Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शिवसेनेचे ‘मिशन महापालिका’

$
0
0

पंधरा दिवसात नवे संघटनात्मक फेरबदल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मनसेने फेरबदलाला सुरुवात करताच शिवसेनेनेही तयारी सुरू केली आहे. महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी रणनिती आखली असून, प्रथमच मुंबईच्या धर्तीवर शिवसेना निवडणुकीचा सामना करणार आहे. त्यासाठी महापालिका क्षेत्रातील चारही मतदारसंघासह लोकसभा क्षेत्रातील सहा मतदारसंघासाठी नवीन सहसंपर्कप्रमुख नियुक्त केले जाणार आहेत. तसेच नवीन वॉर्ड रचनेनुसार प्रत्येक वार्डात शाखा स्थापन करून त्यांना शाखा क्रमांकही दिले जाणार आहेत. निवडणुकीसाठी मायक्रो प्लॅनिंग तयार असल्याची माहिती महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीत भाजपने दगा दिल्याने सावध झालेल्या शिवसेनेने मुंबई प्रमाणेच नाशिक महापालिकाही स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी मुंबईतल्या वॉर्डांमध्ये राबविण्यात येत असलेली रणनितीच नाशिकमध्ये राबविण्याची तयारी संपर्कप्रमुख अजय चौधरींनी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात नाशिक लोकसभा मतदारसंघातील सहाही मतदारसंघामध्ये आता सहसंपर्क प्रमुख नियुक्त केले जाणार आहेत. या बाहेरील सहसंपर्क प्रमुखांवर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली जाईल. त्यांची नियुक्ती मातोश्रीवरूनच केली जाणार आहे.

शाखा बनणार शक्तीकेंद्र

मुंबईच्या धर्तीवर शाखा अधिक सशक्त केल्या जाणार आहेत. त्यासाठी वॉर्डनुसार शाखाप्रमुख नियुक्त करून त्यांना क्रमांक दिले जातील. त्या वार्डातच उपशाखाही असतील.कॉलनी प्रमुखही नियुक्त केले जाणार आहेत. तीन शाखा प्रमुखांवर एक उपविभाग प्रमुख, सहा शाखा प्रमुखांमिळून एक विभाग प्रमुख असणार आहे. विधानसभा मतदारसंघात दोन उपमहानगर प्रमुख असणार आहेत. अशा पद्धतीने मायक्रो प्लॅनिंग करून थेट मित्र पक्षांसह विरोधकांचा सामना करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आधारकार्ड विद्यार्थ्यांसाठी अनिवार्यच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आधार अनिवार्य नसल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला असला तरी, शालेय विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड असणे अनिवार्यच असणार आहे, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाधिकारी उमेश डोंगरे यांनी दिली.

एलपीजी गॅस, स्वस्त धान्य, निवृत्तीवेतन, व्यवहाराच्या नोंदी आदींसाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले होते. या निर्णयामुळे सरकारी पातळीवर कार्यपद्धतीत पारदर्शकता ठेवण्यात येईल, असा सरकारी हेतू होता. मात्र, ही पद्धत देशातील नागरिकांना त्रासदायक ठरल्याने सुप्रीम कोर्टाने यावरील सक्ती बाजूला सारली. या निर्णयानुसार आता शालेय विद्यार्थ्यांचीदेखील आधारकार्ड नोंदणीपासून सुटका मिळणार का, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येत होता. मात्र शालेय पातळीवर हा निर्णय 'जैसे थे'च राखण्यात आला असल्याने लवकरात लवकर आधार कार्ड काढण्याशिवाय कोणताही पर्याय शाळा, विद्यार्थी व पालक यांच्याकडे उरलेला नाही.

शाळांमध्ये बोगस पट पडताळणीची प्रकरणे अनेकदा उघड झाले आहेत. सरकारी अनुदान लाटण्यासाठी शाळा विद्यार्थ्यांची खोटी आकडेवारी दाखवत होत्या. तसेच शाळा टिकविण्यासाठीही ते बोगस आकडेवारी सादर करण्याला प्राधान्य देण्याचे प्रमाण वाढत होते. यामध्ये पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी आधारकार्ड सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला होता. भारतातील इतर राज्यांपैकी महाराष्ट्र या एकमेव राज्यात शालेय विद्यार्थ्यांना आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.

आधारकार्ड जरी वारंवार सांगितली जात असली तरी अद्यापही सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढून पूर्ण झालेले नाही. अद्याप केवळ ५० ते ५५ टक्के विद्यार्थ्यांच्याच आधारकार्डची पूर्तता झालेली आहे. शाळांमध्ये आधारकार्ड काढण्याची सोय करून देण्यात आली असली तरी हे काम संथगतीनेच सुरू असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे शाळा व प्रशासन खरेच राज्य सरकारच्या निर्णय कितपत गंभीर सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. १५ ऑगस्टपर्यंत आधारकार्ड काढणेचे गरजेचे होते. मात्र अजून एक ते दीड महिना ही प्रक्रिया लांबणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कासवगतीने चाललेल्या या मोहिमेला गती घेण्याची गरज निर्माण झाली आहे. इतर कोणत्याही बाबतीत आधार कार्ड अनिवार्य नसले तरी शाळेसाठी ते अनिवार्यच असणार आहे, असे शिक्षणमंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

शाळेच्या पटसंख्येत पारदर्शकता आणण्यासाठी आधार कार्डशिवाय पर्याय नाही. सर्व शालेय विद्यार्थ्यांना आधार कार्ड नोंदणी करून घेणे अनिवार्य आहे. - उमेश डोंगरे, प्रशासनाधिकारी, महापालिका शिक्षणमंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शौचालयांच्या वस्तूंची वापरापूर्वीच चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सिहंस्थ कुंभमेळ्यात भाविकांच्या सुविधेसाठी त्र्यंबक रोडलगत एक्स्लो कंपनीच्या भूखंडावर महापालिकेने शौचालयांची उभारणी केली. मात्र, वापर होण्यापूर्वीच या शौचालयातील वस्तूंची चोरी होत आहे. यामुळे पहिल्या पर्वणीपर्यंत तरी शौचालय राहतील की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाशिकात येणाऱ्या भाविकांसाठी विविध ठिकाणी सुविधा महापालिका उपलब्ध करून देत आहे. सिडको, सातपूरला पर्वणीच्या दिवशी येणाऱ्या भाविकांसाठी शौचालये तयार केली गेली. मात्र, या शौचालयांचा वापर होण्यापूर्वीच चोरी होऊ लागली आहे. सातपूर एमआयडीसीतील एक्स्लो कंपनी भूखंडावर महापालिकेने उभारलेल्या ५० शौचालयांच्या प्लॅस्टिकच्या पाईपांची अल्पवयीन मुलांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास चोरी केली. पोलिसांनी चोरी करणाऱ्या मुलांनाकडून पाईप जमा केले आहेत. यानंतर अल्पवयीन चोरी करणाऱ्या मुलांच्या आई, वडिलांना बोलावून समज देऊन सोडून दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात डेंग्यूचे २४ संशयित रुग्ण

$
0
0

११ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह; स्वाइन फ्ल्यूचीही भीती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आता शहरात स्वाइन फ्ल्यू पाठोपाठ डेंग्यूनेही डोक वर काढायला सुरुवात झाली आहे. ऑगस्टच्या पहिल्याच दहा दिवसातच शहरात २४ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आले असून, त्यात बारा रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे डेंग्यूचेही संकट गडद होत चालले आहे. सद्यस्थित स्वाइन फ्ल्यूचे चार रुग्ण असून, त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

गेल्या वर्षी नाशिकमध्ये डेंग्यू आणि स्वाइन फ्ल्यूने थैमान घातले होते. डेंग्यूने तर जिल्ह्यात तब्बल ३३ जणांचा बळी गेला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी होऊनही आरोग्य विभाग मात्र कागदावर उपाययोजना करण्यात व्यस्त आहे. चालू वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने जुलैत शहरात डेंग्यूचे ७७ संशयित रुग्ण आढळून आले होते. यापैकी २६ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. ऑगस्टमध्ये यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शहरात डेंग्यूचे २४ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यात ११ पॉझिटीव्ह रुग्णांचे अहवाल महापालिकेच्या आरोग्य विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यापैकी एक रुग्ण वगळता उर्वरित १० रुग्ण हे महापालिका क्षेत्रातील आहे. त्यामुळे डेंग्यू डोके वर काढत असल्याचे चित्र असताना दुसरीकडे मात्र धूर फवारणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचेही ढिग तयार होत आहेत. त्यामुळे धूर फवारणीवर होणारा खर्च कुठे जातो असा सवाल विरोधी पक्ष करीत आहेत. सिंहस्थात मोठ्या प्रमाणावर भाविक येणार असल्याने डास प्रतिबंधक फवारणी वाढवण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.

स्वाइन फ्ल्यूचे चार रुग्ण

महापालिका हद्दीत गेल्या आठवड्यात स्वाइन फ्ल्यूचे चार रुग्ण आढळून आले. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, तीन जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोबतच या रुग्णांच्या शोधासाठी आरोग्य विभागाने पथकांची स्थापना केली आहे. सिंहस्थात स्वाइन फ्ल्यूचा धोका वाढण्याची भिती असल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निमा’चे चीनला साकडे

$
0
0

औद्योगिक गुंतवणूक चाचपणीसाठी चीनचे प्रतिनिधी देणार नाशिकला भेट

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

औद्यागिक क्षेत्राच्या स्थैर्यासाठी धडपडणाऱ्या नाशिकमध्ये उद्योगातील गुंतवणूकीसाठी चाचपणीच्या उद्देशाने चीनचे प्रतिनिधी पुढील महिन्यात नाशिकला भेट देणार आहे. फॉक्सकॉनच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पाला नाशिकमध्ये रेड कार्पेट आंथरण्याबाबत सर्व आशा मावळल्यानंतर आता 'निमा'च्या शिष्टमंडळाने चायनीज कौन्सुलेटला साकडे घातले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नाशिकला परतण्याअगोदर शिष्टमंडळाने मुंबई येथे कौन्सुलेट जनरल ऑफ चायना झेंग जियुआन यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी नाशिकच्या औद्योगिक वर्तुळाचे सादरीकरण केले. नाशिकमध्ये ऑटोमोबाइल व इलेक्ट्रिकल हब सोबतच कृषी आधारीत उद्योगांसाठी चांगला वाव असल्याचे मत मांडले.

याशिवाय येथे बड्या फॉर्मास्युटीकल कंपन्याही अस्तित्वात आहेत. नाशिकचे अंतर मुंबईपासून अवघ्या दोनशे किलोमीटर अंतरावर आहे. नाशिकच्या विमानसेवेलाही लवकरच चालना मिळत आहे, यासारखे मुद्देही चायनीज कौन्सुलेटच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

कॉन्सुलेट जनरल झेंग जियुआन, वाईस कॉन्सुलेट चॉन्ग ली, कॉन्सुलेट जनरलच्या राजकीय विभागाचे प्रमुख गुओ ताओजी यांची देखील निमा शिष्टमंडळाने भेट घेतली. निमाच्या वतीने भेट देणाऱ्या शिष्टमंडळात 'निमा'चे अध्यक्ष संजीव नारंग, सरचिटणीस मंगेष पाटणकर, हर्षद ब्राह्मणकर, सुरेश माळी, मनिष रावल, ज्ञानेश्वर गोपाळे, संदीप भदाणे आदींचा समावेश होता.

स्कील्ड मॅनपॉवरची उपलब्धता

नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे मुख्यालय आहे. याशिवाय अनेक जुनी आणि त्र्यंबक रोड परिसरात इंजिनीअरिंग व मॅनेजमेंट कॉलेजेस नव्याने निर्माण झाली आहेत. याशिवाय सरकारी आणि खासगी पातळीवर आयटीआय सारख्या संस्था आहेत. या माध्यमातून नाशिकमध्ये विपूल प्रमाणात स्किल्ड मॅनपॉवर उपलब्ध होऊ शकते. यासाठी उद्योग आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रामध्ये परस्पर समन्वय करार करण्यात आले तर यामध्ये अधिक विकास होऊ शकेल, असे मत औद्योगिक आणि ‌शैक्षणिक क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. उद्योगासाठी आवश्यक असलेली जमीन, दर्जेदार रस्ते, मुबलक पाणी नाशिकमध्ये उपलब्ध आहे. त्याचा उद्योगवाढीसाठी लाभ होऊ शकते, असेही मत मांडले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रात्रीच्या सफाईने साधूंची उडाली झोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साधुग्राममध्ये रात्री दोन वाजता सफाई कर्मचारी काम करतात. एवढ्या रात्री आखाडे आणि खालशांमध्ये सफाईची आवश्यकता नसून, प्रशासनाने सफाईच्या कामाचे फेरनियोजन करावे, अशी मागणी साधू-महंताकडून होते आहे. या पध्दतीमुळे सुरक्षेच्यादृष्टीने अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचा दावा संबंधित साधू-महंतांकडून करण्यात येतो आहे.

साधुग्राम आता आकारास येत असून, आखाड्याशी आणि खालशांशी संबंधित साधू-महंत साधुग्राममध्ये दाखल होत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत खालसे तसेच आखाड्यांची सुरक्षाव्यवस्था तितकीशी मजबूत झालेली नाही. साधुग्रामच्या साफसफाईसाठी प्रशासनाने शेकडो कर्मचारी नियुक्त केले असून, हे कर्मचारी रात्री दोन वाजताही सफाई करीत आहेत. यामुळे सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला असून, प्रशासनाने तातडीने रात्रीच्या सफाईचे काम थांबवावे, अशी मागणी साधू-महंतांकडून होते आहे. एवढेच नव्हे तर सफाई कर्मचाऱ्यांना सेक्टर दोनमध्येच रस्त्यालगत जागा देण्यात आली. मात्र, त्यांना बाथरूम, टॉयलेट देण्यात आले नाहीत. सध्या हे कर्मचारी खालशांच्या सुविधांचा लाभ घेतात. खालसेधारी दाखल झाल्यानंतर सफाई कर्मचारी कोठे जाणार? इतर ठिकाणी सफाई कर्मचारी आणि साधुग्राम यांचा थेट संबंध येत नाही. तसा विचार प्रशासनाने करणे अपेक्षित होते, असा दावा साधूंकडून होतो आहे. यापूर्वी छोट्या मोठ्या चोरीच्या घटना घडल्या असून, साधू महंतांना रात्रीचे जागरण करून लक्ष ठेवावे लागते आहे.

मध्यरात्री दोन वाजता आखाड्यातील सफाईचे काम होणे हाच मोठा धक्का आहे. सफाई कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचाही समावेश आहे. प्रशासनाने हा उद्योग तातडीने बंद करावा. पहाटे चारनंतर सफाईचे काम सुरू करावे. - महंत सुनीलदास महाराज, निर्वाणी आखाडा

साफसफाई कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. अजूनही साधुग्राममध्ये वर्दळ कमी असून, त्यामुळे कर्मचारी जास्त वाटतात. प्रत्यक्षात गर्दी वाढल्यानंतरही ही संख्याही कमी पडू शकते. मात्र, रात्री-मध्यरात्री कर्मचाऱ्यांचे फिरणे योग्य नाही. यातून अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. - महंत भक्तीचरणदास महाराज

ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर आखाड्यांना गेट लावण्यात येईल. पोलिसही तेथे पहाऱ्याला असतील. मात्र, तोपर्यंत रात्रीची सफाई बंद व्हावी. खालशांनाही सुरक्षेची चिंता असून, ठराविक ठिकाणी ठराविक कर्मचाऱ्यांची नियुक्ती व्हावी. यामुळे संबंधित साधू-महंत आणि सफाई कर्मचाऱ्यांची तोंडओळख होईल. - रामकिशोरदास महाराज, श्री महंत, दिगंबर आखाडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधूंच्या प्लॉटचा घोळ काही मिटेना!

$
0
0

साहित्य घेऊन येणाऱ्या साधू-महंतांसमोर यक्षप्रश्न

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साधुग्राममध्ये साहित्यानिशी दाखल होणाऱ्या नवीन खालसाधारकांना जमीनच उपलब्ध नाही. यामुळे जागा वाटपाचा घोळ दिवसागणिक गंभीर बनत चालला आहे. आखाडा प्रमुखांना जागेचा वाद मिटविताना नाकीनऊ येत आहेत.

गत महिन्याच्या सुरूवातीलाच अखिल भारतीय आखाडा परिषेदेमार्फत आखाड्यांसह खालशांना जागेचे वाटप करण्यात आले. गत कुंभमेळ्यात म्हणजे २००३ साली सुमारे ३०० खालसे नाशिकमध्ये आले होते. यंदा त्यात थोडीशी वाढ होईल, असा परिषदेचा अंदाज होता. मात्र तो साफ खोटा ठरला. यंदाच्या कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये चांगल्या सुविधा पुरविण्यात आल्या असून, यामुळे खालशांच्या संख्येत वाढ झाली आहे. सुरुवातीस जागावाटप करताना काही खालशांना तीन ते चार प्लॉट वाटप करण्यात आले. यामुळे ४०० स्क्वेअर फुटाचे १ हजार ३४० प्लॉटचे लागलीच वाटप झाले. यानंतर संपूर्ण लवाजम्यासह साधुग्राममध्ये दाखल होणाऱ्या खालसे प्रमुखांना जागाच उपलब्ध नाही. असे अनेक खालसे दररोज येत असून, त्यांच्या बळकविण्यात येणाऱ्या जागा परत मिळवणे, ज्यांना जागाच नाही त्यांना नवीन जागा शोधण्याची कसरत आखाडा प्रमुखांना करावी लागते आहे. आज सुध्दा तीन ते चार खालशांना जागा शोधण्यासाठी दिगंबर आखाड्याचे श्रीमहंत रामकिशनदास महाराज, निर्वाणी आखाड्याचे श्रीमहंत धर्मदास महाराज यांच्यासह इतर पदाधिकारी झटत होते. १९ ऑगस्ट रोजी आखाड्यांचे ध्वजारोहण पार पडणार असून, त्यानंतर ही समस्या आणखी वाढणार असल्याचा दावा महंतांकडून होतो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोख सोन्याची मुहूर्तावर खरेदी

$
0
0

भाव उतरल्याचा ग्राहकांनी घेतला लाभ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सोन्याचे उतरत असलेले भाव व सिंहस्थातील पुष्य नक्षत्र असा दोन्हींचा मेळ साधत नागरिकांनी गुरुवारी मोठ्या प्रमाणात सोने खरेदीचा आनंद घेतला. यावेळी राशीच्या खड्यांनाही चांगली मागणी होती.

काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरू आहे. त्याचा फायदा घेत सराफ बाजार व इतर ठिकाणच्या दुकांनांमध्ये ग्राहकांची गर्दी झाल्याने व्यावसायिकांमध्ये चैतन्याचे वातावरण होते. गुरुवारच्या पुष्य नक्षत्रावर कोट्यवधीची सोने आणि चांदीची खरेदी झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, शहरात बाजारपेठेत २४ कॅरेटसाठी २६ हजार २०० रुपये तर २२ कॅरेटसाठी २६ हजार रुपये भाव होता. तर चांदी ३६ हजार रुपये किलो होती. अागामी काळात भाव स्थिर राहतील, असा अंदाज सराफांनी व्यक्त केला.

गेल्या दोन महिन्यांपासून सोन्याच्या भावात घसरण सुरू झाल्याने गुरुवारच्या दिवशी अनेक ग्राहकांनी सराफ बाजारातील पेढ्यावर भाव आणखी उतरणार का याची माहिती घेतली. मात्र, गुरुवारी बाजार उघडल्यानंतर भाव २६ हजारावर स्थिरावला. नाशिकमध्ये अनेकांनी लग्नसराईसाठी दागिन्यांची खरेदी केली तर अनेकांनी गुंतवणूक म्हणून खरेदी केली. खरेदी करत असतांना भाव खाली येणार का, याची धाकधूक मनात कायम होती. गुरुपुष्यांमृतच्या मुहूर्तावर अनेकांनी कालावधीत चोख सोन्याची बिस्किटे, वेढे, सोन्याच्या भरीव मूर्ती तसेच सोन्याची नाणी यांना चांगली मागणी होती. सोन्याची नाणी एक ग्रॅम पासून ते पन्नास ग्रॅमपर्यंत उपलब्ध होती. तसेच चेन, अंगठी, हार, नेकलेस, पेन्डल, कुंदन सेट, पाटल्या, बांगड्या यांची खरेदी जोरात झाली.

राशींच्या खड्यांना मागणी

सिंहस्थाच्या कालावधीत राशीच्या खड्यांना चागली मागणी आहे. गुरुवारी राशीच्या खड्यांच्या विक्रीने उच्चांक गाठला यावेळी अधिकाधिक ग्राहकांनी पुष्कराज खरेदी केले. १५०० रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंत खड्याचे भाव होते.

सिंहस्थात आलेल्या गुरुपुष्यांमृतचा मुहूर्त साधत लोकांनी सोन्याची खरेदी केली. सकाळापासूनच लोकांनी गर्दी केली होती. ग्राहकांचा चोख सोन्याकडे जास्त कल होता. खड्यांची मागणीही सातत्याने वाढते आहे. - प्रदीप रणधीर, सराफ व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आखाड्यातील ध्वजांना संगीत सलामी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तीन आखाड्यांमध्ये फडवण्यात येणाऱ्या ध्वजांना दररोज संगीत सलामी देण्यात येणार आहे. ध्वजारोहणाची जोरदार तयारी सध्या सुरू असून संगीत सलामीची मेजवाणी भक्तांसाठी वेगळीच पर्वणी देऊ शकते.

साधूग्राममध्ये प्रमुख तीन अनी आखाडे आहेत. यात, दिगंबर, निर्वाणी आणि निर्मोही आखाड्याचा समावेश होतो. या प्रमुख आखाड्यातंर्गत १८ आखाडे असून यांचे ध्वजारोहण बुधवारी (दि. १९) सकाळी ८.१० वाजता होईल. दिंगबर आखाड्याचा आयताकृती ध्वज असून तो पंचरंगी आहे. निर्वाणीचा लाल तर निर्मोहीच्या ध्वजेचा सफेद रंग असून तो त्रिकोणी आकाराचा असेल. या ध्वजांवर दोन्ही बाजूंनी रेशमी धाग्यांनी हनुमानाची प्रतिमा तयार करण्यात आली असून मुंबई येथे ध्वज तयार करण्यात आल्याचे महंत भक्तीचरणदास महाराज यांनी सांगितले. १० बाय २५ इतका मोठा ध्वज ५४ फुटी लाकडावर लावण्यात येणार आहे. ध्वजारोहणाच्या दिवशी सकाळी प्रत्येकी सहा पंडित धार्मिक विधी करतील. हा विधी आटोपल्यानंतर इतर कार्यक्रम पार पडतील. सिंहस्थ कुंभमेळा हे मोठे पर्व असून तो निर्विघ्न पार पडावे, यासाठी ध्वजारोहण केले जाते, असे भक्तीचरणदास महाराजांनी सांगितले. आखाड्यांच्या दृष्टीकोनातून ध्वजेला महत्त्व असते. त्याची दररोज पूजा केली​ जाईल. एवढेच नव्हे तर संगीत सलामी सुध्दा देण्यात येणार आहे. आखाडे सैनिकांप्रमाणेच काम करतात. त्याच दृष्टीने संगीत सलामी देण्यात येते.

शेवटची पर्वणी १८ सप्टेंबर रोजी झाली की हे ध्वज सन्मानाने उतरविण्यात येतील. दरम्यान, शाही मिरवणुकीत कोणता आखाडा पुढे राहील, मिरवणूक किती वाजता सुरू होईल, याविषयी प्रमुख महंत आणि प्रशासनाच्या बैठकीत निर्णय होईल, असे भक्तीचरणदास महाराजांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायीचे आयुक्तांपुढे लोटांगण

$
0
0

साधुग्राम कंत्राटप्रकरणी बदनामी टाळण्यासाठी तडजोडीचा पर्याय

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

साधुग्रामच्या स्वच्छतेच्या साडेपाच कोटीच्या वादग्रस्त कंत्राटावरून गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली बदनामी टाळण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीने आता आयुक्तांपुढे गुरुवारी लोटांगण घातले. आयुक्तांची भेट घेवून कंत्राट कोणालाही द्या, पण आता बदनामी टाळा असे आर्जव त्यांनी केले. सोबत महापालिकेत वकील बदलण्याची सभापतींसह सदस्यांची मागणी आयुक्तांनी मान्य केली असून सोमवारच्या सुनावणीत अॅड. विवेक साळुंखे महापालिकेची बाजू मांडणार आहे.

साधुग्रामच्या स्वच्छतेच्या कंत्राटावरून गेल्या महिन्याभरापासून महापालिकेचे राजकारण ढवळून निघाले आहे. साधुग्राममधील स्वच्छतेचे कंत्राट कोणाला द्यायचे यावरून राजकारण रंगल्याने हा वाद थेट उच्च न्यायालयात दोनदा पोहचला आहे. स्थायी समितीने संबंधित कंत्राट वॉटर ग्रेसऐवजी क्रिस्टलला देण्याचा निर्णय घेतला. मात्र, उच्च न्यायालयात दोन्ही वेळा या निर्णयाला स्थगिती मिळाली. तर वॉटर ग्रेसच्या काळ्या यादीतील समावेशावरून वाद सुरू असून प्रशासन आणि स्थायी समितीतही वाद सुरू आहेत. या सर्व प्रकरणात स्थायी समिती आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहिली असून सदस्यांच्या कारभारावर शंका उपस्थित केल्या जात आहे.

विरोधकांकडूनही स्थायीलाच जबाबदार धरण्यात येत आहे. महापालिकेच्या वतीने उच्च न्यायालयात व्यवस्थित बाजू मांडली जात नसल्याने स्थायीच्या पदरी निराशाच झाली. माध्यमांमध्ये या कंत्राटावरून स्थायी विरुद्ध आयुक्त असेच चित्र रंगले असून आरोप प्रत्यारोपही झाले आहेत.

स्थायी समिती आणि प्रशासन यांच्यात स्थायी समितीने थोडेसे झुकते घेत, गुरूवारी या प्रश्नांवर आयुक्तांची भेट घेत आपले गाऱ्हाणे मांडले. सभापती शिवाजी चुंभळे सह सदस्यांनी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याशी चर्चा केली. कंत्राट कोणालाही द्या, पण वाद थांबवा. तुमच्याच अधिकारात निर्णय घ्या, अशी विनंती त्यांनी आयुक्तांना केली. सोबतच महापालिकेचा उच्च न्यायालयात सोमवारी या प्रकरणावर बाजू मांडण्यासाठी स्वतंत्र वकील नेमण्याची विनंती करण्यात आली. आयुक्तांनीही नमते घेत, वकील बदलण्याची मागणी मंजूर केली. शिक्षण समितीची केस लढणाऱ्या अॅड. विवेक साळुंखे यांच्याकडे बाजू मांडण्याची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आयुक्त दालनात वादावादी ?

दरम्यान झालेल्या बदनामी वरून संतप्त झालेल्या सदस्यांनी आयुक्तांसोबत वाद घातल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे आयुक्त आणि सदस्यांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन्ही बाजूंनी नमते घेतल्यानंतर हा वाद मिटल्याचे सांगण्यात येत आहे.

स्थायी सदस्यांमध्ये फूट?

कंत्राटाबाबत सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून त्यापूर्वीच स्पर्धेतील एका कंपनीने काही सदस्यांना घेवून वेगळी चूल मांडण्याची तयारी केली. कंत्राट कोणाला जाईल हे सांगणे आता सदस्यांनाही अवघड झाले असून ते संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे या कंत्राटदाराने गुरुवारी एका हॉटेलवर काही सदस्यांना घेवून वाद टाळण्यासाठी आर्जव केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सदस्यांमध्येच आता फूट पडण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिगंबर आखाडा अंधारात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एका प्लॉटमध्ये विजेसाठी सहा पॉईंट मंजूर असताना प्रत्यक्षात दोन पॉईंट लावले जात आहेत. त्यातही सुसूत्रता नसून यामुळे दिगंबर आखाड्यातील साधू-महंतांना अंधारात राहण्याची वेळ येत असल्याची टीका आखड्याचे महामंत्री वैष्णवदास महाराजांनी केली. यामुळे एखादा अपघात झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल असेही महाराजांनी स्पष्ट केले.

महापालिकेने लावलेले स्ट्रीट लाईट आहेत. मात्र, झाडांमुळे त्यांचा प्रकाश जमिनीवर पोहचत नाही. त्यातच नव्याने तयार करण्यात आलेल्या तंबूमध्ये तर वीज पुरवठाच मिळत नसल्याने अनेक अडचणी वाढल्या असल्याचा दावा, वैष्णवदास महाराजांनी केला. एका प्लॉटसाठी सहा पॉईंट देण्याचे ठरले होते. प्रत्यक्षात दोन पॉईंट मिळत असून तेही देण्यास टाळटाळ होते. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी आखाड्याला भेट दिली. त्यावेळी काही कर्मचाऱ्यांनी आखाड्यातील काही भाग खोदून ठेवला. हे काम का केले? याचे स्पष्टीकरण कोणीही देत नाही. तसेच, जमीन पूर्ववत केली जात नाही. सायंकाळच्या सुमारास अंधार झाल्यानंतर डोळ्यात तेल घालून फिरावे लागते. अशावेळी एखादे वयस्कर साधू महंत पडले, त्यांना दुखापत झाली तर याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर असेल, असा इशारा वैष्णवदास महाराजांनी दिला.

गहू कोण साफ करणार?

साधूग्राममधील साधूंसाठी प्रशासन प्रत्येक व्यक्ती तीन किलो इतका गव्हाचा पुरवठा करते. मात्र, हा गहू निकृष्ट असून त्याची साफसफाई कोणी करायची, असा प्रश्न साधूंकडून उपस्थित होतो आहे. इतर कुंभमेळ्याच्या ठिकाणी थेट पीठाचा पुरवठा होतो. मग, इथे गहू घेऊन तो साफ करा, गहू दळा आणि नंतर वापरा असा ​उद्योग कोण करणार? साखरेचीही तीच परिस्थिती आहे. रेशन म्हणजे असून अडचण नसून खोळंबा असल्याची प्रतिक्रिया साधूंकडून व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तारांगण’ला मिळणार संजीवनी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रतिसादाअभावी बंद पडलेल्या महापालिकेचे तारांगण पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू असून, इस्रोच्या मदतीने त्याचे रूपडे पालटणार आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर येत्या २२ ऑगस्टपासून तारांगणचे नवे रुप विद्यार्थ्यांसह भाविकांना पहावयास मिळणार आहे. विशेष म्हणजे, तारांगणमध्ये नवनवीन प्रयोग दाखविण्यात येणार असून, याला इस्रोच्या मदतीचे कोंदण मिळणार आहे.

नाशिक महापालिकेच्या मालकीचे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव तारांगण विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या प्रतिसादाअभावी अनेक दिवसांपासून बंद आहे. उत्तर महाराष्ट्रातील एकमेव तारांगणाची ब्रँडिंग करण्याची संधी सिंहस्थामुळे उपलब्ध झाली असल्याने महापालिकेने पुन्हा नव्या जोमाने प्रचारप्रसार करून हे तारांगण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांसह नागरिकांनाही विज्ञानाची गोडी निर्माण होण्यासह सर्वांना ज्ञानाची दारे खुली करण्यासाठी या तारांगणचे स्वरूप पालटण्यात येणार आहे. सध्याचे प्रयोग बदलून इस्रोशी टायअप करून नवनवीन प्रयोगाची रचना करण्यात आली आहे. त्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्सच्या अपूर्वा जाखडी, अविनाश शिरोडे व महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांच्यात नुकतीच संयुक्त बैठक झाली. तारांगणच्या आतही बदल करण्यात येणार असून, तळघरातील सभागृहात विज्ञान प्रदर्शन दाखवले जाणार आहेत. तर तारांगणच्या वरती नवीन मोठी दुर्बीण बसवली जाणार आहे. तर ४ ऑक्टोबरपासून स्पेसविक साजरा केला जाणार आहे. नाशिककर व सिंहस्थात येणाऱ्या भाविकांना तारांगणमध्ये आकर्षित करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेणार असून, यासाठी स्पॉन्सरशिपचा पर्यायाचाही विचार सुरू अाहे. पर्यटन व आदिवासी विभागांनाही यात सहभागी केले जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांनी सांगितले.

स्पॉन्सरश‌िपचाही पर्याय

तारांगणमध्ये विविध प्रकारचे प्रयोग दाखवण्यासाठी दररोज २० हजाराचा खर्च येतो. हा खर्च भरून काढण्यासाठी स्वयंसेवी संस्था, प्रतिष्ठित नागरिक यांच्याकडून स्पॉन्सरश‌िप घेण्याचा प्रस्ताव आहे. तर संबंध‌ित व्यक्तीला दिवसाचे तीनही शो बुक करण्याची मुभा देण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या वाढदिवसावर खर्च करण्याऐवजी तारांगणला मदत करावी असे आवाहनही केले जाणार आहे. यात नगरसेवक, राजकीय पदाधिकारी, अधिकाऱ्यांचा यात सहभागी वाढविला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रावण मास... सेलिब्रेशन खास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आषाढ महिन्याला निरोप देत हिरवीगार सृष्टी लेऊन श्रावण महिना दाखल होत आहे. या अशा आल्हाददायक आणि उत्साहपूर्ण वातावरणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे श्रावणमासासोबत येतोय 'महाराष्ट्र टाइम्स सेलिब्रेटिंग श्रावण'. या इव्हेंटचा कळसाध्याय म्हणजे 'वामन हरी पेठे प्रस्तुत 'मटा श्रावण क्वीन स्पर्धा. सौंदर्य, बु‌द्धिमत्ता, पारंपरिकता आणि आधुनिकता यांचा मिलाफ साधणाऱ्या या स्पर्धेसाठी आता नोंदणी सुरू झाली आहे.

वर्षागणिक समृद्ध होणाऱ्या व तरुणींसाठी नव्या संधीची दारे खुली करणाऱ्या 'श्रावण क्वीन' स्पर्धेचे स्वरूप यंदा बदलले आहे. वाचकांचा सहभाग वाढावा आणि यातूनच स्पर्धक तरुणी निवडून याव्यात, हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. श्रावण क्वीन स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याची इच्छा असलेल्या १८ ते २५ वर्षे वयोगटातील तरुणींना यंदा ऑनलाइन एण्ट्री करावी लागेल. आपला फोटो आणि माहिती त्यांना खाली दिलेल्या वेबसाइटवर अपलोड करता येईल. निवड झाल्यास ग्रूमिंग सेशनसाठी पूर्ण वेळ देण्याची तरुणींची तयारी असावी.

प्रोफाइल अपलोड किंवा व्होट करण्यासाठी वेबसाइट : http://www.mtshravanqueen.com

ऑनलाइन नोंदणी आणि वाचकांची निवड

श्रावण क्वीन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठीची यंदाची पद्धत जरा निराळी आहे. तुम्ही वेबसाइटवर केलेल्या नोंदणीनंतर वाचकांकडून मिळालेली मते आणि तज्ज्ञ मंडळींचा निर्णय याआधारे श्रावण क्वीन एलिमिनेशन राऊंडसाठी तरुणींची निवड केली जाईल.

एलिमिनेशन राऊंडमध्ये निवड झालेल्या तरुणींमधून अंतिम स्पर्धेसाठी ४ जणींची निवड होईल व त्यांचे ग्रूमिंग सेशन होऊन 'श्रावण क्वीन'ची निवड होईल. स्पर्धेसाठी इच्छुक तरुणींनी अपलोड केलेले फोटो आणि माहिती वेबसाइटवर पाहून वाचक स्पर्धकांना मते देऊ शकतील. 'श्रावण क्वीन'बरोबरच आणखीही अनेक कार्यक्रमांची धम्माल 'महाराष्ट्र टाइम्स' घेऊन येत आहे. अधिक माहितीसाठी वाचत रहा 'महाराष्ट्र टाइम्स'.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सेट’ अखेर ६ सप्टेंबरला?

$
0
0

'मटा'च्या पाठपुराव्यानंतर विद्यार्थ्यांना दिलासा

जितेंद्र तरटे, नाशिक

पहिल्या पर्वणीच्या काळात येणारी व्याख्यातापदासाठीची प्रवेश पात्रता परीक्षा (सेट) आता ३० ऑगस्टऐवजी ६ सप्टेंबरला होणार असल्याचे समजते. पर्वणीच्या काळात शहरातील रस्ते बंद असल्याने नाशिक केंद्रावरील विद्यार्थ्यांना परीक्षा स्थळापर्यंत पोचणे जवळपास अशक्य होते. याबाबतचे वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स'ने दिले होते. या वृत्ताची दखल घेत पुणे विद्यापीठाने आता परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नाशिक केंद्रावरच्या परीक्षार्थींचा जीव भांड्यात पडणार आहे. परीक्षेच्या नव्या तारखेसंबंधीची सूचना विद्यापीठ अधिकृतरित्या कधी जाहीर करते, याकडे लक्ष लागले आहे.

२९ ऑगस्टच्या सिंहस्थ पर्वणीमुळे नाशिक केंद्रावर येणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होणार असल्याचे वृत्त 'मटा'ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नाशिक केंद्र संगमनेरला हलविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पर्वणीमुळे नाशिकमधील वाहतूक व्यवस्था ठप्प असल्याने 'सेट' देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अधिक हाल होणार असल्याचे समोर आल्यावर विद्यापीठाने परीक्षाच पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

कुंभपर्वणीदरम्यान होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्यासाठी 'मटा' ने सातत्याने पाठपुरावा केला होता. विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) च्या वतीने राज्यस्तरीय व्याख्याता पदासाठी ही परीक्षा घेण्यात येते. नव्याने प्राध्यापक बनण्यासाठी सक्तीच्या असणाऱ्या 'सेट' परीक्षेला यंदा तब्बल दीड वर्षानंतर मुहूर्त लागला खरा, पण नाशिकमधील कुंभपर्वणीच्या दुसऱ्याच दिवशीची तारीख निश्चिती करीत विद्यापीठाने गैर नियोजनाच्या उदाहरणाची झलकच भावी प्राध्यापकांना दाखविली. यावर 'मटा' ने बोट ठेवताच नाशिकचे परीक्षा केंद्र चक्क संगमनेर येथे हलवून 'जखम मांडीला अन् मलम शेंडीला' या न्यायाने चालणाऱ्या भोंगळ कारभारावर विद्यापीठाने शिक्कामोर्तबच केले.

आमदारांचाही पुढाकार

'मटा'च्या वृत्तानंतर संगमनेरला हलविण्यात आलेले केंद्र इगतपुरी येथे हलविण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली होती. चिघळतच चाललेला हा परीक्षेचा संभ्रम मिटविण्यासाठी ६ सप्टेंबर रोजी ही परीक्षा होणार असल्याचे समजते. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असून, गैरसोयही टळणार आहे. लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तारीख बदलाबाबत सूचना देण्यात येतील, असेही सूत्रांनी सांगितले.

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेता 'सेट' परीक्षा पुढे ढकलण्याचे आमच्या विचाराधीन आहे. येत्या एक ते दोन दिवसात त्यासंबंध‌िचा निर्णय विद्यापीठाकडून जाहीर केला जाईल. - डॉ. नरेंद्र कडू कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दातृत्वाच्या दर्शनाने दाटला त्यांचा कंठ

$
0
0

'मटा हेल्पलाइन' ने दिले स्ट्रगलर्सला पाठबळ

म.टा.प्रतिनिधी, नाशिक

'साहब...! हम चेक और बँक का त्योहार तो जानत नाही... लेकीन हमारी मदद उन बच्चों तक जरूर पहुचाओ जो पढना और आगे बढना तो चाहत है... लेकीन सिर्फ पैसे कि बजह वहं पावत नही..!! ', हे भावनिक अन् प्रातिनिधीक बोल आहेत 'मटा हेल्पलाईन' च्या छोट्यात छोट्या दात्याचे. दान स्वरूपात दिलेल्या रकमेपेक्षाही त्यांच्या वाक्यातून डोकावणारा दातृत्वाचा विस्तीर्ण भाव उपस्थित श्रोत्यांचे कंठ दाटवून गेला. निमित्त होते 'मटा हेल्पलाईन' या उपक्रमांतर्गत उभ्या राहीलेल्या मदत वाटपाचे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये झालेल्या या सोहळ्याला सुरूवातीपासूनच भावनिकतेची झालर होती.

दिवसभर जिवाचे रान केल्यानंतर मिळालेल्या अल्प मोबदल्यातूनही समाजाच्या विधायकतेचा भाग बनणारे हे बोल कुठल्याही व्यासपीठावरचे नाहीत. 'मटा हेल्पलाईन' या उपक्रमांतर्गत दहावीच्या स्ट्रगलर्स विद्यार्थ्यांसाठी मदत पोहचवताना शब्दातून प्रकटलेली ही तळमळ आहे. यासारख्या कष्टकरी वर्गापासून तर लक्षवेधी रक्कम या मुलांसाठी देणाऱ्या हजारो बड्या अन् अनामिक दात्यांच्या आठवणी 'मटा हेल्पलाईन' च्या व्यासपीठावर जागविल्या जात होत्या. आणि श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उभे राहत होते.

रस्त्याच्या कोपऱ्यावर छोटे दुकान चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या अतिसामान्य नाशिककरांपासून तर उद्योग अन् नोकऱ्यांमध्ये उंची पदांवर ठसा उमटविणाऱ्या समाजाभिमुख दात्यांच्या योगदानातून या उपक्रमातील नऊ विद्यार्थ्यांसाठी सुमारे १५ लक्ष रुपयांची रक्कम उभी राहिली.

मोठ्या उद्देशाचा छोटेखानी सोहळा !

'दान हे गुप्त असले पाहिजे,' असा विचार आपल्या संस्कृतीने दिला आहे. खऱ्या अर्थाने केवळ मदत वाहकाची भूमिका बजाविण्याचा उद्देश 'मटा हेल्पलाईन' या उपक्रमांतर्गत ठेवण्यात आला होता. पैशाअभावी शिक्षणाला पूर्णविराम लागण्याची शक्यता असणाऱ्या गरजू मुलांना आर्थिक मदत मिळवून देणे अन् दातृत्ववान समाजाचे दर्शन या लहानग्यांना घडवून नवी विधायक पिढी घडविणे अशा मोठ्या उद्देशाने आयोजित केलेला हा सोहळा मात्र छोटेखानी अन् साधा होता. गरजूंपर्यंत योग्य मार्गाने मदत पोहचावी, या उद्देशाने या सोहळ्यातील बडेजाव टाळण्याच्या भूमिकेचीही उपस्थितांनी स्वागत केले.

रूजली सामाजिक जाणिवेची बीजं

या अनोख्या उपक्रमात समाजातील विविध घटकांनी योगदान दिले आहे. एकीकडे आत्मकेंद्रीत बनणाऱ्या समाजावर टीका होत असतानाच दुसरीकडे प्रेरणादायी दातृत्वाचं दर्शन घडविणाऱ्या समाज घटकांनी मदत घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही सामाजिक जाणिवेची बीजं रूजविली. या मुलांनीही शिक्षणाचे स्वत:च्या पायांवर स्थिर झाल्यानंतर दातृत्वाचा वसा पुढे चालविण्याचा संकल्प मांडून लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्लास्टिकवर कापडी पिशव्यांचा उतारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्लास्टिकचा वापर पर्यावरणाला घातक ठरत असल्याने त्यावर उपाय म्हणून शहरातील शाळांनी पुढाकार घेतला आहे. शहरात येणाऱ्या भाविकांना ६० हजार कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत 'हरितकुंभ' या उपक्रमांतर्गत शाळांनी या पिशव्यांचे वाटप करण्यास पुढाकार घेतला आहे. येत्या काळात ६ लाख पिशव्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिकमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक येत आहेत. या भाविकांमध्ये प्लास्टिकचा वापर टाळण्यासंदर्भात या भाविकांमध्ये प्रबोधन करणे आवश्यक आहे. हे प्रबोधन कोणत्याही सल्ल्याशिवाय कृतीतून देण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरत आहे. शहरात आलेल्या भाविकांकडून प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन त्यांना कापडी पिशव्या देऊन पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित केले जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत ६० हजार भाविकांना कापडी पिशव्यांचे वाटप झाले असून लवकरच ६ लाख पिशव्यांचे वाटप केले जाणार आहे. या पिशव्या बनविण्याचे काम शाळांनी काही बचतगटांकडे सुपूर्द केले आहे. त्यांना दोन ते तीन रुपयांप्रमाणे एक पिशवी पडत असून आर्थिक भार प्रशासन व शालेय स्तरावर सोडविण्यात येत आहे. भाविकांकडून जमा केलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर विघटन प्रक्रिया करून त्यांना नष्ट केल्या जाणार आहे. सिंहस्थाच्या निमित्ताने शहरात आलेल्या भाविक, पर्यटकांमुळे शहरातील नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी या मोहीम कार्यान्वित आहे.

सिंहस्थात प्लास्टिकचा कचरा वाढतोय. या समस्येला शहरवासियांना सामोरे जावे लागू नये, यासाठी हा उपक्रम लाभदायक ठरत आहे. कापडी पिशव्यांच्या प्रभावी वापराची जाणीवही नागरिकांना होईल.

- उमेश डोंगरे, प्रशासनाधिकारी, शिक्षण मंडळ, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंभमेळा स्पेशलची दररोज दोनदा ट्रीप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

कुंभमेळ्यासाठी स्पेशल गाड्या सुरू झाल्या आहेत. नाशिक-भुसावळ गाडीच्या रोज दोन ट्रीप होत आहेत. ही गाडी सकाळी ८.१० आणि सायंकाळी ७.१० वाजता येते. नाशिक-इटारसी रात्री पावणेदहाला येते.
हावडा-नाशिकचे १९ व २८ ऑगस्ट, १२, १७, २४ सप्टेंबर रोजी साडेसातला आगमन होईल. भुवनेश्वर-नाशिक गाडी १९ ऑगस्टला बुधवारी सकाळी सात वाजता येईल. दुसऱ्या दिवशी ६.५५ ला निघेल. नाशिकला साधुग्रामध्ये १९ ऑगस्टला आखाडा ध्वजवंदन होत आहे. त्यासाठी भुवनेश्वर गाडी आहे. याशिवाय पुणे-कामाख्या (बिहार) ही कुंभ स्पेशल गाडी पनवेलमार्गे १९ ऑगस्टला सायंकाळी साडेसातला येईल. कुंभमेळ्या गाड्यांचा फायदा फक्त परराज्यातील प्रवाशानांच नव्हे तर स्थानिक प्रवाशांनाही होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकेश्वरमधील आखाडे सज्ज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथील श्री पंचायती निरंजनी आखाडा आणि श्री तपोनिधी आनंद आखाडा यांचे शनिवारी (दि. १५) ध्वजारोहण होत आहे. दोन्ही आखाड्यांमध्‍ये रंगरंगोटी, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आखाड्यांमधील वृक्षांना देखील रंगीत विद्युत दिव्यांनी झळाळी मिळाली आहे. आखाड्यांचा ध्वजारोहण सोहळा तसेच पेशवाई मिरवणूक पाहण्यासाठी भाविक, पर्यटकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

श्री पंचायती निरंजनी आखाडा यांचे सकाळी साडेआठ वाजता तर तपोनिधी आनंद आखाडा यांचे सकाळी साडेनऊ वाजता ध्वजारोहण होणार आहे. स्वामी समर्थ गुरूकुल पीठ रिंगरोड मार्गावर हे दोन्ही आखाडे आहेत. श्री पंचायती निरजंनी आखाड्यात आठ प्रमुख महंत असतात. यापैकी महंत रवींद्रपुरी हे मेळा प्रबंधक आहेत. ते आखाड्यात दाखल झाले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ते सकाळी ध्वजारोहण होण्यापूर्वी आखाड्यातील ध्वजाच्या स्थानापासून दूर जातील. शोभायात्रेने रविवारी (दि. १६) नगरप्रवेश करतील. तेव्हा आखाड्यात येऊन ध्वजाचे दर्शन घेतील. निरंजनी आखाड्यात धर्मध्वजा आरोहण उपमहंतांच्या हस्ते होत आहे. तपोनिधी आनंद आखाड्यात धर्मध्वजा आरोहण होत आहे. त्यांच्या भालेस्वरूप देवताना सूर्यप्रकाश देवता असे म्हणतात. त्यांचे चार महंत असतात. याबाबत श्री गणेशानंद सरस्वती यांनी माहिती दिली.

ध्वजारोहणाचे महत्त्व

शाहीप्रवेशावेळी दोन महंत भाले खांद्यावर घेतील. हे भाले म्हणजेच देवता आहेत. या देवतांना चंद्रप्रकाश असे म्हणतात. या देवता आखाड्यातील उपासना देवता कार्तिक भगवान यांच्या मंदिरासमोर केलेल्या मंडपात स्थापन होतात. सकाळ-सायंकाळ पूजा होत असते. त्याच वेळेस ध्वजाची पूजा होत असते. आखाड्याच्या परंपरेत ५२ मढी असल्याने ध्वजास ५२ हात स्तंभ तसेच ५२ बंध असे स्वरूप असते. त्यात चार मढीचे चार दोर असतात. अशा प्रकारे धर्मध्वजा हे सिंहस्थ सुरू झाला असून, धर्मध्वजा समोर दिक्षा देणे आदी धर्माची कर्तव्य होत असतात.

५२ फुटी लाकूड मिळेना

निसर्ग संपत्तीचा ऱ्हास झाल्याने ध्वजासाठी ५२ हात लांब सरळ लाकूड मिळणे कठीण झाले आहे. बहेतक आखाड्यांमध्ये बांबू एकमेकांना जोडण्यात आले आहेत. शहरात आणि आखाड्यांमध्ये भाविकांसाठी अन्नछत्र सुरू झाले आहेत. सकाळ, सायंकाळ आणि दिवसभर जेवण, नाश्ता, चहापाणी वाटप सुरू झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आखाड्यांमध्ये विधीवत उभारले ध्वजस्तंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साधुग्राममधील प्रमुख तीन आखाड्यांचे ध्वजस्तंभ विधिवत पध्दतीने आखाड्यांच्या प्रमुखांच्या हस्ते उभारण्यात आले. आता, ध्वजारोहण कार्यक्रमाची घाई आखाड्यांमागे असून, ऐन अमावस्येच्या दिवशी ध्वजस्तंभ उभारण्याचा मुहूर्त का शोधण्यात आला, असा प्रश्न साधुग्राममध्ये चर्चिला गेला.

आखाड्यांच्या ध्वजारोहण कार्यक्रमास पारंपरिक महत्त्व आहे. ध्वजस्तंभ धार्मिक संस्कार केल्यानंतरच उभारले जातात. शुक्रवारी संध्याकाळी सर्वप्रथम दिगंबर आखाड्यात पूजा करण्यात आली. आखाड्याचे महामंत्री वैष्णवदास महाराज यांच्या हस्ते ध्वजस्तंभाची पूजा करण्यात आली. तसेच ज्या ​चौथऱ्यावर आखाड्यांच्या देवता विराजमान होणार आहेत, त्या ठिकाणांचीही विविधत पूजा झाली. यावेळी आखाड्याचे प्रमुख कृष्णदास महाराज, रामकिशोरदास शास्त्री महाराज यांच्यासह मोठ्या प्रमाणावर साधू-महंत हजर होते. यानंतर पुरोहित विनायक गायधनी आणि दिनेश गायधनी यांनी निर्वाणी आखाड्यात पूजा केली. येथे आखाड्याचे श्रीमहंत धर्मदास महाराजांच्या हस्ते पूजा करण्यात आली. निर्मोही आखाड्याचे प्रमुख राजेंद्रदास आणि महामंत्री श्यामसुंदरदास महाराजांनी पूजेत सहभाग घेतला. तीन्ही आखाड्यात मशीनच्या मदतीने ५४ फूट उंचीचा ध्वजस्तंभ १५ फूट खोल खड्ड्यात रोवण्यात आला. महापालिका कर्मचाऱ्यांनी लागलीच खड्डा बुजवून साफसफाईचे काम हाती घेतले. दरम्यान, ध्वज स्तंभाची उभारणी करताना पारंपरिक पध्दतींना छेद दिला जात असल्याचा दावा काही साधू-महंतांनी केला. यापूर्वी अलाहाबादा येथे यापेक्षा उंच आणि जाड स्तंभ तयार करण्यात आला होता. मात्र, तो ५० पेक्षा साधू-महंतांनी उचलून लावला. आता, थेट मशीनरीचा वापर करण्यात येत असून, धार्मिक विधींचा सोयीने वापर होत असल्याबाबत खेद व्यक्त केला. याउलट काही साधूंनी नवीन पध्दतीचे स्वागत केले.

ध्वजारोहणाची जय्यत तयारी

ध्वजारोहणाचा कार्यक्रम १९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी होईल. आखाड्यांच्या ध्वजारोहणानंतरच धार्मिक कार्यक्रम, अन्नछत्र, खालशांमध्ये कार्यक्रम इत्यादी व्यापक स्वरुपात सुरू होतील. ध्वजारोहण कार्यक्रमास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार असून पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्थेचा वारंवार आढावा घेतला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोपेड चोरीप्रकरणी बापबेट्यास अटक

$
0
0

नाशिक : मास्टर की चा उपयोग करून शहरातील विविध भागांमध्ये पार्क केलेल्या अॅक्टिव्हा मोपेड चोरणाऱ्या बाप बेट्यांना गुन्हे शाखा दोनच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या आठ मोपेड जप्त करण्यात आल्या आहेत. जाकीर शेख (वय ५७) आणि फिरोज जाकीर शेख (वय २२, रा. वजरे कॉप्लेक्स, चौकमंडई) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही संशयित मास्टर की चा वापर करून मोपेडची चोरी करीत असत. गुन्हे शाखेला दोघेही दूधबाजार परिसरात आढळून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images