Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शाहीस्नान क्रम निश्चित

$
0
0

पहिला मान श्री पंचदशनाम जुना आखाड्याला

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथील षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती यांच्या आश्रमात दहाही आखाड्यांचे प्रतिनिधींसोबत जिल्हा प्रशासनाने बैठक घेऊन शाहीस्नानाच्या क्रम आणि वेळेबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली.

षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी महाराज, महामंत्री हरिगिरी महाराज आणि सर्व दहा आखाड्यांचे प्रतिनिधी, साधू-महंत यांच्या समवेत जिल्हा प्रशासनाने बैठक घेतली. याप्रसंगी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते, मेळाधिकारी गावडे, महेश पाटील, उदय किसवे, प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे तसेच मुख्याधिकारी निवृत्ती नागरे आणि अन्य प्रशासकीय अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

प्रथम शाही पर्वणी (२९ ऑगस्ट) आणि तिसरी शाही पर्वणी (२५ सप्टेंबर २०१५) यावेळी पहिली मिरवणूक श्री पंचदशनाम जुना आखाडा, श्री पंचदशनाम आवाहन आखाडा, श्री पंचदशनाम आवाहन आखाडा अशी असेल. दुसरी मिरवणूक तपोनिधी श्री निरंजनी आखाडा व श्री आनंद आखाडा अशी असेल. तिसरी मिरवणूक श्री शंभू पंचायती अटल आखाडा व श्री शंभू पंचायती महानिर्वाणी आखाडा अशी असेल. या मिरवणुका कुशावर्तावर स्नान करून गेल्यानंतर वैष्णव आखाड्यांसाठी दोन तास राखीव असतात. त्यानंतर चौथी मिरवणूक श्री पंचायती बडा उदासीन आखाडा, पाचवी मिरवणूक श्री पंचायती नया उदासीन आखाडा, सहावी मिरवणूक श्री पंचायती निर्मल आखाडा असा क्रम असेल. हा क्रम गत सिंहस्थातात निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये दुसरी शाहीपर्वणी मुख्य शाही स्नान या दिवशी पहिली मिरवणूक तपोनिधी श्री निरंजनी व तपोनिधी आखाडा श्री आनंद आखाडा यांची असेल आणि दुसरी मिरवणुक श्री पंचदशनाम जुना आखाडा,श्री पंचदशनाम आवाहन आखाडा,श्री पंचदशनाम आवाहन आखाडा अशी असेल व त्यानंतर निघणारी तिसरी मिरवणूक व पुढील सर्व सहाव्या मिरवणुकांपर्यंत सर्व मिरवणुकांचा क्रम वरील प्रमाणे असेल.

साधरणत: पहाटे चार वाजता पहिल्या मिरवणुकीतील साधू आखाड्यांतून निघतील व ठरलेल्या ठिकाणी जमा होतील आणि कुशावर्तावर ठरलेल्या वेळेत पोहचतील. स्नानकरून ते मंदिरात दर्शनासाठी जातील व पुन्हा आखाड्यात परत जातील. सर्वांत शेवटची मिरवणूक १२ वाजे पर्यंत आखाड्यात पोहचली म्हणजे भाविकांना स्नानासाठी वेळ देता येईल, अशी आपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

गॅजेटमध्ये नोंद

२००३ पूर्वी पहिली मिरवणूक पाच आखाड्यांची व दुसरी मिरवणूक दोन आखाड्यांची अशी होती. मात्र, वाढती गर्दी आणि सुनियोजनासाठी तीन, दोन आणि दोन अशी योजना करण्यात आली. त्यामध्ये तीन आखाड्यांना दोन शाहीस्नानात पहिला सन्मान देण्यात आला व दोन आखाड्यांना मधल्या म्हणजे दुसऱ्या शाहीस्नानात त्या दोन आखाड्यांना पहिला सन्मान दिला आहे. सर्वानुमते हे निश्चित करण्यात आले व शासन गॅजेट नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आश्वासने घेऊन ‘निमा’ माघारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हजारो कोटींच्या गुंतवणुकीतून उद्योग वर्तुळाची रयाच बदलून टाकणारे 'फॉक्सकॉन' आणि 'जनरल मोटर्स' हे महत्वाकांक्षी प्रकल्प अखेर पुण्यातच राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. या गुंतवणुकीसाठी कंपनीने पुण्यालाच प्राधान्य दिल्याने भविष्यातील नव्या प्रकल्पांसाठी नाशिकचा विचार नक्कीच होईल, या आश्वासनावर 'निमा' च्या शिष्टमंडळाला मंगळवारी माघारी परतावे लागले.

निमाचे अध्यक्ष संजीव नारंग, सरचिटणीस मंगेश पाटणकर, हर्षद ब्राह्मणकर, मनिश रावल, संदीप भदाणे, आयमाचे सुरेश माळी, ज्ञानेश्वर गोपाळे शिष्टमंडळात सहभागी झाले होते. फॉक्सकॉनच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी एअर कॉर्गोची नितांत आवश्यकता होती. कंपनीने नाशिकसह औरंगाबाद आणि नागपूर या शहरांच्या तुलनेत पुण्याचीच अखेर निवड केली. मोठ्या उद्योगातील गुंतवणुकीसंदर्भात नाशिकला कायमच डावलण्यात येत आल्याचा मुद्दा शिष्टमंडळाने मांडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅड. राहुल ढिकलेंना बढती

$
0
0

मनसेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक शहराध्यक्ष अॅड. राहुल ढिकले यांना पक्षातर्फे थेट प्रदेश उपाध्यक्षपदी बढती देण्यात आली आहे. माजी आमदार वसंत गितेंनी पक्ष सोडल्यानंतर राज्य पातळीवरील एकही नाशिकच्या नेत्याला वरिष्ठ पातळीवर स्थान नव्हते. ढिकले यांच्या रुपाने प्रथमच नाशिकला प्रदेश उपाध्यक्षपद मिळाले आहे. आता शहराध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

मनसेतर्फे मुंबईतून पक्षाच्यावतीने राज्यातील नव्या शिलेदारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात नवीन कार्यकारिणीत नाशिकचे शहराध्यक्ष अॅड. ढिकले यांना थेट प्रदेशाध्यक्षपदासाठी बढती देण्यात आली आहे. नव्या नियुक्तीने नाशिकला थेट प्रथमच प्रदेश उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. माजी आमदार वसंत गिते आणि अतुल चांडक यापूर्वी पक्षाच्या सरचिटणीस पदावर होते. मात्र, गितेंनी पक्ष त्याग केला आहे, तर चांडकही पक्षापासून दूर आहेत. त्यामुळे नाशिक मनसेचा गड असूनही प्रदेश पातळीवर एकही नेता नव्हता. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर मनसेत बदल करण्याचे संकेत राज ठाकरेंनी दिले होते. त्यासंदर्भात नाशिकच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चाही केली होती. मात्र, जिल्हाध्यक्षांची निवड वगळता काही बदल झाले नव्हते.

शहराध्यक्षपदाबाबत उत्सुकता

मुंबई आणि नाशिक महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी पुन्हा फेरबदल करण्यास सुरूवात केली आहे. नाशिकला थेट उपाध्यक्षपद देवून नाशिकचेही वजन वाढविण्यात आले आहे. मात्र, त्याचवेळी माजी आमदार नितीन भोसलेंना कार्यकारिणीत डावलण्यात आले आहे. तर दुसरीकडे ढिकलेंची बढती झाल्याने शहराध्यक्षपदावर वर्णी लागण्यासाठी आता इच्छुकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. महापालिकेची निवडणूक बघता नव्या दमाच्या नेत्याकडे हे पद दिले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी अनेक नावे पक्षासमोर आहेत. मात्र, तूर्तास वाद नको म्हणून ठाकरे यांच्या आगामी दौऱ्यात यावर विचार केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्वणीसाठी आठ नियंत्रण कक्ष

$
0
0

नाशिकसह त्र्यंबकेश्वरमध्ये अखंड वीज पुरवठ्यासाठी महावितरणची तयारी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात अखंडित व योग्य दाबाने वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने विविध उपाययोजना केल्या असून आठ ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारले आहेत.

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध विद्युतीकरणाच्या कामांसाठी सिंहस्थ आराखड्यात सुमारे २४.५६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.नाशिक शहरासाठी साधारणपणे १६६ मेगावॅट तर त्र्यंबकेश्वरसाठी १३.०४ मेगावॅट इतका विद्युतभार अपेक्षित आहे. त्यात साधुग्राम, वाहनतळे, घाट परिसर, पोलिस बराकी, चौक्या, वॉच टॉवर्स आदींचा समावेश आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर मिळून सध्याची विजेची क्षमता साडेपाचशे मेगावॅट असून अतिरिक्त क्षमता २५ मेगावॅट इतकी आहे. या दोन्ही ठिकाणी २४७ रोहित्र अस्तित्वात असून नव्याने नाशिकमध्ये ३८ तर त्र्यंबकेश्वर येथे २४ रोहित्र बसविण्यात आले आहेत. आहे. सध्या अस्तित्वातील ४६ रोहित्रांची क्षमता वाढविण्यात आली आहे.

नाशिक शहरात रामकुंड, गणेशवाडी, साधुग्राम येथे उपकेंद्र असून त्याशिवाय तपोवन आणि गणेशवाडी येथे ३३/११ केव्ही, १० एमव्हीए क्षमतेची दोन नवीन उपकेंद्रे कार्यन्वित करण्यात आली आहेत. तपोवनमधील उपकेंद्र हे भविष्यातील शंभर वर्षांचा विचार करून उभारण्यात आले असून याचा कुंभमेळ्यासाठीच कायमस्वरुपी वापर होणार आहे. या भागात पूर्वी गणेशवाडी, मेरी, टाकळी येथून वीजपुरवठा व्हायचा. तपोवन उपकेंद्रामुळे या भागाने विजेचा दाब योग्य राहण्यास मदत होणार आहे.

लक्ष्मीनारायण पूल ते कन्नमवार पूलादरम्यान गोदावरी नदीच्या घाटावर असलेल्या पाच उच्चदाब विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यात आलेल्या आहेत. साधुग्राम, शाहीमार्ग आदी भागातील गर्दी आणि वर्दळ लक्षात घेता भाविकांच्या सुरक्षिततेसाठी या ठिकाणच्या उच्च व कमी दाब वीजवाहिन्या भूमिगत करण्यात आल्या आहेत, असे महावितरणचे अधिक्षक अभियंता आर. डी. चव्हाण यांनी सांगितले. रामकुंड परिसरात मेरी उपकेंद्रातून होणारा विद्युतपुरवठा खंडित झाल्यास गणेशवाडी येथील नवीन उपकेंद्रातून वीजपुरवठा करण्यात येणार आहे.

येथे आहेत नियंत्रण कक्ष

वीज पुरवठा सुरळीत रहावा व वेळीच तक्रारींचे निरसन व्हावे यासाठी महावितरणतर्फे साधुग्राम सेक्टर १, तपोवन, मेरी, सिव्हिल, गणेशवाडी, टाकळी, त्र्यंबकेश्वर आणि खंबाळे येथे नियंत्रण कक्ष कार्यन्वित करण्यात आले आहे. अखंडीत वीज पुरवठ्यासाठी तपोवन आणि गणेशवाडीतील नवनिर्मित उपकेंद्रे कार्यन्वित केले आहे. भूमिगत वाहिन्यांच्या व्यवस्थापनासह वीजपुरवठ्याच्या अचानक उद्भवणाऱ्या समस्यांवर तात्काळ उपायांसाठी महावितरण सज्ज झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबळ्याच्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू

$
0
0

लासलगाव : शिंगवे (ता. निफाड) येथे मंगळवारी सायंकाळी बिबळ्याने पुन्हा एका मुलीवर हल्ला करून ठार केले. शनिवारीच बिबळ्याने हल्ला करून एक दहा वर्षीय मुलाचा बळी घेतला होता. चार दिवसातली ही दुसरी घटना आहे. शिंगवे गावात पाटील मळा परिसरात राहणारे माणिक नामदेव मोगल यांच्या शेतावर मजुरी करणाऱ्या कामगाराची सहा वर्षांची मुलगी दीपाली रामकृष्‍ण कोठे ही घराबाहेर खेळत असताना तिच्यावर दबा धरून बसलेल्या बिबळ्याने हल्ला चढवून गंभीर जखमी केले. तिला नाशिक येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

LED स्क्रीन वर्तविणार अचूक दर्शन घटिका

$
0
0

पर्वणी दरम्यान त्र्यंबकराजाच्या दरबारी नियोजन

प्रवीण बिडवे, नाशिक

त्र्यंबकेश्वरमध्ये मुख्य पर्वणीवेळी येणाऱ्या प्रत्येकालाच कुशावर्तात डुबकी मारून पापक्षालन करण्याची आणि त्र्यंबकेश्वरचरणी माथा टेकविण्याची ओढ असेल. दर्शनबारीत थांबल्यानंतर मंदिर अथवा कुशावर्तापर्यंत पोहोचण्यास नेमका ‌किती वेळ लागेल याचा अचूक अंदाज एलईडी स्क्रीन सिस्टमद्वारे भाविकांना दिला जाणार आहे. त्यामुळे दर्शनबारीत थांबावे की, दुरूनच दंडवत करून परतीच्या प्रवासाला लागावे याचा निर्णय घेणे भाविकांना घेणे सोपे होणार आहे.

मोठमोठाल्या रांगांमुळे दर्शनासाठी नेमकी किती प्रतीक्षा करावी लागेल याचा अंदाजच येत नाही. मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचण्यात काही तास निघून जातात. सिंहस्थ काळात त्र्यंबकेश्वरमध्ये जनसागर लोटणार असल्याने काही किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा लागू शकतात, असा अंदाज पोलिस अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. त्यामुळे याचा अंदाज भाविकांना यावा यासाठी बसस्थान, रेल्वे स्टेशन व महत्त्वाच्या ठिकाणी त्र्यंबकेश्वरला २० तर नाशिकमध्ये ५२ एलईडी स्क्रीन बसविले आहेत. २९ ऑगस्टची पर्वणी असली तरी दुसऱ्या दिवशीही कुशावर्तावर स्नान सुरू राहण्याची शक्यता असल्याने भाविकांनाही रांगेत थांबावे की, पुढच्या मार्गाला लागावे याचा निर्णय घेणे शक्य होणार आहे.

भाविकांची गैरसोय टाळणे त्यांना दृश्य माहिती देत राहणे हा एलईडी स्क्रीन बसविण्यामागील उद्देश आहे. अनेक भाविकांचे रेल्वेचे, बसेसचे आरक्षण असेल. रांगेत थांबावे की, नाही याचा अंदाज त्यामुळे भाविकांना येईल. मात्र रामुकंडावर येण्यासाठी अनेक रस्ते असल्याने असा अंदाज येणे कठीण आहे. - दीपेन्द्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

FM च्या शर्यतीत नाशिकचा वरचष्मा

$
0
0

दहा कोटींची बोली; इतर १३ शहरांना प्रतिसाद नाही

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वेगाने विकसीत होणाऱ्या नाशिक शहराचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे खासगी रेडिओस्टेशन्स (एफएम)साठी नाशिकला मोठी पसंती असल्याचे पुढे आले आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रक्रियेत नाशिकच्या एफएम स्टेशनसाठी तब्बल १० कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे.

मुंबई आणि पुण्यानंतर नाशिककडे अनेकांच्या नजरा आहेत. औद्योगिक, शैक्षणिक, पर्यटन अशा विविध टप्प्यांवर नाशिकचे महत्त्व अधोरेखित होत आहे. आधुनिकीकरण आणि जागतिकीकरणाच्या काळात नाशिकच्या आधुनिक जीवनशैलीची दखल खासगी कंपन्यांनीही घेतली आहे. त्यामुळेच नवीन खासगी एफएम स्टेशन्स नाशिकला येऊ घातली आहेत. यंदाच्या वर्षी नाशिककरांना दोन एफएम स्टेशन्सची मेजवानी मिळणार असल्याचे वृत्त 'मटा' मध्ये १ जानेवारीलाच देण्यात आले होते.

केंद्र सरकारने खासगी एफएम स्टेशनला परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. स्टेशन्सला आवश्यक ती फ्रिक्वेन्सी (वारंवारता) देण्याच्या प्रक्रियेत संबंधित कंपन्यांकडून बोली लावली जात आहे. नाशिकच्या स्टेशनसाठी तब्बल १० कोटी रुपयांची बोली कंपन्यांनी लावली आहे. विशेष म्हणजे, आसनसोल, गुलबर्गा, मंगळुरु, म्हैसूर, पुडुच्चेरी, राजमुंद्री, सिलिगुडी, तिरुची, तिरुनवेली, तिरुपती, तुटीकोरीन, विजयवाडा आणि वारंगल या १३ शहरांना कंपन्यांचा प्रतिसाद मिळू शकलेला नाही. जयपूरसाठी २५ कोटी, चेन्नईसाठी ४४ कोटी, पुण्यासाठी ३६ कोटी, चंदीगडसाठी १७ कोटी, कोचिनसाठी ११ कोटी तर नाशिकसाठी १० कोटी २० लाख ५१ हजार ७५६ रुपयांची बोली लावण्यात आली आहे. नाशिकमध्ये कार्यरत असलेल्या एफएम स्टेशनसाठी गेल्यावेळी झालेल्या बोलीच्या कित्येक पट यंदा अधिक बोली लागत असल्याने नाशिकचे महत्त्व वाढल्याचे अधोरेखित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेंट लॉरेन्सची फीवाढ मागे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सेंट लॉरेन्स शाळेने यंदाच्या शैक्षणिक वर्षात केलेली फी वाढ पूर्णत: मागे घेण्यात आली आहे. शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच आणि शाळा व्यवस्थापन यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर या निर्णयावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले.

शांततेच्या वातावरणात ही चर्चा पार पडली. या बैठकीत नर्सरी ते दहावीपर्यंतच्या सर्व वर्गांसाठी मागील वर्षाप्रमाणेच फी घेतली जाईल, असे संचालिका नलिनी दत्ता यांनी मान्य केले. पुढील वर्षासाठी शुल्क नियमन कायद्यातील तरतुदींनुसार फी निश्चित केली जाईल, असेही दत्ता यांनी म्हटले आहे. या चर्चेला शाळा व्यवस्थापनातर्फे शाळेच्या विश्वस्त नलिनी दत्ता व मुख्याध्यापिका माधुरी कसबे, मंचातर्फे अध्यक्ष श्रीधर देशपांडे, उपाध्यक्षा छाया देव, सचिव डॉ. मिलिंद वाघ, दीनानाथ चौधरी व सचिन मालेगांवकर उपस्थित होते. पालकांचे प्रतिनिधित्व राजेंद्र आव्हाड, शरद जोंधळे, मनिषा देवरे, रुपाली बच्छाव, विद्या वाकचौरे यांनी केले होते.

गेल्या अनेक वर्षांपासून सेंट लॉरेन्स ही शाळा अवास्तव फीवाढ करीत होती. सन् २०१५-१६ साठी शाळेने १९० रुपये (मागील वर्षाच्या तुलनेत १३%) फीवाढ जाहीर केली होती. पालकांनी त्याविरुद्ध

मनपा शिक्षणमंडळाकडे तक्रारही केली होती. त्यानंतर शाळेने फीवाढ ४० रुपयांनी कमी करण्याची तयारी दाखवली. पण पालकांना हे मान्य नव्हते. यापुढे शाळेला पालकांकडून सकारात्मक गोष्टीसाठी नेहमीच सहकार्य केले जाईल आशी ग्वाही पालकांच्या वतीने राजेंद्र आव्हाड, संदीप जोंधळे, देवेंद्र कुलकर्णी व काळू बच्छाव यांनी दिली. शिक्षणाधिका ऱ्यांनी या प्रकरणात केवळ बघ्याची भूमिका पार पाडल्याच्या प्रतिक्रिया यावेळी पालकांच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या.

२८५० पालकांना दिलासा

आंदोलनाद्वारे फी वाढ कमी झाल्यामुळे या शाळेतील सुमारे २८५० पालकांचा एकूण सुमारे ८० लाख रुपयांची आर्थिक बोजा कमी झाला आहे. हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी अनेकांचा हातभार लागला. भावना जाधव, संगीता विसपुते, सौ. जोंधळे, सौ. परिहार, अनिता बडगुजर, आंधळे आदी पालकांनी प्रयत्न केले. या पार्श्वभूमीवर १ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता मायको हॉल येथे पालकांचा विजय मेळावा घेतला जाणार आहे. या मेळाव्याला पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंचतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माय-लेकाच्या भेटीने सारेच गहिवरले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

दोन्ही बछडे पिंजऱ्यात अडकल्याने मादी बिबट्याची अन् त्या पिलांची घालमेल सुरू होती. एका बछड्याने पळ काढल्यानंतर ते आईजवळ पोहोचले. अखेर दुसऱ्या पिलाच्या शोधात मादी बिबट्या दुसऱ्या बछड्यासह पिंजऱ्यात बंदिस्त झाले. पिंजऱ्यातील बछडे जवळ येताच बिबट्याने त्याला चाटत अंगावर खेळविले. दूध पाजून त्याला कुशीत घेतले. आई शेवटी आई असते मग, ती खुल्या जगात असो किंवा बंदिस्त पिंजऱ्यात. तिला आपली पिलं भेटल्यावर आनंद तर वाटणारच. हे दृश्य पाहून उपस्थित वन विभाग कर्मचारी व नागरिकांनाही गहिवरून आले.

एका पिलाला सुरक्षित ठिकाणी ठेऊन दुसऱ्याला नेण्यासाठी गेल्यानंतर स्वतःच पिलासह मादी बिबटा पिंजऱ्यात अडकला. आठ दहा दिवसाच्या विरहानंतर आपली पिलं समोर पाहिल्यावर तिच्या डोळ्यातही आनंदाश्रू तरळून आले. बछड जवळ टाकताच सुमारे एक तास तिने बछड्याला अक्षरशः चाटून अंगावर खेळविले. एरवी उपाशी असलेले पिल्लू पकडल्यानंतर शांत होते. मात्र आई जवळ जाताच तेही गुर गुरायला लागले.

करंजवन येथे आठ ते दहा दिवसांपूर्वी पकडलेल्या मादी बिबट्याने गेल्या पाच महिन्यापासून लखमापूर, करंजवन, दहेगाव, वागलूद, करंजवन धरण परिसर, अवनखेड, कादवा नदी परिसरात अक्षरशः धुमाळूक घातला होता. वागलूद येथील एका तरुणाला जखमी करून, अनेकांना दर्शन देवून व पायाचे ठसे मिळूनही हा बिबट्या पिंजऱ्यात अडकत नसल्याने नागरिक दहशतीखाली होते. करंजवन येथील दिलीप शार्दुल यांच्या शेतातील कारंजी नाल्यात मादी जातीच्या बिबट्याने दोन बछड्यांना जन्म दिला. यावेळी शेतातील कामगार विजय पवार यांनी बिबट्या व पिलांना पाहताच ही बातमी गावातील तरुणांना दिली. यावेळी विजय पवार, प्रमोद शार्दुल, अनिल पिंगळ व गावातील तरुणांनी फटाके व लोखंडी दबडे वाजवत बिबट्याला पळविले. पोत्याच्या साह्याने दोन्ही बछडे पकडून वनविभाग, पोलिस निरीक्षक खोडवे, गटविकास अधिकारी राहुल रोकडे व पंचायत समिती सदस्य गणेश शार्दुल यांच्याकडे दिले. यावेळी रात्री तत्काळ पिंजरा लावून बिबट्याचे दोन्ही बछडे पिंजऱ्यात ठेवून बिबट्या पकडण्यासाठी त्याच्याच बछड्यांचा वापर केला. यातील एका बछड्याने पिंजऱ्यातील फटीतून पोबारा करीत बिबट्याकडे गेला. मात्र, पिंजऱ्यातील दुसऱ्या बछड्यांला नेण्यासाठी आलेला बिबट्या अलगद पिंजऱ्यात अडकला.

गेल्या चार ते पाच महिन्यांपासून वनविभाग व नागरिकांना भयभीत करणारा व अनेक शेळ्या, कुत्रे फस्त करणाऱ्या या बिबट्याला पकडण्यासाठी करंजवन येथील तरुणांनी अक्षरशः प्राणाची बाजी लावली. मात्र, वन विभागातील एकाही अधिकाऱ्याने या तरुणांचे कौतुक केले नाही. फक्त आयते पकडून दिलेल्या बिबट्याला आम्ही पकडले आस आव आणत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलर पार्कमध्ये महाराष्ट्राला ठेंगा

$
0
0

देशभरातील १५ राज्यांमधील २० पार्कला केंद्र सरकारचे ब‍ळ

भावेश ब्राह्मणकर, नाशिक

विविध आघाड्यांवर आगेकूच करणाऱ्या महाराष्ट्राला सोलर पार्कच्या प्रकल्पामध्ये चक्क ठेंगा मिळाला आहे. सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मिती करणाऱ्या या प्रकल्पासाठी महाराष्ट्रातून प्रस्तावच दाखल झाला नसल्याने देशभरातील १५ राज्यात एकूण २० सोलर पार्क उभारण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे.

विजेची प्रचंड मागणी आणि त्या तुलनेत अत्यल्प पुरवठा या समस्येला तोंड देतानाच पारंपरिक ऊर्जासाधनांद्वारे होणाऱ्या वीज निर्मितीतून उदभवलेली प्रदूषणाची समस्या अतिशय चिंताजनक आहे. म्हणूनच अपारंपरिक ऊर्जा साधनांच्या वापराला अधिक चालना दिली जात आहे. यासाठीच केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाने जवाहरलाल नेहरू सौर मोहिमेअंतर्गत देशात विविध ठिकाणी सोलर पार्क साकारण्याचे निश्चित केले. त्यासाठीच्या मार्गदर्शक तत्व प्रसारित करून प्रस्ताव मागविले. त्यात देशभरातील १५ राज्यांनी स्वारस्य दाखविले. मात्र, राज्य सरकारच्या डुलक्यांमुळे या पार्कसाठी कुठलाही प्रस्ताव गेला नाही. परिणामी, केंद्र सरकारने देशातील २१ सोलर पार्कची यादी जाहीर केली आहे. त्यात गुजरातमध्ये ७०० मेगावॉट, आंध्र प्रदेशमध्ये १५०० आणि १ हजार, उत्तर प्रदेशमध्ये ६००, मेघालयात २०, राजस्थानात ६८० आणि एक हजार मेगावॉटचे दोन, मध्य प्रदेशमध्ये ७५० मेगावॉटचे दोन, कर्नाटकात २ हजार, तामिळनाडूत ५००, पंजाबमध्ये ५०० मेगावॉटचे दोन, तेलंगाणामध्ये एक हजार, केरळात २००, उत्तराखंडमध्ये ३९, अरुणाचल प्रदेशमध्ये १००, नागालँडमध्ये ६० आणि अंदमान निकोबार मध्ये १०० मेगावॉटच्या पार्कचा समावेश आहे. याद्वारे १५ राज्यातील २० सोलर पार्कमधून एकूण १२ हजार ९९९ मेगावॉट विजेची निर्मिती केली जाणार असून या पार्कच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध होणार आहे.

मेडाची अनास्था

केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाची नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट अथॉरिटी (मेडा) कार्य करते. पण, मेडाच्याच अनास्थेमुळे केंद्राकडे प्रस्ताव गेला नसल्याचे ऊर्जा क्षेत्रातील सूत्रांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थ सुरक्षेवर ‘स्निपर डॉग्जचा वॉच’

$
0
0

नाशिक व त्र्यंबकमध्ये बॉम्ब तसेच अंमली पदार्थांचा घेणार शोध

प्रवीण बिडवे, नाशिक

सिंहस्थात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांप्रमाणेच डॉग्जची (प्रशिक्षित श्वानांची) फौजही रस्त्यावर उतरणार आहे. राज्यातील विविध शहरांतून तब्बल २५ स्निपर डॉग्ज लवकरच शहरात दाखल होणार आहेत. स्फोटक वस्तू तसेच अंमली पदार्थांचा माग घेण्यासाठी या डॉग्जची पोलिसांना मदत होणार आहे.

सदैव दक्ष असणाऱ्या व इमाने इतबारे कर्तव्य बजावणाऱ्या श्वानांचा प्रामाणिकपणा सगळ्यांनाच भावतो. संशयास्पद वस्तू हुंगण्याची श्वानांची क्षमता कमालीची असते. त्यांच्या याच वैशिष्ट्याचा फायदा पोलिस खात्याला होतो. म्हणूनच पोलिस दलातील या श्वानांनाही पर्मनंट कर्मचाऱ्यांसारख्याच सेवा, सुविधा पुरविल्या जातात. गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी वेगळे तसेच स्फोटके आणि अंमली पदार्थांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या श्वानांची मदत घेण्यात येते. सिंहस्थावर दहशतवादाचे सावट असल्याने पोलिस आतापासूनच विशेष सतर्कता बाळगत आहेत. बाहेरून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी आतापासूनच सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक पर्वणीला ८० लाख ते एक कोटी भाविक येण्याची शक्यता गृहीत धरून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे नियोजन पोलिसांकडून सुरू आहे. या काळात दहशतवादी हल्ला तसेच घातपाती कारवाया घडण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी बंदोबस्तात मोठी वाढ केली आहे. नाशिकच्या बीडीडीएस पथकाकडे दोन श्वान आहेत. मात्र, एकाचवेळी वेगवेगळ्या भागात बेवारस वस्तू आढळल्यास या पथकाची धांदल उडू शकते. म्हणूनच राज्यातून ११ बीडीडीएस पथके बोलावण्यात आली आहेत. त्यामध्ये वाशिम, हिंगोली, ठाणे, अहमदननगर, मुंबई, औरंगाबाद येथील बीडीडीएस पथकांना पाचारण केले आहे. त्यांच्यासमवेत सुमारे २५ श्वान असणार आहेत. ते २४ तास ऑनड्यूटी असणार आहेत. स्फोटकांप्रमाणेच गांजा व तत्सम अंमली पदार्थ शहरात आणली जाऊ नयेत याची दक्षता पोलिसांकडून घेतली जात असताना तपासणीसाठी या श्वानांची मदत होणार आहे. पुण्यातील श्वान अकादम‌ीमध्ये त्यांनी नऊ महिन्यांचे प्रशिक्षण घेतले आहे.

राज्यातील ११ आणि आपल्याकडील एक अशी १२ बीडीडीएस पथके सिंहस्थात मदतीला असतील. ही पथके अत्याधुनिक सामग्रीने अद्ययावत असणार आहेत. याखेरीज सुमारे २५ स्निपर डॉग्जही आमच्या मदतीला असतील. २० प्रकारची स्फोटके, तेवढ्याच प्रकारचे अंमली पदार्थ ते शोधू शकतात. सुरक्षेसाठी या डॉग्जची मोठी मदत होणार आहे. - सचिन गोरे, एसीपी क्राईम ब्रॅन्च, स्नीपर डॉग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेशवाई अन् ध्वजारोहणाची उत्कंठा शिगेला

$
0
0

त्र्यंबकमध्ये पंधरा ऑगस्टपासून सुरुवात

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

या आठवड्यात आखाड्यांच्या ध्वजारोहणास प्रारंभ होत आहे. त्र्यंबकेश्वरमधील दहा आखाड्यांचे ध्वजारोहण तसेच पेशवाई मिरवणूक हे पहिले शाहीस्नानापूर्वीचे खास आकर्षण ठरते. सिंहस्थात स्नान, दर्शनासाठी आलेल्या भाविकांना हेच खरे सिंहस्थाचे दर्शन ठरणार आहे.

प्रत्येक आखाड्यात शासनाने ध्वजस्तंभ दिला आहे. त्याकरिता काँक्रिटीकरण केले आहे. आखाड्याच्या या ध्वजास धर्मध्वजा असे म्हणतात. परकीय आक्रमणांमुळे जर्जर झालेल्या क्षत्रिय राजांचा ध्वज आखाड्यांनी हातात शस्त्र घेवून संरक्षित केला. त्या ध्वजाची स्थापना प्रत्येक कुंभात करून आखाडे पूजन करतात. ध्वज उभारल्यावर आजही आखाडे आवाहन करतात की, कुणी राजा या धर्मध्वजाचे संरक्षण करण्यास समर्थ असेल त्याने हा धर्मध्वज सांभाळावा.

ध्वजारोहणानंतरच आखाड्याच्या कुंभमेळ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होत असते. आखाड्यांमधील ध्वजारोहणाचा विधीचा प्रयोग त्या त्या आखाड्याच्या पुरोहितांकडे परंपरेने करण्याची प्रथा आहे. त्या प्रयोगात विशिष्ट मंत्रांचे उच्चार करून सर्व प्रयोग आखाड्याच्या श्रीमहंतांच्या अनुमतीने पुरोहित अतिशय काळजीपूर्वक करतात. ध्वज उभा झाल्यापासून लाखो साधू-महंत उपस्थिती लावतात. नित्य पूजाअर्चा सुरू होतात. ध्वजारक्षण करणे, त्याचे पावित्र जपणे हे खास काम असते. सिंहस्थातील अखेरचे शाहीस्नान आटोपले की आखाडे आपल्या धर्मध्वजा उतरवून घेतात. अर्थात तीर्थराज कुशावर्तावर पुरोहित संघाने उभारलेला धर्मध्वज पर्वकाल अखेरपर्यंत म्हणजे साधरणत: तेरा महिने असेल. त्र्यंबकेश्वरमधील दहा आखाड्यांच्या ध्वजारोहण व पेशवाई शोभायात्रा स्वतंत्र होत असते. त्र्यंबकेश्वर येथील दहा आखाड्यांच्या ध्वजारोहणासाठी सर्व तयारी झाली आहे. प्रत्येक आखाड्यांच्या ध्वजारोहण व पेशवाई शोभायात्रेसाठी त्या त्या आखाड्यांचे साधू-महंत, महामंडलेश्वर, सचिव आदी सर्व उपस्थित राहतील. मोठ्या संख्येने साधूंचे आगमन शहरात होईल.

येथे सर्वप्रथम श्री तपोनिधी आनंद आखाड्याचे ध्वजारोहण १५ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्याच दिवशी श्री तपोनिधी निरंजनी आखाड्याचे ध्वजारोहण होत आहे. ध्वजारोहण आखाड्यात धार्मिक विधींनी होत असते. पेशवाई हे सिंहस्थाचे खास आकर्षण आहे. शंखध्वनी आणि तुताऱ्या, भरजरी वस्त्रतील बँड पथक, छत्र, चामरे सोने चांदीच्या अंबाऱ्या आणि धर्मदंड असलेले महात्मा हे धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचे दर्शन घडविते.

पेशवाईत नागा संन्याशी आखाड्यांचे साधू सामील होत असतात. शाही पर्वणी कालावधीत रस्त्यांची नाकाबंदी तशात भल्या पहाटेची वेळ स्नानासाठी आलेली अलोट गर्दी या कारणांनी सर्वांनाच नागा साधूंचे दर्शन होत नाही. मात्र, पेशवाई दिवसा असते व आखाड्यापासून कुशावर्त तसेच मंदिर असे प्रमुख मार्गावरून मिरवणूक होत असते. भाविकांना साधूंचे दर्शन होते.

ध्वजदंडाची उंची ५२ हस्त

श्री पंचदशनाम जुना आखाड्यातून मिळालेल्या माहितीनुसार ध्वजदंडाची उंची ५२ हस्त (हात) आहे. कारण आखाड्यात एकूण ५२ मढ्या (मठ) आहेत. ध्वजाची लांबीचे माप हे अंगुलाच्या परिमाणात असून, प्रचलित परिमाणात ते एकतीस फूट इतके आहे. त्याची उंची दहा फूट आहे. ध्वजपूजन आणी आरोहण हे आखाड्याच्या चारही मढींच्या श्री महंतांच्या हस्ते होत असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन मिनिटात मिळणार मदत

$
0
0

सिंहस्थासाठी सहा कायम व चार तात्पुरती अग्निशमन केंद्रे सज्ज

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान आपत्ती व्यवस्थापनासाठी नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने कंबर कसली आहे. आपत्तीप्रसंगी किमान दोन ते तीन मिनिटातच तातडीने प्रतिसाद देण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे आणि वाहनांसह अग्निशमन यंत्रणा सज्ज झाली आहे. यासाठी विशिष्ट प्रकारच्या वाहनांची निर्मिती करण्यात आली असून, गल्लीबोळात जाऊन ते परिस्थितीचा सामना करू शकणार आहेत.

दुर्घटनांच्या वेळी सर्वात जलद कृतीची जबाबदारी ही अग्निशामक विभागाची असते. त्यासाठी महापालिकेचा अग्निशामक विभाग सज्ज झाला आहे. नाशिक शहरातील सहा अग्निशमन केंद्र तसेच साधुग्राममधील चार तात्पुरत्या अग्निशामक केंद्रांसह विविध भागात दोन पथके कार्यन्वित करण्यात येणार आहेत. फायर इंजिनीअरिंगचा एक वर्षाचा प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी युवकांनाही या कुंभमेळ्यात सहभागी करून घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अग्निशामक दलामध्ये क्विक रिस्पॉन्स व्हेईकल्स, ब्रिदिंग ऑपरेटस व्हॅन, रेस्क्यू उपकरणे, अॅडव्हान्स्ड इमर्जन्सी रेस्क्यू व्हॅन, फ्लड रेस्क्यू व्हॅन आदी वाहने व उपकरणे अग्निशामक दलाच्या ताफ्यात समाविष्ट केली आहेत.

नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास जलसंपदा विभागाशी समन्वय साधून ते इतरत्र वळविण्याबरोबरच घाट आणि नदीकाठी पोहणाऱ्यांचे जीवरक्षक पथक फ्लड रेस्क्यू लाँचर, लाईफ रिंग्ज, लाईफ जॅकेट्स, फायबर व रबर बोटस् आदी आवश्यक जीवरक्षक साहित्यासह तैनात ठेवले जाणार आहे. अशा आपत्तीच्या वेळी नागरिकांना एका ठिकाणी जमविण्यासाठी जागेची आणि नंतर पुनर्वसनासाठी स्थळेही निश्चित केली आहेत. गर्दीच्या वेळी अग्निशमन बंब तत्काळ पोहोचण्यासाठी प्रशासकीय राखीव मार्गाचा वापर केला जाणार आहे. शहरातील सहा अग्निशमन केंद्रांबरोबरच कुंभमेळ्याच्या काळात साधुग्राम, बाह्य वाहनतळे, अंतर्गत वाहनतळे, भाविक थांबणारे क्षेत्र (स्टेजिंग एरिया) आदी ठिकाणी तात्पुरती अग्निशमन केंद्रे प्रस्तावित केली आहेत. त्र्यंबकेश्वर येथेही अग्निशमन दलाची आठ पथके व एक रेस्क्यू व्हॅन कार्यन्वित करण्यात येणार असून, वाहनतळांवर देखील पथके ठेवण्यात आली आहेत. त्र्यंबकेश्वर येथील अग्निशामक दलाची सहजबाबदारी एमआयडीसीचे विभागीय अग्निशमन अधिकारी मिलिंद ओगले यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

डायल करा १०१ किंवा १०७७

कुठल्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी अग्निशमन यंत्रणा सज्ज झाली असून, अनेक ठिकाणी या यंत्रणेने मॉकड्रिल घेतले आहे. २१ वर्ष पूर्ण झालेल्या युवा-युवतींना 'स्वयंसेवक' म्हणून एकदिवसीय प्रशिक्षण दिले आहे. आपत्तीच्या काळात अग्निशमन दलाच्या १०१ या क्रमांकाबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कालिन कक्षात १०७७ या क्रमांकावर हेल्पलाईनवर देखील नागरिकांना संपर्क साधता येणार आहे. कुंभमेळा काळात नाशिक अग्निशामक दलाच्या सहाय्यासाठी पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, कोल्हापूर, जळगाव, धुळे, मालेगाव आदी महानगरपालिकांचे तसेच एमआयडीसी, सिडको या प्राधिकरणाचे अग्निशमन बंब त्यांच्या पथकासह उपलब्ध होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्राला सौरधोरणाचा विसर!

$
0
0

भावेश ब्राह्मणकर, नाशिक

प्रगतीशील म्हटल्या जाणाऱ्या राज्य सरकारकडे सौर ऊर्जेसाठी स्वतंत्र धोरणच नसल्याची बाब पुढे आली आहे. इतर राज्यांनी मात्र स्वतंत्र धोरण तयार करून स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीसाठी ठोस कार्यवाही सुरू केली आहे.

देशात औद्योगिक आणि इतर आघाड्यांवर अग्रेसर असलेला महाराष्ट्र मात्र राज्यकर्ते आणि प्रशासनाच्या दूरदृष्टीअभावी पिछाडीवर पडतो की काय, अशी साशंकता उपस्थित होत आहे. अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील सर्वाधिक क्षमता असलेल्या आणि महाराष्ट्रासाठी अनुकुल असलेल्या सौर ऊर्जेच्या निर्मितीबाबत राज्य सरकारची मोठीच निराशा असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच राज्य सरकारला यासंदर्भात अद्याप धोरण साकारता आलेले नाही. इतर राज्य मात्र धोरण जाहीर करुन त्याची अंमलबजावणी करण्यात गुंतल्यामुळे या राज्यांमध्ये सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. केंद्र सरकारने देशात विविध ठिकाणी

सोलर पार्क साकारण्यासाठी राज्यांकडून प्रस्ताव मागविले होते. मात्र, राज्य सरकारकडून त्यास कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी, राज्य सरकारची सौर ऊर्जेबाबतची उदासिनता यातून दिसून येत आहे.

अपारंपरिकचे धोरण जाहीर

राज्य सरकारला आतापर्यंत अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व कळाले नव्हते की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्य सरकारने गेल्या महिन्यात अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रासाठीचे धोरण जाहीर केले आहे. त्यात पवन, सौर, जल विद्युत, बायोगॅस यांचा समावेश आहे. मात्र, या धोरणात सौर ऊर्जेला तुरळकच स्थान देण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये राज्य सरकारबाबत अपारंपरिक ऊर्जेबाबत सातत्याने चर्चा झाली. मराठवाडा आणि विदर्भात सौर ऊर्जेला प्रचंड वाव आहे. मात्र, हे महत्त्व राज्य सरकारने ओळखलेले नाही.

इतर राज्यांची केवळ सौर ऊर्जेसाठीही धोरण असल्याने अनेक गुंतवणूकदार तिकडे जात आहेत. - डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी, सौर तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजमध्ये जात पडताळणीचे धडे

$
0
0

नाशिक समितीच्या वतीने आजपासून उपक्रमास होणार सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दरवर्षी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील कॉलेजेसमधून हजारो जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रकरणे समितीकडे येत असली तरीही त्रुटींची पूर्तता करताना या प्रक्रियेत दिरंगाई होते. ही दिरंगाई व पालकांची धावपळ टाळण्यासाठी नाशिक विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक कॉलेजमध्ये मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात आज (दि. १३) शिबिर होणार आहे. सकाळी ११ वाजता या शिबिराला सुरुवात होणार आहे. आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या उपस्थितीत शिबिर होणारआहे. तर मालेगावमधील एम. एस. जी. कॉलेज येथे उद्या (दि.१४) सकाळी ११ वाजता तर ए. टी. डी. हायस्कूल, मालेगाव येथे दुपारी ३ वाजता शिबिर होणार आहे. १२ वी सायन्सच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या शिबिराचा फायदा घ्यावा, असे आवाहन नाशिक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

सायन्स शाखेतून बारावीच्या विद्यार्थ्यांचे सुमारे २० हजार अर्ज वर्षाकाठी प्राप्त होतात. नाशिकसह नगर जिल्ह्याचा यात समावेश आहे. यातील काही विद्यार्थी उशिरानेही अर्ज सादर करतात. यातील अनेक अर्जांमध्ये आढळून येणाऱ्या त्रुटींच्या परिणामी वेळेत निर्णय घेण्यासाठी समितीला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. या समस्येला मुळापासून संपविण्यासाठी शहर आणि तालुकास्तरावर प्रबोधन गरजेचे असल्याचा मुद्दा नाशिक विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने मांडण्यात आला होता. या अडचणींवर मात करण्यासाठी आता जगजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

एजंट्सच्या साखळीला ब्रेक?

जात पडताळणीच्या प्रक्रियेत होणारा विलंब लक्षात घेता मोठ्या प्रमाणात एजंट्ससाठी नफेखोरी उकळण्याचा धंदा बनला आहे. यामुळे सामान्य अतिसामान्य वर्गातील विद्यार्थ्यांनाही एजंट्सच्या हाती हजारो रुपयांची रक्कम थोपवूनही वारंवार खेट्या घालाव्या लागतात. विद्यार्थ्यांची होणारी ही लूट थांबविण्यासाठी नाशिक समितीने हाती घेतलेली प्रबोधन मोहीम फायदेशीर ठरेल, असा आशावादही विद्यार्थ्यांमधून व्यक्त केला जात आहे.

विद्यार्थी हितासाठी सकारात्मक पाऊल

दरवर्षी जात पडताळणीच्या प्रलंबित कामांचा मुद्दा चर्चेत येतो. अनावश्यक कागदपत्रांची जोडणी, आवश्यक त्या कागदपत्रांची अनुपलब्धता आणि अपूर्ण असणाऱ्या त्रुटी या कारणांमुळे बारावी सायन्सनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर मोठा अडसर उभा राहतो आहे. हजारो विद्यार्थ्यांची दरवेळी होणारी ही अडचण लक्षात घेऊन सुरू होत असलेल्या उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने उपायुक्तांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एलईडी बल्बचे निकष कागदावरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एलईडी बल्बच्या निर्मितीसाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने (बीआयएस) निकष जाहीर केले असले तरी हे नियम कागदावरच असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच दर्जाहीन आणि हलक्या गुणवत्तेच्या एलईडी बल्बची बाजारात चलती असल्याचे दिसून येत आहे.

बीआयएसने एलईडी बल्ब उत्पादकांसाठी नियमावली तयार केली आहे. तसेच, केंद्रीय दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ३० उत्पादनांसाठीचे निकषही जाहीर केले आहेत. याअंतर्गत एलईडी बल्बचाही समावेश आहे. तसेच, एलईडी बल्बच्या उत्पादकांना नोंदणी करतेवेळीच हे निकष आणि नियमावली दिली जात आहे, असे बीआयएसने म्हटले आहे. मात्र, हे सारेच नियम केवळ कागदावर राहत असल्याचे निदर्शनास येत आहे.

सीएफएल बल्बनंतर आता बाजारात एलईडी बल्बची मोठी खरेदी-विक्री होत आहे. इलेक्ट्रॉनिक उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात एलईडी बल्बचे उत्पादन अत्यल्प प्रमाणात होते. मात्र, परदेशातून मोठ्या प्रमाणात हे बल्ब विक्रीसाठी येतात. त्यात चीनच्या बल्बचे प्रमाण लक्षणीय आहे. याच बल्बमध्ये बीआयएसचे कुठलेही निकष पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे. एलईडी बल्ब हे महागडे असून त्यात फसवणूक झाल्यामुळे काही ग्राहकांनी एलईडीचा पर्याय नाकारला आहे. त्यामुळे बाजारात सध्या विक्रीस असलेल्या एलईडी बल्बच्या विक्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सद्यस्थितीत टीव्ही आणि विविध माध्यमांद्वारे एलईडी बल्बच्या जाहिराती संबंधित कंपन्यांकडून केल्या जात आहेत. मात्र, बीआयएस किंवा सरकारी विभागांच्या कुठल्याही प्रकारच्या निकषांची माहिती यात दिली जात नाही. त्यामुळे ग्राहकांनाही आयएसआय किंवा कुठल्या ब्रँडच्या वस्तू खरेदी करायच्या याबद्दल संदिग्धता आहे.

एलईडी बल्बच्या उत्पादकांसाठी आम्ही निकष जारी केले आहेत. त्यांची नोंदणी करतेवेळीच आम्ही ते संबंधितांना सांगतो. आयात होणाऱ्या उत्पादनांबाबत आमच्या दिल्ली ऑफिसकडूनच योग्य ती कार्यवाही केली जाते. - स्मिता नायर, जनसंपर्क अधिकारी, बीआयएस

उत्पादकांसाठी निकष असले तरी त्याचे पालन होते आहे की नाही, याबाबत संभ्रमच आहे. ग्राहकांना अद्यापही कुठल्या मानांकनाचे बल्ब घ्यायचे हे माहित नाही. चीनमधून येणाऱ्या आणि तकलादू गुणवत्तेच्या बल्बचा काय, हा प्रश्न आहेच. - अमित कुलकर्णी, ऊर्जा तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोट्यवधीचे भंगार जाते कुठे?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागासह यांत्रिकी व विद्युत विभागात तयार होणाऱ्या कोट्यवधीच्या भंगाराचा कधीच लिलाव होत नसल्याचा आरोप स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे यांनी केला आहे. दरवर्षी कोट्यवधीची विकासकामे करताना निघणाऱ्या साहित्याचा लिलाव कधीच होत नसल्याचे आढळून आले असून, प्रशासनाकडून या लिलावांची माहिती मागवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यात मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

महापालिकेच्या विविध विभागांकडून दरवर्षी कोट्यवधीची कामे केली जातात. त्यात यांत्रिकी विभाग, विद्युत विभाग, पाणीपुरवठा विभागमामार्फत ही कामे केली जातात. भूमिगत गटार योजनेचाही यात समावेश आहे. विद्युत विभागामार्फत नवीन पोल बसवतांना जुने पोल काढले जातात. भूमिगत तारा टाकल्या जात आहेत. त्यामुळे पोल व जुन्या तारांचा लिलाव कधीच झाला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच नवीन पाइपलाइन टाकताना काढले जाणारे जुने पाइप कुठे जातात असा सवालही त्यांनी केला. कोट्यवधीची सामग्री भंगारात काढली जात असताना त्याचा जाहीर लिलाव झाल्याचे कधीच ऐकले नाही. यात कोट्यवधीचा घोटाळा असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे आयुक्तांनी या संपूर्ण प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात सर्व विभागनिहाय गेल्या तीन वर्षांत निघालेल्या भंगाराची माहिती आपण मागवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कार प्रकरणी दहा वर्षे सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास बुधवारी (दि.१२) न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. मोहन पांडू गारे (३०, रा. मांडणपाडा, ता. पेठ) असे आरोपीचे नाव आहे. गेल्यावर्षी घराजवळ राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीस त्याने पळवून नेले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.

आरोपीने तिला हट्टीपाडा, धनशेत, पिंपळद, जानोरी, ननाशी येथे त्याच्या नातेवाइकांच्या घरी नेले होते. या प्रकरणी ९ जून २०१४ रोजी पेठ पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. गारेसह गोविंद भीमा डगळे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. डगळेने मुलीस लग्न लावून देतो, असे सांगत मोहनसोबत जाण्यास सांगितल्याचा आरोप होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके-जोशी यांच्या न्यायालयात हा खटला सुरू होता. त्यात सरकारी पक्षातर्फे अॅड. सुनीता साळवे यांनी आठ साक्षीदार तपासले. सर्व सुनावणीत गारे हा दोषी आढळला, तर डगळे विरोधात पुरावे मिळाले नाही. न्यायालयाने गारे यास १० वर्षांची सक्तमजुरी आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. डगळे यास पुराव्यांअभावी निर्दोष सोडण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समाजाचे देणे’ आज गुणवंतांच्या हाती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळविलेल्या परंतु पुढील शिक्षणासाठी आर्थिकदृष्टया कमी पडत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे हेल्पलाइन हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत नाशिकभरातून जमा झालेले धनादेश त्या मुलांना हस्तांतरीत करण्यासाठी आज गुरूवार, १३ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिध्द अभिनेता अंकुश चौधरी, अभिनेत्री मुक्ता बर्वे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह लोकेश शेवडे यांची उपस्थिती राहील. गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारकातील स्वगत हॉलमध्ये हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सहकार्य लाभले आहे. कविता रंजवे, अक्षता पवार, सोनल लोखंडे, शुभम गांगुर्डे, मंदार रोकडे, हर्षदा भामरे, मंगेश चौधरी, सौरभ वाघ, अनुराज ढोबळे हेच ते 'मटा'ने हेरलेले नऊ हिरे आहेत. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेऊन यांनी दहावीच्या परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवून दाखविले, त्यांना पुढील शिक्षणासाठी मदतीचा हात, योग्य दिशा, भविष्यात उज्ज्वल यशाचा झेंडा रोवण्यात मदत करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

'मटा'ने हेरलेल्या या नऊजणांनी आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत असताना दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले, नुसते शिक्षणच नाही घेतले तर त्यात उज्ज्वल यश संपादन करून दाखविले. दारिद्र्याच्या या दशावतारामधून बाहेर पडण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत, भविष्यात त्यांना खूप काही करून दाखवायचे आहे, त्यामुळे 'मटा'तर्फे हेल्पलाइन या उपक्रमांतर्गत मदतीची हाक देण्यात आली होती. त्याला अभूतपूर्व असे यशही लाभले. नाशिककरांनी या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण भार उचलण्याची तयारी दाखविली, कुणी त्यांना दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण आम्हीच पूर्ण करू असा हट्ट धरला तर कित्येक कॉलेजेसने या विद्यार्थ्यांना तिन्ही वर्षे मोफत शिकवू असे सांगितले. हा उपक्रम म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे तो वाचकांच्या हातून ओढला जावा असा हेतू होता नाशिककरांच्या भरभरून प्रतिसादामुळे तो पूर्णदेखील झाला आहे.

हा रथ ओढणाऱ्या हातांना, या उपक्रमात योगदान देणाऱ्यांना तर या कार्यक्रमाचे निमंत्रण आहेच पण नाशिककरांनीही या हृदय सोहळ्याला उपस्थित राहावे अशी विनंती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ट्रेकिंग’चा गड होईना सर!

$
0
0

अंजनेरीतील प्रकल्पाबाबत पर्यटन विभागाची चालढकल

फणिंद्र मंडलिक, नाशिक

राज्यातील पहिल्या अंजनेरी येथील ट्रेकिंग ट्रेनिंग सेंटरचा गड दोन कोटी रुपये खर्चानंतरही विविध अडथळ्यांमुळे दोन वर्षांपासून सर होत नसल्याची बाब उजेडात आली आहे. सेंटरचे काम कधी पूर्ण होईल, याबाबत साशंकता आहे.

महाराष्ट्रात साहसी खेळांना चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागातर्फे अंजनेरी येथे राज्यातील पहिले ट्रेकिंग ट्रेनिंग सेंटर स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी राज्य सरकारने पर्यटन विभागाला दोन कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला. यासाठी अंजनेरी येथे ६ एकर जागा निश्चित करण्यात आली. यातील ३ एकर जागा तालुका क्रीडा संकुलासाठी व ३ एकर जागा ट्रेकिंग सेंटरसाठी आरक्षित करण्यात आली. तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यात आले. या क्रीडा संकुलात ऑड‌िटोरियम, म्युझियम, प्रशिक्षणासाठी आलेल्या खेळाडूंसाठी राहण्याची व्यवस्था, उपहार गृह अशी दालने बांधण्याचा प्रस्ताव आहे. हे केंद्र २०१३ मध्ये कार्यान्वित होणे अपेक्षित होते; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे त्याला अजुनही मुहूर्त लागलेला नाही.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे सेंटर पर्यटन विभागाला हस्तांतरीत करण्यात येणार असून, त्यानंतर क्रीडा विभागामार्फत तेथे प्रशिक्षण सुरु करण्याचा सरकारचा मानस आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून या सेंटरचे काम रडतखडतच सुरु आहे. सेंटरचे काम पूर्ण होण्यास आणखी किती वर्ष लागणार याबाबत प्रश्न निर्माण झाला असून, क्रीडा संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images