Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

ग्यानदासांना आता नको लढाई!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या वादाबाबत हायकोर्टाने निर्णय दिला आहे. आता, त्याबाबत वेगळे उत्तर देण्याची गरज नाही. विशेषतः त्र्यंबकेश्वरमधील आखाड्याकडून होणाऱ्या आवाहनानंतर तर मुळीच नाही, असे उत्तर महंत ग्यानदास महाराज यांनी दिले. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे नियोजित अध्यक्ष तसेच निरंजनी आखाड्याचे महंत नरेंद्रगिरी महाराज यांनी अध्यक्षपदाच्या वादावरून महंत ग्यानदास यांना लक्ष्य केले. याबाबत विचारणा केली असता ग्यानदास महाराज यांनी, कोर्टाच्या आदेशानंतर त्यावर टिप्पणी करणे उचित नसल्याचे स्पष्ट केले. हमको अब लढाई नही चाहिए, असे सांगत महंत ग्यानदास यांनी एक पाऊल मागे टाकले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चेन स्नॅचर्सची इराणी टोळी जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुणे, नाशिकव ठाणे जिल्ह्यात चेन स्नॅचिंग करून जेरीस आणणाऱ्या इराणी टोळीला अंबड पोलिसांनी कामटवाडे परिसरातील माऊली लॉन्सजवळ अटक केली आहे. नाशिकमधील दोन गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली असून, पाच तोळे सोने हस्तगत केले आहे. ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी दिली.

हैदर अक्रम जाफरी, अनी अब्बास व काजी सय्यद अशी चेन स्नॅचर्सची नावे असून, ते कल्याणजवळील आंबिवली परिसरात राहणारे आहेत. त्यांच्याकडून एक मोटरसायकलही जप्त केली आहे. अत्यंत नियोजनबध्दरित्या या टोळ्या एकाचवेळी शहरातील विविध भागात चेन स्नॅचिंग करीत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. आंबिवलीहून मोटरसायकलींवर नाशिक, पुणे शहरामध्ये जायचे आणि चेन स्नॅचिंग करून पुन्हा आंबिवलीला परतायचे.

चोरी करताच बदलायचे कपडे

शहरात सकाळच्या सुमारास ही टोळी दाखल व्हायची. घरासमोर झाडू मारणाऱ्या, मॉर्निंग वॉक करणाऱ्या, कामानिमित्त घराबाहेर पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवर येऊन खेचून नेण्यात या आरोपींचा हातखंडा होता. पकडले जाऊ नये म्हणून ते चेन स्नॅचिंग केल्यानंतर लगेचच अंगावरील कपडे बदलत असत, अशी माहितीही पुढे आली आहे.

चेन स्नॅचिंगच्या घटना रोखणे हे मोठे आव्हान होते. ही टोळी अत्यंत चाणाक्ष असून, त्यांनी अद्याप चोरीचे सोने कुणाला विकतात याची माहिती दिलेली नाही. पुणे, नाशिक आणि ठाणे ही त्यांची चोरी करण्याची ठिकाणे होती. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतील अशी आम्हाला खात्री आहे.

- दिनेश बर्डेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अंबड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुंड्यासाठी विवाहितेचा खून

$
0
0

नाशिक : हुंड्याची रक्कम कमी दिली म्हणून विवाहितेचा ओढणीने गळा आवळून खून करण्यात आला. मखमलाबाद परिसरात ही घटना घडली असून, तिचा पती पसार झाला आहे. सीमा सर्जेराव उन्हाळे (वय २५) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचे वडील सकाळी घरी आले तेव्हा ही घटना उघडकीस आली. वडजाईनगर येथे सर्जेराव पत्नी सीमासह राहातो. लग्नात अपेक्षित हुंडा दिला नाही म्हणून तो सीमाचा शारी‌रिक व मानसिक छळ करीत असे. रविवारी मध्यरात्री तो दारू पिऊन त्याने हुंड्याच्या कारणावरून सीमाशी वाद घातला. त्यानंतर गळा आवळून तिचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनांना आता ‘नो एन्ट्री’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सातत्याच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांसाठी डोकेदुखी ठरणारा इंदिरानगर अंडरपास वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे. त्यामुळे या अंडरपासखालून केवळ पादचाऱ्यांनाच यापुढे प्रवेश असणार आहे.

इंदिरानगर अंडरपास (राजमाता उड्डाणपूल) येथे वाहतुकीची सातत्याने कोंडी होत असल्याने नागरिकांची आणि पोलिसांचीही डोकेदुखी वाढली होती. येथील वाहतुकीचा प्रश्न बिकट झाल्याने वाहतूक विभागाने या उड्डाणपुलाखालून ये-जा करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मज्जाव केला आहे. गोविंदनगरकडून इंदिरानगरकडे या उड्डाणपुलाखालून जाणाऱ्या सर्व वाहनांना आता मुंबई नाक्याच्या दिशेने वळून उड्डाणपुलाखालील पीलर कम्रांक १७१ जवळून उजवीकडे वळून इंदिरानगर, पाथर्डी फाटा, मुंबईकडे जाता येणार आहे. मुंबईकडून येणाऱ्या वाहनांनाही या उड्डाणपुलाखालून जाण्यास बंदी असणार आहे. या वाहनांनाही मुंबई नाक्याच्या दिशेने पुढे जाऊन उड्डाणपुलाखालील पीलर क्र. १७१ जवळून उजवीकडे वळून इंदिरानगरकडे जाता येणार आहे. इंदिरानगर आणि मुंबई नाक्याकडून गोविंदनगरकडे जाणाऱ्या वाहनांनाही या अंडरपासचा उपयोग करता येणार नाही. त्यांनाही अंडरपासपासून पुढे जाऊन लेखानगर येथील पुलाखालून यूटर्न घेऊन गोविंदनगर, तिडके कॉलनी, मुंबई नाक्याकडे जाता येईल. मुंबईनाका ते लेखानगर आणि लेखानगर ते मुंबई नाका हे दोन्ही सर्व्हिसरोड एकेरी वाहतुकीसाठी खुले असणार आहेत.

इंदिरानगर अंडरपास हा रस्ता यापुढे केवळ पादचाऱ्यांनाच वापरता येणार आहे. रविवारपासून हा बदल करण्यात आला असून, वाहनधारकांनी त्याची नोंद घ्यावी, असे आवाहन पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी केले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम ११९/१७७ तसेच मोटार वाहन नियम क्र. १५ (२) (१०) नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर ग्यानदास महाराजांची ‘शांती’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पालकमंत्री गिरीश महाजनांची शिष्टाई, पुरोहित संघाचे आरोपांचे स्पष्टीकरण आणि प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार सर्व 'गिलेशिकवे' दूर झाल्याचे सांगत आपण कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत समाधानी असल्याचे आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे साधुग्राममधील जागांबाबत सकाळीच त्यांनी प्रशासनावर आगपाखड केली होती.

पुरोहित संघाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाशी साधुमहंतांचा कोणताही संबंध नसल्याचे ग्यानदास महाराजांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. एवढेच नव्हे तर रामकुंडावरील वस्त्रातंरगृह पाडण्याची आग्रही मागणी त्यांनी केली. यानंतर, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महाराज आता वस्त्रातंरगृह पाडण्याची मागणी करीत नसल्याचे जाहीर करून टाकले होते. यावरून महाराजांचा पारा चढला. त्यामुळे पालकमंत्री महाजन यांनी आज, रविवारी सकाळी महाराजाची भेट घेऊन समजूत काढली. साधुग्राममधील जागांबाबत योग्य ते नियोजन करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. प्रशासनाचे काम सुरळीत चालू असून, आपण समाधानी असल्याचे महाराजांनी स्पष्ट केले.

महाराज पुरोहित संघासोबत

पुरोहित संघाचे काम वेगळे असल्याची भूमिका घेणाऱ्या ग्यानदास महाराजांनी आपण यापुढे पुरोहित संघासोबत असल्याचे जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण देण्यावरून महाराज आणि पुरोहित संघात मतभेद निर्माण झाले होते. पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी अचानक एक दिवस फोन करून नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी जायचे असल्याचे सांगितले. त्यावेळेस मी जाण्यास उपलब्ध नव्हतो. पुरोहित संघाने थेट जाण्याचा निरोप दिल्याने नाराजी होती. त्यातच संघाचे अध्यक्ष बाजुला राहण्याचा प्रयत्न करू लागले. नुकतेच शुक्ल यांनी त्यांच्याही बाजू सांगितली. त्यामुळे गैरसमज दूर झाले असून, ध्वजारोहण मिरवणुकीच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी आपण हजर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, वस्त्रातंरगृह पाडण्यासाठी पालकमंत्री तसेच दोन्ही आमदारच आग्रही असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.

साध्वींना नकारघंटा

साध्वींना आंघोळीसाठी तसेच राहण्यासाठी वेगळी जागा देण्याची मागणी सर्वेश्वरी महादेव वैकुंठधाम मुक्तिद्वार अखाडा (परी)च्या पीठाधीश्वर त्रिकाल भवंता यांनी केली आहे. मात्र, त्यांना साधुग्राममध्ये वेगळी जागा देणे शक्य नसल्याचे ग्यानदास महाराजांनी सांगितले. साध्वींना साधुग्राममध्ये जागा दिल्यास साधुमहंत ते सहन करणार नाहीत, असेही महाराजांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदगावात कापूस, मका लागले करपू

$
0
0

मनमाड : नांदगाव तालुक्यात जवळपास १०० टक्के पेरण्या झाल्या आहेत. परंतु, आता जर पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीला सामोरे जावे लागणार आहे. मका, कापूस, बाजरी या पिकांना नुकसान पोहोचण्याची शक्यता आहे.

पाऊस येईपर्यंत पिकाना संरक्षित पाणी द्यावे, ठिबक सिंचन, तुषार सिंचनाचा वापर करावा, असे आवाहन कृषी अधिकारी अशोक कुळधर यांनी केले आहे. साखळी बंधाऱ्याचा वापर करावा, असे ही शेतकरी वर्गास सुचवले जात असून, पाऊस येईपर्यंत विरळणी, कोळपणी, पिकास मातीची भर, सोयाबीन, मूग, उडिद यासाठी उथळ सऱ्या आदी पर्याय सांगितले जात आहेत. मात्र, येत्या दोन चार दिवसात पाऊस पडला नाही तर सर्व उपायांवर पाणी फिरणार आहे. तसेच जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्याचीही टंचाई जाणवणार आहे.

पेरण्या समाधानकारक आहेत. परंतु, पाऊस नसल्याने स्थिती गंभीर आहे. पिके कोमजू लागल्याने शेतकरी वर्ग संकटात आहे. अशा स्थितीत कृषी सहाय्यक आणि तालुका कृषी विभागातर्फे कृषी सप्ताहाद्वारे जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. गावागावात मार्गदर्शन मोहीम, जागरूकता मोहीम राबविण्यात येत आहे.

- अशोक कुळधर, कृषी अधिकारी, नांदगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात पावसाच्या पुनरागमनाचे वेध

$
0
0

मालेगाव : जुलै महिना निम्मा संपत आला तरी देखील मालेगाव तालुक्यात पावसाच्या पुनरागमनाचे कुठलेही चिन्ह दिसत नाही. यामुळे शेतकरी चांगलाच चिंतातूर झाला असून, कृषी विभागाच्या अंदाजानुसार १५ ते ३१ जुलै या कालावधीत पावसाचे आगमन न झाल्यास शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट वाढू शकते. त्यामुळे आता शेतकऱ्यांसह सगळ्यांच्याच नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

मालेगाव तालुक्यात २१ जूनअखेर पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे आटोपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तालुक्यातील सुमारे ८० हजार ८७५ हेक्टर लागवडी योग्य क्षेत्रापैकी ७२ हजार ४९८ हेक्टरवर वेगवेगळ्या पिकांची अशी ९० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र, गेल्या २० दिवसांपासून पावसाने चांगलीच दडी मारली असल्याने शेतकरी निराश झाला आहे. यंदा सर्वाधिक क्षेत्र मका, बाजरी व कापूस या पिकांचे असून १५ ते ३१ जुलै अखेर या पिकांचे १० ते १५ टक्के मोड अपेक्षित आहे. मात्र, पाऊस लांबणीवर गेल्यास या पिकांचे सर्वाधिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

तालुक्यात जुलैच्या आज अखेर केवळ १५४ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. यात जून आणि जुलैचा पंधरवडा मात्र कोरडाच गेला आहे. सरासरीच्या केवळ ३२ टक्के इतकाच पाऊस आजवर झाला आहे. जुलै महिन्यात तालुक्यात १०२ मि.मी. पर्यंत पावसाची सरासरी अपेक्षित असते, मात्र यंदा या महिनाच्या १५ दिवसात एक मि.मी. पावसाची देखील नोंद झालेली नाही.़

तालुक्यात जूनच्या प्रारंभीच पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे वेगाने केली. आज सुमारे ९० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र, पावसाने अचानक दडी मारल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे ही वस्तुस्थिती आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना उपलब्ध असलेल्या पाण्याचा योग्य वापर कसा करता येईल यासंबंधी मार्गदर्शन केले जात आहे. तसेच, हवामान खात्याच्या अंदाजानुसार १५ ते ३१ जुलै दरम्यान पाऊस अपेक्षित आहे.

- गोकुळ आहिरे, तालुका कृषी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमध्ये खोळंबल्या लावण्या

$
0
0

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर तालुक्यात तीन आठवड्यापासून पावसाने हुलकावणी दिली असून, या हंगामात अवघा २२९ मि. मी. पाऊस झाला आहे. हंगामाच्या सुरुवातीस पावसाने जोर धरल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या आहेत. तालुक्यात सुमारे २७०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, त्यापैकी चार टक्के पुर्नलागवड झाली आहे. पाण्याच्या काठाने जमीन असेल त्यांनी पाणी भरून लावण्या केल्या आहेत. जवळापास ९६ टक्के लावण्या पावसाच्या प्रतीक्षेत खोळंबल्या आहेत.

कडधान्य आणि गळीत धान्य यांच्या पेरण्या आटोपल्या आहेत. यामध्ये उडीद, मूग, तूर, भुईमूग यांचा प्रामुख्याने समावेश आहे. नागली, वरई आणि भात यांच्या पुर्नलागवडीकरिता पाऊस अत्यावश्यक आहे. रोपांची उंची वाढत चालली आहे तर, काही ठिकाणी रोप करपण्यास सुरुवात झाली आहे.

त्र्यंबकेश्वर तालुका कृषी कार्यालयाने पीक विमा भरण्याचे आवाहन केले असून, राष्ट्रीय कृषी विमा योजना तालुक्यात लागू आहे. दि. ३१ जुलै २०१५ पर्यंत नजीकच्या बँक शाखेत अथवा कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

पेरणी झालेली रोपे पावसाअभावी पुर्नलागवडीमुळे खोळंबली आहेत. यामध्ये भात नागली आणि वरई यांचा समावेश आहे. आणखी काही दिवस पाऊस झाला नाही तर दुबार पेरण्या कराव्या लागतील. त्याकरिता वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठविला आहे.

- अजय सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुबार पेरणीचे संकट गडद

$
0
0

टीम मटा :

जून महिन्यात मृग नक्षत्राने दमदार हजेरी लावल्यानंतर आद्रा नक्षत्राने पेरणीसाठी हात दिला. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. मका, बाजरी, कापूस, कडधान्य, भात, फळपिकांना पावसाची नितांत गरज आहे. येत्या दोन-चार दिवसात वरुणराजा प्रसन्न झाला नाही तर दुबार पेरणीचे संकट अटळ आहे.

चांदवडमध्ये कोमेजली पिके

मनमाड : पावसाने ओढ दिल्यामुळे चांदवड तालुक्यात पिके कोमजली आहेत. पावसाळा सुरू होऊन तब्बल महिना दीड महिना उलटून गेला तरी आजपर्यंत केवळ ५६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. कोरडे हवामान, पाणीटंचाई आणि पिकांवर पावसाअभावी पडणारे विविध रोग यांचा मोठा फटका पिकांना बसत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

कांदा, डाळिंब, टोमॅटोसह बाजरीलाही पाऊस नसल्याने फटका बसला आहे. पिकांची अवस्था बिकट आहे. रोपे, पिकांनी माना टाकल्या आहेत. चार पाच दिवसात पाऊस पडला नाहीतर पिके पार गळून जाण्याची भीती आहे. अशा स्थितीत पिके तगून रहावीत यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या ५६ टक्के पेरण्या झाल्या, त्यात बाजरी, मका, सोयाबीन, भुईमूग, मूग, टोमॅटो, तूर या पिकांचा समावेश आहे.

चांदवड तालुक्यात पाऊस नसल्याने कांद्याचे पार वांदे झाले आहेत. कांद्याची रोपे टाकूनही लागवड करण्यात अडचणी असल्याची स्थिती आहे. डाळिंबावर तेल्याचा प्रभाव आहे. टोमॅटो पिकांना पांढरी माशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. जमीन कोरडी पडत असल्याने पिंकांची स्थिती वाईट आहे.

स्ट्रिंकलरचा वापर

पाऊस पडत नसल्याने पिके वाच‌विण्यासाठी दीघवद येथील तुकाराम शेळके या शेतकऱ्याने सोयाबीन पिकासाठी स्ट्रिंकलरचा वापर केला आहे. प्राप्त परिस्थितीवर मात करण्याचा तसेच पिकांना जीवदान देण्याबरोबरच पीक उत्पादन घेण्याचा प्रयोग केला आहे.

चांदवड तालुक्यात पिकांची स्थिती वाईट आहे. जवळपास निम्या पेरण्या झाल्या आहेत. पाऊस न आल्यास बहुतांश पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. बाजरीला पाण्याची खूप गरज आहे. प्रशासन विविध उपाय योजित आहे. स्ट्रिंकलरचा प्रयोग यशस्वी झाला आहे. ठिबक सिंचनाचा काही ठिकाणी वापर होत आहे. फळबागांना मालचिंग केले जात आहे.

- अभिजीत घुमरे, कृषी अधिकारी चांदवड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सॅमसोनाइट कंपनी साकारणार वनराई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

गोंदे एमआयडीसीतील सॅमसोनाइट साऊथ एशिया प्रा. लिमिटेड कंपनी इगतपुरी तालुक्यातील खंबाळे गावात वनराई साकारणार आहे. यात वनविभागाच्या जागेवर तब्बल ५५ हजार ५०० वृक्षांची लागवड केली जाणार आहे, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापक यशवंत सिंग यांनी दिली आहे.

सॅमसोनाइट कंपनीने १५ वर्षांपासून सामाजिक बांधिलकीतून अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहे. इगतपुरी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांना शौचालय बांधून देण्यात आले आहेत. कंपनीच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे. आता खंबाळे गावातील वनविभागाच्या १२५ एकर जागेवर सॅमसोनाइट औद्योगिक प्रतिष्ठान, तैनवाला फाऊंडेशन व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ५५ हजार ५०० वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. सात वर्ष सॅमसोनाइट कंपनी वृक्षांचे संवर्धन करणार असून त्यांनतर वनविभागाकडे सुपूर्त करणार असल्याचे व्यवस्थापक सिंग यांनी सांगितले. कंपनीचे सीईओ रमेश तैनवाला यांच्या संकल्पेतून साकरण्यात येत असलेल्या 'खंबाळे वनराई' या उपक्रमात विविध सामाजिक संघटना, शाळा, कॉलेज व कंपनीतील कामगार वृक्षारोपणासाठी पुढाकार घेत असून दहा हजार झाडे लावली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंदिरानगरवासियांसाठी अंडरपास खुला

$
0
0



ना‌शिक : वाहतूक पोलिसांनी इं‌दिरानगर अंडरपास येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी केलेली उपाययोजना ध्वजारोहन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर तात्पुरती करण्यात आल्याचा दावा आमदार देवयानी फरांदे यांनी सोमवारी केला. पोलिसांनी अंडरपास वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करून केवळ पादचाऱ्यांसाठीच तो खुला असल्याचे निवेदन रविवारी प्रसिध्दीस दिले होते.

इंदिरानगरकडून गोविंदनगरकडे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना लेखानगर येथून सुमारे दोन ते अडीच किलोमीटरचा वळसा घालून यावे लागत असल्याने नागरिकांनी या बदलाला विरोध दर्शविला आहे. याबाबत वाहनधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर फरांदे यांनी पत्रकार परिषद घेतली. येथील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी खडकपूरच्या आयआयटीतील काही तज्ज्ञांची मदत घेण्यात येत आहे. त्यांनी काही तात्कालिक तर काही कायमस्वरुपी उपाययोजना सूचविल्या आहेत. कायमस्वरुपी उपाययोजनांना वेळ लागणार असला तरी तात्पुरत्या उपायोजना करण्यात येत आहेत. यू-टर्नचा पर्याय हा त्याचाच भाग आहे. मात्र, त्याची पोलिसांनी चुकीच्या पध्दतीने अमंलबजावणी केली आहे. केवळ गोविंदनगरकडून येणाऱ्या वाहनधारकांना अंडरपासमधून प्रवेश नसेल. त्यांना १७१ क्रमांकाच्या पिलरखालून वळसा घालून जावे लागणार आहे. तर इंदिरानगरहून येणाऱ्या वाहनधारकांना मंगळवारी (दि. १४) सकाळी दहापासून पुन्हा अंडरपासमधून प्रवेश देण्यात येणार असल्याचे फरांदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व्हिस रोडवर वाहतुकीचा फज्जा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंदिरानगर अंडरपासजवळील सर्व्हिसरोड पोलिसांनी एकेरी मार्ग म्हणून जाहीर करूनही वाहनधारक जीव धोक्यात घालून दोन्ही बाजूने ये-जा करीत असल्याचे सोमवारी दिसून आले. लेखानगर ते गोविंदनगरपर्यंतचा दोन अडीच किलोमीटरचा वळसा टाळण्यासाठी वाहनधारकांकडून शॉर्टकटचा अवलंब केला जात असला तरी यातून अपघातांची शक्यता बळावली आहे.

इंदिरानगर अंडरपास येथे सातत्याने वाहतुकीची कोंडी होते. या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी वाहनचालकांना अनेकदा अर्ध्या तासाहूनही अधिक वेळ घालवावा लागतो. येथील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील बनल्याने वाहतूक विभागानेही तेथे तात्पुरत्या उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार अंडरपास खालून वाहनांना ये-जा करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यासाठी अंडरपासच्या दोन्ही बाजूस बॅरिकेटींग करण्यात आले असून तेथे वाहतुक पोलिसांना कर्तव्यावर ठेवण्यात आले आहे. गोविंदनगर, इंदिरानगर, पाथर्डी फाटा आणि द्वारकेकडून येणाऱ्या वाहनांना पीलर क्रमांक १७१ आणि लेखानगर चौकातून पर्यायी मार्गही देण्यात आले आहेत. मुंबईनाका ते लेखानगर आणि लेखानगर ते मुंबई नाका हे दोन्ही सर्व्हिसरोड एकेरी वाहतुकीसाठी खुले असणार असल्याचे पोलिसांनी रविवारी (दि. १२) कळविले. त्यानुसार सोमवारपासून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.

पोलिसांच्या आवाहन धुडकावले

अंडरपास ते लेखानगर या एक ते दीड किलोमीटरच्या अंतराला वळसा घालून पुन्हा तेवढेच अंतर कापून यावे लागत असल्याने हा बदल नागरिकांना गैरसोयीचा वाटतो आहे. म्हणूनच वाहनधारकांनी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याऐवजी सर्व्हिस रोडवरूनच दोन्ही बाजूने वाहने दामटविण्यास सुरुवात केली आहे. इंदिरानगरकडून मुंबईनाक्याकडे व पुढे शहरातील अन्य भागात जाणारे वाहनचालक सर्रास एकेरी मार्गावर विरुध्द दिशेने वाहने चालविताना आढळून आले.

विरूद्ध दिशेने वाहतूक

अंडरपासजवळ वाहतूक पोलिस असले तरी सर्व्हिसरोडवरील बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणे त्यांना शक्य होत नाही. म्हणूनच विरूध्द दिशेने वाहने चालवून इतरांचाही धोक्यात घालण्यापर्यंत वाहनचालकांची मजल गेली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सर्व्हिसरोडवरही वाहतूक पोलिसांची नेमणूक होणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीची फेरपरीक्षा उद्यापासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या फेरपरीक्षांची निर्णय प्रत्यक्षात आला आहे. उद्या (१५ जुलै) प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा घेण्यात येणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील १२ हजार ७४१ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

नापास झालेल्यांना पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेपर्यंत थांबावे लागत असे. या प्रक्रियेत संपूर्ण एक वर्षाचा कालावधी जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरणही होते. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये या उद्देशाने त्यांची जुलै महिन्यातच फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली होता. त्यानुसार या परीक्षांची तयारी करण्यात आली असून, बुधवारपासून प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षा २१ जुलै ते ५ ऑगस्ट यादरम्यान होणार आहे.

सलग पेपर या कालावधीत घेतले जाणार आहेत. या परीक्षांसाठी २१ केंद्राची व्यवस्था करण्यात आली असून, २१ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचा कॉलेजप्रवेशही सप्टेंबर महिन्यापर्यंत करावयाचा असल्याने ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत या परीक्षांचे निकाल लागण्याची शक्यता नाशिक विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैशांसाठी अडविला निकाल

$
0
0

जितेंद्र तरटे, नाशिक

कानपूर आयआयटीने यंदा नवाच पॉवर प्ले वापरत इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांकडून निकालासाठी पाचशे रुपयांची अतिरिक्त शुल्कवसुली मोहीम उघडली आहे. या आडमुठ्या धोरणांमुळे राज्यातील एमटेक आणि एमईच्या हजारो विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर टांगती तलवार आहे.

एकदा भरलेल्या कुठल्याही परीक्षा शुल्कानंतर परीक्षेचा निकाल हाती पडेपर्यंत नवे शुल्क भरावे लागत नाही. 'यूपीएससी'सारख्या भारतीय प्रशासकीय सेवेसाठी होणाऱ्या परीक्षाही याला अपवाद नाहीत. मात्र, कानपूर आयआयटीने यंदा नफेखोरीसाठी ही मनमानी केल्याची चर्चा 'गेट' परीक्षेच्या उमेदवारांमध्ये आहे. एमई आणि एमटेक या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी इंजिनीअरिंगचे हजारो विद्यार्थी दरवर्षी 'गेट' परीक्षेची तयारी करतात. यंदा कानपूर आयआयटीने ही परीक्षा घेतली. परीक्षेनंतर ठराविक टप्प्यात निकालही ऑनलाइन पध्दतीने जाहीर झाला. मात्र, जाहीर झालेला निकाल अवघ्या तीन दिवसांसाठी इंटरनेटवर दर्शविला गेला. त्यानंतर मात्र निकालाची लिंकच ओपन होत नसल्याने सैरभैर झालेल्या विद्यार्थ्यांना या मार्कशीट्ससाठी नव्याने पाचशे रुपयांचा डीडी कानपूर आयआयटीच्या नावाने पाठविण्याच्या सूचना मिळाल्या.

नव्या प्रवेशाच्या प्रक्रियेत अडसर नको म्हणून पाचशे रुपयांचा भुर्दंडही सोसण्यास इंजिनीअरिंगचे विद्यार्थी तयार आहेत. या स्थितीत मात्र एमई आणि एमटेकच्या प्रवेशांसाठी कॅप राऊंडही तोंडावर येऊन ठेपला आहे. डीटीईच्या (तंत्रशिक्षण संचलनालय) माध्यमातून होणाऱ्या पदव्युत्तर प्रवेशासांठी कानपूर आयआयटीच्या वतीने घेण्यात आलेल्या 'गेट' परीक्षेचे मार्कशीट असणे सक्तीचे

आहे. या परीक्षेत उमेदवाराचा झीरो स्कोअर नसल्याचा पुरावा म्हणून पुढील प्रवेशांसाठी या मार्कशीटला विशेष महत्त्व आहे. या टप्प्यावर कॅप राऊंड तोंडावर आहेत. मार्कशीट हाती असणे अत्यंत गरजेचे आहे. अन् कानपूर आयआयटीच्या आडमुठ्या धोरणांमुळे मार्कशीट विद्यार्थ्याला देण्यासाठी नव्याने पाचशे रुपयांचा डीडी काढण्याची अट आहे. या रितसर प्रक्रियेसाठी डीडी जमा करून विद्यार्थी सामील होत असले तरीही कॅप राऊंडचा मुहूर्तही हुकला आहे. या प्रकारे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचे प्रवेशच धोक्यात येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष धुमसत आहे.

उमेदवार सापडले कोंडीत

नाशिकमध्ये सुमारे १८ इंजिनीअरिंग कॉलेजेस आहेत. बहुतांश कॉलेजेसमध्ये प्रत्येक ट्रेण्डसचे सुमारे शंभरावर सीट्स यासाठी आहेत. पदवीनंतर पार पडणाऱ्या 'गेट' परीक्षेसाठी या विविध ट्रेण्ड्सच्या अंतिम वर्षातील हजारो विद्यार्थी प्रविष्ठ होतात. यासाठी नाशिकमध्ये एनडीएमव्हीपी आणि के. के. वाघ कॉलेज अशी दोन एआरसी (अॅप्लिकेशन रिसीव्हिंग सेंटर्स) सेंटर्स आहेत. 'गेट'चा निकाल जाहीर झाल्यानंतर नाशिकमधील विद्यार्थ्यांनी या निकालाचा स्क्रीन शॉटही घेतला होता. मात्र, डीटीईच्या प्रक्रियेत तो मान्य नाही. त्यासाठी प्रत्यक्षात निकालाचीच आवश्यकता आहे. एकीकडे कानपूर आयआयटीचे आडमुठे धोरण अन् दुसरीकडे डीटीईची तोंडावर आलेली प्रवेश प्रक्रिया यामुळे एमटेक आणि एमईच्या प्रवेशासाठी झटणारे उमेदवार कोंडीत सापडले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सह्याद्री’वरून आज थेट प्रसारण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वर व नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण कार्यक्रमाचे थेट प्रसारण मंगळवारी (दि. १४) पहाटे ४.५० मिनिटांपासून मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या वतीने जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक यांनी दूरदर्शनशी समन्वय साधून विविध वाहिन्यांसाठी मल्टीकॅमेरा सेटअपद्वारे लाईव्ह फिडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी मुंबई दूरदर्शनचे निर्माते जयू भाटकर व १२५ अधिकारी कर्मचाऱ्यांची टीम ओबी व्हॅनसह नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे दाखल झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रामकुंडावर आज वाहनांना प्रवेशबंद

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याची तुतारी मंगळवारी फुंकण्यात येणार असून खऱ्या अर्थाने धर्मध्वजा फडकणार आहे. ध्वजारोहणाच्या सुखसोहळ्याला गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून पोलिस प्रशासनाने रामकुंड आणि गोदाघाटावर भाविकांच्या वाहनांना प्रवेशबंद असल्याचे आदेश काढले आहे. मंगळवारी सकाळी सहा वाजून १६ मिनिटांनी गुरू सिंह राशीमध्ये प्रवेश करीत आहे. त्यामुळे या क्षणापासून खऱ्या अर्थाने सिंहस्थपर्वास प्रारंभ होणार आहे. सकाळच्या प्रहरी सहा वाजून १६ मिनिटांनी प्रमुख साधु महंत, पुरोहित, मंत्री आदींच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा सोहळा साजरा होणार आहे. या कार्यक्रमास भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पोलिस प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना अवलंबल्या आहेत. गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता असल्याने रामकुंड परिसरात वाहनांना प्रवेशबंद ठेवण्यात आला आहे. भाविक तसेच परिसरातील नागरिकांसाठी अन्य मार्गाचा पर्याय प्रशासनाने ठेवला आहे. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाचे आदेश

हे मार्ग राहणार बंद

मालेगाव ते रामकुंड परिसर वाहतुकीसाठी बंद

इंद्रकुंड ते रामकुंड या मार्गावरही वाहनांना प्रवेशबंद

मतेवाड्यापासून कपालेश्वराकडे वाहनांना प्रवेशबंद

काट्या मारुती ते सरदार चौक व काट्या मारुती ते गजानन चौक पुढे मालवीय चौकापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद.

भाविक हे करू शकतात...

पंचवटी कारंजा ते मालवीय चौक तसेच मतेवाडा ते इंद्रकुंड हा एकेरी मार्ग वाहतुकीसाठी खुला असेल. काट्या मारुती ते नागचौक तेथून पुढे गजानन चौक, सेवाकुंज ते दिंडोरीनाका या मार्गावरही वाहतुकीला परवानगी आहे. रामकुंडाकडे येणारे भाविक अमरधाम रोड, आयुर्वेदिक कॉलेज या मार्गाने येऊन रोकडोबा पटांगण, श्रध्दा लॉन्स, अमरधाम रोडच्या दोन्ही बाजूला वाहने उभी करू शकणार आहेत. तेथून त्यांना रामकुंडाकडे पायी जाता येईल. परतीच्या मार्गासाठी गौरी पटांगण, देवी चौक, गणेशवाडी, काट्या मारुती चौक किंवा गौरी पटांगण ते अमरधाव मार्गाने जाऊ शकतील, असे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्र्यांची आज मांदियाळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणासारख्या महत्वपूर्ण धार्मिक सोहळ्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांची मांदियाळी नाशिकमध्ये अवतरली आहे. सोमवारी सायंकाळीच ते नाशिक मुक्कामी दाखल झाले असून मंगळवारी (दि. १४) भल्या पहाटे त्र्यंबकेश्वर चरणी लीन होणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचा नियोजित दौरा दोन दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला होता. ते त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यास सकाळी सहालाच हजेरी लावणार आहेत. मात्र, विधीमंडळ अधिवेशनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंहस्थाच्या ध्वजारोहणासाठी उपस्थित राहणार की नाही याबाबत जिल्हा प्रशासन साशंक होते. परंतु, मुख्यमंत्र्यांसह अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे तसेच जलसंपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांसह मुनगंटीवार तसेच मुंडे यांचे ओझर विमानतळावर आगमन झाले. त्र्यंबकेश्वर येथील श्री लिव्हज हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता. मंगळवारी पहाटे पाचला त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर साडे पाचला ते सर्वजण नाशिककडे मार्गस्थ होतील. सकाळी सव्वा सहाला ते रामकुंड येथे ध्वजारोहण सोहळ्यासाठी पोहोचतील. सकाळी आठला हे सर्वजण ओझर विमानतळाकडे मार्गस्थ होतील. विधीमंडळ अधिवेशनासाठी सकाळी सव्वा नऊलाच ते मुंबईत दाखल होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थ ध्वजेची मिरवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर ध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येला शहरातून अभूतपूर्व ध्वज मिरवणूक काढण्यात आली. ढोलताशाच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीने आसमंत दुमदूमून गेला होता. काळाराम मंदिरात ध्वजाचे विधीवत पूजन करण्यात आले तेथून मिरवणुकीने ध्वज शहरात मिरवण्यात आला.

कुंभममेळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या ध्वज दुपारी तीन वाजता काळाराम मंदिरात आणण्यात आला. तेथे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडीया, आमदार देवयानी फरांदे, आमदार बाळासाहेब सानप, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमीत बग्गा आदींच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले. पौराहित्य भालचंद्र शास्त्री शौचे यांनी केले. १२ वर्षांनी येणारा सिंहस्थ आणि तेरा महिन्यांचा काळ सुस्थितीत व्हावा यासाठी ध्वज पूजन करण्यात आले. पूजनानंतर राममंदिरात ध्वज नेण्यात आला. तेथे पंचोपचार पूजा झाली. तोगडीया व महंत ग्यानदेवदास महाराज यांच्या हस्ते ध्वजाचे पूजन झाले. पालखीतून ध्वज राममंदिराबाहेर सजवलेल्या वाहनात ठेवण्यात आला. सनई चौघड्याच्या निनिदात मिरवणूकीला सुरुवात झाली. मिरवणुकीच्या अग्रभागी मनमाड येथील ओम मित्र मंडळाचे कार्यकर्ते सुबक रांगोळी रेखाटत होते. त्यानंतर मिरवणूक शहरातून मार्गस्थ झाली. नाशिकमधील ढोल पथके सहभागी झाले.

वारकरी महामंडळ, बाराबलुतेदार महासंघ, सनातन संस्था, सदगुरू पंत महाराज बाळकुंद्री, गंगा गोदावरी पुरोहित संघ, श्री दत्त प्रसाद सेवा मंडळ, संस्कारभारती, श्री ओम मित्र मंडळ मनमाड, विघ्नहरण ढोल पथक, माऊली प्रतिष्ठान ढोल, ब्रह्मकुमारी इश्वरी विश्वविद्यालय, गंगा गोदावरी नाभिक संघ, शिवगोरक्ष मित्र मंडळ, जंगलीदास महाराज ट्रस्ट, ग्रहराज ढोल पथक, हिंदू एकता आंदोलन, विश्व हिंदू परिषद, सनातन वैदिक धर्मसभा, राधामदन गोपाल मंदिर, वैदिक ज्ञान संस्कृत महाविद्यालय, शिवगोरक्ष सेवा संघ आदी संस्था मिरवणुकीत सहभागी झाल्या.

मिरवणुकीला विलंब

पुरोहित संघाने मिरवणुकीसाठी दुपारी तीनची वेळ दिली. मात्र, मिरवणूक सुरू होण्यास पाच वाजले. सुरुवातीला उन असल्याने मिरवणूकीत उत्साह कमी होता. मात्र ऊन ओसरल्यानंतर मिरवणुकीत भाविक-पर्यटकांची गर्दी वाढली.

मिरवणुकीचा मार्ग

मिरवणुकीला का‍ळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजाने सुरुवात झाली. तेथून नागचौक, हत्तीपूल, गणेशवाडी, आयुर्वेद भवन, गाडगेमहाराज पुल, नेहरू चौक, चांदवडकर गल्ली, धुमाळ पॉईंट, भगवंतराव हॉटेल, रविवार कारंजा, मालेगाव स्टँड मार्गे रामकुंडावर पोहचली.

व्यासपीठावर गर्दी

काळाराम मंदिरात ध्वजाचे पूजन सुरू असताना स्टेजवर प्रमाणापेक्षा अधिक गर्दी झाली. स्टेजची क्षमता २० लोकांची होती; मात्र शंभर पेक्षा अधिक जणांची उपस्थिती झाल्याने स्टेज हलू लागले. वारंवार आवाहन करूनही उपस्थितांची फोटोसाठी धावपळ सुरू होती. स्टेजभोवती झालेल्या कोंडाळ्यामुळे तो सोहळा सामान्य नागरिकांना पहाता आला नाही.

हेलिकॉप्टरद्वारे टेहाळणी

काळाराम मंदिरात ध्वजपूजन सुरू असताना मंदिरावर लष्कराचे हेलिकॉप्टर टेहाळणी करीत होते. येत्या २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या पहिल्या शाहीस्नानाच्या बंदोबस्ताची रंगीत तालीम असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. दुपारी चार वाजता गंगाघाटावर व काळाराम मंदिराला होलिकॉप्टरने घिरट्या घातल्या.

मिरवणुकीत अंतर

दोन चित्र रथांमधील अंतर जास्त असल्याने मिरवणूक पुढे सरकण्यास विलंब झाला. मिरवणुकीचे पहिले टोक रविवार कारंजावर तर दुसरे टोक गाडगे महाराज पुलावर होते. मिरवणूक अत्यंत धिम्यागतीने पुढे सरकत असल्याने नागरिकही कंटाळले.

सामाजिक संदेश

आनंद आखाड्यात सहभागी झालेल्या महिलांनी सामाजिक संदेश लिहिलेले फलक हाती घेतले होते, स्त्री हत्या बंद करा. गो हत्या बंद करा असे संदेश नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

इस्कॉनची शिस्तबध्दता

इस्कॉनच्या राधा मदन गोपाल मंदिरातर्फे अत्यंत शिस्तबध्दपणे अनुयायी सहभागी झाले. सुरेल अवाजात भजन सादर करून उपस्थितांना डोलायला लावले. 'हरे कृष्णा हरे रामा' या भजनाच्या तालावार नागरिक उत्स्फूर्तेपणे नाचत होते.

पुढाऱ्याची हजेरी

इतरवेळी एकमेकांवर कुरघोडी करीत आरोप प्रत्यरोप करणारे राजकीय पदाधिकारी मिरवण्यासाठी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून वावरत होते. हा सोहळा माझ्यामुळेच पार पडतो आहे, अशी अनेकांची भावना होती.

तोगडियांची उपस्थिती

विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगाडीया यांनी ध्वज मिरवणुकीपूर्वी अचानक हजेरी लावली. नाशिक-पुणे हायवेवरील गंधर्वनगरी येथील बालाजी मंदिरातील कार्यक्रमासाठी तोगाडिया शहरात आले होते. त्यांना आमदार बाळासाहेब सानप यांनी ऐनवेळी आमंत्रण दिले. तोगाडिया यांनी ते तत्काळ स्वीकारून काळाराम मंदिरात हजेरी लावली.

साधू महंताची हजेर‌ी

पुरोहित संघाच्या ध्वजरोहण कार्यक्रमाचा साधू महंताशी कोणताही संबंध नसल्याचे सांगणाऱ्या अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी रविवारी सर्व वादावर पांघरून घातल्याचे जाहीर केले. तसेच मिरवणूक सुरू होण्यापूर्वी महंत हजर झाले. महंत ग्यानदास वगळता महंत भक्तीचरण दास, महंत रामकिशोरदास महाराज यांच्यासह काही साधू महंतांनी मिरवणुकीत सहभाग घेतला.

पोलिस अनभिज्ञ

ध्वज मिरवणुकीचा नागचौकानंतर गणेशवाडी, आयुर्वेदभवन तसेच गाडगेमहाराज पूल असा मिरवणुकीचा प्रवास झाला. मात्र, मिरवणूक गाडगे महाराज पुलाखालून जाणार असा पोलिसांना विश्वास होता. वाहतूक विभागासह पोलिसांचा बंदोबस्त याठिकाणी तैनात करण्यात आला. पंरतु, मिरवणूक थेट पुलावरून पुढे गेली. या बदलाबाबत पोलिसच अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.

आयुक्तांची परेड

मंगळवारी सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला अनेक व्हीआयपी हजर राहणार असून पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी रामकुंड परिसरातील पोलिस चौकीतच ठाण मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसस्थानकाची त्र्यंबकला दुरवस्था

$
0
0

त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ पर्वकाल साधण्यासाठी आलेल्या भाविकांना सेवा सुविधा देण्यासाठी शासनाच्या सर्वयंत्रणा सर्वतोपरी तयारी करीत असताना राज्य परिवहन मंडळ मात्र अद्यापही जुने ते सोने याच अविर्भावात असल्याचे दिसून येत आहे. पहिल्या शाहीस्नानाला किमान वीस लाख भाविक हजेरी लावतील, असा शासन अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर खासगी वाहनांना गर्दीच्या कालावधीत प्रवेश बंदी करण्यात येते. वाहतुकीची भिस्त राज्य परिवहन मंडळाकडे असते. बसस्थानकांवर सुविधांची वानवा आहे. पिण्याच्या पाण्यापासून स्वच्छतागृहापर्यंत सर्वच बाबतीत दुरवस्था आणि अस्वच्छता असा अत्यंत दयनीय प्रकार अनेक वर्षांपासून कायम राहिला आहे. त्र्यंबक येथील नवीन बसस्थानकाबाबत तर नव्याने केलेले डांबरीकरण पहिल्याच पावसात धुऊन निघाले आहे. जुन्याच स्थानकास नव्याने रंगरंगोटी केल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधी विभागाची भूमिका संशयास्पद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

साधुग्राम स्वच्छतेसाठी दिलेल्या साडेपाच कोटींच्या वादग्रस्त ठेक्याबाबत महापालिकेच्या विधी विभागाची भूमिका संशयास्पद असल्याचे समोर आले आहे. उच्च न्यायालयाने महापालिकेला बाजू मांडण्यासाठी सोमवारची शेवटची मुदत दिल्यानंतरही सुनावणीला पालिकेचे मुख्य वकील उपस्थित नव्हते. या प्रकरणावर आज अंतिम सुनावणी होईल. दरम्यान, क्रिस्टल कंपनीनेही न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

महापालिका प्रशासनाने सुमारे साडेपाच कोटींच्या ठेक्यासाठी वॉटर ग्रेस प्रॉडक्ट या कंपनीने सर्वांत कमी निविदा दर दाखल केला होता. परंतु, या कंपनीचा ठेकेदार हा काळ्या यादीत असल्याने तसेच त्याच्याकडे सुमारे ९५ लाख रुपयांची थकबाकी असल्याचा आरोप झाला. सभापतींनी या ठेकेदाराऐवजी द्वितीय न्यूनतम दर सादर करणाऱ्या क्रिस्टल कंपनीला हे काम देण्याचा निर्णय घेतला. मात्र, स्थायीच्या निर्णयाविरुद्ध वॉटर ग्रेस प्रॉडक्ट्स कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ठेकेदाराने आपण काळ्या यादीत नसल्याचे न्यायालयासमोर सिद्ध केले. तर, ९५ लाखांच्या थकबाकीसंदर्भात महापालिका प्रशासनावरच ठपका असल्याचा दावा ठेकेदाराने केला. त्यामुळे उच्च न्यायालयाने पालिकेला बाजू मांडण्यासाठी सोमवारची मुदत दिली होती. त्यासाठी सोमवारच्या सुनावणीत पालिकेचे वकील जे शेखर त्यांनी गैरहजेरी लावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images