Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सिंहस्थासाठी अतिथी देवो भव:

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थात नाशिककरांनी आपली वाहने रस्त्यावर उतरवू नये. चारचाकी वाहनांचा उपयोग तर कटाक्षाने टाळावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. शहरात कुंभमेळा होत असला तरी नाशिककर त्यापासून वंचित राहू नयेत अशीच आमचीही प्रांजळ भावना असली तरी भाविकांना पायपीट करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे सांगत पोलिस अधिकाऱ्यांनी हात वर केले आहे. पोलिसांनी शहरांतर्गत मार्ग वाहतुकीसाठी खुले ठेवले खरे मात्र तो देखील मोठा फेरा ठरणार आहे. शहरातून बाहेर जाणे अत्यावश्यकच असेल तर नागरिकांनी पर्वणीपूर्वीच त्याचे नियोजन करावे, असेही पोलिसांनी कळविले आहे.

शहर नाशिककरांचे असले तरी नागरिकांवरच अनेक मर्यादा लादण्यात आल्या आहेत. बाहेरून येणाऱ्या भाविकांना प्रथम प्राधान्य द्यावे. त्यानंतर शहरातील नागरिकांनी स्नानासाठी रामकुंड तसेच अन्य घाटांवर यावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. त्यामुळे एकूणच हा कुंभमेळा नाशिकच्या भूमीत असला तरी नाशिककरांनाच त्यामध्ये दुय्यम स्थान राहणार असल्याचे स्पष्ट होते. पोलिसांनी नो व्हेईकल झोन, नो एंट्री झोनची घोषणा केली असून त्यानुसारच वाहतुकीचे सर्व नियमन होणार आहे.

नाशिककरांच्या खासगी वाहनांसाठीचे मार्ग

फेम सिग्नल मार्गे जाणारे भाविक

फेम सिग्नल, अशोका मार्ग, साईनाथनगर, इंदिरानगर, लेखानगर, राजमाता, गोविंदनगर, उंटवाडी, एबीबी सर्कल, महात्मा नगर, भोसला सैनिका शाळा, भोसला मिलीटरी कॉलेज, जेहान सर्कल, व्ही. एन. नाईक सर्कलपर्यंत भाविक वाहनांनी येऊ शकतील. तेथून भाविक पायी रामकुंडापर्यंत जाऊ शकतील.

आडगावकडून जाणारे भाविक

डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज, म्हसरुळ टी पॉईंट, राऊ हॉटेल, मखमलाबाद, कोळीवाडा, महापालिका शाळा, गंगावाडी, वेस्ट विंड विन्डो, आसाराम बापू आश्रम, भोसला मिलीटरी कॉलेज, जेहान सर्कल, व्ही. एन. नाईक सर्कल.

उपनगर नाक्याकडून जाणारे भाविक

उपनगर नाका, लवाटे नगर, जय भवानी चौक, रोकडोबा वाडी, विहितगाव नाका, वडनेरदुमाला, वडनेर गेट, पाथर्डी गाव, पाथर्डी फाटा, सिडको हॉस्पिटल, उपेंद्र, गौरीशंकर लॉन्स, विराट चौक, त्रिमूर्ती चौक, उंटवाडी, एबीबी सर्कल, महात्मा नगर, भोसला स्कूल, भोसला मिलीटरी कॉलेज, जेहान सर्कल, व्ही. एन. नाईक सर्कल. व्ही. एन. नाईक सर्कलपासून पायी शहरातून कोणत्याही मार्गे व्ही. एन. नाईक सर्कलपर्यंत पोहचल्यानंतर वाहनधारकांना रामकुंडापर्यंत पायी जावे लागणार आहे.

असे असतील 'नो एंट्री पॉईंट'

पर्वणी काळात पर्वणीच्या एक दिवस आधीपासून सायंकाळी सहा वाजेपासून पर्वणीच्या दिवशी रात्री १२ पर्यंत शहरातील ४० ठिकाणी 'नो एंट्री पॉईंट' असणार आहेत. ते पुढील प्रमाणे : ज्योती बुक डेपो, अशोकस्तंभाकडे जाणारा रस्ता, बाल गणेश उद्यान जवळील रस्ता, पंडित कॉलनीच्या एक ते पाच लेन, टिळकवाडी चौक, कैलास सलूनची गल्ली, धन्वंतरी हॉस्पिटलकडे जाणारा रोड, अरिहंत फ्रुट्स स्टोअर्स जवळील रोड, जलतरण सिग्नल, गोल्फ क्लब मागील रोड, चांडक सर्कल, एसएसके सॉलिशियर हॉटेल समोरील रोड, गोविंदनगर, मुंबई नाका भाभानगरकडे जाणारा रोड, किनारा हॉटेल, साहिल लॉन्स नासर्डी पूल, अशोक स्कूलकडे जाणारा मार्ग, तुलसी आय हॉस्पिटल, पुणे रोडवरील समाजकल्याण भवनसमोरील संपूर्ण महामार्ग, मिरची ढाबा ते पाटाला मिळणारा रस्ता, नाशिक डावा तटकालवा, राष्ट्रीय महामार्ग ३ वरील दोन्ही बाजू, मीनाताई ठाकरे मैदान, विजयनगरकडे जाणारा छोटा पूल, हिरावाडी पूल, मखमलाबाद पाटाचा रस्ता, कुमावत नगरकडून पेठ फाट्याकडे जाणारा रोड, चंद्रमा मॅटर्निटी हॉस्पिटल, सुदर्शन कॉलनी, मधुबन कॉलनी, खंडेराव मंदिराकडे जाणारा रोड, साईबाबा सुपर मार्केट जवळील रोड, राका लॉन्ससमोर, पंचम स्विट्स, रामवाडीकडे जाणारा रोड.

असे असतील क्रॉस पाईंट

शहरांतर्गत वाहतूक सुरळीत सुरू राहावी यासाठी शहरातील सात मार्गांवर ३४ ठिकाणी क्रॉस ओव्हर पॉईंट दिले आहेत. सिडको, नाशिकरोड, पंचवटी, सातपूर, अंबड, इंदिरानगर परिसरांमधील वाहनधारकांना या मार्गांनी एका परिसरातून दुसऱ्या परिसरात जाता येणार आहे.

धुळे रोड

१) आडगाव चौफुली

२) मेडिकल चौफुली

३) हॉटेल जत्रा चौफुली

पुणे रोड

१) मोह चिंचोली चौफुली

२) शिंदे गाव चौफुली

३) बंगाली बाबा

४) सिंधी कॉलनी चौफुली

५) के. एन. केला स्कूल चौक

६) पाण्याची टाकी जेल रोड चौकी

त्र्यंबकेश्वर रोड

१) समृध्दी टी पॉईंट

२) अंबड लिंक रोड

३) सातपूर गाव

४) सकाळ सर्कल

५) आयटीआय सिग्नल

६) एबीबी सर्कल

मुंबई रोड

१) विल्होळी गाव चौफुली

२) गोळाणे चौफुली

३) गरवारे टी पॉईंट

४) पाथर्डी फाटा

५) राणे नगर

६) लेखानगर

७) वडाळा नगर

दिंडोरी रोड

१) म्हसरूळ भाजी मार्केट चौक

२) रिलायन्स पेट्रोलपंप चौक

पेठरोड

१) राऊ हॉटेल चौफुली

२) मेहरधाम

(गजकर्ण, गणेश मंदिर)

३) आरटीओ चौक

४) कुमावत नगर (पाटाजवळ)

प्रशासकीय मार्ग

१) इंदिरागांधी चौक, नारायणबापू नगर

२) दिवे बंगला, टाकळी गाव

३) समर्थ नगर टी पॉईंट

४) ड्रिम सिटी चौक, जनता विद्यालय

५) फेम सिग्नल

६) उपनगर नाका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कमळेश्वर बारव अन् राममंदिराची पडझड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सिहंस्थ कुंभमेळ्यास प्रारंभ झाला असला तरी, सिन्नर येथील सिंहस्थाची पुरातन पार्श्वभूमी असलेले श्री रामचंद्र मंदिर व येथील कमळेश्वर बारव हे अजूनही दुर्लक्षित आहे. पडझड झालेल्या मंदिराची व बारवची दुरवस्था झाली आहे. या पुरातन वास्तूंना पुनर्वैभव केव्हा मिळणार याकडे सिन्नरकरांचे लक्ष लागले आहे.

शहरातील धारणकर गल्लीत श्री रामचंद्र मंदिर असून, या मंदिराच्या बाजूला बारव आहे. या दोन्ही वास्तूंना पुरातन पार्श्वभूमी आहे. या मंदिरास गुरू-शिष्य परंपरेचं मंदिर म्हणून संबोधले जाते. पूर्वी साधू-महंत या ठिकाणी येत असत. या ठिकाणी सिंहस्थाच्या बैठकांचे नियोजन होत असे. कुंभमेळ्याच्या तयारीचे नियोजन करून नंतर साधू नाशिक व त्रंबकेश्वर येथे जात असत.

या मंदिराची ट्रस्ट म्हणून १८ डिसेंबर १८७९ साली नोंद झाली आहे. राममंदिर व नरसिंह मंदिर या नावाने रजिस्‍टरमध्ये नोंद आहे. त्यावेळी गंगादास गुरुरघुविरदास बैरागी, माधवदास गुरुगोपालदास बैरागी अशी ट्रस्टींची नावे आहेत. महंत सुखरामदास यांनी हे मंदिर बांधले आहे. सध्या दुर्गादास गुरुझुंबरदास बैरागी यांच्या ताब्यात हे मंदिर आहे. या मंदिराची देखभाल पूजा अर्चा हेच पाहतात. या मंदिराचे तेच ट्रस्टी आहेत. या मंदिरातील राम व लक्ष्मण यांचे चांदीचे पुरातन मुकूट असून, त्यावेळी या मुकुटांची किमत पन्नास रुपये होती.

मंदिराच्या भिंती कमकुवत झाल्या असून, छपराची कौले जीर्ण झाली आहेत. केवळ मंदिराचा गाभारा पूजे अर्चेसाठी व्यवस्थित आहे. कुंडाची अवस्था बिकट आहे. अनेक वर्षांपासून या कुंडातील पाणी उपसलेले नाही. कचऱ्याने व गाळाने सदर कुंड भरले असून, कुंडात झाडे झुडपे वाढली आहेत. या कुंडाची साफसफाई होणे गरजेचे आहे. सिंहस्थ निमित्ताने या पुरातन वस्तूंचे जतन होणे गरजेचे आहे. याबाबत ट्रस्टी दुर्गादास बैरागी यांनी नगरपालिका, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला. शासनाने या वास्तूकडे साफ दुर्लक्ष केल्याने या पुरातन वास्तू नामशेष होतील, असे दिसू लागले आहे.

मुशाहिरा ७५ रुपये

या मंदिरासाठी शासनाकडून शिवाजी महाराजांच्या काळापासून मुशाहिरा मिळत आहे. पूर्वी हा मुशाहिरा वर्षाला ३६ रुपये होता. आता हा मुशाहिरा वर्षाला रुपये ७५ असून, यामध्ये मंदिरातील मूर्तींची पूजाअर्चा वगैरेचा खर्च समाविष्ट आहे. या मंदिर परिसरात रामकृष्णदास आणि बंकार्दास यांच्या जिवंत समाधी आहेत. मंदिराच्या बाजूला बारव असून, या बारावातील पाणी कधीही आटले गेले असल्याची माहिती उपलब्ध नाही. या बारावाच्या शेजारी ईशान्य कोपऱ्यात भुयार असून, स्नानानंतर ध्यानधारणा करण्यासाठी या भुयाराचा वापर होत असे. त्याकाळी या ठिकाणी गोशाळा असल्याची माहिती दुर्गादास बैरागी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आखाड्यांच्या कामांवर खल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

बहुतेक आखाड्यांची कामे आजही झालेली नसल्याचे सांगत आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी महाराज यांनी पत्रकार परिषदेत सरकारने दिलेल्या सुविधांबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच पोलिस यंत्रणेने दोन दिवसांपूर्वी खंबाळे येथे वाहने अडविल्याने भाविकांना व साधूंना त्रास सहन करावा लागल्याने नियोजनावर टीका केली.

वाहने अडविल्यामुळे खाद्यवस्तू, साहित्य यांची वाहतूक थांबल्याने साधूंसह सर्वांचीच गैरसोय झाली. याचा परिणाम म्हणून आखाडा परिषदेच्या साधूंची तातडीने महानिर्वाणी आखाड्यात बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध ठराव संमत करण्यात आले. यामध्ये पोलिसांनी नाहक वाहनांची अडवणूक करण्याची गरज नाही. आखाड्याशी संबंधित भाविक अथवा साधू असल्यास त्यास शहरात येऊ द्यावे. या बैठकीत अलाहाबाद कुंभमेळ्यात रेशन स्वस्त असते. तसेच स्वच्छता चांगली असते. मात्र, येथे रेशन महाग आहे, त्याची गुणवत्ता चांगली नाही, याबाबत ठराव करून शासनास देणार आहेत. तसेच, वीज मोफत दिली पाहिजे व आखाड्यांना घरपट्टी माफ करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

बैठकीत १०५ वर्ष वय असलेले श्री पंचअग्नी आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री महंत गोपालानंद ब्रह्मचारी यांनी संवाद साधला. साधूंना रेशनचे तांदूळ दिले आहे. ते गायीस देखील खाण्यास देता येत नाही, अशा दर्जाचे आहे. ध्वजस्तंभ म्हणून जे लाकूड दिले ते सागाचे नव्हते. आखाड्यात स्वच्छतागृहांची दुरवस्था आहे. ड्रेनेज व्यवस्था निकृष्ट आहे. तसेच निचरा न होणारी आहे. याबाबत नगरापालिकेसह वारंवार तक्रारी करून देखील काम झालेले नाही, असे सांगितले. आखाडा परिषदेच्या बैठकीस अध्यक्ष नरेंद्रगिरी महाराज, स्वामी सागरानंद महाराज, महामंत्री हरिगिरी महाराज, महंत प्रेमगिरी महाराज, महंत शंकरानंद सरस्वती, महंत रमेशपुरी, महंत शिवनारायण पुरी, रामानंद पुरी, महंत प्रेमानंद महाराज, महंत सत्येंद्रगिरी महाराज, महंत उदयगिरी महाराज, महंत भगतराम, महंत जगतार मुनी आदींसह सर्व आखाड्यांचे साधू-महंत उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एफडीओ’ पुरविणार मोबाइल टेस्ट लॅब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‌सिंहस्थ काळात मोठ्या प्रमाणावर अन्नदान केले जाणार असून उघड्यावरील अन्नपदार्थ सेवनाचे प्रमाणही वाढणार आहे. वेळप्रसंगी अन्नपदार्थांचे जागेवर नमूने घेता यावेत अन विषबाधेसारख्या दुर्घटना टाळता याव्यात यासाठी अधिकाऱ्यांनी मोबाइल टेस्ट लॅब पुरवावेत, असे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाचे राज्य आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी सोमवारी दिले.

कुंभमेळा २०१५-१६ अन्नपदार्थ व औषधींबाबत घ्यावयाच्या खबरदारीसाठी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने आयोजित मार्गदर्शन कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी विभागीय आयुक्त एकनाथ डवले, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, अन्न व औषध प्रशासनाचे नाशिक विभागाचे आयुक्त योगेश बेंडकुळे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. अन्न पदार्थ तसेच औषधे सेवन करतेवेळी कोणत्या दक्षता घ्याव्यात, याची माहि‌ती देणाऱ्या सीडीचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कांबळे म्हणाले, की गतवेळी सिंहस्थात काही औषधांचा ऐनवेळी तुटवडा भासला. मात्र यंदा असे होऊ नये याची काळजी आमच्या विभागाकडून घेतली जाईल. त्यासाठी आम्ही मुंबईतील अनेक औषध कंपन्यांशी चर्चा केली आहे. त्यांनीही सहकार्याची तयारी दर्शविली आहे. सिंहस्थात रस्त्यांवर अन्नपदार्थांची विक्री होईल. या अन्न पदार्थांचा दर्जा राखला जातोय की नाही याची पाहणी सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी पथक स्थापून सातत्याने करावी असे आदेश देण्यात आले.

पर्वणीच्या ३६ तासांमध्ये ८० लाख लोक नाशिकमध्ये येण्याचा अंदाज आहे. भाविकांसाठी साधुग्राम परिसरात दुग्धजन्य पदार्थांचे स्टॉल उघडले आहेत. ठिकठिकाणी अन्न छत्रालय उघडण्यात आले असून भेसळयुक्त पदार्थांचा वापर झाल्यास विषबाधेसारखे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाले तर ती मोठी आपत्ती ठरू शकेल. म्हणूनच भेसळमुक्त अन्न पदार्थच वापरले जातील यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाला पार पाडावी लागणार आहे. अन्न व औषधे तपासणी मोहिमेत हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंगचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी मदत होऊ शकते, असेही पोलिस आयुक्त जगन्नाथन यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरजवंतांसाठी मोफत वाहनसेवा

$
0
0

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान नाशिकमध्ये येणाऱ्या गरजू भाविकांच्या मदतीसाठी महाराष्ट्र खाजगी वाहनचालक बहुउद्देशीय महासंघाकडून आजारी व्यक्ती, वयस्कर, अंध, अपंग व्यक्ती, वाहतूक पोलिस, लहान मुले यांना तातडीची मोफत सेवा दिली जाणार आहे. उपमहापौर गुरूमीत बग्गा यांच्या हस्ते या सेवेचा शुभांरभ झाला. या सेवेसाठी सिंहस्थात २५ गाड्या सज्ज ठेवण्यात येणार आहे. मदतीसाठी इच्छुकांनी विजय माळी (९६५७०३८८१०), धर्मेंद्र जाधव (९९२२६२४१७४), अर्जुन गवळी (९८५०८८९८८५)यांच्याशी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्यानदासांना वाद भोवणार?

$
0
0

अरविंद जाधव, नाशिक

देशभरातील हिंदू संघटना, साधू महंत राममंदिर उभारण्यासाठी हालचाली करीत आहेत. यात वैष्णव आखाड्यांचाही समावेश असून त्यापैकीच एक असलेल्या महंत ग्यानदास यांनी हाशिम अन्सारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत आडकाठी केल्याचा आरोप साधू-महंताकडून केला जात आहेत.

महंत ग्यानदास यांच्या वागणुकीबाबत अमित शहा यांच्याकडे नुकत्याच तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याचमुळे ते नाशिकमधील ध्वजारोहण टाळून त्र्यंबकेश्वर येथे जाणार होते. नाशिकमध्येही महंत ग्यानदास वादग्रस्त ठरले असून प्लॉट वाटपात मोठा घोळ झाल्याचा आरोप साधू-महंताकडून आता होऊ लागला आहे. प्रशासनाने आवश्यक तेवढी जागा उपलब्ध करून दिली. मात्र, दिगंबर, निर्वाणी आणि निर्मोही आखाड्याचे श्री महंत व महामंत्री यांना विश्वासात न घेता महंत ग्यानदास यांच्यासहीत त्यांच्या कंपूने १६० प्लॉटचे वाटप करून टाकले. रोड फ्रंट मिळावा यासाठी २ ते ५ लाख रुपयांपर्यंत सौदेबाजी झाल्याचे सेक्टर दोनमधील एका महंतांनी स्पष्ट केले. यातून जगदगुरूसुध्दा सुटले नसल्याचे अन्य एका महंतांनी सांगितले. शाही मार्ग बदलण्याचे काम ग्यानदास यांच्यासह त्यांच्या कंपूने केले. मात्र, हा बदल फक्त रस्ते व त्या अनुषंगाने सुविधा पुरविणाऱ्या ठेकेदारांना सामोरे ठेऊन करण्यात आला. पैशांपुढे प्राचीन परंपरा मोडीत काढण्यात आल्याचा आरोप विविध खालशांकडून होतो आहे. २००७ मधील प्रयागराज येथील कुंभमेळ्यात सध्याचे निर्वाणी आखाड्याचे श्री महंत धर्मदास आणि महंत सुधीरदास पुजारी यांच्यावर गुंडाकडून हल्ला झाला होता. त्यात 'ग्यानदास महाराजांचा हात होता' अशी चर्चा दबक्या आवाजात आखाड्यांमध्ये सुरू आहे. काही महिन्यापूर्वी निर्वाणी आखाड्याचे महामंत्री गौरी शंकरदास यांच्या भावाने थेट दिगंबर आखाड्याचे श्री महंत कृष्णदास महाराज यांनाच धक्काबुक्की केल्याची घटना घडली होती. हा वाद सुध्दा जागा वाटपातूनच झाला होता. साध्वी त्रिकाल भवंता याचांही वाद अद्याप शमला नसून महंत ग्यानदास अज्ञातवासात जाणार की पलटवार करणार याची चिंता पोलिस प्रशासनाला लागून लागली आहे.

सनातन संस्कृतीला साजेशे काम करण्याची जबाबदारी सर्वांना पेलावी लागेल. साधू-महंतामधील वादाने सिंहस्थाचे नाव खराब होत असून त्याचा परिणाम भक्तांच्या संख्येवर होऊ शकतो.

- महंत सुधीरदास पुजारी, श्री काळाराम मंदिर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्यानदास महाराजांच्या सुटीवर दिगंबर ठाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अर्वाच्य भाषा, ढिसाळ नियोजन आणि श्री दिगंबर पंच आखाड्याबाबत वारंवार समोर आलेली नकारात्मक प्रवृत्ती यामुळे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांना दिगंबर आखाड्याने दिलेला पाठिंबा काढला असून, याबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचे मत आखाड्याचे श्री महंत रामकिशोरदास शास्त्री यांनी व्यक्त केले.

दिगंबर आखाड्याच्या या पवित्र्यामुळे त्र्यंबकेश्वरच्या १० आणि नाशिकमधील एक असे ११ आखाडे ग्यानदास यांच्या विरोधात एकटवाल्याचे दिसते. शाहीपर्वणीच्या तोंडावर हा वाद उद्भवला असून, यामुळे प्रशासन सुध्दा सर्तक झाले आहे. महंत ग्यानदास यांनी आजवर अर्वाच्य भाषा वापरत सर्वांना धाकात ठेवले. मात्र, हा प्रकार 'आमचे खाऊन आमच्यावर उलटण्यासारखा' असल्याचे रामकिशोरदास शास्त्री यांनी स्पष्ट केले. दिगंबर आखाडा सर्वांत जुना आणि मोठा आखाडा आहे. या आखाड्यातर्गंत ४०० खालसे येतात. मात्र, प्रत्येक वेळेस प्रशासनाने ग्यानदास यांचीच तळी उचलली. आता, हे सहन केले जाणार नाही. नूतन अध्यक्ष निवडीसाठी काही काळ जाईल. तोपर्यंत प्रशासनाने थेट आखाड्यांच्या श्री महंताशी संपर्क साधावा. त्यांच्याच माध्यमातून नियोजन होईल, असे शास्त्री म्हणाले.

दरम्यान, दिगंबर आखाड्याने रविवारी इंदौर डाकोर खालसा, तेरा भाई त्यागी आणि १४ भाई महात्यागी यांना ​बहिष्कृत केले. या आखाड्यांच्या प्रमुखांनी माफी मागितल्यास बहिष्कार मागे घेतला जाऊ शकतो. यापूर्वी असे अनेक निर्णय झाले असल्याचे रामकिशोरदास शास्त्री यांनी सांगितले. खालशांना माफी मिळू शकते. मात्र, ग्यानदास यांच्याबाबत कोणतीही तडजोड करणे शक्य नसून आखाड्यांशी डबल गेम खेळणाऱ्यांना धडा शिकवू, असा गर्भित इशाराच शास्त्री यांनी दिला.

हा मेळा अध्यक्षाविना

आखाडा परिषदेची निवड करण्यासाठी त्र्यंबकेश्वरमधील १० आणि नाशिकमधील तीन आखाड्यांमध्ये बैठकीचे आयोजन होते. ज्या व्यक्तीला जास्त आखाड्यांचा पाठिंबा त्यांनाच आखाडा परिषदेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले जाते. त्र्यंबकेश्वरमधील निरंजनी आखाड्याच्या नरेंद्रगिरी महाराजांना १० आखाड्यांनी यापूर्वीच पाठिंबा देऊन अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. मात्र, वादामुळे ते त्र्यंबकेश्वर मध्येच थांबतात. सध्या तरी नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळा आखाडा परिषदेच्या अध्यक्षाविनाच पार पडण्याची चिन्हे आहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्याचे महान पर्व पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. कुंभमेळ्याचे आयोजन मोठी बाब असून तो शांततेत पार पडावा, यासाठी आम्ही सामंजस्याची भूमिका घेऊ. मात्र, तत्वांपासून मागे हटणार नाही.

- रामकिशोरदास शास्त्री, श्री महंत, दिगंबर आखाडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वकील, डॉक्टरांचा रस्त्यासाठी मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहरातील वळण रस्त्यांच्या कामास प्रारंभ होत नाही, तोपर्यंत बागलाण वकील संघासह डॉक्टर्स असोशिएशनने घेतलेल्या आंदोलनाची व्याप्ती थांबणार नाही, असा इशारा बागलाण वकील संघ, सटाणा डॉक्टर्स असोशिएशनच्या वतीने देण्यात आला. याबाबत वकील संघ व डॉक्टर्स असोसिएशनने मोर्चा काढून बागलाणचे प्रांताधिकारी संजय बागडे यांना निवेदन दिले.

सटाणा शहरासाठी शासनाने प्रस्तावित केलेल्या वळण रस्त्यांच्या कामास तातडीने प्रारंभ करावा या मागणीसाठी बागलाण वकील संघ, सटाणा डॉक्टर्स असोशिएशनच्या वतीने सटाणा शहरातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व अ‍ॅड. पंडित भदाणे, अ‍ॅड. नितीन चंद्रात्रे, अ‍ॅड. सरोज चंद्रात्रे, डॉ. किरण अहिरे, डॉ. विलास बच्छाव यांनी केले. यावेळी आंदोलनकांनी घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर नेला. प्रांताधिकारी डॉ. संजय बागडे यांना वकील संघ व डॉक्टर्स असोशिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी बागलाण वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. पंडित भदाणे म्हणाले की, वकील वर्गाने सामाजिक बांधिलकी जोपासत या आंदोलनाचे हत्यार हाती घेतले आहे. सर्वसामान्य नागरिकांचा बळी या ठिकाणी जात असताना वळण रस्त्यासंदर्भात केवळ राजकारण होत असल्याने ते बंद करून पर्यायी वळण रस्ता सुरू करण्यात यावा. सन १९८० सालापासून शहरातील वळण रस्त्यासंदर्भात राजकारण होत आहे. वळण रस्त्याच्या कागदोपत्री देखाव्याशिवाय प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे वळण रस्त्यांचे कामकाज सुरू होत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या रस्त्याावर आतार्पंत अनेकांचे बळी गेले आहेत. यामुळे डॉक्टर व वकील संघ आक्रमक झाला आहे.

याप्रसंगी दिलीप चव्हाण, अ‍ॅड. वसंत सोनवणे, वंदना भामरे, अ‍ॅड. सतीश चिंधडे, अ‍ॅड. हिरामण सोनवणे, अ‍ॅड. प्रवीण भामरे, अ‍ॅड. रेखा शिंदे, अ‍ॅड. मनीषा ठाकूर, अ‍ॅड. स्मिता चिंधडे, डॉ. व्ही. के. येवलकर, डॉ. नंदकुमार पगार, नगरसेविका सिंधुबाई सोनवणे, किशोर कदम, सुनील सोनवणे, नंदू सोनवणे, राहुल पाटील आदींसह मान्यवर सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


श्रावण बहरलाच नाही!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

श्रावण हा महिना खऱ्या अर्थाने हर्षोल्हास देणारा. सभोवताली पसरलेल्या हिरवळीने श्रावणाची चाहूल लागते. मधूनच पडणारा पाऊस व मध्येच पडणारे ऊन असा ऊनपावसाचा खेळ या महिन्यात सुरू असतो. श्रावणात कधी उन्हात पाऊस पडतो, तर कधी पावसात ऊन पडते. जुने लोक त्याला श्रावणपहाळं म्हणायचे मात्र यंदा श्रावण सुरू होऊन दहा दिवसांहून अधिक कालावधी लोटला असून, अद्यापही उन्हाचा कडाका दूर होत नसल्याने श्रावण बहरण्याची चिन्हेच दिसत नाही.

बालकवी उर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची एक अत्यंत गाजलेली, श्रावणाचे वर्णन करणारी कविता आहे.

श्रावण मासी हर्ष मानसी... हिरवळ दाटे चोहीकडे...

क्षणात येते सर सर शिरवे... क्षणात फिरुनी उन पडे...!

गेल्या काही वर्षांपासून अखंडपणे दृष्टीपथास पडणाऱ्या या वातावरणाला मात्र यंदा काहीसा ब्रेक लागल्यासारखे झाले आहे. चोहीकडे हिरवळ दाटलेली काही ठिकाणी दिसत असली तरीही 'क्षणात येते सर सर शिरवे...क्षणात फिरून‌ी उन पडे' या उक्तीला अनुसरून पाऊस मात्र पडताना दिसतच नाही. याउलट भाद्रपदात जे प्रचंड ऊन पडते तेच सध्या अनुभवण्यास मिळत आहे. ऑगस्टमध्येच ऑक्टोबर हिटचा तडाखा नाशिककरांना बसत आहे. त्यामुळे साहित्यातील श्रावणाला आता प्रदूषणामुळे पारखे व्हायला लागते की काय असे चित्र आहे.

सध्याचे कडक उन्हाचे चित्र असल्याने देवदर्शनालाच काय परंतु, इतर कोणत्याही कामासाठी घराबाहेर निघताना नाशिककर विचार करीत आहे. सकाळी दहा वाजताच रस्त्यांवर शुकशुकाट दिसत असून आपापली कामे दहा वाजेच्या आतच सर्वजण उरकून घेताना दिसत आहेत. त्यामुळेच की काय 'वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत' ही उक्ती सध्या तरी अपेक्षाभंग करणारी ठरत आहे.

कृ. ब. निकुंब यांची

घाल घाल पिंगा वाऱ्या

माझ्या परसात

माहेरी जा सुवासाची

कर बरसात

ही कविता नजरेखालून घातली की जानपद गीतांची फार मोठी परंपरा दृग्गोचर होते. सध्या हा श्रावण तापलेल्या उन्हामुळे नाशिककरांना नकोनकोसा वाटत आहे. कधी एकदा दुपार टळून जाते असे सर्वांना होत असून श्रावणपहाळ्यांची चातकासारखी वाट पाहूनही ते येताना दिसत नाही. सिंहस्थासारखा मोठा धार्मिक उत्सव वेशीवर येऊन ठेपलेला असतानादेखील त्याचे औत्सुक्य वाटायचे सोडून लोकांना आता पाण्याची चिंता लागून राहिली आहे. पावसाची वाट पहाण्यातच आला दिवस जात असल्याने सिंहस्थाचे कोणतेही अप्रुप नाशिककरांना राहिलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात जैन बांधवांचा कडकडीत बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राजस्थान हायकोर्टाने संथारा व्रताबाबत दिलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यात जैन बांधवांनी बंद पाळला. नाशिक शहरातही या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील जैन बांधवांनी आपले व्यवहार बंद ठेवल्याने काही भागात अघोषित संचारबंदी होती.

शहरातील रविवार पेठ परिसरात असलेल्या किराणा व्यापाऱ्यांनी व्यवसाय बंद ठेवले. यात प्रामुख्याने होलसेल किराणा दुकानांचा समावेश होता. त्याचप्रमाणे औद्योगिक वसाहतीतील कारखानदार देखील यात सहभागी झाले होते. होलसेल व किरकोळ औषध विक्रेते देखील या बंदमध्ये सहभागी झाले होते. मात्र औषध दुकानदारांनी दुपारनंतर आपले व्यवहार सुरू ठेवले. बंदबाबत ग्राहकांना कल्पना नसल्याने ग्राहक दुकानाजवळ येऊन घरी परतत होते. मे‌डिकलही बंद होती. यामुळे गैरसोय झाली. सायंकाळनंतर मेडिकल उघडल्यानंतर रुग्णांच्या नातेवाइकांनी सुस्कारा सोडला. या व्रतावरची बंदी न हटवल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जैन समाजातर्फे विशाल मोर्चा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संथारा प्रथेच्या विरोधात राजस्थान हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा म्हणून नाशिक येथे सकल जैन समाजाचा मूकमोर्चा काढण्यात आला. ज्येष्ठ नेते जयप्रकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली रविवार कारंजा जैन स्थानक येथून सकाळी दहा वाजता या मोर्चाची सुरुवात झाली. मोर्चाच्या अग्रभागी अमितज्योती म. सा., अंर्तज्योती म. सा. होत्या.

रविवार कारंजा जैन स्थानक, रेड क्रॉस सिग्नल, शालिमार, सीबीएसहून हुतात्मा स्मारक येथे मोर्चा झाला. तेथे प. पू. अमितज्योतीजी म.सा. यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले. देवयानी फरांदे, गुरमित बग्गा, आकाश छाजेड, जैन सेवा संघाचे अध्यक्ष जेसी भंडारी, एच. एल ग्रुपचे हरिष लोढा, सिडको संघाचे राजेंद्र चोरडिया यांच्यासह सुमारे पाच हजार लोक उपस्थित होते.

हुतात्मा स्मारक येथे बोलताना अमितज्योतीजी म. सा. यांनी सांगितले की, संथारा आमची प्राचीन परंपरा आहे. आचार्य विनोबा भावे यांनीही संथारा घेतली होती. हिंदू संस्कृतीतही समाधी परंपरेला मान्यता आहे. ब्रिटिश सरकारने सुध्दा त्यावेळी संथारा परंपरेला मान्यता दिली होती. आज आम्ही स्वतंत्र असूनही आमच्यावर बंधने लादली जात आहेत. राज्यघटनेनुसार प्रत्येकाला आपला धर्म पाळण्याची पूर्णतः मुभा आहे. कोर्टाने आमच्या या हक्कावर गदा आणू नये. संथारा आत्महत्या नसून आत्मकल्याणाचा मार्ग आहे.

जयप्रकाश छाजेड यांनी म्हणाले की, कोर्टाने याबाबत फेरविचार करून निर्णय घ्यावा अन्यथा भविष्यात यापेक्षा जास्त मोठे आंदोलन उभे राहील. सरकारनेही हस्तक्षेप करुन जैन समाजाला न्याय मिळवून द्यावा. मोर्चा झाल्यावर सकल जैन समाजातर्फे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. जैन समाजातर्फे दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व व्यावसास बंद ठेवण्यात आली होती.

अमितज्योती म. सा. तर्फे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर एक विशेष राखी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली व त्यांना सांगण्यात आले की, ही राखी सरकारला देऊन सरकारने जैन समाजाची रक्षा करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे धरणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर आणि जिल्ह्यातील नर्सिंग कॉलेजेमध्ये शिक्षण घेणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांनी सोमवारी आक्रमक होत कलेक्टर ऑफिसच्या आवारात ठिय्या देत उपोषण केले. नर्सिंगच्या अभ्यासक्रमाबाबत विद्यापीठाकडून नव्याने चुकीची धोरणे राबविली जात असल्याच्या निषेधार्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता.

नर्सिंगच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नी आरोग्य विद्यापीठाकडे वारंवार तक्रार करूनही विद्यार्थ्यांना दाद दिली जात नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. याप्रश्नी आता ‌जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. सोमवारी दुपारी विविध रस्त्यांवरून एकत्र येणाऱ्या नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली अन् काही वेळाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्का जाम झाला.

नर्सिंग अभ्यासक्रमाबाबतीत नव्याने उभा राहिलेला प्रश्न या विद्यार्थ्यांनी मंगळवारी कुलगुरूंना घेराव घालत मांडला. याप्रश्नी माहिती घेऊन योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासनही आंदोलनकर्त्यांना विद्यापीठाच्या वतीने देण्यात आले. परीक्षा पध्दतीत बदल करताना विद्यार्थ्यांना विश्वासात घ्यावे, अशीही अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त करण्यात आली. या आंदोलनावेळी अभाविप महानगर मंत्री कुणाल काबरा, जिल्हा संयोजक अमोल गायकवाड, मविप्र, के. के. वाघ नर्सिंग, गोखले नर्सिंग, नाशिक नर्सिंग, नामको नर्सिंग, मातोश्री नर्सिंग, आडके नर्सिंग आदी संस्थांच्या शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्वारका चौक घेणार मोकळा श्वास!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

द्वारका चौकातील महापालिकेच्या जागांवर अतिक्रमण केलेल्या टपरीधारकांची याचिका नाशिक न्यायालयाने फेटाळली. आपल्या अधिकारक्षेत्रात येत नसल्याचे सांगून कनिष्ठ न्यायालयाने अतिक्रमणधारकांना दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे द्वारका सर्कलवरील अतिक्रमण काढण्यास महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे. संबंधित निकालाविरोधात अतिक्रमणधारकांनी उच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली तर, महापालिकेन कॅव्हेट दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

द्वारका चौक अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याने नेहमीच वाहतूक कोंडी होते. महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याने हा चौक ओलाडंताना प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. महापालिकेला अनेक वेळा तक्रारी आणि विनंत्या करूनही अतिक्रमण विभागाने याकडे दुर्लक्ष केले. अखेर अतिक्रमण विभागाने या अतिक्रमणाबाबत गंभीर भूमिका घेत, त्यावर हातोडा चालविण्याचा निर्णय जूनमध्ये घेतला होता. अतिक्रमण निर्मूलन विभागाने द्वारकावरील ३३ टपऱ्या व गॅरेज अशा अतिक्रमणधारकांना सात दिवसांच्या नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, या अतिक्रमणधारकांनी नाशिक न्यायालयात धाव घेतली होती. महिनाभरापासून त्यावर सुनावणी सुरू होती. सोमवारी यावर नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयात सुनावणी झाली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. पटारे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. महापालिकेच्या वतीने विश्वास पारेख यांनी बाजू मांडली. न्यायालयाने हा विषय आपल्या अधिकार क्षेत्रात येत नसल्याचे सांगून हा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे महापालिकेला दिलासा मिळाला असून, आता अतिक्रमण निर्मूलन मोहिमेतर्फे हे अतिक्रमण जमीनदोस्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पर्वण्यांचा अडथळा

न्यायालयाने दिलासा दिला असला तरी, पर्वणी तोंडावर असल्याने अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. अतिक्रमण काढल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिली पर्वणी झाल्यानंतरच या अतिक्रमणावर हातोडा चालण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षतोडीला संरक्षण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या रस्त्यांवर असलेल्या अडीच हजारांवरील झाडे तोडण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील झाडे तोडण्याचे महापालिकेचे मनसुबे उच्च न्यायालयापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयानेही हाणून पाडले. चिंच, वड, उंबर, आंबा यासारखी झाडे तोडायची असतील तर, उच्च न्यायालयातच अपील करण्याचा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे रस्त्यांवरील झाडांचा प्रश्न पुन्हा रेंगाळला आहे.

महापालिकेच्या प्रमुख रस्त्यांच्या विकासकामात अडथळा ठरणारी २६०९ झाडे तोडण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने अनेक जाचक अटी शर्ती घालून दिल्या आहेत. विशेषतः चिंच, उंबर, वड, आंबा ही वृक्ष तोडू नयेत, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. तर, ६४० झाडे ही पुनर्रोपण करण्याचे आदेश दिले होते. सोबतच ११४५ झाडे तोडण्यासंदर्भात समितीने निर्णय घ्यावा, असे आदेशही दिले होते.

या निर्णयामुळे महापालिकेच्या रस्त्यांचे काम खोळबूंन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे शक्य नसल्याने महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती.

उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी महापालिकेच्या वतीने करण्यात आली होती. सोबतच रस्त्यावरील सर्व झाडे तोडण्यास सरसकट परवानगी द्यावी, अशी मागणी करीत कुंभमेळ्याचे कारण दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेची मागणी फेटाळत पालिकेला दिलासा देण्यास नकार दिला. या संदर्भातील निर्णय उच्च न्यायालयाच घेईल, असे सांगत अपील करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.

पुन्हा उच्च न्यायालयात धाव

सर्वोच्च न्यायालयाने दिलासा न दिल्याने पालिकेला पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेऊन आपली बाजू मांडावी लागणार आहे. या प्रक्रियेला बराच कालावधी लागणार असल्याने रस्त्यांची विकासकामे रेंगाळण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राममंदिर, प्लॉट वाटप ग्यानदासांच्या मुळावर

$
0
0

अरविंद जाधव, नाशिक

अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वाद खटल्यातील मूळ याचिकाकर्ते हाशिम अन्सारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची इच्छा होती. मात्र, महंत ग्यानदास यांनी त्यांचे मनपरिवर्तन केले. या वादाला खतपाणी देण्याचे काम ग्यानदास महाराजांनी केल्याचा आरोप साधू-महंताकडून होतो आहे. कुंभमेळ्याची पहिली पर्वणी अवघ्या पाच दिवसांवर असताना ग्यानदास यांच्याबाबत निर्माण झालेल्या वादामुळे यंदाचा सिंहस्थ आखाडा परिषदेच्या अध्यक्षाविना पार पडणार, याचे संकेत मिळत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थी नसलेली शाळा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण तालुक्यातील पिंपळे (सावरपाडा) येथील प्राथमिक शाळेत शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. जुलै महिन्यात शाळेला कुलूप लावले होते. त्यात सुधारणा होत नसल्यामुळे आणि शिक्षकांच्या मनमानी कारभाराला कंटाळून पालकांनी मुले शाळेतून काढून घेतली आहेत. तीन महिन्यापासून शाळेची पटसंख्या शुन्य आहे. सदर शिक्षकांची तत्काळ बदली करण्यासाठी कळवण पंचायत समिती, जिल्हा परिषद यांना निवेदन देऊन सुध्दा कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थ नाराजी व्यक्त करीत आहेत.

पिंपळे बु. सावरपाडा येथील प्राथमिक शाळेत तीन महिन्यापासून एकही विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जात नाही. शाळेच्या रामभरोसे कारभाराला कंटाळून पालकांनी दुसऱ्‍या शाळेत मुलांना दाखल केले आहे. त्यामुळे शाळा शुन्य पटावर आली आहे.

शालेय व्यवस्थापन समितीमध्ये केव्हा मिटिंग होते ते शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व सदस्यांना माहिती दिली जात नाही. त्यात शालेय व्यवस्थापण समितीचा अध्यक्ष हा निरक्षर असून, त्यांचा पाल्य शाळेत शिक्षण घेत नाही तरी आपल्या सोयीसाठी अंगठेबहादूर अध्यक्षाची निवड केली आहे. सावरपाडा ही दोन शिक्षकी शाळा असून, मुख्याध्यापक व इतर एक शिक्षक दररोज बाहेरगावाहून ये-जा करतात. अनेकवेळा एकच शिक्षक शाळेत उपस्थित राहतो.

पालक मेळाव्यात मुख्यापध्यापक दिनकर आहिरे हे पालकांशी व्यवस्थित वागत नाहीत. सन २००६ मध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम केले पंरतु, आजतागायत टाकीत पाणी उपलब्ध झालेले नाही. पोषण आहार शिजवण्याच्या शेडचे पत्रे पाच महिन्यांपासून उडाले आहेत. दिवसा शाळेत शिक्षक मद्यपान करून येतात, अशा अनेक समस्यांचा पाडा गटशिक्षण अधिकारी यांच्यासमोर ग्रामस्थांनी मांडला. या शिक्षकांवर तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी सरपंच रमेश पवार, विष्णू ठाकरे, मोतीलाल भोये, उत्तम भोये, हिरामन भोये, दौलत पवार, बाळू बहिरम, ग्यानदेव भोये, भावराव पवार, रमेश भोये, रामदास पवार, प्रकार ठाकरे, भिवराज पवार, अनिल बहिरम व ग्रामस्थांनी केली आहे.

सावरपाडा प्राथमिक शाळेची पटसंख्या शुन्यावर आली आहे. गावाच्या सहकार्याने पुन्हा शाळेचा कारभार सुळरीत करण्यात येईल. सदर शिक्षकांवर कार्यवाहीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविला आहे.

- ई. एन. पवार, प्रभारी गटशिक्षण अधिकारी, कळवण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भक्कम इमारतीला ठरवले धोकादायक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या पश्चिम विभागीय अधिकाऱ्यांनी भक्कम इमारतीला धोकादायक ठरवत पाडण्याची नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित रहिवाशांनी पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतल्यानंतर इमारत पाडण्यासाठी नव्हे तर दुरुस्तीसाठी नोटीस बजावल्याचा खुलासा संबंधित अधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे.

महापालिकेच्या पश्चिम विभागांतर्गत येणाऱ्या अशोक स्तंभावरील विठ्ठल पार्कमधील डी विंग धारकांनी आपल्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी पश्चिम विभागीय कार्यालयाकडे अर्ज दाखल केला होता. मात्र, सरकारी काम करण्याची सवय झालेल्या विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांनी इमारतीच्या दुरुस्तीला परवानगी देण्याऐवजी आपल्या कार्यालयातील जुनाच फॉरमॅट बाहेर काढत चक्क त्या इमारतीला धोकादायक ठरवले. तसेच, चोवीस तासांच्या आत इमारत खाली करून ती पाडून टाकण्याचे फर्मान सोडले. त्यामुळे या इमारतीत राहणाऱ्या ३१ कुटुंबामध्ये भितीचे वातावरण तयार होऊन त्यांनी तत्काळ महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. संबंधित पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ही नोटीस चुकून गेल्याचा धक्कादायक खुलासा विभागातर्फे करण्यात आला. नोटिसांच्या छापील फॉर्म्युल्यामुळे ही गडबड झाल्याचा दावा संबंधित अधिकाऱ्यांनी केला. राजकीय पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर ३१ कुटुंबांना दिलासा मिळाला असला तरी चोवीस तास या कुटुंबांना दहशतीखाले रहावे लागण्याची वेळ संबंधित अधिकाऱ्यांनी आणली होती.

तारखेतही फसवणूक

संबंधित इमारतधारकांना दिलेल्या नोटिसवर तेरा ऑगस्टची तारीख आहे. परंतु, ही नोटीस शनिवारी या रहिवाशांना बजावण्यात आली. संबंधित इमारत २४ तासाच्या आत खाली करून ती स्वखर्चाने पाडून टाकण्याचे फर्मान सोडले. त्यामुळे या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. बेपर्वा पद्धतीने काम करण्याच्या या पद्धतीमुळे नागरिकांना मात्र मानसिक त्रास सहन करावा लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुक्त’ची पीएचडी पूर्णवेळ!

$
0
0

प्रशांत भरवीरकर, नाशिक

नोकरदार व महिलांनी पीएचडी करूच नये असा हेतू बाळगत 'ज्ञानगंगा घरोघरी' असे ब्रीद मिरवणाऱ्या मुक्त विद्यापीठाने पीएचडी अभ्यासक्रम पूर्ण वेळ केल्याची संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थीवर्गातून उमटत आहे. हा निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा अन्यथा प्रवेशाबाबत विचार करावा लागेल, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

यूजीसीच्या नियमांचा बागुलबुवा पुढे करून पूर्ण वेळ पीएचडीचे फर्मान विद्यापीठाने काढले आहे. दूरस्थ शिक्षणाची परंपरा जोपासून पीएचडी सुध्दा त्या नियमाप्रमाणे करणे गरजेचे असताना सक्ती करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, टिळक विद्यापीठ पुणे हे पूर्णवेळ सोबतच दूरस्थ व अर्धवेळ पीएचडी अभ्यासक्रम चालवतात असे असताना नाशिकला मात्र मुक्त विद्यापीठात कुलगुरू माणिकराव साळुंके परस्पर एकतर्फी निर्णय घेतात अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. साप्ताहिक तीन दिवसाचा कोर्स अचानक सुटीशिवाय दररोज १० ते ६ पूर्णवेळ थांबून करण्याचा निर्णय घेण्यात येत असेल तर पीएचडीसाठीच्या जागा ५० टक्के कमी होणारच ना असेही विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. विद्वत्त परिषद, व्यवस्थापन परिषद यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. परंतु त्यांनाही विश्वासात घेतले जात नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या परिषदांच्या ज्या बैठका होतात त्यांना उच्च तंत्रशिक्षण सचिव, कृषीसचिव हजेरीच लावत नसल्याची धक्कादायक बाबही उघडकीस आली आहे. त्यांची हजेरी असती तर तक्रारी त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचल्या असत्या.

यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पीएचडी पूर्णवेळ करण्यात आलेली आहे. इतर मुक्त विद्यापीठांनी पीएचडी पूर्णवेळ केलेली आहे. अर्धवेळ पीएचडीमुळे क्वालिटीचे प्रश्न निर्माण होतात.

डॉ. माणिकराव साळुंके, कुलगुरू, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२० क्विंटल कांद्याची चोरी

$
0
0

मनमाड : कांद्याला सोन्यासारखा भाव मिळत असतानाच नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील एका शेतकऱ्याच्या कांदा चाळीतून तब्बल एक लाख रुपयांचा २० क्विंटल कांदा चोरीला गेला. आबासाहेब केशव पवार यांच्या कांदा चाळीचे कुलूप तोडून चोरट्यांनी कांदा चोरून नेला. पवार यांनी दोन दिवस कांद्याचा शोध घेतला. सोमवारी सकाळी त्यांनी फिर्याद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडकरांवर पाणीसंकट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

पावसाने दडी मारल्याने आणि पालखेडमधून सोडलेल्या आवर्तनातून पाणी चोरी रोखण्यास पोलिस बंदोबस्त उपलब्ध नसल्याच्या कारणामुळे तब्बल आठवडाभर आवर्तन लांबल्याने मनमाड शहरावर पुन्हा पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. वागदर्डी धरणातील पाणीसाठा अखेर संपुष्टात आल्याने शहराला आवर्तन मिळेपर्यंत नळाद्वारे होणारा पाणी बंद करण्यात आला आहे. तशा आशयाचा जाहीर फलक मनमाड नगरपालिकेतर्फे शिवाजी चौक येथील पाण्याची टाकी येथे लावण्यात आला आहे.

मनमाड शहरात भीषण पाणीटंचाई असून, आवर्तनाला उशीर झाल्यास मनमाडकर नागरिकांवर पाण्यासाठी दाही दिशा फिरावे लागण्याची वेळ येणार आहे. पावसाने ओढ दिली धरणाने तळ गाठला आणि दहा दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असूनही आवर्तन लांबल्याने पाणिबाणीची स्थिती ओढवली आहे. पाण्याची टाकी आणि कुपनलिकांवर आता महिलांची गर्दी असून, कुपनलिका ही आटल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.

शहराची पाणीटंचाई पाहता पालखेड डाव्या कालव्यातून मनमाडसाठी आवर्तन सोडले जाणार आहे. पण, आवर्तनाचे पाणी मध्येच चोरीला जाण्याचे संकट असल्याने पोलिस बंदोबस्त असल्याशिवाय पाणी सोडले जाणे अशक्य आहे. नाशिक येथील शाही पर्वणीमुळे पोलिस बंदोबस्त उपलब्ध नसल्याने किमान पाच ते सहा दिवस आवर्तन सुटणे अवघड आहे. त्यामुळे नागरिकांच्या हालअपेष्टांमध्ये भर पडली आहे. आवर्तन कधी मिळणार, त्यानंतर वागदर्दी धरणात पाणी कधी पोहचणार या प्रश्नांमुळे मनमाडकर चिंतेत असून, सद्यस्थितीत तरी तीव्र पाणीटंचाईने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. पाणी मिळण्याची शक्यता आहे. बंदोबस्त नाही याचा फटका नागरिकांना बसत असल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images