Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कुंभमेळा: शाही स्नानासाठी सज्ज नाशिक

0
0

कुंभमेळा: पहिल्या शाही स्नानासाठी अशी सजली नाशिकनगरी

सिंहस्थाच्या निमित्ताने येणाऱ्या लाखो भाविकांचे आदरातिथ्य करण्यासाठी प्रशासनासह नाशिक नगरी सज्ज झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या रंगीत तालमी करून झाल्या आहेत. ठिकठिकाणी रंगरंगोटी करून प्रशासनाने शहराला नववधूसारखे नटविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


#Follow : कुंभमेळा

0
0

राज जोशी (लेखक रेडिओ मिर्चीचे आरजे आहेत)

नाव घेताच पुढे काही जास्त बोलायची गरज तशी पडणार नाही. वर्षभरापासून नाशिकमध्ये ज्या सोहळ्यामुळे लगबग दिसून येत आहे, विकासकामे जोरावर झाली आहेत, रस्ते रुंद (?) झाले आहेत. तो सोहळा, ती पर्वणी आज पार पडत आहे. साधू-संत, ऋषी-महर्षी, बुवा-बाबा (AC) मंडप, डेरे टाकून दाखल झालेत. प्रवचन, सत्संग, भजन-कीर्तन यांनी वातावरण भक्तिमय झाले आहे. भाविकांची अलोट गर्दी होणार यात काहीच शंका नाही. ओघानेच आपणास नाशिककर म्हणून यजमानाची भूमिका बजावताना काही काळजीपूर्वक जबाबदाऱ्या पार पाडणं अपेक्षित आहे. आपण सर्वतोपरी सहकार्य करणार यात काही शंका नाहीच आहे. पण यात तरुणांसाठी हा सोहळा काय घेऊन आलेला आहे आणि तरुण कुठल्या पद्धतीने त्याकडे बघत आहेत हे पाहणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. शेवटी आजची 'Trending' गोष्ट हीच आहे ना.

धार्मिक गोष्टींना फॉलो करायला लावले की सर्वात आधी तरुण वर्ग नाक मुरडतो. चुकीचं त्यांचं पण नसतं. कारण बऱ्याच वेळा घरचे त्यांना धाकात घेऊन ते करायला भाग पाडतात (कारण त्यांना पुण्य कमवायच असत). त्यामागची शास्त्रीय कारणे (स्वतःलाच माहीत नसल्याने) सांगायचा त्रास ते घेत नाहीत. तरी आजकालच्या पुढारलेल्या अत्याधुनिक पिढीला स्वतःच अर्थ लावून फॉलो करायला आवडायला लागले आहे आणि म्हणूनच ते आपल्या पद्धतीने हा कुंभमेळा फॉलो करणार आहेत.

बहुतेकांना तर सर्वप्रथम कुतूहल म्हणून याकडे बघावेसे वाटत आहे. १०-१२ लाखांच्या शहरात एक कोटीहून अधिक जनता कशी manage होणार याचे कॅल्क्युलेशन्स NMC पेक्षा लोकांनी जास्त मांडले आहेत. ट्रॅफिकचे रुट्स कुठून कुठे जाणार आणि कुठून कुठे बंद होणार यासाठी डोक्यामधे गूगल मॅप तयार झालेत. काहींनी अमृताचा थेंब एक्झॅक्ट कुठे पडला याची पण माहिती काढून ठेवली आहे आणि बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांना नशिकचा manipulated महिमा सांगायची सोय केली आहे.

या सोशल सर्व्हिससोबत अजून एक गोष्ट प्रत्येकाच्या खिशात असते तो म्हणजे कॅमेरा असलेला मोबाइल नाहीतर सुलभ हफ्त्यांवर आलेला D-SLR. मग शहर कसे दिसते यापेक्षा माझा प्रोफाइल पेज कसे दिसले पाहिजे यासाठी फोटोग्राफी सुरू होते. घाटापासून जटांपर्यंतचे फोटो विविध अँगलने काढले जातात आणि घरातल्या नळाला नसतील तेवढे फोटोला फिल्टर्स लावून त्याला शुद्ध केले जाते. पण यात बऱ्याच तरुणांनी त्यांचे फोटोग्राफीचे कसब छान आजमावले आहे.

या भव्य कुंडात तंत्रज्ञानाने डुबकी लावली नाही तर मग चालेल का? अनेक तरुणांनी स्वतःहून काही लोकोपयोगी Apps बनवले. नाशिकची बरीच माहिती, राहण्या, पाहण्या आणि खाण्याची ठिकाणे हे सर्व उपलब्ध करून दिलेत. प्रशासनदेखील या handy तंत्रज्ञानाशी हातमिळवणी करायला चुकले नाही. इमर्जेन्सी, अलर्ट, हेल्पलाइन, पोलिस या सर्व उपयुक्त गोष्टींचा त्यात समावेश आहे.

या पापी जगात पुण्य कमावण्याचा मार्ग फार कमी वेळा मिळतो. आपल्याकडे तो आयता चालून आला आहे. आता आपल्याला कुठे मिळणार शाही स्नानाचा मान? आपण शाही आखाड्याचे नाही ना? (आपल्याला कुस्तीचा आखाडा माहिती आहे. तोही आपण बाजूला उभं राहूनच पाहिलाय.) मग सेवाभावी संस्था स्थापन करून या न त्या मार्गाने सेवा करायचा मार्ग+ट्रेंड निर्माण झालय. (बऱ्याच कमी, उपयोगाच्या ट्रेंडींग गोष्टींपैकी हा एक आहे ही समाधानकारक बाब). रामकुंडावर जाऊन काही चित्रकारांनी रेखाटन कलेने परिसराचे वेगळेच रुपडे दाखवले आहे. तर भाविकांच्या पूजा अर्चनांसाठी तरुण पिढीतले याज्ञिक तयार झाले आहेत.

जमाना बदलला की प्रत्येक स्थिती ही त्या काळानुसार फॉलो होते. याच्या आधीच्या कुंभमेळ्यापर्यंत कुंभमेळा हा पापक्षालन आणि पुण्यग्रहणाचा मार्ग होत. जास्तीत जास्त त्याच्या अनुषंगाने शहर विकास घडायचा. पण हा कुंभमेळा आधुनिक धार्मिक पिढी घडवेल यात तिळमात्र शंका नाही. चला मग एक अविस्मरणीय ट्रेंडींग सोहळ्यासाठी तयार होऊ या.

सिंह गुरूज्ञतथा भानु चंद्रश्चंक्षयस्तथा।

गोदावर्या भवेत्कुंभो जायतेsवनि मण्डले।।

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्वणीसाठी नाशिककर सज्ज

0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

सिंहस्थ कुंभमेळाची पहिली पर्वणी आणि शाही स्नानासाठी देशभरातील भाविकांसह शहरातील नागरिकही सज्ज झाले आहेत. पोलिस प्रशासनाने सायंकाळपासून रस्त्यांवर बंदोबस्त तैनात केला असून दोन दिवस शहरात येणाऱ्या भाविक व पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत.

शनिवारी (दि. २९) सकाळी सात वाजता होणाऱ्या शाहीस्नान परिसर आणि भव्य मिरवणूक मार्गाचा पोलिसांनी शुक्रवारीच ताबा घेतला. त्यामुळे पंचवटीसह जुने नाशिक परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. देशभरातून दाखल होत असलेले भाविक मिळेल तेथे मुक्कामसाठी लॉज व हॉटेलचा शोध घेतांना दिसले. नाशिककरही पर्वणी काळात घर गाठण्यासाठी पर्यायी मार्ग शोधतांना दिसून आले. ठिकठिकाणी चारचाकी आणि मोठ्या वाहनांना प्रवेश बंदी असल्याने कोठून आणि कसा मार्ग मिळेल याची चाचपणी नागरिक करतांना दिसत होते.

सिंहस्थ पाससाठी गर्दी

पोलिस प्रशासनकडून सिंहस्थ पास मिळते का? यासाठी काही विक्रेते व व्यापाऱ्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करताना दिसले. तसेच पर्वणी काळात भाविकांना मदतीसाठी पोलिसांकडून नेमणूक करण्यात आलेले स्वयंसेवकांनी पास व ओळखपत्र मिळविण्यासाठी भद्रकाली पोलिस ठाण्यात गर्दी केली. स्वयंसेवकांच्या पासमध्येही गोंधळ झालेला दिसून आला. नावं कुणाचे आणि फोटो दुसऱ्याच व्यक्तीचे असा गोंधळ उडालेला आहे.

आपत्कालीनचीही जय्यत तयारी

द्वारका, अमरधाम रोड मार्गे रामकुंडावर स्नानासाठी जाणारे भाविकांसाठी असलेला मार्ग हा आपातकालीन मार्ग म्हणून घोषित करण्यात आले आहे. आझाद चौकापासून मार्गाच्या दुतर्फा लाकडी बल्ली टाकून बॅरेकेंडिंग करण्यात आली आहे. मार्गावर सुसज्ज पोलिस चौकी उभारण्यात आली असून येथे सशस्त्र पोलिस तैनात करण्यात आले आहेत. आपातकालीन समयी उपयोगी पडेल यासाठी रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. अमरधान स्मशानभूमी जवळच मार्गावर भाविकांसाठी स्वच्छतागृह बनविण्यात आले असून तात्पुरते पत्र्याचे शौचालय बनविण्यात आली आहे. ध्वनीक्षेपकावरून भाविकांना हिंदी, मराठी आणि इंग्रजीतून सूचना दिल्या जात आहेत. शहरातील विविध भागात एकाचवेळी या सूचना ऐकू येत आहेत.

मिसिंग तक्रारी वाढल्या

सिंहस्थात ताटातूट होऊन व्यक्ती हरवितात. मात्र आता ध्वनीक्षेपकावरून हरविलेल्या व्यक्तींची माहिती जारी केली जात आहे. पर्वणी सुरू होण्यापूर्वीच शुक्रवारी उत्तर प्रदेश व बिहार राज्यातून आलेल्या काही भाविकांची मुले रामकुंडावर हरविली. त्यांची शोधाशोध सुरू झाली; पोलिसांना ती मुले रामकुंडावर आढळून आली. तशी सूचना ध्वनीक्षेपकावरून हिंदीतून देण्यात आली. त्यामुळे पालकांना आपली मुले लगेच सापडली.

पर्वणीपूर्वीच स्नानासाठी गर्दी

शहरात विविध घाट स्नानासाठी सज्ज करण्यात आले आहे. रामकुंडात स्नान करण्याचा ओढ भाविकांना आहे. त्यामुळे पर्वणीत स्नान करता येणार नसल्याची शक्यता गृहीत धरून अनेक उत्तर भारतीय भाविकांनी शुक्रवारीच रामकुंड गाठून स्नान उरकून घेतले. स्नानाच्या वेळी कोणी बुडून जाऊ नये यासाठी प्रशिक्षित जीवरक्षक गोदावरी परीसरात तैनात झाले आहेत.

जीवनाश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी

शहरात शनिवारी (दि. २९) होणाऱ्या पहिल्या सिंहस्थ पर्वणीमुळे पेट्रोलपंपसह अन्य दुकाने बंद राहणार आहेत. त्यामुळे पंचवटी परिसरातील रहिवाशांनी शुक्रवारी पेट्रोल, डिझेलसह भाजीपाला आणि अन्य जीवनाश्यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी गर्दी केली. पंचवटी परिसरातील रहिवाशांनी आपल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनात इंधन भरून घेण्यासाठी शुक्रवारी गर्दी केली. शुक्रवारी सायंकाळी सर्व रस्ते बंद होणार असल्याने अगोदरच सर्व तयारी करण्याकडे सगळ्यांचा कल दिसून आला. याशिवाय दुधवाले, भाजीवाले, फळवाले येणार नसल्याने अनेक गृहिणींनी दोन दिवस पुरेल असा दुधाची तसेच भाजीपाल्याची खरेदी करून ठेवली.

भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज

सिंहस्था कुंभमेळ्यातील पहिली पर्वणी शनिवारी आहे. औरंगाबाद आणि पुणे मार्गाने येणाऱ्या भाविकांसाठी जेलरोडचे नांदूर आणि दसक घाट सज्ज झाले आहेत. रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठीही येथेच स्नानाचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शुक्रवारी दुपारी नांदूरसह दसक घाटाची पाहणी केली. चांगले नियोजन केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. नांदूर आणि दसक घाटावर प्रत्येकी सहा वस्त्रांतरगृह तयार आहेत. दसक व नांदूर घाटावर प्रत्येकी दीडशे पोर्टेबल स्वच्छतागृहे ठेवण्यात आली आहेत. सिन्नरफाटा वाहनतळापासून ते दसक घाटापर्यंत आणि औरंगाबादरोडवरील वैष्णवी लान्सपासून ते नांदूर घाटापर्यंत पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहाची सोय करण्यात आली आहे. मार्गावर औषध फवारणी करण्यात आली आहे. रुग्णवाहिका, वैद्यकीय सेवा केंद्र तसेच अग्नीशमन बंब सज्ज आहेत. मार्गदर्शनपर फलक, लाऊडस्पीकर लावण्यात आले आहेत. पात्राची खोली दर्शविण्यासाठी झेंडे आणि दोरी लावण्यात आली आहे. पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रवेश आणि बाहेर जाण्याचे मार्ग तसेच घाट परिसरात कोणी उघड्यावर शौचास बसू नये म्हणून फलक लावण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकला पोस्टरचा विळखा

0
0

अमोघ पोंक्षे, कॉलेज क्लब रिपोर्टर

राजकीय भाऊगर्दीने व्यापणारी सार्वजनिक ठिकाणे आता साधू, महंत आणि बाबांच्या पोस्टर्न बहरल्याचे दिसून येत आहे. भीत्तीपत्रके आणि होर्डिंग्जने केवळ साधुग्रामच नाही तर शहराच्या अनेक भागात दिसून येत आहेत. हरित कुंभाअंतर्गत शहरात नवनवीन संकल्पना राबविल्या जात असताना या पोस्टरबाजीमुळे शहराचे विद्रुपीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे.

शहर परिसरात राजकीय पक्षातील नेते मंडळींची पोस्टरबाजी कमी होती की काय म्हणून आता त्यात कुंभमेळ्यानिमित्ताने साधू-मंहतांच्या पोस्टरबाजीची भर पडली आहे. या पोस्टरबाजीच्या विळख्यातून नाशिकचा उड्डाणपूलही सुटलेला नाही. उड्डाणपूलाखालील पिलर्सना विविध साधू-महंतांची पोस्टर्स आखाड्यांतर्फे चिकटवण्यात आली आहेत. भागवतकथा, श्रीरामकथा, पारायण, सत्संग यांची माहिती देणारे पोस्टर्ससह साधू, महंतांची जाहिरात करणारेही पोस्टर्स सध्या शहरात अनेक ठिकाणी दिसत आहेत. त्यामुळे शहराच्या विद्रुपीकरणात आणखीनच भर पडली आहे. तसेच शहरात जागोजागी साधूंच्या प्रवचनाची लागलेली मोठमोठी पोस्टर्स आणि बॅनर वाहतुकीसही अडथळा निर्माण करीत आहेत. राजकीय पक्षाप्रमाणे आपण दुसऱ्यांपेक्षा अधिक सरस आहोत, हे पोस्टर्समधून दाखवण्याचा प्रयत्न होत आहे की काय, अशीही शंका उपस्थित होत आहे.

प्रबोधनपर पोस्टर्स

एकीकडे महंतांच्या पोस्टरबाजीवर सामान्य नागरिकांतर्फे टीका होत असली तरी विज्ञान व अध्यात्म या दोहोंच महत्त्व पटवून देणारी पोस्टर्स मात्र चर्चेचा विषय बनली आहेत. 'विज्ञान बिना नही क्रांती और अध्यात्म के बिना नही मनःशांती' असा आशय मांडणारे काही पोस्टर्स नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधुग्राममध्ये भाविकांची गर्दी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

सिंहस्थानिमित्त दाखल झालेल्या देशभरातील साधू, संत आणि महंत यांचा मुक्काम असलेल्या साधुग्राम व तपोवनाची सगळ्यांच्याच मनामध्ये कुतूहल आहे. त्यांना पाहण्यासाठी आणि परिसरातील विविध मंदिरात जावून दर्शन घेण्यासाठी भाविकांची शुक्रवारी अलोट गर्दी झाली.

साधुग्रामचे रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत. लहान-मोठ्या दुकानदारांचा व्यवसाय बहरला आहे. विविध माळा, रुद्राक्ष, शंख आणि धार्मिक पुस्तके, ग्रंथ विकणाऱ्यांची चलती आहे. फुगेवाले, मोरपीस आणि विविध वस्तू शोभेच्या विकणारे यांचाही व्यवसाय जोरा सुरू आहे, असे विक्रेते सांगत आहे. परिसरातील सर्वच लॉज फुल्ल झाले आहेत. बारा वर्षांनी खुल्या झालेल्या रामकुंडावरील गंगा गोदावरी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. परिसरातील कपालेश्वर, काळाराम मंदिर, सीतागुफा, भक्तीधाम, मुक्तिधाम, सोमेश्वर, बालाजी मंदिर भाविकांच्या गर्दीने फुलले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्नदाता सुखी भव

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पर्वणीच्या पूर्वसंध्येला तपोवनातील सर्वच आखाडे आणि खालशांचे ध्वजारोहण पार पडले आहे. आपापल्या सांप्रदायासह विविध प्रवाहांचे साधू व महंत या परिसरात उपस्थित झाले आहेत. शनिवारी (दि. २९) शाहीस्नानाची पहिली पर्वणी साधण्यासाठी देशभरातून येथे आलेल्या भाविक व प्रशासनाच्या विविध कर्मचाऱ्यांसाठी येथील अन्नछत्रं वरदान ठरत आहेत. हजारो भाविकांच्या उपस्थितीने ती गजबजून गेली आहेत.

ध्वजारोहणाचे सोहळे पार पडताच विविध धार्मिक उपक्रमांना प्रारंभ झाला आहे. या उपक्रमांमध्ये अन्नछत्रांचा लाभ सर्वाधिक भाविकांकडून घेतला जातो आहे. मोठ्या अन्नछत्रांमध्ये दिवसाकाठी सुमारे आठ ते दहा हजार भाविक प्रसादाचा लाभ घेत असल्याचे चित्र आहे.

या परिसरातील अनेक आखाड्यांनी अन्नदानाच्या उपक्रमात सहभाग घेतला आहे. स्वामी नारायण ट्रस्टच्या अन्नछत्रात सुमारे ७ ते ८ हजार भाविक या सेवेचा रोज लाभ घेत आहेत. दिगंबर अनी आखाडा, निर्वाणी आखडा, गुजरातमधील बापा सिताराम सेवाभावी ट्रस्ट, इस्कॉन आदी संस्थांच्या वतीने भाविकांसाठी प्रसादाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रशासनालाही आधार

कुंभाच्या नियोजनासाठी विविध जबाबदाऱ्या सांभाळत सरकारच्या विविध विभागांचे कर्मचारी कार्यरत आहेत. यात महापालिकेसह पोलिस, आरोग्य विभाग अन् सर्वच प्रमुख खात्यांचे सर्व स्तरावरील कर्मचारी येथे तैनात आहेत. हजारोंच्या संख्येने येथे उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्थाही या अन्नछत्रांमधून करण्यात आली आहे. काही अन्नछत्रांच्या माध्यमातून कर्मचारी वर्गास डबेही पुरविले जात आहेत. पंचवटीतील स्वामी नारायण ट्रस्टच्या वतीने पोलिस कर्मचाऱ्यांना दिवसाकाठी सुमारे तीन हजार डबे पुरविले जात आहेत.

भुकेल्यांना तृप्ती

नाशिकरोडच्या रेल्वे स्थानकातून व सिन्नर-देवळालीकडून दाखल झालेल्या भाविकांसाठी विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या वतीने बिटको चौक ते दसक घाटादरम्यान ठिकठिकाणी अन्नछत्र व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली असून भाविक त्याचा लाभ घेत आहे. शिवसेना, अन्नपुण्य ग्रुप, पूज्य झुलेलाल मंदिर आदींसेवाभावी अनेक संस्था अन्नछत्र चालविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नि‌र्विघ्न पर्वणी भवतु:

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

होणार होणार म्हणता म्हणता तब्बल १२ वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची पहिली पर्वणी येऊन ठेपली आहे. भक्तीच्या या सोहळ्याने आनंदाचा परमोच्च बिंदू गाठावा अन् निर्विघ्नपणे पहिली पर्वणी पार पडावी यासाठी नाशिकसह त्र्यंबकनगरी सज्ज झाली आहे. एखाद्या परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांने शेवटच्या क्षणापर्यंत पाठ्यपुस्तकाची कास सोडू नये तसे जिल्हा व पोलिस प्रशासनही शेवटच्या क्षणापर्यंत तयारीत गुंतल्याचे पहावयास मिळाले.

समुद्रमंथनातून निघालेल्या अमृताचे थेंब नाशिकच्या गोदावरीत पडले अन् तीर्थक्षेत्र म्हणून गणल्या जाणाऱ्या या नगरीचा लौकीक अधिकच वाढला. या लौकिकाला साजेसा सिंहस्थाचा सोहळा व्हावा यासाठी दोन वर्षांपासून प्रशासन तयारीला लागले होते. गतवेळीप्रमाणे चेंगराचेंगरासारखी दुर्घटना घडून या सोहळ्याला गालबोट लागू नये यासाठी प्रशासनाने सूक्ष्म पातळीवर नियोजन केले. त्यासाठी जिल्हा पातळीपासून केंद्रस्तरापर्यंत काही हजार बैठका घेण्यात आल्या. पहिल्या पर्वणीला तब्बल ८० लाख ते एक कोटी लोक येतील असे गृहीत धरून प्रशासनाने या सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे.

आरोग्य विभागही तैनात

जिल्हा प्रशासनाची वैद्यकीय विभागही कुठल्याही आरोग्यविषयक समस्येचा समाचार घेण्यासाठी सज्ज झाला आहे. जिल्हा प्रशासन तसेच महापालिकेने रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत, साथीचे आजार पसरू नयेत यासाठी पुरेपुर दक्षता घेतली आहे. चेंगराचेंगरी व तत्सम कोणतीही आपत्ती उदभवल्यास तिचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली आहे. अशा आपत्तींमध्ये नागरिकांची सुरक्षितता जपली जावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, त्र्यंबक नगरपालिका अशा ठिकाणांवर इमरजन्सी ऑपरेशन सेंटर्स सज्ज ठेवण्यात आले आहेत. पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेडिंग केले असून गर्दीच्या व्यवस्थापनासाठी 'होल्ड अॅण्ड रिलीज' प्रणाली अवलंबिण्यात येणार आहे.

त्र्यंबकनगरीत भाविकांसाठी शॉवर

त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्तावर स्नान करू इच्छिणाऱ्या भाविकांसाठी कुशावर्ताच्याच परिसरात शॉवरची व्यवस्था करण्यात आली आहे. याखेरीज श्रीश्रीचंद्र, गोरखनाथ आणि अहल्या घाटही भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत. सात हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा त्र्यंबकनगरीत दाखल झाला असून त्र्यंबकेश्वराचे मंदिर आणि कुशावर्त परिसरातील सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे. पहाटेपासूनच आखाड्यांच्या मिरवणुकीला सुरूवात होणार असून त्यासाठी पोलिस बंदोबस्ताचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सुखरूप पार पडावा, कोणतेही विघ्न आल्यास त्याचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, अशी ग्वाही पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली आहे.

भाविक सुरक्षेसाठी कटिबद्ध

सिंहस्थावर दहशतवादाचे सावट असून कुठल्याही संकटाचा सामना करण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. दहशतवादी कृत्यांचा सामना करण्यासाठी रॅपिड अॅक्शन फोर्सचे जवान नाशिक आणि त्र्यंबक नगरीत दाखल झाले आहेत. निर्भय वातावरणात या सोहळ्याचा आनंद लुटा असा संदेश लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी या जवानांनी शहरात संचलन केले. त्यांच्या सोबतील शीघ्र कृती दल (क्यूआरटी), दहशतवादविरोधी पथके, इंटे‌लिजन्स ब्युरो आणि बीडीडीएस सारखी पथके नाशिक आणि त्र्यंबकनगरीमध्ये दाखल झाली आहेत. त्यांनी रंगीत तालीम करून या सोहळ्याच्या सुरक्षेसाठी कटीबध्द असल्याची ग्वाही दिली आहे. सिंहस्थाच्या निमित्ताने शहर आणि ग्रामीण पोलिसांचे बळ दहा पटींनी वाढले आहे. शहरात १५ हजार पोलिस आणि पाच हजार होमगार्डसमुळे शहर खाकीमय बनले आहे. याखेरीज हजारोंच्या संख्येने स्वयंसेवकही पोलिसांच्या मदतीला रस्त्यावर उतरणार आहेत.

शुक्रवारपासूनच पॉईंट टू पॉईंट बंदोबस्त लावला आहे. सीसीटीव्हींसह सर्वच नियंत्रण कक्ष एकमेकांशी जोडले असून त्याची चाचणी घेण्यात आली आहे. पर्वणीवेळी गर्दी झाली तरी लोकांनी संयम राखावा. धक्काबुक्की करून गोंधळ घालू नये. भाविकांच्या सोयीसाठी अनेक ठिकाणी घाट बांधण्यात आले असून शहरवासियांनी त्यांचा उपयोग करावा. - एस. जगन्नाथन, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरे रामा हरे कृष्णाचा रंगला जयघोष

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थातील पहिल्या शाही स्नानाच्या पूर्वसंध्येला साधुग्राममध्ये आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघा (इस्कॉन)तर्फे नगर संकीर्तन करण्यात आले. हरे रामा हरे कृष्णाचा जयघोषाने वातावरण भक्तीमय बनले होते.

दुपारी ४ वाजता नगर संकीर्तनाला सुरुवात झाली. गौरांगदास प्रभु यांच्या मार्गदर्शानाखाली विविध समुदायांचे हजारावर भाविक या सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी इस्कॉनचे राधानाथ स्वामी महाराज व लोकनाथ स्वामी महाराज उपस्थित होते. कलियुगाचा वाईट प्रभाव दूर करुन मनाला शांती लाभावी यासाठी नगर संकीर्तनाचे आयोजन करण्यात आले. रथामध्ये चैतन्य महाप्रुभ यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. जागोजागी हरे रामा हरे कृष्णा या भजनावर नागरिकांनी ताल धरला होता. प्रत्येक चौकात अध्यात्मिक विषयावर नाटिका सादर करण्यात आली. यात दैवी शक्ती आणि आसुरी शक्ती यांच्या संघर्षातून निघालेल्या समुद्रमंथनातून निघालेल्या अमृताची कथा सांगणारी नाटिका सादर करण्यात आली. त्याचप्रमाणे श्रीमद भागवत ग्रंथावर कीर्तन करण्यात आले. तपोवनातून निघालेली नगर संकीर्तन यात्रा साधुग्राममार्गे श्रीकृष्ण आइस फॅक्टरी, काट्या मारुती चौक, गणेशवाडी, गाडगे महाराज पुल मार्गे रामकुंडावर पोहचली. तेथून मूळ मालवीय चौक मार्ग पुन्हा तपोवनात पोहचली. यावेळी सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. जागोजागी संकीर्तन यात्रेचे स्वागत फुलांच्या वर्षावाने करण्यात येत होते. मानवाची प्रकृती बिघडली तर त्यावर औषध देऊन बरे करता येते. मात्र, मनाची प्रकृती बिघडली तर त्यावर भक्तीमार्गाचा एकमेव उपाय आहे. या भक्तीमार्गाच्या उपायातून मानवी जीवन कृतार्थ होते हा संदेश देण्यात आला. यावेळी गौरांगदास म्हणाले की, कलियुगात प्रत्येक मानवाला शरीराबरोबरच मनही सुदृढ करण्याची गरज आहे. त्यासाठी कृष्ण भक्ती हा एकमेव उपाय आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी कृष्ण भक्ती करून जीवनाचे सार्थक करावे, असे ते म्हणाले. शनिवारी सकाळी मुख्य शाहीस्नानाच्या मिरवणुकीत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी इस्कॉनतर्फे करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पदार्थांची तपासणी

0
0


म. टा. प्रतिनिधी, सिडको/सातपूर

नाशिकसह त्र्यंबकमध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाकडून शुक्रवारी खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात आली. यात त्र्यंबकेश्वर व नाशिक तपोवनातील ६०० पेक्षा अधिक आखाड्यांना अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी भेय दिली आणि तेथील खाद्यपदार्थांच्या दर्ज्याची तपासणी केली. तसेच महाकुंभात अन्नातून भाविकांना कुठल्याच प्रकारचा त्रास होऊ नये याची विशेष काळजी घेतली जाणार आहे, असे अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त योगेश बेंडकुळे यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य यंत्रणा सज्ज

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळा काळात भाविकांना उत्कृष्ट, दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. आपत्कालिन परिस्थिती उदभवल्यास तातडीच्या रुग्णसेवेसाठी नाशिकमध्ये आठ तर त्र्यंबकेश्वर येथे चार ठिकाणी तात्पुरते 'साईड आयसीयू' उभारण्यात येणार आहेत. नाशिकच्या पंचवटी कारंजा आणि तपोवन इथे स्वतंत्र रुग्णालय कार्यान्वित झाले आहे. ठराविक अर्धा किलोमीटरच्या अंतरावर हेल्थ डिस्पेन्सरी सुरू करण्यात आल्या आहेत.

कुंभमेळा काळात नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन त्यांना आवश्यक त्या दर्जेदार वैद्यकीय सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी पालकमंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीष महाजन यांनी प्रारंभापासूनच विशेष लक्ष पुरवले आहे. आरोग्य उपसंचालक डॉ. बी. डी. पवार यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयाची सध्या ५४१ बेड्सची क्षमता असून, अतिरिक्त २०० बेड्स वाढविण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालयांमध्येही नव्याने अतिरिक्त ७० बेड्सचा विस्तार करून रुग्णालयाची क्षमता १०० बेड्सची करण्यात आली आहे.

शहरातील पंचवटी कारंजा येथे ११२ बेड्सची क्षमता असलेले इंदिरा गांधी रुग्णालय अतिदक्षता विभागासह कार्यान्वित करण्यात आले आहे, तर तपोवन परिसरात १०० बेडचे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. रामकुंड वस्त्रांतर गृह, लक्ष्मीनारायण मंदिर, साधुग्राम सेक्टर एक डी, 2 सी, दोन ए या पाच ठिकाणी दवाखाने सुरु झाले आहेत तर रामकुंड, इंदिरा गांधी, रुग्णालय, तपोवन रुग्णालय, लक्ष्मीनारायण मंदिर येथे रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. शहरी आरोग्य सेवा केंद्र, नाशिक, नाशिकरोड, सातपूर, सिन्नर फाटा, सिडको, संत गाडगेबाबा महाराज कथडा, आरसीएच केंद्र गंगापूर, इंदिरा गांधी हॉस्पिटल या आठ ठिकाणी आपत्कालिन पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. पर्वणींच्या काळात े विशेष आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे. स्नान घाट, अंतर्गत आणि बाह्य वाहनतळांच्या परिसरात ३२ दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत.

मास्कचे वाटप

लोकसंकल्प हेल्थ फाऊंडेशनतर्फे स्टेशन परिसरात भाविकांना मास्क वाटप करण्यात आले. तिकीट तपासणीस, अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा दलाचे जवान, हमाल आदींनाही मास्क व निलिगरी तेलयुक्त गोळ्या देण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेशवाई सोहळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बडा उदासीन आखाडा व पंच दशनाम जुना आखाडा यांचा पेशवाई सोहळा चंद्र भगवान यांच्या जयघोषात त्र्यंबकेश्वर येथे संपन्न झाला. प्रारंभी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी साधू महंतांचा पुष्पहार व शाल देवून सत्कार केला.

यावेळी स्वामी अधवेशानंद गिरी महाराज, बडा उदासीन आखाड्याचे महंत रघुमुनीजी महाराज, पंच दशनाम जुना आखाड्याचे हरिगिरीजी महाराज, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, निरंजन आखाड्याचे नरेंद्रगिरी महाराज, अखिल भारतीय षडदर्शन आखाड्याचे महंत सागरानंद महाराज, महंत श्रीमान महेश्वरदास महाराज, बिंदू महाराज, महामंडलेश्वर स्वामी आनंद भास्कर, आमदार जयंत जाधव, परवेज कोकणी, भाजपचे तालुकाध्यक्ष कैलास घुले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंग कुशवाह, मेळा अधिकारी महेश पाटील आदींसह मोठ्या संख्येने साधू महंत व नागरिक उपस्थित होते. बिंदू महाराज म्हणाले की, हा सुंदर सोहळा सुखरूपपणे पार पडेल असेही त्यांनी सांगितले. या सोहळ्यात विविध वैवध्यपूर्ण सजावट केलेले रथ काढण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीने साधली `आर्थिक पर्वणी`

0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

सिंहस्थ पर्वणीसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक हजारोंच्या संख्येने दाखल होत आहे. या भाविकांना नाशिकमध्ये दाखल होण्यासाठी प्रशासनाच्या आदेशानुसार एसटी महामंडळाच्या बस व्यतिरिक्त अन्य कोणतेही वाहन उपलब्ध नाही. मात्र, महामंडळाकडूनच जादा तिकीट आकारणी केली जात असल्याचा भाविकांचा आरोप आहे.

सिंहस्थासाठी दाखल होणाऱ्या भाविकांना सिन्नर फाट्यापर्यंत बसने सोडले जात आहे. बाह्य पार्किंग (चिंचोली फाटा घाट) ते अंतर्गत पार्किंग (सिन्नर फाटा) या केवळ पाच किलोमीटरच्या अंतरासाठी प्रती व्यक्ती तब्बल ३० रुपये भाडे आकारले जात आहे. मात्र, बस व्यक्ती रहदारीसाठी अन्य वाहन उपलब्ध नसल्याने पैसे देण्या‌शिवाय पर्याय नसल्याचे भाविकांनी सांगितले. धार्मिक उत्सव काळात खासगी वाहनचालकांकडून प्रवासी भाविकांची लूट होतेच. पण आता एसटी महामंडळानेही तसा कित्ता गिरविण्यास सुरुवात केली काय? असा प्रश्न भाविकांना पडला आहे. पर्वणी होत असलेल्या दसक किंवा रामकुंड या भागात थेट कोणतेही वाहन जात नाही. त्यामुळे सुमारे पाच ते नऊ किलोमीटर पायपीट करावी लागल्याचा अनुभव मध्य प्रदेशातून आलेल्या भाविकांनी कथन केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाही स्नानासाठी वेळेची कमरतता

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शाही स्नानासाठी प्रत्येक आखाड्यास अर्धा तासाची वेळ देण्यात आली असून ही वेळ कमी पडण्याची शक्यता आहे. सर्व आखाड्यांचे स्नान सकाळी १० वाजेपर्यंत संपेल, अशी प्रशासनाची अपेक्षा असली तरी साधू महंताच्या वाढलेल्या संख्येमुळे हा कालावधी वाढू शकतो.

सिंहस्थातील पर्वणीच्या दिवशी शाहीस्नानासाठी आखाड्यांना देण्यात आलेली वेळ, क्रम आणि शाही मिरवणुकीसाठीचा मार्ग पोलिस प्रशासनाने नुकताच जाहीर केला. त्यानुसार शाही मिरवणूक लक्ष्मीनारायण मंदिरापासून सुरू होणार असून प्रत्येक आखाड्यांना शाहीस्नानासाठी ३० मिनिटांचा अवधी देण्यात आलेला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याचे पहिले शाहीस्नान शनिवारी (दि. २९) सकाळी पार पडेल. शाही मिरवणुकीची सुरुवात सकाळी सहा वाजता साधुग्राम येथून होईल. सर्वप्रथम शाही स्नानाचा मान हा निर्वाणी आखाड्याला मिळाला असून त्यापाठोपाठ दिगंबर आणि नंतर निर्वाणी आखाड्याचे शाही स्नान होणार आहे. मात्र, साधूंची वाढलेली संख्या लक्षात घेता एका आखाड्याचे स्नान फक्त अर्धा तासात होणार नाही, असा दावा केला जातो आहे. दिगंबर आखाड्यात सुमारे ४०० खालसे असून अर्धा तासात सर्व साधू महंत स्नान करून बाहेर कसे पडणार असा सवाल साधू महंतांकडून उपस्थित केला जातो आहे.

दोन महंतासाठी एक वाहन

नाशिकमध्ये तीन प्रमुख अनी आखाडे, त्याअंतर्गत १८ उपआखाडे आणि सुमारे ६५० खालसे आहेत. यातील प्रमुख ७०० महंत वाहनाने मिरवणुकीत सहभागी होणार असून दोन महंत मिळून एक असे वाहन वापरण्यास प्रशासनाने मंजुरी दिली आहे. शाही मिरवणुकीत घोडही सहभागी होणार असून वाहनांची मोठी संख्या असलेली मिरवणूक साधूग्राम ते रामकुंड असा प्रवास अर्धातासात पूर्ण करण्याची शक्यता सुध्दा कमीच आहे.

आखाड्यांच्या मिरवणूक वेळा

निर्वाणी - सकाळी ६ वाजता मिरवणूक, ७ वाजता रामकुंडावर

दिगंबर - सकाळी ६.३० वाजता मिरवणूक, ७.३० वाजता रामकुंडावर

निर्मोही - सकाळी ७ वाजता मिरवणूक, ८ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांनी भाविकांना दिला `स्पेस`

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्यात गोदावरी नदीत डुबकी मारण्यासाठी देश-विदेशातील भाविक नाशिकमध्ये दाखल होत आहेत. तर येणाऱ्या भाविकांच्या आदरातिथ्यात प्रशासनाला कोणतीही अडचण येवू नये म्हणून नाशिककरांनी पर्वणीच्या पूर्वसंध्येला घरातच कोंडून घेणे पसंत केले. त्यामुळे शुक्रवारी नाशिकमध्ये अघोषित संचारबंदी पहायला मिळाली. गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व पोलिसांनी केलेल्या आवाहनाला नागरिकांना प्रतिसाद दिल्याने यंत्रणेवरील ताणही काहीसा कमी झाला आहे. पर्वणीच्या दिवशीही नाशिककरांचा हा पवित्रा कायम राहण्याची शक्यता असून, ते दुपारनंतरच घरातून बाहेर पडण्याची चिन्हे आहेत.

पहिल्या पर्वणीला प्रशासनासह नाशिककरही सज्ज झाले आहे. या सिंहस्थात घातपाती कारवायांना रोखण्यासाठी व चेंगराचेंगरीच्या घटना टाळण्यासाठी संपूर्ण शहराला एक दिवस अगोदरच छावणीचे रुप दिले आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण शहराची बांधबंदिस्ती केल्याने नाशिककरांच्या वावरण्यावर मर्यादा आल्या आहेत. स्थानिक नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनासह पोलिसांनी केले आहे. शाळांना आधी सुट्या देण्यात आल्या होत्या. तर पर्वणीच्या आदल्या दिवशीच वाहतूक बंद करण्यात आली असल्याने शुक्रवारी नाशिककरांनी स्वतःलाच घरात कोंडून ठेवणे पसंद केले. दिवसभर शहरात शुकशुकाट पहायला मिळाल्याने अघोषित संचारबंदी अनुभवयास मिळाली. पोलिसांना व प्रशासनाशी संघर्ष करण्याऐवजी भाविकांना त्रास होवू नये म्हणून स्वतःहून नाशिककर रस्त्यांवरून लांब राहिल्याचे चित्र पहायला मिळाले. शहरवासियांच्या या पवित्र्यामुळे पोलीसांनाही दिलासा मिळाला.त्यामुळे पर्वणीचे नियोजन करणे त्यांना अधिक सोपे झाले.

नाशिककर घरातच

रामकुंड आणि घाटांवर उत्तर भारतीय भाविकांची गर्दी वाढल्याने या ठिकाणी यात्रेचे स्वरुप आले आहे. शनिवारी हा आकडा लाखांच्या घरात जाणार असल्याने या गर्दीतही नाशिककर उतरण्याची शक्यता कमीच आहे. काही भागातील नागरिक मात्र दुपारनंतर रामकुंडावर धाव घेण्याची शक्यता आहे. तर या सगळ्या वातावरणापासून लांब राहू इच्छिणाऱ्या काही जणांनी एक दिवस अगोदरच सुट्यांचा आनंद घेण्यासाठी गाव गाठले आहे.

उत्तर भारतीय भाविकच अधिक

पर्वणीच्या पुर्वसंध्येला नाशिकमध्ये विशेषतः उत्तर भारतातील भाविक मोठ्या संख्येन दाखल झाले आहे. महाराष्ट्रातील भाविकांनी मात्र याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. उत्तर भारतातील वृद्धांची संख्या येणाऱ्यांमध्ये अधिक आहे. साधुग्राममध्ये एकदिवस आधीच डेरा टाकून त्यांनी पर्वणीची तयारी केली आहे. राज्यभरातून येणाऱ्या भाविकांचा ओघ मात्र काहीसा रोढावला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेने ५० हजार भाविक दाखल

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोड रेल्वेस्थानकात शुक्रवारी सायंकाळी सहापर्यंत ५० हजारांवर अधिक भाविक दाखल झाल्याने तणावग्रस्त रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलले आहे. शनिवारी पर्वणीच्या दिवसापर्यंत हा आकडा लाखावर जाण्याची शक्यता आहे. शेजारीच असलेल्या रेल्वेस्थानकातूनही दहा हजारावर भाविक त्र्यंबकेश्वरला रवाना झाले.

रेल्वेने येणाऱ्या भाविकांना दसकच्या घाटावर स्नानाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी चौथ्या स्थानकाबाहेर बस आहेत. येणाऱ्या विशेष कुंभ रेल्वेगाड्या चौथ्या फ्लॅटफार्मवर तर जाणाऱ्या पहिल्या फ्लॅटफार्मवर थांबत आहेत. रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिस यांचे एक हजार जवान तैनात आहेत. नागपूर, भुसावळ, मुंबई आदी भागातून जवान आले आहेत. रायफलधारी जवान, बाम्बशोधक पथक, श्वान पथक तैनात सज्ज आहे. सिन्नरफाटा, चौथा फ्लॅटफार्म, सुभाषरोड, मालधक्का, बुकींग कार्यालय येथे रात्रंदिवस गस्त सुरू आहे. या परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. देवळाली कॅम्प आणि ओढा स्थानकातही चोख बंदोबस्त आहे. रेल्वे इंजिन तपासणीसाठी सहा इंजिनिअरसह ५३ कर्मचारी तीन शिफ्टमध्ये कार्यरत आहेत. रेल्वे बोगी आणि भाविकांच्या पाण्यासाठी देवळाली आणि ओढा येथे २५ हजार लिटरचे प्रत्येकी एक तर नाशिकरोड स्थानक आणि चेहेडी येथे २५ लाख लीटरचा प्रत्येकी जलकुंभ तयार आहे. अॅम्बुलन्सह वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहे. सव्वाशे तिकीट तपासनीस भाविकांना मदत करीत आहेत. दरम्यान, पुणे रस्त्याने शुक्रवारी दिवसभरात पाच हजार भाविक शहरात दाखल झाले.

महाव्यवस्थापकांची भेट

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एस. के. सूद यांनी शुक्रवारी नाशिकरोड, देवळाली कॅम्प आणि ओढा रेल्वेस्थानकाला दुपारी भेट दिली. कुंभमेळ्यानिमित्त

तयार करण्यात आलेला चौथा फ्लॅटफार्म,

सिन्नरफाटा बुकिंग कार्यालय, मालधक्का, सुरक्षा आदींची त्यांनी दोन तास पाहणी केली. यावेळी विविध अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाविकांची पर्वणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शाहीस्नानाच्या अवघ्या एक दिवस अगोदर देश-विदेशातील भाविकांनी दुपारपर्यंत रामकुंडावर गर्दी करून स्नानाची पर्वणी साधली. शाहीस्नानासाठी गंगापूर धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने भाविकांच्या स्नानाचा आनंद​ द्विगुणीत झाला.

पहिले ध्वजारोहण १४ जुलै रोजी आटोपले. यानंतर रामकुंडावर भाविकांचा ओघ सुरू असून त्यात शाहीपर्वणीच्या पार्श्वभूमीवर मोठी वाढ झाली. गुरुवारी रात्री (दि. २७) रात्री दोन वाजेपर्यंत रामकुंड गजबजले होते. रामकुंडावर आकर्षक सजावट करण्यात आली असून गाडगे महाराज पुलासह सर्वत्र लाईट माळा बसवण्यात आल्या आहेत. विविधरंगी प्रकाशाची पाण्याशी होणारी मिसळण रामकुंडांची शोभा आणखी वाढवते आहे. प्रशासनाने गंगापूर धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला असून स्वच्छ पाण्यात स्नान करणे, ही मोठी पर्वणी असल्याचे मत मध्य प्रदेश राज्यातून आलेल्या आंबिका अरुणसिंह यांनी व्यक्त केली. शाही स्नानाला होणारी गर्दी लक्षात घेता, आजच स्नान उरकले. लहान मुले सोबतीला असून त्यांच्यासह गर्दीत सहभागी होणे शक्य नसल्याचे सिंह यांनी सांगितले. आकर्षक सजावट, प्रकाशाची योग्य योजना आणि वाहती गोदावरी हे नयनरम्य चित्र पुन्हा १२ वर्षांनी पाहण्यास मिळेल. गेल्या सिंहस्थापेक्षा परिस्थिती बदलली असून पदोपदी तंत्रज्ञानाचा झालेला वापर पाहण्यास मिळतो, अशी प्रतिक्रिया गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केली. शाहीस्नानानंतर प्रदूषणाची पातळी वाढेल म्हणून आजच रामकुंडावर स्नान आटोपले, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामघाटांची आज ‘परीक्षा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भाविकांची आस्था असलेल्या रामकुंडाला पर्याय म्हणून तयार करण्यात आलेल्या रामघाटांची आज खऱ्या अर्थाने परीक्षा असणार आहे. शाहीस्नानाला जाणाऱ्या साधू महंतांना वगळता इतर भाविकांना रामकुंडापर्यंत पोहचता येणार नाही, अशी चोख व्यवस्था प्रशासनाने केली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यातील पहिले शाही स्नान आज, शनिवारी सकाळी पार पडेल. अनेक वर्षांपासून रामकुंडावरच साधू-महंत आणि भाविक पवित्र स्नान करीत होते. मात्र, २००३ साली पार पडलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दुसऱ्या पर्वणीदरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली. त्यात हकनाक २९ भाविकांना आपल्या प्राणास मुकावे लागले. यानंतर, रमणी आयोगाने भाविकांचे विकेंद्रीकरण करण्याची सूचना आपल्या अहवालात केली.

रामकुंडावर पुरेसी जागाच नसल्याने घाटांचे विस्तारीकरण व्हावे, अशी सूचना त्यात करण्यात आली होती. त्यानुसार २०१५ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन आखताना प्रशासनाने नवीन घाटांच्या निर्मितीस प्राधन्य दिले. या घाटांना सुरूवातीस स्थानिक पातळीवर विरोध झाला. मात्र, तरीही प्रशासनाने कन्नमवार पुलाखाली प्रशस्त घाटाची निर्मिती केली. यानंतर, टाकळी तसेच घाट देखील भाविकांसाठी तयार करण्यात आले. या सर्व घाटांना रामघाट असे रामकुंडाशी साधर्म्य असलेले नामाभिधान देण्यात आले. शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या मुंबई आग्रा हायवे, नाशिक-पुणे हायवे, दिंडोरी, पेठ अशा सात ठिकाणी बाह्य वाहनतळे तयार करून भाविकांना दूरवरच अडवण्यात येणार आहे. यानंतर, संबंधित मार्गावरील भाविकांना विविध घाटांवर पोहचवण्यात येणार आहे.

साधू-महंतांचे शाहीस्नान साधारणतः दुपारपर्यंत आटोपण्याची शक्यता असून, त्यानंतर भाविक रामकुंडापर्यंत पोहचू शकतील, असा दावा प्रशासनमार्फत करण्यात येतो आहे. प्रत्यक्षात याउलट परिस्थितीचा अनुभव भाविकांना घ्यावा लागणार आहे. दुपारनंतर नाशिककर रामकुंडाकडे येण्यास निघतील, असाही अधिकाऱ्यांचा कयास असून नव्याने निर्मीत करण्यात आलेल्या सर्व सुविधा कितपत फायदेशीर ठरतील, हे काही तासातच स्पष्ट होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ATMमधून १७ लाख चोरले

0
0

नाशिक : निफाडमधील शनिचौकातील अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून तब्बल १७ लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. विशेष म्हणजे चोरट्यांकडून एमटीएम मशिनची कुठेही तोडफोड करण्यात आली नाही. एटीएममध्ये पैशांचा भरणा करतांना विशिष्ट पासवर्ड देऊन मशिनचा दरवाजा उघडला जातो. त्यानंतर या मशिनमध्ये नोटा ठेवल्या जातात. शनिवारी अशाच पद्धतीने पासवर्ड वापरून पैसे चोरल्याचा पोलिसांना संशय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहीपर्वास मंगलमय प्रारंभ

0
0

टीम मटा

दक्षिण गंगा अर्थात गोदावरीच्या तिरावर आज, शनिवारी कुंभमेळ्याची पहिली शाही पर्वणी पार पडत आहे. या सोहळ्याच्या पूर्वसंध्येलाच देश-विदेशातून नाशकात दाखल झालेल्या लाखो भाविकांनी पवित्र रामकुंडात डुबकी मारली. श्रद्धा अन् भक्तीचा अनोखा मिलाप यानिमित्ताने बघायला मिळाला. त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्तावरही असेच वातावरण अनुभवायला मिळाले. दोन्ही ठिकाणी मिळून शनिवारी होणारा १३ आखाड्यांच्या शाही स्नानाचा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरणार आहे. हा सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासकीय व पोलिस यंत्रणाही चोखपणे कर्तव्य बजावत आहे.

शुक्रवारी सकाळपासूनच रामकुंडात स्नानासाठी हळूहळू गर्दी वाढली होती. दुपारनंतर ती अधिकच वाढली. सायंकाळी सहाच्या काही मिनिटे अगोदर तर संपूर्ण गोदाघाट भाविकांच्या गर्दीने गजबजून गेला होता. सियावर राम चंद्र की जय, अशा जयघोषात लोक गोदावरीत उड्या घेत होते. शनिवारी सकाळी सहा वाजेपासून आखाड्यांच्या मिरवणुका आणि त्यांच्या शाहीस्नानाचा आखाडा रंगणार होता.

नाशिकमध्ये लाखो भाविकांसह निर्वाणी, दिगंबर व निर्मोही या तिन्ही मुख्य आखाड्यांचे साधू शाहीस्नान करीत आहेत. लाखोंचा भाविक जनसमुदाय केवळ रामकुंडावर स्नान करण्याच्या उद्देशाने नाशिकमध्ये दाखल झाला, असून तिन्ही मुख्य आखाड्यांच्या शाहीस्नानानंतरच भाविकांसाठी रामकुंड खुले करून दिले जाणार आहे. शाहीस्नानादरम्यान कोणत्याही चकमकी होऊ नये, कोणतेही वाद उदभवू नये यासाठी पोलिस प्रशासनाने आखाड्यांची क्रमवारी ठरवून दिलेली आहे. त्यानुसारच हे स्नान होणार आहे. यामध्ये सर्वप्रथम निर्वाणी आखाडा स्नान करणार असून, त्यांची मिरवणूक साधुग्रामपासून सहा वाजता निघणार आहे. त्यांना रामकुंडावर येण्यासाठी एक तासांचा अवधी देण्यात आला असून सात वाजता त्यांना स्नानाची वेळ देण्यात आलेली आहे. दुसऱ्या क्रमांकावर दिगंबर आखाडा स्नान करणार असून त्यांची मिरवणूक साधुग्राम येथून सकाळी साडे सहा वाजता निघणार आहे. रामकुंडावर साडे सात वाजता शाहीस्नानाची वेळ दिगंबर आखाड्यासाठी ठरवून देण्यात आलेली आहे. तिसऱ्या क्रमांकावर निर्मोही आखाडा स्नान करणार असून त्यांची मिरवणूक सात वाजता साधूग्राम येथून निघणार आहे. आठ वाजता त्यांनी रामकुंडावर पोहोचत स्नानाची वेळ साधायची आहे.

या शाही मिरवणुका लक्ष्मीनारायण मंदिरापासून सुरू होणार असून प्रत्येक आखाड्यांना शाहीस्नानासाठी तीस मिनिटांचा अवधी देण्यात आलेला आहे. सर्व आखाड्यांचे शाहीस्नान सकाळी १0 वाजेपर्यंत पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. त्यानंतर जगभरातून आलेल्या भाविकांसाठी गोदाघाट खुला करून दिला जाणार आहे. मनपा प्रशासन तसेच पोलिस प्रशासन सर्व ताकद एकवटून भाविकांच्या मदतीसाठी सज्ज झाले आहे.

त्र्यंबकनगरी भक्तीने फुलली

भक्तीच्या या सोहळ्याने आनंदाचा परमोच्च बिंदू गाठावा अन् निर्विघ्नपणे पहिली पर्वणी पार पडावी यासाठी नाशिकसह त्र्यंबकनगरी सज्ज झाली आहे. लौकीकाला साजेसा सिंहस्थाचा सोहळा व्हावा यासाठी प्रशासनासह त्र्यंबकेश्वरमधील बडा उदासीन आखाडा, नया उदासीन आखाडा, श्री पंचायती अटल आखाडा, श्री पंचायती निर्मल आखाडा, श्री शंभू पंचदशनाम आवाहन आखाडा, श्री शंभू पंचदशनाम जुना आखाडा, श्री तपोनिधी आनंद आखाडा, श्री पंचायती आखाडा महानिर्वाणी, श्री पंचअग्नी आखाडा व श्री तपोनिधी निरंजनी आखाडा या दहा शैव आखाड्यांनी जय्यत तयारी केली आहे.

त्र्यंबकमध्ये तुफान पाऊस

पहिल्या शाहीस्नानाच्या पूर्वसंध्येला त्र्यंबकनगरीत वरुणराजाने जोरदार हजेरी लावल्याने भाविकांची प्रचंड धावपळ उडाली. गजानन महाराज देवस्थानाकडून कुशावर्तकडे जाण्याचा मार्ग बंद करण्यात आल्याने भर पावसात दीड किलोमीटचा फेरा मारून भाविकांना शहरात प्रवेश करावा लागला.

अघोषित संचारबंदी

भाविकांच्या आदरातिथ्यात प्रशासनाला कोणतीही अडचण येवू नये म्हणून नाशिककरांनी पर्वणीच्या पूर्वसंध्येला घरातच कोंडून घेणे पसंत केले. चोख बंदोबस्तामुळे शुक्रवारी शहरात अघोषित संचारबंदी पहायला मिळाली. तर रस्ते शहरात येणाऱ्या भाविकांनी गजबजले होते.

एसटीने साधली पर्वणी

भाविकांना नाशिकमध्ये दाखल होण्यासाठी एसटी महामंडळाच्या बस व्यतिरिक्त अन्य कोणतेही वाहन उपलब्ध नाही. मात्र, ही सेवा महामंडळाकडूनच जादा तिकीट आकारणी करून दिली जात असल्याने भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

साधुग्राम फुलला

सिंहस्थासाठी देशभरातील साधू, संत आणि महंत यांचा मुक्काम असलेल्या साधुग्राम व तपोवनाचे सगळ्यांच्याच मनामध्ये कुतूहल असल्याने हा परिसर पाहण्यासाठी व विविध मंदिरात जाऊन दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे.

रामघाटांची 'परीक्षा'

शाहीस्नानाला जाणाऱ्या साधू महंतांना वगळता इतर भाविकांना रामकुंडापर्यंत पोहचता येणार नाही, अशी चोख व्यवस्था प्रशासनाने केल्याने भाविकांची आस्था असलेल्या रामकुंडाऐवजी नव्या रामघाटांवर किती गर्दी होणार हीच प्रशासनाची परीक्षा असणार आहे.

पर्वणीसाठी सज्ज

पोलिस प्रशासनाने शहरात चोख बंदोबस्त तैनात केला आहे. शहरात विविध भागात पंधरा हजार पोलिस तैनात आहेत. तर भाविकांच्या सोयीसाठी तीन हजार बसेस ठिकठिकाणी सज्ज आहेत. पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी नाशिककरही सज्ज झाले आहेत.

गर्दीचा फुगा फुटणार

सिंहस्थ पर्वकाळात देशभरातून किमान एक कोटी भाविक दाखल होतील अशा अपेक्षेने प्रशासनाने सारी सज्जता केली असताना काल रात्री उशीरापर्यंत प्रत्यक्षात लाखभर भाविकांचे आगमन झाल्याने गर्दीचा फुगा फुटणार असे वातावरण आहे. राखी पोर्णिमेच्या सणाचे सावट पहिल्या पर्वणीवर पडल्याचे दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीच्या ५०० बस माघारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव केलेले अतिरेकी नियोजन एसटी महामंडळाच्या सिंहस्थातील एकूण उद्दिष्टांवर घाला घालणारे ठरल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. भाविकांनी पहिल्या पर्वणीकडे पाठ फिरविल्याने राज्यातील विविध भागांतून बोलावलेल्या बसपैकी ५०० बस माघारी पाठविण्याची नामुष्की महामंडळाच्या नाशिक विभागावर आली.

सिंहस्थातील एका पर्वणीसाठी ८० लाख ते एक कोटी भाविक येतील असा अंदाज जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त केला जात होता. त्यानुसार राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बस सोडण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी तब्बल तीन हजार बस सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात १० लाख भाविकांचा आकडाही पार न केल्याने एसटीचे नियोजन पूर्णत: फसले. त्यामुळे एसटीच्या कित्येक बस जागेवरून हलूही शकल्या नाहीत. महामंडळाने खंबाळे येथे केलेले वाहनतळ पूर्णत: कुचकामी ठरले. त्यामुळे तेथून अगदी दोन चार प्रवाशांची ने आण करण्याची वेळ प्रशासनावर आली. राजुर बहुला येथेही २०० बसेस सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. शनिवारी सायंकाळपर्यंत त्यापैकी १२८ बसेस जागेवरच थांबून होत्या. एकूण सर्वच अंतर्गत आणि बाह्य वाहनतळांवर असा अनुभव आल्याने महामंडळाने पाचशे बस परत पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images