Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

इटलीच्या दाम्पत्याला मिळाली आयुष्यभराची ‘सखी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंटरनेटच्या माध्यमातून पूर्ण झालेली अपत्याची इच्छा.. नवं नातं जोडण्याची उत्सुकता अन् मातृत्त्व-पितृत्त्वाचे सुख मिळणार म्हणून तरळलेले आनंदाश्रू.. सोमवारी घारपुरे घाटावरील आधाराश्रमात हे चित्र पहायला मिळाले.

अँड्रिनो सोफेन्टिनी आणि बिआन्का मारिया सिल्वानी अपत्याच्या ओढीने इटलीतील मिलान या शहरातून नाशिकला आले आहेत. येथील 'सखी' या दीड-पावने दोन वर्षाच्या मुलीला त्यांनी दत्तक घेतले. जन्मतः ओठ व टाळू चिकटलेल्या सखीला संपन्न पालक मिळाले, याचा आनंद आधाराश्रमातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता.

सखी जेव्हा आधाराश्रमात दाखल झाली, तेव्हा ती केवळ १० दिवसांची होती. तिचे ओठ व टाळू एकमेकांना चिकटलेले होते. ते विलग करण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. ती सहा-सात महिन्याची झाल्यावर तिचं नाव व फोटो सेंट्रल अॅडोप्शन रिसोर्स ऑथिरिटी (सीएआरए, कारा) या केंद्र सरकारच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आले. यामार्फत अँड्रिनो आणि बिआन्का यांनी सखीची निवड केली, अशी माहिती आधाराश्रमाचे सचिव प्रभाकर केळकर यांनी यावेळी दिली.

सन २०१४ सालापासून परदेशात गेलेलं सखी ही पाचवे मुलं आहे. यापूर्वी दोन मुले स्पेनला, एक इटलीला व एक रोम येथे गेले आहे. अजून ६० बालके दत्तक जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यापैकी दोन बालकेही लवकरच परदेशात प्रस्थान करणार आहेत. मंगळवारी सकाळी १०:३० वाजता या इटालियन दाम्‍पत्याला सखीचे पालकत्त्व जनकल्याण रक्तपेढीचे अध्यक्ष डॉ. रमेश मंत्री व सेक्रेटरी दिलीप कुलकर्णी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात येणार आहे.

सखीचे नाव बदलणार का?, असा प्रश्न बिआन्का यांना विचारल्यावर 'सखी हेच नाव कायम ठेवून त्यालाच आमच्या संस्कृतीप्रमाणे एखादे नाव जोडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सखीला भेटून खूप आनंद झाला. इंटरनेटवरून तिला पाहिले होते. प्रत्यक्षात तिला पाहून भेटण्याचा आनंद आमच्यासाठी अवर्णनीय आहे.

- बिआन्का मारिया सिल्वानी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाविकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

मालधक्क्यावर उन्हात उभे राहिल्यामुळे व श्वसनाचा त्रास झाल्याने परराज्यातील सुमारे साठ वर्षांचा भाविक कोसळला. गर्दीतून त्याला आणणेही पोलिसांना कठीण गेले. रेल्वे मेडिकेल व्हॅनमध्ये प्राथमिक उपचारानंतर त्याला बिटकोमध्ये व नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी त्याचे निधन झाल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीचे आज जेलभरो

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज (दि. १५) जिल्ह्यात जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहरासह तालुकावार जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार जयवंत जाधव व जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी दिली.

राज्यात भयावह दुष्काळाची परिस्थिती आहे. मात्र, सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उदासीन असून, सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी दि. १४ सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये जेलभरो आंदोलन करण्यात आले. मात्र, नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा असल्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नाशिक शहरासह जिल्हाभरात विविध ठिकाणी १४ सप्टेंबर ऐवजी दि.१५ सप्टेंबर रोजी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. या जेलभरो आंदोलनात सर्व नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी हे सहभागी होणार आहेत. शेतकरी तसेच शेतमजूर यांनी देखील उपस्थित रहावे, असे आवाहन जाधव व अॅड. पगार यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्यांनीही साधली पर्वणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यात गर्दीचा आणि नागरिकांच्या दुर्लक्षाचा फायदा घेऊन चोरट्यांनीही हात साफ केला. रामकुंड, घाट परिसर आणि शहरातील अन्य परिसरात एकाच दिवसात चोरीच्या १४ घटना घडल्या. त्यामध्ये चोरट्यांच्या हाती लाखो रुपयांचा ऐवज लागला. पोलिसांनीही १६ चोर पकडले आहेत.

पंचवटी पोलिस स्टेशनच्या हद्दीत चोऱ्यांचे १० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चोरट्यांनी मुख्यत: सोन्याचे दागिने, मोबाइल्स आणि रोख रक्कम लांबविल्याच्या तक्रारी आहेत. विशेष म्हणजे चोरीचे हे सर्व गुन्हे रामकुंड परिसरात घडले. तब्बल सव्वासात ते साडेसात लाखांचा ऐवज या सर्व घटनांमध्ये चोरीस गेला आहे. याखेरीज बसद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा खिसाही चोरट्यांनी रिकामा केल्याचे गुन्हे शहरातील पोलिस स्टेशन्समध्ये दाखल करण्यात आले आहेत. तपोवन येथील ऋषी हिमाचल आखाड्यात दुपारी एक ते अडीचच्या सुमारास चोरट्याने मोबाइल आणि रोकड असा पावणेदोन लाखांचा ऐवज चोरल्याचा गुन्हा आडगाव पोलिसांनी दाखल केला आहे. जयशंकर लॉन्ससमोर उभ्या इनोवा गाडीची काच फोडून चोरट्याने २० हजार रुपयांची रोकड चोरून नेली.

१६ चोर पकडले

बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी १६ चोर पकडल्याचा दावा केला आहे. गुन्हे शाखा, स्थानिक पोलिस स्टेशन्सचे कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी हे चोर पकडल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसेची निवडणुकीतून माघार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

निवडणुका लढवणे दिवसेंदिवस महाग होत चालले आहे. एका एका मताला दहा हजाराचा भाव फुटत आहे. त्यामुळे एका मताला दहा हजाराचा खर्च करण्याची आपली ऐपत नसल्याने आपण कोल्हापूर महापालिका निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली.

नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी सोमवारी दुष्काळाच्या प्रश्नांवर नाशिक जिल्ह्यातील तज्ञ शेतकऱ्यांशी राजगडावर चर्चा केली. यावेळी सहकार क्षेत्रात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा शेतकऱ्यांनी उपस्थित केला. मतदाराची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी मतांचा भाव सांगितला. त्यावर ठाकरेंनीही निवडणुका लढवणे दिवसेंदिवस महाग होत चालले आहे. एका एका मताला दहा हजाराचा भाव फुटत आहे. निवडणुका केवळ पैशांवरच खेळल्या जात आहेत. त्यामुळे एका मताला दहा हजाराचा खर्च करण्याची आपली ऐपत नसल्याने आपण कोल्हापूर महापालिका निवडणुकीतून माघार घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दुष्काळाच्या प्रश्नावर आपण निर्णायक आंदोलन करणार असल्याचे सांगत आपण कोणतेही आंदोलन तडीस नेत असल्याचा दावा राज ठाकरे यांनी यावेळी केला.

मनसे - स्वाभिमानी साथ साथ!

महायुतीतील घटक पक्ष असलेल्या खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी राज ठाकरेंसोबत चर्चा केली. भाजपसोबत असताना ठाकरेंसोबत चर्चा का असा प्रश्न माध्यमांनी केल्यानंतर, जो पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहील, त्याच्या सोबत आम्ही असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला. राज ठाकरेंनी पुढाकार घेतला तर त्यांच्यासोबत राहू असे सांगत भाजपने शेतकऱ्यांचा भ्रमनिराश केल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजने सुनावले; शेतकऱ्यांनी ऐकवले!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

शहरी पक्ष अशी ओळख असलेल्या मनसेची ओळख बदलण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सरसावले असून, राज्यातील दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नांत त्यांनी उडी घेतली आहे. नाशिक दौऱ्यात ठाकरेंनी सोमवारी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भेट घेत विविध प्रश्नांवर त्यांच्याशी चर्चा केली. दुष्काळ लादणारे आणि भ्रष्टाचारीच पुन्हा पुन्हा निवडून कसे येतात, असा सवाल करीत शेतकरी मेळाव्यात येणारे शेतकरी दुष्काळात एकत्र रस्त्यावर का येत नाहीत, असा प्रश्न ठाकरेंनी केला. शेतकऱ्यांनी दुहेरी भूमिका वठवणे बंद केले पाहिजे, असे खडेबोलही ठाकरेंनी सुनावले. तर, साहेब सगळ्या यंत्रणा आम्हाला लुटणाऱ्या असून, तुमची युवा ताकद आमच्या पाठीशी उभी करा, असे आर्जव शेतकऱ्यांनी केले.

राज ठाकरेंनी सोमवारी जिल्ह्यातील दुष्काळाच्या व्यथा राजगडवर शेतकऱ्यांना बोलावून जाणून घेतल्या. विशेषतः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांनी ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत ठाकरेंसमोर शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. शरद पवार, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी एवढे वर्ष आमचा वापर केला. आमच्या परिस्थितीचा फायदा घेतला. पिकांना हमीभाव दिला नाही. दिल्लीत अरविंद केजरीवाल रेशनमधून कांद्याची विक्री करू शकतात मग, राज्यातील नेते असे का करीत नाहीत असा सवाल शेतकऱ्यांनी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण होते. मात्र, त्यांचे प्रश्न सोडवण्याची इच्छाशक्तीच नाही. सहकाराचा बट्ट्याबोळ राजकारण्यांनी केला आहे. राज्यातील केवळ दोनशे कुटुंबाच्या हातात सहकार एकवटला आहे. मनसे वगळता सर्व पक्षांनी साखर कारखाने वाटून घेतले आहेत. मतदारांना आमिष दाखवून निवडणुका जिंकल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचे भले कधीच होत नाही. सगळयाच यंत्रणा शेतकऱ्यांना लुटणाऱ्या आहेत. बाजार समितीत शेतकऱ्यांनाच लुटले जाते. सहकारी बँकाचे वाटोळे केले गेले. त्यांच्या खऱ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न कोणीच करत नाही, अशा व्यथा शेतकऱ्यांनी माडल्या. त्यांना कर्जमाफीऐवजी पायाभूत सुविधांची गरज असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

यावेळी राज ठाकरेंनी शेतकऱ्यांनाही सुनावले. ज्यांनी पंधरा वर्षे सत्ता उपभोगली तेच आता रस्त्यावर उतरत आहेत. ते आंदोलन करताना शेतकरी गप्प कसे असा सवाल करीत शेतकरी मेळाव्याला मोठ्या संख्येने येणारे शेतकरी दुष्काळावर एकत्र का येत नाहीत, असा सवाल करीत शेतकऱ्यांनी दुहेरी भूमिका वठवणे बंद करावे, असे खडेबोल सुनावले. जे राजकारण करतात, दुष्काळ लादतात तरीही तेच कसे निवडून येतात, असा सवाल त्यांनी यावेळी शेतकऱ्यांनाच केला. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

तरूण पाठीशी उभे करा

राज ठाकरेंनी आपली ताकद ग्रामीण भागात उभी करावी, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली. मुंबई व बड्या शहरात तुमची ताकद असल्याने शेतकऱ्यांना फायदा होईल. आम्ही आता थकलो आहोत. तुमच्याकडे युवा ताकद आहे. आम्ही ट्रॅक्टरला आडवे गेले तर घाबरतो. परंतु, तुमचा युवक याच ट्रॅक्टर समोर उभा राहिला तर ड्रायव्हर पळून जातो असे सांगत तुमच्या युवकांची ताकद असून ती आमच्या पाठीशी उभे करा, असे आर्जव त्यांनी केले.

शेतकऱ्यांनी दिला चाबूक

या बैठकीत सिन्नरच्या शरद शिंदे पाटील या शेतकऱ्याने ठाकरेंना चाबूक भेट दिला. बैलांनी काम करावे यासाठी शेतकरी या चाबूकचा उपयोग करतो. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर ठाकरेंनी हा चाबूक चालवावा म्हणून हा चाबूक आम्ही ठाकरेंना दिल्याचे पाटील यांनी सांगितले. ठाकरे शैलीत हा चाबूक चालवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा आपण व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.

भुजबळांनी आमचा कारखाना लुटला

सर्वांनीच आम्हाला लुटले, आता तुम्हीच आमची मदत करा, आमच्यासाठी आंदोलन करा अशी विनंती शेतकऱ्यांनी केली. त्यावर माझ्या आंदोलनाची स्टाईल तुम्हाला माहीत आहे का, असा सवाल त्यांनी शेतकऱ्यांना केला. तेव्हा शेतकऱ्यांनी आम्हाला तुमची स्टाईल मान्य असल्याचे सांगून तुमची जिज्ञासा पाहूनच आम्ही भेटायला आल्याचे त्यांनी सांगितले.

माझी स्टाईल माहीत आहे का?

माजी मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यातील गिरणा साखर कारखाना कसा लुटला याची कहानीच विषद केली. तीनशे एकर जमीन असलेला साखर कारखाना केवळ सत्तावीस कोटीत घेतला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे आमची मदत करा, अशी मागणी शेतक-यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांचे पुण्यसंचय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ हा पुण्यसंचयाचा सोहळा असून पोलिसांनीही आपल्या जबाबदारीच्या पलिकडे जाऊन वृध्द तसेच अपंग बांधवांनी स्नान घडवून आणण्यासाठी खारीचा वाटा उचलला. पोलिसांनी मिनी बसेसच्या माध्यमातून पुरविलेल्या या सेवाकार्याचा तब्बल २० हजार भाविकांनी लाभ घेतला.

पोलिसांनी बॅरिकेडिंग शिथील करून शहरातील वाहतूक बऱ्यापैकी मोकळी ठेवली होती. 'नो व्हेईकल झोन' वगळता अन्य प्रत्येक ठिकाणी मोटरसायकली, रिक्षा यांना प्रवेश दिला जात होता. इदगाह मैदान, डोंगरे वस्तीगृहापर्यंत राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सेवा पुरविली जात होती. मात्र, याखेरीज अन्य अडमार्गाला असलेल्या भागांत अपंग तसेच वृध्द नागरिकांना जाता यावे यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला. या बांधवांना पर्वणी काळात स्नानाचा आनंद लुटता यावा यासाठी पोलिसांनी २८ मिनी बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. प्रत्येक भाविक मार्गावर चार बसेस ठेवण्यात आल्या होत्या. या बसेसद्वारे त्यांनी अपंग, अंध आणि वृध्द बांधवांची वाहतूक केली. त्यांना घाटांच्या शक्य तेवढ्या जवळ सोडण्यात आले.

बेपत्ता पाच ज्येष्ठांची वृध्दाश्रमात रवानगी

रामकुंड आणि परिसरात दोन दिवसांत ८०० हून अधिक व्यक्ती बेपत्ता झाल्या. अशा व्यक्ती आणि त्यांचे नातलगही पोलिसांशी संपर्क साधत. रामकुंड आणि कपालेश्वर पोलिस चौकी येथे असे लोक येऊन थांबत. त्याची उदघोषणा ध्वनीक्षेपकाद्वारे केली जात असे. त्यामुळे बहुतांश बेपत्ता व्यक्तींना त्यांच्या नातलगांपर्यंत पोचविण्यात यश आल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु, पाच वृध्द व्यक्तींची ओळख पटूनही त्यांचे नातलग अद्याप सापडू शकलेले नाहीत. या वृध्दांना पंचवटीतील वृध्दाश्रमात दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यांचा नातेवाईकांचा शोध न लागल्यास त्यांना त्यांच्या गावी पोहोचविण्याची व्यवस्था पोलिस करणार आहेत. रॉय नावाचा कॅनेडियन नागरिक त्र्यंबकेश्वरमध्ये हरविला होता. त्याच्या मुलाशी संपर्क साधून पोलिसांनी त्याला शोधून दिले.

एसटीच्या १६ हजार बसफेऱ्या

प्रवाशी वाहतूकी संदर्भात राज्य मार्ग परिवहन महामंडळाने उत्तम नियोजन केल्याने पोलिसांनाही मोठी मदत झाल्याचे सांगून पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची पाठ थोपटली आहे. एसटीने १६ हजार ६३ फेऱ्यांद्वारे लाखो भाविकांची सुरक्षित वाहतूक केल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

बुडणाऱ्या मुलाचे वाचविले प्राण

गौरी पटांगणालगतच्या नदीपात्रात उतरलेला एक १० वर्षांचा मुलगा पाण्यात बुडू लागला. तेथे ड्युटीवर असलेल्या तिरुपती मुंडे या पोलिसाने क्षणाचाही विलंब न लावता त्याला बाहेर काढले. त्यामुळे या मुलाचे प्राण वाचू शकले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चालीहा व्रताची देवळालीत सांगता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

सिंधी बांधवांच्या पूज्य चालीहा साहिब जो मेलो (श्रावणव्रत) पूज्य बहिराणाची (ज्योती) शहरातून सिंधी शहनाईच्या सुरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. सिंधी समाजबांधवांनी दारणा नदीकाठी विधिवत अक्खा पूजन करून सांगता केली.

सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत झुलेलाल मंदिरात विधिवत पूजा व भजन, कीर्तनादी कार्यक्रम पार पडल्यानंतर दुपारी चारच्या सुमारास शहरातील हौसन रोड मार्गे निघालेल्या या जुलूस मिरवणुकीत शहरातील सर्वच सिंधी बांधवांनी सहभाग घेत शहनाईच्या सुरात नृत्यही केले यावेळी सहभागी भाविकांना नगरसेवक भगवान कटारिया सतीश कॉम्पलेक्स येथे चना-पाव प्रसादाचे वाटप तर रवी सोसायटीच्या सिंधी बांधवांनी सिलेक्शन कॉर्नर येथे गुलाबी दूध रसबत वाटप करण्यात आले. सनईच्या सुरत निघालेली मिरवणूक आनंद रोड मार्गे संसरी लेन, रेल्वे गेट येथून संसरी गावच्या नदीतटावर पोहचली. महिलांनी डोक्यावर कलश घेतल्याचे दिसून आले. पुजारी घनशाम महाराज शर्मा यांनी अख्खापूजन, पल्लव, झुलेलाल भगवान यांची आरती आदी धार्मिक विधी पार पाडले. त्यानंतर या कलश आणि बहिराणा ज्योतीची दारणा नदीपात्रात 'झुलेलाल भगवान की जय'च्या नामघोषात परवान (विसर्जित) करण्यात आली. तेथेच गेल्या ४० दिवस गळ्यात घातलेल्या जान्हवे व व हाती असलेले रक्षासूत्र काढून व्रत समाप्ती करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुष्काळग्रस्त शेतकरी पाल्यांना मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको

पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र दुष्काळाच्या कचाट्यात सापडला आहे. या पार्श्वभूमिवर आरोग्य विज्ञान विद्यापीठाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दहा कोटी रुपयांची मदत दिली जाणार अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी सिडकोतील अशोका इन्स्टिट्यूट हेल्थ सेंटर येथे दिली.

डॉ. जामकर म्हणाले, की दुष्काळामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना मदत करण्यासाठी विद्यापीठाची सामाजिक जबाबदारी स्वीकारण्याचा मानस केला आहे. यात महाराष्ट्रातील वेगवेळगळ्या मेडिकल कॉलेजेसना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आवाहन केले आहे. यात मोठ्या कॉलेजांकडून पाच लाख, छोट्या व मध्यम मेडिकल कॉलेजेसकडून दोन ते तीन लाख रुपये व नर्सिंग कॉलेजेसकडून एक लाख रुपयांची देणगी देण्याचे आवाहन केले आहे. यात महाराष्ट्रातून तब्बल दहा कोटी रुपये निधी संकलन करण्याचे उद्दिष्ट ठरविल्याचे डॉ. जामकर म्हणाले. निधी संकलित करण्यात आल्यानंतर तो दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना देण्यात येणार आहे. यामध्ये महिन्याला दोन हजार रुपये प्रत्येकी दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना एक वर्षापर्यंत दिले जाणार असून शैक्षणिक फी देखील माफ केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी अशोक बिल्डकॉनचे अशोक कटारिया व शिक्षक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको/सातपूर

दरवर्षी सर्वत्र धुमधडाक्यात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवावर यंदा दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांसह सर्वच जण हवालदिल झाले आहेत. सिडको व सातपूरमध्ये झगमगाटात साजरा होणारा गणेशोत्सव यंदा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय अनेक मोठ्या मंडळांनी घेतला आहे. कुठलाही झगमगाट न करता उरलेला पैसा दुष्काळग्रस्तांना दिला जाणार आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर सिडको व सातपूरच्या पोलिस ठाण्यात नुकत्याच झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत पोलिसांनी देखील दुष्काळाची तीव्रता बघता मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले होते. गणेश मंडळांनी देखील दुष्काळात शेतकऱ्यांचे हाल लक्षात घेऊन कमी खर्चात उत्सव साजरा करण्याचे आणि उर्वरित पैसे दुष्काळग्रस्तांना देण्याचे जाहीर केले आहे.

दुष्काळग्रस्तांना मदत

पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी सर्व राजकीय पक्षांनी दुष्काळ ग्रस्तांना मदतीचे आवाहन केले आहे. सिडकोतील नगरसेवक माजी विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांनी त्यांच्या शिव समर्थ कला व क्रिडा मंडळाच्या वतीने घेण्यात येणारे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करून ५१ हजारांची मदत दुष्काळग्रस्तांना देण्याचे जाहीर केले आहे.

यंदा निम्म्याच गणेश मंडळांची नोंद

सिडको आणि सातपूर परिसरात दरवर्षी मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होतो. यात सिडको, सातपूरला प्रत्येकी किमान शंभर मंडळांची पोलिस ठाण्यात नोंदणी होते. परंतु, दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवात सिडकोमध्ये केवळ २५ तर सातपूरला ३० मंडळांनी नोंदणी केली आहे. यामुळे गेल्या वर्षीपेक्षा निम्मेच गणेश मंडळे उत्सव साजरा करणार असल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांसाठी ‘राष्ट्रवादी’ रस्त्यावर

$
0
0

टीम मटा

राज्यभरातील दुष्काळी परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि राज्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करावी या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाभरात जेलभरो आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाभरात रास्तारोको आंदोलन करून केंद्र व राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून सुटका केली. नाशिक शहरासह जिल्हाभरात सुमारे ४५ हजारापेक्षा जास्त कार्यकर्त्यांना जेलभरो आंदोलनामध्ये अटक करण्यात आली.

मालेगावला रास्तारोको

मालेगाव तालुक्यात दाभाडी येथे सुनील कबाडे, तालुकाध्यक्ष गुलाब चव्हाण, राजेंद्र भोसले, अरुण देवरे यांच्या नेतृत्वाखाली जेलभरो आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील दाभाडी येथील प्रवेश द्वाराजवळ रास्तारोको करून आंदोलन करण्यात आले. दोन तास रास्तारोको केल्यानंतर आंदोलकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. या आंदोलनात किशोर इंगळे, आर. के. बच्छाव, काशिनाथ पवार, धर्मा पवार, आनंदसिंग ठोके, भरत आखाडे, बाळासाहेब बागुल, अशोक पवार, दौलत पवार, अशोक सूर्यवंशी आदींसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कळवणला जेलभरो

कळवण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, मविप्र संचालक रवींद्र देवरे, पक्ष निरीक्षक डॉ. योगेश गोसावी, कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, ज्येष्ठ नेते नारायण हिरे, कळवण पंचायत समितीचे माजी सभापती कौतिक पगार, तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, पंचायत समितीच्या सभापती संगीता ठाकरे, उपसभापती संजय पवार, प्रवीण रौंदळ, जितेंद्र पगार यांच्या नेतृत्वाखाली कळवण बसस्थानकाजवळ जेलभरो आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करून कळवणला दुष्काळी जाहीर करावे, प्रत्येक गावाची आणेवारी ५० पैशांच्या आत लावावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देवरे यांनी केली.

दिंडोरीत घोषणाबाजी

संपूर्ण कर्जमाफीसह तत्काळ दुष्काळी उपाययोजना कराव्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कादवाचे अध्यक्ष तथा साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे यांनी दिला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी श्रीराम शेटे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक-कळवण मार्गावर सुमारे दीड तास रास्तारोको करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर सुमारे आठशेहून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून सुटका केली.

कृऊबाचे सभापती दत्तात्रय पाटील, जि. प. उपाध्यक्ष प्रकाश वडजे, दिंडोरी रायुकाँ तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, विश्वासराव देशमुख, आनंद चौधरी, शोभा मगर, शेतकरी नेते भास्कर गोडसे, रघुनाथ पाटील आदींनी आंदोलकाना मार्गदर्शन केले.

बागलाणमध्ये आंदोलन

बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तालुक्यातील सटाणा, वीरगाव, ताहाराबाद व नामपूर येथे रास्ताराको आंदोलनासह जेलभरो आंदोलन छेडण्यात आले. जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार व बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सटाणा येथील शिवाजी पुतळ्याजवळ तब्बल दोन तास रास्ताराको व जेलभरोल आंदोलन छेडण्यात आले. पोलिस निरीक्षक पी. टी. पाटील यांनी यावेळी आंदोलकांना ताब्यात घेतले.

ताहाराबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे यांच्या नेतृत्वाखाली तर नामपूर येथे माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली, जायखेडा येथ जि. प. सदस्य यतीन पगार यांच्या नेतृत्वाखाली तर वीरगाव येथै पंचायत समितीचे उपसभापती वसंत भामरे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजेच्या सुमारास येथील शिवाजी पुतळ्याजवळ रायुकाँचे पदाधिकारी, शेतकरी आपल्या बैलजोड्यांसह जनावरे घेऊन मोर्चाच्या ठिकाणी दाखल झाले. विंचूर-शहादा-प्रकाशा राज्य महामार्ग बंद पाडण्यात आल्यानंतर या ठिकाणी सभा घेण्यात आली. यावेळी आमदार दीपिका चव्हाण, जि. प. सदस्य शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी नगराध्यक्ष विजय वाघ, पांडूरंग सोनवणे, किरण पाटील यांची भाषणे झाली.

सिन्नरमध्ये निषेध

नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर बसस्थानकासमोर माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सिन्नर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करा, जनावरांना मोफत चारा द्या, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा, मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करा, अशा घोषणा देत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत अटक केली. पोलिस ठाण्यात नेल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल, राजाराम मुरकुटे, संजय काकड, अर्जुन बोडके, डॉ. विष्णू अत्रे, राजेंद्र भगत, संध्या भगत, राजेंद्र बलक, डॉ. संदीप लोंढे, संतू पाटील, कल्पना रेवगडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

इगतपुरीत अटक

इगतपुरी तालुक्यात तालुकाध्यक्ष गोरख बोडके व इगतपुरी शहराध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत रास्ताराको व जेलभरो आंदोलनाला प्रारंभ झाला. सचिन पिंगळे, गोरख बोडके, प्रल्हाद जाधव, पांडूरंग वारुंगसे, सुनील वाजे, ज्ञानेश्वर फोकने, हिरामण कौटे, उत्तम सहाने, उमेश खातळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होत. जुना मुंबई-आग्रा महामार्गावर सुमारे दोन तास जाम झाला होता. पोलिसांनी सर्व आंदोलकांना अटक करून दोन तासांनी सोडून दिले.

येवल्यात वाहतूक कोंडी

अॅड. माणिकराव शिंदे, बाजार समितीच्या सभापती उषा शिंदे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, राधाकिसन सोनवणे, हुसेन शेख, संतू झांबरे, जि. प. सदस्य प्रवीण गायकवाड, प्रकाश वाघ, बाबा थेटे, हारिभाऊ जगताप, बाळासाहेब लोखंडे, दत्तात्रय वैद्य, राजू पवार आदींनी आंदोलनात भाग घेतला. सुमारे एक तास सुरू असलेल्या आंदोलनामुळे मनमाड-नगर राज्य तसेच नाशिक-औरंगाबाद या दोन राज्य महामार्गावरील येवला चौफुलीवरील चारही बाजूकडील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती.

या आहेत मागण्या

पीककर्ज व वीजबिले माफ करावीत, सर्व वसुल्या थांबवाव्यात, जनावरांच्या छावण्या सुरू करून चारा, पाणी व पशुखाद्य पुरवावे, दुष्काळी भागातील जनतेला तातडीने पिण्याचे पाणी पुरवून टँकरची संख्या व खेपा वाढवाव्यात, दुष्काळी भागातील जनतेला अन्नसुरक्षा योजनेत सहभागी करून प्रती किली २/३ रुपये दराने गहू, ज्वारी, तांदूळ त्याचप्रमाणे तुरडाळ या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात यावा, शेतावर रोजगार हमी योजना राबवून उत्पादक स्वरुपाची तसेच जास्तीत जास्त जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी, अशा विविध मागण्या आंदोलकांनी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुसळगाव येथील प्रेमी युगुलाची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर-घोटी मार्गावरील हॉटेल राजेपार्क येथील लॉजमध्ये प्रेमी युगुल मृतावस्थेत आढळून आले. मुलीचा गळा आवळून खून केल्यानंतर त्या तरुणाने गळ्याला फास घेऊन आत्महत्त्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सिन्नर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप रामदास जोंधळे (वय २०,रा. मुसळगाव ) व निशा अरुण माळी (वय १९ रा. मुसळगाव) अशी मृतांची नावे आहेत. सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सिन्नर-घोटी मार्गावरील हॉटेल राजेपार्क येथे त्यांनी रूम नंबर १०३ बुक केली होती. संध्याकाळपर्यंत रूम न उघडल्याने रूमबॉयने दरवाजा वाजवला असता आतून कुठलाही प्रतिसाद आला नाही. यामुळे हॉटेलचालकास संशय आला. दरवाजा ठोठावूनही आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने सदर घटनेची माहिती सिन्नर पोलिसांना देण्यात आली. रात्री आठ वाजता पोलिस घटनास्थळी पोहचले. दरवाजा तोडून रूममध्ये प्रवेश केला असता दोघेही मृतावस्थेत आढळून आले.

मुलीचा गळा आवळून खून केला असल्याचे आढळून आले, तर त्या तरुणाने गळफास घेऊन फाशी घेतल्याचे प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सदर मुलगी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिकत असल्याचे समजते. दोघेही मुसळगाव येथे शेजारी राहत होते. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेमुळे मुसळगाव गावावर शोककळा पसरली आहे. सिन्नर पोलिस पुढील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धर्माचार्य बहिष्कृत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आनंद आखाड्याचे धर्माचार्य त्याच आखाड्याच्या रमता पंचाने बहिष्कृत केले आहेत. आखाड्यांनी धर्माचार्य करण्याच्या प्रकाराने सर्वत्र ऊलटसुलट चर्चा होत असताना त्र्यंबक येथे आखाड्याच्या रमता पंच यांनीच यावर आक्षेप घेतला आहे. शिवानी दुर्गा, इंद्रदेव, सोमेश्वरानंद ‌हे आंनद आखाड्याचे धर्माचार्य नसून, ते गुरुकुल संस्थेचे धर्माचार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

तपोनिधी श्री आनंद आखाडा पंचायती यांच्या रमता पंचाने पत्रक प्रसिध्दीस दिले आहे. आनंद आखाड्याच्या नावाने स्वामी सागरानंद सरस्वती, स्वामी शंकरानंद सरस्वती यांनी इंद्रदेव महाराज, सोमेश्वरानंद सरस्वती, साध्वी शिवानी दुर्गा आणि अन्य काहींना धर्माचार्य केले असल्याचे रमता पंच यांना समजले आहे. प्रत्यक्षात या पंच मंडळींना याबाबत माहिती दिलेली नाही. तसेच, याबाबत त्यांनी विचारणा केली असता स्वामी सागरानंद महाराज आणि स्वामी शंकरानंद महाराज यांनी आपण हे धर्माचार्य आनंद आखाड्याचे नसून ते गुरूकुल या संस्थेचे आहे, असे सांगितले. त्यामुळे श्री तपोनिधी आनंद आखाड्याने इंद्रदेव महाराज, सोमेश्वरानंद महाराज आणि साध्वी शिवानी दुर्गा यांना बहिष्कृत करीत असल्याचे जाहीर केले आहे. या पत्रकावर रमता पंच म्हणून महंत कालुगिरी महाराज, महंत धनराजगिरी महाराज, महंत लक्ष्मणभारती, महंत कैलाशपुरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

आखाड्यांनी धर्माचार्य घोषित करण्याबाबत या कुंभमेळ्यात सातत्याने चर्चा घडत आहेत. इंद्रदेव यांच्या धर्माचार्या प्रकरणावरून शैव-वैष्णव वाद पुन्हा उफाळतो काय, अशी परिस्थती निर्माण झाली होती. अखेर त्र्यंबक येथे त्यांना धर्माचार्य करण्याचा सोहळा संपन्न झाला. आता त्यांना आनंद आखाड्याच्या पंचांनीच बहिष्कृत केले आहे. त्याचप्रमाणे साध्वी शिवानी दुर्गा आणि रामशक्तीपीठाचे सोमेश्वरानंद यांच्या धर्माचार्य पदवीबद्दल देखील आक्षेप घेत ते आनंद आखाड्याचे धर्माचार्य नाही असे जाहीर केल्याने यापुढे धर्माचार्य म्हणून ते केवळ स्वामी सागरानंद गुरूकुल संस्थेचे नाव लावणार काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनवासी बांधवांचे तीर्थस्नान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जातीपातीचे बंध तोडून अखिल हिंदू एक व्हावा, समरसता प्रस्थापित व्हावी तसेच, धर्मावरील लोकश्रध्दा अधिक दृढ व्हावी या व्यापक उद्देशाने सिंहस्थ पर्वकाळाच्या निमित्ताने नाशिक क्षेत्री कपिला-गोदा संगमावर तीर्थस्नानाचे आयोजन केले होते. यावेळी जगद्गुरू वल्लभाचार्य यांच्या हस्ते प्रमुख तीर्थपूजन व स्नान झाल्यानंतर उपस्थित असंख्य हिंदू वनवासी बांधवानी या तीर्थात स्नान केले.

पंचवटीतील हिरे महाविद्यालयात भव्य मंडपात या वनवासी बांधवाचे एकत्रिकरण अखिल भारतीय धर्मजागरण विभागाने आयोजित केले आहे. प्रामुख्याने गेल्या दशकात हिंदू धर्म सोडून अन्य धर्मांत गेलेल्या वनवासी बांधवाना घरवापसी कार्यक्रम करून सन्मानाने पुन्हा हिंदू धर्मात आणण्याचे धर्म जागरण विभागाचे माध्यमातून केलेले आहे. अशा घरवापसी झालेल्या वनवासी बंधू, भगिनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिक क्षेत्री एकत्र झाले आहेत.

मंगळवारी सकाळी ९ वाजता हे वनवासी बांधव मिरवणुकीने वाजत गाजत परमपूज्य जगदगुरु वल्लभाचार्य महाराज यांच्या समवेत पंचवटी महाविद्यालयातून तपोवन मार्गाने कपिला गोदा संगमाकडे गेले. मिरवणुकीत रामनामाचा गजर, भारत मातेचा जयजयकार करीत ही मिरवणूक मार्गस्थ होत होती. वाटेत अनेक ठिकाणी हुतात्मा शिरीष कुमार मर्दानी खेळ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दांडपट्ट्याचे मर्दानी खेळ संपन्न केले. लोकमान्य विद्यालयाचे विद्यार्थ्याचे लेझीम पथक व रामराज्य ढोल पथक मिरवणुकीचे आकर्षण होते.

यावेळी रा. स्व. संघाचे प्रांत संघचालक नाना जाधव, प्रांत कार्यवाह विनायकराव थोरात यांनीही वनवासी बांधवांसमवेत तीर्थस्नान केले. यावेळी अखिल भारतीय धर्म जागरण विभाग प्रमुख मुकुंदराव पणशीकर, अ. भा. धर्मजागरणसह प्रमुख राजेंद्र सिंह, क्षेत्रीय धर्मजागरण प्रमुख शरदराव ढोले, प्रांत धर्मजागरण प्रमुख हेमंतराव हरहरे उपस्थित होते. या बरोबरच जगदगुरू वल्लभाचार्य महाराज (सूरत), बालकदास महाराज (छत्तीसगड), दिव्यानंद महाराज (रांची), परमानंद महाराज (झारखंड), रामानुजाचार्य महाराज (उत्तर प्रदेश) हे उपस्थित होते. तसेच, खासदार हरिश्चंद्र चव्हाण व आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व हिंदू बांधव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तराखंड अजूनही सावरतेय पूर तडाख्यातून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उत्तराखंडमध्ये २०१३ मध्ये भयानक पूर तडाख्यानंतर राज्य उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहे. केदारनाथसह संपूर्ण राज्याला उभे राहण्यासाठी काही कालावधी खर्ची पडेल, असा दावा उत्तराखंड काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी मंत्री किशोर उपाध्याय यांनी केला. सिंहस्थ कुंभमेळ्यातील द्वितीय शाही स्नानासाठी उपाध्याय नाशिकमध्ये आले होते.

उत्तरखंड राज्य आर्थिकदृष्ट्या कोलमोडून पडले. पुराच्या तडाख्यानंतर अनेक छोटी-मोठी गावे, शहरे जमीनदोस्त झाली. नागरिकांना मदतीचा हात देताना संपूर्ण अर्थव्यवस्था उभे करणे हेच राज्य सरकारसमोरील प्राथमिक आव्हान होते. केदारनाथ यात्रेसाठी आता नागरिक येऊ लागले आहेत. एकीकडे हिमालय आणि दुसरीकडे गंगेचे पात्र, अशा बिकट परिस्थितीत राज्य सरकारने समाधानकारक सुविधा निर्माण केल्याचा दावा त्यांनी केला. उत्तरखंड राज्यासाठी भाजपाचे केंद्र सरकार हवी ती मदत करीत नसल्याचे उपाध्याय यांनी स्पष्ट केले. उपाध्याय यांनी रविवारी सकाळी कपिलासंगम येथे स्नानाचा आनंद घेतला. यानंतर यज्ञाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवून ते माघारी फिरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहा लाखांचा तेलसाठा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कालावधीत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे विशेष मोहीम राबविली असून, त्यात एकूण आठ लाखांचा तेलसाठा संशयावरून जप्त करण्यात आला आहे. तिसऱ्या पर्वणीपर्यंत ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे एफडीएने सांगितले.

नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा कालावधीत मोठ्या संख्येने भाविक, साधू-महंत व पर्यटक येतात. ही बाब लक्षात घेऊन एफडीएने सिंहस्थ काळात विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या तपासणीची मोहीम राबविली. दुसऱ्या शाही पर्वणीच्या दहा दिवस पूर्वीच खाद्यतेल उत्पादकांसह विविध आस्थापनांना भेटी दिल्या. तेथील खाद्य तेलाचे अन्ननमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले. तर, एकूण ८ लाख ७१ हजार ७०८ रुपये किंमतीचा तेलसाठी एफडीएने संशयावरून जप्त केल्याची माहिती सहआयुक्त योगेश बेंडकुळे यांनी दिली. तसेच, वनस्पतीचे तेलाचे दोन नमुने घेवून १ लाख ८७ हजार ८ रुपये किमतीचा साठा संशयावरून जप्त करण्यात आला आहे.

एफडीए आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी नाशिकला भेट देऊन दिलेल्या विविध निर्देशांनुसार, साधुग्रामधील साधू-महंत व भाविक यांना सुरक्षित दूध मिळावे यासाठी मोबाइल व्हॅनव्दारे जागेवरच दुधाचे नमुन्यांची तपासणी करण्यात आली. हे सर्व नमुने सुरक्षित व चांगल्या प्रतीचे आढळून आल्याचे एफडीएने सांगितले. तसेच, एफडीएने या तपासणीसाठी एकूण पाच पथके स्थापन केली आहेत. त्याशिवाय के. के. वाघ फूड टेक्नोलॉजी कॉलेज, पंचवटी हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, अॅम्ब्रो हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजच्या विद्यार्थ्यांचेही सहकार्य लाभत आहे. त्याद्वारेच एकूण ३८८ अन्न विक्री दुकाने, अन्न छत्रालये व आखाडे यांना भेटी देऊन सुरक्षित अन्न मिळण्याबाबत जनजागृती करण्यात आल्याचे बेंडकुळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निसाका, नासाका’वर जप्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

निफाड आणि नाशिक या दोन सहकारी कारखान्यांनी 'पीएफ'ची थकबाकी न भरल्याने भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या नाशिक विभागाने त्यांच्याविरोधात मंगळवारी जप्तीची कारवाई केली. यात कारखान्यांमधील मशिनरी सिल केल्याचे 'पीएफ'चे आयुक्त जगदीश तांबे यांनी सांगितले.

कंपनी किंवा आस्थापनात काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराचा 'पीएफ' मालकाने भरणे अनिवार्य आहे. परंतु, आस्थापना मालक कामगारांचे 'पीएफ' वेळच्या वेळी भरत नसल्याचे त्यांच्या कारवाई करावी लागत असल्याचे आयुक्त तांबे म्हणाले. याचाच एक भाग म्हणजे 'निसाका' व 'नासाका' यांनी अनेक महिन्यांपासूनचा कामगारांचा 'पीएफ' भरलेलाच नाही. त्यामुळे या दोन्ही कारखान्यांना चार महिन्यांपूर्वीच आयुक्त तांबे यांनी 'पीएफ'ची थकीत रक्कम भरण्याबाबत नोटीसा बजावल्या होत्या. परंतु, कारखान्यांकडून वसुलीची रक्कम भरली न गेल्याने मंगळवारी जप्तीची कारवाई करण्यात आली. 'निसाका'कडे ७५ लाख तर 'नासाका'कडे २८ लाख रुपयांची 'पीएफ' थकबाकी असल्याचेही तांबे यांनी सांगितले. 'पीएफ'च्या सहाय्यक आयुक्त उषा शोंदे यांच्यासह राजेंद्र शिरसाठ व मनोज कोळी यांनी जप्तीची कारवाई केली.

महापालिकाही रडारवर

'पीएफ'चे दस्तावेज सादर न केल्याने नाशिकसह अन्य दोन महापालिका, जिल्हा परिषद व नगरपरिषदांची बँक खाती सिल करण्याचे आदेश आयुक्त जगदीश तांबे यांनी दिले आहे. नाशिक विभागातील नाशिक, धुळे व जळगाव महापालिका तसेच नंदुरबार जिल्हा परिषद, चाळीसगांव व मनमाड नगरपालिकांच्या अधिकाऱ्यांनी दस्तावेज 'पीएफ' कार्यालयत सादर न केल्याने बँख खाते जप्ती करण्यात येणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याची तिसरी पर्वणी (दि. १८) आटोपल्यानंतर बँक खाते सील केले जाणार आहे. नाशिक महापालिकेने सन २०११ पासून दस्तावेज सादर केलेले नाहीत. चाळीसगाव नगरपालिकेचा ७५ लाखांचा तर मनमाड नगरपालिकेचा १४ लाख रुपयांचा 'पीएफ' हिशोबाचे दस्तावेज दाखविलेला नाही.

४०० आस्थापनांना नोटीसा

कामगारांचा हक्काचा 'पीएफ' आस्थापनांकडून लपविला जात असतो अथवा भरला जात नाही. ज्या आस्थापनांनी कामगारांचा 'पीएफ' भरलेला नाही अशा ४०० आस्थापनांना 'पीएफ' कार्यालयाने नोटीसा बजावल्या आहेत. संबंधित आस्थापनांनी तत्काळ 'पीएफ' जमा केला नाही तर पुढील काळात जप्तीची धडक कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त तांबे यांनी सांगितले. आस्थापनांकडून कामगारांचा 'पीएफ' भरण्यासाठी टाळाटाळ केली जाते. तसेच वेळेवर 'पीएफ' भरला नाही. त्यामुळे अशा आस्थापनांवर कारवाई करण्यासाठी 'पीएफ' तपासणीसाठी पथके तैनात केली जाणार असल्याचे आयुक्त तांबे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशाच्या स्थापनेला दिवसभराचा मुहूर्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यंदा गणेशचतुर्थी दिवसभर असल्याने ब्राह्ममुहूर्तापासून सूर्यास्तापर्यंत कोणत्याही वेळेत गणेशाच स्थापना करता येणार असून शक्यतो सकाळी अकरा वाजेच्या आत प्रतिष्ठापना व्हावी, असा संकेत रूढ आहे त्याप्रमाणे नियोजन करावे असे मत पौराहित्य करणाऱ्या गुरूजींनी व्यक्त केले.

गणपती स्थापनेबाबत गुरूजींनी सांगितल्यानुसार दहा दिवसांत आपल्या घरी ज्या श्रींची स्थापना करायची असते ती गणेशमूर्ती शाडूची ९ ते १० इंचच उंचीची असावी. तसेच ही गणेशमूर्ती निवडताना सुद्धा अथर्वशीर्षांत वर्णिलेल्या गणेशासारखीच असावी. यावेळेस पार्थिव गणपती पूजनाची व गणेशस्थापनेची श्रीगणेश चतुर्थी गुरूवार (दि. १७) आहे. ब्राह्म मुहूर्तापासून सूर्यास्तापर्यंत अर्थात पहाटे साडेचार वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत श्रींची प्राणप्रतिष्ठापना करावी.

घरच्या प्रमुख व्यक्तीने आदल्या दिवशीच गणेशमूर्ती आणावी. त्याकरिता घरातून निघतानाच एक तबक, गुलाल, जानवे व नवीन मोठा रुमाल घेऊनच निघावे. वर्णिल्याप्रमाणे गणेशमूर्ती घ्यावी. गणेशमूर्ती आवडली की प्रथम त्या मूर्तीवर थोडासा गुलाल उधळावा व 'मंगलमूर्ती मोरया' असा गजर करीत, आणलेल्या तबकात मूर्ती घ्यावी. जानवे शेजारी ठेवावे व त्यावर रुमाल झाकावा व आनंदाने 'श्रीं'सह घरी यावे.

'श्रीं'ची स्थापना करायची, त्या जागेवर थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर गणेशमूर्ती ठेवावी. श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी पहाटेच उठावे. स्नान उरकून अत्यंत शूचिर्भूत व्हावे. सोवळे, कद, नवीन धोतर नेसावे. कपाळी अष्टगंधाचा टिळा लावावा. घरच्या देवांची पूजा करावी.

त्यानंतर श्रींची प्राणप्रतिष्ठा करावी. घरी आलेल्या देवाला पंचामृत स्नान घालून त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. एकवीस दूर्वाच्या एकवीस जुडींचा हार गळ्यात घालावा. लाल रंगाच्या फुलांचा हार गळ्यात घालावा. मग गणेशाला पंचपक्वान्नांचा नैवेद्य व एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा. घरातील सर्वांनी मिळून भक्तिपूर्वक श्रींची आरती करावी. संपूर्ण दहा दिवस श्रींची नैवेद्यारती सकाळ-सायंकाळ करावी. जमले तर दररोज सकाळी अथर्वशीर्ष म्हणावे, असेही पुरोहितांनी सूचविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवाशी सहा लाख अन् उत्पन्न सहा कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ पर्वणीकाळातील दोन दिवसात राज्य मार्ग परिवहन महामंडळाने तब्बल सहा लाखांहून अधिक भाविकांची सुरक्षित वाहतूक केली. दि. १२ आणि १३ सप्टेंबर या कालावधीत तब्बल सहा कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पर्वणी काळात प्रवासी वाहतुकीची सर्व भिस्त एसटी बसेसवर होती. दुसऱ्या पर्वणीत तब्बल तीन हजार बसेस प्रवाशांच्या वाहतुकीसाठी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. मात्र तरीही महामंडळाच्या प्रवासी वाहतुक क्षमतेपैकी केवळ ५० टक्केच क्षमता वापरात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पर्वणीच्या दिवशी (१३ सप्टेंबर) एसटीने तब्बल १० हजार ३३४ फेऱ्या पूर्ण केल्या. पोलिसांनी बरेचसे रस्ते वाहतुकीसाठी खुले करून ‌दिल्याने महामंडळाला शहरातही बससेवा पुरविणे शक्य होऊ शकले. पर्वणीच्या या एक दोन दिवसात महामंडळाने केवळ शहरातील ७० हजार भाविकांची वाहतूक केली. त्यातून ३६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती प्रादेशिक व्यवस्थापक मिलिंद बंड यांनी दिली. गणेशोत्सवासाठी कोकणात बसेस सोडावयाच्या असल्याने १४ सप्टेंबर रोजी सर्व बसेस मुंबईसाठी सोडण्यात येणार होत्या. मात्र प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन १३ सप्टेंबरलाच बसेस सोडण्यात आल्या.

पहिल्या पर्वणीकाळात महामंडळाला केवळ दीड कोटींचे उत्पन्न मिळाले होते. दुसऱ्या पर्वणीत हे उत्पन्न सहा कोटींच्या पुढे पोहोचले आहे. तरीही त्यात १४ सप्टेंबर रोजीच्या उत्पन्नाचा समावेश नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पासेसला अल्प प्रतिसाद

पर्वणीकाळात महामंडळाने प्रवाशांसाठी एक दिवसांचे पासेस उपलब्ध करून दिले होते. मात्र पहिल्या पर्वणीपेक्षाही दुसऱ्या पर्वणीत या पासेसला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. प्रवाशांनी तिकिटे खरेदी करूनच प्रवासाला पसंती दिल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

वणीसाठी प्रवाशीच नाहीत

महामंडळाच्या बसेसने १२ सप्टेंबर रोजी ९०० तर १३ सप्टेंबर रोजी केवळ त्र्यंबकेश्वरसाठी १२०० फेऱ्या केल्या. शिर्डीसाठीही या दोन दिवसांत शेकडो फेऱ्या मारण्यात आल्या. वणी गडावर जाण्यासाठी मात्र प्रवाशांचा फारसा ओघ नव्हता. तेथे १२ आणि १३ सप्टेंबर या दोन दिवसांत केवळ ६७ फेऱ्या मारण्यात आल्या. पुण्याकडे जाण्यासाठी भाविकांची अधिक गर्दी होती. म्हणून १४ सप्टेंबर रोजी नियमित बससेवेव्यतीरिक्त २७ जादा बसेस सोडण्यात आल्याची माहिती बंड यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेससह भुजबळांचे शक्तीप्रदर्शन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील दुष्काळ, शेतकरी आत्महत्या व कर्जमाफीच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी नाशिकसह जिल्ह्यात सर्वत्र आंदोलन करण्यात आले. शहरात द्वारका चौकात भुजबळांनी आपली पूर्ण शक्ती सरकारच्या विरोधात एकवटत जेलभरो आंदोलन यशस्वी केले. शहरासह जिल्हाभरात ४५ हजार शेतकरी या आंदोलनात उतरल्याचा दावा पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी केला आहे.

राज्यात दुष्काळाची भयावह परिस्थिती निर्माण झाली असून राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. मात्र, राज्य सरकारकडून कुठल्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाही. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सरकारचे डोळे उघडले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा 'राष्ट्रवादी'चे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.

द्वारका चौफुली येथे भुजबळ हे आंदोलक शेतकऱ्यांसह बैलगाडीतून आले. त्यांनी सरकारचा निषेध केला. यावेळी सुमारे पाच हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आंदोलनस्थळी सरकारच्या निषेधार्थ प्रेतयात्रा काढण्यात आली. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी द्यावी, ताबडतोब दुष्काळ जाहीर करावा अशा आशयाची पोस्टर, फलक दाखवून सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी सुमारे दीड तास द्वारका चौफुली येथे ठिय्या मांडला. त्यानंतर छगन भुजबळ यांच्यासह आंदोलकांना अटक करून भद्रकाली तसेच गंगापूर पोलिस स्टेशन आदी ठिकाणी नेण्यात आले. दरम्यान, आंदोलकांमुळे रस्त्यावर वाहने खोळंबली आणि नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला.

पोलिसांची वाहने अपुरी

शेतकरी व कार्यकर्त्यांची संख्या जास्त असल्याने त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांकडे वाहने कमी पडली. शेवटी आंदोलकांना परतण्याचे आवाहन पोलिसांनी केले. आमदार पंकज भुजबळ यांना नांदगाव, आमदार नरहरी झिरवाळ यांना दिंडोरी, आमदार दीपिका चव्हाण तसेच अॅड. रवींद्र पगार यांना सटाणा येथे अटक करण्यात आली.

जनतेची दिशाभूल थांबवा

छगन भुजबळ म्हणाले, की राज्यात भयावह दुष्काळाची परिस्थिती आहे. मात्र, सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उदासीन असून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा फटका राज्यातील शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांना बसत आहे. राज्यात मराठवाड्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातही भिषण दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागात सरकारने ठोस उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी आमची मागणी आहे. केवळ १५ वर्ष यांनी काय केले हे सांगत महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images