Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘पाल’ प्रकरणावर राज्य सरकारची कृपा?

$
0
0
कुपोषित बालक व स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या पाकीटबंद पूरक आहारात (टीएचआर) सडलेली पाल आढळल्याच्या घटनेला आठ महिन्यांचा कालावधी उलटूनही दोषींविरुद्ध कारवाईसाठी राज्य सरकारला मुहूर्त सापडलेला नाही.

नाशिकमध्ये चप्पलमार

$
0
0
सोमवारी नाशिकरोडसह शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर उपम‌‌ुख्यमंत्री अजित पवारांविरोधात चप्पल मार आंदोलन केले. नाशिकरोडसह शालिमारस्थित सेनेच्या संपर्क कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजीसह चप्पलमार आंदोलन करण्यात आले.

गिरणा बँकेत ५१ लाखांचे बनावट कर्जवाटप

$
0
0
नाशिक जिल्हा गिरणा बँकेच्या कळवण शाखेने बनावट कर्जाद्वारे तालुक्यातील ५०हून अधिक आदिवासी शेतक-यांची फसवणूक केल्याची बाब पुढे आली आहे. ५० लाखांहून अधिक रुपयांच्या या गैरव्यवहारामुळे या शेतक-यांनी थेट जिल्हाधिका-यांकडेच धाव घेतली आहे.

चार खंडणीबहाद्दरांना पोलिस कोठडी

$
0
0
रस्ता सुरक्षितता नियमासंदर्भात काम करीत असल्याचे भासवून पोलिस आणि आरटीओच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या चारजणांना कोर्टाने तीन पोलिस कोठडी सुनावली. एका ट्रक चालकाने दिलेल्या तक्रारीनंतर आडगाव पोलिसांनी चौघांना सोमवारी उशिरा अटक केली होती.

तीन वर्षांनंतर स्कॉलरशिपचा लाभ

$
0
0
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या चौथी व सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षांमधील स्कॉलर तब्बल तीन वर्षे या स्कॉलरशिपच्या रकमेपासून वंचित होते.

केवायसी फॉर्म की उलट तपासणी?

$
0
0
बँकिंग व्यवहारांमध्ये होणारी फसवणूक टळावी आणि त्यात पारदर्शकता यावी, यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना केवायसी (नो यूअर कस्टमर) फॉर्म भरून घेणे सक्तीचे केले आहे.

होर्डिंगप्रकरणी नगरसेवकाविरोधात गुन्हा

$
0
0
शहर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा प्रकारे होर्डिंग लावल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक राजेंद्र महाले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

विदेशी मद्याचे शंभर बॉक्स जप्त

$
0
0
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने दिंडोरी तालुक्यात केलेल्या कारवाईत विदेशी मद्यासह सव्वाचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोघांना स्थानिक कोर्टाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

‘मुरकुटे’तील विद्यार्थ्यांना मिळाले हक्काचे पाणी

$
0
0
ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागणाऱ्या मुरकुटे अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना आता हक्काचे पाणी मिळाले आहे. अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासह जेवणाच्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची व्यथा ‘महाराष्ट्र टाइम्स’ने मांडली होती.

दीड लाखांहून अधिकांना मिळाला रोजगार

$
0
0
नाशिक जिल्ह्यात औद्योगिक व्यवसायामुळे तब्बल दीड लाखांहून अधिक जणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. सर्वाधिक रोजगार सूक्ष्म गटात निर्माण झाले असून रोजगाराची उपलब्धता दरवर्षी वाढत असल्याचेही दिसून येत आहे.

सीसीटीव्हीसाठी पाच कोटींची तरतूद

$
0
0
शहरात होणा-या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शहर पोलिस दलाला जुलै २०१५मध्ये ६७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यातील सुमारे ५ कोटी रूपये सीसीटीव्हीसाठी खर्च होणार असून उर्वरित रक्कम पायाभूत सुविधांवर खर्च होणार आहेत.

कुंभमेळ्याची वेबसाइट लवकरच

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र वेबसाइट लवकरच सुरू होणार आहे. तसे निर्देश मुख्य सचिवांनी जिल्हाधिका-यांना दिले आहेत. त्यानुसार येत्या काही दिवसांतच ही वेबसाइट उपलब्ध होणार असून त्यावर सिंहस्थाशी संबंधित माहिती दिली जाणार आहे.

सिंहस्थासाठी सहा हजार बसेस

$
0
0
नाशिक व त्र्यंबकेश्वर केंद्रस्थान असलेल्या आगामी सिंहस्थासाठी एसटीला तब्बल ६ हजार १५० बसेसची गरज भासणार आहे. यापैकी पाचशे नव्या बसेसच्या खरेदीसाठी ११० कोटींची मागणी करण्यात आली आहे.

पर्यटनप्रेमींना मिळणार ‘हुनरसे रोजगार’!

$
0
0
पर्यटनस्थळाविषयी प्रेम असलेल्या स्थानिक तरुणांना प्रोत्साहन देतानाच त्यांना रोजगाराच्या वाटा खुल्या करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) पुढाकार घेतला आहे. ‘हुनरसे रोजगार’ या प्रकल्पांतर्गत उत्तर महाराष्ट्रातील ३० तरुणांना सध्या शिर्डीत प्रशिक्षण दिले जात आहे.

मविप्र फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षणाबरोबरच नोकरीची हमी

$
0
0
शिक्षण घेतल्यानंतही नोकरी मिळण्याची शाश्वती नसलेल्या जमान्यात तब्बल २५३ विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरी मिळवून देण्याचा अभिनव उपक्रम मविप्र समाज संस्थेच्या फार्मसी कॉलेजने राबविला आहे.

शेतक-यांना फसवल्याचा आरोप

$
0
0
सिन्नर तालुक्यातील वडगाव सिन्नर येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीतील सचिव व बँक इन्स्पेक्टर यांनी संगममताने आठ शेतकऱ्यांची फसवणूक केली असून सुमारे ५ लाख तीस हजार रुपये खात्यावर न भरता परस्पर हडप केले.

अधिक मोबदला देण्याची मागणी

$
0
0
नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर जवळील वळण रस्त्याचे कामासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना चालू बाजार भावाने तसेच केंद्र सरकारचे नवीन धोरणात्मक निर्णयानुसार मोबदला मिळावा या मागणीसह अन्य मागण्यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी यांच्या निवेदनद्वारे मागणी केली आहे.

कुत्र्याचा आणखी तिघांना चावा

$
0
0
सातपूर परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या कुत्र्याने मंगळवारी आणखी तीन जणांना चावा घेतल्याने संतप्त नागरिकांनी या कुत्र्याला ठेचून मारले. याप्रकरणी परिसरात अत्यंत संतापजनक वातावरण असून महापालिका प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

भविष्याचे भान ठेवा

$
0
0
आगामी काळात जागतिक पातळीवर कोणत्याही राष्ट्राचे वैश्विक व नैतिक स्थान हे सैनिकी शक्तीवर न ठरता विज्ञान तंत्रज्ञानातील योगदान व कौशल्य असलेल्या मनुष्यबळावरच ठरणार आहे.

पत्ते खेळणारे कर्मचारी निलं‌बित

$
0
0
कार्यालयीन वेळेत पत्ते खेळणाऱ्या महापालिकेच्या सात कर्मचाऱ्यांना निलं‌बित करण्याचे आदेश मंगळवारी महापालिका प्रशासनाने दिले. सोमवारी दुपारच्या सुमारास पूर्व विभागाच्या कार्यालयात महापालिका आरोग्य खात्याचे कर्मचारी पत्ते खेळत असताना आढळून आले होते.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images