Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

'एलबीटी'ची तयारी सुरू

0
0
स्थानिक स्वराज्य संस्थाकर अर्थात 'एलबीटी' लागू करण्याबाबत हायकोर्टाने २६ मार्च रोजी स्पष्ट निर्देश दिले होते.

माकपने केला तब्बल २८ तास 'रास्ता रोको'

0
0
राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांकडून केली जाणारी विविध आंदोलने नागरिकांसाठी नवीन नाहीत. मात्र कळवण तालुक्यात मार्क्सवादी काम्युनिस्ट पार्टीने केलेले तब्बल २८ तासांचे 'रास्ता रोको' आंदोलन चर्चेचा विषय बनले आहे.

मिरवणुकीचा खर्च दुष्काळग्रस्तांसाठी

0
0
राज्यात पडलेल्या दुष्काळाची धग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात राजकीय पदाधिकारी दुष्काळ निवारणाचा आव आणत असले तरी त्यांच्याकडून आयोजित कार्यक्रम, मिरवणूक याद्वारे पैशाची उधळपट्टी सुरूच आहे.

MPSC हेल्पलाइनची कनेक्टिव्हिटी ढासळली

0
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे गेल्या आठवड्यात राज्यातील तीन लाख परीक्षार्थींचा डेटा करप्ट झाला होता. यानंतर मोठ्या दबावाने आयोगाने परीक्षेची तारीख पुढे ढकलली.

प्रवाशांसह एसटीला झळ

0
0
'माकप'तर्फे पुकारण्यात आलेल्या आंदोलनामुळे गुजरात हायवेवरील वाहतूक बंद झाली होती. सलग २८ तासांहून अधिक काळ चाललेल्या या आंदोलनामुळे गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे सर्वाधिक हाल झाले, तसेच एसटी महामंडळालाही फटका बसला.

कुटुंबासह भर उन्हात मांडले रस्त्यावर ठाण!

0
0
विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी काम्युनिस्ट पार्टीने सुरू केलेले 'रास्ता रोको' आंदोलन तब्बल २८ तासांनी मागे घेण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या कुटुंबासह भर उन्हात डांबरी रस्त्यावर ठाण मांडले होते.

वाडकरांचे अपील फेटाळण्याची शक्यता

0
0
जमीन व्यवहार प्रकरणात गायक सुरेश वाडकर यांनी प्रांतांकडे दाखल केलेले अपील फेटाळले जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणी प्रांत विनय गोसावी १६ एप्रिल रोजी निकाल देणार आहेत.

'रासबिहारी'वर कारवाईची मागणी

0
0
रासबिहारी शाळेने विद्यार्थ्यांचे दाखले पाठवून दिल्याच्या घटनेमुळे संबंधित पालक अधिक आक्रमक झाले आहेत.

३ महिन्यांत विनयभंगाच्या तक्रारींत वाढ

0
0
दिल्ली येथे एका युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर केंद्र सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसाठी लैंगिक हिंसाचार कायदा लागू केला. या कायद्यातील कठोर तरतुदींचा प्रभाव आता दिसू लागला असून मागील तीन महिन्यांत शहर पोलिसांकडे विनयभंगाचे तब्बल ३४ गुन्हे दाखल झाले आहेत.

नराधम बापाकडून मुलीचा लैंगिक छळ

0
0
नराधम बापाकडून होत असलेल्या लैंगिक छळाला कंटाळून १६ वर्षीय मुलीने शुक्रवारी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिच्या अत्याचारी वडिलांचा शोध सुरू केला आहे.

गोदावरीला द्या पोलिस संरक्षण

0
0
गोदावरी नदीचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी पालिका प्रशासन आणि राज्य सरकारचे वारंवार कान उपटणा‍ऱ्या मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी गोदावरीला पोलिस संरक्षण देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले.

कंपन्यांनी आपत्ती व्यवस्थापन 'टोल'वले!

0
0
जिल्ह्यातील प्रमुख हायवेवर कोट्यवधीचा टोल वसूल करणाऱ्या टोलनाक्यांच्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक कुठल्याही प्रकारची उपाययोजना नसल्याची बाब पुढे आली आहे.

'टुल डाउन'वर तोडगा नाहीच

0
0
इगतपुरीतील महिंद्रा अँड महिंद्राच्या प्लाण्टमध्ये भारतीय कामगार सेना आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात शुक्रवारी झालेली बैठक निष्फळ ठरल्याने मंगळवारपासून सुरू असलेले टुल डाउन (काम बंद) आंदोलन येत्या सोमवारपर्यंत सुरू राहणार आहे.

‘क्राऊड मॅनेजमेंट’साठी एसटीचा प्रस्ताव

0
0
गेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वच स्तरांवर विचारमंथन सुरू असताना, एसटीने स्वतःहून या ‘क्राऊड मॅनेजमेंट’साठी जिल्हा प्रशासनाला स्वतंत्र प्रस्ताव सादर केला आहे.

इजिप्तची ममी संस्कृती नाशिकमध्ये!

0
0
इजिप्तमध्ये हजारो वर्षांपूर्वी बांधलेले पिरॅमिड आणि जतन केलेलं शव म्हणजेच 'ममी'. इजिप्तमधील ही ममीसंस्कृती नाशिकमधील कोकणा (कोकणी) आदिवासी समाजातही रूढ असल्याचे पुरावे आढळले आहेत.

फुकटचंदांकडून २९ लाख वसूल

0
0
मध्य रेल्वेच्या नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरील तिकीट तपासनीसांनी मागील आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. एप्रिल २०१२ ते मार्च २०१३ या वर्षात ५०५२ प्रवाशांकडून सुमारे २९ लाख रुपयांचा दंड वसूल करून रेल्वेच्या महसुलात भर घातली आहे.

घरफोड्यांत गेला दोन लाखांचा ऐवज

0
0
शहरातील कामटवाडा व नाशिकरोड भागांत भरदिवसा झालेल्या घरफोडीच्या दोन घटनांत चोरट्यांनी दोन लाखांचा ऐवज लंपास केला. कामटवाड्यातील वरदलक्ष्मी सोसायटीत राहणाऱ्या अमोल शिवाजी येवला यांच्या घराचा कडी-कोयंडा व लॅच तोडून चोरट्यांनी तब्बल दीड लाखांचा ऐवज लंपास केला.

इंडस्ट्रीच्या विकासासाठी अत्यंत पोषक

0
0
नाशिक ही औद्योगिक नगरी असली तरी येत्या काळात या नगरीत असंख्य उद्योग येण्याची शक्यता आहे. त्यासाठीची क्षमता आणि संधी 'नाशिक रायझिंग'द्वारे सगळ्यांच्या समोर आल्या आहेत.

खासगी विद्यापीठाला छात्रभारतीचा विरोधच!

0
0
खासगी विद्यापीठांबाबतच्या विधेयकावर स्वाक्षरी न करता राज्यपालांनी ते परत पाठवूनही राज्यात खासगी विद्यापीठे स्थापन करण्याबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका सरकारने मांडलेली नाही.

प्रेसमध्ये कामबंद आंदोलन सुरूच!

0
0
प्रेसमध्ये अंगझडती घेण्यावरून शुक्रवारी रात्री केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान व कामगारांत झालेल्या वादानंतर जवानांनी केलेल्या लाठीमारात दोन कामगार जखमी झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी आयएसपी, सीएनपीमध्ये शुक्रवार रात्रीपासून पुकारलेले कामबंद आंदोलन अजूनही सुरूच आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images