Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

इगतपुरी महिंद्रात ‘टूल डाउन’

0
0
‘महिंद्रा अँड महिंद्रा’च्या इगतपुरी येथील प्लाण्टमध्ये भारतीय कामगार सेनेने मंगळवारी सकाळपासून टूल डाउन (काम बंद) आंदोलन पुकारले आहे.

उन्हाळ्याच्या सुटीत डान्सची धमाल

0
0
उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की शहरात अनेक वर्कशॉप्स सुरू होतात. परंतु बहुतांश वेळा ही वर्कशॉप्स ठराविक वयोगटासाठीच आयोजित केली जातात. म्हणूनच ‘महाराष्ट्र टाइम्स’मार्फत यंदाही मुला-मुलींसह महिलांसाठीही ‘लेट्स डान्स’ हा डान्स वर्कशॉप होत आहे.

मॉकटेलच्या दुनियेत रमल्या सख्या

0
0
चहा, कॉफी, आइस्क्रीम, ज्युस यांसारख्या पेयांची माहिती असणाऱ्या महिलांना ‘मॉकटेल’ या ट्रेंडी पेयाची माहिती मिळाली. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने आयोजित केलेल्या मॉकटेल मेकिंग वर्कशॉपमध्ये या महिलांना एक नवीन प्रकार शिकण्याची संधी मिळाली.

... पण निकालावरील विघ्न कसे टळणार?

0
0
पदवी परीक्षांच्या कामकाजावर बहिष्काराचे आंदोलनास्त्र उपसून दोन महिने उलटले आहेत. कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार या परीक्षांचा श्रीगणेशा झाला असला तरी परीक्षा पार पडल्यानंतर पेपर तपासणीसाठी भक्कम फळी उभी करण्याचे आवाहन विद्यापीठासमोर आहे.

परीक्षेनंतर यंदा मिळणार रिव्हॅल्युएशनचे गुण

0
0
फेब्रुवारी महिन्यात प्राध्यापकांनी विविध मागण्यांसाठी संप छेडल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर दुहेरी आव्हान उभे ठाकले होते. मात्र या प्रश्नी विद्यापीठाने पुढाकार घेऊन तात्पुरत्या व्यवस्थेतून परीक्षेचे नियोजन केले खरे.

बजेटमधील जमाखर्चाकडे सत्ताधा-यांचे दुर्लक्ष

0
0
प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकात स्थायी समितीने भरमसाठ वाढ केली आहे. महापालिकेकडे येणारे उत्पन्न आणि होणारा खर्च यात मोठी तफावत असून निव्वळ आकडे वाढवण्यावर भर देण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी केला.

अडथळा ठरणा-या होर्डिंग्जविरोधात कारवाई

0
0
उन्हाळी सुट्या, गुढीपाडवा व अन्य उत्सवामुळे शहरात शेकडो संख्येने होर्डिंग लागले आहेत. महापालिकेने होर्डिंग लावण्यासाठी परवानगी दिली असली तरी वाहतुकीला अडथळा ठरणा-या होर्डिंगविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वाडकरप्रकरणी सुनावणी शुक्रवारी

0
0
जमीन व्यवहारात फसवणूक झाल्याप्रकरणी सुरेश वाडकर यांनी प्रांत विनय गोसावी यांच्याकडे दाखल केलेल्या अपिलावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. या प्रकरणी बुधवारी सुनावणी होणार होती.

देवळाली कॅम्पची निवडणूक लांबली

0
0
गेल्या अनेक दिवसांपासून देवळाली कॅम्पचे रहिवासी ज्या प्रतीक्षेत होते, ती देवळाली कॅम्पची निवडणूक केंद्र सरकारने पुढे ढकलली आहे.

अजितदादांविरोधात मनसेचा मोर्चा

0
0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुष्काळग्रस्तांची थट्टा करणाऱ्या वक्तव्याचा नाशिकमधील विरोधकांकडून जोरदार समाचार घेतला जात आहे. सोमवारी शिवसेनेने पवारांविरोधात चप्पलमार आंदोलन केले.

अँटिक दागिन्यांची क्रेझ

0
0
‘जुने ते सोने’ ही म्हण सोन्यालाही लागू पडत असून गुढीपाडव्यानिमित्त नाशिकच्या सराफी दालनांमध्ये पेशवाई, मुघलकालीन, निजामकालीन दागिन्यांचे ट्रेंडी कलेक्शन आले आहेत.

दुष्काळींना सेवामार्गाचा आधार

0
0
राज्यातील दुष्काळी भागातील जनतेला विविध उपाययोजनांतून मदतीचा हात देण्यासाठी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे हाती घेतल्या जाणा-या दुष्काळ निवारण अभियानाचा गुरुवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्र्यंबकेश्वरात शुभारंभ होणार आहे.

‘सीएम’च्या प्रतीक्षेत ‘व्हीएन’

0
0
उत्तर महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेत ज्यांचे आदराने नाव घेतले जाते, त्या क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या मोरवाडी येथील पुतळा केवळ मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नाही म्हणून उद्घाटनासाठी तिष्ठत आहे.

सातपूर एमआयडीसी सातपूर औद्योगिक वसाहतीची

0
0
सातपूर औद्योगिक वसाहतीची निर्मिती १९६२ च्या सुमारास करण्यात आली. ६३६ हेक्टर एवढ्या परिसरात ही वसाहत आहे. येथील १२०० भुखंड विकसित करण्यात आले आहेत. गाळे असलेल्या एकूण ५ बिल्डींग आहेत. १९९४मध्ये दोन मजली स्वरूपाचे गाळ्यांचे ४ प्रकल्प साकारण्यात आले. यात एकूण १००हून अधिक गाळे उपलब्ध झाले आहेत.

विज्ञान केंद्रातर्फे १४ पासून कार्यशाळा

0
0
आनंदनिकेतन शाळेच्या डॉ. कमला सोहोनी विज्ञान केंद्रामार्फत विद्यार्थ्यांसाठी सुटीतील उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक गोडी निर्माण करण्यासाठी उभारण्यात आलेल्या या विज्ञान केंद्रामार्फत तीन कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत.

'चर्मकार' महामंडळाशी मुक्त विद्यापीठाचा करार

0
0
राज्य सरकारचे चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ (लीडकॉम) आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

तंबूमध्ये दिसणार 'टुरिंग टॉकिज'

0
0
वेगळ्या विषयामुळे निर्मिती अवस्थेपासूनच चर्चेत असणारा व अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गौरवला गेलेला 'टुरिंग टॉकिज' हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात तंबूमध्ये पाहण्याची मजा प्रेक्षकांना मिळणार असून त्यासाठी तंबू उभारण्याची जय्यत तयारी होत आहे. विशेष म्हणजे शंभर वर्षांनंतर पहिल्यांदाच चित्रपट तंबूमध्ये दाखविण्याचा प्रयोग होत आहे.

मिळाला सुंदर त्वचेचा मंत्र

0
0
ऋतू कोणताही असला तरी त्वचेची काळजी घेणे अपरिहार्य असते. म्हणूनच 'महाराष्ट्र टाइम्स'ने 'बनवा फेस पॅक घरच्या घरी' या सेमिनारचे आयोजन केले होते. घरच्या घरी आपली त्वचा कशी सुंदर बनवायची, याचा मंत्र या कार्यक्रमात महिलांना मिळाला.

रेल्वे संघटनांकडूनच स्टेशनचे विद्रूपीकरण

0
0
भारतीय रेल्वे कामगार संघटनांच्या मान्यतेसाठी संपूर्ण भारतात १७ विभांगामध्ये मतदान होत आहे. त्यासाठी नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर कामगार संघटनांनीच मोठ्या प्रमाणात जाहिरात लावून रेल्वे स्टेशनचे विद्रुपीकरण सुरु आहे.

शहरात दोन ठिकाणी चेन स्नॅचिंग

0
0
गुढीपाडव्याच्या सणानिमित्त सुरू असलेल्या लगबगीचा फायदा घेत चोरट्यांनी दोन ठिकाणी चेन स्नॅचिंग करून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला. यातील एक घटना अंबड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गोविंदनगर येथे तर दुसरी घटना महापालिकेजवळ घडली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images