Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाशिकची विमानसेवा पुन्हा एकदा जमिनीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएलच्या आडमुठ्यापणामुळे अखेर नाशिकची विमानसेवा जमिनीवर आली आहे. दुपारी अडीच वाजेनंतर सुविधा एचएएल देवू शकत नसल्याने अखेर मेहेर कंपनीने अनिश्चित काळापर्यंत सेवा रद्द करण्याचे घोषित केलेे. एचएएलच्या कारभाराचा फटका नाशिककरांना बसत आहे. ओझर विमानतळाच्या ठिकाणाहून विमानसेवा सुरू होण्याच्या नाशिककरांच्या अपेक्षांना पाने पुसण्याचा प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नाशिकला सेवा सुरू झाली. मेरिटाईम हेलि एअर सर्व्हिल प्रा. लि. (मेहेर) या सीप्लेन कंपनीने नाशिक ते पुणे ही सेवा दिवसातून दोनदा देण्याची घोषणा केली. मात्र, वादळी पावसात या कंपनीच्याविमानामध्ये आर्द्रता आल्याने गेल्या महिन्यातील सेवेचा प्रारंभ पुढे ढकलण्यात आला. यादरम्यान, मेहेरला अनेक प्रवाशांना बुकिंगचे पैसे परत करावे लागले. अखेर गेल्या ६ जुलैला मेहेरने मोठ्या उत्साहात विमानसेवेला सुरुवात केली. मात्र, मेहेरला अत्यल्प प्रतिसाद लाभला. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने दोन तास उशिराने पुण्याहून विमान नाशिकला आले. आता मात्र, ही सेवाच अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येत असल्याचे मेहेरने जाहीर केले आहे. एचएएलने दुपारी अडीच वाजेनंतर सुविधा देण्यात असमर्थता दर्शविल्याचे मेहेरचे संचालक सिद्धार्थ वर्मा यांनी सांगितले आहे. दुपारी अडीच वाजेनंतर एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी)च्या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओव्हर टाइम द्यावा लागतो. त्यामुळे प्रति तास ४ हजार रुपये देण्याची मागणी एचएएलने लेखी पत्राद्वारे केल्याचे वर्मा यांनी सांगितले.

एचएएलने किमान काही दिवस तरी चार्जेस माफ करावेत, अशी विनंती केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे केली आहे. त्यांनी काही निर्देश एचएएलला दिले आहेत. त्यावर आता निर्णय होणे अपेक्षित आहे.

हेमंत गोडसे, खासदार

दररोज हजारो रुपयांचे चार्जेस देणे आम्हाला परवडणारे नाही. गंगापूर धरणाच्या ठिकाणीही संध्याकाळची सेवा देण्याचा विचार केला. मात्र, रात्रभर विमान पाण्यात ठेवणे शक्य नाही.

सिद्धार्थ वर्मा, संचालक, मेहेर

आमचे विमान हे दोन इंजिनचे आहे. तसेच, एचएएलने आम्हाला दुपारी ४.३० वाजेपर्यंत सेवा देण्याची लेखी पत्र दिले आहे. त्यामुळे आमची सेवा येत्या १३ जुलैपासून सुरू होईल.

गणेश निबे

संचालक, श्रीनिवास एअरलाईन्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुधीर मुनगंटीवार पालकमंत्री, सभापतीही बदलले!

$
0
0

म. टा. खास प्रत‌िन‌िधी, नाशिक

मनसेच्या पानिपतानंतर महाराष्ट्र नव्याने समजावून घेण्यासाठी राज ठाकरे यांनी हजारो रुपयांची संदर्भ पुस्तके नाशिकमध्येच खरेदी केली होती. हीच पुस्तके आता पालिका शाळांमधील मास्तरांच्या स्वाध्यायासाठी पाठवून द्यावीत काय? असा प्रश्न पालिका शाळांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांना पडला असावा. यालाही कारणही तसेच आहे. कामटवाड्यातील शाळा क्रमांक १०२ मध्ये मुलांच्या माहितीसाठी लिहिलेल्या फळ्यावर नाशिकचे पालकमंत्री चक्क सुधीर मुनगंटीवार दिसत होते, तर जुन्या सभापतींना या शाळेच्या मास्तरांनी अद्याप नारळ दिलेलाच नाही.

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या नावातही व्याकरणाच्या चुका या महान मास्तरांनी करून ठेवल्या. त्यामुळे उर्वरित कालावधीत ठाकरेंसमोर विद्यार्थ्यांऐवजी शाळामास्तरांचीच गुणवत्ता सुधारणेवर भर द्यावा लागणार आहे. या शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. राज ठाकरे आणि महापौर, आयुक्त येणार म्हणून शाळेचे रुपच पालटले होते. मुलांना नवीन गणवेशांसह शाळेची माहितीही अद्ययावत करण्यात आली. शाळेच्या प्रवेशद्वारावर असलेला माहिती फलकही अपडेट करण्यात आला. मात्र, या फलकात शिक्षकांनी असंख्य चुका करून आपल्या गुणवत्तेचं दर्शन घडवले. आपले सामान्य ज्ञान लिहिलेल्या फलकात नाशिकचे पालकमंत्री चक्क सुधीर मुनगंट्टीवार असल्याचे लिहिले. मुख्याध्यापकासह शिक्षकांना गिरीश महाजन हे पालकमंत्री असल्याचे अजूनही माहिती नाही याबद्दल आश्चर्य! विशेष म्हणजे महापालिकेतील पदाधिकारीही या शिक्षक महोदयांना माहिती नाहीत. नवीन नाशिकचे सभापती कांचन पाटील असतांना, जुने सभापती उत्तम दोंदे यांचेच नाव कायम ठेवण्यात आले होते. तर जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांच्या नावातही गोंधळ करण्यात आला.

महापालिका शाळांमधील शिक्षकांचे हे सामान्य ज्ञान माध्यमांनी टिपताच, खळबळून जागे झालेल्या मास्तरांनी सारवासारव करीत फलकच पुसून टाकला. महापालिका शाळांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. मात्र, शिक्षकांचीच गुणवत्ता ढासळल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र घडविण्यास निघालेल्या राज ठाकरे यांना अगोदर मास्तर घडविण्याचे वर्ग घ्यावे लागणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'मिसिंग एन्ट्री'ची दुरुस्ती सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुक्त विद्यापीठातील घडामोडी, तेथील कारभार नेहमीच चर्चेचा विषय असतो. आताही असेच एक उदाहरण समोर आले असून, यावेळी मात्र मुक्त विद्यापीठालाच यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मागील शैक्षणिक वर्षात आलेल्या विद्यार्थ्यांच्या मिसिंग एन्ट्रीच्या दुरुस्तीचे नवे आव्हान विद्यापाठीपुढे उभे राहिले आहे.

मुक्त विद्यापीठातून मागील शैक्षणिक वर्षाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नाव नोंदणीबाबत सर्व माहिती तपासण्यासाठी एसएमएस करण्यात आला होता. परंतु ते न केलेल्या विद्यार्थ्यांनाही हॉलतिकिट नसताना परीक्षा फी भरल्याची पावती दाखवून परीक्षेस बसू देण्यात आले. विद्यार्थ्यांचे ह‌ति लक्षात घेऊन जरी परीक्षेस बसू दिले असले तरी त्यामुळे आता मिसिंग एन्ट्रीच्या तक्रारी समोर येत आहेत. त्याचा फटका हॉलतिकिट घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांनाही बसला असून, त्यांचे निकाल तयार करण्यासाठी मुक्त विद्यापीठ आता अडचणीत सापडले आहेत. यासंदर्भात योग्य वाट काढण्यासाठी १४ जुलै संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या नावाबाबत व इतर काही चुकांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. काही तक्रारी असल्यास विद्यार्थ्यांनी ycmou.digitaluniversity.ac या वेबसाईटवर तक्रार नोंदववावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साध्वींनाही स्वतंत्र जागा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साधुग्राममध्ये साध्वींना स्वतंत्र जागा मिळावी, या मागणीवर अडून बसलेल्या साध्वी त्रिकालभवंता देवीजी यांनी शनिवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. साधुग्राममध्ये महिला साध्वींसाठी स्वतंत्र दोन एकर जागा देण्याची मागणी केली. आखाड्यांमध्ये साध्वींना स्वतंत्र जागा देण्याचे आश्वासन महाजन यांनी साध्वींना दिले. मात्र दोन एकर जागा देण्यास त्यांनी नकार दर्शवला. साध्वीसाठी आवश्यक जागा मिळेल असे आश्वासन त्यांनी दिले.

स्वतंत्र जागेसाठी साध्वी अनेक दिवसापासून महंत ग्यानदास यांच्यासह जिल्हा प्रशासनाशी भांडत आहेत. मात्र दाद मिळत नसल्याने या साध्वींनी शनिवारी नाशिक दौऱ्यावर असलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत, स्वतंत्र जागेची मागणी केली. त्यांनी महाजन यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. साध्वींसाठी स्वतंत्र दोन एकर जागा आरक्षित करा, असा त्यांचा आग्रह होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी एवढी जागा देता येणार नाही, असे सांगीतले. साध्वींसाठी आवश्यक स्वतंत्र जागा देण्यात येईल, असे आश्वासन यावेळी पालकमंत्र्यांनी साध्वींना दिले. जागाची मागणी जास्त असल्याने एवढी जागा शक्य नसल्याचे त्यांनी सांगीतले. त्यामुळे साध्वींच्या जागेचा प्रश्न निकाली निघाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथील शेतकरी रविंद्र उर्फ जनार्दन बाळकृष्ण बस्ते (वय ३०) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. अतिविषारी औषध सेवन करून त्याने द्राक्षबागेत जीवनयात्रा संपविल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले. तीन वर्षांपासून दुष्काळ, अतिवृष्टी आणि गारपीटीमुळे बस्ते यांच्या द्राक्षबागाचे मोठे नुकसान झाले होते. त्यांच्या कुटुंबियांवर १० लाखांहून अधिक कर्ज झाले होते. हे कर्ज फेडायचे कसे याची चिंता रविंद्र यास सतावत होती. सरकारकडूनही ठोस मदत मिळत नसल्याने तो निराश झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज म्हणतात, मी समाधानी!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मनसेच्या साडेतीन वर्षांच्या सत्ता काळात शहरात खूप मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली. विकास दिसायला वेळ जावा लागतो. रस्ते, आयलँन्ड, गोदापार्क यामुळे नाशिकचा चेहरामोहरा बदलला आहे. मात्र, अजूनही दीड वर्ष बाकी असून, इतर शहरात ज्या गोष्टी दिसणार नाहीत, त्या नाशिकमध्ये दिसतील, असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. मी समाधानी आहे. मात्र, नाशिककर समाधानी आहेत, की नाही हे सांगता येणार नाही, असेही ते म्हणाले.

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्यावतीने विविध प्रभागांमध्ये विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना राज यांनी मागील साडेतीन वर्षे विकासकामे सुरू असल्याचे सांगून स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे. ते म्हणाले, की मनसेच्या सत्ताकाळात चकचकीत रस्ते, बोटॅनिकल गार्डन, गोदापार्क, आकर्षक आयलँन्ड उभे राहिले आहेत. आता केवळ शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर असून, तो सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जास्त पार्किंग सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहरात जवळपास साडेचारशे कोटींची कामे सुरू आहेत. नदीचे सुशोभिकरण, नदीत कांरजे उभे करण्याचे प्रोजेक्ट घेतले जाणार आहेत. कोट्यवधींचा खर्च झालेल्या कामांचे उद्‍घाटन व्हायचे बाकी आहे. विकास दिसायला वेळ जावा लागतो असे सांगून मनसेच्या सत्ताकाळावर मी समाधानी आहे. मात्र, जनतेचे माहित नाही, असे सांगून विकासकामांची तुलना जनतेलाच करण्याचे आवाहन केले.

नाशिकच्या जोरावर मुंबईत मागणार मते

मुबंई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात गेल्या साडेतीन वर्षात केलेल्या विकासकामांचे ब्रॅन्डिंग राज करणार आहेत. यासाठी येत्या १४ तारखेला मुंबईत पक्षाची बैठक होणार असून, त्यात नाशिकच्या विकासाचे चित्र मुंबईकरांना पहायला मिळावे यासाठी विशेष तरतूदच करण्यात येणार आहे. नाशिक महापालिकाही यासाठी तरतूद करणार असल्याचे ठाकरेंनी सांगितले.

शिवसेनेला डिवचले

राज ठाकरे यांनी शनिवारी शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका केली. मुंबईत झोपडपट्टीधारक मनपाची घरकुले घेतात आणि परत विकून झोपडपट्टीत जातात, असा आरोप करीत मुंबई महापालिकेत घरकुलांचा धंदा सुरू असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. नाशिकमध्ये मात्र असे होवू नये यासाठी आयुक्तांसह महापौर, नगरसेवकांनी लक्ष ठेवा अशा सूचना त्यांनी केल्या मुंबई आणि औरंगाबाद महापालिकेत अनेक वर्षांपासून सत्ता असलेल्या शिवसेनेच्या कार्यकाळाची आणि नाशिकमधल्या साडेतीन वर्ष मनसेच्या सत्ताकाळाची तुलना करून राज यांनी एकप्रकारे शिवसेनेला डिवचले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील दीड लाख होमिओपॅथी, आयुर्वेदीक, युनानी डॉक्टरांना सर्वोच्च न्यायालयाने अॅलोपॅथी प्रॅक्टीस करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला अपयश आले असून, या निर्णयामुळे नाशिक शहरातील होमिओपॅथी, युनानी व आयुर्वेद डॉक्टरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हिमोओपॅथी, युनानी, डॉक्टरांनी अॅलोपॅथीची प्रॅक्टीस करू नये, यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात महाराष्ट्र सरकारला देखील प्रतिवादी केले होते. महाराष्ट्र सरकारने यात १९९२ पासून विविध बदल सुचवून या डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टीस करायची झाल्यास एक वर्षाचा अधिक कोर्स यशस्वी पूर्ण करावा लागेल. त्यानंतर प्रॅक्टीस सुरू करता येईल, असा निर्णय दिला होता. त्यानुसार डॉक्टरांची प्रॅक्टीस सुरू होती. मध्यंतरी आयएमएने दाखल केलेल्या याचिकेनुसार या प्रॅक्टीसवर निर्बंध आले होते. यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊन सध्या अस्तित्वात असलेल्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त एक वर्ष अधिक अॅलोपॅथी विषयक अभ्यासक्रम पूर्ण करून अॅलोपॅथी प्रॅक्टीस करण्यास मान्यता दिली आहे.

नाशिकमधील बहुतांश आयुर्वेद डॉक्टर फक्त आयुर्वेदाचीच प्रॅक्टीस करतात. आयुर्वेदाच्या शिक्षणातच काही अंशी त्यांना अॅलोपॅथीचा अभ्यास करण्याची मुभा असते. त्यामुळे शहरात फारसा फरक पडणार नाही.

- वैद्य विक्रांत जाधव

आयुर्वेदाची प्रॅक्टीस करण्यास परवानगी होतीच. परवानगी देऊ नये अशी आयएमने हरकत घेतली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे विनाहरकत डॉक्टर प्रॅक्टीस करू शकतील. ग्रामीण भागतील रुग्णांना व आदिवासी भागात जास्त फायदा होईल.

- वैद्य राहुल सावंत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोकाटे-वाजे पुन्हा आमनेसामने

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी २३२ पैकी तब्बल १९० उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर निवडणुकीच्या मैदानात ४२ उमेदवार उरले आहेत. मार्केट कमिटीत सत्ता असलेले माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनल तर, आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनल यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. दोन्ही पॅनलच्या प्रत्येकी १८ उमेदवारांखेरीज मैदानात सोसायटी गट, व्यापारी गटात प्रत्येकी एक स्वतंत्र उमेदवार मैदानात उरला आहे.

वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हे तर शेतकऱ्यांच्या विकासासाठी काम करण्यासाठी परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार राजाभाऊ वाजे यांच्या परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा प्रारंभ येथील क्षेत्रपाल भैरवनाथ मंदिरात करण्यात आला.

परिवर्तन पॅनलचे उमेदवार

जगन्नाथ खैरनार, सुनील बाळकृष्ण चकोर, विजय सानप, नामदेव शिंदे, भाऊसाहेब मल्हारी घुमरे, अनिल सांगळे, भाऊसाहेब शिरसाठ, दत्तात्रय सानप, अंबादास जेजुरकर, हौशाबाई दगू तांबे, प्रा. शकुंतला नामदेव हिरे, शिवाजी तुकाराम गाडे, अण्णासाहेब रानडे, माणिक गडाख, विश्राम शेळके, कचेश्वर वामन चिने, पंढरीनाथ खैरनार, सोमनाथ तुपे.

शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार

सोमनाथ भिसे, अनिल शेळके, दत्तात्रय शेळके, विनायक तांबे, कोंडाजी उगले, सुनील घुमरे, लक्ष्मण शेळके, सुनीता भारत बोऱ्हाडे, सविता सोपान उगले, लक्ष्मण सांगळे, अरुण वाघ, विनायक घुमरे, शांताराम कोकाटे, लता सुदाम रूपवते, सुधाकर शिंदे, संजय नवसे, अनिल जाधव, बाळासाहेब नामदेव आव्हाड.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सभापतीपदासाठी रस्सीखेच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव मनपाच्या स्थायी समितीच्या १६ पैकी ९ सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. नवीन सदस्यांच्या नियुक्तीसाठी १४ जुलै रोजी महापौर हाजी मोहम्मद इब्राहीम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष महासभा होणार आहे. विद्यमान स्थायी समिती सभापतीपद हे काँग्रेसच्या अस्लम अन्सारी यांच्याकडे असले तरी विधानसभा निवडणुकीनंतर मालेगाव मनपात काँग्रेसकडून तिसरा महाजकडे झालेल्या सत्तांतरामुळे स्थायी समितीत देखील सत्तांतर होण्याची चिन्हे आहेत. महापौर पदापासून काँग्रेसला दूर ठेवण्यात तिसरा महाजचे कुरघोडीचे राजकारण यावेळी देखील यशस्वी होते का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसला अडीच वर्ष महापौरपदाची संधी मिळाल्यावर तिसरा महाज, सेना आणि शहर विकास आघाडी यांच्या अनोख्या खेळीने काँग्रेसला महापौरपदापासून दूर ठेवण्यात तिसरा महाजला यश मिळाले. मात्र, स्थायी समिती सभापतीपदी पटकावून काँग्रेसने तिजोरीच्या चाव्या मिळवल्या होत्या. महापौरपद मिळविल्यानंतर तिसरा महाजाला स्थायी समिती सभापतीपद देखील आपल्याकडेच असावे, असे वाटू लागले आहे. त्यासाठी अर्थपूर्ण हालचालींना वेग आला आहे. यामुळे स्थायीत देखील सत्तांतर होण्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेसने महापौरपद गमावेल असले तरी स्थायीतील सत्ता कायम राखण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याने गटनेते खालिद शेख किंवा माजी महापौर ताहेरा शेख यांचा स्थायीत प्रवेश होऊ शकतो. मात्र, सध्या स्थितीत पक्षीय बलाबल पाहता काँग्रेस आणि महाज यांचे समसमान पाच सदस्य स्थायी समितीत असणार आहेत. त्यामुळे स्थायीच्या राजकारणात कोण कोणाची कशी किमत करतो यावरच स्थायीचे सत्तांतर अवलंबून आहे.

महिला व बालकल्याणसाठीही नियुक्ती

स्थायी समिती सदस्य निवडीसोबतच महिला व बालकल्याण समितीमध्ये देखील नव्या नऊ सदस्यांची नियुक्ती होणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांना संख्याबळानुसार प्रतिनिधित्व दिले जाणार आहे.

कार्यकाळ संपलेले सदस्य

काँग्रेस - सभापती अस्लम अन्सारी, इरफान अली,

रफिक शेख.

तिसरा महाज - हमीदा मुसा खान, आतीयाबानो जलील अहमद.

शिवसेना - विजया काळे,

मनोज पवार.

शहर विकास आघाडी -

अजीजूर रेहमान.

मालेगाव विकास आघाडी - सुनील गायकवाड.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोकादायक डीपीमुळे `नागरिकांमध्ये धास्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ व परिसरातील विविध भागात अनेक ट्रान्सफार्मर बसविण्यात आले असले तरी त्यांची सध्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. अनेक डीपी व ट्रान्सफार्मर यांची झाकणे निघाल्यामुळे ती धोकेदायक झाली आहेत.

सर्वच डीपी व ट्रान्सफार्मर कॉलनीच्या मुख्य रस्त्याच्या कडेला बसविण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांना जाता येतांना उघड्या डीपींमुळे अपघात होण्याचा भीती सतावते. अनेक लोकांना व बालगोपालांना याचा त्रास होतो. लहान मुले तर परिसरात खेळत असतांना पालकांच्या जीवाला घोरच लागतो. पाऊस वाढण्यापूर्वी या डीपींची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी आशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. अनेक डीपी व ट्रान्सफार्मर भोवती झाडी वाढली आहेत. शिवाय वेली उंच वाढल्या आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुष्कर सोसायटीची वाट खडतर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

पंचवटीतील अमृतधाम परिसरातील पुष्कर सोसायटीमध्ये अनेक नवीन इमारती उभ्या रहात आहे. मात्र, महापालिका प्रशासनाच्या योग्य नियोजन नसल्याने नागरिकांना या भागात रस्त्याची प्रचंड अडचण जाणवू लागली आहे. या अंतर्गत मार्गावरून पायी चालणेही कठीण झाले आहे.

पुष्कर सोसायटीतील इमारतींकडे जाण्यासाठी रस्ता नीट नसल्याने रहिवाशींची गैरसोय होत आहे. इमारतीतील घरे बुक करतांना इमारतींकडे जाणारा रस्ता एका खाजगी मालकाच्या प्लॉटमधून जात असल्याने प्लॉट मालकाच्या लक्षात येताच प्लॉट मालकाने ताबडतोब प्लॉटला कुंपण घातले. यामुळे रहिवाशांची गैरसोय झाली. त्यानंतर संबंधित बिल्डरने मनपा नकाशाप्रमाणे मूळ रस्ता शोधला. मात्र, या रस्त्याच्या मध्यभागी वीज महावितरण कंपनीची डीपी आहे. नागरिकांच्या मागणीनंतर ही डीपी इतर‌त्र हलविण्यात आली. या कामानंतर रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. पुष्कर सोसायटीच्या मालकीचा एकच रस्ता आहे. तोही पुरेसा नाही. शिवाय दुचाकी वाहने जाऊ शकत असल्या तरी चारचाकी वाहने चालविणे चालकांना कठीण होते.

विजेची डीपी हटविल्यानंतर सोसायटीमधील रहिवाशांना जाण्यायेण्यासाठी चांगला रस्ता राहिलेला नाही. पावसाळ्यापूर्वी अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे.

- अशोक बोरसे, रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारूबंदीसाठी एकवटल्या रणरागिनी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

महापालिकेच्या प्रभाग १७ मधील देशी, विदेशी दारू दुकाने बंद करण्याची मागणीसाठी सातपूरमधील शिवाजीनगर परिसरात दोन दिवस सह्यांची मोहीम राबविण्यात आली. यात दारुबंदीसाठी रविवार सायंकाळपर्यंत शेकडो महिलांनी इंदिरा गांधी विद्यालयात रांगेत उभे सही करण्यासाठी गर्दी केली. प्रभागातील नगरसेवक नगरसेवक दिनकर पाटील यांनी महिलांना सह्यांच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

देशी व विदेशी दारू दुकांनामुळे प्रभाग १७ मधील तरुण व्यसनांच्या अधीन होत असून तेथील कायदा व सुव्यवस्थेची घडी बिघडत चालली होती. या दारूदुकानांबद्दल अनेक तक्रारी महिलांनी केल्या होत्या. तसेच दारू दुकांनामुळे श्रमिकनगर, शिवाजीनगर परिसरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. यासाठी प्रभागातील महिलांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग व नगरसेवक दिनकर पाटील यांच्याकडे अनेकदा तक्रारी मांडल्या होत्या. यानंतर नगरसेवक पाटील यांनी दारू दुकाने बंदीबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे महिलांचे मतदान घेण्याचे सांगितले होते. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने यापूर्वी मतदान घेतले होते. परंतु, त्यावेळी महिलांच्या सह्यांमध्ये अनेक त्रुटी निघाल्याने दारू बंदी होऊ शकली नव्हती.

नगरसेवक पाटील यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे दारू दुकाने बंदीसाठी महिलांचे मतदान घेण्याची पुन्हा मागणी केली. यानुसार शनिवार आणि रविवारी इंदिरा गांधी विद्यालायत सह्यांची पडताळी मोहीम घेण्याचे निश्चित झाले. दरम्यान दोन्ही दिवस शिवाजीनगरच्या इंदिरा गांधी विद्यालयात महिलांनी सकाळपासूनच गर्दी केली. यावेळी मतदारयादीत नाव शोधण्यासाठी महिलांच्या रांगा लागल्या होत्या. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून नगरसेवक पाटील यांनी पोलिस आयुक्तांकडे पोलिस बंदोबस्ताची मागणी केली. त्यानुसार चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. सह्यांच्या पडताळणी मोहिमेसाठी राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक रमेश आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली ४० कर्मचारी व अधिकारी कार्यरत होते.

दारू मुक्तीच्या दिशेने

प्रभाग १७ मधील देशी, विदेशी दारू दुकांनाच्या विरोधात महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला आहे. यामुळे प्रभाग १७ दारू मुक्त नक्कीच होणार असा विश्वास महिलांनी सह्यांची पडताळणी मोहिमेत व्यक्त केला. महिलांना सह्यांच्या पडताळणी मोहिमेत सुरक्षित देण्यासाठी नगरसेवक पाटील, नगरसेविका लता पाटील यांनी तरुण कार्यकर्त्यांची फळी उभी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा, कॉलेजमधील छेडछाडीवर वॉच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात घडणारे महिला आणि मुलींच्या छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्तांनी महिला दक्षता अधिकारी नेमण्याच्या सूचना शाळा आणि महाविद्यालयांना दिल्या आहेत. शालेय आणि कॉलेजच्या विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या घटना वाढल्या आहेत. त्यांना भयमुक्त वातावरणात शिक्षण घेता यावे, समाजातील अपप्रवृत्तींकडून शारी‌रिक किंवा मानसिक त्रास होऊ नये, यासाठी पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी उपाययोजना आखल्या आहेत. नाशिकरोड, देवळाली, उपनगर, इंदिरानगर, अंबड आणि सातपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील शाळा आणि महाविद्यालयांत महिला दक्षता अधिकारी नेमावेत असे पत्र मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीएसटी करप्रणाली उपयुक्तच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

करप्रणालीमध्ये सुसूत्रता येण्याच्या दृष्टीने जीएसटी करप्रणाली ही उपयुक्त आहे. अनेक करांमुळे निर्माण होणाऱ्या गुंत्यापासून या प्रणालीमुळे सुटका होईल. सीएंनी या तरतूदीकडे आशावादी दृष्टीकोनातून बघावे, असे आवाहन आयसीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष सीए मनोज फडणीस यांनी केले.

नाशिक सीए शाखेच्या वतीने अशोका मार्ग येथील आयसीएआय भवन येथे उपप्रादेशिक परिषदेचे उद्घाटन फडणीस यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी केंद्राच्या 'प्रस्थापित वस्तू व सेवा कर' या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज आणि अॅग्रीकल्चरचे माजी अध्यक्ष रामचंद्र भोगले होते. त्यांनीही यावेळी उपस्थित सनदी लेखापालांशी संवाद साधत त्यांच्या योगदानाचा गौरव केला.

पश्चिम विभागाचे अध्यक्ष सीए सुनील पतोदिया म्हणाले, की सीए अभ्यासक्रमाच्या शिक्षणानंतर नोकरीच्या मागे न लागता व्यवसायात पदार्पण करा. रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करा. परिषदेत आयसीएआयचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सीए मुकूंद चितळे यांनी 'नवीन ऑडिट रिपोर्ट व संलग्न तरतुदी' या विषयावर मार्गदर्शन केले. धर्मादाय संस्था व आयकर या विषयी मुंबईचे तज्ज्ञ सीए भूपेंद्र शाह यांनी मार्गदर्शन केले. तसेच आयकर कायद्यातील सूक्ष्म बदलांवर दिल्लीचे वकील कपिल गोयल यांनी मार्गदर्शन केले.

रव‌िवारी झालेल्या विविध सत्रांमध्ये 'अप्रत्यक्ष कर', 'मूल्यवर्धित कर' आणि 'कंपनी कायदा' या विषयावर दिल्लीचे सीए बिमल जैन व मुंबईहून सीए दीपक ठक्कार व निलेश प्रधान यांनी मार्गदर्शन केले. परिषदेत सीए प्रफुल्ल छाजेड, सीए श्रीनिवास जोशी, पश्चिम विभागाचे सचिव सुश्रुत चितळे, पश्चिम विभागाचे माजी अध्यक्ष सीए मंगेश किनारे, यांनीही मार्गदर्शन केले. परिषदेच्या आयोजनासाठी योजन करण्याकरिता नाशिक सीए शाखेचे पदाधिकारी सीए रवी राठी, सीए रेखा पटवर्धन, सीए विकास हासे, सीए मिलन लुणावत, सीए विक्रांत कुलकर्णी, सीए उल्हास बोरसे, सीए सारंग ढोके आदींनी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रलंबित मागण्याविरोधात शिक्षक संघ आक्रमक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावर मार्ग काढण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखेच्या वतीने त्रैमासिक सभा झाली. यात संघाच्या विविध मागण्यांवर चर्चा झाली. मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शिक्षकांचे वेतन दरमहा १ तारखेस व्हावे, पंचायत राज्य शालार्थ अंतर्गत दरमहा होणाऱ्या वेतनातून तालुका व जिल्हा स्तरावरील संस्थांनी बीडीओ, बीईओची परवानगी घेतलेल्या संस्थांची कपात वेतनातून करावी, एलआयसी, आरडी व इतर कपाती वेतनातून कराव्यात. शिक्षकांना निवृत्तीदिनीच सर्व कागदपत्रे, वेतन फंड मिळावेत, चट्टोपाध्याय वेतन श्रेणी बारा वर्षे, २४ वर्षे निवड वेतन श्रेणी पात्र शिक्षकांना लागू कराव्यात आदी मागण्या बैठकीत मांडण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन जिप सीईओ सुखदेव बनकर यांना देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फीवाढीबाबत खुलासा द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक :

सेंट लॉरेन्स शाळेकडून केल्या जात असलेल्या जादा फीवाढीला पालकांना सतत सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नी शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचच्या वतीने केलेल्या तक्रारीला आधार देत महापालिकेने शाळेकडून तात्काळ खुलासा मागितला आहे.

सेंट लॉरेन्स शाळेकडून दरवर्षी होत असलेली फी वाढ ही शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी नेहमीच डोकेदुखीची बाब ठरली आहे. त्याविरोधात अनेकदा आवाज उठवूनदेखील शाळा फीवाढ थांबवित नाही. वारंवार हे प्रकार घडत असल्याने पालकांनी आंदोलनेही केली आहेत. तरीदेखील या प्रकरणास सर्वमान्य तोडगा निघत नसल्याने शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचच्या वतीने महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडे फीवाढीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

या तक्रारीची दखल घेत महापालिका शिक्षण विभागाने शाळेकडून खुलासा मागितला आहे. यापूर्वीही या प्रकारचा खुलासा मागवण्यात आला असून शाळा प्रशासनाने मात्र याबाबतीत गांभीर्य दाखविले नसल्याचे समोर आले होते. मागील दहा वर्षात दरवर्षी फीमध्ये सरासरी वीस टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मात्र, देणगी विरोधी कायद्यानुसार एकदा फीवाढ केल्यानंतर किमान तीन वर्ष फी वाढ करता येत नाही. असे असले तरी शाळा या नियमांचे सर्रास उल्लंघन करत आहे. यावर ठोस भूमिका घेण्याच्या उद्देशाने पत्राद्वारे खुलासा मागवण्यात आला आहे. या वर्षात शाळेने जी फी वाढ केली आहे ती तात्काळ रद्द करावी व वाढीव फी घेतली असल्यास ती विद्यार्थ्यांना परत करावी आदी मुद्यांचा यांत समावेश करण्यात आला आहे.

देणगी विरोधी कायद्यानुसार दरवर्षी फी वाढ करणे नियमाबाहेर असतांना शाळेकडून फीवाढ केली जात असल्याचे समोर येत आहे. शाळेने केलेली ही फीवाढ रद्द करावी व विद्यार्थ्यांकडून जादा फी घेतली आहे, ती परत करावी, अशी आमची मागणी आहे.

- मिलिंद वाघ, शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच

शाळेला रितसर सूचना देऊन पत्र पाठवण्यात आले आहे. शाळेने लवकर यासंबंधी खुलासा देणे अपेक्षित असून विद्यार्थ्यांना या प्रकरणात कोणतीही अडचण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आम्ही कळविले आहे.

- उमेश डोंगरे, प्रशासनाधिकारी, मनपा शिक्षण मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुठभर विद्यार्थी; ढीगभर कर्मचारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्पर्धा परीक्षांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचे चित्र असताना रविवारच्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेने मात्र अनोखा साक्षात्कार परीक्षा यंत्रणेस घडविला. परप्रांतातून आलेल्या अवघ्या ८४ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. तर तब्बल २२०० उमेदवारांनी या परीक्षेकडे पाठ फिरवली. परिणामी मुठभर उमेदवारांसाठी संपूर्ण परीक्षा यंत्रणाच वेठीला धरली गेली.

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वतीने भरण्यात येणाऱ्या क्लास ३ आणि क्लास ४ च्या पदांसाठी रविवारी नाशिकमध्ये परीक्षा झाली. यासाठी शहरात परीक्षा केंद्रांचेही नियोजन करण्यात आले. दिवसभरात दोन टप्प्यात ही परीक्षा झाली. या दोन्ही सत्रातील चित्र सारखेच होते. परीक्षेसाठी उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या राज्यांमधून सुमारे २२०४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात परीक्षेसाठी मात्र अवघे ८४ उमेदवार उपस्थित राहिले. तब्बल २२२० उमेदवारांनी या परीक्षेला दांडी मारल्याने अनेक वर्ग ओस पडल्याचे तर काही ठिकाणी वर्गातील एकमेव परीक्षार्थीवर दोन दोन परीक्षकांना नजर ठेवावी लागल्याचे चित्र होते.

नाशिकच्या केंद्रामुळे फरफट?

परीक्षेसाठीची पदे ही क्लास ३ आणि क्लास ४ या वर्गाची होती. या परीक्षेसाठी येणारे उमेदवारही परराज्यातून येणार होते. मग परराज्यातील उमेदवारांना नाशिकचे केंद्र परीक्षेला देण्यात आल्यानेच उमेदवारांनी पाठ फिरविली असल्याची शक्यता काही परीक्षकांनी व्यक्त केली. सर्वच उमेदवार परराज्यातील असताना त्यांना ‌नाशिकचे दूरचे केंद्र का

देण्यात आले ? हा सवालही

रविवारी चर्चेत राहिला. कनिष्ठ पदांसाठीच्या परीक्षा स्थानिक ठिकाणी असल्यास त्यास मिळणारा प्रतिसादही चांगला मिळत असल्याचा अनुभव प्रशासनाच्या गाठीशी असताना परराज्यातील उमेदवारांसाठी नाशिकच्या केंद्राचे प्रयोजन काय, हा सवाल अनुत्तरीतच राहिला. वरिष्ठांच्या सूचनांकडे निर्देश दाखवित याबाबत जिल्हा प्रशासनही खुलासा करू शकले नाही.

व्यर्थ राबली यंत्रणा!

सिंहस्थातील पर्वणी तोंडावर येऊन ठेपल्याने आता प्रशासनाची तारेवरची कसरत सुरू आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेतली जाते. यंदा मात्र बराचसा स्टाफ हा सिंहस्थाच्या तयारीत असल्याने समाज कल्याणसह विविध शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना या परीक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. यासाठी परीक्षकांसह केंद्र संयोजक आणि शिपाईपदांच्या बरोबरीला बंदोबस्तासाठी पोलिसही नेमण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात अवघ्या ५० पेक्षा अधिक उमेदवारांसाठी इतकी मोठी यंत्रणा दिवसभर वेठीला धरल्याचे चित्र होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावंत बंधू बीजिंगवर उमटवणार ठसा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकचे सुप्रसिध्द आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार राजेश सावंत व प्रफुल्ल सावंत यांना या वर्षात चीन सरकारकडून चौथ्यांदा विशेष आमंत्रण प्राप्त झाले आहे. बीजिंग जवळील कैफंग आर्ट म्यूझियम चायना व रिइंटरपीटेशनचे सुप्रसिध्द क्युरेटर काँग लोह यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २० जुलै ते ५ ऑगस्ट या दरम्यान भरविण्यात येणाऱ्या चित्रप्रदर्शनात सावंत बंधूंचा समावेश राहणार आहे. जगातील प्रथितयश जेष्ठ चित्रकारांमध्ये सावंत बंधू हे सर्वांत कमी वयाचे चित्रकार बीजिंगमध्ये दिमाखात तिरंगा फडकविणार आहेत.

कैफंग इंटरनॅशनल इन्‍व्हीटेशनल वॉटर कलर एक्झिबिशन ऑफ चायना या आंतरराष्ट्रीय चित्रप्रदर्शनाच्या निवड समितीने २८ देशातील ३० चित्रकारांची जागतिक पातळीवरील आजपर्यंतच्या कलात्मक भरीव योगदान, दर्जा व सृजनशील स्वनिर्मित चित्रशैली इ. निकषांच्या आधारे निवड केली. त्यात भारतातून नाशिकच्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार राजेश सावंत व चित्रकार प्रफुल्ल सावंत यांची निवड करण्यात आली आहे.

आयोजकांकडून सहा दिवसीय इंटरनॅशनल मास्टर कोर्सचे आयोजन हे या प्रदर्शनाचे प्रमुख वैशिष्ट्ये आहे. कैफंग आर्ट म्यूझियम, हुनान आर्ट युनिव्हर्सिटी, चायना तसेच जगप्रसिध्द चायनीज वॉटरकलर मॅगझीन यांच्या विद्यमाने आयोजित या इंटरनॅशनल वॉटर कलर मास्टर कोर्ससाठी पाच चित्रकारांना मार्गदर्शक आर्ट कोच म्हणून सन्मानित केले आहे. या पाच चित्रकारात प्रफुल्ल सावंत यांचा समावेश आहे. या युनिव्हर्सिटीत कलेचे शिक्षण घेणारे पोस्ट ग्रॅज्युएट व जलरंग माध्यमात पी. एच. डी. करणाऱ्या निवडक होतकरू कला विद्यार्थ्यांना चित्रकार सावंत निसर्ग चित्रणासह जलरंगाची विविध वैशिष्ट्ये, गुणधर्म, शास्त्रीय बैठक शिकविणार आहेत.

सहा चित्रे झळकणार

या जागतिक चित्रप्रदर्शनात २० जुलै ते ५ ऑगस्ट या काळात दोघा सावंत बंधूंचे प्रत्येकी तीन असे एकूण सहा जलरंग माध्यमातील चित्रे झळकणार आहेत. राजेश सावंत यांचे जर्नी, आफ्टर सायकलिंग, वॉटर टाऊन तर चित्रकार प्रफुल्ल सावंत यांचे तारकेश्वर मंदिर, गंगाघाट, गोमुख टेम्पल अॅट राजस्थान या चित्रांचा समावेश आहे. सावंत बंधूंची सर्व चित्रे चायनीज कलारसिकांचे मने जिंकण्यास सज्ज झाली असून, जागतिक पातळीवर आपल्या भारताचे चीनमध्ये प्रतिनिधीत्व करून ठसा उमटविणारी ठरणार आहेत. येत्या १७ जुलै, रोजी चित्रकार सावंत बंधू चीनसाठी रवाना होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्वजारोहणानिमित्त आज शोभायात्रा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण मंगळवारी (दि. १४) होणार असले तरी त्यानिमित्त सोमवारी दुपारी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. चित्ररथ, ढोल, लेझीम आणि बॅन्ड पथक या शोभायात्रेचे आकर्षण असतील.

दुपारी तीनला काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथून शोभायात्रेला सुरुवात होईल. आखाडा परिषदेचे महंत ग्यानदास यांच्यासह निर्मोही, निर्वाणी, दिगंबर, अनी आखाड्यांमधील साधुमहंत, अनेक धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी यांसह विविध संस्था चित्ररथांसह या शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. श्री गंगा गोदावरी मंदीर पंचकोठी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी पाच हजार पाचशे एक किलो मोतीचूर लाडूच्या प्रसादाचे भाविकांना वाटप करण्यात येणार आहे. ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात गणपतीपूजन व पुण्यहवनाने पहाटे चारला ध्वजारोहण सोहळ्याला सुरुवात होईल. सकाळी ठीक सहा वाजून १६ मिनिटांनी ध्वजारोहण होणार आहे.

शोभायात्रेचा मार्ग

काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथून दुपारी तीनला या शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. ही यात्रा नागचौक, जुना आडगाव नाका, धुमाळ पॉईंट, भगवंतराव मिठाई, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्ड वरील रामतीर्थावर श्री गंगा गोदावरीची महाआरती होऊन या शोभायात्रेची सांगता होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्यानदास महाराज स्वयंघोषित अध्यक्ष

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

आखाड्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी श्री महंत असावे लागते. जेथे महंत ग्यानदास हे निवार्णी, अनी आखाड्याचे श्रीमहंत नाही तर ते अध्यक्ष कसे? असा प्रश्न अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत नरेंद्रगिरी महाराज यांनी उपस्थित केला आहे. सरकारने नाशिक येथील साधुग्राममधील जमीन वाटप करताना ती तेथील तीन वैष्णव आखाड्यांना दिली पाहिजे, त्यामध्ये ग्यानदास महाराजांना सर्वाधिकार देण्याची काहीही आवश्यकता नाही, असे येथे पत्रकार परिषद सांगितले.

त्र्यंबक आणि नाशिक असा दोन ठिकाणी कुंभमेळा होत असल्याचा फायदा ग्यानदास यांनी घेतला आहे. सरकार व प्रसिध्दीमाध्यमांनी याबाबत दखल घेऊन त्यांना अध्यक्ष म्हणण्याची आवश्यकता नाही, असे नरेंद्रगिरी महाराज यांनी बजावले. स्वामी सागरानंद महाराज यांच्या आश्रमात सर्व आखाड्यांच्या साधूंची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी झाली. त्र्यंबक येथे २३ मे २०१५ रोजी आखाडा परिषदेची बैठक झाली. त्यामध्ये बडा उदासीन आखाड्याचे महंत प्रेमानंद महाराज यांनी ठराव मांडला होता, तो येथे काल जुना आखाड्याचे उपाध्यक्ष महंत प्रेमगिरी महाराज यांनी वाचून दाखविला. त्यानुसार १४ मार्च २०१५ रोजी निवड होऊन श्रीमहंत नरेंद्रगिरी महाराज यांना अध्यक्ष व हरिगिरी महाराज हे महामंत्री असतील असे घोषीत करण्यात आले आहे. याबाबत प्रशासनास कळविण्यात आले असून, प्रशासनाने ग्यानदास यांना अध्यक्ष म्हणून बोर्ड लावण्यास मनाई करावी, अशी मागणी करीत त्यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव संमत करण्यात आला.

ग्यानदासांना सवाल

ग्यानदास महाराज स्वतःला अध्यक्ष म्हणतात तर, त्यांनी तेरा आखाड्यांची एखादी बैठक नाशिक येथे का घेतली नाही?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबक येथे साधू-महंत व प्रशासन अधिकाऱ्यांच्या सभेत आपणास अध्यक्ष म्हणून संबोधले होते, याचा प्रशासनातील अधिकाऱ्यांना विसर पडला आहे का?

महंत ग्यानदास हे निवार्णी, अनी आखाड्याचे श्रीमहंत नाही तर ते अध्यक्ष कसे?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images