Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पुन्हा भूकंपाचा धक्का

$
0
0

नाशिक : नाशिक शहरापासून ४० किलोमीटर अंतरावर गुरुवारी पहाटे सहा वाजून २ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याचे निदर्शनास आले आहे. नाशिकच्या भूकंप वेधशाळेत या भूकंपाची त‌िव्रता २.५ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे. यासंबंध‌िची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. गेल्या महिन्यातही पेठ तालुक्यात भूकंपाचा धक्का जाणवला होता. त्यानंतर आता पुन्हा नोंद झाली आहे. मात्र, गुरुवारचे हे धक्के कुठल्या भागात होते, हे अद्याप कळू शकलेले नाही. तशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हेल्पलाइनची मिळणार २४ तास सेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेने २४ तास सेवा देणारी हेल्पलाइन सुरु केली आहे. या हेल्पलाइनचा प्रचार, प्रसार महापालिकेने सुरु केला असून, सिंहस्थात येणाऱ्या भाविक, भक्त आणि पर्यटकांना याचा विशेष उपयोग होणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यास प्रारंभ झाला आहे. साधुग्राममध्ये आता साधू, महंतांचे आगमन होऊ लागले आहे. येत्या १९ ऑगस्टला आखाड्यांचे ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर २९ ऑगस्टला पहिले शाहीस्नान आहे. दर १२ वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थाचे मोठेच आकर्षण संपूर्ण जगभरात आहे. यंदाच्या सिंहस्थात जवळपास एक कोटी भाविक येतील, अशी अपेक्षा प्रशासनाला आहे. त्यादृष्टीने सिंहस्थाचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, पर्वणीच्या दिवशी किंवा सिंहस्थ काळात येणाऱ्या भाविक, भक्त आणि पर्यटकांना येणाऱ्या विविध अडी-अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांना आवश्यक असलेली माहिती देण्यासाठी नाशिक महापालिकेने हेल्पलाइनची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आठवडाभर आणि २४ तास असलेल्या या सुविधेचा विशेष फायदा होण्याची अपेक्षा महापालिकेला आहे. मिझ सोल्यूशनच्या मदतीने महापालिकेने ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी आयसीआयसीआय बँकेचेही सहकार्य लाभले आहे. हेल्पलाइनचा क्रमांक ८३९०३००३०० किंवा ०२५३-६६४२३०० किंवा २२२६१०० असे आहेत. भाविकांना किंवा पर्यटकांना कुठल्याही प्रकारची मदत हवी असल्यास तसेच माहिती द्यायची असल्यास या क्रमांकावर संपर्क साधता येईल. हेल्पलाईनचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम पालिकेने सुरु केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमए अभ्यासात देसलेंच्या कविता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जीवनविषयक तत्वज्ञान आशयसंपन्न कविता आणि गझलांमधून सशक्तपणे मांडणारे नाशिक जिल्ह्यातील गझलकार व साहित्यिक कमलाकर देसले यांच्या कवितांचा समावेश उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या (उमवि) एम. ए. अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.

सुमारे २५ वर्षांपेक्षाही अधिक कालावधीपासून साहित्यामध्ये त्यांचे योगदान आहे. सन् २०१५-१६ पासूनच्या एम. ए. द्वितीय वर्ष अभ्यासक्रमात 'खानदेशातील मराठी साहित्य' हा वैकल्पिक विषय सुरू करण्यात आला. 'उमवि'ने या वर्षी पहिल्यादाच खानदेशातील मराठी साहित्य हा विषय सुरू केला. यात कथा, कविता, कादंबरी, नाटक आदी साहित्य प्रकारांचा समावेश आहे. यासाठी खान्देशातील लक्षवेधी व साहित्यात बहुमोल योगदान असलेल्या लेखक कवींची निवड करण्यात आली आहे. कविता या साहित्यप्रकारात मालेगाव तालुक्यातील झोडगे येथील कवी गझलकार यांच्या ५ कवितांची निवड झाली असून विद्यापीठाने त्याची अधिकृत घोषणा नुकतीच केली आहे. कवी देसले यांची 'ज्ञानिया तुझे पायी' हा कविता संग्रह आणि 'काळाचा जरासा घास' हा गझलसंग्रह अशी दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

'गझलनामा'साठी प्रस्तावना लेखन

गझल या काव्यप्रकाराबद्दल अधिक तंत्रशुद्ध माहिती विद्यापीठ स्तरावरून विद्यार्थ्यान पर्यंत पोहोचावी या उद्देशाने खान्देशातील तीन गझलकार राजा महाजन, वा. ना. आंधळे आणि वा. न. सरदेसाई यांचे 'गझलनामा' हे संपादित पुस्तक डॉ. शिरीष पाटील, प्रा. नामदेव कोळी यांनी संपादित केले. या पुस्तकाचा अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. या संपादित गझलसंग्रहाची अभ्यासपूर्ण अशी प्रदीर्घ प्रस्तावना लेखन कवी देसले यांनी लिहिली आहे. त्यात गझलेचा इतिहास, गझल लेखन तंत्र, खानदेशातील गझल परंपरा व गझलेची आस्वादक समीक्षा यात अंतर्भूत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधुग्राममध्ये २४ तास रुग्णसेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या सर्व साधू-महंत आणि लाखो भाविकांसाठी तपोवनात सिंहस्थ रुगणालय सज्ज झाले असून प्रत्यक्ष सेवेला सुरुवातही करण्यात आली आहे. २४ तास सुरू असलेल्या हॉस्पिटलमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

सर्व सेक्टरचे हे हॉस्पिटल मुख्य केंद्र असून यात ६० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेसह महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र विभाग आहेत. मेडिसीन विभाग असून मागणी केल्याप्रमाणे सध्या सर्व प्रकारच्या औषधांचा साठा या ठिकाणी उपलब्ध झाला आहे. रक्त, लघवी आदी तपासणी साठी स्वतंत्र प्रयोगशाळा निर्माण करण्यात आली आहेत. दिवसरात्र सेवा पुरविण्यासाठी प्रशासनाने ६ वैद्यकीय अधिकारी आणि ६३ लोकांचा स्टाफ नियुक्त केला आहे. सर्व ठिकाणाहून पेशंट आणण्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून १०८ नंबरच्या १०५ रुग्णवाहिका दोन दिवसात याठिकाणी येणार आहेत, अशी आहिती विभागाचे प्रमुख डॉ. हिरामण कोकणी यांनी दिली.

साधुग्राममधील प्रत्येक सेक्टरमध्ये एक वैद्यकीय केंद्र तयार करण्यात आले आहे. सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी सेवा दिली जाणार आहे. सकाळी सात ते तीन वाजेपर्यंत एक आणि दुपारी तीन ते रात्री अकरा वाजेपर्यंत एक असे वैद्यकीय अधिकारी याठिकाणी उपलब्ध असतील. या केंद्रात प्रत्येक ठिकाणी तीन खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अप्पर जिल्हाधिकाऱ्याला अटक

$
0
0

५० लाखांचा हवा होता 'नजराणा'

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जमीन हस्तातंरण करण्याच्या प्रक्रियेसाठी पन्नास लाख रूपयांची लाच मागणाऱ्या मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांच्यासह एका मध्यस्थास अॅण्टी करप्शन ब्युरोने आज बेड्या ठोकल्या. मालेगाव, अहमदनगरसह शहरातील त्यांच्या मालमत्तांचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

हिरावाडी येथील जंयतीभाई पटेल यांच्यासह त्यांच्या काही मित्रांनी मिळून नांदगाव तालुक्यात गणेशनगर आणि गंगाघाटी येथे ७५ एकर ८५ गुंठे जमीन खरेदी केली. याच जमिनीचे हस्तांतरणाचे काम पवार यांच्याकडे पोहचले असता, त्यांनी पटेल यांना नोटीस पाठवली. शेतकरी नसताना जमीन खरेदी करणे आणि नजराणा बुडवणे यामुळे, तुमच्यावर फौजदारी कारवाई का करू नये, अशा अशायाची ती नोटीस होती. यानंतर, तक्रारदार पटेल यांनी शेतकरी असल्याचा पुरावा सादर करून नजराणा रक्कम भरण्याची तयारी दर्शवली. मात्र, पुढील कारवाई टाळण्यासाठी संशयित आरोपी पवार यांनी तक्रारदाराकडे ५० लाख रूपयांची लाच मागितली. यासाठी पवार यांच्यातर्फे दिनेशभाई पंचासरा यांनी काम केले. पंचासरा हे खडी क्रशर उद्योगाशी निगडीत असून, त्यांचे पवार यांच्याकडे सातत्याने जाणे-येणे होते. याप्रकरणात त्याने मध्यस्थ म्हणून काम पाहिले.

दरम्यान, एसीबी कारवाई करणार असल्याची कुणकुण लागल्याने पवार यांनी दोन्ही वेळेस पैसे स्वीकारले नाहीत. याच दरम्यान, एसीबीने पवार आणि तक्रारदार तसेच पंचासरा आणि तक्रारदारात झालेले संभाषण व इतर पुरावे संकल‌ित केले. या आधारे पवार आणि पंचासरा विरोधात भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल केल्याची माहिती अॅण्टी करप्शन ब्युरोचे अधीक्षक डी. पी. प्रधान यांनी दिली. दोन महिन्यापासून एसीबीचे अधिकारी या केसवर काम करीत असल्याचे प्रधान यांनी स्पष्ट केले. आज, सकाळी ११ वाजून १० मिन‌िटांनी गुन्हा दाखल झाल्याबरोबर दोघांना ताब्यात घेतले.

रात्री उशिरापर्यंत चौकशी

मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतल्यानंतर शहरात खळबळ उडाली. पवार यांच्या निवास स्थानाच्या हाकेच्या अंतरावर तहसील तसेच प्रांत कार्यालय असल्याने कामकाजासाठी आलेले कर्मचारी व अधिकारी तसेच नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी एकच गर्दी केली होती. पवार यांचे सरकारी निवासस्थान व कार्यालयात नाशिक येथील अधिकाऱ्यांकडून सायंकाळी उशिरापर्यंत तपासणी सुरूच होती. पवार यांच्याकडे मोठे घबाड सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बुधवारी (ता. ५) सायंकाळी लाचलुचपत विभागाने मनपा शिक्षण मंडळातील कनिष्ठ लिपिकास २० हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले होते आणि या कार्यवाहीला २४ तास उलट नाहीत, तोच गुरुवारी सकाळी थेट अप्पर जिल्हाधिकारी यांना लाचलुचपत विभागाने अटक केल्याने या धडक कार्यवाहीबद्दल शहरात चांगलीच चर्चा रंगली होती. शहरात मागील काही महिन्यांतच लाचलुचपत विभागाने वेगवेगळ्या प्रशासकीय विभागात लाच घेतांना अधिकारी रंगेहाथ पडकले आहेत. २५ फेब्रुवारी रोजी येथील प्रांत संदीप पाटील, शिरस्तेदार हर्षल गायधनी आणि वरिष्ठ लिपिक नाना बागडे यांना देखील सव्वादोन लाख रुपयांची लाच घेतांना पकडले होते. २०११ मध्ये अप्पर जिल्हा अधिकारी यशवंत सोनावणे यांना तेल माफियांकडून जिवंत जाळण्यात आले होते. त्यावेळी देखील त्यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप झाला होता. मालेगाव तहसील व प्रांत कार्यालयातील कारभाराबद्दल देखील नेहमीच लाचखोरी होत असल्याचा विषय चर्चेच असतो. लाचलुचपत विभागाकडून गेल्या काही महिन्यांत सातत्याने होत असलेल्या धडक कार्यवाहीमुळे मालेगावचे महसूल प्रशासन कारभार चांगलाच चर्चेत आला आहे.

आज कार्यवाही करण्यात आलेल्या पवार यांच्या लाचखोर कारभाराबद्दल देखील सातत्याने तक्रारी झाल्या होत्या. मात्र, लाचलुचपत विभागाने संपूर्ण पुरावे हाती घेण्यासाठी जून महिन्यापासून त्यांच्यावर पाळत ठेवली आणि योग्य रेकोर्ड व पुरावे हाती लागल्या बरोबर त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, गेले काही दिवस लाचलुचपत विभागाकडून होत असलेल्या कार्यवाहीमुळे एकूणच मालेगाव प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांत चांगलीच दहशत पसरली आहे. तर नागरिकांमध्ये या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त केले आहे. महसूल यंत्रणेतील अनागोंदी कारभारास अशा कार्यवाहीमुळे निश्चितच वचक बसेल अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत .

तीन ठिकाणी संपत्तीचा शोध

एसीबीने ताब्यात घेतल्यानंतर संशयित आरोपी पवार यांच्यासह पंचासरा यांना नाशिकमध्ये आणण्यात आले. अटकेबाबतची तांत्रिक पूर्तता करून लागलीच त्यांना पुन्हा मालेगावला नेले. पवार हे मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील आहेत. नाशिक आणि मालेगाव येथेही ते बऱ्याच वर्षांपासून राहतात. निवृत्तीला अवघे काही महिने बाकी असताना अटक केलेल्या पवारांच्या संपत्तीचा या तीनही ठिकाणी शोध घेण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले.

तक्रारदाराकडे लाच मागितल्याचे पुरावे संकलित केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. दोघा संशयितांना अटक करण्यात आली. पवार यांच्या संपत्तीचा शोध घेण्यासाठी अहमदनगर तसेच मालेगाव येथे पथक तैनात करण्यात आले आहे. - डी. पी. प्रधान, अधीक्षक, एसीबी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्याचा अबोला!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी एकीकडे प्रशासनाचे प्रयत्न सुरू असताना कुंभमेळ्याला साधू-महंतासह साध्वींनी लावलेल्या वादाच्या गालबोटामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी नाशिक दौऱ्यावर अबोला धरला. विशेष म्हणजे साधू-महंतांपासूनही दूर राहणे त्यांनी पसंद करत ऐनवेळी बैठकीचे ठिकाणही बदलले. तर बंद दरवाजाआड सिंहस्थाच्या तयारी संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी थेट विमानतळ गाठले. यावेळी सिंहस्थात स्थानिक नागरिकांना त्रास होऊ देऊ नका, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी पोलिसांचे कान टोचले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरूवारी संध्याकाळी नाशिक दौऱ्यावर आले होते. अध्यात्म‌िक गुरू श्री एम यांच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री विश्रामगृहावर सिंहस्थांची आढावा बैठक घेणार होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वादग्रस्त साध्वी त्रिकाल भवन्ता विश्रामगृहावर दाखल झाल्या तर काही महंतांनीही मुख्यमंत्र्यांची भेट माग‌ितली. गेल्या अनेक दिवसांपासून साधू-महंतानी प्रशासनाच्या कामांवर नाराजी व्यक्त केली, तर आखाडा परिषदांमध्येच वादविवाद सुरू आहेत. त्यातच साध्वी त्रिकाल भवन्ता आणि साध्वी शिवानी यांच्या वादामुळे तर सिंहस्थाची कुप्रसिद्धीच अधिक होत आहे. त्यामुळे प्रशासनासह मुख्यमंत्र्यांनी या वादापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी ऐनवेळी बैठकीचे ठिकाण बदलत, इंजिनीअर क्लस्टरमध्येच बैठक घेत कुंभमेळा तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी साध्वींचा आणि साधू-महंताच्या वादावर माध्यमे प्रश्न विचारतील म्हणून अबोला धरत थेट विमानतळ गाठले. विशेष म्हणजे कोणत्याही साधू-महंताची भेटही त्यांनी टाळली. त्यामुळे सिंहस्थाच्या आढाव्यानिम‌ित्त बैठकीला आलेल्या मुख्यमंत्र्यांनी साधू-महंताशी चर्चा टाळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सिंहस्थ निर्विघ्न पार पाडा

मुख्यमंत्र्यानी सिंहस्थाच्या आढावा बैठकीत प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर कुंभमेळा आता निर्विघ्न पार पाडा असे आवाहन अधिकाऱ्यांना केले. अधिकाऱ्यांनी यावेळी पॉवर पॉईंट प्रेझेन्टेंशनद्वारे अधिकाऱ्यांनी तयारीचे सादरीकरण केले. सिंहस्थानिम‌ित्त झालेल्या कामांचा आढावा घेतल्यानंतर आता आव्हान विनासंकट सिंहस्थ पार पाडण्याचे असल्याचे सांगत, आपत्काल‌िन स्थितीवर विशेष भर देण्याचे आदेश त्यांनी दिले. सूक्ष्म नियोजनाचा आढावा घेत, संवादावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

अतिरेक नको; पोलिसांना सल्ला

सिंहस्थाच्या सुरक्षेच्या नावाखाली होत असलेल्या सुरक्षा अतिरेकाचाही विषय निघाला. पोल‌िसांकडून करण्यात येत असलेल्या सुरक्षेच्या बाऊवरून मुख्यमंत्र्यांनी पोल‌िसांचे कान टोचले. कुंभमेळ्यात नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी असे आदेश त्यांनी दिले. सुरक्षा आणि सावधगिरीच्या सुचनांची माहिती जनतेला देण्यात यावी. येणारे साधू, भाव‌िक आणि नागरिकात काय करावे तसेच काय करू नये, याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी पोल‌िसांनी त्यांच्याशी संवाद साधावा. सुरक्षा व्यवस्थेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या बाहेरील जिल्ह्यातील पोल‌िसांनाही आवश्यक सुचना देऊन स्थानिकाची जाचातून मुक्तता करण्याचे निर्देश त्यांनी दिला. तर नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून सिंहस्थात आपली भूमिका पारपाडण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संजीवनी जाधव अव्वल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हैदराबाद येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय फेडरेशन चॅम्पियनशिप स्पर्धेत २० वर्षांखालील वयोगटात नाशिकची धावपटू संजीवनी जाधव हिने पाच हजार मीटर शर्यतीत १७ मिनिटे १० सेकंदांची नोंद करीत अव्वल ठरली. तिने द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या मणिपूरच्या नेहाला तब्बल १६ सेकंदांनी मागे टाकले. तामिळनाडूची आर. जोथी तिसऱ्या स्थानी राहिली.

संजीवनीला या स्पर्धेत फारशी चुरस नसल्याने लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. दक्षिण कोरियात गेल्या महिन्यातच झालेल्या जागतिक विद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धेत तिने १६ मिनिटे १६ सेकंदांची वेळ नोंदवली होती, तर यापूर्वी राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत तिने १७ मिनिटे ११ सेकंदांची नोंद केली होती. या स्पर्धेनंतर तिचे पुढचे लक्ष्य सप्टेंबरमध्ये होणाऱ्या कोलकात्यातील राष्ट्रीय स्पर्धेचे असेल. तिथे तिला वेळेत आणखी सुधारणा करण्याची संधी असेल.

स्पर्धेचा निकाल

>संजीवनी जाधव, महाराष्ट्र (१७.१०.९५ मि.)

>नेहा, मणिपूर (१७.२६.४१ मि.)

>आर. जोथी, तामिळनाडू (१८.०५.६२)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पागल कौन?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महंत ग्यानदास हे पागल व बुद्भिभ्रष्ट आहेत, तर महंत नरेंद्रगिरी यांना वेड्यांच्या इस्पितळात दाखल केले पाहिजे! ही विधाने आहेत अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या साधू-महंताची.

अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदावर नरेंद्रगिरी महाराजांनी दावा केला आहे. तर, हायकोर्टाच्या आदेशाने आपणच परिषेदेचे अध्यक्ष असल्याचे ग्यानदास महाराज सांगतात. यावरून आज नरेंद्रगिरी महाराजांनी पत्रकारपरिषदेत महंत ग्यानदास वेडे असल्याचे म्हटले. राजेंद्रदास यापूर्वी ग्यानदासांवर टीका करीत होते. आज ते ग्यानदास यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्यावर आरोप करीत असून त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट केले. याउलट, महंत ग्यानदास यांनी आज या वादाबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. आखाडा परिषदेचे प्रवक्ते राजेंद्रदास म्हणाले, की पदाच्या मोहापायी नरेंद्रगिरी वेडे झाले असून, त्यांना आग्रा हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची वेळ आली आहे. नरेंद्रगिरी खोटारडे असून त्यांनी आजवर केलेल्या फ्रॉडची माहिती समोर येऊ लागली आहे. त्यामुळेच ते बेताल वक्तव्य करीत असून त्यांना शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती सारखे लोक मदत करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

राधे माँ, त्रिकाल भवंता यांच्यासह सिच्चदानंदासारखे पुतळे उभे करून नरेंद्रगिरीसह हरिगिरींनी पैशांचा बाजार मांडला असल्याची टीकाही राजेंद्रदास यांनी केली. त्र्यंबकेश्वर की रामकुंड यातील कोणते क्षेत्र श्रेष्ठ यावरूनही साधू-महंत आक्रमक झाले असून, सर्वसामान्यांचे मात्र यातून चांगलेच मनोरंजन होत आहे.

मटाची भूमिका

सिंहस्थ कुंभमेळा व त्यातील रंगढंग हा आता चेष्टेचा विषय बनला आहे. साधू व साध्वींचा प्रापंचिक वाटावा असा हेवादावा करमणूकप्रधान सिनेमात शोभावा. हे देखील कमी पडले म्हणून की काय पण आता एकमेकाला पागल, बुद्धिभ्रष्ट असे जाहीररित्या संबोधायला या साधूंनी सुरुवात केल्याने व हा सारा भंपकपणा पुढे कोणत्या थराला जाणार याचा अंदाज येऊ लागल्याने थांबवा आता हा थिल्लरपणा हे या तथाकथित साधूपुरुषांना कठोरपणे सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. साधूंच्या या बालबुद्धी वर्तनाने त्यांना जरी आपण फार मोठे तीर मारीत असल्याचा भास होत असला तरी प्रत्यक्षात हिंदुत्वाचीच मान शरमेने खाली जात आहे. षडरिपूंपासून मुक्त म्हणून साधू समुदायाकडे पाहिले जाते. इथे तर मानवी भावभावनांचा शब्दशः कल्लोळ चालला आहे. कुंभमेळ्यात धर्म, आचरण, अध्यात्म यावर मनन, चिंतन व मंथन व्हावे अशी अपेक्षा असते. मात्र, साधूत्व गमावून बसलेली व लौकिकार्थाने मोह, माया, मद, मत्सर, क्रोध यात लिप्त झालेली ही मंडळी भौतिकात आकंठ बुडालेली आहे. अशांकडून वेगळी काही अपेक्षा करता येत नसली तरी किमान पवित्र गोदावरीच्या घाटावर त्यांनी त्यांच्या रागालोभाची धुणी धुणे अजिबातच अपेक्षित नाही. म्हणूनच या समस्त अभिजनांना विनंती की, त्यांनी हा थिल्लरपणा थांबवावा आणि नाशिकची बदनामीही...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वेध इष्टदेवतांच्या स्नानाचे

$
0
0

अनिल पवार, नाशिक

सिंहस्थ कंभमेळ्यात होणारे शाहीस्नान जवळ येऊन ठेपल्याने त्र्यंबकेश्वर व नाशिकमधील आखाड्यांची तयारीसाठी लगीनघाई सुरू झाली आहे. आपापल्या इष्टदेवतांचे स्नान करण्यासाठी पालखी, पूजा साहित्याची जमवाजमव केली जात आहे. आखाड्यांच्या इष्टदेवतांचे स्नान तसेच शस्‍त्रपूजा ही फक्त सिंहस्‍थ काळात म्हणजे शाहीस्नानातच होत असते. मात्र, शस्‍त्रपूजा सिंहस्‍थादरम्यान तसेच दसऱ्यालाही केली जाते.

भारतात त्र्यंबकेश्वर-नाशिक, उज्जैन, प्रयाग, हरिद्वार या ठिकाणी कुंभमेळा ‌भरत असतो. मानवतेच्या या मेळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब या मेळाव्यातून व्यक्त असते. यामुळे साधूंच्या आखाड्यांशिवाय सिंहस्‍थ कुंभमेळ्याचे महत्त्व अधोरेखित होत नाही. सिंहस्‍थाच्या शाहीस्नानादरम्यान प्रत्येक आखाड्याच्या इष्टदेवतांचे स्नान केले जाते. या इष्टदेवतांची आचार्य सर्वप्रथम पूजा करतात. मंत्रघोष करून देवतांचे स्नान केले जाते. ग्रहणाचा योग साधला जातो. पुजाऱ्याकडून वेदमंत्रांच्या घोषात देवतांचे शाहीस्नान केले जाते.

बारा वर्षे इष्टदेवतांची रोज पूजा केली जात असती तरी शाहीस्नान बारा वर्षांनी होते, असे षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती यांनी सांगितले. पंधरा ऑगस्टपासून आखाड्यांची पेशवाई शोभायात्रा व ध्वजारोहणाला सुरुवात होणार आहे. येत्या २९ ऑगस्ट रोजी पहिले शाहीस्नान होणार आहे.

फुलांचा तुटवडा

उज्जैन येथे पेशवाई तसेच शाही मिरवणुकीत रस्ते फुलांनी सजविले जातात. मात्र, त्र्यंबकमध्ये तशी परिस्थिती नाही. त्र्यंबकेश्वरमध्ये नेहमी फुलांचा तुटवडा जाणवतो. फुले विकत घेण्यासाठी नाशिकला यावे लागते. शाहीपर्वणी काळात फुले घ्यायला जाणे शक्य होत नसल्याचे महंत विचारदास महाराज यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठीच्या पेपरची ‘एन्ट्री मिसिंग’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थ्यांच्या बाबतीत कोणतीही गोष्ट गंभीरपणाने घ्यायची नाही, असा विडाच जणू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने उचलला आहे. त्याचाच प्रत्यय विद्यार्थ्यांना पदोपदी येत आहे. चुका करण्याची हद्द करणाऱ्या मुक्त विद्यापीठाने आता आणखी एक पराक्रम केला आहे. २२ जून रोजी झालेल्या तृतीय वर्ष कला शाखेच्या मराठी विषयाच्या एका पेपरलाच विद्यापीठाने मुंबईच्या एका कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांना मिसिंग एन्ट्री दाखवली आहे. या प्रकारामुळे सर्व विद्यार्थी काळजीत पडले असून, आता पुन्हा पेपर द्यावा लागतो की काय अशी धास्ती विद्यार्थ्यांना वाटत आहे.

मुंबई बोरिवली वेस्ट येथील बोराई विभागामध्ये असलेल्या प्रगती कॉलेजमधील हा प्रकार नुकताच उघडकीस आला. या कॉलेजातील विद्यार्थ्यांनी मराठी या विभागात 'लेखन कौशल्यासाठी प्रसारमाध्यमे' या विषयासाठी २२ जून रोजी पेपर दिला होता. त्यानंतर काही दिवसांनी आलेल्या रिझल्टमध्ये काही विद्यार्थ्यांना या विषयासमोर शून्य गुण आढळून आले. अधिक शहानिशा केली असता शून्य गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली. याबाबत काही विद्यार्थ्यांनी एकत्र होत मुक्त विद्यापीठाच्या साईटवर तक्रार विभागात नोंद केली. परंतु, त्याचा काहीही रिप्लाय न आल्याने या विद्यार्थ्यांनी थेट मुक्त विद्यापीठाकडे तक्रार केली असता ६ जुलै पर्यंत रिझल्ट लावू असे सांगून त्यांची बोळवण करण्यात आली. परंतु, ६ तारखेला रिझल्ट लागलाच नाही. त्यानंतर १४ जुलै, १६ जुलै व १८ जुलै अशा तारखा मुक्त विद्यापीठाकडून देण्यात आल्या. त्या तारखांनाही रिझल्ट लावण्यात आला नाही. ठरलेल्या मुदतीतील तारखा टळून गेल्या पण अद्यापही 'लेखन कौशल्यासाठी प्रसारमाध्यमे' या विषयाचा रिझल्ट लागलेला नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेष म्हणजे मुक्त विद्यापीठाने आपली चूक मान्य केली असून 'पेपर बहुदा गहाळ झाले असावे' असे उत्तरही या विद्यार्थ्यांना दिले आहे. हा पेपर पुन्हा द्यावा लागतो की काय अशी धास्ती विद्यार्थ्यांमध्ये पसरली आहे.



असाईनमेंटच्या गुणांचे काय झाले?

मुक्त विद्यापीठाकडून टीवायबीए मराठी या विभागातील झालेल्या प्रत्येक विषयाच्या पेपरसोबत २० गुणांच्या असायनमेंटदेखील होत्या. या सर्व असायनमेंटस विद्यार्थ्यांनी पूर्ण करून दिल्या आहेत मात्र यापैकी एकाही असायनमेंटसचे गुण विषयांना देण्यात आलेले नाही. असायनमेंटच्या जागीही शून्य गुण दाखविण्यात आले आहे. या असायनमेंटस सबमिट करून घेतल्या की नाही याबाबतच संशयाचे वातावरण आहे.

मुक्त विद्यापीठाकडून पेपर गहाळ झाले असल्यास त्याचा फटका आम्हा विद्यार्थ्यांना का? पेपर सांभाळणे ही विद्यापीठाची जबाबदारी आहे. आम्हाला पुन्हा पेपर द्यायला लागू नये असे वाटते.

- श्रृती राऊत, विद्यार्थिनी

मिसिंग एन्ट्रीचा अर्थ विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही. काही तांत्रिक कारणांमुळे त्यांचा रिझल्ट लांबणीवर पडतोय इतकेच. त्यांचा रिझल्ट इतरांपेक्षा दोन दिवस उशिरा लागतो, परंतु ९९.९९ टक्के मुलांचा रिझल्ट लावण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. उरलेल्यांचाही रिझल्ट एक ते दोन दिवसात लावला जाईल.

- डॉ. अर्जुन घाटुळे, परीक्षा नियंत्रक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थात हवाई सेवेची हवाहवाई!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्याचा फायदा उठविण्यासाठी नामांकित हवाई कंपन्या सरसावल्या आहेत. नाशिकची जॉय राईड देण्यासह रामकुंड, तपोवन आणि अंजनेरी प्रदक्षिणा यासारख्या योजना आखण्यात येत असून, काही कंपन्यांनी बुकिंगही सुरू केले आहे.

१२ वर्षांनी भरणारा कुंभमेळा हा विविध व्यावसायिकांसाठीही मोठी पर्वणी ठरतो. यंदाच्या कुंभमेळ्याचा व्यावसायिक लाभ उठविण्यासाठी हवाई क्षेत्रातील कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. नोएडा येथील किंग्ज एअरवेज या कंपनीने हेलिकॉप्टर सेवा देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने शहरात मेरी पोलिस स्टेशन आणि सिडकोतील संभाजी स्टेडिअम येथे हेलिपॅडची परवानगी घेतली आहे. त्याशिवाय ओझर विमानतळ आणि त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ केंद्राच्या ठिकाणी असलेल्या कैलासराज नगरच्या मैदानावरही हेलिपॅडची परवानगी मिळवली आहे. याच कंपनीने सहा आसनी हेलिकॉप्टरद्वारे नाशिक दर्शन आणि अंजनेरी पर्वत परिक्रमा या दोन्हींसाठी प्रत्येकी ३९९९ रुपये भाडे आकारण्याचे निश्चित केले आहे. नाशकातून त्र्यंबकला जाण्यासाठी किंवा तेथून नाशिकला येण्यासाठी ३५०० रुपये भाडे जाहीर केले आहे. ओझरहून त्र्यंबकला जाण्यासाठी प्रति व्यक्ती १५ हजार, अंजनेरी परिक्रमेसाठी ७ हजार, नाशिक ते त्र्यंबक ५ हजार १०० रुपये भाडे ठेवले आहे. १४ ऑगस्टपासून सेवा सुरु होणार असल्याची माहिती संचालक संजीव पासवान यांनी 'मटा'ला दिली आहे. सरकारच्या https://kumbhmela2015.maharashtra.gov.in/1035/Home या अधिकृत वेबसाईटवर कंपनीच्या सेवेची लिंक देण्यात आली असून, त्याद्वारे प्रवाशांना तिकीट बुक करता येईल. या शिवाय मेक माय ट्रीप, श्रीनिवास एअरलाइन्स आणि कॉक्स अँड किंग्ज या कंपन्याही हवाई सेवेसाठी इच्छुक आहेत.



एमटीडीसीशी बोलणी

सिंहस्थ हा पर्यटनाचा महोत्सव असल्याने या काळात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला (एमटीडीसी) सोबत घेण्याचा अनेक कंपन्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठीच काही हवाई सेवा देणाऱ्या कंपन्यांनी एमटीडीसीशी बोलणी सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.



एअर अॅम्ब्युलन्स सुविधा

सिंहस्थाच्या काळात आपत्कालिन परिस्थितीमध्ये एअर अॅम्ब्युलन्सची सुविधा देण्यासाठीही हवाई सेवा देणाऱ्या कंपन्यांनी होकार दर्शविला आहे. त्यासाठीच सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलशी टायअप करतानाच काही प्रसंगी थेट सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून (सीएआर) देण्याचा किंग्ज एअरवेज आणि श्रीनिवास एअरलाइन्स या कंपन्यांनी जाहीर केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या प्राध्यापकांची दिल्लीत निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय प्राध्यापक संघटनेच्या वतीने दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावर आंदोलन करण्यात आले. आंदोलनात नाशिक जिल्हा पुक्टो संघटनेच्या वतीने प्राध्यापकांनी सहभाग घेतला. देशाच्या विविध भागातून मोठ्या संख्येने प्राध्यापकांनी आंदोलनात सहभाग घेतल्याची माहितीही पुक्टोच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांची दखल मानव संसाधन विकास मंत्रलयाने घ्यावी, यासाठी आंदोलन करण्यात आले होते. शिक्षणाचे व्यापारीकरण थांबवावे, २००४ ची अंशदायी निवृत्ती योजना रद्द करावी, शैक्षणिक धोरण ठरविताना शिक्षक संघटनांना सहभागी करून घ्यावे, ओरिएंटेशन व रिफ्रेशर कोर्स पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, यूजीसीच्या तिसऱ्या अँमेंडनुसार केलेल्या दुरूस्तीस मानव संसाधन विकास मंत्रालयाने मान्यता द्यावी, एपीआय नियम रद्द करावा, मानव संसाधन मंत्रालयाने प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात चर्चा करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. सतिष ठाकरे, सरचिटणीस प्रा. शरद देवरे, पुक्टोचे उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र नवले पाटील, सहचिटणीस प्रा. डॉ. नंदू पवार, प्रा. धीरज झाल्टे यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकल कॉलेजेसचा मनमानी कारभार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अन् समाजकल्याण विभाग या दोन्हीही यंत्रणाचे आदेश झुगारून राज्यातील दीडशे मेडिकल कॉलेजेस मनमानी करीत असल्याचे उघड झाले आहे. परिणामी महागडे वैद्यकीय शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी स्कॉलरशीपपासून वंचित राहत आहेत.

आरोग्य विद्यापीठांतर्गत मेडिकल कॉलेजेसना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने स्कॉलरशीप देण्यात येते. यासाठी कॉलेजेसने अद्ययावत माहिती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे सादर करण्याच्या सूचना वेळोवेळी दिल्या होत्या. मात्र, अद्यापही १४९ कॉलेजेसने विद्यापीठाच्या सूचनांनाही वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. या प्रकारामुळे राज्यातील मेडिकल कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या सर्व संस्थांनी आपली त्वरित आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे पाठवावी असे आवाहन असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नाशिक काशिनाथ गवळे व समाज कल्याण अधिकारी के. जी. बागूल यांनी केले आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विद्यापीठाकडून मान्यता दिलेल्या कॉलेजनिहाय शिक्षण फी, परीक्षा फी मंजूर संदर्भात अभ्यासक्रमांची यादी, अभ्यासक्रमाचा कालावधी, मान्य विद्यार्थी संख्या व इतर आवश्यक माहिती मे २०१५ पासून कॉलेजेसकडून मागविण्यात आली होती. अद्याप मात्र एकूण ३१६ कॉलेजेसपैकी १६७ कॉलेजेसची माहिती विद्यापीठामार्फत प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नाशिक यांना उपलब्ध करुन देण्यात आली.

कारवाईचा इशारा

आवश्यक माहिती प्राप्त करण्यासाठी विद्यापीठाकडून वारंवार लेखी पत्र, ई-मेल्स व दूरध्वनीवरुन सूचना देऊन १४९ कॉलेजेसकडून माहिती सादर करण्याची दखल घेतली गेलेली नाही. या कॉलेजेसने त्वरित माहिती दाखल न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा आरोग्य विद्यापीठाच्या वतीने देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘होल्ड अॅण्ड रिलीज’चे पर्वणीकाळात नियोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पर्वणीच्या दिवशी घाटांवर भाविकांची प्रमाणापेक्षा अधिक गर्दी होऊ नये यासाठी होल्ड अॅण्ड रिलीज प्रणाली अत्यंत सुक्ष्मपणे राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. राजमुंद्री येथून अभ्यास दौऱ्याहून परतल्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला.

राजमुंद्री येथे गेल्या महिन्यात चेंगराचेंगरीची घटना घडली होती. त्यामध्ये अनेक भाविकांनी जीव गमावला. ही घटना कशामुळे घडली व आपल्याकडे ती घडू नये यासाठी कोणती खबरदारी घेता घ्यावी याचा अभ्यास करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे एक पथक नुकतेच राजमुंड्री येथे जाऊन आले. तेथील ‌नियोजनात काही त्रूटी राहून गेल्याचे स्थानिक प्रशासनाने मान्य केले आहे. या त्रूटी आपल्याकडे राहणार नाहीत, याची काळजी येथे घेतली जाईल. ही माहिती अप्‍पर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली.

घाटांवर जाण्यासाठी जेवढे प्रवेशमार्ग असतील त्यापेक्षा दुप्पट प्रवेशमार्ग भाविकांना बाहेर येता यावे यासाठी ठेवा असा सल्ला तेथील प्रशासनाने अभ्यास समितीला दिला आहे. त्यांच्याप्रमाणेच आपणही होल्ड अॅण्ड रिलीज (थांबवा आणि सोडा) प्रणाली वापरणार असलो तरी तिचे सूक्ष्म नियोजन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. एका घाटावर एकावेळी किती लोक थांबू शकतात याचा अंदाज घेऊन त्यानुसार केवळ ७५ ते ८० टक्केच भाविकांनाच तेथे एकावेळी सोडण्यात येणार आहेत. गर्दीचा अंदाज घेऊन एक ते दोन किलोमीटरपर्यंत हे होल्ड अॅण्‍ड रिलीज पॉइंट असू शकतात, अशी माहिती गावडे यांनी दिली.

पोलिसांनीही दुर्घटना टाळण्यासाठी नियोजनात आणखी काही गोष्टींचा अंतर्भाव करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांनी दिली. त्यामध्ये गर्दीत सापडलेल्या भाविकांनी ऐनवेळी प्रशासनाची मदत घेण्याचे ठरविले तरी त्यांना आपण नेमके कोणत्या ठिकाणी आहोत हे सांगणे कठीण होईल. त्यामुळे तेथील विद्युत खांबांना क्रमांक देण्याची सूचना जिल्हा प्रशासनाला केली आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या भाविकांना मदत पोहोचविणे सोपे होणार आहे. कोणतीही आपत्ती घडल्यास अथवा कुठल्याही तातडीच्या क्षणी उपयोगात आणता याव्यात यासाठी घाट परिसरात ७० मोटरसायकल्स ठेवण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेता दोनशे मोटरसायकल्स ठेवण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. गर्दीत जेथे कार किंवा अन्य मोठी वाहने बाहेर काढणे कठीण होईल तेथे ही वाहने मदतीसाठी वापरण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मचानवरचा अवलिया रघुवीरदास

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हटयोगी साधूंच्या साधना अत्यंत विचित्र पध्दतीच्या असतात. कुणी काट्यावर झोपून तपश्चर्या करते तर कुणी स्वत:चे मुंडके जमिनीत खुपसून साधना करते. कुणी पाण्यात एका पायावर उभे राहून तर कुणी सूर्याकडे पाहून साधना करते. हटयोगी बाबांच्या साधनेचे हे प्रकार पाहताना सध्या नाशिककर अचंबित होत आहेत. या सर्व बाबांमध्ये ठळकपणाने ज्याचा उल्लेख होईल ते म्हणजे स्वामी रघुवीरदास महाराज. पाच महिने जमिनीवर पाऊल न ठेवण्याचा त्यांचा संकल्प आहे.

इंदूर येथील चित्रकुट धाम आश्रमातील रघुवीरदास महात्यागी फलाहारी महाराज यांनी साधुग्राममधील बटूक हनुमान मंदिराजवळ २७ जुलैपासून मचानवर तपश्चर्या प्रारंभ केली आहे. पर्वणी काळात मचानावरच राहून तपश्चर्या करण्याचा त्यांचा मानस असून २२ नोव्हेंबरपर्यंत जमिनीवर न येण्याचा संकल्पही त्यांनी केला आहे. आम्ही हटयोगी अग्निवर शिजवलेले कोणतेही अन्न खात नसल्याने गेल्या १७ वर्षांपासून मी केवळ फळे खात आहे. तोच माझा आहार आहे असेही ते म्हणाले. तपश्चर्येमध्ये मंत्रसाधना करण्यावर त्यांचा भर आहे. एक मंत्राचे पुरश्चरण रघुवीरसाद करीत आहेत. जमिनीपासून दहा फूट उंच असलेल्या मचानावरच त्यांची राहण्याची, खाण्याची, पिण्याची, झोपण्याची व शौचादीकर्मे करण्याची व्यवस्था करून दिली आहे. बाबा म्हणतात, परमात्म्याच्या प्राप्तीसाठी हे व्रत अंगीकारले असून, आता त्याच्या प्राप्तीनंतरच हे फलाहाराचे व्रत सोडणार आहे. त्यासाठी जेथेही कुंभमेळा असेल तेथे रघुवीरदास महाराज जातात व मचानावर तपश्चर्या सुरू करतात. आता तर त्यांना लोक मचानबाबा म्हणूनच ओळखू लागले आहेत.

महाराजांची तपश्चर्या अन् भय्यालालची होते परीक्षा

रघुवीरदास महाराजांच्या सेवेसाठी इंदूरहूनच भय्यालाल नावाचा एक साधक आलेला असून, त्यांची सेवा करण्यालाच आपला धर्म मानतो. ही सेवा अत्यंत कठीण असल्याचे तो सांगतो. रघुवीरदास महाराजांना काहीच कमी-जास्त चालत नाही. सर्व नियोजन व्यव‌स्थित करावे लागते. उणे काहीही नको असते. ते शिघ्रकोपी असल्याचेही भय्यालाल याने सांगितले.

हटके साधना

गेल्या १७ वर्षांपासून हे बाबा केवळ फळांवर जगत आहेत. त्यांची साधना मोठी विचित्र पध्दतीची आहे. उन्हाळ्यामध्ये अग्नि प्रज्ज्वलित करून त्याच्या समोर बसून ते साधना करतात. हाडे गोठवणाऱ्या कडाक्याच्या हिवाळ्यात ते डोक्यावर थंड पाण्याचे मडके घेऊन तपश्चर्या करतात. ते म्हणतात, ही हटयोगातील सर्वात कठीण तपश्चर्या आहे. ही साधना ऋतुच्या विरोधात जाऊन केलेली असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाराशे स्वयंसेवकांचे कुंभासाठी योगदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्याच्या व्यवस्थेत विविध आघाड्यांवर केटीएचएम कॉलेजमधील सुमारे १२०० स्वयंसेवक योगदान देणार आहेत. या स्वयंसेवकांची एकदिवसीय कार्यशाळा रावसाहेब थोरात सभागृहात पार पडली. यावेळी प्रशासकीय अधिकारी आणि तज्ज्ञांनी त्यांच्याशी संवाद साधला.

मविप्रच्या सोबतीला महापालिका, कुंभथॉन आणि बॉश युनायटेड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, सरचिटणीस नीलिमा पवार, उपमहापौर गुरुमीत बग्गा, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, रासेयो प्रमुख प्रा. बी. जे. भंडारे, बॉश युनायटेडच्या इना जुर्गा, साराप्लास्टच्या हर्षदा जाधव, कुंभथॉनचे डॉ. सचिन पाचोरकर आदींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना कुंभातील संभाव्य जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली.

सिंहस्थ ही बारा वर्षांनी एकदाच येणारी पर्वणी आहे. स्वयंसेवक म्हणून काम करण्याची तुम्हाला चांगली संधी आहे. या कामामुळे तुम्हाला निश्चितच समाधान मिळेल, असे नीलिमा पवार यांनी सांगितले. सिंहस्थामध्ये स्वच्छतेच्या जबाबदारी बरोबरच स्वयंसेवकांना दक्ष पोलिसाची भूमिका पार पाडावी लागेल, असे आवाहन महापौर अशोक मुर्तडक यांनी केले. सिंहस्थात शहरातील कचरा, स्वच्छता व वाहतूक व्यवस्थापनाचा आढावा मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितला. बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांची काळजी घेणे यजमान म्हणून आपले कर्तव्य आहे, असे सांगत विद्यार्थ्यांना जबाबदारीची आठवण प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी करून दिली. उपमहापौर गुरुमित बग्गा, शिक्षणाधिकारी प्रा. एस. के. शिंदे, प्रा. डॉ. कल्पना अहिरे, रासेयोचे प्रा. राजेंद्र गुंजाळ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक व्यवस्थेचा उडाला बोजवारा

$
0
0

म. टा. प्रति‌निधी, नाशिक

रामकुंडाकडे जाणाऱ्या दहीपुलासारख्या प्रमुख रस्त्यावर दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या उग्र बनत चालली आहे. रोजच्या वर्दळीत भाविकांचीही भर पडत असून, पुढील दोन महिन्यांसाठी या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी केली जात आहे.

पावसाची उघडीप आणि सुटीचा शनिवार यामुळे शनिवारी दहीपूल परिसरात वाहनांची मोठी वर्दळ होती. अरूंद रोडवर पुढे जाण्याच्या प्रयत्नातील वाहनचालकांकडून कोंडी होण्यास सुरुवात झाली. स्थानिकांनी वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा तितकासा फायदा झाला नाही. चारही बाजूंनी चौकात येणाऱ्या वाहनांमुळे एकाही वाहनाला पुढे जाता येत नव्हते. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंडासहीत साधुग्राममध्ये जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत असून, किमान पुढील दोन महिन्यांसाठी या परिसरात वाहतूक पोलिसांची संख्या वाढवण्याची मागणी केली जात आहे.

कॉलेजरोडही जॅम

बीवायके कॉलेजसमोरील चौफुलीजवळील मॉल्समध्ये आलेल्या ग्राहकांनी निम्म्यारस्त्यावरच वाहनांची पार्किंग केली. याचा फटका इतर वाहनचालकांना बसला. विविध मॉल्समध्ये येणाऱ्या ग्राहकांची वाहने रस्त्यावर पार्क होणार नाहीत, याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे किंवा वाहतूक पोलिसांनी थेट कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

पोलिस आले आणि गेले!

वाहतूक कोंडी झालेली असताना याठिकाणी पोलिसांचे एक पथक दाखल झाले. पोलिसांना पाहून सर्व वाहनचालकांना हायसे वाटले. मात्र, पोलिसांनी पुढे जाण्यासाठी मार्ग काढला आणि या वाहतूक कोंडीशी आपला काहीही संबंध नसल्याचे दाखवत ते निघून गेले. वास्तविक पोलिसांनी दोन मिनिटे तेथे थांबून नियोजन केले असते तर वाहतूक सुरळीत झाली असती. मात्र, पोलिसांनी दुर्लक्ष केले. यामुळे वाहनचालकांच्या संतापात भर पडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागेसाठी खालशांमध्ये रस्सीखेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खालशांसाठी पुरेशी जागा नसणे, हा वादाचा विषय ठरू पहात आहे. उशिराने साधुग्राममध्ये दाखल होणारे खालसे जागेसाठी आक्रमक भूमिका घेत असून, वादाचा मुद्दा गुद्द्यावर पोहचला आहे. अपुऱ्या जागेमुळे काही साधू-महंत आपसात भिडत असून, आखाड्याच्या ध्वजारोहणापर्यंत हमरी-तुमरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता साधू व्यक्त करीत आहेत.

नाशिकमधील साधुग्राममध्ये तीन अनी आखाडे, ७५० खालसे, ४०० पेक्षा अधिक धार्मिक संस्था, तीन ते चार जगदगुरू यांच्यासाठी सुविधा निर्माण केल्या आहेत. निर्वाणी, निर्मोही आणि दिगंबर या तीन आखाड्यात एकूण १८ आखाड्यांचा समावेश असून तिन्ही अनी आखाडे, चर्तुसंप्रादाय आणि जगदगुरूंसाठी आवश्यक ती जागा दिली. मात्र, दिगंबर अनी आखाड्यासाठी पुरेशी जागा ​नसल्याचा दावा मध्येच करण्यात येतो. त्यातच खालशांना पुरेशी जागा नसल्याचा वाद अनेकदा उद्भवला आहे. औरंगाबादरोडवरील नव्याने निर्माण केलेल्या सेक्टर तीनमधील खालशांच्या जागा वाटपावरून दिगंबर आखाड्याचे श्री महंत रामकृष्णदास शास्त्री आणि निर्मोही अनी आखाड्याचे महामंत्री गौरीशंकर महाराज यांच्यात तू तू में में झाली होती. यानंतर, दिंगबर अनी आखाड्याच्या अन्नछत्रात खुसघोरी झाल्यावरून काही त्यागी व विश्वंभरदास यांच्यात वाद झाला. १९ ऑगस्ट रोजी आखाड्यांचे ध्वजारोहण पार पडणार आहे. त्यापूर्वी शतप्रतिशत खालसे साधुग्राममध्ये दाखल होणार असून, त्यांना जागा कोठे द्यायची असा प्रश्न आखाड्यांच्या प्रमुखांना पडला आहे. आखाड्याची ही भूमिका असताना आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास हे मात्र सर्व आलबेल असल्याचा दावा करतात. दोन चार खालशांच्या जागेचा प्रश्न असून लवकरच त्यावर तोडगा निघेल, असे ग्यानदास म्हणतात. प्रत्यक्षात ९० ते १०० खालशांना पर्याप्त जागा नसून, जस जसे खालशांचे प्रमुख साधुग्राममध्ये दाखल होत आहेत, तसे नवनवीन वाद उद्भवत असल्याचे दिसते. प्रत्येक खालसा आपल्यासाठी मुबलक जागा मागत असल्याने सर्वांचीच पंचाईत होत आहे. यामुळे जागा वाद पेटणार आहे.

नाशिकमधील सुविधा उत्तम

देशात चार ठिकाणी ​कुंभमेळ्याचे आयोजन होते. मात्र, नाशिकमध्ये मिळणाऱ्या सुविधा खूपच चांगल्या असून, याचमुळे १०० टक्के खालसे साधुग्राममध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते. गेल्या वेळेस ४५० च्या जवळपास खालशांनी साधुग्राममध्ये मुक्काम केला होता. यावेळेस हा आकडा ७५० पर्यंत जाईल, असा दावा एका महंतांनी केला. रोड फ्रंटसाठी सगळा आटापिटा असून, पैशांचे वजन महत्त्वाचे असल्याचा दावा सदर महतांनी नाव न छापण्याच्या अटीवर केला. यामुळे जागेचा मुद्दा सर्वाथाने कळीचा ठरणार असून प्रशासन व आखाडा प्रमुखांना डोकुदुखी ठरणार आहे.

मग, जागा गेली कुठे?

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी किती आखाडे, खालसे आणि धार्मिक संस्था येणार याची माहिती प्रशासनाला होती. त्यामुळेच नवीन १२५ एकर जागा तात्पुरती संपादन करीत साधुग्रामसाठी एकूण ३२५ एकर जमीन वापरण्यात आली. जमीन वाढली म्हणजे खालशांना जागा मिळणे अपेक्षित होते. मात्र, तसे झालेले नाही. खालशांच्या ज​मीन वाटपात नक्कीच काळेबेरे झाले असून, त्यावर प्रशासनाने प्रकाश टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ प्रतिनिधीसाठी गुणवत्तेचाच निकष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत कॉलेज स्तरावर होणाऱ्या विद्यापीठ प्रतिनिधींच्या निवडणुका सोमवारी (१० ऑगस्ट) होणार आहेत. यंदाही लोकशाही ऐवजी गुणवत्तेच्या निकषावरच निवडणुका घेतल्या जाणार आहेत.

शहरातील सर्व कॉलेजेसमध्ये एकाच दिवशी या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. लोकशाही पद्धतीने कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांना सामावून घेत निवडणुका घेण्याचा निर्णय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिला होता. विद्यार्थी संघटनांची मागणी व सर्वसमावेशक निवडणुका होण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयाला अधिकृत बाजू अद्यापही प्राप्त न झाल्याने गुणवत्तेच्या आधारावरच निवडणुका घेण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला आहे. त्यानुसार या निवडणुका सोमवारी होणार आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे २४ ऑगस्टपर्यंत कॉलेजेसना विद्यापीठाकडे सादर करायची आहेत.

गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांसह एनएसएस, एनसीसी, क्रीडा, वर्ग प्रतिनिधी, महिला प्रतिनिधी व सांस्कृतिक प्रतिनिधी हे विद्यार्थी विद्यापीठ प्रतिनिधी होण्यास पात्र ठरणार आहेत. कॉलेजचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न, समस्या विद्यापीठाकडे पोहोचविण्याच्या दृष्टीने विद्यापीठ प्रतिनिधी महत्त्वाची भूमिका बजावत असतो. विद्यार्थ्यांना थेट विद्यापीठापर्यंत पोहोचवण्यास या प्रतिनिधीची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत असल्याने सर्वच विद्यार्थ्यांचे लक्ष या निवडणुकांकडे लागले आहे.

लोकशाही पद्धतीने विद्यापीठ प्रतिनिधीची निवड करण्याचे नियोजन जरी असले तरी या शैक्षणिक वर्षात तरी त्याची पूर्तता होणार नाही. येत्या हिवाळी अधिवेशनात लोकशाही पद्धतीने निवडणुका घेण्याच्या निर्णयावर फेरविचार केला जाऊन त्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षांच्या निवडणुकांचे नियोजन केले जाण्याची शक्यता आहे. यामुळे यंदा गुणांचा निकष ग्राह्य धरला जाणार आहे.

- रावसाहेब शिंदे,

समन्वयक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सावरकरांचे स्मारक पर्यटन केंद्र व्हावे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी देवळाली कॅम्प

सावरकरांचे स्मारक हे फक्त स्मारक न राहता आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन केंद्र व्हावे. यामुळे येथील भूमिपुत्रांना रोजगाराची उपलब्धता होईल, असे प्रतिपादन युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केले.
भगूर येथील सावरकर स्मारकात सावरकर वाडा नूतनीकरणाच्या कामाचा प्रारंभ युवा सेनाध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी सावरकर जन्मस्थळाची भेट घेत वाड्याची पाहणी केली. सावरकरांच्या वाड्यातील छायाचित्रांची पाहणी करीत माहिती घेतली.

त्यांच्या समवेत सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, भगूरच्या नगराध्यक्षा अनिता करंजकर, आमदार योगेश घोलप, अजय बोरस्ते, पुरातत्व विभागाचे श्रीकांत घारपुरे आदी उपस्थित होते. येथील शिवाजी चौकात आयोजित कार्यक्रमप्रसंगी भगूर नगरपरिषदेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. इगतपुरी तालुक्यातही ‌आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रस्ता कामांचा प्रारंभ करण्यात आला. आंबेवाडी ते भंडारदरावाडी या एक कोटी रुपयाच्या रस्ता कामाला प्रारंभ केला आहे. खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून या कामाला सुरुवात करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images