Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘वाढते वृद्धाश्रम देशासाठी शाप’

$
0
0

नाशिक : देशभरात वाढत असलेले वृद्धाश्रम म्हणजे या पवित्र भारत भूमीला एक शाप आहे. त्यामुळे कुणीही आपल्या माता-पित्यांना वृद्धाश्रमात पाठवू नये. आज जगात धर्म केवळ माता-भगिनींमुळेच जिवंत आहे. त्यामुळे प्रत्येकाने नारी सन्मान करणे हे आपले आद्य कर्तव्य समजून वागले पाहिजे. तरच धर्माचेही संरक्षण होऊ शकेल, असे प्र‌तिपादन बडा उदासीन आखाड्याचे महंत रघुमुनीजी महाराज यांनी केले.

श्री सद्‌गुरू सेवा समितीतर्फे आयोजित माँ कनकेश्‍वरी देवीजी यांच्या श्री राम कथा सोहळ्यास नुकताच प्रारंभ झाला. या सोहळ्याच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. त्र्यंबकेश्‍वर रिंग रोड येथील श्री स्वामी समर्थ मंदिर मार्गावर असलेल्या श्री पावन गणपती मंदिराजवळ हा सोहळा सुरू झाला. तत्पूर्वी, महंत रघुमुनी महाराज, मुक्तानंद महाराज, सुदामानंद महाराज, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मुक्तानंद महाराज यांनीही या वेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की कथा, प्रवचन कोणतेही असो, ते श्रद्धापूर्वक श्रवण केल्याने त्याचे फळ निश्चित मिळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जाहिरात एजन्सी आक्रमक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यात अधिकृतपणे जाहिरात करण्याची परवानगी मिळालेल्या एजन्सींचे आर्थिक नुकसान झाल्याने आता या एजन्सीज थेट पोलिसात पोहचल्या आहेत. अनधिकृतपणे जाहिरात करणाऱ्या बड्या कंपन्यामुळे आपले आर्थिक नुकसान झाल्याचे सांगून संबंधितांवर गुन्हे दाखल करून चौकशीची मागणी केली. सरकारवाडा पोलिसात टचवूड एजन्सीज विरोधात तक्रार दाखल झाली असून, बड्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, मटा मध्ये जाहिरातीचे गोलमाल उघड होताच संबंधित कंपन्यांनी जाहिराती काढण्यास सुरुवात केली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान जाहिरात करण्यासाठी महापालिकेने विराजीत असोसिएटस, आर. के. इंटरप्रायजेस, नम्रता इंटरप्रायजेस, आर. प्रमोशन या कंपनीन्या अधिकृतपणे परवानग्या दिल्या होत्या. त्यांच्याकडून करापोटी लाखो रुपये अगोदरच वसूल केले. मात्र, पोलिस आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून टचवूड या एजन्सीजने सीएसआरच्या नावाखाली बहुराष्ट्रीय कंपन्याकडून जाहिरात मिळवल्या. एवढेच नव्हे तर, त्या कंपन्यांच्या जाहिराती शहरभर लावल्या. पोलिस आणि आरोग्य विभागाला कोणताही अधिकार नसताना आर्थिक उलाढालीतून परस्पर करण्यात आलेला उपद्व्याप हा अधिकृत एजन्सीजच्या अंगलट आला आहे. टचवूडने बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून जाहिराती मिळवून त्या सीएसआर योजनेत दाखवून हेराफेरी केल्याचे आता उघड झाले आहे. मटाने हा सारा प्रकार उजेडात येताच पोलिसांनी या प्रकरणातून अंग काढून घेतले आहे. दुसरीकडे अधिकृत जाहिरात एजन्सीज आक्रमक झाल्या असून, त्यांनी थेट पोलिसात धाव घेत टचवूड एजन्सीजविरोधात तक्रार दाखल केली आहे.

टचवूड कंपनीने अनधिकृतपणे बहुराष्ट्रीय कंपन्याना आपल्याकडे ओढून त्यांच्याकडून आर्थिक हेराफेरी करून त्यांच्या जाहिराती शहरभर लावल्या आहेत. त्यामुळे आमचे लाखोचे नुकसान झाले असून टचवूडसह केशकिंग, माझा, इंटेक्स, डाबर, नवरत्न, उषा फॅन, आयडिया, एअरटेल, व्हिडीओकॉन, डीटीएच या कंपन्यावर गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. सरकारवाडा पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली असून, चौकशी सुरू केली आहे. संबंधित कंपन्यांनी शनिवारी पोलिस आयुक्तांचीही भेट घेऊन त्यांच्यावर कारवाईसाठी दबाव वाढवल्याने आता या कंपन्यांचे धाबे दणाणले आहे.

रामकुंडावरील जाहिराती हटविल्या

जाहिरात घोटाळ्याची पोलखोल मटाने केल्यानंतर व पोलिसांनीही अंग काढून घेतल्यानंतर संबंधित कंपन्यांनी आपल्या जाहिराती काढण्यास सुरुवात केली आहे. रामकुंडावरील सर्व जाहिराती काढण्यात आल्या असून शहरातील जाहिरातीही कमी करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या पर्वणीला रामकुंडावर जाहिराती लावल्या होत्या. मात्र, आता कारवाईच्या भीतीने या कंपन्यानीच माघार घेत आपल्या जाहिरात हटवण्यास सुरुवात केली आहे.

संबंधित एजन्सीजमुळे आमचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. आम्ही अगोदरच कर भरला मात्र, टचवूडने अनधिकृतपणे परस्पर कंपन्याकडून जाहिराती घेऊन पोलिस आणि महापालिकेची फसवणूक केली आहे. त्यामुळे या एजन्सीजसह कंपन्यांवर कारवाई झाली पाहिजे.

- अनंता मेहंदळे, संचालक, विराजीत असो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधुग्राममध्ये परजल्या तलवारी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या कुंभमेळ्यावर शनिवारी येऊ घातलेले मोठे विघ्न सुदैवाने टळले. शाही मार्गावरून मिरवणूक नेण्यासाठी आखाड्यांची परवानगी का घेतली नाही, या कारणावरून दिगंबर, निर्वाणी आणि निर्मोही या तीनही प्रमुख आखाड्यांनी साधुग्रामध्ये आत्मा मालिक ध्यानपीठातर्फे आयोजित दिंडी मिरवणुकीला अटकाव केला. दोन्ही गटांत वाद झाल्यानंतर निर्वाणी आखाड्याच्या साधूंनी जंगलीदास महाराजांच्या शिष्यांविरोधात थेट तलवारी परजल्या. भाले, काठ्या, अशी शस्त्रेही साधूंनी बाहेर काढली होती.

आत्मा मालिक ध्यानपीठातर्फे गोकुळाष्टमीच्या निमित्ताने भव्य दिंडी काढण्यात आली होती. ही दिंडी शाही मार्गाने दिगंबर आखाड्याजवळ येताच तेथील साधूंनी मिरवणूक पुढे जाऊ देण्यास अटकाव केला. सर्व साधू रस्त्यावर उतरले. त्यांच्या मागोमाग निर्मोही व निर्वाणी आखाड्याचे साधू भांडणात उतरले व त्यांनीही मिरवणूक शाही मार्गाने जाऊ न देण्याची भूमिका घेतली. येथून जाण्यासाठी आधी आमची परवानगी घेणे आवश्यक होते, असे आखाड्यांचे म्हणणे होते तर आम्ही पोलिस प्रशासनाची परवानगी घेतली आहे. त्यांची कागदपत्रे पाहून घ्या, असे दिंडी मिरवणुकीतील शिष्यांचे म्हणणे होते. त्यामुळे हा वाद विकोपाला जाऊन निर्वाणी आखाड्यांच्या साधूंनी मिरवणुकीवर तलवारी परजल्या. या वादावादीत ध्यानपीठाच्या एका गाडीची काच फुटल्याने वातावरण अधिकच तंग झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करीत हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मिरवणुकीमध्ये जंगलीदास महाराज यांची प्रमुख उपस्थिती असल्याने त्यांनी हा वाद मिटवून मिरवणूक दुसऱ्या मार्गाने वळविण्याचे आदेश दिले. त्यामुळे निम्मी मिरवणूक औरंगाबाद रोडने फिरविण्यात आली.

नीतिमूल्यांवरच प्रश्नचिन्ह

शैव-वैष्णवांच्या वादाला असलेली शतकानुशतकांची परंपरा, महंत ग्यानदास महाराजांच्या अध्यक्षपदावरून पराकोटीला गेलेला वाद, इंद्रदेव महाराजांची वादात सापडलेली धर्मसम्राट ही पदवी आणि कार्यक्रमाच्या दिवशी बदलण्यात आलेले स्थळ, त्रिकालभवंता आणि शिवानी दुर्गा यांच्यातील अतिसामान्यांना लाजवणारी भांडणे व आता दिंडी सोहळ्यात परजल्या गेलेल्या तलवारी यामुळे साधूंच्या एकूण नीतिमूल्यांवरच प्रश्नचिन्ह येऊन उभे ठाकले आहे. साधूंचा मनमानी कारभार वाढत चालला आहे. दिवसेंदिवस त्यांच्या संतापाची धार आणखी तीव्र होत चालली आहे हे समोर येणाऱ्या अनेक घटनांवरून सिध्द होत आहे.

आखाड्यांमध्ये धर्मध्वजा फडकल्यानंतर शाही मार्गावरून कोणताही मिरवणूक नेण्यासाठी आखाड्यांच्या परवानगीची आवश्यकता असते. त्याशिवाय, मिरवणूक मार्गावर कोणताही पेशवाई करता येत नाही. आम्ही फक्त आमची परवानगी का घेतली नाही अशी विचारणा केली.

- महंत धरमदास महाराज, निर्वाणी आखाडा

शाही मार्गावरून केवळ खालशांनाच मिरवणुकीची परवानगी असते. ही मिरवणूक त्या मार्गाने घुसल्याने अडचण निर्माण झाली. पोलिसांनी मध्यस्थी करून ही मिरवणूक औरंगाबाद रोडने काढून देण्यात आली. यासंदर्भात आखाड्यांकडून कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त झालेली नाही. त्यामुळे कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

- अविनाश बारगळ, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नरमध्ये अवैध वाळू वाहतूक सुरूच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

अवैध वाळू वाहतुकीवर कडक कारवाई करूनही आळा घालण्यास प्रशासनाला पूर्णपणे यश आलेले नाही. सिन्नर-शिर्डी रस्त्यावर वावीच्या तलाठ्यांनी वाळूचा ट्रक अडवून चौकशी केली असता ट्रकचालकाने रस्त्याच्या मध्येच वाळू ओतत पोबारा केला. गाडीक्रमांक अस्पष्ट असल्याने त्याची नोंदही घेता आली नाही.

तहसील कार्यालयाने अवैध वाळू साठेबाजांवर कडक कारवाईचा बडगा उगारला. मात्र, पूर्णपणे रोखण्यास अपयश आले आहे. दोन दिवसापूर्वी सिन्नर-शिर्डी रस्त्यावर मुसळगाव औद्योगिक वसाहतीजवळ वावीच्या तलाठ्यांनी रस्त्याने जाणाऱ्या आयवा ट्रकला थांबवले असता ट्रकचालकाने तलाठ्याशी बोलणे सुरू असताना रत्याच्या मधोमध ट्रकमधील वाळू रस्त्यावर ओतून धूम ठोकली.

निर्ढावलेले वाळू माफिया पुन्हा सक्रिय झाले असून, शिर्डी रोडवर भरधाव वेगाने जाणाऱ्या आयवा ट्रकमधून अवैध वाहतूक सुरू आहे. संध्याकाळी तसेच रात्रभर ही चोरटी वाहतूक सुरू असते. या वाहतुकीसाठी रात्रीची वाहतूक करणे कायद्याने बंधनकारक असताना राजरोसपणे सर्रास अवैध वाळूची वाहतूक सुरू आहे. शुक्रवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास तलाठी विष्णू गोसावी मुसळगाव औद्योगिक वसाहती जवळून जात असताना एक वाळूचा आयवा ट्रक त्यांनी थांबवला. ट्रकचालकाशी बोलत असताना, ड्रायव्हरने रस्त्यातच वाळू ओतून दिली. काय होत आहे असे पाहत असताना गाडीचालकाने समयसूचकता दाखवत रिकाम्या गाडीसह धूम ठोकली. या ट्रकवर असलेला क्रमांकही नीटसा दिसत नसल्याने त्याचा फायदा घेत ड्रायव्हरने धूम ठोकली. संध्याकाळची वेळ असल्याने वाहने या वाळूवर जाऊन अपघात होण्याची शक्यता वाढली होती.

चोरावर मोर

सिन्नर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जेसीबीच्या सहायाने रस्त्यावरील वाळू बाजूच्या खड्ड्यात लोटून दिली. रात्री उशिरा या ठिकाणाची वाहतूक सुरळीत झाली. पोलिसांनी ही वाळू रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात लोटून दिली होती. सुमारे आठ दहा ब्रास वाळू या ठिकाणी पडलेली असताना अज्ञात व्यक्तींनी ही वाळू रातोरात उचलून घेत या संधीचा फायदा घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरसाळीत वरुणयंत्राचा प्रयोग यशस्वी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

तालुक्यातील तरसाळीसह परिसरात पर्जन्यवृष्टी होण्यासाठी शेतकरी बांधवानी वरूणयंत्राचा प्रयोग करून पाऊस पाडण्यात यशस्वी झाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. परंतु, पावसाचे आगमन होत नव्हते. यामुळे प्रयोग राबविण्यात आला. शेतकरी बांधवानी तरसाळी येथील कपाळ्या डोंगरांच्या परिसरात हा प्रयोग राबविला असता पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी समाधानी व्यक्त केले.

वरूण यंत्र प्रयोगासाठी ४ बाय ४ खड्डा करून त्याच्या भोवती विटांचा थर करून यज्ञकुंड तयार करण्यात आले. या यज्ञकुंडात पळस, पिंपळ, औंदूबर, वड या झाडांच्या फांद्यांसोबत जळाऊ लाकडांचा वापर करण्यात आला. या यंत्रासाठी हवेतील आद्रता किमान ६५ टक्के लागत असल्याने योगायोगाने यावेळी अनुकूल वातावरण उपलब्ध झाले. प्रयोगास सुरुवात करण्यात आली. या यज्ञकुडांत मुठीने मीठाचा मारा करण्यात येत साधारणत: दीड तासात पाऊस अनुकूल वातावरण तयार होऊन पावसास सुरुवात होते.

या यज्ञकुंड तयारीसाठी अल्प प्रमाणात खर्च येतो. सदरील प्रयोगाचा परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. प्रयोग यशस्वी करण्यासाठी तरसाळी येथील शेतकरी विलास वाघ, कोमल चव्हाण, अतुल रौंदळ, नामदेव वाघ, रवींद्र रौंदळ, सुभाष रौदंळ, शशिकांत पाटील, प्रभाकर रौंदळ, लखन पवार आदींसह शेतकऱ्यांनी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठा योजनेला खीळ

$
0
0

कैलास येवला, सटाणा

सटाणा शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नावर राजकारण होत असलेल्या केळझर पाणीपुरवठा योजनेने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. पालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात या निमित्ताने फूट पडली आहे. परिणामी पाणीटंचाईच्या या भिषण परिस्थितीत शहरवासीयांना पाणी मिळो अथवा न मिळो याची तमा न बाळगता केळझर व पुनद पाण्यावरून आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेत आगामी पालिका निवडणुकींचा बिगुल मात्र नगरसेवकांनी वाजविला आहे.

शिवसेना-भाजप युती शासनाच्या काळात अर्थात सन १९९८ साली सटाणा शहराला थेट केळझर धरणातून पिण्याचे पाणी पाइपलाइनद्वारे देण्यासाठी तब्बल १२. ५० कोटी रुपयांची योजना शासनाने मंजूर केली होती. या योजनेला तत्कालीन आमदार ए. टी. पवार यांच्यासह केळझर परिसरातील ३८ गावांतील शेतकऱ्यांनी सातत्याने विरोध करून योजनेला खीळ घातला होता. या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष अर्जुन अहिरे यांनी योजनेचे सटाणा शहराकडून कामास प्रारंभ केला होता. मात्र, निकवेलपासून पुन्हा विरोध झाल्याने काम रखडले गेले ते आजतागायत. पालिकेतील जनरल कौन्सिलच्या १९ जूनच्या सभेत केळझर पाणीपुरवठा योजना गुंडाळण्याचा निर्णय येऊन पुनद धरणातून नव्याने पाइपलाइन करण्याचा ठराव संमत झालेला असताना गत सप्ताहात १२ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी नाशिक यांची भेट घेऊन उपरोक्त ठरावाला विरोध केला. केळझर पाणीपुरवठा योजना मंजुरीचा घाट घातल्याने टंचाई काळात शहरातील पाणी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, पालिका सभागृहात राष्ट्रवादीची सत्ता असताना केळझर व पुनद पाणी प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. आगामी काळात पालिकेच्या राजकारणाला यामुळे गती मिळणार असून, केळझरचे पाणी मिळो अथवा न मिळो मात्र पाणी प्रश्नावर शहरवासीयांना पुन्हा एकदा राजकारण बघावयास मिळणार आहे. विद्यमान नगरसेवकांना केळझर पाणीपुरवठा अयोग्य असल्याची भावना आजच का निर्माण झाली असून, सदरची योजना बंद करण्याचा ठराव करण्यामागील भूमिका देखील गुलदस्त्यात असल्याने या विषयी शहरात चर्चेला ऊत आला आहे.

शहरात सध्या पाणीटंचाईन डोके वर काढले असून, नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येणार आहे. पाऊसच नसल्याने धरणेही कोरडीठाक झाली आहेत. यामुळे टंचाई तीव्र होत आहे.

पाणी पेटणार

दरम्यानच्या काळात ३८ खेडी पुन्हा बागलाणला जोडली गेल्यानंतर देखील हा विरोध कायम आहे. यामुळे या योजनेचे भवितव्य किती हा प्रश्न नंतरचा असताना पुढील वर्षी सटाणा नगरपरिषदेच्या निवडणुकांचा बिगूल वाजत असताना केळझर पाणीपुरवठा योजनेने पुन्हा पेट घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्त कर्मचाऱ्यांचा पाणी योजनेसाठी टाहो

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कळवाडी (ता. मालेगाव) येथे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांनी वणवण भटकावे लागत आहे. सध्या गावात आठ दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. कळवाडी गावासाठी आखण्यात आलेल्या नवीन पाणीयोजनेला लवकरात लवकर मान्यता मिळावी, अशी मागणी गावातील निवृत्त कर्मचाऱ्यांनी सरकार दरबारी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदनही पाठविले आहे.

एकिकडे गेल्या २१ वर्षांपासून गावासाठी कुठलीही नवीन पाणीयोजना आमलात आणली गेली नाही, तर दुसरीकडे गावाची लोकसंख्याही वाढत आहे. त्यामुळे आहे त्या जलकुंभाची क्षमता अपुरी पडत आहे. कळवाडी गावाची लोकसंख्या दहा हजाराच्या आसपास असून, गावासाठी १९८० सालापासून बांधण्यात आलेली एकच जलकुंभ आहे. ही योजना ३५ वर्षांपूर्वीची असल्याने ती नादुरुस्त होण्याच्या मार्गावर आहे. गावात आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो. गावात नवीन पाण्याची टाकी आणि पाइपलाइनसाठी वित्तपुरवठा करण्यात यावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.

कळवाडी पाझर तलावाच्या खाली विहीर व पाइपलाइनसाठी प्रस्तावही ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेकडे पाठविला होता. तसेच, याबाबत ग्रामसभेत ठरावही मंजूर केला आहे. सद्यस्थितीत गावातील जलकुंभ हा जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे भविष्यात जर विपरीत घटना घडली, तर ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्यासाठी खूप हाल होतील. त्यामुळे कळवाडी गावासाठी लवकरात लवकर पिण्याच्या पाण्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी रामदास धोंडू पाटील, नामदेव गणपत खैरनार, मेघराज महादू देसले यांच्यासह गावातील निवृत्त कर्मचाऱ्यांनी केली आहे. आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी जपून वापरा!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा धरणात अवघे तीन टक्के, तर तळवाडे साठवण तलावात केवळ पंधरा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे मनपा प्रशासनाने मालेगावला मंगळवारपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांमध्ये देखील म्हणावा तसा पाऊस न झाल्याने गिरणा धरणात ५८१ दशलफू म्हणजे अवघे तीन टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातही मनपाच्या आरक्षित पाणीसाठ्यापैकी केवळ १०० दशलफू पाणीसाठा गिरणा धरणातून उपलब्ध होणार आहे. चणकापूर धरणावरील आरक्षित चारही आवर्तन घेण्यात आले आहेत. शहारानजीक असलेल्या तळवाडे साठवण तलावात जेमतेम १५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. यामुळे पाण्याच्या नियोजनासाठी शनिवारी महापालिकेची बैठक बोलवली होती.

या बैठकीस महापौर हाजी इब्राहीम, उपमहापौर युनूस ईसा, स्थायी समिती सभापती ताहेरा शेख, आयुक्त किशोर बोर्डे उपस्थित होते. यावेळी पाणीपुरवठा अभियंता जहीर अन्सारी यांनी उपलब्ध पाणीसाठा व नियोजन सभागृहापुढे मांडले. पाण्याची उपलब्धता आणि पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेता मालेगावात येत्या मंगळवारपासून टप्प्याटप्प्याने शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय मनपाने घेतला.

दरम्यान, पाणीपुरवठ्याबाबत दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत असताना देखील मनपा पाणीपुरवठा विभाग याबाबत गंभीर नसल्याचे अनेकांनी या बैठकीत निदर्शनास आणून दिले. पाण्याची उपलब्धता लक्षात घेता पाणी कपातीचा निर्णय घेण्यासंबधीचा प्रस्ताव इतक्या उशिराने का आला? तसेच पाणीटंचाईल सामोरे जाण्यासाठी योग्य नियोजन आराखडा का नाही? असा सवाल अनेकांनी उपस्थित करीत पालिका पाणीप्रश्नावर खरच गंभीर आहे का याबाबत प्रशासनास धारेवर धरले होते.

पाणीप्रश्नावर राजकारण नको

बैठकीला उपस्थित नगरसेवक सुनील गायकवाड, शकील बेग यांनी पाणीप्रश्नावर कोणतेही राजकारण न करता तातडीने नागरिकांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. सखाराम घोडके यांनी शहरात होत असलेली पाणीगळती, अवैध नळजोडणी, अग्निशमन दलाच्या केंद्रावरून शौचालयांना केला जाणारा पाणीपुरवठा यावर नाराजी व्यक्त करीत याबाबत कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

पिण्याच्या पाण्याची उपलब्धता लक्षात घेता मालेगावकरांसाठी दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय कठोरपणे घेणे गरजेचे होते. त्याबाबतीत योग्य ते नियोजन मनपाने केले आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी मनपा कठोर उपाययोजना करणार आहे. तसेच नागरिकांनी देखील पाण्याचा जपून वापर करावा. उघड्या नळांना तोट्या बसवाव्यात. वाहने नळावर धुऊ नये. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

- हाजी मोहम्मद इब्राहीम, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालखेडचे पाणी बंदोबस्तात रवाना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

मनमाड व येवला येथील सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी पालखेड धरणाचे डाव्या कालव्यातून शनिवारी दुपारी चार वाजता पोलिस बंदोबस्तात पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. कडक पोलिस पहाऱ्यात पाणी येवला, मनमाडच्या साठवण बंधाऱ्यात नेण्यात येणार आहे.

यंदा पाऊस कमी पडल्याने दिंडोरी तालुक्यातील सर्वच धरणात अत्यल्प साठा असून, कादवाचे नदीपात्र प्रथमच कोरडेठाक पडले आहे. मनमाड व येवला शहराला पाणीपुरवठा व्हावा यासाठी पालखेड धरणातून आवर्तन सोडण्याची मागणी होत होती. अखेर शनिवारी आवर्तन सोडले असून, ३३० क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे. पालखेड धरणात अवघा ३७५ दलघफू साठा शिल्लक आहे. इतर धरणातही अल्प साठा आहे. दरम्यान, कालव्याद्वारे सोडण्यात आलेल्या पाण्याची चोरी होऊ नये म्हणून प्रशासनाने पोलिसांची मदत घेत पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पथकही तैनात करण्यात आले आहे.

कादवा नदीत पाणी सोडण्याची मागणी

पालखेड धरणाखाली कादवा नदीच्या पात्रावर अवलंबून असलेले नदीपात्र कोरडेठाक होत असल्याने कुर्नोली, खडक सुकेणे, चिंचखेड जोपूळ, मातेरेवाडी आदी गावांचाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता असून, नदीकाठाचे आजूबाजूचे विहिरींनीही तळ गाठल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी कादवा नदीपात्रातही पाणी सोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूलभूत सुविधांसाठी घेराव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

देवळालीतील वॉर्ड क्रमांक १ मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची वस्ती अधिक आहे. या भागात नागरी सुविधांचा सुविधांचा अभाव असल्याचे समजल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विलास पवार यांनी दौरा केला. यावेळी स्थानिकांनी अतिशय पोटतिडकीने आपल्याभागातील समस्या मांडल्या आणि कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला.

सीईओ पाटील यांनी वॉर्ड क्रमांक १ मधील समस्या जाणून घेत त्या तत्काळ दूर करण्याचे आश्वासन दिले. यावेळी स्थानिक नगरसेविका प्रभावती धिवरे, भाऊसाहेब धिवरे, आरोग्य निरीक्षक सतीश भातखळे, इंजिनीअर व्ही. आर. पाटील, स्वच्छता अधिकारी ठाकूर आदी उपस्थित होते.

आनंदरोड वरील उघड्या गटारांमुळे परिसरात आरोग्याच्या दुरवस्थेस आमंत्रण देणारी ठरत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे अपुरी पडणारी ब्रिटिशकालीन पाईप लाईनही बदलण्यात आलेली नाही. त्यामुळे पिण्याच्या नेहमीच टंचाई जाणवते.

कमी दाबाने पाणी पुरवठा होत

असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची नळांच्या तोट्याही मोडून पडल्या आहेत. सार्वजनिक उद्याने निर्माण करण्यात आली; मात्र त्यांची योग्य ती देखभाल होत नाही. उघड्या गटारी आजाराला आमंत्रण ठरत असून ठिकठिकाणी पडलेला कचरा, अडचणीच्या ठरणाऱ्या गल्ल्यांमध्ये पथदीप बसविण्याचे आदेश देत नागरिकांच्या प्राथमिक सुविधाबाबत असलेल्या तक्रारींची दाखल घेतली जाईल, असे आश्वासन सीईओ पवार यांनी येथे नागरिकांना दिले.

शौचालयाच्या कामास सुरुवात

'मटा'ने काही दिवसापूर्वी दिलेल्या वृत्तामुळे या भागातील प्रमुख समस्या असलेले ब्रिटीशकालीन शौचालयाचे काम मार्गी लागले असून त्या शौचालयाच्या पुनरनिर्माणाचे काम सुरू झाले आहे. उर्वरित विकासकामांबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

वार्डात समस्यांना उत्तर देणे कठीण होते. म्हणून आम्ही प्रशासनाला सद्यस्थितीची जाणीव करून देण्यासाठी 'सीईओ' पवार यांना वॉर्डाची पाहणी करवून दिली. यामुळे विविध समस्या मार्गी लागणार आहेत.

- प्रभावती धिवरे, नगरसेविका

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणार

देवळाली कॅम्प परिसरात दोन दिवसांपूर्वी मोकाट कुत्रा रस्त्यात आल्याने झालेल्या अपघातात १ तरुणाचा मृत्यू झाल होता. याप्रश्नी 'सीईओ' पवार यांना विचारले असता त्यांनी मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. तसेच या प्रश्नातील अडचणी समजून घेत निश्चितच तोडगा काढला जाईल, असेह त्यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमध्ये अल्पदरात जेवणाची सुविधा

$
0
0

त्र्यंबकेश्वर : येथे सावन कृपाल रूहाणी मिशन दिल्ली यांनी ना नफा ना तोटा या तत्त्वावर अल्पदरात चहा, नाश्ता, जेवण व मिनरल वॉटर उपलब्ध करून दिले आहे. अवघ्या तीन रुपयात चहा, पाच रुपयात वडापाव, दहा रुपयात जेवण व सात रुपयात पाण्याची बाटली असे सकाळी नऊ ते रात्री नऊ सुरू असते. याकरिता भाजीपाला, किराणा उत्तम दर्जाचा असतो.

येथील नवीन बसस्थानकापासून जवळच जव्हार फाट्यावर सावन कृपाल रूहाणी मिशन यांचे शि‌बिर लागले आहे. केवळ पोट भरणे याकरिता भाविक येत नाहीत हे लक्षात घेऊन याच शिबिरात मेडिटेशन प्रदर्शनी ग्रंथालय व वाचनालय अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मानवाने स्वतःचा स्वतःमध्ये शोध घ्यावा, अशा या संकल्पना आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आखाड्यांकडून साधूंना मिळतेय दीक्षा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

सिंहस्थात साधूंना दीक्षा देण्याचे कार्य येथील आखाड्यांमध्ये सुरू आहे. येथील श्री पंचायती अटल आखाड्यात साधूंना दीक्षा देण्यात येत आहे. अटल आखाड्याचे सचिव श्रीमहंत उदयगिरी महाराज यांनी याबाबत माहिती दिली.

आखाड्याशी संबंध नसलेला केवळ भगवे वस्त्र परिधान करून अंगाला राख लावून कोणी साधू होत नसते. अशा साधूंना मनमुखी असे म्हणतात. स्वतःच्या इच्छेने असे भगवे वस्त्रधारी साधू झाले असतील. मात्र, ते आखाड्याशी संबंधित नसल्याने त्यांना शाहीस्नानात सहभागी होता येत नाही. तसेच आखाड्याचे अथवा आश्रमांचे धार्मिक कार्यक्रम, भंडारा यामध्ये त्यांना स्थान नसते. अशा साधूंना खडी पलटण असेही म्हणतात. अर्थात खडी पलटणमध्ये दीक्षा घेऊन साधू झालेले असतात. परंतु, नंतर भरकटले देखील असतात. मनमुखी म्हणजे अधिकृत दीक्षा घेतलेली नाही, असे भगवे वस्त्रधारी होत.

अशी दिली जाते दीक्षा

साधू म्हणून दीक्षा देताना अगोदर त्याचे मुंडण केले जाते. नंतर त्यास पांढऱ्या वस्त्राची लंगोटी बांधली जाते. त्याची शेंडी कापून टाकतात. शेंडी कापतांना त्याचे गुरू आणि ती दीक्षा घेणारी व्यक्ती यांच्यावर एक वस्त्र टाकतात. त्या पांघुरणाखाली शेंडी कापून काढतात. त्यानंतर त्याला भस्म लावतात. त्याच्या गळयात दोऱ्यात ओवलेले रूद्राक्ष घालतात. त्यानंतर गेरूचे वस्त्र परिधान करतात, अशा प्रकारे साधू झाल्यानंतर कोतवालासमवेत जाऊन आखाड्यातील इष्टदेवतांना नारळ, गुळ प्रसाद अपर्ण करतात. यामध्ये धने देखील असतात.

देवतेसमोर तसेच उपस्थित साधूंना दक्षिणा देतात. अशा प्रकारे साधू म्हणून आपला जीवनक्रम सुरू करतात. येथून पुढे दीड वर्ष दिलेल्या मंत्राचा जप करणे, शुध्द आचरण ठेवणे आदी सर्व नियम पाळले तर नागासाधू म्हणून त्यावर संस्कार केले जातात. धर्माचार्य अथवा एका दिवसात महंत म्हणून घोषित करण्याने वाद निर्माण होत आहेत. तथापि, आखाड्यांमधून सिंहस्थात साधूंना दीक्षा देण्याचा कार्यक्रम पारंपरिक पध्दतीने घडत असतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धार्मिक संस्था बनल्या टेक्नोसॅव्ही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्ताने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या संस्थाही सोशल मीडियाच्या माध्यमातून टेक्नोसॅव्ही झाल्या आहेत. या सोहळ्याला हायटेक करीत अनेक संस्थांनी व्हॉटस् अॅप आणि फेसबुकसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यक्रमांचा प्रचार सुरू केला असून, भाविकाची गैरसोय होऊ नये याची जास्तीत जास्त काळजी त्यांच्याकडून घेतली जात आहे.

सिंहस्थानिमित्त नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या संस्थांशी अनेक वर्षांपासून जोडले गेलेले देशभरातील भाविक या कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावतात. शाहीस्नानाचा पुण्यसंचय करतानाच सत्संग, प्रवचन, रामकथेचा आनंद लुटण्यासाठी नाशिकनगरीत येण्याचे नियोजन देशभरातील हजारो भाविकांनी केले आहे. अपरिचित शहरामध्ये येणाऱ्या भाविकांची गैरसोय अथवा फसवणूक होऊ नये याची काळजी अशा आयोजक संस्थांकडून घेतली जात आहे. त्यासाठी त्यांनी फ्लेक्स, बॅनर, पत्रके या पारंपरिक साधनांबरोबरच व्हॉट्स अॅप व्हिडीओ, फेसबुकसारख्या सोशल माध्यमांद्वारे भाविकांपर्यंत तसेच अनेक श्रध्दाळूंपर्यंत पोहोचण्याचे काम करीत आहेत.

मानव उत्थान सेवा समितीच्या वतीने ११ ते १३ सप्टेंबर या कालावधीत नाशिकमध्ये सदभावना संमेलन होत आहे. हे संमेलन नेमके कोठे होणार, रेल्वे स्टेशन, शहरातील बसस्थानकांपासूनचे संमेलनस्थळाचे अंतर, त्यासाठी बसेसचा मार्ग, निवासाची व्यवस्था, सत्संग पंडाल, संमेलन स्थळापासून संस्थेच्या श्री हंस कल्याण धामचे अंतर अशी सर्व माहिती भाविकांना केवळ एका मिनिटाच्या व्हिडीओद्वारे पोहोचवली जात आहे.

संस्थांशी संबंधित स्वयंसेवकांचे व्हॉटस् अॅप ग्रुप कार्यरत असून, प्रत्येकजण व्हॉटस् अॅपसारख्या सोशल मीडियाद्वारे अशी मा‌हिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. शहरात सुधांशू महाराज, मोरारी बापू, सतपालजी महाराज, नारायण सेवा प्रतिष्ठान यांसारख्या अनेक धार्मिक संस्थांनी सामाजिक उपक्रम आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अशा कार्यक्रमांची माहिती सर्वदूर पोहोचविण्यासाठी या संस्था हायटेक झाल्याचे पहावयास मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कावनईत रंगला शाही सोहळा

$
0
0

विजय बारगजे, घोटी

प्रभू श्रीरामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जय, भगवान कपिल मुनिकी जय अशा जयघोषात शंखनाद करीत पर्वकाळाचा मुहूर्त साधत श्रीक्षेत्र कावनईच्या कपिल धारातीर्थ येथे सिंहस्थातील पहिला शाहीस्नान सोहळा साधू संताच्या स्नानाने पार पडला. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी जिल्ह्यातील हजारो भाविक, साधक सहभागी झाले होते.

सह्याद्रीच्या कुशीत प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या व सनातन काळात दंडकारण्य समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कावनई येथे रविवारी मंगलमय वातावरणात साधू-महंत व भाविकांच्या सहवासात या शतकातील दुसऱ्या कुंभमेळ्याचे पहिले शाहीस्नान इगतपुरी तालुक्यातील धार्मिक तसेच महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र कावनई येथे अत्यंत धार्मिक व जल्लोषमय वातावरणात संपन्न झाले. या शाहीस्नानात एक हजारापेक्षा जास्त साधू व महंत तसेच दीड लाखापेक्षा जास्त भाविकांनी या पवित्र शाहीस्नानचा लाभ घेतला.

आखाडा परिषदेने जाहीर केल्याप्रमाणे ६ सप्टेंबरचा मुहूर्त साधत शाहीस्नानासाठी साधू व भाविकांची पावले कावनई क्षेत्राकडे वळाली. श्री क्षेत्र कावनई येथे महंत ग्यानदास महाराज, जगतगुरू रामानाचार्या, श्रीहंस देवाचार्या महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शाहीस्नान सोहळा मोठ्या आनंदात व उत्साहात पार पडला.

सकाळी ७.३० वाजता कावनई क्षेत्राचे महंत रामनारायणदास फलाहारी महाराज यांच्या हस्ते धर्मध्वजाचे विधीवत पूजन करण्यात आले. तसेच, विविध आखाड्यांचे इष्टदेव, देवतांचे पूजन तसेच महाआरती करण्यात आली. यानंतर कावनई खिंड येथे वाद्यांच्या गजरात व पुष्पवृष्टीत विविध आखाड्यांच्या साधू-महंतांचे आगमन झाले. साधू- महंतांची शाही मिरवणूक तीर्थ कुंडापर्यंत काढण्यात आली. प्रभू रामचंद्राच्या जयघोषात व कपिल मुनी, मारुतीरायचा जयघोष करीत सर्व साधूंनी जलपूजन, शाहीस्नानासाठी तीर्थकुंडात उड्या घेतल्या. आखाडा परिषदेने दिलेल्या सूचनेनुसार बरोबर सकाळी १०.३० वाजता कपिलस्नानास सुरुवात झाली.

शाही मिरवणूक सुरू होण्याआधी माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ, जि. प. अध्यक्षा विजयश्री चुंभळे, खासदार हेमंत गोडसे, आमदार निर्मला गावित, आमदार सीमा हिरे, माजी आमदार शिवराम झोले, काशिनाथ मेंगाळ, माजी सभापती अलका जाधव आदी पदधिकाऱ्यांसह विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. शाहीस्नान कार्यक्रम आटोपल्यानंतर कुंभमेळा तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी धावती भेट दिली.

सकाळी दहा वाजेच्या सुमारास साधू-महंताचे आगमन झाले. वाद्याच्या गजरात भगव्या ध्वजाची पताका डोलवत व धर्माच्या घोषणा देत महंत ग्यानदास महाराज व यांच्यासह शेकडो साधूंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी कावनई खिंडपासून तीर्थकुंडापर्यंत साधू-महंतांची मिरवणूक काढण्यात आली. पर्वाचा मुहूर्त साधत महंत ज्ञानदास महाराज यांच्या हस्ते कपिलधारा तीर्थक्षेत्री विधीवत पूजन करून १० वाजून ३० मिनिटांनी शाहीस्नान करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी जयजयकार करून पुष्पवृष्टी केली. या पाठोपाठ कपिलधारा तीर्थक्षेत्राचे विधीवत जलपूजन केले. या जलपूजन सोहळ्यानंतर उपस्थित भाविकांनी तीर्थस्नान करण्यासाठी एकच गर्दी केली.

पोलिस बंदोबस्त

नाशिक ग्रामीणचे जिल्हाप्रमुख संजय मोहिते, विभागाचे पोलिस उपअधीक्षक छगन देवराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिस अधिकारी सुरेश मनोरे, संदीप कोळेकर यांच्यासह पोलिस अधिकारी तळ ठोकून होते. या शाहीस्नानासाठी ४१८ पोलिस कर्मचारी, स्थानिक गुन्हेचे शाखेचे ३० कर्मचारी, १५० होमगार्ड्स व राज्य राखीव दलाचे ६० जवान असे जवळपास ८०० पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा ताफा बंदोबस्तासाठी तैनात होता. यावेळी घोटी येथील कावनई फाटा, पार्किंग स्थळ, वाकीफाटा, पंपा सरोवर, शाहीस्नान मार्ग या ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावला होता.

जिल्हाधिकारी तळ ठोकून

प्रशासकीयदृष्ट्या अडचणी निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह हे सकाळपासून उपस्थित होते. शाहीस्नानप्रसंगी जिल्हाधिकारी थेट भाविकांमध्ये जाऊन बसले. यावेळी जिल्हाधिकारी समवेत प्रांत अधिकारी बाळासाहेब वाघचौरे, तहसीलदार महेंद्र पवार व आदी अधिकारी वर्ग दिमतीला होते.

आजी - माजी पालकमंत्र्यांची उपस्थिती

या शाहीस्नानाच्या सोहळ्यासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे शाहीस्नानापूर्वी कावनई क्षेत्री हजर झाले. त्यांनी संपूर्ण शाहीस्नानाचा आनंद घेत तब्बल दीड तास भाविकांशी व साधूंशी संवाद साधला. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे शाहीस्नान झाल्यानंतर तासाभराने दाखल झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुम्हारे नासिक के रिक्षावाले इमानदार है!

$
0
0

prashant.desale@gmail.com

नाशिकः संपूर्ण राज्यावर दुष्काळाचे सावट असल्याने सिंहस्थ कुंभमेळ्याला येणारा गर्दीचा ओघ बराचसा ओसरला आहे. परतीचा पाऊस तरी येता का, की तो ही पाठ दाखवून जातो, या भीतीमुळे किमान महाराष्ट्रातील तरी भाविक आणि पर्यटक धास्तावले आहेत. मात्र काही पर्यटक असेही आहेत की जे शेकडो किलोमिटरचा प्रवास करून नाशिकनगरीत येत आहेत. यादरम्यान त्यांना असे अनेक नाशिककर भेटत आहेत की ज्यांच्यामुळे या पाहुण्यांना अतिथी देवो भवःचे महत्त्व पटत आहे. ओडिशाहून आलेल्या दाम्पत्याला असा काही अनुभव आला की नाशिकने त्यांच्या मनात घर केलं.

संतोष देव आणि नलिनी देव हे तरुण दाम्पत्य आपल्या साडे तीन वर्षाच्या मुलाला घेवून सिंहस्थ् कुंभमेळ्यासाठी नाशिकला आलं. ओडीशातील अंगुल येथील जिंदाल प्लॅंटमध्ये संतोष देव मोठ्या पदावर आहेत. ओडिशात नोकरी लागण्याआधी त्यांना नागपूरच्या एका कंपनीत नोकरीची संधी आली होती. मात्र, आपला प्रांत सोडून इतक्या दूर कसे जायचे, तेथील कल्चर आपल्याला सूट होईल का, तिथली माणसं कशी असतील, त्यात भाषेची अडचण या सगळ्या समस्यांमुळे त्यांनी ती ऑफर झुगारली आणि ओडीशातच स्थायिक झाले. मात्र, कुंभमेळ्यानिमित्त नाशिकला आल्यावर त्यांना आपल्या 'त्या' निर्णयावर पश्चाताप झाल्याचे ते सांगतात. 'यहाँ लोक बडे को-ऑपरेटिव्ह है, बाहर से आये है, फिर भी एैसा नही लगता की यह दुसरा प्रांत है', असं संतोष देव सहज बोलून गेले.

नाशिकबाबत, इथल्या प्रवासाबाबत त्यांनी खूप काही सांगितले, खासकरून दिलीप जाधव यांच्याबाबत. दिलीप जाधव हे नाशिकच्या हजारो रिक्षाचालकांपैकीच एक. कुंभमेळ्याच्या काळात रिक्षावाल्यांच्या उत्पन्नात वाढ झाली असली, तरी परप्रांतातून येणाऱ्या पर्यटकांना शहरात फिरविणे तितकेसं सोपं नाही. त्यांची भाषा, हा रिक्षावाला आपल्याला फसव‌िणार तर नाही ना? ही प्रवाशांच्या मनातील भावना या सगळ्या गोष्टी दिसतात तितक्या सोप्या नाहीत. विशेष म्हणजे रिक्षावाले पर्यटकांना जी काही वागणूक देतात, त्यावरूनच बऱ्यापैकी पर्यटक हे इथल्या लोकांच्या स्वभावाबाबत अंदाज बांधतात. संतोष आणि नीलिमा देव यांना नाशिक नवीन. मात्र, जाधव यांनी त्यांच्याकडून कुठलाही दर न ठरवता, त्यांना संपूर्ण रामकुंड परिसरात तसेच शहरात इतर ठिकाणी फिरविले. इतकेच नव्हे तर रामकुंडावर कुठे जायचे, काय पहायचे, मंदिरांबाबत माहिती, आमुक मंदिर कुणाचे, विविध चौकांची नावे याबाबत इंत्यभूत माहिती दिली. याबाबत नीलिमा देव म्हणाल्या, 'वैसे तो दिलीपभाई को हम जाणते भी नही, लेकीन इन्होंने हमारा पुरा ख्याल रखा, दर्शन के लिए मदत भी की, और किराये के बारे में भी हिचकिचाहट नही की, सच कहू तो तुम्हारे नासिक के रिक्षावाले इमानदार है...' निलीमा देव यांच्या या एका वाक्याने नाशिकच्या संपूर्ण रिक्षावाल्यांना एक प्रमाणपत्रच बहाल केलं होतं.

जाधव यांच्यासारखे हजारो रिक्षावाले आज अनेक पर्यटकांची नाशिक शहरात दर्शनासाठी ने-आण करीत आहेत. तसं पाहिलं तर कुठल्याही शहरात चहावाले आणि रिक्षावाल्यांबाबत कुणी चांगलं बोललं तरच नवल. रिक्षावाला अमूक ठिकाणी सोडायचे कितीही रुपये म्हंटला तरी प्रत्येक प्रवाशांना ते जास्तच वाटतात. त्यामुळे शहर कुठलेही असो, रिक्षावाले सगळीकडे सारखेच असतात असा एक गैरसमज आज समाजात पसरला आहे. मात्र जाधव यांच्यासारखे काही रिक्षावाले आजही आहेत, की जे संपूर्ण शहराचे प्रतिनिधीत्व करतात. आपल्या शहराचे नाव खराब होणार नाही यासाठी प्रयत्न करतात. कुंभमेळ्यात आलेले सगळेच पर्यटक रिक्षा करतात असे नाही; मात्र जे करतात त्यांना जर रिक्षावाल्यांकडून चांगली वागणूक मिळाली तर नक्कीच नाशिक पर्यटकांचं सर्वात आवडतं शहर बनणार, यात शंका नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सेफ्टी टँकमध्ये गुदमरून दोन जणांचा मृत्यू झाला असला तरी पोलिसांनी अकस्मात मृत्यू एवढीच नोंद केली आहे. मृतांचे नातेवाईक, कंपनीशी संबंधित काही लोकांचे रविवारी जबाब नोंदविण्यात आले. मात्र, तक्रार आल्याशिवाय आणि शहानिशा झाल्याशिवाय निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा दाखल करता येणार नाही, असे सातपूर पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांनी रविवारी सकाळी गोंधळ घालून महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

सातपूर एमआयडीसीतील नाईस भागात साईश इंजिनीरिंग कंपनीत सेफ्टी टँक साफ करीत असताना विनोद माधव मारू (३२) व मजूर दिपक रामचंद्र माळी (२५) या दोघांचा गुदमरून मृत्यू झाला. मारू हे महापालिकेचे सफाई कर्मचारी तर माळी मजुरी काम करायचा. शौचालयाच्या टाकीत उतरल्यानंतर मिथेन गँसमुळे भोवळ येऊन त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. या घटनेप्रकरणी तक्रार देण्यावरून राजकारण सुरू झाले आहे. मृतांच्या नातेवाईकांनी तक्रार द्यावी, असे सांगण्यात आले होते. मात्र, रविवारी याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकला नाही. पोलिसांनी केवळ अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

पोलिसांनी रविवारी कंपनी मालक आणि व्हॅक्यूम गाडीचालकाचे जबाब नांदविले. महापौर अशोक मुर्तडक यांनीही सातपूर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. वाल्मिकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश दलोड यांच्याशी त्यांचा वाद झाला. आपापसातील वाद मिटवून पोलिस स्टेशनमध्ये या असे त्यांना सांगण्यात आले.

मृतदेह दुपारी ताब्यात

सफाई कामगारांना सुरक्षाविषयक साधने न पुरविताच काम करण्यास भाग पाडणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी घोषणाबाजी करीत मृत मारू यांच्या निकटवर्तीयांनी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला. सकाळी अकरापासून दुपारी एकपर्यंत हा गोंधळ सुरू होता. तोपर्यंत नातलगांनी मृतदेहही ताब्यात घेतला नव्हता. दुपारी एकनंतर सरकारवाडा पोलिसांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर नातलगांनी मृतदेह ताब्यात घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राममंदिर निर्मितीसाठी संत मंडळावर जोर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दीर्घकाळापासून चर्चेत असणाऱ्या अयोध्येतील राममंदिर उभारणीकरिता आता अखिल भारतीय स्तरावरही संतांचे मंडळ स्थापन करून सातत्याने हे मंडळ केंद्र सरकारच्या संपर्कात राहील. मंदिर निर्माणाच्या वाटेवरील अडथळे दूर सारण्यासाठी हे मंडळ कार्यरत राहील, असा ठराव विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आयोजित संत संमेलनात मंजूर करण्यात आला.

यावेळी सामाजिक समरसता, जनगनणा आणि गोहत्याबंदी या विषयांवरील ठरावही मंजूर करण्यात आले. जनगणनेसंदर्भात मंजूर करण्यात आलेल्या ठरावानुसार देशातील राज्य आणि केंद्र सरकारला आवाहन करण्यात येणार आहे. यानुसार सर्वच समाजांसाठी देशभरात राष्ट्रीय समान जनसंख्या नितीच्या निर्मितीवर भर द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. गो रक्षाविषयक ठरावही यावेळी मंजूर झाला. यानुसार गोवंश मांस निर्यातबंदी, कत्तलखान्यांना मिळणारे शासकीय अनुदान बंद करावे, देशात गो अभयारण्यांची निर्मिती, राज्य व केंद्र स्तरावर गोवंश संरक्षण संवर्धन मंत्रालयांची स्थापना, गोवंश हत्याबंदी कायद्याची निर्मिती या मुद्द्यांची अंमलबजावणी सरकारने करावी. सामाजिक समरसतेविषयीच्या प्रस्तावात सर्व समाजांसाठी मंदिरांची दारे खुले ठेवावीत, गावामध्ये पाणवठा, स्मशान ही ठिकाणी कुणासाठीही प्रतिबंधित नको, सर्व महापुरुषांचे उत्सव साजरे करण्यात यावेत, असे ठराव मंजूर करण्यात आले.

‍राममंदिरासाठी स्वतंत्र कायदा हवा

भाजप सत्तेत आल्यानंतर अयोध्येत राममंदिर उभारणीची अपेक्षा सरकारकडून आहेच. मात्र त्यासाठी स्वतंत्र कायद्याच्या निर्मितीची आवश्यकता वाटते, असेही प्रवीण तोगडिया यांनी सांगितले. स्वातंत्र्यानंतर सोमनाथ मंदिर निर्माणाच्या रस्त्याप्रमाणे कायदा निर्मितीसाठी केंद्राला प्रस्ताव पाठविण्याचे पुढचे पाऊल असेल, असेही ते म्हणाले.

कृषिक्षेत्रावर भर हवा

विकासाच्या दृष्टीने विचार करता स्वस्त आणि समान शिक्षणाचा पर्याय प्रत्येकासाठी आजमितीला उपलब्ध नाही. या पर्यायापर्यंत पोहचण्यासाठी केवळ त्यावरील तरतूद वाढविणे हे सरकारच्या हाती आहे. बेरोजगारीच्या प्रश्नावरील उपाय शोधताना सरकारला शेतीच्या विकसनावर लक्ष केंद्रित

करावे लागेल. या क्षेत्रात अद्याप ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक सरकारकडून होणे अपेक्षित आहे. कुंभाच्या नियोजनासाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

... तो तर औरंगजेबच!

कुंभादरम्यान नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील काही विकासकामे साकारताना अधिकाऱ्यांनी या शहरांमध्ये काही मंदिरांना धक्का लावला होता. या संदर्भात टिप्पणी करताना संबंधित नियंत्रक अधिकाऱ्याला तोगडिया यांनी औरंगजेबाची उपमा दिली. सांस्कृतिकदृष्टया नाशिक व त्र्यंबक सारखी शहरे कळसस्थानी असल्याने मंदिरांचे नुकसान खपवून घेतले जाणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनयभंगप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,नाशिक

मोबाइल गहाळ झाल्याबाबत विचारणा करणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. शरणपूर रोडवरील वसंत मार्केट परिसरात ही घटना घडली. शुक्रवारी (दि. ४) रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. जमिन व्यवहाराच्या कामासाठी ही महिला पतीसमवेत आली होती. त्यावेळी तिचा मोबाइल गहाळ झाला. महिलेने दोघांकडे मोबाइलबाबत विचारणा केली. त्यावेळी दोघांनी तिचा विनयभंग केला. यावेळी झालेल्या झटापटीत तिचे मंगळसूत्र गहाळ झाले. महिलेने सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये चौघांविरोधात फिर्याद दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ नागरिकावर प्राणघातक हल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे व जेष्ठ साहित्यिक कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांचा शोध सुरू असतांनाच अशाच प्रकारची घटना बागलाण तालुक्यातील जायेखडा येथे सोमपूर शिवारात घडली. पहाटे फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दगा तुळशिराम ठाकरे (वय ६७) या जेष्ठ नागरिकांवर अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून धारदार शस्त्राने प्राणघात हल्ला केल्याचा प्रकार गुरुवारी घडला. दगा ठाकरे नाशिक येथील खासगी रुग्‍णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. जायखेडा पोलिसांनी सदरचा प्रकार मोटर अपघात म्हणून दाखल केला असताना प्रत्यक्षात दि. ६ रोजी दुपारी ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

दगा तुळशिराम ठाकरे हे आपल्या पत्नी समवेत जायखेडा येथे शेती व्यवसाय करतात. त्यांना तीन मुली असून, तिघे बाहेरगावी असतात. दि. ३ ऑगस्ट गुरुवार रोजी पहाटे ५ ते ५. ३० वाजेच्या सुमारास नित्यनियमाप्रमाणे पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. जायखेडा-सोमपूर रोडवर अज्ञात व्यक्तीने पाठीमागाहून येत दगा ठाकरे याच्या डोक्यावर, पाठीवर सपासप वारून करून त्यांना जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. ते गंभीर जखमी झाल्याने बेशुद्ध अवस्थेत जागीच पडले. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने मालेगाव येथील खासगी रुग्‍णालयात दाखल करण्यात आले. ते मृत्युशी झुंज देत असताना जायखेडा पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदार यांनी या घटनेची सखोल चौकशी न करता थेट मोटर अपघात दाखल करून प्रकरण दाबण्याच्या प्रयत्न केला असल्याचा आरोप केला जात आहे. यानंतर दगा ठाकरे यांच्या कन्या जयश्री नितीन कंरबळकर (वय ३४ रा. कल्याण जि. ठाणे) यांनी या झालेल्या प्रकाराची माहिती घेत दगा ठाकरे यांच्यावर प्राणघात हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आणून देत रविवार दि. ६ रोजी दुपारी ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास जायखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र होळकर करित आहेत.

हल्ला झालेले दगा तुळशिराम ठाकरे हे अद्यापही बेशद्ध अवस्थेत असल्याने माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांनी प्राथमिक चौकशीत मोटार अपघाताचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, चौकशीनंतर जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

- राजेंद्र होळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अबब! राज्य नाट्यस्पर्धेसाठी २५० एन्ट्रीज

$
0
0

Prashant.bharvirkar@timesgroup.com

नाशिक : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचलनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाशिकहून तब्बल २५० एन्ट्रीज गेल्या असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षापर्यंत १५ पेक्षा जास्त एन्ट्रीज न मिळालेल्या केंद्रासाठी अचानक २५० एन्ट्रीज कशा गेल्या हे गणित न समजणार आहे. नाशिक केंद्र वाचविण्यासाठी हे गौडबंगाल करण्यात आले की काय, असा संशय येतो आहे. या एन्ट्रीज डमी असल्याची शक्यता एका ज्येष्ठ रंगकर्मीनेही व्यक्त केली आहे.

राज्य नाट्यस्पर्धेसाठी इतक्या एन्ट्री आल्या कोठून हा मोठा संशोधनाचा भाग आहे. यापैकी निम्म्या एन्ट्रीज व्हॅलिड धरल्या गेल्या, तर त्याचा पुढील नाट्यस्पर्धांवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. कारण जून-जुलै महिन्यात एन्ट्रीज येण्याची प्रोसेस सुरू होते. नोव्हेंबरपर्यंत स्पर्धा आटोपतात. त्यानंतर निकाल व इतर बाबींना काही महिने लागतात. आता २५० एन्ट्रीज आल्या असतील व त्यातील निम्म्या सादर करण्याची परवानगी देण्यात आली तर त्यासाठी जानेवारी उजाडण्याची चिन्हे आहेत. राज्य नाट्य स्पर्धेचे पारंपरिक रूपडे आमूलाग्र बदलून ही स्पर्धा अधिकाधिक प्रेक्षकाभिमुख करण्यासाठी सांस्कृतिक संचलनालयाने मध्यंतरी काही दणकेबाज निर्णय घेतले. राज्यनाट्य स्पर्धा म्हणजे केवळ उपचार असा प्रत्यय गेल्या काही वर्षांपासून येत असताना संचालनालयाने समन्वयकाला काही विशेष अधिकार दिले. स्पर्धेतील पारदर्शकता वाढावी यासाठी रंगकर्मींना गुणाची वर्गवारी समजण्याची पध्दत रूढ करण्यात आली. तिन्ही क्रमांकाच्या पारितोषिकांत भरघोस वाढही करण्यात आली. जुनी संहिता वापरण्याची परवानगी देण्यात आल्याने ज्येष्ठ रंगकर्मींचा सहभाग अचानक वाढून गेला. त्यांचे मार्गदशनही तरूण कलावंतांना मिळत आहे. स्पर्धा प्रेक्षकाभिमुख करताना नाटकाचे तिकिट विकण्यासाठी संस्थांना प्रोत्साहन दिले जात असल्याने नाट्यगृहात गर्दी तर होतेच; सोबतच तिकिटाचा परतावा वाढवून दिल्यामुळे संस्थाही भरभरून काम करताना दिसत आहे. या सर्वांचा फायदा व पारितोषिकाची वाढलेली रक्कम पाहून अनेक संस्थांनी एन्ट्रीज दिल्याची शक्यता नाकारता येत नाही.

डमी एन्ट्रीजलाही तितकाच वेळ

स्पर्धेसाठी २५० एन्ट्रीज आल्या असल्याने त्यांची छाननी करणे, वेगवेगळी कागदपत्रे जोडणी करणे, अर्ज तपासून फाईल तयार करणे यासाठी तितकाच वेळ लागणार आहे. सगळे अर्ज तपासणे हे सांस्कृतिक संचलनालयाच्या नाट्य विभागाला भलतेच जड जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images