिवडा, पंचवटी कारंजा कॉर्नर, पंचवटी

n भिंगे बंधू, १३६२, जुन्या सीबीएससमोर, शरणपूर रोड

n गोविंद दंडे अॅण्ड सन्स, दत्तमंदिर चौक, नाशिकरोड

n राजकमल पान स्टॉल, जुने बसस्थानक, देवळाली कॅम्प

n निमा हाऊस, आयटीआय सिग्नलजवळ, सातपूर

n अंजली प्लायवूड, नवरंग कॉम्प्लेक्स, द्वारका, नाशिक पुणे रोड

n विधाते बंधू चिवडेवाले, चंद्रकांत विधाते,

n त्रिमूर्ती चौक, नवीन नाशिक

n सप्तश्रृंगी डेअरी, चार्वाक चौक, इंदिरानगर

n भावे प्लॅस्टो, टर्ले चेंबर, शिवाजीनगर, जेलरोड

n महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, काठियावाड शोरूम समोर, डिसूझा कॉलनी, नाशिक

विशेष सूचना :

चेक विद्यार्थ्यांच्या नावाने द्यावेत. चेक गोळा करण्यासाठी 'मटा' ने या सेंटर्सशिवाय कोणाचीही नेमणूक केलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुक्त’च्या पीएचडीला पुन्हा खीळ

$
0
0

प्रशांत भरवीरकर, नाशिक

मुक्त विद्यापीठाची पीएचडी गाईडअभावी पुन्हा एकदा संकटात सापडली आहे. विद्यापीठात पीएचडीसाठी असलेल्या विषयांचे प्राध्यापक यूजीसीच्या नियमात बसत नसल्या कारणाने गाईड होण्यासाठी ते पात्रच ठरत नाही. त्यामुळे मानव्यविद्याशाखेचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही विषयांची पीएचडी देण्यासाठी मुक्त विद्यापीठ असक्षम आहे. यपीएचडीसाठी निवड झालेल्यांचे भवितव्य अंधारात सापडले आहे.

जूनमध्ये पेट परीक्षा (पीएचडी प्रवेशपरीक्षा) झाली. राज्यभरातील १५ हजार जणांनी आपले नशीब आजमवले. पैकी ४६ ते ५० जणांदरम्यान विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळवले आहे. परंतु, कृषीविद्याशाखा, निरंतर शिक्षण, सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, वाणिज्य आणि व्यवस्थापन यांसह अनेक विषयातील गाईडच उपलब्ध नाहीत व यूजीसीच्या नियमाप्रमाणे ज्या विद्यापीठातून पीएचडी घ्यायची असेल तेथीलच गाईड घेण्याची सक्त‌ी असल्याने केवळ मानव्यविद्याशाखा वगळता मुक्त विद्यापीठाला पीएचडी देता येणार नाही. पीएचडीसाठी विद्यावेतन म्हणून २५ हजार रुपये देण्यात येणार असल्याने यादीत नाव झळकलेल्या काही विद्यार्थ्यांनी हातातील नोकरी सोडून पीएचडीसाठी वेळ काढल्याची शक्यता नाकारता येत नाही.





कुलगुरूंची होतेय दिशाभूल

मुक्त विद्यापीठातर्फे देण्यात येणाऱ्या कृषीविस्तार या अभ्याक्रमातील पीएचडीसाठीचे नियम भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या अखत्यारीत असतात, असे कुलगुरूंना सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, मुळात तसे नसून ही पीएचडी यूजीसीच्या निकषांनुसारच देण्यात येत असल्याचे जगजाहीर आहे. विद्यापीठाच्या संचालक मंडळापैकीच एकजण कुलगुरूंची दिशाभूल करीत असल्याचेही समोर आले आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कायद्याचे मार्गदर्शन तेही मोफत!

$
0
0

एनबीटी कॉलेजमध्ये मोफत विधी सल्ला केंद्र



अश्विनी कावळे, नाशिक

'शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये', असे म्हटले जात असले तरी कोर्टाची पायरी चढण्याची वेळ अनेकांवर येतेच. मात्र, ही पायरी चढण्याची तऱ्हा माहित नसल्याने अनेक जण भांबावतात. अन् आपल्या समस्येवर मार्ग निघेल की नाही, याचा विचार करुन धास्तावतातही. समाजातील सामान्य नागरिकांची हीच भीती लक्षात घेऊन शहरातील एनबीटी लॉ कॉलेजने 'मोफत विधी सल्ला केंद्र' सुरू केले आहे. त्याचा अनेकांना फायदा होतो आहे.

अनेकदा ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची कायद्याविषयी असलेल्या अपुऱ्या ज्ञानामुळे फसवणूक व दिशाभूल होण्याची शक्यता असते. त्यामुळेच सामाजिक भान जपून लॉ कॉलेजनी हा पुढाकार घेतला आहे. लॉ हे क्षेत्र समाजाशी निगडीत आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांचा समाजाशी योग्य समन्वय असणे, समाजाला समजून घेण्याची क्षमता असणे गरजेचे असते. या क्षमता विकासाच्या दृष्टीनेही हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरत आहे.

राज्यातील अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव अशा ठिकाणांहून येथे अनेक जण मार्गदर्शन मिळवण्याच्या उद्देशाने येतात. प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्यांसाठी हे केंद्र कार्यरत असून, कॉलेजमधील प्राध्यापक, माजी विद्यार्थी मिळून हे केंद्र चालवतात. बांधकाम मजूरांची हक्के, कर्तव्ये, स्थलांतरित कुटूंबे, हुंडाबळी, महिलांचा छळ, नोकरीसंदर्भात झालेल्या फसवणुकी किंवा आलेल्या अडचणी अशा सामाजिक, घरगुती अडचणींवर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी या केंद्राची सुरुवात कॉलेजमध्ये करण्यात आली. यासाठी 'कायद्यांचे शिपाई' हा मंचदेखील कॉलेजनो विकसित केला आहे. ज्यांना कायद्याची जाण व समाजकार्याची आवड आहे, अशा विद्यार्थ्यांचा सहभाग या मंचात आहे. याद्वारे असंघटित कामगारांना त्यांच्या अधिकाराची, हक्कांची जाणीव करुन दिली जाते. ते काम करीत असलेल्या ठिकाणी त्यांची नोंद केलेली आहे का? ही नोंदणी कशाप्रकारे होते?, त्याचा लाभ कशाप्रकारे घेता येतो?, नोंदणी झालेल्या मजुरांसाठी काय सरकारी योजना आहेत?, राज्यघटनेत त्यांना कोणकोणते हक्क दिलेले आहेत?, ते हक्क कशाप्रकारे मिळवायचे? अशी सर्व माहिती कामगारांना दिली जाते. दर शुक्रवारी दुपारी २ ते ४ या वेळात हे केंद्र कॉलेजमध्ये सुरू असते. भविष्यात या केंद्रांतर्गत हेल्पलाईन व्यवस्था सुरू करण्याची योजना कॉलेज प्रशासनाच्या विचाराधीन आहे.

समाजाला त्यांच्या अडचणींवर न्याय मिळवून देण्यासाठी हे केंद्र कार्यरत आहेत. आजपर्यंत अनेक व्यक्तींना मार्गदर्शन करण्यात आम्हाला यश आले आहे. भविष्यात या केंद्राची व्याप्ती वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

डॉ. अस्मिता वैद्य

प्राचार्य, एनबीटी लॉ कॉलेज







मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामोपचाराचा बांधा सेतू

$
0
0

प्रवीण बिडवे

गौण खनिजांची चोरटी वाहतूक हा केवळ नाशिक जिल्ह्यापुरता मर्यादित विषय नाही. संबंध राज्यात आणि देशातही हा विषय गाजतो आहे. अशा वाहतुकीतून राज्य सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याने महसूल खात्यानेही हा विषय आपल्या अजेंड्यावर घेतला आहे. गौण खनिजांच्या चोरट्या वाहतुकीला ब्रेक लावण्यासाठी जिल्हा प्रशासनच नव्हे, तर राज्य सरकारही अधिक कठोर बनले आहे. म्हणूनच सरकारचा आदेश अंमलात आणण्यापलीकडे जिल्हा प्रशासन वेगळे काही करतेय, असे म्हणता येणार नाही. चोरट्या वाहतुकीवरील कारवाईत आढळलेल्या गौण खनिजांवर त्यांच्या ब्रासवरील किमतीच्या पाच पट दंड आकारावा, असे आदेश महसूल खात्यानेच तमाम जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याची अमलबजावणी स्थानिक पातळीवरील अधिकारी करत असतील, तर त्यात गैर ते काय? त्यांची इच्छा असो अथवा नसो त्यांना वरिष्ठांचा आदेश पाळावाच लागेल. गेल्या महिन्यात पुण्यात झालेल्या महसूल विभागाच्या बैठकीत गौण खनिजांच्या चोरीचा मुद्दा प्राधान्यक्रमावर ठेवण्यात आला. त्यावर सखोल चिंतन झाले. यावरूनच राज्य सरकार याबाबत किती सतर्क झाले आहे, याचा अंदाज येऊ शकतो.

हाच अंदाज गौण खनिज वाहतूकदारांनाही येऊ लागल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे. एकतर गौण खनिजांच्या चोरट्या वाहतुकीवर गेल्या तीन-चार महिन्यांत केलेल्या कारवायांमधून जिल्हा प्रशासनानाने सुमारे अडीच कोटींचा दंड वसूल केला आहे. साहजिकच हा दंड गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्यांच्या खिशातून काढण्यात आल्याने त्यांचा जिल्हा प्रशासनाबद्दलचा रोष उफाळून येणे स्वाभाविक आहे. तो सिंहस्थाच्या कामांच्या पार्श्वभूमीवर प्रकट केला, तर त्यातून काहीतरी साध्य करून घेता येईल, एवढाच या बंदरुपी आकांडतांडवामागील प्रयत्न दिसतो. चोरट्या वाहतुकीतून जो बक्कळ पैसा मिळतो, तो दंडाच्या रुपाने सरकारच्या तिजोरीत जाणार असेल, तर मग हा व्यवसायच कशासाठी करायचा, अशी भावना या वाहतूकदारांच्या अस्वस्थतेत भर पाडणारी ठरू लागली आहे. हे कोठेतरी थांबावे, यासाठीच सिंहस्थाचा मुहूर्त शोधण्यात आल्याचेही लपून राहात नाही. म्हणूनच राजकीय वजन असलेल्या प्रतिनिधींच्या छत्रछायेखाली वाहतूकदारांनी बंदचे हत्यार उपसले आहे. या माध्यमातून जिल्हा प्रशासनावर दबाव टाकण्याचा वाहतूकदार संघटनांचा प्रयत्न असला तरी तो कितपत सफल होईल, हे येत्या काळातच समजू शकेल. मात्र जिल्हा प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने हा तिढा अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे.

वाहनातून जेवढ्या ब्रास गौण खनिजांची बेकायदा वाहतूक होते, तेवढ्याच ब्रासवर प्रशासनाने दंड आकारावा. त्याचा दरही माफक असावा, अशा वाहतूकदार संघटनांच्या मुख्य मागण्या आहेत. तर गौण खनिजांची बेकायदा वाहतूक करीत असल्याची कबुलीच वाहतूकदार देऊ लागल्याने प्रशासनाने त्यांच्यावर काय कारवाई करावी आणि काय करू नये, हे त्यांनी सांगण्याचा आणि आम्ही ते ऐकण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे वाहतूकदारांनी बंद सुरूच ठेवला तरीही प्रशासन त्यापुढे झुकणार नाही, असे संकेतच दिले जात आहेत. त्यातच स्थानिक स्तरावरील महसूल विभागाचे अधिकारी चोरट्या वाहतुकीला प्रोत्साहन देण्यात पुढे असतात, असा जाहीर आरोप संघटनेकडून करून झाल्यानंतर आणखी एक वादाची ठिणगी पडली आहे. संघटना पदाधिकाऱ्यांचे असे वक्तव्य महसूलच्या अधिकाऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा खुलासा अधिकाऱ्यांच्या संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतूकदार संघटनांकडेही थेट आरोपाशी निगडीत पुरावे मागितल्याने हा वाद मिटण्याऐवजी अधिक चिघळू लागला आहे. अर्थात या दोहोंमध्ये सामान्य माणूसच भरडला जातो आहे. शहर, जिल्ह्यात सुरू असलेली बांधकामे आणि सिंहस्थाशी संबंधित कामेही गौण खनिजांअभावी बंद पडू लागली आहेत, हे वास्तव आहे. या कामाशी संबंधित लोक 'बंद' केव्हा मिटणार, याची प्रतीक्षा करू लागले आहेत. सिंहस्थाची कामे घेणाऱ्या ठेकेदारांची यामुळे कोंडी झाली आहे. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे दडपण असताना वाहतूकदारांचा बंद लांबत चालल्याने ठेकेदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. साधुग्राम, वाहनतळावर मुरूम अथवा अन्य गौण खनिजे कशी आणायची आणि काम कसे पूर्ण करवून घ्यायचे, हा प्रश्न ठेकेदारांनीच सोडवायचा असून प्रशासनाला त्याच्याशी देणेघेणे नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. याउलट त्यांनी कामांना विलंब केलाच तर त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे.

वाहतूकदारांनी बंद कायम ठेवला तर प्रशासन एनकेनप्रकारे शहरातील बांधकामांसाठी गौण खनिजे उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रशासनावर वाहतूकदाराची भूमिका पार पाडण्याची वेळ येऊ नये, सामोपचाराने हा प्रश्न निकाली निघून मध्यम मार्ग काढला जावा आणि सामान्य माणसांची फरफट होणार नाही, याची काळजी घेतली गेली, तर हा प्रश्न निकाली निघेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोत रहिवाशांचे ठिय्या आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको/सातपूर

पार्थडी फाटा येथील जी. टी. सावंत महाविद्यालयाचे पार्किंगच्या जागेवरून रहिवाशांनी आंदोलन केले. पार्किंगच्या सुरू असलेल्या संरक्षक भिंतीचे काम महाविद्यालयालगतच्या रहिवाशांनी बंद पडले. अनेकदा महापालिका व महाविद्यालयाचे संचालक यांना सांगूनही मागणी मान्य होत नसल्याने आंदोलन करावे लागल्याचे रहिवाशांनी सांगितले.

जी. टी. सावंत महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना वाहने पार्किंगसाठी महापालिकेच्या बारा मीटर रोड लगत शेडचे काम सुरू केले आहे. परंतु, सदर पार्किंगचे काम रस्त्यात येत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला होता. याबाबत त्यांनी महापालिका व महाविद्यालयातील संचालक यांना माहिती देखील दिली होती.

परंतु, त्याकडे लक्ष देण्यात आले नसल्याचा त्यांचा आरोप आहे. अखेर रहिवाशांनी पार्किंगच्या संरक्षक भिंतीचे काम बंद करून तेथेच ठिय्या दिला.

रोडलगत महाविद्यालयाने पार्किंगचे काम सुरू केले आहे. रस्त्यात होत असलेल्या बांधकामाला आम्ही विरोध केला होता. महापालिका व महाविद्यालयाला सविस्तर माहिती देऊनही बांधकाम सुरूच होते. शेवटी काम थांबविण्यासाठी आम्हाला आंदोलन करावे लागले.

- मेघा बोरसे, रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौकशी होईपर्यंत ‘त्या’ कर्मचाऱ्यांचे निलंबन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

एका शैक्षणिक संस्थेत विद्यार्थीनीवरील अत्याचार प्रकरणात तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्यानंतर संतप्त पालकांनी आंदोलनाचे हत्यार म्यान केले. याप्रकरणी त्या संस्थेतील मुख्याध्यापक, वर्ग शिक्षिका आणि आणखी एका कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले. शनिवारी सकाळच्या सुमाराला पाल्यांना शाळेत सोडण्यासाठी पालक शाळेच्या आवारात आले होते. त्यावेळी या संस्थेतील इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या बालिकेवर अत्याचार झाल्याचे वृत्त पालकांच्या कानावर आले. या वृत्ताने संतप्त झालेल्या पालकांनी अल्पावध‌ीतच आंदोलनाचा पावित्रा स्वीकारला. याची दखल संस्थाचालकांनी घेतली व चौकशी समिती नेमत संबंधित तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदाकाठचे सौंदर्य आणखी बहरणार

$
0
0

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शनिवारी रामकुंडासह गोदाघाटाची पाहणी करत, नदीच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. सद्यस्थितीत नदीचे सौंदर्य पाहून राज ठाकरेंनी त्यात आणखीन भर घालत, व्हिक्टोरीया पूल ते घारपुरे घाटापर्यंतच्या काठावर ऑस्ट्रेलियन टिक हे वृक्ष लावण्यासह नदीपात्रात कारंजा लावण्याचे आणि बोटिंग क्लब सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. सोबतत ठाकरेंनी रामकुंडात सुरू असलेल्या विकासकामांची एक किलोमीटर पायपीट करत बारकारईने पाहणी केली. गोदावरीची स्वच्छता पाहून त्यांनी यावेळी सुटकेचा निश्वास टाकला.

राज ठाकरेंनी शनिवारी शहरातील विविध विकासकामांचे उद् घाटन केले. प्रभाग क्रं. ४० मधील ३०० घरकुलांचे वाटप केल्यानंतर ठाकरेंनी आपला मोर्चा गोदाकाठावर वळवला. नदीपात्रात रामवाडीच्या बाजूने लावलेल्या नारळाच्या वृक्षांची पाहणी केली. यावेळी ठाकरेंनी नदीपलीकडच्या बाजूने ऑस्ट्रेलियन टिक हे वृक्ष लावण्याची सुचना केली. हे वृक्ष वर्षात पंधरा फुट उंच व आकर्षक असल्याने सौंदर्यात भर घालतील असे त्यांनी सांगीतले. तर घारपुरे घाट ते व्हिक्टोरिया ब्रिज दरम्यान बोटिंग क्लब सुरू करा आणि नदीपात्रात कारंजा सुरू करण्याचे निर्देश दिले. यानंतर ठाकरेंनी रामकुंडावरील विकासकामांची पाहणी केली. रामकुंडावरील मंद‌िरे, नक्षीकामांची ज‍वळून माह‌िती घेतली. तासभर ठाकरेंनी रामकुंडावर भटकंती करत, सर्व माहिती जाणून घेतली. ठाकरेंच्या मुडी भावाने पक्षाचे पदाधिकारीही आश्चर्यचकीत झाले होते.

कुंभमेळा प्रतिष्ठितांचा नाही !

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे निमंत्रण आपल्याला पुरोहित संघाकडून मिळाल्याचे सांगत, ठाकरेंनी हा कुंभमेळा प्रतिष्ठ‌ितांचा नाही तर, साधू-संताचा असल्याचा टोला यावेळी लगावला. ध्वजारोहणासाठी गर्दी करणाऱ्या राजकीय नेत्यांना चपराक लावत, आपण ध्वजारोहणासाठी नव्हे; तर कुंभमेळ्याला भेट देऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्यसरकारने पुरेसा निधी दिला नसल्याची टीका त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्युतीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'आयटीआय' नाशिकमधील कार्यशाळांच्या विद्युतीकरणाची झालेली दुरावस्था व त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या लक्षात घेत सार्वजनिक बांधकाम व विद्युत विभागाने राज्य सरकारकडे अपेक्षित रकमेसंबंधित अंदाजपत्रक सादर केले होते. या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून, त्यानुसार तब्बल सत्तर लाख रुपये विद्युतीकरणासाठी मिळणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोईतून मुक्तता होणार आहे. आयटीआयची इमारत ही पन्नास वर्ष जुनी आहे. त्यामुळे तेथील सर्व विभागांमधील इलेक्ट्र‌किल वायरिंग जीर्ण झाल्या होत्या. बिल्डिंगचे मेन स्व‌चि तुटलेले असल्याने वारंवार शॉर्टसर्किट होत असल्याचे प्रकारही येथे वारंवार घडत होते.

परिणामी, विद्यार्थ्यांच्या जीवाला धोक्याची शक्यता वाढत होती. तसेच या तुटलेल्या वायरिंग ही वर्कशॉप व प्रॅक्ट‌किल्सच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या मार्गात अडसर निर्माण करत असल्याने व या असुविधांमुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. यावर मार्ग काढण्याच्या उद्देशाने बांधकाम व विद्युत विभागामार्फत हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. वायरींग नुतनीकरणासाठी सत्तर लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्या अंदाजपत्रकानुसार ही मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर होणार असून, त्यांच्या अभ्यासक्रमालाही चालना मिळणार आहे.

वर्कशॉप १ : २४ लाख ८७ हजार ६२८ रुपये

मशिनीष्ठ ग्राईन्डर, मॅक्याट्रॉनिक्स, विद्युतीकरण, वर्कशॉपमध्ये फॅन, लाईट फिटिंग, स्वच्छतागृहांचे विद्युतीकरण, ऑपरेटर अडव्हान्स मशिन टूल्स, एमएमटीएम आदी.

वर्कशॉप क्रमांक २ : २४ लाख ९३ हजार ३३४ रुपये

वेल्डर, फिटर, वायरमन, विजतंत्र विभागाचे विद्युतीकरण, शिटमेटल, डिझेन मेकॅनिक, आरएसीचे विद्युतीकरण, प्लंबर, पॅपऑरेटर कम मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, कारपेंटर, स्वच्छतागृहाचे विद्युतीकरण, फॅन, लाईट फिटींग आदी.वर्कशॉप क्रमांक ३ : १९ लाख ९५ हजार ८५७ रुपये

मोटार मेकॅनिक, पीपीओ, पेंटर सिव्हील, ड्रॉसमनचे विद्युतीकरण, स्वच्छतागृहाचे विद्युतीकरण, फॅन, लाईट फिटींग आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरूपौर्णिमेनंतरच साधुग्राममध्ये ‘चैतन्य’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साधुग्राममधील जागा वाटपाचा तिढा कायम आहे. आखाडे प्रमुखांनी आस्ते कदम भूमिका घेतली असून, आणखी १५ दिवस ही शांतता कायम राहण्याची चिन्हे आहेत. गुरूपौर्णिमेनंतर सर्वच प्रमुख साधुमहंत साधुग्राममध्ये दाखल होतील आणि त्यानंतरच साधुग्राममध्ये चैतन्य पसरेल, अशी अपेक्षा सध्या उपस्थित साधुंकडून व्यक्त होते आहे.

साधुमहंतांच्या परंपरेत गुरूला विशेष स्थान असते. गुरूच्या आदेशानुसारच सर्व अनुयायी काम करतात. कुंभमेळ्यासाठी असे अनेक विशेष साधु-महंत येणार असून ते गुरूपौर्णिमेनंतर येण्यास सुरूवात होईल, असे सध्या साधुग्राममध्ये वास्तव्यास असलेल्या भक्तीदास महाराज यांनी सांगितले. कमी जागा, उशिरापर्यंत सुरू असलेली कामे व प्रशासनाची भूमिका यामुळे​ सध्या उदासिनतेची छटा साधुग्राममध्ये दिसून येत असल्याचा दावा भक्तीदास यांनी केला. प्रशासनाने संताशी चर्चा केली असती तर हा वाद उद्भवला नसता. मात्र, प्रशासन व संत एकमेकांना समजू शकले नाही, असा दावाही त्यांनी केला. पहिली शाही पर्वणी २९ ऑगस्ट रोजी असून, ३१ जुलै रोजी गुरूपौर्णिमेचा कार्यक्रम पार पडेल. या कार्यक्रमानंतर देशविदेशातील महंत व साधू नाशिकला येतील, असे दयाळदास महाराज यांनीही स्पष्ट केले. चर्तुसंप्रादय आखाड्याचे प्रमुख बर्फांनी बाबा हे सुध्दा ऑगस्टमध्येच येणार असल्याचे दयाळदास महाराजांनी स्पष्ट केले. सध्या साधुग्राममध्ये जागा ताब्यात घेणे आणि त्यावर तंबू उभे करण्याचे काम सुरू आहे. गुरूपौर्णिमेला सर्व महंत आपाआपल्या संस्था तसेच मंदिरामध्ये परततील. गुरूपौर्णिमेचा सोहळा आटोपून मगच साधुमहंत कुंभमेळ्यासाठी परत येणार असल्याचे दिगंबर आखाड्याचे प्रमुख महंत रामकिशोरदास महाराज यांनी सांगितले. ऑगस्टमध्ये नाशिकमध्ये दाखल होणारे साधुमहंत सप्टेंबर महिन्यातील पर्वणी आटोपल्यानंतर थेट उज्जैन येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीला लागू शकतात.

'वेळेचा चांगला उपयोग करा'

गुरूपौर्णिमेमुळे अनेक साधुमहंत ऑगस्ट महिन्यातच दाखल होतील. तोपर्यंत प्रशासनाने रस्त्यांची परिस्थिती सुधारावी. येणाऱ्या साधुमहंतांकडे मोठे सामान वाहून नेणारी वाहने असतात. साधुग्राममधील रस्त्याची परिस्थिती दयनीय असून, ते जड वाहनांचा भार पेलू शकणार नाहीत. तेव्हा प्रशासनाने मिळालेल्या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन महंत रामकिशोरदास महाराज यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अज्ञात साधूवर चोरीचा गुन्हा

$
0
0


नाशिक : रामकुंडावर पुजेसाठी आलेल्या कुटुंबियांजवळील साडे तीन लाख रूपयांचा ऐवज तेथे साधू बनून आलेल्या संशयिताने लांबविला. गुरूवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला. साधुच्या वेषात आलेला हा संशयित भुरटा चोरटा असावा असा संशय पोलिस उपायुक्त अविनाश बारगळ यांनी व्यक्त केला आहे. गुजरातहून फिर्यादी मुलासमवेत नाशिकमध्ये पुजेसाठी आले होते. त्यावेळी तेथे अनोळखी साधू आला. पुजेत असलेले नारळ आणि फुले पाण्यात टाकून या असे त्यांना सांगितले. त्यानुसार ते दोघेही नारळ आणि फुले घेऊन पाण्याजवळ गेले. तीच संधी साधून चोरट्याने त्यांची बॅग लांबविली. साडेतीन लाखांची रोकडो चोरीस गेल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासन प्लॉटचे नंबरिंगच विसरले

$
0
0

अरविंद जाधव, नाशिक

साधुग्रामच्या जागेचे हस्तांतरण होऊन सात दिवस उलटून गेले असले तरी जागा वाटपाचा तिढा कायम राहिला आहे. साधुग्राममधील प्लॉट अप्रमाणीत असून, त्यावर नंबर टाकण्यात आलेले नाही. प्रशासनाचे आणि आखाड्याचे प्लॉट नेमके कोणते, याबाबत अजूनही संभ्रम असून, या गोंधळामुळे शनिवारी संध्याकाळीपर्यंत एकाही प्लॉटचे वाटप करणे शक्य झालेले नाही.

तपोवनात २००३ साली साधुग्रामसाठी २०० एकर जागा आरक्ष‌ित करण्यात आली होती. यंदाच्या कुंभमेळ्यासाठी त्यात १५० एकरची वाढ करण्यात आली. एकूण ३५० एकर जमिनीवर साधुग्राम उभारण्यात आला असून, त्यात तीन लाख २० हजार साधुमहंताच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. प्रशासनाने साडेतीनशे एकरमध्ये ३०० चौरस मीटरचे १ हजार ५३७ प्लॉट तयार केले आहेत. या प्लॉटमध्ये टॉयलेटससह बाथरूमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, जमीन हस्तांतरीत करण्यापूर्वीच अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांनी टॉयलेटस व बाथरूमच्या जागेसह सर्व्हिसरोडबाबत हरकत घेतली. महंताच्या आक्षेपानुसार शक्य ते बदल केले जातील, असे प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर गत सोमवारी प्रशासनाने साधुग्रामची जागा आखाडा परिषदेकडे सोपवली. मात्र, यानंतर जागा वाटापावरून दिंगबर आखाड्याचे महंत रामकिशोरदास महाराज आणि ग्यानदास महाराज यांच्यात खटके उडाले. हा वाद महंतांनी आपआपसात गुरूवारी मिटवला. त्यामुळे शुक्रवारपासून जागा वाटपाचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र, प्रशासनाच्या धोरणांमुळे यास फाटा बसला.

याबाबत माहिती देताना रामकिशोरदास महाराज यांनी सांगितले की, साधुग्राममधील ४०० प्लॉट प्रशासन खासगी संस्थाना देणार आहेत. ते प्लॉट नेमकी कोणते आहेत, याची आम्हाला माहिती नाही. उपस्थित अधिकारीही त्याबाबत अनभिज्ञ आहेत. आम्ही आज जागा वाटप केली आणि प्रशासनने ती पुन्हा परत मागितली तर अडचण निर्माण होऊ शकते. तसेच काही प्लॉटमध्ये फक्त टॉयलेटस तर काही प्लॉटमध्ये फक्त बाथरूम येतात. सर्वत्र सावळा गोंधळ असून, त्यावर प्रशासनाने पर्याय सुचवणे अपेक्षीत आहे. साधुग्राममध्ये २८ हजार २४७ मीटर लांबीची सिव्हेज पाईप लाईन टाकण्यात आली असून, त्यात बदल होणार नाही. मग, आलेल्या साधुमहंताच्या निवसाची सोय करायची तरी कशी असा प्रश्न आहे. गत कुंभमेळ्यात प्लॉटला नंबर देण्यात आले होते. यावेळेस अशी तजवीज नसल्याने स‌ीमा निश्च‌ित करताना अडचणी निर्माण होत आहेत. शनिवारी संध्याकाळपर्यंत एकाही प्लॉटचे वाटप करणे शक्य झाले नसल्याचे महंत रामकिशोरदास महाराज यांनी स्पष्ट केले.

प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे सर्वत्र गोंधळ निर्माण झाला आहे. लवकरात लवकर प्लॉट ताब्यात मिळाले तरच त्यावर तंबू उभारण्याचे काम सुरू होईल. वॉटरप्रुप काम करताना वेळ लागू शकतो. मात्र, प्रशासन अजूनतरी याबाबत गंभीर नसल्याचे दिसते.

महंत रामकिशोरदास महाराज, दिगंबर आखाडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्वजारोहणासाठी व्ह‌ीआयपींची मांदियाळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह त्र्यंबकेश्वर येथे तर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक नाशिकच्या कार्यक्रमासाठी हजर राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुध्दा पुरोहित संघाला उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले असून, ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी व्हीआयपींची मांदियाळी भरणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या मुख्य उपस्थितीत त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण पर्व होणार आहे. सोमवारी सायंकाळी सिंग नाशिक मुक्कामी येणार असून, मंगळवारी सकाळी त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत. सिंह यांचा नियोजित दौरा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार सोमवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास सिंह यांचे ओझर विमानतळावर आगमन होणार आहे. सायंकाळी पावणे सातला ते गोल्फ क्लब येथील सरकारी विश्रामगृहावर पोहाचतील. तेथेच त्यांचा मुक्काम असणार आहे. मंगळवारी सकाळी सहाला त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या ध्वजारोहण पर्वाला ते उपस्थित राहणार आहेत. सात वाजता ते पुन्हा विश्रामगृहावर पोहोचतील. सकाळी आठला ते ओझर येथून विमानाने दिल्लीकडे मार्गस्थ होणार आहेत. सिंह यांच्यासमवेत त्याचे खासगी सचिव नितेश कुमार झा, अमरेंद्र तिवारी, याखेरीज पोलिस अधिकारी के. पी. सिंह उपस्थित राहतील.

नाशिकच्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी आयुष (स्वतंत्र कार्यभार) आणि केंद्रीय राज्यमंत्री आरोग्य व कुटुंब कल्याण, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हजर राहणार आहेत. सोमवार १३ जुलै, रोजी रात्री नाईक शहरात मुक्कामी येणार आहेत. मंगळवारी म्हणजेच १४ जुलै रोजी सकाळी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी ते राहतील. पुरोहित संघाने या कार्यक्रमाचे अनेक मंत्र्यांना आमंत्रण दिले असून, केंद्रीय मंत्र्यांची संख्या आणखी वाढू शकते.

पालकमंत्र्यांचा दौरा

दरम्यान, पालकमंत्री गिरीष महाजन आज शहर दौऱ्यावर आले होते. त्यांनी रामकुंडासह साधुग्राममध्ये पाहणी दौरा केला. याबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ‌देखील शनिवारी शहर दौऱ्यावर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images