Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

राज यांचे अजितदादांना प्रत्युत्तर

$
0
0
'पाणीच नाही तर काय सोडणार?... मुतता का आता तिथे?...' अशी अर्वाच्य भाषा वापरून दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळणा-या अजित पवार यांना राज यांनी आज खास ठाकरे शैलीत उत्तर दिलं. आगामी निवडणुकीत मतदार अजित पवारांना ‘मत’ नव्हे तर ‘मूत’ देतील. त्यात ते वाहून जातील... या शब्दात राज यांनी अजित पवारांच्या वादग्रस्त वाक्याचा समाचार घेतला.

हायवेच्या कामाला स्थानिकांचा ‘ब्रेक’

$
0
0
पिंपळगाव ते गोंदे दरम्यान सुरू असलेल्या तिसऱ्या व अंतिम टप्प्यातील मुंबई-आग्रा हायवेचे काम पूर्णत्त्वाच्या मार्गावर असले तरीही, या कामाला चार ठिकाणी लागलेला ब्रेक अद्याप कायम आहे.

चार प्रभाग सभापतीसाठी आज निवडणूक

$
0
0
महापालिकेच्या चार प्रभाग समित्यांच्या सभापतीसाठी सोमवारी सकाळी ११ वाजेपासून निवडणूक होणार आहे. सभापतीपदाची माळ आपल्याच पक्षाच्या गळ्यात पडावी म्हणून सर्वच पक्षांनी कंबर कसली असून महाआघाडी की महायुती यावर सत्तेचे समीकरण अवलंबून असेल.

शाळाबाह्य मुले आढळल्यास कारवाई

$
0
0
मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या अधिनियमाने ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार दिला आहे. या अधिकाराबरोबरच या वयोगटातील प्रत्येक मुलाला शाळेत दाखल करण्याची जबाबदारीही शाळांवर सोपविण्यात आली आहे.

नाशिकमध्ये होणार खुले कारागृह

$
0
0
राज्यात नव्याने खुली कारागृहे सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र सरकारच्यावतीने करण्यात आली आहे. कारागृह प्रशासनाच्यावतीने नाशिकमध्ये खुले कारागृह सुरू करण्यात येणार आहेत. त्याबाबतचा अध्यादेश नाशिक कारागृह प्रशासनास मिळाला आहे.

उद्योगात ९३७२ कोटींची गुंतवणूक

$
0
0
नाशिक शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत उद्योगांमध्ये आजवर ९,३७२ कोटींची गुंतवणूक झाली आहे. सूक्ष्म उद्योगांपासून मोठ्या उद्योगांपर्यंत झालेल्या या गुंतवणुकीतून नाशिकचे औद्योगिक बलाढ्यपण समोर येत आहे. आगामी काळात ही गुंतवणूक वाढतच जाण्याची चिन्हे आहेत.

जातीचे राजकारण मोडीत काढा

$
0
0
राज्याच्या प्रश्नावर एकत्र न येणारे नेते जातीच्या राजकारणासाठी मात्र एकत्र येतात. कारण जातीचे राजकारण करून सत्ता मिळवता येते, हे त्यांना माहीत आहे. विभाजनाचा हा धंदा आता मोडीत काढा, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे रविवारी झालेल्या जाहीर सभेत केले.

जळगावात उष्माघाताचा पहिला बळी

$
0
0
शनिवारी दुपारी चक्कर येऊन कोसळल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून हा उष्माघाताचा हा राज्यातला पहिला बळी असल्याचे सांगण्यात येते.

फॉरेन एक्स्चेंज चोरीमागे मॅनेजर

$
0
0
पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘सेंट्रम डायरेक्ट’ या ‘फॉरेन करन्सी एक्स्चेंज’मधून देशी-विदेशी चलनासह ३२ लाखांच्या मुद्देमाल चोरीप्रकरणाचा उलगडा करण्यात नाशिक पोलिसांना अखेर यश आले आहे.

प्राध्यापक संघटना आंदोलनावर ठाम

$
0
0
विविध मागण्यासांठी सुरू असलेला परीक्षेवरील बहिष्कार हा कायम ठवण्याचा निर्णय महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. समाजशास्त्र विद्यालयात झालेल्या बैठकीला ४३ सदस्य उपस्थित होते.

राज ठाकरे यांना जामीन मंजूर

$
0
0
जळगावात २००८मध्ये राज ठाकरे यांच्या विरोधात दाखल झालेल्या एका खटल्यात सोमवारी, त्यांना १५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.

पासपोर्ट मेळाव्यात पाचशे नागरिकांचा सहभाग

$
0
0
पासपोर्ट काढणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन पासपोर्ट सेवा केंद्राच्या ठाणे मुख्यालयातर्फे नुकतेच ठाणे व नाशिक विभागात पासपोर्ट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात अंदाजे पाचशे नागरिकांनी सहभाग घेतला.

‘क्राऊड मॅनेजमेंट’साठी एसटीचा प्रस्ताव

$
0
0
गेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वच स्तरांवर विचारमंथन सुरू असताना, एसटीने स्वतःहून या ‘क्राऊड मॅनेजमेंट’साठी जिल्हा प्रशासनाला स्वतंत्र प्रस्ताव सादर केला आहे.

अनधिकृत बांधकामांवर बीट अधिका-याची नजर

$
0
0
पालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामे व धोकादायक इमारतींच्या सर्व्हेक्षणाचे आदेश आयुक्त संजय खंदारे यांनी सोमवारी दिले.

१५ हजार उद्योगांनी रोवले पाय

$
0
0
नाशिक शहर परिसरासह जिल्ह्यात आजवर १५ हजारांहून अधिक उद्योगांची पायाभरणी झाली आहे. यात सूक्ष्म गटातील उद्योगांची संख्या सर्वाधिक असून, या उद्योगांमुळे जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळाली आहे.

‘क्रांतीसूर्य’ही धावले दुष्काळग्रस्तांसाठी

$
0
0
महात्मा फुले नेहमी तळागाळातील समाजासाठी झटत राहिले. त्यांच्या कार्याचा आदर्श घेत नाशिकरोड येथील क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने यंदा महात्मा फुले यांची १८६वी जयंती दुष्काळग्रस्तांसाठी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हाणामारीप्रकरणी गुन्हा दाखल

$
0
0
बिटको हॉस्पिटलमध्ये रविवारी रात्री दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीप्रकरणी सोमवारी सकाळी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वडनेदुमाला येथे या दोन गटांमध्ये घरगुती वादातून हाणामारी झाल्यानंतर ते परस्परांविरोधात तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे गेले होते.

आरोग्याधिका-यांना श्वानाची भेट

$
0
0
जुने नाशिक परिसरासह शहरात वाढलेल्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात महापालिकेला अपयश येत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन केले.

मराठा संघटनांकडून राज ठाकरेंचा निषेध

$
0
0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरून केलेल्या वक्तव्याप्रकरणी मराठा संघटनांनी राज यांचा निषेध केला आहे. संभाजी ब्रिगेड व छावा मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून राज यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.

केबलवरून अनेक चॅनेल गायब

$
0
0
टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) आणि ब्रॉडकास्टर यांच्यात करार न झाल्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. त्यामुळे सेट टॉप बॉक्स बसवूनही केबलवरून अनेक चॅनेल गायब झाली आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images